Home Blog Page 2988

लक्ष्मीबाई वाडेकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

0
संघर्षातून कुटुंबाला उभे करणार्‍या पाच महिलांचा विशेष सन्मान
पुणे : रोजंदारी करुन जीवनातील संघर्षाशी दोन हात करीत कुटुंबाला घडवणार्‍या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नेते परशुराम वाडेकर यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई बाळकृष्ण वाडेकर यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. संघर्षातून कुटुंबाला उभे करणार्‍या पाच विशेष महिलांचा सन्मानही यावेळी होणार आहे.
रविवार, दि. 24 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 6.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे हा समारंभ होणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, खासदार अनिल शिरोळे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. पी. ए. इनामदार यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

निवडणुका लागू द्या मग पहा त्यांची कशी फाडतो -राज ठाकरे (व्हिडीओ)

0

पुणे- माझा तोफखाना तयार आहे ,आचारसंहिता लागण्याची वात पाहतोय , मग पहा ,ज्यंची फाडायची त्यांची कशी फाडतो .. अशा स्वरूपाचे आवाहन आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी येथे दिले .
मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या वार्डातील इ लर्निंग शाळेचे भूमिपूजन राज यांच्या हस्ते झाले .त्यावेळी ते बोलत होते . प्रथम त्यांनी वसंत मोरे यांच्या वार्डातील दवाखान्याचे भूमिपूजन केले.त्यानंतर ते कोंढवा येथील या कार्यक्रमाला आले .. ते म्हणाले , माझे दोन्ही नगरसेवक चांगले आहेत ,त्यांना त्यांच्या कामामुळे मुंबईतही आता लोक ओळखतात पुण्याचे १६२ नगरसेवक माझ्या हातात येवू द्यात ..मग पहा कसा चमत्कार करून दाखवितो ,पण तुमच्या नशिबात हा चमत्कार दिसत नाही कारण हा चमत्कार हवा असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात ..पण माझा तोफखाना तयार आहे निवडणुका लागू द्यात मग पहा कोणाची कशी फाडतो …

जिल्हाधिकारी राम यांच्याकडून मतदान केंद्राची पहाणी

0

पुणे दि.22:-आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पुणे शहरातील २१५ कसबा विधानसभा मतदारसंघातील श्रीमती सावित्रीबाई फुले इंग्रजी माध्यम शाळा, रफीक अहमद किडवाई ऊर्दू माध्यमिक विद्यालय  या मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील प्राथमिक सुविधांची पाहणी केली. मतदान केंद्र, दिव्यागांसाठी सोयी आदींचा आढावा घेतला.

यावेळी पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, झोनल अधिकारी अविनाश घोडके, मंडल अधिकारी प्रमोद साळी, तलाठी एस.एन.नांगरे, अजिंक्य वनशिव, सौरभ शिरसाठ, बाळासाहेब आखाडे, सतीश देशमुख आदि उपस्थित होते.

पुण्यात तिसऱ्या ‘आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे’ आयोजन

0
  • तीन दिवसीय परिषदेत जागतिक किर्तीचे तज्ज्ञ डॉक्टरव संशोधक उपस्थित राहणार.
  • भारतातील  १५५० डॉक्टरांची  परिषदेला उपस्थित राहणार आहे.
  • भारतातून ५० मधुमेह विशेषज्ञ व संशोधकआपले संशोधनपर निबंध सादर करणार.

पुणे-मधुमेहावर उपचार करणारे एक अग्रगण्य हॉस्पिटल असलेल्या चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटी तर्फे आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे आयोजन ८ मार्च ते १०मार्च २०१९ दरम्यान हॉटेल जे डब्लू मॅरीयेट, पुणे येथे करण्यात आले आहे. ही चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटीने आयोजित केलेली तिसरी आंतरराष्ट्रीयमधुमेह परिषद आहे. याचे उद्घाटन नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते पार पडणार आहे.

भारतात मधुमेह होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या ७.४ कोटी भारतीय मधुमेह ग्रस्त आहेत. यामधील अर्ध्या लोकांना माहित देखील नसत की त्यांना मधुमेह आहे. मधुमेहावर नियंत्रण न आणल्यास  किडनी, नस, डोळे आणि हृदय याची हानी होते.  मधुमेह व त्यामुळे होणारे विविध आजार व त्यावरील उपचार या विषयी चर्चा करण्यासाठी अनेक जागतिक किर्तीचे तज्ज्ञ डॉक्टर व संशोधक या परिषदेमध्ये भाग घेणार आहेत.  याशिवाय या परिषदेमध्ये जगभरातील नामवंत संस्था जसे कि कॅरोलिन्सका इन्स्टिटयूट, लुंड विश्वविद्यालय, ओरेब्रो (स्वीडन), मेयो क्लिनिक, व्हर्जिनिया विद्यापीठ आणि मियामी विद्यापीठ (यु.एस.ए), कार्डिफ विद्यापीठ व मॅन्चेस्टर विद्यापीठ(इंग्लंड) सहभाग घेणार आहेत. भारतातून ५० डाएबेटीस विशेषज्ञ व संशोधक आपले संशोधनपर निबंध सादर करणार असून यापैकी एकाला चेलाराम फाउंडेशन डाएबेटीस रिसर्च अवॉर्ड व एक लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतातील  १५५० डॉक्टर्स  परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटीचे अध्यक्ष श्री. लाल एल चेलाराम म्हणाले की “चेलाराम मधुमेह संस्था नेहमीच मधुमेह आणि त्याची गुंतागुंत टाळण्याकरिता लढण्यात आघाडीवर राहिली आहे. या परिषदेद्वारे ह्या क्षेत्रातील नवे ज्ञान मधुमेहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांपर्यंत पोहचविण्याचा हा आमच्या संस्थेचा प्रयत्न आहे. त्यामुळे मधुमेहाचे व त्याचे दुष्परिणाम या वरील उपचारांवर मोठा प्रभाव पडेल.”

यावेळी चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. जी. उन्नीकृष्णन म्हणाले की “ या परिषदेनिम्मित जगभरातील विख्यात मधुमेह तज्ञ उपस्थित राहणार आहेत. पाश्चात्य देशांमध्ये मधुमेहाशी तुलना करता भारतात मधुमेह एक वेगळे आव्हान आहे. मला आशा आहे की या परिषदेच्या मध्यमातून भारतातील मधुमेहामुळे ग्रस्त लाखो लोकांना नवीन उपाय मिळेल.”

तसेच चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटीचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ.(ब्रि) अनिल पी पंडीत म्हणाले की “चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटी अत्याधुनिक सोई सुविधां बरोबर पोडियाट्री डिपार्टमेन्ट, रिअल-टाइम रेगुलर ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम, इंसुलिन पंप, बेरिएट्रिक सर्जरी, एंडोक्रायोलॉजी, हेमोडायलिसिस केंद्र यासारख्या उपकरणे व सुविधा उपलब्द्ध आहेत. याच बरोबर चेलाराम हे मल्टिस्पेशालिटी केअर असून या मध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह ऑफथालमीक केअर व प्रगत रेडिओलॉजिकल इमेजिंग इ. चा समावेश देखील आहे.”

या परिषदेत मधुमेहामुळे होणारी ‘पायाची न्यूरोपॅथी’ ही कार्यशाळा हे एक वैशिष्ठ्यपूर्ण सत्र आहे. ह्या कार्यशाळेत मधुमेही व्यक्तीचे पाय कसे तपासावेत तसेच पायांच्या जखमा व व्रण कशाप्रमाणे उपचार करावे ह्याचे प्रत्यक्ष सादरीकरण केले जाणार आहे. कमी उष्माकांचा आहार व व्यायाम ह्यांचा वजनामध्ये होणारी घट तसेच मधुमेहापासून मुक्ती ह्यांचा परस्पर संबंध ह्याविषयी चर्चासत्र होणार आहे. तसेच ह्या परिषदेत मधुमेहावरील नवीन उपचार, बेरिएट्रिक सर्जरी, पायातील जंतू संसार्गावरील नवीन उपचार औषधी, थायरोइड ग्रंथीचे विकार, कन्टिन्यूअस ग्लुकोज मॉनिटरिंग (CGM)  इ. विषयी चर्चा होणार आहे.

तिसरी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद- २०१९ हे वैद्यकीय क्षेत्रातील पुस्तकी आणि प्रात्यक्षिक ज्ञान याला जोडणारा एक दुवा ठरू शकेल. तसेच ही परिषद डॉक्टर व संशोधक यांना मधुमेहाच्या नवीन बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी एक वैज्ञानिक व्यासपीठ उपलब्ध करून देईल.

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑमव्हेट यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार

0

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनात यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार डॉ. गेल ऑमव्हेट यांना प्रदान करण्यात येणार आहे.

शनिवार, दि. २३ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संविधाननगरी, बालगंधर्व रंगमंदिरात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर उपस्थित राहणार आहेत.
तत्पूर्वी, दुपारी २.३० वाजता संमेलनस्थळी ‘लेखन स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक दडपशाही’ या विषयावर भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून, त्यामध्ये राजीव खांडेकर, जयदेव डोळे, संजय आवटे, अरुण खोरे, बालाजी सुतार, अपर्णा लांजेवार, युवराज मोहिते सहभागी होणार आहेत.

मी कुदळ मारणार -राज ठाकरेंच्या इशाऱ्यावर राजकीय चर्चा

0


पुणे-मनसे चे नगरसेवक वसंत मोरे यांच्या प्रयत्नातून कात्रज येथे डिलाईट बेकरीसमोर सरकारी दवाखान्याच्या भूमिपूजन प्रसंगी राज ठाकरे यांनी माध्यमांना ‘मी नारळ नाही फोडणार ,मी कुदळ मारणार ‘असा हातानेच इशारा केल्याने .. राज ठाकरे यांच्या या इशाऱ्याला ‘गर्भित इशारा ‘ समजायचे काय ? यावरून राजकीय चर्चेला सुरुवात झाली .अर्थात तत्पूर्वी अनिल शिदोरे आणि वसंत मोरे यांनी नारळ फोडला होता ,त्यामुळे कदाचित राज यांनी ‘ मी आता कुदळ मारणार’ असा इशारा केला असेल . पण निवडणुकीच्या तोंडावर राज यांच्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देऊन येथील राजकीय सामिक्षकांमध्ये  या इशाऱ्यावर चर्चा रंगली नाही तर नवलच .
या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी जमली होती . मोबाईल कॅमेरा वर चित्रीकरण करण्यासाठी झालेल्या गर्दीने या कार्यक्रमात व्यत्तय येत होता.अनिल शिदोरे,रुपाली पाटील ,किशोर शिंदे ,गणेश सातपुते आदी कार्यक्रमाला उपस्थित होते .याभागातील मुस्लीम समाजाची उपस्थिती लक्षणीय होती . महापालिकेचे अधिकारी पठाण यांचा सत्कार यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला .पहा या कार्यक्रमाची व्हिडीओ झलक ….

‘बसंत उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम २०१९’ चे २४ फेब्रुवारी रोजी आयोजन

0
पुणे : बांगीया संस्कृती संसद ने ‘बसंत उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम २०१९’ चे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ९.१५ पासून पुढे होणार आहे. उत्सवाचे १४ वे वर्ष असून, कार्यक्रम एम्प्रेस गार्डन येथे होणार आहे. हिवाळ्याचे दिवस संपून हवेत नावीन्य आल्याची चाहूल देणारा हा वसंतोत्सव असतो, अशी माहिती बांगीया संस्कृती संसदच्या उपाध्यक्ष मधुमिता घोष यांनी पत्रकाद्वारे दिली.
सास्वती गुहा ठाकुर दूरदर्शन बंगालीच्या पहिल्या निवेदक व अभिनेत्री आणि त्यांची कन्या श्रेया गुहा ठाकूर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
श्रेया गुहा ठाकूर या ‘रबिन्द्र संगीत’ सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर श्रेष्ठ कलाकार बिप्लाब मोंडल आणि सिन्थेसायझर वर सुब्रता मुखर्जी (बाबू) साथ सांगत करतील.
यावेळी सादर होणार ‘बसंत बंदना’ हा समर्पित कार्यक्रम गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘नबीन’ मधील निवडक गाण्यावर आधारित आहे. वसंत ऋतूतील सकाळच्या विविध छटांचे दर्शन नृत्यातून घडविणार आहेत.
बसंतोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांचे मूळ मूळ गुरुदेव रवींद्रनाथ टागोरच्या जन्मस्थानी शांतीनिकेत आहे. ज्यामध्ये लोकांना एकत्र आणून विविध रंग रुपी आनंद आणि प्रेम देते, असे या कार्यक्रमाबद्दल बोलताना मधुमिता घोष म्हणाल्या.

