Home Blog Page 2992

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कँडल मार्च ,मोदींना रक्ताची पत्रं

0

पुणे -जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे , अभय छाजेड ,संगीता तिवारी आदी कार्यकर्त्यांनी कल्याणी नगर , गोल्ड सिनेमा चौक दरम्यान  कँडल मार्च  काढून  श्रद्धांजली  वाहण्यात आली .

तर पन्नास कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहून ती पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्याचे ठरवले आहे. तसेच पुलवामाचा बदला घ्या अशीही मागणी या पत्रांमधून करण्यात आली आहे.

प्रिय मोदीजी ‘मन की बात के बदले खून की बात’ चाहीये, इंडिया डिमांड रिअल सर्जिकल स्ट्राईक, हमे निंदा चाहिये… और एक भी आतंकी जिन्दा नही चाहिए, जगाच्या पाठीवरुन पाकिस्तानचे नाव मिटवा, नोटाबंदी नको तर दहशतवाद बंदी करा असा मजकूर असलेली ही पत्र या 50 जणांनी स्वतः रक्ताने लिहिली आहेत. पुणे शहर काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमित बागुल आणि त्यांच्यासह 49 कार्यकर्त्यांनी ही पत्रे लिहिली असून याबाबत अमित बागुल म्हणाले की, सीमेवर जवान शहीद होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
तर ते पुढे म्हणाले की, आम्ही 50 जणांनी स्वतःच्या रक्ताने हे पत्र लिहिली आहेत. ती ईमेल आणि कुरियर च्या माध्यमातून पंतप्रधाना पाठवण्यात येणार आहेत. या पत्रांची दखल घेऊन पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

 

पाक आणि दहशतवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी

0

पुणे- शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल पाकीस्तानने आपल्या वीर जवानांवर जो भ्याड हल्ला केला त्या हल्याचा व दहशतवादाला सतत खतपाणी घालणाऱ्या पाकीस्तानचा निषेध करण्यात आला. दहशतवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली.
शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले की पाकिस्तान मध्ये समोरुन युध्द करायची हिम्मत नाहिये त्यामुळे सतत आपल्या वीर जवानांवर पाकीस्तान भ्याड हल्ले करत आहे. या हल्याचा आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत. यावेळी युवक शहराध्यक्ष राकेश कामठे, अभिषेक बोके,गणेश नलावडे, ओ.बी.सी.शहराध्यक्ष संतोष नांगरे, अजय दराडे,मनोज पाचपुते, महेश हांडे,अमोल ननावरे,फहिम शेख, विशाल नाटेकर,नितीन राठोड, स्वप्नील थोरवे, प्रेम भांडे पाटील,जावेद इनामदार,शेर अली शेख,गजानन लोंढे,निखिल बटवाल,विकी वाघे,सौरभ गुंजाळ,चेतन मोरे, सदाशिव गायकवाड,निलेश वरे, अमोल पोतदार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गोव्यातील पर्यटकांच्या संख्येत घट होण्यामागच्या कारणांचा सरकारतर्फे शोध

0

तज्ज्ञ आणि भागधारकांबरोबर काम, लवकरच उपाययोजनाआजगांवकर

पणजी –  पर्यटन मंत्री  मनोहर आजगांवकर यांनी आज गोव्यातील पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राची चिंता दूर करत राज्यातील पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी विशिष्ट यंत्रणा लवकरच लागू करणार असल्याचे सांगितले. यावेळेस त्यांनी सर्व भागधारकांना यासंदर्भात गोवा सरकारला सहाकार्य करण्याचे आवाहन केले.

मनोहर आजगांवकर म्हणाले, ‘आज पर्यटन क्षेत्रातील भागधारकांबरोबर फलदायी चर्चा झाली आणि मी गोव्यातील पर्यटन सुधारण्यासाठी त्यांच्याकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या सुचनांचे स्वागत करतो. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली असून त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे आणि त्यामागच्या कारणांचा शोध घेत सर्व पर्यटन संघटनाआणि भागधारकांना विश्वासात घेऊन एकत्रितपणे त्यावर काम केले जाईल. गोवा सरकार पर्यटन क्षेत्रातील भागधारकांबरोबर तसेच तज्ज्ञांबरोबर यासंदर्भातील समस्यांचा वेध घेत असून येत्या काही दिवसांत पर्यटकांच्या संख्येत घट होण्यामागची कारणे शोधली जातील व त्यावर लवकरात लवकर उपाययोजना केली जाईल.’

आजगांवकर म्हणाले, की ते गरजेप्रमाणे सरकारच्या इतर विभागांबरोबर म्हणजेच पोलिस व स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर काम करून गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण राखले जाईल याची खात्री करतील.त्यांनी भागधारकांना गोवा पर्यटनबरोबर काम करून गोव्याचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करण्यासाठी विपणन धोरण आखण्यास मदत करावी असेही सांगितले.पोर्वोरिम येथे आज झालेल्या बैठकीत ते अध्यक्षस्थानी होते, तर या बैठकीसाठी विविध पर्यटन संघटना, हॉटेलचालक आणि भागधारक उपस्थित होते. श्री. आजगांवकर यांनी या बैठकीत मांडल्या गेलेल्या सर्व समस्या तसेच व्यापारी संघटना आणि हॉटेलचालकांनी सुचवलेल्या उपाययोजना ऐकून घेतल्या. या उपाययोजनांमध्ये पायाभूत सुविधा, स्वच्छता सुधारणे, विमानवाहतूकीचे प्रमाण वाढवणे, सार्वजनिक बससेवा सुधारणे, राज्य जलवाहिन्यांचा वापर करणे, पर्यटनाशी संबंधित आणखी उपक्रम, सवलती सुरू करणे यांचा समावेश होता.

