Home Blog Page 3157

10 वाहिन्या जळाल्याने डेक्कन परिसरात वीजपुरवठा विस्कळीत

0

पुणे, दि. 23 : डेक्कनमधील महावितरणच्या स्विचिंग स्टेशनमध्ये आग लागून इनकमिंगच्या दोन व आऊटगोईंगच्या आठ अशा 11 केव्ही क्षमतेच्या एकूण 10 वीजवाहिन्या सोमवारी (दि. 23) दुपारी 2 वाजता जळाल्याने जंगली महाराज रोड, डेक्कन परिसर, फर्ग्युसन कॉलेज रोड परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. रात्री उशिरापर्यंत या सर्व वाहिन्या बदलण्याचे काम पूर्ण होणार आहे.

दरम्यान या आगीमुळे वीज खंडित झालेल्या सुमारे 3500 पैकी 1500 वीजग्राहकांना पर्यायी व्यवस्थेतून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा करण्यात आला. परंतु विजेच्या वाढत्या मागणीमुळे भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने उर्वरित वीजग्राहकांसाठी पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा उपलब्ध होऊ शकला नाही.

याबाबत माहिती अशी, की डेक्कनमधील बीएमसीसी रोडवरील इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रिसर्च (आयएमडीआर) स्विचिंग स्टेशनला आज दुपारी 2 वाजता आग लागली. यामध्ये 11 केव्ही क्षमतेच्या 2 इनकमिंग व 8 आऊटगोईग अशा एकूण 10 वीजवाहिन्या जळाल्याने जंगली महाराज रोड, डेक्कन, आपटे रोड, एफसी रोड, शिरोळे रोड, बीएमसीसी रोड आदी परिसरातील सुमारे 3500 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. दुपारी 5 वाजेपर्यंत टप्पाटप्प्याने सुमारे 1500 वीजग्राहकांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात आला. मात्र उन्हामुळे विजेची मागणी वाढलेली असल्याने भारव्यवस्थापन शक्य झाले नाही. परिणामी उर्वरित सुमारे दोन हजार वीजग्राहकांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देणे शक्य झाले नाही.

प्राथमिक अंदाजानुसार स्विचिंग स्टेशनमधील या आगीत महावितरणचे सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारणही अद्याप समजू शकले नाही. महावितरणकडून या आगीत जळालेल्या सर्व वीजवाहिन्या बदलण्याचे काम ताबडतोब सुरु करण्यात आले. आज रात्री 10 वाजेपर्यंत जळालेल्या वीजवाहिन्या बदलण्याचे काम पूर्ण होणार आहे. वीजग्राहकांनी या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पालिका शाळेतील मुलीवर अत्याचार -कारवाई नाही कोणावर ?(व्हिडीओ)

पुणे- देशभर अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना पुणे महापालिकेच्या शाळेतील मुलींची  सुरक्षितता सुद्धा धोक्यात असल्याचे निष्पन्न झाले आहे . मार्केटयार्ड परिसरातील एका शाळेत सहावीच्या एका मुलीवर  शाळेतच अत्याचार झाला आणि ती 4 महिन्याची गर्भवती असताना हा अत्याचार  उघड झाला .. याबाबत वृत्तपत्रातून आलेली बातमी  आणि मुख्यसभेत विपक्षनेते चेतन तुपे यांनी उठविलेला आवाज ही , यावर पालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांच्याकडून उत्तरे मिळवू शकला नाही . शाळेत मुलगी गेल्यानंतर तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी अधिकारी आणि मुख्याध्यापक किंवा अन्य अधिकारी यांच्यावर आहे किंवा नाही ? अशा प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत . आज महापालिकेची मुख्य सभा पुन्हा होते आहे …हा संवेदनशील मुद्दा पुन्हा उठवून याबाबत जाब कोणी विचारणार ? कि हा मुद्दाच सोडून देणार ? हे आज स्पष्ट होईल .

