Home Blog Page 3060

राष्ट्रवादी- मनसे सलगी – प्रसिद्धी पण ‘गुप्तगू ‘नेमकी कशासाठी ? राजकारण निवडणुकीचे …

0

पुणे-औरंगाबाद-मुंबई दरम्यानच्या विमानप्रवासातील शरद पवार आणि राज ठाकरेंच्या भेटीने राजकीय वातावरण ढवळून निघाले  आहे. शरद पवार आणि राज ठाकरे यांची विमानात भेट झाल्याचा फोटो समोर येताच एकच राजकीय खलबते सुरु झाली पण त्यादिवशी विमानात त्यांच्यात आगामी निवडणुकांविषयी कोणती चर्चा झाली याबाबतचा तपशील अगर मुद्दे  समोर आलेले नाहीत .गेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या जादुई हवेने ,सर्व राजकीय पक्षांची धूळधाण उडवून भाजपला  ऐतिहासिक विजय मिळवून दिला . आता येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ..गेल्या वर्षाहून अधिक कालावधी पासून अर्थात शरद पवारांच्या या साऱ्या हालचाली सुरु असल्याचे सांगायला नको .पवार प्रसंगी शिवसेनेशी ,मनसे शी युती करू शकतात हे सारे सांगतील . जे पवार भाजपला राज्यात सत्तेवर बसविण्यासाठी मदतीला जाऊ शकतात ते राजकारणात कोणाशीही प्रसंगी युती आघाडी करू शकतात. पण या साऱ्या गोष्टी प्रसंगी च होतात . सध्या तरी त्यांची राजकीय हवामान घडविणे ,चाचपणी करणे, विरोधकांना संभ्रमात, बुचकळ्यात  टाकून ठेवणे अशा पद्धतीचे राजकारण सुरु असावे असे म्हरले जाते. एकीकडे भुजबळांना बाहेर काढल्यानंतर पुण्याचे दीपक मानकर चक्क मोका खाली आत जाणे हि बाब हि राजकीय मानली जाते . एकीकडे भाजप सत्तेवर असला तरी पवारांना थेट शह न देता ,त्यांचे बळ कसे कमी करता येईल हे पाहत असावा असे राजकीय समीक्षकांना वाटत असताना दुसरीकडे पवार देखील भाजपच्या विरोधात जमवा जमव करत आहेत  असे दिसते आहे .याच पार्श्वभूमीवर विमान प्रवासातील भेटीची प्रसिद्धी करायची पण तेथील चर्चेची गुप्तगू ‘गोपनीय ‘ ठेवली जात असावी असा कयास आहे .

विमान प्रवासात खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच राज्यमंत्री अर्जुन खोतकरांना विनंती केल्याने राज ठाकरे त्यांच्या सीटवर बसले होते. औरंगाबाद विमानतळाहून मुंबईकडे निघालेल्या विमानात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा ते त्यांच्या सीटवर बसत होते. राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्या सीट्स उजवीकडे बाजूबाजूला होत्या, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार तथा राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या सीट्स डावीकडच्या रांगेत बाजूबाजूला होत्या. विमानातील आपल्या सीटवर शरद पवार बसल्यावर त्यांच्या बाजूच्या सीटवर अर्जून खोतकर बसणार…एवढ्यात इतक्यात शरद पवार त्यांना म्हणाले, “तुम्ही (खोतकर) तिथे बसा, राजला इथे (माझ्या बाजूला) बसू द्या.”पवार यांच्या या बोलण्याचा मान राखत राज्यमंत्री खोतकर उजवीकडच्या रांगेत म्हणजे बाळा नांदगावकरांच्या बाजूला जाऊन बसले आणि त्यानंतर पुढच्या साधारण तास-दीड तासाच्या विमान प्रवासात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या गप्पा रंगल्या. पवार आणि ठाकरे यांच्या गप्पा सुरु असताना त्यात थोड़ा वेळ का होईना पण सहभागी होण्याचा मोह राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि मनसे नेता बाळा नांदगावकर यांनाही आवरला नाही. त्यासाठी सीट सोडून हे दोघे लोकल ट्रेनप्रमाणे विमानातही उभे राहिले होते.

कॉंग्रेसने मनसेला महाआघाडीत घेतले नाही पण राष्ट्रवादीकडून मनसे शी सलगी केली गेली  तर  पुणे जिल्ह्यात दौंड व खडकवासला विधानसभा मतदारसंघात  राष्ट्रवादीला निश्चित फायदा होऊ शकतो. जिल्ह्यातील अन्य मतदारसंघातही मनसे-राष्ट्रवादीला एकमेकांना लाभ होईल अशा प्रकारे कारभार होऊ शकतो. मनसेला जिल्ह्यातील एकमेव जागा मिळाली होती तर तिसऱ्या स्थानावर ३ मतदारसंघातील मते प्राप्त केली होती ती दुसरया स्थानावरील राजकीय पक्षाला पराभवाला कारणीभूत ठरलेली आहे तर ६ ठिकाणी चौथ्या स्थानावरील मनसेची मते देखील इतर पराभूत पक्षांच्या दृष्टीकोनातून प्रभावशाली आहेत.  मनसे ने २०१४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत केवळ 1 जागा जिंकली होती तर ६ ठिकाणी दुसरया क्रमांकाची तर 15 ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविण्यात आलेली होती. मोदींच्या लाटेत देखील २२ मतदारसंघात चांगली मते प्राप्त केलेली होती. मनसेला राज्यात एकूण ३.७ टक्के मते मिळाली होती. २००९ मध्ये १३ आमदार जिंकलेल्या मनसेला ५.७१ टक्के मते मिळाली होती. पाच वर्षांने मनसेची मते घट झालेली होती. राष्ट्रवादीने २०१४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत 41 जागा जिंकून ५६ ठिकाणी दुसरया क्रमांकाची तर ५१ मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविण्यात आलेली होती. एकूण १४८ मतदारसंघात प्रभावी मते प्राप्त केलेली होती. मनसे आणि राष्ट्रवादी मध्ये युती झाल्यास मनसेला २७ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मतांचा लाभ होईल तर राष्ट्रवादीला ३५ मतदारसंघात प्रभावी मतांचा लाभ होईल. कॉंग्रेसने मनसेला महाआघाडीत घेतले नाही तरी राष्ट्रवादी स्वत:च्या कोट्यातून पक्षांतर्गत काही मतदारसंघात  मनसेला फायदा  देऊ करेल. अशी शक्यता आहे. गेल्या ३ विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारामुळे इतर पक्षांना अप्रत्यक्षपणे फायदा मिळाला मात्र त्या लाभाचा मनसेला काहीही लाभ व राजकीय उपयोग झाला नाही. या अनुभवातूनच मनसेने जास्तीत जास्त आपल्या जनादेशाचा राजकीय लाभ घेऊन आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा उभारी घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मदत घेण्यास प्रयत्नशील आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेतल्यास भाजप (२७.८ टक्के), शिवसेना (१९.३ टक्के), काँग्रेस (१८ टक्के) तर राष्ट्रवादीला १७.२ टक्के मते मिळाली होती. या व्यतिरिक्त मनसेला ३.७ टक्के मते मिळाली होती. यानंतर बसपाला २.३ टक्के मते पडली होती. अन्य राजकीय पक्षांना एक टक्के किंवा त्यापेक्षा कमीच मते पडली आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला ०.९ टक्के मिळाली होती. शेकापच्या पारडय़ात एक टक्का मते पडली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाची अकोला, वाशीम या जिल्ह्यामध्ये चांगली ताकद आहे. राज्यातील छोटय़ा पक्षांच्या गेल्या दोन-तीन निवडणुकांच्या निकालांचा आढावा घेतल्यास मतांमध्ये फार काही फरक पडलेला नाही. २००९ मध्ये १३ आमदार जिंकलेल्या मनसेला ५.७१ टक्के मते मिळाली होती. पाच वर्षांने मनसेची मते घटली. बहुजन समाज पक्षाला २००४ मध्ये (४ टक्के), २००९ मध्ये (२.३५ टक्के) तर २०१४ मध्ये (२.३ टक्के) मते मिळाली आहेत.

