Home Blog Page 3025

सनबर्न विरोधात नगरसेवक बालवडकरांची हायकोर्टात याचिका..सुनावणी आता शुक्रवारी.

0

पुणे-पुण्यातील सनबर्न या फेस्टिव्हल विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ध्वनीप्रदूषणाचे नियम पाश्चिमात्य सणांनाही लागू करा, फक्त भारतीय सणांवरच बंधने का? अशी मागणी करत अमोल बालवडकर यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने रात्री 8 ते 10 या वेळेत लाऊडस्पीकर आणि फटाके उडवण्यास संमती दिली आहे. असं असूनही आंतरराष्ट्रीय म्युझिक फेस्टच्या नावाखाली ध्वनीप्रदूषणाचे सगळे नियम पायदळी तुडवले जातात. दुपारी तीन वाजल्यापासून मध्यरात्री उशिरापर्यंत डॉल्बी साऊंड आणि डीजे कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात सुरु असतात असाही आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

वेळेची मर्यादा आणि डेसिबलची पातळी सांभाळून सण साजरे करण्याची मर्यादा फक्त भारतीय सण उत्सवांना का? सनबर्नलाही कायदा सारखाच आहे असा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. अनुराग जैन यांनी कोर्टात केला. सुट्टीकालीन न्यायालयात न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. शांतता क्षेत्र नसलं तरीही ध्वनी मर्यादा आणि पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं मत हायकोर्टानं मांडलं आहे. तसंच कार्यक्रमाचं आयोजन होत असलेल्या ठिकाणापासून लोकवस्ती किती दूर आहे? असा सवाल करत या याचिकेवरची सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली आहे.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी 29 ते 31 डिसेंबर या कालावधीत पुण्यातल्या बावधन लवळे मध्ये असलेल्या ऑक्सफोर्ड गोल्फ क्लबवर यंदाचा सनबर्न फेस्टिव्हल रंगणार आहे. या कार्यक्रमाच्या ऐन तोंडावरच विरोधातली याचिका दाखल झाली आहे.

सरकारी वकीलाने न्यायालयाच्या आवारातच केली न्यायाधीशाला मारहाण….

0

नागपूर- उपराजधानी नागपुरातील जिल्हा न्यायालयापुढे वकीलांमधील खूनी संघर्षाचे प्रकरण ताजेच असताना न्यायालयाच्या व्हरांड्यातच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश के. आर. देशपांडे यांना सरकारी वकीलाने मारहाण केल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेनंतर पोलिसांनी वकीलास ताब्यात घेऊन अटक केली. व्यक्तीगत दिवाणी प्रकरणात आपल्या विरोधात निवाडा दिल्याच्या कारणावरून वकीलाने हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे.

दुपारी बारा वाजताच्या सुमारास न्यायमंदिरच्या सातव्या माळ्यावर ही घटना घडली.दिवाणी न्यायाधीश किरण रंगराव देशपांडे हे काही प्रशासकीय कामासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. पी. इंगळे यांच्या कक्षात आले होते. कक्षातून बाहेर पडल्यावर ते त्यांचे सहकारी न्या. एस.व्ही. देशमुख यांच्यासह न्यायालयातील लिफ्टजवळ प्रतीक्षेत उभे होते. त्याचवेळी अतिरिक्त सरकारी वकील अॅड दिपेश मदनलाल पराते (वय ४२) तेथे आला. त्याने संतापाच्या भरात न्या. देशपांडे यांना ठार मारण्याची धमकी देत थापड मारली. त्यामुळे न्या. देशपांडे यांचा चष्मा खाली पडला. त्यांना भोवळ आली. न्या. देशपांडे यांना पुन्हा धमकी देत अॅड. पराते तेथून सहा माळ्याच्या दिशेने पळाला. न्या. देशपांडे यांनी आरडाओरड केल्यावर तेथील पोलिस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी अड. पराते याच्या दिशेने धाव घेऊन त्याला पकडले. त्याला सुरुवातीला न्या. व्ही. बी. कुळकर्णी यांच्या लघुलेखकाच्या कक्षात आणले गेले. तर या घटनेत किरकोळ जखमी झालेले न्या. देशपांडे यांना न्या. कुळकर्णी यांच्या कक्षात बसविण्यात आले. ही घटना घडली त्यावेळी न्यायालयाच्या व्हरांड्यात पक्षकार आणि वकीलांची वर्दळ होती. घटनेची माहिती न्यायालय परिसरात पसरताच वकील व न्यायालयात आलेल्या लोकांनी सहाव्या माळ्यावर एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती सदर पोलिस ठाण्याला देण्यात आल्यावर पोलिसांनी अॅड. दिपेश पराते याला ताब्यात घेतले.

