पुणे-सत्ताधारी पक्षातील कुणाची तरी टक्केवारी ठरेना आणि म्हणून कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाला प्रारंभ होईना असा थेट आरोप मनसे चे नेते आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी केला आहे .दक्षिण पुण्यातला महत्वाच्या अशा कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे आणि त्यामुळेच वारंवार फेर निविदा निघत आहेत असा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे
पहा या संदर्भात त्यांनी नेमके काय म्हटले आहे …
टक्केवारी ठरेना ..आणि कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाला प्रारंभ होईना -वसंत मोरेंचा आरोप
टक्केवारी हाच उद्देश ठेवल्याने कात्रज कोंढवा रस्ता रखडला -चेतन तुपे पाटील
पुणे- अपघात ,लोकांचे मृत्यू …जनहित आणि जनसंरक्षण अशा गोष्टींना प्राधान्य देण्या ऐवजी प्रथम प्राधान्य टक्केवारीला देण्यात आल्याने दक्षिण पुण्यातला महत्वाच्या अशा कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे आणि त्यामुळेच वारंवार फेर निविदा निघत आहेत असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी केला .
पहा या संदर्भात त्यांनी नेमके काय म्हटले आहे …
‘विद्यार्थ्यांनी आजार लपवू नये’ : डॉ. सय्यद तकी आबिदी
पुणे :
’खाण्याच्या चांगल्या सवयी, व्यायाम आणि आनंदी राहण्याकडे कल ठेवावा, आजार, नैराश्य कधीही लपवू नये’, असा सल्ला कॅनडास्थित फिजिशियन डॉ. सय्यद तकी आबिदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
‘महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटर’ आयोजित ‘विद्यार्थ्यांसाठी शारिरीक, मानसिक आरोग्याचे महत्व’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार अध्यक्षस्थानी होत्या.
आझम कॅम्पसमधील ‘हायटेक’ हॉलमध्ये बुधवारी सकाळी हे व्याख्यान झाले. यावेळी मुनव्वर पीरभॉय, डॉ. मुश्ताक मुकादम, डॉ. जालिस अहमद, डॉ.नझिम शेख उपस्थित होते.
डॉ. सय्यद तकी आबिदी म्हणाले, ‘पौगांडावस्थेत शरीरातील अंतस्थ ग्रंथींच्या स्त्रावाच्या चढउतारामुळे (हार्मोनल इम्बॅलन्स) विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या आयुष्यात, आरोग्यात बदल घडतात. ते लक्षात येत नाहीत. अशावेळी हार्मोन्स्, थायरॉईड, हिमोग्लोबिन तपासून उपचार घेतले पाहिजे. कोणतीही छोटी आरोग्यविषयक समस्या दुर्लक्षित करू नये. विद्यार्थिनींनी हार्मोनल इम्बॅलन्सवर उपचार केले नाहीत तर पुढे जननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी खाण्यामध्ये हे आवडत नाही ते खात नाही, असा दृष्टिकोण बाळगू नये. विद्यार्थिनींमध्ये खाण्याच्या आवडी-निवडीमुळे हिमोग्लाबिन कमतरतेची समस्या निर्माण होते.
मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी स्वतःच्या आहे त्या व्यक्तिमत्वावर समाधानी असले पाहिजे. अनावश्यक स्पर्धा टाळावी, नैराश्य येत असेल तर वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत. रात्री जागरण करू नये. अभ्यासासाठी झोप न येण्याच्या गोळ्या घेऊ नयेत.
विद्यार्थ्यांनी दर 2 वर्षांनी तपासण्या करून त्याची नोंद ठेवण्याची सवय लावून घेतली पाहिजे. पुढील आयुष्यात या नोंदी उपयोगी ठरतात. पाण्याची बाटली सोबत ठेवण्याची साधी सवयही उपयुक्त ठरते.
डॉ. मुश्ताक मुकादम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आबेदा इनामदार डॉ. सय्यद तकी आबिदी यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला.
