Home Blog Page 3018

१४७ गरजू रुग्णांचे कृत्रिम पायरोपण

0
लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलतर्फे दोन दिवसीय शिबीराचे आयोजन
पुणे : द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ यांच्यातर्फे व अहमदाबाद येथील राजस्थान हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित दोन मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट) शिबिरात १४७ रुग्णांना कृत्रिम पाय (जयपूर फूट) बसविण्यात आले. याचबरोबर ५३ पोलिओ कॅलिपर्स, २५० पेक्षा जास्त सिंगल स्टिक, नीकॅप, सर्जिकल बूट, कुबड्या व कंबरपट्टा आणि दोन व्हीलचेअर व एक तीनचाकी सायकलचे वाटप या शिबीरात करण्यात आले.
महावीर प्रतिष्ठान, महर्षीनगर पोलीस चौकीजवळ, सॅलिसबरी पार्क येथे या पुणे येथे ५ व ६ जानेवारी रोजी झालेल्या या दोन दिवसांच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्रांतपाल अभय शास्त्री, जयपूर फूटचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन दीपक शेटिया, राजेंद्र गोयल, वीरेंद्र पटेल, शरद पवार, प्रवीण ओसवाल, तुषार मेहता, सतीश राजहंस, सुनील शेटिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रमेश शहा म्हणाले, “सामाजिक सेवेत लायन्स क्लब नेहमीच पुढाकार घेत असून, हे ५३ वे शिबीर होत आहे, याचा आनंद वाटतो. समाजातील गरजूना, वंचित घटकांना चांगल्या रीतीने आयुष्य जगता यावे, यासाठी लायन्सचे सर्व पदाधिकारी नेहमी प्रयत्नशील असतात. लायन हसमुख मेहता यांनी जयपूर फूट शिबिराची सुरुवात केली. आज हजारो दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम लायन्स क्लबने केले आहे.
दीपक सेठिया म्हणाले, “यंदाच्या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास ५०० लोकांनी याचा लाभ घेतला. फाटलेले किंवा विद्रुप असलेल्या ओठ, कान व नाक यावर मोफत शल्य चिकीत्सा शिबीरातही रुग्णांनी सहभाग घेतला. हे शिबीर संपूर्णतः मोफत होते. बाहेरगावच्या रुग्णांच्या राहण्याची व जेवणाची मोफत सोय करण्यात आली होती. आमच्या सर्व स्वयंसेवकांनी अतिशय चांगले नियोजन केले.”

ठाकरे अंदाज – पॉपकॉर्न ऐवजी वडापाव सोबत!

0

महाराष्ट्राचे मानबिंदू हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट ‘ठाकरे’ जागतिक पातळीवर गर्जण्यास सज्ज झालेला आहे तेव्हा स्वाभाविकतः महाराष्ट्राची आन बान शान असलेल्या, दिवसाच्या कोणत्याही वेळेला सर्वसामान्यांचे पोट भरेल आणि स्वस्तात मस्त तसाच चटपटीत अशा महाराष्ट्रातील लोकप्रिय शिव वडापावची चव राष्ट्रीय दर्शकांना चाखण्यास मिळणार आहे.

बाळासाहेब ठाकरेंसारख्या महाराष्ट्राच्या मातीतील रांगड्या व लोकप्रिय व्यक्तित्वाप्रमाणेच दशकानुदशके करोडोंच्या मनांवर व जिभेवर राज्य गाजवणारा शिव वडापावने चवखोरांवर टीका केलेली आहे. ठाकरे चित्रपटाच्या टिझर व ट्रेलर प्रक्षेपणादरम्यान स्टार्टर्स म्हणून वडापाव सर्व्ह करणाऱ्या निर्मात्यांच्या विचारशरणीस पाठिंबा देत ७२ निवडक कार्निवल सिनेमा थिएटरमध्ये त्यांनी शिव वाडा पाव ची निवड त्यांच्या एफ अँड बी ऑफरमध्ये केलेली आहे. अद्वितीय अशा पॅन-इंडिया मार्केटिंग पुढाकाने टेंट कार्ड्स, वेबसाइट बॅनर, सिनेमा स्लाइड्स आणि एसएमएस मोहिम याद्वारे उत्साहवर्धक महाराष्ट्रीयन पाककृतींना राष्ट्रीय प्रेक्षकांसमोर सादर केले जाईल.

‘ठाकरे’ चित्रपटासह कार्निवल सिनेमाज मध्ये शिव वडापावचा स्वाद चाखत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. तसंही असे ऐकिवात आले आहे की, राष्ट्रीय प्रेक्षकांसमवेत आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना देखील ठाकरे चित्रपटाबरोबर झणझणीत मराठी मोळ्या वडापावचा स्वाद चाखण्यास मिळणार आहे.

संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित ‘ठाकरे’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तांत्रिक विभागाच्या टीमने ह्या चित्रपटाच्या अनुषंगाने काम केलेले आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून येत्या २५ जानेवारी २०१९ ला हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.

विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे निर्देश

0

पुणे :- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विकास कामांना मंजूरी देण्यात येते. ही विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हा वार्षिक योजना 2019-20 च्या प्रारुप आराखडयाची छाननी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चालू आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला आमदार राहूल कुल, सदस्य शरद बुट्टे पाटील, ज्ञानेश्वर चवरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी उत्तम चव्हाण,  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी उपस्थित होते.

