Home Blog Page 319

कृत्रिम बुद्धिमत्ता टूल्सचा वापर करताना सावधगिरी बाळगा

मुंबई, दि. 9 : डिजिटल युगात संगणक हा आपला अविभाज्य भाग बनला आहे. शिक्षण, व्यवसाय, बँकिंग, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांमध्ये संगणकाचा वापर होतो. या डिजिटल युगात  संगणकाच्या मूलभूत गोष्टींची  माहिती असणे आवश्यक आहेच, त्याचबरोबर कामामध्ये सुलभता, सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा संगणक सजग असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मास्टेक नॉसकॉमच्या प्राजक्ता तळवलकर यांनी सांगितले.

टेक – वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात ‘डिजिटली सजग बना’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. नॅसकॉमचे अधिकारी प्राजक्ता तळवलकर, राहुल मुलाने यांनी मार्गदर्शन केले.माहिती तंत्रज्ञानाच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर करताना सावधगिरीने केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना डेटा चोरी होणार नाही यासाठी सतर्क असणे आवश्यक असून चॅट जीपीटी सारख्या एआय टूल्सवर काळजीपूर्वक डेटा दिला पाहिजे असा सल्ला राहुल मुलाने यांनी उपस्थितांना दिला.

यासोबतच संगणकाचे विविध भाग, ऑपरेटिंग सिस्टीम, संगणकाचा कीबोर्ड वापरताना उपयोगी पडणारे शॉर्टकट, जीमेल वापरताना स्मार्ट ईमेल आणि दिनदर्शिकेचा वापर कसा करावा, जीमेल मधील लेबल्सचा उपयोग, गूगल नोट्स, गूगल लेन्स, डॉक्युमेंट डिजिटायझेशन याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

मेट्रो तीनच्या अंतिम मार्गाचे ऑगस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 9 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यानच्या (9.77 किमी) सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मेट्रो तीनच्या आचार्य अत्रे चौक ते कुलाबा या मार्गावरील अंतिम टप्प्याचा शुभारंभ येत्या ऑगस्ट महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

मुंबई मेट्रो लाईन-3 (फेज 2अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक) सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी स्थानकातून हिरवी झेंडी दाखवून केला. त्यानंतर मान्यवरांनी बीकेसी ते सिद्धीविनायक मेट्रो स्थानकादरम्यान प्रवास करत मेट्रोचा आनंद लुटला. यावेळी जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी सान, प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.

मेट्रोच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी  या 13 कि.मी. मार्गाचे लोकार्पण 7 ऑक्टोबर 2024 रोजी झाले. आता फेज 2अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्ग हा दुसरा टप्पा उद्यापासून नागरिकांसाठी खुला होणार आहे. आतापर्यंत 22 कि.मी. मेट्रो सुरू झाली आहे. मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत असून मेट्रो तीनचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. येत्या ऑगस्टमध्ये मेट्रो 3 च्या अंतिम टप्प्याचा मार्गावरील मेट्रो सेवा सुरू होईल. मेट्रो 3 मुंबईतील विमानतळांशीदेखील जोडली जाणार आहे.

मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार

मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा मेट्रोचा मार्ग मिठी नदीच्या खालून जात आहे. त्याचप्रमाणे गिरगाव सारख्या गर्दीच्या ठिकाणीही मेट्रोचे काम सुरळीत झाले आहे. आता अंतिम टप्प्यातील दोन स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंतच्या मेट्रोला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मार्गावर प्रवाशांना उत्तम कनेक्टिविटी मिळेल. या मार्गावरील सर्व मेट्रो स्थानकेही अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असून प्रत्येक स्थानकावर प्रवेशासाठी अनेक प्रवेश मार्ग असल्याने गर्दीचे योग्य व्यवस्थापन होईल. तसेच मेट्रो मार्ग हे प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोची कामे मोठ्या वेगाने सुरू आहेत. याद्वारे मुंबईकर तसेच महामुंबईतील नागरिकांसाठी सुलभ व अखंड परिवहन जोडणी (सिमलेस ट्रान्स्पोर्ट सिस्टीम) यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू आहे. यावर्षी 50 कि.मी. तर पुढील वर्षी आणखी 50 कि.मी. मेट्रोचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सिंगल प्लॅटफॉर्मवर सर्व सार्वजनिक परिवहन सेवा मिळणार

मेट्रो, बेस्ट, लोकल या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी सिंगल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यातून प्रवाशांना एकाच तिकीटावर प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत हा प्रयोग सुरू करण्यात येणार असून त्यानंतर महामुंबईतही ही सेवा देण्यात येणार आहे. सध्या यावर प्रायोगिक तत्वावर काम सुरू असून लवकरच त्याचा व्यावसायिक वापर सुरू होईल. यामुळे नागरिकांना मुंबई तसेच महामुंबई परिसरात सुलभपणे प्रवास करता येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

बेस्टने कालच गुगल सेवेबरोबर सांमजस्य करार केला आहे. यापुढे बेस्टच्या बसेसचे रिअल टाईम लोकेशन गुगलवर मिळणार असून या ठिकाणी प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजनही करता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांना दिलासा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबईकरांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. मेट्रोमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मेट्रोमुळे या मार्गावरील सुमारे चार ते पाच लाख वाहने कमी होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन व वेळेची बचत होणार आहे. देशातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे मुंबईत उभारण्यात येत आहे. नागरिकांची गरज ओळखून कामे होत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मेट्रोची कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील 50 टक्के वाहने कमी होतील. त्यामुळे महामुंबईकरांसाठी मेट्रो प्रकल्प वरदान ठरणार आहे.

