पुणे-पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही महिलांच्या कलागुणांना
वाव देणारा महिला महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. यावर्षी सुप्रसिद्ध
शेफ विष्णु मनोहर यांनी कोथरूड येथील हर्षल हॉल येथे ४ तिखट व २ गोड
खाद्यपदार्थ्यांची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून
उद्घाटन झाले. याप्रसंगी पुणे फेस्टीव्हलचे
सांस्कृतीक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू, मिस पुणे फेस्टीवलच्या संयोजिका सुप्रिया
ताम्हाणे, महिला महोत्सवाच्या संयोजिका दिपाली पांढरे, संयोगिता कुदळे व सोहानी
डांगे उपस्थित होते. यावेळी विष्णु मनोहर यांनी जे पदार्थ शिकवलेत त्याच्या
रेसिपी झेरॉक्स स्वरूपात सगळ्यांना देण्यात आल्या. महिलांनी या कार्यक्रमास मोठी
गर्दी केली होती. संयोगिता कुदळे आणि दिपाली पांढरे यांनी याचे आयोजन केले
होते.
यावेळी उपस्थित असणार्या सर्व महिलांमधुन एका भाग्यवंत महिलेस
आकर्षक साडी भेट देण्यात आली. याचवेळी बाळकृष्ण नेहरकर यांचा धमाल
कार्यक्रम ‘खेळ रंगला वहिणींचा’ हा सादर झाला. यात वन मिनिट गेम शो घेण्यात
आला. त्यावेळी विजेता महिलेला पैठणी भेट देण्यात आली.
पुणे फेस्टिव्हलमध्ये शेफ विष्णु मनोहर यांची खाद्य प्रात्यक्षिके
आरती अंकलीकर- टिकेकर यांचे सदाबहार शास्त्रीय गायन
पुणे-पुणे फेस्टिव्हलमध्ये जेष्ठ शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर- टिकेकर यांचे ”सुरवंदना’ हे
सदाबहार शास्त्रीय गायन बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाले. प्रथम त्यांनी राग भीमपलासमध्ये विलंबित
एकतालात; अखिया मोरी लाग रही’ ही बंदिश सादर केली. ‘मध्यलय तीनताल’ मध्ये ‘जा जा रे अपने मंदिरवा
ही बंदिश आणि द्रुत एकताल मध्ये पं.दिनकर कैकिणी रचित रचना सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
पाठोपाठ ‘पावसाळा’या ऋतूत गायला जाणारा ‘मियाँमल्हार ‘या रागातील तालमाला त्यांनी सादर केली.
तानसेन यांच्या शिष्यांनी त्यांच्यावर रचलेली ही तालमाला आहे.
‘समर्थ रामदास स्वामी’ यांनी रचलेला अभंग ‘ताने स्वर रंगवावा’ जो श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केला आहे
तो सादर करून त्यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
वर्ष ऋतूत गायला जाणारा उपशास्त्रीय संगीतातील ‘कजरी’हा गीतप्रकार त्यांनी सादर केला. कजरीचे बोल
होते ‘बरसन लागी बदरिया रुमझुम के’भैरवी रागातील अवघा रंग सादर करून त्यांनी कार्यक्रमाची समाप्ती
केली.
साथसंगत हार्मोनियम – मिलिंद कुलकर्णी, तबला – विभव खांडोलकर, साइड रिदम – आदित्य आपटे, पखवाज –
गणेश पापळ, तानपुरा – कु.स्वरूपा बर्वे, कु.अबोली गद्रे यांनी केली.
याप्रसंगी महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आवर्जुन उपस्थित होत्या. गेली ३० वर्षे पुणे
फेस्टिवलसारखा दर्जेदार सांस्कृतिक महोत्सव सुरु असून ही कौतुकाची बाब आहे. असे सांगून त्यांनी
कलाकारांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल पुणे फेस्टिवलला धन्यवाद दिले. त्यांच्या हस्ते आरती
अंकलीकर-टिकेकरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे,
सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख मोहन टिल्लू उपस्थित होते. पुणे फेस्टिवल चे बालगंधर्व रंगमंदिर प्रमुख श्रीकांत
कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.
गोएल गंगा ग्रुप व प्राईड पर्पल हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते
आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत 80 हुन अधिक खेळाडू सहभागी
- रित्सा कोंदकर , प्रिशा शिंदे, सक्षम भन्साळी यांना अव्वल मानांकन
पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांची जुगलबंदी रंगणार
पुणे – क्रियायोग परंपरेतील एक अवतारपुरुष मानले जाणारे परमहंस योगानंद यांचे शिष्य स्वामी क्रियानंद यांनी स्थापन केलेल्या ”आनंद संघ” या संस्थेतर्फे प्रख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा आणि प्रख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या जुगलबंदीचा ‘गुरु-वंदना’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि.३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता गणेश कला क्रीडा मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात पुण्यातील रसिकांना या दोन दिग्गज कलाकारांच्या जुगलबंदीचा आस्वाद घेता येणार आहे. या मैफिलीत ‘शिव-हरी’ यांना पं. विजय घाटे आणि पं. भवानीशंकर यांची सुरेल साथसंगत लाभणार आहे.
योगसाधना आणि ध्यानधारणा यांच्या आधारे समाजाची उन्नती करण्याचे कार्य स्वामी परमहंस योगानंद ट्रस्टकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे निराधार, विधवा, वृद्ध महिला आणि परित्यक्तांना या ट्रस्टतर्फे कायमस्वरूपी मदत पुरविली जाते. त्याचाच एक भाग म्हणून या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमातून मिळणारे उत्पन्न वृंदावन येथील निराधार महिलांच्या मदतीसाठी दिले जाणार आहे. परमहंस योगानंद यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रारंभी पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते भारतीय कलेवर आधारित स्वामी क्रियानंद यांनी लिहिलेल्या ” आर्ट अॅज ए हिडन मेसेज ” या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. याप्रसंगी आनंद संघाचे जागतिक प्रमुख धर्माचार्य स्वामी ज्योतिश नोवाक, सीबीआयचे माजी संचालक आणि मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष डी. आर. कार्तिकेयन, परमहंस योगानंद चैरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका पिया सिंग, संचालक मंजुनाथ किणि, आध्यात्मिक गुरु स्वामी देवी, स्वामी जया, स्वामी ध्याना आणि आनंद संघाचे अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी आनंद संघाचे जागतिक प्रमुख स्वामी ज्योतिश नोवाक यांनी चितारलेल्या तैलचित्रांच्या प्रदर्शनाचे ऑनलाईन उदघाटनही होणार आहे. हे प्रदर्शन पुण्यातील रेंज हिल्स रस्त्यावरील अशोक संकुलात आनंद संघाच्या योगा सेंटर मध्ये रसिकांना सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पाहता येणार आहे. तसेच csrworld.net या लिंकवर ते ऑनलाईनही पाहता येणार असल्याची माहिती आनंद संघाचे पुण्याचे शाखा प्रमुख डॉ. आदित्य गाईत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी त्यांचे सहकारी स्नेहल भट, पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य संतूर वादक दिलीप काळे आदि उपस्थित होते. गुरु वंदना हा कार्यक्रम वृंदावन मधील सर्व विधवा महिलांना ‘लाईव’ पाहता येणार आहे.
कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका bookmyshow.com वर तसेच बालगंधर्व रंग मंदिर, टिळक स्मारक मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि कमला नेहरू पार्कसमोर शिरीष बोधनी यांच्या कडे २४ सप्टेंबर पासून उपलब्ध राहतील असे आयोजकांनी कळविले आहे. सामाजिक जाणिवेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास रसिकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन डॉ. गाईत यांनी केले आहे.
सिंथॉलची मेन्स ग्रूमिंग उत्पादने दाखल
५५०० कोटी उलाढाल असलेल्या मेल ग्रूमिंग मार्केटमध्ये परिपूर्ण ग्रूमिंग उत्पादने दाखल करणारा सिंथॉल पहिला ब्रँड
मुंबई, २० सप्टेंबर २०१८: सिंथॉल या अंदाजे ६६ वर्षे आघाडीवर असलेल्या लोकप्रिय बँडने चेहरा, शरीर, केस व दाढी यांसाठी ८ नवे प्रकार दाखल करून मेल ग्रूमिंग मार्केटमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले आहे. सिंथॉलच्या मेल ग्रूमिंग उत्पादनांचे अनावरण गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) भारत व सार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया यांनी ग्रूमिंग शोमध्ये केले व त्यामध्ये एशियन गेम्समधील सुवर्णपदकविजेते अर्पिंदर सिंग व अभिनेता हर्षवर्धन कपूर हे शोस्टॉपर्स होते.
ही उत्पादने दाखल केल्याने ५५०० कोटी रुपये उलाढाल असलेल्या मेल ग्रूमिंग मार्केटमध्ये परिपूर्ण ग्रूमिंग उत्पादने दाखल करणारा सिंथॉल हा पहिला वहिला ब्रँड ठरला आहे. सिंथॉल हा पुरुषांसाठीचा भारतातील एक वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड आहे आणि पुरुषांच्या अपेक्षा जाणून घेत या ब्रँडने प्रगती साधली आहे. सिंथॉलची मेल ग्रूमिंग उत्पादने सर्वंकष असून, त्यामध्ये नावीन्यपूर्ण, विविध फायदे असणाऱ्या व अत्यंत उपयुक्त, प्रामुख्याने आधुनिक पुरुषांसाठी तयार केलेल्या उत्पादनांचा समावेश आहे.
सिंथॉलने मेल ग्रूमिंग मार्केटमध्ये प्रवेश केल्याबद्दल, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) भारत व सार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया यांनी सांगितले, “भारतातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील पुरुष महिलांपेक्षा अधिक पैसे ग्रूमिंग व पर्सनल केअर उत्पादनांवर खर्च करतात, असे पाहणीत आढळले आहे. त्यांना वेळ वाचवतील, असी सोपी व बहुपयोगी उत्पादने हवी असतात. सिंथॉल मेल ग्रूमिंग उत्पादने ही गरज पूर्ण करतात आणि ती आमच्या पुरुष ग्राहकांचे जीवन अधिक सुंदर व ताजेतवाने करतील, असा विश्वास आहे. मी विशेषतः पहिल्यावहिल्या सिंथॉल शेव्ह + फेसवॉश व फेसवॉश, तसेच बिअर्ड + फेस वॉश, वॅक्स ऑइल, आफ्टर शेव्ह + आफ्टर ट्रिम यांचा समावेश असलेल्या आणि बहुपयोगी व वापरण्यास सोप्या असलेल्या संपूर्ण बिअर्ड उत्पादनांबद्दल याबद्दल अधिक उत्सुक आहे.”
सिंथॉल मेल ग्रूमिंग उत्पादनांविषयी बोलताना एशियन गेम्समधील सुवर्णपदकविजेते अर्पिंदर सिंग म्हणाले, “ग्रूमिंगचा अप्रतिम अनुभव देणाऱ्या सिंथॉलशी जोडलेले असणे गौरवास्पद आहे. ग्रूमिंग हा माझ्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. मला ग्रूमिंग साधे व कमी वेळखाऊ आवडते. सिंथॉलच्या मेल ग्रूमिंग उत्पादनांमुळे ते खरेच शक्य झाले आहे. मी प्रवासात असलो, जिममध्ये असलो किंवा कामानिमित्त टूरवर असलो तरी शेव्ह + फेस वॉश अशी बहुपयोगी उत्पादने व बिअर्ड उत्पादने मी नेहमी सोबत ठेवतो. ही उत्पादने एखाद्या मित्रप्रमाणे असावीत, वापरण्यास सोपी व सोयीस्कर असावीत आणि सिंथॉल तसा मित्र नक्कीच आहे.”
अभिनेता हर्षवर्धन कपूर यांनी सांगितले, “सिंथॉलला सहा दशकांची समृद्ध परंपरा आहे. माझ्या वाढत्या वयातही मी सिंथॉल वापरला आहे. या नव्या व अप्रतिम ग्रूमिंग उत्पादनांशी सहयोग करताना मला अतिशय आनंद होतो आहे. मी बाहेर खूप वावरतो आणि त्यामुळे माझ्यासाठी ग्रूमिंग सोपे, साधे, अधिक डू-इट-युवरसेल्फ व विनासायास असणे गरजेचे असते. सिंथॉलच्या नव्या उत्पादनांमुळे हे सहज शक्य होणार आहे व विशेषतः आउटडोअर शूटसाठी मी जेथे जेथे जाईन तेथे मला ही उत्पादने नेता येणार आहेत. ही उत्पादने माझ्या व्यक्तिमत्त्वाला, माझ्या जीवनशैलीला पूरक आहेत. खरेतर, सिंथॉल आणि मी महान व्यक्ती व गुणवत्ता यांचा एकच वारसा जपत आहोत. मी पूर्णतः बॉलीवूड कुटुंबातला असल्याने मी लहानपणापासून विनोद खन्ना, शाहरूख खान, हृतिक रोशन, विराट कोहली अशा लोकप्रिय व्यक्तींना या ब्रँडचा चेहरा असल्याचे पाहत आलो आहे. सिंथॉलची ही नवी उत्पादने आजच्या ग्रूमिंग मार्केटमध्ये उठून दिसतील, याची खात्री आहे!”
इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरमध्ये २५ सप्टेंबर ते १० अॉक्टोबर पर्यंत मोफत तपासणी शिबिर
सततची पाठदुखी ? दुर्लक्ष करू नका आणि तुमचे प्रोस्टेट वेळीच चेक करा…
पुणे : पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून आकड्यांनुसार ६ मधील १ पुरुष प्रोस्टेट कॅन्सरग्रस्त आहे. ह्या गंभीर आजारांवर मात करण्यासाठी त्यावर लवकरात लवकर उपचार होणे अत्यंत महत्वाचे आहे. २५ सप्टेंबर ते १० अॉक्टोबर ह्या कालावधीत इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरने मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
जवळपास ६० टक्के रुग्ण डॉक्टरांना भेटतात जेव्हा ते शेवटच्या टप्यावर पोहचलेले असतात, ८०% – ९०% संपूर्ण बरे झालेल्या रुग्णांचे निदान अगदी पहिल्या टप्प्यात झालेले असते. दुर्दैवाने भारतात मात्र ह्यासंबंधी जागरूकता नसल्याने कित्येक रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात उपचाराला येतात जेव्हा उशीर झालेला असतो असे मत आयपीसीचे कन्सल्टंट युरोलॉजीस्ट डॉ. देशमुख हृषीकेश यांनी व्यक्त केले. प्रोस्टेट कॅन्सर हा अत्यंत हळू गतीने वाढत असून अखेर प्राणघातक ठरतो त्यामुळे त्याचे प्राथमिक टप्प्यात निदान होऊन त्यावर उपचार होणे अत्यंत महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.
इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सर (IPC) मागील ५ वर्षांपासून प्रोस्टेट कॅन्सर आणि त्याचे निदान करण्यासाठी उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे ज्यात ५०,००० पेक्षा जास्त लोकांची जनजागृती करण्यात आली आहे.
प्राथमिक लक्षणे:वारंवार लघवी येणे, रात्री वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीला त्रास होणे, लघवी पूर्ण होत नसल्याची जाणीव होणे व लघवीचा प्रवाह घटणे.कॅन्सरच्या पूढील टप्यात हाडांमध्ये वेदना होणे, भूक कमी होणे याबरोबरच फ्रॅक्चर आणि अर्धांगवायूचा धोका देखील संभावतो.
भविष्यात प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ५० वर्षांपूढील पुरूषांनी पीएसए आणि डीआरई तपासणी करण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट फॉर प्रॉस्टेट कॅन्सरने दिला असून कोणत्याही प्रकारच्या पाठदूखीकडे दुर्लक्ष करू नये असे देखील सुचवले आहे. जर वेळेत निदान झाले तर हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. विशेषत: ५० वर्षे वयानंतर कोणत्याही पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.
प्राथमिक टप्प्यात निदान झाल्यास रुग्ण १००% बरा होऊ शकतो. उशीर झाल्यास प्रोस्टेट प्राणघातक ठरू शकतो त्यामुळे तुमच्या सततच्या पाठदुखीवर दुर्लक्ष करू नका आणि तुमचे प्रोस्टेट वेळीच चेक करा.
तारीख : २५ सप्टेंबर ते १० अॉक्टोबर २०१८
वेळ – अपॉईंटमेंट नुसार
ठिकाण : इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सर, पुणे ग्राउंड फ्लोअर, कुमार – दि ओरायन, सेंट मिराज कॉलेजजवळ, डॉनबॉस्को युथ सेन्टरच्या विरुद्ध, कोरेगाव पार्क, पुणे
संपर्क : ७७९८५७७५६३ / 020-6603 7777/78
पेट्रॉनतर्फे ‘रोव्हर’ मोनो ब्लुटूथ इअरफोनचे अनावरण
एकदा चार्ज केल्यावर 8 तासांपर्यंत चालणाऱ्या पॉलिमर बॅटरीचा समावेश
मुंबई: पेट्रॉन या आघाडीच्या मोबाइल अॅक्सेसरीज ब्रँडने ‘रोव्हर’ सीएसआर चिप असलेले ब्लुटूथ इअरफोन दाखल केल्याची घोषणा केली आहे. कॉल घेण्यासाठी व सुरळीतपणे संगीत ऐकण्यासाठी पेट्रॉन रोव्हर हे उत्तम हँड्स-फ्री मोबाइल उत्पादन आहे. अर्गोनॉमिक शहरी, वजनाने हलके डिझाइन, वायरलेस ब्लुटूथ कनेक्टिविटी, एचडी मायक्रोफोन, व्हॉइस कमांड्स, व बराच काळ टिकणाकी पॉलिमर बॅटरी ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.
पेट्रॉन रोव्हरची निर्मिती हाय डेफिनिशन व्हॉइस कॉल करण्याच्या दृष्टीने, मायक्रोफोन वापरून केली आहे व त्यामुळे कॉलची गुणवत्ता वाढली आहे. मल्टिफंक्शन बटण व विशेष पॉवर स्विच यामुळे रोव्हर वापरण्यास सोपे आहे. मायक्रो यूएसबी चार्जिंग केबलमुळे ते झटपट व सुलभपणे चार्ज होते. पेट्रॉन रोव्हरमध्ये निरनिराळ्या प्रकारची आकर्षक वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत – बॅटरीच्या कमी वापरासाठी व उत्तम वायरलेस कनेक्टिविटीसाठी सीएसआर ब्लुटूथ चिपसेट, उत्तम आवाज, संगीतासारखा मोबाइल कण्टेण्ट ऐकण्यासाठी A2DP स्ट्रीमिंग, 280-डिग्री रोटेटेबल माइक, इंटरचेंजेबल साइड्स, व एका चार्जमध्ये 8 तासांपर्यंत टॉकटाइम देईल अशी 90mAh बॅटरी.
पेट्रॉन रोव्हर दाखल होत असल्याबद्दल, पेट्रॉनचे संस्थापक-मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन ख्वाजा यांनी सांगितले, “सध्या वायरलेस तंत्रज्ञानामध्ये कमालीची सुधारणा होत आहे व त्याचे फायदेही अनेक आहेत. ब्लुटूथ ऑडिओ डिव्हाइसविषयी विचार करताना आपण अनेकदा केवळ संगीत या एकाच पैलूविषयी बोलतो. परंतु, पेट्रॉन संगीत व संवाद या दोन्हींना समान महत्त्व देते. पेट्रॉन रोव्हरमुळे केव्हाही बोलणे व संगीत ऐकणे सोपे होणार आहे. आमचे ब्लुटूथ इअरफोन टिकाऊ आहेत व दिवसभर वापरण्याच्या दृष्टीने तयार केले आहेत, यामुळे ते कामाच्या दरम्यान व त्याव्यतिरिक्त सातत्याने वापर करणाऱ्यांसाठी आदर्श ठरतात.”
पेट्रॉन रोव्हर 1299 रुपयांमध्ये पेट्रॉनच्या www.ptron.in या ऑनलाइन स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. तसेच, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन व लेटेस्टवन.कॉम या प्रमुख ई-कॉमर्स पोर्टलवर मिळेल.
वैशिष्ट्ये:
ü सुलभ कॉल – ब्लुटूथ v4.1 तंत्रज्ञान व मल्टिफंक्शन बटण यामुळे
ü उत्तम कनेक्टिविटी – सीएसआर चिपसेट
ü स्पष्ट व नैसर्गिक बोलणे – आवाज चांगला ऐकू येण्यासाठी एचडी व्हॉइस व साउंड
ü अॅडजस्टेबल – 280 डिग्री रोटेटेबल माइक व इंटरचेंजेबल साइड
ü इफेक्टिव्ह ट्रान्समिशन रेंज – पेअर्ड डिव्हाइसपासून 10 मीटरपर्यंत
ü फ्रिक्वेन्सी रेंज रिस्पॉन्स – 20 Hz-20 kHz
ü इम्पेडन्स – 32 ohms
ü बॅटरीची क्षमता – 90 mAh
ü टॉकटाइम – 8 तासांपर्यंत
ü स्टँड-बाय टाइम – 200 तास
पेट्रॉनविषयी
पेट्रॉनची निर्मिती एक इलेक्ट्रॉनिक व मोबाइल अॅक्सेसरीज ब्रँड म्हणून करण्यात आली आहे. 2014 या वर्षात, पेट्रॉनने चीनमध्ये कंत्राटी उत्पादनाद्वारे मोबाइल अॅक्सेसरीजच्या उत्पादनाला सुरुवात केली. त्याची मालकी पाल्रेड ऑनलाइन टेक्नालॉजिज प्रा. लि. (पीओटी) या पाल्रेड टेक्नालॉजिज लि. (पीटीएल) या 2004 पासून बीएसई व एनएसई येथे नोंदणीकृत असलेल्या कंपनीच्या उपकंपनीकडे आहे.
ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रँड पेट्रॉनद्वारे विविध प्रकारची मोबाइल अॅक्सेसरीज उत्पादने दिली जातात. पेट्रॉनद्वारे ब्लुटूथ हेडसेट्स, पोर्टेबल ब्लुटूथ स्पीकर्स, वायर्ड हेडसेट्स, चार्जर व केबल, स्मार्ट वॉचेस, नेटवर्किंग उत्पादने अशा उत्पादनांची विक्री केली जाते. पेट्रॉनकडे मिड-मार्केटसाठी ब्रँडेड अॅक्सेसरीज श्रेणीतील गुणवत्तेला वॉरंटीचे पाठबळ असलेली, पण किफायतशीर दरामध्ये मिळणारी विविध प्रकारची उत्पादने आहेत, ही पेट्रॉनची क्षमता आहे.
टीव्हीएस एक्सएल १०० तर्फे मराठी अभिनेते मकरंद अनासपुरेची महाराष्ट्रातील अम्बेसिडरपदी निवड
टीव्हीएस मोटर कंपनी या प्रसिद्ध दुचाकी व तीनचाकी उत्पादक कंपनीने आज मराठी सेलिब्रेटी मकरंद अनासपुरे यांची टीव्हीएस एक्सएल १०० श्रेणीचे महाराष्ट्रातील ब्रँड अम्बेसिडर म्हणून निवड केल्याचे जाहीर केले. मकरंद अनासपुरे महाराष्ट्रात या ब्रँडचा चेहरा असतील.
टीव्हीएस एक्सएल १०० हा भारतातील एक प्रसिद्ध ब्रँड असून अत्याधुनिकतेमुळे तो देशभरात प्रवासासाठी अतिशय सोयीस्कर म्हणून ओळखला जातो. या सहकार्याद्वारे ब्रँडने महाराष्ट्रातील ग्राहकांप्रती आपली बांधिलकी अधिक दृढ केली असून आपले स्थानही आणखी बळकट केले आहे.
या नव्या ब्रँड सहकार्याविषयी मकरंद अनासपुरे म्हणाला , ‘टीव्हीएएस एक्सएल ब्रँडने देशभरात दिलेले योगदान पाहातच मी मोठा झालो आहे आणि त्यांच्या अत्याधुनिक अशा टीव्हीएएस एक्सएल १०० शी जोडताना मला अतिशय आनंद होत आहे. हा ब्रँड माझ्याइतकाच महाराष्ट्रात खोलवर रूजलेला आहे. टीव्हीएस मोटर कंपनी ही प्रतिष्ठित कंपनी असून विविध उत्पादनांच्या वारशासह कंपनी अत्युच्च दर्जा आणि खात्रीशीर ग्राहक समाधान देते. ब्रँडसोबतची ही भागिदारी समृद्ध करण्यासाठी मी उत्सुक आहे.’
टीव्हीएएस एक्सएल १०० श्रेणीमध्ये टीव्हीएएस एक्सएल १००, टीव्हीएएस एक्सएल १०० हेवी ड्युटी आणि नुकतेच लाँच केलेले टीव्हीएएस एक्सएल १०० हेवी ड्युटी आय टच स्टार्ट या तीन वाहनांचा समावेश होतो. या गाडीमध्ये आय- टच स्टार्ट या इलेक्ट्रिक स्टार्ट तंत्रज्ञानाचे स्टार्टर जनरेटर यंत्रणेसह एकत्रीकरण करण्यात आले आहे. टीव्हीएएस एक्सएल १०० ची पूर्ण श्रेणी वाजवी किंमत, आरामदायीपणा आणि बहुपयोगीपणासाठी प्रसिद्ध आहे.
टीव्हीएस पेटंट्स पेंडिंग -टीव्हीएस मोटर कंपनीबद्दल
आम्ही प्रतिष्ठित दुचाकी व तीन चाकी उत्पादक उत्पादक आणि सात अब्ज डॉलर्स टीव्हीएस समूहाची प्रमुख कंपनी आहोत. वाहतुकीद्वारे प्रगती साधण्यावर आमचा विश्वास आहे. ग्राहकांप्रती वाटणारा विश्वास, मूल्य, पॅशन आणि अचूकता यांचा शंभर वर्षांचा वारसा आम्हाला लाभला असून नाविन्यपूर्ण व टिकाऊ प्रक्रियेद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीची उच्च दर्जाची उत्पादने बनवताना आम्हाला अभिमान वाटतो. देशभरातील आमच्या ६० टच पॉइंट्सद्वारे ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यावर आमचा भर असतो. डेमिंग प्राइज मिळवणारी आमची एकमेव दुचाकी कंपनी आहे. आमची उत्पादने गेल्या चार वर्षांपासून जेडी पॉवर आयक्यूएस आणि अपील सर्वेक्षणातील संबंधित विभागात अग्रणी राहिली आहेत. सलग तीन वर्ष आमच्या कंपनीने जेडी पॉवर ग्राहक सेवा समाधान सर्वेक्षणात पहिले स्थान मिळवले आहे.
महावितरण उभारणार ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र
पहिल्या टप्यातील ५० विद्युत वाहन चार्जिंग केंद्राच्या कामाला गती
मुंबई :-भारत सरकारच्या धोरणाचे समर्थन करण्यासाठी महावितरणव्दारे भविष्यामध्ये विद्युत वाहनांचा वाढता वापर लक्षात घेता महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्याच्या प्रस्तावास तत्वतः मंजुरी मिळांली आहे.
