Home Blog Page 2996

काँग्रेस, राष्ट्रवादीने बगलबच्चे मोठे केले: पंकजा मुंडे

0

पुणे- राज्यभर विरोधक भारतीय जनता पार्टीवर आरोप करत सुटले असल्याचे दिसत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सत्तेच्या काळात स्वत:ची घरे भरली. बगलबच्चे मोठे केले; परंतु भाजपने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांना मोठे करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले. दलालांची फौज बंद केली, अशी टीका राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली.

गावजत्रा मैदान, भोसरी या ठिकाणी आ. महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून शिवांजली सखी मंचच्या माध्यमातून पूजा महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित ‘इंद्रायणी थडी’च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, माजी महापौर नितीन काळजे, प्रदेश सचिव उमा खापरे, सुनील शेळके, विजय फुगे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांना राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, माता रमाबाई आदी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले.

कृष्ण हे महाभारतामध्ये कौरवांच्या मागे नव्हे; तर पांडवांच्या माध्यमातून धर्माच्या पाठीमागे उभे राहिले होते. जनतारूपी कृष्ण हा भाजपच्या पाठीमागे असल्याचा विश्‍वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संरक्षणमंत्रिपदी एका महिलेची निवड करून खर्‍या अर्थाने स्त्रीशक्तीला मोठे करण्याचे काम केले आहे.

त्यांचाच आदर्श घेऊन राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षम करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. बचत गटाची शक्ती आम्ही ओळखली असल्याने महाराष्ट्रात बचत गटांना मोठे करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले असून, 8 जिल्ह्यांवरून 26 जिल्ह्यांत महिला बचत गट सक्षम केले असल्याचा विश्‍वास मुंडे यांनी या वेळी व्यक्त केला.

गोपीनाथ मुंडे यांचे भोसरीवर प्रेम होते. आ. महेश लांडगे हे कमळ चिन्हावर निवडणूक लढले नसले, तरीही ते सध्या आमच्याबरोबर असल्याने ते आमचे मित्र आहेत. मुंडेसाहेब आज असते, तर त्यांना निश्‍चित त्यांनी ताकद दिली असती; मात्र त्यांच्या पश्‍चात त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तसेच राज्यातील वंचित घटकांचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने आ. लांडगे यांना निश्‍चित ताकद देणार आहे, असा आशावाद मुंडे यांनी व्यक्त करत ‘इंद्रायणी थडी’च्या माध्यमातून स्त्रीशक्तीला प्रबळ बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केल्याबद्दल आ. महेश लांडगे, पूजा लांडगे यांचे मुंडे यांनी आभार व्यक्त करीत महिलांच्या प्रगतीसाठी मी आणि माझे सरकार निश्‍चित प्रयत्न करील, असे प्रतिपादन केले.

या वेळी बोलताना महेश लांडगे म्हणाले की, इंद्रायणीच्या पवित्र काठावर राहणारी आपण माणसे आहोत. संत ज्ञानेश्‍वर माउली आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा सांप्रदायिक वारसा आपण जपत आहोत. त्यामुळे याला ‘इंद्रायणी थडी’ असे नाव देण्यात आले असून, महिलांना व्यासपीठ निर्माण होण्यासाठी ही थडी भरविण्यात आली आहे. प्रास्ताविक महिला बालकल्याण सभापती स्वीनल म्हेत्रे यांनी, तर आभार महापौर राहुल जाधव यांनी मानले.

पुणं स्मार्ट झालं कि भाजप वाले स्मार्ट झाले ? अशोक चव्हाणांचा सवाल (व्हिडीओ)

पुणे- ..स्मार्ट पुण्याचं भूमिपूजन ,उद्घाटन यांनी केलं …पण स्मार्ट कोण झालं …? पुण्याचा बट्ट्याबोळ यांनी केला ..अशा स्थानिक प्रश्नांवर बोलत ‘ चाय वाले का ड्रामा अब 2 महिनेसे ज्यादा नही चलेगा’असा इशारा प्रदेशकॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे दिला .भवानीपेठेत त्यांची आज सायंकाळी जाहीर सभा झाली .सभेला नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती .कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील ,पुणे कॉग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे ,बाळासाहेब शिवरकर,नगरसेवक अविनाश बागवे ,आ.शरद रणपिसे ,मोहन जोशी ,अभय छाजेड,आबा बागुल, अरविंद शिंदे , मनीष आनंद ,कमल व्यवहारे ,अजित दरेकर ,उल्हास पवार ,रफिक शेख ,विठ्ठल थोरात शेखर कपोते ,राजेंद्र भुतडा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .


पुण्यातील हेल्मेट सक्ती वर यावेळी भाष्य करताना अशोक चव्हाण म्हणाले , रस्त्यांची ,वाहतुकीची यांनी वाट लावली , मुबलक पाण्याचं नियोजन करता आलं नाही आणि हेल्मेट सक्ती लादली . यामुळे भाजपवाल्यांच्या डोक्यावर एवढी दगडं पडतील कि त्यांना हेल्मेट घालूनच बाहेर पाडाव लागेल अशी स्थिती येवू शकते . पुणे तिथे सारे उणे अशी स्थिती करून ठेवलेल्या भाजपने स्मार्ट पुण्याच्या प्रकल्पांच उद्घाटन केलं पण पुणेकरांच्या हाती काय आलं ? मोदींनी फसव्या घोषणा देवून सत्ता मिळविली त्यानंतर पेट्रोल डीझेल , गॅस चे दर त्यांनी कमी केले काय ? आता यांचा ड्रामा फार काळ चालणार नाही . त्यांच्या फायद्यासाठीच ते लोकसभा आणि विधानसभा एकत्रित घेतील .कॉंग्रेस पक्ष ..निवडणुका एकत्र व्होवो वा वेगळ्या व्होवो दोन्हीला तयार आहे . आणि जोपर्यंत हे सरकार पायउतार होत नाही तोपर्यंत कॉंग्रेसचा संघर्ष सुरूच राहील असे हि चव्हाण म्हणाले .

मनसे आणि एमआयएमला आघाडीमध्ये “नो” एन्ट्रीच -कॉंग्रेसची भूमिका

0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने जरी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेला जागा सोडण्याची तयारी दर्शवली, तरीही त्याला आमचा प्रखर विरोध राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मनसे आणि एमआयएमला आघाडीमध्ये “नो” एन्ट्री आहे, हे दोन्ही पक्ष आम्हाला चालणार नाहीत, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिले आहे. दुसरीकडे, बहुजन वंचित आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे, अशी आमची इच्छा आहे. यासंबंधीचा प्रस्ताव अॅड. प्रकाश आंबेडकर यांना दिला असून त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पहात असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खा. चव्हाण बोलत होते. यावेळी माजी खासदार एकनाथराव गायकवाड,  शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

