Home Blog Page 2994

आयसीआयसीआय बँकेतर्फे एफडी एक्स्ट्रा ही नाविन्यपूर्ण ठेवींची श्रेणी लाँच

0

मुंबई – आयसीआयसीआय बँकेने एफडी एक्स्ट्रा ही नाविन्यपूर्ण निश्चित आणि रिकरिंग ठेवींची श्रेणी लाँच केली असून त्यामुळे ग्राहकांना विशेष फायद्यांचा लाभ घेता येणार आहे.या टर्म ठेवी ग्राहकाच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवरील गरजा आणि ध्येये, उदा – गाडी आणि घराच्या डाउन पेमेंटसाठी बचत करणे, निवृत्तीचे नियोजन, मुलांचे शिक्षण, प्रवासाच्या आकांक्षा वगैरे पूर्ण करण्यासाठी खास तयार करण्यात आल्या आहे. ठेवींची ही नवी श्रेणी ग्राहकांना पुढील काही दिवसांत उपलब्ध होणार आहे.याप्रसंगी प्रणव मिश्रा, प्रमुख – रिटेल लायबिलिटीज समूह म्हणाले, ‘कित्येक गुंतवणुकदारांसाठी निश्चित आणि रिकरिंग ठेवी त्यातील जोखीम कशीही असली, तरी गुंतवणुकीचा मूलभूत पर्याय आहेत. आर्थिक बाजारपेठांमधील अस्थिरता लक्षात घेत ग्राहकांचा टर्म ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यातला रस वाढत आहे, कारण या ठेवींच्या रुपातून आकर्षक व्याजदर, रोखीचा प्रवाहीपणा, भांडवल सुरक्षा आणि खात्रीशीर परतावे मिळतात. आमच्या ग्राहकांना टर्म ठेवींमधील त्यांच्या गुंतवणुकीचा अतिरिक्त फायदा मिळवून देण्यासाठी ‘एफडी एक्स्ट्रा’ ही निश्चित आणि रिकरिंग ठेवींची नवी श्रेणी लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. या टर्म ठेवी ग्राहकाच्या आयुष्यातील विविध ध्येयांशी सुसंगत असून त्यामध्ये टर्म योजेद्वारे संरक्षण, म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे इक्विटी बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय किंवा उच्च शिक्षण, निवृत्ती, प्रवासासारख्या गरजांसाठी नियोजन यांचा समावेश होतो.हंगामी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये निश्चित ठेवी आणि इतर बचत उत्पादनांवरील टीडीएसची (टॅक्स डिडक्टेड अट सोर्स) मर्यादा सरकारने १० हजार रुपयांवरून वाढवून ४० हजार रुपयांपर्यंत नेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या वाढीमुळेग्राहकांना निश्चित ठेवींमध्ये जास्त गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल. एफडी एक्स्ट्रा उपक्रम आणि त्याला अर्थसंकल्पातील अतिरिक्त कर सवलतींची जोड मिळाल्यास ग्राहक निश्चित आणि रिकरिंग ठेवींमध्ये जास्त गुंतवणूक करतील.

 पहिल्या एफडी एक्स्ट्रा टर्म- ठेवीचे एफडी लाइफ असे नामकरण करण्यात आले आहे. यामध्ये १८ ते ५० वर्ष वयोगटातील ग्राहकांना निश्चित ठेवींद्वारे गुंतवणूक आणि ठेवीदारासाठी एक वर्ष कालावधीच्या मोफत टर्म जीवन विम्याची सुरक्षितता असा दुहेरी फायदा मिळेल. या क्षेत्रात अशा प्रकारची सुविधा पहिल्यांदाच देण्यात आली आहे, ज्यामध्ये किमान तीन लाख रुपयांपर्यंतच्या आणि किमान दोन वर्ष कालावधीच्या निश्चित ठेवीसाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीचा तीन लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा दिला जाणार आहे. स्पर्धात्मक व्याजदराव्यतिरिक्त ग्राहकाला एका वर्षाचे मोफत विमा कवच मिळणार आहे. या विम्याचे पुढील वर्षी नूतनीकरण करण्याचा पर्याय ग्राहकाकडे असेल.