टप्पा 2 अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाची माहिती :

– स्थानकांची संख्या – 6 (सर्व भूमिगत)

– अंतर – 9.77 किमी

– हेडवे – 6 मि 20 सेकंद

– तिकिटाचे दर – किमान भाडे रु. १०/-, कमाल भाडे रु. ४०/-

– गाड्यांची संख्या – ८

– प्रवास वेळ (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक)- १५ मिनिटे २० से

– फेऱ्यांची संख्या – २४४ फेऱ्या

– प्रवास वेळ आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक- ३६ मी

– तिकिट दर आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक किमान भाडे रु. १०/-, कमाल भाडे रु. ६०/-

– एकूण एस्केलेटरची (सरकते जीने) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) २०८

– एकूण उद्वाहक (लिफ्ट) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) – ६७

कनेक्टिविटी

बीकेसी, वरळी यांसारख्या बिझनेस हब्सना जोडले जाणार आहे. बीकेसी स्थानक मेट्रो मार्ग 2 बी आणि बुलेट ट्रेनशी भविष्यात जोडले जाणार असून त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होणार आहे. सिद्धिविनायक मंदिर, माहीम दर्गा आणि माहीम चर्च यासारखी धार्मिक स्थळे तसेच शिवाजी पार्क, रवींद्र नाट्य मंदिर, शिवाजी मंदिर, यशवंत नाट्य मंदिर, प्लाझा सिनेमा यासारखी मनोरंजनाची ठिकाणे देखील या मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

मुंबई– मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची आज भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिल्लीतील निर्वाचन सदन येथे भेट घेतली. ही भेट निवडणूक आयोगाकडून विविध राष्ट्रीय व राज्य पातळीवरील राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी सुरू असलेल्या संवादाचा एक भाग आहे.

या संवादांमुळे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षाध्यक्षांना थेट आयोगासोबत आपले सूचनात्मक मुद्दे मांडता येतात, ही एक दीर्घकाळची गरज होती.

यापूर्वी आयोगाकडून एकूण ४,७१९ सर्वपक्षीय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये ४० मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ), ८०० जिल्हा निवडणूक अधिकारी (डीईओ), आणि ३८७९ मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांच्याद्वारे झालेल्या बैठकांचा समावेश असून त्यामध्ये २८ हजारांहून अधिक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून टोळक्याकडून तरुणाला मारहाण, वाहनांची तोडफोड

लोणी काळभोरमध्ये एकाला अटक
पुणे-लोणी काळभोरमधील म्हातोबाची आळंदी येथे राहणाऱ्या एका तरुणाला पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयित आरोप करुन टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर संबंधित टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

याप्रकरणी आदित्य संतोष इंगोले (वय २४), करण शंकर गावडे (वय १९) यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राेहित सुभाष जावळकर (वय ३२, रा. म्हातोबाची आळंदी, लोणी काळभोर) याने याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रोहित जावळकर हा त्याच्या घराजवळ थांबला होता. त्यावेळी आरोपी गावडे, इंगोले आणि त्यांच्याबरोबर असलेले तीन साथीदार त्याठिकाणी आले. ‘तु पोलिसांचा खबरी आहे’, असा आरोप करुन आरोपी गावडे, इंगोले आणि साथीदारांनी त्याला थेट लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जावळकर याच्या घराच्या परिसरातील रस्त्यावरील गाड्यांची तोडफोड करुन दहशत पसरवली गेली.या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी आरोपी संतोष इंगोलेला अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

माहेश्वरी सहेली ग्रुपच्या ‘समुद्र मंथन’ ने भारावले पुणेकर !

पुणे :

माहेश्वरी सहेली महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या,अध्यक्षा विजया बांगड़ व नीता बिहानी यांच्या संकल्पनेवर आधारित ‘समुद्र मंथन’ या भव्य पौराणिक नृत्यनाटिकेच्या सादरीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व उपस्थित पुणेकर भारावून गेले ! कार्यक्रमाचे नियोजन,प्रस्तुती’ऑयस्टर इव्हेंट ‘च्या संयोजिका दीपा बाफना व कविता खिंवसरा यांनी केले.१५० पेक्षा जास्त महिला कलाकारांना योग्य प्रशिक्षण देऊन,उत्तम संवादलेखन,कलात्मक कोरियोग्राफी,ध्वनि मुद्रण,वीडियो ग्राफिक्स,आकर्षक प्रॉप्स व टेक्नीकल इफेक्ट्सद्वारे भव्यदिव्य व अंगावर शहारे आणणारा पौराणिक नृत्य नाटिकेचा समुद्र मंथन हा कार्यक्रम सादर करण्यात आला.योगेश फूलफगर,प्रणव पद्मनाभ,अनिरुद्ध पद्मनाभ,शिल्पा पारेख व जागृती देसरडा-संघवी यांचे सहकार्य मिळाले. पौराणिक नृत्य नाटीकेला साजेशी अप्रतिम वेशभूषा हेमा बूब व रूपाली काबरा यांनी केली.सहेली ग्रुप च्या वतीने संगीता बिहाणी ,मीना बिहाणी व संयोजन समितीचे सहकार्य लाभले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर,उद्योजक मोनिका पोफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे दि.५ मे २०२५ रोजी हा कार्यक्रम झाला. माहेश्वरी सहेली ग्रुप च्या ३५ वर्षे वाटचालीचा आढावा यावेळी घेण्यात आला.सहेली ग्रुप तर्फे अनेक सामाजिक संस्था, प्रकल्पाना यावेळी मदत देण्यात आली.पुणे जिल्हा माहेश्वरी समुदाय चे अध्यक्ष रतन राठी , महेश सोमाणी ,संजय बियाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भव्य नृत्य नाट्याने भारावले पुणेकर !