महाराष्ट्र राज्याचे स्वतंत्र इलेक्ट्रीक व्हेहिकल प्रोत्साहनपर धोरण २०१८ तयार करण्यात आले असून याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी (मुंबई-४, ठाणे-६, नवी मुंबई-४, पनवेल-४, पुणे-१०, मुंबई-पुणे महामार्ग-१२ आणि नागपूर-१०) महावितरणतर्फे सदर प्रकल्प टप्प्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासाठीच्या निविदा अंतिम टप्प्यात असुन एक आठवडयात कार्यादेश देण्यात येणार आहे. नागपूर येथील अमरावती रोड उपकेंद्र आणि पुणे येथील पॅराडीगम उपकेंद्रांत प्रत्येकी एक फास्ट डीसी चार्जिंग केंद्र उभारण्यात आले असून ते लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.
एका विद्युत वाहन चार्जिंग केंद्रासाठी महावितरणला अंदाजे २ लाख ५० हजार रुंपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई वगळंता राज्यात विजेचा पुरवठा महावितरण करीत असल्याने महावितरणने राज्यात विविध ठिकाणी विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्याचे योजिले आहे.
विद्युत वाहन चार्जिंग केंद्र महावितरणच्या उपकेंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त जागेत उभारण्यात येणार आहेत. तसेच तेथे विद्युत वाहन चार्जिंग केंद्र हे फास्ट डीसी चार्जिंग केंद्र असणार आहे. या केंद्रात एका विद्युत वाहनास पूर्ण चार्जिंग करण्यासाठी अंदाजे ४५ मिनीट ते १ तास एवढा कालावधी लागणार आहे. विद्युत वाहन चालकांना प्रती युनिट ६ रुंपये दर टीओडी तत्वावर चार्जिंगसाठी आकारण्यात येणार आहे. तसेच रात्री २२.०० ते सकाळी ६.०० या कालावधीमध्ये वीज दरामध्ये १ रुंपया ५० पैसे एवढी सुटही देण्यात येणार आहे.
महावितरणच्या निविदा प्रक्रियांमध्ये नामांकित कंपन्यांचा प्रचंड प्रतिसाद
मुंबई :- ३१ मार्च २०१८ अखेर प्रलंबित असलेल्या कृषीपंप ग्राहकांना उच्चदाब वीज यंत्रणेतून वीजजोडणी मिळावी यासाठी महावितरणच्यावतीने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. या निविदा प्रकियेला देशातील नामांकित कंपन्यांनी प्रचंड सहभाग नोंदविला आहे.
राज्यातील कृषीपंप ग्राहकांना उच्चदाब वीज यंत्रणेतून वीजजोडणी देण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया यापूर्वी स्थानिक पातळीवर राबविण्यात आली. स्थानिकांना कामे मिळावेत या उद्देशाने ही निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती. परंतु स्थानिक कंत्राटदारांनी या कामासाठी जास्त मोबदला मिळावा म्हणून ही कामे स्वीकारली नाहीत. शेवटी महावितरणने या कामासाठी मोठ्या कंपन्यांना निमंत्रित केले.
आता नामांकित कंपन्यांनी या कामासाठी आपला सहभाग नोंदविला असून यात प्रामुख्याने टाटा प्रोजेक्ट, नागार्जुन कंन्स्ट्रक्शन कंपनी, एल अँड टी, होल्टास, अग्रवाल पॉवर कंपनी लि, भारत इलेक्ट्रिीकल्स अशा १६ कंपन्यांनी सहभाग नोंदविला आहे. ज्या ठिकाणी या प्रक्रियेला प्रतिसाद मिळालेला नाही. त्या ठिकाणीसुध्दा मोठ्या कंपन्यांना निमंत्रित करण्याचा महावितरणचा मानस आहे.
महावितरणच्या औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, नंदूरबार, धुळे व जळगाव या मंडलांतील कामे फूल टर्नकी तत्वावर करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता ५ ते ८ निविदा महावितरणला प्राप्त झाल्या आहेत. नामांकित कंत्राटदारांच्या सहभागामुळे आता उच्चदाब वीज यंत्रणेतून शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याच्या कामाला गती मिळणार आहे.
भिलारेंच्या घरी ‘गौराई’ न अनुभवलेली पंढरीची वारी(व्हिडीओ)
अजय अतुलच्या लई भारी गाण्यानं देखाव्याच्या भक्तिरसात भरले रंग ..
पुणे-मराठी माणूस आणि भक्तीभाव यांचं पिढीजात घट्ट असं भावनिक नातं आहे जे अनेक उत्सवात पहायला मिळतं.आणि जिथं भक्ती भावना असते ..किंवा श्रद्धा असते तिथे ..ईश्वराचा वावर असतो म्हणतात . काही असो ..पण मराठी माणसाच्या श्रद्धेचं असंच एक दर्शन कात्रज जवळील भिलारे वाडीच्या ज्ञानेश्वर उर्फ माऊली अर्जुन भिलारे यांच्या घरी प्रत्येक वर्षी गौराई च्या वास्तव्याच्या काळात घडतं.
देव भावनांचा भुकेला आहे असंही म्हणतात … आणि त्याच भावना इथे प्रत्येकाच्या ठायी दिसतात . भिलारे यांचे संपूर्ण कुटुंब तसेच भाऊ ,बहिण, भाचे अशी सारी मंडळी या भक्ती भावनेच्या रसात तल्लीन होऊन यंदा गौराइंच्या स्वागतासाठी भिलारे परिवाराने ‘चला पंढरीसी जाऊं रखमादेवीवरा पाहूं’ वारसा पंढरीच्या पायी वारीचा’ हा हलता देखावा साकारला.पियुषा कातुरे ,नितीन भिलारे ,किरण कातुरे
यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या देखाव्यात दिवे घाट ,गोल रिंगण ,चंद्रभागा नदी सुरेखपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे .विशेष म्हणजे या साऱ्या कुटुंबाच्या भक्ती भावनेन आकारास आलेल्या या देखाव्यात अजय अतुल च्या ..’लई भारी ‘ मधील , माऊली ..माऊली ..या गाण्यानं तर अप्रतिम रंग भरले आहेत . पहा हा देखावा व्हिडीओ स्वरूपात ….