पालकमंत्री गिरीश बापट यांनी 2018-19 या वर्षात जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या विविध विकास कामांची सद्यस्थिती आणि त्यावर झालेल्या खर्चाचा आढावा घेतला. बैठकीत 2019-20 साठी प्रशासकीय विभागांनी योजनांच्या अंमलबजावणीबाबत केलेल्या सूचना, नवीन अंतर्भूत करण्यात आलेल्या योजना, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीतून झालेला खर्च व अखर्चित निधी, नवीन बाबींवरील प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्याबाबत चर्चा करण्यात आली. समिती सदस्य तसेच लोकप्रतिनिधींनी विकास कामांच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या सूचनांची दखल घेण्याची सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठकीत केली.

जिल्हा नियोजन अधिकारी यांनी प्रास्ताविकात 2019-20 साठी तयार करण्यात आलेल्या प्रारुप आराखडयाची माहिती दिली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पदे, कर्मचारी संख्येत कपात नाही – महावितरण

0

मुंबई : वीजग्राहकांना अधिक तत्पर सेवा आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्याची मागणी लक्षात घेऊन महावितरण अंतर्गत मनुष्यबळ पुनर्रचना आराखडा हा सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन आणि चर्चा करूनच तयार करण्यात आला आहे. या पुनर्रचनेत कोणतेही पद किंवा कर्मचारी कपात होणार नाही उलट नवीन कार्यालयांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे महावितरण प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

महावितरणमधील सहा संघटनांच्या कृती समितीने सोमवारी (दि. ७) राज्यव्यापी संप पुकारला होता. या पार्श्वभूमिवर महावितरणकडून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात संघटनांचे आरोप खोडून काढण्यात आले आहेत.

दरम्यान, मनुष्यबळ पुनर्रचना व फ्रॅन्चाईजीविरोधात सहा संघटनांच्या कृती समितीने सोमवारी पुकारलेल्या एक दिवसीय संपाला सोमवारी (दि. ७) संमिश्र प्रतिसाद मिळाला. महावितरणधील सुमारे 50 टक्के कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. मात्र संप कालावधीत राज्यातील वीजसेवा पुर्णतः सुरळीत होती. संपाचा वीजसेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. वीज ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम २०१७ लागू आहे.

भविष्यातील स्पर्धा पाहता वीजग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे. तसेच सध्याच्या रचनेतील कर्मचाऱ्यांवर असणारा ताण कमी करण्याची कर्मचारी संघटनांची मागणी होती. कर्मचाऱ्यांच्या कामात अधिक स्पष्टता यावी व जबाबदारी स्पष्ट व्हावी यासाठी महावितरण अंतर्गत मनुष्यबळ पुनर्रचनेची प्रक्रिया गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान मुख्यालय व क्षेत्रीय कार्यालयांतील विविध स्तरांवर चर्चा करण्यात आलेली आहे. सर्व संघटना प्रतिनिधींसमवेत वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये पुनर्रचना आराखड्यावर सादरीकरणाद्वारे चर्चा करण्यात आली आहे. संघटनांकडून आलेल्या मागण्या, काही सूचनांचा अंतर्भाव करून सर्वसंमतीने पूनर्रचना आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये कुठलीही पदसंख्या कमी होणार नाही तसेच कर्मचारी संख्येत कपात सुद्धा होणार नाही. याउलट अनेक विभाग कार्यालयांतर्गत नवीन उपविभाग व शाखा कार्यालयांची निर्मिती करण्यात येत आहे. पुनर्रचनेच्या अंमलबजावणीमध्ये अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांना नजिकच्या कार्यालयात किंवा विनंतीनुसार बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

ग्राहक व कर्मचारी हित लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या सर्वसमावेशक पुनर्रचना आराखड्याची प्रायोगिक अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात पुणे परिमंडलमधील रास्तापेठ व गणेशखिंड मंडल, भांडूप परिमंडलमधील वाशी व ठाणे मंडल आणि कल्याण परिमंडलातील कल्याण मंडल एकमध्ये येत्या दि. 1 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी दरम्यान आलेल्या उणिवा किंवा अडचणी दूर करण्यासाठी महावितरणचे संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व कर्मचारी संघटनांच्या सूचनांची दखल घेऊन या पुनर्रचना आराखड्यात फेरबदलाबाबत प्रशासनाला सूचविणार आहे व त्याप्रमाणे बदल करण्यात येणार आहे.

क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सध्या अनेक प्रकारचे कामे करावे लागतात. परिणामी कामाचा तणाव निर्माण होतो व आरोग्यावरही परिणाम होतो ही बाब अनेक कर्मचारी संघटनांनी निदर्शनास आणून दिली होती. त्याचाही प्रामुख्याने विचार करून या पुनर्रचनेत प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामांची जबाबदारी व कर्तव्ये नेमून देण्यात आलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यास कामाचे योग्य नियोजन करणे सोयीचे होईल व त्याचा थेट फायदा वीजग्राहकांना होणार आहे.