या क्षेत्रातील अशा पहिल्याच प्रकारच्या या ठेवींचे ‘एफडी इन्व्हेस्ट’ असे नाव असून त्यामुळे ग्राहकाला आयसीआयसीआय प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट कंपनीच्या त्यांच्या आवडीच्या म्युच्युअल फंडात ठेवींवर मिळालेले व्याज म्युच्युअल फंडाच्या मासिक सुलभ हप्त्यांमध्ये (एसआयपी) गुंतवणूक करण्यास मदत होईल. किमान दोन लाख रुपयांच्या आणि किमान एका वर्ष कालावधीच्या निश्चित ठेवीवर ‘एफडी इन्व्हेस्ट’ मुद्द्ल सुरक्षित ठेवते. त्याचबरोबर याद्वारे ग्राहकांना एफडीवर मिळणारे व्याज म्युच्युअल फंडात गुंतवण्याची संधी मिळते.

एफडी एक्स्ट्रा या निश्चित ठेवींच्या श्रेणीमधील आणखी एका आवृत्तीचे नाव ‘एफडी इन्कम’ आहे. निश्चित आणि रिकरिंग ठेवींच्या स्वरुपात हा प्रकार उपलब्ध असून त्याद्वारे ग्राहकाला मॅच्युरिटीनंतरचे उत्पन्न आपल्या ध्येयाननुसार मिळवण्याचा पर्याय दिला जातो. ग्राहकांना संपूर्ण मॅच्युरिटी रक्कम मासिक उत्पन्न म्हणून त्यांच्या पसंतीच्या कालावधीसाठी मिळवता येते. त्याशिवाय त्यांना गुंतवणुकीच्या रकमेचा ३० टक्के भाग मॅच्युरिटीवर आणि उर्वरित ७० टक्के भाग त्यांच्या पसंतीच्या कालावधीसाठई मासिक उत्पन्न म्हणून मिळवता येतो. सर्व ठेवींसाठी गुंतवणूक आणि पेआऊट टप्प्यासह कमाल एकूण कालावधी १० वर्ष आहे.

आयसीआयसी बँक ग्राहकांना निश्चित ठएवींवर इन्सटंट प्लॅटिनम क्रेडिड कार्ड मिळवून देते व त्यासाठी कोणतेही वार्षिक किंवा प्राथमिक शुल्क भरावे लागत नाही. यामुळे क्रेडिट कार्डाबाबत नवखे असणाऱ्या ग्राहकांना सहजपणे क्रेडिट कार्ड मिळते.

फेसबुक पेजवर गांधी कुटूंबियांना मारण्याची धमकी–पुणे शहर कॉंग्रेस कडून पोलिसात तक्रार

0

पुणे-गेल्या दि. ३० जानेवारी २०१९ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त उत्तर
प्रदेशातील अलिगड येथे हिंदू महासभेच्या कार्यकर्ते व नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर
प्रतिकात्मकरित्या गोळ्या झाडल्या आणि शौर्य दिवस साजरा केला याबाबत फेसबुकवर श्रीमती.
निती गोखले नावाच्या महिलेने आपले कमेंट्‌स पोस्ट केले. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की,
‘Ajun 2 Gandhi ahet. Tyacha vadh karayla ek Nathuram Godse have’ या कमेंट्‌स
वरून हे स्पष्ट होते की, नीती गोखले यांना गांधी कुटूंबियांबाबत द्वेष आहे आणि त्यांची हत्या
झाली पाहिजे असे त्यांना वाटते. ही फार गंभीर बाब आहे. या पोस्टचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते रमेश अय्यर, ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर
व सोशल मिडीयाचे प्रमुख चैतन्य पुरंदरे यांनी वरिष्ठ पोलीस स्टेशन सायबर सेल शिवाजीनगर
येथे याबाबत तक्रार नोंदविली. तक्रारीत असे म्हटले आहे की, निती गोखले यांच्या विरूध्द
पोलीसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे तीव्र
आंदोलन करण्यात येईल.

