Home Blog Page 3016

खासदार वंदना चव्हाणांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा १५ दिवसांत २७ महापालिकांच्या अभ्यास दौरा

0

पुणे-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अर्बन सेलची स्थापना खा. वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने व मुख्य मार्गदर्शनाखाली झाली
आहे. काल बुधवार दि. ०९ जानेवारी २०१९ रोजी प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सेलची
पहिली बैठक मुंबई प्रदेश कार्यालय येथे पार पडली. या बैठकीस आ. हेमंत टकले, आ. विद्या चव्हाण, ठाणे शहराध्यक्ष श्री.
आनंद परांजपे, पक्षाचे सरचिटणीस श्री. शिवाजीराव गर्जे आणि शहरी भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने शहरी (नागरी) भागातील प्रश्न, समस्या सोडविण्याच्या दृष्टीने
नियोजनबद्ध आरखडा तयार करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. आगामी काळात अर्बन सेलचे सदस्य महाराष्ट्रातील
शहरी भांगात जाऊन स्थानिक महापालिका क्षेत्रांतील नागरी समस्यांचा आढावा घेतील व त्यासोबत विशेष तज्ञांच्या
मदतीने हा प्रस्तावित आराखडा तयार करतील अशी माहिती या सेल च्या अध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण यांनी दिली.
वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली येत्या १५ दिवसांत २७ महापालिकांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले
आहे, या दौर्यादरम्यान नागरी समस्या व तेथील नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा अभ्यास अर्बन सेलचे सदस्य करणार आहेत. या
संदर्भातील नियोजनासाठी येत्या शनिवारी १२ जानेवारी २०१८ रोजी मुंबई येथे पक्ष कार्यालयात महाराष्ट्रातील पक्षाचे
शहराध्यक्ष, महानगरपालिकेतील गटनेते, प्रमुख पदाधिकारी यांची बैठक प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील यांच्या प्रमुख
उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा अर्बन सेल शहरी-नागरी जीवनमान सुधरण्याच्या दृष्टीने
प्रयत्नशील असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
स्थानिक पातळीवर किमान १० सदस्यांचा कृती गट तयार करण्याचे निश्चित करण्यात आले असून यात पक्षाचे आजी-
माजी नगरसेवक, पराभूत उमेदवार, सक्रीय कार्यकर्ते व विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष यांचा यात समावेश असेल.

संशोधित इलेक्ट्रीक वाहने हेच उद्याचे भविष्य :डॉ . सागर व्यंकटेश्वरम

0
पुणे :‘इलेक्ट्रिक व्हेईकल लॅबोरेटरी ‘चे उदघाटन भारती विद्यापीठ ‘कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ‘ मध्ये डॉ . सागर व्यंकटेश्वरम (मुख्य कार्यकारी अधिकारी ,ऑप्टिक्स टेल प्रा . लि . ) आणि रमा सुंदरम (मुख्य कार्यकारी अधिकारी,प्रोपेलिक्स सोल्युशन्स ) यांच्या हस्ते  झाले . कार्य्रक्रमाच्या  अध्यक्षस्थानी ‘भारती विद्यापीठ’कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ‘चे प्राचार्य आनंद भालेराव होते .
डॉ.डी एस बनकर (विभागप्रमुख ,इलेक्ट्रिक इंजिनियरिंग ),प्राध्यापक वर्ग ,संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.हा कार्यक्रम भारती विद्यापीठ (कात्रज ) येथे झाला .
यावेळी बोलताना डॉ . सागर व्यंकटेश्वरम म्हणाले ,’भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढणार आहे . इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या सुपर कपॅसिटरच्या संशोधनाची गरज निर्माण होणार आहे . ही आव्हाने इलेक्ट्रिक इंजिनियजिंग विद्यार्थांनी पेलावी ‘
रमा सुंदरम म्हणाले ,’मागील वर्षी भारतात फक्त ५ हजार इलेक्ट्रिक वाहने विकली गेली . मात्र ,हा आकडा पुढे वाढणार आहे . त्यासाठी उपयुक्त संशोधन पुढे आले पाहिजे . ‘
डॉ आनंद भालेराव म्हणाले,’भारत सरकार इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लॅन २०३० कडे पाहत आहे . त्यात गुंतवणूक होत आहे . सार्वजनिक वाहतूक आणि ओला -उबेर सारख्या टॅक्सी सेवा इलेकट्रीक होणार आहेत . अशावेळी इलेक्ट्रिक वाहनांचा वैयक्तिक वापर वाढला पाहिजे . या वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीज ची कार्यक्षमता आणि आयुष्यमान वाढविण्यासाठी संशोधन करायला वाव आहे . विद्यार्थ्यांनी त्यात पुढाकार घ्यावा ‘

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला जीएसटीच्या महसूलाचा वाटा द्या अन्यथा न्यायालायात भेटा- कॉंग्रेसचा भाजपला निर्वाणीचा इशारा

पुणे- कॅन्टोन्मेंट बोर्डातील रहिवाश्यांच्या विविध समस्या संदंर्भात पुणे शहर जिल्हा काँग्रेसकमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आज  पुणे  कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरपुतळा, अरोरा टॉवर्स, कॅम्प येथून झाली. मोर्चा अरोरा टॉवर्स मार्गे, बच्चू अड्डा, सरबतवाला चौक,शिवाजी मार्केट, पुना कॉलेज मार्गे कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे समाप्त झाला. शहर काँग्रेसचे अध्यक्षरमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारीडॉ. डी. एन. यादव यांना भेटून कॅन्टोन्मेंट बोर्डातील रहिवाश्यांच्या विविध समस्यांबाबतीत निवेदन देण्यात आले.

निवेदनातील मागण्या –
1) पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या मिळकतींचे भाडे कराराची मुदत वाढविण्यासाठी
रेडी रेकनरनुसार नागरिकांना १% रजिस्ट्रेशन फी भरावी लागते ती एक समान धोरण करून
फी कमी करण्यात यावी.
2) पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीतील बांधकामांना १ एफ.एस.आय. आहे तो वाढवून मिळावा.
3) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी रेडीरेकनर प्रमाणे कर आकारणी करतात तो कर रद्द करून
२०१३ साली जी.पी.सी.‌ बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे कर आकारण्यात यावा व करामध्ये वाढ
करू नये.
4) पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची रविंद्रनाथ टागोर ही इंग्रजी माध्यमाची शाळा असून त्या ठिकाणी
गरीब व होतकरू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यामुळे या शाळेची फी बंद करून सर्वांना
मोफत शिक्षण देण्यात यावे.
5) पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या मिळकींचे हस्तातंरणाची प्रकरणे लवकरात लवकर
निकाली काढण्यात यावीत.
6) पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रूग्णांकडून
कमीत कमी फी आकारावी.

7) पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य सेवा मिळावी.
8) सन २०१७ साली केंद्र सरकारने संपूर्ण देशात जी.एस.टी.ची अमंलबजावणी केली. या
निर्णयामुळे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला टॅक्सच्या माध्यमातून मिळणारा महसूल संपुष्टात आला.
त्यामुळे अनेक विकासकामे रखडलेली आहे. भा.ज.प. प्रणित राज्यसरकारने जी.एस.टी.मधील
महसूलातील वाटा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डला देण्याचे आश्वासन दिले होते परंतु आजपर्यंत या
आश्वासनाची पूर्तता केलेली नाही.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी.एन.यादव यांना दिलेल्या समस्यांच्या निवेदना
बाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ असे शिष्टमंडळाला सांगितले. भा.ज.प. प्रणित राज्यशासनाने
जी.एस.टी. च्या महसुलाचा वाटा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला दिला नाही तर कॅन्टेन्मेंट बोर्डाच्या
जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष उच्च न्यायालयामध्ये राज्यसरकारच्या विरूध्द जनहित याचिका
दाखल करून न्याय मागणार असे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
डी.एन.यादव यांना सांगितले.
मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी महापौर
कमल व्‍यवहारे, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे सदस्य अशोक पवार, रशिद शेख, नगरसेविका लता
राजगुरू, चाँदबी नदाफ, सुजाता शेट्टी, नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, रफिक शेख,
नीता रजपूत, माजी नगरसेवक करण मकवाणी, मंजूर शेख, मुकारी अलगुडे, महिला अध्यक्षा
सोनाली मारणे, युवक अध्यक्ष विशाल मलके, संजय कवडे, सुरेखा खंडागळे, राजेंद्र शिरसाट, प्रदिप
परदेशी, सुनिल घाडगे, रमेश सोनकांबळे, अनुसया गायकवाड, साहिल केदारी, हसन कुरेशी, मुन्ना
केदारी, विठ्ठल थोरात, मेहबुब नदाफ, रवि पाटोळे, राहुल तायडे, प्रकाश पवार, आसिफ शेख,
अशोक लांडगे, लुकस नायडे, शिलार रतनगिरी, पार्वती भडके, मीरा शिंदे, सुलतान खान, अनिल
अहिर, सादिक लुकडे, नदीम मुजावर, सेल्वराज ॲन्थोनी, वैशाली रेड्डी, नंदा ढावरे, शोभना
पण्णीकर, राधिका मखामले, कल्पना उनवणे आदींसर असंख्य नागरिक व काँग्रसचे पदाधिकारी,
कार्यकर्ते सहभागी झाले होते.

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व-२’च्या दुस-या आठवड्यात ‘सेलिब्रेशन’ थीमवर होणार अफलातून परफॉर्मन्स

0

हास्याचे डबल डोस देण्यासाठी महाराष्ट्राचे मनमुरादपणे मनोरंजन करणारा कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा-पर्व २’ ७ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नवीन वर्षात हास्याच्या जत्रेने धमाकेदार एण्ट्री करत प्रेक्षकांना कॉमेडीची डबल ट्रिट देण्यासाठी हा कार्यक्रम चार दिवसांचा केला आहे. तसेच या कार्यक्रमाचे दोन फॉरमॅट आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे जजच्या भूमिकेत…या दोन्ही गोष्टी म्हणजे ‘फूल ऑन एंटरटेनमेंट’.

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- पर्व २’ या कार्यक्रमाच्या पहिल्या आठवड्यातील सुपर-डुपर स्किट्सने महाराष्ट्राला पोट धरुन हसवल्यानंतर हा कार्यक्रम दुस-या आठवड्यात ‘सेलिब्रेशन’ या थीममधून प्रेक्षकांना पुन्हा एकदा हसवायला सज्ज होणार आहे.

येत्या सोमवार आणि मंगळवारी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- कॉमेडीचे जहागिरदार’ या फॉरमॅटमध्ये समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, अरुण कदम, अंशुमन विचारे आणि त्यांच्या सोबतीला ८ नवीन कॉमेडीयन्स ‘सेलिब्रेशन’ या थीमवर आधारित अफलातून स्किट सादर करणार आहेत. मग ते सेलिब्रेशन लग्नाच्या वाढदिवसाचेही असू शकते आणि ऑफिसमधील शेवटचा दिवस असल्याने बॉसला दिलेली सेंड ऑफ पार्टीपण असू शकते. सेलिब्रेशनचा आनंद कॉमेडीमुळे कसा द्विगुणीत होतं याचे उत्तम उदाहरण पाहण्यासाठी आणि जज महेश कोठारेंची सेलिब्रेशन स्किटला मिळणारी रिऍक्शन पाहण्यासाठी बघा ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- पर्व २’ सोनी मराठीवर.

जीतेंद्र-श्रीदेवीच्या ‘हिम्मतवाला’ सिनेमाला ‘लकी’च्या निर्मात्यांचे ‘कोपचा’ गाण्याव्दारे ट्रिब्युट !

0

यंदाच्या मोस्ट अवेटेड लकी चित्रपटाचे पहिले गाणे ‘कोपचा’ नुकतेच रिलीज झाले आहे. ह्या गाण्याव्दारे लकीच्या निर्मात्यांनी 1983मध्ये झळकलेल्या जीतेंद्र-श्रीदेवी स्टारर ‘हिम्मतवाला’ सिनेमाला ट्रिब्यूट दिले आहे. अमितराजने संगीत दिलेल्या ह्या गाण्याला डिस्को किंग बप्पी लाहिरी आणि पॉप क्वीन वैशाली सामंतने गायले आहे. तर अभय महाजन आणि दिप्ती सतीवर हे गाणे चित्रीत झाले आहे.आपल्या 45 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत सुप्रसिध्द संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरींनी गायलेले हे पहिले मराठी गाणे आहे.

