Home Blog Page 2984

‘क्रिप्टोकरिअर्स’ जॉब पोस्टिंग्समध्ये मुंबईची घसरण: बंगलोरनंतर दुसरा नंबर पटकावला पुण्याने

0

· क्रिप्टोकरिअर्स जॉब पोस्टिंग्समध्ये मुंबईची दुसऱ्या क्रमांकावरून सातव्या स्थानावर घसरण

· महानगरांव्यतिरिक्त अहमदाबाद व थिरुअनंतपूरम या दोन शहरांचाही यादीत समावेश

 बंगलोर:  जगातील पहिल्या क्रमांकाची जॉब साईट म्हणून नावाजल्या जाणाऱ्या इन्डीडकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार जे याआधी क्रिप्टोकरन्सी संबंधित नोकऱ्यांच्या उप्लब्धतेमध्ये सर्वाधिक आघाडीवर असणाऱ्या शहरांच्या यादीत मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर होते परंतु मार्च २०१८ मधील उपलब्ध नोकऱ्यांच्या तुलनेत आता मात्र मुंबईत बरीच घसरण झालेली दिसून आली आहे.  क्रिप्टोकरिअर्समध्ये नोकऱ्यांच्या संधी बंगलोरमध्ये सर्वात जास्त आहेत, संपूर्ण देशभरात उपलब्ध असलेल्या क्रिप्टोकरन्सी नोकऱ्यांपैकी ३४ टक्के नोकऱ्या या एकट्या बंगलोर शहरात आहेत.  त्यापाठोपाठ दुसरा क्रमांक पुणे शहराने पटकावला असून ८ टक्के नोकऱ्या पुण्यात आहेत.  त्यानंतर हैदराबाद, नोएडा व गुरगाव ही शहरे आहेत. 

एकीकडे मुंबईत मागणीमध्ये घट होत असताना दुसरीकडे अहमदाबाद व थिरुअनंतपूरम ही शहरे जी याआधी या यादीत नव्हती त्यांनी चक्क पहिल्या दहांमध्ये मुसंडी मारली आहे.  उत्तरेकडील शहरांमध्ये मागणीत सातत्य दिसून येत असले तरी दक्षिणेकडील शहरांच्या तुलनेत ती मागेच आहेत.

क्रिप्टोकरिअर्ससाठी भारतातील आघाडीची शहरे: 

२०१९ रँक

(जानेवारी १८ ते डिसेंबर १८)

२०१८ रँक (मार्च १७ ते मार्च १८)

शहर

भारतातील क्रिप्टोकरन्सी जॉब पोस्टिंग्सची टक्केवारी

1

1

बंगलोर

34%

2

4

पुणे

8%

3

3

हैदराबाद

8%

4

7

नोएडा

7%

5

5

गुरुग्राम

6%

6

6

चेन्नई

5%

7

2

मुंबई

4%

8

अहमदाबाद

3%

9

8

नवी दिल्ली

3%

10

थिरुअनंतपूरम

2%

 पहिल्या पाच शहरांमध्ये क्रिप्टोकरन्सी जॉब पोस्टिंग्सची टक्केवारी दर्शवणारी आकडेवारी:

Cryptocareers_line graph

इन्डीड इंडियाचे हेड ऑफ इंजिनिअरिंग, इंडिया व साईट डायरेक्टर श्री. वेंकट मचावरपू यांनी सांगितले, ब्लॉकचेन तंत्रज्ञानात भरपूर वाव असल्यामुळे जर तुमच्याकडे आवश्यक ती कौशल्ये असतील तर क्रिप्टोकरिअर्समध्ये तुमच्यासाठी नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत.  २०१८ मध्ये दिसून आले की, अशा कुशल व्यावसायिकांसाठी मागणी मोठ्याप्रमाणावर वाढत आहे.  बंगलोर व हैदराबाद यासारख्या तंत्रज्ञानाचे मुख्य केंद्र असलेल्या शहरांमध्ये सर्वत जास्त संख्येने नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत.  त्याचबरोबरीने पुणे व हैदराबाद यासारखी शहरेदेखील या क्षेत्रात नोकऱ्यांच्या संधी निर्माण करण्यामध्ये पुढे येत आहेत.  क्रिप्टोचे एकूण बाजार भांडवलीकरण अंदाजे २११ बिलियन यूएस डॉलर्स इतके प्रचंड असल्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्यास सकारात्मक वातावरण आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला संस्थात्मक वातावरणात पारंपरिक पद्धतीने स्वीकारले न गेल्यामुळे आता हे क्षेत्र नवीन, आधुनिक संधी घेऊन उदयास येत आहे.  भारतात सरकारी यंत्रणा क्रिप्टोकरन्सीला वैध करण्यासाठी कार्यरत असून भारतात भविष्यकाळात या क्षेत्रात विकासाच्या नवीन संधी नक्की निर्माण होतील. 

इन्डीड

इन्डीड या जॉब साईटवर नोकऱ्या मिळवणाऱ्या लोकांची संख्या इतर कोणत्याही साईटपेक्षा जास्त आहे.  इन्डीड ही जगातील पहिल्या क्रमांकाची जॉब साईट असून याठिकाणी वेब किंवा मोबाईलवर कोट्यवधी नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध आहेत.  ६० देशांमधील २८ भाषांमध्ये ही साईट उपलब्ध आहे.  इन्डीडवर दर महिन्याला २५० मिलियनपेक्षा जास्त लोक नोकऱ्या शोधतात, आपले रिज्युमे पोस्ट करतात व कंपन्यांबद्दल माहिती मिळवतात. 

