Home Blog Page 3154

कामगारदिनानिमित्त मेट्रो कामगारांचा सन्मान

पुणे-श्रमदान करून जे लोक देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावत आहेत त्यांचा सन्मान होणे अतिशय आवश्यक आहे. मेट्रो हा पुण्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामध्ये कामगारांच्या श्रमाचे योगदान खूप मोठे आहे. याच हातांनी देशाची प्रगती होते त्यामुळे कामगार हा देशाचा महत्त्वाचा स्तंभ आहे. त्यांच्याकडून राष्ट्र निर्माणाचे बहुमोल कार्य होत आहे, असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय कला अकादमीच्यावतीने कामगार दिनानिमित्त पुणे शहरामध्ये सुरु असलेल्या मेट्रोचे काम करणाºया कामगारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, मेट्रोचे दिनेश गर्ग, प्रकाश कदम, संतोष पाटील, अकादमीचे मंदार रांजेकर, रोमा लांडे, योगिनी बागडे, योगेश गोलांडे,गणेश माने, जयवंत मोहने, अमर लांडे उपस्थित होते. पुणे मेट्रोचा पहिला स्तंभ असलेल्या कृष्णा हॉस्पिटल शेजारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भेटवस्तू आणि उपरणे देऊन कामगारांचा सत्कार करण्यात आला. तसेच कामगारदिनानिमित्त ृयावेळी कामगारांना आईस्क्रीम पार्टी देखील देण्यात आली.

आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, शहराच्या जडणघडणीत कामगारांचे योगदान मोठे आहे. कामगार अतिशय प्रामाणिकपणे त्यांचे काम करीत असतात. परंतु दिवसभर काम केल्यानंतर थकवा घालविण्यासाठी व्यसनांचा आधार घेतात. मात्र त्यांनी व्यसनापासून दूर रहात स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घ्यायला हवी.असेही त्यांनी सांगितले. मंदार रांजेकर यांनी सूत्रसंचालन केले.

पुणे लोकसभा – दीपक मानकर आणि संजय काकडेंवरच कार्यकर्त्यांच्या नजरा

पुणे- पुण्यातील आगामी राजकारणाचे मातब्बर नेतृत्व म्हणून राजकीय वर्तुळातील अनेकांच्या नजरा  आता राष्ट्रवादीचे दीपक मानकर आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यावर खिळून रहातील असे स्पष्ट चित्र  आहे . राष्ट्रवादीने आगामी लोकसभेच्या उमेदवारीसाठी कॉंग्रेस कडे पुण्यावर हक्क सांगताना नवा चेहरा डोळ्यासमोर ठेवल्याचे सांगण्यात येत असले तरी राष्ट्रवादीच्या गोटात सर्वत्र दीपक मानकर हेच तगडे नेतृत्व असल्याचे मानले जाते . तर भाजपच्या गोटात संजय काकडे यांचे नाव घेतले जाते . भाजपच्या गोटातील विशिष्ट वलयांकित मंडळी जी पक्षाच्या हिताचा विचार करीत नाहीत,अन्य पक्षांशी मैत्रीचे संबध जोपासण्यास प्राधान्य देतात  अशीच मंडळी काकडे यांच्या नावाला विरोध करतील असे बोलले जाते . दरम्यान खासदार वंदना चव्हाण यांनी देखील  आता असंख्य वर्षे राजकारणात काढली आणि त्या ही आता पुस्तकी आणि  नाटकी सभ्यतेऐवजी वास्तवता लक्षात घेऊन राजकारण करतील असा दावा करण्यात येतो आहे.
म्हणजेच भाजपमध्ये बापट आणि राष्ट्रवादी मध्ये चव्हाण ही जी दोन्ही नावे राजकारणात वैशिष्ट्यपूर्ण मानली जातात त्यांना आता वास्तवतेशी सांगड घालावी लागेल आणि आपल्या पक्षातील खऱ्या आणि जनशक्ती ज्यांच्या सभोवताली आहे अशा  पक्षातील मातब्बरांच्या चेहऱ्यांना पुढे न्यावे लागणार आहे असे दिसते आहे . कॉंग्रेसमध्ये कितीही उमेदवार असले तरी लोकसभेला प्रभाव दाखवू शकेल असा चेहरा त्यांच्या कडे नाही हि वास्तवता या पक्षाने स्वीकारली तर सरळ सरळ भाजप आणि राष्ट्रवादी असाच सामना होवू शकणार आहे .
एकीकडे संजय काकडे यांनी लोकसभेची तयारी सुरु केल्याचे बोलले जाते , तर दुसरीकडे राष्ट्रवादी ने लोकसभेचा उमेदवारच गुलदस्त्यात ठेवल्याने भूमिकेबद्दलच संशय देखील व्यक्त होतो आहे . तर अनेकांच्या मते मानकर हे लोकसभा लढविणार नाहीतच ते विधानसभेच्या रणांगणात असतील असे दिसते आहे . या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी चा  विचार करता या दोन्ही पक्षांकडे लोकसभेसाठी तशी सक्षम उमेदवारांचीच वानवा दिसते आहे . पण जिथे शिरोळे यांच्या सारखे उमेदवार चालले तिथे  या दोन पक्षातील अन्य उमेदवार ही चालतील अशी भावना वरिष्ठ नेत्यांनी बाळगावी काय ? असा हि सवाल उपस्थित होतो आहे .

भगवान बुध्द जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

पुणे-संवाद, सद्भाव, शांतता आणि करुणेचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांचे विचार मानवाच्या प्रगतीसाठी कायमस्वरूपी मार्गदर्शक आहे. त्याच बरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांची सुद्धा आज जयंती असून अशा महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्याचा दूरदर्शी विचार हा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत खासदार अनिल शिरोळे ह्यांनी व्यक्त केले. विश्रांतवाडी येथील बुद्ध वाटिका संघतर्फे आयोजित संयुक्त जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. ह्या प्रसंगी आयोजक राहुल प्रताप, जेष्ठ भीमगायक सुरेश गायकवाड, सुनील पांडे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापुरुषांची जाती धर्मात वाटणी होऊ शकत नाही. असे वाटणी करणारे फक्त स्वार्थाचा विचार करीत असून समाजातील नागरिकांनी अशा प्रवृत्तींपासून दूर राहावे असे आवाहन देखील शिरोळे ह्यांनी ह्या प्रसंगी बोलताना केले.