अशोकरावांना भविष्य वर्तवण्याची सवय; मुख्यमंत्र्यांचा टोला

0

मुंबई- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांनी चिमटा काढला आहे. अशोकरावांना भविष्य वर्तवण्याची सवय जडली आहे. त्यांच्याकडे सध्या पक्षाचे काम उरलेले नाही’, असा टोला त्यांनी लगावला.28 फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूकही घेतली जाईल, त्यामुळे कामाला लागा, असे भाकित अशोक चव्हाण यांनी केले होते. चव्हाणांच्या भाकितावर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. प्रशासनात आणि राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधक अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत.अशोक चव्हाणांचे वक्तव्य देखील तोच प्रकार आहे. चव्हाणांचे भाकित चुकीचे आहे. राज्य सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, विधानसभा बरखास्त होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पायाखालची जमीन सरकल्याने चव्हाण यांनी मत मांडले असावे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच म्हणजेच 28 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा भंग करतील आणि लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूक होईल. त्यांची तयारी सुरू असल्याचे भाकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. गुरुवारी सायंकाळी औरंगाबादेतील राजीव गांधी मैदानावर काँग्रेसची सभा झाली त्या वेळी त्यांनी हे भाकीत वर्तवले.ते म्हणाले, दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याची तयारी सुरू आहे. म्हणून फडणवीस विधानसभा मुदतीपूर्वीच गुंडाळतील. आपण सज्ज असले पाहिजे. याबद्दलचा अधिक तपशील मात्र चव्हाण यांनी दिला नाही. ते म्हणाले की, या वेळी पुन्हा केंद्रात मोदी सरकार आले तर त्यानंतरच्या पाच वर्षांनी आपल्याला मतदानाचाही अधिकार शिल्लक राहणार नाही. गेल्या वेळी त्यांनी भरपूर घोषणा केल्या होत्या. आता येत्या काही दिवसांत पुन्हा घोषणांचा पाऊस पडेल.

४४५ किल्ल्यांच्या संवर्धनासाठी रायगडावर एक दिवसीय दुर्ग परिषद

0

खासदार छत्रपती संभाजी राजे यांची माहिती
मुंबई – प्रतिनिधी
राज्यात जवळपास ४४५ किल्ले असून यातील फक्त ४५ किल्ले केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या पुरातत्व विभागाकडून आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पुरातत्व विभागाकडून ३३ किल्ल्यांचे संवर्धन केले जाते. मात्र उर्वरीत ३३२ किल्ल्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. या सर्वच किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी येत्या ११ फेब्रुवारी २०१९ रोजी रायगड किल्ल्यावर दुर्ग परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रायगड किल्ला विकास प्राधिकरणचे अध्यक्ष आणि खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिली.
या परिषदेच्या निमित्ताने केंद्रीय पुरातत्व खाते, राज्य पुरातत्व खाते, वनविभाग आणि पोलिसा दलातील अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच एकत्रित आणण्यात येणार आहे. तसेच पर्यटन मंत्री जयकुमार रावल, रायगडचे पालक मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह काही अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर दुर्ग संवर्धन आणि जतनासाठी काम करणाऱ्या २०० शिवभक्तांच्या संघटनांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. या सर्वांच्या सूचना या परिषदेत ऐकून त्यानुसार किल्ल्यांचे संवर्धन आणि जतनासाठी काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रायग़ड किल्ला आणि परिसरासराठी ६०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी २८ कोटी रूपयांच्या फरसबंदीचे काम सध्या सुरु आहे. पन्हाळा, देवगिरी, शिवनेरी, सोलापूरचा भुईकोट किल्ला, सिंधूदूर्ग किल्ला यासह १५ किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी केंद्रीय वित्त आयोगाकडे १५० कोटी रूपयांची मागणी केली. यापैकी १० किल्ल्यासाठी पैसे देण्याचे वित्त विभागाने मान्य केल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यपरिस्थितीत रायगड किल्ल्यावरील ८०० पायऱ्यांच्या डागडूजीचे काम पूर्ण झाले आहे. आणखी ९०० पायऱ्यांचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. याशिवाय रायगडावर संगीत व लाईट शोचे आयोजनही करण्यात येणार आहे. याशिवाय रायगडाच्या पायथ्याशी ८८ एकरच्या जमिनीवर छत्रपतीं शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वस्तूंचे वस्तु संग्रहालय उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशभरात महाराष्ट्रात धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी ‘ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे’च्या पाहणीतला निष्कर्ष

0

– आरोग्यमंत्र्यांची माहिती

·‘तंबाखू मुक्त शाळा’ अभियानांतर्गत 2 हजार 755 शाळा तंबाखू मुक्त

·महिला व पुरुषांच्या तंबाखू सेवनाच्या प्रमाणात घट

·जिल्हास्तरावर 309 तंबाखू मुक्ती केंद्राची स्थापना

·6 हजार 324 जणांनी बंद केले तंबाखू सेवन

मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे (GATS-2) 2016-17 नुसार देशभरात महाराष्ट्रमध्ये धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणानुसार धूम्रपान करण्याचे प्रमाण 3.8 इतके असून ते अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. महाराष्ट्रात धूम्रपान 2.1 टक्क्याने आणि धुम्रविरहित तंबाखू सेवनात 3.1 टक्क्याने घट झाल्याचे आढळून आले आहे. ‘तंबाखू मुक्त शाळा’ अभियानांतर्गत 2 हजार 755 शाळा तंबाखू मुक्त करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राष्ट्रीय कौटुंबीक आरोग्य पाहणीमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात राज्यात तंबाखू सेवनाच्या प्रमाणात सन 2005-06 ते 2015-16 मध्ये घट आढळून आली आहे. सन 2005-06 मध्ये स्त्रीयांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण 10.5 होते ते आता 5.8 टक्के तर सन 2005-06 मध्ये पुरुषांमधील तंबाखू सेवनाचे प्रमाण 48.3 टक्क्यावरुन 36.6 टक्क्यावर आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावर 309 तंबाखू मुक्ती केंद्राची स्थापना केली आहे. त्यामार्फत तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती तसेच समुपदेशन जिल्हा व तालुकास्तरावर केले जात आहे. डिसेंबर 2018 अखेर 1 लाख 42 हजार जणांचे समुपदेशन करण्यात आले असून त्यापैकी 6 हजार 324 लोकांनी तंबाखू सेवन बंद केले आहे. राज्य शासन, सलाम मुंबई फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थाबरोबर जिल्हा, तालुका व गावपातळीवर ‘तंबाखू मुक्त शाळा’ हे अभियान राबवत आहे. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 2 हजार 755 शाळा तंबाखू मुक्त केल्या आहेत.

सर्व आरोग्य संस्था व कार्यालये तंबाखू मुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असून आतापर्यंत एकूण 804 आरोग्य संस्था तंबाखू मुक्त करण्यात आल्या आहेत. राज्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. ‘कोटपा’ कायद्यांतर्गत विविध कलमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कार्यवाही करुन डिसेंबर 2018 अखेर राज्यात 15 लाख 39 हजार 174 रुपये एवढा दंड वसूल केला आहे.

तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीरीत्या राबविण्यासाठी आरोग्य विभागाला संबंध हेल्थ फाऊंडेशन, सलाम बॉम्बे फाऊंडेशन, टाटा मेमोरीअल हॉस्पिटल आदी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळत आहे. राज्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे काम चांगले सुरु असून गॅट्‌स-2 च्या सर्वेक्षणामध्ये त्याचा प्रभाव दिसून येत आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

‘टी अँड एच’ ब्रँडचा भारतात विस्तार करण्याची योजना-जोआना ब्राऊटिन भारताच्या दौऱ्यावर

0

व्यक्तीमत्त्वाची चिरंतन छाप उमटवण्यासाठी सौंदर्यवर्धन करणे हा एखाद्याच्या दैनंदिन कार्यक्रमातील अविभाज्य भाग असतो आणि ते काम ‘ट्रुफिट अँड हिल’ (टी अँड एच) या लक्झुरियस बार्बरशॉप ब्रँडइतके उत्कृष्ट कुणीच करत नाही. ब्रिटनमधील महान राजांची सेवा केल्यानंतर ‘टी अँड एच’ तीच अजोड सेवा आणि आतिथ्य भारतभर व जगभर पुरवत आहे. भारतात हा ब्रँड ‘लॉइड्स लक्झरीज प्रायव्हेट लिमिटेड’चे कृष्णा गुप्ता व इस्तयाक अन्सारी यांनी सन २०१३ मध्ये भारत, नेपाळ, म्यानमार, भूतान, श्रीलंका, बांगलादेश व व्हिएतनाम या देशांसाठीची मास्टर फ्रँचायसी लायसन्सेस प्राप्त करुन आणला. त्यानंतर प्रथमच ‘ट्रुफिट अँड हिल’ ग्लोबलच्या कार्यकारी संचालक जोआना ब्राऊटिन या केटी व ॲलिस ब्राऊटिन यांच्या समवेत भारताच्या दौऱ्यावर आल्या असून ‘टी अँड एच’ ब्रँडचा भारतात व जगात विस्तार करण्याची योजना त्यांनी आखली आहे.

यानिमित्त बोलताना इस्तयाक अन्सारी म्हणाले, भारतातील सौंदर्यवर्धन बाजारपेठेने पुरूषांच्या गरजांकडे बराच काळ दुर्लक्ष केल्याने ती मोठ्या संधींपासून दूर राहिली आहे. सुंदर दिसणे हे केवळ स्त्रियांचेच अधिकारक्षेत्र राहिले नसून आता पुरूष व महिला दोघेही आरशापुढे उभे राहून सौंदर्यवर्धन करतात. शहरी मध्यमवर्गीय लोकसंख्येतील वाढ आणि लहान शहरांमधील सुधारित वितरण चॅनल्स हेसुद्धा सन २०२० पर्यंत या क्षेत्राच्या प्रगतीला मोठी चालना देण्याची अपेक्षा आहे. यातून ‘टी अँड एच’ ब्रँडला आपली सर्वोत्तम सौंदर्य निगा उत्पादने व सेवा भारतातील विविध शहरांत वाढवण्याच्या भरपूर संधी आहेत. जोआना ब्राऊटिन यांचे भारतात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. त्या आता ‘टी अँड एच’साठी प्रगतीच्या संधी शोधणार असून पुरूषांच्या सौंदर्यवर्धन बाजारपेठेत विस्ताराची व्यूहरचना आखत आहेत.

जोआना ब्राऊटिन यांनी ‘ट्रुफिट अँड हिल’मध्ये कॉर्पोरेट रि-पोझिशनिंग प्रक्रिया सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या प्रक्रियेअंतर्गत त्यांनी या ब्रँडच्या विपणन व्यूहरचनेत क्रांतिकारी बदल घडवले, कंपनीची प्रतिमा व ब्रँडच्या स्थितीकडे लक्ष पुरवले, तसेच उत्पादन संच आणि उत्पादनाचे पॅकेजिंग व सादरीकरण करण्याच्या शैलीचीही मोठ्या प्रमाणात फेररचना केली. या प्रक्रियेच्या यशातून ब्रँडची प्रचंड विश्वसनीयता निर्माण झाली, ज्याची लाभदायक फळे आजही ‘ट्रुफिट अँड हिल’ला मिळत आहेत. ‘ट्रुफिट अँड हिल’ ही जगातील पुरूष सौंदर्यवर्धन क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक बनली असून त्यातूनच तिचा युनायटेड किंग्डम (युके) व आंतरराष्ट्रीय बाजारपेठा दोन्हींत झपाट्याने विस्तार झाला आहे. आजघडीला ‘टी अँड एच’ची उत्पादने जगभर विकली जातात आणि ‘टी अँड एच’च्या बार्बरशॉप्सची संख्याही सातत्याने वाढत चालली आहे. ही आऊटलेट्स लंडन, कॅनडा, अमेरिका, मलेशिया, थायलंड, सिंगापूर, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, अझरबैजान, तसेच पश्चिम आशिया व दक्षिण कोरियामध्ये आहेत आणि लवकरच युरोपमध्येही आणखी स्टोअर्स उघडली जाणार आहेत.

ट्रुफिट अँड हिल’विषयी

‘ट्रुफिट अँड हिल’च्या गौरवशाली इतिहासाला वर्ष १८०५ मध्ये म्हणजे हिज मॅजेस्टी किंग जॉर्ज तृतिय यांच्या राजवटीत प्रारंभ झाला. तेव्हापासून त्यांच्या ग्राहकवर्गात राजघराण्यातील पुरुषांचा आणि शाही पाहुण्यांचा समावेश झाला. ‘ट्रुफिट अँड हिल’चे केशकर्तनकार हिज रॉयल हायनेस, ड्यूक ऑफ एडिंबर्गचे राजपरवानापत्र बाळगतात. ‘ट्रुफिट अँड हिल’ने आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सौंदर्यवर्धन उत्पादने व सेवा पुरवल्या आहेत. त्यांच्या उच्चभ्रू ग्राहकवर्गात उद्योजक, संसद सदस्य, राजदूत व मुत्सद्दी व आमंत्रित नामवंतांचा समावेश आहे. ऑस्कर वाइल्ड, चार्ल्स डिकन्स, लॉर्ड बायरन, फ्रँक सिनात्रा, विन्स्टन चर्चिल, आल्फ्रेड हिचकॉक व लॉरेन्स ऑलिव्हिए ही या ग्राहकांतील काही प्रसिद्ध नावे होत. लंडनखेरीज ‘ट्रुफिट अँड हिल’ची लक्झुरियस बार्बरशॉप्स शिकागो, टोराँटो, बीजिंग, क्वालालुंपूर, सिंगापूर, बँकॉक, बाकू येथे आहेत, तर भारतातील ११ शहरांत १९ बार्बरशॉप्स आहेत.

‘ट्रुफिट अँड हिल’तर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट व आगळ्या सेवांमध्ये रॉयल शेव्ह अँड हेअरकट, क्लासिक शेव्ह अँड हेअरकट, अन्य हेअर ट्रिटमेंट्स, रॉयल मॅनिक्युअर अँड पेडिक्युअर, हेड मसाज, फेशियल्स आदींचा समावेश आहे, प्रत्येक भेटीत कॉम्प्लिमेंटरी वॅलेट सर्व्हिसेस, वाय-फाय, रिफ्रेशमेंट्स अशा सुविधांचा समावेश आहे. त्यांच्याकडे खास प्रसंग, व्यावसायिक बैठका अथवा निव्वळ आरामदायी अनुभूतीसाठी ‘रॉयल सूट’ नावाची खास व्हीआयपी रुमही सज्ज आहे.

