Home Blog Page 3193

डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

0
‘जश्न – ए -सर सय्यद’ : अल्पसंख्याकांच्या शिक्षण महर्षीच्या, प्रागतिक विचारांचा पुण्यात महोत्सव
पुणे :‘डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट’ आणि ‘नॅशनल कौंसिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज’, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जश्‍न – ए- सर सय्यद’ या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवार, दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता हाय-टेक हॉल, आझम कॅम्पस येथे होणार आहे, अशी माहिती डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट च्या अध्यक्ष आबेदा इनामदार यांनी पत्रकाद्वारे दिली.
अल्पसंख्याकांच्या शिक्षण महर्षीच्या विचारांचा, प्रागतिक विचारांचा पुण्यात महोत्सव या निमित्ताने  होत आहे.
सर सय्यद यांना अल्पसंख्यक शैक्षणिक , सामाजिक, प्रागतिक चळवळीचे प्रणेते मानले जाते.
प्रसिद्ध लेखक आणि संशोधक शामिम तारिक (मुंबई) यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यशाळेमध्ये डॉ. गुलाम दस्तगीर (संचालक,‘डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट’), डॉ. कमार सिद्दीकी (मुंबई), डॉ.अल्ताफ अन्जुंमन (काश्मीर), डॉ. काझी नावेद (औरंगाबाद), डॉ. जनीसार मोईन (हैदराबाद), डॉ. समीना पठाण (पुणे) आदी सहभागी होणार आहेत.
कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.तारिक मन्सूर (कुलगुरू, अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी) असून, डॉ. पी.ए.इनामदार (नॅशनल कौंसिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज, नवी दिल्ली, मंडळाचे माजी सदस्य) उपस्थित राहणार आहेत.
कार्यशाळेचा समारोप कार्यक्रम डॉ. ए. आर. शेख असेंब्ली हॉल, आझम कॅम्पस येथे होणार आहे.

‘पद्मश्री’ नामदेव ढसाळांचे साहित्य‘नोबेल’ पुरस्काराच्या योग्यतेचे ! – आचार्य रतनलाल सोनग्रा.

0
पुणे:  राजगुरुनगर येथील महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर तर्फे पंचायत सभागृहात ‘पद्मश्री’ नामदेव ढसाळ यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या नावाच्या काव्यप्रतिभा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अध्यक्षपदावरून बोलताना आचार्य रतनलाल सोनग्रा म्हणाले, “पद्मश्री नामदेव ढसाळ” हे उपेक्षित वंचितांचे वास्तववादी साहित्यिक होते. त्यांनी दलित जनतेला जबर हिंमत दिली. त्यांच्या लढाऊ संघटनेचा धाक जातीयवादी लोकांना होता. त्यामुळे ग्रामीण भागातील दलितांना संरक्षण मिळाले. साहित्यकार हा कोणत्या जातीधर्माचा, राष्ट्राचा नसून तो संपूर्ण जगाचा आणि मानवतेचा प्रवक्ता असतो.
क्रांतीकारी विचारांची विद्रोही मंडळी हे विद्रूप कुरुप जग सुंदर करण्यासाठी झटतात. ते सौंदर्याचा द्वेष करू शकत नाही. प्रख्यात क्रांतीकारी राजगुरू यांची आठवण सांगताना आचार्य सोनग्रा म्हणाले,“एकदा आपल्या खोलीत त्यांनी एका सुंदर महिलेचे कॅलेंडर टांगले. भगतसिंह, सुखदेव राजगुरूच्या खोलीत ते चित्र पाहून चंद्रशेखर आझाद यांनी ते कॅलेंडर फाडून टाकले. राजगुरूंनी चंद्रशेखरांना विचारले तुम्ही ते कॅलेंडर का फाडले? ‘जग सुंदर करायला निघालात.. सुंदर गोष्टींना नष्ट करून कसे चालेल?’ चंद्रशेखर यांनी राजगुरूंकडे दिलगिरी व्यक्त केली.
पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे साहित्य जागतिक उंचीचे आहे. भारताला जर साहित्याचे नोबेल मिळाले तर ते पद्मश्री नामदेव ढसाळ सारख्या प्रखर साहित्यिकालाच मिळेल!”सासवड साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. श्री. विजय कोलते यांनी म. सा. प. ची चळवळ ग्रामीण भागात वळविण्यावर भर दिला.
म.सा.प. शाखा राजगुरूनगर, ग्रामपंचायत पुर व कै. नानासाहेब गोरंडे सार्वजानिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पाच काव्यसंग्रहांना रोख रक्कम, मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. लोककवी श्री. प्रशांत मोरे च्या सुमधुर आवाजातील कवितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. लोककवी श्री. प्रशांत मोरेंना आचार्य सोनग्रा यांनी आपला कबीरवाणी ग्रंथ भेट देऊन गौरव केला. दुसर्‍या सत्रात कसदार कवींचे बहारदार कवी संमेलन रंगले. सौ. शोभा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कवीसंमेलनात सुमारे ४० कवींनी सहभाग घेतला. यात आमदार श्री. जयदेव गायकवाड, दूरदर्शनचे माजी उपमहासंचालक अरूणम् सकट यांनी श्री. नामदेव ढसाळांच्या आठवणी सांगितल्या.  कार्यक्रमाचे मुख्य संयोजन व प्रास्तविक अध्यक्ष श्री. संतोष गाढवे यांनी केले तर नियोजन उपाध्यक्ष सदाशिव अमराळे यांनी केले. धर्मराज पवळे यांनी सूत्रसंचालन तर स्मिता पवळे यांनी आभार मानले.

महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

0

पुणे-महाशिवरात्रीनिमित्त नवसम्राट तरुण मंडळाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन महाशिवरात्रीनिमित्त सोमवार पेठमधील नरपतंगीर चौकातील नवसम्राट तरुण मंडळाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी भरत पटेल व भगवती पटेल व अविनाश लडकत व अश्विनी लडकत यांच्याहस्ते ओम नमः शिवाय पूजन होमहवन व लघुरुद्र अभिषेक व महापूजा करण्यात आले . यावेळी शिवभक्तानी दर्शनाचा लाभ घेण्यास गर्दी केली होती .