टाटा कॅपिटलने अनावरण केले व्यक्तिगत कर्जांसाठी ‘टीआयए’मोबाइल अॅपवर आधारित व्हॉइसबोट

0

मुंबई: टाटा कॅपिटलने व्यक्तिगत कर्जांसाठी टाटा कॅपिटलच्या मोबाइल अॅपमध्ये प्रथमचटीआयएया अशा प्रकारच्या एकमेव व्हॉइसबोटचे अनावरण केले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पाठबळ लाभलेले टीआयए हे ग्राहकाच्या व्यक्तिगत कर्ज (पर्सनल लोन) घेण्याच्या एकंदर प्रवासात ध्वनीच्या (व्हॉइस) स्वरूपामध्ये मदत करण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आले आहे. ग्राहकाला कर्जासाठी पात्रता तपासून बघण्यापासून ते कर्जमंजुरीच्या संपूर्ण प्रक्रियेत काही मिनिटांमध्ये मदत उपलब्ध करून देण्यात हे सहाय्य करणार आहे.

टाटा कॅपिटलच्या मुख्य मार्केटिंग डिजिटल अधिकारी अबोंती बॅनर्जी म्हणाल्या, “ग्राहकांना वैशिष्ट्यपूर्ण सेवा देण्यासाठी कायम नवीन कल्पना आजमावत राहण्याचा आमचा, टाटा कॅपिटलचा, कायमच प्रयत्न असतो. एआय आर्थिक परिसंस्थेचा कायापालट करत असताना, टीआयए ही अशा प्रकारची पहिलीच व्हॉइसबोट व्यक्तिगत कर्जांसाठी सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. संभाषणात्मक तंत्रज्ञान, विशेषत: व्हॉइस असिस्टन्सची भारतात वेगाने वाढ होत आहेटीआयएच्या मदतीने या बदलाचा पाया कर्जमंजुरीच्या प्रक्रियेत घालून ग्राहकाचा अनुभव अधिक स्मार्ट जलद करण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे. आमची नवीन व्हॉइस असिस्टेड सेवा वापरण्यास सोपी आहे. त्याचप्रमाणे तिच्या कर्जमंजुरीचा प्रवास सुलभ करण्याच्या क्षमतेमुळे तिला वेगाने स्वीकृती मिळेल असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.”व्हॉइस असिस्टेड व्यक्तिगत कर्ज हे उद्योगातील नवीन उत्पादन आहे, तर टीआयएचा पहिला टप्पा चॅटबोट टाटा कॅपिटलच्या वेबसाइटवर उपलब्धही झाला आहे. यामध्ये एआयच्या माध्यमातून ग्राहकांच्या सर्व उत्पादनांबद्दलच्या शंकांना उत्तर देण्याची संभाषणात्मक क्षमता, पात्रतेचे मापन करण्याची क्षमता तसेच व्यक्तीनुरूप उत्पादने आणि बरेच काही पुरवण्याची क्षमता असलेल्या सुविधा आहेत. टीआयएच्या वेबआधारित इंटरफेसला ग्राहकांनी तत्काळ स्वीकारल्याचेही दिसून येत आहे. ही सेवा सुरू झाल्यापासून काही आठवड्यांतच लाखांहून अधिक संवाद याद्वारे झाले आहेत. या व्हॉइस असिस्टेड प्रवासामुळे उत्पादने पुढे अधिक वैशिष्ट्यपूर्ण होणार आहेत. ग्राहक आज आर्थिक सेवांचा लाभ घेण्याचे माध्यम म्हणून त्यांच्या स्मार्टफोन्सला पसंती देऊ लागले आहेत. ग्राहकांचे विचार समजून घेण्याच्या टीआयएच्या क्षमतेमुळे टाटा कॅपिटलला ग्राहक अनुभव अधिक समृद्ध करण्यात मदत होणार आहे. त्याचबरोबर यामुळे कंपनीला आपल्या डिजिटल सोल्युशन्समध्ये आणखी काही रूपांतरणात्मक सुविधांची भरही घालता येणार आहे. भारतातील सातत्याने बदलत राहणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी टाटा कॅपिटलने डिजिटल प्लॅटफॉर्म्स तयार करण्यावर त्यांचा विस्तार करण्यावर भर कायम राखला आहे. भाषा ओळख (स्पीच रेकग्निशन) तंत्रज्ञान, भाषेची नैसर्गिक समज आणि टेक्स्टटूस्पीच तंत्रज्ञान यांचा वापर करून ग्राहकाला पूर्णपणे नवीन असा संभाषणाचा अनुभव देणे हे टीआयएचे उद्दिष्ट आहे. इंटलिजंट सुविधा पर्यायांनी सुसज्ज असलेले टीआयए ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यास, त्यांना कर्जाची प्रक्रिया सुलभ करून सांगण्यास, योग्य उत्पादन निवडण्यात ग्राहकांना मदत करण्यास तसेच टाटा कॅपिटल अॅपमधून मंजूर झालेले कर्ज ग्राहकाला उपलब्ध करून देण्यास सक्षम आहे. व्यक्तीनुरूप तसेच अखंडित अनुभव देऊन टीआयए ग्राहकांचे व्यवहार सोपे सोयीस्कर करून देते.  