माहेश्वरी सहेली ग्रुप आयोजित च्या ‘समुद्र मंथन’ या भव्य नृत्यनाटिकेच्या सादरीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला. उपस्थित पुणेकर भारावून गेले ! देव-दानवांच्या युद्धात अमृतप्राप्तीसाठी केलेले समुद्र मंथन या नाट्यात अतिशय परिणामकारकरीत्या दाखविण्यात आले.फक्त महिलांनी ते सादर केले आणि वाहवा मिळवली. दोन महिने माहेश्वरी ग्रुपने सादरीकरणासाठी मेहनत घेतली होती.१५० पेक्षा जास्त महिला कलाकारांना योग्य प्रशिक्षण देऊन,उत्तम संवादलेखन,कलात्मक कोरियोग्राफी,ध्वनि मुद्रण,वीडियो ग्राफिक्स,आकर्षक प्रॉप्स व टेनिकल इफेक्ट्सद्वारे भव्यदिव्य व अंगावर शहारे आणणारा पौराणिक नृत्य नाटिकेचा समुद्र मंथन हा कार्यक्रम सादर करण्यात आला.’ऑयस्टर इव्हेंट’च्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

पाकचे ३६ ठिकाणी घुसखोरीचे प्रयत्न भारताने हाणून पाडले

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ८-९ मे च्या रात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांची माहिती आज पत्रकार परिषदेतून दिली.भारत-चीन तणावाच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाची ही सलग तिसरी पत्रकार परिषद आहे

८-९ मे च्या मध्यंतरी रात्री, पाकिस्तानी सैन्याने भारतीय युद्धक्षेत्रात अनेक हल्ले केले, लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. आंतरराष्ट्रीय सीमेवर ३६ ठिकाणी घुसखोरीचे प्रयत्न झाले. गोळीबार झाला. भारताने घुसखोरांना ठार मारले.

८-९ मे च्या मध्यंतरी रात्री, पाकिस्तानी सैन्याने भारतीय युद्धक्षेत्रात अनेक हल्ले केले, लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. आंतरराष्ट्रीय सीमेवर ३६ ठिकाणी घुसखोरीचे प्रयत्न झाले. गोळीबार झाला. भारताने घुसखोरांना ठार मारले.
त्यांचा उद्देश हवाई संरक्षण प्रणालींबद्दल गुप्तचर माहिती आणि माहिती गोळा करणे आहे. हे तुर्कीचे ड्रोन होते. याची चौकशी केली जात आहे. एक UAV देखील सापडला, जो निष्क्रिय करण्यात आला.विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या की, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला, ज्यामध्ये काही सैनिक जखमी झाले. ७ मे २०२५ रोजी रात्री ८:३० वाजता भारताने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला आणि त्या काळात त्यांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले नाही. नागरिकांना ढाल म्हणून वापरले जात होते.

‘पंजाब सेक्टरमध्ये हाय एअर डिफेन्स अलर्ट दरम्यान, आमचे हवाई क्षेत्र नागरी उड्डाणांसाठी बंद होते परंतु एक नागरी उड्डाण पाकिस्तानच्या हद्दीवरून चालत होते.’ भारतीय हवाई दलाने संयम दाखवून प्रतिसाद दिला आणि आंतरराष्ट्रीय नागरी हवाई सेवांची सुरक्षा सुनिश्चित केली.
विक्रम मिस्री म्हणाले, काल रात्री पाकिस्तानने चिथावणीखोर कारवाई केली
विक्रम मिस्री म्हणाले की, काल रात्री पाकिस्तानी सैन्याच्याकारवायांबद्दल तुम्हाला माहिती मिळाली आहे. या चिथावणीखोर कारवाया होत्या, त्यांनी भारतीय शहरे, नागरी पायाभूत सुविधा आणि काही लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य केले. भारतीय लष्करी तुकड्यांनी याला प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानचा दावा आहे की त्यांनी कोणत्याही धार्मिक स्थळावर हल्ला केला नाही. त्यांनी पूंछमधील गुरुद्वारावर हल्ला केला. या हल्ल्यांची जबाबदारी घेण्याऐवजी, पाकिस्तान म्हणत आहे की भारतीय सैन्य हे करत आहे. पाकिस्तान आपल्या कृती आणि आक्रमकता मान्य करण्यास नकार देत आहे आणि जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.

