Home Blog Page 2999

शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव 10 फेब्रुवारी रोजी

0

पुणे-नृत्य आणि संगीत यांचा सुंदर मिलाफ असणारा शनिवारवाडा नृत्य आणि
संगीत महोत्सव यंदा रविवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता
ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे यंदाचे
18वे वर्ष आहे. यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात अभिनेत्री पद्मनी कोल्हापुरे
करणार आहेत.
या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संयोजन समिती सदस्य
अभिनेते जॅकी श्रॉफ म्हणाले की, “पुणे ही सांस्कृतिक नगरी आहे. येथे गेली 18 वर्षे
नृत्य महोत्सव होतो ही विशेष बाब आहे. यंदा 7 नृत्य शैलींचा अविष्कार एकाच
मंचावर होत आहे ही अनोखी घटना आहे. मुंबईतही असा कार्यक्रम व्हायला हवा.
रसिकांनी याचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी संयोजन समितीतर्फे बोलताना सबीना संघवी म्हणाल्या की, पुणे हे
महोत्सवांचे शहर आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पुणे आघाडीवर आहे. शास्त्रीय
नृत्याचे शिक्षण देणार्‍या अनेक संस्था येथे आहेत. त्यामुळेच येथे नृत्य महोत्सव
सुरू करण्यात आम्ही पुढाकार घेतला आणि गेली 18 वर्षे हा महोत्सव चालू आहे.
ही आनंदाची बाब आहे.
या प्रसंगी संयोजन समितीच्या गायत्रीदेवी पटवर्धन, वर्षा चोरडीया, मनिषा
साठे तसेच शमा भाटे व स्वाती दैठणकर पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या.

प्रख्यात अभिनेत्री पद्मनी कोल्हापुरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे
उद्घाटन झाल्यानंतर ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगना स्वाती दैठणकर व त्यांच्या
‘नुपूरनाद’ चे 11 शिष्या ‘गणेशवंदना’ सादर करतील. त्यानंतर ‘महाभारत रीइंटरप्रीटेड
– अतित की परछाईयाँ’ या नृत्य व संगीत यांचा सुंदर मिलाफ असणार्‍या 105
मिनिटांच्या नृत्यसंरचनेची सुरूवात होईल. याची संकल्पना व नृत्य दिग्दर्शन
नृत्यगुरू पं. शमा भाटे यांचे आहे. एकून 7 नृत्य शैलींपैकी नाट्यमय ‘कथ्थक’मधून
द्रौपदी – अमीरा पाटणकर, ‘कथकली’तून भीष्म – डॉ. कन्नन, ‘छाऊ’तून आक्रस्ताळा
आणि शीघ्रकोपी दुर्योधन – राकेश साई बाबू, ‘कुचिपुडी’तून सहनशील कुंती –
वैजयंती काशी, ‘मोहिनीअट्टम’ मधून गांधारी – गोपिका वर्मा, ‘ओडिसी’तून धोरणी
युधिष्ठिर – रामली इब्राहिम आणि ‘भरतनाट्यम’मधून कर्ण – वैभव आरेकर या
व्यक्तिरेखा वेशभूषा आणि संगीतासह वैविध्यपूर्ण शैलीतून महाभारताच्या
कथानकाचा पट मांडणार आहेत. ‘नादरूप’ या संस्थेच्या शिष्या मुख्य नृत्य
विशारदांना साथ देणार आहेत.
अतिशय तालबद्ध नृत्य, श्रवणीय संगीत आणि एकरूप झालेल्या भावमुद्रा या
आधारे सादर होणार्‍या या नृत्य व संगीत कार्यक्रमात, यातील भिन्न नृत्यशैलींना
वेगवेगळे संगीत देण्यात आले आहे. नरेंद्र भिडे यांनी संगीतरचना केली आहे.
अनुरूप प्रकाशयोजना हर्षवर्धन पाठक यांनी केली आहे.
मानवी जीवनातील गुंतागुंतीचे, सर्वार्थाने वेध घेणारे महाभारत हे खर्‍या
अर्थाने महाकाव्य आहे. पराकोटीचे दुःख, औदार्य, सूड, सहानुभूती, विफलता आणि
शांतता या सार्‍यांचा अनुभव यामध्ये मिळतो. या नृत्यसंरचनेमध्ये महाभारतातील
काही महत्वाच्या व्यक्तिरेखांना एकत्र गुंफण्यात आले आहे. या व्यक्तीरेखा त्यांच्या
जीवनातील अखेरच्या टप्प्यावर आहेत. त्यांच्या जीवनात प्रचंड मोठी उलथापालथ
झाल्यानंतर आपल्या सर्व प्रिय व्यक्ती आणि संपत्तीचा नाश झाल्यावर ते मागे

