जळीतग्रस्तांना बालवडकर फौन्डेशन ची मदत
स्पर्धात्मक युगात स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करणे गरजेचे – संदीप पाटील
पुणे : सध्याचे युग हे स्पर्धात्मक आहे प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे नशीब अजमावणे कठीण झाले आहे असे असताना देखील आपले कर्तृत्व सिद्ध करणे गरजेचे आहे आणि पोलीस पाल्य हे सिद्ध करतील असा विश्वास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला.
पुण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी महोत्सव घेण्यात यावा तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाबरोबर आर्मी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी देखील असा मेळावा घेण्यात यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्य निवृत्त पोलीस अधिकारी/कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनतर्फे महाराष्ट्रात प्रथमच पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या मुला-मुलींसाठी भव्य नोकरी महोत्सव उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी अप्पर पोलीस महासंचालक खंडेराव शिंदे, माजी पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे, माजी पोलीस उपायुक्त सीताराम न्यायनिरगुणे, माजी पोलीस उपायुक्त सुखानंद साब्दे, माजी अप्पर, पोलीस अधीक्षक शशिकांत राजहंस, माजी पोलीस उपअधीक्षक मदन चव्हाण, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा कार्यक्रमाचे आयोजक भाऊसाहेब आंधळकर, माजी सहाय्यक फौजदार दिलीप शिंदे, राजा सोनूले, संपत जाधव, सुरेश रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
भाऊसाहेब आंधळकर म्हणाले की, महाराष्ट्राची सद्यस्थिती पाहता रोजगार समस्या सध्या भेडसावत आहे. नोकरी मिळणे कठीण झाले असून हा एक गंभीर विषय बनला आहे. याच विषयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांच्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार चांगली नोकरी मिळावी यासाठी हा एक प्रयत्न संघटनेतर्फे करण्यात आला आहे. महोत्सवात आत्तापर्यंत १५००० मुलांनी उपस्थित राहून अर्ज भरला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन पालकांसह मुलांनी हजेरी लावली. सर्वांना नोकरी मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी महोत्सव भरवणार तसेच त्याची पूर्व सूचनाही देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गद्रे-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सर्वेश बिरमाणेचा मानांकित खेळाडूवर विजय
पुणे: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सर्वेश बिरमाणे याने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत आगेकूच केली.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात सर्वेश बिरमाणे याने तिसऱ्या मानांकित अमन तेजाबवालाचा 6-4, 6-0असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. पाचव्या मानांकित
सुहित रेड्डी लंकाने कार्तिक प्रहारचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(3)असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. फैज नस्यामने दक्ष अगरवालचा
6-3, 6-2असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
मुलींच्या गटात बिपाशा मेहन, सायना देशपांडे, प्रेरणा विचारे, आर्या पाटील, गार्गी पवार या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी:
संजीत देवीनेनी(भारत)(1)वि.वि.अर्जुन गोहड(भारत) 6-2, 6-2;
अनर्घ गांगुली(भारत)वि.वि.अभुदया शर्मा(भारत) 6-2, 6-4;
फैज नस्याम(भारत)वि.वि.दक्ष अगरवाल(भारत)
6-3, 6-2;
प्रभाजीत चंढोक(भारत)वि.वि.कपिश खांडगे(भारत) 6-4, 6-4;
सर्वेश बिरमाणे(भारत)वि.वि.अमन तेजाबवाला(भारत)(3) 6-4, 6-0;
सुहित रेड्डी लंका(भारत)(5)वि.वि.कार्तिक प्रहार(भारत) 6-3, 7-6(3);
मुली:
बिपाशा मेहन(भारत)वि.वि.लोलाक्षी कांकरिया(भारत) 6-2, 6-1;
सायना देशपांडे(भारत)वि.वि.व्योमा भास्कर(भारत) 6-0, 6-2;
प्रेरणा विचारे(भारत)(7)वि.वि.वशिष्टा पठानीया(भारत) 6-3, 6-4;
आर्या पाटील(भारत)वि.वि.तन्वीका सर्वानन(भारत) 6-1, 6-2;
गार्गी पवार(भारत)(8)वि.वि.लालित्या कल्लूरी(भारत) 6-2, 6-2.