न्या. देशपांडे यांना वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान, अॅड. दिपेश पराते याला पोलिस पुन्हा न्यायालयात हजर करीत असताना त्याने आपल्याला या प्रकरणात फसविण्यात आल्याचा कांगावा केला. आपण कोणालाही मारहाण केली नाही, असा दावा करतानाही तो दिसला. दरम्यान, सदर पोलिसांनी अॅड. परातेविरुद्ध भादंविच्या ३५३, ३३२ आणि ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

निकाल विरोधात गेल्यामुळे मारहाण
पोलिस सूत्रांनी सांगितले की, अॅड. दिपेश पराते यांचे वडील अॅड. मदनलाल पराते यांनी न्या. देशपांडे यांच्या न्यायालयात पार्टीशन सुट दाखल केली होती. २८ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने सदर प्रकरण कालमर्यादित केले. त्यामुळे दोन्ही बाजू ऐकून न्या. देशपांडे यांनी प्रकरण निकाली काढले. निकाल विरोधात गेल्यामुळे संतापातून अॅड. पराते याने आपल्यावर हल्ला केला, असे न्या देशपांडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे

पुण्यातील वकिलाला 1 कोटी 70 लाखांची लाच घेताना अटक

0

पुणे-भूमी अभिलेख कार्यालयातून जमिनीवर असलेली नावं कमी करून देतो त्यासाठी दोन कोटी रुपये लागतील अशी मागणी एका वकिलाने केली. तडजोड करून एक कोटी सत्तर लाखाची लाच घेताना.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून वकिलास अटक केली. अ‍ॅड. रोहित शेंडे असे लाच घेणार्‍या वकिलाचे नाव आहे.

भूमी अभिलेख कार्यालयातले अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. जमिनीवर असलेली नावे कमी करुन देतो. या कामासाठी दोन कोटी रुपये लागतील. पैसे दिल्यानंतर कागदपत्रं दिली जातील असे या वकिलाने तक्रारदाराला सांगितले होते. त्यावर तडजोड करून एक कोटी सत्तर लाख रुपये देण्याचे ठरले. वकिलाने लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात करण्यात आली. त्यानंतर वकील रोहित शेंडे याला पैसे देण्याचे ठरले. त्यानुसार सापळा रचून एक कोटी सत्तर लाखाची लाच घेताना वकील रोहित शेंडे यास रंगेहाथ पकडले आहे. तसेच बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनबर्न उधळून लावू… संभाजी ब्रिगेड

0

पुणे-सनबर्न उधळून लावू… असा इशारा संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी दिला आहे .

शिंदे यांनी यासंदर्भात म्हटले आहे कि,सनबर्न फेस्टिव्हल’ रद्द करावा… या मागणीसाठी पुणेकरांचा संघर्ष सुरू आहे. हा दारूड्या संस्कृतीचा व आमली पदार्थांचा खुला बाजार आहे. हा सरकार पुरस्कृत अश्लिल पाश्चात्य संस्कृतीचा उदो उदो आहे. तो थांबला पाहिजे. हा समाजविघातक सनबर्न फेस्टिव्हल दि. २९ ते ३१ डिसेंबर २०१८ रोजी लवळे, पुणे येथे होणार आहे. परंतु सनबर्न फेस्टिव्हला लवळे ग्रामपंचायची अजून परवानगी नाही… मग सनबर्न रद्द करा…अशी मागणी पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेड च्या संतोष शिंदे यांनी केली आहे .

शिंदे यांनी असे म्हटले आहे कि,लवळे गावाच्या ग्रामसेवकांनी  आज पत्र दिलेले आहे. त्यात त्यांनी सनबर्नला आम्ही परवानगी दिलेली नाही असे म्हटले आहे . म्हणजे सनबर्न फेस्टिवल बेकायदेशीर आहे. यासाठी श्री. राहूल मस्के व अनूप मारणे प्रत्यक्ष भेटून पाहणीकरून लेखीपत्र घेतले आहे. तरी सनबर्न चे काम सुरू आहे व Book my Show वर Online booking सुरू आहे. यामुळे हजरों लोकांची लाखों रूपयांची फसवणूक होणार आहे.

सनबर्न फेस्टिव्हल’ शेजारी पाच फुटावर ८०० मुलींचे हॉस्टेल आहे. सनबर्न’ला वेळेची मर्यादा नसते. मात्र शिवजयंती, दहिहंडी, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव काळात कायद्याचा बडगा दाखवून रात्री १० वा. बंद केले जातात. मात्र सनबर्न फेस्टिव्हलला आर्थिक गणिते बघून रात्रभर चालवण्यास परवानगी दिली जाते. सनबर्न फेस्टिव्हल मध्ये रात्रभर अमली पदार्थाचे प्रचंड सेवन व वापर होत असतो. यामुळे तरूण पिढीवर प्रचंड वाईट परिणाम होतात. या वाईट संस्कृतीमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. रात्रभर तरूण मुले मुली दारू पिऊन व आमली पदार्थाचे सेवन करून दररोज धिंगाना करत फिरतात. कोर्टाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करून चार स्पिकर लावून, वेळेची मर्यादा पाळून आदेश पाळले जातात. मात्र सनबर्न फेस्टिव्हलवर कोणतेही नियम व अटी पाळले जात नाहीत. बेकायदेशीर मद्य विक्री व अमली पदार्थाची विक्री केली जाते. यावर आमचा आक्षेप आहे. म्हणून सरकारने परवानगी देऊन नये. नियोजित सनबर्न फेस्टिव्हलला पाठीशी न घालता तो रद्द करावा. आम्ही बेकायदेशीर सनबर्न उधळून लावू. असे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे..