साहित्य हे समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब

0
सम्यक साहित्य संमेलनात ‘मी आणि माझे लेखन’ यावर परिसंवाद 
पुणे : “साहित्य हे संवेदनशील व्यक्तीच्या भावनांचा निचरा करणारे, समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब, विवेकवादी विवेचन असते,” असा सूर ‘मी आणि माझे लेखन’ या परिसंवादात व्यक्त झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनातील तिसऱ्या परिसंवादात मान्यवरांनी आपले विचार मांडले. या परिसंवादात युवा कवी सुदाम राठोड, लेखक राकेश वानखेडे, श्रीकांत देशमुख, सुरेश पाटोळे, इंदुमती जोंधळे, वृषाली मगदूम सहभागी झाले होते. मंगेश काळे हे अध्यक्षस्थानी होते.
कवितेला संताप, वेदनेबरोबरच विवेकाची जोड असावी असे सांगत राठोड म्हणाले, “भाषेवरील प्रभुत्व आणि भावनिक राजकारण करता आले म्हणजे चांगली कविता करता येते असे नाही. त्यासाठी विवेक आणि जाणिवा जाग्या असणे आवश्यक आहे. साहित्याला वैश्विक होण्यासाठी दलित साहित्याची गरज पडली. करण यात वेदना, संताप याबरोबरच विवेकाची जोड होती. सर्वच वंचित, शोषितांचे साहित्य म्हणजे दलित साहित्य.  पण सतत आक्रोश, वेदना, विद्रोह हेच म्हणजे दलित साहित्य ही संज्ञा होणे चुकीचे आहे. कोणतीही फक्त दुःखाची भावना फार काळ टिकत नाही.”
वानखेडे म्हणाले, “माझ्या लहानपणी फार शिक्षण नव्हते त्यामुळे माझे आजोबा मला पत्र लिहायला सांगायचे. ते बोलत राहत त्यातून नेमकं काय घ्यायचं आणि काय नाही हे समजून लिहू लागलो, हा लेखनाचं माझा पहिला धडा होता. आजचा समाज, समस्या यांचे आकलन, वाचन आणि त्यावर तुमचे भाष्य हे तुमचे लेखन असते. कादंबरी हा लोकशाही शी हातात हात घालून चालणार प्रकार आहे.”
आपण ज्या वातावरणात वाढलो ते अनुभवच आपल्या लेखनाची प्रेरणा ठरल्याचे सांगत जोंधळे म्हणाल्या, “जीवनासाठी, भलबुरेपणासाठी, आणि काय चालले आहे हे समजण्यासाठी कलेचं उपयोग व्हायला हवा. माझी लेखनाची नाळ जीवनाशी आहे. सामाजिक, आर्थिक दंगलीकडे साक्षीभावाने बघताना ते माझ्या आतून व्यक्त होते. आजूबाजूला जे घडत आहे ते बघताना कोणताही संवेदनशील माणूस शांत बसूच शकत नाही. अनुभूतीच्या जाणिवांचा तसेच चिंतन, मनन आणि माणुसकीचा ओलावा लेखनात असायलाच हवा.”
देशमुख म्हणाले,”कवी, लेखक हे जे वंचित, निराश, दुःखात आहेत त्याविषयी बोलत असतात. त्यामुळे जर कलावंत, साहित्यिक यांना केंद्रस्थानी ठेवले तरच सुधारणा होऊ शकते. ज्यांना चेहरा नाही अशांविषयी ते लिहितात. जगण्याचे उर्ध्वपातन म्हणजे लेखन.”
जीवन आणि लेखन प्रवास हे एकमेकांना जोडलेले आहेत असे सांगत मगदूम म्हणाल्या,”भावनांचा उत्स्फूर्त अविष्कार म्हणजे साहित्य. मी जे अनुभवत गेले, बघत गेले त्यातून माझे लेखन सुरू झाले. एखाद्या स्त्रीच्या समस्येसाठी आंदोलने, संघर्ष, मोर्चे करताना मी फार अस्वस्थ असे पण एकदा तो प्रश्न सुटला की मी माझ्या भावनांचा निचरा कथा लेखनातून करते.”
काळे म्हणाले, “प्रत्येकाने सुरुवातीच्या काळात संतापी असावे आणि स्थिरावले की संशयी व्हावे म्हणजे लेखन फुलते. कोणत्याही साहित्यनिर्मितीसाठी रियाज आवश्यक असतो. कला फक्त जीवनवादी किंवा कालवडी नसावे. या दोहोंचा योग्य मेळ त्यात साधलेला असावा.”
माणसाच्या वृत्ती, प्रवृत्ती आणि विकृती मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या लेखनातून करतो, असे पाटोळे यांनी सांगितले.

सूर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या ऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

0

पुणे : सूर्यदत्ता पब्लिक स्कूलमध्ये ११ वी वाणिज्य शाखेत शिकत असलेल्या ऋतुजा शरद गोरे हिने शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धा विधिशा (मध्यप्रदेश) येथे पार पडल्या. तिने १९ वर्षा खालील मुलींच्या गटातून ५९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत तिने मध्यप्रदेश, छत्तीसगड, आसाम, हरियाना या संघाच्या खेळाडूंचा पराभव केला. तसेच नुकत्याच संयुक्त अरब अमिराती येथे पार पडलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ५९ किलो वजनी गटामधून तिने सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात तिने संयुक्त अरब अमिरातीच्या खेळाडूंचा १४-२ ने पराभव केला. या स्पर्धेत भारतातील १३ खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत भारताने १ सुवर्ण व ४ कांस्य पदकाची कमाई केली. मागील वर्षीही ऋतुजाने या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली होती.

शिमोगा, कर्नाटक येथे झालेल्या फेडरेशन राष्ट्रीय स्पर्धेतही ऋतुजाने सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशाबद्दल सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इंस्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संजय चोरडिया व उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनी तिला गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन तिचे विशेष अभिनंदन केले. ऑलंम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन देशासाठी सुवर्णपदक आणण्याची ऋतुजाची इच्छा आहे. अरविंद निषाद व प्रवीण बोरसे यांच्याकडून ती प्रशिक्षण घेत असून, आई-वडिलांचा पाठिंबा तिला प्रोत्साहित करत असल्याचे ऋतुजा सांगते.

भारतातील १३१किल्ल्यावर दुर्गपूजा होणार.

0
जुन्नर /आनंद कांबळे
भारतातील १३१किल्ल्यावर उद्या रविवारी दुर्गपूजा करण्यात येणार आहे अशी माहिती शिवाजी ट्रेल व हिस्ट्री क्लबचे संघटक प्रा.विनायक खोत यांनी दिली.
दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी किल्ल्यावर दुर्गपूजा केली जाते. यावेळी किल्ल्यावरील जमीन व गवत सुकते व ते काढण्यास सोपे जाते.तसेच  बोर्डाच्या परीक्षा चालू होतात.
याचवेळी नववी पर्यतचे विद्यार्थी ,हिस्ट्री क्लबचे विद्यार्थी यांना सकाळची शाळाअसते.त्यामुळे हे विद्यार्थी किल्ल्यावर वेळ देतात .ही वेळ किल्ले संवर्धन कामासाठी योग्य असते म्हणून फेब्रुवारी महिन्यात दुर्गपूजा आयोजित करण्यात येत आहे.
     गेली २२वर्ष शिवाजी ट्रेल च्या माध्यमातून दर वर्षी एका किल्ल्यांचे पूजन केले जात आहे. पूजन म्हणजे किल्ल्याची साफ सफाई करणे , वास्तुची स्वच्छता करणे व प्रार्थना करणे ,
हे किल्ला स्वरुपी देवतांनो 
त्याकाळी तुम्ही आमचे रक्षण केले
आता वेळ आली आहे की
आम्ही तुझे संरक्षण करण्याची,ते आम्ही  केले पाहिजे.
जेथे जेथे संवर्धन कार्य चालू आहे तेथे अशी कोणतेही दुर्घटना धडू देऊ नकोस  कि ज्यामुळे हे संवर्धन कार्य खंडित होईल, संवर्धन कार्य करणाऱ्यांना सुख , शांती , समृध्दी दे व त्याच्या आरोग्याची काळजी घे.
हिच तुझ्या चरणी माझी प्रार्थना.
२०१४ ला घनगड किल्ल्यावर वार केलेल्या पूजेस महाराष्ट्रातून जवळ पास ३००० दुर्ग प्रेमी किल्ल्यावर आले होते , एवढी संख्या पाहून  संस्थापक श्री मिलिंद क्षीरसागर यांनी २०१५ ची पूजा राज्यातील अनेक किल्ल्यावर करण्याचा मानस ग्रुप मेम्बर्स ला बोलून दाखवला व २०१५ ला ७०/८० किल्ल्यावर दुर्ग पूजा पार पडली , २०१६ ला शतक नक्की होईल व आश्या मुहूर्तावर , सरदार घराण्यातील श्री सत्यशील राजे दाभाडे यांनी किल्ल्यावर उपस्थित रहावे म्हणून विचारणा केल्यावर त्यांनी आजुन काही घराणी सोबत आणण्याची इच्छा व्यक्त केली , व २०१६ ला १२१ किल्ल्यांवर पूजा पर पडली विशेष म्हणजे २१किल्ल्यांवर सरदार घराण्याच्या वंशजांनी उपस्थिती लावली होती , ह्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली. मागील दोन दशके संवर्धन कार्यात आग्रेसार असणाऱ्या संस्थेने किल्ले तिकोना , किल्ले घनगड , किल्ले चावांड व किल्ले नारायणगड वर  संवर्धन कार्य केले आहे, किल्ल्यांवर ध्वजस्तंभ उभारणे, किल्ल्यावरील वनस्पती, फुले यांचे अभ्यास पूर्व नोंदी करणे, किल्ल्यांचे सर्वेक्षण करणे, दुर्ग संवर्धक कार्यशाळा घेणे, किल्ल्यांवर हिस्ट्री क्लब च्या विद्यार्थ्यांना संवर्धन कार्यात गोडी लावणे, किल्ल्याच्या घेऱ्यातील गावात समाज उपयोगी कामे करणे, लायब्ररी चालू करणे, विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटणे , वैद्यकिय सेवा पुरवणे अश्या अनेक कामात पुढाकार घेऊन समाजाला एक नवीन दिशा देण्याचे काम चालू आहे, सरदार घरण्यांच्या मदतीने वीर सेनानींच्या नावाचे पुरस्कार चालू केले आहेत,
श्रीमंत साबूसिन्हा पवार दुर्ग संवर्धक पुरस्कार, हिरोजी इंदुलकर दुर्ग संवर्धन पुरस्कार, सरसेनापती खंडेराव दाभाडे रमंना पुरस्कार असे काही पुरस्कार कायमस्वरूपी चालू केले आहेत.
दुर्ग संवर्धन कार्यात सर्वांना प्रेरणा मिळावी म्हणून सरदार घराण्याच्या वंशजांना एकत्र करून किल्ल्यांवर घेऊन जाण्याचे काम चालू झाले. खरे वीर  पुरुष समाजा समोर आदर्श म्हणून आणले तर आजचा युवक परत उमेदीने , ताठ मानेने  समाजाचे नेतृत्व करेल व त्याचा आदर्श छत्रपती व त्यांचे सरदार असतील.
२०१९ मधील हि दुर्ग पूजा भारतातील १३१ किल्ल्यांवर ( ऐतीहासीक वास्तू)  होणार असून ५० किल्ल्यांवर एकूण ८० पेक्षा जास्त सरदार घराणी किल्ल्यांवर उपस्थित राहणार आहेत ही एक ऐतिहासिक घटना असणार आहेत.
महाराष्ट्र सह पंजाब , दिल्ली , मध्यप्रदेश राजस्थान , गुजराथ , दमण, गोवा , केरळ ,कर्नाटक , आंध्र प्रदेश व तमिळनाडू ह्या राज्यात पूजा होणार आहेत.

भजन स्पर्धेचेजिल्हास्तरीय भजन स्पर्धेत धामणखेल शाळा द्वितीय

0
जुन्नर /आनंद कांबळे
पुणे जिल्हा परिषदेच्या   यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात जुन्नर तालुक्यातील धामणखेल जि.प शाळेस भजन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा अवसरी खु|| ता.आंबेगाव जि. पुणे या ठिकाणी आयोजित  करण्यात आल्या होत्या..
 भजन स्पर्धेत  लहान गटात 13 तालुक्यातील शाळा सहभागी झाल्या होत्या.. त्यामध्ये जि. प.प्राथमिक शाळा धामणखेल (,ता.जुन्नर ,जि. पुणे )या शाळेचा द्वितीय क्रमांक आला ,अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक आहिरे सर यांनी दिली.
          विजेत्या संघाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक  वळसे पाटील ,शिक्षणाधिकारी सुनिल कुऱ्हाडे, गटनेते शरद  लेंडे ,गटशिक्षणाधिकारी  पी. एस.मेमाणे,विस्तार अधिकारी भोंडवे ,केंद्रप्रमुख सौ.रंजना डुंबरे,आदी मान्य वरांच्या हस्ते चषक आणि प्रशस्ति पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
        विजेत्या संघास  पांडुरंग डामसे ,दिपक पानसरे सौ .अनिता औटी ,सौ.मनीषा नाडेकर यांनी मार्गदर्शन केले.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान कोंडे,उपाध्यक्ष विकास मडके,सदस्य सत्यवान ताजवे,संतोष कोंडे,चंद्रकांत कोंडे,सरपंच सौ.मंदाताई गुंजाळ उपसरपंच बारकू रघतवान व सर्व ग्रामपंचायत सदस्य ,शाळा  व्यवस्थापन समिती सदस्य आणि धामणखेल ग्रामस्थांच्या वतीने सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन  करण्यात आले.