टॉप ५ अप्सरांची होणार निवड!!

0

झी युवावर अप्सरा आली कार्यक्रमाचा सेमीफायनल !!

महाराष्ट्राची लावणीची परंपरा जिवंत ठेवत, युवा पिढीला या पूर्वापार चालत आलेल्या लोकप्रिय नृत्याची ओळख करून देण्यासाठी झी युवा वाहिनीने ‘अप्सरा आली’ हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणला.  त्यांनतर प्रत्येक बुधवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता अक्खा महाराष्ट्र केवळ अप्सरा आली हा कार्यक्रम पाहण्यात मश्गुल झाला . लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध लोकनृत्य ‘लावणी’ला मंच उपलब्ध करून देणाऱ्या अप्सरा आली या कार्यक्रमात आजपर्यंत अनेक सौंदर्यवती आणि उत्कृष्ट नृत्य करणाऱ्या अप्सरांनी त्यांची कला सादर केली. महाराष्ट्रातूनच नव्हे तर सातासमुद्रापलीकडून त्यात भाषा आणि दोन देशांमधील अंतर याचा अडथळा पार करत क्लॉडिया आणि लीटा कोलंबिया देशातून या कार्यक्रमात सहभागी झाल्या. सध्या श्वेता परदेशी, ऋतुजा राणे, माधुरी पवार, मानसी शर्मा, ऐश्वर्या काळे , श्रुती भालेकर , पायल मेमाणे आणि किन्नरी दामा या अप्सरा सध्या या कार्यक्रमात आपली कला सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत .  मात्र आता ही स्पर्धा त्याच्या अंतिम टप्प्यावर आली असून येत्या बुधवारी उपांत्यफेरी मध्ये या टॉप स्पर्धकांमधून टॉप ची निवड होणार आहे. अप्सरा आली या कार्यक्रमाची हवा महाराष्ट्रभर असून प्रत्येक अप्सरा ही तिचा उत्तम परफॉर्मन्स देत आहे.  आता या टॉप अप्सरा कोण असतील याची साऱ्या महाराष्ट्राला आतुरता लागली आहे आणि हे जाणून घ्यायचं असेल तर बुधवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता अप्सरा आली हा कार्यक्रम पाहावाच लागेल. झी युवा वाहिनीवरील सर्व कार्यक्रम बघत राहण्यासाठी ३९ रुपयांचा ‘ झी फैमिली पॅक’   नक्की निवडा…या मध्ये तुमचे मनोरंजन करण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतील.