विदेश सचिव विक्रम मिस्री ने कहा, “…अपनी हरकतों को स्वीकार करने के बजाय, पाकिस्तान ने यह बेतुका और अपमानजनक दावा किया कि भारतीय सशस्त्र बल अमृतसर जैसे अपने ही शहरों को निशाना बना रहे हैं और पाकिस्तान पर दोष मढ़ने की कोशिश कर रहे हैं… पाकिस्तान ने गलत सूचना फैलाई कि भारत ने ड्रोन हमले के जरिए ननकाना साहिब गुरुद्वारे को निशाना बनाया, जो एक और सरासर झूठ है… पाकिस्तान सांप्रदायिक विवाद पैदा करने के इरादे से स्थिति को सांप्रदायिक रंग देने की पूरी कोशिश कर रहा है…”

पाकिस्तान म्हणत आहे की आम्ही नानक साहिबवर ड्रोन हल्ला केला आहे. पाकिस्तान या मुद्द्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. पहलगाम हल्ल्यात हेच दिसून आले.

गुरुद्वारावरील हल्ल्यात काही शीख सदस्यांचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तान म्हणत आहे की आपण आपल्याच शहरांवर हल्ला करत आहोत, ही फक्त कल्पना आहे.
करतारपूर कॉरिडॉर खुला आहे की नाही? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले,’ तुम्हाला परिस्थितीची आणि नियंत्रण रेषेवरील परिस्थितीची जाणीव आहे. कर्तारपूर साहिब कॉरिडॉरवरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.सुरक्षेच्या कारणास्तव, कर्तारपूर साहिब कॉरिडॉर पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आला आहे.
धार्मिक स्थळांना लक्ष्य केल्याची चर्चा होती; एका चर्चचाही उल्लेख केला जात आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,’या निंदनीय कृत्याचे वृत्त आहे. पाकिस्तानने डागलेला एक शेल पूंछमधील क्राइस्ट स्कूलजवळ पडला. क्राइस्ट स्कूलच्या एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. ख्रिश्चन कॉन्व्हेंटवरही बॉम्ब पडला आहे. काही लोकांनी भूमिगत हॉलमध्ये लपून आपले प्राण वाचवले. पाकिस्तान चर्च, गुरुद्वारा आणि मंदिरांना लक्ष्य करत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये २६०० पदांसाठी भरती; आजपासून अर्ज सुरू, पदवीधर अर्ज करू शकतात

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

श्रेणीनुसार रिक्त पदांची माहिती:

श्रेणीचे नाव पोस्टची संख्या
राखीव नसलेले १०६६
अनुसूचित जाती ३८७
एसटी ६९७
ओबीसी २६०
ईडब्ल्यूएस २६०
शैक्षणिक पात्रता:

पदवी पदवी

वयोमर्यादा:

किमान: २१ वर्षे
कमाल: ३० वर्षे

राखीव श्रेणींसाठी एसबीआयच्या नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.
निवड प्रक्रिया:

ऑनलाइन परीक्षा
स्क्रीनिंग चाचण्या
मुलाखत
स्थानिक भाषा चाचणी
शुल्क:

सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस: ७५० रुपये
एससी, एसटी, पीएच : मोफत


पगार:४८४८० – ८५९२० रुपये प्रति महिना

परीक्षेचा नमुना:

विषय -प्रश्नांची संख्या- गुण -वेळ -मर्यादा
इंग्रजीभाषा- ३० — ३० — ३० मिनिटे
बँकिंग ज्ञान– ४०– ४०– ४० मिनिटे
सामान्य जागरूकता/अर्थव्यवस्था- ३०- ३०- ३० मिनिटे
संगणक अभियोग्यता- २०- २०- २० मिनिटे
एकूण १२०- १२० -१२० मिनिटे
वर्णनात्मक चाचणी -२ -५०- ३० मिनिटे
अर्ज कसा करावा:

अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या.
नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करा.
वापरकर्ता नाव आणि पासवर्डने लॉग इन करा.
फॉर्ममध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि इतर कागदपत्रे जोडा.
फॉर्मचे पूर्वावलोकन करा आणि शुल्क भरून सबमिट करा.
त्याची प्रिंटआउट घ्या आणि ती जपून ठेवा.

https://ibpsonline.ibps.in/sbidrjadec24

रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट बनले नवे पोप:पोप बनणारे अमेरिकेतील पहिले कार्डिनल

व्हॅटिकनमध्ये झालेल्या पोप कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या दिवशी आज नवीन पोपची निवड करण्यात आली. ६९ वर्षीय रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांची नवीन पोप म्हणून निवड झाली आहे. पोप बनणारे ते अमेरिकेतील पहिले कार्डिनल आहेत. त्यांनी स्वतःसाठी पोप लिओ-१४ हे नाव निवडले आहे.१३३ कार्डिनल्सच्या दोन तृतीयांश बहुमताने (८९ मते) त्यांची पोप म्हणून निवड झाली. १९०० नंतर दोन दिवसांत नवीन पोपची निवड होण्याची ही पाचवी वेळ आहे.