वळून पाहत आपल्या जीवनाचे तटस्थपणे परीक्षण करीत आहेत. अचानकपणे
त्यांना तो विजय निष्फळ आणि पराभव निरर्थक वाटू लागतो. “येवढा महाविनाश
होण्यास मी कारणीभूत झाले आहे काय? आणि हा असा महाविनाश टाळता आला
नसता काय?” असाच प्रश्न यातील प्रत्येक व्यक्तीरेखा विचारत राहते. एकाच
कथानकात भिन्न नृत्य शैलींचा एकत्रित अविष्कार मनाला मोहित करतो. या
महोत्सवाच्या प्रवेशिका दि. 5 फेब्रुवारी पासून 9 फेब्रुवारी पर्यंत बालगंधर्व रंगमंदिर,
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि हॉटेल ओ (कोरेगाव पार्क) येथे उपलब्ध
असतील. या प्रवेशिका महोत्सवाच्या दिवशी म्हणजे दि. 10 फेब्रुवारी सकाळी 11
नंतर कार्यक्रमस्थळी उपलब्ध असतील. गोल्ड प्रवेशिकेचे मूल्य 500 रुपये आणि
सिल्वर प्रवेशिकेचे मूल्य 300 रूपये आहे. प्रथम येणार्‍यास प्राधान्य, याप्रमाणे
आसन व्यवस्था करण्यात आली आहे. ‘बूक माय शो’ वेबसाईटवर देखील ऑनलाईन
या प्रवेशिकांचे आरक्षण करता येऊ शकेल.
यंदाच्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक इंडो स्कॉटले अ‍ॅटो पार्टस प्रा.लि. असून
झाला ग्रूप, फाईव्ह एफ वर्ल्ड, वेकफिल्ड, रेडिओ वन आणि प्युअर गोल्ड फाईन
चॉकलेट हे सहप्रायोजक आहेत.
शनिवारवाडा नृत्य व संगीत महोत्सवाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे – जॅकी
श्रॉफ, सबीना संघवी, गायत्रीदेवी पटवर्धन, मनीषा साठे, वर्षा चोरडिया, नीलम शेेेवलेकर,
पारूल मेहता, रेखा कृष्णन आणि महोत्सव समन्वयक विनेश परदेशी.

लोकशाहीवर घाला घालण्याचे काम हे सरकार करीत आहे – शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील

0
पुणे -शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीवर 
घाला घालणाऱ्या भाजप सरकारचा पुरम चौकात(अभिनव कॉलेज चौक)येथे निषेध आंदोलन करण्यात आला. 
यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले की जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ज्या मागण्यांसाठी उपोषण
 करत आहेत त्या मागण्यांवर हे सरकार सत्तेवर आले आहे आणि आज अण्णा हजारे नि त्या मागण्यांचे 
पत्र पंतप्रधान यांना पाठविले असता त्यांनी शुभेच्छा म्हणून अण्णा हजारेंना परत पत्र पाठविले , 
लोकशाही ची थट्टा या सरकारने चालविली आहे .लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर हे सरकार
 दडपशाही करीत आहे. मुख्यमंत्री तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुत्ते म्हणून संबोधत आहेत.ज्या घटनेने देश
 एकसंध ठेवण्याचे काम केले त्या घटणेला आव्हान हे जातीयवादी सरकार देत आहे. भारतीय लोकशाही वर 
घाला घालण्याचे काम या सरकारकडून होत आहे.यावेळी नगरसेवक सुभाष जगताप,शिवाजीनगर विधानसभा 
अध्यक्ष निलेश निकम, महिला शहराध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक अध्यक्ष राकेश कामठे,सामाजिक न्याय 
अध्यक्ष बापु डाकले,ओ.बी.सी शहराध्यक्ष संतोष नांगरे,पर्वती अध्यक्ष नितीन कदम,प्रवक्ते भूषण राऊत,प्रदीप
 देशमुख,फहिम शेख,अर्चना हनमघर,अर्चना चंदनशिवे,स्वाती पोकळे,सुरेखा दमिष्टे,शांतिलाल मिसाळ,अजय 
दराडे,युसुफ शेख,अमोल ननावरे,महेश हांडे,रुपेश संत,अच्युत लांडगे,प्रेम भांडे,विकी वाघे,समिर पवार,राजाभाऊ
 सावंत,अमोघ ढमाले, संजय खोपडे,सदाशिव गायकवाड,संजय लोणकर,विनोद पवार,संजय दामोदरे राष्ट्रवादी 
कॉंग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

बंजारा समाजाचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0

पुणे-अठरा वर्षीय युवक नामे विनोद शंकर पवार यांची तळेगांव दाभाडे-पुणे येथे अज्ञातांनी निर्घृण हत्या करुन लोहगड घाट-लोणावळा येथे फेकून दिले.सदर घटनेला जवळपास तीन महीने झाले तरी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे अधिकारी अद्यापही आरोपीला अटक केली नाही.अमानवीय क्रूर हत्या करण्यात आली असताना देखील पोलिसी चिड़ीचुप आहे,खरच पोलिसांकडे आरोपीला पकडण्या इतके यंत्रणा नसतील का ?अथवा पोलिस आरोपीवरच मेहरबान करत नसतील ना..? सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे.एकुलता एक मुलगा हरवून बसलेल्या माता पित्याची अवस्था काय असेल याचा विचार न केलेलाच बर..पण संबंधित पोलिस अधिकारी यांच्याकडे जवळपास सगळे पुरावे असताना देखील टाळाटाळ करीत असल्याचे जाणवत आहे.त्यामुळे बंजारा समाजातील पीडित कुटुंबियांना न्याय मिळून देण्यासाठीतसेच सबंधित अधिकाऱ्यांच्या जाहिर निषेध नोंदविण्यासाठीबंजारा समाजाचा पुणे जिल्हाधिकारी  कार्यालयावर  मोर्चा काढण्यात आला .