ह्या गाण्याविषयी चित्रपटाचे निर्माते सुरज सिंग म्हणतात, “ माझी पिढी ऐंशीच्या दशकातल्या चित्रपटांवर वाढलीय. आमच्या पिढीचा बप्पीदांच्या गाण्याशी खास ऋणानुबंध आहेच. पण त्यासोबतच जीतेंद्रसरांसाठी माझ्या मनात एक खास जागा आहे. आणि म्हणूनच जीतूसर आणि त्यांच्या गोल्डन एराला समर्पित करणारे कोपचा गाणे आम्ही घेऊन आलो आहोत. मला पूर्ण विश्वास आहे, हे गाणे रसिकांच्या ओठांवर पटकन रूळेल.”

गाण्याविषयी बप्पी लाहिरी म्हणाले, “सत्तरच्या दशकाच्या सुरूवातीला मी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं असलं तरीही, मला ओळख दिली ती एका मराठी दिग्दर्शकाच्या सिनेमाने. 1975ला आलेल्या राजा ठाकुर ह्यांच्या जख्मी सिनेमामूळे माझे करीयर ख-या अर्थाने सुरू झाले. आणि मी ‘लकी’ ठरलो.  मराठीत काम करण्याची खूप इच्छा असूनही सततच्या व्यस्ततेमूळे मी काम करू शकलो नाही.  संजय जाधव ह्यांच्या लकी सिनेमामूळे मी मराठीत गायक म्हणून पदार्पण करतोय. “

गायिका वैशाली सामंत म्हणाली, “लहानपणी मी बप्पीदांची गाणी खूप ऐकायचे. तेव्हा कोणी मला सांगितलं असतं की, मोठी झाल्यावर एक दिवस मी त्यांच्यासोबत एक डूएट गाईन. तर कधी विश्वासच बसला नसता. हे खरंच स्वप्नवत आहे. एवढ्या मोठ्या संगीतकार-गायकासोबत गाणं गायला मिळाणं, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे स्वत:ला खूप लकी समजते, की मला संजयदादाच्या सिनेमात बप्पीदांसोबत हे एक एनर्जेटिक गाणं गाता आलं. “’बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर7’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, अभय महाजन आणि दिप्ती सती स्टारर,  संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपट 7 फेब्रुवारी 2019ला  महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

उद्योजक होऊ इच्छिणार्‍यांनी विचार, विश्‍वास व साध्य ही त्रिसुत्रीच जपावी : नीरज राठोड

0
हिंजवडीत उद्योजक परिषदेला सुरुवात 
पिंपरी । प्रतिनिधी :
यशस्वी उद्योजक होण्यासाठी फक्त कौशल्य असून चालत नाही, तर जिद्द, इच्छाशक्तीही असावी लागते. त्याचबरोबर आपले लक्ष्य निश्‍चित करून ते साध्य करण्यासाठी स्वत:चे प्रशिक्षक स्वत:च व्हा. विचार, विश्‍वास आणि साध्य ही त्रिसुत्री उद्योगामध्ये येणार्‍यांनी लक्षात घेतली पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ लेखक आणि उद्योजक नीरज राठोड यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील उद्योजकांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी हिंजवडी येथील हॉटेल ओरिटेल येथे आयोजित यंग अंत्रेप्रेनर्स समिट (युवा उद्योजक परिषद) आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत महाराष्ट्रासह देशभरातील उद्योजक होऊ इच्छिणारे सहभागी झाले आहेत. परिषदेत उद्योजक बी.आर. व्यंकटेश, स्टार्टअप इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल चिक्कारा, माध्यम समन्वयक शबनम अस्थाना, सी स्टार हॉलिडेच्या संस्थापिका वनश्री हिरामठ, एनएफआयच्या मिनी कक्कर, आयोजक सुजाता मेंगाने, संदीप काळे आदींनी युवक युवतींना उद्योगासंबंधी मार्गदर्शन केले. प्रिया कोठारे आणि प्रवीण जाधव यांनी या परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. ही उद्योजक परिषद 12 जानेवारीपर्यंत सुरु असणार आहे.
नीरज राठोड यांनी पुढे सांगितले, की स्वत:चे प्रशिक्षक स्वत:च व्हा. तुम्हाला नेमके काय करायचे हे ठरवा. स्वत:च स्वत:ची प्रेरणा बना. ‘लोक काय म्हणतील’, याकडे दुर्लक्ष केले तरच उद्योगात यशस्वी व्हाल. तसेच उद्योगामध्ये यशस्वी ठरलेल्या लोकांसोबत आपला वेळ घालवा. त्यामुळे त्यांचे आत्मपरीक्षण करून आपणही तसे बनण्याचा प्रयत्न कराल. काहीतरी करण्याची अंतर्मनात उर्मी हवी. लोक काय म्हणतील, याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गोष्टी साध्य होतील, असेही राठोड म्हणाले.
अनिल चिक्कारा म्हणाले, की नवीन उद्योग उभा करताना आपल्या हातून अनेक चुका घडू शकतात. स्वत:च्या चुकांचे स्वत:च आत्मपरीक्षण करून त्या चुका पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घेतली आणि मेहनत घेऊन काम केल्यास व्यवसायात यश मिळवता येते. त्याचबरोबर स्वत:वर विश्‍वास आणि दुर्दम्य इच्छाशक्तीही हवी. काहीतरी करण्याची अंतर्मनात भूख हवी, असेही त्यांनी सांगितले.
शबनम अस्थाना यांनी सांगितले, की तीस वर्षापूर्वी महिलांना फारशा संधी उपलब्ध नव्हत्या. गेल्या काही वर्षात महिलांसाठी उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने परिस्थिती पूरक बनली आहे. त्यामुळे लोकांच्या सांगण्यापेक्षा आपल्याला काय करायचे आहे, हे ठरवून काम केल्यास उद्योगात निश्‍चित यश मिळते. आत्मविश्‍वास हवा, तसेच लोकांच्या नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करणेही गरजेचे आहे.
वनश्री हिरामठ म्हणाल्या, की उद्योगासंबंधी ज्ञान आत्मसात करून उद्योग सुरु करणे फायदेशीर ठरते. पैसा आणि पॅशन या दोन्ही गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. स्टार्टअपमध्ये ‘हो’ आणि ‘नाही’ या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. तसेच जोखीम पत्करल्याशिवाय उद्योजक बनता येत नाही, असेही त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन प्रिया कोठारे आणि प्रवीण जाधव यांनी केले; तर सुजाता मेंगाने यांनी आभार मानले.