‘टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियम’चे पुरस्कार जाहीर

0
के. व्यंकटेशम, डॉ. अजय चंदनवाले, गिरीजा ओक, राजेंद्र जगताप, डॉ. पंकज जिंदाल,
डॉ. शैलेश पालेकर आदी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते होणार सन्मानित
पुणे : टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदा पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, प्राप्तिकर आयुक्त आदर्शकुमार मोदी यांना प्रशासकीय सेवा, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले व हॅन्ड सर्जन डॉ. पंकज जिंदाल यांना आरोग्यसेवा, द लीला ग्रुपचे मोहित अगरवाल व नोवाटेल हॉटेलचे नितीन पाठक यांना उद्योग, संजीवनी मुजुमदार यांना शिक्षण, विजय मित्तल यांना समाजसेवा, डॉ. शैलेश पालेकर यांना रोटरी सेवा, अभिनेत्री गिरीजा ओक यांना अभिनय आणि साहिब दिलबाग सिंग यांना सराफा व्यवसायातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात येणार आहे. जानकी मल्होत्रा आणि नीलम पाटील यांचा विशेष सत्कार यावेळी केला जाणार आहे.
त्रिपुरा व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या शुभहस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. रविवार, दि. २८ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी ४.०० वाजता विमाननगर येथील हॉटेल नोवाटेलमध्ये शानदार सोहळ्यात हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. याप्रसंगी बाहरी बी. आर. मल्होत्रा,
सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्यासह लष्करप्रमुख, एएफएमसी, एनडीएचे कमांडर, पुणे व पिंपरीचे महापालिका आयुक्त, आयकर विभागाचे आयुक्त जिल्हाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती टीएमसीचे सचिव डॉ. जयसिंग पाटील यांनी दिली आहे.

तरुणांनी भवताल समजून घ्यावे- दादा इदाते

0
पुणे : “स्पर्धेच्या युगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा सर्रासपणे वापर केला जातो. तरुण पिढीला तंत्रज्ञानाची पूर्णतः माहिती असते, परंतु भवतालच्या घडामोडी, समाजातील प्रतिकूल परिस्थिती याबाबतही माहित असणे अपेक्षित आहे. त्यामुळे तरुणांनाही प्रत्येक गोष्टीतील सत्यता माहिती करून घ्यावी,” असे मत राष्ट्रीय विमुक्त जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकूजी उर्फ दादा इदाते यांनी व्यक्त केले.
 
घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रातील राजा रवी वर्मा कलादालनात जयहिंद परिवार आणि लाईफस्टार ग्लोबल रिसर्च फाउंडेशतर्फे आयोजित भारतदर्शन राष्ट्रीय महोत्सव २०१८ या दोन दिवसीय महोत्सवात  दादा इदाते बोलत होते. याप्रसंगी दिग्दर्शक निर्माते मुकेश कणेरी, अभिनेत्री देविका दफ्तरदार, चैताली चटर्जी, नृत्यांगना मधुमिता मिश्रा, सतीश खर्डे पाटील, संयोजक नारायण फड, नेहा जोशी, रिटा सेठिया, हसन शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या महोत्सवात दोन दिवसीय कला व हस्तकला प्रदर्शन आयोजिले असून, रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.
दादा इदाते म्हणाले, “जगात विविध प्रकारची बुद्धिमत्ता असलेली माणसे आहेत. त्यात वाईट माणसे सक्रिय व चांगली माणसे निष्क्रिय आहेत. त्यामुळे चांगल्या माणसांनी पुढाकार घेऊन सकारात्मक गोष्टींचा प्रसार केला पाहिजे. समाजातील गरजूना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम नारायण फड यांच्यासारखे करीत आहेत, याचे समाधान आहे. अशा कार्यक्रमातून वंचित घटकांतील लोकांनाही आपल्या कलेला विकसित करण्याची संधी मिळेल.”
देविका दफ्तरदार म्हणाल्या, “कला माणसाला जगायला शिकवते. देशभरातून अनेक ठिकाणाहून कलाकार येथे आले आहेत. त्यांच्या कला व त्यांच्याविषयी जाणून घेता आले. कलेचे महत्व ओळखून आपण एखादी कला जोपासली पाहिजे.” नारायण फड यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. रिटा सेठिया यांनी सूत्रसंचालन केले. नेहा जोशी यांनी आभार मानले.

टेनिस अजिंक्यपद 2018 स्पर्धेत एकेरीत भारताच्या सिद्धांत बांठियाला विजेतेपद थायलंडच्या मनचया सवांगकिइला दुहेरी मुकुट;

