मोदी सरकारची धोरणे शेती विरोधी : आमदार जयंत पाटील यांची मोदी सरकारवर सडकून टीका
कार्ट्यां बिनधास्तपणे सिगारेट ओढतात: अजित पवार
पुणे- चल म्हटली कि निघाली … हे गिरीश बापटांचे वक्तव्य आता कुठे विस्मरणात जाते ना जाते तोच कार्ट्यां बिनधास्तपणे सिगारेट ओढतात असे वक्तव्य आज माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांनी केले आहे .
आधुनिक काळात कार्ट्यांचे (मुली) व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः शहरातील कार्ट्या बिनधास्तपणे सिगारेट ओढतात. ठराविक वयात आणि चुकीच्या मित्र परिवारामुळे दिवसेंदिवस मुलींमधील व्यसनाधिनता वाढली आहे. असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित स्वर्गीय आर. आर. पाटील कॅन्सर साक्षर व कॅन्सरमुक्ती अभियानात ते बोलत होते.
जीवनशैली बदलल्यामुळे अनेकांकडून चक्क आनंदात, दुःखात, विजयात आणि मूड नसताना दारु घेतली जाते. ग्रामीण भागात पोलिसांना सापडणार नाही, असे दारुचे गुत्ते दारूड्यांना लगेच आढळून येतात.
तंबाखू, दारू, सिगारेटमुळे कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्याचे पवारांनी सांगितले. देशात सर्वाधिक कॅन्सर रुग्ण असलेल्या यादीत महाराष्ट्र राज्याचा क्रमांक सर्वात आधी लागतो काय, अशी भीती पवारांनी व्यक्त केली. पुर्नजन्म सारख्या गोष्टी अंधश्रद्धा असल्याचे सांगत जन्माला आल्यानंतर चांगले काम केले पाहिजे. नाहीतर निरोगी शरीर व्यसनामुळे वाया जाईल, असे ते म्हणाले. विशेषत दारू पिणाऱ्या मुलींबाबत त्यांनी काळजी व्यक्त केली.
बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला 300 कोटी कां दिले ?: अजित पवार
पुणे: कोथरुडमधील ठरलेल्या जागेवर शिवसृष्टीचा निर्णय करत नाही,ती बीडीपी च्या जागेत ढकलता आणि नंतर लगेचच आंबेगावमधील बाबासाहेब पुरंदरे उभी करत असलेल्या शिवसृष्टीला 300 कोटी देता? तुम्ही पुणेकरांची फसवणूक करत आहात, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
लाल महालात आयोजित करण्यात आलेल्या बहुजन अस्मिता परिषदेत पवार बोलत होते. स्मारकांसंबंधाने शासनाने काढलेला जीआर वाचून दाखवत पवारांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
फडणवीस सरकारने फक्त घोषणा केल्या. शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाची भूमिपूजने केली, मात्र कुठलेही काम सुरू नाही. जिजाऊंच्या सिंदखेडराजाला निधीची घोषणा केली, मात्र एक काम सुरू नाही.
लोकांची मागणी असलेल्या कोथरुडमधील जागेवर शिवसृष्टीचा निर्णय करत नाही आणि कोणालाही विश्वासात न घेता आंबेगावमधील बाबासाहेब पुरंदरे उभी करत असलेल्या शिवसृष्टीला ३०० कोटी कसे काय देता? सरकार पुणेकरांची फसवणूक करत आहे. हे सरकार करतंय इतकं दुटप्पी राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते.