“पियानो फॉर सेल” या मराठी नाटकाचा ग्रैंड प्रीमियर संपन्न
जगातील सर्वांत जुने लक्झुरियस बार्बरशॉप असलेल्या लंडनच्या ‘ट्रुफिट अँड हिल’चे पुण्यात पदार्पण
· पुण्यातील पहिले आऊटलेट कोरेगाव पार्कमध्ये सुरू
· ‘ट्रुफिट अँड हिल’ची आता भारतात १९ आऊटलेट कार्यरत
पुणे : ग्रेट ब्रिटनमधील राजघराण्याच्या सलग नऊ पिढ्यांचे २०० वर्षे केशसंवर्धन करण्याची कामगिरी नावावर असलेल्या लंडनच्या ‘ट्रुफिट अँड हिल’ या जगातील सर्वांत जुन्या लक्झुरियस बार्बरशॉपचे पुण्यात पदार्पण झाले आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सेवेचा वारसा कायम राखत ‘ट्रुफिट अँड हिल’ अत्याधुनिक सुविधांसह पुण्यातील प्रतिष्ठित अशा कोरेगाव पार्कमध्ये कार्यान्वित झाले आहे. ‘ट्रुफिट अँड हिल’च्या जगप्रसिद्ध केशसंवर्धन सेवांबरोबरच त्यांच्या पहिल्या स्पा सेवांचा लाभही पुणेकरांना घेता येणार आहे.
‘ट्रुफिट अँड हिल’ला भारतात आणण्याचा मान लॉईड्स लक्झरीज लिमिटेड या कंपनीकडे आहे. या कंपनीने या ब्रँडसाठी केवळ भारतातच नव्हे तर नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, म्यान्मार व व्हिएतनाम या देशांसाठीही मास्टर फ्रँचायसी लायसन्स प्राप्त केले आहे.
लॉईड्स लक्झरीज लिमिटेडची स्थापना वर्ष २०१३ मध्ये कृष्णा गुप्ता व इस्तयाक अन्सारी यांनी केली. पुरुषांना संपूर्ण आरामदायी वातावरणात अत्युच्च सुखावह केशसंवर्धन सेवा मिळवून देण्याच्या हेतूने कंपनी कार्यरत आहे. यासंदर्भात बोलताना कृष्णा गुप्ता म्हणाले, “ग्राहकांना आमच्यायेथून जाताना नवचैतन्याची अनुभूती मिळावी, हे आमचे उद्दिष्ट्य आहे. आम्ही केवळ सेवाच देत नसून अनुभवही देऊ करतो. आपल्या व्यक्तीमत्त्वाचे संवर्धन करणे ही दैनंदिन गरज असते. आम्ही त्याचे आलिशान अनुभवात रुपांतर करण्यासाठी उच्च प्रशिक्षित केशकर्तनकार व कर्मचाऱ्यांच्या मदतीने अत्यंत सुखावह वातावरणात सेवा देतो. आमच्या पुणे येथील स्टोअरचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे येथील स्पा सेवा, ज्या अलिकडेच आमच्या काही स्टोअरमध्ये सुरु करण्यात आल्या आहेत. लवकरच त्या आमच्या भावी स्टोअर्समध्येही उपलब्ध करुन दिल्या जातील.”
हे स्टोअर कोरेगाव पार्कमध्ये २००० चौरस फूट प्रशस्त जागेत साकारले असून तेथे रीटेल सेक्शन, रॉयल सूट, बार्बरिंग सेक्शन, पेडिक्युअर सूट, फूट स्पा व दोन मसाज रुम्स अशा सुविधा आहेत. महोगनी लाकडांतून साकारलेली अभिरुचीपूर्ण अंतर्रचना व त्याला चिक ब्ल्यू वॉलपेपरची सजावट यामुळे येथे शांत व संपूर्ण आरामदायी वातावरणाची अनुभूती येते.
‘ट्रुफिट अँड हिल’ भारतासह जगभरातील अन्य १२ देशांमध्ये कार्यरत असून त्यांची आऊटलेट्स लंडन, कॅनबेरा, बाकू, टोराँटो, बीजिंग, शांघाय, साल्मिया, क्वालालुंपूर, सिंगापूर, बँकॉक, शिकागो, वॉशिंग्टन, तसेच भारतातील प्रमुख शहरांत आहेत.