केपीआयटी ‘आणि ‘ज्ञान प्रबोधिनी ‘तर्फे ‘छोटे सायंटिस्ट ‘ स्पर्धा १३,१४ फेब्रुवारी रोजी पुण्यात

0
पुणे :‘केपीआयटी’ आणि ‘ज्ञान प्रबोधिनी ‘ यांचा संयुक्त उपक्रम असलेली   ‘छोटे सायंटिस्ट ‘ स्पर्धा  १३,१४ फेब्रुवारी रोजी  पुण्यात होत आहे . ज्ञान प्रबोधिनी चे शिक्षण विभागाचे सहकार्यवाह प्रा . विवेक पोंक्षे ,तुषार जुवेकर(कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभाग प्रमुख ,’केपीआयटी’ ) ,स्पर्धा समन्वयक प्रकाश रणनवरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली . 
 मावळ -मुळशी तालुक्यातील २०  शाळा ,पुणे महानगर  क्षेत्रातील 10 शाळा ,पिंपरी -चिंचवड क्षेत्रातील ८ शाळा अशा 38 शाळा सहभागी होणार आहेत . 
१३ फेब्रुवारी रोजी ४० शाळातील २०० विद्यार्थी  स्पर्धेत सहभागी होणार आहेत . १४ फेब्रुवारी रोजी ‘अटल टिंकरिंग लॅब’ च्या २०  शाळा आणि १०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत . 
ही स्पर्धा केपीआयटी कॅम्पस   , हिंजवडी -फेज -३  येथे होणार आहे . स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. या उपक्रमात  ‘वी  -सॉल्व्ह  ‘  ही समस्या परिहार स्पर्धा असून त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक परिसरातील समस्या देऊन त्यावर वैज्ञानिक उत्तर ,प्रकल्प शोधण्यास सांगण्यात येणार आहे . विजेत्यांना सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र ,स्कुल बॅग ,व   विजयी शाळांना ट्रॉफी देण्यात येणार आहे . 
२०१२ मध्ये २० शाळांमध्ये ८०० विद्यार्थ्यांमध्ये सुरु झालेला हा उपक्रम १७७ शाळा आणि १५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे . भारतातील २० शहरांमध्ये हा उपक्रम पोहोचला आहे . 

ग्राहक मंचाचा फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरला दणका

0
मुदत ठेवीप्रकरणी ठेवीदाराला ठेवीसह नुकसान भरपाई देण्याचे आदेश
पुणे : मुदत ठेवीच्या प्रकरणात धनादेश न वटल्याने दोषी ठरवत फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीला पुणे जिल्हा ग्राहक मंचाने दणका देत तक्रारदार वारजे येथील वैशाली व रत्नाकर माटे यांना ७,२६,१०० रुपये इतकी रक्कम मुदत पुर्तीनंतर आठ टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अनिल खडसे यांच्या अध्यक्षतेखालील क्षितिजा कुलकर्णी व संगीता देशमुख यांच्या मंचाने नुकताच हा निकाल दिला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वारजे येथील वैशाली व रत्नाकर माटे या दाम्पत्याने उदय पाटणकर या ब्रोकरच्या (एजंट) माध्यमातून २०१२ मध्ये फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत पाच लाखांची मुदत ठेव ठेवली होती. मुदतीनंतर २०१५ मध्ये फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरने माटे दाम्पत्याला ७,२६,१०० रुपये देणे होते. त्यासाठी माटे यांना सप्टेंबर २०१५ मध्ये दोन धनादेश देण्यात आले. मात्र, सदरचे दोन्ही धनादेश वटले नाहीत. माटे यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये पुन्हा नव्याने दोन धनादेश दिले. मात्र ते भरू नयेत, अशी सूचना कंपनीने केली. तिसऱ्यांदा मे २०१६ मध्ये दोन धनादेश दिले गेले. मात्र तेही वटले नाहीत. त्यामुळे माटे यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली.
ग्राहक मंचाकडे माटे यांचे वकील अॅड. डॉ. श्रीराम करंदीकर यांनी तक्रारींबाबतचा तपशील मांडला. या प्रकरणावर सुनावणी करीत ग्राहक मंचाने फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर व ब्रोकर पाटणकर यांना एक महिन्याच्या आत वरील रक्कम माटे यांना द्यावी, असे आदेश दिले आहेत.

