Home Blog Page 3019

असंतोषाविरोधात सामान्यांचा एल्गार ‘आसूड’

0

मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. अनेक चित्रपटातून आपल्याला त्यांच्या अभिनयसामर्थ्याची चुणूक पहायला मिळतेय. ‘आसूड’ या आगामी मराठी चित्रपटातून मराठीतले हे दिग्गज आपल्याला एकत्र आलेले पाहायला मिळणार आहेत.

विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंतयांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारेराणा जंगबहादूर, अवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत हे दोन नवे चेहरे या चित्रपटात झळकणार आहेत. 

अन्नदाता शेतकरी हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण सद्यस्थिती अशी आहे कि, हाच शेतकरी आज अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जगत आहे. त्याच्यासाठी निर्माण केलेल्या योजना, सोयी-सुविधा आज त्याचापर्यंत पोहोचतच नाही. शेतकऱ्याच्या या विदारक परिस्थितीवर ‘गोविंद प्रोडक्शन्स’ प्रस्तुत ‘आसूड’ या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. अॅक्शन, इमोशन च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या आणि सरकारी यंत्रणा यावर ज्वलंत टीका करणारा आणि सगळ्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा असा राजकीय थरारपट ‘आसूड’च्या निमित्ताने प्रेक्षकांना ८ फेब्रुवारीला बघता येणार आहे. 

चित्रपटाची निर्मिती डॉ. दीपक मोरे यांची असून सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेबजळमकर तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथापटकथा आणि संवाद निलेशरावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे. धनराज पाटील लाहोळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

दुचाकी स्वारांवरील पोलिसी कारवाया हा भाजपचा डल्ला – रमेश बागवे

0

पुणे- रस्त्यावरील वाहनचालकांवर हेल्मेट सक्तीच्या नावाखाली सुरु असलेल्या पोलिसी कारवाया हा, प्रत्येकाला १५ लाख रुपये देण्याचा वादा करणाऱ्या भाजपचा डल्ला आहे. भाजप हाच पोलिसांच्या खांद्यावर बंदुका ठेऊन हि वसुली करत असल्याचा आरोप करत या दरोडेखोरीला आम्ही शेवटपर्यंत विरोध करू असा पवित्रा आज पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी घेतला आहे .
ते म्हणाले , आम्ही सुरुवाती पासून पुणे शहरात हेल्मेट सक्तीला विरोध करत आलो आहोत . गेली ३० वर्षात अनेकदा पुणेकरांनी या सक्ती विरोधात आवाज उठविला आणि सक्ती हाणून पाडली . असे असताना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच हि वसुली पुणे पोलिसांनी चालविली आहे .पुण्यात हेल्मेट सक्ती अव्यवहार्य असून ती राबविणे नाग्रीक्नावर जुलूम करणे होय .सरकार च्या तिजोरीत खडखडाट करून ठेवला आणि आता साईबाबांच्या चरणी आलेले पैसेही यांनी कर्ज म्हणून घेतले ते त्यांना पुरेनात म्हणून पुणेकरांची भर रस्त्यावर लुट सुरु आहे .यावर पुणेकर एकत्र येवून पुन्हा धडा शिकवतील आणि आम्हीही शेवटपर्यंत अशा जाचक सक्तीला विरोध करू असे ते म्हणाले.

दुचाकीस्वारांवरील पोलिसी कारवायांनी पुण्यातील नागरिकात संताप (व्हिडीओ- ऑडिओ नीट ऐका)

पुणे- हेल्मेट सक्ती आणि वाहतूक नियमनाच्या नावाखाली पुणे पोलिसांनी सुरु केलेल्या आक्रमक कारवायांनी पुणेकर हैराण झाले असून या कारवायांचा फटका आगामी निवडणुकीत भाजप स्नेला बसल्याशिवाय राहणार नसल्याचे नागरी प्रतिक्रियांमधून स्पष्ट होते आहे. शिवाय हेल्मेट सक्ती बद्दल  सक्तीच्या समर्थन करणाऱ्या केलेल्या वार्तांकना मुळे हि प्रख्यात आणि विश्वासार्ह म्हणून गणल्या जाणाऱ्या काही माध्यमांवरही चौकाचौकातून नागरिकांनी पोलिसांपुढे नाराजी व्यक्त केली . जे पोलीस या माध्यमांच्या बातम्यांचा दुचाकीस्वारांना हवाला देऊ पाहत होते.
यावेळी वायरलेस मेसेज वरून रोज सातत्याने पोलिसांना  येणारे कंट्रोल रूम मधील मेसेज पोलीस नागरिकांना ऐकवीत होते . या मेसेज द्वारे , आज रोजच्या पेक्षा जास्त कारवाई झाली पाहिजे असा आदेश रस्त्यांवरील पोलिसांना तासाला दिला जात होता .एकीकडे हेल्मेट विरोधी कृती समिती हतबल झालेली असताना दुसरीकडे पोलिसी कारवायांनी वेग घेतल्याचे आज दिसत होते. नागरिक भाजप सेनेच्या आमदार खासदारांची नावे घेऊन शिव्या शाप देत दंड भरताना दिसत होते … आम्ही इथे एक हलकीशी व्हिडीओ झलक देत आहोत ..एक पोलिस   आधीकारी   आणि  दुचाकी स्वार महिला    यांंच्यातील सं वाद …. कान देवून ऐका….

 

पर्यावरणपूरक सुपारीच्या पानांच्या प्लेटवर अबालवृद्धांनी रंगवला कॅनव्हास

0
सुपरमाईंड फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ युवा, नटराज निकेतन व सामवेद इंटरनॅशनलतर्फे आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा  
पुणे : ‘सेव्ह अर्थ’, ‘गो-ग्रीन से नो टू प्लास्टिक’, ‘प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत अबालवृद्धांनी पर्यावरणपूरक सुपारीच्या पानांच्या प्लेटवर कॅनवास रंगवला. पुण्यातील विविध शाळांमध्ये सकाळपासूनच चित्र काढण्याची लगबग चालू झाल्याने ‘तारे जमीन पर’ची अनुभूती आली. ‘से नो टू प्लास्टिक’ ही संकल्पना घेऊन पुण्यातील सुपरमाईंड फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ युवा, नटराज निकेतन, नागपूर व सामवेद इंटरनॅशनल या संस्थांनी आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.
पुण्यात मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कुल, बालशिक्षण मंदिर, अहिल्यादेवी कन्याशाळा, राजा शिवराय प्रतिष्ठान, दरोडे स्कुल, राजीव गांधी इंटरनॅशनल स्कुल, महेश विद्यालय, दामले प्रशाला या शाळांमध्ये सकाळी ९ ते १० या वेळेत ही स्पर्धा झाली. जवळपास १० हजार पेक्षा अधिक विद्यार्थी व प्रौढांनी या स्पर्धेत भाग घेतला. ट्रॅफीक पोलीस, रिक्षावाले काका, पालक, शिक्षक व स्वतः मुख्याध्यापकानींही चित्रे रंगवली. सुपारीच्या पानांपासून बनवलेल्या प्लेटवर आकर्षक रंगसंगती आणि अनुरूप संदेश देणारी ही बोलकी चित्रे सगळ्यांचेच लक्ष वेधत होती.
कटारिया हायस्कुल येथे झालेल्या स्पर्धेवेळी ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल, बाबा कुलकर्णी, संयोजिका सुपरमाइंडच्या मंजुषा वैद्य, दया कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ युवाचे श्रीकांत जोशी, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्यातर्फे या स्पर्धेची विशेष दखल घेण्यात आली असून, या उपक्रमाचे वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाल्याची अधिकृत घोषणा नागपूर येथे केली गेली व उपक्रमाचे प्रमुख मुकुंद पात्रीकर याना याचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. प्रत्येक शाळांतील पहिल्या दहा चित्रांना पदक आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या स्पर्धेला माँटेसरी ते ज्येष्ठ नागरिक या गटातील अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांनीच अतिशय उत्कृष्ट चित्रे काढली आहेत. ही स्पर्धा भारतात दिल्ली, मुंबई, पुणे, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, गुजरात, तामिळनाडू, ओरिसा यासह देशातील अनेक प्रमुख शहरांच्या ठिकाणी झाली. ‘प्लास्टिकचा वापर टाळा व त्याऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करा’ असा संदेश या चित्रकला स्पर्धेतून दिला गेला. यातील उत्कृष्ट चित्रांची निवड करून लवकरच त्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, असे मंजुषा वैद्य म्हणाल्या.

प्रतिक्रियात्मक लेखनाकडून वैचारिक बैठकीकडे व्हावा नव लेखनाचा प्रवास !