पर्यटन भागधारकांनी आजगांवकर यांना पर्यटकांना विविध पातळ्यांवर दिला जाणारा त्रास तसेच छळवणुकीवर मार्ग काढण्याची विनंती केली. छळवणुकीच्या या प्रकारांमध्ये पर्यटन स्थळी भिकाऱ्यांनी संघटितपणे पर्यटकांना त्रास देणे, स्थानिक कंपन्यांद्वारे अवास्तव टॅक्सी शुल्क आकारले जाणारे, जास्त जीएसटी, पर्यटन स्थळी पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी व त्यांची दुरवस्था, दाबोलिम येतथे उशीराच्या विमानांसाठी दीर्घकालीन पार्किंग समस्या, व्हिसाचे अवास्तव शुल्क, व्हिसा शुल्कावर पेबॅक सवलतींची गरज, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी सवलती सुरू करण्याची गरज इत्यादींचा समावेश होता.

ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाने (टीटीएजी) श्री. सॅव्हिओ मेसियास यांच्या नेतृत्वाखाली श्री. आजगांवकर यांना गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर आधारित अहवाल लवकरात लवकर दाखल करण्याचे आश्वासन दिले. या अहवालामुळे सरकारला समस्या हाताळण्यासाठी मदत होणार असून श्री. आजगांवकर यांनी यावेळेस पर्यटन भागधारकांना सरकारबरोबर एकत्रितपणे काम करून गोव्यातील पर्यटन उंचावण्याचे आश्वासन दिले.

गोवा सरकारच्या पर्यटन विभागाचे सचिव श्री. संजीव गडकर, श्री. राजेश काळे, उपसंचालक, पर्यटन  विभाग, श्री. गॅव्हिन डायस, व्यवस्थापक – जीटीडीसी आणि राज्य स्तरीय विपणन आणि प्रसार समितीचे सदस्य, श्री. नंदन कुडचडकर आणि श्री. अभिजित वाळके यावेळेस उपस्थित होते.

महापालिकेतील शिक्षकांची दैनावस्था – 6 महिन्यांचे कंत्राट -आणि पगार दरमहा 10 हजार

0

पुणे : महापालिका शाळेत शेकडो शिक्षक अवघ्या  सहा महिन्यांच्या कंत्राटावर ,अवघ्या 10 हजार रुपये दरमहा पगारावर काम करीत आहेत .अशा शिक्षकांनी नुकतेच महापालिकेसमोर आंदोलन केले . अखेरीस त्यांच्या मागण्या उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आयुक्तांपर्यंत पोहोचविल्या आणि त्यांच्या पगारात वाढ करण्यास तात्विक मान्यता घेतली आहे . आता स्थायी समिती पुढे त्यांच्या पगार वाढीचा विषय पुढील आठवड्यात येईल असा विश्वास डॉ . धेंडे यांनी व्यक्त केला आहे .
पहा आणि ऐका …नेमकं उपमहापौर  डॉ धेंडे यांनी याबाबत काय म्हटले आहे …

सावरकर जयंतीनिमित्त क्रांतिकारक अभिवादन यात्रा व सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारकात ‘वंदे मातरम’चे होणार समूहगान

0
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३५ व्या जयंतीनिम्मित ऑफबिट डेस्टिनेशन, वि. दा. सावरकर प्रतिष्ठान ठाणे, सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई, ठाणे भारत सहकारी बँक लि. व उचित माध्यम, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिकारक अभिवादन यात्रा व सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारकत ‘वंदे मातरम’चे समूहगान आयोजित केले आहे. दिनांक २२ मे ते ४ जून २०१९ या कालावधीत ही यात्रा होणार आहे. यातील बहुतांश प्रवास जहाजमार्गे असणार आहे, अशी ऑफबीट डेस्टिनेशनचे प्रमुख नितीन शास्त्री व ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनचे डॉ. विश्वास केळकर यांनी दिली.
नितीन शास्त्री म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह जवळपास ९०० क्रांतिकारकांनी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानच्या या सेल्युलर जेलमध्ये अनंत यातना सहन केल्या. त्यांनी क्रांतिकारी चळवळीची मशाल तेवत ठेवली. ‘वंदे मातरम’च्या जयघोषाने सेल्युलर जेल परिसर क्रांतिकारकांनी दणाणून सोडला. त्यामुळे अंदमानातील सेल्युलर जेलला आणि वंदे मातरम जयघोषाला ऐतिहासिक महत्व आहे. क्रांतिकारकांच्या या बलिदानाप्रती अभिवादन करण्यासाठी आणि इंग्लंडच्या राणीलाही कापरे भागविणाऱ्या वंदे मातरमच्या जयघोषाने समूहगान करून भारतीयांमधील सुप्त चेतना जागविण्यासाठी या अभिवादन यात्रेचे आयोजन केले आहे.”
“चौदा दिवसांच्या या यात्रेत चेन्नई-अंदमान-चेन्नई हा प्रवास ‘स्वराज द्वीप’ या विशेष जहाजाने करण्याची संधी मिळणार आहे. तीन दिवसांच्या जहाज प्रवासानंतर २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३५ व्या जयंतीदिनी ढोल-ताशा वादन आणि सेल्युलर जेलमध्ये ‘वंदे मातरम’ समूहगान होणार आहे. त्यानांतर सेल्युलर जेलची पाहणी आणि सावरकर यांच्या कोठडीची दर्शन घेता येणार आहे. तसेच ध्वनी प्रकाश कार्यक्रम पाहता येणार आहे. या यात्रेदरम्यान अंदमानातील बेटे, निसर्ग संपदा, अँथ्रोपोलॉजिकल म्युझियम, सागरिका म्युझियम आदी गोष्टी पाहता येणार आहेत. या अभिवादन यात्रेत आणि समूहगान कार्यक्रमाला भटके व विमुक्त राष्ट्रीय आयोगाचे माजी अध्यक्ष आणि मुंबईतील सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादा उर्फ भिकूजी इदाते, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष व माजी खासदार प्रदीप रावत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.”
अधिक माहितीसाठी ऑफबीट डेस्टिनेशन्स, ५८६ शनिवार पेठ, नारायण पेठ पोलीस चौकीजवळ, केळकर रस्ता, पुणे येथे किंवा ९४२२०१०४६७/७३७८८४३६६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