ट्रुफिट अँड हिल ग्राहकांना उत्कृष्ट सौंदर्यवर्धन उत्पादने देते, ज्यात खास प्री-शेव्ह ऑइल, शेव्हिंग क्रिम, कलोन्स व आफ्टरशेव्हज्, बाथ अँड बॉडी प्रॉडक्ट्स, शॅम्पू व कंडिशनर, शेव्हिंग किट्स आदींचा समावेश आहे.

राज्याच्या ई पीक पाहणी पथदर्शी प्रकल्पाकरीता पुणे महसूल विभागातून बारामती तालुक्याची निवड

0

बारामती :  – शेतकरी सक्षमीकरणाकरीता पीक पेरणीची माहिती  मोबाईलवर ॲपद्वारे  गाव नमुना नं.१२ मध्ये शेतक-यांनी स्वत:  नोंदविण्याचा प्रकल्पांतर्गत ई पिक पाहणी ( Mobile App) कार्यशाळेचे आयोजन येथील कवी मोरोपंत नाटयगृह येथे करण्यात आले होते. यावेळी प्रकल्प सल्लागार टाटा ट्रस्टचे  श्री.नरेंद्र कवडे (से.नि. भा.प्र.से),        ई फेरफार राज्य समन्वयक जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणेचे श्री.रामदास जगताप, प्रांताधिकारी हेमंत निकम, उपविभागीय कृषी अधिकारी  श्री.बालाजी ताटे, गट विकास अधिकारी श्री.प्रमोद काळे, तालुका कृषी अधिकारी श्री.पडवळ इ.मान्यवर उपस्थित होते.

क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणीची अद्ययावत आकडेवारी तातडीने संकलित करणे, यामध्ये पारदर्शकता आणणे आणि  या पीक पाहणीच्या प्रक्रीयेमध्ये शेतक-यांचा सक्रीय सहभाग घेणे इत्यादी उद्दीष्टाकरीता पीक पेरणीची आकडेवारी  मोबाईलवर ॲपद्वारा गांव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्याची सुविधा शेतक-यांना उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शासनाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ.जयंत कुमार बांठिया यांच्या मार्गदर्शनाखाली ई पीक पाहणी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मा.मुख्यमंत्री यांच्या दि.१० मे २०१८ रोजीच्या पत्रान्वये यास मान्यता देण्यात येवून शासनाच्या महसूल आणि वन  विभागाकडून १० सप्टेंबर २०१८ रोजी याबाबतचा शासन निर्णयही   निर्गमित झाला आहे

या ई पीक पाहणी पथदर्शी प्रकल्पांतर्गत  मोबाईल ॲपद्वारा पीक पेरणीची आकडेवारी घेण्यासाठी राज्यातील       ६ विभागांतर्गत ६ तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुणे महसूली विभागांतर्गत बारामती तालुक्याची निवड झाली आहे. तालुक्यामध्ये सदरचे कामकाज शेतक-यांनी करण्यासाठी ॲपबाबतचे आवश्यक ते प्रशिक्षण देण्याकरीता कवी मोरोपंत पिंगळे नाटयगृह, बारामती येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहायक,ग्रामसेवक तसेच शेतक-यांना पीक पेरणीची ‍ माहिती नोंदविण्याचे प्रशिक्षण देण्यात येवून त्यांच्या मोबाईल मध्ये  हे ॲप डाऊनलोड करण्यात आले.

या ई पीक पाहणी ॲपद्वारे पीक अहवाल प्रक्रीयेमध्ये शेतक-यांचा सक्रीय सहभाग राहणार आहे त्यामुळे अचूक आणि विश्वसनीय पीक माहिती आधारे कार्यक्षम धोरण आखण्यास मदत होईल. यामुळे पीक विमा योजनांसारख्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सुलभता येईल. पीक विम्याचे दावे निपटारा करण्याची प्रक्रीया सुलभ रितीने होईल. पीकांची आपत्तीमुळे हानी / नुकसान झाल्यास त्यांना कार्यक्षमतेने मदत करता येणे शक्य होईल.  शेतक-यांना हवामान, किडींचा प्रार्दूभाव आणि इतर रोगांच्या उपचारासाठी त्यांना तातडीचे संदेश देणे शक्य होईल तसेच अचूक माहितीच्या आधारे – शासकीय  निर्णय प्रक्रीया आणि  नियोजन सुलभ होईल.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार हनुमंत पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन महसूल नायब तहसिलदार  संजय पांढरपट्टे  यांनी केले.

‘समृद्ध मातृभूमी ‘ चे डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते प्रकाशन

0
माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांचा उपक्रम
पुणे  : ‘समूद्ध मातृभूमी ‘ मासिक विचार पुस्तिकेचे प्रकाशन विश्वशांती केंद्राचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते कोथरूड येथे नुकतेच करण्यात आले.
या प्रसंगी ए. डी. टी. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील रॉय,विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, बिहार राज्याचे पर्यटनमंत्री श्री. प्रमोदकुमार,प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. अरुण जामकर, डॉ सर्फराज पठाण, सौ. जन्नत पठाण इ. उपस्थित होते.
‘ हे विचार  प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात, ग्रामपंचायत आणि स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी ज्ञानाचा अनमोल खजिनाच ठरणार आहे ‘, असे उद्गार प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी
प्रकाशन समारंभ प्रसंगी काढले.
 प्रा. डॉ. एस. एन. पठाण हे या मासिक विचार पुस्तिकेचे प्रमुख मानद संपादक असून सहसंपादक श्री. संदीप तापकीर हे आहेत
‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन.पठाण यांनी पर्यावरण संरक्षण, ग्रामीण विकास व सांप्रदायिक सद्भाव या देशातील विषयांना वाहिलेले ‘समृद्ध मातृभूमी ‘द्वारे देशसेवेचे कंकणच हाती बांधले
आहे ,असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीश बापट यांनी शुभेच्छा संदेश द्वारे केले.
 या अंकाच्या प्रकाशनासाठी पाठविलेल्या संदेशात हे मत नोंदविले आहे.’