पुण्याचे ६ हजार ७६५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी केले सादर

0
पुणे-महापालिकेचे २०१९-२० या आर्थिक वर्षीचे अंदाजपत्रक आज महापालिकेत सादर करण्यात आले. शहरातील मेट्रो प्रकल्प, पीएमपीएमएलचे सक्षमीकरण, स्मार्ट प्रकल्प, वाहन तळांच्या विकास, शहरांतर्गत वाहतुकीसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या उच्चतम क्षमता द्रुतगती मार्गाचे (एचसीएमटीआर) काम सुरू करण्याबरोबरच नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना आणि पूर्व भागास वरदान ठरणाऱ्या भामाआसखेड पाणी पुरवठा योजनेसाठी भरीव तरतूद असलेले ६ हजार ७६५ कोटी रुपयांचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षीचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी महापालिकेच्या मुख्यसभेत आज, शुक्रवार (दि.२२) सादर केले. महापौर मुक्ता टिळक ,आयुक्त सोरव राव ,राजेंद्र निंबाळकर ,बिपीन शर्मा,रुबल आगरवाल,सभागृहनेते श्रीनाथ भिमाले शिवसेनेचे नाना भानगिरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते . स्थायीने सादर केलेले हे  अंदाजपत्रक महापालिका आयुक्तांच्या अंदाजपत्रकापेक्षा ६८० कोटीने जास्त आहे.
समान पाणीपुरवठा योजना
‘समान पाणीपुरवठा योजने’मुळे पुणेकरांना २४ तास पुरेसे पाणी योग्य दाबाने मिळणार आहे. पाण्याची अनावश्यक साठवणूक व पर्यायाने पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून मीटर पद्धती राबविण्यात येणार आहे. पाण्याची गळती शोधून तेथे दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. पाण्याच्या वापराप्रमाणे बिल पद्धतीमुळे पाणी वापराचे लेखापरीक्षण होईल आणि वाया जाणार्‍या पाण्याचे अचूक प्रमाण ठरविता येईल. पाण्याचे समान वितरण करता यावे, यासाठी या योजनेत साठवण टाक्या बांधण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनेने आता गती घेतली असून, सध्या ६० साठवण टाक्यांचे काम प्रगतिपथावर आहे. मार्च २०१९ अखेर २५ टाक्यांचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
(अंदाजपत्रकात तरतूद ः ३०१ कोटी ४० लाख रुपये)
भामा-आसखेड 
पुणे शहराचा वाढता विस्तार पाहता पूर्व भागाला पुरेसा व नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी भामा-आसखेड प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे पुणे-नगर रस्त्यावरील कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव, धानोरी, कल्याणीनगर, वडगाव शेरी,विमान नगर, खराडी, चंदननगर या भागाचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार असून, या भागातील नागरिकांची टँकरच्या खर्चातून सुटका होणार आहे. या प्रकल्पाचे ८०% काम पूर्ण झाले आहे. या वर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रकल्प पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. योजनेचे काम पूर्ण करणे आणि सिंचन पुनर्स्थापना खर्च किंवा प्रकल्पग‘स्तांना मोबदला देण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः १८५ कोटी रुपये)
गतिमान वाहतूक 
पुणे मेट्रो रेल प्रकल्प 
जलद, सुरक्षित प्रवासी सेवेच्या दृष्टीने शहरभर मेट्रो मार्गांचे जाळे तयार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. शिवसृष्टी ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मेट्रो मार्गांचे काम पूर्वनियोजनानुसार वेगाने सुरू आहे. पीएमआरडीएच्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. पुणे शहराच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात १९५.२६ किमीचे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुणे महानगर मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मेट्रो मार्गिकेला तत्त्वतः मान्यता देण्यात आली असून, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याचे काम अंति’ टप्पत आहे. रामवाडी ते लोहगाव विमानतळ आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गांचा डीपीआर करण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः ८ कोटी रुपये)
नगर रस्त्यासाठी वाहतूक आराखडा
केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत गेल्या वर्षी शहरातील २०० किलोमीटर रस्त्यांचे ‘रोड सेफ्टी ऑडिट’ करण्यात आले होते. त्यात पुणे-नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वांत धोकादायक असल्याची बाब समोर आली आहे. याचा विचार करून पुणे-नगर रस्ता हे एक एकक मानून ‘नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा’ तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये मेट्रो मार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण व पुरेशी बससं‘या, ठिकठिकाणी उड्डाण पूल/ग्रेडसेपरेटर/भुयारी मार्ग आणि रोड सेफ्टी ऑडिटमध्ये सुचविलेल्या उपाययोजना तातडीने करण्यात येणार आहेत.
नगर रस्त्यावरील महत्त्वाचे प्रकल्प 
१. पुणे मेट्रोचे लोहगाव विमानतळ व वाघोलीपर्यंत विस्तारीकरण, डीपीआर तयार करणे (अंदाजपत्रकात तरतूद ः २ कोटी रुपये)
२. गोल्फ चौक उड्डाण पूल/ग्रेडसेपरेटर ः (अंदाजपत्रकात तरतूद ः २० कोटी रुपये)
३. खराडी येथे उड्डाण पूल/ग्रेडसेपरेटर   ः (अंदाजपत्रकात तरतूद ः १५ कोटी रुपये)
४. कल्याणीनगर ते कोरेगाव पार्क उड्डाण पुलाचे विस्तारीकरण ः (अंदाजपत्रकात तरतूद ः १५ कोटी रुपये)
५. येरवडा शास्त्रीनगर येथे उड्डाण पूल ः (अंदाजपत्रकात तरतूद ः २० कोटी रुपये)
६. विश्रांतवाडी येथे केंद्र शासन व पुणे मनपाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत उड्डाण पूल ः (अंदाजपत्रकात तरतूद ः २० कोटी रुपये)
 
सिंहगड रस्त्यावर उड्डाण पूल 
राजाराम चौक ते ङ्गन टाइम थिएटरपर्यंत सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरात पाच चौक आहेत. सिंहगड रस्त्यावरून प्रतितास जाणार्‍या वाहनांची सं‘या आठ हजारांहून अधिक आहे. त्यामुळे या चौकांमधील वाहतूक कोंडीत वाहनचालकांना अडकून पडावे लागते. त्यामुळे वेळ व इंधनाचा अपव्यय होतो. सिंहगड रस्त्यावरून जाणार्‍या हजारो वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा, यासाठी उड्डाण पूल बांधण्याची योजना आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः ३० कोटी रुपये)
पाषाण-सूस उड्डाण पूल 
मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाषाण-सूस येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये नोकरीनिमित्त प्रवास करणार्‍या कर्मचार्‍यांची सं‘या मोठी आहे. या भागात सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो. वाहतूक कोंडीचे निवारण करण्यासाठी पाषाण-सूस येथे उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. उड्डाण पूल प्रकल्पाच्या संकल्पचित्राला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त झाले आहे.
धायरी ङ्गाटा येथे जंक्शन पूल 
सिंहगड रस्त्यावर सणस शाळेजवळ धायरी फाटा येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खडकवासला रस्त्याकडे जाणारा उड्डाण पूल बांधण्यात आला आहे. मात्र या पुलाखाली असलेल्या चौकातील वाहतूक कोंडी कमी झालेली नाही. त्यामुळे या उड्डाण पुलावरुन इंग‘जी ‘वाय’ आकाराचा धायरीकडे जाणारा जंक्शन पूल उभारण्यात येणार आहे.
वाहनतळांची निर्मिती
शहराच्या विविध भागांमध्ये वाहतूक कोंडी होते. पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भरच पडते. महापालिकेने पार्किंगचे धोरण निश्‍चित केले असून, या धोरणााला सुसंगत शहराच्या विविध भागात वाहनतळांची निर्मिती करण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्त्यावर रेव्हेन्यू कॉलनी व मॅक्डोनोल्ड शेजारी, दत्तवाडी, बाणेर, वारजे, विमाननगर, कोंढवा बुद्रुक आदी परिसरातील उपलब्ध ऍमेनिटी स्पेसवर वाहनतळ निर्मिती करण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः २९ कोटी ५४ लाख रुपये)
रिंग रोड, नवे रस्ते
एचसीएमटीआर प्रकल्प 
शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी ‘उच्चतम क्षमता द्रुतगती मार्ग’ (एचसीएमटीआर) प्रकल्प १९८७ च्या विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला होता. शहरातील प्रमुख साठ रस्त्यांना जोडणारा ३६ किलोमीटर लांबीचा व २४ मीटर रुंदीचा हा प्रकल्प आहे. दोन्ही बाजूस तीन याप्रमाणे सहा मार्गिका प्रस्तावित आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधी उभारणीचे पर्याय सुचवून निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एका सल्लागार कंपनीकडे देेण्यात आली आहे. या प्रकल्पाला या वर्षी गती देण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः २०० कोटी रुपये)
महत्त्वाच्या रस्त्यांसाठी तरतुदी
कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गावर होणारी वाहनांची गर्दी, वाढलेली लोकसं‘या यामुळे वाहतुकीची कोंडी होते. या भागातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महापालिका हद्दीपर्यंत ८४ मीटर रुंद विकास आराखड्यातील रस्त्याची आखणी करण्यात आली आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः ५५ कोटी ३० लाख रुपये)
शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नदीपात्रातून शिवणे-खराडी असा अठरा किलोमीटरचा रस्ता करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. शिवणे ते म्हात्रे पूल, म्हात्रे पूल ते संगमवाडी आणि संगमवाडी ते खराडी या तीन टप्प्यात हे काम होईल. (अंदाजपत्रकात तरतूद ः २२ कोटी १२ लाख रुपये)
कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने ‘बालभारती-पौड फाटा’ रस्त्याची निर्मिती महत्त्वाची आहे. बालभारती ते पौड फाटा रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेने पर्यावरण आघात मूल्यांकन आणि वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः २८ लाख रुपये)
ट्रॅङ्गिक वॉर्डन
रस्त्यावरील चौकांची सं‘या, वाहतूक कोंडी होण्याची ठिकाणे, सिग्नलचा कालावधी यांचा अभ्यास करून सिग्नलचे सुसूत्रीकरण करण्याचे काम सुरू आहे. शहरामध्ये मेट्रो, बीआरटी आणि ठिकठिकाणी उड्डाण पुलांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असून वाहनचालकांचा वेळ व इंधनाचा अपव्यय होतो. विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना झेब्रा पट्‌ट्यांवरून रस्ता ओलांडताना गैरसोय होते. वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत व्हावी, वाहतुकीची कोंडी कमी व्हावी आणि पादचार्‍यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी वर्दळीच्या मुख्या चौकांमध्ये १०० ट्रॅङ्गिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः १ कोटी २० लाख रुपये)
सक्षम सार्वजनिक वाहतूक
पीएमपीएमएलसाठी नवीन बसेस
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) नुकत्याच पर्यावरणपूरक व किङ्गायतशीर अशा २५ ई-बसेस ताफ्यात दाखल केल्या. पाचशे ई-बसेस टप्प्याटप्प्याने आणि ८०० सीएनजी बसेस घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. महिलांच्या ‘तेजस्विनी’ बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, लवकरच आणखी २७ ‘तेजस्विनी’ बसेसची खरेदी केली जाईल. (अंदाजपत्रकात तरतूद ः ई बसेससाठी १०५ कोटी रुपये आणि ८०० बसेससाठी ७५ कोटी रुपये)
दृष्टिहीनांसोबतच्या मदतनीसाला सवलत 
महापालिकेतर्ङ्गे दृष्टिहीनांना प्रवासासाठी ‘पीएमपीएमएल’चा मोङ्गत पास दिला जातो. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या मदतनीसाला किंवा नातेवाईकाला प्रवासाचे पूर्ण भाडे आकारले जाते. या भाड्याचा भार दृष्टिहीन व्यक्तीलाच सहन करावा लागतो. अनेकदा अंधत्त्वामुळे रोजगाराचे कोणतेच साधनही नसते. दृष्टिहीनांसोबत असलेल्या मदतनीसाला रेल्वे आणि एसटीत सवलतीचा पास दिला जातो. त्याच धर्तीवर ‘पीएमपीएमल’च्या तिकिटात पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे. ‘पीएमपीएमएल’ने प्रवास करणार्‍या शहरातील दृष्टिहीन पासधारकांची सं‘या १५०० इतकी आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. (अंदाजपत्रकात तरतूद ः ३० लाख रुपये)
नदीसुधारणा-काठ सौदर्यीकरण 
मुळा-मुठा शुद्धीकरण
‘राष्ट्रीय नदी संवर्धन योजने’अंतर्गत मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करण्याचा प्रकल्प (जायका) हाती घेण्यात आला आहे. प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ९९०.२६ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले असून, सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांत प्रतिदिन २७७ दशलक्ष लिटर क्षमतेची ६ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र व ७० किलोमीटरच्या मलवाहिन्या विकसित करण्यात येणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद ः ८० कोटी रुपये)
 
