Home Blog Page 314

“मेरी दुनिया तू”— प्रेम आणि त्यागाची सैनिकाची अमर प्रेमकहाणी!

देशभक्ती आणि प्रेम यांच्या अद्वितीय संगमातून साकार झालेलं “मेरी दुनिया तू” हे गाणं आज पॅनोरमा म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालं असून, संगीतप्रेमींमध्ये आणि विविध कलाक्षेत्रात याचे भरभरून स्वागत होत आहे. एका नवविवाहित भारतीय सैन्य अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित असलेलं हे गाणं, त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर, देशसेवेच्या कठोर वास्तवाचं भेदक चित्रण करतं.

या गाण्याचं गीत आणि संगीत श्रेयस देशपांडे यांनी केलं आहे. केवळ दिग्दर्शक म्हणूनच नव्हे तर एक प्रतिभावान गीतकार-संगीतकार म्हणूनही श्रेयस देशपांडे यांनी आपल्या कलाकृतीतून मन जिंकून घेतलं आहे. सह-दिग्दर्शक श्रेयस भागवत यांनी संकल्पना अधिक प्रभावी बनवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, तर सहाय्यक दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर उमेश कोरडे यांच्या भव्य आणि भावस्पर्शी चित्रणाने गाण्याला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे.

“मेरी दुनिया तू” हे गाणं गायलं आहे तन्मय संचेती आणि ईश्वरी ठाकूर. या दोघांच्या भावनांनी ओथंबलेल्या गायनामुळे गाण्याला एक अस्सल, अंतःकरणाला भिडणारं रूप प्राप्त झालं आहे. त्यांचा सूर, बोल आणि संगीत यांचा समन्वय श्रोत्यांच्या मनाला भारावून टाकत

गाण्यात प्रमुख भूमिकेत चेझन लॉयर आणि गायत्री जैन यांनी अभिनय केला असून, त्यांनी नवविवाहित जोडप्याच्या नाजूक नात्याचं आणि अचानकच आलेल्या वेगळेपणाच्या वेदनेचं अत्यंत संवेदनशीलतेने दर्शन घडवलं आहे. सैन्य अधिकारी आणि त्याच्या पत्नीमधील नातं, त्यांच्या प्रेमातली गोडी आणि त्याचबरोबर देशासाठी दोघांनी केलेल्या त्यागाचं भावनिक चित्रण या गाण्यातून समोर येतं. तसेच या गाण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे ओम कडू, वैभव टकले, दिग्विजय मते, अश्विनी मोहोळ, करिष्मा फडतरे, सिद्धार्थ चव्हाण, यश भोर, विनोद राजे, गौरवराज आणि आनंद मुरुगकर यांनी.

या गाण्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे, हे केवळ सैनिकाच्या त्यागाबद्दलच बोलत नाही, तर एका स्त्रीच्या – एका पत्नीच्या त्यागाचंही सुंदर, हृदयस्पर्शी प्रतिबिंब यात उमटतं. फक्त रणभूमीवर नव्हे, तर घरामध्येही देशासाठी जे काही सोसलं जातं, ते या गाण्यातून स्पष्टपणे जाणवतं.

गाण्याच्या प्रदर्शना नंतर, समाज माध्यमांवर आणि संगीत व चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांकडून या गाण्याचं कौतुक होत आहे. विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी या गाण्याच्या भावनात्मक मांडणीला, संगीताला, आणि अभिनयाला विशेष दाद दिली आहे.

“मेरी दुनिया तू” हे गाणं आजच्या तरुण पिढीला प्रेम आणि देशभक्ती यांच्यातील समतोल दाखवतं, आणि एक विचारप्रवृत्त करणारा संदेश देते – की प्रेम ही केवळ साथ नसते, तर त्याग करण्याची तयारीही असते.

18वा आदिवासी चित्रपट महोत्सव पुण्यात

बहुरंग, पुणेतर्फे दि. 19 व दि. 20 रोजी आयोजन

यंदाच्या महोत्सवाचे ‌‘शीरमोर‌’ बोधचिन्ह

पुणे : बहुरंग, पुणे आयोजित 18वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सोमवार, दि. 19 आणि मंगळवार, दि. 20 मे रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. माडीया गोंड लोक शिरस्त्राण म्हणून वापरत असलेले ‌‘शीरमोर‌’ हे यंदाच्या महोत्सवाचे बोधचिन्ह आहे, अशी माहिती बहुरंग, पुणेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी यांनी आज (दि. 12) पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सव पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे होणार आहे. देश-विदेशातील आदिवासी जमातींची सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, वेगळेपणा, बोलीभाषा, चालीरिती, जीवनशैली, धार्मिक कार्ये, देवदेवता, रूढी-परंपरा तसेच कला, संगीत, नृत्य, नाट्य या विषयी माहिती व्हावी या उद्देशाने दरवर्षी आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. राज्य शासनाअंतर्गत असलेला सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 19 रोजी दुपारी 12 ते 12:30 या वेळात महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला असून उद्घाटन स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 12:30 ते 3 या वेळात ब्लॅक स्टॅम्प (मराठी), ढोल (मराठी), धातू शिल्पकला (मराठी), काठी होळी (मराठी), सोम्या (मराठी), वेलकम टू कचराघर (इंग्रजी), ह्यू (इंग्रजी), पायविहिर (मराठी), कष्टाळू (मराठी) या देश-विदेशातील लघुपटांसह ‌‘आम्ही आदिवासींची लेकरे‌’ हे आदिवासी गीत दाखविले जाणार आहे.
दि. 20 रोजी कलावंत, कला पुरस्कार वितरण सोहळा दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. दिनेशकुमार यशवंत भोईर (पालघर) आणि दत्तात्रय हैबत तिटकारे (खेड) यांचा कलावंत पुरस्कार देऊन तर परमानंद हिरामण तिराणिक (वरोरा-चंद्रपूर), आणि कृष्णा सदाशिव भुसारे (विक्रमगड) यांचा कला पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. पुरस्कारांचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 12:30 ते 3 या वेळात भगवान बिरसा मुंडा (हिंदी) चित्रपट दाखविला जाणार आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.