या मोर्चामध्ये आमदार हरीभाऊ राठोड साहेब,ऍड.  रमेश खेमू राठोड,संतोष पवार,युवराज आडे,दिनेश राठोड,हृषिकेष चव्हाण,कमलताई आडे,जयश्री राठोड,संजय चव्हाण,विजय आड़े,संजय जाधव,सचिन जाधव,तारकेश्वरी राठोड,शरद पवार,बाबू पवार,ऍड.सोनाली घाडगे,सचिन जाधव,मूर्ति राठोड,रत्नंजय राठोड,राजाभाऊ चव्हाण पीडित मुलाचे आई वडील व असंख्य बंजारा उपस्थित होते. सदर मोर्चाचे आयोजन बंजारा समाजाचे नेते ऍड  रमेश खेमू राठोड यांनी केले होते.

                         नववी मध्ये शिकणाऱ्या १३  वर्षीय चिमुरडिचा लैंगिक छळ करुन सतत त्रास देणाऱ्या नराधम विरोधात आई वडिलांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती,परंतु संबंधित पोलिस स्टेशन अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची गंभीर पणे दखल घेतली नाही.शेवटी त्या नाराधमांच्या लैंगिक त्रासाला कंटाळून चिमुरडीने विष प्राशन करुन आपला जीवन संपविला.अशा नराधमांना शिक्षा तर झालीच पाहिजे परंतु निष्काळजी पणे राहिलेल्या त्या संबंधित अधिकारी यांच्यावर देखील कड़क शासन झाले पाहिजे. एकीकडे खुलेआम खून करुन राक्षरूपी मारेकरी फिरत आहे तर दुसरीकडे चिमुरडीचा जिव घेणारे हैवानरूपी नराधम बिंदास्तपणे वावरत आहे. इतकेच नव्हे तर ज्यांच्या हाती सुरक्षिततेची हमी ते मात्र काहीच घडले नाही असेच आव आणत आहे.

             दोन्ही घटनेसंदर्भात आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावे व पीडित कुटुंबियांना न्याय मिळून देण्यासाठी तसेच सबंधित अधिकाऱ्यांच्या जाहिर निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी  कार्यालय-पुणे येथे मोर्चा काढण्यात आला त्या वेळी ऍड  रमेश राठोड व बंजारा शिष्ठमंडळानी जिल्हाधिकारी साहेबांना भेटुन सविस्तर निवेदन देण्यात आले.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेस भरघोस प्रतिसाद वीजजोडणीसाठी २८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

0

मुंबईमुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून महावितरणने पोर्टल सुरु केल्यानंतर केवळ पंधरा दिवसात सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी सुमारे २८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

शाश्‍वत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. महावितरणच्या पोर्टलवरून अर्ज केलेल्या २६ हजार शेतकऱ्यांपैकी २ हजार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा सर्व्हे करण्यात आलेला असून २ हजार २९३ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. याशिवाय अर्ज भरतांना काही त्रुटी असलेल्या ४१९ अर्ज सध्या नामंजूर करण्यात आले असून या शेतकऱ्यांनी अर्जातील माहिती दुरूस्त करून आपले अर्ज पुन्हा महावितरणच्या पोर्टलवरून भरावेत.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली मार्गदर्शन पुस्तिका व व्हॉट्स ॲप अशा माध्यमांचा वापर करण्यात येत असून क्षेत्रीयस्तरावरील सर्व कर्मचारी व अभियंते सोशल माध्यमांद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा लाभ घेत दि. २ फेब्रुवारी २०१९ पर्यन्त राज्यातील सुमारे २८ हजार शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून मागील पंधरा दिवसात १६ हजार ९६० शेतकऱ्यांनी आपले अर्ज या पोर्टलवरून भरले आहेत. तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी – डॉ.दिपक म्हैसेकर

0

पुणे,  दिनांक 5 : मतदारांचे पत्ता बदल तसेच नवीन मतदारांची नोंदणी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करुन एकही मतदार  मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी दिल्या.

            जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये असलेल्या हडपसर व पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयास आज विभागीय आयुक्तांनी भेट देवून लोकसभा निवडणूक 2019 च्या मतदार यादीबाबत आढावा घेवून सूचना केल्या.

            मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी असलेल्या फॉर्म नं.6 बाबत मतदारांना योग्य रितीने मार्गदर्शन करावे. मतदारांचा पत्ता बदलला असल्यास त्याबाबत त्याची नोंद घेण्याबरोबरच एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना यावेळी विभागीय आयुक्तांनी केल्या.

            उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, तहसिलदार कल्पना ढवळे, नायब तहसिलदार रोहिणी घाडगे, प्रशांत कसबे बैठकीस उपस्थित होते. यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी नागरिकांशी संवाद साधून मतदार यादी बाबत त्यांना मार्गदर्शन केले.

 

झी युवावर १० फेब्रुवारीला मनोरंजनाचा ‘महारविवार ‘

0

मनोरंजनाचे दुसरे नाव म्हणजे झी युवा वाहिनी. आजवर या वाहिनीने अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम दाखवून महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे येथेछ मनोरंजन केले आहे. सध्या प्रेक्षकांना घरी बसून नियमितपणे सोमवार ते शनिवार ७ ते १० च्या दरम्यान रोज संध्याकाळी तू अशी जवळी राहा ,सूर राहू दे , वर्तूळ , वाजता फुलपाखरू , आम्ही दोघी आणि  अप्सरा आली असे कार्यक्रम झी युवावर पाहण्याचे  ठरलेले असते . मात्र रविवारी काय करावं हे त्यांना कळत नसतं. मग उगाच रीमोटचा चाळा करत हे प्रेक्षक जे मिळेल ते पाहतात आणि स्वतःचे मनोरंजन करतात . याच गोष्टीचा विचार करुंन या रविवारी झी युवा घेऊन येतंय मनोरंजनाचा महारविवार .