नदीकाठ सुधारणा प्रकल्प
पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड या हद्दीतून वाहणार्‍या ४४ किलोमीटर लांबीच्या मुळा-मुठा नदीच्या काठाचे सुशोभीकरण व विकसन करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यासाठी उपरोक्त संस्थांनी मिळून ‘एसपीव्ही’ स्थापन करण्यासाठी प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे, अंतिम प्रकल्प अहवाल तयार करणे, नदीशी संलग्न विविध विभागांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’, एसपीव्ही कंपनी स्थापन करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद ः ७ कोटी रुपये)
 
नैसर्गिक जलस्रोतांचा विकास 
पुणे महापालिका हद्दीत आणि नव्याने समाविष्ट गावांमध्ये तलाव, विहिरी, झरे आदी नैसर्गिक जलस्रोतांची सं‘या मोठी आहे. सध्या यांपैकी बहुतेक जलस्रोत ङ्गारसे वापरात नाहीत. या जलस्रोतांचा विकास केल्यास निसर्गातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार्‍या पाण्याचा दैनंदिन वापरासाठी उपयोग करता येईल. या दृष्टिने समाविष्ट गावांमध्ये मोठ्या सं‘येने असलेल्या विहिरींवर जलशुद्धीकरण यंत्रणा बसविणे, आधुनिक तंत्राचा वापर करून तलावांचे शुद्धीकरण आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद ः १ कोटी ७० लाख रुपये)
 
कात्रज तलाव प्रदूषणमुक्त 
भिलारेवाडी, मांगडेवाडी व गुजर-निंबाळकरवाडी या ग‘ामपंचायतींच्या हद्दीमध्ये मुख्य मलवाहिन्या विकसित करण्यासाठी मा. मुख्य सभेची मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे नानासाहेब पेशवे तलाव (कात्रज) प्रदूषणमुक्त होईल. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये सांडपाणी संकलित करून त्यावर प्रकि‘या करण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः ३ कोटी ५० लाख रुपये)
ड्रेनेज गाळ काढण्यासाठी विशेष यंत्रणा 
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्ङ्गत डे्रनेजमधील गाळ काढण्याचे काम केले जाते. या कामाचे उत्तम नियोजन करून स्वच्छता अभियान यशस्वी करण्याच्या उद्देशाने प्रत्येक प्रभागात जेटिंग मशिन, वाहन व आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या रस्त्यांबरोबर छोटे रस्ते व गल्लीबोळातील डे्रेनेज सङ्गाई करणे सुलभ होईल. प्रत्येक प्रभागात स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध झाल्याने ड्रेनेज सङ्गाईची कामे वेळेत व प्रभावीपणे पूर्ण होऊ शकतील. (अंदाजपत्रकात तरतूद ः ४ कोटी रुपये)
सर्वांसाठी वैद्यकीय सुविधा
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय
पुणे शहरात आरोग्य सेवेसह बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर पुणे महापालिकेच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालय बांधण्यासाठी मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली होती. सर्वसामान्य नागरिकांना परवडणार्‍या दरात किंबहुना मोङ्गत वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. नायडू रुग्णालयाच्या आवारात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : १० कोटी रुपये)
महिलांसाठी कर्करोग निदान चाचणी
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्ङ्गत शहरात १९ प्रसूतिगृहे चालविली जातात. या प्रसूतिगृहांमध्ये कर्करोगाचे निदान करणारी यंत्रणा उपलब्ध नाही. सध्या महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याने मृत्यू होणार्‍या महिलांची सं‘या मोठी आहे. प्राथमिक स्तरावर कर्करोगाचे निदान झाल्यास रुग्ण आजारातून पूर्णपणे बरा होऊ शकतो. महापालिकेच्या सर्व १९ प्रसूतिगृहांमध्ये ‘स्मार्ट स्कोप’ हे कर्करोगाचे निदान करणारे उपकरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांना ही सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः १ कोटी रुपये)
सुरळीत औषध पुरवठ्यासाठी सॉफ्टवेअर
गाडीखाना या मध्यवर्ती केंद्रातून महापालिकेच्या विविध रुग्णालयांना आवश्यक औषधांचा पुरवठा केला जातो. औषधनिहाय शिल्लक साठा, कोणत्या रुग्णालयात कोणत्या औषधांचा किती साठा आहे त्याची माहिती घेऊन, त्यानुसार पुरवठा करण्याच्या प्रचलित पद्धतीत रुग्णालयांमध्ये वेळेवर औषधांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे जीवनावश्यक औषधांची टंचाई निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन मनपाच्या सर्व रुग्णालयांना आवश्यक असणारा औषध पुरवठा सुरळीतपणे व्हावा व औषधांची टंचाई भासू नये यासाठी ‘स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत’ हे सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे.
राजीव गांधी रुग्णालयात डायग्नोसिस सेंटर
मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय) या तंत्रामुळे अनेक आजारांचे निदान लवकर आणि अचूक होते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात या तंत्राचा वापर वाढला आहे. डॉक्टर बहुतेकदा एमआरआय करायचे असे सुचवितात. परंतु एमआरआय सारखी निदान पद्धती खर्चिक आहे. सर्वसामान्य नागरिकांना अत्यल्प दरात विविध आजारांच्या निदान चाचण्या करता याव्यात यासाठी येरवडा येथील ‘राजीव गांधी रुग्णालयात डायग्नोसिस सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. एमआरआय, क्ष किरण (एक्स रे), सोनोग्राफी, सिटीस्कॅन आदी सुविधा तेथे अल्प दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद ः १० कोटी रुपये)
पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना 
‘पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजने’अंतर्गत मिळकत कर भरणार्‍या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसदाराला विम्यापोटी पाच लाख रुपये मिळत होते. या योजनेची पुनर्रचना करण्यात येणार आहे. या योजनेत निवासी मिळकतकर धारकाच्या कुटुंबात तो स्वतः, त्याची पत्नी किंवा पती, त्याच्यावर अवलंबून असलेली २३ वर्षांखालील पहिली दोन अविवाहित अपत्य, मिळकतकर दात्याचे आई व वडील अशी
कुटुंबाची व्या‘या करण्यात आली आहे. नवीन योजनेत समाविष्ट करण्यात आलेले लाभ पुढीलप्रमाणे
१. मिळकतकर धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपये
२. मिळकतकर धारकाच्या पत्नीचा किंवा पतीचा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये
३. मिळकतकर धारकावर अवलंबून असलेल्या २३ वर्षांखालील पहिल्या दोन पाल्यास अपघाती मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबाला मूळ विमा रकमेच्या
   ५०% म्हणजे दोन लाख पन्नास हजार रुपये
४. मिळकत धारकाच्या आई किंवा वडलांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख पन्नास हजार रुपये
५. कुटुंबातील व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यास कुटुंबातील सर्वांना मिळून किंवा एका व्यक्तीला एका वर्षामध्ये जास्तीत जास्त एक
   लाख रुपये दवाखान्यातील उपचारासाठी दिले जातील
६. वरील पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण एका कुटुंबातील सर्वांना मिळून किंवा एका व्यक्तीला वर्षातून एकदा वापरता येईल
७. अपघाताने पूर्णतः अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये किंवा अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणानुसार भरपाई देण्यात
   येईल (अंदाजपत्रकात तरतूद ः ७ कोटी रुपये)
मनपाच्या प्रत्येक विभागासाठी पुष्पक शववाहिनी
निधन झालेल्या व्यक्तीचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपीए’एल) पुष्पक शववाहिनी सेवा दिली जाते. या सेवेसाठी दररोज १२ ते १८ कॉल येतात. सध्या पीएमपीए’एलकडे तीन पुष्पक शववाहिन्या आहेत. मृत व्यक्तीचे घर ते स्मशानभूमी आणि परत घर अशी सेवा असेल तर दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. पुष्पक गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन दोन पुष्पक शववाहिन्या घेतल्या जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाच विभागांना प्रत्येकी एक याप्रमाणे पाच गाड्या उपलब्ध होतील. (अंदाजपत्रकात तरतूद ः ५० लाख रुपये)
भटके व मोकाट कुत्र्यांची नसबंदी 
पुणे शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव लक्षात घेता तो कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी नायडू हॉस्पिटलजवळील केंद्रात दर वर्षी १२ हजार कुत्र्यांची नसबंदी केली जाते. या प्रकल्पाची क्षमता वाढवून दरवर्षी १८ हजार कुत्र्यांची नसबंदी केली जाईल. (अंदाजपत्रकात तरतूद ः ४ कोटी रुपये)
 
प्राणी उपचार व संगोपन केंद्र 
पाळीव प्राणी किंवा शहरात आढळणारे पशु-पक्षी यांची संख्या मोठी आहे. शहर आणि परिसरात वन्य विभागाच्या जमिनी असल्यामुळे या ठिकाणच्या पशु-पक्ष्यांचा वावर असतो. सध्या पाळीव प्राणी किंवा पशु-पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सुविधा आहे. परंतु ते शहराच्या एका भागात असल्याने अन्य ठिकाणी तातडीने उपचाराची सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन विश्रांतवाडी किंवा मुंढवा परिसरात प्राणी उपचार व संगोपन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः २ कोटी रुपये)
 
