Home Blog Page 3063

‘सुजान आणि कर्तव्यदक्ष व्हा, आपल्या बालकांचे संपुर्ण लसीकरण करून घ्या’

0

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनातर्ङ्गे शाळेतून सर्व विद्यार्थ्यांना देण्यात रूबेला व गोवर या रोगाच्या प्रतिबंधक लसीकरणाविषयी पालकांमध्ये जागृती व्हावी व पालकांच्या सर्व शंकांचे निरसन व्हावे यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले. शाळेत आयोजित पालक सभेसाठी पालकांनीही जागरूकपणे व उत्स्ङ्गर्त सहभाग घेतला. शाळेतील बहुसं‘य पालक सभेसाठी उपस्थित होते.
कार्यक‘माच्या सुरूवातीला शाळेच्या माननीय मु‘याध्यापिका सौ. कल्पना वाघ यांनी सर्व पालकांचे स्वागत केले व पालकांनी दिलेल्या उत्स्ङ्गूर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले. रूबेला लसीकरण बालक निरोगी राहण्यास उपयुक्त आहे. बालक निरोगी राहिले तर शाळेत १००% उपस्थित राहून प्रगत होईल म्हणून आपण सर्वजन या मोहिमेत सहभागी होऊया असे आवाहनही त्यांनी पालकांना केले. कमला नेहरू शासकीय रुग्णाल्यातील वैद्यकीय अधिकरी डॉक्टर श्रीमती उज्वल मेश्राम यांनी पालकांना रूबेला आजाराविषयी माहिती दिली. या आजाराच्या प्रतिबंध लसीकरण्याचे ङ्गायदे, बालकांना त्याचा होणारा ङ्गायदा, लसीकरणाविषयी घ्यावयाची काळजी याची सविस्तर व उपयुक्त अशी माहिती त्यांनी पालकांना दिली. तसेच पालकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. यावेळी हॉस्पिटलच्या डॉक्टर मीना नाईक यांनी बालकांचा आहार-विहार, निरोगी मानसिक स्वास्थ्य याविषयी पालकांना मार्गदर्शन केले.
कार्यक‘मासाठी शालासमिती अध्यक्ष डॉक्टर सुनील भंडगे यांचे  मार्गदर्शन लाभले. सौ योगिता भावकर यांनी कार्यक‘माचे सूत्रसंचालन केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक सौ तनुजा तिकोने, श्री धनंजय तळपे उपस्थित होते.

स्वयम् प्रकल्पांतर्गत अंडी उत्पादन

0

राज्य शासनाने 27 एप्रिल 2017 च्या शासन निर्णयान्वये राज्याच्या 16  आदिवासी जिल्ह्यात 104 एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात स्वयम् प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाच्या 22 कोटी 55 लक्ष 75 हजार रुपयांच्‍या  खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प सन 2017-18 ते 2019-20 या तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

सन 2017-18 या आर्थिक वर्षात प्रकल्पासाठी रक्कम रु. 7 कोटी 70 लक्षचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. त्यातून राज्याच्या 8 जिल्ह्यातील 39 मदर युनिट्स कार्यान्वित करण्यात आली. या मदर युनिट्स धारकांना आणि त्या अंतर्गत प्रत्येकी 417 लाभार्थ्‍यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती विकास अभियान (उमेद) कडे सोपविण्यात आली.  सन 2017-18 मध्ये रायगड जिल्ह्यातील 2 मदर युनिट्समध्ये पक्षी संगोपनास प्रारंभ झाला.

सन 2018-19 या आर्थिक वर्षात प्रकल्पासाठी 5 कोटी 60  लक्षचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून 5 जिल्ह्यातील 26 मदर युनिट्ससाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. आतापर्यंत 11 जिल्ह्यातील 51 मदर युनिट्समध्ये पक्षी संगोपन सुरु  करण्यात आले आहे. सध्या एकूण 97 हजार 40 सुधारीत देशी प्रजातीच्या एक दिवसीय पिलांचे संगोपन सुरु आहे तर आतापर्यंत चार आठवडे वयाच्या 1 लक्ष 16 हजार 250 पिलांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सातत्याने वाढ होत जाणार आहे.

रायगड जिल्ह्यात  मार्च 2018 मध्ये पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आलेल्या पक्ष्यांपासून अंडी उत्पादनास प्रारंभ झाला आहे. उर्वरित 10 जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील पिलांपासून आगामी तीन ते चार महिन्यात अंडी उत्पादनास सुरुवात होईल. या अंड्यांचे संकलन व विपणन महिला व बाल विकास विभागामार्फत करण्याचे योजनेत निश्चित करण्‍यात आले आहे. त्यानुसार अंगणवाड्यांतील बालकांना पूरक पोषण आहारांतर्गत अंडी वाटप करण्यात येणार आहेत. या बाबीच्या अंमलबजावणीमध्ये महिला व बाल विकास विभागाचा नोडल सहभाग महत्‍त्वपूर्ण आहे.

