Home Blog Page 3028

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अवतरणार ‘सिम्बा’

0

आपला रोजचा ताणतणाव विसरून आपल्याला हसायला लावणारी, अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करणारी मालिका म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ अवघ्या काही दिवसातच हा कार्यक्रम लोकप्रिय ठरला आणि त्यातील कलाकार महाराष्ट्रातील नव्हे तर परदेशातीलही रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत. ४०० भागांचा यशस्वी टप्पा पार पडल्यावर या चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल हे नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे ज्यात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे.

मराठीच नव्हे तर आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, रितेश देशमुख, इरफान खान, जॉन अब्राहम, रविना, नाना पाटेकर, विद्या बालन यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील या मंचावर हजेरी लावली. आता ‘सिम्बा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रणवीर सिंग लवकरच झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमात येणार आहे.

रणवीर सिंग, सारा अली खान, दिग्दर्शक रोहित शेट्टी, तसेच चित्रपटातील बाकीची कास्ट अभिनेता सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, सुचित्रा बांदेकर, अश्विनी काळसेकर, सौरभ गोखले आणि अशोक समर्थ हे देखील उपस्थित होते. आता हे कलाकार थुकरट वाडीत सज्ज होणार म्हटल्यावर विनोदवीरांनीदेखील धमाल केली. थुकरट वाडीत चेन्नई एक्सप्रेस आणि सिंघम या चित्रपटांवर आधारित विनोदी स्किट सादर करण्यात आलं. या धमाकेदार स्किटने सर्व कलाकारांना पोट धरून हसायला लावलं. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना त्यांचं हे स्किट इतकं आवडलं की रोहितने सगळ्यांचं तोंडभरून कौतुक तर केलंच पण त्याच सोबत त्याने निलेशकडे या स्किटचे राईट्स मागितले आणि त्या स्किटवर चित्रपट बनवायला आवडेल असं हि म्हणाला.

तेव्हा सिम्बा चित्रपटाच्या टीमसोबत विनोदवीरांनी केलेली हि धमाल पाहायला विसरू नका चला हवा येऊ द्या मध्ये २४ आणि २५ डिसेंबर सोमवार व मंगळवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर!!!

‘भीमा कोरेगाव’चा रिपब्लिकन पार्टीकडून आढावा

0
पुणे : गेल्यावर्षी भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनातर्फे तयारी सुरु आहे. येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला देशभरातून नागरिक येतात. त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबची तयारी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) अभिवादन सभेच्या कार्यक्रमाचा आढावा पक्षाच्या वतीने घेण्यात आला. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, कामगार आघाडीचे महेश शिंदे, पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, युवक शहराध्यक्ष शैलेश चव्हाण यांनी शुक्रवारी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट देऊन परिसराची पाहणी केली. येथे नागरिकांसाठी उभारण्यात येत असलेल्या सुविधा, तसेच विविध संस्था, संघटनांच्या कार्यक्रमासाठीचे नियोजन याचा आढावा घेतला.
तत्पूर्वी, पक्षाच्या वतीने विजयस्तंभ दिनादिवशी आयोजिलेल्या अभिवादन सभेच्या नियोजनाची बैठक झाली. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हा या तीनही विभागातून रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार आहेत. या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष परशुराम वाडेकर, कामगार आघाडीचे महेश शिंदे, पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, अल्पसंख्याक आघाडीचे ऍड. अयुब शेख, रफिक दफेदार, नगरसेविका हिमाली कांबळे, नीलेश आल्हाट, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, महिला अध्यक्ष शशिकला वाघमारे, महिला आघाडीच्या प्रियदर्शिनी निकाळजे, संगीता आठवले, संजय सोनावणे, वसंत बनसोडे, किरण भालेराव, संतोष खरात, तात्या जगताप, विक्रम आल्हाट यांच्यासह २५० ते ३०० पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बाळासाहेब जानराव म्हणाले, “अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यंदा प्रथमच अभिवादन सभा विजयस्तंभापासून दूर होत आहे. गेली ३० वर्षे अभिवादन सभा विजयस्तंभाजवळ होत असे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ही अभिवादन सभा पेरणे फाटा येथील टोलनाक्याजवळ होणार आहे. त्यासाठी २० हजार फुटांचा मंडप घालण्यात येणार आहे. ५००० पेक्षा अधिक लोकांच्या बसण्याची व्यवस्था येथे केली जाणार आहे. आठवले साहेबांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे एक हजार कार्यकर्ते सुरक्षाकवच देणार आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातून ३००, पिंपरी-चिंचवडमधून २००, तर पुणे शहरातून ५०० कार्यकर्ते पक्षाचे टी-शर्ट घालून सुरक्षा व्यवस्था पुरविणार आहेत.”