प्रकाश गोळे पक्षी संवर्धन योजना
पश्‍चिम घाटाच्या पर्वतरांगा आणि दख्खनच्या पठाराचा काही भाग पुण्याजवळ असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे अधिवास पुणे शहरात बघायला मिळायचे. वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीमुळे शहर आणि परिसरातील पक्षिविश्‍व समृद्ध होते. आजही शहरामध्ये दीडशेहून अधिक जातीचे पक्षी वास्तव्यास आहेत. परंतु निसर्ग साखळीत महत्त्वाची भूमिका असणारे अनेक पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. अशा परिस्थितीत पक्षी संवर्धनासाठी अनेक जण धडपड करीत असतात. अशा पक्षिप्रेमींना बळ देण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने ‘प्रकाश गोळे पक्षी संवर्धन योजना’ राबविण्यात येणार आहे. या योजनेत पक्षी संवर्धन संमेलनाचे आयोजन केले जाईल.
वैशिष्ट्यपूर्ण उद्याने, पर्यावरण संवर्धन
वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांवर आधारित उद्याने 
हिंगणे खुर्द येथील तुकाई माता उद्यानात चार एकर क्षेत्रावरील लिली पार्क व सात एकर जागेवरील रॉक पार्क, वडगाव शेरीत दिव्यांगासाठी अडथळा विरहित ‘बॅरीअर फ्री ऍक्सेस’ व वैशिष्ट्यपूर्ण पाम उद्यान, कोथरूडच्या हिंदुहृदयसम‘ाट बाळासाहेब ठाकरे उद्यानात दृकश्राव्य माध्यमातून स्वतःविषयी माहिती देणारी झाडे ‘टॉकिंग ट्रीज’, स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीसाठी विमाननगर परिसरातील ‘वेस्ट पार्क’, कळस धानोरीत नागरी वन उद्यान आणि वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणारे इंद्रप्रस्थ उद्यानातील ‘ट्रॅफीक पार्क’ अशी वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांवर आधारित उद्याने विकसित केली जाणार आहेत. त्यासाठी अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे.
ई-कचरा व प्लॅस्टिक कचरा संशोधन केंद्र
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात ई-कचरा व प्लॅस्टिक कचरा तयार होतो. या कचर्‍याची विल्हेवाट आणि पुनर्वापर या दृष्टीने प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. ई-कचर्‍यातील पारा, शिसे याबरोबरच कॅडमियम, ब्रोमिनेटेड फ्लेम रिटारडंट्‌स, हेक्झावॅलंट क‘ोमियम यांसारखे हानिकारक घटक थेट पर्यावरणात मिसळतात. प्लॅस्टिक कचर्‍यामुळे सुद्धा नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. या कचर्‍याचे संकलन, त्यांचा कमीत कमी वापर, पुनर्वापर, हानिकारक पदार्थांची विल्हेवाट लावणे आदीवर संशोधन करण्यासाठी पुणे शहरात ई-कचरा व प्लॅस्टिक कचरा संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः २ कोटी रुपये)
मनपा अधिकारी व पदाधिकार्‍यांसाठी ई-मोटारी
शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी पीएमपीएमएलच्या ताफ्यात नुकत्याच २५ ई-बसेस दाखल झाल्या आहेत. ई-बसेस डिझेलवर चालणार्‍या बसेसच्या तुलनेत किङ्गायतशीर व पर्यावरणपूरक आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महापालिकेतील पदाधिकारी व अधिकार्‍यांसाठी भाडेतत्त्वावर ई-मोटारी घेण्यात येणार आहेत. तसेच  ई-मोटार चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून पर्यावरणपूरक वाहन वापराचा संदेश पुणेकरांपर्यंत जाईल. (अंदाजपत्रकात तरतूद ः १ कोटी रुपये)
कल्पवृक्ष-कार्बन न्यूट्रल पुणे (बांबू लागवड)
बांबूची लागवड पर्यावरण पूरक आणि आर्थिक उत्पन्न देणारी आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील मोकळ्या जागा, ऍमिनेटी स्पेसेस, बीडीपी क्षेत्र, उद्याने, मैलापाणी शुद्धीकरण केंद्र आदी ठिकाणच्या ५० एकर जागेवर बांबू विकास महामंडळ, नागपूर यांच्याशी करार करून प्रायोगिक तत्त्वावर ‘कल्पवृक्ष-कार्बन न्यूट्रल पुणे’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः १ कोटी रुपये)
सर्व उद्याने विद्यार्थ्यांसाठी खुली
पुणे शहरात शालेय व महाविद्यालयन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची सं‘या मोठी आहे. उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी देशाच्या विविध भागांतून विद्यार्थी शहरात येतात. छोट्याघरांमुळे शहरातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जागा अपुरी पडते. बाहेरगावांहून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध होत नाहीत. अशा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी शहरातील सर्व १९१ उद्याने सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत खुली करण्यात येणार आहेत. ही सुविधा छायाचित्रकार, चित्रकार, शिल्पकार आदींना ही उपलब्ध असेल. यासाठी उद्यान विभागाचे ओळखपत्र घेणे आवश्यक असणार आहे.
शहरी जलयुक्त शिवार
पुणे महापालिका व नव्याने समाविष्ट गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टेकड्या व वन विभागाच्या जमिनी आहेत. भांबुर्डा वन विभागातील वेताळ टेकडी, पाचगाव-पर्वती, वारजे टेकडी, महात्मा टेकडी, सिंहगड रस्त्यावरील टेकडी, गंगाधा’, हडपसर, धानोरी आदी भागांमध्ये पाणी साठवता येईल किंवा भूजल पातळी वाढवता येईल अशा जमिनी आहेत. पुणे वन विभागाबरोबर संयुक्त प्रकल्प राबवून शहरी जलयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः २ कोटी रुपये)
टाकाऊ वस्तूंचे पुनर्चक‘ीकरण प्रशिक्षण केंद्र
टाकाऊ वस्तूंचे पुनर्चक्रीकरण करून टिकाऊ वस्तू निर्मिती करण्याचे प्रशिक्षण महिला बचतगट आणि विद्यार्थ्यांना देण्यासाठी पुणे शहरात प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये वापरलेल्या, बंद पडलेल्या, बिघडलेल्या वस्तू व उपकरणांचे पुनर्चक्रीकरण करण्याचे प्रयोग शिकविण्यात येणार आहेत. या इमारतीची उभारणी करताना अधिकाधिक टाकाऊ साहित्याचा उपयोग केला जाणार आहे. ‘स्वच्छ भारत’ या योजनेच्या जनजागृतीसाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल. (अंदाजपत्रकात तरतूद ः १ कोटी रुपये)
घनकचरा व्यवस्थापन, वीजनिर्मिती 
रामटेकडी येथे कचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्प
रामटेकडी हडपसर येथे कचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाची उभारणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पामध्ये दररोज ७५० मेट्रिक टन कचर्‍यावर प्रकि‘या करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष वीजनिर्मिती पुढील वर्षी होऊ शकेल. या प्रकल्पातून १३.५ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होणे अपेक्षित आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे.
उरुळी फुरसुंगी येथे बायोमायनिंग व भू-भराव टाकणे 
उरुळी फुरसुंगी कचरा डेपोवर सुमारे ९ लक्ष मेट्रिक टन इतका कचरा साठलेला आहे. या कचर्‍यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. बायोमायनिंग प्रक्रीयेने या कचर्‍याची पुढील चार वर्षांत विल्हेवाट लावली जाणार आहे. तसेच १० एकर जागेवर भू-भराव टाकणे व देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः १० कोटी ५० लाख रुपये आणि ७० लाख रुपये)
 
यांत्रिकी पद्धतीने कचर्‍याचे वर्गीकरण
शहरात निर्माण होणार्‍या कचर्‍यापैकी सुमारे ५५० मेट्रिक टन कचर्‍यावर दररोज यांत्रिकी पद्धतीने वर्गीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. हडपसर-रामटेकडी प्रकल्पात २०० मेट्रिक टन, केशवनगर, लोहगाव, आंबेगाव प्रकल्पात प्रत्येकी १०० मेट्रिक टन आणि बिबवेवाडी प्रकल्पात ५० मेट्रिक टन कचर्‍यावर वर्गीकरणाची प्रकि‘या करण्यात येईल. भूगांव व ङ्गुरसुंगी येथे नवीन रॅम्प बांधण्याची योजना आहे. त्यासाठी पुरेशी तरतूद करण्यात आली आहे.
स्वच्छ व सुंदर प्रभाग स्पर्धा
आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मीती करून स्वच्छ व सुंदर प्रभाग स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रभागातील सर्वसाधारण स्वच्छता, घन कचर्‍याचे व्यवस्थापन, सुशोभिकरण आदी निकषांवर ही स्पर्धा होणार आहे. पर्यावरणपूरक उपक‘म राबविणार्‍या प्रभागांना विशेष प्राधान्य दिले जाईल. (अंदाज पत्रकात तरतूद : १ कोटी रुपये)
समाविष्ट गावांमध्ये विकासकामे
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये विविधप्रकारची विकासकामे करण्यात येणार आहेत. रस्ते व पदपथ निर्माण करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य सुविधा, शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा, शाळांमध्ये मूलभूत सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतागृहांच्या सुविधा, मैलापाणी शुद्धीकरण, नाल्यांची स्वच्छता, पथदिवे बसविणे आदी विकासकामे केली जातील. (अंदाजत्रकात तरतूद ः १९२ कोटी रुपये)
गुणवत्तापूर्ण शिक्षण, क्रीडा सुविधा
ई-लर्निंग व ई-ग्रंथालय प्रकल्प
वानवडी येथील महादजी शिंदे शाळेच्या जुन्या इमारतीच्या जागी ई-लर्निंग स्कूल बांधले जाणार आहे. वडगाव शेरीत ई-लर्निंग स्कूलसाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार आहे. मनपा शाळांतील वर्ग खोल्यांमध्ये ई-लर्निंगची सुविधा नव्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ई-ग्रंथालये पहिलंदाच सुरू करण्यात येणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद ः ई-लर्निंग १३ कोटी ६० लाख रुपये आणि ई-लायब‘री ५ कोटी रुपये)
मनपा शाळांचे गुणवत्ता मूल्यांकन 
महापालिकेच्या शिक्षण विभागातील सर्व विद्यालयांचे शासन, प्रशासन, नेतृत्व आणि अध्ययन व अध्यापन अशा चार विषयांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता पद्धतीनुसार चाचणी प्रकि‘येवर आधारित मूल्यांकन पद्धतीचा वापर केला जाईल. मूल्यांकनानुसार विद्यालयातील गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. महापालिका शाळांचे पहिल्यांदाच गुणवत्ता मूल्यांकन करण्यात येणार आहे.
मनपा शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा 
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाच्या सर्व १३६ इमारतींमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सध्या महापालिकेच्या दहा शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे नियोजन आहे. या यंत्रणेचे नियंत्रण मु‘याध्यापकांच्या कार्यालयातून करण्यात येर्ईल. (अंदाजपत्रकात तरतूद ः १ कोटी २६ लाख रुपये)
डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा
डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा उपक‘माअंतर्गत ’हापालिकेच सर्व शाळांना अभ्यासपूरक पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यावर राष्ट्रप्रेमाचे संस्कार व्हावेत या हेतूने वाचन प्रेरणा उपक‘माला चालना दिली जाईल. त्या दृष्टीने शाळांना पुस्तके दिली जातील.
स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धा
विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी व शिस्त लागावी या हेतूने पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या सर्व शाळांमध्ये दर तीन महिन्यांनी ‘स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धा’ घेण्यात येणार आहे. वैयक्तिक स्वच्छता, शाळा व परिसरातील स्वच्छता, स्वच्छतागृह, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने केलेले विविध उपक‘म या निकषांच्या आधारावर ही स्पर्धा घेण्यात येईल. यशस्वी शाळांना विभागनिहाय बक्षिसे देण्यात येतील.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्या‘यानमाला
इयत्ता दहावी म्हणजे शालेय जीवनातील शेवटचे वर्ष आणि दहावीची परीक्षा जीवनातील महत्त्वाची परीक्षा म्हणून ओळखली जाते. करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्य आणि समाजाचे दहावीच्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष असते. या परीक्षेला यशस्वीपणे सामोरे जाता यावे यासाठी अभ्यास करण्याचे तंत्र व मंत्र, परीक्षा पद्धती, ताण-तणाव कमी करण्यासाठी उपाययोजना, करिअरची निवड याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने व्या‘यानमालांचे आयोजन करण्यात येणार आहे.
मनपा शाळांतील मैदाने विकसित करणे
विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व त्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा या उद्देशाने महापालिका शाळांतील दोन हजार चौरस फूटांपेक्षा मोठी असणारी २३ मैदाने क्रीडांगणे म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. कबड्डी, खोखो, मल्लखांब, ऍथलेटिक्स, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल आदी खेळांसाठी उपयुक्त ठरतील अशा सर्व सुविधा या मैदानांवर उपलब्ध असतील. खेळांसाठी आवश्यक साहित्य पुरविले जाणार असून, खेळाडूंंना प्रशिक्षण देण्यासाठी मान्यताप्राप्त क‘ीडा संस्थांच्या माध्यमांतून अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध करून दिले जातील. (अंदाजपत्रकात तरतूद ः १ कोटी रुपये)
मनपा शाळा व उद्यानांमध्ये योग केंद्र 
योग ही भारताची प्राचीन ज्ञानशैली आहे. शारीरिक व्यायाम, भावनात्मक समतोल आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी योग महत्वाचा आहे. योगासनाचे महत्व लक्षात घेऊन त्याबाबत जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने २०१५ मध्ये २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगदिन‘ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या सर्व १३६ इमारतींमध्ये व सर्व उद्यानांमध्ये योग प्रशिक्षणासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योग प्रशिक्षकांच्या नियुक्त्या करुन सकाळी ५.०० ते ७.०० आणि संध्याकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत नागरिकांना ही केंद्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत. माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व प्राणायामाचे शिक्षण दिले जाणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः २ कोटी रुपये)
शशिकांत भागवत क्रीडा संग्रहालय व माहिती केंद्र
बाबुराव सणस मैदानाच्या परिसरात क्रीडा संग‘हालय व क्रीडा माहिती केंद्र विकसित करण्यात येणार आहे. विविध खेळ, त्यांचा इतिहास, खेळाडू, प्रशिक्षण, करिअर संधी,   क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी यांची अद्ययावत माहिती,   क्रीडा साहित्य, संदर्भग्रंथ, पुस्तके, ई-लायब‘री, छायाचित्रे, ध्वनिचित्रङ्गिती, मॉडेल्स या माध्यमांतून नागरिकांना kडा विश्‍वाची माहिती व्हावी यासाठी हे केंद्र विकसित करण्यात येणार आहे. या क‘ीडा संग‘हालय व माहिती केंद्राला क‘ीडा पत्रकार शशिकांत भागवत यांचे नाव देण्यात येणार आहे.
कल्याणीनगर क्रीडा अकादमी  
क्रीडा अकादमीत आठ ते चौदा वर्षे वयोगटातील मुला-मुलींची भारतीय क्रीडा प्राधिकरणाने पुरस्कृत केलेल्या संस्थेच्या चाचणीद्वारे निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या मुला-मुलींना आठ ते दहा वर्षे प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणे हे अकादमीचे उद्दिष्ट आहे. कुस्ती, बॅडमिंटन, ऍथलेटिक्स, जलतरण, टेबल टेनिस या वैयक्तिक आणि कबड्डी, व्हॉलिबॉल, हॉकी, खोखो या सांघिक खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कल्याणीनगर भागात क्रीडा अकादमीची उभारणी करण्यात येईल. (अंदाजपत्रकात तरतूद ः २ कोटी रुपये)
 