यावेळी शिवभक्तांना फराळवाटप वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन बाळासाहेब लडकत , अखिलेश विजय आगरवाल , अरुण गोसावी , हिराशेठ पारवानी , कुमार लडकत , सुधीर लडकत, संतान डिसोझा , संगिता लडकत , सविता लडकत व अलका लडकत यांनी केले होते . महाशिवरात्रीनिमित्त मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने शिवमंदिरात बालचमूंना शिवप्रभूंचे दर्शन घडवून महाशिवरात्री उत्साहात साजरी महाशिवरात्रीनिमित्त मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने पुणे लष्कर भागातील विविध शिवमंदिरात बालचमूंना शिवप्रभूंचे दर्शन घडवून महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी बालचमूंना मंजितसिंग विरदी यांच्याहस्ते फराळवाटप करण्यात आले . यावेळी मनप्रित विरदी , हरभजन कौर , मनमित विरदी , रिद्दीमा विरदी . सहेर विरदी आदी मान्यवर उपस्थित होते , या कार्यक्रमाचे संयोजन सूरज अग्रवाल , सायली रणधीर , शिवानी राठोड , रवी शर्मा , शीतल शर्मा आदींनी केले .

महाशिवरात्रीनिमित्त भोलेनाथ मित्र मंडळाच्या प्राचीन शिवमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न महाशिवरात्रीनिमित्त रास्ता पेठमधील शिवरकर मळ्यातील भोलेनाथ मित्र मंडळाच्या प्राचीन शिवमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले .यावेळी ओम नमः शिवाय पूजन होमहवन व लघुरुद्र अभिषेक व महापूजा किशोर शिवरकर यांच्याहस्ते करण्यात आले .यावेळी आनंद शिवरकर , नितीन शिवरकर , राजेंद्र शिवरकर , सुरेश शिवरकर , प्रभाकर शिवरकर आदी मान्यवर उपस्थित होते .

महाशिवरात्रीनिमित्त श्री समर्थ गुरु गोपालस्वामी महाराज (येगावकर) मठात महाशिवरात्र महोत्सव उत्साहात साजरा महाशिवरात्रीनिमित्त पुणे लष्कर परिसरातील रेसकोर्सजवळील श्री समर्थ गुरु गोपालस्वामी महाराज (येगावकर) मठात महाशिवरात्र महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी पहाटे पूजा , अभिषेक , होमहवन करण्यात आले . यावेळी हर्षवर्धन धिवार यांच्याहस्ते फराळवाटप करण्यात आले . या महाशिवरात्र महोत्सव आयोजन मोहन पगडेल्लू , शाम अवचरे , राजेंद्र बनसोडे , दत्तात्रय सणस , यशवंत ओव्हाळ व चंद्रशेखर नारायणे आदींनी केले होते . महाशिवरात्रीनिमित्त श्री राजेश्वर तरुण मंडळाच्यावतीने श्री शंकराची पूजा व अभिषेक महाशिवरात्रीनिमित्त पुणे लष्करमधील श्री राजेश्वर तरुण मंडळाच्यावतीने श्री शंकराची पूजा व अभिषेक पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरसेविका प्रियांका श्रीगिरी यांच्याहस्ते करण्यात आली . तर आरती श्री बालाजी सोशल ग्रुपचे अध्यक्ष राजेश श्रीगिरी यांच्याहस्ते करण्यात आली . यावेळी श्री राजेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील पैनारकर , कार्याध्यक्ष अशोक चेटपेल्ली , शशी निघोजकर , विकास सुबंध , अशोक काटरपवार , अनिल गोरे , धनराज परदेशी , गणेश राचलवार , राहुल बुलबुले , आदींनी केले होते .

महाशिवरात्रीनिमित्त जय शंभो नारायण ग्रुपच्यावतीने सामूहिक महामृत्युंजय जप महाशिवरात्रीनिमित्त पुणे लष्करमधील कोळसा गल्लीमधील जय शंभो नारायण ग्रुपच्यावतीने सामूहिक महामृत्युंजय जप करण्यात आला . यावेळी वाळूची पिंड तयार करण्यात आली होती . या कार्यक्रमाचे आयोजन योगेश होळकर , आकाश चव्हाण , हितेश गांधी , मयूर होळकर , शुभम कनोजिया , रोहित व्हावळ यांनी केले होते .

महाशिवरात्रीनिमित्त श्री प्रसन्नेश्वर शिवमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन महाशिवरात्रीनिमित्त सोमवार पेठ येथील शाहू उद्यानांमधील श्री प्रसन्नेश्वर शिवमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी प्रशांत मते यांच्याहस्ते अभिषेक व महापूजा करण्यात आले . या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन निलेश थोपटे , विशाल कोंडे , विजय परोळ, निलेश बारगुजे , श्री नायडू , विकास कदम आदीनी केले होते . यावेळी शिवभक्तांना फराळवाटप करण्यात आले . महाशिवरात्रीनिमित्त हरकानगर तरुण मंडळाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन महाशिवरात्रीनिमित्त भवानी पेठमधील हरकानगर तरुण मंडळाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी ओम नमः शिवाय पूजन होमहवन व लघुरुद्र अभिषेक व महापूजा करण्यात आले . यावेळी शिवभक्तानी दर्शनाचा लाभ घेण्यास गर्दी केली होती . यावेळी शिवभक्तांना फराळवाटप वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन हरकानगर तरुण मंडळाचे अध्यक्ष शैलेश चव्हाण , उपाध्यक्ष गोपी वाघेला , हेमराज साळुंके , भारत चव्हाण , महेंद्र चव्हाण , प्रताप कोद्रे , दिनेश कंडारे व हरकानगर पंचायत समितीने केले होते .