मतदानाच्या दुसऱ्या दिवशी, रोमन कॅथोलिक चर्चच्या सिस्टिन चॅपलच्या चिमणीतून पांढरा धूर निघत होता, जो नवीन पोपची निवड झाल्याचे दर्शवितो.

नवीन पोपची निवड होताच व्हॅटिकनमध्ये उपस्थित असलेल्या ४५ हजारांहून अधिक लोकांनी टाळ्या वाजवून एकमेकांचे अभिनंदन केले. यापूर्वी, ७ मे रोजी झालेल्या मतदानाच्या पहिल्या दिवशी कोणालाही पोप म्हणून निवडण्यात आले नव्हते.

बुधवारी रात्री ९:१५ वाजता मतदानाचा पहिला टप्पा सुरू झाला.

त्यांच्या पहिल्या भाषणात, नवीन पोप म्हणाले – प्रत्येकाच्या हृदयात शांती असो

पोप म्हणून निवड झाल्यानंतर, पोप लिओ-१४ यांनी सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या बाल्कनीतून स्पॅनिश भाषेत लोकांना संबोधित केले. त्यांनी लोकांना इतरांवर दया दाखवण्याचे आणि प्रेमाने जगण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले- फ्रान्सिस यांचा उत्तराधिकारी म्हणून मला निवडणाऱ्या सर्व कार्डिनल्सचे मी आभार मानू इच्छितो. मी अशा पुरुष आणि स्त्रियांसोबत काम करण्याचा प्रयत्न करेन जे निर्भयपणे येशूचा प्रचार करण्यासाठी मिशनरी बनतात आणि त्यांच्याशी विश्वासू असतात.
पोप लिओ यांचा जन्म १४ सप्टेंबर १९५५ रोजी अमेरिकेतील इलिनॉय येथे झाला. त्यांना पोप फ्रान्सिस यांचे जवळचे सहकारी मानले जात होते आणि त्यांची विचारसरणी देखील पोप फ्रान्सिसशी जुळते.
जेव्हा कार्डिनल पोप म्हणून निवडला जातो तेव्हा त्यांना विचारले जाते की त्यांना कोणते नाव द्यायचे आहे. ही परंपरा सहाव्या शतकापासून सुरू आहे. पोपला त्यांना हवे ते नाव निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु सहसा ते मागील पोप किंवा संतांची नावे निवडतात.

लोकशाही व संविधान संरक्षणाची भूमिका घेणाऱ्या पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस भाजपाविरोधात लढत राहील: हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची.

भारत पाकिस्तान हल्ल्याप्रकरणी सर्वांनी भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी उभे रहावे.

मुंबई, दि. ९ मे २०२५

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले पक्ष, मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही. काँग्रेस पक्ष भारत जोडोचा विचार घेऊन पुढे जात आहे, सर्वांनी एकत्र येताना विभाजनवादी विचाराला मुठमाती दिली पाहिजे आणि लोकशाही व संविधानाचे संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रयत्न जे पक्ष करतील त्यांच्यासोबत काँग्रेस असेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्ष भाजपा विरोधात लढत आहे, शरद पवार हे इंडिया आघाडीचे एक महत्वाचे नेते आहेत, काही राजकीय घटना घडली तर त्यानंतर भूमिका घेता येईल. राज्यात महाविकास आघाडी म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर लोकसभा व विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढलो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निर्णय हे स्थानिक पातळीवर घेतले जातील असेही सपकाळ म्हणाले.

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले असून सर्वांनी भारतीय लष्कराच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. काँग्रेस पक्षाने केंद्र सरकार सोबत असल्याचे जाहीर केले आहे. एकदिलाने एकसंध राहून दहशतवादाचा मुकाबला करून दहशतवाद समुळ संपवला पाहिजे. आपण २६/११ च्या हल्ल्याच्या वेळेस दुभंगलेला समाज पाहिला तसे यावेळी दिसत नाही हे विशेष महत्वाचे आहे. पाकिस्तानवरील हल्ल्याकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. काही जण दावे करून हवा देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याची गरज नाही, चुकीच्या घटना टाळाव्यात असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

महाराष्ट्र अलर्ट मोडवर:’वर्षा’ निवासस्थानी ‘सुरक्षा उपाययोजना’ या विषयावर मुख्यमंत्र्यांची बैठक; सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द

भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन सुरक्षा बैठक घेतली. या बैठकीचा उद्देश सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेणे आणि राज्यभरातील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणे होता. दरम्यान महाराष्ट्राला अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृहविभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी उपस्थित होते.मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे.,..

  • प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा.
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थे द्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण करा.
  • केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’ चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्या.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाज माध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅंडल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • प्रत्येक जिल्हाधिकारी यांना आपत्कालीन फंड आजच देणार, ज्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असतील तर ती तत्काळ करता येईल. याव्यतिरिक्त कोणताही महत्वाचा प्रस्ताव यासंदर्भात आला तर तो 1 तासात मंजूर करा.
  • एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या, त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’ बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • सैन्याच्या तयारी संबधित गतिविधीचे चित्रीकरण करणे आणि ते समाज माध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे, त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा.
  • सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या
  • नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचवणे यासाठी शासनाकडून व्यवस्था उभी करा.
  • शासनाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधा (उदा. विद्युतनिर्मिती, वितरण) यावर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्या
  • सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तिन्ही दल तसेच कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत व्हीसी माध्यमातून निमंत्रित करा.