0
 ‘ सोशल मीडिया आणि नवलेखनाची परंपरा   ‘ या विषयावरील  परिसंवादाचा सूर
पुणे :’ प्रतिक्रियात्मक लेखनाकडून वैचारिक बैठकीकडे  नव लेखनाचा प्रवास व्हावा ‘ असा सूर     अ.भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलनातील  ‘ सोशल मीडिया आणि नवलेखनाची परंपरा   ‘ या विषयावरील  परिसंवादात उमटला !
मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आणि महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आयोजित बाराव्या अ.भा. मुस्लीम  मराठी साहित्य संमेलनाच्या
दुसऱ्या दिवशी,५ जानेवारी शनिवारी सकाळी ९ वाजता ‘ सोशल मीडिया आणि नवलेखनाची परंपरा   ‘ या विषयावर  परिसंवाद आयोजित करण्यात आला . त्यात   पत्रकार कलीम अजीज , प्रा.डॉ. समाधान इंगळे , ‘ अक्षरनामा ‘ पोर्टलचे राम जगताप , पत्रकार हीना कौसर खान, कुणाल गायकवाड    आदी नव्या पिढीचे प्रतिनिधी सहभागी झाले .
आझम कॅम्पस मधे हा कार्यक्रम झाला.
हिना कौसर खान म्हणाल्या, ‘ नव माध्यमांवरील लिखाण करणारे तरुण पुस्तक न लिहिणारे पण तरीही लेखकच आहेत. काळ समजून घ्यायला या नोंदी उपयोगी पडतील. प्रतिक्रियात्मक लेखन या नव माध्यमांवर अधिक होत असले तरी ते उथळ नाही. मात्र, या लिखाणाचा वैचारिक बैठकीकडे प्रवास सुरू झाला पाहिजे. ‘
कुणाल गायकवाड म्हणाले, ‘ नव माध्यमातील लिखाणातून साहित्याची नवी सैद्धांतिक मांडणी होताना दिसत नाही. संशोधन केले पाहिजे, असा दृष्टीकोण दिसत नाही. प्रस्थापित साहित्यात जितका जातीयवाद नाही, तितका नव माध्यमात दिसतो. मात्र, एकाच कंपनीकडे नव माध्यमांची मालकी असणे धोक्याचे आहे. ‘
अक्षरनामा ‘ पोर्टलचे राम जगताप म्हणाले, ‘ भोवतालच्या घडामोडी समजून घ्यायला सोशल मीडिया उपयोगी पडतो. मुस्लीम तरुणांनी अजून अधिक प्रमाणात सोशल मीडियाकडे वळले पाहिजे. आपण कुठलीही गोष्ट फॉरवर्ड करताना स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की हा मजकूर विश्वासार्ह आहे का ? त्यातून सोशल मीडियावर फॉरवर्ड होणारा  निम्मा फेक मजकूर कमी होईल. अनेक तरुण -तरुणी इथे सशक्तपणे, सकारात्मक व्यक्त होत आहेत, त्यातून प्रत्येकाला रोज नवी उमेद मिळेल.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रा. समाधान इंगळे  यांनी सोशल मीडियावरील दमदार नव लेखकांचा परिचय करुन दिला. निवडक उतारे वाचून दाखवले. ते म्हणाले, ‘ सोशल मीडियामुळे नवी भाषा , नव्या इमोजीची अभिव्यक्ती निर्माण होत आहे. सामाजिक, राजकीय बदल होत आहेत. अॅडिक्शन देखील निर्माण होत आहे. प्रस्थापित माध्यमांनाही सोशल मीडियावरील टीकेने अनेकदा बदलावे लागले आहे. ‘
दाहक मुजावर यांनी सूत्रसंचालन केले. फिरोज खान यांनी वक्त्यांचा सत्कार केला.
सकाळी ११ वाजता ‘मुस्लिम तरुणापुढील आव्हाने  ‘या विषयावर  परिसंवाद आयोजित केला होता . त्यात  डॉ एस एन पठाण ,गणी  आजरेकर ,चंद्रशेखर शिखरे ,डॉ फारुख  तांबोळी ,हलीमा कुरेशी ,अझीम शेख आदी  सहभागी झाले.
दुपारी दीड वाजता ‘प्रसारमाध्यमे  आणि  मुसलमान ‘  या विषयावर  परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात  डॉ  जयदेव डोळे ,संजय आवटे , आमदार इम्तियाझ जलील ,बशीर मुजावर ,राज काझी ,अझीम शेख ,साजिद पठाण आदी  सहभागी झाले .
सायंकाळी ४ वाजता ‘ धार्मिक ध्रुवीकरण आणि  समतेच्या चळवळी  ‘ या विषयावर  परिसंवाद झाला. त्यात  डॉ  रत्नाकर महाजन ,अन्वर राजन  ,निरंजन टकले ,डॉ सय्यद रफिक पारनेरकर , ह भ प डॉ  सुहास  फडतरे महाराज ,डॉ सुदाम राठोड आदी  सहभागी झाले .
सायंकाळी ७ वाजता ‘अनुवंशिक गैरसमज ‘ ही एकांकिका सादर झाली . रात्री साडेसात वाजता ‘मुस्लिम यशस्वी उद्योजकांशी संवाद ‘ या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. तर रात्री ९ वाजता ‘मिला जुला मुशायरा ‘  रंगला .
*संमेलनातील रविवारचे कार्यक्रम*
६ जानेवारी (रविवारी ) सकाळी ९ वाजता कविसंमेलन होणार आहे . सकाळी ११ वाजता ‘मुस्लिम मराठी साहित्याचे सामाजिक योगदान  ‘या विषयावर  परिसंवाद आयोजित केला आहे . त्यात  फ म  शहाजिंदे ,डॉ विद्या बोरसे ,डॉ  विश्वास वसेकर ,डॉ  अक्रम पठाण ,डॉ   पांडुरंग कंद आदी  सहभागी होणार आहेत .
दुपारी दीड वाजता मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाची सर्वसाधारण सभा होणार असून खुले संमेलन होईल . दुपारी अडीच वाजता ‘इस्लाम आणि स्त्रियांचे हक्क ‘ हा परिसंवाद होईल . त्यात डॉ कादिरा शेख ,आबेदा इनामदार ,डॉ आयेशा पठाण ,सीमा देशपांडे, शरीफा बाले सहभागी होणार आहेत .
सायंकाळी साडेचार वाजता या तीन दिवसीय संमेलनाचा समारोप होणार असून  माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे ,सामाजिक  न्याय मंत्री दिलीप कांबळे ,उपस्थित राहणार आहेत .

पीएमआरडीएच्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला गती देण्यासाठी आढावा बैठक

0

पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला
गती देण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली दि.०५ जानेवारी २०१९ रोजी शनिवारी औंध
कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्याचबरोबर पीएमआरडीएमध्ये सध्या सुरु असलेली विविध
विकास कामे मेट्रोसह, रिंगरोड, टीपीस्कीम तसेच पीएमआरडीए होर्डिंग पॉलिसी व अनधिकृत बांधकाम
सध्य स्थितीची माहिती पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत घेतली.
यावेळी बैठकीला अन्न व नागरी पुरवठा तथा, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह महानगर आयुक्त किरण
गित्ते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कविता द्विवेदी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रविणकुमार देवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद पाठक, उपजिल्हाधिकारी सुहास मापारी,
महानगर नियोजनकार विवेक खरवडकर, महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी तसेच
पीएमआरडीए अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत पीएमआरडीएच्या अनेक विकास कामांवर चर्चा झाली. त्यामध्ये टाटा-सिमेन्स
कंपनीच्या प्रतिनिधीसोबत शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या कामाकाजाचे टप्पेमध्ये होणारे डिझाइन, मेट्रो
अलाइंमेंट व व्यवहार्यता तफावत निधीसाठी आवश्यक शासकीय जमिनी, मेट्रो सुरक्षा तसेच मेट्रोला
लागणारी जागा, स्थानके, पीएमसी क्षेत्रातील casting yard साठी बैठका, विकास आराखड्यावर सुरु
असलेले बदल आदी विषयावर चर्चा झाली. त्याचप्रमाणे मेट्रो व रिंगरोडची कामे सुरु असताना नागरिकांना
कोणतीही हानी पोहचणार नाही याची दक्षता घेण्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. टाटा-सिमेन्सच्या
प्रतिनिधींनी सादरीकरणाच्या माध्यमातून मेट्रोच्या होणाऱ्या कामकाजाचा आढावा बैठकीमध्ये मेट्रोचे १०
जानेवारीपासून प्रत्यक्ष मूळ ग्राउंड मार्किंग सुरु होणार असल्याचे सांगितले.
तसेच पीएमआरडीए क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाना सध्या २४३३ नोटीसा बाजाविलेल्या आहेत. तसेच
१४३६ नोटीसावर पीएमआरडीएने निर्णय प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच १९४ बांधकामावर कारवाई करून
दोन लाख पन्नास हजार चौरस फूट बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे. अनधिकृत बांधकामाला
अडथळा ठरणाऱ्या ४७ जणांवर FIR आतापर्यत दाखल करण्यात आले आहेत. तसेच अनधिकृत बांधकाम
अधिकृत करण्यायोग्य असलेल्या बांधकामधारकांना पत्र पाठवून सूचना देखील देण्यात येत आहेत.
त्याचप्रमाणे सध्या पीएमआरडीए क्षेत्रात सुरु असलेली रस्ते विकास कामे व प्रस्तावित रस्ते विकास कामे
या रस्त्यांचाही आढावा घेण्यात आला. पीएमआरडीए क्षेत्रात एप्रिल २०१८ मध्ये जाहिरात दर निश्चित
करण्यात आले आहेत. पीएमआरडीएकडे ६०० होर्डिंग धारकांनी नोंदणी केलेली आहे. मंजूर दराप्रमाणे
जाहिरातधारकांनी परवानगी शुल्क भरून रीतसर परवानगी घ्यावी. जाहिरात धोरणाप्रमाणे इतर
मागण्याबाबत होर्डिंगधारकांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे पालकमंत्र्यांनी झालेल्या बैठकीत
सांगितले. सर्वाना नवीन वर्षाच्या शुभेछां देउन त्यांनी बैठकीचा समारोप केला.

