1. ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण थांबवली नाही. यापुढे पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबवलं नाही तर भारत पूर्ण शक्तिने हल्ला करणार.
2. भारतावर जर यापुढे दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसं उत्तर दिलं जाणार हे ऑपरेशन सिंदूरमुळे स्पष्ट झालं. ज्या ठिकाणी दहशतवादी तळं आहेत ती उद्ध्वस्त केली जाणार.
3. यापुढे पाकिस्तानचे न्यूक्लिअर ब्कॅकमेल सहन करणार नाही. त्या धमकीच्या आडून दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना सोडणार नाही.
4. दहशतवादी आणि त्यांना पोसणाऱ्यांना वेगवेगळ्या दृष्टीने पाहणार नाही. दोघांवरही कारवाई करणार.
5. यापुढे व्यापार आणि दहशतवाद सोबत होणार नाही. यापुढे रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही.
6. ज्यांनी आमच्या बहिणींचे कुंकू पुसले त्याचा बदला भारताने घेतला.
7. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे अचूकरित्या उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नव्हती की भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल. जेव्हा राष्ट्र सर्वोच्च असते तेव्हा असे कठोर निर्णय घेतले जातात.
8. मेड इन इंडिया शस्त्रांनी त्याची ताकद दाखवली. हवाई हल्ले असो वा पर्वतीय प्रदेश, प्रत्येक ठिकाणी भारतीय बनावटीच्या शस्त्रांनी त्याची क्षमता सिद्ध केली.
9. भारताच्या जोरदार हल्ल्यांमुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं शस्त्रसंधीची याचना केली. तोपर्यंत भारताने आपलं लक्ष्य साध्य केलं होतं. त्यामुळे आम्ही शस्त्रसंधी केली.
10. यापुढे पाकिस्तानसोबत फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा होणार.