पहिल्या टप्प्यातील पिलांच्या वाटपापासून 16 आठवड्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लाभार्थींनी प्रत्येकी 15 याप्रमाणे चार आठवडे वयाची पिले आणि त्यानंतर 16 आठवड्यानंतर तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील प्रत्येकी 10 पिले अशी एकूण प्रत्येकी 45 पिले वाटप करण्यात येणार आहेत. लाभार्थ्‍यांना त्यांना देण्यात आलेल्या पक्ष्यांच्या अंड्यापासून अंडी उबवणूक करुन त्यांच्याकडील पक्षी संख्या वाढवून या परसातील कुक्कुटपालनाचा चरितार्थाचे निरंतर साधन म्हणून विस्तार करावा, यासाठी लाभार्थींना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

जिल्‍हा माहिती कार्यालय, पुणे

शीघ्र व्हावे राममंदिर,यावं रामराज्य – संघाच्या भागवतांचा दगडूशेठ ला अभिषेक (व्हिडीओ)

0
पुणे : महागणपतीच्या आशिर्वादाने रामराज्य प्रस्थापित व्हावे आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे व कोणताही उशीर न होता पूर्णत्वास यावे, असे साकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गणरायाचरणी अभिषेकातून घातले. दगडूशेठ गणपती मंदिरात येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती असे सांगत गणरायाकडे जे मागितले, ते त्यालाच माहित आहे, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे ट्रस्टच्या १२६ व्या वर्षी मंदिरामध्ये मोहन भागवत यांनी सदिच्छा भेट देत गणरायाची आरती आणि अभिषेक केला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, हेमंत रासने, महेश सुर्यवंशी, सुनिल रासने, डॉ.बाळासाहेब परांजपे, प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सुर्यवंशी, यतीश रासने, उल्हास भट, राजेंद्र घोडके, रा.स्व.संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह महेश करपे, किशोर येनपुरे आदी उपस्थित होते.
सकाळी ठिक १० वाजता भागवत यांचे गणपती मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सभामंडपात सुरु असलेल्या अभिषेकादरम्यान त्यांनी गणरायाची सर्वसामान्यांना सुख, शांती, समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली. अभिषेकाचे पौरोहित्य करणा-या मिलींद राहुरकर गुरुजांनी केलेल्या मंत्रपठणाला साथ देत भागवत यांनी राममंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी प्रार्थना केली. त्यानंतर महाआरती व भागवत यांना स्मृतीचिन्ह देऊन ट्रस्टतर्फे सन्मानित करण्यात आले. ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत गणपती सदन या ट्रस्टच्या इमारतीला भेट देऊन ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहितीही भागवत यांनी घेतली.
* मंदिर हे आत्मसाधना व लोकसेवेचे केंद्र व्हावे : मोहन भागवत

श्री विघ्नहर्त्याच्या उपासनेतून कष्ट, विघ्न दूर व्हावेत, संस्कार करावेत अशा प्रकारच्या औचित्यपूर्ण दिशेने चाललेले दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कार्य पाहून आनंद वाटला. समाजाची धारणा करणारा धर्म हाच आहे. आत्मसाधना व लोकसेवा या दोन्हींचे परिपूृर्ण केंद्र यातून आपले मंदिर बनावे असा लेखी शुभेच्छा संदेश त्यांनी अभिप्राय म्हणून गणपती सदन येथे दिलेल्या भेटीदरम्यान दिला.

महापालिकेला लावला ७ हजार कोटीचा चुना …(व्हिडीओ)

0

पुणे-सुमारे ३ वर्षात महापालिकेने  एलबीटी च्या ७ ते ८ हजार कोटीच्या उत्पन्नावर पाणी सोडले काय ? असा प्रश्न निर्माण करणारी अभ्यासपूर्ण सरबत्ती काल कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी येथे मुख्य सभेत केली . पाण्याची टंचाई , पाटबंधारेला अन्य प्रकल्पाचे ६५ कोटी वळविण्याचा प्रस्ताव तत्पूर्वी या गोष्टीकडे बागवे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले . आणि महिनाभरात , म्हणजे पुढच्या महिन्यात प्रशासनाने यावर खुलासा करावा असेही आवाहन दिले .त्यांनी दिलेल्या लेखी प्रश्नांवर प्रशासनाने लेखी माहिती दिलेली आहे मात्र त्यावर चर्चा आज होणार नाही पुढच्या महिन्यात होईल असे महापौरांनी सांगितले यावेळी प्रशासनाने अपुरी माहिती दिल्याचा आरोप करत हे आव्हान दिले आहे ,
पहा नेमके बागवे यांनी काय म्हटले आहे .

पाटबंधारेने नाक दाबताच पालिकेने दिले ६५ कोटी (व्हिडीओ)

