Home Blog Page 2997

‘मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ च्या तपपूर्ती महोत्सवास प्रारंभ

0
पुणे :
‘मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ चा तपपूर्ती महोत्सवास बुधवार ६ फेब्रुवारी सायंकाळी प्रारंभ झाला.
 पद्मश्री पं. सुरेश तळवळकर,प्रख्यात तबला वादक तसेच  यांची   विशेष उपस्थिती उद्घाटन कार्यक्रमाला होती .  ६ ते ८ फेब्रवारी या कालावधीत हा तपपूर्ति महोत्सव पुण्यात आयोजित करण्यात आला आहे .
या तपपूर्ती महोत्सवात तीन दिवसांचा कलात्म जल्लोष,  सारंग सन्मान प्रदान, स्मरणिका   प्रकाशन आणि कथक नृत्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम दिनांक  ६ ते ८ फेब्रवारी २०१९ दरम्यान  यशवंतराव चव्हाण  नाट्यगृह, कोथरुड येथे  दररोज सायंकाळी ६.४५ वाजता होत आहेत.
‘मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’  च्या संस्थापक-संचालक प्राचार्या अर्चना संजय यांनी स्वागत केले.
६ फेब्रुवारी रोजी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मनीषा साठे, अर्चना संजय या नृत्यगुरूंच्या संरचना ‘अभिव्यक्ती ‘ या नृत्याविष्कारांतर्गत सादर करण्यात आला. ‘ झनक झनक पायल बाजे ‘  गीतावरील वरील नृत्य सादर करण्यात आले.तपपूर्ती वर्षानिमित्त १२ वयाच्या विद्यार्थिनींनी शिववंदना सादर केली.रोहिणी भाटे यांना आदरांजली साठी त्यांची रचना ‘नटवरी त्रिवेणी ‘सादर करण्यात आली. या सर्व नृत्याविष्कारांना चांगला प्रतिसाद मिळाला.’कट्यार काळजात घुसली ‘ संगीत नाटकातील रचना सादर करण्यात आल्या . शेवटी अभिषेक गावडे यांनी ‘तराणा ‘ सादर केला .
७ फेब्रुवारी रोजी महोत्सवाच्या दुसऱ्या  दिवशी ‘अभिजात ‘ या अविष्कारांतर्गत सारंग सन्मान प्रदान समारंभ आणि पंडित राजेंद्र गंगाणी, पंडित योगेश शमसी यांची विशेष प्रस्तुती आयोजित करण्यात आली . यंदाच्या  तपपूर्ती सारंग सन्मानाच्या मानकरी ज्येष्ठ नृत्यांगना पंडिता मनीषा साठे या आहेत.  पद्मश्री  प्रतापराव पवार (चेअरमन, सकाळ माध्यम समूह) यांच्या  हस्ते त्यांना गौरविण्यात येणार आहे.
तपपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन  मुकुंद संगोराम (कलासमीक्षक आणि  संपादक, ‘लोकसत्ता’, पुणे) , मुरलीधर मोहोळ (नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष ) तपपूर्ती सोहळ्याचे स्वागताध्यक्ष ॲड . शीतल चव्हाण (कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासक- वक्ते ) यांच्या हस्ते होणार आहे .
८ फेब्रुवारी रोजी  ‘अभिनव ‘ या अविष्कारांतर्गत  एकल नृत्य प्रस्तुती सादर होणार आहे. त्यात वल्लरी आपटे, सुजाता गावडे, दीक्षा त्रिपाठी, राजश्री  घोंगडे,  सिद्धी पोटे यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे.  समारोप सोहळ्यास   लक्ष्मीकांत देशमुख (माजी  अध्यक्ष, अखिल भारतीय  मराठी साहित्य संमेलन ), कॅप्टन निलेश गायकवाड (स्वागताध्यक्ष, विश्व मराठी साहित्य संमेलन) आणि दिग्दर्शक संजय सिंगलवार यांची उपस्थिती असणार आहे.
६ ते ८ फेब्रुवारी या  तीनही दिवशी नृत्यगुरू अर्चना संजय यांच्या शिष्या कथक नृत्य सादर करणार आहेत. त्यांना चारुदत्त फडके (तबला), समी उल्लाह खान (हार्मोनियम आणि गायन), ,नितीश पुरोहित (सरोद ), रश्मी मोघे (गायन ), तुषार घरत (पखवाज ) संगीत मिश्रा ( सारंगी ) हे साथसंगत करीत  आहेत.