सातवे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन 20 फेब्रुवारीपासून

0
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन 20 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. जंगली महाराज रस्त्यावरील संविधाननगरी, बालगंधर्व रंगमंदिरात हे संमेलन होणार आहे. या संमेलनात यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार डॉ. गेल ऑमव्हेट यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती संमेलनाचे प्रमुख संयोजक परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष जी. के. ऐनापुरे, संमेलनाचे निमंत्रक प्रा. विलास वाघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. विजय खरे, संयोजक दिपक म्हस्के, धर्मराज निमसरकर, प्रा. किरण सुरवसे,  अमरनाथ सिंग आदी उपस्थित होते.
परशुराम वाडेकर म्हणाले, “साहित्य-संस्कृतीतून तयार होणार्‍या जनमानसाला व्यापक परिवर्तनवादी दृष्टी लाभावी. समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय या तत्वांबरोबर लोकशाही समाजवादी मूल्य रूजावीत, या हेतूने 2010 पासून सम्यक साहित्य संमेलन भरविले जात आहे. हे संमेलन वाचक, साहित्यिक व विचारवंतांना जोडणारे विचारपीठ आहे. संमेलनाचे हे सातवे वर्ष आहे. ज्येष्ठ कादंबरीकार जी. के. ऐनापुरे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. पाच दिवसांच्या या संमेलनात संविधान दिंडी, विविध विषयांवर परिसंवाद, शाहीरी जलसे, रॅप म्युझिक, नाटके व कवी संमेलने, स्वतंत्र ग्रंथदालन असणार आहे.”
‘’संमेलनाची सुरुवात संविधान सन्मान रॅलीने बुधवार, दि. 20 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 4.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बुधवार पेठ येथील भिडे वाडा अशी होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन गुरुवार, दि. 21 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. गंगाधर पानतावणे विचारमंचावर ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितिन करमळकर, उप-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, संमेलनाचे माजी अध्यक्ष यशवंत मनोहर, डॉ. विजय खरे, डॉ. अनिल सपकाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनावेळी विचारमंचावरुन जी. के. ऐनापुरे यांचे अध्यक्षीय भाषण ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर सायंकाळी 6.00 वाजता वात्रटीकाकार रामदास फुटाणे व सहकार्‍यांचे ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या विषयावर कवी संमेलन होणार आहे. सायंकाळी 8.00 वाजता अभिनेते सयाजी शिंदे प्रस्तुत ‘बैल अ-बोलबाला’ हे नाटक सादर होणार आहे. तत्पुर्वी, दुपारी 2.00 वाजता प्रवीण डोणे-शिरीष पवार व सहकार्‍यांचा ‘भीमस्पंदन’ हा कार्यक्रम, तर दुपारी 3.30 वाजता ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते भाई वैद्य ग्रंथदालनाचे उद्घाटन होणार आहे.”
संमेलनाचा समारोप रविवार, दि. 24 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 2.00 वाजता डॉ. गंगाधर पानतावणे विचारमंचावर होणार आहे. समारोपासाठी माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. विलास वाघ, डॉ. अनिल सपकाळ उपस्थित राहणार आहेत. तत्पुर्वी, सकाळी 9.30 वाजता अनिरुद्ध बनकर ‘मी वादळवारा’ हा भीमगीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता ‘समकालीन साहित्य चळवळी आणि बांधिलकी’ या विषयावर परिसंवाद होणार असून, परिसंवादाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक व माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोतापल्ले भूषविणार आहेत.
संमेलनाच्या तिसर्‍या दिवशी शुक्रवार, दि. 22 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 9.30 वाजता विपीन तातड यांचा ‘समस्या मेरे देस की’ हा रॅप साँगचा विशेष कार्यक्रम, तर सकाळी 11 वाजता ‘समकालीन राजकारणाचे बदलते सांस्कतिक संदर्भ’ यावर परिसंवाद होणार असून, अध्यक्षस्थानी साहित्यिक सुरेंद्र जोंधळे असतील. अजित अभ्यंकर, डॉ. सुधीर गव्हाणे, श्रुती तांबे, अविनाश महातेकर व इतर साहित्यिक सहभागी होतील. दुपारी 2.30 वाजता ‘मी आणि माझे लेखन’ या विषयावरील परिसंवादात मंगेश काळे, श्रीकांत देशमुख, इंदुमती जोंधळे, सुदाम राठोड व इतर साहित्यिक सहभागी होतील. सायंकाळी 5.00 वाजता कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार असून, त्याचे सूत्रसंचालन नितिन चंदनशिवे करणार आहेत. सायंकाळी 7.00 वाजता ज्ञानेश महाराव यांचे सादरीकरण असलेले ‘तुकाराम’ हे नाटक होईल.
चौथ्या दिवशी शनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 9.30 वाजता ‘निळी धम्मछाया’ हा भीम गीतांचा कार्यक्रम मधुकर मेश्राम सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता हरिश्चंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखाली ‘जात प्रभुत्व आणि मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ऋषीकेश कांबळे, रुपाली शिंदे, दिलीप चव्हाण, शरद गायकवाड, राहुल कोसंबी सहभागी होणार आहेत. दुपारी 2.30 वाजता ‘लेखन स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक दडपशाही’ या विषयावर भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून, त्यामध्ये राजीव खांडेकर, जयदेव डोळे, संजय आवटे, अरुण खोरे, बालाजी सुतार, अपर्णा लांजेवार, युवराज मोहिते सहभागी होणार आहेत. सायंकाळी 5.30 वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑमव्हेट यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मान होणार आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, कुलगुरु डॉ. एकनाथ खेडकर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 7.00 वाजता कवी लोकनाथ यशवंत व सहकार्‍यांचे कवी संमेलन होणार असून, त्याचे  सूत्रसंचालन प्रशांत वंजारे करणार आहेत. रात्री 9.00 वाजता अरुण मिरजकर लिखित ‘एका धोतराची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. धर्मराज निमसरकर, राजाभाऊ भैलुमे, किरण सुरवसे, दीपक म्हस्के, निशा भंडारे, अमरनाथ आदी कार्यकर्ते संमेलनाच्या यशस्वीततेसाठी परिश्रम घेत असल्याचे परशुराम वाडेकर यांनी नमूद केले.
अध्यक्ष निवडीबद्दल ऐनापुरे यांचा सत्कार
सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कादंबरीकार जी. के. ऐनापुरे यांचा प्रा. विलास वाघ यांच्या सत्कार करण्यात आला. सद्यस्थितीत समाजात सुरु असलेल्या अविवेकी गोष्टींवर संमेलनात भाष्य करणार आहे. सर्व विचारधारेतील लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा सम्यक साहित्य संमेलनाचा हेतू आहे. मुक्तपणे विचार मांडण्याचे व्यासपीठ या संमेलनाने उपलब्ध करून दिले असून, त्याला न्याय देणारी भूमिका मांडणार असल्याचे ऐनापुरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. प्रा. विलास वाघ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