महाशिवरात्रीनिमित्त कोंढवा खुर्द ग्रामस्थांचे संकट हरण महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सव उत्साहात साजरा महाशिवरात्रीनिमित्त कोंढवा खुर्द ग्रामस्थांचे संकट हरण महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात आले . यावेळीमहारुद्र अभिषेक , हवन झाले . श्री पांडुरंग सेवा भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला . सुश्राव्य भजन व धूप आरती करण्यात आली . यावेळी शिवभक्तांना फराळवाटप माजी नगरसेवक तानाजी लोणकर यांच्याहस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन कोंढवा खुर्द ग्रामस्थ व सर्व सेवाभावी मंडळांनी केले होते .

‘बैजूज्’ने एका वर्षात महाराष्ट्रातील 9 लाख विद्यार्थी जोडले

0

पुण्यातील `स्टुडंट कनेक्ट सेंटरचे उद्घाटन जाहीर

पुणे : ‘बैजूज्’, या भारतामधील शिक्षणक्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि देशातील के-12 अॅप सादर करणाऱ्या निर्मात्या कंपनीने, पुण्यात `स्टुडंट कनेक्ट सेंटर‘चे उद्घाटन करण्याचे जाहीर केले आहे.

अमर अविनाश कॉर्पोरेट प्लाझा, 11, बंड गार्डन रोड येथे स्थित असलेले, हे पुण्यातील पहिले ‘बैजूज्’च्या `स्टुडंट कनेक्ट सेंटर’ आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना ‘बैजूज्’च्या अध्यापन उपक्रम आणि वैयक्तिक वैशिष्ट्यांचा अनुभव देणाऱ्या अॅपचे परिणाम समजण्यास मदत होणार आहे. ‘बैजूज्’चे तज्ज्ञ हे अॅप कसे वापरायचे ते दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरी त्यांच्या सोयीनुसार जातील. यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी 09243500457 या क्रमांकावर फोन करून सत्राचे आयोजन करायचे आहे. अन्य सहा कार्यालयांचे लवकरच उद्घाटन होईल.

या सेंटरद्वारे ‘बैजूज्’ला या प्रदेशात आपले नेटवर्क सखोल आणि विस्तारीत करता यावे, यासाठी लक्षणीय पाठिंबा दिला जाईल. पुण्यातील या विशेष सेट-अपच्या उद्घाटनाद्वारे, ‘बैजूज्’ महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांशी जोडले जाण्याचे ध्येय बाळगून आहे, याबरोबरच अधिक गुंतवणुकीच्या आणि वैयक्तिक अध्ययनाच्या अनुभवांद्वारे अधिक चांगले शिकता यावे यासाठी मदत केली जाईल.

14 लाख विद्यार्थ्यांसह ‘बैजूज्’ महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणारी सेन्टर्स मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूर आदी ठिकाणीही कार्यरत आहे. याबरोबरच यवतमाळ, रत्नागिरी आणि हिंगोली यासारख्या लहान शहरे आणि नगरांमध्येही अलिकडच्या महिन्यांत कार्याला लोकांची पसंती लाभत आहे.

बीवाजेयूच्या महाराष्ट्रातील विकासाबाबत, बैजूज्चे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. मृणाल मोहीत म्हणाले की, “आमच्या पहिल्या `स्टुडंट कनेक्ट सेंटर’चे पुण्यात उद्घाटन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. केवळ पुण्यातून 1.25 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना व आसपासच्या प्रदेशातील विद्यार्थ्यांना या केंद्रातून तज्ज्ञांमार्फत, अॅपच्या वैशिष्ट्यांचे सखोल आकलन होण्यास मदत होईल. येत्या काही महिन्यांमध्ये आम्ही अन्य 6 केंद्र पुण्यात सुरू करत आहोत. 53 मिनिटांच्या एंगेजमेंट रेटमुळे राज्यातील आमची विद्यार्थी संख्या गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

खरं तर, इतक्या मोठ्या प्रमाणावर मोठ्या आणि लहान शहरांमध्येही स्वीकृती मिळणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे. या प्रदेशातील विद्यार्थ्यांमध्ये या अॅपची स्वीकृती झाल्याने ऑनलाइन अध्ययन प्रकाराला लोकप्रियता प्राप्त झाली आहे, येत्या काही वर्षांत, या प्रदेशातील जास्तीत जास्त मुले डिजिटल अध्ययनात क्रांती घडवण्यासाठी सज्ज असतील.”

मृणाल पुढे म्हणाले की, “यात अध्ययनाची महत्त्वाकांक्षा आणि प्रोत्साहन अतिशय उच्च आहे आणि या प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी सातत्याने उपक्रमांच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहे, त्याद्वारे सेवा देण्याची खरी गरज आहे. प्रादेशिक भाषांमध्येही आमचे अॅप व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारतातील सर्वात मोठा एज्युकेशन ब्रँड असलेले आम्ही सातत्याने नावीन्यपूर्ण पद्धतींचा शोध घेत आहोत, यामुळे महाराष्ट्रातील डिजिटल अध्ययानाच्या स्वीकृतीला प्रोत्साहन मिळणार आहे.”

सध्या भारतभरातील लहान शहरे आणि नगरे यांतून 74 टक्के विद्यार्थी अॅपवर आहेत. पुढील वर्षी हा आकडा दुप्पट होईल, अशी ‘बैजूज्’ला अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या उच्चतम महत्त्वाकांक्षेमुळे आणि त्यांच्या दर्जात्मक संहिता आणि चांगल्या शिक्षकांबाबतच्या प्रश्नांमुळे जास्तीत जास्त विद्यार्थी तंत्रप्रवण अध्ययन उपक्रमाचा स्वीकार करत आहेत.