रंगत-संगत प्रतिष्ठान, आम्ही एकपात्रीतर्फे नितीन कुलकर्णी यांना नगरकर स्मृती पुरस्कार

पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान आणि आम्ही एकपात्री यांच्या वतीने पहिल्या वंदन राम नगरकर स्मृती पुरस्काराने कोल्हापूर येथील एकपात्री कलावंत, सिने अभिनेते नितीन कुलकर्णी यांचा गौरव केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. 18 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध एकपात्री कलावंत वंदन राम नगरकर यांनी त्यांच्या हयातीत एकपात्री कलावंतांकरिता मोलाचे कार्य केले. त्यांच्या स्मृती कायम जागृत ठेवण्याच्या उद्देशाने यंदाच्या वर्षीपासून वंदन राम नगरकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि आम्ही एकपात्रीच्या अध्यक्षा अनुपमा खरे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ रंगकर्मी बण्डा जोशी यांच्या हस्ते होणार असून उत्तरार्धात ‌‘हास्यवंदन‌’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास डॉ. वैजयंती वंदन नगरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस अर्ज करण्यास मुदतवाढ

पुणे, दि. १३: राज्यात शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) – २०२५ ला प्रविष्ठ होण्यासाठी १४ मे २०२५ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. एनसीएल प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पोहोच पावतीच्या आधारे अर्ज भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. पोहोच पावतीनुसार मिळालेले एनसीएल प्रमाणपत्र पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.mscepune.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त ‘जयतु शंभू’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे १४ मे रोजी सासवड येथे आयोजन

पुणे, दि. १३ : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती प्रथमच राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहे. या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील आचार्य अत्रे सभागृह सासवड येथे १४ मे २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लेखणी आणि समशेर यांचा अनोखा संगम असणारे छत्रपती संभाजी महाराज हे सर्वांसाठी ऊर्जा आणि प्रेरणेचा स्त्रोत आहेत. पुरंदर किल्ला हे त्यांचे जन्मठिकाण असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त ‘जयतु शंभू’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ‘जयतु शंभू’ या सांस्कृतिक कार्यक्रमात ढोल पथक, मर्दानी खेळ, वासुदेव, गोंधळी असे शंभरहून अधिक लोककलाकार आपली कला सादर करणार आहेत. प्रामुख्याने स्नेहलता तावडे, तेजा देवकर, ऋतुराज फडके हे कलाकार यात सहभाग घेणार असून निवेदक प्रसिद्ध अभिनेत्री समीरा गुजर तर राकेश अशोक शिर्के हे नृत्यदिग्दर्शन करणार आहेत.

सर्व शिवभक्त व शंभू भक्तांनी ‘जयतु शंभू’ या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

ज्ञानदेव पडळकर महावितरणच्या अधीक्षक अभियंतापदी रूजू

पुणे, दि. १३ मे २०२५महावितरणच्या रास्तापेठ शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता म्हणून श्री. ज्ञानदेव पडळकर यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. याआधी ते नाशिक मंडलमध्ये याच पदावर कार्यरत होते. रास्तापेठ मंडलचे यापूर्वीचे अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले यांची पदोन्नतीवर मुख्य अभियंतापदी लातूर येथे बदली झाली. त्यांच्या रिक्त जागी श्री. पडळकर रूजू झाले आहे.

तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये श्री. ज्ञानदेव पडळकर ऑगस्ट १९९७ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रूजू झाले. पदोन्नतीनंतर त्यांनी उपकार्यकारी अभियंता म्हणून जत, सांगली, कोल्हापूर तर कार्यकारी अभियंता म्हणून पुणे (कोथरूड विभाग) येथे काम केले आहे. जानेवारी २०१७ मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे श्री. पडळकर यांची अधीक्षक अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर सोलापूर व नाशिक येथे काम केल्यानंतर बदलीद्वारे पुणे येथील रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता म्हणून ते रूजू झाले आहे.

राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने राखली शंभर टक्के निकालाची परंपरा!

पुणे
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकांसह मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या ठरलेल्या देशातील पहिल्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या निकालात यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी अभिनंदन केले आहे.

शाळेतील सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.शिवराम नामदेव राठोड ( ९४.०५ टक्के ) कोमल मारुती कुडके ( ९३.०८ टक्के )सादिया हबीब शेख (८८.०६ टक्के ), जान्हवी अमोल हुंबरे (८८.०६ टक्के), मयान अनिल कांबळे ( ८६ टक्के)या विद्यार्थ्यांनी विशेष यश प्राप्त केले आहे.
याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलमध्ये आर्थिक दुर्बल घटकासह मध्यमवर्गीयांची मुले शिक्षण घेतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी या शाळेने नावलौकिक प्राप्त केला आहे. शाळेची स्थापना माझ्या पुढाकारातून झाली. स्थापनेपासून सलग शंभर टक्के निकालाची परंपरा राखण्यात यश मिळाले आहे.केवळ दहावी -बारावीमध्येच नाही तर आयआयटीमध्येही या शाळेतील विद्यार्थी टॉपर ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल यासाठी शिक्षकवर्ग , सर्व लोकप्रतिनिधी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याने हे यश मिळाले आहे असेही आबा बागुल यांनी नमूद केले .