समाजमनाची वैचारिक स्वच्छता हे गाडगेबाबांचे स्वप्न -प्रा. तेज निवळीकर

0

पुणे : “संत गाडगेबाबा हे कृतिशील सुधारक होते. विचार, निर्णय आणि कृती या त्रिसूत्रीचा अवलंब करून कीर्तनातून समाजात जागृती केली. गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक परिवर्तनासाठी वेचले. त्यांचे विचार परखड असले, तरी त्यांना फारसा विरोध झाला नाही. कारण त्यांच्या विचारात आणि आचारात एकवाक्यता होती. आपल्या भोवतालच्या परिसराच्या स्वच्छतेबरोबरच समाजमनाची स्वच्छता व्हावी, हे गाडगेबाबांचे स्वप्न होते,” असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते आणि गागडेबाबांचे अभ्यासक प्रा. तेज निवळीकर यांनी केले. साहित्यातून सामाजिक सुधारणेचा विचार पुढे नेण्यासाठी कायमच प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

भोसरी येथील प्रितम-प्रकाश महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन व प्रकाश पगारिया व्याख्यानमालेतच्या समारोपप्रसंगी प्रा. तेज निवळीकर बोलत होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. ललिता सबनीस, मुख्य संयोजक डॉ. अशोककुमार पगारिया, स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक प्रकाश रोकडे, प्रीतम-प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, बंधुता प्रतिष्ठानचे प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख, व्याख्याते प्रा. तेज निवळीकर यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’, तर पीपल्स बॅंकेचे चेअरमन बबनराव भेगडे यांना ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार’ डॉ. सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “संविधानाचा विचार सगळीकडे पोहोचविण्यासाठी बंधुता हे मूल्य अतिशय आवश्यक आहे. आर्थिक श्रीमंतीपेक्षाही वैचारिक श्रीमंती अधिक महत्वाची असते. त्यामुळे बंधुतेचे हे तत्वज्ञान श्रीमंतांपर्यंत पोहोचवायला हवे. आज समाजात अशांतता असण्याचे कारण हे बंधुतेचा अभाव आहे. स्वातंत्र्य, समता यासह बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांनाही आपण प्राधान्य दिले पाहिजे. माणसांच्या मनातील भेद जाळण्यासाठी बंधुता मनात रुजायला हवी.”

प्रकाश रोकडे म्हणाले, “बंधुतेचा विचार घेऊन गेली वीस वर्षे समाजात जागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजाला दिशा देणारे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या भावनेतून राष्ट्रीय बंधुता संमेलने घेतली जात आहेत. रा. ग. जाधव यांच्यापासून डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यापर्यंत अनेक मान्यवर साहित्यिकांनी या संमेलनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. ही परंपरा यापुढेही अशीच चालू राहील.”

यावेळी एकविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अशोककुमार पगारिया यांची निवड करण्यात आली. बबनराव भेगडे, डॉ. अशोक शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. बाळासाहेब जवळकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी आभार मानले.

चाकण येथे स्टंट शो ..

0

चाकण: केटीएम या युरोपातील दिग्गज अशा रेसिंग ब्रॅन्ड तर्फे चाकण येथे आकर्षक केटीएम स्टंट शो चे आयोजन केले होते. या शो चे आयोजन व्यावसायिक अशा स्टंट कलाकारांकडून लोकांना चांगले स्टंट्स पहायला मिळावेत या उद्देशाने करण्यात आले होते. तसेच चाहत्यांना नवीन आणि अधिक प्रतीक्षेत असलेली ड्यूक १२५ एबीएस बघण्याची संधी मिळाली.या स्टंट शो चे आयोजन हॉटेल साई रीजेंसी, ५२/२ कुरुळी, चाकण रोड, भोसरी, पुणे येथे करण्यात आले होते. यामध्ये व्यावसायिक अशा स्टंट टिम तर्फे श्वास रोखून धरणाऱ्या स्टंट्सने आपली कला ही केटीएम ड्यूक बाईक्सच्या माध्यमातून दाखवली.

श्री.अमित नंदी बजाज ऑटो लिमिटेडच्या प्रो बायकिंग चे प्रेसिंडेंट यांनी सांगितले ‘‘केटीएम हा ब्रॅन्ड हाय परफॉर्मन्स रेसिंग बाईक म्हणून प्रसिध्द आहे, म्हणून आम्ही आमच्या ग्राहकांना नेहमीच केटीएम बाईक देत असलेल्या साहस आणि उत्साहाचा अनुभव आमच्या ग्राहकांना उपलब्ध करून देत आहोत.व्यावसायिक स्टंट्सचे हे कार्यक्रम विविध शहरांत होणार असून भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावर आयोजित करणार आहोत.केटीएम हा एक्सक्लूझिव्ह असा प्रिमियम ब्रॅन्ड असून यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना अनोखा केटीएम अनुभव देण्यास उत्सुक आहोत.’’

हा कार्यक्रम शहरांतील लोकांसाठी खुला आहे.आजपर्यंत अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन कांचीपुरम,कोईम्बतूर,चेन्नई,विजयापूर,लखनौ,इंदूर,औरंगाबाद,जम्मू,राजकोट,जालंधर,जोधपुर,अंकलेश्वर, कल्याण,सांगली,सातारा,भिवंडी आणि अशा अन्य कित्येक शहरांत करण्यात आले आहे.

केटीएमच्या चाहत्यांना केटीएम बाईक्स या सिद्धेश्वर कॉम्प्लेक्स, पवना सहकारी बँके समोर, चिंबळी फाटा जवळ, कुरुळी, पुणे , महाराष्ट्र येथे खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

भारताच्या रोहन बोपन्ना-दिवीज शरण व ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा यांच्यात विजेतेपदासाठी लढत

0

पुणे: एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण, ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव  करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुहेरीत उपांत्य फेरीच्या चुरशीच्या झालेल्या लढतीत भारताच्या अव्वल मानांकित रोहन बोपन्ना व दिवीज शरण या जोडीने इटलीच्या सिमॉन बोलेल्ली व क्रोएशियाच्या इवान दोडीज यांचा सुपरटायब्रेकमध्ये 6-3, 3-6, 15-13 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 1 तास 33 मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये 4-3अशा फरकाने आघाडीवर असलेल्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांनी सिमॉन बोलेल्ली व इवान दोडीज यांची आठव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-3असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत सिमॉन बोलेल्ली व इवान दोडीज यांनी रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांची चौथ्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. उत्कंठावर्धक झालेल्या सुपरटायब्रेकमध्ये रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांनी सुरेख खेळ केला. रोहन व दिवीज यांनी दोन मॅच पॉईंट्स वाचवले, तर पाचव्या मॅच पॉईंट्सवर 15-13 अशा फरकाने या जोडीने विजय मिळवला.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा या जोडीने स्पेनच्या गेरार्ड ग्रनॉलर्स व मार्सेल ग्रनॉलर्स या जोडीचा 6-4, 3-6, 10-6असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 1 तास 22 मिनिटे चालला. अंतिम फेरीत भारताच्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांचा सामना ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा यांच्याशी आज(दि.5 जानेवारी 2019 रोजी) दुपारी 3 वाजता होणार आहे.

दुहेरी गट: उपांत्य फेरी:
लूक बांब्रिज(ग्रेट ब्रिटन)/जॉनी ओमारा(ग्रेट ब्रिटन) वि.वि.गेरार्ड ग्रनॉलर्स(स्पेन)/मार्सेल ग्रनॉलर्स(स्पेन) 6-4, 3-6, 10-6;
रोहन बोपन्ना(भारत)/दिवीज शरण(भारत)(1)वि.वि. सिमॉन बोलेल्ली(इटली)/इवान दोडीज(क्रोएशिया) 6-3, 3-6, 15-13;

‘परिघाबाहेर’ –समाजाभिमुख कवितांचे प्रतिबिंब

स्त्रियांनी केवळ चूल आणि मूलं सांभाळायची असतात,  या मानसिकतेत आताशा खूपच फरक पडत चाललाय. विविध क्षेत्रांप्रमाणेच साहित्‍यक्षेत्रातही याचे प्रतिबिंब उमटत आहे. कवयित्री आशा अशोक डांगे यांनी नोकरी आणि कुटुंब या दोन्‍ही जबाबदा-या सांभाळून काव्‍यरचनेच्‍या क्षेत्रात ‘परिघाबाहेर’ या काव्‍यसंग्रहाच्‍या निमित्‍ताने आश्‍वासक पाऊल टाकले आहे. त्‍यांचे प्राथमिक आणि माध्‍यमिक शिक्षण औरंगाबाद येथे झाले. वडील कामगार कल्‍याण मंडळाच्‍या सेवेत होते. त्‍यामुळे मंडळाच्‍या विविध सांस्‍कृतिक उपक्रमाचा आस्‍वाद त्‍यांना शालेय जीवनापासून मिळत होता. मंडळाच्‍या ग्रंथालयाचा वाचनानुभव त्‍यांना समृध्‍द करुन गेला. वाचनाची आवड जोपासत असतांनाच महाविद्यालयीन जीवनात नाट्यस्‍पर्धांमधून आपले अभिनय कौशल्‍य  दाखवता आले. शाळेत असतांना चित्रकलेचे शिक्षक आणि कवी सुरेश धनगर यांच्‍यामुळे त्‍यांच्‍यात कवितेची आवड निर्माण झाली. इयत्‍ता सातवीतच त्‍यांनी पहिली कविता लिहीली. महाविद्यालयाच्‍या वार्षिक अंकात, औरंगाबादच्‍या दैनिक मराठवाडा, दिव्‍यमराठी, उर्मी साहित्‍य पत्रिका आदींमध्‍ये त्‍यांच्‍या कविता प्रकाशित झाल्‍या आहेत.