बहादूरशहा जफर यांच्या शायरीवर शमीम तारिक यांचे व्याख्यान

0
‘रसिक मित्र मंडळ ‘च्या ‘एक कवी -एक भाषा ‘ उपक्रमातील ६० वे व्याख्यान २८ डिसेंबर रोजी 
पुणे :’रसिक मित्र मंडळ ‘ यांच्यातर्फे  मुघल बादशाह बहादूरशहा जफर यांच्या शायरीवर शमीम तारिक ( मुंबई ) यांचे   व्याख्यान २८ डिसेंबर रोजी  आयोजित करण्यात आले आहे.
हे व्याख्यान  २८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात होणार आहे .
रसिक मित्र मंडळ ‘च्या ‘एक कवी -एक भाषा ‘ उपक्रमातील हे  ६० वे व्याख्यान आहे ,अशी माहिती रसिक मित्र मंडळ चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला  यांनी दिली

विसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन ३ व ४ जानेवारीला

0
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस, तर स्वागताध्यक्षपदी प्रकाश जवळकर
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना ‘प्रा. रा. ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार’
यशवंतराव गडाख, प्रा. तेज निवळीकर यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’
पुणे-भोसरी : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे, भगवान महावीर शिक्षण संस्था, भोसरी व बंधुता प्रतिष्ठान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन व प्रा. प्रकाश पगारिया व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३ आणि ४ जानेवारी २०१९ या दरम्यान प्रीतम-प्रकाश महाविद्यालय, सेक्टर न. १, इंद्रायणीनगर, भोसरी येथे हे संमेलन होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस हे या संमेलनाचे अध्यक्ष असून, प्रकाश जवळकर हे स्वागताध्यक्ष आहेत.
या संमेलनाचे उद्घाटन गुरुवार, दि. ३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रझिया पटेल यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, भगवान महावीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, संमेलनाचे कार्याध्यक्ष हाजी अफजलभाई शेख, प्रीतम-प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, संघटक महेंद्र भारती, स्मरणिकेच्या संपादिका मधुश्री ओव्हाळ व संगीता झिंजुरके उपस्थित राहणार आहेत. उदघाटनप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे ‘प्रा. रा. ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या ‘अध्यक्षीय भाषण’ पुस्तकाचे, डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या ‘बंधुताचार्यांची प्रकाशगाथा’ या समीक्षाग्रंथाचे, बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या ‘अग्निकुंड’ समीक्षा ग्रंथाचे आणि मुल्याविष्कार या संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी होणार आहे.
समारोप समारंभ शुक्रवार, दि. ४ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४.०० वाजता होणार असून, यावेळी ज्येष्ठ लेखक यशवंतराव गडाख व प्रा. तेज निवळीकर यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी पुणे पीपल्स सहकारी बँक मर्यादित यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच गुणवंत शिक्षक व विद्यार्थी पुरस्कारांचे वितरण होईल.
एकूण आठ सत्रात होत असलेल्या या संमेलनात दुसर्‍या सत्रात डॉ. अशोककुमार पगारिया यांची प्रकट मुलाखत शंकर आथरे घेणार आहेत. यावेळी ‘श्यामची आई संस्था पुरस्कार’ नवजीवन शिक्षण संस्थेचे रामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालय व भोसरीतील भैरवनाथ विद्यालय यांना प्रदान केला जाईल. यावेळी डॉ. विजय ताम्हाणे, प्रा. जे. पी. देसाई, डॉ. शिरीष लांडगे, राजेंद्र धोका यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तिसऱ्या सत्रात ‘थोडंसं भान असुद्या’ या विषयावर ऍड. अपर्णा रामतीर्थकर यांचे व्याख्यान होणार आहे. चौथ्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव आव्हाड यांचे ‘संविधानिक आरक्षण व विद्यमान आरक्षण समस्या’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील यशवंतांना भूमिपुत्र पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यावेळी पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हरिश्चंद्र गडसिंग उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी (दि. ४) सकाळी ९.३० वाजता पाचव्या सत्रात ‘काव्यपंढरी’ हे कविसंमेलन होणार आहे. अध्यक्षस्थानी अनिल दीक्षित असतील. कवीसंमेलनात
उद्धव कानडे, मधुश्री ओव्हाळ, डॉ. भीम गायकवाड, बबन धुमाळ यांच्यासह इतर मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. सतीश खाबिया, प्रा. चंद्रकांत वानखेडे, शंकर आथरे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी संतोष घुले यांना ‘लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार’, तर दीप पारधे यांना ‘लोकगायक प्रल्हाद शिंदे पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. सहाव्या सत्रात लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांचे ‘स्त्रीवादी साहित्य : काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर मोहिनीताई लांडे व आकांक्षा प्रतिष्ठानच्या राणीताई चौरे यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. सातव्या सत्रात प्रा. तेज निवळीकर यांचे ‘मूल्य शिक्षणाचे पहिले मुक्त विद्यापीठ : संत गाडगेबाबा’ या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी शिवप्रेरणा नागरी सहकारी पतसंस्था व कलांगण कला संस्था यांना ‘राजश्री शाहू सामाजिक न्याय हक्क पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.
अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित् परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मुख्य संयोजक डॉ. अशोककुमार पगारिया, स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर आणि बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाचे संयोजक डॉ. अशोक शिंदे, संघटक महेंद्र भारती, शंकर आथरे उपस्थित होते.

राफेल विमान खरेदीची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशीची मागणी

0

पुणे-राफेल विमान खरेदीमध्ये मोदी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची संयुक्त संसदीय समिती
मार्फत चौकशी करावी यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे
यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.


यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले की, ‘‘केंद्रातील मोदी सरकारने राफेल विमान
खरेदीमध्ये भारतातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केला आहे. आपले मित्र अनिल अंबानी यांना या
भ्रष्टाचाऱ्याच्या माध्यमातून पैसे मिळवून देऊन स्वत:चे खिसे भरले आहेत. मोदी सरकारने
भ्रष्टाचाराचे टोक गाठले असून ते आता मा. सर्वोच्च न्यायालयालादेखील फसविण्याचे काम करीत
आहेत. खोटे प्रतिज्ञापत्र मा. न्यायालयात सादर करून मा. सर्वोच्च न्यायालयाबरोबरच या देशातील
१३० कोटी जनतेला देखील त्यांनी फसविले आहे. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
मा.राहुलजी गांधी यांनी या भ्रष्टाचाराची पायामुळे खोदून काढण्याचे ठरविले असून त्यामुळेच
त्यांनी या राफेल विमान घोटाळ्याची चौकशी फक्त आणि फक्त संयुक्त संसदीय समितीच करू
शकते व यातील ३६ हजार कोटींचा घोटाळा बाहेर पडेल असे म्हटले आहे. या देशातील शेतकऱ्यांची
कर्ज माफ करण्यासाठी मोदी सरकारकडे पैसे नाहीत परंतु अनिल अंबानीचा फायदा करून
देण्यासाठी पंतप्रधान मोदी स्वत: हा विमानाचा व्‍यवहार करतात हे या देशाचे दुर्दैव आहे. अनिल
अंबानी यांच्या कंपनीला राफेल डसॉल्ट एव्‍हिएशन कंपनीकडून ३० हजार कोटींचा ऑफसेट पाटनर
म्हणून कॉनट्रॅक्ट मोदी यांनी मिळवून दिले. याचाच अर्थ अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स
लि., कंपनीला ३० हजार कोटीपेक्षा जास्त रूपयाचा फायदा करून दिला गेला व सरकारी तिजोरीचे
४१ हजार २०५ कोटींचे नुकसान केले. देशातील प्रत्येक नागरिकाचा पैसा केंद्र सरकार कश्या
पध्दतीने खर्च करीत आहे याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना असणे आवश्यक आहे म्हणूनच
५२८ कोटींचे राफेल विमान १६७० कोटीला कसे विकत घेतले ?, विमानाची किंमत १ हजार कोटींनी
जास्त कशी वाढली ? या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी संयुक्त संसदीय समितीतर्फे करावी अशी
मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला करीत आहोत.
यावेळी माजी आमदार मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांनी
देखील यावेळी भाषणे केली.आंदोलनास नीता रजपूत, अरविंद शिंदे, आबा बागुल, अजित दरेकर, रविंद्र धंगेकर,
अविनाश बागवे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, चाँदबी नदाफ, रफिक शेख, संगिता तिवारी, विरेंद्र
किराड, दत्ता बहिरट, महिला अध्यक्षा सोनाली मारणे, युवक अध्यक्ष विशाल मलके, ब्लॉक अध्यक्ष
सचिन आडेकर, सुजित यादव, क्लेमेंट लाजरस, बाळासाहेब दाभेकर, अनिल सोंडकर, बाळासाहेब
अमराळे, राजू शेख, राजेंद्र शिरसाट, बाबा नायडू, प्रशांत वेलणकर, शिवानंद हुल्याळकर, रजिया
बल्लारी, ज्ञानेश्र्वर मोझे, प्रविण करपे, विजय खळदकर, सतिश पवार, सुमित डांगी, अशोक पवार,
शेखर कपोते, वाल्मिक जगताप, राजेंद्र पेशने, नंदा ढावरे, संगीता शिरसागर, अनुसया गायकवाड,
संगीता पवार, कैलास गायकवाड, विनय ढेरे, पार्वती भडके, भगवान कडू, रवि पाटोळे, सादिक
कुरेशी, चैतन्य पुरंदरे, चेतन आगरवाल, शाबिर खान, विश्वास दिघे, साहिल केदारी, अविनाश
अडसुळ, रामविलास माहेश्वरी, रजिया बल्लारी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काव्य सप्ताह उपक्रमाच्या १९ व्या वर्षानिमित्त आयोजित काव्य संमेलनात ५० कवींचा सहभाग

0

पुणे :कविताप्रेमींचा वार्षिक आनंदोत्सव असलेल्या १९ व्या काव्य सप्ताह ‘२०१८ चे दूरदर्शन चे ज्येष्ठ निर्माते अरुण काकतकर यांच्या हस्ते उदघाटन झाले .काव्य सप्ताह उपक्रमाच्या १९ व्या वर्षानिमित्त आयोजित काव्य संमेलनात ५० कवींनी सहभाग घेतला .आयोजक जेष्ठ कवी रमेश गोविंद वैद्य यांनी प्रास्ताविक केले . दीपाली दातार यांनी सूत्रसंचालन केले .स्काऊट सभागृह ,उद्यान प्रसाद समोर ,सदाशिव पेठ येथे २५ डिसेंबर २०१८,सायंकाळी ७ वाजता काव्य सप्ताह चे उदघाटन झाले .पहिल्या दिवशीच्या कवी संमेलनात अरुण काकतकर ,रमेश गोविंद वैद्य ,आश्लेषा महाजन ,आरुषी दाते ,सुधीर कुबळे ,बाळासाहेब कार्वे यांच्यासह ५० कवींनी कविता सादर केल्या . ब्रेल लिपीतील कविताही दिव्यचक्षु कवींनी सादर केल्या .हा काव्य सप्ताह २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१८कालावधीत होणार असल्याची माहिती संयोजक रमेश गोविंद वैद्य यांनी दिली . ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य राजेंद्र देशपांडे ,राजा नाईक ,सुरेंद्र गोखले ,दीपक बीडकर यांनी स्वागत केले

क्रिकेट स्पर्धेने सी एम चषक पर्वतीचा यशस्वी समारोप.

0

पुणे-भारतीय जनता पार्टी, पर्वती विधानसभा मतदार संघ आयोजित सी एम चषक कला क्रिडा महोत्सवाचा यशस्वी आयुष्मान भारत क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस समारंभाने झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  गिरीष बापट आणि  सिने अभिनेते-दिग्दर्शक प्रविण तरडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद आमदार माधुरी मिसाळ आणि पुणे शहर भाजपा सरचिटणीस दीपक मिसाळ यांनी भूषविले.
दहा दिवस चाललेल्या या सी एम चषक कला क्रिडा महोत्सवाचा शेवट क्रिकेट स्पर्धांनी झाली. तीन दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धांचे आयोजक नगरसेवक महेश वाबळे आणि डेक्कन क्लबचे माजी अध्यक्ष अजय गुप्ते यांनी काम पहिले. त्यांना योगेश वाबळे आणि शैलेश देशपांडे यांनी सहआयोजक म्हणून सहकार्य केले. अतिशय रोमहर्षक झालेल्या या मालिकेमध्ये भूतान क्रिकेट क्लब यांनी विजेतेपद तर अभिनव ११ क्रिकेट क्लबने उपविजेतेपद पटकावले. त्याना चषक आणि रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले. या बक्षिस समारंभाची प्रस्तावना करताना नगरसेवक महेश वाबळे म्हणाले. “ आमदार माधुरीताईनी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल मी आणि माझे सर्व कार्यकर्ते त्यांचे आभारी आहेत. सी एम चषक सारख्या देशातील सर्वात मोठ्या कला क्रिडा महोत्सवाचा भाग बनता आल्याबद्दल आम्हाला सर्वांनाच आनद होतोय.”
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पालकमंत्री बापट म्हणाले. “ मुख्यमंत्र्यांची या स्पर्धाबाबत जी संकल्पना होती, ती महाराष्ट्रभर अत्यंत यशस्वी झाली आहे. तरुणांनी अधिक उत्साहाने या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. पर्वतीच्या आमदार आमच्या विधानसभेच्या सहकारी माधुरीताईनी सर्व क्रिडा स्पर्धांचे अतिशय उत्तम नियोजन केले आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पर्वती मतदार संघाचे नियोजन अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगून त्यांनी आमदार मिसाळ आणि सहकार्यांचे कौतुक केले.
मा. प्रवीण तरडे म्हणाले, “ तरुणांनी त्यांच्या उत्साहाचा वापर योग्य रित्या केल्यास देशाची प्रगती अत्यंत वेगाने होऊ शकते. जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. आणि ते का हे या मैदानी खेळ खेळणाऱ्या तरुणानाकडे पाहून कळते. तसेच प्रत्येक तरुणानी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सहभागी व्हायला हवे.”
समारोपाचे भाषण करताना आमदार मिसाळ म्हणाल्या “पर्वती मतदार संघ नोंदणीमध्ये सुरवातीला शेवटच्या स्थानावर होता. परंतु जेव्हा स्पर्धांची तारीख नक्की करण्यात आली. त्यानंतर पर्वती मधील प्रत्येक नगरसेवक, पदाधिकार्यांनी अतिशय उत्साहाने आणि जबाबदारीने केलेल्या कष्टाने आज पर्वती पश्चिम महाराष्ट्रात पहिल्या पाच मध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या सत्तर क्रमांकावर आहे. मुख्य संयोजक म्हणून आखलेल्या कार्यक्रम पत्रिकेची सर्व सहकाऱ्यांकडून काटेकोर अंमलबजावणी झाल्यानेच आज पर्वती पुन्हा अग्रस्थानी आहे.”
याप्रसंगी मान्यवरांसह युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, पुणे शहर विस्तारक योगेश बाचल, नगरसेवक आनंद रिठे, रघुनाथ गौडा, मानसी देशपांडे, मंजुषा नागपुरे, सरस्वती शेंडगे, रुपाली धावडे, मनीषा वाबळे, मनोज देशपांडे, विश्वास ननावरे, हरीश परदेशी, प्रशांत दिवेकर, योगेश वाबळे, शैलेश देशपांडे, जितेंद्र पोळेकर, प्रसाद शहाडे, मंगेश शहाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उजनी धरणावर 1000 मे.वॅ.तरंगते सौरप्रकल्पासाठी महावितरण कंपनीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात

0
मुंबई :नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मितीचे महत्व लक्षात घेऊन राज्यातील ऊर्जेच्या वाढत्या मागणीच्या पूर्ततेकरिता महावितरण कंपनीने अशा ऊर्जा र्स्त्रोतांपासुन तयार होणाऱ्या वीजेकरिता स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे वीज खरेदीबाबत विविध उपक्रम हाती घेतलेले आहे.
या उपक्रमात पवन व सौर स्त्रोतांबरोबरच ऊसाची चिपाडे, कृषिजन्य टाकाऊ पदार्थासारख्या स्त्रोतांचा वीज निर्मितीत समावेश आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना सुरु केली आहे. त्या अंतर्गत महावितरणने निविदा काढलेल्या आहेत व या निविदा प्रक्रियेत यशस्वी झालेल्या सौरऊर्जा प्रकल्प विकासकांसोबत वीज खरेदीकरार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच भविष्यात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनाअंतर्गत नविन निविदा काढण्याचे प्रयोजन केले आहे. सद्या ग्रीड संलग्न राज्या अंतर्गत आणि आंतरराजीयसौर ऊर्जा प्रकल्पातून 1000 मे.वॅ.वीज खरेदीकरिता निविदा दिनांक 5 डिसेंबर 2018 रोजी प्रकाशीत केली आहे.
जमिनीवरील उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांच्या वापरावर मर्यादा येत असल्यामुळे राज्यात मोठया प्रमाणात उपलब्ध असलेल्या तलाव/ धरणांच्या पाण्यावर तरंगते सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यास मोठया प्रमाणात वाव आहे. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने उजणी धरण, जि. सोलापूर येथे जलाशयावर 1000 मे.वॅ.क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यासाठी महावितरण कंपनीची अमलबजावणी संस्था म्हणून नियुक्त केले आहे. त्या अनुषंगाने महावितरण कंपनीने सदर प्रकल्पासाठी स्वारस्याचे प्रकटीकरण मागविले होते. सदर स्वारस्य प्रकटीकरणद्वारे मिळालेल्या सूचनांचा विचार करण्यासाठी, तसेच तरंगत सौरऊर्जा प्रकल्पाच्या नवीन तंत्रज्ञानाबाबत या क्षेत्रातील मर्यादीत अनुभवाचा विचार करुन तरंगता सौरप्रकल्प आस्थपित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी/कामकाज/कार्यपध्दती/अमंलबजावणी निश्चित करण्यासाठी शासनातर्फे संचालक(वाणिज्य), महावितरण, यांच्या अध्यक्षते खाली समिती गठीत करण्यात आली होती.
सदर समितीने दि.27 सप्टेंबर 2018 रोजी शासनास अहवाल सादर केलेला होता. तसेच दि.18 डिसेंबर 2018 रोजी मा.महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने या प्रकल्पास दिलेल्या मान्यता व समितीच्या शिफारसीनुसार महावितरण कंपनी दि.24 डिसेंबर 2018 रोजी उजणी धरण, जि. सोलापूर येथील जलाशयावर 1000 मे.वॅ. (10X100 मे.वॅ. समुह) तरंगता सौरऊर्जा प्रकल्पातून वीज खरेदीबाबत निविदा प्रकाशित केल्या आहेत. सदर स्पर्धात्मक निवड प्रक्रिया उलट बोलीसह करण्यात येणार आहे. सदर निविदेत तरंगता सौरऊर्जा प्रकल्प विकासक किमान 100 मे.वॅ.क्षमता ते 1000 मे.वॅ. क्षमता स्थापित करु शकणार आहे आणि त्यासाठी समितीने उजणी धरण येथील जलाशयावर प्रत्येकी 100 मे.वॅ च्या 10 जागा निश्चित केल्या आहेत. जेथे प्रकल्प विकासक तरंगते सौरऊर्जा प्रकल्प उभारणी करु शकतो. प्रकल्प विकासकाला तरंगते सौरऊर्जा प्रकल्पासोबत विजेचे निषकासन करण्याची प्रणाली उभारायची आहे.
हे तरंगते सौरप्रकल्प उभारल्यानंतर  एका वर्षात कतीतकमी 1 टीएमसी पाण्याचे बाष्पीकरण टाळूण, पाण्याची बचत करता येणार आहे. तसेच जमीनीवर उभारलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या तुलणेत तरंगते सौर ऊर्जा प्रकल्पाची कार्यक्षमता 6%  ते 7% नी जास्त अपेक्षित आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही उजनी धरण लगतच्या शेतक-यांना दिवसा वीज उपलब्ध करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
सदर निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता आवश्यक तपशीलवार माहिती टीसीआयएल वेब पोर्टल व महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

