फ्रान्सकडून सिमरन जेठवानी यांना मानद डॉक्टरेट
कमिशनर व्यंकटेशम साहेब इकडे लक्ष द्या हो….
फसवणुकीचे एसएम एस कोठून येतात त्याचा तपास करा हो…
‘तु ही नजरों में…तु ही नजारों में’ कार्यक्रम मंगळवारी
पुणे : प्रसिद्ध संगीतकार नौशाद अली आणि गीतकार मजरुह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित ‘तु ही नजरों में…तु ही नजारों में’ हा विशेष कार्यक्रम मंगळवार, दि. ५ फेब्रुवारी २०१९ रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. सरस्वती, अंतर्नाद आणि महक या संस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
गायक जितेंद्र अभ्यंकर, अली हुसेन, गायिका मनीषा निश्चल, भाग्यश्री अभ्यंकर यांचे बहारदार गायन अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. संगीत संयोजन केदार परांजपे, तर निवेदन सुलभा तेरणीकर यांचे निवेदन असणार आहे. प्रसाद गोंदकर, रमाकांत परांजपे, विक्रम भट, केदार मोरे, अभिजित भदे, विशाल थेलकर, विजू मूर्ती, दर्शना जोग, निलेश देशपांडे व बाबा खान हे वाद्यांवर साथसंगत करणार आहेत.
शिवकालीन इतिहास व स्वराज्याची अस्मिता जपण्यासाठी किल्लेसंवर्धन महत्वाचे – प्रा.विनायक खोत
महाराष्ट्रातून येणाऱ्या शिवभक्तांसाठी गडावरील शिवजन्म सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पायथ्याशी दाखविणार – आमदार शरद सोनवणे
स्वारगेट, सुभाषनगरमधील खोदकामात 4 दिवसांत 8 ठिकाणी वीजवाहिन्या तोडल्या – सुमारे नऊ हजार वीजग्राहकांना फटका
पुणे : गेल्या चार दिवसांत तब्बल आठ ठिकाणी महावितरणच्या 11 केव्ही क्षमतेच्या दोन भूमिगत वीजवाहिन्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या खोदकामात तोडण्यात आल्याने स्वारगेट, टिळक रोड, सुभाषनगर परिसरात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे अभियंता व कर्मचार्यांची तारेवरची कसरत सुरु आहे.
दरम्यान शुक्रवारी (दि. 1) वीजवाहिनी तोडल्याने दुपारी दोन वाजता सुभाषनगर परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. पर्यायी व्यवस्थेतून सायंकाळपर्यंत 90 टक्के भागात वीजपुरवठा सुरु करण्यात आला तर उर्वरित दोन रोहित्रांचा वीजपुरवठा दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत सुरु करण्यात येत आहे.
याबाबत माहिती अशी, की पर्वती विभाग अंतर्गत स्वारगेट, टिळकरोड, शुक्रवार पेठ, सुभाषनगर, चाटे कॉलनी, तहसील कार्यालय आदी परिसराला स्वारगेट व सुभाषनगर या दोन 11 केव्ही भूमिगत वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. सध्या पुणे महानगरपालिकेकडून नेहरू स्टेडीयम येथे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण सुरु आहे. तसेच महालक्ष्मी मंदिर ते सारसबाग दरम्यान महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. या खोदकामात दि. 29 जानेवारीपासून आजपर्यंत या दोन्ही भूमिगत वीजवाहिन्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आठ वेळा तोडण्यात आले आहे. यात पुणे महानगरपालिकेच्या खोदकामात पाच ठिकाणी तर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या खोदकामात तीन ठिकाणी वीजवाहिनी तुटली. सुभाषनगर वीजवाहिनी तीन ठिकाणी तर स्वारगेट वीजवाहिनी पाच ठिकाणी तोडण्यात आली आणि बहुतांश वेळा रात्रीच्या सुमारास हे प्रकार घडले आहेत.