‘परिघाबाहेर’ या काव्‍यसंग्रहात एकूण 59 कविता आहेत. बहुतांश कविता या स्‍त्री जीवनाला केंद्रबिंदू मानणा-या आहेत. संसाराची चौकट न मोडता, संस्‍कारांच्‍या  वर्तुळात अडकूनही परिघाबाहेर जाऊन समाजव्‍यवस्‍थेवर, चाली-रितींवर आसूड ओढणा-या कवितांमुळे वाचक अंतर्मुख होतो. कवितेचा विषय, त्‍यातील सच्‍चेपणा, विचारांची स्‍पष्‍टता, सहजसोपी भाषा यामुळे कविता थेट मनाला भिडतात. स्‍त्रीमनाच्‍या वेदना मांडत असतांना कविता कुठेही अगतिक होत नाही, ती सशक्‍त, समर्थ आणि आत्‍मनिर्भरतेने प्रश्‍नांना सामोरे जाते, हीच या काव्‍यसंग्रहाची शक्‍ती आहे.

परिघाबाहेर/आशा अशोक डांगे/ गोदा प्रकाशन, औरंगाबाद/मुखपृष्‍ठ –सरदार जाधव/ पृष्‍ठ 80/ किंमत: 150 रु. (आशा अशोक डांगे- मोबाइल 9764455597)

स्‍त्री मुक्‍तीवर भाषणे ठोकणा-या पण स्‍वत:वरील कौटुंबिक अन्‍याय सहन करणा-या तथाकथित स्‍त्रीमुक्‍तीची व्‍यथाही त्‍या गांभिर्याने मांडतात. कवितेतील नायिका आपल्‍या मुलीला येणा-या संकटाची जाणीव करुन देत सावध करते, हा आशावाद नक्‍कीच प्रेरणा देणारा आहे. ‘मी फक्‍त लढले थोडं’ ही कविताही जगण्‍याची ऊर्मी देणारी आहे. ‘संकटे आली, वारही झाले, पडले थोडे, दुखावलेही थोडे.. मी फक्‍त केले एवढे.. मी मात्र जगले केवढे.. मी मात्र जगले सारे..’

कोणताही धर्म असला तरी स्त्रियांचे प्रश्‍न जवळपास सारखेच आहेत. ‘स्‍त्रीधर्म’ या कवितेत त्‍या म्‍हणतात, ‘तिला जपावा लागतो आणि जगावा लागतो प्रत्‍येकच धर्म’ ती निरपेक्षपणे पाळते.. शिकवण बुध्‍दांची.. अपेक्षा दु:खाचे मूळ कारण आहे.. येशूची करुणा मनात जागवून तिला जाळणा-यांना, जीव    घेणा-यांना माफ कर म्‍हणते. श्रीकृष्‍णाची शिकवण लक्षात ठेवून ‘कर्म करते, फळांची अपेक्षा न ठेवता… कारण तिचा एक धर्म आहे ‘स्‍त्रीधर्म’.  तिच्‍या भवतालचं  जग मात्र नेहमीच विसरतं स्‍वत:चा मानवधर्म  तिच्‍याकडे स्‍त्री म्‍हणून पहातांना..’ अशा शब्‍दांत त्‍या मनातील खंत व्‍यक्‍त करतात. स्त्रियांकडे सृजनाचे अनेक आविष्‍कार करण्‍याचे सामर्थ्‍य असून याची तिला जाणीव झाल्‍याने तिने कात टाकल्‍याचेही त्‍या ठामपणे अधोरेखित करतात.

कवयित्री आशा अशोक डांगे या शिक्षिका आहेत. शिकविणे हा धर्म असला तरी व्‍यक्‍तीगत जाणीवांचा प्रभाव वागणुकीवर पडत असतो. शिक्षीका आणि कवयित्री या नात्‍याने विद्यार्थ्‍यांच्‍या मनोभूमिकेवरही त्‍यांचे विचारमंथन चालते. निरागस चेहरा असलेले, उद्याचे भविष्‍य असलेले विद्यार्थी  पहातांना मन कधी-कधी खिन्‍नतेची खोल पातळी गाठू पहाते, पण त्‍याचवेळी  एखादा निरागस चेहरा नवचैतन्‍य निर्माण करुन आशा जागवतो… शाळेत शिकवतांना विद्यार्थ्‍यांचे जीवन जवळून अनुभवतांना त्‍यांचे संवेदनशील मन अस्‍वथ होतेच, पण उद्याची आशाही पल्‍लवीत करते.

हर्षाचा झोका, मनपाखरु, सखे फूल तू, रिमझिम, वळीव, पाऊस, ओंजळ, हिंदोळ्यावर, एकांत या सारख्‍या कवितांमधून प्रेमभावना आणि निसर्ग डोकावत असला तरी त्‍यात सहजता आहे. ‘भिजव सारा गाव…’ मधील भावना देवाला साद घालणारी आहे. जिथे मानवी प्रयत्‍न तोकडे पडतात, तिथे ‘देव’ ही संकल्‍पना उदयास येते. या कवितेतील देवाला घातलेले साकडे हे स्‍वत:च्‍या कल्‍याणासाठी नसून समस्‍त मानवजातीसाठी आहे, हे विशेष.

‘परिघाबाहेर’ या काव्‍यसंग्रहातील कवितांचा मूळ गाभा भावस्‍पर्शी असल्‍याने सामाजिक प्रश्‍नांबरोबरच मानवी संवेदनाचे भेदक प्रतिबिंब त्‍यात पडलेले दिसते, म्‍हणूनच या कविता समाजाभिमुख ठरतात.

परीक्षक : राजेंद्र सरग -9423245456

…तर मी याहूनही अधिक उत्तम काम केले असते – जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले

0

पुणे – आजवर मी प्रकाशात रहावं म्हणून माझ्यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या अनेक लोकांचा आज सन्मान होत आहे, याचा मला आनंद आहे. देशभरातील लोकांनी माझ्या कामासाठी मला भरपूर प्रेम दिले. तुमचं हे प्रेम मला आधी कळले असते तर मी याहूनही अधिक उत्तम काम केले असते अशी भावना जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कलासंस्कृती परिवाराच्या वतीने दिला जाणारा  ‘कलाकृतज्ञता पुरस्कार’ स्विकारताना व्यक्त केली.

कलासंस्कृती परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘स्टार ऑफ स्क्रीन’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कलासंकृती परिवाराचे अध्यक्ष वैभव जोशी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, कलासंस्कृती परिवाराचे उपाध्यक्ष माधव अभ्यंकर, मंगेश नगरे, सचिव विनय जवळगीकर, खजिनदार प्रवीण वानखेदे, रणजीतसिंह मोहिते पाटील, संजय ठुबे आदि मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारांचे यंदा चौथे वर्ष होते. विक्रम गोखले यांना ‘कलाकृतज्ञता पुरस्कार’, माजी आमदार व कला अभ्यासक उल्हास पवार यांना ‘समाज संस्कृती पुरस्कार’, किशोर पंडित, बाळासाहेब शिंदे आणि शुभांगी दामले यांना ‘निकोप सेबा पुरस्कार’, अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि अभिनेते अजिंक्य देव यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या प्रसंगी चित्रपटाच्या पडद्यामागील तंत्रज्ञ कलाकार यांना ‘स्टार ऑफ स्क्रीन’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये  स्पॉट बॉय, सेटिंग बॉय, लाईट बॉय, ड्रेस मन, हेअर ड्रेसर, आर्टिस्ट कॉर्डीनेटर, प्रोडक्शन मॅनेजर, प्रोडक्शन असिस्टंट, पी.आर., कॅमेरा असिस्टंट यांचा समावेश होता, त्यांना  स्मृतिचिन्ह आणि दोन लाख रुपयांचा फॅमिली मेडिक्लेम विमा देण्यात आला.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जॅकी श्रॉफ यांनी  कलासंस्कृती परिवाराच्या पडद्यामागील कलाकारांचा सन्मान करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मल्लखांब, योगासने, नृत्य, स्कीट आदी विविध सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच या प्रसंगी महाराष्ट्र मंडळाच्या मल्लखांबपटूनी प्रात्यक्षिके सादर केली, त्यांना विक्रम गोखले यांनी ११ हजार१११ रूपयांचे रोख पारितोषिक  दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिनी पोफळे यांनी केले.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांसाठी २८ एप्रिल व ५ आणि १२ मे ला मतदान होण्याची शक्यता