अतिरिक्त आयुक्तांना मारहाण -कायदेशीर कारवाईसाठी पोलीस आणि पालकमंत्र्यांच्या संपर्कात -आयुक्त

0

पुणे- महापालिकेतील प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचारी यांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये ,तसेच त्यांच्या सुरक्षीततेसाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी पोलीस कारवाई होईलच त्यासाठी आपण पोलीस आयुक्त आणि पालकमंत्री यांच्याशी बोललो आहे . ही दुदैवी घटना असून या घटनेची दखल शासन आणि प्रशासनाने घेतली आहे. पालकमंत्र्यांनी वारंवार घटनेची माहिती घेतली आहे. या घटनेची सर्व कायदेशीर कार्यवाही केली जाईल. आपले संघटन आणि अन्यायाविरोधात लढा सुरूच राहणार आहे. जनतेचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्वानी काम सुरू करावे.
असे आयुक्त सौरव राव यांनी मंगळवारी महापालिकेच्या कर्मचारी वर्गाने काम बंद आंदोलन केले यावेळी आयोजित करण्यात आलेल्या निषेध सभेत सांगितले .नेमके आयुक्त काय म्हणाले ,ते ऐका त्यांच्याच शब्दात …

अन्यायाचा प्रतिकार करायलाच हवा -नगरअभियंता वाघमारे

0

पुणे-चुकीचे आरोप आणि अन्याय यांचा प्रतिकार आता करायलाच  हवा,निंबाळकर यांच्यावर झालेला हल्ला हा संस्थेवर झालेला हल्ला आहे अशा शब्दात महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी
अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकारचा निषेध नोंदविला . अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवारी पुणे महापालिकेच्या कर्मचारी वर्गाने काम बंद आंदोलन केले.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या निषेध सभेत ते बोलत होते .

लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांशी वागताना आचारसंहिता हवी – उपायुक्त मोळक

0

पुणे-अधिकाऱ्यांनी  कसे वागावे याबाबत जशी आचारसंहिता आहे तशी आचार संहिता लोकप्रतिनिधींना देखील घालून दिली पाहिजे असे मत   महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक  यांनी येथे मांडले .
अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकाराचा त्यांनी निषेध नोंदविला . अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवारी पुणे महापालिकेच्या कर्मचारी वर्गाने काम बंद आंदोलन केले.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या निषेध सभेत ते बोलत होते .

नगरसेवक अरविंद शिंदे हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर

0

पुणे –आरोप-प्रत्यारोपातून झालेल्या शाब्दिक वादानंतर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांना मंगळवारी कोर्टाने तात्पुरता जामीन मंजूर केला. पासपोर्ट जमा करावा, दर मंगळवारी शिवाजीनगर पोलिस स्टेशनला हजेरी लावावी, या अटींवर शिंदे यांना जामीन मंजूर करण्यात आला. सत्र न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. तर नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी अद्याप जामिनासाठी अर्ज केलेला नाही.