मुंब्रा, कळवा व मालेगाव विभागांची फ्रॅन्चायझी देण्यात येत असून तो धोरणाचा एक भाग आहे. हा निर्णयसुद्धा संघटनांशी चर्चा करूनच घेण्यात आला आहे. अपेक्षित महसूलवाढ होत नसल्याने तसेच वीजहानी, वीजचोरीचे प्रमाण कमी होत नसल्याने यापूर्वीपासूनच राबविण्यात येणाऱ्या फ्रॅन्चायझी धोरणाचा विचार करून मुंब्रा-कळवा विभाग व मालेगाव विभागाची निवड करण्यात आली आहे.

दि. ८ व ९ जानेवारीच्या देशव्यापी संपात महावितरणमधील तीन संघटनांचा सहभाग असून या दोन्ही दिवशी वीजसेवा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून संपूर्णपणे नियोजन करण्यात आले आहे.

घोरपडी रेल्वे उड्डाणपूल व लुल्लानगर चौक उड्डाणपूलाचे काम लवकरच मार्गी-दिलीप कांबळे

0

पुणे  :- पुणे शहरातील घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपूल तसेच  लुल्लानगर चौक उड्डाणपूलाचे काम  लवकरच मार्गी लागेल असा  विश्वास सामाज‍िक न्याय राज्यमंत्री  दिलीप कांबळे यांनी व्यक्त केला.

या दोन्ही उड्डाणपूलाच्या कामासंदर्भात आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री  श्री. कांबळे यांनी आज पुणे येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित केली होती. त्यानंतर ते बोलत होते.

उड्डाणपुलाच्या परिसरातील अतिक्रमण लवकरात लवकर काढावे तसेच भूसंपादनाच्या कार्यवाहीमध्ये पुणे महानगरपालिकेने समन्वयाची भूमिका पार पाडावी असे  निदेशही श्री कांबळे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

व्यवसायात नावीन्य, कुटुंबाचा सहभाग महत्वाचा डॉ. रवींद्र कुलकर्णी

0
मराठी ब्राम्हण व्यावसायिक मित्रमंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन
पुणे : “व्यवसाय करताना नाविन्यता आणि कुटुंबीयांचा सहभाग अतिशय महत्वाचा असतो. व्यवसाय उभारताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, या समस्यांना घाबरून जाण्याऐवजी त्याचे संधींमध्ये रूपांतर केले, तर आपण यशस्वी होऊ शकतो. नातेवाईकांवर विश्वास आणि एकमेकांच्या विचारांचा आदर ठेवणे हे उत्तम व्यावसायिक असल्याचे लक्षण आहे,” असे मत एलके केमिकल्सचे संस्थापक संचालक डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
मराठी ब्राम्हण व्यावसायिक मित्रमंडळाच्या २७ व्या वार्षिक स्नेहसंमेलनात डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह युरोपा लॉक्सचे व्यवस्थापकीय संचालक सलील जोशी यांची मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी दोन्ही उद्योजकांचे कुटुंबीय, मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय जोशी, श्रीपाद करमरकर, माधव गोडबोले, राहुल कुलकर्णी, प्रसाद पटवर्धन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. जास्तीत जास्त तरुणांनी नोकरीपेक्षा उद्योगाकडे वळावे, यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचे मित्रमंडळ गेली २६ वर्षे करीत आहे.
रवींद्र कुलकर्णी म्हणाले, “शालेय वयापासूनच काहीतरी इनोव्हेशन करण्याचा विचार मनात होता. आयआयटी बेंगलोरला प्रवेश मिळाल्यानंतर माझे जग बदलले. तेथील अनुभवामुळे माझे विश्व विस्तारले. कोलंबिया विद्यापीठात शिक्षणाची आणि तिथेच कामाचीही संधी मिळाली. आईच्या इच्छेनुसार, काही काळानंतर भारतात परतलो आणि व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. आपल्या देशात उपलब्ध साधनांचा वापर करून जगात मागणी असणाऱ्या वस्तूंची निर्मिती करण्यासह वैश्विक स्तरावर भारताचे नाव करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शैक्षणिक गुणवत्ता, दळणवळण, कुशल कामगार यामुळे पुण्याची निवड केली. आज संपूर्ण कुटुंब या व्यवसायात आहे, याचा आनंद वाटतो. अनेक नाविन्यपूर्ण केमिकल बनवणारी कंपनी म्हणून आमची ओळख आहे.”
सलील जोशी म्हणाले, “कठोर परिश्रम आणि निर्णयक्षमतेच्या जोरावर व्यवसाय वृद्धी होते. कुलूपासारख्या उत्पादनांचा व्यवसाय सुरु करणे सुरुवातलीला जिकिरीचे वाटत होते. परंतु, गुणवत्ता, कामातील प्रामाणिकपणा आणि ग्राहकाशी जोडलेली नाळ यामुळे आज युरोपा लॉक्स यशस्वी कामगिरी करीत आहे. व्यवसायात ‘टर्न ओव्हर’पेक्षा ‘कलेक्शन’ला महत्व दिले पाहिजे. तरुणांनी जिद्द, मेहनत आणि नावीन्यतेचा ध्यास घेऊन काम केले, तर कोणत्याही क्षेत्रात व्यवसाय उभा करता येतो. नोकरी मागण्यापेक्षा व्यवसाय करणे कधीही चांगले आहे. त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करत राहणे गरजेचे आहे. जीएसटीमुळे कर रचनेत सुसूत्रता आली असून, सध्या कर भरणे अधिक सुकर वाटते.”
या कार्यक्रमात गजानन चाफळकर, चिंतामणी हसबनीस, प्रज्ञा आगाशे, नरेंद्र काळे, प्रतिभा भांबूरकर या छोट्या व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला. विशाखा वेलवणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक सुप्रिया देव यांनी केले.