कार्तिक हिरपाराच्या शतकी खेळीसह सिनेक्रोन संघाचा विजय

0
पुणे- आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत सिनेक्रोन संघाने अर्न्स्ट अँड यंग संघाचा तर स्प्रिगर नेचर संघाने व्हेरीटास संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मौदानावर झालेल्या सामन्यात कार्तिक हिरपाराच्या आक्रमक शतकी खेळीच्या जोरावर सिनेक्रोन संघाने अर्न्स्ट अँड यंग संघाचा 59 धावांनी दणणात पराभव केला. पहिल्यांदा खेळताना कार्तिक हिरपाराच्या झंजावाती फलंदाजीच्या बळावर सिनेक्रोन संघाने 20 षटकात 5 बाद 201 धावांचा डोंगर रचला. कार्तिकने 22 चौकार व 2 षटकांसह केवळ 70 चेंडूत दमदार 123 धावा केल्या. 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हर्षद जोशी व प्रतिक पांडा यांच्या अचूक गोलंदाजीपुढे अर्न्स्ट अँड यंग संघ चार चेंडू बाकी असताना सर्वबाद 142 धावांत गारद झाला. 70 चेंडूत 123 धावा करणारा कार्तिक हिरपारा सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत जयप्रकाश शिरोळेच्या अचूक व आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर स्प्रिगर नेचर संघाने व्हेरीटास संघाचा 3 गडी राखून पराभव केला.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी     
सिनेक्रोन – 20 षटकात 5 बाद 201 धावा(कार्तिक हिरपारा 123(70), विश्वजीत उधान 2-24) वि.वि अर्न्स्ट अँड यंग- 19.2 षटकात सर्वबाद 142 धावा(झुबेर हसन 32(25), चिन्मय जोशी 37(24),जमीर शेख 21-3, हर्षद जोशी 3-27, प्रतिक पांडा 2-13) सामनावीर- कार्तिक हिरपारा
सिनेक्रोन संघाने 59 धावांनी सामना जिंकला.  
व्हेरीटास- 20 षटकात 8 बाद 96 धावा(सुमित दिघे 21(34), सुशांत मुळे 23(21), जयप्रकाश शिरोळे 3-9) पराभूत वि स्प्रिगर नेचर- 16 षटकात 7 बाद 97 धावा(राहुल नगाडे 46(47), सुमित दिघे 5-13) सामनावीर- जयप्रकाश शिरोळे
स्प्रिगर नेचर संघाने 3 गडी राखून सामना जिंकला.  

शेतकर्‍यांसाठी ग्राहकाधिष्ठीत वितरण सुविधा -विद्युत नियामक आयोगाची मंजुरी

0

मुंबई:- राज्यात मार्च-२०१८ अखेर पैसे भरुंन प्रलंबित असणार्‍या २ लाख २४ हजार ७८५ शेतकर्‍यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याच्या कामास सुरूंवात झाली असून राज्यातील काही शेतकर्‍यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्यात आलेला आहे. राज्यातील शेतकर्‍यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शेतकर्‍यांना शाश्वत वीजपुरवठा मिळांवा या उद्देशाने मुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री ना. श्री चंद्रशेखर बावनकुळें यांच्या पुढाकाराने ही योजना अंमलात आणण्यात आली असून डिसेंबर -२०१९ अखेरपर्यंत यासर्व शेतकर्‍यांना महावितरणकडून उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्यात येईल. या प्रणालीवर सुमारे ५ हजार ४८ कोटी रूंपये खर्च होणार असून या  प्रणालीमुळें शेतकर्‍यांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळंणार आहे. तसेच प्रत्येक शेतकर्‍यांसाठी समर्पित रोहित्र राहणार असल्यामुळें शेतकर्‍यांमध्ये रोहित्रांप्रती स्वामित्वाची भावना निर्माण होईल. या प्रणालीमुळें शेतकर्‍यांच्या शेती उत्पादनात वाढ होणार असून रोहित्र नादुरुंस्त होण्याचे प्रमाणे कमी होईल. तसेच तांत्रिक व वाणिज्यिक हानीचे प्रमाण कमी होईल.

उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे लवकर वीजपुरवठा करण्यात यावा, याकरिता अनेक शेतकर्‍यांनी मा.मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यानुसार मा.ऊर्जामंत्री यांनी अशा शेतकर्‍यांसाठी ग्राहकाधिष्ठीत वितरण सुविधा (डीडीएफ) अंमलात आणण्याचे निर्देश दिले व मा. आयोगाकडेही याबाबत पाठपुरावा केला. त्याद्दष्टीने महावितरणने  मा. आयोगाकडे याचिका सादर केली होती. या याचिकेवर मा. आयोगाने तातडीने सुनावणी घेवून दि. १८ डिसेंबर २०१८ रोजी सदर याचिकेस मंजुरी प्रदान केली. त्यामुळें ग्राहकाधिष्ठीत वितरण सुविधेद्वारे वीजपुरवठा घेऊ इच्छिंणार्‍या शेतकर्‍यांना या सुविधेचा लाभ घेता येईल. यापूर्वी, शेतकर्‍यांना  वीजपुरवठा देण्यासाठी ही सुविधा उपलब्ध नव्हती.

सध्या अस्तित्वात असलेल्या कृषीपंपधारक शेतकर्‍यांना तसेच प्रलंबित यादीत असणार्‍या  शेतकर्‍यांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकाधिष्ठीत वितरण सुविधेद्वारे वीजपुरवठा घेण्यासाठी लागणारी उच्चदाब वाहिनी व रोहित्राचा खर्च शेतकर्‍यांना स्वतः करावा लागणार आहे. त्यानंतरच महावितरणद्वारे त्यांना नवीन वीजपुरवठा जोडून देण्यात येणार आहे व लघुदाब वाहिनीवरुंन उच्चदाब वाहिनीवर स्थलांतरित केले जाईल. तसेच, कृषीपंपधारक शेतकर्‍याने कुठल्याही कारणास्तव कायमस्वरुंपी वीजपुरवठा खंडित केला (पीडी) तर त्या शेतकर्‍याला केलेल्या खर्चाच्या रक्कमेची परिपूर्ती घसारा पध्दतीनुसार  करण्यात येईल.

एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन 3लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत साई संहिता चमर्थी हिला दुहेरी मुकुट

0
  • पुरुष गटात दिल्लीच्या अनुराग नेनवानी याला विजेतेपद 

पाचगणी- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन  3लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत महिला गटात साई संहिता  चमर्थी हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटांत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, पुरुष गटात दिल्लीच्या अनुराग नेनवानी याने विजेतेपद पटकावले आहे.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत महिला गटात अव्वल मानांकित तामिळनाडूच्या साई संहिता चमर्थी हिने कर्नाटकच्या दुसऱ्या मानांकित प्रतिभा नारायण 6-0, 6-3 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. साई ही एमओपी वैष्णा येथे वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षाला शिकत असून चेन्नई टेनिस सेंटर येथे प्रशिक्षक सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे हे या वर्षातील दुसरे विजेतेपद आहे. महिला गटातील विजेत्या खेळाडूला करंडक व 16एआयटीए गुण प्रदान करण्यात आले.

पुरुष गटात अंतिम फेरीत चौथ्या मानांकित दिल्लीच्या अनुराग नेनवानीने आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या अरमान भाटियाचा टायब्रेकमध्ये 7-6(0), 6-1असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1तास 10मिनिटे चालला.  अनुराग हा एसजीटीबी खालसा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षाला शिकत असून आदर पुनावाला महाराष्ट्र टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक आदित्य मडकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. पुरुष गटांतील विजेत्या खेळाडूला करंडक व 35एआयटीए गुण प्रदान करण्यात आले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण इवो वेल्तुजीस,  स्पर्धा संचालक जावेद सुनेसरा व एआयटीए सुपरवायझर वैशाली शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: पुरुष गट:

अनुराग नेनवानी(दिल्ली)(4)वि.वि.अरमान भाटिया(महा)(8)7-6(0), 6-1;

महिला गट:

साई संहिता  चमर्थी(तामिळनाडू)(1)वि.वि.प्रतिभा नारायण(कर्नाटक)(2)6-0, 6-3

विनामूल्य प्लास्टिक सर्जरी शिबिर शिरूर येथे शनिवारी व रविवारी

0

पुणे : अगरवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्ट, आर. एम. धारिवाल फाउंडेशन आणि गायत्री परिवार याच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक्स व हॅन्ड सर्जरी शिबिर आयोजिले आहे. शिबिराचे हे नववे वर्ष असून, दि. २२  व २३ डिसेंबर २०१८ या दोन दिवशी शिरूर येथील मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल येथे हे शिबीर होणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध हॅन्ड सर्जन डॉ. पंकज जिंदल, ट्रस्टचे अध्यक्ष सतीश नेवातीया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे सचिव अरुण सिंघल, खजिनदार संजय अगरवाल, प्रकल्प संचालक उमेश जालान, राजीव अगरवाल मदनबाई धारिवाल हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. भूषण सोमवंशी आदी उपस्थित होते.

डॉ. पंकज जिंदल म्हणाले, “भाजल्यामुळे झालेल्या जखमा, जन्मतः असलेले हाताचे, पायाचे किंवा शरीराचे व्यंग, वाकडी बोटे, मस, चेहऱ्यावरील वाकडे व्रण, मुरुमांमुळे झालेले खड्डे, दुभंगलेले ओठ, वाकडे नाक आदी गोष्टींवर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. स्त्री व मुलींना प्राधान्य देण्यात येणार असून, गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. या सगळ्या शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत असणार आहेत.”

डॉ. पंकज जिंदल म्हणाले, “देशात ७० लाख लोकांना भाजल्यामुळे मोठ्या जखमा झाल्या आहेत. जेणेकरुन त्यांना दैनंदिन काम करणेही शक्य होत नाही. अशा लोकांवर उपचार करुन त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. अनुभवी सर्जनकडून या शस्त्रक्रिया केल्या जात आहे. या शस्त्रक्रियांमुळे जीवन बदलून गेले आहे. पुढील काही वर्षात या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. गावांमध्येही अनेक लोक अशा शस्त्रक्रियांपासून वंचित आहेत.”

सतीश नेवातीया म्हणाले, “डॉ. पंकज जिंदल यांनी आपल्या अनुभवी टीमसह सामाजिक भावनेतून हजारो रुग्णांवर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करुन त्यांना नवी ओळख दिली आहे. गेल्या नऊ वर्षात शेकडो रुग्ण पुन्हा नव्याने सुरळीत आयुष्य जगू लागले आहेत. त्यामुळे या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा. शिबीराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व गरजू व्यक्तींनी १९ डिसेंबर २०१८ नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ७५८८१४८८०५, ७०६६०२८११३, ९०११००७६६९ किंवा ०२१३८-२२५५९९, २२४५९९ या क्रमांकावर संपर्क साधावा.”

दलित कोब्राच्यावतीने बैठा सत्याग्रह

0

पुणे-भारतीय दलित कोब्राच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर नागरिकांच्या विविध मागण्यासाठी बैठा सत्याग्रहास सुरवात करण्यात आली . हा बैठा सत्याग्रह सर्व जाती धर्माच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे , दलित ओ बी सी मागास विद्यार्थ्यांना सर्वच शिक्षण मोफत देण्यात यावे , बेघरांना हक्काचा निवारा देण्यात यावा व इतर मागण्यांसाठी हा बैठा सत्याग्रहास सुरवात करण्यात आली . भारतीय दलित कोब्राचे कोब्राराजे ऍड. भाई विवेक चव्हाण यांच्या नेर्तृत्वाखाली या बैठा सत्याग्रह्यामध्ये मोठया संख्येने नागरिक सहभागी झाले . शुक्रवार २१ डिसेंबर २०१८ ते सोमवार  २४ डिसेंबर २०१८ पर्यंत हा बैठा सत्याग्रह  असणार आहे . या मागण्याचे निवेदन  शासनास दिल्याचे भारतीय दलित कोब्राचे कोब्राराजे ऍड. भाई विवेक चव्हाण यांनी सांगितले

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे आदिवासी भागात १३० शौचालये व सोलर पंपाची उभारणी

0
पुणे : ग्रामीण भागातील आरोग्य चांगले राहावे आणि परिसरातील वातावरण स्वच्छ व सुरक्षित राहण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात एकूण १३० शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. त्यातील तिसऱ्या टप्प्यातील वाडा तालुक्यातील बावेघर, हमरापूर व केव गावात ५० शौचालयांचे व सोलर पंपाचे उद्घाटन कोकण विभागाचे पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे बी. आर. मेहता, ठाण्यातील सैनिक वेल्फेअर संस्थेचे श्री. गायकवाड, वाडा पंचायत समितीचे श्री शिंदे, विक्रमगढ पंचायतीचे श्री पवार यांच्यासह गावकरी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने व खेरवाडी सोशल वेल्फेअर असोशिएशनच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अत्याधुनिक शौचालये बांधली आहेत. याआधी वाडा तालुक्यातील सोनाळे या गावात ५० शौचालये, सौरदिवे बसविण्यात आले. झेडएफ स्टिअरिंग गिअर या कंपनीच्या मदतीने वडवली गावात ३० शौचालये सौरदिव्यांसहित उभारली आहेत. वडवली गावातील नागरिकांना दूरवरून पाणी  आणावे लागत असल्याने त्यांच्या सोयीसाठी फाउंडेशनच्या पुढाकारूतून सोलर वॉटर पंप बसविण्यात आला आहे. या उपक्रमातून जमलेला एक लाख रुपयांचा निधी सैनिक वेल्फेअर संस्थेकडे सुपूर्त करण्यात आला.
यावेळी बोलताना सुरेश मेंगडे म्हणाले, “पुण्यातून पालघरमध्ये येऊन या आदिवासी बांधवांच्या आरोग्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. आपल्या गावाच्या विकासासाठी स्थानिकांनीही या संस्थाना प्रतिसाद देत या सुविधांचा सुयोग्य वापर करावा. आपली व परिसराची स्वच्छता राखणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.”
याबाबत बोलताना मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया म्हणाल्या, “स्वच्छतेच्या योग्य सोयीसुविधा असतील, तर जीवघेण्या आजारांपासून कुटुंबाचे रक्षण होईल. त्यातून समाजाचे आरोग्य चांगले राहील. उघड्यावर शौचाला बसणाऱ्या लोकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शौचालये आणि सौर दिव्यांसह या भागात पाणी संवर्धनासाठी उपक्रम सुरु आहेत. त्यामध्ये गाळ काढणे, छोटे बंधारे बांधणे आदींचा समावेश आहे. मुंबईपासून ११५ किमी अंतरावर असलेल्या पालघरमधील बहुतांशी आदीवासी गावे प्राथमिक गरजांपासून वंचित आहेत. त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी फिनोलेक्स व मुकुल माधव फाऊंडेशन प्रयत्नशील आहे.” झेडएफ स्टिअरिंग गिअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्कर्ष मुनोत यांनी या सामाजिक कार्यात सहभागी होता आल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

‘गो ग्रीन-से नो टु प्लास्टिक’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन

0
पुणे : सुपरमाईंड फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ युवा, नटराज निकेतन, नागपूर व सामवेद इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिकबंदी व प्लास्टिकऐवजी पर्यायी नैसर्गिक घटकांच्या वापरातून ‘गो ग्रीन-से नो टू प्लास्टिक’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 5 जानेवारी 2019 रोजी मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कुल येथे सकाळी 9 ते 10 या वेळेत पुण्यातील चित्रकला स्पर्धा होणार आहे.
या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रसिद्ध कार्टूनिस्ट चारुहास पंडित सुपारीच्या पानांपासून बनविलेल्या प्लेटवर पहिले चित्र काढून स्पर्धेची सुरवात करणार आहेत. आमदार मेधा कुलकर्णी, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडके, ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांच्यासह पुण्यातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित असणार आहेत.
या स्पर्धेत चित्र काढण्यासाठी कागदाऐवजी सुपारीच्या पानापासून बनविलेल्या प्लेटचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे ही चित्रकला स्पर्धा जगातील आगळीवेगळी स्पर्धा ठरणार आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्यातर्फे या स्पर्धेची विशेष दखल घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी येणार्‍या शालेय विद्यार्थी स्पर्धकांना विनामूल्य प्लेट देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेमध्ये माँटेसरी ते ज्येष्ठ नागरिक या गटातील सर्वजण भाग घेऊ शकतात. या स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे ’गो ग्रीन-से नो टू प्लास्टिक’ अंतर्गत सुपारीच्या झाडापासून बनविलेल्या प्लेट्सवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा भारतामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, मध्यप्रदेश, छत्तीसगड यासह देशातील अनेक प्रमुख शहरांच्या ठिकाणी एकाच वेळी घेण्यात येणार असून, सहभागी होणार्‍या प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी सर्व शाळांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी बसवावे व ‘प्लास्टिकचा वापर टाळा व त्या ऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करा’ असा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तसेच वेगवेगळ्या वयोगटांकरिता विभिन्न विषय दिले जाणार आहेत. यात प्रामुख्याने गट ए, बी, सी, डी, इ, एफ अशा सहा गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. कोणतेही फळ किंवा फुल, आवडता ऋतू, निसर्गचित्र/दृश्य, जग वाचवा/पृथ्वी वाचवा, एकता-अनेकता/एकतेचेे बळ, टीम वर्क अशा संकल्पनेवर ही चित्रे असणार आहेत. चित्रकला स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी जाहीर करण्यात येणार असून, मान्यवरांच्या हस्ते पहिल्या दहा चित्रांना विशेष भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शनही आयोजिले जाणार आहे.
सहभागी शाळांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी 9049992809/7 या क्रमांकांवर किंवाwww.supermindfoundation.org या संकेतस्थळावर नावनोंदणी करता येईल, अशी माहिती सुपरमाईंड फाउंडेशन संस्थेच्या मंजुषा वैद्य व सामवेद इंटरनॅशनलचे मुकुंद पात्रीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रोटरी क्लबचे श्रीकांत जोशी व सुपरमाईंड फाउंडेशच्या दया कुलकर्णी उपस्थित होत्या.

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचे दुसरे सत्र शानदार प्रारंभासाठी सज्ज

0

पुणेभारताचा अव्वल मानांकित टेनिसपटू प्रजनेश गुन्नेश्वरण याला वाईल्ड कार्डद्वारे विशेष प्रवेश देण्यात आले असल्याचे टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या संयोजकांनी आज जाहीर केले. म्हाळुंगे बालेवाडी  क्रीडा संकुल येथे 31 डिसेंबर 2018 ते जानेवारी 2019 या कालावधीत होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार म्हणाले किटाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा ही आशियातील सर्वोत्तम एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धांपैकी एक असून अव्वल दर्जाचे खेळाडूसर्वोत्तम सुविधाआमच्या दृष्टीकोनाशी सहमत असणारे भागीदार आणि देशातील उभरत्या प्रजनेश गुन्नेश्वरणसारख्या गुणवान खेळाडूंना वाईल्ड कार्ड अशा सर्व माध्यमातून ही स्पर्धा सर्वोत्तम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्पर्धेचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर दाखविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले किया स्पर्धेतील गुंतवणूकदारांसाठी हि स्पर्धा अतिशय महत्वाची ठरणार असून एसएमजी अहवालानुसार गत मौसमातील टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला पारंपरिक माध्यमे तसेच सोशल मिडियावरील फॉलोअर्स आणि टेनिस चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे.

या अहवालानुसार एटीपी 250, एटीपी 500 आणि एटीपी 1000 दर्जाच्या सर्व स्पर्धांमध्ये टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला फेसबुकवर सर्वोत्तम प्रतिसाद मिळाला आहे. इतकेच नव्हे तर अन्य 15 एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धांच्या तुलनेत टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला 3,50,000हुन अधिक चाहत्यांनी प्रतिसाद दिला असल्याचे अय्यर यांनी नमूद केले.

पीएमसीचे आयुक्त सौरभ राव म्हणाले किक्रीडा प्रेमी असल्याबद्दल प्रसिद्धी असलेल्या या शहरांतील टेनिस प्रेमींसाठी व चाहत्यांसाठी टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा ही एक सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.

राव यांना अनुमोदन देताना पीसीएमसीचे आयुक्त श्रवण हार्डीकर म्हणाले कि, या स्पर्धेसाठी प्रजनेश गुन्नेश्वरण व रामकुमार रामनाथन यांना मुख्य फेरीसाठी वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले आहे तर, एस.के मुकुंद व साकेत मायनेनी यांना पात्रता फेरीसाठी वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले आहे. ज्याप्रकारे पुण्यातील या स्पर्धेसाठी जागतिक दर्जाच्या सर्वोत्तम सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खेळाडुंबरोबरच प्रेक्षकांना सुद्धा जगांतील सर्वोत्तम दर्जाच्या आंतरराष्ट्रीय अशा या स्पर्धेचा अनुभव घेता येणार आहे.

प्रजनेशसाठी 2018 वर्षे यशदायी ठरले आहे. वर्षाच्या सुरुवातीला असलेल्या 243व्या क्रमांकावरून त्याने लक्षवेधी कामगिरी करत नोव्हेंबरमध्ये 104व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चीन आणि बंगळुरू येथे झालेल्या चॅलेंजर स्पर्धांमधील विजेतेपदामुळे त्यालाही हि प्रगती करता आली आहे. एका महिन्यापुर्वीच झालेल्या केपीआयटी एटीपी चॅलेंजर स्पर्धेतही त्याने उपविजेतेपद पटकावले होते. तसेचआशियाई स्पर्धेतील कांस्य पदक हा त्याच्या शिरपेचातील आणखी एक तुरा ठरला.

सध्या जागतिक क्रमवारीत 110व्या स्थानावर असलेला प्रजनेश हा स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमधील पहिला खेळाडू ठरणार असून विश्वक्रमवारीतील अव्वल 50मधील पाच खेळाडू हे मुख्य ड्रॉमध्ये खेळत आहेत. या सर्व जागतिक दर्जाच्या खेळाडूंसाठी टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा आगामी नव्या मौसमासाठी उत्तम सुरुवात व सराव ठरणार आहे. या खेळाडूंमध्ये गतविजेता व विश्व क्रमवारीत 30व्या क्रमांकाचा फ्रेंच खेळाडू सिमॉन जाईल्स तसेचजागतिक क्र.6खेळाडू केविन अँडरसन(दक्षिण अफ्रिका)जागतिक क्र. 7खेळाडू  मेरिन चिलीच(क्रोएशिया)जागतिक क्र.25खेळाडू हुयोन चूँग आणि जागतिक क्र. 45खेळाडू मालेक झाजेरी(ट्युनेशिया) या मातब्बर खेळाडूंचा समावेश असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भीमथडी जत्रेतील ८२ महिला बचत गटांना रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ‘ चे प्रशिक्षण

0
पुणे :’भीमथडी ‘जत्रेत सहभागी होणाऱ्या ८२ महिला बचत गटांना खाद्य पदार्थांची स्वच्छता,व्यावसायिक नियम,खाद्य परवाने, व्यक्तिमत्व विकास याबाबत शारदानगर आणि पुणे येथे ‘ एम.ए. रंगूनवाला इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च ‘,पुणे यांच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले.
महिला बचत गटांना अन्न परवाना याबाबत शासकीय कायदे,अन्न पदार्थांची स्वच्छता, ग्राहक सेवा,व्यक्तिमत्व विकास,ग्राहक वर्तन याबाबत   या प्रशिक्षण कार्यक्रमात सौ.सुनंदा पवार ,  तज्ज्ञ  मार्गदर्शक अनिता फ्रन्झ,आकाश वाळके,पुनीत बसून
यांनी माहिती आणि प्रशिक्षण दिले.
कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्यातील बारकावे,नियम,अटी समजून व्यावसायिक स्पर्धेत उतरले पाहिजे कारण दिवसेंदिवस वाढणारी स्पर्धा खडतर आहे,यासाठी नविन्यपूर्ण व्यावसायिक माहिती प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे असे मत अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ.सुनंदा पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
भिमथडीची पूर्व तयारी म्हणून गेली 12 वर्ष भीमथडी जत्रेत सहभागी बचत गटांना प्रशिक्षण दिले जाते .
सहभागी महिला बचत गटांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून पुढील व्यवसायास त्यांना प्रशिक्षणाचा उपयोग होणार असल्याचे आकाश वाळके यांनी सांगितले.
प्रशिक्षण आयोजन आणि हेतु याबाबत सचिन खलाटे प्रकल्प अधिकारी यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमाला विजय कोकाटे,शुभांगी तावरे,आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मोसमाची सांगता थायलंडमध्ये करण्यास संजय सज्ज

0
पुणे- पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले मोसमाची सांगता थायलंडमध्ये करण्यास सज्ज झाला आहे. थायलंड प्री रॅली मालिकेतील अखेरच्या फेरीत तो भाग घेईल. मोसमाचा प्रारंiभ त्याने फेब्रुवारीत थायलंडमध्येच केला होता. कांचनाबुरी या ऐतिहासिक प्रांतात येत्या शनिवारी-रविवारी ही रॅली होईल.
 
संजय इसुझु डीमॅक्स युटीलीटी कार चालवेल. तो फोर बाय फोर ओपन क्लासमध्ये भाग घेईल. थायलंडचा मिनील थान्याफात त्याचा नॅव्हीगेटर असेल. संजयने सांगितले की, गेली आठ-दहा वर्षे मी थायलंडमध्ये रॅली करीत आहे. कांचनाबुरी प्रांतातील रॅलीत मी प्रथमच भाग घेईन. ब्रीज ऑन रिव्हर क्वाय या प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपटाचे चित्रीकरण या भागात झाले होते.
टीम इसुझू फुकेटने कार सुसज्ज केली आहे. विचाई वात्ताहाविशुथ हे या संघाचे प्रमुख आहेत. ते ट्यूनर सुद्धा आहेत. थायलंडमधील रॅली संजयसाठी फार महत्त्वाच्या आहेत. याविषयी त्याने सांगितले की, जागतिक रॅली मालिकेत सहभागाचे एक स्वप्न यंदा मी फिनलंडमध्ये साकार केले. माझी आणखी एक महत्त्वाकांक्षा आहे आणि ती म्हणजे डकार रॅली. त्यासाठी मला थायलंडमध्ये सराव करण्याची गरज आहे. इसुझु डीमॅक्स युटीलीटी कारमधून सराव करणे खडतर अशा डकार रॅलीच्या तयारीसाठी फायदेशीर ठरेल.
जूनमधील फेरीत त्याने टायर अचूक पसंतीचे नसूनही दुसरा क्रमांक मिळविला होता. तेव्हा संजयच्या संघाने चिखलमय मार्गासाठी वापरली जाणारी कठिण टायर बसविली होती, प्रत्यक्षात मार्ग मऊ वाळूचा होता. अशावेळी संजयने कौशल्य पणास लावत कार नियंत्रीत केली. त्यामुळे तो फोर-बाय-फोर खुल्या गटात हे यश मिळवू शकला.