0

पुणे-एचसीएल पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या तर्फे आयोजित आणि आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात एकेरी गटात भारताच्या सिद्धांत बांठिया याने विजेतेपद संपादन केले. तर, मुलींच्या गटात थायलंडच्या मनचया सवांगकिइ हिने दुहेरी व एकेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात भारताच्या चौथ्या मानांकित सिध्दांत बांठीयाने आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसऱ्या मानांकित उझबेकिस्तानच्या सेर्गेय फोमीनने 6-1, 6-4 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना 1तास 5मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये सिद्धांतने सुरेख सुरुवात करत दुसऱ्याच गेममध्ये सेर्गेयची सर्व्हिस ब्रेक केली व  2-0अशी आघाडी घेतली. सामन्याच्या अखेरपर्यँत आपली आघाडी कायम ठेवत सिद्धांतने सहाव्या गेममध्ये सेर्गेयची पुन्हा एकदा सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-1असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसरा सेट फार रंगतदार ठरला. या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले व चौथ्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या त्यामुळे सामन्यात 2-2 अशी स्थिती निर्माण झाली. सिद्धांतने पुढच्याच गेममध्ये सेर्गेयची सर्व्हिस भेदली व आघाडी घेतली. सहाव्या गेममध्ये सिद्धांतने 15-30 असे गुण असताना दोन बिनतोड सर्व्हिस केल्या व स्वतःची राखत 4-2अशी आघाडी मिळवली. त्यानंतर सेर्गेयने पिछाडीवरून जोरदार पुनरागमन करत आठव्या गेममध्ये सिद्धांतची सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-4अशी बरोबरी साधली. पण आघाडीवर असलेल्या सिद्धांतने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत नवव्या गेममध्ये सेर्गेयची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-2असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. लक्ष्य-भारत फोर्ज यांचा पाठिंबा असलेला सिद्धांत हा  पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे आणि केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. यावेळी विजेतेपदानंतर आनंद व्यक्त करताना सिद्धांत म्हणाला कि, माझ्या कुमार गटांतील कारकिर्दीतील हा सर्वोत्तम विजय आहे. मला हि स्पर्धा जिंकायचीच होती. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मी सर्व सामने आत्मविश्वासाने खेळले असून डेक्कन जिमखाना येथील टेनिस कोर्ट हे माझ्या खेळाच्या शैलीशी सुसंगत ठरते. स्पर्धेतील उपांत्य व अंतिम फेरीच्या लढती माझ्यासाठी अटीतटीच्या होत्या. कारण दोन्ही खेळाडू अव्वल मानांकित खेळाडू होते. त्यामुळे माझ्यावर दडपण तर होतेच, पण त्याचबरोबर या कोर्टवर खेळण्याची सवय असल्यामुळे मी त्यानुसार माझा खेळ केला. 

मुलींच्या गटात अंतिम फेरीत थायलंडच्या तिसऱ्या मानांकित मनचया सवांगकिइने इंडोनेशियच्या चौथ्या मानांकित प्रिस्का मॅडेलिन नुगरोचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 6-3असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सामन्यात पहिल्या सेटमध्ये मनचयाने दुसऱ्या, चौथ्या व आठव्या गेममध्ये प्रिस्काची सर्व्हिस रोखली व हा सेट टायब्रेकमध्ये 7-6(5)असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मनचयाने अधिक भक्कम सुरुवात करत प्रिस्काची पहिल्या, तिसऱ्या व सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-3अशा फरकाने जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मनचया हि सुपाणबुरी स्पोर्ट्स शाळेत दहावी इय्यतेत शिकत असून  पिरॅमिड टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक योदचाई काँग कुंत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

एचसीएल कॅर्पोरेशनचे  धोरण व्यवस्थापकीय अधिकारी व शिव नादर फाउंडेशनचे सुंदर महालिंगम म्हणाले की, भारताचे टेनिस खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव नावलौकिकास आणत आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून पुढच्या पिढीला यश मिळवण्याकरिता आम्ही प्रोत्साहन देत आहोत. गेल्या काही वर्षांत एचसीएलने अनेक उपक्रम राबवून प्रतिभावान युवा खेळाडूंना सर्वोत्तम खेळ करण्यासाठी व खेळात सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. यापैकी काही खेळाडू भविष्यात आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील, अशी मला आशा आहे.
 
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, यावर्षीच्या एचसीएल आशियाई  टेनिस अजिंक्यपद 2018 स्पर्धा उत्तम पध्दतीने पार पडली याचा आम्हाला खूप आनंद झाला आणि मी विजेत्या, उपविजेत्या तसेच सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करतो. ही सन्माननीय स्पर्धा सलगद दोन वर्षे पुण्यात घेतल्याबद्दल सहकार्यासाठी एचसीएलचे आभार मानू इच्छितो आणि येत्या काही वर्षांमध्ये एचसीएलसह अनेक स्पर्धा आयोजित करण्याची आशा करतो. “

स्पर्धेतील एकेरीतील विजेत्या खेळाडूंना 280 आयटीएफ गुण व करंडक, तर उपविजेत्या खेळाडूंना 170 आयटीएफ गुण व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ऑलंम्पियन व आशियाई सुवर्णपदक विजेता दत्तू भोकनळ, एचसीएलचे सुंदर महालिंगम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा, स्पर्धा सुपरवायझर लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी: मुले:
सिध्दांत बांठीया(भारत)(4)वि.वि.सेर्गेय फोमीन(उझबेकिस्तान)(2)6-1, 6-4

मुली:
मनचया सवांगकिइ(थायलंड)(3)वि.वि.प्रिस्का मॅडेलिन नुगरो(इंडोनेशिया)(4)7-6(5), 6-3.

वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या गरोदर महिलेची डिलिव्हरी डॉकटर विद्या विजय माने यांनी केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान

0

पुणे-घोरपडी गाव येथे रेल्वे क्रॉसिंगजवळ वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या एका गरोदर महिलेची डिलिव्हरी डॉकटर विद्या विजय माने यांनी केल्याबद्दल स्वयंम सामाजिक संस्थेच्यावतीने त्यांना पुष्पगुछ देउन स्वयंम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दीप्ती पाटोळे व सामाजिक कार्यकर्ते अजय पाटोळे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले .

एका गरोदर महिलेला रेल्वे क्रॉसिंग करून दवाखाण्यात जायचे होते . परंतु रेल्वे गेट बंद असल्यामुले त्यांना रिक्षा त्याच ठिकाणी थांबबावी लागली त्यावेळीस त्या महिलेला वेदना सुरु झाल्या . त्यावेळी अचानक देवदुताप्रमाणे डॉकटर विद्या विजय माने या त्या गरोदर महिलेच्या मदतीला धावल्या . त्यांनी त्या महिलेची प्रसूती केली . आणि त्यातून त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला . डॉकटर विद्या विजय माने  यांच्या मदतीमुळे आईचे व तिच्या बाळाचे प्राण वाचले . त्याच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वयंम सामाजिक संस्थेच्यावतीने सन्मानित करण्यात आले . असे स्वयंम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दीप्ती पाटोळे व सामाजिक कार्यकर्ते अजय पाटोळे यांनी सांगितले .