जुळता जुळता जुळतंय की’मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज

0

आपल्या जोडीदाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड आणि जोडीदाराला दिलेली साथ यातून देखील प्रेम व्यक्त करता येऊ शकते. सोनी मराठी वाहिनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने नात्यांचीलव्हस्टोरी सेलिब्रेट करणार आहे. अशीच अपूर्वा आणि विजय यांच्या अनोख्या नात्यांची लव्हस्टोरी ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

अपूर्वाचे स्वत:चे हॉटेल असावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विजयने सावकाराकडून घेतलेले कर्ज आणि त्यानंतर झालेला गोंधळ आपण सर्वांनी पाहिला आहे. या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी अपूर्वाकडेहॉटेल विकणे हा एकमेव मार्ग जरी असला तरी विजय तिला असे करण्यापासून रोकतो आणि त्यानंतर त्याचे लक्ष  ‘महाराष्ट्रातील प्रसिध्द शेफ विष्णु मनोहर कोल्हापूरात येऊन ‘बेस्ट शेफ’ची निवड करणारआहेत’ या जाहिरातीकडे जाते. विष्णु मनोहर अपूर्वाच्या हॉटेलमध्ये येऊन तिला कोणता पदार्थ शिकवणार आणि पदार्थांशी निगडीत कोणत्या टिप्स देणार हे प्रेक्षकांना येत्या सोमवारी एक तासाच्या विशेषभागात पाहायला मिळणार आहे.

ख्यातनाम शेफ विष्णु मनोहर यांच्याकडून पदार्थांची रेसिपी जाणून घ्यायला अनेक स्त्रिया आतूर असतात आणि आता तर घर बसल्या स्त्रियांना आणि प्रेक्षकांना ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेतूनविष्णु मनोहर यांच्याकडून रेसिपी जाणून घ्यायला मिळणार आहेत.

“अपूर्वाला रेसिपी शिकवता शिकवता प्रेक्षकांनाही छान पदार्थ शिकवायचे आहेत आणि ते पदार्थ फिल्मी स्टाईल शिकवायचे नसून पूर्णपणे ते पदार्थ शिकता येतील आणि घरी करता येतील. असे हवेत माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी हा एक वेगळा अनुभव असेल”, असे विष्णु मनोहर यांनी म्हटले.

अपूर्वाने बनवलेल्या  स्पेशल डिशेस, विष्णु मनोहर यांची  खास रेसिपी आणि अपूर्वा-विजय यांच्या नात्याची लव्हस्टोरी पाहण्यासाठी नक्की बघा ‘जुळता जुळता जुळतंय की’चा एक तासाचा विशेष भाग १८फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता फक्त सोनी मराठीवर.