पालिकेकडून सुमारे ३०० कोटीं रुपयांच्या व्याजावर ‘पाणी ‘ जबाबदारी कुणाची ? माजी उपमहापौर आबा बागुल यांचा सवाल
महावितरणच्या संभाव्य वीजग्राहकांना मीटर्सची उपलब्धता आता वेबसाईटवर उपलब्ध
मुंबई-महावितरणने सर्व वर्गवारीतील संभाव्य वीजग्राहकांना मीटर्सची उपलब्धता महावितरणच्याwww.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. यात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांच्या वर्गवारीतील ग्राहकांना लागणाऱ्या मीटर्सच्या उपलब्धतेबाबत उपविभागीय कार्यालयापर्यन्त समावेश करण्यात आला आहे.
महावितरणचा कारभार लोकाभिमूख आणि पारदर्शी व्हावा यासाठी महावितरणच्या सोयी सुविधांची माहिती वीजग्राहकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून संभाव्य ग्राहकांना लागणाऱ्या सर्व वर्गवारीतील मीटर्सबाबतची उपलब्धता महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कोणत्याही ग्राहकाला नवीन विद्युतपुरवठा हवा असल्यास त्यासाठी लागणाऱ्या मीटर्सबाबतची सद्यस्थिती ते घरबसल्या महावितरणच्या वेबसाईटवर बघू शकणार आहेत.
महावितरणच्या वेबसाईटवर शाखा कार्यालयांपर्यन्त मीटर्सबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे येथून पुढे आता ग्राहकांना मीटर्स नाहीत या सबबीखाली त्यांची गैरसोय होणार नाही. मीटरच्या पुरवठ्याबाबत व सद्यस्थितीबाबत ते स्वत: महावितरणच्या वेबसाईटला भेट देऊन मीटर्सच्या उपलब्धतेबाबत खातरजमा करू शकणार आहेत. त्यामुळे मीटर्सच्या उपलब्धतेबाबत आता कोण्त्याही संबंधित अधिकाऱ्याला टाळाटाळ करता येणार नाही. महावितरणच्या टोलफी क्र. 1800 102 3435 व 1800 233 3435 यावर संभाव्य वीजग्राहक नवीन वीजपुरवठा, त्वरित जोडणीकरिता किंवा नादुरुस्त मीटर बदलणेकरिता संपर्क साधू शकतात.
मीटर्सच्या उपलब्ध्तेबाबत माहिती www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्याने महावितरणने ग्राहकाभिमूख सोयीकरिता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
” डॉक्टर्स डे ” निमित्त विविध डॉक्टरांचे सन्मान
अज्या-शीतलीचा मधुचंद्र महाबळेश्वरमध्ये….
जिथे मराठी तिथे झी मराठी या धोरणाला केंद्रस्थानी ठेवून झी मराठी ही नुसती वाहिनी राहिलेली नसून ती प्रत्येक मराठी कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच बनलीआहे. झी मराठीवरी लोकप्रिय मालिका ‘लागीर झालं जी’ ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. अज्या आणि शीतली सोबत मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनातघर करून बसलं आहे. नुकतंच मालिकेत शीतल आणि अजिंक्यचा शुभविवाह सामूहिक विवाहसोहळ्यात पार पडला. अनेक अडचणींवर मात करून शीतल आणिअजिंक्य एकत्र आले. पण त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांचा संसार खरंच सुखाचा होऊ देतील का? हा प्रश्न सर्वांचा मनात डोकावतो.
लग्न झाल्यापासून अज्या आणि शीतली यांना एकत्र असा वेळच घालवायला नाही मिळत आहे. नातेवाईक आणि घरच्या सदस्यांची उठबस करण्यातच शीतलीचासर्व वेळ जातो त्यामुळे अज्याची मात्र चिडचिड होतेय. समाधान मामा आणि जीजी त्या दोघांनी एकत्र वेळ घालवावा म्हणून त्यांना बाहेर फिरायला जायचा सल्लादेतात. सध्या मालिकेत अज्या आणि शीतली त्यांच्या हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेल्याचे प्रेक्षक पाहत आहेत. महाबळेश्वरच्या गारव्यात अज्या आणि शीतलीप्रेमाचे ४ क्षण घालवत आहेत.