ब्राह्मण समाजाने उद्योजकता विकासावर भर द्यावा- कलराज मिश्र

0
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे : “ब्राह्मण समाजाकडे ज्ञान आहे. जिद्द, चिकाटी यासारखे गुण आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, स्किल इंडिया यासारखे महत्वाकांक्षी उपक्रम राबविले आहेत. त्याचा लाभ घेत ब्राह्मण समाजाने उद्योजकता विकासावर भर द्यायला हवा. त्यासाठी समाजातील इतर उद्योजकांनी तरुणांना उद्योग क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित करावे,” असा सल्ला माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार कलराज मिश्र यांनी दिला.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘ब्रह्मोद्योग-२०१८’ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात ब्राह्मण उद्योजकांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी कलराज मिश्र बोलत होते. याप्रसंगी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, कुलगुरू पंडित वसंतराव गाडगीळ, परिषदेचे स्वागताध्यक्ष अमर साबळे, तेलंगणातील खासदार वेणुगोपाल आचार्य, उद्योग आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र जोशी, प्रदेशाध्यक्ष उदय महा, चितळे दूधचे नानासाहेब चितळे, बडवे इंजिनीअरिंगचे नानासाहेब बडवे, व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे, सुप्रिया बडवे, आर. जी. शेंडे, विवेक कोल्हटकर, संदीप खर्डेकर, महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे, शहराध्यक्ष मयूर अरगडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कलराज मिश्र म्हणाले, “कृषी आणि उद्योग यावरच देशाचा विकासदर अधिक प्रमाणात अवलंबून असतो. छोटे छोटे उद्योग सुरु करून समाज सक्षम बनेल. तरुणांनी नोकऱ्या मागणारे बनू नये, तर नोकऱ्या देणारे बनावे. बेरोजगारीवर स्वयंरोजगारी हाच उपाय असून, ज्ञान-कौशल्ये आत्मसात करत उद्योग करण्याचा आपला प्रयत्न असावा. गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर साधनसंपत्ती आहे. इनोव्हेटिव्ह कल्पना लढवून त्याचे उद्योगात रूपांतर कसे करता येईल, याचा विचार करावा.”
अमर साबळे म्हणाले, “विकासाची गंगा तळातल्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समाजाचे एकत्रीकरण होणे गरजेचे आहे. संविधानावर  विश्वास ठेवून काम करणारे सगळेच देशभक्त असून, महिलांचा, ज्येष्ठांचा सन्मान करण्याची परंपरा ब्राह्मण समाजाने जपली आहे. समाजाला संस्कारित करण्यासह रोजगारनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. अलीकडे ब्राह्मण समाजात उद्योजक वाढत आहेत, ही आनांदाची बाब आहे.”
गोविंद कुलकर्णी म्हणाले, “आपल्या समाजाला आरक्षण नको, तर संरक्षण मिळायला हवे. त्यासाठी संघटित होऊन समाजाच्या सक्षमीकरणासाठी आपण काम करणे गरजेचे आहे. व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी सरकारकडे आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली होती. परंतु, आपण आपल्या स्तरावर एकत्रित येऊन नवतरुणांना उद्योगासाठी प्रोत्साहित करायला हवे.”
श्रीकांत बडवे म्हणाले, “तरुणांनी पाच ‘आय’चा मंत्र पाळावा. त्यामध्ये ‘इंट्रोस्पेक्ट’ अर्थात आपल्या क्षमता ओळखून उद्योगात उतरावे. त्यात सतत सुधारणेला (इम्प्रुव्हमेंट) वाव असावा. नवनिर्मितीच्या (इनोव्हेशन) ध्यासातून चांगले काम उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच केवळ विचार करून थांबता कामा नये, तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी (इम्प्लिमेंट) होणे महत्वाचे असते. तसेच आपण करत असलेले काम समाजाला उपयुक्त (इंटिग्रेट) असावे.”
यावेळी ‘ब्रह्मोत्सव – २०१८’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. वेणुगोपाल आचार्य यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. उदय महा यांनी प्रास्ताविक केले.

जावेद मियादाद मवाली खेळाडू – सुनिल गावसकर

0

पुणे-भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणला, की संपूर्ण देशातील क्रिकेटप्रेमी हे टिव्ही समोर चिकटून बसतात. दोन्ही संघातील खेळाडूंमधल्या द्वंद्वाचीही या सामन्यांदरम्यान चांगलीच चर्चा होते. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी पाकिस्तानचे माजी खेळाडू जावेद मियादाद यांना ‘मवाली खेळाडू’ असं म्हटलं आहे. पुण्यात अथश्री फाऊंडेशनकडून सुनिल गावसकर यांचा आज जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुण्याच्या कलमाडी हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी गावसकरांची मुलाखत घेतली, यावेळी बोलत असताता गावसकरांनी आपल्या कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पाकिस्तानचे खेळाडू हे स्लेजिंग करण्यामध्ये माहिर होते. समोर कोणताही खेळाडू असला तरीही ते त्याला सोडत नसतं. जावेद मियादाद यामध्ये आघाडीवर असायचा. यावेळी सुनंदन लेले यांनी गावसकरांना तुम्हाला कोणत्या खेळाडूचा त्रास झाला असा प्रश्न विचारला. याला उत्तर देताना गावसरकरांनी मियादाद यांचं नाव घेतलं. “जावेद मियादाद हा माझ्या कारकिर्दीत मी पाहिलेला मवाली खेळाडू होता. सतत समोरच्या खेळाडूचं लक्ष विचलीत करण्यासाठी काही ना काही बोलत रहायचं हे त्याची सवय होती, आणि अनेकदा तो यात यशस्वीही व्हायचा.”

माझ्या कारकिर्दीचा शेवटचा कसोटी सामना मी पाकिस्ताविरुद्ध खेळलो. मात्र दुर्दैवाने आम्हाला या सामन्यात पराभव स्विकारावा लागला. यानंतर मला सामना गमावल्याचं प्रचंड दु:ख झालं होतं. पाकिस्तानी संघाचं ड्रेसिंग रुम आमच्या शेजारी होतं. त्यांच्या संघाचं अभिनंदन करण्यासाठी मी व माझे सहकारी त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये गेलो, त्यावेळी मियादादचं जंगी सेलिब्रेशन सुरु होतं. यावेळी जावेदने माझी माफीही मागितली. गावसकर यांनी भारत-पाकिस्तान सामन्यातील अनेक किस्से उलगडवून दाखवले.

टेनिस अजिंक्यपद 2018 स्पर्धेत उझबेकिस्तानच्या सेर्गेय फोमीन व थायलंडच्या मनचया सवांगकिइ यांना दुहेरी मुकुटाची संधी; भारताच्या सिद्धांत बांठियाचा अंतिम फेरीत प्रवेश

0

दुहेरीत मुलांच्या गटात क्रिस्टीन डीडीयर चिन व सेर्गेय फोमीन यांना, तर मुलींच्या गटात हिमारी सातो व मनचया सवांगकिइ यांना विजेतेपद

पुणे: एचसीएल पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या तर्फे आयोजित आणि आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात उझबेकिस्तानच्या सेर्गेय फोमीन व मुलींच्या गटात थायलंडच्या मनचया सवांगकिइ यांनी दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. 