SSC: राज्याचा निकाल ९४.१० टक्के,बारावी नंतर दहावीतही शैक्षणिक राजधानी पिछाडीवरच, मुलीच ठरल्या सरस, कोकणाची पुन्हा बाजी!

मुलीच ठरल्या सरस, कोकणाची पुन्हा बाजी!

पुणे-यंदाचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तर यंदाच्या वर्षी राज्यात २८१ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.तर २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत. सर्व विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के आहे. सर्व विभागीय मंडलातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के असून मुलांची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. याचाच अर्थ नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ टक्के जास्त आहे.बारावी नंतर दहावीतही शैक्षणिक राजधानी पुणे पिछाडीवरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विभागनिहाय SSC निकाल…

कोकण विभाग – ९८.८२ टक्के
कोल्हापूर विभाग – ९७.४५ टक्के
मुंबई विभाग – ९५.८४ टक्के
पुणे विभाग – ९४.८१ टक्के
नाशिक विभाग – ९३.०४ टक्के
अमरावती विभाग – ९२.९५ टक्के
छत्रपती संभाजीनगर – ९२.८२ टक्के
लातूर विभाग – ९२.७७ टक्के
नागपूर – ९०.७८ टक्के

सीबीएसईचा निकाल येथे पाहा

cbse.gov.in
results.nic.in
results.digilocker.gov.in
umang.gov.in
DigiLocker, UMANG

सीबीएसई दहावीची गुणपत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

https://cbseresults.nic.in

सीबीएसई बारावीची गुणपत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

https://examinationservices.nic.in/cbseresults/class_xii_jh_2025/ClassTwelfth_bn_2025.htm

निकालांमध्ये मुलींचा निकाल मुलांपेक्षा चांगला लागला आहे. दहावीच्या मुलींचा निकाल ९५.०% लागला, तर मुलांचा निकाल ९२.६३% लागला. मुलींचा निकाल मुलांपेक्षा २.३७% चांगला लागला आहे.बारावीत मुलींचा निकाल ९१.६४% आणि मुलांचा ८५.७०% लागला. याचा अर्थ असा की दोन्ही वर्गात मुली जिंकल्या आहेत.

२११ जणांना १०० टक्के

दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी २११ आहेत. त्यात शंभर टक्के गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी लातूर बोर्डाचे आहेत. लातूरच्या ११३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के मिळाले आहे. पुण्यातील १३ जणांना शंभर टक्के गुण मिळाले आहे. नागपूरमध्ये ३, संभाजीनगर ४०, मुंबई ८, कोल्हापूर १२, अमरावती ११, नाशिक २, कोकण ९ जणांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.

राज्यात ३५ टक्के मिळवणारे २८५ विद्यार्थी कुठल्या विभागातील किती ?

नागपूर – ६३ विद्यार्थी, छत्रपती संभाजी नगर – २८ विद्यार्थी, मुंबई – ६७ विद्यार्थी, कोल्हापूर – १३ विद्यार्थी, अमरावती – २८ विद्यार्थी, नाशिक – ९ विद्यार्थी, लातूर – १८ विद्यार्थी, कोकण – ० विद्यार्थी, एकूण २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत.

प्रथम-द्वितीय-उत्तीर्ण श्रेणीची टक्केवारी

राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ७४५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थ्यांनी ४५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

१ लाख ८ हजार ७८१ विद्यार्थी ३५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९४.१० टक्के लागला. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही घट झाली आहे.गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल १.७१ टक्क्यांनी घटला आहे. त्यात कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.८२ टक्के, तर सर्वांत कमी नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेतही कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती.

राज्यभरातील २३ हजार ४८९ शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेत ९२.३१ टक्के मुले, तर ९६.१४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. त्यामुळे मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३.८३ने जास्त आहे. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९९.३२ टक्के, तर गडचिरोली जिल्ह्याला निकाल सर्वांत कमी ८२.६७ टक्के लागला.

यंदा दहावीचा निकाल का घटला याचे नेमके कारण देता येणार नाही. कारण दरवर्षी निकालात वाढ किंवा घट होतच असते. प्रश्नपत्रिकेची काठिण्यपातळी कमी-जास्त होत असते. बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यात ३७ केंद्रांवर गैरप्रकार घडले. आता तपासणी, चौकशी करून संबंधित केंद्रांपैकी दोषी केंद्रे कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. या अभियानामध्ये भरारी पथके, बैठी पथके, आकस्मिक भेटी अशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

राज्यभरातील ३७ परीक्षा केंद्रांवर कॉपीची प्रकरणे निदर्शनास आली. मात्र कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि कोकण या चार विभागातील एकाही परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरण निदर्शनास आले नाही. तर पुणे, नागपूर, लातूर विभागात प्रत्येकी सात, छत्रपती संभाजीनगर विभागात तेरा, मुंबई विभागात तीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