नरेंद्र मोदी विचार मंचच्यावतीने अभिवादन

तथागत भगवान बुध्द जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी विचार मंचच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उत्तमराव शिंदे सरकार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी सामूहिक बौध्द वंदना घेण्यात आली .तसेच खीर वाटप करण्यात आले . यावेळी शिरीष घोरपडे , वासुदेव शर्मा , राजकुमार काळभोर , संजय बामणे , मोहनराव शिंदे सरकार , माजी आमदार एल. टी. सावंत , चंद्रकांत सांगलीकर , संजय मोहिते , माजी न्यायमूर्ती इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते .

दलित पँथर महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने अभिवादन

 तथागत भगवान बुध्द जयंतीनिमित्त  दलित पँथर महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने   पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दलित पँथरचे पुणे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे  यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी सामूहिक बौध्द वंदना घेण्यात आली .तसेच खीर वाटप करण्यात आले .

यावेळी दलित  पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे  , पुणे जिल्हाध्यक्ष विठ्ठल केदारी , विशाल खिलारे , शुभम सोनवणे, गौतम शिंदे , विक्रम कांबळे , ऋषिकेश चव्हाण, हर्षल गोटे , डॉ रोहित गडकरी , मेरी भांडारकर , सुनीता सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते .

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताडीवाला रोड विभागच्यावतीने अभिवादन

 तथागत भगवान बुध्द जयंतीनिमित्त   पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आनंद सवाणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी सामूहिक बौध्द वंदना घेण्यात आली .तसेच खीर वाटप करण्यात आले . यावेळी अनिल पाटील , महेंद्र कांबळे , हनुमंत मनोहरे , हर्षद शेख , सचिन पारधे , जितेंद्र कांबळे , सागर साळवे , रेश्मा बनसोडे आदी उपस्थित होते .

रिपब्लिकन मातंग सेनेच्यावतीने अभिवादन

तथागत  भगवान बुध्द जयंतीनिमित्त रिपब्लिकन मातंग सेनेच्यावतीने  पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास  रिपब्लिकन मातंग सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल तुजारे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी सामूहिक बौध्द वंदना घेण्यात आली .तसेच खीर वाटप करण्यात आले .

याप्रसंगी  विजय वडागळे , विल्सन पाखरे , वत्सला वाघमारे , कुसुम साळवे , गणेश ओव्हाळ , केशव खंडागळे , डेव्हिड मंडलिक , प्रदीप वाघमारे ,  राजेश वैरागर, विठ्ठल वाघमारे  आदी मान्यवर उपस्थित होते 

 दलित महासंघाच्यावतीने अभिवादन

तथागत  भगवान बुध्द जयंतीनिमित्त दलित महासंघाच्यावतीने  पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दलित महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद वैराट यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी सामूहिक बौध्द वंदना घेण्यात आली .तसेच खीर वाटप करण्यात आले .

यावेळी सुभाष  शेंडगे , सारिका नेटके , सुहास नाईक , ऍड. यशवंत जाधव , प्रा. राजेंद्र भोईवार , प्रभाकर गवळी ,  सहदेव खंडागळे , नितीन चंदनशिवे  , खंडूजी पवार , लक्ष्मी पवार , किरण ढावरे आदी मान्यवर उपस्थित  होते .

  रमाबाई महिला विकाससंस्थेच्या अभिवादन

 तथागत  भगवान बुध्द जयंतीनिमित्त  पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास   रमाबाई महिला विकास संस्थेच्यावतीने  अध्यक्षा मायावती चित्रे  यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून  विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी सामूहिक बौध्द वंदना घेण्यात आली .तसेच खीर वाटप करण्यात आले . यावेळी जाकीर शेख , रेखा वाघमारे , निर्मला त्रिभूवन , श्रद्धा खरात , यास्मिन कुरेशी , आयेशा कांबळे मी मीरा प्रभू , विमल कर्डीले आदी उपस्थित होते  

 विलास चौरे समाज सेवा प्रतिष्ठानच्यावतीने अभिवादन

 तथागत  भगवान बुध्द जयंतीनिमित्त विलास चौरे समाज सेवा प्रतिष्ठानच्यावतीने  पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास    विलास चौरे समाज सेवा प्रतिष्ठानचे  संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब चौरे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी सामूहिक बौध्द वंदना घेण्यात आली .तसेच खीर वाटप करण्यात आले .

यावेळी सतीश मदने , नरेश जगताप , रोहित जगताप , बबलू घुगे , विजय तलभंडारे , सचिन जगताप ,  सदा देवनार , भूषण घोंगडे , श्रीकांत शेंडगे , प्रकाश साळवे , चंद्रकांत सकट , गोरख दुपारगुडे , बाबा कांबळे , सुभाष मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते  

  रिपब्लिकन जनशक्तीच्यावतीने अभिवादन

 तथागत  भगवान बुध्द जयंतीनिमित्त  रिपब्लिकन जनशक्तीच्यावतीने  पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास     रिपब्लिकन जनशक्तीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्याहस्ते  पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी सामूहिक बौध्द वंदना घेण्यात आली .तसेच खीर वाटप करण्यात आले .  यावेळी शशी तावरे , संगीता सरोदे , सुरेश धमरे , जुलेखा खान , अर्चना रायकर आदी उपस्थित होते