महावितरणचे अभियंते व कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अथक परिश्रम करीत आहेत. पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र महावितरणशी समन्वय न साधता सुरु असलेल्या या खोदकामांचा दोन्ही वीजवाहिन्यांवरील सुमारे 9 हजार ग्राहकांना नाहक फटका बसला असून महावितरणचे आर्थिक नुकसान देखील झाले आहे. गेल्या चार दिवसांत या दोन्ही वीजवाहिन्यांवरील ग्राहकांचा एकूण 10 तास वीजपुरवठा खंडित राहिला. महावितरणकडून या प्रकारांबाबत संबंधीत संस्थांना कळविण्यात आले असून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
देशात लोकशाही ऐवजी धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न-डॉ.कुमार सप्तर्षी
सुप्रिया सुळे,वंदना चव्हाणांसह पुण्यात राहणारे 25 आमदार 5 खासदार हेल्मेट सक्तीवर मुग गिळून बसलेत हि शोकांतिका -खर्डेकर
पुणे- पुण्यात हेल्मेटची सक्ती हि जुलमी च आहे .जिथे आरोग्यास हानिकारक दारू ,गुटखा मिळतो ,पाहटे पर्यंत पब्ज चालू राहतात ..अशा कारणांनी मानवी आरोग्यास काही हानी पोहोचत नाही आणि हेल्मेट घातले नाही तरच हानी पोहोचते असा जुलमी कारभार पुण्यात होत असताना खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ,खासदार वंदना चव्हाण यांच्या सह पुण्यात राहणाऱ्या 25 आमदार आणि 5 खासदारांनी या जुलमी कारभाराविरोधात आवाज न उठविणे हि शोकांतिका आहे असे मत भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी येथे मांडले … पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी सक्तीला विरोध केला आहे. सर्वपक्षीय आंदोलन म्हणून त्या येथे आल्या .आता आणखी भाजपचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील असा विश्वास व्यक्त करीत ते म्हणाले, रँड नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याची जुलमी राजवट या पुणेकरांनी उलथवून टाकली ,हि हेल्मेट सक्ती देखील ते उलथवून टाकतील .या पुढे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल …
पुण्यातल्या एकाही आमदार वा खासदारात ‘दम ‘ नाही -रुपाली पाटील
पुणे- पोलीस आयुक्ताने पुण्यात सुरु केलेली हेल्मेट सक्ती चा जुलमी कारभार थांबविण्याचा ..पुण्यातल्या एकाही आमदार वा खासदारात दम नाही अशी स्पष्ट चेतावणी आज मनसे च्या महिलाध्यक्षा माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी येथे दिली .
पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे हेल्मेट सक्तीविरोधात आंदोलन करण्यात आले .यावेळी त्या बोलत होत्या .या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्याबद्दल सक्ती विरोधी कृती समितीने कोणतेही चुकीचे वर्तन वा घोषणा दिलेल्या नाहीत . सरकारच्या विरोधात दिलेल्या आहेत .त्यामुळे आंदोलन स्थळी झालेला प्रकार काही गंभीर नाही आणि तो कोणी मनाला लाऊन घेवू नये असे त्या म्हणाल्या ….
पुण्यात मुघलांचे राज्य -निवडणुकीतच उलथविण्याची संधी -सुरतवाला
पुणे-छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. रयतेचे ऐकूनच ते निर्णय करीत ,पण पुण्यात जनतेचे म्हणणे धुड्कारून सक्ती चा कारभार राबविला जातो आहे ,पुण्यात मुघलांचे राज्य असल्याचा त्यामुळे भास होतो आणि हे राज्य उलथवून टाकण्याची संधी जनतेला आता निवडणुकीतच मिळेल असे येथे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी म्हटले आहे . पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे हेल्मेट सक्तीविरोधात आंदोलन करण्यात आले .यावेळी माध्यमांशी बोलताना सुरतवाला म्हणाले ,वाहतुकीचा खोळंबा हि पुण्याची मुख्य अडचन आहे पण त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून वसुलीवर लक्ष केंद्रित केले जाते आहे .पुण्यात आगामी निवडणूक राम मंदिरावर होणार नाही तर ती हेल्मेटवर होईल ,आणि ज्यांना ज्यांना हेल्मेटचा जाचझाला तेते भाजपला धडा शिकवतील.
अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकीचा जुमलाच-चेतन तुपे पाटील
केंद्र सरकारने पाच वर्षांच्या कालावधीतील हा शेवटचा अर्थसंकल्प आज संसदेत मांडला. यावेळी अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी प्राप्ती कराची मर्यादा पाच लाख केल्याची घाेषणा केली. यामुळे किरकोळ व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुमारे 70 टक्के किरकोळ व्यावसायिकांना या निर्णयाचा लाभ असल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.
पालकमंत्री गिरीश बापट यांची प्रतिक्रिया :
आले अच्छे दिन :
समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा व आर्थिक उभारी देणारा सर्वोत्तम अर्थसंकल्प असे मी केन्द्रीय अर्थसंकल्पाचे वर्णन करेन. गरीब.कष्टकरी.शेतकरी. कामगार,महिला,अंगणवाडी सेविका,मध्यमवर्गीय लोक,निवृत्त सैनिक,पेन्शनर यांना इतके भरभरून अनुदान व सवलती देण्याचे धाडस आजपर्यंत कोणत्याही सरकारने केले नव्हते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केले. ख-या अर्थाने अच्छे दिन आले . असे या अर्थसंकल्पावर दृष्टिक्षेप टाकल्यावर जाणवते. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमुळे शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. सर्वंकश आणि देशाची आर्थिक भरभराट करणारा अर्थसंकल्प.
व्हॅलेंटाईनच्या महिन्यात सावनी रविंद्रची चाहत्यांसाठी ‘रोमँटिक’ तमिळ सुरेल भेट !!!
व्हॅलेंटाइन्सच्या प्रेमळ महिन्यात सावनी रविंद्रने आपल्या चाहत्यांना एक सुरेल रोमँटिक गीताची भेट दिली आहे. ‘नान सोल्लव्वा’ ह्या तमिळ शब्दांचा अर्थ ‘तूला एक सांगू का’ असा आहे. सतिशकांत ने लिहिलेल्या ह्या रोमँटिक गीताला शुभंकर शेंबेकरने संगीत दिले आहे. आणि सावनी रविंद्रसोबत गायलेही आहे. ‘सावनी ओरिजनल्स’ सीरिजमधले हे पहिले गाणे आहे.
सावनी रविंद्रने तमिळभाषी सिनेमांसाठी अनेक गाणी गायली आहेत. ‘ईमाई’, ‘कुटाल’ हे तिचे गाजलेले सिनेमे आहेत. ‘वेनिलाविन सलाईगल्ली’ ‘कत्रिल इधगळ’,’उईरे उईरे’ सिंगल्स सुध्दा प्रसिध्द आहेत. ‘नान सोल्लव्वा’ विषयी सावनी रविंद्र सांगते, “दक्षिणेमध्ये माझे बरेच चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून तमिळभाषी चाहत्यांकडून सतत मला एखादं ओरिजनल साँग गाण्याची फर्माइश होत होती. ती इच्छा मी ह्या रोमँटिक गाण्याने पूर्ण केली आहे. मुख्य म्हणजे ह्या गाण्याचे संगीत नियोजन चैन्नईमधल्या म्युझिशियननी केल्याने गाणं खूप अस्सल तमिळ मातीतलं वाटतंय. चित्रीकरणही गाण्याला साजेसेच करण्यात आलंय. तमिळ आणि मराठी कानसेनांच्या गाण्यांविषयीच्या आवडींमध्ये साम्य असतं असं मला वाटतं. त्यामूळे हे सुमधूर गीत मराठी रसिकांनाही आवडेल असा मला विश्वास आहे. “
‘सावनी ओरिजनल्स’विषयी सावनी रविंद्र सांगते, “सूरांना भाषेचे बंधन नसते. सावनी अनप्लग्डला रसिकांनी खूप छान प्रतिसाद दिला. तो पाहून यंदाच्या वर्षीचा माझा संकल्प आहे की, यंदा मी ओरिजनल गाणी घेऊन येणार आहे. तमिळनंतर बंगाली, पंजाबी, नेपाळी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये सावनी ओरिजनल्स घेऊन येण्याचा मानस आहे.”
स प चीही वाटचाल विद्यापीठाच्या दिशेने….