१० फेब्रुवारीची संध्याकाळ ही मनोरंजनाचा महारविवार म्हुणून  यापुढे ओळखली जाईल . या महा रविवारची सुरुवात संध्याकाळी ७ वाजता तू अशी जवळी राहा या राजवीर आणि मनवा  यांच्या अनोख्या प्रेमकहाणीने होईल . त्यांनतर रात्री ८ वाजता फुलपाखरू मालिकेतील मानस आणि वैदेही च्या बाळाच्या बारश्याचा महत्वाचा प्रसंग आपल्याला पाहायला मिळेल . त्यांनतर रात्री ९ वाजता  अभि आणि मीनाक्षी  यांच्या आयुष्यातील अनपेक्षित कलाटणी असलेली  मालिका वर्तूळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल . सध्या या तिन्हीही मालिका प्रेक्षकांमध्ये अतिशय प्रचंड प्रसिद्ध असल्यामुळेच झी युवा वाहिनी १० फेब्रुवारीला  ‘मनोरंजनाचा महारविवार ‘ प्रेक्षकांच्या आग्रहातर दाखवत आहे .

७ वाजता तू अशी जवळी राहा या मालिकेमध्ये राजवीर आणि त्याचे मनवावर असलेले वेडे प्रेम आपल्याला पाहायला मिळते . सिद्धार्थ बोडके आणि तितिक्षा तावडे हे दोघे या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहेत . राजवीर मनवावर एवढं प्रेम करतोय की तिच्या आयुष्यातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा सहवास सहन होत नाही आहे . अगदी तिचं कुटुंब सुद्धा त्याला नको आहे  मात्र मनवा त्याच्यावर करत असलेल्या प्रेमापोटी तो जमेल तितकं सगळ्या गोष्टी सांभाळत आहे . महारविवारी मनवा चा डान्स परफॉर्मन्स आणि त्यानंतर होणाऱ्या नाट्याची मजा अनुभवायला मिळणार आहे .

८ वाजता फुलपाखरू मालिकेतील मानस आणि वैदेही या दोघांच्या महाविद्यालयीन प्रेमापासून आता लग्न आणि त्यानंतर झालेल्या बाळाची कथा  सांगण्यात आली आहे . यशोमान आपटे आणि हृता दुर्गुळे हे दोघे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत .या महारविवारी आपल्याला मानस  वैदेहीच्या  बारशाची तयारी  , बाळाचं नाव  आणि  मानस वैदही च स्वप्नातील गाणं आपलयाला पाहायला मिळणार आहे  . मानस आणि वैदेहीने आपलं बाळ शाल्मलीला देण्याचा निर्णय आणि हे दोघे आपलं बाळ शाल्मली ला देणार का याबद्दलची उत्कंठा आपल्याला  पाहायला मिळेल .

९ वाजता वर्तूळ मालिकेतील मीनाक्षी तिला असलेला एक वाईट भूतकाळ  म्हणजेच विक्रम आणि अभिच्या दृष्टीने भविष्यात येणारी सुखाची चाहूल या अतिशय उत्कृष्ट कथानकेवर ही मालिका पुढे सरकते . विकास पाटील , विजय आंदळकर आणि जुई गडकरी यांच्या या  मालिकेत मुख्य भूमिका आहेत . अभि आणि मिनाक्षीचं लग्न आणि त्यात विक्रम एन्ट्री करणार का ?  हा सध्याच्या मालिकेमधील महारविवार आपलयाला पाहायला मिळेल. संगीत ,हळद आणि मग लग्न यातील गम्मत जमत प्रेक्षक अनुभवतील . या एपिसोड मध्ये झी युवा वाहिनीवरील इतर कलाकार सुद्धा तुम्हाला वर्तूळ मालिकेतील या भव्य लग्नात दिसतील . आणि त्याचबरोबर विक्रम चा थरार आणि कथानकात होणारे ट्विस्ट प्रेक्षकांना मालिकेत अडकवून ठेवेल .

या तिन्ही मालिका सध्या मनोरंजनाने भरलेल्या असून हा महारविवार प्रेक्षकांना आवडेल यात शंकाच नाही . झी युवा वाहिनीवरील सर्व कार्यक्रम बघत राहण्यासाठी ३९ रुपयांचा ‘ झी फैमिली पॅक’   नक्की निवडा…या मध्ये तुमचे मनोरंजन करण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतील. आणि मनोरंजनाचा महारविवर १० फेब्रुवारीला झी युवावर पाहायला चुकूनही विसरू विसरू नका.

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत होरांगी अकॅडमीच्या खेळाडूंचे यश