याप्रसंगी बोलताना इस्तयाक अन्सारी म्हणाले, “आमची भारतभर सध्या ११ शहरांत १९ स्टोअर्स कार्यरत आहेत. ‘ट्रुफिट अँड हिल’ची ७ स्टोअर्स मुंबईत, ३ स्टोअर्स बंगळुरुत व नवी दिल्ली, गुरुग्राम, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, चंडीगड, चेन्नई व पुण्यात प्रत्येकी एक स्टोअर आहे. आम्ही आमचे पहिले आंतरराष्ट्रीय स्टोअर बांगलादेशात ढाका येथे गुलशन ॲव्हेन्यूसारख्या उच्चभ्रू परिसरात उघडत आहोत.”
‘ट्रुफिट अँड हिल’विषयी
‘ट्रुफिट अँड हिल’च्या गौरवशाली इतिहासाला वर्ष १८०५ मध्ये म्हणजे हिज मॅजेस्टी किंग जॉर्ज तृतिय यांच्या राजवटीत प्रारंभ झाला. तेव्हापासून त्यांच्या ग्राहकवर्गात राजघराण्यातील पुरुषांचा आणि शाही पाहुण्यांचा समावेश झाला. ‘ट्रुफिट अँड हिल’चे केशकर्तनकार हिज रॉयल हायनेस, ड्यूक ऑफ एडिंबर्गचे राजपरवानापत्र बाळगतात. ‘ट्रुफिट अँड हिल’ने आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम केशसंवर्धन उत्पादने व सेवा पुरवल्या आहेत. त्यांच्या उच्चभ्रू ग्राहकवर्गात उद्योजक, संसद सदस्य, राजदूत व मुत्सद्दी व आमंत्रित नामवंतांचा समावेश आहे. ऑस्कर वाइल्ड, चार्ल्स डिकन्स, लॉर्ड बायरन, फ्रँक सिनात्रा, विन्स्टन चर्चिल, आल्फ्रेड हिचकॉक व लॉरेन्स ऑलिव्हिए ही या ग्राहकांतील काही प्रसिद्ध नावे होत. लंडनखेरीज ‘ट्रुफिट अँड हिल’ची लक्झुरियस बार्बरशॉप्स शिकागो, टोराँटो, बीजिंग, क्वालालुंपूर, सिंगापूर, बँकॉक, बाकू, कॅनबेरा व सोल येथे आहेत.
‘ट्रुफिट अँड हिल’तर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट व आगळ्या सेवांमध्ये रॉयल शेव्ह अँड हेअरकट, क्लासिक शेव्ह अँड हेअरकट, अन्य हेअर ट्रिटमेंट्स, रॉयल मॅनिक्युअर अँड पेडिक्युअर, हेड मसाज, फेशियल्स आदींचा, तसेच कॉम्प्लिमेंटरी वॅलेट सर्व्हिसेस, वाय-फाय, रिफ्रेशमेंट्स अशा सुविधांचा समावेश आहे.
त्यांच्याकडे खास प्रसंग, व्यावसायिक बैठका अथवा निव्वळ आरामदायी अनुभूतीसाठी ‘रॉयल सूट’ नावाची खास व्हीआयपी रुमही सज्ज आहे.
ट्रुफिट अँड हिल कोरेगाव पार्क
पत्ता : ५, गॅलक्सी गार्डन, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क (स्टारबक्ससमोर), पुणे
सोनिया गांधींच्या वाढदिवसा निमित्त कॉंग्रेसचा सेवा ,कर्तव्य, त्याग सप्ताह- विविध उपक्रम(व्हिडीओ)
चेक बाऊन्सप्रकरणी अभिनेता राजपाल यादवला ३ महिन्यांचा कारावास
नवी दिल्ली – चेक बाऊन्सप्रकरणी बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव याला ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
२०१० साली राजपाल याने इंदौर येथील सुरेंद्र सिंह या व्यक्तीकडून ५ कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले होते. तसेच काही दिवसात पैसे परत करतो असे आश्वासनही त्याने सिंह यांना दिले होते. मात्र, दिलेली मुदतीत यादव पैसे परत करत नसल्याने सिंह यांनी यादवच्या मागे तगादा लावला होता. यामुळे 2015 साली यादव याने मुंबईतील अॅक्सिस बँकेचा एक चेक सिंह यांना दिला. पण तो चेक बाऊन्स झाला. यामुळे सिंह यांनी वकीलाकडून यादव याला नोटीस पाठवली. तरी देखील यादव याने कर्ज फेडले नाही. यामुळे सिंह यांनी येथील जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयाने सिंह व यादव यांना सामंजस्याने हा वाद सोडवण्याचा अनेकदा सूचना दिल्या. मात्र, यादवने गंभीरपणे न घेता सिंह यांचे कर्ज फेडलेच नाही. यामुळे त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
रस्त्यात झाड कोसळल्याने संतप्त जमावाकडून ठेकेदाराच्या कार्यालयाची तोडफोड
पुणे – महापालिकेचे काम सुरू असताना गुलटेकडी इंदिरानगर गल्ली क्रमांक २ येथे भर रस्त्यात झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली. याचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी ठेकेदाराच्या कार्यालयाची तोडफोड केली. तसेच ठेकेदाराच्या एका कर्मचाऱ्याला जबर मारहाण करुन ३ दुचाकी आणि कार्यालयाची तोडफोड केली आहे.
या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सेवन लव चौकपासून मार्केटयार्डकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते.. मात्र, ठेकेदाराला बोलवा तरच झाड काढू देऊ, असे म्हणत स्थानिकांनी झाड काढण्यास विरोध केला.
तिसऱ्या पूना क्लब फुटबॉल लीग स्पर्धेत गेट मेस्सी, कोक इन कॅन, झाल्टन ऑफ स्विंग संघांची विजयी सलामी
‘माझ्या आईला नेहमी खुश ठेवीन’ – सई ताम्हणकर
गेल्या काही दिवसांपासून संजय मोने यांच्या कानाला खडा या आगामी चॅट शोची सर्वत्र चर्चा आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारणार आहेत. कानाला खडा लावणारे काही किस्से या गप्पांमध्ये रंगणार आहेत. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ३० नोव्हेंबर पासून शुक्रवार व शनिवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार आहे आणि नवनवीन व भन्नाट किस्स्यांची मैफिल प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे.
या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात तरुणांच्या हृदयाची धाडकन सई ताम्हणकर संजय मोने यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी सज्ज होणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई हिने एका पेक्षा एक सुपरहिट सिनेमे देऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तिचं सौंदर्य आणि कमालीचं अभिनय कौशल्य यामुळे तिने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी इतकंच नव्हे तर तामिळ सिनेसृष्टीत देखील स्वतःची छाप सोडली आहे. तिच्या आजवरच्या प्रवासात असे अनेक किस्से आहेत ज्यामुळे तिने कानाला खडा लावला. तिने सिनेमात बिकिनी घातली आणि त्यामुळे झालेला बोभाटा, तिचे मित्र-मैत्रिणी, तिचा सांगली ते मुंबईचा प्रवास या सगळ्याबद्दल तिने दिलखुलास गप्पा मारल्या आणि संजय मोनेंशी गप्पा मारताना सईने तिच्या आईला नेहमी खुश ठेवण्याचा कानाला खडा लावला असं म्हंटल. नक्की काय झालं हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘कानाला खडा’ शुक्रवार आणि शनिवारी रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठी वर.
ट्रूस्पेस जॅगवॉर्स ,जीएससी पँथर्स, डी लिंक चिताज यांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत गौरव कासटच्या नाबाद 58धावांच्या खेळीच्या जोरावर कासट ड्रॅगन्स संघाने रेड बुल्सचास 7गडी राखून पराभव करत आगेकूच केली. पहिल्यांदा खेळताना रेड बुल्स संघाने 6षटकात 3बाद 78धावा केल्या. यात तन्मय चोभेने 21चेंडूत 3चौकार व 4षटकारांच्या नाबाद 51धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. हे आव्हान कासट ड्रॅगन्स संघाने 5.5षटकात 1बाद 82धावा करून पूर्ण केले. यामध्ये गौरव कासटने 20चेंडूत 5चौकार व 5षटकारांच्या मदतीने नाबाद 58धावा, प्रतीक वांगीकरने 11चेंडूत नाबाद 18धावा करून संघाला विजय मिळवून दिला.सामन्याचा मानकरी गौरव कासट ठरला. कर्णा मेहता याच्या उपयुक्त 45धावांच्या जोरावर जीएससी पँथर्स संघाने ओव्हन फ्रेश टस्कर्सचा 13धावांनी पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
जीएससी पँथर्स: 6षटकात 4बाद 86धावा(कर्णा मेहता 45(17,2×4,4×6), यश परांजपे 27(11,2×4,2×6), श्रीनिवास चाफळकर 2-3)वि.वि.ओव्हन फ्रेश टस्कर्स: 6षटकात 6बाद 73धावा(हर्षल गंद्रे 34(13,4×4,2×6), श्रीनिवास चाफळकर 21(12,2×4,1×6), राहुल गांगल 1-4, हर्षल जैन 1-7);सामनावीर-कर्णा मेहता; जीएससी पँथर्स संघाने 13धावांनी विजयी;
रेड बुल्स: 6षटकात 3बाद 78धावा(तन्मय चोभे नाबाद 51(21,3×4,4×6), अमित कुलकर्णी 12, नील हळबे 1-3, आकांश जैन 1-7)पराभूत वि.कासट ड्रॅगन्स: 5.5षटकात 1बाद 82धावा(गौरव कासट नाबाद 58(20, 5×4,5×6), प्रतीक वांगीकर नाबाद 18(11,2×4,1×6), तन्मय चोभे 1-1);सामनावीर-गौरव कासट; कासट ड्रॅगन्स 7गडी राखून विजयी;
गुडलक हॉग्स लिमये: 6षटकात 2बाद 54धावा(देवेंद्र चितळे नाबाद 35(19,3×4,1×6), शिवकुमार जावडेकर 1-4, गौरव सावगावकर 1-7)पराभूत वि.अंजनेया ब्रेव बिअर्स: 5.5षटकात 3बाद 55धावा(अंजनेया साठे 27(15,2×4,2×6), गौरव सावगावकर 10, अमोलल लिमये 2-10, समीर जोग 1-9);सामनावीर-अंजनेया साठे; अंजनेया ब्रेव बिअर्स 5गडी राखून विजयी;
टायगर्स: 6षटकात 2बाद 61धावा(मधुर इंगहाळीकर नाबाद 44(24,4×4,3×6), अक्षय ओक 1-10)पराभूत वि.डी लिंक चिताज: 6षटकात 4बाद 62धावा(आत्मन बागमार नाबाद 34(16,1×4,3×6), कृष्णा मेहता 10, सिद्धार्थ साठ्ये 1-5, अमित कुलकर्णी 1-14);सामनावीर-आत्मन बागमार; डी लिंक चिताज 4गडी राखून विजयी;
ट्रूस्पेस जॅगवॉर्स: 6षटकात 2बाद 73धावा(रवी कासट 34(16,3×4,2×6), नकुल पटेल नाबाद 27(13, 2×4,1×6))वि.वि.आर स्टॅलियन्स: 6षटकात 3बाद 64धावा(हर्षद बर्वे 30(17, 1×4,1×6), रोहित बर्वे 20(11), सोहम गांधी नाबाद 10, निरंजन गोडबोले 1-3, अनुज मेहता 1-12);सामनावीर-रवी कासट; ट्रूस्पेस जॅगवॉर्स 9धावांनी विजयी.
आरक्षणाचा निर्णय स्वागतार्ह; पण श्रेयासाठी राजकीय जल्लोष चुकीचा : राम जाधव
क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघांचा अंतिम फेरीत प्रवेश
पुणे,- पीवायसी हिंदु जिमखाना क्लब यांच्या तर्फे पीवायसी करंडक 14वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत प्रसन्न पवारच्या 62 धावांच्या बळावर व्हेरॉक वेंगसरकर क्रि
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी
क्लब ऑफ महाराष्ट्र- 45 षटकात 8 बाद 147 धावा(क्रिश शहापुरकर 85, विवेक टिपरे 17, कबीर भट्टचार्जी 2-35, भार्गव महाजन 1-35, ओंकार राजपुत 1-34, साहिल सावंत 1-6) पराभूत वि व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी- 27.4 षटकात 3 बाद 150 धावा(प्रसन्न पवार 62, शार्दुल विनोदे 34, वैभव अगम नाबाद 24, साहिल कड 1-26, पार्थ कांबळे 1-55, तेजस शिंदे 1-25) सामनावीर- प्रसन्न पवार
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.
‘मिसेस महाराष्ट्र – एम्प्रेस ऑफ महाराष्ट्र २०१८’ सौंदर्य स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यात उत्साहात संपन्न
पुणे-
नुकतीच विनय अरान्हा प्रेझेंट्स मिसेस महाराष्ट्र – एम्प्रेस ऑफ महाराष्ट्र २०१८ – सीझन ३, पॉवर्ड बाय हयात पुणे ही सौंदर्य स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. संगीत, नृत्याच्या साथीने संपन्न झालेल्या या दिमाखदार कार्यक्रमात प्रतिष्ठेचा किताब पटकावण्यासाठी राज्यभरातून ४० स्पर्धक चुरशीने सहभागी झाले होते. या स्पर्धेचा हा तिसरा सीझन होता.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून युक्ता मुखी, शिबानी कश्यप, रीतु शिवपुरी व असीस कौर यांनी काम पाहिले तर विनय अरान्हा, अशोक धामणकर, सुमीत कुमार व कार्ल मस्कारेन्हास यांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करुन दाखवला.
लोकप्रिय दूरचित्रवाणी अभिनेता अमन यतन वर्मा याने आपल्या शैलीदार सूत्रसंचालनाने प्रेक्षकांचे रंजन केले आणि शिबानी कश्यप हिने तिची देशभर लोकप्रिय झालेली प्रसिद्ध गाणी गाऊन उपस्थितांना ठेका धरायला लावला.
डिवा पेजंट्सची चैतन्यशील जोडी असलेल्या अंजना व कार्ल मस्कारेन्हास यांच्या मालकीच्या या स्पर्धेत उपांत्य फेरीतून निवडलेल्या २० स्पर्धकांतून अंतिम फेरीत ६ सर्वोत्तम विजेत्यांची निवड करण्याचे आव्हान परीक्षकांपुढे होते. हे विजेते सिल्व्हर (वय २० ते ३३) आणि गोल्ड (वय ३४ व त्यापुढे) अशा दोन दोन गटांतून निवडायचे होते.
अंतिम फेरीपूर्वी डिवा पेजंट्सकडून गेले तीन दिवस मिळालेल्या मार्गदर्शनाचा पुरेपूर लाभ उठवत स्पर्धकांनी किताबाचा मुकूट जिंकण्यासाठी अत्यंत आत्मविश्वासाने प्रयत्न केले व आपल्या तयारीचे दिमाखाने प्रदर्शन केले.
स्पर्धेचा निकाल :
किताब विजेते :
मिसेस महाराष्ट्र – एम्प्रेस ऑफ महाराष्ट्र २०१८ – सिल्व्हर : प्रांजल दुधे
मिसेस महाराष्ट्र – एम्प्रेस ऑफ महाराष्ट्र २०१८ – गोल्ड : नियोमी डे
फर्स्ट रनर-अप – सिल्व्हर : डॉ. अर्चना काटकर
फर्स्ट रनर-अप – गोल्ड : शुची त्रिवेदी
सेकंड रनर-अप – सिल्व्हर : ऐश्वर्या साळवे
सेकंड रनर-अप – गोल्ड : शिल्पा कुलकर्णी
याखेरीज महाराष्ट्र राज्यभरातून ४ क्वीन्सही निवडण्यात आल्या.
क्वीन ऑफ मुंबई – केशिका
क्वीन ऑफ नाशिक – वैशाली मुळे
क्वीन ऑफ लातूर – माधुरी माकणीकर
क्वीन ऑफ पुणे – गौरी मालेकर
हे विजेते किताबाचा मुकूट, आकर्षक बक्षीसे व मोदसूत्रचे अलंकार घेऊन आनंदाने घरी रवाना झाले.
या स्पर्धेतून ‘डिवा’चे ‘डेअर * ड्रीम * डॅझल’ हे बोधवाक्य खऱ्या अर्थाने प्रतित झाले आणि ही महाराष्ट्रात झालेली एक भव्यतम सौंदर्य स्पर्धा ठरली.