रंगवैखरी स्पर्धेत फर्ग्युसनच्या ‘वारसदार’ ची बाजी

0
पुणे-मराठी भाषेच्या देदिप्यमान परंपरेला आजच्या युवापिढीच्या माध्यमातून उजाळा देणार्‍या राज्य मराठी विकास संस्था आयोजित ‘रंगवैखरी पर्व-२’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचा ‘वारसदार’ हा नाट्याविष्कार प्रथम क्रमाकाचा मानकरी ठरला. सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी या संघाला रू. १,५०,००० रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
एकांकिका स्पर्धांच्या परंपरागत 
साचेबद्धपणापेक्षा वेगळेपण असलेल्या आणि नाट्य, चित्र, शिल्प, संगीत, नृत्य या कलांचा संगम साधून मराठी भाषेच्या दैदिप्यमान परंपरेला आजच्या युवापिढीच्या माध्यमातून उजाळा देणार्‍या या स्पर्धेतील द्वितीय क‘मांकाचा पुरस्कार रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संघाने सादर केलेल्या ‘‘अधिक देखणे तरी’’ या नाट्याविष्काराला मिळाला  असून या संघाला रू. १,२५,००० रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर तृतीय क‘मांकाचा पुरस्कार मुंबईच्या राम नारायण रूईया महाविद्यालयाच्या ‘‘द्रोणायन’’ या नाट्याविष्काराला देण्यात आला त्यांना रू. १,००,००० रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बेळगांवच्या ज्योती कॉलजच्या ‘‘द्रोण’’ व नगरच्या न्यू आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजने सादर केलेल्या ‘‘वैजयंता’’ या एकांकिकांना उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्र व बेळगाव कंेंद्रांतून विभागीय अंतिम फेरीत निवडून आलेल्या विविध सात संघांच्या नाट्याविष्कारांची महाअंतिम फेरी काल मुंबईच्या रविद्रं नाट्यमंदिरमध्ये स्पर्धकांच्या प्रचंड उत्साहात आणि प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत पार पडली. त्यावेळी उपस्थित मान्यवर, ज्येष्ठ साहित्यिक व ९६ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष  प्रेमानंद गज्वी म्हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थी प्रथमच नाटक सादर करताना काही न काही त्रुटी राहणं साहजिकच आहे. पण नेपथ्य, संगीत, वाड़मय, नृत्य, शिल्प, चित्र अशी सहाही कलांचा समावेश असणारी अशी ही स्पर्धा यापूर्वी झाली नव्हती. हे या स्पर्धेचे ठळक वैशिष्टय आहे.
वैयक्तिक बक्षिसे पुढीलप्रमाणे-
१.सर्वोत्कृष्ट विद्यार्थी दिग्दर्शक(प्रथम)(रू.१५,०००)-मयूर सरकाळे, किशोर गरड (वारसदार,    फर्ग्युसन)
२. सर्वोत्कृष्ट संगीत(द्वितीय)(रू.१०.०००) चैतन्य देशपांडे(वारसदार, फर्ग्युसन  )
३. सर्वोत्कृष्ट नृत्यसंरचना (प्रथम)(रू.१५.०००)नेहा सांवत (वारसदार,फर्ग्युसन)
४. सर्वोत्कृष्ट नेपथ्य (प्रिथम)(रू.१५.०००) सुदेश पगार आणि किशोर गरड (वारसदार,फर्ग्युसन)
५. सर्वोत्कृष्ट शिल्प (द्वितीय)(रू.१०.०००) सुदेश पगार (वारसदार,फर्ग्युसन)

व्‍यंगचित्रकलेचा वारसा जपणारे दिवाकर शेडगे

0

व्‍यंगचित्रकार  दिवाकर शेडगे यांनी कलाक्षेत्रामध्‍ये स्‍वत:चा एक वेगळा ठसा उमटवला आहे.  कलेचा वारसा असलेल्‍या घराण्‍यामध्‍ये 7 फेब्रुवारी 1942 मध्‍ये त्‍यांचा जन्‍म झाला. त्‍यांचे शिक्षण लौकिकार्थाने एस.एस.सी. असले तरी चित्रकलेच्‍या क्षेत्रात ते ‘मास्‍टर’ आहेत.  त्‍यांची व्‍यंगचित्रातील रेषा रसिकांच्‍या ओळखीची झाली आहे. स्‍वतंत्र शैली असलेले त्‍यांचे व्‍यंगचित्र पाहिल्‍यावर वाचकांच्‍या चेह-यावर खुदकन हसू आल्‍याशिवाय राहत नाही.  उपलब्‍ध जागेचा परिपूर्ण वापर हे त्‍यांच्‍या व्‍यंगचित्राचे आणखी एक ठळक वैशिष्‍ट्य म्‍हणावे लागेल.

आपल्‍या व्‍यंगचित्रकलेच्‍या प्रवासाविषयी  शेडगे सांगतात. माझं पूर्ण नाव दिवाकर जयंत शेडगे.  आमचं सारं  घराणं आर्टीस्टचं.  माझे वडील स्वत: चित्रकार होते. माझा भाऊ कमल शेडगे हा कॅलिग्राफीमध्ये मास्टर. सर्वात धाकटा भाऊही पण तो आता हयात नाहीय, तोही चित्रकार होता. आम्ही चौघंही टाइम्स मध्ये कामाला होतो.  ह्या अशा कलाकार घराण्यात मी ब्रश, पेन्सिल घेतल्याशिवाय काय करणार होतो. अभ्यासात मी तितका हुशार नव्हतो त्‍यामुळे एस.एस. सी. झाल्यावर मी कॉलेजला न जाता वडिलांच्या हाताखाली  काम करु लागलो.