0
पुणे : वडगावशेरी येथील होरांगी तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी राजाराम भिकु पठारे स्टेडीयमवर झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘पुमसे’ या क्रीडा प्रकारात यश मिळवले. होरांगी तायक्वांदो अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, आसाम, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली येथून स्पर्धक सहभागी झाले होते. देशांतर्गत एकूण पुमसे आणि किरोगी मध्ये २५०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेत अकॅडमीच्या अन्वी बांगर, तनिषा मुदलीयार, मानस पसारकर, प्रज्वल भोसले, प्रित वांद्रे, मानस भट्ट, निल धोका, गित लुकंड, गंगाधर कुलकर्णी, धनेश थाराकन, जुल्फीकार देवताळे, युतिका कुमार, सान्वी क्षेत्री, क्रिश केदगोणी, सर्वेश केदगोणी, आरुष सणस, संजना पवार, तणमया नांबियार, आयुषी भंडारी, अशवीन गंजी, सहर्ष तालाकोकुला, रघुवीर बजाज, अनिका बजाज, वत्सल गुसेन, प्रिया भापकर, प्रणव भापकर, गितीका गुणीशेट्टी, अन्वी तांभाळे, मनस्वी सिंह, वेद ईगालनी, कालीन्दी सरदेशमूख, तेजस्व सिंह यांनी सुवर्णपदक पटकावले.
प्रांजल पानसे, सियान फर्नांडिस, रिओना फर्नांडिस, ओमकार भगत, अविरल त्रिपाठी, प्रज्वल हलाली, रवी यमजाल, मंथन देवी, अनुज सिंग, सुमेधा साखरे, पार्थ रेगे, आशिरा अख्तर, भावना ऊंद्रु, आविरल त्रिपाठी, अभिता त्रिपाठी, अक्षदा महाराज, नारायणी पाटील, कार्तिकीय चिन्ना, रिशिता चिन्ना, वंश ब्रनवाल, ईशिता ब्रनवाल, प्रथमेश सोनार, श्रीजीत जाना यांनी रौप्यपदक पटकावले. तर कुनाल सिंग, दिव्या रिजवानी, सारंग सरागे, अनयराज पवार, समिक्षा यमजाल, अर्णव सणस, अजिंक्य फडतरे, समृद्धी कोल्हे, समर्थ  मेमाणे, शौर्य मुजूमदार, अथर्व पाठक, श्रावणी गंजी, आदित्य ऊंद्रु, वैष्णवी सिंग, ज्ञानेश्वरी ईगाले, रिया सदावर्ते, अमृता पांडे, वेद ईगलनी यांनी कांस्यपदक पटकावले.
होरांगी तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष मास्टर बाळकृष्ण भंडारी यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. सुवर्ण व रौप्यपदक विजेत्यांना दक्षिण कोरीयात शिष्यवृत्तीमार्फत चोसन विद्यापीठात जाण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत सांरग धोका, योगेश मुदलीयार, श्रीनिवास केदगोणी, प्रशांत वांद्रे, अपुर्वा रेगे, राजिव त्रिपाठी, विशाल गवते, आरती पासारकर, राखी केदगोणी, शलाखा सणस, वंदना बांगर यांचे सहकार्य लाभले. वैष्णवी वांद्रे, अहाना सैय्यद, ईशान सैय्यद, खुशबू तिवारी, अंजली लोहार, पुजा गुप्ता, सिद्धू क्षेत्री, विनोद शिंदे यांनी पुमसे खेळात पंच म्हणून सहभाग घेतला. रविंद्र भंडारी आणि कपिल अनमल यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले.

अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

0

मुंबई- अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले. एलिझाबेथ हॉस्पिटल(नेपेन्सी रोड) मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. कर्करोगानं आजारी असल्यानं त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते. ‘कमांडर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेले प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर  गायक-संगीतकार वासूदेव भाटकर यांच्या घरी 3 ऑगस्ट 1949 मध्ये रमेश भाटकर यांचा जन्म झाला होता. 1977 मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तीस वर्षांहून अधिक काळ ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. वयाची 69 वर्षे पूर्ण केल्यानंतरही त्यांचा कामाचा उत्साह पूर्वीसारखाच कायम  असायचा. वयाची पासष्टी ओलांडल्यानंतरही त्यांच्या चेह-यावर म्हातारपणाच्या म्हणाव्या तितक्या खुणा दिसत नव्हत्या. काही दिवसांपूर्वीच ते ‘तू तिथे मी’ आणि ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत दिसले होते.

रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘अश्रूंची झाली फूले’ हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. तसेच त्यांची केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारखी अनेक नाटकं गाजली आहेत. १९७७ ला चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसं यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना एक मुलगा आहे.

मोदी वाघ आहे, आणि वाघाला कोणीही हरवू शकत नाही – मुख्यमंत्री

0

मुंबई-येणारी निवडणूक मोदींसाठी नव्हे तर देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाची असून देशाच्या विकासाचा वेग पुढील दहा वर्षे कायम ठेवायचा असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी निवडून दिले पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मुख्यममत्री सांगीतले की, जंगलातली कितीही जनावरे एकत्र आली तरी ती सिंहाला हरवू शकत नाहीत. नरेंद्र मोदी वाघ आहे, आणि वाघाला कोणीही हरवू शकत नाही. असे सांगून ते म्हणाले की मोदी हे आज देशाचे वाघ आहेत. राज्यस्तरीय सीएम चषक स्पेर्धेचे समापन सोहळ्यावर मुंबईतील सोमैय्या मैदानात रविवारी सांयंकाळी पार पडलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाचे युवा महासंगम मध्ये पारितोषिक वितरण करताना मुख्यमंत्री बोलत होते.

युवा महासंगमच्या मंचावर यावेळी मुख्यमंत्री फडणवीस सोबत मंचावर शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार पूनम महाजन, ज्येष्ठ आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार योगेश टिळेकर देखील उपस्थित होते. मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्य़क्ष मोहित भारतीय यांच्याकडून सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि मान्यवरांना तलवार भेट करण्यात आली. आपल्या स्वागत भषणात भारतीय म्हणाले की मुख्यमंत्री फडणवीस म्हणजे युवाशक्तीचे प्रतीक आहेत. सीएम चषक स्पर्धेसाठी आणि युवमहासंगमसाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विशेष मेहनत घेतली.