0

 -दिवाळीनंतर प्रत्यक्षात पाणीकपात –
पुणे- गेल्या 6 वर्षापासून महापालिकेकडे खडकवासला पाणीपुरवठा प्रकल्पातून घेण्यात येणाऱ्या पाण्याच्या बिलापोटी ची थकीत रक्कम किती याचा वाद प्रलंबित असताना , पाणी कपातीची तलवार टांगती ठेऊनच नाक दाबून आज पालिकेकडून ६५ कोटी रुपये पाटबंधारे खात्याला मिळविण्यात यश आले . जायका प्रकल्पासाठी केलेल्या ६५ कोटीच्या तरतुदीतून हि रक्कम वर्ग करून पाटबंधारेला देण्याचा प्रस्ताव आज महापालिकेच्या मुख्य सभेत भाजपने बहुमताच्या जोरावर संमत केला . यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने हि रक्कम पाणी पट्टीची बड्या बड्या उद्योगांकडून येणे असलेली सुमारे १०० कोटीची थकबाकी वसूल करवून द्यावी अशी मागणी केली होती .मात्र भाजप आणि सेनेने ती धुडकारून लावत हा प्रस्ताव मंजूर केला .
दरम्यान कालवा फुटीनंतर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पालिका रोज 1 हजार 350 एमएलडी पाणी घेत आहे. सध्या पाणी कपात नाही. मात्र दिवाळीनंतर रोज एकवेळ पाणी पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे, अशी माहिती पाणी पुरवठयाचे अधिकारी प्रविण गेडाम यांनी दिली ,ते म्हणाले, कालवा फुटीनंतर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पालिका रोज 1 हजार 350 एमएलडी पाणी घेत आहे. सध्या पाणी कपात नाही. दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळित होईल. मात्र दिवाळीनंतर रोज एकवेळ पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. पाणी पुरवठयाबाबत उदया सर्वपक्षनेत्याची बैठक बोलविली आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.
कॅन्टोन्मेंट जलशुध्दीकरणकेंद्राला गळतीमुळे जास्त पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे पर्वती जलशुध्दीकरण केंद्राला पाणी पुरवठा कमी होतो. पर्वती ते कॅन्टोन्मेंट जलकेंद्रादरम्यानची 2 हजार 200 मिलीमीटर व्यासाची बंदिस्त पाईपलाईनचे काम नोव्हेबर अखेर पर्यत पूर्ण होणार आहे. त्यामुळे पाण्याची गळती थांबणार आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी प्रविण गेडाम यांनी सांगितले.
यावेळी पाणी कपातीचा धाक दाखवून ,टांगती तलवार ठेऊन ,ब्लॅकमेल करून सरकार पालिकेकडून पैसे उकळीत असल्याची तक्रार दिलीप बराटे ,चेतन तुपे ,अविनाश बागवे ,अरविंद शिंदे आदींनी केली .
सुरुवातीला ३५२ कोटी येणे आहे असे पाटबंधारे ने कळविले नंतर आक्षेप घेतल्यावर हि रक्कम १५४ कोटीवर आली .आणि आता त्याहूनही थकीत रक्कम कमी आहे असा दावा पालिका प्रशासनाने केल्याने हा वाद प्राधिकरणाकडे प्रलंबित आहे. पण सध्या यावर निर्णय लागेपर्यंत ६५ कोटी घ्या आणि शांत बसा असे धोरण स्वीकारत हा प्रस्ताव आणण्यात आला . या साठी जायका प्रकल्पासाठी केलेली तरतूद वर्ग करण्यात आली . शहराच्या पर्यावरणासाठी जायका प्रकल्प महत्वाचा असून , पाटबंधारेला द्यायचेच आहेत तर ,पाणीपट्टी पोटी बड्या उद्योगांकडून पालिकेला येणे असलेली सुमारे १०० कोटीची रक्कम वसूल करा आणि ती द्या ,पण ३ वर्षापासून प्रलंबित असलेल्या जायका चे पैसे वर्ग करू नका अशी भूमिका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली . दरम्यान सर्व पक्षातील नगरसेवकांकडून, एकीकडे पाणीकपातीची तलवार पाटबंधारे ठेवत असल्याने रोष व्यक्त करण्यात आला. तर थकीत रकमेचा योग्य हिशेब लावावा अशी मागणीही करण्यात आली . तर सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी ,थकबाकी द्यायचीच आहे ,जायका साठी ठेवलेले ६५ कोटी मार्च अखेरपर्यंत खर्च होणे शक्य नसल्याने हि रक्कम वर्ग करून देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आणि हि रक्कम दिल्याने जायका प्रकल्पाच्या कोणत्याही कामावर परिणाम होणार नाही जानेवारीत जायका च्या कामाला गती येईल असे ते म्हणाले .

पाणी रे पाणी ..नव्या सभागृहात हुंकार कायम ..(व्हिडीओ)

0

पुणे- पावसाळा संपतो ना संपतो तोच ,कालवा फुटीच्या निमित्ताने पुणेकरांच्या पाण्यावर झालेला हल्ला ..किती दिवस ,कुठपर्यंत, कसे  पुणे पचवेल .. याची चिंता करावी अशी स्थिती महापालिकेच्या नव्या  सभागृहात तरी वारंवार दिसते आहे. कालवा फुटी आणि पुणेकरांना देण्यात येणारे पाणी यांचा प्रत्यक्षात तसा काही संबध नसला .. तरी पाटबंधारे खात्याने फर्मान काढले आणि पाणी कपातीची टांगती तलवार ..आज ना उद्या पुणेकरांच्या माथ्यावर कोसळणार हे ऑक्टोबर मध्येच स्पष्ट झाले . अनेक आंदोलने ,झाली, बैठका झाल्या ..आणि प्रत्यक्षात पाणी मिळत नसल्याच्या तक्रारीही सभागृहात सातत्याने मांडल्या जाऊ लागल्या … आज देखील पुन्हा पाणी रे पाणी … च सभागृहात निनादले …पहाच एकदा हा व्हिडीओ रिपोर्ट ….

‘संवाद’ कार्यकर्ता दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न.