खासदार संजय काकडेंनी भीम फेस्टिव्हल मध्ये गाण्यावर धरला ठेका

0

खासदार काकडेंच्या पुण्यातील भीम फेस्टिव्हलला भेटी

पुणे, दि. 22 एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने पुणे शहर व परिसरात सुरु असलेल्या भीम फेस्टिव्हलला खासदार संजय काकडे यांनी भेटी देण्यास सुरुवात केली आहेत. दांडेकर पूल येथील भीम फेस्टिव्हलला नुकतीच भेट दिल्यानंतर त्यांनी आज विमाननगर येथील भीम फेस्टिव्हलला भेट दिली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला. खासदार काकडे यांनी ठेका धरताच उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

खासदार संजय काकडे यांनी आज विमाननगर येथील भीम फेस्टिव्हलला भेट दिली. याप्रसंगी आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक राहुल भंडारी, नगरसेवक शंकर पवार, ओंकार कदम आदी मान्यवर आणि हजारो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी त्यांनी आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

मंत्री बापट आणि शिवतारेंवर आरोप करून शेतकऱ्याची आत्महत्या

0

पुणे –  जलसंपदा विभागाकडून शेतीसाठी वेळेवर पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून इंदापूर अर्बन बँकेचे विद्यामन संचालक व शेतकरी वसंत सोपाना पवार (वय ४८, रा. बेलवाडी) यांनी  विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी पवार यांनी दोन चिठ्या लिहून ठेवल्या असून आत्महत्येस  जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीष बापट हे जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखलकरावेत असे या चिठ्ठीत लिहून ठेवले आहे

वालचंदनगर पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार वसंत पवार यांचे लासुर्णेमध्ये हार्डवेअर व शेतीसाठी लागणाऱ्या  रासायनिक खतांचे दुकान आहे. लासुर्णे व बेलवाडी परिसरामध्ये त्यांची शेती आहे. शनिवारी (दि. २१) रोजी लासुर्णे येथील दुकानबंद केल्यानंतर घरी गेलेच नव्हते. घरातील नागरिकांनी रात्रभर शोध घेतला. मात्र, त्यांचा शोध लागला नव्हता. रविवारी (दि. २२)रोजी सकाळी त्यांचा मृतदेह बेलवाडी गावच्या हद्दीतील जामदारवस्ती जवळील विहिरीमध्ये पाण्यावरती तरंगत असल्याचा आढळून आला. वालचंदनगर पोलिसांनी तातडीने मृतदेह पाण्यातुन बाहेर काढल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये दोन चिठ्ठया आढळल्या आहेत. यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे पिके जळाल्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये वाढ झाल्याने कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक फौजदार शिवाजी होले,महेंद्र फणसे करीत आहेत. 

नीरा डाव्या कालव्यातून गेल्या वर्षी व य वर्षी उन्हाळी हंगामचे पाणी वेळेत न मिळाल्यामुळे आत्महत्येस जबाबदार असणारे जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व पुणे जिल्हाचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी पवार यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवली आहे.माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. हेमंतराव नरुटे, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर,मार्केट कमिटीचे माजी संचालक अनिल पवार,  दुधगंगाचे माजी अध्यक्ष शहाजी शिंदे, उपसरपंच प्रकाश चव्हाण यांनी शेतीसाठी पाणी प्रश्नावरून सरकारच्या विरोधात आवाज उठवून कुंटूबाला न्याय मिळवून देण्याची प्रयत्न करावा असे वसंत पवार यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे.जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभरामुळे निरा डाव्या कालव्यातुन उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळण्यास विलंब होत असल्यामुळे वसंत पवार व परिसरातील शेतक-यांनी १३ एप्रिल रोजी लासुर्णे जवळील चिखली फाटा येथे ४२ व ४३ क्रमांकाच्या वितरिकेस पाणी सोडण्यासाठी रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता. जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी ४२ व ४३ क्रमांकांच्या वितरिकेस १७ व १९ एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते.परंतु अद्याप या दोन्हीही वितरिकेस पाणी सोडण्यात आलेले नाही. यामुळे या परीसरातील सात हजार एकरातील पिके जळण्याच्या  मार्गावर आहेत.

झोपडपट्टीत भीषण अग्नितांडव: तीन तासात होत्याचं नव्हतं झालं!