मुख्यमंत्री फडणवीस युवा महासंगममध्ये आलेल्या जवळपास 50 हजार युवकांचे स्वागत केले आणि सांगीतले की, नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत,  पण विरोधकांकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. बाकी सर्व नेते केवळ आपापल्या भागाचे नेते आहेत, पण मोदी देशात कुठेही गेले तरी लाखभर लोक सहज त्यांना ऐकण्यासाठी जमतात. आजवर अनेकदा देशात गरिबी हटाव ची घोषणा झाली पण गरिबी कधी हटली नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की फक्त कांग्रेसी नेत्यांचे शिष्यांचीच गरिबी हटली. परंतु आज मोदींच्या प्रत्येक योजनेमुळे खरी गरिबी हटविण्याची सुरुवात झाली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी, विकासासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करणे अवश्यक आहे त्यासाठी सर्व भाजयुमो कार्यकर्त्यांनी कसून काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले की बाज की उडान अभी बाकी है. रणांगणात गेल्यावर मोगलांचा खातमा करणारे मावळे मला समोर दिसत आहेत.

मोदींनी देशाशी गद्दारी केली; अण्णा हजारे

0

पुणे-लोकपालच्या आंदोलनामुळेच मोदी सरकार सत्तेवर आलं. मात्र सत्तेवर येताच त्यांना लोकपालचा विसर पडला. त्यांनी देशाशी गद्दारी केली, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मोदी सरकावर थेट तोफ डागली आहे. पाच वर्षांपूर्वी अरुण जेटली, सुषमा स्वराज लोकपालवर भरभरुन बोलत होते. मात्र आता ही सर्व मंडळी मूग गिळून गप्प आहेत, असे असं अण्णा हजारे म्हणाले. लोकपाल नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारेंचं राळेगणसिद्धीत उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकपाल आंदोलनामुळे देश ढवळून निघाला. त्यामुळेच केंद्रात भाजपाची सत्ता आली. मात्र आज पाच वर्ष होऊनही त्यांना अद्याप लोकपाल नेमता आलेला नाही. ही देशाशी गद्दारी आहे, अशा तिखट शब्दांमध्ये अण्णा मोदी सरकारवर बरसले. दिलेला शब्द न पाळण्यात काँग्रेसची डॉक्टरेट, तर भाजपा ग्रॅज्युएट असल्याचंही त्यांनी म्हटलं. गेल्या पाच वर्षांपासून सरकारकडून जनतेची दिशाभूल सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

राज्य सरकार साफ खोटं बोलत आहे, माझ्या नव्वद टक्के मागण्या मान्य झाल्या असत्या तर मी कशाला उपोषणाला बसलो असतो? असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे. कोणत्याही मागण्या मान्य झालेल्या नाहीत. या सरकारवर माझा विश्वास राहिलेला नाही. केंद्रातले मंत्री आणि मुख्यमंत्री मला भेटायला येणार असं मला कळवण्यात आलं. मी त्यांना कळवलं की तुम्ही येऊ नका कारण तुम्ही आलात की लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तुम्ही ठोस निर्णय घ्या, मागण्या किती मान्य केल्या ते लेखी द्या त्यानंतर आम्ही विचार करू तुमच्यावर आता आमचा विश्वास नाही असंही अण्णांनी म्हटलं आहे.

उपोषण करू नका असं राज ठाकरेंनी सांगितलेली गोष्ट ऐकणार का? त्यावर अण्णा यांनी नाही म्हटलं आहे. परमेश्वर माझ्या पाठिशी आहे. मी आणखी पाच दिवस तरी उपोषण करू शकतो आणि मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी उपोषण करणारच असंही अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी भेट घेतली, माझ्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली त्याचं बरं वाटलं मात्र मी माझं उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत मागे घेणार नाही. लोकपाल, लोकायुक्तांच्या मागणीमुळे जे आंदोलन उभं राहिलं होतं त्यामुळे मोदी सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यावर आता मात्र लोकपाल आणि लोकायुक्त यांचा सोयीस्कर विसर मोदी सरकारला पडला. मोदी देश हुकूमशाहीकडे घेऊन जात आहेत असाही आरोप अण्णा हजारेंनी केला. मोदी सरकार आणि फडणवीस सरकार जनतेची दिशाभूल करत आहेत असाही आरोप पत्रकारांशी बोलताना केला.

2013 मध्ये भाजपाने तुमचा वापर केला असं राज ठाकरे म्हटले, त्याबद्दल काय सांगाल? असं विचारताच अण्णा म्हटले की राज ठाकरे म्हटले ते सत्य आहे सगळ्या देशालाच हे माहित आहे. त्यावेळी लोकपालच्या आंदोलनामुळे भाजपाची सत्ता आली मात्र आत्ता त्यांना माझा आणि आंदोलनाचा विसर पडला. भाजपा असो आप असो कोणीही लोकपाल, लोकायुक्त यांच्यावर शब्दही काढत नाहीत हे दुर्दैवी आहे असंही अण्णा हजारे म्हटले आहे. तसंच सत्ता बदलून परिवर्तन होणार नाही व्यवस्था बदलली पाहिजे असंही मत यावेळी अण्णा हजारेंनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम करणारे मुख्यमंत्री आहेत असं वाटलं होतं मात्र त्यांनी वारंवार शब्द देऊनही तो पाळला नाही त्यामुळे आता त्यांच्यावर माझा विश्वास राहिला नाही असंही अण्णा म्हटले आहेत.