भारताच्या वैयक्तिक के-12 अॅपचे निर्माते – ‘बैजूज्’ ही `उत्तम शिक्षणासाठीची’ अग्रेसर संस्था आहे, तिच्याद्वारे विद्यार्थ्यांना स्वयंशिक्षण घेता येते. ‘बैजूज्’च्या अध्ययनाची उत्पादने सगळ्या इयत्तांसाठी (चवथी ते बारावी) शिक्षण देते, यात स्पर्धात्मक परीक्षांसाठी चाचणी तयारी अभ्यासक्रमही चालवते. या अॅपद्वारे चौथी ते बारावीच्या वर्गांसाठी गणित आणि विज्ञान विषयासाठीही अभ्यासक्रम शिकवले जातात. अलिकडेच उद्घाटन करण्यात आलेल्या `पॅरेंट कनेक्ट’ अॅपद्वारेमुळे पालकांना आपल्या पाल्याची प्रगती वेळोवेळी कळण्यास मदत होते, त्यामुळे आपल्या पाल्याचे कौतुक करता येतेच शिवाय त्यांच्या या अध्ययनाच्या प्रवासात पाठिंबा देण्याची भूमिका उत्तमप्रकारे बजावता येते.

वैयक्तिक स्तरावरील शिक्षण पुढील स्तरावर नेण्यासाठी, ‘बैजूज्’ने बिग डेटा अॅनालिसिसचा लाभ घेतला आहे, याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययनाची माहिती घेत वैयक्तिक स्तरावरील हे अध्ययनाचे व्यासपीठ उभारता आले आहे. गुंतवणूक आणि परिणामकारक अध्ययनासाठी अॅपद्वारे वैयक्तिक स्तरावर विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवास निर्माण करण्यात आला आहे, हा मार्ग अधिक लाभदायक असेल, शिवाय विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या क्षमतेचा आणि स्टाइलचा असेल, त्यासाठी मदत करणारा असेल.

बैजूज्बद्दल :

‘बैजूज्’ ही भारतातील सर्वात मोठी एज्यु-टेक कंपनी आणि भारतातील सर्वात मोठी के-12 अध्ययन अॅप सादर करणारी निर्माती कंपनी आहे, तिच्यातर्फे चौथी ते बारावी (के-12)चे विद्यार्थ्यांसाठी उच्चतम स्वीकृती, गुंतवणूक आणि परिणामांच्या अध्ययन उपक्रमांचे सादरीकरण केले जाते, याबरोबरच जेईई, एनईईटी, कॅट, आयएएस, जीआरई आणि जीमॅट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठीही मदत केली जाते.

2015 साली उद्घाटन झाल्यापासून, ‘बैजूज्’ हे तब्बल 14 दशलक्ष वापरकर्ते आणि 9,00,000 वार्षिक पेड सबस्क्राइबर यांच्यासाठी सर्वात लोकप्रिय आणि प्राधान्यक्रम असलेले एज्युकेशन अॅप ठरले आहे. दर दिवशी तब्बल 3000 शहरे आणि नगरांमधील विद्यार्थी सुमारे 53 मिनिटे हे अॅप दररोज वापरतात. ‘बैजूज्’चे अॅप शिकणे अतिशय आनंददायी आणि परिणामकारक करते. वार्षिक नवीकरणीय दरही वाढता म्हणजेत 90 टक्के इतका आहे.

जागतिक स्तरावरील अध्ययनाचा अनुभव देताना, ‘बैजूज्’ अध्ययन अतिशय सोपे आणि दृश्यात्मक स्तरावर लक्षणयी करते, ते केवळ पद्धतीत अडकून पडत नाही. हे शिक्षणाचे अॅप नव्या पिढीचे, भौगोलिकदृष्ट्या अध्ययनाच्या सर्व उफलब्ध सामग्रीचा वापर करून, संवादात्मक संहितेचे आणि समजायला सोप्या अशा पद्धतींचे आहे.

 

नऊवारी साडी नेसून पुण्याच्या शीतलने घेतली 13 हजार फुटांवरून उडी (व्हिडिओ)

0

पुणे-थायलंड येथे तब्बल तेरा हजार फूट उंचीवरून मराठमोळ्या शीतल महाजनने उडी घेतली. शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग या साहसी खेळात 17 राष्ट्रीय व 6 जागतिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारी मराठमोळी नऊवारी साडी नेसून तिने उडी मारल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आणखी एक विशेष बाब म्हणजे शीतल महाजन ही पुण्याची लेक असून तिला पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आहे. पॅरा जंपर (स्काय डायव्हर) साहसी खेळात उत्तुंग भरारी घेत पद्मश्री शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग या साहसी खेळात 17 राष्ट्रीय व 6 जागतिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. एवढे विक्रम नावावर करणा-या शीतल महाजन या पहिल्या भारतीय महिला आहेत.

थायलंड येथे पॅराग्लायडिंग करताना नऊवारी साडी परिधान केली. यामुळे मराठी संस्कृती जगात पसरली आहे. तसेच साहसी मराठी बाण्याचे देखील प्रदर्शन संपूर्ण जगाला झाले. अशा प्रकारे एवढ्या उंचीवरून उडी घेतल्याचे अद्याप तरी ऐकिवात नाही. त्यामुळे पद्मश्री शीतल महाजन यांनी हा एक विक्रम केल्याचे म्हटले जात आहे.

 

मुख्य सभेने ही करवाढ प्रस्ताव एकमताने फेटाळला …

0

पुणे- प्रामाणिकपणे सचोटीने काम केल्यास , महापालिकेचे उत्पन्न वाढी साठी मनापासून प्रयत्न केल्यास महापालिका प्रशासनाला करवाढी सारखे प्रस्ताव ठेवण्याची गरजच भासणार नाही अशा शब्दात प्रशासनाची कान उघडणी करत आज ..मिळकत कर वाढी ला मुख्य सभेने विरोध करत .. स्थायी समितीने ती फेटाळून लावल्याबद्दल अभिनंदन करत .. मुख्य सभेने हि प्रशासनाचा करवाढ प्रस्ताव फेटाळून लावला . अरविंद शिंदे, चेतन तुपे पाटील,संजय भोसले, अजय खेडेकर, दिलीप वेडे पाटील,महेश वाबळे आदींनी यावेळी प्रशासनाला कार्यक्षमतेचे आवाहन केले . यावेळी पहा आणि ऐका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले काय म्हणाले …….

पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजमीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध

0

पुणे – महावितरणकडून पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा व सांगली जिल्ह्यासाठी सिंगल व थ्री फेजचे 1 लाख 75 हजार नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ही संख्या आवश्यकतेपेक्षा दुपटीहून अधिक आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी किंवा नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी नवीन वीजमीटर उपलब्ध नसल्याच्या कोणत्याही माहितीवर वीजग्राहकांनी विश्वास ठेऊ नये अथवा कुठल्याही स्वयंघोषित एजंटांना थारा देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणच्या सर्वच कार्यालयांना मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आणखी एक लाख नवीन वीजमीटर लवकरच मिळणार आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी. तसेच नादुरुस्त वीजमीटर सुद्धा तातडीने बदलवण्यात यावेत, असे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. या कामात किंवा वीजमीटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून वीजग्राहकांची दिशाभूल केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास महावितरणच्या संबंधित कर्मचार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा व सांगली जिल्ह्यांत दि. 6 फेब्रुवारीपर्यंत सिंगल फेजचे तब्बल 1 लाख 55 हजार नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त साधारणपणे आणखी 1 लाख नवीन मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत सिंगल फेजचे पुणे जिल्ह्यात 88100, सातारा – 15250, सोलापूर – 15800, कोल्हापूर- 10500 व सांगली जिल्ह्यात 25,760 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. याशिवाय 20 केडब्लूपेक्षा अधिक व कमी वीजभार असणार्‍या थ्री फेजच्या स्वतंत्र नवीन वीजजोडणीसाठी सुद्धा आवश्यकतेपेक्षा दुप्पटीने वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

महावितरणने मटेरियल मॅनेजमेंटची प्रक्रिया ही ईआरपीच्या (एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) माध्यमातून ‘ऑनलाईन’ केलेली झालेली आहे. त्यामुळे साधनसामग्रीची उपलब्धता व पुरवठा ही प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत अधिक गतिमान झालेली आहे. तसेच नवीन मीटर वीजजोडणीसाठी किंवा नादुरुस्त मीटरऐवजी बदलून मिळण्यास विलंब होत असल्यास महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयात ग्राहकांनी ताबडतोब संपर्क साधावा. याशिवाय मुंबई येथील विशेष मदत कक्षातील 022-26478989 किंवा 022-26478899 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत तसेच 24×7 सुरु असललेल्या 1912 किंवा 18002003435 किंवा 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांनी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ‘कॉफी विथ स्टुटंड ’उपक्रम

0
पुणे : ‘राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस’ पुणे शहरच्या वतीने ‘कॉफी विथ स्टुटंड’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी फर्गुसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट घेतली. भेटी दरम्यान विद्यार्थ्यांसमवेत कॉफी घेऊन त्यांच्या समस्या, अडचणी समजून घेतल्या. या समस्या सोडवण्यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी यांच्याशी तातडीने चर्चा करण्यात आली व लवकरात लवकर प्रश्‍न सोडवावे अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील,  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष ऋषी परदेशी, प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्ष मनाली भिलारे,  संध्या सोनावणे, केशव माने, रवी आमरावती, राज पाटील, साई होळकर, सौरभ माने,वैभव थरकुडे, व विद्यार्थी मोठ्या संख्याने उपस्थित होते.
या भेटी नंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये प्रमुख्याने स्वच्छतागृहची दुरावस्था, वसतिगृहामध्ये पाण्याची समस्या, महाविद्यालयाच्या सुरक्षा भिंती, परत तपासणीचे पेपर दाखवण्यात बाबत आदी समस्यांचा समावेश होता. खासदार वंदना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद सादत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्काळ प्रयत्न करू असे आश्‍वासन दिले.
‘कॉफी विथ स्टुटंड’ या उपक्रमाची संकल्पना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष ऋषी परदेशी यांची आहे. या उपक्रमांतर्गत पुण्यातील विविध महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांसमवेत कॉफी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि महाविद्यालय पदाधिकार्‍यांशी चर्चा करून शक्य तितक्या समस्या तत्काळ सोडविणे हा प्रमुख हेतू आहे.  या उपक्रमात पक्षाचे ज्येठ नेते देखील सहभागी झाले आहेत. आत्तापर्यंत स.प.महाविद्यायल, वाडिया कॉलेज येथे भेटी देण्यात आल्या.

नयना गुंडे यांनी स्वीकारला पीएपीएमएलचा पदभार

0

पुणे-वादग्रस्त अधिकारी तुकाराम मुंढे यांची नाशिकच्या आयुक्तपदी बदली झाल्यांनतर पीएपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नयना गुंडे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली होती. त्यानुसार नयना गुंडे यांनी आज  पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाचा आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारला.नयना गुंडे यापूर्वी वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होत्या.

तुकाराम मुंढेंची अवघ्या दहा महिन्याच्या कालावधीनंतर नाशिकच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली. आपल्या अल्पशा काळात त्यांनी  अधिकारी आणि कर्मचा-यांवर शिस्तीचा बडगा उगारला होता. अनेक कर्मचा-यांना घरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे पीएमपीएमएल कर्मचा-यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. त्यामुळे काही कामगार संघटनांनी त्यांच्या बदलीची मागणी केली होती.

दरम्यान, पीएमपीएमएलच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच आराखडा तयार झाल्याने त्याची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन नयना गुंडे यांच्यासमोर आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांशी समन्वय साधत प्रवाशांना आवश्यक सोई-सुविधा पुरवणे, बीआरटी, आयटीएमएस आणि इतर यंत्रणा प्रभावीपणे राबवणे, तोटा कमी करणे अशा विविध आघाड्यांवर गुंडे यांना काम करावे लागणार आहे.

 

पुणेकरांना आता २४ तास समान पाणीपुरवठा..!