दहावीच्या निकालात राज्यात इंग्रजी माध्यमाचा निकाल सर्वाधिक ९८.४४ टक्के लागला आहे. तर सर्वाधिक विद्यार्थी असलेल्या मराठी माध्यमाचे ९२.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.राज्य मंडळातर्फे एकूण आठ माध्यमांमध्ये परीक्षा घेतली जाते. त्यानुसार मराठी माध्यमातून १६ हजार ५३४ शाळांतील १० लाख ७६ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या १० लाख ६६ हजार ९०० विद्यार्थ्यांपैकी ९ लाख ९० हजार ६१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर इंग्रजी माध्यमाच्या ४ हजार ३१९ शाळांतून नोंदणी केलेल्या ३ लाख ५१ हजार ९५९ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ५१ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ३ लाख ४५ हजार ९६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्या खालोखाल उर्दू माध्यमाच्या १ हजार ३०४ शाळांतून ८८ हजार ५२३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या ८७ हजार ७७३ विद्यार्थ्यांपैकी ८१ हजार १४९, म्हणजेच ९३.५९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य मंडळाने दिली.

हिंदी माध्यमाचा निकाल ९०.४८ टक्के लागला. ६१२ शाळांतून नोंदणी केलेल्या ३७ हजार २५ विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ३३ हजार १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कन्नड माध्यमाच्या ७८ शाळांतील २ हजार ६१४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या २ हजार ५४६ विद्यार्थ्यांपैकी ९१.५२ टक्के, २ हजार ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुजराती माध्यमाच्या ४६ शाळांतून नोंदणी केलेल्या १ हजार ३१६ विद्यार्थ्यांपैकी १ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १ हजार २२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुजराती माध्यमाचा निकाल ९४.४४ टक्के लागला. तेलुगू माध्यमाचे ९६.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पाच शाळांतून नोंदणी केलेल्या १२९ विद्यार्थ्यांपैकी १२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधी माध्यमाचा निकाल ८२.६१ टक्के लागला. एका शाळेतून परीक्षा दिलेल्या २३ विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

युध्दविराम 3 दिवसांनंतर केला असता तर POK भारतात असते! अमित शहांचे ‘ते’ भाषण व्हायरल…

0

युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियात याबाबत नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानचे पुन्हा तुकडे करण्याची चांगली संधी भारताकडे होती, असे मत अनेकांनी व्यक्त केले. अमेरिकेपुढे भारत झुकल्याची पोस्टही अनेकांनी केली. तर काहींनी अमित शहांचा दोन वर्षांपूर्वीचा संसदेतील भाषणाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकमधील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त केले. त्यानंतर पाकने पलटवार करताना भारतावर ड्रोन व क्षेपणास्त्र डाकली. पण भारतानेही चोख प्रत्युत्तर देत सर्व ड्रोन, क्षेपणास्त्र, लढाऊ विमाने हवेतच नेस्तनाबूत केली. दोन्ही देशांमधील संघर्ष टोकाला पोहचल्यानंतर शनिवारी अचानक युध्दविरामाची घोषणा झाली.

शहांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ता. 6 डिसेंबर 2023 रोजीचा हा व्हिडीओ आहे. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक आणि जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयकावरील चर्चेदरम्यानचे शहांचे भाषण पुन्हा चर्चेत आले आहे. यावेळी बोलताना शहा यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दोन चुकांकडे लक्ष वेधले होते.
1948 मध्ये पाकिस्तानशी युध्दविरामासाठी सहमती दर्शविणे आणि काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रापर्यंत नेणे, या नेहरूंच्या ऐतिहासिक चुका होत्या, असे शाह म्हणाले होते. 1948 मध्ये सैन्य जिंकत होते. युध्दविराम तीन दिवसांनी पुढे ढकलला असता तर पीओके (पाकव्याप्त काश्मीर) भारतात असते, असेही शाह म्हणाले होते. शनिवारी झालेल्या युध्दविरामानंतर शहांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कलाकार व्हा, सेलिब्रिटी नव्हे:संतोष जुवेकर

एमआयटी एडीटी’चा ‘कारी-२०२५’ महोत्सव संपन्न

पुणेः कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त आयुष्य घेऊन जन्मते. इतिहासात कायमच योगदानाची नोंद राहते व्यवहाराची नाही. त्यामुळे कलाकाराने केवळ व्यवहारावर भर न देता योगदानावर भर द्यावा व सेलिब्रिटी होण्याचा हट्ट सोडून शेवटपर्यंत स्वतःतील कलाकार जिवंत ठेवून अखेरीस शांती व तृप्ती रसाचा आनंद घ्यावा, असे मत प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते संतोष जुवेकर यांनी मांडले.
ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, मीडिया, डिझाइन आणि आर्किटेक्चरचा सर्वांत मोठा महोत्सव
कारी-२०२५” च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. प्रसंगी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., कुलसचिव प्रा.डाॅ.महेश चोपडे, अधिष्ठाता डाॅ.मिलिंद ढोबळे, कार्यक्रमाच्या मुख्य समन्वयक डाॅ.मुक्ता अवचट, समन्वयक डाॅ.विराज कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी जुवेकर पुढे म्हणाले, आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण मी अप्लाईड आणि फाईन आर्टिस्ट आहे, असे सांगतो. परंतू माझ्या मते आपले कलाकार असणे आणि त्यापेक्षाही आपल्यातील कला’कारी’ अधिक महत्त्वाची असते. कला ही मनुष्याच्या अंतापर्यंत साथ देते, आणि ज्याला कलेची आवड आहे, त्यालाच मनुष्य म्हटले जाऊ शकते.
ज्येष्ठ कलावंत श्री. सुहास बहुलकर यावेळी म्हणाले, ‘कारि’ म्हणजे, काहीतरी नाविण्यपूर्ण घडविणे. ज्यामध्ये कविता, कलाकृती, चित्र, फोटो, तंत्रज्ञान, चित्रपट अशा प्रत्येक चागोष्टीचा अंतर्भाव होऊ शकतो. एमआयटी एडीटी विद्यापीठाचा कॅम्पस मुळात अनेक कलाकृतींचा संगम असून जेथून अनेक कलाकार घडत आहेत. कित्येक दिवसांपासून माझी ललित कला, परफाॅर्मिंग आर्ट्स, मीडिया, डिजाइन आणि आर्किटेक्चर या सर्व गोष्टी एकाच छताखाली पाहण्याची इच्छा होती, ती आज ‘कारी’च्या माध्यमातून पूर्ण होत आहे. खरंतर कला ही कुठल्याही व्यक्तिच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा असा भाग असते. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देत, कलाभिमूख शिक्षणाकडे ‘एमआयटी एडीटी’चा असणारा भर नक्कीच उल्लेखनीय आहे, असेही त्यांनी म्हटले.