नवमत तरुण मंडळाच्या लुबिनी विहारचा पहिला वर्धापन दिन  सोहळा उत्साहात

तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त पुणे कॅम्पमधील कडबा फडईमधील नवमत तरुण मंडळाच्या लुबिनी विहारचा पहिला वर्धापन दिन  सोहळा उत्साहात पार पडला . यावेळी बुध्दररूपाची भव्य मिरवणूक काढण्यात आली . यावेळी सामूहिक बौध्द वंदना घेण्यात आली .तसेच खीर वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन नवमत तरुण मंडळाचे अध्यक्ष संदीप पाडळे , उपाध्यक्ष विठ्ठल केदारी , रमेश गाडे , गौत्तम कांबळे ,  उत्तम कांबळे , प्रणय पाडळे , शिलरत्न गांगुर्डे , विकास रणपिसे , इस्माईल शेख , मोहन जगताप , पवन कांबळे , तुकाराम मोरे , राहुल पुणेकर , अभिजित कांबळे , रवींद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते 

..तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान मोदी हे ब्राम्हण- राजेंद्र त्रिवेदी

0

नवी दिल्ली : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राम्हण  होते. व पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही ब्राम्हण आहेत  असे वादग्रस्त वक्तव्य गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. गांधीनगर येथे समस्त गुजरात ब्राह्मण समाज संस्थेतर्फे ब्राम्हण  बिझनेस समिट आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेलही उपस्थित होते.

राजेंद्र त्रिवेदी म्हणाले,ब्राम्हण  कधीच सत्तेचे लोभी नव्हते. त्यांनी अनेक राजे घडवले. मी हे नेहमीच सांगत आलो आहे की, ब्राम्हणानीच अनेकांना देवत्व मिळवून दिले आहे. श्रीराम हे क्षत्रिय होते, पण ऋषी-मुनींनी त्यांना देव बनवले. असे म्हणून ते पुढे म्हणाले, जो कोणी शिकतो तो ब्राह्मणच असतो. त्यामुळे आंबेडकर हेदेखील ब्राह्मणच होते, हे म्हणणे मला चुकीचे वाटत नाही. सर्व शिक्षित लोक हे ब्राह्मणच असतात हे म्हणणे यामुळे चुकीचे ठरत नाही. याच संदर्भात मग पंतप्रधान मोदी हेदेखील ब्राह्मणच आहेत, हे सांगायला मला अभिमान वाटतो, असेही त्रिवेदी म्हणाले.

शरद पवार यांच्या पायाला दुखापत

0

पुणे :राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला इजा झाली असून १५ मेपर्यंत त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांतील त्यांचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात येणार आहेत.

लष्कर भागातील पूजा दिनेश राणावत हिने यश मिळविले

पुणे-युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन सिव्हिल सर्व्हिस २०१७ अंतिम निकाल लागला . त्यात पुणे  लष्कर भागातील पूजा दिनेश राणावत हिने यश मिळविले व  तिला यात ऑल इंडिया रँक २५८ मिळाली  .या रँक प्रमाणे तिला  इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस (IRS) मिळू शकते . पूजाने गेली चार वर्षांपासून अतिशय मेहनतीने हे यश मिळविले आहे . तिच्या यशात तिच्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा असल्याचे तिने सांगितले .
तिच्या वडिलांनी तिला खूप सपोर्ट व प्रोत्सहान दिले  .
सेंट अन्स शाळेतुन तिने प्राथमिक शिक्षण घेतले . त्यानंतर तिने फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेत  मानस शास्त्राची पदवी घेतली . राज्य शास्त्रामध्ये पदव्युत्तर  झाली . त्यानंतर चाणक्य मंडळामध्ये तिने स्पर्धा परीक्षेसाठी प्रवेश घेतला . तत्पश्चात तिने दिल्ली येथे जाऊन सेल्फ स्टडी करून स्पर्धा परीक्षेची अधिक जोमाने तयारी केली . दिल्लीत पूजाने दीड वर्ष सेल्फ स्टडी केली  .  नंतर एक वर्षाची माय पार्लमेंट फेलोशिप मिळवली  . या फेलोशिप मध्ये तिला लोकसभा व राज्यसभा , तसेच केंद्रसरकारची तयारी होणारी ध्येयधोरणी  शिकण्यास मिळाली . सन २०१७ मध्ये तिने स्पर्धा परीक्षा दिली . यातून तिने हे यश मिळविले . जीतो मध्ये पूजा मुलाखत कशी दयावी याबद्दलचे शिक्षण घेतले. यामध्ये तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले .
 पूजा आता रेव्हेन्यू सर्व्हिसेस मध्ये जाणार आहे . राजस्थान मारवाडी समाजातील पूजा हि पहिली तरुणी आहे कि जिने युनिअन  पब्लिक सर्विस कमिशन मध्ये यश मिळविले असे तिचे वडील दिनेश राणावत यांनी सांगितले . समाजासाठी काहीतरी करण्याची तिला पहिलीपासून आवड होती  .जिद्दीने प्रयत्न केल्याने यश हमखास मिळते असे तिने आवर्जून सांगितले .  पूजाचा धाकटा भाऊ बिट्स पिलानी मध्ये इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक इंजिनियरमध्ये शेवटच्या वर्षात शिकत आहे .
पूजाने मिळविलेल्या यशाने पुणे लष्कर भागातील ठक्कर हाऊसमध्ये तिच्या घरी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे  .

स्कोर ट्रेंड्स इंडियावर प्रियंका चोप्रा बनली नंबर वन !

0

बॉलीवूडची अंतरराष्ट्रीय आयकन प्रियंका चोप्रा नेहमीच दर्जेदार काम करताना दिसते. त्यामूळेच तिची फक्त देशातच नाही तर परदेशातही खूप मोठी फॅनफॉलोविंग आहे. आणि त्यामूळेच तर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री असण्याचा मान प्रियंकाने पटकावला आहे.