0

पुणे-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व
पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीच्या वतीने दोन दिवसीय ‘संवाद’ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे
आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाची
विचारधारा व महत्व याची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी
दिल्लीहून आलेले  राजीव साहू, विनोद नायर, लेखा नायर, चैतन्य रेड्डी या
वेगवेगळ्या तज्ञांनी दोन दिवस मार्गदर्शन केले. काँग्रेसचा इतिहास, स्वातंत्र्यानंतर भारत
बनविण्यात काँग्रेसची भूमिका, काँग्रेसची विचारधारा नेते आणि धोरण आणि इतर
विचारधारा यांची तुलना, भारतीय विकासामध्ये काँग्रेसचे योगदान सध्याचे राजकीय
आव्‍हान व संधी, धर्मनिरपेक्षता आणि सांप्रदायिक राजकरण, संवाद कौशल्य आणि
व्‍यक्तिमत्व विकास या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन करून सर्वांशी संवाद साधला.
आज राज्याचे माजी सहकार मंत्री  हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे प्रवक्ते  सचिन
सावंत, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा  चारूलता टोकस यांनी राज्य सरकारचे अपयश,
काँग्रेसचे ६० वर्षातील योगदान आणि महिलांचा सहभाग या विषयावर कार्यकर्त्यांबरोबर
संवाद साधला. त्यानंतर सर्व शिबीरार्थींना महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल
यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके वाटण्यात आली.
यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे व पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष
सचिन साठे यांनी सर्व शिबीरार्थींचे व मार्गदर्शक तज्ञांचे आभार मानले. शिबीराचे
सूत्रसंचालन ॲड. निलेश बोराटे यांनी केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुणे विमानतळावर स्वागत

0

पुणे दि. २२ : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज वायुसेनेच्या विमानाने पुणे येथील लोहगाव विमानतळावर आगमन झाले.

यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद उपस्थित होत्या.

पुणे येथील सिंबायोसिस विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभास उपस्थित राहण्यासाठी पुण्यात राष्ट्रपती महोदय यांचे आगमन झाले.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, एअर कमोडोर के.व्ही.एस. नायर, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुष्प देवून राष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.

‘भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गुरु शिष्याचं नातं’

0

पुणे-भाजपा शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला झुकतं माप देताना दिसते आहे कारण त्यांच्यात गुरु शिष्याचं नातं आहे असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिरुरमधल्या शेतकरी मेळाव्यात लगावला. शरद पवारांचं बोट धरून आपण राजकारणात आलो असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं त्याचाच समाचार घेत उद्धव ठाकरेंनी ही टीका केली. तसेच २०१४ मध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या तेव्हा राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा जाहीर करून शिवसेनेची गोची केली होती. त्याचाही राग उद्धव ठाकरेंच्या मनात आहेच हे दाखवणारेच हे वक्तव्य आहे. शिरुरमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थापाडे म्हणत त्यांच्या आश्वासनांना काहीही अर्थ नसतो असे म्हटले आहे.

२०३० पर्यंत सगळ्यांना घरं मिळतील असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. म्हणजे तुम्हाला तोपर्यंत यांना निवडून द्यावं लागणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त खोटं बोलता येतं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यातील सलगीबद्दलही त्यांनीही टीका केली आहे. भाजपा आणि शिवसेना हे खरे तर सत्तेतले मित्रपक्ष आहेत मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. त्याचाच प्रत्यय उद्धव ठाकरेंच्या भाषणातूनही आला.

राष्ट्रवादीची मला काळजी वाटते आहे, आजूबाजूला दुष्काळ पडतो आहे, तेव्हा राष्ट्रवादीवाल्यांना धरणाच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका असं म्हणत अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याची आठवणही त्यांनी करून दिली. राफेल कराराला नेमका विरोध आहे की पाठिंबा ते काकांना विचार असा टोलाही अजित पवारांना त्यांनी लगावला.

दुष्काळ जाहीर करण्यास चंद्रकांत पाटील मुहूर्ताची वाट का बघताय ? : अजित पवार

पुणे-यंदा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीमध्ये आला आहे. मात्र, भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील हे 31 ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करू असे सांगतात. दुष्काळ जाहीर करण्यासाठी चंद्रकांत पाटील हे मुहूर्ताची वाट का बघतायेत, अशा शब्दांमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी अजित पवार म्हणाले की,देशातील अनेक राज्यांनी दुष्काळ जाहीर केला असताना, हे सरकार एवढा वेळ का लावत आहे ? यातून या सरकारची मानसिकता दिसत आहे. यंदा भूजल पातळी खाली गेली असून त्यामुळे जलयुक्त शिवाराची कामे कशाप्रकारे झाली असतील हे कळतं. जलयुक्त शिवाराबाबत केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणारी शिवसेना भाजपावर टीका करतेय. सत्तेमध्ये असून भाजपावर टीका करणे योग्य नाही, भाजपा आणि शिवसेना दोन्ही पक्ष राज्यातील परिस्थितीला जबाबदार आहेत. अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी भाजपा आणि शिवसेनेवर सडकून टीका केली.

ते पुढे म्हणाले की,शेतकऱ्यांच्या मालास हमी भाव मिळाला पाहिजे,दूधाला चांगला भाव मिळाला पाहिजे या मागण्यांची दखल सरकारने घेतली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्यसरकारने दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील नेहरू मेमोरियल हॉल ते विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्य सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी अजित पवार यांनी राज्यातील अनेक प्रश्नांवर भूमिका मांडली.