मी चित्र काढता-काढता व्यंगचित्राकडे केव्हा वळालो हे मला समजलंच नाही. मारिओ मिरांडा, बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या चित्रांनं मी अक्षरश: भारावून गेलो. पूर्वी टाइम्सच्‍या ‘फिल्मफेअर’मध्ये त्यांचे पूर्णपान भरुन रंगीत चित्र यायचं. चित्रांचे फिनिशींग, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स जबरदस्त. तसंच बाळासाहेबांची ‘मार्मिक’मध्ये येणारी व्‍यंगचित्रे खूप आवडायची. त्‍यांच्‍या व्‍यंगचित्रांनी मला अक्षरश: वेडच लावलं, असं म्‍हटल्‍यास वावगं ठरु नये.

ह्या दोघांसारखीच व्यंगचित्रे काढायची असं मी  ठरवलं.  सुरुवातीचे काही दिवस काहीचं जमलं नाही. पेपर्सवर पेपर फाडले. पण मी हार मानली नाही. मनाशी जिद्द धरली, वडिलांनी मार्गदर्शन केलं. मग एकदा हात बसल्यावर मी थांबलो नाही.  1969च्‍या ‘आवाज’ या दिवाळी अंकामध्‍ये माझं व्‍यंगचित्र पहिल्‍यांदा प्रसिध्‍द झालं. माझ्याच स्‍वतंत्र शैलीमधील हे व्‍यंगचित्र असल्‍याने मला हुरुप आला.  त्यानंतर लोकसत्ता, श्रीदीपलक्ष्मी, दीपावली, हेमांगी, श्री, आक्रोश, दक्षता, जत्रा, सुगंध, लोकप्रभा, मार्मिक, गंधाली, फीरकी व इतर अनेक दिवाळी अंकात माझ्या मालिका प्रसिध्द झाल्या. मी  जवळ-जवळ पन्नासहून अधिक दिवाळी अंकांसाठी व्यंगचित्रे काढली आहेत, अजूनही काढतोय. आतापर्यंत माझी  सुमारे 4 हजार  व्यंगचित्रे प्रसिध्द झाली आहेत. याशिवाय मी  काही नाटकांच्या जाहिरातीही  केल्या. ‘ऑल दी बेस्ट’च्या पंधरा जाहिराती केल्या. मोहन वाघांनी खूष होवून मला ट्रॉफी दिली. सन  1992 मध्‍ये मुंबई मराठी पत्रकार संघाचं ‘मधुचंद्र साहित्यिकांचा’ या मालिकेतील प्रसिध्‍द झालेल्‍या हास्‍यचित्रांबद्दल उत्कृष्ट हास्यचित्राचं शं.वा. किर्लोस्कर स्मृतिचिन्ह मिळालं. सन 2002 मध्‍ये ‘कलाकुंज’ दिवाळी अंकांसाठी  उत्कृष्ट हास्यचित्रांच शं.वा. किर्लोस्कर स्मृतिचिन्ह मिळालं.  व्‍यंगचित्रकार म्‍हणून रत्नागिरी टाइम्‍स, दो बजे दोपहर, सांज समाचार (हिन्दी) यांच्यासाठी वर्षभर कार्टून स्ट्रिप्स केल्या. काही दिवाळी अंकांची मृखपृष्ठ व कथाचित्रे सुध्दा मी केलीत. मी माझे स्वत:चे व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवले नाही. पण प्रदर्शनात मी चित्रे पाठवतो.  आज माझं वय 78 वर्षे आहे. अजूनही काम करतोय. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत  मी काम करणार आहे,  थांबणार नाही… ॲट ॲनी कॉस्ट.

पत्ता- दिवाकर शेडगे, 104/शिवआशिष को.ऑ.हा.सो., जुनी पोस्ट ऑफीस बिल्डिंग, जुना ठाणे-बेलापूर रोड, कळवा (पश्चिम), पिनकोड – 400605,  दूरध्‍वनी  -(022)  25412309, मो.  9821291029

 

राजेंद्र सरग, 9423245456

ऐश्वर्या बच्चन यांनी घेतली जुन्नरच्या अंध तरुणाच्या कामाची दखल

0
अवयदानाच्या प्रचाराने अंधाला दिसणार सृष्टी
जुन्नर /आनंद कांबळे
अवयवदानाचा   प्रचार व प्रबोधन करणाऱ्या अंध तरुणाच्या कामाची दखल थेट  ऐश्वर्या राय बच्चन यांनी घेतली असून ,त्यांच्या देणगीतून येत्या फेब्रुवारी मध्ये या अंधाला दुनिया दाखविण्यासाठी एक डोळा देण्याचा संकल्प बच्चन यांच्या संस्थेने सोडला आहे .
 त्यांचे नाव श्री. विनायक विश्वनाथ नावरांगे, (यावली शहिद,) विदर्भ, संत तुकडोजी महाराज यांच्या भूमीतून आले आहेत .
 विशेष म्हणजे ते एकटे आले आहेत. वयाच्या तिसऱ्या वर्षी कावीळ या रोगामुळे त्यांनी दृष्टी गेली, नंतर त्यांनी बाबा आमटे यांच्या आनंदवन मध्ये पुढील शिक्षण घेतलं. तिथे त्यांनी अंध लोकांची ब्रेल या शास्त्रज्ञाने विकसित केलेल्या ब्रेल लिपी,  वेगवेगळे उपजीविकेसाठी लागणारे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले.
साधना ताईंनी त्यांचा विवाह एका अनाथ मुलीशी लावून दिला, आत्ता त्यांना दोन मुले आहेत. पण आपल्या मध्ये काहीतरी कमी आहे म्हणून या व्यक्तीने दुसऱ्यांच्या आधाराची अपेक्षा न ठेवता जीवन जगायला सुरुवात केली.
आज ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरातील संस्था, शाळा, महाविद्यालयांना भेट देऊन अवयव दानाचे महत्व पटवून देताना आपल्या आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी याच थोडक्यात माहिती द्वारे उद्बोधन करायचं काम चालू आहे.
वयाच्या चाळीशीत सुद्धा हा माणूस लोकांना प्रेरणादायी ठरत आहे.
 ऐश्वर्या राय बच्चन यांच्या संस्थेने त्यांना एक लाख रुपयाची मदत करून हैद्राबाद येथे येत्या फेब्रुवारी मध्ये त्यांच्या एक डोळ्याचे रोपन होणार असण्याची माहिती त्यांनी दिली.
 त्यांनी आज जुन्नर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, जुन्नर येथे त्यांचा एक छोटा उद्बोधनाचा कार्यक्रम घेतला.
श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील प्रा.गौरव कांबळे, सुशील डहाळे,अतुल काजळे यांनी  याबाबत पुढाकार घेवुन कार्यक्रमाचे नियोजन केले..   डाँ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक  गौतम कांबळे यांनी शाळेत कार्यक्रम घेण्यास पृरवानगी दिली.,आकाराम कवडे सर यांनी विशेष सहकार्य करून एक सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले.
विनायक नावरांगे यांनी अवयव दान आणि आरोग्याविषयी माहिती दिली आणि संस्कार गीत गाऊन दाखवले. विशेष म्हणजे त्यांनी आवाहन केले की कुणाच्या घरी अपंग लोक असतील तर त्यांना मदत मिळवून देण्याचं प्रयत्न मी करेल.
अशा अपंग लोकांना मदत करण्याचं काम  आमदार बच्चू भाऊ कडू हे करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
श्रीलंका मधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात डोळे भारतामध्ये आणले जातात अन कित्येक अंध लोकांना दृष्टी मिळते.
यामागील करण एक की तिथल्या सरकार ने जनतेला अवयव दान करायला अनिवार्य केले आहे.
 आपल्या भारतामध्ये लोक अजूनही अंधश्रद्धे मुळे अवयव दान करत नाही. मेल्यानंतर स्वर्ग कसा पाहणार असे इत्यादी गैरसमज. याबाबत आपण सर्वांनी जनजागृती करायला हवी. मी सुद्धा अवयव दान करायचा निर्णय घेतला आहे आणि तुम्ही पण करावा अशी इच्छा बाळगून आहे.
तुमच्या आमच्या सारख्या डोळस असून अंध असलेल्या माणसांना या व्यक्तीने दृष्टी देण्याचा प्रयत्न अस म्हणता येईल..