नदीपात्रातील रस्त्यातील अडथळे एक महिन्यात दूर करण्याचे आयुक्तांचे आदेश

0
पुणे-भिडे पुलाकडून नदीपात्रातील रस्त्याने कोथरूड कर्वेनगर ला जाण्यासाठीचा पर्यायीरस्त्यातील वाहतुकीला होणारे अडथळे तातडीने दूर करण्याचे आदेश आयुक्त सौरव राव यांनी येथे दिले .आमदार विजय काळे आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या उपस्थितीत या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत महापालिका आयुक्तांनी  अधिकारी,नागरिक ,आणि जमीन मालक यांची संयुक्तपणे घेतलेल्या बैठकीत हे आदेश दिले .
कर्वे रस्त्यावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी बाबा भिडे पुलाकडून नदीपात्रातील रस्त्याने कोथरूड कर्वेनगर ला जाण्यासाठीचा पर्यायी रस्ता म्हणून दुचाकीस्वार या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात.मात्र हा रस्ता रजपूत वीटभट्टी जवळ अत्यंत अरुंद होतो आणि रोज संध्याकाळी येथे वाहतूक कोंडी होते ज्याचा स्थानिक नागरिकांना आणि वाहनचालकांना ही प्रचंड त्रास होतो.स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकास निधीतून २४ डिसेंबर रोजी भैरवनाथ मंदिराकडून (मेहेंदळे गॅरेज चौकातून ) नदीपात्रात जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी स्थानिक नागरिक तसेच येथील जमीन मालक प्राची शहा यांनी या समस्येबाबत ची माहिती दिली व प्रशासनाने योग्य निर्णय घेतल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन ही दिले.यानंतर नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आमदार विजयराव काळे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना याविषयी जमीनमालक व स्थानिकांची भूमिका सांगितली.
यानंतर आमदार विजयराव काळे यांनी या विषयावर आज महापालिकेत बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी आयुक्त सौरभ राव,अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर,पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर,डी पी चे राजेंद्र राउत,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक आदित्य माळवे,भाजप उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,जमीन मालक प्राची शहा व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
यावेळी ५ महिन्यापूर्वी घेतलेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पुढे काहीच न झाल्याबद्दल आमदार काळे यांनी नाराजी व्यक्त केली व रस्त्याचे महत्त्व समजून घ्यावे व युद्धपातळीवर हे काम केले जावे असे सांगितले.प्राचीताई शहा आणि संदीप खर्डेकर यांनी ” हा रस्ता डी पी त दर्शविल्याप्रमाणे १५ मीटर केल्यास काही घरांचे पुनर्वसन करावे लागेल व येथे एस आर ए होण्यास अडचणी निर्माण होतील हे निदर्शनास आणून दिले.” यावर आयुक्त सौरभ राव यांनी ” हा रस्ता करण्यासाठी येथील सर्व अडथळे दूर करण्यात यावे असे स्पष्ट आदेश देताना त्यासाठी एक महिन्याचा कालावधी निश्चित केला.आमदार विजय काळे यांनी येथील रहिवाशांचे योग्य पुनर्वसन व्हावे व येथील एस आर ए स्कीम ही मार्गी लागावी यासाठीचा आराखडा तयार करावा आणि लवकरातलवकर येथील वाहतूक कोंडीतून सामान्यांची सुटका व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.यास प्राची शहा यांनी ही संमती दर्शविली व सुधारित आराखडा दाखल करु व या महत्त्वाच्या १५ मीटर रस्त्याच्या पूर्ततेसाठी सहकार्य करु असे सांगितले.
आमदार विजय काळे यांची शिष्टाई सफल झाली असून त्यांनी सर्वसमावेशक तोडगा काढला आणि सर्वांचे एकमत घडवून आणले असल्याने ८ वर्षे प्रलंबित असलेला विषय मार्गी लागेल असा विश्वास स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केला.तसेच आपण कोथरूड च्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून आता ह्या विषयाचा दैनंदिन पाठपुरावा करणार असून लवकरच हा रस्ता होइल आणि कोथरूडकरांची एक मोठी समस्या सुटेल असेही त्या म्हणाल्या.