‘जीएसटी’च्या यशात सीए, कर सल्लागार महत्वाचा- राजेश पांडे

0
पुणे : “गेल्या सव्वा वर्षाच्या काळात वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (रेरा) या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी बऱ्याच अंशी यशस्वी झाली आहे. यामध्ये लेखापाल (सीए) आणि कर सल्लागार यांनी घेतलेली मेहनत महत्वाची आहे. या दोन्ही कायद्यात काही अडचणी येत आहेत. त्यासाठी येत्या काळात त्यामध्ये सुधारणा करून जीएसटी अधिक सुलभ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे प्रतिपादन केंद्रीय जीएसटी विभागाचे अतिरिक्त महासंचालक राजेश पांडे यांनी केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे विभाग व दि वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशर्न्स असोसिएशन (डब्ल्यूएमटीपीए) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ’जीएसटी आणि रेरा’ या विषयावरील ‘ज्ञानसंगम 2018’ या  एक दिवसीय परिसंवादाच्या उद्घाटनावेळी राजेश पांडे बोलत होते. पुणे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी आयसीएआय पुणेच्या उपाध्यक्षा व ‘ज्ञानसंगम-2018’च्या प्रमुख समन्वयक सीए ऋता चितळे, ‘डब्ल्यूएमटीपीए’चे माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, अध्यक्ष नवनीतलाल बोरा, ‘आयसीएआय’चे सचिव राजेश अग्रवाल, खजिनदार अभिषेक धामणे, ऍड. मिलिंद भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेश पांडे म्हणाले, “जीएसटी आणि रेरा या कायद्यांत सतत बदल करावे लागत आहेत. हे बदल स्वीकारून कर सल्लागार, सीए आणि करदाते यांनी एकत्रितपणे यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत. राज्य आणि केंद्र सरकारतर्फे अशा संस्थांना बरोबर घेऊन जीएसटीतील बदलांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जावा. कर भरणाऱ्यांनी वेळेत कर भरावा. आधी दिरंगाई होते आणि मग तारखा वाढवून द्याव्या लागतात. त्याचा अतिरिक्त ताण यंत्रणेसह सगळ्यांवरच पडतो.”
“कर सल्लागारांनी करदात्याच्या सगळी दुःखे आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना उद्योग वृद्धीसाठी लक्ष केंद्रित करण्यास वेळ द्यावा. त्यासाठी कायद्यातील बदलांचे ज्ञान आपण घेऊन त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी. येत्या काळात सर्वांकडून अभिप्राय मागवून जीएसटीमध्ये आणखी बदल केले जातील. जेणेकरून जीएसटी ‘गुड अँड सिम्पल टॅक्स’ बनेल आणि करप्रणाली अधिक सुकर होईल,” असेही त्यांनी नमूद केले.
परिसंवादात जीएसटी व रेरा यासंदर्भातील नवीन कायदे समज गैरसमज, यादरम्यान येणारा मानसिक ताणतणाव यावर मार्गदर्शन सत्रे झाली. यामध्ये सीए केल्विन शहा यांनी ‘वार्षिक कर परतावा आणि जीएसटी ऑडिट’, ज्ञानवत्सल स्वामी यांनी ‘ताणतणाव व्यवस्थापन’, तर ऍड. रतन शामल यांनी ‘रेरा : पुनर्विकासातील अडचणी’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चासत्रात ऍड. मिलिंद भोंडे, ऍड. अभय बोरा, सीए प्राजक्ता शेट्ये-देव व सीए यश नागर यांनी सहभाग घेतला.
नवनीतलाल बोरा यांनी आपले विचार मांडले. नरेंद्र सोनावणे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए ऋता चितळे यांनी परिसंवादाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. ऍड. मिलिंद भोंडे यांनी आभार मानले.

 

ओयो लिव्हिंगद्वारे भारतातील तरुणांसाठी सादर केले दीर्घकालीन दर्जेदार हौसिंग

0
  • बजेट मिडसेग्मेंट हॉस्पिटॅलिटी श्रेणींमध्ये सर्वात लोकप्रिय ब्रँड म्हणून स्थान निर्माण केल्यानंतर, ओयो दीर्घकालीन हौसिंग रेंटल श्रेणीमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज
  • राहण्याच्या दृष्टीने भारतीयांची पसंती मिळवण्याचे उद्दिष्ट, तरुण तरुण प्रोफेशनलना राहण्याचा पहिलावहिला, पूर्णतः व्यवस्थापित असलेला सुरळीत, दीर्घकालीन अनुभव देण्यापासून सुरुवात करणार
  • या पूर्णतः व्यवस्थापित ओयो मालमत्ता खात्रीचे उत्पन्न, मालमत्तेचे दर्जेदार अपग्रेडेशन दखभाल यांची खात्री देतात, तसेच मालमत्ता मालकांना मनःशांती देतात

 