सलमान खानसोबतच्या ती करत असलेल्या ‘भारत’ ह्या सिनेमाची घोषणा झाल्यावर गेल्या काही दिवसांमध्ये प्रियंका मीडियाच्या प्रत्येक व्यासपीठावर चर्चेचा विषय बनली होती. सलमान खान  नेहमीच लोकप्रियतेच्या शिखरावर राहिला आहे. त्यामूळेच सलमानसोबतच्या ह्या चित्रपटाच्या ह्या घोषणेने प्रियंकाला डिजीटल आणि सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंडिंग सेलिब्रिटी बनवले.

प्रियंकाच्या नंतर स्कोर ट्रेंड्सच्या यादीत आलिया भट्ट दूस-या, सोनम कपूर तिस-या आणि दीपिका पदूकोण चौथ्या स्थानी आहे. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे  ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

गेल्या आठवड्याअखेर जाहिर झालेल्या आकडेवारीनूसार, प्रियंकाला एप्रिलच्या दूस-या आठवड्याअखेरीस 87.43 गुण मिळाले होते. तर दूस-या स्थानी असलेल्या आलिया भटला 54.67 गुण मिळाले होते.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “प्रियंका सोशल मीडियावर भरपूर लोकप्रिय आहे. ट्विटर, फेसबुक, डिजिटल न्यूज, ब्रॉडकास्ट, व्हायरल न्यूज आणि सगळ्या प्रिंट प्रकाशनांमध्ये चर्चेत राहिलेल्या प्रियंका चोप्राला 87.43 गुणांसह बॉलीवुडची सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी होण्याचा मान मिळाला. ”

अश्वनी कौल पूढे म्हणतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत डिव्हाईन स्टार्स संघाला विजेतेपद

0

पुणे:डिव्हाईन स्टार्स ग्रुप, पुणे व एक्सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंटसयांच्या तर्फे आयोजित पहिल्या एक्सेल टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत भारती फुलमाळीच्या नाबाद 62धावांच्या खेळीच्या जोरावर डिव्हाईन स्टार्स संघाने शेलार ग्रुप संघाचा 9 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.

डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत पहिल्यांदा खेळताना शेलार ग्रुप संघाने 20षटकात 8बाद 109धावा केल्या. यात सोनिया डबीर 32, कोमल झंझाद 14, वैष्णवी काळे 16, चार्मी गवई 13यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत शेलार ग्रुप संघाला 109अशी धावसंख्या उभारून दिली. डिव्हाईन स्टार्सकडून निकिता भोर(2-11), प्रिया सिंग(2-19), श्रावणी कदम (2-28)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाच्या विजयाचा पाया रचला. डिव्हाईन स्टार्स संघाने 18.2षटकात 1गड्यांच्या बदल्यात 111धावा करून पूर्ण केले. यात भारती फुलमाळीने 45 चेंडूत 7चौकारांसह नाबाद 62धावा, आदिती गायकवाडने 58 चेंडूत नाबाद 5चौकारांसह 44धावा केल्या. भारती व आदिती यांनी दुसऱ्या गड्यासाठी 80चेंडूत 111धावांची भागीदारी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. सामन्याची मानकरी भारती फुलमाळी ठरली.

3ऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत किरण नवगिरेच्या(58धावा)धडाकेबाज खेळीच्या जोरावर रिग्रीन संघाने मेटा स्कुलचा 7 गडी राखून पराभव करत तिसरा क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 31000रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 21000रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी भारतीय महिला संघाच्या कर्णधार नीलिमा जोगळेकर, माजी भारतीय(फिजीकली चॅलेंज)संघाचे कर्णधार सौरभ रावलीया, डिव्हाईन स्टार्सचे राजेंद्र आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेलार ग्रुप ऑफ  इंडस्ट्रिज्‌चे विश्वनाथ शेलार, रिग्रीनचे सागर राऊत, प्रदीप पाटील अँड असोसिएट्सचे प्रदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: शेलार ग्रुप: 20षटकात 8बाद 109धावा(सोनिया डबीर 32(38,2×4,1×6), कोमल झंझाद 14(9,2×4), वैष्णवी काळे 16(21,3×4), चार्मी गवई 13(24), निकिता भोर 2-11, प्रिया सिंग 2-19, श्रावणी कदम 2-28)पराभूत वि.डिव्हाईन स्टार्स: 18.2षटकात 1बाद 111धावा(भारती फुलमाळी नाबाद 62(45, 7×4), आदिती गायकवाड नाबाद 44(58, 5×4), श्वेतल खटाळ 1-22);सामनावीर-भारती फुलमाळी;

3ऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी लढत:मेटा स्कुल: 15षटकात 8बाद 98धावा(पूनम खेमनार 40(29,4×4), सोनाली शिंदे 25(41,1×4), रोहिणी मोरे 14(10,2×4), उत्कर्षा देशपांडे 1-15, श्रद्धा पाखरकर 1-20)पराभूत वि.11.4षटकात 3बाद 101धावा(किरण नवगिरे 52(28, 7×4, 2×6), तेजल हसबनीस 27(31,2×4), भक्ती शास्त्री 12(9,2×4), पूनम खेमनार 2-20, सोनाली शिंदे 1-19); सामनावीर-किरण नवगिरे.

इतर पारितोषिके:

सर्वोत्कृष्ट फलंदाज: किरण नवगिरे(170धावा)

सर्वोत्कृष्ट गोलंदाज: निकिता भोर(10विकेट)

मालिकावीर: सोनिया डबीर(235धावा व 2विकेट)

उद्योमुख खेळाडू: आदिती जोशी

सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक: चार्मी गवई

सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: आदिती गायकवाड

राज्यात ९० मिनिटांनी एक आत्महत्या, ७५ मिनिटांनी एक बलात्कार आणि ६० मिनिटांनी एक विनयभंग; भयाचे वातावरण -जयंत पाटील

0

पुणे-महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न टकमक टोकावर उभा आहे. राज्यकर्त्यांची कातडी गेंडय़ाची झाली आहे. शहरातील मध्यमवर्गीय महागाईने त्रस्त झाला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी विधानसभेत जाळ्या लावण्यात सरकार मश्गूल आहे. राज्यात ९० मिनिटांनी एक आत्महत्या, ७५ मिनिटांनी एक बलात्कार आणि ६० मिनिटांनी एक विनयभंग होत आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आली असून भयाचे आणि अस्वस्थततेचे वातावरण आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या सभेत ते बोलत होते. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भाषणे झाली.