सुहास बहुलकर यांना विश्वारंभ कला पुरस्कार
‘कारी-२०२५’ उत्सवानिमित्त कलाक्षेत्रातील बहुमुल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ कलावंत श्री. सुहास बहुलकर यांचा डाॅ.विनोद शहा (प्रसिद्ध चिकित्सक तथा समाजसेवक) व डाॅ.स्वाती कराड-चाटे (विश्वस्त माईर्स एमआयटी शिक्षण समुह) यांच्या हस्ते ‘विश्वारंभ कला पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. तसेच यानिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते प्रा.डाॅ.मिलिंद ढोबळे लिखित ‘प्राचीन लेणी – एक दृश्य अन्वेषण’, प्रा.डाॅ.सुभाष बाभुळकर लिखित डाॅ.आनंद कुमारस्वामी या पुस्तकांचे प्रकाशन देखील करण्यात आले.

नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे

1. ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण थांबवली नाही. यापुढे पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबवलं नाही तर भारत पूर्ण शक्तिने हल्ला करणार.

2. भारतावर जर यापुढे दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसं उत्तर दिलं जाणार हे ऑपरेशन सिंदूरमुळे स्पष्ट झालं. ज्या ठिकाणी दहशतवादी तळं आहेत ती उद्ध्वस्त केली जाणार.

3. यापुढे पाकिस्तानचे न्यूक्लिअर ब्कॅकमेल सहन करणार नाही. त्या धमकीच्या आडून दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना सोडणार नाही.

4. दहशतवादी आणि त्यांना पोसणाऱ्यांना वेगवेगळ्या दृष्टीने पाहणार नाही. दोघांवरही कारवाई करणार.

5. यापुढे व्यापार आणि दहशतवाद सोबत होणार नाही. यापुढे रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही.

6. ज्यांनी आमच्या बहिणींचे कुंकू पुसले त्याचा बदला भारताने घेतला.

7. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे अचूकरित्या उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नव्हती की भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल. जेव्हा राष्ट्र सर्वोच्च असते तेव्हा असे कठोर निर्णय घेतले जातात.

8. मेड इन इंडिया शस्त्रांनी त्याची ताकद दाखवली. हवाई हल्ले असो वा पर्वतीय प्रदेश, प्रत्येक ठिकाणी भारतीय बनावटीच्या शस्त्रांनी त्याची क्षमता सिद्ध केली.

9. भारताच्या जोरदार हल्ल्यांमुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं शस्त्रसंधीची याचना केली. तोपर्यंत भारताने आपलं लक्ष्य साध्य केलं होतं. त्यामुळे आम्ही शस्त्रसंधी केली.

10. यापुढे पाकिस्तानसोबत फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा होणार.

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले – गेल्या काही दिवसांत आपण देशाची ताकद आणि संयम दोन्ही पाहिले आहे. सर्वप्रथम, मी प्रत्येक भारतीयाच्या वतीने भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, आपल्या गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम करतो.आणि सांगतो भारत कोणतेही आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही,आणि त्या नावाने दहशतवाद देखील सहन करणार नाही ,दहशतवादाला आश्रय देणारे सरकार असले तर त्यालाही सोडणार नाही युद्धात आमची श्रेष्ठता आम्ही सिद्ध केली आहे. या कारवाईदरम्यान आमच्या मेड इन इंडिया शस्त्रांची सत्यता सिद्ध झाली आहे जगाने पाकिस्तानचे कुरूप सत्य पाहिले आहेकोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी आम्ही निर्णायक पावले उचलत राहू.
आम्ही युद्धभूमीवर प्रत्येक वेळी पाकिस्तानला पराभूत केले आहे.

पाकिस्तानशी चर्चा होणार असेल तर ती फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच असेल
Pm मोदी म्हणाले,’ आपली एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे; आपण सर्वजण सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध एकजूट आहोत. हे निश्चितच युद्धाचे युग नाही, पण ते युद्ध दहशतवादाचेही युग नाही. दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता हीच एका चांगल्या जगाची हमी आहे. ज्या पद्धतीने पाकिस्तानी सैन्य आणि सरकार दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे, त्यामुळे एक दिवस ते पाकिस्तानलाच नष्ट करेल. जर पाकिस्तानला टिकून राहायचे असेल तर त्याला त्याचे दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट कराव्या लागतील, याशिवाय शांततेचा दुसरा कोणताही मार्ग नाही. भारताचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे, दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालू शकत नाहीत, दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत. पाणी आणि रक्त देखील एकत्र वाहू शकत नाहीत. मी जागतिक समुदायाला हे देखील सांगू इच्छितो की आमचे घोषित धोरण असे राहिले आहे की जर पाकिस्तानशी कोणतीही चर्चा झाली तर ती फक्त दहशतवादावरच असेल; जर काही चर्चा झाली तर ती फक्त पीओकेवरच असेल. देशवासियांनो, आज बुद्ध पौर्णिमा आहे, भगवान बुद्धांनी आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला आहे. शांतीचा मार्ग देखील सत्तेतून जातो. मानवतेला शांती आणि समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी, प्रत्येक भारतीयाला शांततेत जगता यावे, विकसित भारताचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी, भारत शक्तिशाली असणे आवश्यक आहे. गरज पडल्यास या शक्तीचा वापर करणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांत भारताने हेच केले आहे. मी पुन्हा एकदा भारतीय सैन्य आणि सशस्त्र दलांना सलाम करतो. मी भारतीय लोकांच्या धैर्याला, एकतेला आणि दृढनिश्चयाला सलाम करतो. खूप खूप धन्यवाद. भारत माता चिरंजीव होवो.
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत ऑपरेशन सिंदूरने एक नवीन रेषा आखली आहे. ते एक नवीन सामान्य बनले आहे. पहिले- जर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या स्वतःच्या अटींवर प्रतिसाद देऊ. जिथे जिथे दहशतवाद्यांची मुळे उफाळून येतील तिथे आम्ही कडक कारवाई करू. दुसरे – भारत कोणतेही आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही. भारत त्यांच्या आश्रयाखाली वाढणाऱ्या दहशतवादी अड्ड्यांवर अचूक आणि निर्णायक हल्ला करेल. तिसरे म्हणजे, आम्ही दहशतवादाला आश्रय देणारे सरकार आणि दहशतवादाचे सूत्रधार यांना वेगळे घटक म्हणून पाहणार नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, जेव्हा पाकिस्तानी सैन्याचे उच्च अधिकारी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना निरोप देण्यासाठी जमले तेव्हा जगाने पाकिस्तानचे कुरूप सत्य पाहिले. हा राज्य पुरस्कृत दहशतवादाचा मोठा पुरावा आहे. भारत आणि त्याच्या नागरिकांना कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी आम्ही निर्णायक पावले उचलत राहू.
आम्ही युद्धभूमीवर प्रत्येक वेळी पाकिस्तानला पराभूत केले आहे. ऑपरेशन सिंदूरने एक नवीन आयाम जोडला आहे. आम्ही नवीन युगातील युद्धात आमची श्रेष्ठता सिद्ध केली आहे. या कारवाईदरम्यान आमच्या मेड इन इंडिया शस्त्रांची सत्यता सिद्ध झाली. २१ व्या शतकातील युद्धात भारतात बनवलेल्या संरक्षण उपकरणांची वेळ आली आहे हे जग पाहत आहे.

आपल्या शूर सैनिकांनी ऑपरेशनची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रचंड धैर्य दाखवले. आज मी त्यांचे शौर्य, धाडस आणि शौर्य आपल्या देशातील प्रत्येक आई, बहीण आणि मुलीला समर्पित करतो.आपल्या शूर सैनिकांनी ऑपरेशनची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रचंड धैर्य दाखवले. आज मी त्यांचे शौर्य, धाडस आणि शौर्य आपल्या देशातील प्रत्येक आई, बहीण आणि मुलीला समर्पित करतो.२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी दाखवलेल्या क्रूरतेने देश आणि जगाला धक्का बसला होता. कुटुंब आणि मुलांसमोर सुट्टी साजरी करणाऱ्या निष्पाप लोकांची क्रूर हत्या ही दहशतीचा एक अतिशय भयानक चेहरा आहे. देशाची सुसंवाद तोडण्याचा हा एक घृणास्पद प्रयत्न होता. माझ्यासाठी वैयक्तिकरित्या, हे दुःख प्रचंड होते.या दहशतवादी हल्ल्यानंतर, संपूर्ण राष्ट्र, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी एका सुरात उभा राहिला.