जागवल्या नौशाद अली-मजरुह सुलतानपुरींच्या आठवणी

0
पुणे : तेरी बिंदीया रे… होठो मे ऐसी बात… ऐसे न मुझे तुम… नैन लडजै… लेकर हम दिवाना दिल… गुम है किसीं… अशा एक से बढकर एक गीतांच्या सादरीकरणामुळे ‘तु ही नजरों में…तु ही नजारों में’तुन नौशाद अली-मजरुह सुलतानपुरींच्या आठवणी जागवल्या गेल्या. गायक जितेंद्र अभ्यंकर, अली हुसेन, गायिका मनीषा निश्चल, भाग्यश्री अभ्यंकर यांच्या बहारदार गायनाने यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ‘नौशाद-मजरुह’मय झाले.
प्रसिद्ध संगीतकार नौशाद अली आणि गीतकार मजरुह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दी निमित्त स्वरस्वती, अंतर्नाद आणि महक या संस्थांच्या वतीने ‘तु ही नजरों में…तु ही नजारों में’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पूर्वार्धात १६  उत्तरार्धात १३ गाण्यांच्या मैफलीने रसिक मंत्रमुग्ध झाले. मजरुह सुलतानपुरी आणि नौशाद यांनी अजरामर केलेल्या या गीतांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
मनीषा निश्चल, जितेंद्र अभ्यंकर यांच्यासह भाग्यश्री अभ्यंकर व अली हुसेन यांनी काली घटा, तेरी बिंदीया रे, ओ मेरे दिलके चैन, चला जाता हुं, याद मे तेरी, मोहें पनघट पे, गुम है किसीं, बडे है दिल के काले आदी गाणी सादर केली. लयबद्ध संगीत संयोजन केदार परांजपे यांनी केले. सुलभा तेरणीकर यांच्या आशयपूर्ण निवेदननाने नौशाद-मजरुह यांना प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी रसिकांना दिली. प्रसाद गोंदकर (सतार), रमाकांत परांजपे (व्हायोलिन), विक्रम भट, केदार मोरे (ढोलकी), अभिजित भदे, विशाल थेलकर, विजू मूर्ती, दर्शना जोग, निलेश देशपांडे व बाबा खान यांनी साथसंगत केली.

दिप्ती सती ठरली पहिली ‘लकी’ गर्ल, दिप्तीला मिळालं पहिलं मराठी ‘हिरोइन- इंट्रोडक्शन’ साँग

0

बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नवी हिरोइन लाँच होताना, तिच्यासाठी फिल्ममेकर्सनी खास ‘हिरोइन-इंट्रोडक्शन’ साँग बनवण्याची परंपरा नवी नाही. मात्र मराठी सिनेसृष्टीत एखाद्या अभिनेत्रीने पहिलं पाऊल ठेवताना तिच्यासाठी खास इंट्रोडक्शन साँग बनणे, हे कधी झाले नाही. पण संजय जाधव हे नेहमी आपल्या सिनेमांमधून काहीतरी हटके करण्यासाठी प्रचलित आहेत. त्यामूळेच त्यांनी आपल्या ‘नव्या’ हिरोइनसाठी खास हिरोइन-इंट्रोडक्शन साँग केले आहे.

7 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात सर्वत्र झळकलेल्या लकी सिनेमातली हिरोइन दिप्ती सतीचे हे ‘जी ले जरा’ गाणे नुकतेच सोशल मीडियावरून लाँच झाले आहे. यो (सचिन पाठक) ने लिहीलेल्या गीताला पंकज पडघन ह्यांनी संगीत दिले आहे. आणि शाल्मली खोलगडेने हे गाणे गायले आहे.

ह्या गाण्याविषयी फिल्ममेकर संजय जाधव म्हणतात, “बॉलीवूड आणि तमिळ सिनेमांमध्ये हिरोइनला लाँच करताना, तिचे पहिले गाणे खूप स्पेशल असावे, ह्यावर भर दिला गेलेला मी पाहिलाय. पण मराठीत असे साँग मी पाहिले नव्हते. फिल्ममध्ये लावणीने हिरोइनची एन्ट्री झालेली आहे. पण तिचा पहिला-वहिला सिनेमा असताना तिचे खास इंट्रोडक्शन करण्यासाठी कधी साँग बनवले गेले नव्हते. माझ्या हिरोइनचीही कधी अशी एन्ट्री व्हावी असं मला नेहमी वाटायचं. दिप्ती उत्तम डान्सर आहे. ती कथ्थक आणि भरतनाट्यममध्ये विशारद आहे. तर हिपहॉप आणि फ्री स्टाइल डान्सिंगही तिला खूप चांगली जमते. त्यामूळे मी माझी खूप वर्षांपासूनची ‘हिरोइन-इंट्रोडक्शन’ साँगची इच्छा ‘जी ले जरा’ गाण्याने पूर्ण केली.”