राज्यांना इमर्जन्सी पावर्स वापराचे आदेश,चंदिगड-अंबालामध्ये हवाई हल्ल्यांचा इशारा:लष्करप्रमुखांना टेरिटोरियल आर्मी बोलावण्याचा अधिकार

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती कायम आहे. शुक्रवारी चंदीगड आणि अंबाला येथे हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. लष्कराचे पश्चिम कमांड चंदीगडमध्ये आहे; एनआयए कार्यालयही तिथेच आहे. अंबाला येथे एक हवाई दलाचे तळ आहे.तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. असे म्हटले जाते की जर लष्करप्रमुखांना हवे असेल तर ते प्रादेशिक सैन्याच्या अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना बोलावू शकतात. टीए हे एक निमलष्करी दल आहे जी गरज पडल्यास सैन्याला मदत करते. दुसरीकडे, गृह मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी, एअर चीफ मार्शल एपी सिंग आणि सीडीएस अनिल चौहान यांनी ताज्या परिस्थितीची माहिती दिली. गृहमंत्र्यांनी बीएसएफ आणि सीआयएसएफ अधिकाऱ्यांसोबतही बैठक घेतली. त्यांनी भारत-पाकिस्तान सीमा आणि विमानतळांच्या सुरक्षेची माहिती घेतली. कृषी मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयानेही तयारीबाबत बैठका घेतल्या.

दरम्यान, गेल्या ३ दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार करत आहे. यामध्ये १७ नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये ५ मुलांचाही समावेश आहे. अनेक इमारती आणि वाहनांचेही नुकसान झाले आहे.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने तिसऱ्यांदा पंजाबवर हल्ला केला. अमृतसरमध्ये पहाटे ५ वाजता ड्रोन हल्ला झाला. तथापि, भारतीय लष्कराच्या संरक्षण प्रणाली S-400 ने खासा परिसरात दोन ड्रोन नष्ट केले. यापैकी एक लहान होते आणि दुसरे मोठे होते.

पठाणकोटमध्ये रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी एअरबेसजवळ शोध मोहीम सुरू केली. यावेळी नदीकाठी एक बॉम्ब आढळला. त्यानंतर सैन्याने परिसर रिकामा केला. यासोबतच करोली गावाजवळ एक ड्रोन आढळून आला. सैन्याने ते आपल्या ताब्यात घेतले आहे. येथेही पहाटे ४:३० वाजता ३-४ स्फोटांचे आवाज ऐकू आले.

गुरुवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर, भटिंडामधील बीड तालाब आणि नाथना ब्लॉकमधील तुंगवाली गावातील शेतात पाकिस्तानी रॉकेटचे तुकडे पडलेले आढळले.
सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यास सांगण्यात आले आहे. घरांचे दरवाजे आणि खिडक्या अशा प्रकारे झाकण्यास सांगितले आहे की प्रकाश दिसणार नाही.
शुक्रवारपासून जैसलमेरमधील बाजारपेठा संध्याकाळी ५ वाजता बंद राहतील. संध्याकाळी ६ वाजता सुरू होणारा हा ब्लॅकआउट १२ तासांसाठी असेल. रात्री लग्न करू नका. जिल्ह्यातील रामदेवरा परिसरातील सर्व दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, धर्मशाळा आणि गोदामे शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, उत्तराखंडमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. राज्यभरात सुरक्षेबाबत पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. विशेषतः नेपाळच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त दक्षता बाळगली जात आहे. गुरुवारी रात्री उशिरा राजधानी डेहराडूनमध्ये सघन तपासणी मोहीम राबविण्यात आली, ज्यामध्ये संशयितांची कसून चौकशी करण्यात आली.संरक्षण मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे ज्यामध्ये लष्करप्रमुखांना प्रादेशिक सैन्य नियम, १९४८ अंतर्गत प्रादेशिक सैन्य (टीए) च्या सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा अधिकार देण्यात आला आहे. टीए हे एक निमलष्करी दल आहे जे नागरिकांना सशस्त्र दलांमध्ये सेवा करण्याची संधी प्रदान करते. ते नोकरी किंवा व्यवसाय देखील सुरू ठेवू शकतात. गरज पडल्यास सैन्याला मदत करणे आणि अंतर्गत सुरक्षा, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत सेवा प्रदान करणे हा त्याचा उद्देश आहे.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर सांगितले की, आमची कृषी गोदामे भरली आहेत. आम्ही दहशतवाद्यांना सोडणार नाही. आम्ही दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला, नागरिकांवर नाही. कृषी विभाग या नात्याने, अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्याकडे गहू, तांदूळ किंवा इतर धान्ये पुरेशा प्रमाणात आहेत. सीमेवर सैनिक तैनात आहेत आणि शास्त्रज्ञ शेतात शेतकऱ्यांसोबत आहेत. शेतकऱ्यांसोबत शेतात काम करणे आणि उत्पादन वाढवणे ही आपली जबाबदारी आहे.