पुणेकरांनी केली 9 दिवसात केली ,100 कोटी रुपयांची हेल्मेट खरेदी ….?

अखेर आज आमदार कुलकर्णींनी सक्ती रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांना केली विनंती

पुणे -कुठला सिनेमा किती दिवसात किती कोटीचा धंदा करतो या बातम्या तर येत असतातच ,पण आता पुण्याच्या पोलीस कमिशनरांच्या कारवाई अस्त्रा ने 9 दिवसात पुण्यातील दुचाकीस्वारांना सुमारे 100 कोटी रुपयांहून अधिक रकमेची हेल्मेट खरेदी करायला लावल्याचे दिसते  आहे .दरम्यान आज भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी आपला हेल्मेट सक्तीला विरोध असल्याचे सांगत हि सक्ती शिथिल करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना भेटून केली आहे.

गेल्या 1 तारखेपासून पुण्याच्या पोलीस कमिशनरांनी जो कारवाई शस्त्राचा जो जोरदार मारा  शहरातील रस्तोरस्ती दुचाकीस्वारांवर सुरु ठेवला आहे त्यात ५० हजार दुचाकीस्वार प्रत्यक्षात त्यांच्या तडाख्यात सापडले आणि सुमारे अडीच कोटीचा दंड त्यांनी भरला असला तरी ..या कारवाईशस्त्राने मात्र  भय निर्माण करून हेल्मेटच्या दुकानांतून गर्दी ओसंडून वाहू लागली आणि सुमारे १०० कोटी रुपयांची हेल्मेट खरेदी पुणेकरांनी नव्या वर्षाच्या  पहिल्या आठवड्यात केल्याचे दिसले आहे . दरम्यान आज अखेरीस कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी या हेल्मेट सक्ती विरोधातील आपली भूमिका कायम ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटल्या आणि म्हणाल्या ‘ साहेब तेवढी पुण्यात हेल्मेट सक्ती शिथिल करायला त्या कमिशनर  व्यंकटेश यांना सांगा हो.. .. फडणवीस सांगतो … म्हणाले आहेत ..पाहू यात आता पुढे काय होते ते ..

गेल्या दोन वर्षांपूर्वी देखील पुण्यात असा सक्ती राबविण्याचा प्रयोग झाला होता तेव्हा मंडई च्या टिळक पुतळ्या समोर आंदोलन करत आ.मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेला दोष दिला होता आणि मुख्यमंत्र्याकडे तक्रार करू असे म्हटले होते . आता आज सकाळी हीच जुनी बातमी मायमराठी ने पुन्हा प्रदर्शित करून जुन्या प्रसंगाची ,त्यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली . शहरातले खासदार यांनी केवळ ट्विटर वर ट्विट करून हा विषय सोडला , अन्य साऱ्या आमदारांनी कुलपे घातली .पण अखेरीस मेधाताई बोलल्या …..तरी ..

त्यानंतर त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या ,’शहराच्या मध्य भागात वाहन चालवताना अनेक अडचणी येतात. हेल्मेट वापरणे शक्य होत नाही. त्यामुळे शहरात हेल्मेट सक्ती रद्द करण्याची मागणी मी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.शहरात गाड्यांचा वेग कमी असतो. महिला, वृद्ध नागरिक दुचाकीवर जात असल्याने हेल्मेट वापरणे अडचणीचे होते. हेल्मेटला विरोध नाही. मात्र, हेल्मेट सक्ती फक्त महामार्गांवर असायला पाहीजे. असेही त्या म्हणाल्या. याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर ते पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी बोलतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी दर्शवला.आणि मी पूर्वीच्याच मझ्या हेल्मेट सक्ती विरोधी भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

दरम्यान काही माध्यमांनी शहरातील ७० टक्के दुचाकी चालकांनी हेल्मेट स्वीकारल्याचा दावा करत हेल्मेटचे जनता स्वागत करत असल्याचे म्हटले आहे. या नुसारच विचार केला , शहरातील दुचाकीस्वारांची संख्या लक्षात घेतली ,आणि प्रती हेल्मेट ची किमान किंमत आधारभूत धरली हेल्मेटच्या बाजारात किती कोटी रुपयांची उलाढाल झाली याचा अंदाज येवू शकेल .शहरात ४५ लाख दुचाक्या आहेत ,त्याच्या ७० टक्के दुचाक्यांची संख्या 31 लाख ५० हजार एवढी होईल . पूर्वीच्या , जुन्या हेल्मेट धारकांची संख्या 11 लाख ५० हजार एवढी जास्तीत जास्त अंदाजे गृहीत धरली तरी 20 लाख  नवी हेल्मेट 9 दिवसात विकली गेलीत असा तर्क काढता येईल . आणि किमान एक हेल्मेट ५०० रुपयांना गृहीत धरले तर १०० कोटी रुपयांची हेल्मेट खरेदी पुणेकरांनी केली असे म्हणता येणार आहे .पुण्याच्या पोलीस कमिशनरांच्या या कारवाईला अर्थात काहींनी हेल्मेट समर्थनाचा प्रचार करत साथ हि दिली होती .