मोदी, केजरीवाल दोघे नालायक – राज ठाकरे

0

पुणे-नरेंद्र मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान बघितलेला नाही. अण्णा हजारेंमुळे हे सगळे सत्तेत आहेत. केजरीवाल काळा की गोरा हे माहितही नव्हतं. अण्णांमुळे देशाला समजलं. आज तुम्ही अण्णांना भेटायला येत नाही. साधी तब्येतीची विचारपूस करत नाही. अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी दोघांनी अण्णांना वापरुन घेतलं अशा शब्दात राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली.

मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा लोकपालाची नियुक्ती झाली पाहिजे अशी तुम्ही भूमिका होती मग आता का नाही? असा सवाल राज यांनी विचारला. निवडणुकीत मोदी-शाह विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई होईल. कदाचित त्यामध्ये भाजपही असेल. भाजपाच्या काही नेत्यांच्या मनात मोदींबद्दल नाराजीची भावना आहे या प्रश्नावर गडावरचा गडकरी खूप महत्व असतो असे सूचक विधान राज यांनी केले.

हे निर्लज्ज सरकार आहे. माणस वापरुन फेकून देण्याच काम हे करतात असे राज म्हणाले. अण्णा जगले काय किंवा गेले काय ? याचं सरकारला काहीही पडलेलं नाही अशी टीका राज यांनी केली. हा अर्थसंकल्प निवडणूका डोळयासमोर ठेऊन तयार केला असून वेगळया मार्गाने पैसे वाटण्याचा हा प्रकार आहे अशी टीका राज यांनी केली.

सीबीआय, आरबीआय या स्वायत्त संस्थांवर मोदी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वायत्त संस्था स्वत:च्या राजकारणासाठी वापरणं हे दुर्देवी आहे असे राज म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. आरबीआयच्या दोन गव्हर्नरनी राजीनामे दिले ही चांगली गोष्ट नाही. आलोक वर्मा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फेरनियुक्तीचे आदेश दिले. ती मोदी सरकारची पहिली हार होती असे राज म्हणाले.

कोलकात्यामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात ते म्हणाले की, सीबीआयचे ४० जण पोलीस आयुक्तांच्या घरी छापा टाकतात. हे पंतप्रधानांना माहित नाही असं होऊच शकत नाही. पोलीस आयुक्त ही साधी व्यक्ती नाही असे राज म्हणाले. सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलीस असा संघर्ष होणे देशासाठी घातक आहे असे राज म्हणाले.

जीएसटी भवन मधील कंत्राटी कर्मचारी यांना मिळाला मागील 3 महिन्याचा पगार

0

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने जीएसटी आयुक्त, जीएसटी विशेष आयुक्त तथा वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली असता जीएसटी भवन मधील कंत्राटी कर्मचारी यांना मागील 3 महिन्याचा पगार नुकताच देण्यात आला आहे.

महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली करिश्मा श्रीधनकार, प्रिती चव्हाण, प्रशांत झावरे, सुकन्या कीर या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. दरम्यान वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर प्रकरणाची गंभीर दाखल घेत जीएसटी आयुक्त यांना कंत्राटी कर्मचारी यांचे पगार तात्काळ देण्याचे सूचना दिल्या होत्या. जीएसटी आयुक्त यांनी ठेकेदाराला कर्मचाऱ्यांचे पगार तात्काळ देण्याचे लेखी आदेश दिले. परंतू, ठेकेदाराने 80 % पगार देण्याचे आश्वासहीत केला असता कर्मचारी यांनी दि. 29 जानेवारी रोजी काम बंद आंदोलन केला असता. नुकताच 100 % पगार देण्यात आला आहे. यावेळी जीएसटी भवन मधील कर्मचारी यांनी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.

शताब्दी शाळेची… हटकेश्वर ज्ञानमंदिर गोद्रे

0
जुन्नर /आनंद कांबळे 
जुन्नर तालुक्यातील १००%आदिवाशी समाज असलेल्या गोद्रे येथील जिल्हा परिषदेच्या ज्ञानमंदिर शाळेस १००वर्षे पूर्ण झाल्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष मधुकर रेंगडे यांनी दिली.
आदिवाशी भागातील हटकेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेल्या गोद्रे या गावात १जून १९१९ रोजी इंग्रज शासनाने मराठी प्राथमिक शाळा सुरु केली.ही शाळा आता जिल्हा परिषदेमार्फत चालविली जाते.शाळेचे सध्याचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असे आहे.या शाळेस पूर्वीचेच नाव देण्यात यावे याबाबत जिल्हा परिषदेने ठराव करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.पूर्वी ज्ञान मंदिर गोद्रे असे नाव होते.
शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त ९व १० फेब्रुवारी  रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
९ फेब्रुवारी सकाळी प्रभात फेरी,महोत्सवाचे उद्घाटन आदिवाशी मंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते होत आहे.यावेळी पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण व इतर  मान्यवरांच्या उपस्थित होत आहे. क्रिडास्पर्धा, राज्यस्तरीय काव्य संमेलन यामध्ये कवी तुकाराम धांडे व अन्य कवी उपस्थित राहणार आहेत.तसेच माजी विद्यार्थी स्नेहमेळावा ,महिलांसाठी पारंपारिक गीतगायन ,भजनी मंडळाचा कार्यक्रम
तर १० फेब्रुवारी रोजी रांगोळी स्पर्धा , राहुल शिंदे यांचे शिवव्याख्याण, आदिवाशी संस्कृती व संवर्धन कांबडानृत्य (उडदावणे ता.अकोले )त्याचप्रमाणे  गुणगौरव सन्मान सोसोनवणे  व माजी मंत्री मधुकर पिचड ,खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,आमदार शरददादा सोनवणे व तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थित होत आहे.या शताब्दी महोत्सवास गोद्रे ग्रामस्थ  व माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येणार आहेत असेही शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष  मधुकर रेंगडे यांनी सांगितले .