पुणे–स.प महाविद्यालयाची वाटचाल सरकारच्या निर्णयानुसार विद्यापठाच्या निर्मितीसाठी व्हर्टिकल क्लस्टर स्वतंत्र महाविद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात करणे असे तीन पर्याय उपलब्ध आहेत.या तिन्ही प्रकारांबाबत शासनाकडून सविस्तर नियमावली अजून प्राप्त झालेली नाही ही नियमावली मिळाली की,त्या नुसार स.पमहाविद्यालयाचे रूपांतर विद्यापठात करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एस.के जैन यांनी दिली.
जगमित्र डाँ रोहिदास वाघमारे …..
माझे मित्र श्री जयराज यांना डाँकटरांनी बायपास करण्याचा सल्ला दिला आणि ते हादरलेच. काय करायचे म्हणून जयराम यांनी मला फोन केला. दुसऱ्या तज्ञाचे मत घ्यावे असे मी सुचविल्यावर ते म्हणाले, तुम्हीच सांगा, कुणाकडे जायचे म्हणून. अशा जीवघेण्या परिस्थितीत तातडीने योग्य सल्ला मिळणे फार आवश्यक असते म्हणून मी तात्काळ हृदयरोगतज्ञ डाँ.रोहिदास वाघमारे सर यांना फोन केला. त्यांनी लगेच भेटीची वेळ दिली.
ठरल्याप्रमाणे आम्ही त्यांना भेटलो. त्यांनी आधी कुठलेही रिपोर्ट्स न पाहता केवळ नाडी परीक्षा करून निदान केले. सध्या कोणतीही शस्त्रक्रिया करण्याची गरज नसून योग्य आहार,नियमित व्यायाम,सकारात्मक विचार करणे असे सोपे उपाय त्यांनी हसत हसत सुचविले. निघताना जयराम यांनी फी देण्यासाठी पैश्याचे पाकीट उघडले . तर आम्हाला आश्चर्य आणि आनंदाचा धक्काच बसला. कारण ते म्हणाले, अहो, मी कोणाकडून, कधीही फी घेत नाही , तर तुमच्या कडून कशी घेऊ ? मी जर फी घ्यायचे ठरविले तर रोज ५० हजार कमावू शकतो. पण ते माझे ध्येय नसून लोकसेवा हेच माझे खरे ध्येय आहे. खरोखरच आजच्या जगात असे ध्येयवादी डाँकटर आहेत हे पाहून आम्ही भारावूनच गेलो. वाघमारे सर बसले होते,त्यांच्या मागच्या, पुढच्या,शेजारच्या भिंतीवर अनेक सन्मानचिन्ह, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्रं दिसत होती. ही सर्व त्यांच्या आजपर्यंतच्या निस्वार्थ सेवेची पावतीच म्हटली पाहिजे. आज जरी ते मानसन्मानाच्या शिखरावर असले तरी इथपर्यँतची त्यांची वाटचाल अजिबात सोपी नाही.
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका गरीब,निरक्षर पण संस्कारक्षम चर्मकार कुटुंबात त्यांचा ८ जून १९५४ रोजी जन्म झाला. आठव्या इयत्तेपर्यंत ते १० पैश्याला बुटपालिश करत शिकले . इतकेच नव्हे तर अस्पृश्यतेचे चटके सहन करत गुणवत्तेत येत राहिले. शिक्षणाबरोबरच त्यांनी चित्रकला, हस्तकला, नाट्य, क्रीडा, वक्तृत्व, निबंध, हस्ताक्षर स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य मिळविले होते. १९७६ साली औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला त्यांना प्रवेश मिळाला .ते सम्पूर्ण मराठवाडा विभागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम आले होते.नंतर त्यांनी एम डी ( मेडिसिन) ही पदवीही प्राप्त केली.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात विविध उच्च पदांवर कार्य करून ते ३० जून २०१२ रोजी सेवानिवृत्त झाले. वैद्यकीय सेवेबरोबरच ते सातत्याने साहित्यसेवा, नाट्य,चित्रपट, समाजसेवा, शैक्षणिक सेवा करत आले आहेत. आजवर ५००हुन अधिक कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, उद्घाटक, परीक्षक म्हणून उपस्थित राहिले आहेत. विविध वृत्त वाहिन्यांच्या कार्यक्रमात भाग घेतला आहे. विविध साहित्य संमेलनामध्ये ते अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. त्यांचे ४ कविता संग्रह, एक वैद्यकीय पुस्तक पुस्तक प्रकाशित झाले आहे.त्यांनी मराठी,हिंदी वृत्तपत्रातून नियमितपणे आरोग्य विषयक लेखन केले आहे. आजपर्यंत त्यांना दीडशेहून अधिक राज्य, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. जगनमित्र असलेल्या, इतरांना आरोग्य, आनंद प्रदान करणाऱ्या डाँ. रोहिदास वाघमारे यांना दीर्घायुष्य लाभो आणि या पुढचीही त्यांची वाटचाल दैदीप्यमान राहो,या मनःपूर्वक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी.