नवी दिल्ली, ऑक्टोबर 22, 2018: ओयो या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या व जगातील झपाट्याने वाढत्या हॉटेल, घरे व राहण्याची दर्जेदार सुविधा यांच्या साखळीने दीर्घकालीन, पूर्णतः व्यवस्थापित हौसिंग रेंटल श्रेणीमध्ये प्रवेश केल्याचे आज जाहीर केले आहे – ओयो लिव्हिंग भारतातील तरुणांना व वाढत्या लोकसंख्येला माफक दरामध्ये उत्कृष्ट वास्तव्याचा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. भारतातील हौसिंगविषयक बदलत्या गरजांसाठी अतिशय समर्पक असलेले, ओयो लिव्हिंग वास्तव्याची पहिलीवहिली, पूर्णतः व्यवस्थापित, आरामदायी, अत्यंत दर्जेदार सुविधा उपलब्ध करणार आहे. या सुविधेमुळे, घर शोधणे, उपलब्ध होणे व दररोज सांभाळणे, यासाठीचा त्रास कमी केला जाणार आहे. ओयो लिव्हिंगमधील सर्व रहिवाशांना शेअर्ड स्पेसेसचा फायदा मिळेल, तसेच त्यांना आर्थिक स्वातंत्र्यही उपभोगता येईल, यामुळे ही राहण्याची सुविधा शोधण्यासाठी आणि त्यामध्ये राहण्यासाठी अतिशय सोपी आहे. यामार्फत ओयोनो दीर्घकालीन हौसिंग रेंटल्स व अॅकॉमोडेशन बिझनेसमधील आघाडीचा ब्रँड बनण्याचे, तसेच भारतातील सर्वात मोठा हौसिंग पुरवठादार बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दाखल करत असताना, ओयो लिव्हिंगमध्ये नोएडा, गुरगाव, बेंगळुरू व पुणे येथे 35+ लाइव्ह प्रॉपर्टी व त्यामध्ये 2000 हून अधिक बेड्स असतील आणि त्या प्रामुख्याने तरुण व युवा प्रोफेशनल यांच्या दृष्टीने निर्माण केल्या जातील. सध्या कार्यरत असलेल्या बहुतांश मालमत्ता पूर्णतः भरलेल्या असून, ओयो लिव्हिंगने 2019 पर्यंत 10 प्रमुख मेट्रोंमध्ये विस्तार करायचे आणि 50,000 हून अधिक बेड उपलब्ध करायचे ठरवले आहे.

याविषयी बोलताना, ओयो हॉटेल्स अँड होम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संस्थापक रितेश अग्रवाल म्हणाले, “भारतामध्ये सातत्याने नावीन्य आणण्याचे वास्तव्याचा जागतिक दर्जाचा अनुभव निर्माण करण्याचे आमचे आश्वासन ओयो लिव्हिंगमुळे प्रत्यक्षात साकारले जाणार आहे. संपादन व्यवस्थापन, परिवर्तन, ऑपरेशन्स, उत्पन्न व्यवस्थापन, आणि ऑनलाइन ऑफलाइन या दोन्ही माध्यमातून वितरण या बाबतीत आमच्याकडे कौशल्य असलेल्या बजेट मिडसेग्मेंट हॉस्पिटॅलिटीमध्ये ओयो हा ब्रँड अतिशय लोकप्रिय असून, त्यामुळे आम्हाला पुढील वाटचाल करण्यासाठी मोठी मदत झाली आहे. आज, ओयो लिव्हिंग दाखल करून आम्ही नवी सुविधा देण्यासाठी, तसेच राहण्यासाठी उत्कृष्ट सुविधा निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट पाळण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे. ग्राहकांकडून आणि मालमत्ता भागीदारांकडून आम्हाला मिळालेल्या प्रतिसादाच्या मागणीच्या अनुषंगाने ओयो लिव्हिंग ही संकल्पना मांडण्यात आली आहे. आमच्या दृष्टीने ही प्रचंड मोठी संधी आहे आणि आम्ही पहिलावहिला पूर्णतः व्यवस्थापित वास्तव्याचा अनुभव देण्यासाठी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील आमच्या समृद्ध अनुभवाचा लाभ घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच, आज दाखल केलेली ही सुविधा म्हणजे, भारतातील सर्वात मोठा हौसिंग पुरवठादार होण्याच्या, या श्रेणीतील नावीन्य साकारणारा आघाडीचा ब्रँड म्हणून आमचे स्थान निर्माण करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या आमच्या वाटचालीतील हा महत्त्वाचा मैलाचा टप्पा आहे.

2018 या वर्षाच्या मध्यात प्रायोगिक तत्त्वावर सादर झालेले, ओयो लिव्हिंग रहिवाशांना पूर्णतः व्यवस्थापित स्वतंत्र निवासी घर उपलब्ध करते. त्यामध्ये काँट्रॅक्टिंग, फर्निशिंग, स्वच्छता, देखभाल व इन-स्टे सेवा यांचा समावेश आहे. प्रत्येक सुविधेमध्ये वाय-फाय कनेक्टिविटी, टीव्ही, नियमित हाउसकीपिंग, पॉवर बॅक-अप, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स व 24/7 केअरटेकिंग अशा सुविधा समाविष्ट केल्या आहेत. रहिवाशांना नेहमी ओयो सपोर्ट उपलब्ध असणार आहे व त्यासाठी मासिक भाड्यापेक्षा जास्त कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. दर महिना दर बेड 7999 रुपयांपासून सुरुवात असलेले, ओयो लिव्हिंग रहिवाशांना ब्रोकरेज, लॉक-इन कालावधी यावर बचत करण्यासाठी मदत करेल, तसेच घर शोधण्याचा त्रासही वाचवला जाईल. यामुळे नवीन ठिकाणी राहायला जात असताना आवश्यक असलेली मदतही केली जाईल.