‘जी ले जरा’ गाणे कालाघोडा, मुंबई सीएसटी स्टेशन, चर्चगेट स्टेशन, मुंबई युनिव्हर्सिटी, सोफिया कॉलेज अशा भागांमध्ये चित्रीत झालंय. दिप्ती सतीसोबत ह्या गाण्यामध्ये सूमारे 50 डान्सर्स सहभागी झाले आहेत. ह्याविषयी सिनेमाचे निर्माते सुरज सिंग म्हणतात, “मुंबईतल्या सर्वात जास्त वर्दळ असलेल्या भागात आम्ही हे गाणे चित्रीत करत होतो. हे गाणे जरी आम्ही रविवारी चित्रीत केले असले तरी, ह्या ठिकाणी रविवारी येणा-या पर्यटकांची संख्या जास्त असते. जवळजवळ 3 ते 4 हजार लोकांच्या जमावासमोर न विचलीत होता दिप्ती सतीने ह्या गाण्याचे चित्रीकरणे केले. त्यामूळे मला तिचे कौतुक वाटते. ”

दिप्ती सती म्हणते, “ कोणत्याही अभिनेत्रीसाठी सिनेसृष्टीत असे लाँच मिळणे, हे स्वप्नवत आहे. त्यामूळे मी संजयदादांची खूप ऋणी आहे, की त्यांनी मला एवढ्या धमाकेदार एनर्जेटिक गाण्याने सिनेसृष्टीत लाँच केले.”

ह्या गाण्याच्या चित्रीकरणाविषयी विचारल्यावर दिप्ती म्हणते, “गाण्याचे चित्रीकरण एका दिवसात पूर्ण केले. ह्या गाण्यात माझे बरेच चेंजेसही आहेत. त्यात गाण्याचे कोरीओग्राफर उमेश जाधव होते. त्यांच्या एनर्जीला मॅच करत, डान्स-स्टेप आत्मसात करत, भर-भर कपडे चेंज करत, गाण्याचे चित्रीकरण पूर्ण करणे चॅलेंजिंग होते. पण मला आम्ही ते गाणे वेळेत पूर्ण केले. आणि ते खूप छान आकाराला आलंय, याचे मला खूप समाधान आहे.”

‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकला आहे.

थकीत वीजबिलांच्या वसुलीशिवाय पर्यायच नाही; मोहीम आक्रमकपणे राबवा -संजय ताकसांडे

0

पुणे पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात सध्या थकीत वीजबिलांच्या वसुलीची अतिशय विदारक स्थिती आहे. सातत्याने वीज बिल थकीत ठेवण्याची मानसिकता बदलण्यासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची व वसुलीची मोहीम आक्रमकपणे राबवावी, असे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले.

महावितरणच्या प्रकाशभवनमध्ये पुणे परिमंडलातील सुमारे 1500 अभियंते, अधिकारी व जनमित्रांशी प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी थेट संवाद साधला. यावेळी मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) श्री. शंकर तायडे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. अलोक गांगुर्डे, अधीक्षक अभियंते श्री. सुंदर लटपटे, श्री. पंकज तगलपल्लेवार, श्री. राजेंद्र पवार, उपमहाव्यवस्थापक (आयटी) श्री. एकनाथ चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे म्हणाले, की गेल्या दोन वर्षांपासून पुणे परिमंडलात थकबाकीदारांविरुद्ध कठोरपणे कारवाई सुरु करण्यात आली आहे. मात्र त्यात सातत्य नसल्यामुळे थकबाकी वाढत आहे. आर्थिक कोंडी वाढत आहे. ही विदारक स्थिती बदलण्यासाठी सर्व अभियंते व जनमित्रांनी कोणत्याही परिस्थितीत महावितरणचा एक रुपयाही थकीत राहणार नाही या मानसिकतेप्रमाणे काम करावे व संपूर्ण थकबाकी याच महिन्यात वसुल करावी असे निर्देश त्यांनी दिले. वसुलीच्या कामात हेतुपुरस्सर हयगय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली.