पुणे – आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचा संभाव्य कार्यक्रम “पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’(प्राब)ने जाहीर केला असून याप्रमाणे महाराष्ट्रात ३ टप्प्यात मतदान होण्याची शक्यता असून लोकसभेसाठी पहिला टप्प्यात २८ एप्रिलला मतदान घेण्यात येऊ शकते तर ५ आणि १२ मे मध्ये अनुक्रमे दुसरया व तिसऱ्या टप्प्यात मतदान होऊ शकेल. या संभाव्य लोकसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून ७ ते १२ मार्च २०१९ दरम्यान होणाची संभावना असून नामनिर्देशन पत्र पहिल्या टप्प्यासाठी १५ एप्रिल २०१९ तर दुसर्या टप्प्यासाठी २१ एप्रिल २०१४ पासून उपलब्ध होऊ शकणार आहे. देशात एकूण ९ टप्प्यात निवडणुका घेण्यात येतील व अंतीम मतदानानंतर २६ अथवा २८ मे २०१९ रोजी मतमोजणी देशभरातील सर्व मतदारसंघातील एकत्रितपणे होऊ शकणार असल्याचे “प्राब’’ने म्हटले आहे. संभाव्य निवडणुक कार्यक्रमानुसार इच्छूकांना लोकसभा निवडणुकांची पूर्वतयारी करण्यासाठी केवळ ८० दिवस उरले आहेत. सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश एका लोकसभा मतदारसंघात असल्याने व्यापकतेनुसार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कल्पक व अत्याधुनिकीकरण सुविधांचा वापर करावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकांची उमेदवारांनी पुर्वतयारी करणे शक्य व्हावे. याकरीता वेळेचे काटेकोरपणे नियोजन करण्याकरीता या संभाव्य निवडणुक कार्यक्रमाचा उपयोग निवडणुक लढविणा-यांना होणार असल्याचे “पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’(प्राब)चे अध्यक्ष चंद्रकांत भुजबळ यांनी सांगितले. वरील निवडणुक कार्यक्रम संभाव्य म्हणून सुनियोजित करण्यात आला असून यामध्ये  निवडणुक आयोगाचा अंतिम कार्यक्रम ग्राह्य धरावा असे आवाहनही संस्थेने केले आहे. “पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’ ही राजकीय क्षेत्रातील नामवंत सल्लागार संस्था आहे. राजकीय क्षेत्रात शिक्षण व प्रशिक्षण देणारी पहिली सर्वेक्षण व अॅनालिसेस करून देणारी एकमेव संस्था असून गेली २५ वर्षापासून देशभरात कार्यरत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, गोवा, उत्तरप्रदेश, मणिपूर, केरळ या राज्यांमध्ये निवडणूकांचा प्रदिर्घ अनुभव आहे. नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हापरिषद, विधानसभा, लोकसभा, आदी निवडणूकांकरीता मतदारांमध्ये प्रबोधनात्मक उपक्रमाबरोबरच निवडणूक विषयक सर्व सल्ला व सेवा पुरविण्यात येतात. “पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’(प्राब) ही अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविणारी एकमेव विश्वसनीय संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नसून संपूर्णपणे व्यावसायिक व सामाजिकतेची जाण असणारी संस्था आहे. अचूक सर्वेक्षण अंदाज, निवडणूक पुर्वतयारी, प्रचार तंत्र व मंत्र निवडणूक विश्लेषण, निवडणूक रणनिती, निवडणूक आचार संहिता, निवडणूक प्रशिक्षणाबरोबरच सुदृढ लोकशाही निर्माण करण्यासाठी विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. जनजागृती अभियानाबरोबरच निवडणूक विषयावर विविध स्वरूपाची प्रबोधनात्मक २१ पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधीना व मान्यवरांना यश संपादन करण्यासाठी अचूक सर्वेक्षण अंदाज व निवडणूक रणनिती वर्तविण्यात संस्थेने प्राविण्य मिळविले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही… सेवा उपलब्ध करून देणारी “पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’(प्राब) ही एकमेव विश्वसनीय संस्था आहे.

लोकसभा निवडणुकांचा संभाव्य निवडणुक कार्यक्रम असा असू शकेल कारण…..

[?]  लोकसभा मुदत- 4 जून २०१४ ते ३ जून २०१९ कालावधी आहे. ३ जून २०१९ पर्यंत १७ वी लोकसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे.
[?]  ११ जानेवारी २०१९ ला अंतिम मतदारयादी जाहीर होणार आहे ही यादीच लोकसभा निवडणुकांसाठी ग्राह्य असणार आहे.
[?]  लोकसभा निवडणुकांची महाराष्ट्रात आयोगाकडून तयारी /आवश्यक सुविधांसाठी निविदा प्रक्रिया सुरु.
[?]  अर्थसंकल्पीय अधिवेशन व दहावी बारावीच्या परीक्षांचा कालावधीनंतरच निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होईल.
[?]  विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 18 फेब्रुवारीऐवजी 25 फेब्रुवारी 2019 पासून होणार आहे. ते ८ दिवस कामकाज पार पडेल. अंतिम अर्थसंकल्प जूनमध्ये आचारसंहिता संपल्यावर मांडण्याची शक्यता.
[?]  गुरुवार 21 फेब्रुवारी 2019 ते बुधवार 20 मार्च 2019 या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा आहे.
[?]  शुक्रवार 1 मार्च 2019 ते शुक्रवार 22 मार्च 2019 दरम्यान दहावीची लेखी परीक्षा आहे.
[?]  सीबीएसई बोर्डाच्या 12वी ची परीक्षा 15फेब्रुवारी पासून 3 एप्रिल दरम्यान होणार आहे.
[?]  सीबीएसई बोर्डाच्या दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत असणार आहे.

[?] असे होइल महाराष्ट्रात मतदान…..

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी एप्रिल महिन्यातील अखेरच्या आठवड्यातील रविवार व मे महिन्यातील पहिला व दुसरा रविवार म्हणजे २८ एप्रिल तसेच ५ व १२ मे २०१९ अशा तीन टप्प्यांमध्ये  मतदान होण्याची शक्यता आहे.

[?] पुणे, नगर, कोल्हापूरमध्ये ५ मे तर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये १२ मे रोजी मतदान होण्याची शक्यता-

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी एप्रिल महिन्यातील अखेरच्या आठवड्यातील रविवार व मे महिन्यातील पहिला व दुसरा रविवार म्हणजे २८ एप्रिल तसेच ५ व १२ मे २०१९ अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व १० मतदारसंघांतील मतदान घेण्यात येऊ शकते तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील १९ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होऊ शकेल. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याच्या मतदानात मुंबई-कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील १९ मतदारसंघांचा समावेश असू शकेल.

[?] खालील लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात २८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-

५) बुलडाणा ६) अकोला ७) अमरावती ८) वर्धा ९) रामटेक १०) नागपूर ११) भंडारा-गोंदिया १२) गडचिरोली-चिमूर १३) चंद्रपूर १४) यवतमाळ-वाशीम

[?] खालील लोकसभा मतदारसंघात दुस-या टप्प्यात ५ मे २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-

१५) हिंगोली १६) नांदेड १७) परभणी ३३) मावळ ३४) पुणे ३५) बारामती ३६) शिरूर ३७) अहमदनगर ३८) शिर्डी ३९) बीड ४०) उस्मानाबाद ४१) लातूर ४२) सोलापूर ४३) माढा ४४) सांगली ४५) सातारा ४६) रत्नागिरी-सिंधुदुर्ग ४७) कोल्हापूर ४८) हातकणंगले

[?] खालील लोकसभा मतदारसंघात तिस-या टप्प्यात १२ मे २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-

१) नंदूरबार २) धुळे ३) जळगाव ४) रावेर १८) जालना १९) औरंगाबाद २०) दिंडोरी २१) नाशिक २२) पालघर २३) भिवंडी २४) कल्याण २५) ठाणे २६) मुंबई उत्तर २७) मुंबई वायव्य २८) मुंबई ईशान्य २९) मुंबई उत्तर-मध्य ३०) मुंबई दक्षिण-मध्य ३१) मुंबई दक्षिण ३२) रायगड

16 व्या लोकसभेचा कार्यकाल ३ जून २०१९ रोजी संपत असल्याने त्यापूर्वी निवडणुका होऊन नवे सरकार अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना प्रत्येक राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, राज्याचे क्षेत्रफळ, मतदारसंख्या, नक्षलवादाची समस्या, अशा अनेक पैलूंचा विचार करण्यात येत असतो. लोकसभा निवडणुकांची उमेदवारांनी पुर्वतयारी करणे शक्य व्हावे. याकरीता वेळेचे काटेकोरपणे नियोजन करण्याकरीता या संभाव्य निवडणुक कार्यक्रमाचा उपयोग निवडणुक लढविणा-यांना होऊ शकेल. वरील निवडणुक कार्यक्रम संभाव्य म्हणून सुनियोजित करण्यात आला असून यामध्ये  निवडणुक आयोगाचा अंतिम कार्यक्रम ग्राह्य धरावा असे आवाहनही “प्राब”संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

राज्यात लोकसभेच्या 48 जागा-

2014 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपा – शिवसेना युतीने राज्यातील 48 पैकी 41 जागांवर विजय मिळवला होता. मात्र, पोटनिवडणुकांनंतर 48 पैकी 22 जागा भाजपाकडे आहेत. तर शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 5, काँग्रेस 2 आणि स्वाभिमान पक्षाकडे एक जागा आहे.