आम्ही भारतीय सैन्याला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले. आज, प्रत्येक दहशतवादी संघटनेला माहित आहे की आपल्या बहिणी आणि मुलींच्या कपाळावरील सिंदूर काढण्याचे काय परिणाम होतात.ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक नाव नाही तर ते देशातील कोट्यवधी लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे रोजी रात्री उशिरा आणि ७ मे रोजी पहाटे, संपूर्ण जगाने हे आश्वासन परिणामात रूपांतरित होताना पाहिले. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर आणि प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ले केले. भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल, याची दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण जेव्हा देश एकजूट असतो, राष्ट्र प्रथम या भावनेने भरलेला असतो, राष्ट्र सर्वोच्च असते, तेव्हा कठोर निर्णय घेतले जातात. निकाल प्रदर्शित केले जातात.जेव्हा भारताच्या क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोनने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला तेव्हा दहशतवादी संघटनांच्या इमारतीच हादरल्या नाहीत तर त्यांचे मनोबलही डळमळीत झाले. बहावलपूर आणि मुरीदके सारखी दहशतवाद्यांची अड्डे एक प्रकारे जागतिक दहशतवादाची विद्यापीठे राहिली आहेत. जगात कुठेही जे काही मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत, मग ते ९/११ असो किंवा लंडन ट्यूब बॉम्बस्फोट असो किंवा भारतातील मोठे दहशतवादी हल्ले असोत, ते सर्व या दहशतवादी तळांशी जोडलेले आहेत. दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींचे सिंदूर नष्ट केले होते, म्हणून भारताने दहशतवादाचे हे मुख्यालय उद्ध्वस्त केले. या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक कुख्यात दहशतवादी मारले गेले आहेत.गेल्या अडीच ते तीन दशकांपासून पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी सूत्रधार मुक्तपणे फिरत होते. जे भारताविरुद्ध कट रचायचे. भारताने त्यांना एका झटक्यात उद्ध्वस्त केले. मित्रांनो, भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तान निराशेच्या गर्तेत बुडाला. निराशेने वेढला आणि चवताळला. या भीतीमध्ये, त्याने आणखी एक धाडस केले; भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या कारवाईला पाठिंबा देण्याऐवजी पाकिस्तानने भारतावरच हल्ला करायला सुरुवात केली.पाकिस्तानने आमचे गुरुद्वारा, घरे, मंदिरे आणि शाळा लक्ष्य केल्या. पाकिस्तानने लष्करी तळांना लक्ष्य केले पण यामध्ये पाकिस्तान स्वतःही उघडकीस आला. जगाने पाहिले की पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारतासमोर पत्त्यासारखी कशी कोसळली. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना आकाशातच उद्ध्वस्त केले. पाकिस्तान सीमेवर हल्ला करण्यास तयार होता, पण भारताने पाकिस्तानच्या छातीवर हल्ला केला. भारताच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी अचूक मारा केला. पाकिस्तान हवाई दलाच्या एअरबेसचे नुकसान केले, ज्याचा त्यांना खूप अभिमान होता. पहिल्या तीन दिवसांत पाकिस्तानचा इतका नाश झाला की त्याने कल्पनाही केली नव्हती. भारताच्या आक्रमक कारवाईनंतर, पाकिस्तानने सुटकेचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली, पाकिस्तान जगभरात तणाव कमी करण्यासाठी विनवणी करत होता आणि जबरदस्त मार खाल्ल्यानंतर, १० मे रोजी दुपारी, पाकिस्तानी सैन्याने आमच्या डीजीएमओशी संपर्क साधला. तोपर्यंत आम्ही दहशतवादाच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान केले होते, दहशतवाद्यांना मारले होते आणि दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त केले होते. जेव्हा पाकिस्तानने आवाहन केले आणि सांगितले की ते यापुढे कोणत्याही दहशतवादी कारवाया किंवा लष्करी साहसात सहभागी होणार नाहीत, तेव्हा भारताने त्याचा विचार केला. मी पुन्हा एकदा सांगत आहे की आम्ही फक्त पाकिस्तानच्या दहशतवादी आणि लष्करी तळांविरुद्धची प्रत्युत्तरात्मक कारवाई पुढे ढकलली आहे. येत्या काळात, पाकिस्तानचे प्रत्येक पाऊल भविष्यात तो कोणत्या दृष्टिकोनातून घेतो याच्या आधारावर आम्ही मोजू. भारताचे हवाई दल, लष्कर, नौदल, बीएसएफ आणि निमलष्करी दल सतर्क आहेत. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक नंतर, ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्ध भारताचे धोरण आहे.दहशतवादाविरुद्धच्या लढाईत ऑपरेशन सिंदूरने एक नवीन रेषा आखली आहे. ते एक नवीन सामान्य बनले आहे. पहिले- जर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या स्वतःच्या अटींवर प्रतिसाद देऊ. जिथे जिथे दहशतवाद्यांची मुळे उफाळून येतील तिथे आम्ही कडक कारवाई करू. दुसरे – भारत कोणतेही आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही. भारत त्यांच्या आश्रयाखाली वाढणाऱ्या दहशतवादी अड्ड्यांवर अचूक आणि निर्णायक हल्ला करेल. तिसरे म्हणजे, आम्ही दहशतवादाला आश्रय देणारे सरकार आणि दहशतवादाचे सूत्रधार यांना वेगळे घटक म्हणून पाहणार नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, जेव्हा पाकिस्तानी सैन्याचे उच्च अधिकारी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना निरोप देण्यासाठी जमले तेव्हा जगाने पाकिस्तानचे कुरूप सत्य पाहिले. हा राज्य पुरस्कृत दहशतवादाचा मोठा पुरावा आहे. भारत आणि त्याच्या नागरिकांना कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी आम्ही निर्णायक पावले उचलत राहू.
आम्ही युद्धभूमीवर प्रत्येक वेळी पाकिस्तानला पराभूत केले आहे. ऑपरेशन सिंदूरने एक नवीन आयाम जोडला आहे. आम्ही नवीन युगातील युद्धात आमची श्रेष्ठता सिद्ध केली आहे. या कारवाईदरम्यान आमच्या मेड इन इंडिया शस्त्रांची सत्यता सिद्ध झाली. २१ व्या शतकातील युद्धात भारतात बनवलेल्या संरक्षण उपकरणांची वेळ आली आहे हे जग पाहत आहे.