शरद पवार आणि सलमान खान पुण्यात एकत्र (व्हिडीओ)

0

पुणे- देशाच्या राजकारणातील दिग्गज आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि २०१४ पूर्वी गुजरात मध्ये जाऊन पतंगबाजी करून नरेंद्र मोदींशी संपर्कात असल्याच्या चर्चेला कारणीभूत ठरलेला हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा सुपरस्टार सलमान खान आता २०१९ मध्ये म्हणजे उद्याच्या रविवारी, 10 फेब्रुवारीला पुण्यात एकत्र दिसणार आहेत . अर्थात यावेळी ते पतंग उडविणार नाहीत तर गरजू मुलींना मोफत सायकलीचे वाटप करणार आहेत ,ते हि चक्क 6 हजार मुलींना … अर्थात यावेळी खासदार सुप्रिया सुळे ,टाटा ट्रस्टचे  व्यंकटरमण हे दिखील उपस्थित राहणार आहेत
राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि कार्यक्रमाचे निमंत्रक प्रकाश कदम यांनी या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे .कात्रज कोंढवा रस्त्यावरील शिवगोरक्ष मैदानावर हा कार्यक्रम होणार असून त्यासाठी मंडप ..तसेच 6 हजार सायकलीचे सुटे भाग येथे आणण्यात आले असून ते जोडून मजबूत सायकली बनविण्याचे काम हि वेगाने सुरु होते जे आज अंतिम टप्प्यात आले होते .
टाटा ट्रस्ट, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तसेच मेंटर्स फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने बारामती, दौंड, इंदापूर, भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, हवेली आणि खडकवासला मतदार संघातील शालेय विद्यार्थिनी आणि आशा वर्कर्स यांना शरद पवारांच्या हस्ते  मोफत सायकल वाटप होणार असलेल्या या कार्यक्रमात अभिनेता सलमान खान ची उपस्थिती राजकारणात आणि सिनेसृष्टीसह तमाम महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणार आहे .  सलमान खान यांनी गुजरात मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मोदींच्या समवेत केलेल्या पतंगबाजी नंतर राजकारणात सत्तांतराचे वादळ उठले होते .आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या समवेत पुण्यात सलमान पतंगबाजी करणार नाही तर गरजू ६००० मुलींना सायकलवाटप सोहळ्यात सहभागी होणार आहे .

दिव्यांगांसाठी पुण्यात १२ दिवसांच्या सक्षमीकरण शिबिराचे आयोजन

0

पुणे : अशोक मिंडा ग्रुप आणि ‘स्पार्क मिंडा’च्या ‘स्पार्क मिंडा फाउंडेशन’तर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी १२ दिवसांच्या ‘सक्षम’ या विशेष सक्षमीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथे १२ स्थानिक एनजीओंच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

‘स्पार्क मिंडा’, अशोक मिंडा ग्रुप हा समाजपयोगी कार्यासाठी चांगलाच ओळखला जातो. या संस्थेतर्फे कृत्रिम अवयवरोपण शिबिराचे आयोजन, पुण्यातील येरवडा तुरुंगातील कैद्यांसाठी वायर हार्नेस बेल्टची उभारणी, तसेच मुले-महिलांसाठी शैक्षणिक सुविधा पुरविल्या जातात. या संस्थेच्या कल्याणकारी समितीतर्फे २०१४ पासून समाजविधायक काम केले जाते. गेल्या २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत पुण्यातील चिंबोळी येथे वैद्यकीय मदत आणि सक्षमीकरणासाठी कृत्रिम अवयवरोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अशोक मिंडा ग्रुपच्या ‘स्पार्क मिंडा’तर्फे दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी ‘सक्षम’ या समाजविधायक कार्याची सुरुवात करण्यात आली. ‘सक्षम’तर्फे या ग्रुपतर्फे गरजूंना तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, नोकरीवर असताना कामाचे प्रशिक्षण देणे, कामगारांना ५ ‘एस’ची ओळख आणि जीवनोपयोगी कौशल्यांची माहिती करून देणे तसेच दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळवून देण्याची कामे केली जातात. या शिबिरामध्ये दिव्यांगांना अवयवरोपणच्या मदतीबरोबरच कॅलिपर जोडणी, वॉकर्स, कोपऱ्याचे क्रचेस, तीनचाकी तसेच इतर सुविधा अवघ्या एका दिवसामध्ये पुरविल्या जातात.

कृत्रिम अवयवरोपण कार्यक्रमावेळी ‘अशोक मिंडा’ ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अशोक मिंडा म्हणाले, “सक्षम’सारखे आयोजित करण्याची गोष्ट आमच्या संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. २०१५ मध्ये या शिबिराद्वारे जगभरातील पाचशे दिव्यांगांना विविध प्रकारच्या जोडणीचा लाभ घेता आला होता. मात्र अवघ्या तीन वर्षांमध्ये हा आकडा पाच हजारांपर्यंत वाढविण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. या शिबिराच्या आयोजनासाठी आमच्यावर टाकलेला विश्वास आणि मदतीसाठी आम्ही भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीचे (जयपूर फूट) आभारी आहोत.  या शिबिरामध्ये सहभागी होऊन समाजाच्या पुनरुथ्थानाला चालना दिल्याबद्दल आम्ही अनेक दिव्यांग व्यक्तींचेही आभारी आहोत. आम्हाला विश्वास आहे की अशाप्रकारच्या मदतीमुळे समाजपयोगी कार्याला भविष्यात आणखी बळकटी मिळेल.”

श्री. अशोक मिंडा यांच्या या भूमिकेला पाठिंबा देत ‘स्पार्क मिंडा फाउंडेशन’च्या श्रीमती सारिका मिंडा म्हणाल्या, “आमचे पुण्याशी जोडलेले नाते हे खूप जुने असून ते सर्वज्ञातही आहे. येरवडामध्ये प्रॉडक्शन युनिटची स्थापना करून चिंबोळी येथे ‘सक्षम-दिव्यांग सक्षमीकरण केंद्रा’ची स्थापना करून आम्ही दिव्यांगाना एक चांगले आयुष्य जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

“समाजामध्ये टाकलेल्या व्यक्तींच्या आयुष्याला नवीन दिशा, अर्थ मिळवून देणे आणि त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ‘स्पार्क मिंडा’तर्फे काम सुरू आहे. आम्हाला हे सांगताना आनंद होतो की, गेल्या १२ दिवसांमध्ये पुणे आणि परिसरामधील एक हजाराहून अधिक दिव्यांगांना अवयव जोडणीचा लाभ मिळवून दिला आहे. ‘जयपूर फुट’ हे आमच्या प्रत्येक शिबिराचा एक अविभाज्य भाग आहे. समाजविधायक अशाप्रकारच्या भागीदाऱ्या या आयुष्यात एकदाच होतात.”

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ‘बजाज ऑटो लि.’चे वरिष्ठ उपाध्यक्ष (पर्चेस विभाग) श्री. डी. व्ही. रंगनाथ म्हणाले, “दिव्यांग व्यक्तींचे आयुष्य आनंदी बनविण्यासाठी ‘अशोक मिंडा’ ग्रुपतर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो.”

‘स्पार्क मिंडा’, ‘अशोका मिंडा ग्रुप’ गेल्या काही दशकांपासून समाजविधायक कार्य करीत आहे. एक जबाबदार व्यक्ती, संस्था या नात्याने ही कंपनी लोक, प्लॅनेट आणि नफा या त्रिसूत्रीशी संबंधित आहे. पर्यावरणपूरकता तसेच समाजाच्या काळजीला या संस्थेत अधिक प्राधान्य आहे. विविध विकासाची उद्दिष्ट साधण्याचे लक्ष्य ठेवून २०१३ पासून कंपनी कायद्याअंतर्गत काम करणाऱ्या या संस्थेने शिक्षण, आयुष्यमान उंचावणे, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण आदींना प्राधान्य दिले आहे. ‘सीएसआर’ प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी या संस्थेने ‘स्पार्क मिंडा फाउंडेशन’ची स्थापना केली. ही कंपनी मिंडा कार्पोरेशन लि.ची १०० टक्के उपकंपनी आहे.

स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुप :

‘स्पार्क मिंडा’ आणि ‘अशोक मिंडा’ या संस्था वाहननिर्मिती उद्योगात कार्यरत आहे. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली-गुरगांव येथे आहे. श्री. एस. एल. मिंदा यांनी १९५८ मध्ये या संस्थेची स्थापना केली असून त्यांचा ६० वर्षांचा वारसा पुढे घेऊन या कंपनीची सध्या वाटचाल सुरू आहे. सुरक्षा, चालकांसाठी सूचना आणि टेलिमॅटिक्स या तीन गटांमध्ये या संस्थेकडून वाहनांना लागणाऱ्या विविध पार्टसची निर्मिती करण्यात येते. या संस्थेकडून दोनचाकी, चार चाकी वाहने, ट्रॅक्टर आणि विविध वाहनांसाठी युरोप, अमेरिका, चीन आणि इतर आशियाई देशांसाठी काम केले जाते. या  संस्थेचे एकूण ३३ प्लॅंट्स आहेत.

लोकसेवक होण्यासाठी तुमची सोबत हवी -ज्ञानेश्वर मुळ्ये यांची भावना

0
पुणे : “प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आता नव्या भूमिकेसाठी इच्छूक आहे. नोकरीच्या कार्यकाळात पासपोर्टचा चेहरा बदलला. आता लोकसेवक होऊन देशाचा चेहरामोहरा बदलण्याची इच्छा आहे. समाजातील दुजाभाव, भेद संपवण्यासाठी मला काम करायचे आहे. त्यासाठी मला आपली सोबत हवी असून, ती मिळाल्यास मी कुठेही कमी पडणार नाही,” अशी भावना निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी व्यक्त केली.
सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘सुर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कारां’चे वितरण विद्यावाचस्पती पंडित डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते झाले. सन्मानचिन्ह, मानपत्र व उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यंदा पुरस्कारांचे १७ वे वर्ष होते. बावधन येथील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये झालेल्या या सोहळ्याला लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी. बी. शेकटकर (निवृत्त), प्रसिद्ध कवी शैलेश लोढा, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, अभिनेता रझा मुराद, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, डॉ. विनोद शहा आदी उपस्थित होते.
ग्रॅमी पुरस्कारप्राप्त पद्मभूषण विश्वमोहन भट्ट (भारतीय शास्त्रीय प्रदर्शन कला), ज्ञानेश्वर मुळ्ये (प्रशासकीय सेवा), हुकमीचंद चोरडिया (ग्लोबल आंत्रेप्रेन्युअरशीप), पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर (भारतीय शास्त्रीय संगीत), डॉ. अरविंद नातू (विज्ञान-तंत्रज्ञान), रमणलाल शहा (ज्योतिषशास्त्र), शक्ती कपूर (चित्रपट व कला), असितकुमार मोदी (निर्मिती-दिग्दर्शन), फारुक मास्टर (वैद्यकीय सामाजिक सेवा), शाम अगरवाल (पत्रकारिता) यांना ‘सुर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार’, तर पद्मश्री मिलिंद कांबळे (औद्योगिक सामाजिक सेवा), रितु प्रकाश छाब्रिया (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी), विष्णू मनोहर (हॉस्पिटालिटी मॅनेजमेंट), डॉ. अर्चिका सुधांशू (अध्यात्म), संदीप गादिया (सायबर सुरक्षा), विजय भंडारी (सामाजिक उद्योगता व मानवता), मनिष पॉल (मनोरंजन), सुरी शांदिया (बँकिंग अ‍ॅन्ड फायनान्स), डॉ. शैलेश गुजर (माध्यम व जनसंपर्क), बीके सुजाथाबेन राठी (वैद्यकीय संशोधन), निवेदिता साबू (फॅशन डिझाईन), मानसी गुलाठी (आरोग्य), विपुल कासार (स्टार्टअप व इनोव्हेशन), अंकिता श्रॉफ (महिला उद्योजक) यांना ‘सुर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
ज्ञानेश्वर मुळ्ये म्हणाले, “१३० कोटींच्या देशात केवळ आठ कोटी लोकांकडेच पासपोर्ट आहेत. पासपोर्ट विभागाचा कार्यभार सांभाळताना ७७ पासपोर्ट केंद्रावरून ४५० केंद्र निर्माण झाली. अनेक लोक पासपोर्टकडे वळली, याचा आनंद आहे. संत-समाजसुधारकांची परंपरा असलेल्या महाराष्ट्राच्या छोट्याशा गावातून आल्याने समाजातील वंचित घटकांची जाणीव आहे. गावाशी नाळ आजही कायम आहे. समाजसेवेच्या भावनेतून यापुढे काम करण्याची इच्छा आहे.”
पंडित डॉ. शंकर अभ्यंकर म्हणाले, “आपल्या कार्याला अध्यात्माचे अधिष्ठान असल्याशिवाय त्याची चांगली फलप्राप्ती होत नाही. माणूस जोडण्यावर आपण भर दिला पाहिजे. सूर्यदत्ता शिक्षणसंस्थेने अशी असंख्य माणसे जोडली असून, विद्यार्थ्यांमध्ये मूल्यभाव रुजविण्याचे काम डॉ. चोरडिया करीत आहेत.”
डॉ. डीबी शेकटकर म्हणाले, “राष्ट्रभक्तीसाठी राष्ट्रशक्तीचे कवच आवश्यक आहे. युवकांतील ही राष्ट्रशक्ती घडविण्याचे काम शिक्षणसंस्थांनी करावे. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ते काम करीत आहे, याचा आनंद वाटतो. मातेचे संस्कार आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. नारींचा सन्मान व्हावा, तेथे देवता वास करते.”
शक्ती कपूर म्हणाले, “सर्वांना परवडेल अशा पद्धतीचे शिक्षण उपलब्ध करून द्यायला हवे. युवकांनी आपले चारित्र्य निर्माण केले पाहिजे. विविध क्षेत्रातील चांगल्या व्यक्तींना विद्यार्थ्यांसमोर आणून ‘सूर्यदत्ता’ने चारित्र्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तारुण्यात मजा करण्यासह गांभीर्याने अभ्यासही करावा.”
डॉ. अरविंद नातू म्हणाले, “शिक्षणात तंत्रज्ञानाने क्रांती आणली आहे. डिजिटायटेशन, डिकार्बोनेशन आणि डिमॉनेटायझेशन या तीन गोष्टी भविष्यात महत्वाच्या आहेत. येत्या काळात विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती येईल. जिथे त्यांना अभ्यासक्रम, परीक्षांचे स्वरूप ठरवता येईल. घरूनच अभ्यासही करता येईल.”
हुकमीचंद चोरडिया म्हणाले, “प्रवीण व सुहाना मसाल्याच्या उत्पादनांत दर्जा आणि ग्राहकाभिमुख सेवा दिल्यानेच यश मिळाले. आजच्या तरुणांत प्रचंड उत्साह आहे. यश-अपयशात कार्याचे मोजमाप नसते. आपल्या कामातील सातत्य आणि निष्ठा हेच आपल्याला यशाकडे नेतात.”
असितकुमार मोदी म्हणाले, “लोकांनी हसत आणि हसवत राहिले पाहिजे. आजच्या या पुरस्काराने आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. आणखी चांगल्या विनोदी मालिका माझ्याकडून होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करतो.”
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक-मनाच्या तंदुरुस्तीला प्रोत्साहनासाठी या व्यक्तींचे मार्गदर्शन प्रेरक ठरेल.”
विश्वमोहन भट, सुरेश तळवलकर, श्याम अगरवाल, विश्वेश कुलकर्णी, डॉ. फारूक मास्तर, विष्णू मनोहर, विजय भंडारी, निवेदिता साबू, मनीष पॉल, रझा मुराद, उल्हासदादा पवार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. सुनील धनगर व नुपूर पिट्टी, डॉ. किमया गांधी, स्नेहल नवलखा यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.

ई-बस शनिवारपासून मार्गावर : मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण

0

अशी असेल ई-बस
– वातानुकुलित
– आरामदायी बैठक व्यवस्था
– आसनक्षमता – ३१
– मोबाईल चार्जिंगची सुविधा
– पॅनिक बटन
– सीसीटीव्ही
– इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) 
– तीन तासात बॅटरी चार्जिंगमध्ये २०० किलोमीटर अंतर धावणार
– एका युनिटमध्ये ३ किलोमीटर अंतर धावणार
– प्रदुषण कमी होणार

पुणे : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या वातानुकूलित ई-बस शनिवार (दि. ९) पासून पुणेकरांच्या सेवेत रूजू होत आहेत. इतर बसच्या तिकीट दराप्रमाणेच या बसचे तिकीट दर असल्याने प्रवाशांना कमी पैशांमध्ये आरामदायी प्रवास करता येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये सात मार्गांवर या बसचे नियोजन करण्यात आले आहे.

या मार्गावर धावणार ई-बस 
1)डांगे चौक ते हिंजवडी माण फेज ३ 
बस – ६
फेऱ्या – ९६
वारंवारिता – २० मिनिटे
2)आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा
बस – २
  फेऱ्या – २०
वारंवारिता – ४५ मिनिटे
३). निगडी ते भोसरी
बस – २
 फेऱ्या  – ४८
वारंवारिता – ६० मिनिटे
4)हडपसर ते पिंपळे गुरव
बस – ३
  फेऱ्या – ६०
वारंवारिता – ३० मिनिटे
5)भेकराईनगर ते न. ता. वाडी
बस – ३
   फेऱ्या- ४८
वारंवारिता – ४५ मिनिटे
6)भेकराईनगर ते पुणे स्टेशन
बस – ३
   फेऱ्या – ५४
वारंवारिता – ३० मिनिटे
7)हडपसर ते हिंजवडी माण फेज ३
बस – ३
  फेऱ्या  – १८
वारंवारिता – ६० मिनिटे
पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या ताफ्यात ५०० एसी ई-बस भाडेतत्वावर येणार आहेत. सुरूवातीला प्रजासत्त्ताक दिनी पुणेकरांच्या सेवेत या बस आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, नियोजित वेळेत बस न आल्याने हा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला. दोन आठवड्यांपुर्वी ताफ्यात १० बस रुजू झाल्या. या बसचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण करण्याचा सत्ताधाऱ्यांचा आग्रह होता. पण मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने मागील काही दिवस बस आगारांमध्येच उभ्या होत्या. अखेर शनिवारी पहिल्या टप्प्यातील नऊ मीटर लांबीच्या २५ ई-बसचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे.
ई-बसचे तिकीट दर इतर नियमित बस एवढेच असतील. तसेच सर्वप्रकारचे पासही या बसमध्ये चालणार आहेत. वातानुकुलित व आरामदायी बसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुसह्य होणार आहे. या बससाठी निगडी व भेकराईनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. एकुण सात मार्ग निश्चित करण्यात आले असून त्यातील चार मार्ग पुण्यातील तर तीन मार्ग पिंपरी चिंचवडमध्ये आहेत.

पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये सात मार्गांवर या बसचे नियोजन : पहिल्या टप्यात २५ बस धावणार

पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या ताफ्यात ५०० एसी ई-बस भाडेतत्वावर येणार

ई-बसचे तिकीट दर इतर नियमित बस एवढेच सर्वप्रकारचे पासही या बसमध्ये चालणार

सध्या पीएमपीला १० बस मिळाल्या असून शनिवारपर्यंत उर्वरित बस मिळण्याची शक्यता आहे. तसेच केवळ दहा बसचीच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी झाली आहे. त्यामुळे शनिवारी सर्व बस मार्गावर येण्याची शक्यता कमी आहे. याबाबत अद्याप नियोजन झालेले नाही, असे पीएमपीतील अधिकाºयांनी सांगितले. उर्वरित १५ बसची नोंदणी पुढील आठवड्यात होऊ शकते. त्यानंतरच या बस मार्गावर येतील. तोपर्यंत उपलब्ध बस ठरावित मार्गांवर सोडण्यात येतील.

 

सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कादंबरीकार जी. के. ऐनापुरे यांची निवड

0

पुणे : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ कथाकार व कादंबरीकार जी. के. ऐनापुरे, तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार किरण नगरकर यांची निवड करण्यात आली आहे. दि. 20 ते 24 फेब्रुवारी 2019 या कालावधीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हे संमेलन होत आहे.

संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जी. के. ऐनापुरे यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. गुरुवार, दि. 14 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 12.30 वाजता पत्रकारभवन, नवी पेठ, गांजवे चौक, पुणे येथे हा सत्कार समारंभ होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे प्रमुख संयोजक व विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिली आहे.

परशुराम वाडेकर म्हणाले, “साहित्य-संस्कृतीतून तयार होणार्‍या जनमानसाला व्यापक परिवर्तनवादी दृष्टी लाभावी. समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय या तत्वांबरोबर लोकशाही समाजवादी मूल्य रूजावीत, या हेतूने 2010 पासून सम्यक साहित्य संमेलन भरविले जात आहे. हे संमेलन वाचक, साहित्यिक व विचारवंतांना जोडणारे विचारपीठ आहे. पाच दिवसांच्या या संमेलनात संविधान दिंडी, विविध विषयांवर परिसंवाद, शाहीरी जलसे, रॅप म्युझिक, नाटके व कवी संमेलने, स्वतंत्र ग्रंथदालन, यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार वितरण होणार आहे. यंदा हा पुरस्कार डॉ. गेल अ‍ॅमवेट यांना डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.”

या संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितिन करमळकर, उप-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, संमेलनाचे माजी अध्यक्ष यशवंत मनोहर, सुधाकर गायकवाड, डॉ. विजय खरे, डॉ. अनिल सपकाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. धर्मराज निमसरकर, राजाभाऊ भैलुमे, किरण सुरवसे, दीपक म्हस्के, निशा भंडारे, अमरनाथ आदी कार्यकर्ते संमेलनाच्या यशस्वीततेसाठी परिश्रम घेत असल्याचे परशुराम वाडेकर यांनी नमूद केले.