बालगंधर्व रंगमंदिराची इमारत तर सोडा , मोकळ्या जागेवरही कोणी डोळा ठेऊ नये – महेश मांजरेकर(व्हिडीओ)

0

पुणे- बालगंधर्व रंगमंदिर पाडु नये ती वास्तु तशीच ठेवावी .आणि तिथल्या मोकळया जागेवर अनेकांचा डोळा जरी असला तरी ती जागा तशीच ठेऊन ती रंगमंदिराचीच रहावी असं स्पष्ट मत  अभिनेता ,दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यकत केेले. पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित  महेश मांजरेकर दिग्दर्शित भाई या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला . बालगंधर्व रंगमंदिराची    वास्तु न पाडता तशीचा ठेवावी आणि हवे तर अंतर्गत दुरुस्ती करावी.हल्ली मोकळया जागेवर अनेकांचा डोळा असतो तशी त्या रंगमंदिराच्या मोकळया जागेत काही न करता ती रंगमंदिराची असावी असही मत मांजरेकर यांनी व्यक्त केले.
बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडण्याच्या मुद्‌द्‌यावरून भिन्न मतप्रवाह असलेले,. तरी ते पाडून त्याच्या जागी बहुमजली रंगमंदिर उभारण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यासाठी या रंगमंदिराच्या पुनर्बांधणीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही पुढील काही दिवसांत पूर्ण होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास प्रकल्प या योजनेत वास्तुविशारदांनी नोंदणी करून प्रक्रिया करण्यास प्रारंभ केला असल्याचे  असे महापालिकेच्या भवन रचना विभागाने म्हटले आहे.२१ जानेवारी  पर्यंत हि प्रक्रिया पूर्ण होणार आहे .पूर्वी सांस्कृतिक क्षेत्रातील अनेकांनी या प्रकल्पाला आक्षेप घेतला होता. मात्र या प्रकल्पाची प्रत्यक्षात कार्यवाही सुरु झाल्यावर , प्रसिद्ध  सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी या पुनर्विकास प्रकल्पाला प्रखर विरोध दर्शविला .कुठल्याही राजकीय पक्षांच्या सांस्कृतिक विभागांनी आजपर्यंत यास कडाडून विरोध केलेला नाही हे विशेष . अलीकडेच स्थापन झालेल्या एका  राजकीय कार्यकर्त्याच्या सांस्कृतिक संघटनेमार्फत आमिषे दाखवून  या प्रकल्पाचा विरोध मोडून काढण्याचे काम सुरु असल्याची चर्चा आहे.

पात्र, परीक्षा दिलेल्या कर्मचाऱ्यांना प्रलंबित ठेऊन ; अपात्राना भरतीत सामावून घेण्याची घाई ..हाय रे महापालिका

0

पुणे: महापालिकेच्या  चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना लिपिक टंकलेखक ३ या पदावर पदोन्नती देण्यासाठी पात्र  झालेल्या २६७ कर्मचाऱ्यांचे  प्रशिक्षण झाले,परीक्षा झाल्या  आणि या परीक्षांचा निकाल जाहीर करून नेमणूक करण्याच्या प्रक्रियेला प्रलंबित ठेऊन अर्जाच्या छननतच अपात्र असलेल्याना आता पदोन्नती च्या प्रक्रियेत  सामावून घेण्याची मोहीम वेगाने सुरु करण्याचा  अजब गजब प्रकार महापालिकेत चालू असल्याचा आरोप होतो आहे. पीएमसी एम्प्लॉईज युनियनने या प्रकरणी घोटाळे होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून तृतीय श्रेणीत घेण्यासाठी म्हणून घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न करता थेट यादीच जाहीर करून त्यात अपात्र उमेदवारांची नावे घुसडण्याचा प्रकार झाला असल्याचे युनियनचे म्हणणे आहे.

 

महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमधून लिपिक टंकलेखक ३ या पदावर पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्याबाबत कार्यवाही सुरु केली आहे ,या पूर्वी अपात्र ठरविण्यात आलेल्या ११७ जणांची यादी या समवेत जोडण्यात आली असून यातील जे सेवक आवश्यक अहर्ता धारण करतात त्यांनी १५ डिसेंबर पर्यंत कागदपत्रे सादर करावीत असे सांगणारे हे कार्यालयीन परिपत्रक ..

हि आहे अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांची यादी …


महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये सुशिक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. वारसा हक्काने नोकरी मिळत असल्याने शिक्षण असूनही नोकरीची संधी मिळाली की ते लगेच नोकरी स्विकारतात. त्यानंतर मग वरच्या वर्गात येण्यासाठी प्रयत्न करतात. खात्यातंर्गत परीक्षा घेऊन अशा उमेदवारांना तृतीय श्रेणीत टंकलेखक किंवा कारकून म्हणून सामावून घेतले जाते. त्यासाठी त्यांची सेवेची ५ वर्षे पुर्ण झाली असल्याचे बंधन घालण्यात येते. त्याशिवाय किमान १० वी उत्तीर्ण वगैरे अटीही असतात.