पाटील म्हणाले, बूथ कमिटय़ांवर आपल्याला लक्ष द्यावे लागेल. हे नाही झाले तर आपल्याला आपले विचार योग्य ठिकाणी पोहोचवता येणार नाहीत. ही यंत्रणा चार महिन्यांत उभी करावी लागेल, तरच आपले संघटन भक्कम होईल. राष्ट्रवादीत कोणताच गट नाही. दीड वर्षांत पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढू आणि काम करू आणि अपेक्षित असणारा पक्ष घडवू. हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाने निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आणि सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. जयाला कधी अंत नसतो. त्यामुळे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विजयपथावर येईल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. कठीण कालखंडात पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. सत्ता नसताना कोण आपला हे समजले. सर्वानी चांगली साथ केली, अशी भावना सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील

0

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी  माजी मंत्री जयंत पाटील यांची निवड करण्यात आली. पुणे येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने ही निवड करण्यात आली. दरम्यान, प्रदेश उपाध्यक्षपदी नवाब मलिक, खजिनदारपदी हेमंत टकले तर सरचिटणीसपदी शिवाजी गर्जे यांची निवड करण्यात आली.

अध्यक्षपदासाठी दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे आणि विधान परिषदेतील नेते धनंजय मुंडे यांच्या नावाचीही चर्चा होती. धनंजय मुंडे यांच्याकडे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी असल्यामुळे त्यांचे नाव या स्पर्धेतून मागे पडले. अखेर जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. खासदार सुप्रिया सुळे यांनीही अनुकूलता दर्शवल्याने पाटील यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला.

जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्ताव सुनील तटकरे यांनी मांडला. या प्रस्तावाला धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे यांनी अनुमोदन दिले. एकमुखाने अनुमोदन दिल्याने जयंत पाटील यांची निवड केली. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, प्रफ्फुल पटेल, विजयसिंह मोहिते पाटील, डी.पी.त्रिपाठी, गणेश नाईक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

चार विजेत्यांना मिळाले ‘आयफोन-8’

व्होडाफोनच्या पग-अ-थॉनस्पर्धेचा निकाल जाहीर

पुणे : ‘व्होडाफोन इंडिया’तर्फे घेण्यात आलेल्या ‘30 दिवस पग-अ-थॉन’ या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पुण्यातील प्रतिककुमार कृष्णलाल दुबे, सूरज बालेकुंद्री, तसेच लातूरचे सचिन व्यवहारे व औरंगाबादचे बळीराम शेळके या चार ग्राहकांना ‘आयफोन-8’ हा मोबाईल देऊन ‘व्होडाफोन’तर्फे गौरविण्यात आले.

‘30 दिवस पग-अ-थॉन’ ही गेमिंग स्पर्धा संपूर्ण देशात महिनाभर आयोजित करण्यात आली होती. ‘व्होडाफोन’च्या प्रीपेड तसेच पोस्टपेड ग्राहकांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी होती. ‘माय व्होडाफोन’ अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांनी मोबाईलवर सर्फिंग करायचे व विविध पेजेसवर, वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहिलेल्या ‘व्होडाफोन पग्ज’ना शोधायचे, असे या स्पर्धेचे स्वरूप होते. सात किंवा त्यापेक्षा जास्त पग शोधून काढणार्‍यांना दोन लाख रुपये किंमतीचे ‘सुपर अ‍ॅपल हॅम्पर’ देण्यात आले. ‘आयफोन-8’ आणि ‘सुपर अ‍ॅपल हॅम्पर’ या बक्षिसांव्यतिरिक्त शोधलेल्या प्रत्येक ‘पग’मागे वेगळे ‘सरप्राईज गिफ्ट’ देण्यात आले. दररोज एका भाग्यवान विजेत्याने या स्पर्धेत ‘आयफोन-8’ मिळवलेला आहे, असे व्होडाफोनच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन करताना ‘व्होडाफोन इंडिया’च्या महाराष्ट्र व गोवा विभागाचे प्रमुख आशिष चंद्रा म्हणाले, “व्होडाफोन इंडिया’मध्ये आम्ही नेहमीच नावीन्यपूर्ण योजना आखतो व ग्राहकांना गमतीचे व विविध अनुभव देत असतो. ‘30 दिवस पग-अ-थॉन’ ही ‘माय व्होडाफोन’ अ‍ॅपवरील स्पर्धाही याच प्रकारचा आनंद ग्राहकांना देण्यासाठी आयोजित करण्यात आली. एका क्लिकवरून या अ‍ॅपमध्ये काय करता येते, याचा अनुभवही ग्राहकांना या स्पर्धेच्या निमित्ताने मिळाला. आमच्या सर्व विजेत्यांचे मी अभिनंदन करतो व त्यांना ‘व्होडाफोन’सह अधिक काळ आनंदात राहता यावे, यासाठी शुभेच्छा देतो.’

‘व्होडाफोन’च्या ग्राहकांना सर्व सेवा मोबाईलवर अगदी एका क्लिकवर मिळाव्यात याकरीता ‘माय व्होडाफोन’ हे अ‍ॅप विशेष प्रकारे बनविण्यात आले आहे. बिलाचे पेमेंट, रिचार्ज, आपल्या प्लॅनचे तपशील, नवीन उत्पादनांची उपलब्धता आदी सुविधा या अ‍ॅपमध्ये देण्यात आल्या आहेत.