शिवसेनेकडून भाजपला झुकवण्याचे प्रयत्न !

२००९ पर्यंत राज्यात शिवसेना १७१ आणि भाजप ११७ जागा लढवत आली होती. मात्र २०१४ मध्ये लोकसभेसाठी युती केल्यानंतर विधानसभेसाठी शिवसेनेने १५१, भाजप ११९ व मित्रपक्ष १८ असा फॉर्म्युला भाजपपुढे ठेवला होता. परंतु तो भाजपने अमान्य केला होता. त्यानंतर मित्रपक्षांना सोडलेल्या १८ जागांपैकी ११ जागा भाजपला, तर ७ जागा मित्रपक्षांना असा शिवसेना १५१, भाजप १३० आणि मित्रपक्ष ७ असा फॉम्युर्ला शिवसेनेने दिला होता. मात्र मित्रपक्षांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला. तेव्हा भाजपनेही युती तोडली होती. मात्र भाजप स्वबळावर १२२ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला. तर मोदी लाटेतही शिवसेनेने ६३ आमदार निवडून आणले होते. २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजप आता युतीचे सूतोवाच करू लागली असली तरी शिवसेना आता भाजपपुढे न झुकता भाजपलाच झुकवण्याकडे लक्ष केंद्रीत करीत आहे. सध्या भाजपकडे १२१ तर शिवसेनेकडे ६३ आमदार आहेत. दोघांचेही विद्यमान आमदार १८४ आहेत. ते वगळता १०४ जागा शिल्लक राहतात. त्यापैकी ८५ जागा शिवसेना भाजपकडे मागत आहे. परंतु त्यांची बेरीज १४८ पर्यंत जाते. या जागा भाजप शिवसेनेला देऊ शकत नाही. मात्र, ७५ जागा शिवसेनेला देण्यासाठी भाजप तयार आहे. त्यामुळे १३८ जागांवर शिवसेना युतीसाठी तयार होण्याची शक्यता आहे. म्हणजेच भाजपच्या वाट्याला १५० जागा येतील. शिवसेना आणि भाजपमध्ये युती संदर्भात चर्चा सुरू आहे. शिवसेनेने दोन मागण्या भाजपसमोर ठेवल्या आहेत. एक म्हणजे लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूक घ्यावी आणि दुसरी मागणी म्हणजे १५५ जागा द्याव्या.

लोकसभेला मताधिक्य मिळवून दिले तरच आमदारकीची उमेदवारी- मुख्यमंत्र्यांचे धोरण

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक आमदाराने आपापल्या तालुक्यातून किती मताधिक्य मिळवून दिले यावरच पुढील राजकीय गणिते अवलंबून असतील अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. जो आमदार त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य (लीड) देणार नाही त्यांना आमदारकीची उमेदवारी द्यायचे की नाही ते ठरवले जाईल. एक तर काम करा अन्यथा उमेदवारीची आशा सोडा. येणा-या निवडणुकीत भाजपला 2 कोटी मते मिळाली पाहिजेत. त्यासाठी नियोजन करून समाजातील विविध वर्गांना पक्षाशी जोडून घ्या. असे झाल्यास आपण स्वबळावर बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे.

लोकसभेसाठी शिवसेना व भाजप इच्छुक नेते संभ्रमात!

शिवसेनेसोबत युती होणार नाही असे गृहित धरून 2014 साली शिवसेनेने जिंकलेल्या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अनेक नेत्यांना लोकसभेची तयारी करण्याची सूचना पक्षाने यापूर्वीच दिल्या आहेत. मात्र, शिवसेनेसोबत युती होणार नाही हे खुद्द पक्षाध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्र्यांनाच माहित नाही. या पार्श्वभूमीवर लोकसभेची तयारी स्वबळासाठी करायची की युतीसाठी असा संभ्रम अनेक इच्छुकांत आहे.

निवडणुकीपूर्वी भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षण – :

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती केली तरी दोन्ही पक्षांना मिळून 30 ते 34 जागा मिळतील. भाजपाने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवली तर 15 ते 18 जागाच मिळतील. तर शिवसेनेला पाच ते आठ जागा मिळतील तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला 22 ते 28 जागा मिळतील असा अंदाज यात वर्तवण्यात आला होता. दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील आघाडीसंदर्भात शिवसेनेने घेतलेली ताठर भूमिका, रोजच्या रोज शिवसेनेकडून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर केली जाणारी टोकाची टीका, शिवसेनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नरमाईचा पवित्रा या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेची उपयुक्तता आणि या पक्षाची संभाव्य रणनीती यावरही पक्ष खासदारांची मते पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी जाणून घेतली. भाजपच्या सर्व राज्यांमधील खासदारांच्या स्वतंत्र आढावा बैठका घेण्याचे नियोजन केले आहे. जानेवारी अखेरपर्यंत वाट बघू. कारण लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेची लागू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे जानेवारीनंतर निर्णय घ्यावा लागेल, अशी रणनीती भाजपने ठरविली आहे. सन २००९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११९ जागा लढविल्या होत्या. त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाजप ११७ आणि शिवसेना १७१ असे जागांचे वाटप होत असे. नऊ आकडा युतीला लाभदायक असल्याने असे आकडे ठरले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आणखी दहा-बारा जागा जास्त मागितल्या होत्या . शिवसेनेने याआधी एकदाही न जिंकलेल्या अशा ३५ जागा त्यामध्ये होत्या. त्यातील दहा किंवा बारा जागा द्याव्यात, अशी भाजपची मागणी होती. परंतु त्या जागा देण्यास शिवसेनेच्या नेतृत्वाने नकार दिला आणि त्यामुळे युती तुटली होती. त्या जागा भाजपला दिल्या असत्या तर आज शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता हे सत्य कोणीही नाकारत नाही.परंतु आता परिस्थितीत खूप फरक पडला आहे.

भाजपची निवडणूक तयारी-

[?]  मतदार नोंदणी मोहिमेत राज्यात ३६ लाख नव्याने मतदारांची नोंदणी
[?]  लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने पुढील दोन महिन्यांत अनेक कार्यक्रम ठरविले आहेत.
[?]  11 व 12 जानेवारीला दिल्लीत खासदार, आमदार आणि पक्षाच्या पदाधिकार्‍यांचे संमेलन
[?]  दोन महिन्यांतील निवडणूक तयारीची सांगता 2 मार्चला राज्यभर रॅली काढून होणार
[?]  सीएमचषकमधून 42 लाख तरुणांची नोंदणी
[?]  दोन कोटी मते मिळविण्याचे लक्ष्य
[?]  2014 च्या निवडणुकीत पक्षाला दीड कोटी मते (122 जागा)मिळाली होती
[?]  राज्यात मतांचा टक्‍का वाढविण्यासाठी आणि अतिरिक्‍त 50 लाख मते मिळविण्यासाठी विविध समाजघटकांना सोबत जोडण्याचा कानमंत्र
[?]  मतदान केंद्र(बुथ) निहाय १० कार्यकर्ते नोंदणी व प्रशिक्षण पूर्ण
[?]  लोकसभा व विधानसभा निहाय राजकीय व सामाजिकदृष्ट्या सर्वेक्षण
[?]  विविध स्पर्धा, उपक्रमांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची मतदारांपर्यंत पोहोचविण्याची मोहीम
[?]  भाजपकडून लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रचार संकल्पना/साधने तयारी पूर्ण
[?]  भाजपच्या निवडणूक तयारीतील अभाव जाणून घेण्यासाठी प्राब संस्थेशी संपर्क करा.

राष्ट्रवादी निवडणूक तयारी-

[?]  राज्यभर राष्ट्रवादीने हल्लाबोलच्या माध्यमातून भाजपा सरकार विरोधी अभियान राबविले होते.
[?]  ९ जानेवारीपासून राष्ट्रवादीची राज्यभर ‘परिवर्तन यात्रा’
[?]  विजयी संकल्प मेळाव्याचे राज्यभरात आयोजन केले होते.
[?]  मतदान केंद्र(बुथ) निहाय कार्यकर्ते (बुथ एजंट) निवड/नोंदणी अभियान
[?]  नागरिकांच्या माध्यमातून निवडणूक जाहीरनामा संकल्पना
[?]  केंद्र सरकारच्या विरोधात काही मुद्यांवर आंदोलने व निदर्शने केली
[?]  राष्ट्रवादीच्या निवडणूक तयारीतील अभाव जाणून घेण्यासाठी प्राब संस्थेशी संपर्क करा.