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन अणुशक्तींमधील संघर्ष रोखला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणण्यास अमेरिकेने मदत केली आहे. मला वाटते की ही कायमची युद्धबंदी असेल.ट्रम्प म्हणाले की दोन्ही देशांकडे खूप जास्त अण्वस्त्रे आहेत. तुम्ही थांबलात तर आम्हीही व्यवसाय करू. माझ्या सरकारने युद्धबंदीत मदत केली आहे. जर हा संघर्ष थांबला नाही तर आम्ही व्यवसाय करणार नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, “आम्ही पाकिस्तानसोबत खूप व्यापार करणार आहोत. आम्ही भारतासोबत खूप व्यापार करणार आहोत. आम्ही सध्या भारताशी वाटाघाटी करत आहोत. लवकरच पाकिस्तानसोबत वाटाघाटी होणार आहेत…”युद्धबंदीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की त्यांनी अणुयुद्ध रोखले आहे. ते म्हणाले की ते भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांसोबत व्यवसाय करतील.

ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानचे नेतृत्व खूप मजबूत आणि शक्तिशाली आहे हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो. परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याची ताकद, शहाणपण आणि संयमी दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. आम्ही खूप मदत केली. मी उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचे त्यांच्या कामाबद्दल आभार मानू इच्छितो.
ट्रम्प म्हणाले- मी म्हणालो, चला, आम्ही तुमच्यासोबत खूप व्यवसाय करणार आहोत. आम्ही सध्या भारताशी चर्चा करत आहोत. आम्ही लवकरच पाकिस्तानशी चर्चा करणार आहोत.
ट्रम्प यांचे पुत्र ट्रम्प ज्युनियर यांनी रविवारी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय आपल्या वडिलांना दिले. ते म्हणाले की, हुशार लोक वाटाघाटीच्या टेबलावर आहेत आणि अमेरिकेमुळे जग सुरक्षित आहे.

यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही ट्रम्प यांचे कौतुक केले होते. शनिवारी एका टीव्ही भाषणात त्यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना त्यांचा धर्म विचारल्यानंतर त्यांची हत्या केली. महिला आणि मुलांसमोर त्या पुरूषांच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडण्यात आल्या. घटनेच्या वेळी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात होते. ते दौरा मध्येच सोडून देशात परतले आणि कॅबिनेट बैठक बोलावली.

पहलगाम घटनेच्या १५ दिवसांनंतर, लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले केले. २५ मिनिटांत ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात ७ मे रोजी पहाटे १:०५ वाजता संघर्ष सुरू झाला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील अनेक दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला होता.

त्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष ४ दिवस सुरू राहिला, त्यानंतर ट्रम्प यांनी १० मे रोजी संध्याकाळी ५:३० वाजता सोशल मीडिया पोस्टद्वारे दोन्ही देशांमधील युद्धबंदीची माहिती दिली.

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

0

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले …
पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल उद्या 13 मे रोजी दुपारी जाहीर करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना उद्या दुपारी 1 वा. बोर्डाने निश्चित केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. बारावी बोर्डाचा निकाल गत आठवड्यातच जाहीर झाला होता हे विशेष.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत आठवड्यातच इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर केला होता. त्यानंतर विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दहावीचा निकाल केव्हा लागणार? याविषयीची उत्सुकता लागली होती. त्यानुसार, मंडळाने सोमवारी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार मंगळवारी दुपारी 1 वा. ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या व इतर अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुणपत्रिकांचे वाटप केले जाईल.

कुठे पाहता येईल निकाल?

https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com

विद्यार्थ्यांना उपरोक्त संकेतस्थळांवर विषयनिहाय संपादित केलेले गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रतही (प्रिंट आऊट) घेता येईल. विशेषतः शाळांना https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.यंदा दहावीच्या परीक्षेला 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी बसले होते. त्यात 8 लाख 64 हजार 120 मुले, 7 लाख 47 हजार 471 मुली, तर 19 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता.

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने भारतीय बॉक्स ऑफिसवर अधिकृतपणे ₹१०० कोटींचा आकडा पार केला आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा चित्रपटाच्या प्रभावशाली कथानकाला आणि देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीला अधोरेखित करतो.

राज कुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, वाणी कपूर आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात अजय देवगणच्या समोर झळकलेली अभिनेत्री वाणी कपूरने प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आणि चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व कृतज्ञता व्यक्त केली.

वाणी कपूर म्हणाली, “रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला आणि एक ब्लॉकबस्टर म्हणून साजरा केला जात आहे, यासाठी मी अत्यंत आभारी आहे. या लोकप्रिय फ्रँचायझीचा भाग होणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्या अभिनयाला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल मी नम्रपणे कृतज्ञता व्यक्त करते. एक अभिनेत्री म्हणून, मी विविध प्रकारचे भूमिकांमध्ये काम करण्याचा आणि प्रत्येक प्रकल्पातून शिकण्याचा प्रयत्न करते. प्रेक्षकांकडून मिळणारा असा प्रतिसाद खूपच प्रेरणादायक आणि समाधान देणारा असतो. ‘रेड 2’च्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करते. देशभरातून मिळणारे प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी खूप खास आहे.”

या मैलाचा दगड गाठून, ‘रेड 2’ने आपली यशस्वी घौडदौड कायम ठेवली असून, वर्षातील एक प्रमुख हिट म्हणून आपली जागा पक्की केली आहे.