0

 

पुणे-मार्केटयार्ड येथे शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत 72 घरे भस्मसात झाले आहेत. घटनास्थळी दोन सिलेंडर फुटल्याने  आग पसरत गेली. नागरिकांनी सतर्कता दाखवत 50 पेक्षा अधिक गॅसचे सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशामक दलाच्या 16 गाड्या, 13 पाण्याचे टँकर आणि 55 जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

आंबेडकरनगर परिसरात दाटीवाटीने घरे असल्यामुळे घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब पोहोचण्यास विलंब होत होता. आगीचे स्वरुप मोठे असल्याने ती त्वरित आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. तब्बल तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तोपर्यंत नागरिकांना डोळ्यासमोर आपली घरे जळताना पाहावी लागली.

आगीत भस्मसात झालेल्या एका घरात लग्नसराईची लगबग सुरू होती. चार दिवसांवर लग्न आले होते. त्यासाठी भिशीमधून जमा केलेले दीड लाख रुपये कालच घरात आणून ठेवले होते आणि आज सकाळी ही घटना घडली. आगीत संपूर्ण घर तर जळालेच पण कालच आणलेल्या दीड लाख रुपयांचाही कोळसा झाल्याचे सांगताना एका महिलेच्या डोळ्यातील पाणी आटत नव्हते..

रमेश  नामक इसमाने रडत रडत त्याची कथा सांगितली. सहा महिन्यांपासून भावाच्या लग्नासाठी मार्केटयार्डात मोलमजुरी करून पैसे गोळा केले होते. दोन दिवसानंतर आम्ही संपूर्ण कुटूंबासह उत्तरप्रदेश येथील घरी जाणार होतो. परंतू आगीने आमचे सर्वस्व हिरावून घेतले. आता माझ्या भावाच लग्न कसं होणार, हे सांगताना तो धाय मोकलून रडत होता.

महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत निषेध व निदर्शने

0

पुणे-रिपब्लिकन संघर्ष दल महाराष्ट्र प्रदेश या सामाजिक संघटनेच्यावतीने कटुआ येथील असिफा , उनाव व साताऱ्यातील अमरावती चव्हाण या ७० वर्षीय दलित महिलेला पेट्रोल टाकून जाळून हत्या झालेल्या अन्यायाचा तसेच भारतातील लहान मुलीवर वाढत असलेले बलात्कार खुनाच्या घटनेचा निषेध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जागर मेळावा घेऊन मालधक्का चौकात शासन सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात निषेध करून निदर्शने करण्यात आली .

रिपब्लिकन संघर्ष दल महाराष्ट्र प्रदेश या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय भिमाले यांच्या नेर्तृत्वात जागर मेळावा व निषेध करण्यात आला . यावेळी महापालिका स्थायी समिती माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी , भीमछावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शाम गायकवाड , लष्कर ए भीमा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस धनंजय सोनवणे , लष्कर भीमा संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष विनोद साळवे , भारिपचे नागेश भोसले , विलास चौरे समाज सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब चौरे , , भीमछावा संघटनेचे महिलाध्यक्षा निर्मल गायकवाड , नरेश जगताप , सूरज पाटोळे , अभिषेक शिकोत्रे , अनिल कांबळे , अनिल कांबळे , रिपब्लिकन संघर्ष दलाचे पुणे शहर अध्यक्ष नितीन बालकी  , पुणे शहर सरचिटणीस विनायक बंडी , किरण पारधे , पुणे महिलाध्यक्षा जाहिदा शेख , सरचिटणीस मिना साळवी , निर्मला पारधे , लता माकर , मनिषा वाघमारे , कविता जगताप आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने उपस्थित होते .

सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांच्या सत्काराचा सोहळा संपन्न