 

 

पुण्यातल्या राहुल हजारीचा एमटीव्ही पॅन्टलून्स स्टाईल सुपरस्टार्सच्या अंतिम फेरीत प्रवेश

0

टीव्ही अभिनेत्री सना सईद आणि श्रुती सेठ करतील प्रसिद्ध संगीत कलाकार अर्जुन कानुगोसह अंतिम फेरीत जज~

पुणे: पॅन्टलून्स, आदित्य बिर्ला फॅशन अँड रीटेल लिमिटेड आणि एमटीव्ही इंडियासह लिव्ह फ्लुइड फॅशनच्या भारतातले अग्रगण्य फास्ट फॅशन डेस्टिनेशन भारतातील पुढच्या स्टाईल सुपरस्टार्सच्या शोधात आहेत.एमटीव्ही आणि पॅन्टलून्स यांनी देशभरातील सात फाइनलिस्ट जाहीर केले आहेत जे आता ‘एमटीव्ही पॅन्टलून्स स्टाईल सुपरस्टार्स’ या प्रतिष्ठित खिताबसाठी स्पर्धा करतील.

एमटीव्ही पॅन्टलून्स स्टाइल सुपरस्टार्स फॅशनिस्ट्सला त्याचांतले कौशल्य, फॅशन साठी फ्लेअर आणि वैयक्तिक शैलीच्या भागाचे प्रदर्शन दर्शविण्यासाठी एक मंच प्रदान करते. लोकप्रिय एमटीव्ही व्हीजे बेनाफशा अंतिम फेरीचे आयोजन करणार असून टीव्ही अभिनेत्री सना सईद आणि श्रुती सेठ प्रसिद्ध संगीत कलाकार अर्जुन कानुगोसह या फेरीत परीक्षक म्हणून उपस्थित असतील.

दिल्लीतील निष्ठा पाठक आणि आर्यन गुप्ता, पुण्यातील राहुल हजारी, अहमदाबादमधील स्नेहा रामदेव, इंदूरमधील अनुशा अरोरा, गोवाचा अमर ओझा आणि देहरादूनची शर्मिष्ठा चॅटर्जी यांना फॅशन स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या ५००० स्पर्धकांमधून निवडण्यात आले आहे. विजेता एमटीव्हीद्वारे प्रसारित केलेल्या वेबिसोड्समध्ये आणि संगीत आणि फॅशन फ्रॅटर्निटीमध्ये वैशिष्ट्यीकृत करेल.

रॅन फर्नांडिस, हेड मार्केटिंग अँड ई-कॉमर्स, पॅन्टलून्स म्हणतात “संगीत आणि फॅशन हे युवा संस्कृतीतील सर्वात मजबुतीचे खांब आहे; एमटीव्ही पॅन्टलून्स स्टाईल सुपरस्टार्स संगीत आणि फॅशनचे परिपूर्ण संगम आहे. आजचे तरुण विवेकपूर्ण असून त्यांना फॅशनची जाणीव आहे. एमटीव्ही पॅन्टलून्स स्टाईल सुपरस्टार्स त्यांना त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि शैलीची वेगळी भावना व्यक्त करण्याची संधी देते आणि पँटालून ब्रँडचा प्रस्ताव “स्टाइल युअर चेंज” ला वास्तविकतेत उतरवते.

खासदार काकडे यांच्या हस्ते खेळाडुंचा सत्कार

0

पुणे : खेळामुळं माणूस तंदुरुस्त राहतो. पर्यायानं देश तंदुरुस्त राहतो. परंतु, आपला देश खेळामध्ये मागे आहे. खेळात प्रगती करण्यासाठी सर्व शाळांमध्ये खेळ बंधनकारक केला पाहिजे, असे मत राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केले.

पुणे महापालिकेने आयोजित केलेल्या आंतरशालीय क्रीडा स्पर्धेचा समारोप आणि खेलो इंडिया मध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार खासदार संजय काकडे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. श्रीमती सावित्रीबाई गणपत पवार फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नगरसेवक शंकर पवार, क्रीडा अधिकारी राजेंद्र ढुमने, शाळेच्या मुख्याध्यापिका गिरीजा तरवडे, शाळा सुधार समितीच्या उपाध्यक्षा विनया बहुलीकर, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

खेळामुळे आपण मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहतो. खेळातूनच उद्याचे नेतृत्व घडणार असल्याने खेळाकडे लक्ष द्यायला हवे. त्यादृष्टीकोनातून नियोजन व्हायला पाहिजे. यासंदर्भात आपण महापालिकेला लवकर पत्र पाठवणार आहोत, असेही खासदार काकडे म्हणाले.

तापसी पन्नू ने पुण्यातील लँडमार्क निसान खराडी शोरूम येथे दिली भेट

0

पुणे-बॉलीवूड डिवा आणि प्रीमियर बॅडमिंटन लीग – पुणे ७ एसेस टीमच्या मालकीण,तापसी पन्नू यांनी त्यांच्या सर्व टीम खेळाडूंसह लँडमार्क निसान खराडी शोरूमला भेट दिली. तापसी, या पहिल्या अश्या सेलिब्रिटी आहेत ज्या प्रीमियर बॅडमिंटन लीग टीमच्या मालकीण आहे.  त्यांना बॅडमिंटन आवडत असून त्यांच्या भेटीदरम्यान, लँडमार्क ब्रँडसाठी त्यांच्या प्रेमाचीही घोषणा केली. ग्रुप लॅन्डमार्कसाठी देखील हि भावना परस्पर आहे कारण त्यांना देखील प्रीमियर बँडमिंटन लीग टीम-७ एसेस सोबत सहयोगी होऊन अभिमान आहे.