चांदणीचौकाच्या कामाला संरक्षण खात्याचा ग्रीनसिग्नल – गिरीश बापट

0
पुणे : चांदणी चौकातील एनडीए रस्यावरील बांधकामाला आज केन्द्रीय संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखविला.त्यापाठोपाठ  लोहगाव विमानतळावरील कार्गोच्या  स्थलांतरालाही संरक्षण खात्याने  मान्यता दिली. त्यामुळे ही दोन्ही कामे आता तातडीने मार्गी लागतील. अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी नवीदिल्ली येथे  पत्रकारांना दिली. 
 
संरक्षणमंत्री डाॅ. निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवीदिल्ली येथे आज बैठक झाली. केंन्द्रीय् मंत्री नितीन गडकरी व संरक्षण खात्याचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. त्यामध्ये पुण्याच्या प्रश्नावर निर्णायक चर्चा झाली. अशी माहितीही बापट यांनी दिली. ते म्हणाले की चांदणी चौकातील उड्डाणपूल व रुंदीकरणाचा नियोजित प्रकल्प राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या हद्दीतून जातो. प्रबोधिनीची ४८ गुंठे जागा या प्रकल्पात आहे. ती ताब्यात देऊन त्याठिकाणचे उड्डाणपूलाचे काम सुरू करण्यास संरक्षण मंत्रालयाने आज तत्वश: मान्यता दिली. या जमिनीच्या बदल्यात अहमदनगरमध्ये संरक्षण खात्याला जागा देण्याचे या बैठकीत ठरले. 
 
लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण या विषयावरही या बैठकीत चर्चा झाली. संरक्षण खात्याने विस्तारीकरणासाठी पंधरा एकर जागा दिली आहे. तथापि कार्गोचे स्थलांतर न झाल्याने विस्तारीकरणाचे काम रखडले होते.कार्गोच्या  स्थलांतराला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे विमानतळाचे  लवकरच विस्तारीकरण पूर्ण होईल.

वाहतूक जनजागृकतीसाठी मदत करावी – तेजस्वी सातपुते

0

पुणे -शहराची वाढती वाहतूक हि समस्या मोठी जटील झाली असून शिस्तप्रिय म्हणून ख्याती असलेल्या ख्रिस्ती   समाजाने वाहतूक जनजागृतीसाठी मदत करावी . आसे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेच्या  पुणे शहर पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी येथे केले .त्या ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त एम्प्रेस गार्डन येथे ख्रिस्त ऐक्य संघटतर्फे मेळावा कार्यक्रमात त्या बोलत होत्या .  यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा संघटनेतर्फे सन्मान करण्यात आला . या मेळाव्यास शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत , माजी आमदार मोहन जोशी , परिमंडळ चारचे सहाय्यक आयुक्त देविदास पाटील , वानवडी विभागाचे वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र विभांडीक , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड ,फिनिक्स बहुद्देशीय संस्थेचे  सचिव संभाजी बालवडकर ,व सनराईज इंटरनॅशनल स्कुलचे अध्यक्ष शरद बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते .   सत्कार्थींमध्ये प्रामुख्याने दत्तवाडी येथे नुकत्याच घडलेल्या कालवा फुटीच्या घटनेत अनेकाचे प्राण वाचविणाऱ्या महिला पोलीस हवालदार नीलम गायकवाड , पेन्टथलॉन गेम २००८मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारे अजिंक्य बालवडकर , सामाजिक कार्यकर्ते मनजितसिंग विरदी , प्रकाश पी परब , शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल २००८ मध्ये पुरस्कार प्राप्त रेखाब जे लोंढे , सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मते , नगरसेविका अश्विनी लांडगे ,माजी नगरसेवक  दीपक उर्फ बाबा मिसाळ , नगरसेवक वनराज आंदेकर , राजाभाऊ चव्हाण व राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू तनुश्री बेंगळे आदी मान्यवरांचा सन्मानचिन्ह , पुष्पगुछ व शाल देउन मान्यवर पाहुण्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला .

 यावेळी ख्रिस्ती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .या मेळाव्याचे संयोजन ख्रिस्त ऐक्य संघटनेचे अध्यक्ष राजेश राठोड , उपाध्यक्ष राजन नायर , सचिव मोझेस कलकोटी , खजिनदार अनिल भालशंकर , संपर्कप्रमुख राजेंद्र शिंदे , प्रसिध्दीप्रमुख सुहास जाधव, पास्टर सुधीर चव्हाण ,ऍड  रविंद्र शिंदे , सुशील बेंगळे व मनोज परदेशी आदींनी केले . प्रास्ताविक राजेश राठोड यांनी केले तर सूत्रसंचालन मोझेस कलकोटी यांनी केले तर आभार राजन नायर यांनी मानले . 

राज्य कर्मचार्‍यांना खुशखबर..सातवा वेतन आयोगनुसार 4 ते 14 हजार रुपये पगारवाढ मिळणार

0

मुंबई- राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना तब्बल 15 टक्के पगारवाढ दिली जाणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकारी कर्मचाऱ्यांना 4 ते 14 हजार रुपयांची पगारवाढ मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

1 फेब्रुवारीला होणार्‍या पगारात मिळेल वाढीवर रक्कम

राज्य कर्मचार्‍यांना 1 जानेवारी 2018 पासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. विशेष म्हणजे कर्मचार्‍यांना 1 फेब्रुवारीला होणाऱ्या पगारात वाढीव रक्कम मिळणार आहे. 1 जानेवारी 2016 पासूनची तीन वर्षांची थकबाकी पाच समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा केली जाणार आहे.

17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

राज्यातील 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. त्याद्वारे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन मासिक चार ते पाच हजार रुपयांनी, तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन पाच ते आठ हजार रुपयांनी तसेच प्रथम व द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन नऊ ते 14 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 42 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार अाहे.

बंड केले म्हणून मी तरलो : अमोल पालेकर

0

पुणे-मागे वळून पाहताना माझ्या या निवड प्रक्रीयेची मला खंत वाटत नाही.  मी बंड केले म्हणून मी तरलो, असे मत ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केले. आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित ९ व्या आशियाई चित्रपट महोत्सवात आज ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना यंदाचा ‘झेनिथ एशिया सन्मान’ नवसिनेमाचे प्रणेते कुमार शाहनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना अमोल पालेकर म्हणाले की, पारंपारिक चित्रपटांमध्ये स्त्रियांना नेहमी दुय्यम भूमिका दिल्या जातात. मात्र माझ्या चित्रपटांची स्त्री हीच केंद्रीय संकल्पना असायची. स्त्रियांचा परिवारात आणि समाजात मानसन्मान उंचावेल अशाच भूमिका मी स्त्रियांच्याबाबतीत आखत गेलो. कलेला कलेच्या दृष्टीनेच पाहिले पाहिजे. त्यात भावना गुंतवून भावना दुखवला गेल्या, असा दृष्टिकोन ठेवायला नको.

मी प्रेक्षकांना विनंती करतो की ब्लॅक किंवा व्हाईट अशा कथानकात अडकू नये. सध्या सगळीकडे असहिष्णूता दिसून येत आहे. पद्मावत सारख्या चित्रपटाला विरोध होतो. आमिर खानने जर महाभारतात ‘श्रीकृष्णाची भूमिका निभावली तर त्यालाही विरोध होतो. देशातील ही परिस्थीती आहे.

पारंपारिक चित्रपट सृष्टीत रमण्याऐवजी मी प्रादेशिक चित्रपटांमध्ये अधिक रमलो. चित्रपट निवडताना मी संहितेच्या आशयाला महत्त्व दिल्याने मी चित्रपट स्वीकारण्याऐवजी अनेक चित्रपट नाकारतच गेलो. मागे वळून पाहताना माझ्या या निवड प्रक्रीयेची मला खंत वाटत नाही.  मी बंड केले म्हणून मी तरलो, असे मत ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केले.

 

 

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात ” आठवले चषक कॅरम स्पर्धेचे ” उदघाटन

0

पुणे-केंद्रीय सामाजिक न्याय  राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त भवानी पेठ काशेवाडीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातर्फे ” आठवले चषक कॅरम स्पर्धेचे  ” उदघाटन करण्यात आले . या कॅरम स्पर्धेचे उदघाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले . या कॅरम स्पर्धेचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदीप धांडोरे व पुणे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष लियाकत शेख यांनी केले होते . या कॅरम स्पर्धेमध्ये ९६ कॅरम खेळाडूंनी सहभाग घेतला . यावेळी प्रमुख पंच म्हणून उमेश चव्हाण ,मनिष चव्हाण व राजू वानखेडे यांनी काम पाहिले . तर सहाय्यक पंच म्हणून रणजित लांडगे , विनोद लोंढे यांनी काम पाहिले .