७० वर्षांच्या आजींनी बिबट्यावर प्रतिहल्ला करत वाचवले स्वत:चे प्राण-बिबट्या जेरबंद…

0

पुणे- लहानपणी आपण ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ..ची गोष्ट ऐकली असेल …या गोष्टीत मोठ्या चतुराईने आजीबाईंनी आपली सुटका वाघोबाच्या तावडीतून करून घेतली …पण आजच्या काळात ..प्रत्यक्षात ..डोक्यात बादली घालून पुण्यातील एका आजीबाईंना आपली सुटका बिबट्याच्या तावडीतून करवून घ्यावी लागल्याची घटना आज सकाळी येथे घडली आहे . शहरातील पूर्व भागातील मुंढवा-केशवनगर भागातील रेणुका मंदिर परिसरात एक बिबट्या अढळून आल्याने खळबळ उडाली होती. यावेळी हातातील बादली बिबट्याच्या  डोक्यात घालून पळत सुटत  ७० वर्षीय आजीबाईनी आपला बचाव केल्याचा प्रसंग  घडला .अखेरीस बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीमध्ये दडून बसलेल्या  या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभाग आणि अग्निशामक दलाला यश आले आहे. या बिबट्याने ४ ते ५ लोकांवर हल्लाही होता.

अग्निशामकच्या माहितीनुसार, या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. दरम्यान, या बिबट्याने ७ वर्षे वयाच्या मुलावर हल्ला केला होता, या मुलाला वाचवताना इतर ३ जखमी झाले आहेत. दरम्यान, अग्निशमनचे बचाव पथक , वनविभाग, कात्रज येथील प्राणी संग्राहलायाची टीम यांनी संयुक्त कारवाईद्वारे जाळी टाकून बिबट्याला पकडले.

बिबट्याच्या या हल्ल्यात एक आजीबाई जखमी झाल्या आहेत. तर आदित्य भंडारी नामक तरुणही यात जखमी झाला आहे.

पुण्यातील मुंढवा-केशवनगर भागात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याची घटना घडली. या घटनेत भोई वस्ती येथे राहणार्‍या सुमित्रा सूर्यकांत तारू या ७० वर्षांच्या आजींना बिबट्याने जखमी केले आहे. मात्र, जर त्यांनी समोर असणाऱ्या बिबट्याच्या तोंडावर बादली फेकून मारली नसली तर हा हल्ला त्यांच्या जीवावर बेतू शकला असता.

दरम्यान, सुमित्रा तारू या आजींशी संवाद साधल्यानंतर त्यांनी हा थरारक अनुभव माध्यमांच्या  प्रतिनिधीसमोर व्यक्त केला. त्या म्हणाल्या, मी नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर घराबाहेरील चुलीवर पाणी ठेवण्यासाठी बाहेर गेले होते. चुलीच्या बाजूला एक रिकामी बादली होती. तेथून काही फुट अंतरावर मला भटकं कुत्रं असल्याचा भास झाला. मात्र, तो बिबट्या असल्याचे मला दिसले. त्यानंतर मी बचावासाठी त्याच्या तोंडावर जवळची बादली फेकून मारली. या अचानक हल्ल्यामुळे गोंधळलेल्या बिबट्याने माझ्यावर झडप घातली आणि मानेला तसेच डोक्याला इजा केली.

या जीवघेण्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी मी हातातील बादली त्याच्या डोक्यात घातली आणि बाहेरच्या बाजूला पळत सुटले. त्यानंतर आरडा ओरड करण्यास सुरुवात केली आणि वाघ आल्याचे सर्वांना सांगितले. तेवढ्यात भिंतीवरून उडी मारून बिबट्या पसर झाला. घरापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या इमारतीमध्ये बिबट्या घुसल्याचे या आजीबाईंनी सांगितले. तसेच आपण या भागात ४० वर्षांपासून राहत आहोत. इतक्या वर्षात इथं कधीही कोणताही वन्यप्राणी आला नाही. मात्र आज बिबट्या कसा आला याचे आश्चर्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

जुन्नर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गोकुळ कुरकुटे

0
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गोकुळ कुरकुटे यांची तर कार्याध्यक्षपदी रवींद्र पाटे यांची  निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस दत्ता म्हसकर होते.
कार्यकारणी पुढीलप्रमाणे -उपाध्यक्ष इस्माईल सय्यद ,संजय शेटे
सचिव-सचिन कांकरिया
सहसचिव – सुरेश भुजबळ
खजिनदार- पराग जगताप
प्रसिद्धी प्रमुख -लक्ष्मण शेरकर
तक्रार निवारण प्रमुख – दादा रोकडे
आळेफाटा  विभाग प्रमुख – अर्जुन शिंदे,
जुन्नर विभाग प्रमुख – दामोदर जगदाळे
ओतूर विभाग प्रमुख – रामनाथ मेहेर
नारायणगाव विभाग प्रमुख – अतुल कांकरिया तर सल्लागार ज्ञानेश्वर भागवत ,प्रवीण ताजणे,रमेश तांबे यांची एकमताने निवड करण्यात आली.