इंडियन ऑइलने शुक्रवारी सांगितले की, ‘देशभरात इंधनाचा पुरेसा साठा आहे. आणि आमच्या पुरवठा लाइन व्यवस्थित काम करत आहेत. घाबरून खरेदी करण्याची गरज नाही. आमच्या सर्व आउटलेटवर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सहज उपलब्ध आहेत.’

सांस्कृतिक ज्ञानदिंडीने नवोदित मराठी साहित्य संमेलनाचा जागर

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून साहित्य संमेलनाची सुरुवात

कराड, ९ मे २०२५ : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ संत तुकाराम महाराजांचे वंशज रामदास महाराज मोरे यांच्या हस्ते सांस्कृतिक ज्ञान दिंडीने करण्यात आला. कऱ्हाड येथील दत्त चौकातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या ज्ञान दिंडीने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कृष्णाकाठ या सांस्कृतिक ग्रंथाची ही ज्ञानदिंडी यावेळी काढण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रातून पाचशे पेक्षा जास्त साहित्यिक या ज्ञान दिंडीत सहभागी झाले होते. वारकऱ्यांच्या ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात आणि महाराष्ट्रातील महामानवांच्या बहुसांस्कृतिक पेहरावात प्रचंड उत्साहात संमेलनाचे मुख्य निमंत्रक डॉ. शरद गोरे यांच्या नेतृत्वात ही दिंडी पार पडली. यावेळी कराड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत व्हटकर, मुख्य महसूल अधिकारी अभिजीत पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजप किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ, भाजपचे भरत पाटील, शिवसेनेचे राजेंद्र माने, आयोजक विकास भोसले, डॉ. नितीन नाळे, डॉ. हनुमंत चिकने, संदीप पवार, विक्रम शिंदे, अमोल कुंभार, गणेश दिवेकर, रमेश रेडेकर, नम्रता पाटील, नंदा वर्पे, नंदा पवार, विद्या पवार, सरिता कलढोणे तसेच महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ साहित्यिक यावेळी उपस्थित होते.

रसिकांनी अनुभवले ‘परमेलप्रवेशक’ रागांचे सौंदर्य

गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे आयोजन ‌
पुणे : दिवसाच्या आठ प्रहरांमध्ये बांधलेले उत्तर भारतीय संगीतातील रागचक्राचे सुरेल आवर्तन रसिकांनी ‘परमेलप्रवेशक राग – रंग’ या मैफलीच्या माध्यमातून अनुभवले. संगीतातील विविध थाट, त्यातील दोन थाटांच्या सीमारेषांवर उभे असलेले राग आणि त्यांच्यातील शुद्ध – कोमल स्वरांच्या संगती यांचे सुंदर दर्शन या मैफलीतून घडले.
भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे ‌‘परमेलप्रवेशक राग-रंग‌’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात करण्यात आले होते.
कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता लेखन संगीताचार्य डॉ. ज्योती काळे यांची होती. या कार्यक्रमात गायिका डॉ. मीनल देशपांडे व शुचिता आठलेकर, तसेच स्वतः संगीताचार्य डॉ. ज्योती काळे यांनी विविध बंदिशी सादर केल्या. तोडी, भैरव, मारवा, कल्याण, भैरवी, खमाज, पूर्वी, बिलावल, काफी आणि आसावरी या दहा थाटांमधील सीमारेषेवर वावरणारे राग, समयचक्रानुसार होणारे त्यांचे सादरीकरण, शुद्ध – कोमल स्वरांचे नक्षीकाम तसेच तीव्र स्वरांची स्थाने, याविषयीचे विवेचन डॉ. ज्योती काळे यांनी केले. त्यापाठोपाठ आठ प्रहरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ रागांतील आठ बंदिशी सादर झाल्या. मुलतानी रागामधील सरगमगीतापासून सुरू झालेला हा सांगीतिक प्रवास जौनपुरी रागातील तराण्यापर्यंत रसिकांना खिळवून ठेवणारा होता. बीत गयो जनम (पूरिया – ताल त्रिताल), तू जयमाल रानी (जयजयवंती – एकताल), कहा तुम पिया (अडाणा – झपताल), शामसुंदर मनमोहन (भैरवी – दादरा), जागो जागो रे नंद दुलार (भटियार – त्रिताल), कवन बटरिया (अल्हैया बिलावल – अध्धा त्रिताल) आणि तराणा (जौनपुरी – रूपक) अशा बंदिशी सादर झाल्या.
दोन थाटांच्या मधले सीमारेषेजवळचे राग म्हणजे परमेलप्रवेशक राग, असे सांगून डॉ. ज्योती काळे यांनी या संकल्पनेचे शास्त्रीय आणि सौंदर्यशास्त्रीय, अशी दोन्ही रूपे स्पष्ट केली.
त्यांना स्वानंद कुलकर्णी (संवादिनी), श्रीकांत भावे (तबला) यांनी अनुरूप साथसंगत केली. भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्‌सचे संचालक डॉ. शारंगधर साठे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ गायिका, गुरू, रचनाकार विदुषी डॉ. माधुरी डोंगरे, गायिका अनुराधा मराठे, अंजली मालकर आदी उपस्थित होते.