शिवसृष्टी, स्मारके, वारसा प्रकल्प 
शिवसृष्टी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित कायमस्वरूपी प्रदर्शन ‘शिवसृष्टी’च्या माध्यमातून उभे राहणार आहे. अवघ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकास साजेशी ‘शिवसृष्टी’ पुणे महापालिकेच्या वतीने चांदणी चौकातील जैवविविधता उद्यानाच्या (बीडीपी) ५० एकर जागेत उभारण्यास राज्य सरकारने विशेष बाब म्हणून परवानगी दिली आहे. शिवसृष्टीच्या निर्मितीला वेग देण्यासाठी भूसंपादन करण्याची प्रकि‘या सुरू झाली आहे. (अंदाजपत्रकात तरतूद २६ कोटी ४० लाख रुपये)
गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर स्मारक 
आपल्या अलौकिक प्रतिभेने आणि सिद्धहस्त लेखणीने मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी समृद्ध करणारे ‘आधुनिक वाल्मिकी’ गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे उचित स्मारक करण्याची योजना आहे. त्यासाठी कोथरूड येथील महात्मा सोसायटीमधील ‘एक्झिबिशन सेंटर’मध्ये जागा निश्‍चित करण्यात आली आहे. गीतरामायण दालन, गदिमांच्या वैयक्तिक वस्तूंचे दालन, गदिमांच्या चित्रपटांचे दालन, गदिमांच्या साहित्याचे दालन, डिजिटल स्मारक, प्रेक्षागृह, कलादालन, उद्यान अशा स्वरूपाचे हे स्मारक असेल.
(अंदाजपत्रकात तरतूद ः ५० लाख रुपये)
 
आद्य क‘ांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक 
लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महात्मा ङ्गुले, वासुदेव बळवंत ङ्गडके आदींना प्रेरणा देणार्‍या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथील त्यांच्या समाधी स्थळावर स्मारक उभारण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली होती. राज्य सरकारने विकास आराखड्यात हे आरक्षण कायम केले आहे. स्वातंत्र्य लढ्यात वीर लहुजींचे योगदान मोलाचे होते. त्यांचे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे. वीर लहुजींच्या स्मारकाची प्रकिया लवकरच सुरू होणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः ३ कोटी ५० लाख ५० हजार रुपये)
 
बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास
पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज रंगमंदिर, मनोरंजनाच्या सुविधा, वाहनांसाठी मुबलक जागा यांच्या समावेशाने बालगंधर्व रंगमंदिर पुण्यासह देशातील एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्याची भूमिका आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी वास्तू विशारदांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार ५२ वास्तू विशारदांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. पुनर्विकसनचा निर्णय घेण्यासाठी सांस्कृतिक, कला, वास्तुरचना या क्षेत्रांतील दिग्गजांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यांच्या सल्ल्याने पुनर्विकास आराखडा अंतिम केला जाणार आहे. (अंदाजपत्रकीय तरतूद ः ११ कोटी ४० लाख रुपये)
शहीद सौरभ फराटे स्मारक
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पुण्यातील जवान सौरभ फराटे यांना डिसेंबर २०१६ मध्ये वीरगती प्राप्त झाली. शहीद सौरभ फराटे यांचा पराक्रम सर्वांसाठीच प्रेरणादायक आहे. त्यांच्या पराक‘माची स्मृती जतन करण्यासाठी हडपसर परिसरात भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.
वारकरी सांस्कृतिक भवन
पुणे महापालिका हद्दीत हडपसर येथे वारकरी सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांच्या निवासाची व्यवस्था व्हावी या हेतूने हे भवन उभारले जाईल. कमलेश बहादूरसिंग झाला यांनी या प्रकल्पासाठी महापालिकेला स्वतःच्या मालकीची जागा दिली आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः २ कोटी १७ लाख ५० हजार रुपये)
हज हाउस
पवित्र हज यात्रेसाठी पश्‍चिम महाराष्ट्रातून जाणार्‍या भाविकांची सं‘या मोठी असते. अनेकदा भाविकांना मुंबईतील हज हाउसमध्ये निवासाची व्यवस्था होऊ शकत नाही. अशा भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी पुणे शहरात निवास व्यवस्था करता यावी यासाठी महापालिकेच्या वतीने हज हाउस उभारण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः १ कोटी १७ लाख ५० हजार रुपये)
कला प्रदर्शन-संवर्धन केंद्र
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी पुणे शहराची ओळख आहे. शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, अभिनय, नाटक, चित्रकला, व्यंगचित्रकला, शिल्पकला आदी विविध क्षेत्रांमध्ये पुण्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंत दिले. विविध कला प्रकारांचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, सराव करणार्‍या कलाप्रेमींची संख्या मोठी आहे. आपली कला प्रदर्शित करण्यासाठी स्थानिक स्तरावर व्यासपीठ असावे अशी कलाकारांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे महापालिकेच्या पाच विभागांमध्ये प्रत्येकी एकाप्रमाणे अस्तित्त्वातील इमारतीत किंवा नव्याने उभारलेल्या इमारतीत कला प्रदर्शन-संवर्धन केंद्र उभारण्यात येणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद ः १ कोटी रुपये)
वारसा जतन संवर्धन
नाना वाडा येथील पेशवेकालीन दगडी इमारतीची उर्वरित टप्प्यातील जतन संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत. तसेच विश्रामबागवाडा येथील तिसर्‍या टप्प्यातील जतन व संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत. महात्मा ङ्गुले मंडई येथे जतन व संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत. विश्रामबागवाडा येथील पुनवडी ते पुण्यनगरी प्रदर्शनाचे नूतनीकरण, नाना वाडा येथील पेशवेकालीन दरबार हॉल येथे नाना ङ्गडणवीस यांच्या जीवनावर आधारित कायमस्वरूपी प्रदर्शन करण्याची योजना आहे. नाना वाडा येथे क्रांतीकारकांच्या जीवनचरित्रावर आधारित कायमस्वरूपी संग‘हालय उभारणार आहे. पुणे शहरात हेरिटेज वॉक, मिनी बस टूर हे उपक‘म सुरू करण्यात येतील. त्या माध्यमातून शहरातील सांस्कृतिक वारसा आणि त्याची ओळख पर्यटकांना होऊ शकेल. त्यासाठी अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद करण्यात आली आहे.
सर्वांसाठी परवडणारी घरे
प्रधानमंत्री आवास योजना
केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पुणे शहरातील पात्र लाभार्थ्यांना घरे देण्याचे पुणे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. या योजनेचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामधून परवडणार्‍या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. अल्प उत्पन्न गटातील सदनिका बांधण्यासाठी हडपसर, खराडी, वडगाव (खुर्द) या परिसरातील आठ ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६,२६४ परवडणार्‍या घरांची निर्मिती करण्यास मा. मु‘य सभेने मान्यता दिली आहे. खराडी, हडपसर भागातील प्रकल्पांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे. उर्वरित प्रकल्पांच कामाची प्रक्रिया सुरू आहे. सार्वजनिक-खासगी तत्त्वावर खासगी विकसकांमार्ङ्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रस्ताव मागविण्यात आले असून, या वर्षी आणखी दहा हजार घरकुलांची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः ७० कोटी रुपये)
सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी
सौरऊर्जा पार्क 
विजेची वाढती मागणी व पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून अपारंपरिक ऊर्जास्त्रोत वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे महापालिकेच्या ३४ इमारतींवर सौरऊर्जा निर्माण करण्याचा प्रकल्प पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारने सन २०२० पर्यंत देशात अपारंपरिक उर्जास्रोताला प्राधान्य दिले आहे. या योजनेला पाठिंबा देण्यासाठी महापालिकेच्या वतीने सौरऊर्जा पार्क विकसित करण्यात येणार असून, महापालिका व शासनाच्या उपलब्ध असणार्‍या सर्व मिळकतींवर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. महापालिकेचा विजेवर सरासरी २५५ कोटी रुपये खर्च होतो. या खर्चातून ५० कोटी रूपांचे सौरऊर्जा प्रकल्प उभारून या वर्षीपासून दरवर्षी २० कोटी रूपांची बचत केली जाणार आहे.या प्रकल्पावर टप्प्याटप्याने का’ करून विजेचा खर्च शून्यावर आणणचे निोजन आहे.
स्मार्ट सिटी 
स्मार्ट सिटी प्रकल्प
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रस्तांचे सुशोभीकरण व पुनर्रचना, स्वारगेट व बालेवाडीत ट्रान्सपोर्ट हब, युवकांचे सबलीकरण करण्यासाठी लाइट हाउस, समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पुणे आयडिया फॅॅक्टरी, नागरिकांच्या सहभागातून विकास कामे, बस वाहतुकीची कार्यक्षमता वाढविणे,  मोबाईल ऍपद्वारे प्रवासी माहिती, ई-बस, ई-रिक्षा, सायकल योजना, ई-कनेक्टिव्हिटी, वाय-फाय, सौरऊर्जा, घनकचरा व्यवस्थापन, पदपथावर एलईडी दिवे, पीएमसी केयर, स्काडा, पाणी योजना, स्मार्ट हेल्थ, स्मार्ट पर्यटन, सीसीटीव्ही यंत्रणा आदी योजना राबविण्यात येणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद ः ५० कोटी रुपये)
दैनंदिन व्यवहारात माहिती तंत्रज्ञान
डिजिटायझेशन
पुणे महापालिकेच्या विविध खात्यांमधील डिजिटायझेशनचे प्रमाण वाढत असल्याने माहिती व तंत्रज्ञान विभागाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. पुणे मनपाची सर्व विभागांची माहिती अद्ययावत ऑनलाइन डॅशबोर्डच्या माध्यमातून विकसित करून सेंट्रलाइज प्लॅटफॉर्म कार्यान्वित करण्यात येणार आहे. सर्व संगणक प्रणाली इंटिग्रेट करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या डॅशबोर्ड प्लॅटफॉमचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.  नगरसचिव विभागाकडील सन १९५० पासूनचे सर्व जुने व महत्त्वाचे दस्त, नोंदी, अभिलेख, विविध समिती निर्णय इत्यादी कागदपत्रांचे स्कॅनिंग करून ती डिजिटल स्वरूपात जतन करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात गरजेप्रमाणे त्याचा वापर करता येईल. यासाठी अंदाजपत्रकात पुरेशीतरतूद करण्यात आली आहे.
दैनंदिन व्यवहारातील संगणक साक्षरता
इंटरनेटमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती झाली आहे. रेत्त्वे बुकिंग, एसटी बुकिंग, लाइट बिल भरणे, टेलिफोन बिल भरणे, कर भरणे, सिनेमाची तिकिटे काढणे, इंटरनेट बँकिंग आदी दैनंदिन कामे ऑनलाइन पद्धतीने मोबाइल किंवा संगणकाच्या मदतीने केली जातात. त्यामुळे वेळेची मोठी बचत होते. ज्येष्ठ नागरिक व महिलांना संगणकाचे व मोबाइलचे प्राथमिक शिक्षण देण्यासाठी दैनंदिन व्यवहारात उपयुक्त ठरेल असा अभ्यासक‘म तयार करण्यात येणार आहे. हा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम ‘डिजिटल लिटरसी’च्या माध्यमातून महिला व ज्येष्ठ नागरिकांना शिकविण्यात येणार आहे.
समाजकल्याणकारी योजना
महिलांसाठी वसतिगृह
शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परगावांहून पुण्यात येणार्‍या महिला आणि युवतींची सं‘या मोठी आहे. शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान व उद्योग क्षेत्रातील वाढत्या संधींमुळे नगर रस्ता परिसरातही परगावांहून येणार्‍या महिलांची सं‘या वाढत आहे. माङ्गक शुल्क आकारून महिलांना निवासासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. कळस-धानोरी परिसरात महापालिकेच्या वतीने विद्यार्थिनी आणि नोकरी करणार्‍या महिलांसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः २ कोटी रुपये)
लाइट हाउस प्रकल्प
लाइट हाउस प्रकल्पात १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील २० हून अधिक प्रशिक्षण अभ्यासक‘म चालविले जातात. प्रामु‘याने वस्तीमधील व आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना प्रवेश दिला जातो. टॅली, कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलरिंग, ब्यूटी व हेल्थ, जिम इन्स्ट्रक्टर, नर्सिंग सहायक, कुकिंग असे अभ्यासक‘म शिकविले जातात. भवानी पेठ व वारजे या ठिकाणी दोन लाइट हाउस प्रकल्प सुरू आहेत. वडगाव शेरी व शहरात उपलब्ध होणार जागांवर नवीन लाईट हाउस प्रकल्प राबविण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः ३ कोटी ४० लाख रुपये)
राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना
महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविण्याच्या उद्देशाने राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत महिला व युवतींसाठी स्वसंरक्षण, स्वावलंबन आणि समुपदेशन या तीन बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. महिला व युवतींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि त्यांना स्वसंरक्षण करता यावे यासाठी ज्यूदो, कराटे, लाठी-काठी, योगासने व व्यायाम शिकविले जाणार आहेत. महिलांना स्वावलंबी व आर्थिक सक्षम करण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून व्यवस्थापन, क्षमतांचे संवर्धन, उद्योजकीय विकास, रोजगाराच्या संधी व बाजारपेठ मिळवून देणे आदी कार्यक‘म राबविले जाणार आहेत. पौगांडावस्थेतील मुली, युवती, विवाहित महिला यांच्या विविध समस्या व प्रश्‍न, कौटुंबिक सल्ला, महिलांचे अधिकार, कायदे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद ः २ कोटी ५० लाख रुपये)
मागासवर्गीय समाजातील महिलांसाठी स्वयंरोजगार
मागासवर्गीय समाजातील महिलांना स्वयंरोजगारासाठी उद्योग-व्यवसाय सुरू करता यावा यासाठी कौशल्य प्रशिक्षण, उद्योग-व्यवसाय प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, भांडवल उभे करणे, अल्प दरात कर्ज मिळविणे, विविध प्रकारच्या उद्योग, ववसाकि समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन करणे यासाठी उद्योग व्यवसायाबाबतचे संगोपन (इनक्युबेशन) केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
स्पर्धा परीक्षार्थींना प्रोत्साहन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्वपरीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी मोठ्या सं‘येने विद्यार्थी प्रयत्न करीत असतात. पुणे शहरात कायमस्वरूपी वास्तव्य असणार्‍या आणि पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन मु‘य परीक्षेस पात्र ठरणार्‍या गुणानुक‘मे प्रत्येकी शंभर विद्यार्थ्यांना मु‘य परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक संदर्भग्रंथ व पुस्तकांच्या खरेदीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये एक वेळ प्रोत्साहनपर निधी दिला जाईल.
 
रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी क‘मिक पुस्तके
कौटुंबिक परिस्थिती आणि आर्थिक स्थिती बेताची असल्याने अनेक मुलांना इच्छा असूनही शिक्षण अर्धवट सोडावे लागते. असे काही विद्यार्थी दिवसभर मिळेल ते काम करून रात्र प्रशालेत प्रवेश घेतात आणि जिद्दीने शिक्षण पूर्ण करतात. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साहाय्य करता यावे यासाठी महापालिकेच्या वतीने या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके विनामूल्य देण्यात येणार आहेत. सध्या पुणे शहरात दोन हजार विद्यार्थी रात्र प्रशालेत शिक्षण घेत आहेत.
युवकांसाठी स्वयंरोजगार
पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत खादी ग्रामोद्योग आयोगाच्या मार्ङ्गत राष्ट्रीय स्तरावर नोडल एजन्सी म्हणून कार्यरत असलेली केंद्रीय कुंभारी प्रशिक्षण संस्था आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील होतकरू व व्यवसाय करू इच्छिणार्‍या १८ ते ५० वयोगटातील व्यक्तींसाठी खनिज, वनसंपत्ती, कृषी, अभियांत्रिकी, अपारंपरिक ऊर्जा व रसायन आदी क्षेत्रांवर अवलंबून असलेले शंभरहून अधिक अल्प मुदतीचे (१२ दिवस व ३० दिवस) अभ्यासक‘म राबविण्यात येणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद ः १ कोटी रुपये)
संस्कार केंद्र
लहान बालके व किशोरवयीन मुलांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासाबरोबर त्यांच्यावर उत्तम संस्कार व्हावेत, या उद्देशाने शहराच्या विविध भागात संस्कार केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी महापालिका शाळेतील वर्ग खोल्या संध्याकाळच्या वेळेत उपलब्ध करून दिल्या जातील. भारतीय संस्कृती, परंपरा, चांगल्या सवयी आदी बाबतचे संस्कार या केंद्रांमधून केले जातील. सुसंस्कृत, राष्ट्राभिमानी पिढी घडविणे हे या केंद्रांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात ३० महापालिका शाळांमध्ये संस्कार वर्ग चालविण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी ङ्गिरते दवाखाने
ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः सकाळी किंवा सायंकाळी ङ्गिरायला, व्यायामाला येणार्‍या नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहराच्या विविध भागांत सहा ङ्गिरते दवाखाने सुरू केले जाणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद ः १ कोटी ६० लाख रुपये)
कलादालन, शिल्प, नाट्यगृह
भवन रचना विभाग ः महत्त्वाचे प्रकल्प
पुणे मनपा मु‘य इमारतीमध्ये पूर्व बाजूस तिसर्‍या मजल्यावर ‘कमांड कंट्रोल सेंटर’ची उभारणी, शिवाजीनगर येथे डॉ. होमी भाभा हॉस्पिटलची नव्याने उभारणी, सिंहगड किल्ल्यावर स्वराज्यनिष्ठ शिल्पाची उभारणी, बाणेर येथील आर. के. लक्ष्मण कलादालन, येरवडा येथील रामभाऊ मोझे शाळेच्या जुन्या इमारतीच्या जागी नवीन इमारत, कोथरूड येथे एक्झिबिशन सेंटर, हडपसर येथे कै. विठ्ठलराव तुपे नाट्यगृह आदी मागील वर्षाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना आवश्यक असणारी तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
 उपयुक्त प्रशिक्षण, क्षेत्रीय कार्यालय विकास
वसंतराव भागवत प्रशिक्षण प्रबोधिनी 
महानगरपालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, वर्ग एक व दोन चे अधिकारी, अभियंता, लिपिक, शिक्षक आणि सर्व विभागातील कर्मचारी यांना महापालिकेचे कामकाज, कायदे, नियम, सभा कामकाज नियमावली, विभागनिहाय कामाची माहिती, कार्यालयीन कामकाज, इंटरनेटचा वापर, विविध खात्यांचे कामकाज आदींचे प्रशिक्षण देणे आवश्यक असते. विकासाभिमुख, गतिमान, पारदर्शक सुशासनासाठी अशाप्रकारचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कायद्यांमध्ये होणारे बदल, बदलणारे नियम व कामकाज पद्धती, नव्याने येणारे तंत्रज्ञान यांची अद्ययावत माहिती प्रशासनाला असणे आवश्यक आहे. महापालिकेचे कामकाज जाणून घेण्याबाबत नागरिकांना उत्सुकता असते. या प्रशिक्षण कार्यक‘मासाठी ‘वसंतराव भागवत प्रशिक्षण प्रबोधिनी’ची स्थापना करण्यात येणार आहे.
 
पत्रकार डी. आर. कुलकर्णी गृहनिर्माण संस्था प्रशिक्षण कार्यक‘म
पुणे महापालिकेच्या हद्दीत २० हजारहून अधिक गृहनिर्माण संस्था आहेत. गृहनिर्माण संस्थांच्या संचालक मंडळाचे कामकाज, विविध नागरी प्रश्‍नांची सोडवणूक, विकासकामे, विकासकामांमध्ये जनतेचा सहभाग याबाबत सुसंवाद साधण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘पत्रकार डी. आर. कुलकर्णी गृहनिर्माण संस्था प्रशिक्षण कार्यक‘म‘ सुरू करण्यात येणार आहे. गृहनिर्माण संस्थातील पदाधिकार्‍यांना संस्थेच्या कामकाजाचे प्रशिक्षण, सुरक्षा कर्मचारी, घरेलु कामगार, वाहनचालक आदींना प्रशिक्षण यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग, कचर्‍याचे वर्गीकरण, कचर्‍यापासून खतनिर्मिती, सौरऊर्जा आदी प्रकल्प राबविण्याची गरज आणि कर सवलतींची माहिती व प्रोत्साहन देणे हा उद्देश असेल.
नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय विकास
नगर रस्ता भागाचा भौगोलिक विकास आणि लोकसं‘येची वाढ लक्षात घेऊन या भागातील नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टिने नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामासाठी अंदाजपत्रकात पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आहे.
मुद्रण महर्षी मामाराव दाते मुद्रणालयाची पुनर्बांधणी 
घोले रस्त्यावर पुणे महापालिकेचे मुद्रण महर्षी मामाराव दाते मुद्रणालय आहे. या मुद्रणालयाचा पुर्नविकास करून त्याठिकाणी बहुउद्देशीय केंद्र उभारण्याची योजना आहे. मुद्रणालयासाठी अद्ययावत यंत्रसामग्री आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. मुद्रणालयाला लागणार्‍या जागेव्यतिरिक्त उर्वरित इमारतीत मोठी जागा उपलब्ध होणार आहे. या जागेवर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली जाईल. अभ्यासक, संशोधक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यांना ही अभसिका उपयुक्त ठरेल. (अंदाजपत्रकात तरतूद ः २ कोटी रुपये)
 
शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार
केंद्र शासन, राज्य सरकार व पुणे महापालिकेच्या विविध योजनांची व त्यासाठी आवश्यक असणार्‍या दाखल्यांची माहिती देण्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच शासकीय योजनांची माहिती अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणसाठी माहिती पुस्तिका तयार करून तिचे वितरण करण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद ः ७५ लाख रुपये)
 
आपत्ती व्यवस्थापन
नवीन अग्निशमन केंद्र 
नैसर्गिक आपत्तीग‘स्त व अपघातग‘स्तांसाठी अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने खरेदी केलेल्या अत्याधुनिक यंत्रसामुगग्रीचे संचलन, देखभाल दुरुस्तीसाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच क्विक रिस्पॉन्स टिम व वाहन खरेदी केली जाणार आहे. बावधन येथे अग्निशमन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच हडपसर, गंगाधा’, ’ार्केटार्ड येथील अग्निशमन केंद्राचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

 

भाग्यश्री देसाई यांना कलागौरव पुरस्कार प्रदान

0

पुणे-महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर आणि कै. नानासाहेब गोरडे वाचनालयाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा पद्मश्री नामदेव ढसाळ कलागौरव पुरस्कार या वर्षी भाग्यश्री देसाई यांना नुकताच प्रदान करण्यात आला. कवी, चित्रकार, अभिनेत्री, चित्रपट व नाट्य निर्माती अशा चौफेर भूमिका बजावणाऱ्या देसाई यांना हा पुरस्कार जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी भाग्यश्री देसाई त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, पद्मश्री नामदेव ढसाळ कलागौरव पुरस्कार मला दिल्याबद्दल मी महाराष्ट्र साहित्य परिषदचे मी विशेष आभार मानते. माझ्या कामाची तुम्ही देखल घेवून दिलेला हा सन्मान  माझ्या लेखनाच्या भविष्याला नवसंजीवनी देणारा असून आगामी काळात मी अजून दर्जेदार लेखन करणार आहे. देसाई पुढे म्हणाल्या पुरस्कार मिळणं ही कलाकारांना पाठीवर कौतुकाची थाप असते. पण या प्रोत्साहाने नवीन उमेद घेऊन यशाच्या अवकाशात उंच गवसणी घातली पाहिजे.

यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर शाखाचे अध्यक्ष संतोष गाढवे, मसापच्या कार्यअध्यक्ष सुनिताराजे पवार, शरद बुट्टे – पाटील, सदाशिव अमराळे, अॅड. सतीश गोरडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गाढवे म्हणाले की महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर शाखा नेहमी स्तुत्य कार्यक्रमांचे आयोजन करीत आली आहे आणि आगामी काळात देखील असेच कार्यक्रम आम्ही करणार आहोत. संतोष गाडवे यांनी सर्वांचे आभार मानले.