यासोबतच सर्वच 12 विभागांचे अभियंते व जनमित्रांसोबत प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी विभागनिहाय स्वतंत्र बैठक घेतली व संवाद साधला. यामध्ये प्रामुख्याने थकबाकीचा आढावा घेण्यात आला व वसुली संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार विजेचा अनधिकृत वापर करीत असल्यास तात्काळ फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 7 लाख 3 हजार थकबाकीदारांकडून 133 कोटी 52 लाख रुपयांच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम राबविण्यास सुरवात झाली आहे. कार्यकारी अभियंते, सर्व उपविभाग व शाखा कार्यालयप्रमुख, लेखा अधिकारी व कर्मचारी आणि जनमित्रांनी प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत थकबाकीदारांविरुद्ध कठोरपणे कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार क्रेडाईमधील युवा विकसकांना मार्गदर्शन

0

नवी दिल्लीत १३ व १४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय परिषदेचे आयोजन

पुणे :- क्रेडाई नैशनलकडून येत्या  १३ व १४ फेब्रुवारी ला नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडीअम येथे क्रेडाई युथकॉन२०१९चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच ३००० हून अधिक विकासकांसोबत संवाद साधणार आहेत. १३ फेब्रुवारीला केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून  १४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रेडाईमधील युवा विकसकांना मार्गदर्शन करणार आहेत.अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी दिली.ते पुढे म्हणाले कि, क्रेडाई युथकॉन हा क्रेडाईच्या युथविंगचा नाविन्यपूर्ण उपक्रम भारतातील तरुण विकासकांसाठी एक सुयोग्य व्यासपीठ ठरणार आहे. हेच तरुण विकसक भविष्यातील बांधकाम क्षेत्राच्या प्रगतीचे चालक ठरणार आहेत.

यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, महारेराचे अध्यक्ष गौतम चटर्जी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांसारखे मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

परवडणाऱ्या घरे , रेरामुळे बांधकाम क्षेत्रात आलेली पारदर्शकता,पायाभूत सुविधांची प्रगती, भारतीय अर्थव्यवस्थेची सध्य स्थितीचा बांधकाम क्षेत्रावर होणारा परिणाम अशा महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होणार आहे.

क्रेडाई नैशनलचे प्रेसिडेंट (इलेक्ट) सतीश मगर म्हणाले कि, क्रेडाई युथकॉन २०१९ हि भारतातील सर्वात मोठी व भव्य रियल इस्टेट परिषद आहे. भारतातील बांधकाम क्षेत्राच्या विकासाठी क्रेडाई अविरत प्रयत्न करत आहे. यातून भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी अत्यंत लाभदायक वातावरण निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.

प्रदूषण नियंत्रण संशोधनाबद्दल अमोल चाफेकर यांना शिष्यवृत्ती

0
लंडनच्या प्रसिद्ध संस्थेकडून सन्मानित
पुणे – लंडनमधील रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनियरिंग या संस्थेकडून अमोल चाफेकर यांना त्यांच्या प्रदूषण नियंत्रणा संबंधित उल्लेखनीय संशोधनाबद्दल ‘इनोव्हेशन इन पोल्युशन कंट्रोल’ ही शिष्यवृत्ती देण्यात आली. यात ६ महिन्यांसाठी प्रशिक्षण असून २ आठवड्यांचे ऑनसाइट प्रशिक्षण असणार आहे.
 
न्यूटन फंड प्रोग्रामच्या अंतर्गत काही मोजकेच संशोधक या शिष्यवृत्तीसाठी निवडले जातात. भारतातून १५ संशोधक निवडले गेले त्यातले  पुण्याचे अमोल चाफेकर एक आहेत. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून संशोधकांमध्ये उद्योजक क्षमता आणि व्यावसायिकीकरणाच्या कौशल्यांची निर्मिती करण्याचा हेतू होता.
निवड प्रक्रिया अतिशय कठीण होती. त्यांच्या संशोधनाचे कौशल्य, त्यांच्या नवकल्पनाची क्षमता, त्यांच्या संशोधनाचे सामाजिक आणि आर्थिक फायदे या आधारांवर त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली .
 
ही शिष्यवृत्ती फिलीपीन्स, केनिया, दक्षिण आफ्रिका, भारत, पेरू, मेक्सिको, कोलंबिया, ब्राझिल, व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, चिली, चीन, इजिप्त, तुर्की येथील वैज्ञानिक आणि संशोधकांही देण्यात आली आहे.

दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन-12 देशातील प्रतिनिधींचा सहभाग

0

पुणे :वाय अ‍ॅण्ड एम अंजूमन खैरूल इस्लामच्या पूना कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स वतीने ‘न्यू ट्रेंडस् इन कॉमर्स, इकॉनॉमिक्स, बँकींग, कोऑपरेशन, मॅनेजमेंट, कॉम्पुटर सायन्स, आय टी अ‍ॅण्ड एन्हार्यनमेंट’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी ही परीषद सेमिनार हॉलमध्ये होणार आहे, अशी माहिती डॉ. आफताब अन्वर शेख (प्राचार्य, पूना कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स) यांनी पत्रकाद्वारे दिली.