0

पुणे-बहुचर्चित पुणे महापालिका महत्त्वाकांक्षी चोवीस तास पाणीपुरवठा योजनाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पालिका आवारात फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या कारकीर्दीतच या महत्वाच्या प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ करण्यास यश मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला

 

पुणे महापालिकेच्या वतीने शहराला 24 तास समान पाणीपुरवठा करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. त्यामधील 245 कोटी खर्चाच्या पाणी टाक्‍यांच्या कामास सुरूवात झाली आहे. मात्र, जलवाहिनीच्या कामासाठी 26 टक्के वाढीव दराने निविदा आल्याने त्या वादग्रस्त ठरल्या. त्यामुळे प्रशासनाने या निविदा रद्द करून जवळपास दोन हजार 315 कोटींच्या जलवाहिन्यांच्या कामासह पाणी मीटर, जलशुध्दीकरण केंद्रातील कामे आणि या योजनेची दहा वर्षांची देखभाल दुरुस्ती अशा सर्व कामांसाठी एकत्रित निविदा प्रक्रिया राबविली होती. शहराला चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनी, केबल डक्ट, पाणी मीटर आणि मेन्टनन्सच्या कामाच्या सहा पैकी पाच कामे एल अँड टी ला तर एक काम जैन एरिगेशनला देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे आता पुणेकरांना २४ तास समान पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी पालिकेने सहा पॅकेजमध्ये निविदा मागविल्या होत्या. सुमारे २३१५ कोटी रुपयांच्या या निविदा सरासरी ११ टक्के कमी दराने आल्या असून महापालिकेला २०५० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. सहा पॅकेजमध्ये ‘एल अँड टी’ कंपनीची सर्वात कमी निविदा आली आहे. त्यामुळे हे काम याच कंपनीला मिळणार हे निश्चित होते. परंतु महापालिकेच्या निविदा प्रक्रियेच्या संकेतानुसार कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचे काम एकाच कंपनीला दिल्यास त्या कंपनीच्या कारभारात एकाधिकारशाही निर्माण होते. प्रसंगी बदलत्या परिस्थितीनुसार कंपनी स्वत: च्या मागण्या रेटून नेत त्यांना हवे ते निर्णय घेऊ शकते. किंबहुना कामही अर्धवट ठेऊ शकते. असे झाल्यास प्रकल्प बंद पडणे अथवा रेंगाळू शकतो. त्यामुळे एखाद दुसऱ्या प्रकल्पाचे काम सेकंड लोएस्ट निविदा भरलेल्या कंपनीला देण्यात येते. त्यानुसार एका कामाची निविदा जैन एरिगेशनला देण्यात आली आहे.
पहा आणि ऐका याबाबत स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ काय म्हणाले …

 

फॅशन स्ट्रीट गाळेधारकांचा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयावर मूक मोर्चा

0

पुणे-एम. जी. रोड हॉकर्स पथारी असोसिएशन सेवा संस्थेच्यावतीने फॅशन स्ट्रीट गाळेधारकांचा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयावर मूक  मोर्चा काढण्यात आला . या मोर्चाचे नेर्तृत्व एम. जी. रोड हॉकर्स पथारी असोसिएशन सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड .म. वि. अकोलकर यांनी केले . या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने गाळेधारक सहभागी झाले होते . यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष राजीव सेठ व बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांना निवेदन देण्यात आले .

या निवेदनामध्ये  एम. जी. रोड हॉकर्स पथारी असोसिएशन सेवा संस्थेच्यावतीने मागण्या मांडण्यात आल्या . सन १९९७ पासून या ठिकाणी ४४८ गाळेधारक आपला व्यवसाय करीत आहे . पुणे कॅम्प भागातील ईस्ट स्ट्रीटवरील जागा पूर्वीच्या एम. जी. रोडवरील पथारीवाल्यासाठी व्यवसायासाठी जागा देण्यात आली होती . परंतु पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आपल्या अटी व शर्थीचे पालन करत नाही . बोर्डामध्ये २२ / ११/ १९९७ च्या झालेल्या बैठकीत ४४७ हॉकर्स  कांबळे मैदान व ९२ हॉकर्सला पूना कॉलेजसमोरील आबाजी मैदान येथे जागा देण्याचे मान्य  केले . परंतु आबाजी मैदान येथे एकाही हॉकर्सला जागा देण्यात आलेली नाही . तसेच येथील विद्युत पुरवठा सुरळीत चालण्यासाठी भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी परवानगी द्यावी .  फॅशन स्ट्रीटमध्ये मागासवर्गीय व अल्पसंख्यांक बांधव व्यवसाय करून आपला चारितार्थ चालवीत आहे , त्यात तरुणांना नोकऱ्या मिळत नाही त्यामुळे बोर्डाने येथील गाळेधारकांची रोजीरोटी हिसकावून घेऊ नये . त्यांच्यावर अन्याय करू नये . असे एम. जी. रोड हॉकर्स पथारी असोसिएशन सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड .म. वि. अकोलकर यांनी सांगितले .

या मोर्चामध्ये एम. जी. रोड हॉकर्स पथारी असोसिएशन सेवा संस्थेचे उपाध्यक्ष युसूफ खान , चिटणीस झहीर खान , इरफान कुरेशी , नाझीम कुरेशी , वाजिद कुरेशी , तौफिक शेख , झुल्फिकार कुरेशी , इफ्तेकार बारी शेख , अशफाक काझी , प्रकाश रंगवानी , जयदीप चव्हाण व मोठ्या संख्येने गाळेधारक सहभागी झाले होते.

साई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शिर्डी स्पर्धेत केनियाचा इल्फेज रूटोला विजेतेपद

0
  • बाळकृष्ण जगताप ,  भास्कर कांबळे ,  राम यादव ,  निलेश यादव , पुजा , रमेश गवळी,  राजश्री तरिहाल,  दत्तात्रय जयभय, प्रतिभा नाडकर,  थॉमस फिलिप, दुर्गा सील यांना विजेतेपद   

पुणे: चॅम्प एन्ड्युरन्स टीम व रनबडीज क्लब यांच्या तर्फे आयोजित साई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शिर्डी स्पर्धेत  केनियाच्या  इल्फेज रूटोने विजेतेपद पटकावले तर  जॉन रिप्रोझेलने दुसरा क्रमाक पटकावला. 