0
पुणे- नगरसेवक अजित दरेकर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांच्या सत्काराचा सोहळा  येथे संपन्न झाला .  यातील श्रीधर फडके यांची  भक्तीगिते सादरीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला .कार्यक्रमाची सुरूवात स्वामींचा भंडारा ने झाली   नगरसेविका आरती कोंढरे व विजया हरीहर ,सुशिला नेटके आदी मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावली .त्यानंतरच्या  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंञी  बाळासाहेब शिवरकर, बाळासाहेब दाभेकर,सहपोलिस निरीक्षक वैभव पवार,
तसेच काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा सौ.कमल व्यवहारे,नगरसेवक  रघुनाथ गौडा आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर राहुल साठे प्रस्तुत भव्य शो
“नृत्यविष्कार २०१८”या कार्यक्रमास प्रारंभ झाला
या कार्यक्रमाची सांगता प्रमुख पाहुणे आमदार अनंतराव गाडगीळ,
माजी गृहराज्यमंञी रमेश बागवे,  अभय छाजेड,तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या उपस्थितीत झाली .यावेळी श्री अक्कलकोट  स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टच्या वतीने  दिशा परिवारचे  संस्थापक अध्यक्ष श्री राजाभाऊ चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला .

कठुआ, उन्नाव प्रकरणी पद्मावती ते लक्ष्मीनगर कॅण्डल मार्च

0
 
पुणे-
कठुआ, उन्नाव व सुरत येथे झालेल्या महिलांवर अत्याचारा विरोधात शिंदे हायस्कुल चौक ते गजानन महाराज चौक या दरम्यान आक्रोश यात्रा व कॅण्डल मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये सहकारनगर, पद्मावती व लक्ष्मीनगर परिसरातील अनेक संस्था आणि संघटना सहभागी झाल्या होत्या.
या प्रसंगी मोर्च्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, युवती  व युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. महात्मा गांधी तरुण मंडळ, मैत्रीय महिला मंच, शिव ओम क्रिडा प्रतिष्ठान, काचेचा गणपती मित्रमंडळ, एकत्व फाऊंडेशन, स्ट्रायकर्स क्लब, पुणे हेल्पिंग हॅन्डस, सायन्स अॅकॅडमी व दिलासा आधार केंद्र आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. बलात्कारांच्या घटनेतील आरोपींना फाशी झालीच पाहिजे यासारखे हातात फलक घेतलेल्या युवतींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. या प्रकरणातील आरोपींना  कठोरातील कठोर शिक्षा झाले पाहिजे, पुन्हा असा गुन्हा करण्याचं धाडस कोणी केलं नाही पाहिजे, बलात्कारासारख्या घटनांच्या केसेस फास्ट ट्रक कोर्टात चालविल्या जाव्यात, महिला सुरक्षेकरिता कठोर पाऊले उचलली जावीत, असे मनोगत उपस्थित महिला व युवतींनी केले.  या कॅण्डल मार्च व आक्रोश मोर्च्याचे आयोजन श्रीनिवास सुभाष जगताप यांनी केले होते.

असिफाला न्याय मागण्यासाठी भाजपच्या नगरसेविकांनी देखील पुढे येण्याची गरज – अश्विनी कदम

0

पुणे- आठ वर्षाच्या असिफाला न्याय मिळालाच पाहिजे या मागणी साठी भाजपच्या नगरसेविकांनी देखील पुढे आले पाहिजे , महिला मुलींवरील अत्याचारा संदर्भात पक्षभेद विसरून महिलांनी एकजूट दाखविली पाहिजे असे मत व्यक्त करीत स्थायी समिती च्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी महापालिकेच्या सभागृहात या बाबत भाजप नगरसेविका का मागे राहिल्या ? त्यांच्या महिला अत्याचाराच्या विरोधातील भावना बोथट झाल्या आहेत काय ?असा सवाल केला आहे .
महिला मुलींवरील अत्याचार संदर्भात राजकीय पक्षा च्या भिंती उभ्या करण्या पेक्षा सर्वपक्षीय नगरसेविकांनी एकजूट दाखविली पाहिजे असे त्यांनी सांगितले. आपल्या स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत निर्भया  योजना मांडली होती. जिथे महिला आणि मुलींची वर्दळ असते अशा ठिकठीकाणी निर्भय पथके तैनात करावीत जेणेकरून टवाळखोरांवर  धाक बसून महिलांना त्रासाला सामोरे जावे लागणार नाही . अशी पथके तैनात करण्यासाटी महापौर मुक्ता टिळक यांनी पुढाकार घ्यावा असे हि त्या म्हणाल्या … पहा आणि ऐका नेमके अश्विनी कदम यांनी काय म्हटले आहे .