या खास भागाचे चित्रीकरण करताना शीतल म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर म्हणाली, “प्रेक्षकांना अज्या-शीतलीचं प्रेम आणि त्यांची अनोख्या लव्हस्टोरी मध्येजास्त इंटरेस्ट आहे आणि आता ते दोघे एकत्र आले आहेत व सर्व अडचणींपासून दूर, काही प्रेमाचे क्षण अनुभवत आहेत त्यामुळे आमच्या इतकेच प्रेक्षक देखीलखूप उत्सुक असणार आहेत.”
अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण म्हणाला, “प्रेक्षक अजिंक्य आणि शीतलच्या लग्नासाठी खूपचं उत्सुक होते आणि आता ते एकत्र आले आहेत त्यामुळेत्यांना एकत्र बघताना देखील प्रेक्षकांना नक्कीच छान वाटत असणार आहेत. होनीमूनसाठी ते दोघे महाबळेश्वर सारख्या निसर्गरम्य ठिकाणी आले आहेत आणिप्रेक्षक लवकर हे पाहू शकणार आहेत कि त्या दोघांनी महाबळेश्वर मध्ये काय मजा केली आणि ते कुठे कुठे फिरले.” ‘लगीर झालं जी’ मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर!!!
‘सोफोश’ समाजासाठी प्रेरणादायी
पुणे-सोफोश संस्थेमुळे वंचित मुलांना हक्काचे घर मिळाले आहे . मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी योग्यरित्या पार पडली असून संस्थेचे काम समाजासाठी प्रेरणादायी आहे असे मत माजी नगरसेवक दिलीप उंबरकर यांनी व्यक्त केले .
ससून रुग्णालयातील सोफोश संस्थेच्या आयोजित कार्यक्रमात माजी नगरसेवक दिलीप उंबरकर बोलत होते . यावेळी अनाथ मुलांना खाऊ व फळांचे वाटप करण्यात आले . यावेळी नगरसेवक योगेश समेळ व माजी नगरसेवक दिलीप उंबरकर यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश प्रशासकीय अधिकारी शर्मिला सय्यद , यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला . या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे कार्यकर्ते सतीश गायकवाड यांनी केले .
या कार्यक्रमास अरविंद कोठारी , जयप्रकाश पुरोहित , मुरलीधर जाधव , माजी नगरसेवक मनिष साळुंके , महेंद्र शिंदे , गोरख दुपारगुडे , राजेंद्र कणबर्गे , किशोर कुठे , शैलेश लालबिगे , विजय झुंज , नंदू रणधीर , गणेश यादव , भिकन सुपेकर , राहुल कांबळे , शकील शेख , प्रताप सावंत आदी मान्यवर उपस्थित होते .
गेल्या ४४ वर्षापासून सोफोश संस्थेचे काम अथकपणे सूरू आहे . मुलांना मायेने मातेचे प्रेम देत आहेत असे मत प्रशासकीय अधिकारी शर्मिला सय्यद यांनी व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गायकवाड व आभार पी. के. कुलकर्णी यांनी मानले .
‘डॉक्टर्स डे’ निमित्तच्या मॅरेथॉन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद
पुणे-‘डॉक्टर्स डे’ निमित्त ज्युपिटर हॉस्पिटल ने, डॉक्टरांच्या विविध संघटनेने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. या मध्ये १००० डॉक्टर सहभागी झाले होते त्यात ४०० महिला डॉक्टर यांचा सहभाग होता. ‘कर्करोगाच्या जनजागृतीचा’ संदेश देत या मॅरेथॉन स्पर्धेची सुरवात सकाळी ६.३० वाजता भोसरी प्राधिकरण स्पाइन रोड येथून झाली.