इतना टूटा हू के छूने से बिखर जाऊंगा …..गझल ची एक संस्मरणीय शाम

0

पुणे- इतना टूटा हू के छूने से बिखर जाऊंगा …… , हंगामा क्यू हे बरपा थोडी सी जो पी ली है …… , प्यार का पहला खत लिखने मै वक्त लगता है ……. , चढता सुरज धीरे धीरे …… , चुपके चुपके रात दिन असू बहाणा याद है ….. , कल चांदणी रात थी शब भर रहा चर्चा तेरा …एक एक गझल सदर होत गेली आणि गझलची शाम संस्मरणीय होत गेली

द मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी , बजमे अ अदब , पूना कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ” शाम – ए – गझल ” हा गझलचा कार्यक्रम आयोजित केला होता  . पुणे लष्कर भागातील पूना कॉलेजच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमामध्ये मुंबईचे प्रसिध्द गझल गायक रफिक शेख , पुण्याचे गझल गायक शकील इनामदार यांनी विविध गझल सादर करून गझलप्रेमींना मंत्रमुग्ध केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबीर  शेख यांनी केले .

     या कार्यक्रमाचे उदघाट्न अंजुमन ए खैरुलइस्लाम पूना कॉलेजचे विश्वस्त मिर्झा सलात बेग व  उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्याहस्ते करण्यात आले .या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोंढवा प्रभाग समितीचे अध्यक्ष हाजी गफूर पठाण , पूना कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. खान मोईनुद्दीन , हाजी गुलाम एज्युकेशन ट्रस्टचे माजी अध्यक्ष मुन्नावर पीरभाई , गोल्डन ज्युबली एजुकेशन ट्रस्टचे अध्यक्ष शाहिद इनामदार , प्रसिध्द कवी अस्लम चिश्ती , ऍड. सलीम शेख , बांधकाम व्यावसायिक अमिन शेख , हज कमिटीचे अध्यक्ष हाजी रियाझ काझी  ,जेष्ठ पत्रकार झुल्फिकार सहेर ,  इकबाल शेख , रफिक काझी , सलीम बागवान , मुमताज पीरभाई ,  लेडी हवाबाई शाळेच्या मुख्याध्यापिका जिल्हेहुमा बारगीर , जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष शफाकत शेख , युसूफ वहिद , गोल्डन ज्युबली एजुकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष शाहिद मुनीर शेख , हाजी गुलाम एजुकेशन ट्रस्टचे विश्वस्त अब्दुल वहाब शेख , मुश्ताक अलबुशरा ,गोल्डन ज्युबली एजुकेशन ट्रस्टचे  माजी अध्यक्ष एस. एम. खान , प्रसिध्द कवी नजीर फतेपुरी , शिक्षक पतसंस्थेचे संचालक व माजी अध्यक्ष भानुदास कुलाळ , आबिद अश्ररफी , हमीद बियाबानी ,  अझीम गुडाकूवाला , सत्तार शेख , मुबारक जमादार आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे संयोजन द मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी , शाबीर शेख , नौशाद हुसेन यांनी केले होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहमद बागवान , मोहम्मद मुतालीब , लतीफ शेख , रफिक शेख , आरिफ शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले .

“सायकल” चित्रपटाची टीम पुणेकरांच्या भेटीला !

0

पुणे : “आपला मानूस” चित्रपटाच्या यशानंतर, वायकॉम18 मोशन पिक्चर्स “सायकल” हा पुढील मराठी सिनेमा सादर करण्यासाठी सज्ज आहेत. ४ मे २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच रीलीज झालेल्या सायकल चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सायकल चित्रपटाची टीम आता येत आहे पुणेकरांच्या भेटीला, ज्यामध्ये चित्रपटाचे कलाकार प्रियदर्शन जाधव जाधव, हृषीकेश जोशी, दीप्ती लेले, मैथिली पटवर्धन तसेच दिग्दर्शक प्रकाश कुंटे आणि लेखक अदिती मोघे उपस्थित असणार आहेत.

“सायकल” ही एक हलकीफुलकी कथा आहे ज्यामधून तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल. सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकल वर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे. एके दिवशी केशवच्या गावात दोन व्यक्ती येतात आणि त्याची लाडकी सायकल चोरतात. यामुळे निराश झालेल्या केशवला आपली सायकल नक्की मिळेल ही आशा आहे. म्हणूनच केशव आपल्या सायकलच्या शोधात घराबाहेर पडतो. केशव ही सायकल शोधत असताना त्याच्या प्रवासा दरम्यान त्या चोरांचे काय झाले ? त्याला त्याची सायकल परत मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट बघितल्यावर मिळणार आहेत.

कॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके आणि हंपी सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी त्यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली सायकल हा सिनेमा चित्रित केला आहे. केशवच्या भूमिकेत हृषिकेश जोशी आहे, तसेच प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम सारखे नामवंत कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिका करत आहेत. तसेच चित्रपटामधील मैथिली पटवर्धनचा निरागस अभिनय नक्कीच प्रेक्षकांचे मनं जिंकेल यात शंका नाही.

‘सायकल’ बद्दल बोलताना भाऊ कदम म्हणाले, चित्रपटात आमची चोरांची पाचवी पिढी आहे. मुळात आम्ही गोड चोर आहोत. एक सायकल चोरल्यानंतर आमच्या आयुष्यात कसे झपाट्याने परिवर्तन घडते , ते चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीने दाखवले आहे.

प्रियदर्शन जाधव म्हणाले, मी देखील चित्रपटात एका चोराच्याच भूमिकेत आहे. पण मी एक चतुर चोर आहे. त्यात परिस्थितीनुरूप आमच्याकडे सायकल येते. मुळात ती चोरण्याचा आमचा  उददेश नसतो, पण ती चोरी आम्ही करतो पुढे काय घडते, हे चित्रपटात पहाणेच योग्य ठरेल.