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात भारताच्या चौथ्या मानांकित सिध्दांत बांठीयाने आपली विजयी मालिका कायम ठेवत अव्वल मानांकित कझाकस्तानच्या डॉस्टनबीके ताशबुलतावचा 6-2, 4-2असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. हा सामना 59मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये सिद्धांतने आक्रमक खेळ केला. या सेटमध्ये चौथ्या व सहाव्या गेममध्ये डॉस्टनबीकेची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-2असा सहज जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या डॉस्टनबीकेला अखेरपर्यँत सूर गवसला नाही. सामन्यात 2-1अशी स्थिती असताना सिद्धांत याने बॅकहँड व फोरहँडचे सुरेख फटके लावत 4थ्या गेममध्ये डॉस्टनबीकेची सर्व्हिस भेदली व 2-2 अशी बरोबरी साधली. त्यानंतर सिद्धांतने आपली सर्व्हिस राखली व 6व्या गेममध्ये पुन्हा डॉस्टनबीकेची सर्व्हिस रोखली. सामन्यात 4-2अशा सिद्धांत आघाडीवर असताना डॉस्टनबीकेला दुखापत झाल्यामुळे त्याने सामना सोडून दिला. यावेळी सिद्धांत म्हणाला कि, सामन्याच्या सुरुवातीला माझ्यावर दडपण होते. पण पहिला गेम जिंकल्यानंतर माझा आत्मविश्वास दुणावला व डॉस्टनबीकेने केलेल्या चुकांचा फायदा घेत सामन्यात विजय मिळवला.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दुसऱ्या मानांकित उझबेकिस्तानच्या सेर्गेय फोमीनने तिसऱ्या मानांकित कोरियाच्या सीओन याँग हनचा 6-4, 6-3असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना 1तास 15मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये फोमीनने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत सीओन याँग हनची 6व्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-4असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये फोमीनने चतुराईने खेळ करत सीओन याँग हनची 6 व 8व्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3असा जिंकून विजय मिळवला. अंतिम फेरीत भारताच्या सिद्धांत बांठियासमोर उझबेकिस्तानच्या सेर्गेय फोमीनचे आव्हान असणार आहे.

मुलींच्या गटात उपांत्य फेरीत थायलंडच्या तिसऱ्या मानांकित मनचया सवांगकिइने हाँग काँगच्या अव्वल मानांकित वांग हाँग यी कोडीवर टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-2  असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. हा सामना 1तास 45मिनिटे चालला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत थायलंडच्या आठव्या मानांकित मई नपात निरुदोर्नने चौथ्या मानांकित इंडोनेशियाच्या प्रिस्का मॅडेलिन नुगरोचा 2-6, 6-3, 6-0असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 2तास 3मिनिटे चालला.

दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात मलेशियाच्या क्रिस्टीन डीडीयर चिन व उझबेकिस्तानच्या सेर्गेय फोमीन यांनी भारताच्या देव जावीया व मन शहा यांचा 7-6(7-5), 6-3 असा पराभव  करून विजेतेपद संपादन केले. मुलींच्या गटात जपानच्या हिमारी सातो व थायलंडच्या मनचया सवांगकिइ यांनी जपानच्या साकी इमामुरा व थायलंडच्या पुन्नीन कोवापिटुकटेड यांचा7-5, 6-3असा पराभव करून विजेतेपद पटकावले. दुहेरीतील विजेत्या खेळाडूंना 210 आयटीएफ गुण तर उपविजेत्या खेळाडूंना 130 आयटीएफ गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एचसीएलचे रजत चदोलीया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा, स्पर्धा सुपरवायझर लिना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी: मुले: 

सिध्दांत बांठीया(भारत)(4) वि.वि.डॉस्टनबीके ताशबुलताव(कझाकस्तान)(1)6-2, 4-2सामना सोडून दिला;

सेर्गेय फोमीन(उझबेकिस्तान)(2)वि.वि.सीओन याँग हन(कोरिया)(3)6-4, 6-3;

मुली:
मनचया सवांगकिइ(थायलंड)(3)वि.वि.वांग हाँग यी कोडी(हाँग काँग)(1)7-6(4), 6-2 1तास 45मिनिटे
मई नपात निरुदोर्न(थायलंड)(8) वि.वि.प्रिस्का मॅडेलिन नुगरो(इंडोनेशिया)(4)2-6, 6-3, 6-0

दुहेरी: अंतिम फेरी: मुले
क्रिस्टीन डीडीयर चिन(मलेशीया)/ सेर्गेय फोमीन(उझबेकिस्तान)(3) वि.वि.
देव जावीया(भारत)/मन शहा(भारत)7-6(7-5), 6-3;

दुहेरी गट: अंतिम फेरी- मुली
हिमारी सातो(जपान)/मनचया सवांगकिइ(थायलंड)वि.वि.साकी इमामुरा(जपान)/पुन्नीन कोवापिटुकटेड(थायलंड)7-5, 6-3.

टाटा कन्सलटन्सी सर्विसेसच्या ५०व्या वर्षपूर्ती सोहळ्यातील अनोख्या कर्मचारी स्पर्धेत जगभरातून २००,००० सहभागी

0

मुंबई टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (BSE: 532540, NSE: TCS), या आघाडीच्या जागतिक आयटी सेवा, कन्सल्टिंग आणि बिझनेस सोल्युशन पुरवठादार कंपनीने त्यांच्या ‘बिलियन स्टेप्स चॅलेंज’ या उपक्रमाला विक्रमी प्रतिसाद लाभल्याची घोषणा केली आहे. या उपक्रमात जगभरातील २००,००० सहभागींची नोंद झाली आणि त्यात एकूण ३ बिलियन पावलांची नोंद करण्यात आली. २.४ दशलक्ष किमी. हून अधिक अंतर यात एकत्रितरित्या कापले गेले. म्हणजेच, चंद्रावर जाऊन परत येता येईल अशा तीन फे-या किंवा सहा वेळा पृथ्वीप्रदक्षिणा किंवा गुरूभोवती साडेपाच फे-या.

टीसीएसचा ‘बिलियन स्टेप्स चॅलेंज’ म्हणजे कंपनीने कर्मचा-यांना सहभागी करून घेण्यासाठी आखलेला सर्वात मोठा उपक्रम आहे. टीसीएसची पन्नास वर्षे साजरी करण्यासाठी संपूर्ण संस्थेत राबवण्यात आलेल्या टीसीएस५० या कार्यक्रमाचा हा भाग आहे. अधिक व्यापक प्रमाणात बोलायचे झाल्यास, ‘बिलियन स्टेप्स’ म्हणजे उत्साहची अभिव्यक्ती आणि #OneTCSचा भाग म्हणून सर्व टीसीएस कर्मचा-यांनी एकत्र येणे. एका खास अॅपमध्ये लाखो पावलांची नोंद करण्यासाठी टीसीएसचे कर्मचारी वैयक्तिक स्वरुपावर आणि ग्रुपसोबत चालण्यासाठी, धावण्यासाठी बाहेर पडले. या कंपनीतच बनवण्यात आलेल्या अॅपमुळे कर्मचा-यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता. कारण ‘बिलियन स्टेप्स’ उपक्रमातील त्यांच्या सहभागाची अगदी मिनिटाला मिनिटाला त्यांना माहिती मिळत होती. अवघ्या काही दिवसांतच कंपनीने लाखोंचा टप्पा गाठला आणि शेवटच्या दिवशी ३ बिलियनवर आपण पोहोचलो, याची रीअल टाइम माहिती अॅपमधून मिळत असल्याने कर्मचा-यांना फारच आनंद होत होता. २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या काळात राबवण्यात आलेल्या या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद लाभला. ४८ देशांमधील २००,००० हून अधिक टीसीएस कर्मचा-यांनी यात सहभागी होत ठरवलेल्या लक्ष्याच्या ३०० टक्के अधिकचा टप्पा गाठला.

टीसीएसच्या ग्लोबल ह्युमन रीसोर्सेसचे ईव्हीपी आणि प्रमुख अजोय मुखर्जी म्हणाले, ”जगभरात विविध ठिकाणी असलेले आमचे कर्मचारी या एका ध्येयाच्या पूर्ततेसाठी एकत्र आले ही बाब म्हणजे #OneTCSच्या उत्साहाचे, त्यातील तत्वांचे प्रतिक आहे. या प्रकारच्या कर्मचा-यांना सहभागी करून घेणा-या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे टीसीएस ही एक प्रगतीशील व काम करण्याचा आनंद देणारी कंपनी ठरते आणि त्यामुळेच जगभरातील उत्कृष्ट प्रतिभेला ही कंपनी आकर्षून घेते आणि आपल्यासोबत जोडूनही घेते. जगभरातून टीसीएसमधील एकवाक्यतेचा हा स्वर म्हणजे टीसीएसच्या ५० वर्षांच्या प्रवासातील एक मैलाचा टप्पा आहे.”

 टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडविषयी (टीसीएस)

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही एक आयटी सेवा, कन्सल्टिंग आणि व्यवसाय सोल्युशन्स कंपनी असून गेल्या पन्नास वर्षांत कंपनीने जगातील अनेक मोठ्या व्यवसायांशी त्यांच्या रूपांतरणाच्या प्रवासात भागीदारी केली आहे. टीसीएस एक कन्सल्टिंगवर आधारित, आकलनाचा आधार असलेल्या आयटी, व्यवसाय व तंत्रज्ञानात्मक सेवांची एकात्मिक श्रेणी तसेच इंजिनीअरिंग सेवा देऊ करते. या सेवा दिल्या जातात कंपनीच्या अनोख्या स्थान स्वतंत्र वेगवान डिलीव्हरी प्रारूपाच्या माध्यमातून. सॉफ्टवेअर विकासातील सर्वोत्कृष्टतेचा मापदंड म्हणून या प्रारूपाला मान्यता आहे.

भारतातील सर्वांत मोठ्या बहुराष्ट्रीय व्यवसाय समूहाचा, टाटा समूहाचा भाग असलेल्या टीसीएसकडे ४६ देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण लाभलेले ४००,०००हून अधिक कन्सल्टण्ट्स आहेत. कंपनीचा ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील एकत्रित महसूल १९.०९ बिलियन डॉलर्स होता. कंपनी भारतातील बीएसई (पूर्वीचा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजः आणि एनएसई (नॅशनल स्टॉक्स एक्स्चेंज) यांच्या सूचीत समाविष्ट आहे. टीसीएसने हवामान बदलाविषयी घेतलेली सक्रिय भूमिका आणि जगभरातील समुदायांसोबत केलेल्या पुरस्कारप्राप्त कामामुळे कंपनीला जगातील अग्रगण्य शाश्वतता सूचींमध्ये स्थान मिळाले आहे. डॉ जोन्स सस्टेनिबिलिटी इंडेक्स (डीजेएसआय), एमएससीआय ग्लोबल सस्टेनिबिलिटी इंडेक्स आणि एफटीएसईफॉर गुड इमर्जिंग इंडेक्स या सूचींमध्ये कंपनीला स्थान मिळाले आहे.

१५ व्यावसायिक भाडेकरूंना गेली ८ वर्षे वाऱ्यावर सोडले-महापालिकेविरोधात आंदोलनाचा इशारा ..

0

पुणे :दगडूशेठ दत्त मंदिराशेजारी बाबुगेनु चौक १११२/१३ बुधवार पेठ येथील ८ गुंठे ट्रस्टची जागा पुणे पालिकेने सुपर मार्केटच्या नावाखाली आरक्षित करून १५ व्यावसायिक भाडेकरूंना गेली ८ वर्षे वाऱ्यावर सोडले आहे. पालिकेने तातडीने पुनर्वसन करावे अन्यथा पालिकेसमोर आमरण उपोषण करू, असा इशारा श्रीराम व्यावसायिक भाडेकरू संघाने पत्रकार परिषदेत दिला.

श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी श्रीराम व्यावसायिक भाडेकरू संघा’च्या वतीने देवेंद्र शर्मा, एस.पी. वर्मा, गजानन कोराळे, मेघा सूर्यवंशी, श्री. आगा, श्री. पटपटीया आणि श्रीराम व्यावसायिक भाडेकरू संघाचे सभासद उपस्थित होते.सदरची जागा ‘रामचंद्र महादेव ट्रस्ट’ ची होती. १९८७ साली पालिकेने आरक्षण केले आणि ट्रस्ट ला जागा आजतागायत विकसित करून दिलेली नाही. तेथील व्यावसायिक भाडेकरूंना बेघर केले. याबाबत संघाने माहिती अधिकार, आयुक्त, पालकमंत्री, स्थानिक नगरसेवक यांच्याकडे मदतीची धाव घेतली परंतु कोणीच याची दखल घेतली नाही. ७० ते ८o वर्षापासून तेथे व्यवसाय करणाऱ्या भाडेकरूंचे पुनर्वसन झालेले नाही, त्यांचे त्याच जागेत पुनर्वसन व्हावे, अशी मागणी देवेंद्र शर्मा यांनी यावेळी केली.सदर जागा सद्यस्थितीत कचरापेटी समान पडून आहे. पालिका तात्पुरता व्यवसाय करण्यास देखील त्या जागेवर परवानगी देत नाही.तरी आम्ही संघाच्या वतीने सदर जागेवर सुपर मार्केट बांधून व्यावसायिक भाडेकरूंना पुनर्वसन करून हक्क द्यावा, अशी मागणी करीत आहोत असे या पत्रकार परिषदेत सांगितले.

या प्रभागाचे नेतृत्व महापौर मुक्ता टिळक करतात, तर आमदार गिरीश बापट हे पालकमंत्री आहेत. पालिकेच्या ३५ लोकशाही दिनामध्ये उपस्थित राहूनही या भाडेकरूंना न्याय मिळाला नाही.

आता ऊर्जामंत्र्यांनी देखील सुनावले महापालिकेला ..फूटपाथवर अडथळा निर्माण करणारे फिडर पिलर्स हटवा

0

पुणे : शहरातील पदपथांवर अडथळा निर्माण करणारे फिडर पिलर्स  येत्या एक ते दीड वर्षात हटवावेत व ते योग्य जागी स्थानांतरीत करण्यात यावे असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी, दि. 26 रोजी पुणे महानगरपालिका व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. यासाठी हवे तर संयुक्त खर्च  करा पण ते हत्वा निश्चित असे त्यांनी म्हटले आहे .

येथील सेनापती बापट रस्त्यावरील प्रकाशभवनमध्ये महावितरण व पुणे महापालिकेची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी महापौर सौ. मुक्ता टिळक, उपमहापौर डाँ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्री. श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. योगेश मुळीक, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक श्री. पुरुषोत्तम जाधव, महावितरणचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. राजेंद्र निंबाळकर, मुख्य अभियंता श्री. श्रीनिवास कंदुल आदींची उपस्थिती होती.

या बैठकीत शहरातील फुटपाथवरील फिडर पिलर्समुळे पादचाऱ्यांना त्रास होत असून अपघाताची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली. यावर ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांनी महावितरण व महापालिकेने संयुक्तपणे एक समिती स्थापन करून असे धोकादायक ठिकाणांची यादी तयार करावी आणि संयुक्त खर्चाने येत्या एक ते दीड वर्षात ते योग्य जागी स्थानांतरीत करावेत व त्याचा अहवाल वेळोवेळी महापौरांना सादर करण्यात यावा असे निर्देश दिले. तसेच भूमिगत वीजवाहिन्यांसाठी आवश्यक असलेले खोदकाम ही महापालिकेच्या मंजुरीनंतरच करण्यात यावी व ही मंजुरी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित देण्याची कार्यवाही करण्याची सूचना ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांनी केली.

नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा कारवाईऊर्जामंत्री

वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी आवश्यक देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात यावे व एखाद्या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार आढळून आल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. प्रकाशभवन येथे महावितरण व महापारेषणच्या पुणे जिल्ह्यातील कामांचा ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्वाधिक वीजपुरवठा खंडित होत असलेल्या परिसरांची व विभागांची नावे जाणून घेतली. नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी वीजयंत्रणेवर बारीक लक्ष ठेवावे व खंडित होण्याचे नेमक्या कारणांवर कायमस्वरुपी उपाययोजना करावी. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडल्यास त्याचा कालावधी कमीतकमी राहील याचेही प्रयत्न करण्याची सूचना यावेळी ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांनी दिली. दरम्यान पुणे जिल्ह्यातील महापारेषणच्या विविध उपकेंद्राची सुरु असलेली कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी संबंधीत कंत्राटदारांविरुद्ध कठोर भूमिका घ्यावी. प्रसंगी त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करून नव्या कंत्राटदारांना कामे देण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, श्री. सुनील पावडे, श्री. अनिल भोसले, महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. रोहीदास मस्के तसेच अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

लेखक-र्‍हीदम वाघोलीकर यांना ब्रिटिश पार्लिमेंट मध्ये ‘महात्मा गांधी सन्मान’ प्रदान*

0
इंग्लंडच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ मध्ये गौरव
पुणे ःयुवा लेखक र्‍हीदम वाघोलीकर यांना  हाऊस ऑफ कॉमन्स ‘ लंडन मध्ये झालेल्या ‘ग्लोबल अचिव्हर्स कॉनक्लेव्ह’ मध्ये   ‘महात्मा गांधी सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.
‘एनआरआय वेल्फेअर सोसायटी ऑफ इंडिया’ (लंडन) संस्थेतर्फे पुरस्कार वितरण करण्यात आले
. जगभरातून ४५ नागरिकांना हा सन्मान दिला जातो. हा पुरस्कार मिळविणारे र्‍हीदम वाघोलीकर हे सर्वात तरुण भारतीय आहेत.
हा पुरस्कार गुरूवार, दि. 25 ऑक्टोबर 2018 रोजी ‘ग्लोबल अचिव्हर्स कॉनक्लेव्ह’ दरम्यान ब्रिटीश पार्लमेंट (‘हाऊस ऑफ कॉमन्स’) लंडन येथे देण्यात आला.
यावेळी भारताचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, पद्मविभूषण डॉ. अनील कोहली, आणि मान्यवरांना गौरविण्यात आले. यावेळी ऱ्ही दम वाघोलीकर यांचे पिता सुधीर वाघोलीकर तसेच भारत, इंग्लंडमधील मान्यवर उपस्थित होते
` या सन्मानामुळे भारताचा झेंडा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये उंचावल्याचा आनंद वाटतो ‘, असे ऱ्हीदम वाघोलीकर यांनी सांगीतले.
र्‍हीदम हे सामाजिक विषयांवर जनजागृतीचे काम करणाऱ्या ‘क्रिएटिंग पॉसिबिलिटीज’  स्वयंसेवी सेवी संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी ‘स्वरलता-रिदमिक रेमीनीसेस ऑफ लता दीदी ’या लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक तसेच किशोरीताईंवरील ‘द सोल स्टिरिन्ग व्हॉईस -गानसरस्वती किशोरी आमोणकर’ ही पुस्तके लिहिली आहेत.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर,  माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील , पंडित बिरजू महाराज यांनी वाघोलीकर यांच्या लेखन उपक्रमाचे कौतुक केले आहे. तसेच वाघोलीकर गौरी सावंत यांच्या समवेत अनाथ मुलींना मदतीचे सामाजिक कार्य करत आहेत.
र्‍हीदम वाघोलीकर यांना इस्मा इन्स्टिट्यूट (इंटरनॅशनल स्पिरिच्युलिटी मार्केट)च्या वतीने अध्यात्म क्षेत्रातील दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच ‘आसिआन थाई इंडियन बिझनेस लीडरशिप’ परिषदेत ‘रुवा उद्योजक’ सन्मान, ‘कला गौरव राष्ट्रीय पुरस्कार’, ‘इंटरनॅशनल अचिव्हर्स’ पुरस्कार (दुबई), सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार, अमृता फडणवीस यांच्या हस्ते ‘फेमिना मोस्ट पॉवरफुल ऑफ द यीअर 2018’ पुरस्कार मिळाले आहेत.