सुपर कार्स, व्हिंटेज कार्स, सुपर बाइक्स आणि व्हिंटेज बाइक्सचा शो ८, ९ आणि १० फेब्रुवारी ला
मुंबई– पार्क्स भारतात सुपर आणि व्हिंटेज कार व बाइक शो सादर करत असून तो अशा प्रकारचा पहिलाच शो आहे. एप्रिल २००९ मध्ये सुरू झालेल्या सुपर कार शोचा डिस्प्लेवर असणाऱ्या सुपरकार्सबाबत मोठा विकास झाला आहेच, शिवाय त्याचे मोटरिंग सेलिब्रेशनची भव्य झाले आहे. या सोहळ्यात भर घालण्यासाठी या शोमध्ये पहिल्यांदाच विविध प्रकारच्या सुपर कार्स आणि बाइकसोबत व्हिंटेज कार्स आणि व्हिंटेज बाइक्स डब्ल्यूआयएएच्या शतकमहोत्सवाच्या निमित्ताने समाविष्ट करेल्या जाणार आहेत. काळजीपूर्वक निवडलेल्या कार्स आणि बाइक्स एमएमआरडीए मैदान, बीकेसी येथे ८, ९ आणि १० फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित केल्या जाणार आहेत. या परंपरेचा एक भाग म्हणून सुपर कार क्लब ऑफ इंडिया मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवर १० फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांच्या खास गाड्यांसर परेड काढणार आहेत.
श्री. गौतम सिंघानिया, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, रेमंड लिमिटेड आणि सुपर कार क्लबचे संस्थापक अध्यक्ष म्हणाले, ‘पार्क्सद्वारे सादर केला जात असलेला मोटर शो भारतातील सर्वात अनोखा शो आहे आणि इतक्या वर्षांत प्रतिष्ठितशो म्हणून त्याची ओळख तयार झाली आहे. या आवृत्तीमध्ये डब्ल्यूआयएएचा शतकमहोत्सवही साजरा केला जाणार असून त्यात विविध सुपर कार्स, व्हिंटेज व क्लासिक कार्स, व्हिंटेज बाइक्स व सुपरबाइक्सचा ताफा या सोहळ्याचा भाग असेल. आम्हाला विश्वास वाटतो, की हा वार्षिक महोत्सव आणखी मोठा व चांगला बनेल.”
डब्ल्यूआयएएच्या शतकमहोत्सवाचा भाग म्हणून या सुपरकार्स तसेच विविध व्हिंटेज कार्स, बाइक्स व सुपरबाइक्स १० फेब्रुवारी रोजी सकाळी११.३०नंतररस्त्यांवरून फिरतील तेव्हा मुंबईकरांना त्यांची झलक पाहाता येईल. सुपर कार्स आणि बाइक्स तसेच व्हिंटेज कार्स आणि बाइक्स एमएमआरडीए मैदान, बीकेसी येथे शुक्रवार आणि शनीवारी म्हणजेच ८ व ९ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ दरम्यान प्रदर्शित केल्या जाणार आहेत.
नितिन डोसा, अध्यक्ष, व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया म्हणाले, ‘डब्ल्यूआयएएचे अध्यक्षपद हा माझ्यासाठी सन्मान आहे आणि मला अभिमान वाटतो, की व्हिंटेज व सुपर कार्स आणि बाइक्सचा भारतातील सर्वात मोठा ऑटो शो डब्ल्यूआयएएच्या शतकमहोत्सवी वर्षात मुंबईत भरवला जाणार आहे.’