‘नॅशनल इंटिग्रेटेट मेडिकाल असोसिएशन’, ‘इंडियन डेंटल असोसिएशन पिंपरी-चिंचवड शाखा’, ‘पिंपरी-चिंचवड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन’, ‘फॅमिली फिजिशियन असोसिएशन’ आदी संघटनांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. मॅरेथॉनचे फ्लॅग ऑफ ज्युपिटर हॉस्पिटल च्या महाव्यवस्थापिका डॉ. शुभदा शर्मा यांनी केले. त्या वेळी त्यांनी ज्युपिटर हॉस्पिटल ने कर्करोगाच्या उपचारासाठी एकत्रित केअर युनिट ची स्थापना केली या बदल माहिती दिली.
भोसरी प्राधिकरण स्पाइन रोड येथून सुरु झालेली स्पर्धा एमआडीसी पोलीस चौकी मार्गे तीन, पाच, आणि दहा किलोमीटर या टप्यात विभागलेली होती. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्यावर दुतर्फा ढोल ताशा पथक उपस्थित होते.
या वेळी श्री.गिरीश निकम, डॉ. निलेश पाटील, डॉ प्रमोद कुबडे, डॉ.सत्यजित पाटील, डॉ. संतोष भांडवलकर,डॉ. सी. बी पवार, डॉ. प्रताप सोमवंशी, आदींसह पिंपरी-चिंचवड, पुणे, हडपसर, कोंढवा, चाकण, तळेगाव,येरवडा, खराडी, हिंजवाडी, आदी भागातील सुमारे हजार डॉक्टर उपस्थित होते. यात सर्व डॉक्टरांनी उस्फुर्त सहभाग घेतला.
प्रभागातील झावळ्या व पाला पाचोळा संकलनासाठी व विल्हेवाटीसाठी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्याकडून नियोजन –
पुणे ते पंढरपूर प्रवासात वारकऱ्यांसोबत असतील ‘व्होडाफोन’च्या दोन ‘मोबाईल व्हॅन’.
वारकऱ्यांना मिळतील मोफत कॉल करण्याची सुविधा, मोबाईल चार्जिंग पॉईंट्स, रिचार्ज व्हाऊचर्स आणि एम-पेसा मनी
ट्रान्स्फर सेवा.
‘व्होडाफोन प्ले’मधून वारकऱ्यांना मुक्कामीच्या ठिकाणी पाहता येतील थेट बातम्या, धार्मिक चित्रपट, ऐकता येतील भजने.
पुणे- व्होडाफोन या भारतातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीने पंढरपूरच्या आषाढी यात्रेत वारकऱ्यांना सेवापुरविण्याची आपली दरवर्षीची योजना आज जाहीर केली. पुणे ते पंढरपूर अशी पायी वारी करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना‘व्होडाफोन’च्या मोफत सेवा पुरविण्यासाठी दोन मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. गेली पाच वर्षे ही सेवापुरविणाऱ्या ‘व्होडाफोन’ची एक व्हॅन ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत व दुसरी तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत
असेल, असे ‘व्होडाफोन’तर्फे सांगण्यात आले.
या ‘व्होडाफोन मोबाईल व्हॅन’मध्ये मोफत कॉलिंगची सोय, मोबाईल फोन चार्जिंगचे पॉईंटस, रिचार्ज व्हाऊचर्स व ‘एम-पेसा’ ही पैसे ट्रान्स्फर करण्याची सेवा आदी सुविधा उपलब्ध असतील. वारकऱ्यांना वारीत असतानादेखील आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधता यावा, हा यामागचा उद्देश आहे. पालखी मार्गावरील सर्व मुक्कामी ठिकाणी वारकऱ्यांना या सेवांचा लाभ घेता येईल. प्रत्येक व्हॅनमध्ये 8 फोन, 50 चार्जिंग पॉईंटस ठेवण्यात येतील.
यंदाच्या वर्षी तर या व्होडाफोन मोबाईल व्हॅनमध्ये ‘एलईडी स्क्रीन’ही उपलब्ध करून देण्यात येत आहे. या स्क्रीनवर वारकरी बातम्या, भक्तीगीते, भजने व धार्मिक चित्रपट पाहू शकतील. ‘व्होडाफोन प्ले’ या व्होडाफोनच्या मनोरंजनासाठीच्या ‘अॅप्लिकेशन’च्या माध्यमातून हे कार्यक्रम सादर करण्यात येतील. वारकऱ्यांना केवळ बातम्याच नव्हे, तर मनोरंजनाच्या सोज्वळ
कार्यक्रमांचा यातून आनंद घेता येईल. ‘व्होडाफोन’ची ही पंढरपूर यात्रेची वारी 2013पासून सुरू झाली. तेव्हापासून ‘व्होडाफोन’ने लाखो वारकऱ्यांना ‘व्होडाफोन
मोबाईल व्हॅन’च्या माध्यमातून मोफत कॉलिंगची सुविधा दिलेली आहे. या व्हॅन्सचे उद्घाटन तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज पालख्यांच्या विश्वस्तांच्या हस्ते व ‘व्होडाफोन इंडिया’चे महाराष्ट्र-गोवा परिमंडळाचे प्रमुख आशिष चंद्रा यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या उपक्रमाबद्दल बोलताना आशिष चंद्रा म्हणाले, की सलग सहाव्या वर्षी पंढरपूर यात्रेला जाता
येणार असल्याचा व्होडाफोनला अभिमान आहे. ही यात्रा एकमेवाद्वितीय असून सर्व महाराष्ट्राला ती एकत्र आणते. राज्यातील कानाकोपऱ्यातील गावांमधून लाखो भाविक एकत्र येतात व 450 किलोमीटरचे अंतर पायी चालतात, ही दरवर्षीची अद्भूत घटना आहे. ‘व्होडाफोन मोबाईल व्हॅन’च्या माध्यमातून या यात्रेला मदत करण्यास व्होडाफोनला नेहमीच आनंद वाटतो. वारकऱ्यांना कुटुंबियांशी संवाद
साधण्यात या व्हॅनचा हातभार लागतो. यंदा ‘व्होडाफोन प्ले’देखील वारकऱ्यांना त्यांच्या मुक्कामी मनोरंजनाचा आनंद देऊ शकणार आहे. 21 दिवसांच्या वारीत वारकऱ्यांना व्होडाफोनच्या एकसंध, कोणताही अडथळा नसलेल्या व विश्वासार्ह अशा नेटवर्कचा अनुभव घेता येईल. वारकऱ्यांच्या भक्तीमय मार्गाने त्यांच्यासोबत आम्ही यापुढेही असेच जात राहू.
‘बापमाणूस’ मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण ची एंट्री
झी युवावरील बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. या मालिकेत आता प्रेक्षक एक नवा चेहरा पाहत आहेत. योगिता चव्हाणने गावठी या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले, बापमाणूस या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
योगिता ही बापमाणूस मालिकेत शालू या आदिवासी मुलीचे पात्र साकारत आहे. एकेदिवशी शालू योगायोगाने सूर्याला भेटते आणि सूर्या काळजीपोटी तिला वाड्यावर घेऊन येतो. शालू ही सूर्या आणि गीता यांच्या लव्ह स्टोरीमध्ये प्रमुख भूमिका बजावणार आहे. तिच्या एन्ट्रीमुळे या मालिकेत लव्ह ट्रँगल प्रेक्षक अनुभवू शकणार आहेत.
सध्या मालिकेत प्रेक्षक गीता आणि सूर्या यांचे उमलते नाते पाहत आहेत सूर्या आणि गीताने एकमेकांबद्दल वाटणाऱ्या भावना कबुल केल्या आणि आता त्यांचं नातं पुढे नेण्यासाठी ते त्यांच्या कुटुंबियांशी देखील बोलणार आहे.
पण शालूच्या येण्यामुळे मालिकेला नवीन वळण आलं आहे आणि प्रेक्षकांना हे पाहणे रंजक ठरेल.