ऋषिकेश जोशी म्हणाले, चित्रपटात  मी अत्यंत समतोल पात्र साकारतो आहे. पंचक्रोशीतील लोकांना प्रेम आणि आपुलकी वाटेल, असे माझे व्यक्तिमत्व आहे. मी व्यवसायाने ज्योतिषी असल्याने मी भाकितं करतो. पण अचानक माझी सायकल चोरीला जाते त्यामुळे माझी अस्वस्थता आपणास चित्रपटात बघायला मिळेल

कलर्स मराठीचे बिजनेस हेड निखिल साने म्हणाले, मराठी चित्रपटांत सरशी बाजू असते ती कथानकाची.  म्हणून मराठीत चित्रपट निर्मिती करणे आनंददायक वाटते. विशेष म्हणजे त्यातून आपल्याला आपल्या सभोवतालचा गोष्टी बघायला मिळतात. सायकल च्या माध्यमातून आपणास माणसा माणसातला चांगुलपणा अनुभवायला मिळेल.

सेल्सीफाय झिफ डेव्हिस यांच्या कंपनीचा अत्याधुनिक बी 2 बी परफॉर्मन्स मार्केटिंग सुविधासह भारतात

 विमान नगर येथील नव्या सेंटरमध्ये १००० हून अधिक कर्मचारीवर्ग

पुणे – डेटा-बेस्ड परफॉर्मन्स मार्केटिंग आणि टेक्नॉलॉजी कंपन्यांसाठी आघाडीची संकल्पना असलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेल्सीफाय ह्या झिफ डेव्हिस यांच्या जे२ ग्लोबल कंपनीने अत्याधुनिक बी 2 बी परफॉर्मन्स मार्केटिंग सुविधांसह भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि विस्तार केला आहे.
पुण्यातील वेकफिल्ड आयटी सिटी इन्फोपार्कमध्ये अशी सुविधा निर्माण आणि विकसित केली गेली आहे जी २००५ मधील कंपनीच्या स्थापनेच्या पर्फोर्मंसच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक आहे.
भारतातील पुणे येथे या नव्या केंद्राची स्थापना करून त्यांनी 1000 हून अधिक रोजगाराची निर्मिती केली आहे. ज्यामुळे कित्येक प्रतिभाशाली तरुणांना रोजगार मिळू शकेल. संघटनेचे अधिकृत उद्घाटन संयुक्त राज्य अमेरिकेतील कंपनीच्या टीमच्या हस्ते नुकतेच पुण्यात करण्यात आले.
  ही सुविधा जगभरातील 300 पेक्षा जास्त कंपन्यांना सेवा देणार असून एक्सपेडिया, ऍमेझॉन, नेटअॅप, मोंगोडीबी, ब्रोकेड, प्युरस्टॉरेज, एक्झा्क्टली, ओगिल्वी आणि गॅरोसह इतर प्रमुख कंपन्यांचा ह्यात समावेश आहे.

महिंद्रा ट्रक अँड बसने रंधवा मोटर्स या मुंबईतील 93व्या डीलरशिपचे केले उद्घाटन

मुंबई: 19 अब्ज उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनने (एमटीबीडी) मे. रंधवा मोटर्स या मुंबईतील नव्या, अद्ययावत डीलरशिपचे उद्घाटन केले आहे व डीलरशिपची एकूण संख्या 93 पर्यंत वाढवली आहे. अलीकडेच, एमटीबीडीने आर्थिक व व्हॉल्युमच्या बाबतीत पुन्हा उभारी घेतली आहे व हे प्रमाण आर्थिक वर्ष 18 मधील या क्षेत्राच्या वाढीच्या जवळजवळ दुप्पट आहे.  

 या वेळी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्राच्या कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट विभागाचे व महिंद्रा ट्रक अँड बसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद सहाय यांनी सांगितले, “एमटीबीडी भारतातील सीव्ही क्षेत्रात स्वतःचे अतिशय खास व आघाडीचे स्थान निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. एचसीव्ही श्रेणीतील विशिष्ट बाजारपेठ व विशिष्ट श्रेणीमध्ये आम्ही अगोदरच तिसऱ्या स्थानावर आहोत आणि आता एकंदर तिसरे स्थान साध्य करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. नवी आयसीव्ही उत्पादने विकसित करण्यासाठी अंदाजे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून, येत्या काळात परिपूर्ण व्यावसायिक वाहन कंपनी बनण्यासाठीही एमटीबीडी कार्यरत आहे. आमच्या डीलरशिपमध्ये नव्याने झालेली वाढ, तसेच नवी ब्लेझो एचसीव्ही उत्पादने व मायलेज, सर्व्हिस व स्पेअरची हमी यामुळे ग्राहकांना सेवा देण्याची आमची क्षमता लक्षणीय प्रमाणात वाढून बाजारातील आमचे स्थान आणखी बळकट होईल.”

मुंबईतील बाजारपेठेविषयी बोलताना सहाय यांनी नमूद केले, “मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र असल्याने तेथे हेव्ही व लाइट कमर्शिअल व्हेइकल्ससाठी प्रचंड वा आहे आणि एमटीबीडी ग्राहक सेवेच्या बाबतीत नवी प्रमाणके निर्माण करण्यासाठी मे. रंधवा मोटर्स अशा डीलर पार्टनरच्या सक्षम जाळ्याद्वारे या बाजारपेठेला सेवा देणार आहे”.

डीलरशिपच्या उद्घाटनानिमित्त बोलताना, रंधवा मोटर्सचे व्यवस्थाकीय संचालक एम. एस. रंधवा यांनी सांगितले, “आम्ही महिंद्रा ट्रक अँड बसच्या बरोबर ग्राहकांसाठी नवी डीलरशिप सुरू करत असल्याने ट्रकिंग उद्योगातील नव्या अध्यायाचा एक भाग बनताना आम्हाला अतिशय अभिमान व सन्मानित वाटते आहे. या क्षेत्रातील आमच्या सखोल ज्ञानाचा वापर करून अशीच उच्च प्रमाणके वापरण्याची संधी आम्हाला या डीलरशिपमुळे मिळणार आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी व त्यांनी चांगली कामगिरी करावी यासाठी आम्ही एकत्रित काम करणार आहोत.”