नारद मंदिरात कीर्तन महोत्सव

0

पुणे-कीर्तनकलानिधी ह.भ.प. कै. डॉ. अनंतबुवा मेहेंदळे यांच्या २६ व्या पुण्यतिथी निमित्ताने पुण्यातील भिकारदास मारुती मंदिरा जवळील नारद मंदिर येथे रविवार दि २२ एप्रिल ते मंगळवार दि २४ एप्रिल असे तीन दिवस रोज ,सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ‘अनंत स्मृती कीर्तन महोत्सव २०१८ ‘ साजरा करण्यात येणार आहे.या कीर्तन महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळात जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प सौ तारा देशपांडे यांना दरवर्षी दिला जाणारा अनंत स्मृती कीर्तन पुरस्कार प्रदान केला जाणार आहे रोख रक्कम , स्मृतीचिन्ह ,सन्मानपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या कीर्तन महोत्सवात दि २२ एप्रिल रोजी ह. भ. प श्री मनोहरबुवा जोग (गोवा )यांचे कीर्तन होणार असून सोमवार दि २३ एप्रिल रोजी कीर्तन विशारद ह.भ.प सौ निवेदिता मेहेंदळे (पुणे) यांचे पूर्वरंग ‘शक्ती ही देवता’ आणि उत्तररंग ‘विवेकानंद’ या विषयावर कीर्तन होणार असून दि २४ एप्रिल रोजी अनंत स्मृती कीर्तन पुरस्काराच्या मानकरी जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प सौ तारा देशपांडे यांचे पूर्वरंग ‘त्यागिता हा देह’ आणि उत्तररंग ‘मयूरध्वज’ या विषयावर कीर्तन सादर होणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामुल्य आहे .

पारदर्शकता व गतीमानता आणण्यासाठी महावितरणद्वारे केंद्रीकृत देयक प्रणालीचा अवलंब

0

मुंबई- केंद्र सरकारने सर्व रोख व्यवहार कमी करून ऑनलाईनद्वारे व्यवहार करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याच धर्तीवर महावितरणच्या सर्व आर्थिक व्यवहारात अधिक गतीमानता, पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी 01 मे 2018 पासून महावितरणच्या ईआरपी प्रणालीतून केंद्रीकृत देयक प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीत राज्यातील सर्व कार्यालयातील देयकांची अदायगी केवळ मुंबई मुख्यालयातूनच थेट आदात्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

सध्या महावितरणमध्ये स्थानिक पातळीवर देयक अदायगीची प्रक्रिया राबविण्यात येते. यामुळे या सर्व प्रक्रियेस काही प्रमाणात विलंब लागतो. त्यामुळे आर्थिक कामकाजात अधिक गतीमानता, पारदर्शकता आणण्यासाठी स्वयंचलित सॅप प्रणालीद्वारे ही केंद्रीकृत देयक अदायगीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

या केंद्रीकृत प्रणालीतून कंत्राटदारांच्या देयक अदायगीसाठी दरमहा सुमारे 20 हजार आर्थिक व्यवहार हाताळले जाणार आहेत. अपारंपारिक वीज खेरेदीशी संबंधित 5 ते 6 हजार आर्थिक व्यवहाराची ही प्रक्रिया यापूर्वीच महावितरणने सुरू केलेली आहे. याशिवाय महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित ७५ ते ८० हजार एवढ्या आर्थिक व्यवहारासाठी ही प्रक्रीया लवकरच राबविण्यात येणार आहे. या प्रणालीचा लाभ घेण्यासाठी कंत्राटदारांनी महावितरणच्या विभागीय कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी कंत्राटदाराने बँकेच्या तपशीलासह व्हेंडर नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल इत्यादी माहिती देणे बंधनकारक आहे.

याशिवाय रोख व्यवहार कमी करण्यासाठी महावितरण कार्यालयातील दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना प्री-प्रेड कार्ड देण्यात येणार आहेत. राज्यभरात सुमारे 2 हजार कर्मचाऱ्यांना या कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्डाद्वारे ते आपल्या कार्यालयातील प्रशासकीय बाबीसंबंधीचा खर्च करतील.