42 किलोमीटर गटात  18-30 वयोगटात मुलीमध्ये पुजाने 03:36:25सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला तर मुलांच्या गटात निलेश यादवने 02:49:23सेकंद वेळेसह प्रथम क्रमांक पटकावला. 31-40 वयोगटात राम यादवने 03:15:31 सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला तर 41-50 वयोगटात भास्कर कांबळेने 02:52:47सेकंदासह अव्वल क्रमांक मिळवला. 51-60 वयोगटात बाळकृष्ण जगतापने 03:47:52सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांकांसह विजेतेपद संपादन केले. 

10 किलोमीटर गटात  शुभम राठोड,  अर्चना कोहकडे,  व्यंकट राव,  निक्की राय,  शुभम सिंग,  शारदा भोयर, नागराव भोयर यांनी तर हाफ मॅरेथॉन(21किलोमीटर) गटात रमेश गवळी,  राजश्री तरिहाल,  दत्तात्रय जयभय, प्रतिभा नाडकर,  थॉमस फिलिप, दुर्गा सील  यांनी आपापल्या वयोगटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

चॅम्प एन्ड्युरन्स टीम व रनबडीज क्लब यांच्या तर्फे आयोजित साई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शिर्डी  स्पर्धा 10 व 21किलोमीटर प्रकारात पार पडली. भारतासह केनिया, स्पर्धेत एकूण 10600 धावपटूनमध्ये 7460धावपटूंनी अनवाणी हि मॅरेथॉन शर्यत पूर्ण केली. 10 किलोमीटर 14-30 मुलांच्या वयोगटात शुभम राठोडने 33मिनिटे 17सेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकवला. तर, मुलींच्या गटात अर्चना कोहकडेने 40मिनिटे 43सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकवला. 31-40वयोगटात पुरुष गटात व्यंकट रावने 33मिनिटे 18सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकवला. महिला गटात निक्की रायने 47:42सेकंद वेळ नोंदवून पहिला क्रमांक पटकावला. 41-50वयोगटात पुरुष व महिला गटात शुभम सिंग व शारदा भोयर यांनी अव्वल क्रमांक पटकावला.

मॅरेथॉन शर्यतीस व्दारावती भक्त निवास येथून प्रारंभ झाला आणि  काकडी गाव (एअरपोर्ट पोर्ट) येथे या शर्यती चा समारोप झाला.

स्पर्धेतील विजेत्यांना 10लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मर्क कंज्युमर हेल्थचे बिजीनेस हेड डॉ.ब्रिजेश कपिल, मर्क कंज्युमर हेल्थचे सेल्स डायरेक्टर नागेश कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे महासंचालक कृष्ण प्रकाश(व्हीआयपी सुरक्षा) साईबाबा शिर्डी संस्थान ट्रस्टचे सदस्य प्रताप भोसले, रिलायन्स इंडस्ट्रीजचे वरिष्ठ व्यवस्थापक कमलेश कुमार, एमपी ग्रुपचे अभिषेक पाठक, अरविंद बिजवे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमानुसार:  10 किलोमीटर:
14-30 वयोगट: मुले:
 1. शुभम राठोड(33: 17से), 2.भागीनाथ(33:20से), 3.शिवाजी पालवे(33:35से);
मुली: 1.अर्चना कोहकडे(40:43से), 2.नंदिनी पवार(42:34से), 3.निकिता बामनवत(45:21से);

31-40वयोगट: पुरुष: 1.व्यंकट राव(33:18से), 2.किशनलाल कोसरिया(35:49से), 3.विलास डोईफोडे(39:19से);
महिला: 1.निक्की राय(47:42से), 2.अर्चना तांबे(59:11से), 3.स्वाती विखे(01:07:41से);

41-50वयोगट: पुरुष: 1.शुभम सिंग(28:41से), 2.ज्ञानेश्वर कोलते(38:15से), 3.सुहास आंबराळे(40:16से);
महिला: 1.शारदा भोयर(49:02से), 2.अमिशा वाडकर(51:29से), 3.नॅन्सी पिंटो(59:05से);

51-60वयोगट: पुरुष: 1.नागराव भोयर(41:49से), 2.बातचली रामण्णा(44:26से), 3.प्रसाद जवाहर(44:34से);

61-99वयोगट  पुरुष: 1.बजरंग चव्हाण(48:01से), 2.शान भाई पधियार(50:38से), 3.संधू शेख(51:45से);

हाफ मॅरेथॉन(21किलोमीटर): 18-30वयोगट: मुले: 1.कमलु(01:11:26से), 2.सागर दळवी(01:13:53से), 2.मनोज राणे(01:15:33से);
मुली: 1.भाग्यश्री ठाकरे(02:12:03से), 2.प्रज्ञा पाटील(02:14:20से), 3.मयूर कझरे(02:15:10से);

31-40वयोगट: पुरुष: 1.रमेश गवळी(01:11:31से);
महिला: 1.राजश्री तरिहाल(01:36:55से), 2.सीमा वर्मा(01:44:16से), 3.वैशाली शेलार(01:57:57से);

41-50वयोगट: पुरुष: 1.दत्तात्रय जयभय(01:15:51से), 2.सुरेश कुमार(01:19:56से), 3.शिवानंद शेट्टी(01:25:24से);
महिला: 1.प्रतिभा नाडकर(01:50:06से), 2.माधुरी निमजे(02:03:25से), 3.रितू हांडा(02:16:09);

51-60वयोगट: पुरुष: 1.थॉमस फिलिप(01:24:37से), 2.चरण सिंग(01:28:09से), 3.सुरेंदर कुमार(01:33:39से);

महिला: 1.दुर्गा सील(01:54:07से), 2.शामला मनमोहन(02:00:28से);

61-99वयोगट: पुरुष: 1.बाळासाहेब पोवार(01:42:31से), 2.दिनकर शेळके(01:43:46से), 3.दिलीप राठी(01:51:49से).