ग्राहकांकडे असलेल्या सध्याच्या ट्रकच्या तुलनेत अधिक इंधनक्षमता देणारा ट्रक यासह सहा हमी देणारा महिंद्रा ब्लेझो हा भारतातील एकमेव ट्रक आहे, अन्यथा ग्राहकांना त्यांचा ट्रक परत करता येऊ शकतो. एमटीबीडीने 48 तासांत ट्रक पुन्हा सुरळीत सुरू करण्याची हमी देऊन ब्रेकडाउन सेवेतील अपटाइमविषयीही खात्री दिली आहे, अन्यथा कंपनी ग्राहकाला दररोज 1000 रुपये देणार आहे. तसेच, डीलर वर्कशॉपमध्ये वाहनाचा खात्रीशीर टर्नअराउंड 36 तास आहे, अन्यथा कंपनी दररोज 3000 रुपये देईल.

एमटीबीडीची मायलेजची हमी म्हणजे उत्कृष्ट इंजिनीअरिंग आणि ग्राहकांना अप्रतिम मूल्य देण्याचा निश्चय यांचे प्रतिक आहे. समूहाने केलेले सहयोग आणि सर्व्हिस टच पॉइंट्स व स्पेअर्स रिटेलर नेटवर्क यांची वाढ यांचा लाभ घेऊन कंपनीने आफ्टर-सेल्स नेटवर्कवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने सर्व्हिस व स्पेअर्सची हमी ही संकल्पना निर्माण झाली.  उत्पादनामध्ये सातत्याने नावीन्य व ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन ही एमटीबीडीची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत व त्यामुळे ही हमी देणे शक्य झाले आहे.

महिंद्रा ट्रक अँड बसविषयी

महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजन ही 19 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा एक भाग व संपूर्ण मालकीची उपकंपनी असून ती सर्व एकात्मिक ट्रकिंग सेवा पुरवते. कंपनीने विशिष्ट प्रकारच्या वापरासाठी खास पद्धतीचे ट्रक तयार करून व व्यवसायाच्या गरजेनुसार अप्रतिम कामगिरी करून आपले स्थान उंचावले आहे. उत्तम कामगिरी करणारी वाहने, विक्रीनंतर तत्पर सेवा, विस्तारित वॉरंटी व अन्य अनेक फायदे यामुळे महिंद्राने भारतीय ट्रकिंग उद्योगात नवा मैलाचा दगड निर्माण केला आहे.

 महिंद्रा ट्रक अँड बसतर्फे एकात्मिक ट्रकिंग सुविधा दिल्या जातात, ज्या प्रत्येक बाबतीत महिंद्राच्या उत्कृष्ट सेवांबरोबरच, ग्राहकांना झटपट सुविधा व विश्वासार्हता असे फायदे देऊन नफा मिळवण्यास मदत करतात. एचसीव्ही उत्पादने भारतीय ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन तयार करण्यात आली आहेत व त्यामध्ये मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया या विचाराचा अवलंब केला आहे. एचसीव्ही श्रेणीमध्ये, महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनचे 40,000 हून अधिक एचसीव्ही ट्रक रस्त्यावर धावत आहेत. कंपनी व्यावसायिक वाहन बाजारातील प्रत्येक श्रेणीला सेवा देण्यासाठी कार्यरत आहे; कार्गो व स्पेशलाइज्ड लोड वापराच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या प्रकारांबरोबर 3.5 टन जीव्हीडब्लू ते 49 टन जीव्हीडब्लू. अवजड व्यावसायिक वाहनांच्या ब्लेझो रेंजचे उत्पादन चाकणमधील ग्रीन फिल्ड प्रकल्पामध्ये केले जाते. अंदाजे 700 एकरांमध्ये विस्तारलेला प्रकल्प 4,000 कोटी रुपये गुंतवणूक करून उभारला आहे व महिंद्राच्या अन्य उत्पादनांचीही निर्मिती करतो. यामुळे महिंद्रा समूहाला एकात्मिक उत्पादन सुविधेच्या समन्वयाचा लाभ घेणे शक्य होते. कंपनी 6 वर्षे किंवा 6 लाख किमी ट्रान्स्फरेबल वॉरंटी देते व ती या क्षेत्रातील पहिली आहे व किंमतक्षम एएमसी आहे.एलसीव्ही श्रेणीमध्ये, महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनचा बाजारहिस्सा 9.4% आहे. अंदाजे 1,85,000 वाहने अगोदरच भारतीय रस्त्यावर धावत असून देशभर कंपनीचे स्थान अधिक सक्षम होणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या जहीराबाद येथील प्रकल्पात एलसीव्ही लोड व्हेइकल व बस यांची निर्मिती केली जाते. महिंद्रा ट्रक अँड बसने विक्रीनंतरच्या सेवेमध्ये व स्पेअर्स नेटवर्कमध्ये झपाट्याने वाढ केली असून त्यामध्ये 93 संख्येने 3S डीलरशिप, 149 हून अधिक अधिकृत सर्व्हिस सेंटर, 32 एम-पार्ट्स प्लाझा व 2,900 रोडसाइड असिस्टन्स पॉइंट आहेत; आणि ग्राहकांना महत्त्वाच्या ट्रकिंग मार्गावर आणखी पाठिंबा देण्यासाठी स्पेअर्स नेटवर्कमध्ये 2,000 नेटवर्क पॉइंट्सचा समावेश आहे. कंपनीची नाऊ ही भारतातील पहिली बहुभाषीय 24X7 हेल्पलाइन असून ग्राहकांना व चालकांना तातडीने पाठिंबा उपलब्ध करण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञ तिच्याशी जोडलेले आहेत. नाऊ मोबाइल सर्व्हिस व्हॅन व मोबाइल वर्कशॉप यामुळे सपोर्ट नेटवर्कची व्याप्ती व तत्परता वाढते.