सिरीज् टेनिस स्पर्धेत एकेरीत शरण्या गवारे, क्रिश पटेल,गार्गी पवार व भक्ती शहा यांना विजेतेपद

0

पाचगणी- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्ससनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या शरण्या गवारे हिने तर, मुलांच्या गटात गुजरातच्या क्रिश पटेल या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. दुहेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या गार्गी पवार व गुजरातच्या भक्ती शहा या जोडीने विजेतेपद पटकावले.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात अंतिम फेरीतपाचव्यामानांकित लक्ष्यचा पाठिंबा लाभलेल्या शरण्या गवारेने आपली विजयी मालिका कायम ठेवत विपाशा मेहराचा 6-2, 4-2 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. 1तास 20मिनिटे चाललेल्या या सामन्यात  शरण्याने सुरेख सुरुवात विपाशाचीपहिल्याच गेममध्ये सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये शरण्याने आपले वर्चस्व कायम राखत पाचव्या गेममध्ये विपाशाची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट  6-2असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला आक्रमक खेळ केला व स्वतःच्या सर्व्हिस राखल्या. सामन्यात  4-2 अशी स्थिती असताना  विपाशाला बरे वाटू न लागल्यामुळे तिने सामन्यातून माघार घेतली.  शरण्या गवारे हि पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत चौथ्या मानांकित गुजरातच्या क्रिश पटेल याने दुसऱ्या मानांकित दिल्लीच्या सुशांत दबसचा 6-4, 6-3असा संघर्षपूर्ण पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.  दुहेरीत मुलांच्या गटात  दिवेश गेहलोट याने सुशांत दबसच्या साथीत फैज नस्याम व आर्यन भाटियाचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-4असा पराभव करून विजेतेपद मिळवले. मुलींच्या गटात   गार्गी पवार व भक्ती शहा या जोडीने संजना सिरीमल्ला व सृजना रायाराला यांचा 6-4, 6-1असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील  विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना प्रशस्तिपत्रक व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली.  स्पर्धेचे पारितोषिक वितरण लगान व जोधा अकबरमधील अभिनेता अमिन हाजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक जावेद सुनेसरा व वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते
स्पर्धेचा सविस्तर निकाल:  16 वर्षाखालील मुली: अंतिम फेरी: 

शरण्या गवारे(5)वि.वि.विपाशा मेहरा6-2, 4-2 सामना सोडून दिला;

मुले- क्रिश पटेल(4)वि.वि.सुशांत दबस(2)6-4, 6-3;

दुहेरी गट: उपांत्य फेरी: मुले:

दिवेश गेहलोट/सुशांत दबस(1)वि.वि.अर्णव पतंगे/चेतन गडियार(4)6-4, 6-2;

फैज नस्याम/आर्यन भाटिया वि.वि.उदित गोगोई/नितीन सिंग(2)6-3, 6-4;

अंतिम फेरी:  दिवेश गेहलोट/सुशांत दबस वि.वि.फैज नस्याम/आर्यन भाटिया 7-6(4), 6-4;

मुली:  उपांत्य फेरी: 

संजना सिरीमल्ला/सृजना रायाराला वि.वि.भूमिका त्रिपाठी/वैष्णवी आडकर6-1, 6-2;

गार्गी पवार/भक्ती शहा वि.वि.दिव्या भारद्वाज/स्वरदा परब 6-4, 6-3;

अंतिम फेरी:  गार्गी पवार/भक्ती शहा वि.वि. संजना सिरीमल्ला/सृजना रायाराला6-4, 6-1.

पिंपरी महापालिकेला दणका; पुणे महापालिका सुधारणार काय ? ?

0

देशातील करोडो कंत्राटी कामगारांना दिलासा: महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निकाल

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या १८ वर्षांच्या लढाईला यश: अवमान याचिकेवर महापालिका आयुक्तांना दणका