पवार म्हणाले, कुठलेही आणि सोयीचे निर्णय घेतले जात आहेत. दीपक मानकर आणि सहकाऱ्यांनी कोथरुडला शिवसृष्टी उभारण्याची मागणी लावून धरली होती. मेट्रोच्यावर स्लॅब टाकून शिवसृष्टी उभारता आली असती. पण ती बीडीपीमध्ये उभारण्याचा निर्णय झाला. त्यासंदर्भात सह्याद्रीवर बैठक झाली. त्यानंतर दोन दिवसांत कुणालाही न सांगता आंबेगाव येथील बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला 300 कोटी देण्यात आले. वास्तविक राज्य सरकार किंवा महानगरपालिकेशी संबंधीत कामाला पैसे दिले असते तर चालले असते. यात पुणेकरांना फसवले जातेय. एकीकडे बीडीपीमध्ये शिवसृष्टी उभारणार असे म्हणताय, दुसरेकडे 300 कोटी देवूनही टाकताय. त्या शिवसृष्टीसंबंधी पर्यटनाचे निर्णयही घेताय. हे दुटप्पी राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते. स्पष्टपणे सांगायला हवे होते, तीच शिवसृष्टी उभारु म्हणून. तिथे विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष बनवून काम करता आले असते.
दोन महिन्यात २४ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करा!: विखे पाटील
मुंबई-शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी सहा महिन्यात २४ हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा केली आहे. परंतु, अभियोग्यता चाचणी झालेली असताना सरकारला सहा महिन्यांचा वेळ कशाला हवा? सरकार प्रामाणिक असेल तर तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करून दोन महिन्यात २४ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
शिक्षण मंत्र्यांच्या विधानासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, सवंग लोकप्रियतेसाठी वाट्टेल ती घोषणा करण्याची या सरकारची भूमिका यापूर्वी अनेकदा अनुभवली आहे. त्यामुळे २४ हजार शिक्षकांच्या भरतीसंदर्भात शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अभियोग्यता चाचणी यापूर्वीच झालेली असल्याने उर्वरित प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करणे शक्य आहे. सरकार प्रामाणिक असेल तर पुढील २ महिन्यात २४ हजार शिक्षकांची भरती झालीच पाहिजे. यासंदर्भात तातडीने कार्यवाही सुरू झाली नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी दिला.
भारतीय जनता पक्षाने देशात वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात दिवसाला फक्त ४५० म्हणजे वर्षाकाठी २ लाखांपेक्षा कमी रोजगाराची निर्मिती होते आहे. रोजगारनिर्मितीचे आश्वासन पूर्ण करता आले नाही म्हणून सरकारने माफी मागण्याऐवजी पकोडे विकण्याचा फुकटचा सल्ला देऊन बेरोजगारांची थट्टा होत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी यावेळी केला.
जाळ्या बसवून मंत्रालयाला सर्कशीचा तंबू बनविण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडवा!: विखे पाटील मुंबई-
मुंबई-मंत्रालयातील वाढते आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी पहिल्या मजल्यावर संरक्षक जाळ्या बसवून फारसा उपयोग होणार नाही. उलट जाळीवर उडी मारल्यास जीव जाणार नाही, फार तर हात-पाय तुटतील; पण आपल्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले जाईल,अशी भावना निर्माण झाल्यास अन्यायग्रस्त रोज मंत्रालयात उड्या मारू लागतील. त्यामुळे ही सर्कस करण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडविण्याचे सरकारने प्रामाणिक प्रयत्न करावेत,असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
नागपूर महानगर पालिकेच्या एका अन्यायग्रस्त कर्मचाऱ्याने नागपुरातील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान‘रामगिरी’समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. अशा आत्मघातकी पद्धतीने कोणीही आपल्यावरील अन्यायाविरूद्ध दाद मागू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पण सोबतच जनतेमध्ये इतकी टोकाची भावना का निर्माण होते, याचे सरकारने आत्मचिंतन करण्याची आवश्यकताही विरोधी पक्षनेत्यांनी विषद केली. ते म्हणाले की, सरकारकडून न्याय मिळत नाही म्हणून मंत्रालयात येऊन जीव देण्याचे दुर्दैवी लोण आता मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत येऊन थडकले आहे. मंत्रालयातून कोणी उडी घेऊन आत्महत्या करू नये म्हणून पहिल्या मजल्यावर संरक्षक जाळ्या उभारण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. पण हा या घटनांवरील इलाज नाही. संरक्षक जाळी असल्याने जीव जाणार नाही, याची खात्री पटली तर आपल्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाखी लोक रोज मंत्रालयातून उड्या मारायला लागतील. त्यामुळे अशी सर्कस करून जनतेला कोलांटउड्या मारण्यास भाग पाडण्याऐवजी जनतेत आत्महत्या करण्याचा विचारच येणार नाही, अशा पद्धतीने सरकारने काम करावे, असेही विखे पाटील पुढे म्हणाले.
“ती’च्याकरिता-आम्ही साऱ्याजणी’ महापलिकेच्या महिला बालकल्याण समितीची विशेष मोहीम
पुणे : शहरातील सर्वच घटकांतील महिलांना सहजासहजी “सॅनिटरी नॅपकिन’ उपलब्ध करून देण्याकरिता महिला बचतगटाच्या पुढाकारातून “ती’च्याकरिता-आम्ही साऱ्याजणी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून झोपडपट्ट्या मुख्यतः आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील महिला आणि युवतींना मोफत “सॅनिटरी नॅपकिन’ पुरविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात दर महिन्याला सुमारे दोनशेहून अधिक महिलांना सामावून घेण्यासाठी नॅपकिनची व्यवस्था केली जाणार असून, पुढील आठवड्यापासून या मोहिमेला सुरवात होणार आहे.अशी माहिती महापलिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राणी रायबा भोसले यांनी येथे दिली .
गरजू महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरविण्याच्या मोहिमेला सहकार्य करण्यासाठी बचत गटांनीही प्रतिसाद दिला आहे. राजकीय क्षेत्रासह नोकरी आणि व्यवसाय करीत असलेल्या 50 ते 60 महिला एकत्र आल्या आहेत. त्या महिन्याकाठी पाचशे रुपये जमा करतील. त्यातून नॅपकिनची खरेदी करण्यात येणार आहे. त्या त्या भागात केंद्र सुरू केले जातील. ज्यामुळे काही महिलांना रोजगार उपलब्ध होतील. असे मोहिमेच्या समन्वयक आणि महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राणी भोसले यांनी सांगितले.
झोपडपट्ट्यांमधील महिलांमध्ये नॅपकिनबाबत जागृती व्हावी, या उद्देशाने “तिच्याकरिता-आम्ही साऱ्याजणी’ ही मोहीम सुरू केली आहे. परंतु, अनेकजणी केवळ आर्थिक अडचणीमुळे नॅपकिन वापरत नसल्याचे पाहणीत आढळून आले. त्यात, युवतींचाही समावेश आहे. नॅपकिनचा वापर होत नसल्याने महिला आणि युवतींच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे केवळ जागृतीचा उपाय न करता नेमक्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्व म्हणून विविध क्षेत्रातील महिलांना एकत्र आणून गरजू महिलांना मोफत नॅपकिन देण्याचा विचार पुढे आला, असे भोसले यांनी सांगितले.
‘जीएसटी’ची मध्यमवर्गीयांना झळ बसतेय – इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित ‘जीएसटी’वरील राष्ट्रीय चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर
92 वर्षाच्या आजी तब्बल सात तास ताटकळत उभ्या राहिल्या..अन अखेर झालो सलमान भेट …
पुणे : अवघ्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या सुपरस्टार असलेल्या सलमान खानला भेटण्यासाठी त्याची ९२ वर्षांची फॅन तब्बल १५ वर्षांपासून प्रतीक्षा करीत होती. त्याचा दररोज एक सिनेमा पाहण्याचा त्यांचा छंद आजही कायम जपलेला. पुण्यात आलेल्या सलमानला भेटण्यासाठी या आजीबाई तब्बल सात तास ताटकळत उभ्या राहिलेल्या. त्यांचं सलमान खानला भेटण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं ते एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संवेदनशीलतेमुळे. पुणे पोलीस दलाचे ‘गनमॅन’ पोलीस हवालदार शैलेश जगताप यांनी या आजींची सलमानशी भेट घालून देत अनोख्या पद्धतीने शुक्रवारी वाढदिवस साजरा केला.
कलावती सतीश कल्लम (वय ९२, रा. रास्ता पेठ) असे या आजींचे नाव आहे. कल्लम या गृहीणी आहेत. त्यांच्यावर मुलांचे आणि नातवांचे प्रचंड प्रेम आहे. कल्लम कुटुंबीयांचा केक बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय असून रास्ता पेठेमध्ये त्यांची बेकरी आहे. या बेकरीला त्यांनी ‘ग्रॅनीअम्माज केक’ असे नाव दिले आहे. कलावती यांनी १९९४ साली प्रदर्शित झालेला हम आपके है कौन? हा चित्रपट पाहिला अन् त्या सलमान खानच्या प्रेमात पडल्या. तेव्हापासून आजतागायत त्या सलमानचा एक चित्रपट दररोज पाहतात. मागील पंधरा वर्षांपासून त्यांनी सलमान खानला भेटायचा चंग बांधला होता. त्यासाठी त्यांनी काही मंत्र्यांची आणि लोकप्रतिनिधींचीही भेट घेतली होती. मात्र, सलमान हा सुपरस्टार असल्याने तुमची भेट होणार नाही असे त्यांना सांगण्यात येत होते.
नुकतेच सलमान खान पुण्यामध्ये एका सराफी दुकानाच्या उद्घाटनासाठी आला होता. त्याला भेटण्यासाठी या आजी सात तास ताटकळत उभ्या होत्या. परंतू, प्रचंड गर्दी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. कलावती यांच्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्या पाहून पोलीस हवालदार शैलेश जगताप यांनी त्यांची माहिती काढली. जगताप यांचे मित्र असलेल्या श्रीधर कल्लम यांची ती आजी असल्याचे त्यांना समजले. त्यांनी श्रीधर यांना बोलावून सलमान खानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
सलमानचा अंगरक्षक शेरा हा जगताप यांचा मित्र आहे. जगताप यांनी शेराशी संपर्क साधला. जगताप यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. वाढदिवसाचा गाजावाजा न करता जगताप यांनी या आजींना अनोखी भेट देण्याचे ठरविले. आजींना घेऊन जगताप, परवेझ जमादार आणि नातू श्रीधर मुंबईला रवाना झाले. संध्याकाळी फिल्म सिटीमध्ये गेल्यानंतर थेट सलमान खानची शुटींग सुरु असलेल्या ठिकाणी सर्वजण पोचले. सलमान खानने या आजीबाईंना पाहून त्यांना मिठीच मारली. त्यांच्या आपल्यावरील प्रेमाने त्याला भरुन आले. भावूक झालेल्या सलमानने आजींनी खास त्याच्यासाठी नेलेला केक कापला. आजींना स्वत: सर्वत्र फिरुन शुटींग दाखवले. हे सर्व घडत असताना आजींच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला होता. सलमान या आजींना गाडीपर्यंत सोडायला आला. त्याच्या विनम्रतेमुळे आजीबाई भारावून गेल्या होत्या. सलमानने पोलीस हवालदार शैलेश जगताप यांचे कौतुक करतानाच त्यांना धन्यवादही दिले. तरुण अभिनेता आणि वृद्ध चाहतीची झालेली भेट सर्वांसाठी अनोखी ठरली.
कलावती आजी सलमानच्या खुप मोठ्या चाहत्या आहेत. त्यांची भेट सलमानशी घालून दिली याचा मला विशेष आनंद आहे. योगायोगाने सलमानचा अंगरक्षक माझा मित्र आहे. माज्या वाढदिवसाच्या दिवशी हा योग जुळून आला. सलमान खानने खुप अगत्याने आजींचे स्वागत केले आणि त्यांच्यासोबत वेळही घालविला.
– शैलेश जगताप, पोलीस हवालदार
मी सलमानची जबरदस्त चाहती आहे. माझे १५ वर्षांचे स्वप्न आज पूर्ण झाले. सलमानला पाहून मला खूप आनंद झाला. मी त्याच्यासाठी नेलेला केक त्याने कापला. मला स्वत: सोबत घेऊन फिल्म सिटीमध्ये फिरला. पोलीस हवालदार शैलेश जगताप यांनी हा योग जुळवून आणला. मला खूप आनंद झाला आहे.
– कलावती कल्लम
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत फातिमा मुजावर प्रथम
डेक्कन जिमखाना तर्फे अनिल. जी. रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग स्पर्धेला 13 फेब्रुवारी पासून प्रारंभ
पुणे- डेक्कन जिमखाना तर्फे अनिल. जी. रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर दि.13 ते 17 फेब्रुवारी 2018 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक मिहिर केळकर यांनी सांगितले की, स्पर्धेचे दुसरे वर्ष असून सर्व सामने विद्युत प्रकाश झोतात होणार आहेत. स्पर्धेत 150 हून अधिक सभासदांची निवड लिलाव पध्दतीने करण्यात आली असून यातील संघाचे मालक हे क्लबचे सभासद असून यात 8 संघ सहभागी झाले आहेत.
ते पुढे म्हणाले की, स्पर्धेत प्रत्येक संघात एकुण 10 खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे सामने 7 षटकाचे होणार आहेत. स्पर्धेसाठी क्रिकेट टेनिस बॉलचे सर्व नियम लागू आहेत. स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने 13 ते 15 फेब्रुबारी दरम्यान होणार आहेत तर सुपर लीग सामने 16 फेब्रुवारी रोजी होती.स्पर्धचा उपांत्य व अंतिम फेरीचे सामने दि. 17 फेब्रुवारी 2018 या दिवशी होणार आहे.
स्पर्धेत हॉग्स, हॅट्ट्रिक्स्, मोटिव्हेटर्स, स्पार्टन्स, नॉर्थ-वेस्ट टायगर्स, वाडेश्वर विझार्डस, एमजे वुल्वस्, सिटी प्राईड सुपरस्टार हे 8संघ झुंजणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, डेक्कन जिमखान्या तर्फे 17 फेब्रुवारी रोजी विशेष कामायनी संस्थेतील मुलांसाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन केले गेले आहे. विशेष मुलांसाठी कामयानी संघटनेने हाती घेतलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक जागरूकता वाढावी व लोकांना या कार्याची ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम आहे.
‘व्हॅलेंटाइन व्हाया ‘What’s up लग्न’
‘कॅाफी आणि बरंच काही’ आणि ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातील प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही जोडी रसिकांची फेव्हरेट ठरली होती. दोघांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावल्याने ही जोडी पुन्हा कधी एकत्र येते याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली होती. ‘What’s up लग्न’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना-वैभव पुन्हा एकत्र दिसणार असल्याने ही जोडीच यंदाचं ‘व्हॅलेंटाइन कपल’ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
‘व्हॅलेंटाइन डे’ म्हटला की दिवसभर आपल्या प्रिय व्यक्तीसोबत धम्माल करायची. सकाळी उठल्यापासूनचा प्रत्येक क्षण तिच्यासोबत घालवायचा. यात भेटवस्तू देणं, कॅाफी शॅापमध्ये जाऊन गप्पा मारणं, निसर्गरम्य स्थळी जाऊन आपल्या जीवनातील रोमँटिक क्षण कैद करण्यासोबतच आपल्या प्रिय व्यक्तीला जे आवडतं ते करण्यातच स्वत:चा आनंद मानणं हे सुद्धा आलंच. वैभव-प्रार्थना हे यंदाचं व्हॅलेंटाइन कपल ‘What’s up लग्न’ या चित्रपटात अशाच प्रकारचे रोमँटिक क्षण साजरे करताना दिसणार आहे.
फिनक्राफ्ट मीडिया’ अँड ‘एन्टरटेन्मेंट प्रा. लि’. या बॅनरखाली तयार झालेल्या ‘What’s up लग्न’ या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे. जाई जोशी व व्हिडीओ पॅलेस हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. हा चित्रपट १६ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
‘रॉयल ट्वींकल’, ‘सिट्रस’ गुंतवणूक बुडवणार्यांवर कडक कारवाई होणार : मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
पुणेकरांना आता घडणार खगोल विश्वाची सफर ! सात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उदघाटन..
आंबेगाव च्या खाजगी शिवसृष्टीला ३०० कोटीचा मलिदा दिल्याने वातावरण गढूळ -चेतन तुपे पा.
पुणे- कोथरूड येथील शिवसृष्टीच्या विषयावर पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना चांदणी चौकातील जागेवर ती उभारण्याचे आश्वासन दिलेले असताना मुख्यमंत्र्यांनी आंबेगाव येथील दुसऱ्या एका खाजगी शिवसृष्टीला भूखंड देण्याचा अध्यादेश 2 दिवसातच काढल्याने , आणि पालिकेत भाजपने कोथरूडच्या मूळ जागेवरील हक्क सोडून देणारी उपसूचना दिल्याने याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे ते दूर करण्याचे काम महापौर आणि सत्ताधाऱ्यांनी करावे असे आवाहन करत खाजगी शिवसृष्टीला ३०० कोटीचा मलिदा देण्यात आल्याचा आरोप आज पालिकेतील खास सभेत बोलताना विरोधीपक्ष नेते चेतन तुपे पाटील यांनी केला .
ते म्हणाले आमचा शिवसृष्टीला विरोध नाही ,ती व्हावी अशीच मागणी आहे ,त्यासाठी आम्ही दीपक मानकर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय सर्वांनी एकमताने कमानी केला . पण लगेचच एक दिवस जाताच मुख्यमंत्र्यांनी आंबेगाव येथे एका खाजगी शिवसृष्टीला ३०० कोटीचा मलिदा दिल्याने वातावरण संशयाचे आणि गढूळ होत आहे . याबाबत सत्ताधाऱ्यांनी खुलासा करणे आवश्यक आहे … पहा आणि ऐका चेतन तुपे यांचे शिवसृष्टी वरील खास सभेतील हे भाषण ….
जिजाऊंची बदनामी केली ,त्या पुरंदरेंना शिवसृष्टीसाठी जागा देवून शिवप्रेमींवरच फडणवीसांनी साधला गनिमी कावा – अरविंद शिंदेंचा घणाघात-शिवसृष्टीचा निर्णय म्हणजे फिक्सिंग आणि षड्यंत्र असल्याचा आरोप
पुणे- दीपक मानकर यांच्यामुळे शिवसृष्टीचा निर्णय घेणे भाग पडले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन पण त्यांना फसवलं गेलंय.. असे सांगत एकीकडे आमच्याशी 6 फेब्रुवारीला शिवसृष्टीबाबत बोलणी करून आश्वासन दिले आणि दुसरीकडे तातडीने ८ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांनी …ज्यांनी जिजाऊमातेची बदनामी केली ,ज्यांनी जेम्स लेन ला मार्गदर्शन केले त्या बाबासाहेब पुरंदरेंना खाजगी शिवसृष्टीसाठी आंबेगाव ला जागा देण्याचा अध्यादेश काढून शिवप्रेमींवर च गनिमी कावा केल्याचा आरोप कॉंग्रेसचे गट नेते अरविंद शिंदे यांनी आज महापालिकेच्या मुख्य सभेत केला .
मुख्यमंत्र्यांनी शिवसृष्टीबाबत मुंबईत घेतलेली बैठक म्हणजे मॅच फिक्सिंग आणि षड्यंत्र होते असेही त्यांनी म्हटले आहे . आम्ही शिवसृष्टी चांदणी चौकात व्हावी यासाठी आजच्या सभेतील उपसूचनेला पाठींबा देतो ..पण शिवतारे यांच्या सूचनेप्रमाणे बीडीपी ची अजमेरा बिल्डरची जागा मोकळी करायची होती काय ?असा सवाल करत 2 महिन्यात हि जागा ताब्यात घेतली तर आपण स्वतः मुख्यमंत्र्यांच्या नावाचा जयजयकार करू ..पण हि वेळ येणार नाही हे मला ठाऊक आहे …असे शिंदे म्हणाले .
आंबेगाव येथे पुरंदरे यांच्या संस्थेला जागा देण्याचा अध्यादेश काढल्याची माहिती सभागृहात देत त्यांनी ..मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली …पहा आणि ऐका त्यांचे भाषण जसेच्या तसे ….