लँडमार्क निसानसाठी हा आनंदायी क्षण होता. बॉलीवूड स्टार तापसी पन्नू सोबत न्यू निसान किक्सची बुकिंग केल्या गेलेल्या ग्राहकांपैकी एका ग्राहकाने हा क्षण आनंदी असल्याचे व्यक्त केले.  अलीकडेच अनावरण करण्यात आलेली निसान किक्स प्रगतीशील एसयूव्ही डिझाइन असून प्रगत तंत्रज्ञानासह सज्ज आहे. तरुण व शहरी साहसी ग्राहकांना आवाहन करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. हे उल्लेखनीय आहे की नवीन निसान किक्स आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ ची  देखील ‘ऑफिशियल कार’ आहे.

लँडमार्क ग्रुप भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात व्यावसायिकपणे चालणारी ऑटोमोबाईल डीलरशिप श्रृंखला आहे जी २७ शहरांमध्ये ८० पेक्षा अधिक अत्याधुनिक सुविधा चालवते. भारतातील सर्वात मोठ्या बाजारपेठेंपैकी एक असून पुण्यातील निसानसाठी लँडमार्क हे एकमेव भागीदार आहे. यासोबत वाकडेवाडी, खराडी  आणि  बारामती  येथे आर्ट डीलरशिपची कार्यशाळा सुरु करण्यात आली आहे तसेच वाघोली येथील कार्यशाळा लवकरच सुरू होणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना आणि परवडणाऱ्या घरांच्या उभारणीत क्रेडाई महाराष्ट्राची सक्रीय वाटचाल

0

अध्यक्ष शांतीलाल कटारिया राज्य दौऱ्यावर, कामांचा घेणार आढावा

पुणे :-“प्रधानमंत्री आवास योजना व परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी क्रेडाई महाराष्ट्र सक्रीय पाऊले उचलत आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यात ५ लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीचे महत्वाकांक्षी लक्ष्य क्रेडाईने समोर ठेवले आहे. याचाच आढावा घेण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया राज्यातील २५ शहरांमध्ये दौरा करणार आहेत.

येत्या १२ तारखेला इंदापूर,बार्शी,सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, १३  तारखेला बीड व नगर, सातारा, कराड, कोल्हापूर, कागल १७ तारखेस तर १८ ला सावंतवाडी,रत्नागिरी,चिपळूण असा दौरा नियोजित करण्यात आला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भ भागात मात्र पुढील महिन्यात त्यांनी योजिले आहे.

येत्या २०२२ पर्यंत ५ लाखांहून अधिक घरांची निर्मितीसाठी  क्रेडाईने राज्य सरकारशी सामंजस्य करार केला आहे. यातील ३ लाखांहून अधिक घरांचे काम प्रगतीपथावर आहे. यास अल्पावधीत मूर्त रूप प्राप्त होण्याच्या उद्देशाने, प्रत्येक शहरातील कामाचा आढावा, या योजनेअंतर्गत काम करताना विकासकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या सर्वातोपरी सहकार्य करण्याच्या हेतूने कटारिया यांनी हा दौरा निश्चित केला आहे.

कटारिया पुढे म्हणाले कि, रेरा अंतर्गत प्रकल्पांची नोंदणीचा आढावा ते घेणार असून त्यासंबंधीच्या अडचणींविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या दौऱ्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेला बळ देणाऱ्या क्रेडाई महाराष्ट्राच्या या उपक्रमात राज्य शासनाने अधिक सवलती देऊन संबंधित मंजुरीना गती द्यावी या संबंधीचा प्रस्तावही शासनास क्रेडाई महाराष्ट्र सादर करणार आहे.

रंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे मुख कर्करोग आणि हेल्मेट वापराविषयी जनजागृती मोहिम

0
‘असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सीऑफिशियल सर्जन्स ऑफ इंडिया ‘च्या सुवर्णमहोत्सवास पुण्यात प्रारंभ
पुणे :‘असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सीऑफिशियल सर्जन्स ऑफ इंडिया ‘च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्यूकेशन सोसायटीच्या रंगूनवाला डेंटल कॉलेज आयोजित मुख कर्करोग आणि हेल्मेट वापराविषयी जनजागृती मोहिमेचे ,मशाल पदयात्रेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी आज केले.
हा कार्यक्रम एम ए रंगूनवाला डेंटल कॉलेज, आझम कॅम्पस येथे झाला. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार होते.
‘असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सीऑफिशियल सर्जन्स ऑफ इंडिया ‘च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . ओरल अँड मॅक्सीलोफेशियल सर्जरी  विभागाचे प्रमुख डॉ जे बी गारडे यांनी कुलगुरूंना रंगूनवाला डेंटल हॉस्पिटल मध्ये सुरु असलेल्या मुख कर्करोग विषयक संशोधनाची आणि हेल्मेट नसल्याने झालेल्या अपघातग्रस्तांवर केलेल्या शस्त्रक्रियांची माहिती दिली .
डॉ . करमाळकर म्हणाले ,’रंगूनवाला डेंटल हॉस्पिटल मध्ये सुरु असलेल्या मुख कर्करोग विषयक संशोधनाला आंतरराष्ट्रीय सहयोग मिळावा ,यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रयत्न करेल ‘
यावेळी लतीफ मगदूम ,प्राचार्य रमणदीप दुग्गल ,डॉ हर्षद भागवत ,डॉ सोनी ,डॉ गौरव खुटवड , डॉ . अश्विनी वडणे उपस्थित होते .
मुख कर्करोग विषयक जनजागृतीसाठी कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी  ‘ये पान हमे इस मोड पे ले आया ‘ हे  पथनाट्य सादर केले . कुलगुरूंनी त्याचे कौतुक केले .
रंगूनवाला डेंटल कॉलेज तर्फे १० जानेवारी रोजी मुख कर्करोग विषयक आणि हेल्मेट वापरविषयक जनजागृतीसाठी मशाल पदयात्रा आझम कॅम्पस ,सेव्हन लव्हज चौक मार्गे भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज पर्यंत काढण्यात येणार आहे