ओयो लिव्हिंगविषयी बोलताना, ओयो हॉटेल्स अँड होम्सचे चीफ ग्रोथ ऑफिसर कविकृत यांनी सांगितले, कामानिमित्त बाहेर असताना घरी राहिल्याप्रमाणे राहण्याचा अनुभव मिळण्याची अपेक्षा असलेल्या तरुणांच्या गरजा विचारात घेऊन ओयो लिव्हिंग सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-2018’ महोत्सवाचे आयोजन

0

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-2018’ या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन आणि दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद या महोत्सवात होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार, दि. 25 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता भोसलेनगर येथील अ‍ॅग्रिकल्चर कॉलेजच्या मैदानावर केंद्रीय उद्योग मंत्री गिरीराज सिंग यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी खासदार अमर साबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कुलगुरु पंडित वसंतराव गाडगीळ, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहतील. शनिवार, 27 ऑक्टोबर व रविवार, 29 ऑक्टोबर 2018 या दोन दिवशी परिषद होणार असून, देशभरातील जवळपास 1000 उद्योजक या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.

दि. 25 ऑक्टोबर रोजी मुख्य उद्घाटन सोहळ्यानंतर सकाळी 11.00 राज्यस्तरीय ब्राह्मण महिला मेळावा आयोजिला आहे. यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, अभिनेत्री मृणाल देव, आमदार मनिषा कायंदे, शोभाताई फडणवीस, सिम्बायोसिसच्या संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर महिला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 4.00 वाजता वकिल आघाडीचा मेळावा होणार आहे. त्यासाठी निवृत्त न्यायाधीश व्यंकटेश्वरैय्या, अ‍ॅड. दादासाहेब बेंद्रे, अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांच्यासह न्याय व विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील.

दि. 26 ऑक्टोबर 2018 रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व इतर सलग्नित संस्थांच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांचे अधिवेशन व ‘समाजभूषण’ पुरस्कारांचे वितरण होणार आहे. दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन शनिवार, दि. 27 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्या हस्ते, तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, माजी खासदार तरुण विजय, श्रीकांत भारतीय, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, नीलम गोर्‍हे, अनंत गाडगीळ, माधुरी मिसाळ आदी उपस्थित असणार आहेत.

परिषदेचा समारोप रविवार, दि. 28 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी 4.00 वाजता गोविंदगिरी महाराज आणि खासदार अमर साबळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उद्योजक अशोक देशपांडे यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार, तर विद्या मुरकुणबी, संतोष पांडे, रमणाचार्य हैदराबाद, राध्येशाम जयमिनी, सुभाष तिवारी यांना ‘उद्योगभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या परिषदेमध्ये विविध चर्चासत्र होणार आहेत. त्यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. व्यवसायाच्या संधी, अर्थसहाय्य, व्यवस्थापन, व्यवसायातील आव्हाने आणि संधी, कर व्यवस्थापन अशा विविध विषयांवर तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत. दि. 29 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत राज्यस्तरीय ब्राह्मण एकत्रिकरण मेळावा आयोजिला आहे. तसेच ‘सन्मान, सहकार्य व संरक्षण’ या त्रिसूत्रीवर चर्चा होणार असून, यासाठी डॉ. गोविंद कुलकर्णी, वा. ना. उत्पात, श्री गोवर्धनजी शर्मा, मोरेश्वर घैसास गुरुजी, अशोक बोडस यांच्यासह ब्राह्मण चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अशी माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, उद्योग आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र जोशी, प्रवक्ता संदीप खर्डेकर, प्रदेशाध्यक्ष उदय महा व जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारूड सांगणाऱ्या तात्यांवर प्रेक्षकांचा जडला जीव

0

– अरूण नलावडेंनी साकारलेल्या दर्जेदार भूमिकांमध्ये भेटी लागी जीवातल्या तात्यांची भर

–  भेटी लागी जीवातल्या तात्यांवर प्रेक्षकांचा जडला जीव

-रंगकर्मी अरूण नलावडेंच्या दर्जेदार भूमिकांमध्ये तात्यांची भर

 

सोनी मराठी वाहिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केलंय आणि याचे एकमेव कारण म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील मनोरंजक मालिका. या वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय होतं आहेत आणि प्रत्येक मालिकेत एक नाविन्य, वैशिष्ट्य आहे. त्यापैकी ‘भेटी लागी जीवा’ या मालिकेचे वैशिष्ट्ये म्हणजे या मालिकेतील कलाकार आणि कथा. ३ पिढ्या आणि त्यातील प्रमुख पुरुष मंडळी यांच्या नात्यावर आधारित कथा मांडून सोनी मराठीने एक उत्तम मालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे. ३ पिढ्या, त्यांचे स्वभाव, त्यांची मतं, त्यांचा एकंदर वावर याच्या अवती-भवती फिरणारी ‘भेटी लागी जीवा’ची कथा खूप सुंदर पध्दतीने मांडली जात आहे. आणि ही कथा तितक्याच सुंदर पध्दतीने यातील ३ पिढ्यांतील प्रमुख पुरुष पात्र साकारणारे कलाकार अरुण नलावडे (तात्या), समीर धर्माधिकारी (विकास) आणि श्रेयस राजे (विहंग) यांनी पडद्यावर सादर केली आहे.