डिसेंबर २०१६ मध्ये महापालिकेने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मधून अर्ज मागविले . या अर्जांची छाननी जानेवारी 2018 ला पूर्ण झाली आणि त्यात २६७ जण पात्र ठरले ,आणि ११७ जण अपात्र ठरले .
२६७ पात्र उमेदवारांना शिवाजी दौंडकर या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली प्रशिक्षण देण्यात आले त्यानंतर  त्यांची २२ जुलै २०१८ रोजी परिक्षा घेतली. त्याचा निकाल अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र परीक्षेस बसता न आलेल्या, कागदपत्र अपुर्ण असल्यामुळे अपात्र ठरलेल्या अशा ११७ जणांची एक यादी १२ डिसेंबर २०१८ ला प्रसिद्ध केली. त्यांना १५ डिसेंबरपर्यंत कागदपत्रे आणून देण्यास सांगण्यात आले.
या यादीवर काहीजणांना आक्षेप घेतला. त्यानंतर प्रशासनाने १३ डिसेंबरला एक शुद्धीपत्रक काढले. त्यानंतर ते शुद्धीपत्रक १४ डिसेंबरला लागलीच रद्द केले. १५ डिसेंबरला एक परिपत्रक काढले. त्यात ४३ जणांची यादी प्रसिद्ध केली. यातच पुन्हा ५ वर्षांचे सेवाकाल पुर्ण झाला नसलेली नावे घुसडण्यात आली. त्यांना प्रशिक्षण देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. १७ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान हे १३ तासांचे प्रशिक्षण सत्र पुर्णही झाले.
सेवाकाल पुर्ण करत नसलेल्या, अपात्र असलेल्या उमेदवारांना यादीत बसवण्यासाठी म्हणून हा सर्व उपदव्याप करण्यात आला असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. काही नगरसेवक तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच हा खटाटोप केला असल्याची चर्चा आहे. मात्र त्यामुळे पदवीधर असलेल्या व तरीही चतुर्थ श्रेणीतच काम करावे लागत असणाऱ्या पात्र उमेदवारांवर अन्याय होत आहे. केवळ ५ वषार्चा सेवाकाल पुर्ण होत नसल्याने ते अपात्र समजले गेले आहेत, मात्र ज्यांचा वशिला आहे ते असा सेवाकाल पुर्ण झाला नसतानाही पात्र समजून तृतीय श्रेणीत जाणार आहेत.
युनियनचे अध्यक्ष बापू पवार व सरचिटणीस चंद्रकांत शितोळे यांनी याबाबत आयुक्त सौरव राव यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी या सर्व प्रक्रियेची माहिती दिली असून संबधित खातेप्रमुखांना आदेश देऊन पात्र उमेदवारांवर होत असलेला अन्याय त्वरीत दूर करण्याची मागणी केली आहे.

जानकरांनी धनगर समाजाच्या नावाचा स्वार्थासाठी उपयोग केला – तुपे पाटील (व्हिडीओ)

पुणे- जानकरांनी धनगर समाजाच्या नावानं मंत्री पद मिळविलं,पण नंतर धनगर आरक्षणावर काहीही न करता धनगर समाजाची फसवणूक केली आहे, त्यांनी केवळ स्वार्थासाठी या समाजाच्या नावाचा उपयोग करून घेतला  असा आरोप आज शर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी केला.
शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या  वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजप-सेना युती सरकारने धनगर व मुस्लिम समाजातील लोकांना आरक्षण देतो असे सांगुन त्या समाजाची जी फसवणुक केली आहे त्या फसवणुकीचा व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला व जिल्हाधिकारी राम यांना  निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यानी सत्तेवर आल्यावर पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देउ असे सांगितले होते पण सत्त्ता येउन चार वर्षे होत आली पण राज्य सरकारने आरक्षणाचा साधा प्रस्ताव सुध्दा केंद्र सरकारकडे पाठविलेला नाही ,मुख्यमंत्र्यानी आणि जाणकारांनी  आरक्षणाच्या नावाखाली धनगर आणि मुस्लिम समाजाची फसवणूक केली आहे याचा आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे निषेध करतो.
प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले की, भाजप- सेना सरकारने अनेक आश्वासने देउन लोकांना जनतेला फसविले यांच्या जाहिरनाम्यातील एक ही आश्वासन हे सरकार पुर्ण करु शकलेले नाहीये. फक्त मोठी मोठी भाषण करायची लोकांना आश्वस्थ करावयाचे मते मिळवायची आणि नंतर काय बोललोय त्याबद्दल एक वाक्य की काढायचे नाही अशा या दुट्ट्प्पी सरकारला एक मिनिट सुध्दा सत्तेवर राहण्याचा आधिकार नाही.
मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची बाजु  कोर्टात व्यवस्थितपणे या जातीयवादी सरकारने मांडली नाही त्यामुळे मुस्लिम समाजाचे आरक्षण कोर्टात टिकले नाही. हे सरकार जातीयवादी आहे यांना मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचेच नाही यांना फक्त समाजाची मते पाहिजे असल्याने हे फक्त आरक्षणाचे गाजर दाखवित आहेत यापुढील काळात मुस्लिम समाज यांच्या भुलथापाना बळी पडणार नाही असे नगरसेवक गफुऱ पठाण म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस ओ.बी.सी विभागाचे अध्यक्ष संतोष नांगरे म्हणाले भाजप सरकारने फक्त महादेव जाणकरांना मंत्रीपद दिले व  धनगर समाजाच्या तोंडाला पाने  पुसली या सरकारने जर लवकरात लवकर आरक्षण दिले नाही तर या सरकरमधील मंत्र्याना रस्त्यावर फिरु देणार नाही. आंदोलनासाठी शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील, प्रवक्ते अंकुश काकडे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे,  बाळासाहेब बोडके,नगरसेवक गफुर पठाण,प्रदिप गायकवाड,युवक अध्यक्ष राकेश कामठे, ओ.बी.सी अध्यक्ष संतोष नांगरे, रईस सुंडके,प्रदिप देशमुख,भोलासिंग अरोरा,स्वप्नील दुधाणे,विद्यार्थी अध्यक्ष रीशी परदेशी,हाजी फिरोज,फहिम शेख माणिकशेठ दुधाणे,दिलीप अरुंदेकर,मिलिंद वालावडकर,चंद्रकांत कवडे, डॉ.सुनिता मोरे,उज्वला देशकर,निता गलांडे,शांतिलाल मिसाळ,सागर भोसले,महेश हांडे,हरीष लडकत,रुपेश आखाडे,छबिल पटेल,हेमंत येवलेकर,संजय गायकवाड,विकी वाघे, विकी मोरे,दिपक लोंढे,राजाभाउ सावंत,मयुर गायकवाड,विजय जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.