आपली सहिष्णुता हरवत चाललो आहोत काय? किरण नगरकर यांचा सवाल

0
पुणे : “ज्ञानेश्वर, तुकारामांपासून इतर अनेक संतांची परंपरा आपल्याला आहे. शांतता, अहिंसा आणि सहिष्णुता यांचे संस्कार देणारा आपला देश असूनही दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश व कलबुर्गी यांसारख्या विचारवंतांच्या हत्या होतात. गांधीजींच्या मारेकऱ्याचे कौतुक केले जाते. हे असे का होत आहे? आपल्याला झाले तरी काय? आपण आपली सहिष्णुता हरवत चाललो आहोत काय?” असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांनी उपस्थित केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाचे उद्घाटन किरण नगरकर यांच्या हस्ते झाले. संविधाननगरी, बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या संमेलनाच्या गंगाधर पानतावणे विचारपीठावरून नगरकर बोलत होते. प्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संमेलनाध्यक्ष जी. के. ऐनापुरे, साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, ‘बार्टी’चे यादव गायकवाड, प्रमुख संयोजक परशुराम वाडेकर, डॉ. विजय खरे, दीपक म्हस्के, प्रा. किरण सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाची सुरुवात पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून झाली.
किरण नगरकर म्हणाले, “महाराष्ट्राचा इतिहास बघितला, तर महाराष्ट्राने देशाला खूप सुज्ञ लोक दिले. अनेक थोर विचारवंत, तत्वज्ञ देशाला दिले. पुरातन संस्कृतीला आधुनिक वळण दिले आणि मराठी माणसाला २१ व्या शतकात आणले. पण आज आपण त्यांची शिकवण विसरलो. मैत्रीने आपण खूप काही मिळवू शकतो, पण हल्ली माणसाला माणूस म्हणून समाजण्यापेक्षा हल्ला करणे, मारून टाकणे असे प्रकारच वाढले आहेत.” यासह त्यांनी आपल्या साहित्यिक जडणघडणीमागचा प्रवास उलगडला. गांधीजींच्या चरित्राचा व पुण्याचाही यात महत्वाचा हातभार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “लोकशाहीला सुसूत्रतेत बांधण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. आपल्याला लिहिण्याचे, व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिले. पण याचा वापर मनापासून व्यक्त होण्यासाठी करावा. प्रत्येकाने आपला धर्म घरी पाळावा. सार्वजनिक ठिकाणी येताना संविधान हाच एकमेव धर्मग्रंथ असला पाहिजे. दलित साहित्याची दिशा बदलणे आवश्यक आहे. काळ बदलत आहे, जग हायटेक होत आहे. त्यामुळे दलित तरुणांचेही अनुभव विश्व बदलत आहे. परंतु समोर येणारे साहित्य कलाकृती ही त्याच त्या पद्धतीची उद्वेग, विद्रोह व्यक्त करणारी आहे. ते आता बदलणे आवश्यक आहे.”
‘विद्यापीठात तयार होत असलेले नवे सभागृह पुढच्या वर्षीपासून या संमेलनासाठी मोफत उपलब्ध करून दिले जाईल,’ अशी घोषणा डॉ. नितीन करमळकर यांनी केली. डॉ. रावसाहेब कसबे यांनीही आपले विचार मांडले. परशुराम वाडेकर यांनी स्वागत केले. डॉ. विजय खरे यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. धर्मराज निमसकर यांनी आभार मानले. तत्पूर्वी, प्रवीण डोणे व शिरीष पवार यांनी सादर केलेल्या ‘भीमस्पंदन’ भीमगीतांच्या सुरेल कार्यक्रमाने सभागृह भारावले. डॉ. पी. ए. इमानदार यांच्या हस्ते ग्रंथ दलनाचे उद्घाटन करण्यात आले.
—————–
संमेलनाध्यक्षांचे मनोगत
संमेलने भरविण्याच्या असाध्य रोगाची लागण
आपल्याला साहित्य, नाट्य संमेलनाची शंभरीकडे वाटचाल करणारी परंपरा आहे. परंतु, सकाळ साहित्यावळे लोक दलित, विद्रोही, पर्यायी साहित्याला शत्रू मानतात. त्यातून अनेक विरोधी, पर्यायी आणि समांतर अशा संमेलनाच्या जुळण्या सुरु झाल्या. कालांतराने विद्रोही संमेलनाची धार कमी झाली. संमेलनाच्या नावावर लोकांना वेठीस धरण्याचे प्रकारही सुरु झाले. मतपेढ्या आणि स्वार्थाच्या भावनेतून संमेलने भरविण्याचा असाध्य रोग लागल्याचे दिसत आहे. या संमेलनाच्या व्यासपीठाचा उपयोग संसदीय राजकारणाचा मार्ग बनू लागला. त्यातून साहित्य संमेलनाच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. आपल्याला खंडित करणारी एक शक्ती कार्यरत झाली. आजही वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला ती शक्ती अनुभवायला मिळते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बाबतीत जो गोंधळ झाला, त्यातील अनेक घटना हास्यास्पद आहे. अरुणा ढेरे यांनी अशा घटनेचा निषेध करणे विनोदी होते. तात्पुरती असहमती दाखविण्याचे प्रकार दिसून आले. डॉ. अरुणा ढेरे या सतर्क नाहीत. त्यांना कोणतेही वास्तव माहिती नाही. कारण त्या अज्ञात झऱ्यावर कवितेचा रियाझ करत असाव्यात. कारण आज लेखक-कार्यकर्ता यांच्यात होणारे अवस्थांतर असावे. विज्ञान आणि शास्त्र यातील अंतर वाढवत धर्म आणि अध्यात्माकडे नेण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. हातात सत्यसाईबाबांची राख आणि हळदीचे पेटंट घेऊन फिरणारा म्हणजे शास्त्रज्ञ अशी ओळख तयार होत आहे. संशोधनाला धर्माच्या चौकटीत नेण्याचा प्रयत्न घातक आहे. नाटक-सिनेमातील एकल संस्कृतीच्या धुडगुसामुळे सांस्कृतिक वर्चस्वाचा मुद्दा उपस्थित होतो. त्यातून ठराविक समूहाचे लोक यशस्वी होताना आपण पाहतो. श्रमिकांच्या वस्त्या, चाळी, सार्वजनिक उत्सव हा नाटकांचा माहोल होता. मात्र आज परिस्थिती बदलल्याने अनेक कलाकार हालअपेष्टा सहन करताहेत. सातशे वर्षांची परंपरा असलेल्या मराठी साहित्यात समीक्षा नाही. त्याचे वळण अदृश्य आरक्षाप्रमाणे आहे. अकॅडमिक वातावरणात ती अडकून पडली आहे. सततच्या होणाऱ्या विभाजनाचा आणि राजकीय फायदा लक्षात घेऊन होणारी तोडफोड गंभीर आहे. हे बदलण्यासाठी समांतर असलेल्या सम्यक साहित्यासारख्या चळवळीची निश्चित गरज आहे, असे वाटते.

पेनिनसुला लॅण्डने लाँच केले पुण्यातील गहुंजे येथे अॅडरेसवन सेंट्रल पार्क

0

●        लाँचिंगच्या पहिल्या टप्प्याला उदंड प्रतिसाद प्राप्त झाल्यानंतर पेनिनसुला लॅण्ड लिमिटेडने अॅडरेसवन सेंट्रल पार्कचा दुसरा टप्पा लाँच केला

●       या एका टप्प्यामध्ये ६००हून अधिक अपार्टमेंट्स विकसित करण्यासाठी १६० कोटी रुपये गुंतवण्याची कंपनीची योजना

●        अपार्टमेंट्सचे पाच प्रकार (वन बीएचके ते थ्री बीएचके) १९ लाख रुपयांपासूनच्या (यामध्ये मुद्रांक शुल्क, नोंदणी अन्य कर समाविष्ट) आकर्षक किंमतीत देऊ करणार

पुणे, २१ फेब्रुवारी २०१९: पेनिनसुला लॅण्ड लिमिटेड या अशोक पिरामल समूहाचा भाग असलेल्या अग्रगण्य कॉर्पोरेट रिअल इस्टेट विकासक कंपनीने ६००हून अधिक अपार्टमेंट्स विकसित करण्यासाठी पुण्यातील गहुंजे येथे अॅडरेसवन सेंट्रल पार्कच्या लाँचिंगची घोषणा आज केली. .२६ एकर जागेत पसरलेले अॅडरेसवन सेंट्रल पार्क हे मुंबईपुणे द्रुतगती मार्गावर मोक्याच्या ठिकाणी आहे. हे ठिकाण पुण्याच्या बाजूला एमसीए क्रिकेट स्टेडिअमशेजारी आहे.

अॅडरेसवन हा पेनिनसुला लॅण्डचा पुण्यातील पहिला परवडण्याजोगा लग्झरी प्रकल्प आहे. या प्रकल्पाची रचना विख्यात आर्किटेक्ट हफीझ काँट्रॅक्टर यांनी केली आहे. गेल्या वर्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात कंपनीने सुमारे ९०० युनिट्स लाँच केले. कंपनीच्या सर्वांत यशस्वी प्रकल्पांपैकी हा एक होता.

पेनिनसुला लॅण्ड लिमिटेडचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव पिरामल म्हणाले, आमच्या पहिल्या टप्प्याला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर अॅडरेसवन सेंट्रल पार्कच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करताना आम्ही प्रचंड रोमांचित झालेलो आहोत. दुसऱ्या टप्प्यात ६०० अपार्टमेंट्स विकसित करण्यासाठी १६० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची आमची योजना आहे. आमच्या ग्राहकांना परवडण्याजोग्या किंमतीत तरीही आरामदायी सुविधा देणारी घरे पुरवण्यावर आमचा, पेनिनसुला लॅण्डचा, विश्वास आहे. आमचा अॅडरेसवन प्रकल्प या तत्त्वज्ञानाचीच ग्वाही देणारा आहे.”

ते पुढे म्हणाले, “शहरीकरण वाढत असल्याने भारतात परवडण्याजोग्या घरांची मागणी प्रचंड आहे आणि या क्षेत्राला आवश्यक ती चालना देण्यासाठी सरकारनेही परवडण्याजोग्या घरांसाठी अनेक उपक्रम पुरवले आहेत. ‘सर्वांसाठी घरेया उपक्रमाला चालना देण्यासाठी हंगामी अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अनेक करसुधारणांची घोषणा केली आहे. यामुळे परवडण्याजोग्या घरांच्या विभागाला असलेल्या मागणीला नक्की चालना मिळेल.”

अॅडरेसवन सेंट्रल पार्क हिरव्यागार प्रदेशात वसलेले आहे. यामध्ये कम्युनिटी हॉलसह क्लब हाउस, जिम्नॅशिअम, स्विमिंग पूल, क्रिकेट नेट्स, सायकलिंग ट्रॅक, फूटबॉल फिल्ड आदी सुविधा आहेत. मुंबईपुणे द्रुतगती मार्गालगतच्या मोक्याच्या ठिकाणामुळे हा प्रकल्प हिंजेवडीला जोडणारा आहे. हिंजेवाडीपासून हे ठिकाण १० किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.

ग्राहकांना सुलभ वित्तसहाय्य पुरवण्याच्या उद्दिष्टाने कंपनीने अनेक वित्तीय ऑफर्स तसेच योजना लाँच केल्या आहेत. कंपनीने होम कॅपिटलसोबत करार केला आहे. यामुळे घर खरेदीदारांना मुद्रांक शुल्क तसेच नोंदणीसाठी व्याजमुक्त कर्ज मिळवण्यात मदत होईल. यासह १८ महिन्यांपर्यंत ग्राहकांना व्याजमुक्त हप्ते (ईएमआय) भरावे लागतील. हे हप्ते समान रकमेचे असतील. त्यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त बोजा येणार नाही. याशिवाय, या प्रकल्पाला पीएमवाकेची मंजुरी आहे. त्यामुळे घरखरेदीदाराला व्याजावर .६७ लाख रुपयांपर्यंत सबसिडी मिळू शकेल आणि परिणामी घर खरेदीदारांना अधिक मोठ्या अधिक चांगल्या दर्जाच्या घरांसह वित्तसहाय्य मिळवून देण्यात मदत होईल. त्याचप्रमाणे अधिकाधिक ग्राहक या सबसिडीसाठी पात्र ठरू शकतील.

मुंबईपासून जवळ असल्याने तसेच आयटी आणि आयटीई उद्योग वेगाने वाढत असल्याने पुणे बाजारपेठेला एकंदर विकासाला मोठा वाव आहे. या बाजारपेठेत एकंदर मोठा क्षमता आहेच, शिवाय गहुंजेसारख्या ठिकाणांना निवासीदृष्ट्या मागणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईपुणे द्रुतगती मार्गावर असल्याने गहुंजे हे महत्त्वाचे निवासी ठिकाण म्हणून उदयाला येत आहे. हे ठिकाण पुणे, मुंबई आणि नवी मुंबईपासून जवळ आहे. यामुळे या भागात औद्योगिक वाढ झाली आहे. या लोकप्रिय भागापासून सर्वांत जवळ असलेले रेल्वे स्थानक म्हणजे आकुर्डी रेल्वे स्थानक.

गहुंजेमधील सामाजिक पायाभूत संरचनाही उत्तम आहेत. एमसीए क्रिकेट स्टेडियम, सिम्बॉयसिस विद्यापीठ, विख्यात डी. वाय. पाटील कॉलेज, आदित्य बिर्ला रुग्णालय यामुळे या भागाचे महत्त्व वाढले आहे. एमआयडीसारख्या मुख्य रस्त्यांना हा भाग उत्तमरित्या जोडलेला असल्याने अन्य ठिकाणांनाही जोडला गेला आहे. हिंजेवडी आयटी पार्क, तळवडे आयटी पार्क हेदेखील या ठिकाणाहून जवळ आहेत.

पेनिनसुला लॅण्ड लिमिटेड विषयी:

भारताच्या गगनरेखेची व्याख्या नव्याने करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांसाठी पेनिनसुला लॅण्ड लिमिटेड ही कंपनी ओळखली जाते. अशोक पिरामल समूहाचा भाग म्हणून ही कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण काम करण्यास वचनबद्ध आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध होणाऱ्या पहिल्या काही रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये कंपनीचा समावेश होतो. चांगल्या पारदर्शक व्यावसायिक पद्धतींसह उत्तम कॉर्पोरेट प्रशासनाचा अंगिकार करत असल्याचे हे महत्त्वाचे निदर्शक आहे.

आज पेनिनसुला लॅण्ड ही एक एकात्मिक रिअल इस्टेट कंपनी आहे. आमच्या प्रकल्पांमध्ये रिटेल व्हेंचर्स, जागतिक दर्जाचे व्यावसायिक प्रकल्प निवासी संकुलांचा समावेश होतो. कंपनीने दशलक्ष चौरस फुटांची रिअल इस्टेट उभारली असून, १० दशलक्ष चौरस फूट जागा मुंबई, बेंगळुरू, पुणे, गोवा, नाशिक आणि लोणावळा आदी शहरांमध्ये बांधकामाखाली आहे. पेनिनसुलाने मुंबईला दिलेल्या काही महत्त्वाच्या खुणांमध्ये पेनिनसुला कॉर्पोरेट पार्क, पेनिनसुला टेक्नोपार्क, पेनिनसुला बिझनेस पार्क, क्रॉसरोड्स, सीआरटू, अशोक टॉवर्स आणि अशोक गार्डन्स यांचा समावेश होतो.