शनिवारी पालकमंत्री बापट यांचा नागरी सत्कार – अमोल बालवडकर (व्हिडीओ)

0

पुणे-येत्या शनिवारी 10 गावांचे ग्रामस्थ,सरपंच यांच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती येथे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली .
16 फेब्रुवारी रोजी ,सकाळी साडेदहा वाजता मुंबई बेंगलोर महामार्गावरील बाणेर येथील मर्चिडीस शो रूम शेजारील बंटारा भवन मध्ये हा सोहळा होणार आहे. सुस,हिंजेवडी,माण, म्हाळुंगे ,बाणेर ,बालेवाडी,पाषाण ,सुतारवाडी ,सोमेश्वर वाडी येथील ग्रामस्थ आणि सरपंच यांच्या वतीने होणाऱ्या या समारंभास सकाळ पेपर्स चे अध्यक्ष प्रतापराव पवार ,तसेच माजी खासदार नानासाहेब नवले,हभप वाणीभूषण चंद्रकांत महाराज वांजळे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत .शंकरभाऊ मांडेकर ,पांडुरंग ओझरकर ,कोमाल्ताई साखरे,स्मिताताई जांभूळकर ,स्मिताताई भोसले,बाळासाहेब रानवडे ,अपुर्वाताई निकाळजे ,मयूर भांडे,,राहुल जांभूळकर,पांडुरंग पाडाळे,गजानन चांदेरे,सपनाताई वाडकर ,कविताताई माकर,तर नगरसेवक अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरे ,स्वप्नाली सायकर ,ज्योतीताई कळमकर  हे या साम्राम्भाचे निमंत्रक आहेत .

‘केपीआयटी ‘आणि ‘ज्ञान प्रबोधिनी’आयोजित ‘छोटे सायंटिस्टस्’ स्पर्धेचा समारोप

0
पुणे :‘केपीआयटी ‘ टेक्नॉलॉजीस लिमिटेड आणि ‘ज्ञान प्रबोधिनी’आयोजित ‘छोटे सायंटिस्टस्’ स्पर्धेचा समारोप   केपीआयटी कॅम्पस   , हिंजवडी -फेज -३ येथे झाला . विजेत्या शाळांना पारितोषिके देण्यात आली . स्पर्धेचे हे पाचवे वर्ष होते .  या उपक्रमात  ‘वी -सॉल्व्ह ‘ ही समस्या परिहार स्पर्धा होती , त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक परिसरातील समस्या देऊन त्यावर वैज्ञानिक उत्तर शोधण्यास,प्रकल्प करण्यास सांगण्यात आले  होते  . विजेत्यांना सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र ,स्कुलबॅग ,व   विजयी शाळांना ट्राफी देण्यात आली  .
पुणे मनपा क्षेत्रातील  इयत्ता 8 वी गटात  प्रथम क्रमांक संत नामदेव माध्यमिक विद्यालय( महर्षी नगर पुणे ),  दुसरा क्रमांक राजीव गांधी ई लर्निग  स्कुल   (सहकार नगर), तृतीय क्रमांक  यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय( बिबवेवाडी) यांना मिळाला . पिंपरी -चिंचवड मनपा गटात  प्रथम क्रमांक  पिंपरी  –  चिंचवड  मनपाचे थेरगाव  स्कुल  , द्वितीय क्रमांक  पिंपरी -चिंचवड    मनपाचे पिपळे गुरव स्कुल यांना मिळाला .  इयत्ता 8 वी गटात मावळ व मुळशी विभागातून   प्रथम क्रमांक संत तुकाराम विद्यालय( शिवणे)  दुसरा क्रमांक  श्रीराम विद्यालय (नवलाख उंबरे),तिसरा क्रमांक स्व बाबूराव रायरीकर माध्यमिक विद्यालय(उरवङे) यांना मिळाला .
इयत्ता 9 वी गटात प्रथम क्रमांक ग्राम प्रबोधिनी विद्यालय( साळुम्बरे ).दुसरा क्रमांक पंचक्रोशी विद्यालय (दारूब्रे)  तृतीय क्रमांक व्हिजन इंग्लिश  स्कुल   (न-हे आंबेगाव ) यांना मिळाला .
अटल टिंकरिंग लॅब ‘ असलेल्या शाळांच्या  ‘छोटे सायंटिस्टस्  ‘ स्पर्धेत एसपीएम स्कुलचा प्रथम क्रमांक आला .द्वितीय क्रमांक  मिलेनियम नेशनल  स्कूल (पुणे )  तर तृतीय क्रमांक सुंदराबाई राठी स्कुल   (पुणे) यांनी पटकावला .   किशोर पाटील (व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ,केपीआयटी  उद्योग  समूह ),  पिंपरी -चिंचवड  मनपा माध्यमिक शिक्षण अधिकारी पराग मुडे ,डॉ. सारिका केळकर ,राहूल उपलप  , संत रंजन ( टीम लिङर ,केपीआयटी) प्रकाश रणनवरे(स्पर्धा समन्वयक ) यांच्या च्या हस्ते बक्षिसे  देण्यात आली .
१३ फेब्रुवारी रोजी  पुण्यात झालेल्या या स्पर्धेत  मावळ -मुळशी तालुक्यातील २०  शाळा ,पुणे महानगर  क्षेत्रातील 10 शाळा ,पिंपरी -चिंचवड क्षेत्रातील ८ शाळा अशा 38 शाळा आणि २०० विद्यार्थी सहभागी झाले.  १४ फेब्रुवारी रोजी ‘अटल टिंकरिंग लॅब’ च्या १६ शाळा आणि १०० विद्यार्थी सहभागी झाले .
 किशोर फडतरे , तुषार जुवेकर (केपीआयटी ) यांनी स्पर्धा संयोजन केले .प्रणव पुजारी यांनी सूत्रसंचालन केले . केपीआयटीच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख राजेश सिंग ,  परेश शिंदे ,गणेश भताणे ,विशाल गायकवाङ, अक्षय कुलथे , प्रशांत दिवेकर उपस्थित होते .
 २०१२ मध्ये २० शाळांमध्ये ८०० विद्यार्थ्यांमध्ये सुरु झालेला हा उपक्रम १७७ शाळा आणि १५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे . भारतातील २० शहरांमध्ये हा उपक्रम पोहोचला आहे .

इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा)च्या माजी विद्यार्थी मेळाव्यास चांगला प्रतिसाद

0
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) आझम कॅम्पस येथे नुकत्याच झालेल्या  चौथ्या माजी विद्यार्थी मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला .  माजी विद्यार्थ्यांच्या ‘द नेस्ट ‘ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एन. जगताप , लतिफ मगदूम (सहसचिव , एम सी ई सोसायटी) ,इरफान शेख (सहसचिव , एम सी ई सोसाटी) उपस्थित होते .
सलमान राखांगी यांना  ” प्राईड ऑफ अल्युमनी ‘ अक्षय रोकडे यांना   ‘बेस्ट आंत्रप्रुन या पुरस्काराने गौरविण्यात आले .
कीर्ती सपारे यांनी सूत्र संचालन  केले . अरिफ खान पठाण यांनी आभार मानले .

शिवजयंती सोहळ्याला जुन्नरला होणारी सभा ओझरला घेण्यास जुन्नर मधून सर्वपक्षीय विरोध

0
जुन्नर /आनंद कांबळे
यंदाच्या वर्षी  शिवजयंती सोहळ्याची सभा ओझर येथे घेण्याचे नियोजन   लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.मात्र या निर्णयाला जुन्नर शहरातील  सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडुन विरोध होत आहे..शिवजयंतीची सभा किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी  नेहमीप्रमाणे जुन्नरलाच झाली पाहिजे ती ओझऱला घेऊन देणार नाही,असे निवेदन जुन्नर शहरातील  सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच शिवप्रेमीं जनतेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.
   19 फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरीवर साजरा होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यांनंतर  प्रतिवर्षी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला होणारी मुख्यमंत्री ,व मंत्रीगनांच्या प्रमुख उपस्थितीत जुन्नर येथे  होणारी सभा यावर्षी अष्टविनायक क्षेत्र ओझर येथे  होणार  असल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी  जुन्नर येथे झालेल्या शिवजयंती  नियोजन बैठकीत सांगितले होते.
किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मोत्सव सोहळया नंतर    जुन्नरला होनाऱ्या सभेची परंपरा खंडीत करु नये असे निवेदन    जुन्नरचे शिवसेनेचे नगराध्यक्ष शाम पांडे,   उपनगराध्यक्ष अलका फुलपगार ,राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते  दिनेश दुबे यांच्यासह सर्वच नगरसेवक ,नागरिकांच्या वतीने  निवेदन देण्यात आले आहे.
 जुन्नर शिवजन्मभूमी सोडून दुसऱ्या  ठिकाणी घेण्यासाठी  ओझरला येथे सभा घेण्याचा  निर्णय आम्हास मान्य नाही अन्यथा   आम्ही सभा  होऊ देणार नाही,असे निवेदनात म्हटले आहे.
१)केंद्र शासनाच्या भारतमाता रस्ते जोडणी योजनेच्या अंतर्गत राज्यातील अष्टविनायक क्षेत्रांच्या 10 किमी परिघातील रस्ते दुपदरी करण्याची कामे सध्या सुरु आहेत त्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा आमदार शरद सोनवणे यांचा प्रयत्न आहे. म्हणून अष्टविनायक क्षेत्र ओझर येथे सभा घेण्याचे नियोजन आहे. 
 २)जुन्नर येथेच  शिवजयंती सोहळ्यानंतरची सभा व्हावी म्हणून  पालकमंत्री गिरीष बापट यांना  पत्र जुन्नर  शहर भाजपच्या वतीने देण्यात आलेले आहे .
-नरेंद्र तांबोळी(अध्यक्ष-जुन्नर शहर भाजप)
३)महाराष्ट्र राज्याची निर्मिती  झाल्यापासून शिवजयंती ही शिवनेरीच्या पायथ्याशी होत आहे.यावर्षीच अपवाद का? असा प्रश्न जुन्नर शहरवासियांना पडला आहे.

शेतकी कॉलेज येथे मेट्रो भूमिगत कामाचा शुभारंभ संपन्न

0

पुणे-शिवाजीनगर येथील शेतकी कॉलेज येथे मेट्रो भूमिगत कामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी मेट्रोच्या अधिकार्यांनी भूमिगत मेट्रोचा मार्ग, उपलब्ध मशिनरिज ची माहिती उपस्थितांना दिली. पालकमंत्री गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रो साठी दिलेल्या निधी व त्यांनी केलेल्या सहकार्याबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे मेट्रोचे पुढील प्रस्ताविंत मार्गची पूर्तता करून संपूर्ण पुण्यामध्ये मेट्रोचा विस्तार करण्याची आपली योजना असल्याचे पालकमंत्री बापट यांनी सांगितले. स्थानिक आमदार विजय काळे यांनी पुणेकरांना पुढील दिड वर्षामध्ये मेट्रो मधून प्रवास करायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला. नगरसेवक आदित्य माळवे यांनी मेट्रो चे काम लवकरात लवकर होण्यासाठी महापालिकेच्या परवानग्या व वृक्ष प्राधिकरण विषयक कामे जलदगतीने करून देण्याचा मानस व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री  बापट, आमदार विजय काळे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक आदित्य माळवे, नगरसेविका सोनाली लांडगे, नगरसेविका राजश्री काळे, नगरसेवक महेश लडकत, नगरसेवक अजय खेडेकर, माजी नगरसेवक दत्ता खाडे, मधुकर मुसळे, शाम सातपुते, संदीप काळे, रवींद्र साळेगावकर, अभिनव सावंत, विशाल धुमाळ, शैलेंद्र मोरे, गौरव गोटे, प्रदीप मोरे, मनोज नलावडे, नरेश राउत, बाळासाहेब अमराळे, मुकुंद पुराणिक, सतीश मराठे, अपर्णा गोसावी, भावना शेळके, शाम काची, दिलीप शेळके, नंदा मोरे, दत्ता खंडागळे, वैशाली काणे, किरण बदामी, सुप्रिया खैरनार, सुधीर आल्हाट, प्रभाकर पवार, अपर्णा कुऱ्हाडे, गणेश बगाडे, संतोष लांडगे, शिवाजी डोंगरे, श्री. सोरटे, प्रसाद कुलकर्णी, श्री. रिसबूड, रोहित शेळके, गोविंद भोगी, लक्ष्मण लोखंडे, दिलीप काळे, संदीप गायकवाड, ऐश्वर्य देशपांडे यांच्यासह मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्तांना मारहाण प्रकरण -नगरसेवक रवींद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

0

पुणे : महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्या प्रकरणी सरकारी आणि बचाव पक्षाची बाजु बुधवारी न्यायालयाने ऐकून घेतली.  गुरुवारी काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. सत्र न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांच्या न्यायालयाने धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. त्यामुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
सत्र न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांच्या न्यायालयात धंगेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. याच प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांना मंगळवारी न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. याच धर्तीवर धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी बचाव पक्षाचे वकील हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात केली. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकरी वकील उज्ज्वला पवार यांनी बाजु मांडली. निंबाळकर हे भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत. धंगेकर व इतरांकडून त्यांना मारहाण झाली आहे. प्रशासकीय अधिकाºयाला मारहाण करणे गंभीर गुन्हा आहे. शिंदे व धंगेकर यांची याप्रकरणात भूमिका वेगळी असून धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन नाकारावा, अशी मागणी यावेळी पवार यांनी केली.  या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे बचाव पक्षाच्या वकील अ‍ॅड. निंबाळकर यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील आद्य लेणीं पैकी एक जुन्नर येथील तुळजा बुद्ध लेणी.

0
जुन्नर /आनंद कांबळे
सम्राट अशोकांनी बुद्धांच्या पवित्र अस्थिधातुंवर ८४००० स्तुप बांधले, लेणी कोरल्या,पहिली लेणी बिहार येथील बराबर येथे कोरली.जगप्रसिद्ध सांची, सारनाथ, भरहूत येथील स्तुप आपल्याला माहीत आहेत. सांची येथील बुद्ध स्तुपाचे चित्र आज नवीन आलेल्या २०० च्या नोटेवर आपणास पहायला मिळते.
जुन्नर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले शहर.ज्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्याच्या पश्चिम बाजुला कड़ेलोटाच्या पायथ्याजवळ एक टेकडी लागते.त्या टेकडीपासून जवळच ठाकरवाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावाच्या शेवटी तुळजा लेणी कोरलेली आपणास पहायला मिळते.
भारतातील एकून लेण्यांपैंकी सर्वांत जास्त लेणी जुन्नर तालुक्यात आहेत. त्यापैंकीच तुळजा लेणी.तुळजा लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे ही लेणी महाराष्ट्रात कोरण्यात आलेली सर्वात पहिली लेणी असावी,असे बौद्ध लेणी अभ्यासक व पत्रकार सिध्दार्थ कसबे यांनी सांगितले .
ही लेणी सम्राट अशोकांच्या काळातच कोरली गेली असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे.
या लेणीमध्ये असलेला स्तुप हा अन्य ठिकाणी पाहायला मिळत नाही. या स्तुपाच्या भोवती बारा अष्टकोणी खांब आहेत आणि वरती गोलाकार घुमट… बाजुलाच बौद्ध भिक्षुंसाठी विहार, भोजनालय, सभा मंडप कोरले आहेत. काही ठिकाणी सुंदर असे नक्षीकाम केलेले पहायला मिळते. यात उपासक स्तुपाची पूजा करताना दाखवले आहेत. बुद्ध, धम्म, संघ या तीन रत्नांचे त्रिरत्न चिन्ह सुद्धा जुन्नर येथील प्रत्येक लेणीमध्ये कोरलेले दिसते. डोंगरावरुन कोसळणारे धबधब्याचे पाणी थेट लेणीसमोरच पानकोदीमध्ये साठवले जाते. पावसाळ्यात लेणीचे सौंदर्य अधिकच खुलून येते. लेणीमधून समोर असणारा विस्तीर्ण जुन्नर तालुका, शिवनेरी किल्ला दिसतो.
लेण्यांमधील चित्र
या लेणीच्या अभ्यासासाठी अनेक अभ्यासक येत असतात. लेणी आणि शिल्प कलेचे अभ्यासक महेंद्र शेगावकर सर या लेणीबद्दल सांगतात की, या लेणीच्या निर्मितीचा काळ हा सुरुवातीचा म्हणजे इ.स.पू २३० चा आहे. नंतर तिथे अजिंठ्यासारखे चित्रकलेच्या माध्यमातून जातक कथा व बुध्द चरित्रातील प्रसंग साकारण्यात आली.
या लेणीची प्रसिद्धी हेन्री कुझेनच्या कानावर गेली. मुंबई गव्हर्नर व तो या लेणी पाहण्यासाठी येणार होते असा निरोप जून्नरच्या कलेक्टर ला मिळाला. गव्हर्नर येतात म्हणून लेणीची साफसफाई करुन घेण्यात आली. वाढलेली झुडपे, कोळी किष्टके, पाकोळ्याची घाण काढण्यात आली. ही घटना १९१८ मधील आहे. पाणी टाकून गोणपाट – कांबळीच्या मदतीने लेणीच्या भिंती स्वच्छ करण्यात आल्या. त्यामुळे सर्व चित्रे नष्ट झाली. जेव्हा गव्हर्नर, हेन्री कुझेन आले… बघतात तर काय? तो हा प्रकार… जे पाहण्यासाठी आले तेच नष्ट झालेले होते. अतिउत्साह व अज्ञानापायी ऐतिहासिक ठेवा नष्ट झाला होता.
झालेल्या प्रकारामुळे त्यांनी कपाळावर हात मारुन घेतला. याबाबतचा तेव्हाचा अहवाल आजही पुरातत्व खात्याकडे आहे. अज्ञानापायी असे प्रकार अनेक ठिकाणी झालेले आहेत. सोळाव्या – सतराव्या शतकात सारनाथ येथील तथागतांच्या अस्थीचा सोन्याचा करंडक सापडला. त्यातील रक्षा गंगेत श्रद्धापूर्वक विसर्जित करण्यात आली व तो करंडक जपून ठेवण्यात आला. तुळजा लेणी स्तुप व त्यावर असलेले गोल छत्र व बारा गोलाकार स्तंभ अशी रचना अन्यत्र कुठेही आढळून येत नाही.

महापौर दालनातील घटनेचे मी समर्थन करणार नाही,पण भ्रष्ट कारभारालाही पाठीशी घालू नका- अरविंद शिंदे

0

पुणे-अतिरिक्त आयुक्तांना महापौर दालनात झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात अटकपूर्व जामिन मिळविलेले कॉंग्रेस पक्षाचे महापालिकेतील गट नेते अरविंद शिंदे यांनी .. महापौर दालनात घडलेली घटना समर्थनीय नाहीच .. असे म्हटले आहे मात्र चूक कोणाची हे लक्षात घेतले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे .
महापौर कार्यालयात जे काही घडले ते अनवधानाने घडले असे सांगत ते म्हणाले महापालिकेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरु आहे त्याचा आवाज उठविण्यासाठी आम्ही माध्यमांकडे जाणे ,मुख्य सभेत आवाज उठवणे आणि आंदोलने करत आलो आहोत .अनेक प्रकरणातील भ्रष्टाचारावर आम्ही आवाज उठविला आहे. आयुक्तांना त्या दिवशी आम्ही सकाळीच जलपर्णी बाबतच्या गैरप्रकाराबाबत निवेदन दिले होते.त्यास दाद मिळेना म्हणून आम्ही महापौर दालनात ठिय्या मांडला यावेळी आम्ही अतिरिक्त आयुक्तांवरच आमचा आक्षेप आहे त्यांना बोलावू नका असे सांगितले होते तरीही ते तिथे आले. आणि आपली बाजू महापौरांपुढे विशद करू लागले. यावेळी आमच्यातील एक नगरसेवक , म्हणाला चोऱ्या तुमच्याच खात्यातून होतात …तुम्ही काय खुलासा देतात ..त्यावेळी त्यांची प्रतिक्रीया होती तुमच्या लोकांची लायकी आहे का माझ्यावर आक्षेप घेण्याची … र मी त्यावर उठून प्रश्न केला तुम्ही आमची लायकी काढणारे कोण ?आणि गोंधळ झाला . त्यात आम्हालाही अतिरिक्त आयुक्तांच्या सुरक्षा रक्षकांकडून ढकलेले गेले .
यापूर्वी अतिक्रमण खात्याच्या एका अधिकाऱ्याला कार्यालयात मारहाण झाली होती तेव्हा मी मुख्य सभेत आवाज उठविला होता , उलट त्या अधिकाऱ्यावरच गुन्हा दाखल केला गेला. सभागृह नेत्यासह अन्य कार्यालये फोडली गेल्याची घटना महापालिकेत घडली तेव्हा देखील अशी पोलीस कारवाई करण्यात आली नाही . आणि आता महापौर दालनात झालेली घटना अनवधानाने झाली असताना मध्यरात्री नंतर पोलिसांचा मोठा ताफा आमच्या घरी  येतो आणि  आम्हाला त्यास तोंड द्यावे लागते याला काय म्हणावे ,महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा जरूर हक्क आहे पण त्यांनी भ्रष्ट कारस्थानांना पाठीशी घालू नये असेही आवाहन त्यांनी केले . पहा आणि ऐका नेमके अरविंद शिंदे यांनी नेमके काय म्हटले आहे त्यांच्याच तोंडून …..