उद्या शुक्रवार, दिनांक 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता परिषदेचे उदघाटन होणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ च्या सहकार्याने आयोजित या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत 12 देशातून 300 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये बाहरीन, मोझांबिक, इराक, अफगाणिस्तान, नामिबीया, नायझेरियन, यामेन, युएसए, जर्मनी, श्रीलंका, थायलंड, रवांडा या देशांचा समावेश आहे.

वाणिज्य, अर्थशास्त्र, बँकिंग, सहकार, व्यवस्थापन, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि पर्यावरण या क्षेत्रातील सर्वात प्रभावी आणि प्रचलित ट्रेंडचा आढावा घेणे तसेच विविध देशांतील तज्ञ आणि प्रतिनिधींना एकत्र आणणे हा या परिषदेचा प्रमुख हेतू आहे.

डॉ. आब्बास लोखंडवाला (कॉमर्स अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर विभाग प्रमुख), नसरीन परवेज खान आणि वाफीया वाहिद हे परिषद संयोजन समितीमध्ये आहेत.

या परिषदेमध्ये वनिडा वडीचारोइन (थाई – नीचि इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुआनुंग, बँकॉक), डॉ. रविंद्र डिसानायके (मार्केटींग मॅनेजमेंट विभाग केलॅनिया विद्यापीठ, श्रीलंका), क्लेरन्स फर्नांडीस (रूवांडा रेनेसान्स चे अध्यक्ष), चित्राल बेनिल्डस फर्नांडो(श्रीलंका), प्रा. मॅपा थिलकार्तने (केलॅनिया विद्यापीठ, श्रीलंका) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘१३ पॉईंट रोस्टर’प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तीव्र निदर्शने

0

पुणे : नोकर भरतीत १३ पॉईंट रोस्टर पद्धत लागू करण्याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (ए) जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंद आंदोलनावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ससून रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार करून घालून आंदोलनाला सुरुवात झाली. आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत आंदोलन केले.

या आंदोलनात पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनावणे, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, नगरसेविका हिमाली कांबळे, सुनीता वाडेकर, सोनाली लांडगे, महिला आघाडीच्या शशिकला वाघमारे, प्रियदर्शिनी निकाळजे, बसवराज गायकवाड, नीलेश आल्हाट यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. तहसीलदार हेमंत निकम यांनी हे निवेदन स्वीकारले. तर कार्यकर्त्यांवरील ३५३ कलमांतर्गत दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे निवेदन पोलीस उपयुक्त मितेश घट्टे यांनी स्वीकारले.

डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “पूर्वीच्या २०० पॉईंट रोस्टर पद्धतीमुळे अनुसूचित जाती जमातींना व ओबीसीला ४९ टक्के मिळत होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १३ पॉईंट रोस्टर पद्धती लागू झाल्यास एससी, एसटी व ओबीसींना लाभ मिळणार नाही. परिणामी समाजात बेकारी वाढेल. त्यामुळे ही १३ पॉईंट रोस्टर पद्धती लागू करू नये. तसेच केंद्र शासनाने अध्यादेश काढून या नोकर भरतीला स्थगिती द्यावी. तसेच सदरची नोकरभरती पूर्वीप्रमाणे २०० पॉईंट रोस्टरनुसार करावी”

बाळासाहेब जानराव म्हणाले, “आंबेडकरी कार्यकर्त्यांवर विनाकारण गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अनेकांवर ३५३ अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.” परशुराम वाडेकर, शशिकला वाघमारे यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले.

मोदी भागिले दीदी = मोदी … परेश रावलचा हिसाब …

0

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असा वाद चर्चेत आला आहे. या वादावरुन भाजपाचे नेते आणि अभिनेते परेश रावल यांनी एक टि्वट केले आहे.

परेश रावल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी गणित मांडले आहे. मोदी आणि दीदी नावांचा भागाकार (मोदी/दीदी = मोदी) केला आहे. तसेच, फोटोला ‘हिसाब बराबर’ अशी कॅप्शन दिली आहे. दरम्यान, परेश रावल यांच्या ट्विटला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 2300 लोकांनी रिट्विट केले आहे. तर 9700 लोकांनी लाईक केले आहे. याशिवाय काही लोकांनी त्यांच्या गणित ज्ञानाविषयी आक्षेप घेतला आहे.

दरम्यान,  गेल्या रविवारी शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बंगालमध्ये मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. या प्रकारानंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि सीबीआयविरोधात आंदोलनास सुरुवात केली होती.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. 2016 पासून हा संघर्ष सुरू झाला. केंद्र आणि राज्य सरकारमधील या संघर्षाची ठिणगी एका घोटाळ्यामुळे पडली. 2013 मध्ये हा घोटाळा उघडकीस आला. शारदा चिट फंड नावानं ओळखल्या जाणाऱ्या या घोटाळ्यात तृणमूलच्या अनेक नेत्यांची नावे समोर आली. सत्ताधाऱ्यांच्या आशीवार्दामुळेच हा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाने अनेकदा केला.

दत्तक मुलींना विसरली प्रीती झिंटा, त्यांचा खर्च करत नाही अन भेटत हि नसल्याचा आरोप

0

प्रीती झिंटाने 10 वर्षापुर्वी म्हणजेच 2009 मध्ये 34 मुलींना दत्तक घेतले होते आणि त्यांचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली होती. पण आता वृत्त आहे की, प्रीती आपल्या या दत्तक घेतलेल्या मुलींना विसरली आहे. ती कधीच त्यांची विचारपूस करायला जात नाही आणि त्यांचा खर्चही देत नाही. उत्तराखंडाच्या ऋषिकेशमध्ये शीशम झाडी येथील मदर मिरेकल स्कूलच्या संस्थापिका शाइला इत्तेफाम यांनी सांगितल्यानुसार, 34 मुलींचे पालन पोषण आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे वचन देऊन प्रिती आता विसरली आहे.

– शाइना  म्हणते की, प्रीती अनेक वर्षांपासून शाळेतही आलेली नाही. तिच्या वागण्यामुळे स्कूल मॅनेजमेंट नाराज आहे.
– लग्नापुर्वी 2009 मध्ये प्रितीने आपल्या 34 व्या वाढदिवशी शाळेत शिकणा-या विद्यार्थिनींना दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी तिला परवाणगी देण्यात आली होती. तिने अनाथ मुलींना दत्तक घेतले होते. लग्नानंतर ती आपल्या पतीसोबत येथे आली होती. शाइना म्हणते की, काही वर्षापुर्वी ती शाळेत आली, तेव्हा फक्त मुलींसोबत फोटो काढून निघून गेली.

– हम बने तुम बने- देणार पालकत्वाचे धडे

0
हल्लीच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याने सगळ्याच क्षेत्रात अव्वल असावं या अपेक्षेपायी पालकांकडून त्यांचं बालपणच हिरावून घेतलं जातं. आज हा क्लास तर उद्या तो क्लास. तारेवरची ही कसरत करताना मुलं कमी पडली तरी ओरडा बसतो… पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली ही मुलं दबून गेली आहेत. या सगळ्यामुळे नकळत पालक – मुलांमध्ये एक दरी निर्माण झाली आहे.
सातत्याने वेगळे विषय हाताळत समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोनी मराठीने हम  बने तुम बने . च्या एका भागात याच विषयाभोवती मालिकेची कथा गुंफली आहे. जिथे कमी मार्क मिळाले, आता घरी ओरडा पडणार म्हणून रेहा सईच्या रिपोर्ट कार्डवर तिच्या बाबांची खोटी सही करते. ही गोष्ट घरी कळल्यावर तुलिका सईवर चिडते. हर्षदाचा संताप अनावर होतो आणि ती रेहावर हात उगारते तर दुसरीकडे आईसाहेब मुलांवर हात उचलल्यामुळे आपल्या सूनांवर चिडतात.
या एकंदर गोष्टीचा शेवट काय होणार? कमी मार्क मिळालेला रिपोर्ट कार्ड आपल्याला दाखवताना आपल्या मुलीला भिती का वाटली? आपल्यातला संवाद कमी झाला आहे का? नात्यांमध्ये वाढलेलं अंतर बने कुटुंबीय कमी करू शकणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी नक्की पहा येत्या ७ फेब्रुवारीला ह.म.बने तु.म.बने, एक तासाचा विशेष भाग रात्री १० वाजता, फक्त सोनी मराठीवर

सरंजामेचा खरा चेहरा लवकरच येणार सगळ्यांसमोर

0

झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एक अतूट नाते तयार झाले आहे.मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिकाटि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे. या मालिकेमधील विकिशाचं म्हणजेच विक्रांत आणि इशा यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती.सर्व प्रेक्षकांना ज्या लग्नाचे वेध लागले होते तो नवीन वर्षातील पहिलाच शाही लग्नसोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला.निमकरांची इशा सरंजामेंच्या मोठ्या घरात लग्न करून आली आणि रुळली.