42 किलोमीटर: 

18-30 वयोगट: मुली: 1. पुजा(03:36:25से)
 
18-30 वयोगट: मुले: 1.  निलेश यादव( 02:49:23से), रवी शिकरवर(03:05:51से)
 
31-40 वयोगट: पुरुष: 1. राम यादव(03:15:31से), 2. लालदेव मुर्मु(03:21:08 से), 3. संजय नेगी(03:42:24से)
 
41-50 वयोगट: पुरुष: 1.भास्कर कांबळे(02:52:47से), 2. सेल्वाराज रमेशकुमार(03:05:36से), 3. मदन कांती(03:49:07से)
 
51-60 वयोगट: पुरुष: 1. बाळकृष्ण जगताप( 03:47:52से), डॉ.मनिंदर पॉल सिंग(03:54:24से), 3. संजय भोसले(04:07:47से)

पुणे जिल्हा राजपत्रित अधिकारी समन्वय समितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

0

पुणे  – राजपत्रित अधिकारी महासंघाच्या  32 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात पुणे जिल्हा समन्वय समितीच्या  उत्कृष्ट कार्याबद्दल मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे जिल्हा समन्वय समितीचा  सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

राजपत्रित अधिकारी महासंघाचा 32 वा वर्धापनदिन कार्यक्रम 7 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यसचिव सुमित मलीक, महासंघाचे सल्लागार ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात पुणे जिल्हा समन्वय समितीच्यावतीने महासंघाचे उपाध्यक्ष विनायक लहाडे व जिल्हा समन्वय समितीचे सदस्य मोहन साळवी, रवींद्र चव्हाण, अशोक मोहिते, शिरीश पाटील तसेच महासंघाच्या संघटन सचिव तथा दुर्गा मंचच्या अध्यक्षा सुवर्णा पवार व सदस्या  कांचन जाधव, सुहिता ओहाळ, भावना चौधरी, अनुराधा ओक यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी पुणे समितीचे काम शिस्तबध्द असल्याचे गौरवोद्गार श्री. फडणवीस यांनी काढले. कार्यक्रमास राज्यातील विविध विभागातील  राजपत्रित अधिकारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

गुलाबजामच्या पंगतीच्या निमंत्रणासाठी 11 हजार गुलाबजामचे वाटप

0
पुणे – पुणेकर नागरिक अनेक कारणासाठी  सुप्रसिद्ध आहेत. त्यामध्ये खवय्येगिरीचाही समावेश आहे. कोणते चविष्ट पदार्थ कुठे खावेत याचे प्रशिक्षण पुणेकर देतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रातील तमाम खवय्येगिरी करणाऱ्या सिनेरसिकांसाठी  लवकरच झी स्टुडिओज एक टेस्टी चित्रपट ‘गुलाबजाम’  घेऊन येत आहे.
सचिन कुंडलकर लिखित आणि दिग्दर्शित ‘गुलाबजाम’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अतिशय हटके प्रमोशन सध्या सुरू आहे.  रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त गाठत चित्रपटगृहात चित्रपट पहायला आलेल्या सिनेरसिकांना येत्या 16 फेब्रुवारी पासून संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेला ‘गुलाबजाम’ चित्रपट पहायला यायचं हं! असे निमंत्रण चक्क गुलाबजाम खायला घालून देण्यात आले, पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड,  सिटी प्राईड सातारा रस्ता आणि अभिरुची सिटी प्राईड या चित्रपटगृहात सिनेमा पाहायला आलेल्या सुमारे 11 हजार  प्रेक्षकांना एका टेस्टी सिनेमाला येण्याचे हे गोड निमंत्रण देण्यात आले. प्रेक्षकांना हे आगळे वेगळे निमंत्रण भावले आणि अनेक प्रेक्षकांनी या स्वादिष्ट सिनेमाचा आस्वाद घेणारच असल्याची ग्वाही दिली.  गोड अशा ‘गुलाबजाम’ची पंगत येत्या शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात बसणार आहे.

अन्वेषाचे आगामी “सजन घर आओ रे” म्युझिक सिंगल . . .

0

संगीत हे एक असं माध्यम आहे ज्याने आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो, एकप्रकारचं औषध आहे हे आपल्या प्रत्येक भावना जणू समजून घेण्याचं काम संगीत ही कला करत असते. मुळात हे असं माध्यम आहे जे वैचारिक आणि सामाजिक पातळीपर्यंत पोहचू शकत. अशाच एका सैनिक पत्नीची भावना “सजन घर आओ रे” या हिंदी गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होणार आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका अन्वेशा दत्ता या गायिकेने हे गाणं गायलं आहे. अन्वेशाने “गोलमाल रिटनर्स”, “डेंजरस इश्क”, “रांझणा”, “प्रेम रतन धन पायो” यांसारख्या अनेक बॉलिवुड सिनेमांसाठी गाणे गायले आहे.

“सजन घर आओ रे” हे गाणं अत्यंत कमी वेळ मिळणाऱ्या सहजीवना करता आतुरतेने पतीची वाट बघणाऱ्या पत्नीचे मनोगत व्यक्त करतांनाच, पती युध्धभूमीवर लढतांना त्याच्या जिवाच्या काळजीने होणारी पत्नीच्या मनाची घालमेल हि देखील ह्या गाण्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एस.व्ही.पी एन्टरप्राइजेस या निर्मितीसंस्थेने या गाण्याची निर्मिती केले असून प्रसाद फाटक यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.  या अगोदर प्रसाद यांनी “सांजवेळी सोबतीला”, द्रौपदी से दामिनी”, “तुझ्याविना” यांसारखे अनेक म्युझिक सिंगल्सची निर्मिती केली. जनजागृतीपर संदेश देणाऱ्या गाण्यांचे दिग्दर्शन करणाऱ्या प्रसाद यांनी काही व्यवसायिक गाण्यांचे दिग्दर्शनही केले. सैनिकांच्या पत्नीला आपला पती अनेक दिवसांनी घरी येण्याचा तिचा आनंद, तसेच तो घरी येणाच्या एक दिवस अगोदर मिळालेल्या युद्धाच्या बातमीने होणारी तिची तगमग समीर सामंत यांच्या शब्दांनी व्यक्त होते आहे. समीर सामंत यांनी “कट्यार काळजात घुसली”, उंबटू” अशा अनेक सिनेमांसाठी गाणी लिहिली आहेत.  व्हेलेंटाईन डे  च्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेले हे गाणे सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या सैनिक पत्नींना समर्पित आहे.