” मराठी पत्रकार दिन ” सोहळा उत्साहात संपन्न

0

पुणे-मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ हे बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२  रोजी सुरू केले. हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनही आहे. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने पुणे मीडिया वॉच व सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या वर्षी ” मराठी पत्रकार दिन ” सोहळा उत्साहात संपन्न झाला . यंदाच्या सोहळ्याचे चौदावे वर्ष होते  .

 नवी पेठमधील गांजवे चौकाजवळील पुणे श्रमिक पत्रकार भवनमध्ये येथे झालेल्या या  ” मराठी पत्रकार दिन ” सोहळ्याचे  उदघाटन  दर्पणकार  बाळशास्त्री जांभेकर  यांचे प्रतिमेस माजी आमदार मोहन जोशी यांच्याहस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहराचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे ,पुणे मीडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर , सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालयचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला , डॉ. भगवान यादव , मनजितसिंग विरदी , भीमराव पाटोळे , मंजिरी धाडगे , संगीता आठवले , प्रा. वाल्मिक जगताप , शिवानंद हूल्ल्याळकर , श्याम सहानी , फिरोज मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते .

पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यामध्ये नामदेव ढसाळ पत्रकारिता पुरस्कार हा सुगावा प्रकाशनचे प्रकाशक व दै. बहुजन महराष्ट्र वृत्तपत्राचे संपादक विलास वाघ , बाळासाहेब ठाकरे प्रभावशाली व्यंगचित्रकार  पुरस्कार हा पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग , पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार हा गेली ५० वर्षापासून दै . आज का आनंदचे व दै संध्यानंदचे संस्थापक संपादक श्याम अग्रवाल ,  उत्कृष्ट जनसंपर्क पुरस्कार हा गेली ३० वर्षांपासून जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असलेले ” अक्षरकला  ” या जनसंपर्क संस्थेचे संचालक  प्रविण वाळिंबे , उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार दै. इंडियन एक्सप्रेसचे  वृत्तपत्र छायाचित्रकार आरुल होरायझन , उत्कृष्ट इलेट्रॉनिक माध्यम पुरस्कार माय मराठी वेब मीडियाचे संपादक शरद लोणकर , उत्कृष्ट उपसंपादक हा दै. पुण्यनगरीचे उपसंपादक अशोक बालगुडे , उत्कृष्ट गुन्हे वार्तांकन पुरस्कार हा  दै. पुणे मिररच्या पत्रकार अर्चना मोरे ,  प्रदीप रणपिसे राजकीय पत्रकारिता पुरस्कार हा दै आज का आनंदचे पत्रकार शैलेश काळे , उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दै. केसरीचे पत्रकार स्वप्नील पोरे , उत्कृष्ट क्रीडा पत्रकारिता पुरस्कार हा दै. सकाळ टाइम्सचे अश्व शर्यतीचे पत्रकार व पुणे रेसिंग जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मुनीर सय्यद , उत्कृष्ट उपनगर वार्ताहर हा दै. लोकमतचे उपनगर वार्ताहर प्रमोद गव्हाणे ,सिटीझन जर्नालिस्ट पुरस्कार हा अनिल अगावणे  , ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार हा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुंक्यातील साप्ताहिक महामित्रचे संपादक दशरथ फुले , सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय पुरस्कार हा भवानी पेठमधील सापिका येथील हिंद बाल समाज मंडळ ट्रस्ट संचालित ज्योती वाचनालय , उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार हा वानवडी येथील श्रीगणेश न्यूज पेपर एजन्सीचे संचालक अतुल भुजबळ आदींचा सन्मान स्मृतिचिन्ह , शाल व पुष्पगुछ देउन सन्मानित करण्यात आले .

व्याख्यानामध्ये ” बदलते तंत्रज्ञानांचे माध्यमासमोरील आव्हाने ” या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्रविदया विभागाचे सहाय्यक प्राध्यापक संजय विष्णू तांबट यांनी सांगितलॆ कि , सामाजिक माध्यमांमुळे प्रिंट मीडियावर परिणाम झाला . बदलती माध्यमे रूपे व वाचकांची गरज समन्वय  साधून वृत्तपत्रांनी बदल स्वीकारला पाहिजे हि काळाची गरज आहे . नव्वदच्या दशकामध्ये वाचकांना वृत्तपत्र , साप्तहिक व मासिके माध्यमे फक्त उपलब्ध होती मात्र इलेक्ट्रॉनिक माध्यमे आल्यानंतर वाचकांचा कल बदलला मात्र प्रिंट मीडियाचे महत्व अबाधित राहिले . विस्तृत स्वरूपात माहिती हि आज देखील वृत्तपत्रातच दिली जात आहे ., मात्र सोशल मीडियावर आज प्रत्येक जण बातमी देऊ लागला आहे . त्यामुळे वृत्तपत्रांच्या वाचकांवर मोठा परिणाम झाला .