काँग्रेस निवडणूक तयारी-

[?]  काँग्रेसकडून राज्यभरात जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले होते
[?]  कार्यकर्त्यांच्या खचलेल्या मन:स्थितीला उभारी देण्याकरिता संकल्प मेळावे घेतले होते.
[?]  मतदान केंद्र(बुथ) निहाय कार्यकर्ते (बुथ एजंट) निवड/नोंदणी अभियान
[?]  केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात विविध मुद्दे वरून वेळोवेळी आंदोलने व निदर्शने केली होती.
[?]  काँग्रेसच्या निवडणूक तयारीतील अभाव जाणून घेण्यासाठी प्राब संस्थेशी संपर्क करा.

शिवसेनेची निवडणूक तयारी-

[?]  वेळोवेळी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करण्याच्या आमदार/खासदारांना फक्त सूचना
[?]  जिल्हाध्यक्ष/संपर्क प्रमुखांकडून मतदारसंघातील राजकीय आढावा व त्या आधारे रणनीती
[?]  लोकांमधून निवडून न आलेल्या लोकप्रतिनिधीच्या संकल्पनेतून पक्षबांधणी व योजना
[?]  मतदान केंद्र(बुथ) निहाय बुथ एजंट नोंदणी अभियान
[?]  केंद्र व राज्य सरकारमधील सहभाग आणि विरोधी टीकात्मक भूमिका/प्रचार रणनीतीवर खल सुरूच
[?]  शिवसेनेच्या निवडणूक तयारीतील अभाव जाणून घेण्यासाठी प्राब संस्थेशी संपर्क करा.

भाजप-शिवसेना युतीबाबत मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भूमिका-

[?]  युतीसाठी शिवसेनेच्या प्रतिसादाची वाट पाहणार, पण झुकणार नाही- भाजप अध्यक्ष अमित शाह
[?]  काहीतरी गमावून शिवसेनेसोबत युती नाही/महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या सर्व 48 जागांवर लढण्याची भाजपची तयारी-भाजप अध्यक्ष अमित शाह
[?]  आपण स्वबळावर बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ शकतो- मुख्यमंत्री
[?]  शिवसेनेसोबत युती करण्याचे आपले प्रयत्न सुरू मात्र, युती झाली नाही, तर स्वबळावर लढण्याची आपली तयारी – मुख्यमंत्री
[?]  शिवसेनेचा युती करण्याचा विचार नाहीच- खासदार संजय राऊत
[?]  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युतीचा प्रश्नच उद््भवत नाही- खासदार संजय राऊत
[?]  युतीसाठी मने जुळली, फक्त त्यासाठीची चर्चा अद्याप बाकी- अर्थमंत्री मुनगंटीवार
[?]  लोकसभेच्या जागांची बोलणी करतानाच विधानसभेचेही जागावाटप व्हावे यादृष्टीने प्रयत्न सुरू असून लोकसभेच्या जागा वाटपाचा विषय एक कप भर चहाच्या मिटींगमध्ये संपेल-मुनगंटीवार
[?]  विविध पक्ष व नेत्यांनी युतीबाबत व्यक्त केलेल्या भूमिका अधिक माहितीसाठी प्राब संस्थेशी संपर्क करा.

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी चर्चा

[?]  काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीवर सहमती मात्र काही जागांचा घोळ कायम
[?]  जागावाटपाची राज्यस्तरीय चर्चा आता संपली असून पुढील अंतिम निर्णय आता दिल्लीत होणार
[?]  आघाडीचा घटक पक्षांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न;घटक पक्षांनाही जागा सोडणार
[?]  काँग्रेसचा २००९ च्या सूत्रानुसार जागा वाटपावर भर आहे. मात्र राष्ट्रवादीने २०१४ मधल्या वाढलेल्या ताकदीच्या अनुषंगाने जोर लावला आहे. घटकपक्षांना जागा सोडण्याची दोन्हीही पक्षांची तयारी आहे.

घटकपक्षांना जागा सोडण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी –

[?] बहुजन विकास आघाडीला-पालघर लोकसभा मतदारसंघ
[?] समाजवादी पार्टीला-भिवंडी लोकसभा मतदारसंघ
[?] स्वाभिमानी शेतकरी संघटनेला-हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
[?] भारिप बहुजन महासंघाला-अकोला लोकसभा मतदारसंघ
[?] आरपीआय गवई गटाच्या राजेंद्र गवईं यांना एक लोकसभा मतदारसंघ देण्याची भूमिका
[?] नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाला- सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ  (राणेंना छुपी मदत करण्याची भूमिका/भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेल्या राणें यांची प्रसंगी भाजपशी पंगा घेण्याची तयारी)

महा-आघाडीबाबत प्रमुख घटक पक्षांची मागणी व भूमिका-

[?]  एमआयएमची व भारिप बहुजन महासंघाची बहुजन वंचित आघाडी स्थापन
[?]  राष्ट्रवादीशी आघाडीस असहमत; कॉंग्रेसबरोबर आघाडीची तयारी ११ जागांची भारिपची मागणी;एमआयएमची साथ सोडण्याची कॉंग्रेसची अट अमान्य
[?]  एक जागा नव्हे किमान ६ हव्यात नाहीतर स्वबळावर लढणार- खासदार राजू शेट्टीं (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
[?]  शिवसेनेशी युती केली तर खासदारकीचा राजीनामा/ स्वबळावर लढणार- खासदार नारायण राणे (स्वाभिमान पक्ष)
[?]  कॉंग्रेसने योग्य जागा द्याव्यात अन्यथा इतरांशी आघाडी/बहुजन वंचित आघाडीतही जाण्याची तयारी- राजेंद्र गवईं (आरपीआय गवई गट)
[?]  मुंबईतून निवडणूक लढविणार- केंद्रीयमंत्री आठवले (आरपीआय आठवले गट)
[?]  बारामतीतून अथवा कोठूनही निवडणूक लढविणार- मंत्री महादेव जानकर (रासप)
[?]  हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार- राज्य कृषीमंत्री सदाभाऊ खोत(रयत क्रांती संघटना)

बाईच्या भाषेवर पुरुषांची बंधने नकोत -डॉ. अश्विनी धोंगडे

0
पुणे : “अनुभवातून लिहिले साहित्य कसदार असते. स्त्रियांनी आपल्या अनुभवांवर आधारित साहित्य निर्माण केले पाहिजे. बाईचा माणूस म्हणून विचार होण्यासह त्यांना मुक्तपणे लिहिता आले पाहिजे. मात्र, आज बाईच्या भाषेवर पुरुषांची बंधने आहेत. स्त्रियांनी भाषेवरील ही पुरुषी बंधने झुगारून कसदार साहित्य निर्मिती केली पाहिजे,” असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केले.
भोसरी येथील प्रितम-प्रकाश महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन व प्रकाश पगारिया व्याख्यानमालेत ‘स्त्रीवादी साहित्य : काल, आज उद्या’ या विषयावर डॉ. धोंगडे बोलत होत्या. यावेळी आकांक्षा प्रतिष्ठानच्या संचालिका राणीताई चौरे व पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर मोहिनीताई लांडे यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’, तर शिवप्रेरणा नागरी सहकारी पतसंस्थेचे प्रा. बाजीराव गायकवाड व कलांगण कला संस्थेचे सचिन घटने यांना ‘राजर्षी शाहू सामाजिक न्याय हक्क पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रा. अशोककुमार पगारिया, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रकाश जवळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, “समाजात स्त्री आणि पुरुषांच्या लेखनात फरक जाणवतो. पुरुषांनी स्त्रीयांच्या शरिराचे वर्णन केले, तर ते उत्तम साहित्य बनते. पण स्त्रीयांनी शरिराचे वर्णन केल्यास त्या लेखनाला आश्लिल समजले जाते, हे अयोग्य आहे. स्त्रीवाद हा स्वतःच्या जगण्यातून साहित्यात उतरला जातो. आत्ताच्या स्रीयांचा लेखनावर विश्वास राहिला नाही. मोकळे होणे ही साहित्याची गरज आहे. साहित्य दु:खातुन, नैराश्यातून निर्माण होते आणि ती आजच्या पिढीतील स्त्रीयांनी जपले पाहिजे.”
लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या साहित्यिकाने आपल्या लेखणीतून सुधारणेचा विचार मांडला. आजच्या साहित्यात समाज सुधारणेचा विचार रुजला पाहिजे. त्यासाठी अशा प्रकारची वैचारिक संमेलने उपयुक्त ठरतील. त्यामुळे बंधुतेचा विचार घेऊन साहित्यनिर्मिती झाली, तर समाजात बंधुभाव वाढेल. समाजाला जोडणारी माणसे आपल्यासमोर आणून त्यांचा सत्कार करण्याचे काम बंधुता परिवार करीत आहे, याचा आनंद वाटतो.”
तत्पूर्वी ‘काव्यपंढरी’ हे कविसंमेलन रंगले. प्रतिभावान कवींनी आपल्या कवितेतून समाजात बंधुभाव रुजविण्याचे विचार मांडले. यावेळी संतोष घुले यांना ‘लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार’, तर दीप पारधे यांना ‘लोकगायक प्रल्हाद शिंदे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता झिंझुरके यांनी केले. प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी आभार मानले.