पुण्यात ११८८ कथक नृत्यांगनांचा विश्वविक्रम !

पुणे :राज्यातील २० शहरातून आलेल्या ११८८ कथक नृत्यांगनांनी एकत्र सादर केलेल्या नृत्याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ मध्ये झाली आहे. एकाचवेळी सर्वाधिक नृत्यांगनांनी कथक नृत्य सादर करण्याचा विश्वविक्रम यातून नोंदवला गेला. पुण्याच्या प्रेरणा फाउंडेशनच्या ‘नृत्य चक्र’ या नृत्यसमूहाने या विक्रमाची नोंद केली.

ज्योती मनसुखानी यांच्या संकल्पनेतून विविध गटांच्या एकूण ११८८ नृत्यांगनांनी एकत्र येत २० मिनिटांसाठी नृत्य सादरीकरण केले. संयोजन समितीत तेजस्विनी साठे,ज्योती मनसुखानी,अस्मिता ठाकूर, रसिका गुमास्ते आणि डॉ. माधुरी आपटे यांचा समावेश होता.कथक नृत्यांगनांनी एकाचवेळी सादर केलेल्या सर्वाधिक रचनांसाठी ही नोंद झाली.गतवर्षी २५ फेब्रुवारी रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,मात्र नोंदीचे प्रमाणपत्र १ मे २०२५ रोजी मिळाले. शास्त्रीय कथक नृत्य सादरीकरणाचा हा उपक्रम महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर झाला होता.

महिन्याभराच्या तैनाती यशस्वीरित्या पूर्ण करून आयएनएस सुकन्या (आयओएस सागर) कोचीला परतले

नवी दिल्‍ली-

भारतीय नौदलाने पहिल्यांदाच हाती घेतलेल्या भारतीय महासागरी जहाज सागर या उपक्रमात नऊ आयओआर (हिंद महासागर क्षेत्रातील देश) नौदलांतील कर्मचारी सहभागी झाले होते. आग्नेय आयओएस क्षेत्रातील महिन्याभराच्या तैनातीच्या समाप्तीनंतर हे जहाज 08 मे 2025 रोजी कोची येथे परतले. कोची येथील नौदल तळावर झालेल्या भव्य स्वागत समारंभात दक्षिणी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस अॅडमिरल व्ही श्रीनिवास यांनी भारतीय कर्मचारी तसेच नऊ मित्रदेशांच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

तैनातीच्या यशस्वी सांगतेमुळे सागरी सहकार्य क्षेत्रात एक नवा अध्याय सुरु झाला असून सामुहिक सागरी हिताचे संरक्षण, क्षमता निर्मिती तसेच आयओआर देशांशी असलेली कायमस्वरूपी भागीदारी यांच्याप्रती भारताची कटिबद्धता यातून अधोरेखित होत आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कारवार येथून दिनांक 05 एप्रिल 2025 रोजी आयओएस सागर या जहाजाला रवाना केले होते. तैनातीदरम्यान या जहाजाने दार-ईसलाम, नकाला, पोर्ट लुईस,पोर्ट व्हिक्टोरिया तसेच माले या बंदरांना भेट दिली. संयुक्त नौदल सराव, व्यावसायिक तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण तसेच टांझानिया, मोझांबिक, मॉरीशस आणि सेशेल्स या महत्त्वपूर्ण देशांमध्ये संयुक्त ईईझेड टेहळणी हे या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचे घटक होते.

कोमोरोस, केनिया,मादागास्कर,मालदीव्ज,मॉरीशस, मोझांबिक, टांझानिया, सेशेल्स आणि श्रीलंका या नऊ भागीदार देशांच्या 44 आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा अत्यंत अनोखा अनुभव ठरला कारण या सर्वांनी भारतीय नौदल कर्मचाऱ्यांसह संयुक्तपणे या जहाजावर काम करून, ‘एक महासागर, एक मोहीम’ या संकल्पनेचा खरा अर्थ दाखवून दिला.  दिनांक 25 मार्च रोजी कोची येथे एसएनसीमध्ये बंदरसंबंधित आणि सागरी प्रशिक्षण अशा संयुक्त टप्प्यासह सुरु झालेला आयओएस सागर या जहाजाचा प्रवास सर्व कर्मचाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला.आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कर्मचाऱ्यांचे एका उत्तम प्रकारची वीण असलेल्या आणि एकसंघ पथकाच्या स्वरूपातील अशा प्रकारचे व्यावसायिक आणि सुरळीत एकत्रीकरण सौहार्द आणि सागरी मैत्रीच्या उर्जेचे दर्शन घडवते. ही मोहीम म्हणजे भारत सरकारची महासागर (प्रदेशातील सुरक्षिततेसाठी परस्पर आणि समग्र आघाडी) ही धोरणात्मक संकल्पना साकार करण्यासाठी आयओआर मध्ये ‘सर्वप्रथम प्रतिसाद देणारा देश’ आणि ‘प्राधान्यक्रम असलेला संरक्षण भागीदार’ असण्याप्रती भारतीय नौदलाच्या कटिबद्धतेचा पुरावाच आहे.