पुणे शहराचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे  यांनी आपले अध्यक्षस्थानी बोलताना  सांगितले कि ,  एकेकाळी वृत्तपत्रावर कोणती बातमी घायची हे ठरले जायचे मात्र अलीकडे गुन्हेगारीच्या बातम्या सर्रास पहिल्या पानावर दिल्या जात आहे . वाजवीपेक्षा त्याला जास्त महत्व दिले जात आहे . कोणत्याही सेलिब्रिटींच्या वैयक्तिक जीवनाची बातमी तिखट मीठ लावून झळकाविले जाते . अशा बातम्यांना प्राधान्य दिले जाऊ नये . सामाजिक विषयांना व  नागरि समस्यांना  वर्तमानपत्रात जागा दिली पाहिजे . वाचकांची अभिरुची सांभाळण्यासाठी वृत्तपत्रांनी नवीन माहिती दिली पाहिजे . सोशल मीडियावरील येणाऱ्या बातमीच्या पुढील बातमी काय आहे हे वृत्तपत्रांनी सांगितले पाहिजे .

  दै . आज का आनंदचे व दै संध्यानंदचे संस्थापक संपादक श्याम अग्रवाल यांनी  पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , आज का आनंद सुरुवातीला १५ पैशाला  पेपर विकला जात होता आज हा पेपर सात रुपयांना विकला जात आहे . वृत्तपत्र चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे . २४ तास यंत्रणा राबविल्यानंतर वृत्तपत्र तयार होते . वाचकांची गरज भागविण्यासाठी नवनवीन उपक्रम वृत्तपत्रे राबवितात.  आर्थिक गणिते जुळविताना कसरत करावी लागते. त्यासाठी संघर्ष करावा लागतो . वर्तमानपत्रे हि समाजाची गरज आहे , आजही आपलयाकडे छापील शब्दाला  मोठी किंमत आहे , त्यासाठी वर्तमानपत्र कायमस्वरूपी टिकवून राहतील .

 दै. पुण्यनगरीचे उपसंपादक अशोक बालगुडे यांनी उत्कृष्ट उपसंपादक पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले कि , इलेक्ट्रॉनिक मीडिया आला तरी देखील प्रिंट मीडिया  आपली विश्वासहर्ता  कायम  टिकवून आहे . त्यामुळे आजही वृत्तपत्र वाचक दूर गेलेला नाही कारण नळावरील   पाणी भरणारी महिला पाणी येणार नसल्याची  माहिती हि पेपरमध्ये छापून आली आहे का ? असे विचारते हि विश्वासहर्ता  वृत्तपत्रांनी कायम टिकवून ठेवल्यामुळे  वृत्तपत्राचे महत्व अबाधित राहील त्यात शंका नाही , असा विश्वास बालगुडे यांनी व्यक्त केला .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत पुणे मीडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर यांनी केले तर सूत्रसंचालन विकास भांबुरे यांनी केले  तर आभार सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालयचे ग्रंथपाल दिलीप भिकुले यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर जोग , प्रशांत फुले ,संतोष गायकवाड , नितीन बाल्की व भारती अंकलेल्लू आदींनी विशेष परिश्रम घेतले .

या कार्य्रक्रमाचे आयोजन पुणे मीडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर व सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालयचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला यांनी केले होते .

‘आयसीएआय’च्या ‘सीसीएम’पदी चंद्रशेखर चितळे

0
‘आरसीएम’पदी आनंद जाखोटिया, अरुण गिरी व यशवंत कासार यांची निवड

पुणे : दि इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटीवर पुण्यातील सीए चंद्रशेखर चितळे यांची सेंट्रल कौंसिल मेंबर म्हणून, तर सीए आनंद जाखोटिया, सीए अरुण आनंदागिरी व सीए यशवंत कासार यांची ‘रिजनल कौन्सिल मेंबर’ म्हणून निवड झाली आहे. पुणे शाखेतुन एक सीसीएम आणि तीन आरसीएम निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असून, पुण्यासाठी ही आनंदाची बाब आहे.२४ व्या सेंट्रल कौन्सिलसाठी व २३ व्या रिजनल कौन्सिलसाठीची निवडणूक गेल्या महिन्यात झाली. त्यात पुण्यातून निवडून आलेले ‘सीसीएम’ चंद्रशेखर चितळे आणि ‘आरसीएम’ आनंद जाखोटिया, अरुण आनंदागिरी व यशवंत कासार यांचा पुणे आयसीएआयच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी व्यवस्थापकीय समितीच्या सदस्या सीए रेखा धामणकर, सचिव सीए राजेश अगरवाल, सीए सचिन परकाळे, पुणे आयसीएआयचे खजिनदार सीए अभिषेक धामणे आदी उपस्थित होते.

‘आरसीएम’ पश्चिम विभागासाठी पुण्यातील ८००० सीए व २५ हजार सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणार आहेत. १९६२ मध्ये सुरु झालेली पुणे शाखा भारतातील तिसऱ्या क्रमांकाची शाखा आहे. पश्चिम विभागात पुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, सुरत, अहमदाबाद, गोवा, बडोदा आदी शाखांचा समावेश आहे. केंद्रीय स्तरावर सीए व्यावसायिकांसाठी चांगले काम करण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे चितळे यांनी नमूद केले. जाखोटिया, आनंदागिरी व कासार यांनीही आपल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत सीएंसाठी भरीव काम करणार असल्याचे सांगितले.