विद्यार्थी केंद्रीत शिक्षण पद्धतीला अग्रक्रम- प्रा. डॉ. भूषण पटवर्धन

0

पुणे :  विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) माध्यमातून भारतीय शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात फेरबदल होत आहे. तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान  आणि कला यावर आधारित अभ्यासक्रम  देण्यात येणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून नव्या अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी युजीसी प्रयत्नशील आहे, असी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यांनी दिली.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे आयोजित तिसर्‍या नॅशनल टीचर्स काँग्रसचे उद्घाटन विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यांच्या हस्ते झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी), नॅक,  महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ, असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेज प्रिन्सिपॉल्स फेडरेशन, यूनेस्को , युनिसेफ , एआयसीटीई, असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू), महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र प्राचार्य परिषद या भारतातील व महाराष्ट्रातील प्रमुख संस्था नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या सहयोगी आहेत. उद्घाटनप्रसंगी जगविख्यात संगणक तज्ज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित होते. सिल्वन्ट सल्लागार प्रा.लि. चे आनंद सुदर्शन, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टचे डॉ. सच्चिआनंद जोशी, नॅशनल टीचर्स काँग्रेसचे जागतिक समन्वयक डॉ. जय गोरे, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम, महासचिव प्रा. डॉ. सुधाकर जाधवर, जागतिक आरोग्य  संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच एमआयटी वर्ल्ड पीस व्युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा कराड, कार्याध्यक्ष व टीचर्स काँग्रेसचे संस्थापक प्रा. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आय. के. भट, माईर्स एमआयटीचे संस्थापकीय विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्रो कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्रो. कुलगुरू डॉ. श्रीहरी होनवाड, कुलसचिव प्रा. डी. पी. आपटे, एनटीसीचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. सुधीर गव्हाणे हे उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल आदर्श शिक्षण मंडळीचे अध्यक्ष व आयएमडीआरचे संस्थापक डॉ. पी.सी. शेजवलकर, एआयसीटीईचे अध्यक्ष  प्रा. डॉ. अनिल डी. सहस्त्रबुध्दे, युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीचे कुलपती डॉ.एस.जे. चोप्रा व ग्रेट लेक इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. पराग दिवाण यांना जीवन गौरव पुरस्कार ने सन्मानीत करण्यात आले.

प्रा. डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, युजीसीच्या माध्यमातून देशातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तेवर आधारित  शिक्षण देण्यात यावे. देशात चांगल्या शिक्षणासाठी भारतीय शिक्षण पद्धतीत फेरबदल  करने गरजेचे आहे. यासाठी युजीसीने आठ नियम बनविले आहे. यात ऑटोनॉमीमधील आवडीनुसार विद्यार्थ्यांना विषयाची निवड करता यावी. स्टेम या विषयासोबत कृषी या विषयाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यां-विद्यार्थ्यांमध्ये इंडक्शन प्रोग्राम, शिक्षकांसाठी इंडक्शन प्रोग्राम तयार करून त्यांना एका महिण्याचे प्रशिक्षण द्यावे. तसेच विद्यार्थ्यांची स्किल डेव्हल्प करून त्यांच्यातील संवाद कौशल्याची वाढ करणे आवश्यक आहे. नॅशनल क्रेडीट बँड तयार करण्याची ही आवश्यकता आहे. समाजातील आणि स्थानिक समस्या सोडविण्यासाठी संशोधनात्मक वृत्तीची जोपसना आणि दृष्टी तयार करावी लागणार आहे. युजीसीने शाश्वत विकासाबरोबरच विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत संवेदनशील बनविण्याचे कार्य हाती घेतले आहे. देशातील गुणवंत आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या फेलोशीप युजीसीने सुरू केल्या आहेत. संशोधनावर आधारित शिक्षण देण्यात यावे. विद्यार्थी केंद्रीत शिक्षणासाठी पुढाकार घ्यावे. आर्टिफिशयल इंटेलिजेंटच्या साह्याने नवीन शिक्षण पद्धतीची उभारणी करावी लागणार आहे.

विजय भटकर म्हणाले, कोणत्याही देशाच्या सुजलाम भविष्यासाठी नॅशनल टीचर्स काँग्रेस सारखे व्यासपीठ गरजेचे आहे. देशाचे भविष्य शिक्षक घडवितात. अनेक तज्ज्ञ शिक्षक भारतात होऊन गेले.  विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक तज्ज्ञ युवक घडविण्याचे कार्य केले शिक्षकांच्या हातून होते.  भविष्यात काय घडणार आहे, याची कल्पना आपण करू शकत नाही, मात्र एक तज्ज्ञ शिक्षक ती कल्पना करून त्याचा सामना कसा करावा याचा मार्ग ते दाखवतात. ज्ञान, तत्वज्ञान आणि माध्यमातून भारत विश्वगुरू बनेल, त्यासाठी नॅशनल टीचर्स काँग्रेससारखे व्यासपीठ नक्कीच मदतीचे ठरेल.

डॉ. सच्चिआनंद जोशी म्हणाले, देशातील शिक्षकांसाठी नॅशनल टीचर्स काँग्रेस महत्वाचे व्यासपीठ आहे. शिक्षक हा मुलांच्या आयुष्यातील पहिला रोल मॉडल असतो, मात्र पालकांकडून मुलांना यासाठी प्रोत्साहन मिळत नाही. शिक्षकांकडून अनेक अपेक्षा केल्या जातात, मात्र समाज त्यांच्याकडे तुच्छतेच्या भावनेने पाहतो.  सर्वांना मार्गदर्शन करणे आणि गुणवंत समाज घडविण्यासाठीची जबाबदारी शिक्षकांची असते. भारतात आणि भारतीय शिक्षकांमध्ये जगातिक महागुरू बनण्याची क्षमता आहे.

डॉ. आनंद सुदर्शन म्हणाले, आपली मानसिक स्थिती व्यवस्थित राहिल्यास तुम्ही सुंदर भविष्य घडवू शकता. जगातिक तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलाप्रमाणे आपले ज्ञान अध्यावत करून विद्यार्थ्यांना प्रदान करावे. तंत्रज्ञानानुसार भारतीय शिक्षण पद्धतीत बदलाव आणण्याचे कार्य मानवसंसाधन विकास मंत्रालयातर्फे केले जात आहे. त्याचा लाभ भारतातील सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे.

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्म्याची सांगड घालून विद्यार्थ्यांला शिक्षण देण्याची गरज आहे.  एकविसाव्या शतकात भारत हा ज्ञानाचं दालन म्हणून उद्यास येईल. त्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असणार आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि कला शिक्षणाची आवश्यकता असल्यामुळे सर्व विद्यापीठांनी यानुसार अभ्यासक्रमाची रचना करावी.

प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,  शिक्षक, शिक्षणव्यवस्था यातील अडचणी समजून घेऊन त्यावर राज्य, केंद्र पातळीवर उपाय शोधण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बहुशाखीय शिक्षक देशाच्या विविध भागातून आले आहेत. प्रत्येक राज्याच्या शिक्षणातील पद्धती, त्यातील अडचणी यावर चर्चा होणार आहे. शिक्षकाचे समाज घडविण्यात महत्वाचे योगदान आहे. आई – वडीलानंतर शिक्षकच हा महत्वाचा गुरू आहे, म्हणून शिक्षकांना योग्य ते मार्गदर्शन व्हावे, हाच या परिषदेचा उद्देश आहे.

डॉ. जय गोर, डॉ. नंदकुमार निकम, डॉ. आय के भट यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  डॉ. आर. एम. चिटणिस यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.  दीपक आपटे यांनी आभार मानले.

बिल्डरच्या आग्रहास्तव मेट्रोचा मार्ग वळविला -स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गात गंगाधाम हि आले….

0

पुणे – सत्ताधारी भाजपने स्वारगेट ते कात्रज या मेट्रोमार्गात बांधकाम व्यावसायिकासाठी बदल केला आहे. स्वारगेट-मुकुंदनगर-गंगाधाम मार्गे कात्रजपर्यंत घेऊन जाण्याचा भाजपने घाट घातला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. याविरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वारगेट येथील जेधे चौकात आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर आणि शिवाजीनगरहून सातारा रस्त्याने कात्रज असा मेट्रोचा मार्ग प्रस्तावित आहे. मात्र, पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या वतीने हा मार्ग वळवल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ आज स्वारगेट चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे म्हणाले, पुणे शहरातून जाणाऱ्या मेट्रोचा मार्ग स्वारगेट-सातारा रस्ता-कात्रज असा पद्धतीने जाणार आहे. मात्र, पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने या मार्गात बदल करुन स्वारगेट-मुकुंदनगर-गंगाधाम मार्गे नेण्याचा घाट घातला आहे. हा मार्ग बांधकाम व्यावसायिकासाठी वळविण्यात आल्याचा आरोप तुपे यांनी केला. ही निषेधार्थ बाब असून हा मार्ग बदलल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.