या प्रकरणी आयुक्त निंबाळकर यांनी सोमवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली होती. नगरसेवक अरविंद शिंदे आणि रवींद्र धंगेकर यांच्यासह १५ ते १७ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून शिंदे यांनी अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील, अ‍ॅड. रुपाली पाटील, अ‍ॅड. हितेश सोनार आणि अ‍ॅड. पुष्कर पाटील यांच्यामार्फत अर्ज केला होता.

जलपर्णी काढण्यासाठीच्या निविदांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मला चोर व भ्रष्टाचारी म्हणण्याची त्यांची लायकी आहे का, असे विधान केल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे असे बोलून त्यांनीच जमाव भडकावला. शिंदे यांनी वैयक्तिक कोणाला मारहाण केलेली नाही. तसेच, सरकारी कामात अडथळा आणला नाही, असा युक्तिवाद शिंदे यांचे वकील अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे-पाटील यांनी कोर्टात केला. कोर्टाने शिंदे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. शिंदे यांच्या अर्जावर पोलिसांना २७ फेब्रुवारी रोजी बाजू मांडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

जलपर्णी टेंडर प्रकरणात ग़ैरप्रकार नाही-आयुक्त (व्हिडीओ)

0

पुणे-जलपर्णी टेंडर प्रक्रिया मध्ये प्राथमिक दृष्ट्या काही गैरप्रकार झाल्याचे दिसत नाही तरीही महापौरांच्या आदेशान्वये पुन्हा चौकशी करून आज आम्ही महापौरांना अहवाल सादर करणार आहोत अशी माहिती येथे आज महापालिका आयुक्त सोरव राव यांनी दिली .

आज महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी आयोजित केलेल्या निषेध सभेत आयुक्तांनी उपस्थिती लावली त्यानंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले कि ,यावेळी ,आता 2 तास झाले तुम्ही कलम बंद आंदोलन करून जनहितासाठी मात्र काम सुरु ठेवा असे आवाहन मी केले आहे.नेमके आयुक्त काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात …

 

कॉंग्रेसच्या अरविंद शिंदे यांनींच चिथावणी दिली – अतिरिक्त आयुक्त

0

पुणे-महापौरांच्या दालनात आपल्याला झालेली मारहाण हा प्रकार कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी चिथावणी दिल्यामुळेच झाला असा आरोप आज सकाळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी केला .

महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी वर्गाने आज मनप हिरवळीवर मोठ्या संख्ये जमून या प्रकरणी निषेध सभेचे आयोजन केले होते तत्पूर्वी माध्यमांच्या प्रश्नांना अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांनी उत्तरे दिली यावेळी ते म्हणाले ,

25 कोटीची निविदा काढली हि बातमीच चुकीची आहे,ती देणाऱ्या संबधित पत्रकाराला आपल्याकडून व्यवस्थित माहिती करून घ्या असे सांगितले होते .पूर्वी कायम खर्च करूनही १०० टक्के संपूर्ण जलपर्णी निघत नसे ,कायम तलाव जलपर्णी मुक्त रहावा  या हेतूने  प्रभावी अंमलबजावणी व्हावी  या हेतूने प्रस्ताव मागविले होते . यात जलपर्णी राहिली दिसली तर दंड आकारणी चीही तरतूद राहील याची कल्पना देवूनच प्रस्ताव मागविले . उद्या कोणी कितीही रकमेच्या खर्चाचा प्रस्ताव देऊ शकते ,त्यावर आम्ही काही करू शकत नाही. पण अशा आक्षेपार्ह प्रस्तावावर आम्ही काही कार्यवाही केली ,सह्या केल्या तर आम्ही दोषी ठरू ,पण असे काहीही केलेले नाही.उलट 29 जानेवारीलाच असा प्रस्ताव आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला .त्यांना खात्री असती कि यात गैरप्रकार झालाय तर त्यांना अन्य मार्ग होते ,पण गोंधळ घालून ,अधिकाऱ्यांना दमदाटी करून  भडकपणा निवडणुकीच्या अनुषंगाने करणे यावर त्यांनी भर दिला .योग्य कामाबद्दल जरूर संघर्ष करावा पण बेछूट आरोप करत आधिकाऱ्यांना चोर ,भ्रष्टाचारी म्हटल्यास कोण ऐकून घेईल . तरीही प्रत्युत्तर देताना मी त्यांना आहो ,जाहो घालूनच बोललो पण अरविंद शिंदे यांनी चिथावणी दिली एकेरी भाषा केली .चप्पल फेकून मारणे,शिवीगाळ करणे असे प्रकार  झाले . कालच त्यांनी लेखी माफी मागितली असती तर या प्रकरणावर पडदा पडला असता .अखेर मी पोलिसात तक्रार केली.त्यांच्यावर सामान्य माणसावर होते त्याप्रमाणेच कायदेशीर कारवाई व्हावी अशीच माझी मागणी आहे .