स्वाती शर्माचं ‘तू हाथ नको लावूस’ गाण्यानं मराठीत पदार्पण

0

राजीव एस. रुईया दिग्दर्शित ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या सिनेमातील ‘तू हाथ नको लावूस’ हे गाणे सोशल मीडियावर हिट ठरते आहे. हे गाणे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका स्वाती शर्मा हिने गायले आहे. स्वाती शर्माचे ‘तनु वेड्स मनू २’ सिनेमातील ‘बन्नो’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या ओठी आहे.

या सिनेमाच्या निमित्ताने स्वाती शर्मा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. या सिनेमातील सर्व गाणी ही स्वातीने एकटीनेच गायली आहेत. स्वातीच्या ‘तू हाथ नको लावूस’ या गाण्याला सोशल मीडियावर ४ लाख व्हियूज आहेत. हे गाणे मीरा जोशी व प्रियदर्शन जाधव यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि.या बॅनरखाली निर्मिती करण्यात आली आहे. दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा हे निर्माते आहेत. तर रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत. हा सिनेमा येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी कृती गट स्थापन करावेत -खा. वंदना चव्हाण

0

पुणे-विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी कृती गट स्थापन करण्यात यावेत असा निर्णय येथील महिलांच्या एका बैठकीत घेण्यात आला .अॅड. वंदना चव्हाण व डॉ. किरण मोघे यांनी आज दि. २६ ऑक्टोबर २०१८ रोजी, इंद्रधनुष्य
पर्यावरण व नागरिकत्व केंद्र, येथे महिलांच्या विषयांवर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती.
२०१३-२०१४ मध्ये पुणे महानगरपालिकेने अॅड. सौ. वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने देशात सर्वातप्रथम ‘Framework for Developing Women Friendly City’ चा अहवाल All India Institute ofLocal Self Government, Mumbai यांच्याकडून तयार करून घेण्यात आला होता. ज्यामध्येविविध स्तरातील, विविध क्षेत्रातील महिलांचे प्रश्न व त्यावर कारवायाच्या उपाययोजना मांडण्यातआल्या आहेत.
या अहवालाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने येणाऱ्या २०१९-२० च्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतुदींचाअंतर्भाव करण्यात यावा यासाठी अभ्यास गट करण्यात आले. श्रीमती किरण मोघे व श्री. अविनाश मधाले यांच्या पुढाकाराने आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता, दळणवळण, स्वछता गृह, नोकरी करणाऱ्यामहिलांसाठी सुविधा (पाळणाघरे, हॉस्टेल) इ. असे कृती गट नेमण्यात आले.
जनवादी महिला संघटना, CEE, CFAR, समाजविकास, पुणे विद्यापीठ स्त्री विभाग, नारी समता मंच, ALERT, SNDT, जनआरोग्य मंच, तथापी ट्रस्ट, आशा केर ट्रस्ट इ. विविध संस्थांबरोबर माजी महापौर वैशाली बनकर, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष वासंती काकडे, नगरसेविका नंदालोणकर, माजी नगरसेविका सौ. मीनल सरवदे, सौ. सुरेखा कवडे, सौ. विजया कापरे, सौ. शारदाओरसे, सौ. हिना मोमीन, सौ. रंजना पवार, सौ. शशिकला कुंभार तसेच सौ. रजनी पाचंगे, सौ.मृणाल वाणी, कु. मनाली भिलारे, कु. स्नेहल शिंगारे, सौ. नीता गलांडे, श्रीमती. संजीवनीजोगळेकर आदि उपस्थित होते.

क्रिकेटची परतफेड करणे अवघड-सुनील गावस्कर

0

चंदू बोर्डे यांच्या पँथर्स पेसेस या आत्मचरित्राचे प्रकाशन

पुणे: भारतीय क्रिकेटला चंदू बोर्डे यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा वारसा आहे, ज्यामुळे आम्ही त्यांना बघून क्रिकेट खेळायला लागलो. क्रिकेटने आम्हांला आयुष्यात इतके दिले आहे कि, त्याची परतफेड करणे अवघड आहे, अशी भावना भारताचे माजी कर्णधार व लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी येथे व्यक्त केली.

भारताचे माजी कर्णधार चंदू बोर्डे यांच्या पँथर्स पेसेस या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे माजी कर्णधार व लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्नल ललित राय, लेखक मोहन सिन्हा, पूना क्लबचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील आणि अनुबंध प्रकाशनचे अनिल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुनील गावस्कर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाले कि, माझ्या पिढीला चंदू बोर्डे, टायगर पतौडी यांसारख्या दिग्गजांना बघून क्रिकेट शिकायला मिळाले. मी पहिल्यांदा चंदू बोर्डेना 1958साली इंडिया-वेस्ट इंडिज दरम्यान ब्रे बॉन स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात बघितले होते. त्यावेळेस ब्रे बॉन स्टेडियमच्या पिचवर चेंडूला भरपूर उसळी मिळायची आणि वेस्ट इंडिजच्या आक्रमक गोलंदाजांविरुद्ध दिग्गज खेळाडू बघताना उत्कृष्ट अनुभव असायचा. फक्त खेळाडू म्हणूनच नव्हे तर, व्यवस्थापक आणि मार्गदर्शक म्हणून त्यांचे कार्य अतुलनीय आहे. बोर्डे सर हे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसमोर एक जिवंत उदाहरण आहे. यांसारख्या दिग्गजांच्या वारस्यामुळेच आम्ही क्रिकेट खेळायला लागलो.

याप्रसंगी बोलताना कर्नल ललीत राय म्हणाले कि, चंदू बोर्डेमधला एक साधा व प्रामाणिक माणूस या पुस्तकातून प्रतिबिंबीत होतोय. हे पुस्तक फक्त क्रिकेट प्रेमींसाठीच नव्हे तर, व्यवस्थापन कौशल्यासाठी आजच्या पिढीलादेखील सुसंगत आहे.

यावेळी चंदू बोर्डे म्हणाले कि, वयाच्या 16व्या वर्षापासून पूना क्लबच्या याच मैदानावर मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी आतारसाखे प्रशिक्षण नव्हते. त्यामुळे आम्ही दिग्गजांना खेळताना पाहूनच शिकायचो. मी माझे भाग्य समजतो कि, मला अनेक दिगगजांबरोबर खेळण्याची संधी मिळाली. सुनील गावस्कर हे भारताच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट सलामीच्या फलंदाजांपैकी एक असून त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करणे हे माझे भाग्य आहे.

या पुस्तकाला प्रस्तावना वेस्ट इंडिजचे दिगग्ज गॅरी सोबर्स यांनी लिहिले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदन लेले यांनी केले.या पुस्तकामध्ये चंदू बोर्डे यांच्या विविध भूमिकांचा तब्बल 6 दशकांचाअनुभव प्रतिबिंबीत झाला आहे