एकापाठोपाठ एक दर्जेदार भूमिका करणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरूण नलावडे तात्यांच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या पात्राचं वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी भारूडाचे कार्यक्रम करणाऱ्या तात्यांच्या वाणीत ऐकू येणाऱ्या ओव्या आणि त्या ओव्यांभोवती गुंफलेलं तात्यांचं आयुष्य. डिजे-रिमिक्स च्या या काळात गवळण, भारूड, भजन, किर्तनसारखे शब्द कानावर पडणं दुर्मिळचं. मात्र सध्या सोनी मराठीवर सुरू असलेल्या या मालिकेच्या निमित्ताने कानी पडणारे हे शब्द प्रेक्षकांना खूपच भावत आहेत. त्यात तात्यांकडून या एकंदर नाट्याला मिळणारी भारूडाची जोड कौतुकास्पद आहे. केवळ भारूड किंवा किर्तनच नाही तर अरूण नलावडे म्हणजेच तात्यांना दिलेले संवाद ही तितक्याच ताकदीचे आहेत. हल्लीच्याच एका भागात, ” आशिर्वादाला ओझं समजून परत करायला आले की काय…” म्हणणाऱ्या तात्यांचे संवाद भाव खाऊन जात आहेत. त्यात मालिकेच्या अनुशंगाने सादर होणारं भारूड प्रेक्षकांना आपल्या मुळांशी घट्ट जोडून ठेवत आहे.

भारूडाशी जोडलेली तात्यांची पिढी, बिझनेस हेच सर्वस्व समजणारा मध्यमवयीन विकास आणि तारूण्याशी नुकतीच ओळख झालेला तरूण म्हणजे विहंग.  मुलगा-वडील-नातू अशी ही तीन पिढी, त्यांच्यातील पुरेसा नसणारा संवाद, भावना यावर आधारितल ‘भेटी लागी जीवा’ मालिकेतील या तिघांच्या नात्यामध्ये पडलेली दरी कशी भरत जाते हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  अरुण नलावडे, समीर धर्माधिकारी आणि श्रेयस राजे यांनी त्यांच्या भूमिका इतक्या चोख पार पाडल्या आहेत की ही कथा जणू आपल्या सभोवताली घडतेय असं वाटून प्रेक्षक मालिकेला मनापासून दाद देत आहेत.

आजोबा आणि नातू यांची योगायोगाने झालेली भेट प्रेक्षकांसाठी आनंददायी क्षण असेल पण त्यांच्या नात्याची खरी ओळख त्यांना कधी होईल हे जाणून घेण्यासाठी पण प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. आपल्या वडीलांना भेटवण्यासाठी जेव्हा विहंग तात्यांना घेऊन त्याच्या घरी जाईल तेव्हा काय घडेल अन् कसं घडेल हे पाहण्यासाठी बघत राहा ‘भेटी लागी जीवा’ सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता फक्त सोनी मराठी वर.

रिटेल व्यापाऱ्यांसाठी सहकारी सोसायटीची स्थापना होणार

0

रिटेल व्यापारी व ग्राहकांच्या फायद्यासाठी मालाची खरेदी एकत्रित करणार

पुण: पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने रिटेल सहकारी सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिटेल व्यापारातील परकीय गुंतवणूक आणि मॉलबरोबरील स्पर्धेत रिटेल व्यावसायिक टिकावा यासाठी ही सहकारी सोसायटी काम करणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

देशात 7 कोटी रिटेल व्यापारी आहेत. या व्यावसायिकांना रस्त्यावर आणण्याचे धोरण सध्याच्या केंद्र सरकारने घेतले आहे. रिटेल व्यापारात शंभर टक्के परकीय गुंतवणूक येणार असल्याने मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या यामध्ये उतरत आहेत. सुरुवातीच्या काळात तोट्यामध्ये धंदा करून पुन्हा मक्तेदारी निर्माण करण्याचे काम या मोठ्या कंपन्या करतात. जगभरात हाच अनुभव आलेला असताना भारत सरकार याच कंपन्यांसाठी सोयीचे निर्णय घेत आहे. आधीच मॉलच्या स्पर्धेत रिटेल व्यापारी अडचणीत सापडलेला असताना परकीय गुंतवणुकीचा निर्णय दुर्दैवी आहे. त्यामुळे रिटेल व्यापाऱ्याने एकत्र आले पाहिजे, एकत्रित खरेदी करून जास्तीत जास्त फायदा ग्राहकाला कसा देता येईल याचा विचार झाला पाहिजे. रिटेल सहकारी सोसायटी रिटेल व्यापाऱ्यांच्या भल्यासाठीच काम करेल, असेही निवंगुणे म्हणाले. यावेळी उमेश यादव उपस्थित होते.

रिटेल सहकारी सोसायटीच्या माध्यमातून रिटेल व्यापाऱ्यांना सभासद केले जाईल. सभासद असलेले रिटेल व्यापाऱ्यांची मागणी व त्यांच्याकडील विक्रीचा ताळेबंद करून मालाची एकत्रित खरेदी केली जाईल. एकत्रित खरेदी केल्याने कमी किंमतीत माल व वस्तु मिळतील. आणि या वस्तु ग्राहकांना पूर्वीच्या तुलनेत कमी किंमतीत विकता येतील. यातून मॉल व ऑनलाइन व्यावसायिकांच्या स्पर्धेत रिटेल व्यापारी टिकू शकतो. तेच काम ही रिटेल सहकारी सोसायटी करणार आहे. यासंदर्भातील सर्व काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ही रिटेल सहकारी सोसायटी अस्तित्वात येईल. रिटेल व्यापाऱ्यांनी यासंदर्भात रिटेल व्यापारी संघाला संपर्क साधावा, असेही निवंगुणे यांनी सांगितले.