अतिरिक्त आयुक्तांना मारहाण -महापालिका मंगळवारी बंद – ‘त्या ‘ नगरसेवकावर कारवाई करणार -महापौर

0


पुणे- महापौरांच्या दालनात अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे -अशा दहशतवादी कृत्याचा निषेध म्हणून महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी उद्या मंगळवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी ‘बंद ‘ पुकारला आहे तर दुसरीकडे कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या ज्या नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला आहे त्यांच्या कठोर कारवाई ची भूमिका महापौर मुक्ता टिळक यांनी घेतली आहे .
दरम्यान अभियंता संघाचे वतीने उदया सकाळी 11,वाजता मनपा हिरवळीवरील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयाजवळ निषेध सभा आयोजित केल्याचे  अभियंता संघाने जाहीर केले आहे

 

कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि रवी धंगेकरांवर गुन्हा दाखल

0

पुणे- महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौर दालनात मारहाण प्रकरणात आज रात्री उशिरा कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि रवी धंगेकरांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आय ए एस  अधिकाऱ्याला चप्पल फेकून मारणे. अंगावर धावून जाणे ,शिवीगाळ करणे याप्रकरणी पोलिसांनी हि तक्रार नोंदवून घेतली आहे स्वतः अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पोलिसात या प्रकरणी तक्रार नोंदविली आहे .शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वाघमारे याप्रकरणी तपास करीत आहेत .आज सायंकाळी महापौर दालनात हा प्रकार  झाला होता .

 

काकडे यांना उमेदवारी दिली तरी त्यांचेही काम राष्ट्रवादी करेल -अजित पवार

0

पुणे-कॉंग्रेस पक्ष ज्याला  पुण्यातून उमेदवारी देईल त्याचे काम राष्ट्रवादी करेल ,उद्या कॉंग्रेसने संजय काकडे यांना दिली तरी राष्ट्रवादी त्यांचे काम करेल अशी ग्वाही आज अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली . खा. संजय काकडे यांच्या भेटीनंतर ते माध्यमांनी वचारले असता त्यावर बोलत होते.

काकडे हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र भाजपने इतर नेत्यांचीच नावे चर्चेत आणल्याने काकडेंनी थेट आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. आज पुण्यात अजित पवार यांची भेट घेऊन आपली मोर्चेबांधणी केली.

काॅंग्रेसचा जो कोणी उमेदवार असेल त्याला राष्ट्रवादी काॅंग्रेस मनापासून मदत करेल, असे अजित पवार यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. काकडे भाजपवर नाराज असल्याने तुमची भेट झाली का, या प्रश्नावर काकडेंनी माझ्याशी बोलताना तसे सांगितलेले नाही. त्यामुळे ते भाजपवर नाराज असल्याची माझी माहिती नाही. ते भाजपचे केवळ सहयोगी सदस्य आहेत. भाजपचे खासदार नसल्याने अपक्ष खासदार ते कोणालाही भेटू शकतात.