खासदार काकडेंचा गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपर्क जोरात; दुचाकीवरून भ्रमंती…
पुणे, दि. 19 : गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत राज्यसभा खासदार व भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी खडकवासला, पर्वती आणि कसबा विधानसभा मतदार संघ अक्षरश: पिंजून काढला आहे. या भागातील गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. खासदार काकडे पुणे लोकसभा मतदार संघातून इच्छुक असून, गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी मतदार संघातील संपर्क जोरदार वाढविला आहे.गणेशत्सवामुळे अपेक्षीत गर्दी लक्षात घेऊन आणि वाहतूक कोंडीतून मार्ग काढून जास्तीत जास्त मंडळांना भेटी देता याव्यात म्हणून खासदार संजय काकडे यांनी दुचाकीवर प्रवास केला. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही दुचाकीवर निघाले. त्यामुळे खासदार काकडेंची एंट्री दुचाकींच्या ताफ्यासह झाली.
खासदार काकडे यांनी रविवारपासून शहरातील बिबवेवाडी, मार्केटयार्ड, सहकारनगर, महर्षीनगर, मुकुंदनगर, धनकवडी, पर्वती, टिळक रोड, सदाशिव पेठ व नवी पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, नारायण पेठ, शनिवार, मंडई, कसबा, बुधवार, गणेश, नाना पेठ आदी भागांतील बहुतांशी मंडळांना भेटी देण्यास सुरुवात केली. दोन दिवसांत खडकवासला, पर्वती व कसबा मतदार संघ खासदार काकडे यांनी पिंजून काढला.
गणेश भक्तांमधील उत्साह, गणेश मंडळांकडून केलेली सजावट, आरास आणि पोलीस व स्वयंसेवकांनी राखलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळे गणेशोत्सवाचा उत्तम पद्धतीने आनंद नागरिकांना घेता येत आहे. गणेशोत्सव म्हणजे भक्तीचा उत्सव. या काळात सगळीकडे आनंद व समाधान असते. यावेळी गणेशोत्सवाचे हे उत्साही रुप पाहिल्याचे खासदार संजय काकडे यांनी सांगितले. तसेच, सर्वांना सुखी आणि माझ्या अन्नदात्या शेतकऱ्यांवरील संकट दूर करून त्यांच्या जीवनातही सुखाचे दिवस येऊ देत, अशी प्रार्थनाही त्यांनी गणराया चरणी केली.
गणेशोत्सवानिमित्त अनेक जुन्या मित्र परिवाराला भेटता आले, सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देता आल्या याचा आनंद व समाधान खूप असल्याच्या भावना खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केल्या.
खासदार काकडे यांनी भेटी दिल्या तेव्हा नगरसेवक धीरज घाटे, खडक सार्वजनिक मंडळाचे संजय बालगुडे, बाबु गेणु मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब मारणे, केसरीवाडा गणपतीचे रोहित टिळक, नगरसेवक शंकर पवार, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, नगरसेविका सरस्वतीताई शेंडगे, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड गणेशोत्सव मित्र मंडळाचे सचिन पायगुडे, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, श्री गणेश तरुण मंडळ बिबवेवाडीचे अध्यक्ष प्रितम नागापुरे, श्री सिद्धीविनायक मित्र मंडळ चिंतामणीनगरचे विश्वनाथ पवार, श्री गणेश मित्र मंडळ बिबवेवाडीचे नवनाथ बढे, संजीवनी मित्र मंडळ सहकारनगरचे संजय विद्धवांस, अंकुश मित्र मंडळ इंदिरानगरचे राकेश पावटेकर, साईनाथ प्रतिष्ठान अप्परओटाचे सचिन महाडिक, अष्टविनायक मित्र मंडळ धनकवडीचे प्रतीक पलांडे, अखिल इंदिरानगर मित्र मंडळ बिबवेवाडीचे सूर्यकांत फडतरे, अरण्येश्वर अखिल तावरे कॉलनी मित्र मंडळचे गणेश लगस, साने गुरुजी मित्र मंडळ सदाशिव पेठ, हमालनगर मित्र मंडळ मार्केटयार्डचे बाळासाहेब मारणे, आंबेडकरनगर मित्र मंडळचे सिकंदर दुधाणे, स्टेट बँकनगर मित्र मंडळचे विकी लोहकरे, साईनाथ प्रतिष्ठान बिबवेवाडीचे अशोक गवळी, अखिल सुपर रहिवासी संघ इंदिरानगरचे विशाल दारवटकर, सुवर्ण मित्र मंडळ अप्पर सुपरचे सचिन मारणे, आलिशान मित्र मंडळ धनकवडीचे पप्पू घोलप, अखिल लक्ष्मीनगर शाहू वसाहत मित्र मंडळचे अनिल जाधव, लक्ष्मीनगर रहिवासी संघ गणेशोत्सवचे राजाभाऊ सावंत, साई मित्र मंडळचे ओंकार भोसले, लक्ष्मीनगरचा लालबाग राजाचे निलेश जाधव, अष्टविनायक मित्र मंडळचे अभिजीत सस्ते, शिवाजी चौक मित्र मंडळाचे बाळासाहेब आगळे, श्री मंगल सार्वजनिक गणेशोत्सवाचे विष्णू हरिहर, जोत्याची तालीम मंडळाचे प्रकाश गवळी, विजय शिवाजी तरुण मंडळाचे महेंद्र जैन, शनिपार मिञ मंडळाचे शेखर साळुंखे, गुरुवर्य जगोबादादा वस्ताद तालिमचे रविंद्र किरवे, हसबनीस बखळचे अशोक हसबनिस, मुंजाबाचा बोळचे विवेक भिलारे, रामेश्वर मिञ मंडळाचे मंगेश बिबवे, वनराज मित्र मंडळाचे वनराज आंदेकर, बाल मित्र तरुण मंडळाचे मनिष साळुंखे, गरुड मंडळ आदी मंडळाचे मान्यवर उपस्थित होते.
अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल
मराठी, हिंदी चित्रपटामध्ये आपण अनेकदा आयटम सॉंग बघितले आहे, त्यात अनेक नृत्यांगना, सुंदर अभिनेत्री डान्स करताना दिसतात क्वचित प्रसंगी अभिनेत्यांनी आयटम नंबर केल्याचे बॉलीवूड मध्ये उदाहरणे आहेत. मात्र तुम्ही कधी ‘भाईटम सॉंग’ बघितले आहे का? प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे भाईटम सॉंग आहे, नुकतेच ते सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले असून नेटकऱ्यानी मोठ्या प्रमाणावर पसंती देत व्हायरल केले आहे.
अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स आहेत.
आयटम सॉंगच्याच धर्तीवर बनलेल्या भाईटम सॉंगची खासियत म्हणजे यात शहरातील सगळ्यात मोठ्या भाईचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशीच्या जल्लोषावर आधारलेले हे गाणे आहे, त्यामुळे या गाण्यास खास भाई स्टाईल डान्स बघायला मिळतो.
आजवर प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत पण या भाईटम सॉंगच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांचा डान्स चाहत्यांना दिसणार आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले असून नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे. आजवर अतिशय सौम्य शब्दांची गाणी लिहिणाऱ्या प्रणीत कुलकर्णी यांनी ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे गीत लिहिले असून आदर्श शिंदे यांनी अफलातून गायले आहे.
चित्रपटातील हे गाणे मनोरंजन करणारे असले तरी ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर भाष्य करताना महानगर आणि लगतच्या गावातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव मांडणारा व वास्तववादी स्थिती मांडणारा आहे.
राधिकाचा जीव धोक्यात
गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं’ असं म्हणत जवळपास २ वर्षांपूर्वी सुरु झालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, ‘स्वावलंबी’ राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी ‘नखरेल’ शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला ‘बिचारा’ गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे.
नुकतंच मालिकेत नवीन शनायाची एंट्री झाली आणि त्यामुळे मालिका अजूनच रंजक बनत चालली आहे. शनाया राधिकाचा बदला घेण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत आहे. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि शनयाच्या अशाच एका चालीमुळे राधिकाच्या अपघात झाला. राधिका शनायामुळे तिच्या जीवाला मुकणार का? तर आगामी भागात प्रेक्षक पाहू शकणार आहेत कि राधिका तिच्या अपघातामुळे कोमामध्ये जाणार आहे आणि त्यामुळे राधिकाच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे. आता कुठे राधिकाच्या एक यशस्वी उद्योजिकेच्या प्रवासाला सुरुवात झाली होती पण त्याला देखील शनायाने ग्रहण लावलं. आता राधिकाच्या गैरहजेरीत तिच्या ऑफिसचं कामकाज कोण पाहणार? राधिकाच्या अपघातामुळे शनायाला तिच्या वागण्याचा पश्चाताप होणार का? गुरुनाथला खरंच त्याच्या चुकांची जाणीव होऊन तो राधिकाच्या काळजी घेणार का? हे पाहणं रंजक ठरेल.
विक्रांत आणि ईशाच्या प्रेमाची एक नवी सुरुवात?
झी मराठी वरील नवीनच सुरु झालेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका सध्या तुफान गाजतेय. सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. विक्रांत सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी ईशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आहे. हे दोघे कसे भेटतात, त्यांची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीचं प्रेमात कधी रुपांतर होतं हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की एकीकडे ईशाला तिच्या मनात विक्रांतसाठी असलेल्या भावनांची जाणीव झाली आहे पण दुसरीकडे तिची आई तिचं लग्न बिपीन टिल्लूशी लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी ती विक्रांतना ईशाला समजवायला सांगते पण विक्रांतचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरतात. ईशा विक्रांतसमोर तिच्या मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करते पण विक्रांत तिला नकार देतो आणि तिला बिपिनशी लग्न करायचा सल्ला देतो. प्रेक्षक आगामी भागात पाहू शकणार आहेत की ईशाच्या वडिलांची नोकरी जाणार आहे आणि त्यामुळे निमकर कुटुंबावर आर्थिक संकट ओढवणार आहे. त्यामुळे ईशाची आई तिला बिपिनला होकार देण्याची गळ घालते आणि ईशाकडे दुसरा काहीच पर्याय नसल्यामुळे ती त्याला होकार देणार आहे. त्यामुळे विक्रांत आणि ईशाच्या प्रेमकहाणीचं पुढे काय होणार? ईशा विक्रांतला विसरणार का? विक्रांतला ईशाबद्दलच्या त्याच्या मनात असलेल्या भावनांची जाणीव होणार का की त्याला जाणीव होई पर्यंत बिपीन आणि ईशाचं लग्न होणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.