हेमांगी कवीचे फुलपाखरू मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन
झी युवा या वाहिनीने युथफूल कन्टेन्ट सादर करून तमाम महाराष्ट्रातील जनतेचं भरभरून मनोरंजन केलं आहे. अल्पावधीतच ‘फुलपाखरू’ या मालिकेने रसिकांची पसंती मिळाली आहे आणि या मालिकेने एक वर्ष प्रेक्षकांचेमनोरंजन करून लोकप्रियतेचे शिखर गाठले. मालिकेतील वैदेही म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे तमाम तरूणांच्या हृदयाची धडकन आहे तर मानस म्हणजेच यशोमन आपटे सगळ्या मुलींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेलं प्रेम, त्यांचा एकमेकांवरचा लटका राग, त्यांची खोडकर मस्ती, थोडे रुसवे – फुगवे, एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मानस आणि वैदेहीची ही प्रेमकथा म्हणजे ‘फुलपाखरू’. या कार्यक्रमातप्रेक्षकांनी अनेक ट्विस्ट्स अँड टर्न्स अनुभवले. आता या मालिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री फुलपाखरू मालिकेत योग टीचर म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
चित्रपट नाटक आणि मालिका या तीन ही माध्यमात आपल्या अभिनयाने ठसा उमटविलेल्या हेमांगीने फुलपाखरू मालिके द्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. हेमांगी या मालिकेत एका योग टीचरच्या भूमिकेत दिसणारआहे. हेमांगीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे त्यामुळे तिच्या या नवीन पात्राला देखील प्रेक्षक तितकंच प्रेम देतील यात शंकाच नाही.
छोट्या पडद्यावरील तिच्या पुनरागमनाबद्दल बोलताना हेमांगी म्हणाली, “माझ्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात छोट्या पडद्यावर झाली त्यामुळे मी या माध्यमात काम करण्यासाठी नेहमीच उत्साही असते. फुलपाखरूची संपूर्ण टीमखूप एनर्जेटिक आहे त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना देखील खूप मजा येते. प्रेक्षकांनी नेहमीच माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि या पुढेही माझ्या कामावर असंच प्रेम करतील याची मला खात्री आहे.”
हेमांगी कवीची ही नवीन भूमिका पाहायला विसरू नका फुलपाखरूमध्ये सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त झी युवावर!!
बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत ग्रोवलिंग टायगर्स, रेजिंग्ज् बुल्स संघांची विजयी सलामी
पुणे- पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत ग्रोवलिंग टायगर्स व रेजिंग्ज् बुल्स या संघांनी अनुक्रमे स्ट्राईकिंग जॅगवार्स व स्पीडिंग चिताज् या संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत ग्रोवलिंग टायगर्स संघाने स्ट्राईकिंग जॅगवार्सचा 43-40असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून प्राप्ती पाटील, नील जोगळेकर, सिद्धार्थ मराठे, मृणाल कुरळेकर, ओंकार अग्निहोत्री, रोहन फुले यांनी अफलातून कामगिरी केली.
दुसऱ्या सामन्यात शार्दूल खवळे, अभिराम निलाखे, अर्जुन गोहड, हृदया शहा यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर रेजिंग्ज् बुल्स संघाने स्पीडिंग चिताजचा 42-41असा संघर्षपूर्ण करून विजयी सलामी दिली.