सगळं चांगलं चालू असताना आता मालिका एक रंजक वळण घेणार आहे. मालिकेतील जालिंदरची व्यक्तिरेखा वेगवेगळ्यापद्धतीने ईशाला वेळोवेळी सावध करताना प्रेक्षकांनी पाहिली आहे. मालिकेचा नुकताच एक प्रोमो रिलीज झाला आणि त्यामुळेजालिंदरच्या म्हणण्यात तथ्य आहे कि काय अशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण होईल. या प्रोमोमध्ये विक्रांतचा एक वेगळाचचेहरा प्रेक्षकांच्या समोर आला. विक्रांतने त्याच्या स्वार्थासाठी ईशाशी लग्न केल्याचं समोर येतं. पण विक्रांतने असं का केलं?त्याच्या अशा वागण्याचं कारण काय आहे? यासगळ्यामागे त्याचा स्वार्थ काय आहे? या सर्व प्रश्नांचा उलगडा मालिकेच्यायेत्या काही भागात होईल आणि हे पाहणं खूप रंजक ठरेल यात शंकाच नाही.

ऋतुजा जोगदंड ची अंतर भारतीय नेटबाँल संघात निवड

0
पुणे-नवी सांगवी येथील कु.ऋतूजा जोगदंड हि मॉडर्न  महाविद्यालयाची विद्यार्थीनी असून तिनें पूणे जिल्हा स्तरीय खेळली  होती .त्यानंतर तिची नगर येथे झालेल्या विभागीय  स्पर्धेतही तिची निवड झाली, होती .त्यानंतर निवडी चे पत्र  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील  नाशिक, येवला,राजगुरूनगर, पुणे,अकोले, पिंपरी चिंचवड, विविध महाविद्यालयाच्या प्राचार्य यांना देण्यात आले. यावेळी राज्यातील विविध.महाविद्यालयातून  12 विद्यार्थ्यांनीची निवड करण्यात आली.आकुर्डी येथील प्रा रामकृष्ण मोरे या महाविद्यालयाची कू  विशाखा पलांडे या विद्यार्थिनी पण या संघात निवड झाली आहे.फेब्रुवारीत चेन्नईत 20 ते 23 तारखेला होणाऱ्या स्पर्धेत देशपातळीवर ऋतुजा जोगदंड खेळणार आहे.  कोणत्याही प्रकारची घरामध्ये क्रिडा वातावरण नसताना तिची निवड झाल्याने प्राचार्य डॉ. राजेंद्र झुझाराव व तिचे वडील मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड व अध्यक्ष विकास कूचेकर यांनी तिचे कौतुक केले. तिला क्रिडा शिक्षक विक्रम फाले यांचे बहूमोल मार्गदर्शन मिळाले. तिचे आतराष्टी्य पातळीवर खेळण्याचे स्वप्नं आहे असे तीने यावेळी  सांगितले.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित

0

मुंबई – सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या घोषणेचा शासन निर्णय आज प्रसिध्द करण्यात आला.
नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, मराठी चित्रपट, किर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत, तमाशा, लोककला या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना प्रतिवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन १९७६ पासून सदरील पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री, विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील गठित समितीने २०१८ च्या पुरस्कारांसाठी खालील मान्यवरांची शिफारस केली होती.
पुरस्काराचे रु. १ लाख रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे स्वरुप असून नाटक विभागासाठी श्री रवी पटवर्धन, कंठसंगीतासाठी, श्रीमती माधुरी विश्वनाथ ओक, उपशास्त्रीय संगीतासाठी श्री. श्याम देशपांडे, मराठी चित्रपटासाठी श्रीमती उषा नाईक, कीर्तनासाठी ह.भ.प.विनोदबुवा खोंड, शाहिरीसाठी शाहीर विजय जगताप, नृत्यासाठी श्रीमती माणिकबाई रेंडके, आदिवासी गिरीजनसाठी श्रीमती वेणू बुकले, वाद्यसंगीतासाठी पं.प्रभाकर धाकडे, तमाशासाठी श्रीमती चंद्राबाई अण्णा आवळे, लोककलेसाठी श्री मोहन कदम आणि कलादानसाठी श्री. श्रीकांत धोंगडे  यांना हा पुरस्कार जाहिर झालेला आहे.  पुरस्कार प्राप्त सर्व कलाकारांचे सांस्कृतिक कार्य मंत्री, श्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.