सावरकर भवनाच्या जागेवर मेट्रोचे स्टेशन करावे-चित्रपट निर्माता:नगरसेवकाची मागणी

0

पुणे -पुण्याचं सांस्कृतिक लेणं असलेल्या बालगंधर्व  रंगमंदिराची धूळधाण उडवून तिथे मेट्रो स्टेशनाचा घाट घालण्याचा इरादा ठेवणाऱ्यांना शिवसेनेचे नगरसेवक आणि चित्रपट निर्माते विशाल धनवडे यांनी ‘महापालिकेच्या मालकीच्या सावरकर भवनाच्या इमारतीच्या जागेचा पर्याय सुचविला आहे. बालगंधर्व ऐवजी मेट्रो चे स्टेशन सावरकर भवन या इमारतीच्या जागेवर उभारावे आणि त्यास स्वातंत्र्यवीर सावरकर मेट्रो स्थानक असे नाव द्यावे असे त्यांनी म्हटले आहे . सध्या या इमारतीत महापालिकेने मोटारी सह अनेक व्यावसायिकांना जागा भाड्याने दिलेल्या आहेत . बँका, टेलिफोन  अशांचा त्यात समावेश आहे . अशा मार्गाने महापालिका तिथून किती आर्थिक उत्पन्न मिळविते ? त्यापेक्षा तिथे मेट्रोचे स्टेशन उभारून जाहिराती द्वारे तिथून महापालिकेने उतपन्न मिळवावे , परंतु बालगंधर्व रंगमंदिराच्या जागेला धक्का लावू नये असे असे विशाल धनवडे यांनी म्हटले आहे .

मेट्रोच्या नावाने बालगंधर्व रंगमंदिराचा बळी जाऊ देणार नाही – नगरसेवक बाळासाहेब ओसवाल

0

पुणे-बालगंधर्व रंगमंदिराच्या जागेवर मेट्रो स्टेशन करून पुण्याचा कलेचा वारसा ,ऐतिहासिक वास्तू धुळीस मिळविण्याचे तथाकथीतांचे प्रयत्न शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही . असा इशारा देत ,मेट्रो हवी आहे पण पर्यायी जागा उपलब्ध असताना , बालगंधर्व रंग मंदिराच्याच जागेचा अट्टाहास का धरला जातोय असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी केला आहे. पहा आणि ऐका नेमके त्यांनी याप्रकरणी काय म्हटले आहे …

अतिक्रमण खात्यानंं १५०० सिलेंडरचा काळाबाजार केला काय ?पहा उपमहापौर काय म्हणतात …

0

पुणे-अतिक्रमण खाते एकीकडे गोरगरीब  पथारीवाल्यांचा पैसा खाऊन मर्जीतील पथारीवाल्यालाच व्यवसाय करू देत असल्याचे चित्र असताना  …या खात्याने विक्रेत्यांकडून पकडलेल्या सुमारे 4 महिन्यातील १५०० सिलेंडर चा काळा बाजार केल्याचा आरोप होतो आहे . आज याप्रकरणी ‘मायमराठी’ ने खुद्द उपमहापौर डॉ .सिद्धार्थ धेंडे यांच्याकडे विचारणा केली असताना त्यांनी यावेळी तत्क्षणी या प्रकारास दुजोरा देत पहा नेमके काय म्हटले आहे .

जेट एअरवेजच्या मेगा सेलमुळे प्रवासखर्चात ५० टक्क्यांपर्यंत बचत

0

~ एअरलाइनच्या वेबसाइटवरून तसेच मोबाइल अॅपवरून बुकिंग केल्यास एक्स्लुसिव्ह लाभ ~

मुंबई २०१९ सालाचे भव्य स्वागत करत, जेट एअरवेज या भारतातील आघाडीच्या, पूर्ण-सेवा आंतरराष्ट्रीय एअरलाइन कंपनीने सात दिवसांच्या आकर्षक ग्लोबल फेअर सेलची घोषणा केली आहे.

आजपासून लागू होणाऱ्या या सेलमध्ये ग्राहक एअरलाइनची तिकिटे बुक करून इकोनॉमी आणि प्रीमियम या दोन्ही विभागांत ५० टक्क्यांपर्यंत* भरघोस सवलत मिळवू शकतात. हा सेल एअरलाइनच्या देशांतर्गत व परदेशातील नेटवर्कमधील निवडक ठिकाणांसाठी लागू असून, यामध्ये भारतातील एअर फ्रान्स व केएलएम रॉयल डच एअरलाइन्स या कंपन्यांच्या विमानसेवेचाही समावेश आहे. यात सार्क, असिआन, आखाती देश (मस्कत व शारजाह वगळता), मँचेस्टरसह युरोप आणि उत्तर अमेरिकेतील टोरोंटो या ठिकाणांचा समावेश होतो.

सेलच्या काळात बुकिंग केलेल्या एकमार्गी तसेच येण्या-जाण्याच्या प्रवासासाठी हे सवलतीचे तिकीटदर वैध आहेत. एअरलाइनच्या देशांतर्गत नेटवर्कमध्ये तसेच अबूधाबी, अॅम्स्टरडॅम-शिफोल, लंडन-हीथ्रो आणि पॅरिस चार्ल्स दी गोल या एअरलाइनच्या गेटवेजमध्ये प्रवास करण्यासाठी या सवलतीचा लाभ घेता येईल.

११ जानेवारी २०१९ म्हणजेच शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत एअरलाइनच्या सर्व बुकिंग चॅनल्समार्फत केलेल्या बुकिंग्जसाठी हा मेगा सेल उपलब्ध आहे. शिवाय, ग्राहक www.jetairways.com या एअरलाइनच्या वेबसाइटवरून किंवा मोबाइल अॅपवरून थेट बुकिंग करू शकतात आणि काही एक्स्लुजिव्ह लाभ मिळवू शकतात. यामध्ये प्रत्येक फ्लाइट बुकिंगवर २५० बोनस जेपीमाइल्स, बुकिंगनंतर २४ तासांच्या आत केलेल्या बदलांसाठी किंवा तिकीट रद्द करण्यासाठी शून्य रद्दीकरण किंवा परिवर्तन शुल्क, त्याचप्रमाणे वाढत्या प्रवासभाड्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी नाममात्र शुल्क भरून पसंतीचे भाडे लॉक करून ठेवण्याची सुविधा आदींचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे ग्राहक त्यांचा प्रवास तत्काळ सुरू करू शकतात, तर प्रीमिअर विभागातून देशांतर्गत प्रवास करणारे त्यांचा प्रवास १३ जानेवारी, २०१९पासून सुरू करू शकतात. इकॉनॉमी विभागात देशांतर्गत प्रवासासाठी बुकिंग करणारे प्रवासी २० जानेवारी, २०१९पासून प्रवास करू शकतात. देशांतर्गत तिकिटांना एक प्रगत खरेदी निर्बंध लागू आहे. त्यानुसार प्रीमिअर कॅबिनची तिकिटे प्रवास सुरू करण्याच्या किमान ०८ दिवस आधी बुक केली पाहिजेत, तर इकॉनॉमी विभागाची तिकिटे प्रवास सुरू करण्याच्या किमान १५ दिवस आधी बुक केली पाहिजेत.

भारतातील प्रवासी कोणत्याही ६६ देशांतर्गत ठिकाणी आणि थेट एअरलाइनद्वारे सेवा दिल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी किंवा एअरलाइनच्या कोडशेअर पार्टनर्सद्वारे अॅम्स्टरडॅम आणि पॅरिस गेटवेजमार्फत पुरवल्या जाणाऱ्या सेवांच्या ठिकाणी या सेलचा लाभ घेऊन प्रवास करू शकतात. आखाती देशांतील प्रवासी या योजनेखाली भारत, आसिआन आणि सार्क देशांमध्ये प्रवास करू शकतात. ही मर्यादित काळासाठी असलेली ऑफर नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका येथील प्रवाशांनाही लागू असून, ते या ऑफरचा लाभ घेऊन भारत, आखाती देश, लंडन व मँचेस्टरसह युरोप व टोरोंटोला प्रवास करू शकतात. अतिपूर्वेकडील देशांतील पाहुणे भारत, आखाती देश, सार्क, अॅम्स्टरडॅम, लंडन, मँचेस्टर व पॅरिस येथे प्रवास करू शकतात. तर युरोप आणि टोरोंटोमधील पाहुणे भारतातील अनेकविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी या सवलतीचा उपयोग करू शकतात.

*नियम व अटी लागू

जेट एअरवेजविषयी

जेट एअरवेज ही भारतातील आघाडीची आंतरराष्ट्रीय एअरलाइन असून, सध्या ती भारत व परदेशांतील ६६ ठिकाणी सेवा देते. जेट एअरवेजचे विस्तीर्ण जाळे भारताच्या सर्व बाजूंना पसरलेले आहे. महानगरे, राज्यांच्या राजधान्या व उदयोन्मुख ठिकाणी ही एअरलाइन सेवा देते.

भारताबाहेर, जेट एअरवेज आग्नेय आशिया, आखाती देश, युरोप व उत्तर अमेरिकेतील महत्त्वाच्या ठिकाणी सेवा देते. जेट एअरवेज समूह सध्या १२४ विमानांच्या ताफ्यासह सेवा देतो. यामध्ये बोइंग ७७७-३०० ईआर, एअरबस ए३३०-२००/३००, नवीन बोइंग ७३७ मॅक्स, नेक्स्ट जनरेशन बोइंग ७३७ आणि एटीआर ७२-५००/६०० यांचा समावेश होतो.

हेल्मेट सक्ती वर अखेर बापट बोलले -पण ….आता परिस्थिती बदलली असेही म्हणाले..

पुणे- ज्यांनी बोलावं,पुण्याच्या पोलीस आयुक्तांना तोंडी तंबी द्यावी .. सक्ती शहरात करू नका अशी भूमिका ठाम बोलून दाखवावी अशी अपेक्षा ज्यांच्याकडून होती ते पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट अखेर उशिरा का होईना ..पत्रकारांच्या आग्रहास्तव हेल्मेट वर बोलले खरे .. पण जेमतेम ..काही स्पष्ट भूमिका नाही … कधी काळी कॉंग्रेस च्या राजवटीत सुर्यकांत पाठक,संदीप खर्डेकर आदी कार्यकर्त्यांच्या समवेत शहरातील सक्तीला विरोध करणारे बापट आता सत्तेत आल्यावर ,पालकमंत्री असताना ..
नेमके काय बोलले .. तो व्हिडीओ  येथे पहा .. आणि विचार मंथन करा …

पेजावरमठाचे मठाधिपती प.पू.श्री श्री विश्‍वेशतीर्थ स्वामी यांना ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर ज्ञान-ब्रह्मर्षि’ पुरस्कार जाहीर