स्पर्धेचे उदघाटन पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमडीटीएचे सचिव अभिषेक ताम्हाणे, स्पर्धेचे आयुक्त कौस्तुभ शहा आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे सह आयुक्त अश्विन गिरमे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
ग्रोवलिंग टायगर्स वि.वि.स्ट्राईकिंग जॅगवार्स 43-40(एकेरी:10 वर्षाखालील मुली: मृणाल शेळके पराभूत वि.सिया प्रसादे 0-4; 10 वर्षाखालील मुले: मनन अगरवाल पराभूत वि.सूर्या काकडे 3-4(5-7); 12 वर्षाखालील मुली: प्राप्ती पाटील वि.वि.पूर्वा भुजबळ 6-4; 12 वर्षाखालील मुले: नील जोगळेकर वि.वि.राघव अमीन 6-2; मिश्र दुहेरी: अर्जुन कीर्तने/एंजल भाटिया पराभूत वि.अमोद सबनीस/अन्या जेकब 0-6; एकेरी:14 वर्षाखालील मुली: ख़ुशी शर्मा पराभूत वि.मधुरिमा सावंत 4-6; 14 वर्षाखालील मुले: सिद्धार्थ मराठे वि.वि.अनर्घ गांगुली 6-4; 16 वर्षाखालील मुली: मृणाल कुरळेकर वि.वि.मृण्मयी भागवत 6-2; 16 वर्षाखालील मुले: ओंकार अग्निहोत्री वि.वि.अझफर मदानी 6-3; मिश्र दुहेरी: रोहन फुले/मृणाल कुरळेकर वि.वि.इंद्रजीत बोराडे/मृण्मयी भागवत 6-5(4));
रेजिंग्ज् बुल्स वि.वि.स्पीडिंग चिताज् 42-41(एकेरी: 10 वर्षाखालील मुली: मेहक कपूर पराभूत वि.देवांश्री प्रभुदेसाई1-4; 10 वर्षाखालील मुले: शार्दूल खवळे वि.वि.सक्षम भन्साळी 4-2; 12 वर्षाखालील मुली: कौशिकी समर्थ पराभूत वि.आदिती लाखे 4-6; 12 वर्षाखालील मुले: अभिराम निलाखे वि.वि.श्लोक गांधी 6-1;मिश्रा दुहेरी: तनय शहा/समीक्षा श्रॉफ पराभूत वि.पार्थ देवरूखकर/आशी छाजेड 5-6(6); 14 वर्षाखालील मुली: रिजूल सीडनळे पराभूत वि.श्रावणी खवळे 4-6; 14 वर्षाखालील मुले: अर्जुन गोहड वि.वि.आर्यन हूड 6-2; 16वर्षाखालील मुली: हृदया शहा पराभूत वि.वैष्णवी आडकर 4-6; 16वर्षाखालील मुले: सर्वेश बिरमाने पराभूत वि.यशराज दळवी 2-6; मिश्र दुहेरी: हृदया शहा/सर्वेश बिरमाने वि.वि.वैष्णवी आडकर/यशराज दळवी 6-2).
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहमतीनं हजारो कोटींचा जमिन घोटाळा – काँग्रेसचा थेट आरोप
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बिल्डर यांच्यात साटलोट असून नवी मुंबईतील सिडकोच्या जमीनसंबंधी मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. सिडकोतील 1467 कोटी रुपयांची 24 एकर जमिन केवळ 3 कोटी रुपयांत बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आली, असा आरोप मुंबईमध्ये काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणजीत सुरजेवाला यांनी माहिती दिली.सिडकोची तब्बल 1767 कोटी रुपयांची जमीन 3.60 कोटी रुपयांच्या कवडीमोल दरात बिल्डरला देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या शहरी विकास विभागाच्या परवानगीशिवाय हा व्यवहार होऊ शकत नाही, असा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांवर करण्यात आला आहे.
कोयना धरणाच्या 8 प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेली जमीन 15 लाख प्रति एकर दराने बिल्डरला विकण्यात आली. मंत्रालयातील मोठ्या अधिका-यांचा यात सहभाग असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे. तसेच संबंधित बिल्डर हे नुकतेच विधानपरिषदेत निवडून गेलेले आमदार प्रसाद लाड यांचे निकटवर्तीय असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी, ‘महाराष्ट्राला क्लिन चिट मुख्यमंत्री लाभले आहेत. ते आपल्या मंत्र्यांना ताबडतोब क्लिन चिट देतात’, अशी टीका केली आहे.
सगळे कायदे धाब्यावर बसवत नावांमध्ये बदल करणे, पॉवर ऑफ अॅटर्नी देणं, सर्वे या सगळ्या गोष्टी एका दिवसांत म्हणजेच अवघ्या २४ तासांमध्ये उरकण्यात आल्या. सिडको अथवा कुठल्याही सरकारी यंत्रणेने विरोध तर केलाच नाही उलट बेकायदेशीर कृत्य करण्यात सहाय्य केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, रणजीत सुरजेवाला व संजय निरुपम यांनी केला आहे.हा मोठा भ्रष्टाचार असून या प्रकरणाची खुली चौकशी व्हावी तसेच हा व्यवहार रद्द करण्यात यावा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.