परेड फ्लॅग ऑफची वेळ – सकाळी ११.३०
परेडचा मार्ग – एमएमआरडीए मैदान, बीकेसी– सी लिंक – वरळी सीफेस – एनएससीआय – हाजी अली – पेडर रोड – बाबूलनाथ – चौपाटी – मरीन ड्राइव्ह – एयर इंडिया इमारतीपाशी डावीकडे वळून – रिगल राउंडअबाउट – एशियाटिक ग्रंथालय – रिझर्व्ह बँक – बलार्ड इस्टेट
विवेक गोयंका, डब्ल्यूआयएएचे अध्यक्ष म्हणाले, ‘या १०० वर्ष जुन्या संघटनेचा अध्यक्ष या नात्याने भारतातील व्हिंटेज व सुपर कार्स आणि बाइक्सचा भारतातील सर्वात मोठा ऑटो शोडब्ल्यूआयएएच्या शतकमहोत्सवी वर्षात मुंबईत भरवला जाणार आहे, याचा मला अभिमान वाटतो. डब्ल्यूआयएए शतकमहोत्सवी वर्षात असल्यामुळे दुहेरी सेलिब्रेशनाची संधी आहे आणि डब्ल्यूआयएएमध्ये आम्ही या मोटरिंग सोहळ्याचा भाग होताना आनंदित झालो आहोत.’
ऑडी, मर्सिडीज, मॅसरेटी, लॅम्बोर्गिनी, अस्टन मार्टन, पोर्श, फेरारी, बेंटले आणि रोल्स रॉइस अशा प्रसिद्ध सुपर आणि लक्झरी कार ब्रँड्ससोबतच सुपर कार्सही पहिल्यांदाच पार्क्स सुपर कार शोमध्ये पहिल्यांदा सहभागी होणार आहेत. भारतातील सुपर कार्स मालकांचा पहिला आणि एकमेव क्लब – सुपर कार क्लब (एससीसी) www.facebook.com/SuperCarClubOfficial हा दोन भिन्न व्यक्तिमत्त्व मात्र समान आवड असलेल्या दोन व्यक्तींच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. सुपर कार क्लब हा केवळ सदस्यांसाठीचा क्लब असून रेमंड लिमिटेडचे सीएमडी श्री. गौतम सिंघानिया त्याचे सदस्य आणि संस्थापक आहेत.
पार्क्सबद्दल
पार्क्स हा प्रीमियम कॅज्युअल लाइफस्टाल ब्रँड आहे, जो आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगांसाठी आवश्यक ड्रेसिंगच्या शोधात असलेल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतो. पार्क्स हा ब्रँड २२ ते ३० वर्ष वयोगटातल्या उत्साही, आक्रमक, बहिर्मुख, दमदार आणि आयुष्य मनसोक्त जगणाऱ्या तरुणांचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करतो. पार्क्सने आपला स्वभाव आणि तेजतर्रार वृत्तीचे प्रतिंबिब असलेल्या कपड्यांची निवड करणाऱ्या नव्या पिढीची नस अचूक पकडली आहे.
१९९९ मध्ये स्थापना झाल्यापासून पार्क्स कॅज्युअल वेयर सेगमेंटमधील सातत्यपूर्ण नाविन्य आणि आंतरराष्ट्रीय ट्रेंड्स व स्टायलिंग पसंतीचा ब्रँड ठरला आहे. कामापलीकडच्या आयुष्यातील कपड्यांची गरज पुरवणारा ब्रँड असे त्याचे स्थान असून स्पोर्ट आणि क्लबसारख्या विभागांतून या गरजा पूर्ण केल्या जातात. दर्जावर भर देण्यासाठी हा ब्रँड पूर्ण प्रयत्न करतो. उत्पादनासाठी सर्वोत्तम यंत्रणा, तंत्र, ट्रॅकिंग यंत्रणा व प्रक्रिया वापरली जाते. यातील बहुतांश भाग स्वयंचलित आहे.