पुणे– कंत्राटी सफाई कर्मचा-यांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम अदा करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिला असून  २० जून २०१८ पर्यंत त्यामुळे कर्मचा-यांना ६५ कोटी १६ लाख ८ हजार १४० रुपये महापालिकेला द्यावे लागणार आहेत. मात्र, या निकालाचा फायदा देशातील करोडो कंत्राटी कामगारांना होणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी गुरुवारी (दि. १९) पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधात कंत्राटी सफाई कर्मचा-यांना पालिका सेवेत कायम करावे व कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, याबाबत यशवंत भोसले यांनी पालिकेविरोधात सन २००१ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सन २००४ मध्ये या याचिकेवर निर्णय झाला आणि त्यामध्ये कंत्राटदार बदलले तरी कामगारांना सेवेत कायम ठेवावे. तसेच अतिरिक्त आयुक्त कामगार विभाग यांनी दिलेल्या निर्णयानुसार समान काम समान वेतन कर्मचा-यांना देण्यात यावे. सन ११९८ पासून २००४ पर्यंत किमान वेतनाच्या फरकाची कर्मचा-यांची यादी व रक्कम १६ कोटी ८० लाख २ हजार २०० रुपये देण्याबाबतचेही निर्देश देण्यात आले होते.

या निकाला विरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन त्यावर स्थगितीचे आदेश आणले. यानंतर सर्व कामगारांना पालिकेने काढून टाकले. या याचिकेवर १२ जानेवारी २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवून महापालिकेची याचिका फेटाळली. गेली २ वर्षे ३ महिने या निकालाची अंमलबजावणी करावी, यादीतील सर्व कर्मचा-यांना त्यांच्या नावे धनादेश द्यावेत, व सर्व ५७२ कामगारांना कामावर घ्यावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महापालिका तत्कालीन आयुक्तांनी याचिकाकर्ते यशवंत भोसले यांच्यासमवेत अनेक बैठका घेतल्या. मात्र, अंमलबजावणी केली नाही. पालिका चालढकलपणा करत असल्याने त्यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केला म्हणून भोसले यांनी १० ऑक्टोबर २०१६ रोजी महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली होती. यावेळी यशवंत भोसले यांनी महापालिकेच्या प्रवेश द्वाराजवळ ४०० कामगारांसह १ दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. तरी आयुक्तांनी कोणतीच उपाय योजना न केल्याने भोसले यांनी थेट आयुक्तांविरुद्ध उच्च न्यायालयात खटला दाखल केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांवर खटला दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

२०१६ पासून २०१८ हे २ वर्षे ३ महिने या न्यायालयाचा अवमान याचिकेवर अनेक वेळा सुनावणी झाली, परंतू महापालिकेकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेची याचिका फेटाळlली व उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला त्यानुसार ५७२ सफाई कामगारांना फरकाची एकूण रक्कम रुपये १६ कोटी ८० लाख २ हजार २०० रुपये व त्यावरील १८ टक्के सन २००५ पासूनचे १५ वर्षाचे व्याज ४५ कोटी ३६ लाख ५ हजार ९४० रुपये असे एकूण ६५ कोटी १६ लाख ८ हजरा १४० रुपये एवढी रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे. याबाबत टाळाटाळ केल्याने अवमान याचिकेत उच्च न्यायालयाने १६ एप्रिल २०१८ रोजी निकाल दिला असून महापालिका आयुक्तांना २० जून २०१८ च्या आत या कामगारांची रक्कम देण्याचे आदेश दिलेले आहे. या आदेशाची अंमलबजावणी तोपर्यंत न केल्यास महापालिका आयुक्तांनी न्यायालयात हजर राहावे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

पुणे महापालिकेत कामगार कायद्याचे सर्रास उल्लंघन करून नियुक्तीपत्र न देता अधिकृत नेमणुका न करता अवघ्या ७ / ८ हजार रुपयांच्या अधिकाऱ्यांमार्फत हातोहात दिल्या जाणाऱ्या पगारावर दिवसभर गरजू तरुणांना राबवून घेतले जाते . संगणकावर काम करण्यासाठी हे तरुण घेतले जातात . जे काम कायम स्वरूपी असताना तात्पुरते भासविले जाते . अशा  बोगस कामगारांची ७२ एवढी संख्या आहे. आता त्यांना आणि इतरांना सेवेत घेण्यासाठी काढण्यात येणारे टेंडर ची जाहिरात घराघरात पोहोचणार नाही ,जनतेला समजणार नाही  अशा पद्धतीने  वृत्तपत्रात देऊन कागदोपत्री सेवक दाखविण्याचा प्रयत्न हि कायद्यातील पळवाटा शोधूनच राबविला जातो आहे . कामगारांवर अन्याय होत असताना दुर्दैवाने येथे कोणी कामगार नेता किंवा राजकीय नेता देखील पुढे येत नाही . त्यामुळे गरजू तरुणाईची आर्थिक पिळवणूक होताना दिसत आहे . आता या निकालाने आणि नवीन आलेल्या आयुक्तांच्या कार्यपद्धतीने  तरी येथे कामगार कायद्यांचा सन्मान राखला जाणार काय ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे .

बाबासाहेबांचे विचार संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक – खासदार काकडे

0

खासदार काकडेंची भीम फेस्टिव्हलला भेट

पुणे : बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य क्रांतिकारी होते. जगातील अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून त्यांनी भारताची राज्यघटना तयार केली. ही जगातील सर्वोत्तम राज्यघटना मानली जाते. त्यांच्यामुळे करोडो माणसांच्या जीवनात बदल झाला. जोपर्यंत पृथ्वीतलावर मनुष्य असेल तोपर्यंत संपूर्ण विश्वाला त्यांचे जीवन व त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील, अशा शब्दांत राज्यसभेचे खासदार व भाजपाचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त खासदार संजय काकडे यांनी दांडेकर पूल (सिंहगड रस्ता) येथील अखिल भिमज्योत सेवा संघाच्या वतीने आयोजित भीम फेस्टिव्हलला गुरुवारी सायंकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

याप्रसंगी नगरसेवक शंकर पवार, नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेवक परशुराम वाडेकर, अखिल भिमज्योत सेवा संघाचे अध्यक्ष तानाजी ताकपेरे व उत्सव प्रमुख हृषिकेश ओव्हाळ आदी मान्यवर आणि बाबासाहेबांवर प्रेम करणारे हजारो नागरिक उपस्थित होते.

खासदार काकडे हे गरीब कार्यकर्त्यांचे वाली!
खासदार संजय नाना काकडे हे गरीब कार्यकर्त्याला कधीही न विसरणारे नेते आहेत. त्यांनी आजपर्यंत हजारो गरीब कार्यकर्त्यांना पाठबळ दिले आहे. त्यांचा हात ज्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर असतो त्याचे सोनेच होते. शक्यतो राजकारणातील नेते गरीब कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करतात पण, खासदार संजय काकडे म्हणजे गरीब कार्यकर्त्यांचा वाली आहेत, असे नगरसेवक परशुराम वाडेकर यांनी यावेळी सांगितले.

असीफाला मेणबत्त्या पेटवून भावपूर्ण आदरांजली

0

पुणे–कठूआ प्रकरणात बळी पडलेल्या निरागस असीफाला मार्केटयार्ड भागातील विविध सामाजिक संघटना व पथारी व्यावसायिक यांच्यावतीने  मेणबत्त्या पेटवून भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. मार्केट यार्डच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आयोजित केलेल्या श्रध्दांजलीपर कार्यक्रमात मोठ्या संख्येने पथारी व्यावसायिक  सहभागी झाले होते . तसेच कठूआ व उन्नव बलात्कार  प्रकरणातील क्रूरकर्म्यांना तत्काळ फाशी द्यावी . भाजपच्या आमदार व मंत्र्यानी आरोपीच्या बाजून समर्थन केले असून लोकशाहीला हि  घटना कलंक आहे . त्याचा निषेध करीत आहोत , असे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लीगल सेलचे प्रदेशअध्यक्ष ऍड भगवानराव साळुंके यांनी सांगितले .

यावेळी दलित पॅंथर पथारी व्यवसायिक पुणे शहर अध्यक्षा बबिता खान ,गौतम शिंदे , सुषमा मंडलिक , पौर्णिमा प्रसाद , प्रेमा शेट्टी , अझहर बागवान , असिफ खान , नवनाथ चाबुकस्वार  व मार्केटयार्ड मधील पथारी व्यावसायिक , हमाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

दलित पँथर मार्केटयार्ड पथारी विभाग  राष्ट्रवादी तिरंगा युवा प्रतिष्ठान , महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लीगल सेल बागवान सोशल ग्रुप , वॉरियर ग्रुप आदी सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .