Home Blog Page 3032

लवार्डे गावच्या इतिहासात प्रथमच आदिवासी महिलांचा ग्रामसभेमध्ये सहभाग

0

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कर्वे समाज सेवा संस्थेच्या प्रथम वर्ष समाजकार्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मुळशी तालुक्यातील लवार्डे या गावी नुकत्याच पार पडलेल्या विशेष राष्ट्रीय सेवा योजना शिबिरादरम्यान उल्लेखनीय कामगिरी करीत पी आर ए व सर्वेक्षणाच्या आधारे गावचा कृती आराखडा व विकास आराखडा बनविण्याची किमया करून दाखविली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रयत्न व मार्गदर्शनामुळे गावच्या इतिहासामध्ये प्रथमच आदिवासी महिलांनी ग्रामसभेमध्ये सहभाग घेऊन त्यांच्या समस्यांबद्दल मते नोंदविण्याचे धाडस दाखविले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कर्वे समाज सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लवासा रस्त्यावरील लवार्डे गावी राष्ट्रीय सेवा योजने च्या विशेष ७ दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. महेश ठाकूर व प्रा. चेतन दिवाण यांनी केले होते त्यादरम्यान समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी ही किमया करून गावकर्यांची वाहवा मिळविली आहे. 

शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी शिबीर कालावधीमध्ये मशाल फेरी, प्रभात फेरी, शिवार फेरी, मूल्य साखळी, गाव सामाजिक नकाशा, संसाधन नकाशा, महिला , तरुण, शेतकरी व विद्यार्थी बैठका, सर्वेक्षण आणि पी. आर. ए. आदी व्यावसायिक पद्धतींचा अवलंब करीत संपूर्ण गावच्या समस्यांचा व उपलब्ध संसाधनांचा सखोल अभ्यास व आढावा घेऊन शिबिराच्या सांगता समारोप समारंभावेळी आयोजित ग्रामसभेमध्ये ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यासमोर गावचा कृती आराखडा व विकास आराखडा सादर केला.ग्रामस्थांनी या उपक्रमाला भरभरून दाद दिली व ग्रामसभेमध्ये सक्रीय सहभाग नांदवून विद्यार्थ्यांनी बनविलेला गाव विकास आराखडा जाणून घेतला. 

कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक दीपक वलोकर, जि. प. सदस्य सागर काटकर, जि. प. सदस्य अंजलीताई कांबळे, मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती महादेव कोंढरे आदी मान्यवरांनी शिबिरार्थी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या तसेच शिबीर समारोपावेळी आयोजित ग्रामसभेस सरपंच सौ. अस्मिता मारणे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, ग्रामसेवक श्री अडसूळ, माजी सरपंच सौ सुतार, माजी उपसरपंच अशोक चौले, प्रगतशील शेतकरी दगडू मारणे, व विलास मारणे, माजी सरपंच नामदेव चौले व वसंत काटकर तसेच बहुतांशी ग्रामस्थांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचा गौरव केला.

प्रा. डॉ. महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवाण, रुपेश पवार, श्याम खोंड यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना शिबिर व शिबीर उपक्रमांसंबंधी प्रशिक्षण व पी. आर. ए. तसेच सर्वेक्षणासाठी व्यावसायिक मार्गदर्शन केले. 

अगरवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गरजूंसाठी दोन दिवसीय विनामूल्य प्लास्टिक सर्जरी शिबिर

0

पुणे : अगरवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्ट, आर. एम. धारिवाल फाउंडेशन आणि गायत्री परिवार याच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक्स व हॅन्ड सर्जरी शिबिर आयोजिले आहे. शिबिराचे हे नववे वर्ष असून, दि. २२  व २३ डिसेंबर २०१८ या दोन दिवशी शिरूर येथील मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल येथे हे शिबीर होणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध हॅन्ड सर्जन डॉ. पंकज जिंदल, ट्रस्टचे अध्यक्ष सतीश नेवातीया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे सचिव अरुण सिंघल, खजिनदार संजय अगरवाल, प्रकल्प संचालक उमेश जालान, राजीव अगरवाल मदनबाई धारिवाल हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. भूषण सोमवंशी आदी उपस्थित होते.

डॉ. पंकज जिंदल म्हणाले, “भाजल्यामुळे झालेल्या जखमा, जन्मतः असलेले हाताचे, पायाचे किंवा शरीराचे व्यंग, वाकडी बोटे, मस, चेहऱ्यावरील वाकडे व्रण, मुरुमांमुळे झालेले खड्डे, दुभंगलेले ओठ, वाकडे नाक आदी गोष्टींवर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. स्त्री व मुलींना प्राधान्य देण्यात येणार असून, गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. या सगळ्या शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत असणार आहेत.”

डॉ. पंकज जिंदल म्हणाले, “देशात ७० लाख लोकांना भाजल्यामुळे मोठ्या जखमा झाल्या आहेत. जेणेकरुन त्यांना दैनंदिन काम करणेही शक्य होत नाही. अशा लोकांवर उपचार करुन त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. अनुभवी सर्जनकडून या शस्त्रक्रिया केल्या जात आहे. या शस्त्रक्रियांमुळे जीवन बदलून गेले आहे. पुढील काही वर्षात या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. गावांमध्येही अनेक लोक अशा शस्त्रक्रियांपासून वंचित आहेत.”

सतीश नेवातीया म्हणाले, “डॉ. पंकज जिंदल यांनी आपल्या अनुभवी टीमसह सामाजिक भावनेतून हजारो रुग्णांवर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करुन त्यांना नवी ओळख दिली आहे. गेल्या नऊ वर्षात शेकडो रुग्ण पुन्हा नव्याने सुरळीत आयुष्य जगू लागले आहेत. त्यामुळे या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा. शिबीराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व गरजू व्यक्तींनी १९ डिसेंबर २०१८ नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ७५८८१४८८०५, ७०६६०२८११३, ९०११००७६६९ किंवा ०२१३८-२२५५९९, २२४५९९ या क्रमांकावर संपर्क साधावा.”

जिल्हयातील पात्र लघु उद्योजकांना पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणेजिल्हयातील उद्योग क्षेत्रातील असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांकरीता राज्य शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. या जिल्हा पुरस्कार प्रथम क्रमांकास रु. १५ हजार व व्दितीय पुरस्कारास रु.१० हजार व मानचिन्ह देण्यात येते. जिल्हयातील पात्र लघु उद्योजकांनी या पुरस्कारासाठी दि.३१ डिसेंबर २०१८ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्‍यवस्थापक यांनी केले आहे.

            या पुरस्कारासाठी ज्ञापन पोहोच भाग-2 हा स्थायी लघु उद्योग म्हणून उद्योग संचालनालय यांच्याकडे मागील तीन वर्षे नोंदणीकृत असावा, दिनांक 1 जानेवारी 2015 पुर्वीचे भाग-2 तसेच उद्योग घटक मागील दोन वर्षे सलग उत्पादन प्रक्रियेत असलेला असावा. लघु उद्योग कोणत्याही संस्थेचा, बँकेचा थकबाकीदार नसावा. तसेच लघु उद्योगांची निवड ही त्यांने केलेली भांडवली गुंतवणूक, तंत्रज्ञान, स्वावलंबन, उद्योजकता तसेच प्रथम पिढीतील नव उद्योजक, उत्पादीत वस्तू बाबतची गुणवत्ता, निर्यातक्षम सनदी लेखापाल यांचे प्रमाणपत्र इ. बाबींचा विचार करण्यात येतो.

            विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांच्याकडे विनामूल्य उपलब्ध आहेत. अर्जाकरीता व पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांचे कार्यालय, कृषि महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे दुरध्वनी क्र.20-25539587, 25537966 यांच्याशी संपर्क  साधावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी ३९०० किमीच्या सायकल प्रवासाचा आरंभ

0
पुणे-पर्यावरण हेच जीवन असा संदेश देण्यासाठी भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी आघाडीच्या वतीने शाहू महाविद्यालय येथील दोन विद्यार्थी कु. सायली महाराव व अभिजित गवळी यांनी अरुणाचल प्रदेश व गुजरातव परत पुणे असा ३९०० कि. मी. चा सायकल प्रवास सुरु करताना  आज सारसबाग येथील तळ्यातील महागणपतीचे दर्शन घेऊन आरंभ केला.
या  अभियान व संपूर्ण सायकल प्रवासात ते प्लास्टिक हटाव या प्रबोधन अंतर्गत मोहिमेत प्लास्टिक मुळे होणारे प्रदूषण, मानवास होणारे विविध अपाय, व अनेक विविध प्रकारच्या नुकसानीची माहितीची आपल्या मोहीमेत प्रबोधन करणार आहेत
विशेष म्हणजे या मोहीमेत अरुणाचल प्रदेश व गुजरातव परत पुणे असा ३९०० कि. मी. चा प्रवास सायकलवर करणार आहेत
 यावेळी राष्ट्रीय ध्वज तिरंगा झेंडा फडकावून त्यांना अभियान यशस्वी होण्यासाठी निरोप व शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी पुणे महानगरपालिका चे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष हरीश परदेशी नगरसेवक दिलीप वेडे पाटील लोकसभा चे विस्तरारक योगेश बाचल ,किरण वैष्णव, शेखर वाघ प्रशांत अडसूळ ,दिव्या  लोळगे, लीना देशमुख सोनाली वैष्णव व  विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे संयोजक
गणेश शेरला ,सरचिटणिस भा ज पा झोपडपट्टी आघाडी यांनी केले

राफेल करारात घोटाळा नाहीच: सुप्रीम कोर्ट

0

नवीदिल्ली -फ्रान्सकडून ३६ राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या करारात कोणताही गैरव्यवहार आढळलेला नाही, असे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला दिलासा दिला आहे. या करारातील ऑफसेट हक्क रिलायन्स डिफेन्सला देण्याच्या निर्णयातही आक्षेपार्ह काहीच सापडले नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.

वायुदलाची क्षमता वाढवण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून फ्रान्सकडून ३६ लढाऊ राफेल विमाने खरेदी करण्याचा करार भारताने केला होता. हा करार अंदाजे ५८ हजार कोटी रुपयांचा होता. मात्र, या करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी तसेच इतरांनी सुप्रीम कोर्टात केल्या होत्या. या घोटाळ्याचा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करावा, अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. के. कौल व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने या याचिकांवर शुक्रवारी निर्णय दिला.

आशिया खंडातील श्रीमंत महापालिकेची ‘दानत’पहा

0

पीएमपी प्रवास महिन्यातून 1  दिवस मोफत देण्यास नकारघंटा

पुणे-आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून नावजलेल्या महापालिकेला जणू भिकेचे डोहाळे लागलेत कि दानत कमी झाली कोणास ठाऊक …? पण पुणे महापालिकेने तयारी दर्शवून देखील पिंपरी महापालिकेने मात्र  वर्षांला १२ दिवस ,म्हणजे दर महिन्यातून  1 दिवस याप्रमाणे पीएमपीतून मोफत प्रवासाची योजना राबविण्यास नकार दिला आहे.अनेकांचा वेगाने  राजकीयआणि आर्थिक  उत्कर्ष करणाऱ्या या महापालिकेला हा नकार देण्याची वेळ यावी ,हि चिंतनीय अशी बाब मानली जाणार आहे.

या योजनेसाठी  पुणे महापालिकेने हिरवा कंदील दाखवला असला तरी, पिंपरी पालिकेने मात्र नकारघंटा दर्शवली आहे. एका पालिकेचा होकार व दुसऱ्याचा नकार राहिल्यास या योजनेचे भवितव्य अधांतरी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पीएमपीच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढावी, यासाठी प्रोत्साहन म्हणून महिन्याला एक याप्रमाणे वर्षांला १२ दिवस मोफत प्रवासाची मुभा देणारी ही योजना २०१६ पासून चर्चेत आहे. पुणे महापालिकेने त्यास यापूर्वीच मान्यता दिली आहे. तथापि, पिंपरी पालिकेची संमती आवश्यक आहे. ती अजून मिळालेली नाही. यासंदर्भात, पुणे महापालिकेने १७ ऑक्टोबर २०१८ ला पिंपरी पालिकेला एक पत्र पाठवून या योजनेबाबत कळवले होते.

मोफत प्रवासाची ही योजना लागू केल्यास साधारणपणे पीएमपीची प्रवासी संख्या तिपटीने वाढेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. त्यानुसार, दर महिन्याला तीन कोटी अतिरिक्त खर्च होणार आहे. यासाठी पुणे पालिकेने सुमारे २० कोटी तर पिंपरी पालिकेने सुमारे साडेचौदा कोटी रुपये संचलनतूट पीएमपीला अदा करणे अपेक्षित आहे. या खर्चास पुणे महापालिकेने मान्यता दिली. तथापि, पिंपरी पालिकेची नकारघंटा दिसून येते. स्थायी  समितीत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर सदस्यांनी हा विषय फेटाळला. अंतिम निर्णय सभेने घ्यावा, अशी शिफारस स्थायी समितीने केली होती. त्यानुसार, २० डिसेंबरला होणाऱ्या सभेच्या विषयपत्रिकेवर हा प्रस्ताव आहे. सभेने स्थायी समितीचाच निर्णय कायम ठेवल्यास या योजनेचे भवितव्य अधांतरी राहणार आहे.

पुणे महापालिकेने ही योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे. तथापि, पिंपरी पालिकेचा अंतिम निर्णय २० डिसेंबरच्या सभेत होणार आहे. २०१६ पासून हा विषय चर्चेत आहे.  योजनेच्या अंमलबजावणीसाठी पिंपरी पालिकेची संमती आवश्यक ठरणार  आहे.

 

पानशेत पुरग्रस्त वसाहतीतील नागरीकांनी प्रलंबित प्रश्नाबाबत अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणे  :- पानशेत पुरग्रस्त वसाहतीतील विशेषता पर्वती दर्शन, शिवदर्शन, दत्तवाडी, एरंडवणा, हेल्थ कॅम्प, जनवाडी, भवानी पेठ येथील नागरीकांनी महसुल मंत्री यांच्या दि.15 जुन 2018 च्या बैठकीत दिलेल्या निर्देशाचे अनुषंगाने तसेच पुनवर्सन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या दि.7 डिसेंबर 2018 च्या बैठकीत दिलेल्या निर्देशाचे अनुषंगाने पानशेत पुरग्रस्त वसाहतीतील नागरीकांच्या मिळकत पत्रिकांमध्ये शासनाकडील अनुदानीत आदेशामधील क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची नोंद झाली आहे अशा मिळकत पत्रिकेवरील संबधीतांनी जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख पुणे यांच्या कार्यालयातअर्ज सादर केल्यास दुरुस्तीची कार्यवाही अवलंबणेत येईल, संपर्कासाठी जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख, पुणे बंगला नं.1, एअरपोर्ट रोड,समता नगर, बदामी चौक, येरवडा, पोस्ट ऑफिसच्या मागे, येरवडा पुणे, इमेल आयडी dslr.pu_mh@gov.in, dslr_pune@yahoo.in ,दुरध्वनी क्र.०२०-२६६८४६५८ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख राजेंद्र गोळे यांनी केले.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे व्यवसाय प्रशिक्षण

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय पुणे मार्फत चालू अर्थिक वर्षात अनुसूचित जातीतील महार, नव बौध्द, बुरुड,भंगी, हिन्दु-खाटीक इत्यादी जातीतील पात्र उमेदवारास टु व्हीलर सर्व्हिस सेंटर, ब्युटी पार्लर, डिप्लोमा, जी.एस.टी, संगणक प्रशिक्षण, फेब्रिकेशन/ वेल्डीग, वाहन चालक मोबाईल रिपेंरींग, फॅशन डिझायनिंग, नेफ्रीजेटर ॲड ऐअर कंडीन्शर रिपेंरीग, मोटार रिवायडींग, रिटेल मॅनेजमेंट इत्यादी व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.  या व्यवसाय प्रशिक्षणासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनिंग कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, इत्यादीसह जिल्हा कार्यालय, 424 मंगळवार पेठ, लडकत पेट्रोल पंपाजवळ पुणे. दुरध्वनी क्र.020-26121295 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत बनसोडे यांनी केले आहे.

शिवसेनेचे सगळे नखरे आम्हाला ठाऊक-मुख्यमंत्री

0

मुंबई-शिवसेनेचे सगळे नखरे आम्हाला ठाऊक आहेत आणि ते आमच्यासोबतच राहतील कुठेही जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपाला अहंकार नडला अशी टीका पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनी केली. मात्र आम्ही अहंकारी नाही आम्ही जमिनीला धरून असलेली माणसं आहोत असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवसेनेने तुमची साथ सोडली तर तुम्ही राज्यात काय कराल? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी शिवसेना आमची साथ सोडणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे नखरे पाहून तर ते तुम्हाला साथ देतील असे वाटत नाही असे मुलाखतकाराने विचारताच शिवसेनेचे नखरे जे तुम्हाला दिसतात तसे नाहीत आम्हाला सगळे नखरे ठाऊक आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

सामनामधील अग्रलेखांबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. सामनातले अग्रलेख वाचले तर वाटते की युती होणे अशक्य आहे यावर तुम्ही काय म्हणाल असे विचारताच, अहो म्हणूनच मी सामना वाचत नाही असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यातला कलगीतुरा कायमच रंगलेला असतो. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे भाजपावर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. असे असले तरीही आम्हाला त्यांचे सगळे नखरे ठाऊक आहेत ते आमची साथ सोडणार नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच राज्यांमधील निवडणुकांबाबत विचारण्यात आले. त्यावेळी या निवडणुकांच्या निकालांवरून लोकसभेचा अंदाज बांधू नका लोकसभा निवडणुकांमध्ये मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राहुल गांधी विरोधकांचे नेतृत्त्व करत आहेत हे चांगलं आहे, पुढची दहा वर्षे तरी त्यांना विरोधातच बसायचे आहे असेही मुख्यमंत्री म्हटले आहेत.

राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही-मुख्यमंत्री

0

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत मात्र त्यांची राजकीय वक्तव्ये आणि व्यंगचित्रे गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पाच राज्यांचे निकाल आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधत पप्पू आता परमपूज्य झाला असे म्हटले होते. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीतून उत्तर दिलं आहे.

पाच राज्यांमधल्या निवडणुकांमधून जनतेने चांगला पायंडा पाडला आहे. इतके दिवस भाजपाचे नेते राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवत होते. मात्र राहुल गांधी आता परमपूज्य झाले आहेत असे राज ठाकरेंनी म्हटले होते. त्याच टीकेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंना गांभीर्याने घेऊ नका असे म्हटले आहे. राज ठाकरेंकडे फक्त आपली मतं मांडतात, त्यांच्याकडे बाकी काही काम नाही. त्यामुळे त्यांना कोणीही गांभीर्याने घेऊ नका असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेबाबत जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी राज ठाकरेंना खूप गांभीर्याने घेऊ नका असे म्हणत त्यांच्या टीकेतली हवाच काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला ठाऊकच आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारविरोधात भूमिका घेत असतात. व्यंगचित्रातूनही व्यक्त होत असतात. राज ठाकरे जे काही बोलतात ते त्यांचे मत असते त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

भाजपाच्या पराभवाबद्दलही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा हा पराभव आहे असे आम्हाला वाटत नाही कारण मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये थोड्या फरकाने ते जिंकले आहेत. छत्तीसगढमध्ये आमची सपशेल हार झाली आहे त्यावर आम्ही आत्मपरीक्षण आणि चिंतन करतो आहोत असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

युग फाउंडेशनच्यावतीने विठ्ठलराव शिवरकर विद्यालयात जागृती अभियान

0

पुणे-युग फाउंडेशनच्यावतीने वानवडी़  भैरोबानाला येथील विठ्ठलराव शिवरकर माध्य. व  उच्च माध्य. विद्यालयातील विद्यार्थिनींना ३६०० सॅनिटरी नॅपकिनचे  वाटप  करुन जागृती अभियान राबविण्यात आले.

 या वेळी युग फाउंडेशनचे अध्यक्ष: कुणाल जेधे, संस्थापक: कणव चव्हाण व फाउंडेशनचे कार्यकर्ते प्रतीक्षा चरण,राहुल बालगोहिरे, गोपी कसोटे, परी हमदुले, विकास कसोटे, कैझ होडीवाला, मिस्बाह शरीफ, सिद्धांत सारवान तसेच विठ्ठलराव शिवरकर  विद्यालयाचे  मुख्याध्यापक  लघु वाघुले, दिपा व्यवहारे,नंदिनी   गायकवाड, दिपाली जाधव आदि मान्यवर उपस्थित होते

    युग फाऊंडेशनचे समनव्यक कनव चव्हाण यांनी सांगितले कि , युग फाऊंडेशन शाळांमध्ये मुलींमध्ये सेनेटरी नॅपकिन वापरण्याबाबत जागरुकता अभियान राबवित आहे . त्यासाठी शॉर्ट फिल्म दाखविण्यात येते . त्यामध्ये सेनेटरी नॅपकिन वापरण्याबाबतचे महत्व सांगण्यात आले . तसेच सेनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात येते.

विठ्ठलराव शिवरकर  विद्यालयाचे  मुख्याध्यापक  लघु वाघुले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले . तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परी हमदुले यांनी केले तर आभार  युग फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल जेधे यांनी मानले .

भीमथडी जत्रेचे १३ व्या वर्षात पदार्पण, पुण्याचा सर्वात मोठा ग्रामीण महोत्सव

0
‘पुनर्वापर , पुनरनिर्माण आणि टिकाऊ संकल्पनेतुन साकारलेल्या उत्पादनांबरोबरच ‘भीमथडी सिलेक्ट
पुणे– ग्रामीण संस्कृतीचा शहरांशी साधलेला एक संवाद सोहळा म्हणून भीमथडी जत्रा नावारूपास आली. महाराष्ट्राची संस्कृतीत ‘जत्रा’ म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, खरेदीचा, भेटीगाठीचा, सांस्कृतिक आदान-प्रदानतेचा एक सणच असतो. भीमथडी जत्रा गेल्या १३ वर्षांपासून पुण्यात  अॉग्रीकल्चरल   डेवलपमेन्ट ट्रस्ट, बारामती या संस्थेच्या वतीने भरवली जाते.  ही जत्रा २२ ते २६ डिसेंबर पर्यंत  अॉग्रीकल्चरल   ग्राऊंड, सिंचननगर, पुणे येथे होणार आहे.
अॅग्रीकल्चरल डेवपलपमेन्ट ट्रस्ट, बारमतीच्या सौ. सुनंदा पवार यांच्या  हस्ते  २२ डिसेंबर रोजी  भिमथडीचे उद्घाटण होईल. ह्या वर्षी  २०० हून अधिक ग्रामिण संस्कृतीचे स्टॉल भीमथ़डी मध्ये पहावयास मिळतील
अॅग्रीकल्चरल डेवपलपमेन्ट ट्रस्ट, बारमतीच्या सौ. सुनंदा पवार यांच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण कृतीशील मार्गदर्शातून, मेहनतीतून ‘भीमथडी जत्रा’ हा अभिनव उपक्रम नावरूपाला आला. यंदा भीमथडी जत्रा आपल्या १३ व्या वर्षात पदार्पण करते आहे. या वर्षीच्या भीमथडी जत्रेला पुणेकर भरघोस प्रतिसाद देतील, असा विश्वास त्यांना आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, महिला बचत गटांची दर्जेदार उत्पादने, हस्तकला वस्तू , महाराष्ट्राचे अस्सल खाद्य पदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन या सर्व गोष्टींचा एकाच छताखाली पुणेकरांना आनंद घेता येतो. म्हणून भीमथडी जत्रेला गेल्या १३ वर्षात पुणेकरांनी प्रचंड प्रेम दिलं. ग्रामीण महिलांच्या मेहनतीला  आणि ग्रामीँण कलाकरांच्या कलागुणांना दाद देण्याच्या उद्देश्यातुन आम्ही भीमथडी जत्रेची सुरवात केली. यातून महिला बचत गटांची आर्थिक  उन्नती झाली. अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहील्या.
सई पवार नेगी यांच्या संकल्पनेतुन साकारलेली भिमथाडी सिलेक्ट  थिम ह्यावर्षी देखील पहावयास मिळते ज्यात  फॉशनच्या अनोख्या स्टॉलचा एक विशेष विभाग आहे. येथे भारतातील पारंपारिक हातमाग, हस्तकला आणि इतर हस्तशिल्प पुनरुज्जीवन व कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, “यावर्षी पारंपारिक हातमाग, हस्तकला आणि भारताच्या इतर शिल्पकला पुनरुज्जीवित आणि टिकवून ठेवण्याच्या क्षेत्रात काम करणार्या कारागीर,  आणि डिझायनर असलेल्या 38 स्टॉलचा एक विशेष विभाग दर्शविला जाईल. गेल्या वर्षी पुणेकरांचा त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला होता आणि यामुळे त्यांना प्रचंड यश मिळाले. भीमथाडी सिलेक्टमध्ये ‘रीसायकल, रीयूज अँड  सस्टेन’ च्या विचारधारेच्या आधारावर  उत्पादनांची थीम तयार केली आहे. ”
भीमथडी  सिलेक्ट मधील डिझाइनर आणि कारागीरांनी  नैसर्गिक साहित्य जसे सेंद्रिय कापूस, खादी, लिनेन आणि नैसर्गिक रंगांचा वापर केला आहे. धाग्यांपासून ते अंतिम उत्पादनापर्यंत प्रत्येक कपडे कुशल विणकर आणि कारागीरांनी हाताने तयार केली आहेत.

भीमथडी जत्रेचे  १३ वे वर्ष –
शनि २२ डिसेंबर – संध्याकाळी ४ ते रात्री १०
रविवार २३ ते बुधवार २६ डिसेंबर – सकाळी १० ते रात्री १०
स्थान: अँग्रीकल्चरल कॉलेज ग्राउंड, सिंचन नगर, पुणे

या वर्षीच्या भीमथडी जत्रेचे वेळापत्रक-

1 २२ डिसेंबर उद्घाटन (४ वाजता)
2 २२ डिसेंबर सुफियान मलिक – कश्मीरी संगीतकार यांची राबाब प्रस्तृती  (सायंकाळी ७ वाजता )
3 २३ डिसेंबर त्रिधरा-आभाऊती आणि ऋषिकेश पवार यांचे सादरीकरण, एकाच छताखाली असलेल्या लोकांनी जीवनाच्या वेगवेगळ्या मार्गातून साकारलेली कथा, यातील शास्त्रीय कथ्थक या उत्सवाची सुंदरता प्रकट करेल आणि एक जादुई ताल निर्माण करेल

(सायंकाळी ७ वाजता)

4 २४ डिसेंबर बॉलीवूड फिल्म / म्युझिक इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कलाकार कविता सेठ यांचे प्रस्तृतीकरण जसे की इकतारा, तुम हे बंधू, जीते हे चल इत्यादी                                          (सायंकाळी ७ वाजता)
5 २५ डिसेंबर अभंगा रीपोस्ट-जाझ स्वरूपात मराठी अभंगाचा अनन्य अनुभव (सायंकाळी ७ वाजता)
6 २६ डिसेंबर स्पंदन – कथक आणि बॉलीवूड फ्यूजन

(सायंकाळी ७ वाजता)

लोकसहभागातून नद्या जलपर्णी मुक्त करणे शक्य :प्रदीप वाल्हेकर

0
पुणे :जीविधा, निसर्गसेवक व देवराई फाऊंडेशन या संस्थांतर्फे तर्फे ” जलपर्णी मुक्त ,स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान” या विषयावर पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते प्रदीप वाल्हेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .
बुधवार दि. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता. इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर,दत्तवाडी येथे हे व्याख्यान झाले  . प्रदीप वाल्हेकर म्हणाले ,’ आपल्या देशातील सर्व नद्या जलपर्णी या विदेशी वनस्पतीने भरल्या आहेत. यामुळे एका बाजूला नदी पात्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे तर दुसरीकडे डासांची संख्या वाढत आहे. जलपर्णी निर्मुलन हा मोठा प्रश्न आपल्यापुढे उभा आहे. फक्त कंत्राटे देऊन जलपर्णी नदीतून पुढे ढकलली जाते ,पण नष्ट होत नाही . आम्ही पर्यावरणप्रेमी एकत्र येऊन रोटरी आणि लोकसहभागातून जलपर्णी मुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई हे जीवनध्येय मानून अभियान सुरू केले आहे. स्वतःच्या खिशातून लाखो रुपये घालून आम्ही पवना नदी जलपर्णी मुक्त करण्याचे काम करत आहोत .
नदी स्वच्छ ,प्रवाही ,निर्मळ ठेवण्याच्या  प्रेरणेने अनेक कार्यकर्त्यांची फौज याकामी उभी राहिली आहे. जलपर्णी पक्व होण्याआधी काढली तरच ती परत परत येणार नाही हे या अभियानाचे सुत्र आहे. या मोहिमेची माहिती  व्याख्यानातून देण्यात आली   .
जलपर्णी चे पुनरुत्पादन चक्र तोडणे हाच एकमेव उपाय असल्याचे वाल्हेकर यांनी सांगितले . पाण्यातील जलपर्णीला फुले ,फळे आली की हजाराच्या पटीत बिया नदीत पसरून जलपर्णीची भयानक वाढ होते . आणि नदीचे पात्र भरून जाते . जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होते आणि पवनेच्या काठच्या गावांना तेच पाणी शुद्ध करून पिण्यासाठी खर्च करावा लागतो .
जलपर्णी नष्ट करण्याच्या बाबतीत पालिका ,प्रशासन ,गावकरी यांच्यात जागृती घडवून एकत्रित कामाची गरज असल्याचे वाल्हेकर यांनी सांगितले .
पवनेपाठोपाठ इंद्रायणी नदी स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी  दिली .
 धनंजय शेडबाळे यांनी प्रास्ताविक केले . यावेळी जीविधा ‘चे संचालक राजीव पंडित ,उष:प्रभा  पागे ,शैलेंद्र पटेल तसेच अनेक पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते  हे व्याख्यान सर्वांसाठी विनामूल्य होते .

भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित ‘ जननी ‘ एकपात्री प्रयोगाला चांगला प्रतिसाद

0
साहित्य प्रकारातील आईच्या विविध रुपांचे घडले   विश्वरूप दर्शन !
पुणे :भारतीय  विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे  सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत अंजली कऱ्हाडकर प्रस्तुत  ‘ जननी  ‘ एकपात्री प्रयोगाचे  बुधवारी ,१२ डिसेंबर रोजी आयोजन   करण्यात आले होते .सरदार नातू सभागृह ,भारतीय विद्या भवन ,सेनापती बापट रस्ता येथे १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम झाला. त्याला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
‘जननी ‘ म्हणजे आईची महती साहित्यातील विविध प्रकारांमध्ये वर्णिली आहे . कथा ,कादंबऱ्या ,कविता ,नाटक यामधील आईची रूपे मांडणारा हा आगळा वेगळा एकपात्री प्रयोग अंजली कऱ्हाडकर  यांनी सादर केला.
 भारतीय विद्या  भवन -इन्फोसिस फाऊंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा ६३ वा कार्यक्रम होता. . हा कार्यक्रम विनामूल्य ,सर्वांसाठी खुला होता.

अंजली कऱ्हाडकर  यांनी ‘जननी ‘कार्यक्रमा अंतर्गत साहित्यातील अनेक  व्यक्तिरेखा, स्वगते, नाट्यपदे, नाट्यछटा गाऊन व साभिनय सादर केल्या.

‘अनंतयुगाची जननी ‘हा समर्थ रामदासांच्या अभंगाने कार्यक्रमाचा आरंभ झाला . ‘ वीज म्हणाली धरतीला ‘ हा राणी लक्ष्मीबाईंचा वि .वा .शिरवाडकर लिखीत नाट्यप्रवेश अतिशय जोशपूर्ण आणि त्वेषात सादर झाला. बहिणाबाईंच्या  ‘आज माहेराला जाणे ‘ या कवितेतून सासुरवाशिणीचे भावविश्व उलगडले.
 नाट्य छटाकार दिवाकर यांची ‘ चिंगी महिन्याची ‘ ही नाट्य छटा त्यांनी सादर केली. सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे  तेंव्हा आताची आधुनिक माता कशाप्रकारे मुलांना विविध क्लास लावते, स्पर्धेत टिकण्यासाठी त्यावरील नाटिका सादर केली गेली.
 मंगेश पाडगांवकर यांची ‘चिऊताई ‘  ही कविता सादर करण्यात आली.सुधा मूर्ति यांची ‘गौरम्मा ‘ ही रचना सादर झाली.
वसंत कानेटकर लिखित ‘ हिमालयाची सावली ‘आणि ‘अखेरचा सवाल ‘ हे नाट्य प्रवेश सादर झाले. बालगंधर्व यांचे ‘ नाही मी बोलत नाथा ‘ हे नाट्य पद गाऊन साभिनय सादर केले.
 कार्यक्रमाची सांगता तुकाराम महाराजांच्या ‘ मायेविण बाळ ‘या अभंगाने झाली.
 अंजली क-हाडकर यांना प्रांजली पाध्ये यांनी संवादिनीची तर अमित अत्रे यांनी तबल्याची साथ केली .
 भारतीय विद्या भवनचे मानद सचिव   प्रा.नंदकुमार काकिर्डे    यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक   केले

सृजन करंडक स्पर्धेत आर्य स्पोर्टस्, प्रदिपदादा कंद स्पर्टस् क्लब संघांची आगेकुच

0
पुणे- पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत आर्य स्पोर्टस् संघाने  मंगेशभाऊ गाडे युवा मंच येलवडी(खेड) संघाचा तर प्रदिपदादा कंद स्पर्टस् क्लब संघाने शिवनगर क्रिकेट क्लब  संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 
 
लेजेन्डस् क्रिकेट क्लब, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत बालाजी पवारच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर आर्य स्पोर्टस्(शिवसैनिक) संघाने मंगेशभाऊ गाडे युवा मंच येलवडी(खेड) संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना मंगेशभाऊ गाडे युवा मंच येलवडी(खेड) संघाने 6 षटकात 4बाद 52 धावा केल्या. 52 धावांचे लक्ष बालाजी पवारच्या 19, वौभव पांडूलेच्या 18 व राजेंद्र पानेसरच्या 13 धावांच्या बळावर आर्य स्पोर्टस्(शिवसैनिक) संघाने 4.1 षटकात 4 बाद 56 धावांसह सहज पुर्ण करत विजय मिळवला. 19 धावा करणारा बालाजी पवार सामनावीर ठरला. 
 
दुस-या लढतीत शुभम टाळेकरच्या अष्टपैलू कामगिरीसह प्रदिपदादा कंद स्पर्टस् क्लब  संघाने शिवनगर क्रिकेट क्लब संघाचा 16 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अमित तपकीरच्या 30, प्रमोद कंदच्या नाबाद 14 व शुभम टाळेकरच्या नाबाद 11 धावांच्या बळावर प्रदिपदादा कंद स्पर्टस् क्लब संघाने 6 षटकात 2 बाद 65 धावा केल्या. 65 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्वप्निल शिवले व शुभम टाळेकर यांच्या अचूक गोलंदाजीपुढे शिवनगर क्रिकेट क्लब संघ 6 षटकात 3 बाद 49 धावांत गारद झाला. नाबाद 14 धावा व 10 धावांत 1 गडी बाद करणारा शुभम टाळेकर सामनावीर ठरला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी 
मंगेशभाऊ गाडे युवा मंच येलवडी(खेड)- 6 षटकात 4बाद 52 धावा(निलेश काळे नाबाद 22, प्रशांत चौधरी 2-16, सौरभ दोडके 1-17, निलकंठ पवार 1-4) पराभूत वि आर्य स्पोर्टस्(शिवसैनिक)- 4.1 षटकात 4 बाद 56 धावा(बालाजी पवार 19, वौभव पांडूले 18, राजेंद्र पानेसर 13, नितिन पवार 2-15, अमित बावले 1-18, राजेंद्र येवले 1-22)सामनावीर- बालाजी पवार
आर्य स्पोर्टस्(शिवसैनिक) संघाने 6 गडी राखून सामना जिंकला.
 
प्रदिपदादा कंद स्पर्टस् क्लब- 6 षटकात 2 बाद 65 धावा(अमित तपकीर 30, प्रमोद कंद नाबाद 14, शुभम टाळेकर नाबाद 11, तन्वीर शेख 2-3) वि.वि शिवनगर क्रिकेट क्लब- 6 षटकात 3 बाद 49 धावा(श्रीराम सोळे नाबाद 20, निलेश डोंबाळे 15, उमेश जाधव 14, स्वप्निल शिवले 2-8, शुभम टाळेकर 1-10) सामनावीर- शुभम टाळेकर 
प्रदिपदादा कंद स्पर्टस् क्लब  संघाने 16 धावांनी सामना जिंकला.  

राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे उत्पादन क्षेत्राला मर्यादा- कर्नल अशोक सोमण

0

पुणे- सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे भारताला उत्पादन क्षेत्रात अपेक्षित प्रगती करण्यात मर्यादा येत असल्याचे मत व्यवस्थापन तज्ज्ञ कर्नल अशोक सोमण यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी व पद्मावती प्रतिष्ठान यांच्या वतीने पद्मावती बनहट्टी यांच्या स्मरणार्थ आयोजित भारत उत्पादन क्षेत्रात हब होऊ शकतो का? या विषयावर सोमण बोलत होते. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, पद्मावती प्रतिष्ठानच्या कौमुदी बनहट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोमण पुढे म्हणाले, ‘उत्पादन क्षेत्रात चीनने मोठी प्रगती केली आहे. एकपक्षीय सत्ता, भारताच्या चार पट क्षेत्रङ्गळ, सरकारकडे जमिनीची मालकी, कार्यक्षमता, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दळणवळण व्यवस्था, मोठ्या प्रमाणात सबसिडी यामुळे चीनला हे यश शक्य झाले आहे. राजकीय इच्छाशक्ती, आधुनिक तंत्रज्ञान, दळणवळणाच्या सुविधा व कार्यकुशलता वाढविल्यास भारत उत्पादन क्षेत्राचे हब होऊ शकेल.’
सोमण पुढे म्हणाले, ‘कृषी, सेवा व उद्योग क्षेत्रात संतुलित विकास केल्यास अर्थव्यवस्था सक्षम होऊ शकते.’ १९७२ पासून दरवर्षी पद्मावती व्या‘यानाचे आयोजन करण्यात येत आहे.