0

पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारततर्फे कर्नाटकमधील उडुपी येथील पेजावर मठाचे ज्ञानमठाधिपती प.पू.श्री श्री विश्‍वेशतीर्थ स्वामी यांना आध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर ज्ञान-ब्रह्मर्षि’ पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकांनंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवार दि. १२ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११.१५ वाजता विश्‍वराजबाग, लोणी काळभोर, पुणे येथील जगातील सर्वात मोठा घुमट असलेल्या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली विश्‍व शांती प्रार्थना सभागृहात हा ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर ज्ञान-ब्रह्मर्षि’ पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.
या समारंभासाठी संतवृत्तीचे थोर शास्त्रज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यात्माचे अभ्यासक व कीर्तनकार शांतीब्रह्म ह.भ.प.श्री मारुती महाराज कुर्‍हेकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प.पू.श्री श्री विश्‍वेशतीर्थ स्वामीजींनी गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करीत आहेत. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, संतस्वरूप व ज्ञानस्वरूप विभूती म्हणून त्यांची ओळख आहे. विश्‍वशांती व विश्‍वकल्याणाचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले आहे.
स्वामींजींनी सुरू केलेल्या अखिल भारत मध्य महामंडळ एबीएमएम सेंटरने गरीब विद्यार्थ्यांना मदत केली आहे. त्यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी कर्नाटमधील बेंगळुरू, हुबळी, धारवाड अशा ठिकाणी वसतीगृहे सुरू केली आहेत. त्यांना राष्ट्रसेवक म्हणून ओळखले जाते. ते एक महान समाजसुधारक आहेत.
प.पू.श्री श्री विश्‍वेशतीर्थ स्वामी यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर ज्ञान-ब्रह्मर्षि’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी दिली.

आता घरोघरी नळाने येणारा पाण्याचा थेंब हि घ्यावा लागेल विकत – प्रारंभ झाला १२ मीटर बसवून

0

  पुणे-जीएसटी ,हेल्मेट सक्ती , बेरोजगारी, महागाई … याने हैराण झालेल्या पुणेकरांनो सांभाळा … आता तुम्हाला घरात नळाने येणाऱ्या पाण्याच्या थेंबालाही पैसे मोजावे लागणार आहेत .ज्याचा प्रारंभ नुकताच गाजावाजा न करता १२ मीटर बसवून करण्यात आला आहे .समान पाणीपुरवठा योजनेच्या नावाने ..खऱ्या अर्थाने सर्वत्र समान पाणी पुरवठा होणार नसून ,जेवढे पैसे तेवढे पाणी या अर्थाने हा पाणीपुरवठा होणार आहे हे सर्वप्रथम पुणेकरांनो लक्षात घ्या .  आणि विशेष म्हणजे हा ऑगस्ट २०१६ चाच प्रस्ताव आहे जो आता मार्गी लागतो आहे.     

पाण्याचे मीटर (ऑटोमॅटिक मीटर रिडिंग) बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. औंध येथील सारस्वत बँकेच्या पाणीजोडणीला मीटर बसविण्यात आले आहेत. आतापर्यंत १२ मीटर बसविण्यात आले असून, आणखी ५० मीटर या परिसरात बसविण्यात येणार आहे. विमाननगरमध्येही मीटर बसविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली. समान पाणी पुरवठा योजनेतील बहुचर्चित मीटर बसविण्यास सुरुवात झाल्याने वापर होणाऱ्या प्रत्येक थेंबाचे ‘ऑडिट’ होणार आहे.

औंध-बाणेर-बालेवाडी येथे रस्त्यांची कामे करताना स्मार्ट सिटी कंपनीने समान पाणीपुरवठा योजनेनुसार पाइप टाकण्याची कामे सुरू केली आहेत. ड्रेनेज, स्ट्रॉम वॉटर आणि जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. त्यासाठी पालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदार कंपन्यांची मदत घेण्यात येत आहे. त्यानुसार सारस्वत बँकेच्या पाणीजोडाला मीटर बसविण्यात आले आहे. जलवाहिन्या टाकण्याचे काम झाले की, लगेचच व्यावसायिक नळजोडांना मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून रस्ता खोदाईला विलंब होत असला, तरी या खोदाई करण्यात येणार आहे. नगर रस्ता, विमाननगर परिसरात खोदाईची कामे हाती घेण्यात येणार आहेत. योजनेच्या कामाचे कार्यादेश देऊन आठ महिने उलटले तरी कामास सुरुवात न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ठेकेदार कंपन्यांकडून सर्वेक्षण सुरू असल्याचा दावा पालिका प्रशासन करत असले, तरी हे काम सुरू न करण्यास आतल्या गोटातील हालचाली कारणीभूत असल्याची चर्चाही होती.

स्मार्ट सिटी कंपनीने औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात पाणी आणि ड्रेनेज लाइन बदलण्याची कामे हाती घेतली आहेत. नव्या जलवाहिनी समान पाणीपुरवठा योजनेंर्तगत टाकण्यात येत आहेत. त्यामुळे या परिसरात मीटर बसविण्याच्या कामास पुढील काळात वेग येईल, असे चित्र आहे. प्रशासनाकडून सुरुवातीला व्यावसायिक नळजोडांना मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर घरगुती (सोसायट्यांना) मीटर बसविण्यास सुरुवात होणारआहे.