जिवोदॉनतर्फे भारतात नवी, अत्याधुनिक फ्लेवर्स उत्पादन सुविधा पुणे येथे सुरू

0

आशिया- पॅसिफिक प्रदेशात आक्रमक विस्तार करण्याच्या जिवोदॉनच्या विकास महत्त्वाकांक्षेसाठी ६० दशलक्ष स्विस फ्रँकची गुंतवणूक

  • या सुविधेद्वारे कंपनीच्या पर्यावरणसंदर्भातील कार्यवाही योजनेसाठी महत्त्वाचे योगदान

पुणे–स्वाद आणि सुगंध क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी जिवोदॉनने आज पुणे, भारतात नव्या फ्लेवर्स उत्पादन सुविधेचे अधिकृत उद्घाटन केल्याचे जाहीर केले. या अत्याधुनिक कारखान्यासाठी ६० दशलक्ष स्विस फ्रँकची गुंतवणूक करण्यात आली आहे आणि ते आशिया- पॅसिफिक भागातील विकास क्षमतेचा लाभ घेण्याचे निदर्शक आहे.

स्वाद आणि चवीसंदर्भात उच्च दर्जाची उत्पादने वितरित करण्याच्या हेतूने आराखडा करण्यात आलेली ही उत्पादन सुविधा ४० हजार चौरस फुटांच्या प्रशस्त जागेत वसलेली असून त्यामुळे जिवोदॉनला खाद्यपदार्थ, पेय आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करणे शक्य होईल. नवी सुविधा कंपनीच्या सध्या दमण येथे कार्यरत असलेल्या कारखान्यासाठी पूरक असून आता द्रव मिश्रण, पावडर मिश्रण, इमल्शन्स, प्रोसेस फ्लेवर्स, स्प्रे ड्राइंगची कंपनीची क्षमता भारत, नेपाळ व बांग्लादेशातील बाजारपेठांसाठी आणखी मजबूती आणणार आहे. जिवोदॉनया च्या नव्या सुविधेच्या ठिकाणी सुमारे २०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

जिवोदॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिलस अँड्रीयर म्हणाले, ‘पुण्यात जागतिक दर्जाची स्वाद उत्पादन सुविधा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे व ही सुविधा जिवोदॉनच्या भारताशी असलेल्या दीघकालीन बांधिलकी आणि वारशाचे तसेच आशिया- पॅसिफिकसारख्या उच्च विकास क्षमता असलेल्या बाजारपेठेवर धोरणात्मकपणे लक्ष केंद्रित करण्याचे ताजे उदाहरण आहे. आमचा नवा कारखाना जिवोदॉनला आपल्या ग्राहकांबरोबर आणखी जवळून काम करत विविध प्रकारची उत्पादने आणि वैविध्यपूर्ण भारतीय बाजारपेठेसाठी चवीचे असामान्य अनुभव देणे शक्य करेल.’

नवी उत्पादन सुविधा कंपनीची पहिली शून्य द्रवकचरा तयार करणारी सुविधा असून येथे सर्व सांडपाणी त्यावरील प्रक्रियेनंतर शुद्ध करून त्याचा फेरवापर केला जाईल. यामुळे पर्यायाने जिवोदॉनच्या पर्यावरणविषयक कार्यवाही योजनेसाठी महत्त्वाचे योगदान दिले जाणार आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी संपूर्ण सुविधेमध्ये प्रभावी एलईडी लायटिंग तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे तसेच सौर पॅनेल्सचा समावेश करण्याचे काम सुरू असून त्यामुळे जिवोदॉनचे १०० टक्के अक्षय उर्जा वापरण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे योगदान मिळेल. स्थानिक पर्यावरणाचे जतन करण्यासाठी ११०० झाडेही लावण्यात आली आहेत.

जिवोदॉनच्या फ्लेवर्स विभागाच्या आशिया- पॅसिफिक क्षेत्राच्या व्यावसायिक प्रमुख मोनिला कोठारी यांनी भारतीय बाजारपेठेचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, ‘गेल्या काही वर्षांत भारतातील खाद्यपदार्थ आणि पेय उद्योगक्षेत्रात प्रचंड मोठी वाढ झाली आहे आणि या बाजारपेठेत आम्ही सातत्यपूर्ण विकास पाहिला आहे. हे वेगवान रुपांतरण लक्षात घेता, आम्हाला या बाजारपेठांच्या गरजा पुरवण्यासाठी चपळ असणे आवश्यक असून भारतातील नवी उत्पादन सुविधा त्या हेतूने आरेखित करण्यात आली आहे.’

रांजणगाव, पुणे, महाराष्ट्र येथे झालेल्या उद्घाटनपर समारंभासाठी जिवोदॉनचे उच्च व्यवस्थापन अधिकारी उपस्थित होते व त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी जिलस अँड्रीयर आणि अध्यक्ष, फ्लेवर्स विभाग, लुई डीअमिको तसेच इतर मान्यवर आणि प्रादेशिक व्यवस्थापन सदस्यांचा समावेश होता.

जिवोदॉनबद्दल

जिवोदॉनही स्वाद आणि सुगंध क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी आहे. खाद्यपदार्थ, पेय, ग्राहक उत्पादने आणि सुगंध भागिदारांच्या मदतीने जिवोदॉनजगभरातील ग्राहकांना आनंदित करणाऱ्या चवी आणि सुगंध तयार करते. ग्राहकाची पसंत जाणून घेण्याची तळमळ आणि सातत्याने नाविन्यनिर्मितीचा ध्यास यांमुळे जिवोदॉनअसामान्य स्वाद आणि सुगंध तयार करते, जे ग्राहकांना मोहित करते. कंपनीने २०१८ मध्ये ५.५ अब्ज स्विस फ्रँकची विक्री पूर्ण केली आहे. स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या या कंपनीचे १४५ ठिकाणी स्थानिक अस्तित्व असून जगभरात सुमारे १३,६०० कर्मचारी आहेत.

 जिवोदॉन फ्लेवर्सबद्दल

स्थानिक चवींबद्दलचे जिवोदॉनचे सर्वसमावेशक ज्ञान, विस्तृत जागतिक नेटवर्क आणि धोरणात्मक अंतर्गत माहिती यामुळे ग्राहक कुठेही असले, तरी त्यांच्याबरोबर जास्त जवळून काम करता येते. उत्पादन निर्मितीबाबत गरजेनुसार उत्पादन तयार करण्याचा दृष्टीकोन ठेवल्यामुळे फ्लेवर्स विभाग हे ज्ञान, नाविन्य, सर्जनशीलता यांच्यासह ग्राहकांना ताज्या, अभिनव संकल्पना व उत्पादने पुरवते. जिवोदॉनदीर्घकाळ टिकणारे स्वाद आणि चवीचे अनुभव तयार करते, जे पेय, गोड आणि नमकीन पदार्थ व नाश्ता अशा विविध क्षेत्रांत ग्राहकांच्या भावनांना स्पर्श करते.