स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी भाजपकडून सुनिल कांबळे (व्हिडीओ)

0

पुणे: महापालिकेतील  स्थायी समिती अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपने अध्यक्ष पदासाठी सुनील कांबळे यांना आज उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे दाखल केला . तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्मिता कोंढरे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. स्थायी समिती मध्ये सर्वाधिक भाजप सदस्य असल्याने सुनील कांबळे अध्यक्ष होणार आहेत. महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी दि. 5 मार्चला निवडणूक होणार आहे. पालिकेत भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे भाजपकडून ज्या सदस्याला उमेदवारी मिळणार, तोच अध्यक्षपदी विराजमान होणार हे निश्‍चित आहे.

हेमंत रासने ,उमेश गायकवाड आणि राजेंद्र शिळीमकर,दिलीप वेडे पाटील  हे देखील  अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजकल्याणमंत्री असलेल्या दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील यांना उमेदारी दिली .सुनील कांबळे हे पाचव्यांदा नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून आले आहेत . यापूर्वी शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहले आहे . या शिवाय ते गेली 2 वर्षे स्थायी समितीचे सदस्य होते. आज त्यांच्याबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करताना महापौर मुक्ता टिळक,उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे  ,सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, मावळते स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक,माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ,शिवसेनेचे संजय भोसले,तसेच इच्छुक  असलेले पण उमेदवारी न मिळालेले गायकवाड ,वेडेपाटील ,शिळीमकर यांच्या सह आरती कोंढरे ,रंजना टिळेकर,नाना भानगिरे,दीपक पोटे,विशाल धनवडे, आदी नगरसेवक उपस्थित होते .

व्हॅस्कॉन इंजिनियर्सने पुण्यात झालेल्या १० व्या रिअलिटी प्लस एक्सलन्स पुरस्कार २०१९ मध्ये साधली हॅटट्रिक

0

व्हॅस्कॉन गुडलाइफला (काटवी) सर्वसमावेशक ब्रँड कॅम्पेन आणि बजेट हाउसिंग प्रोजेक्ट ऑफ इयर पुरस्कार

व्हॅस्कॉनचे विपणन प्रमुख नवीन ठाकूर यांना बेस्ट मार्केटर पुरस्कार

 पुणे-  – पुण्यातील सर्वात विश्वासार्ह आणि प्रसिद्ध डेव्हलपर व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेडने (बीएसई स्क्रिप आयडी व्हॅस्कॉनईक्यू), पुण्यात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या

१० व्या रिअलिटी प्लस एक्सलन्स पुरस्कार २०१९ मध्ये तीन पुरस्कार पटकावले आहेत. काटवी येथील व्हॅस्कॉनच्या गुडलाइफ प्रकल्पाला ‘बजेट हाउसिंग प्रोजेक्ट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. सर्व माध्यमांतील सर्वोत्तम व्याप्तीसाठी ‘सर्वसमावेशक ब्रँड कॅम्पेन ’ पुरस्कारही गुडलाइफ प्रकल्पाने मिळवला आहे. व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि.चे विपणन प्रमुख नवीन ठाकूर यांनी बेस्ट मार्केटर पुरस्कार जिंकला आहे.

 या कामगिरीबद्दल व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. सिद्धार्थ वासुदेवन म्हणाले, ‘१० व्या रिअलिटी प्लस एक्सलन्स पुरस्कार २०१९ मध्ये विविध पुरस्कार मिळवल्याचा आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. तीन दशकांचा वारसा लाभलेल्या व्हॅस्कॉनने कायमच ग्राहकांना त्यांच्या पैशांचे मूल्य देणारी दर्जेदार उत्पादने पुरवली आहेत आणि हे पुरस्कार आमची बांधिलकी व इतक्या वर्षांत उभारलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.’

व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि.बद्दल

व्हॅस्कॉन इंजिनियर्स ही आघाडीची नोंदणीकृत स्थावर मालमत्ता कंपनी असून तिचे मुख्यालय पुण्यात आहे. ३० वर्षांचा अनुभव असलेल्या या कंपनीने आतापर्यंत ५० दशलक्ष चौरस फुटांचे मिळून एकूण २०० पेक्षा जास्त प्रकल्प तयार केले असून निवासी, औद्योजिक, आयटी पार्क्स, मॉल्स व मल्टीप्लेक्सेस, हॉस्पिटॅलिटी आणि कम्युनिटी वेल्फेयर सेंटर्सचा समावेश आहे. हे प्रकल्प भारतातील ३० पेक्षा जास्त शहरांत ईपीसीसह उभारलेले तसेच कंपनीचे स्वतःचे स्थावर मालमत्ता प्रकल्प आहेत. यापुढेही ईपीसी आणि परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण कंपनीने ठेवले आहे.

 

एमआयटी एनसीसी ट्रुप ने ३१२ युनिट रक्त जमा करून पुलवामा हुतात्म्यांना केले अभिवादन

0

पुणे: ‘रक्तदान करा आणि पुलवामा येथील हुतात्म्यांना अभिवादन करा’, या घोष वाक्यानुसार एमआयटी एनसीसी ट्रुपतर्फे आयोजित केलेल्या ‘सहारा ब्लड डोनेशन ड्राइव्ह’ या रक्तदान शिबिरात ३१२ रक्तदात्यांनी रक्तदान करून हुतात्म्यांना अभिवादन केले.
कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संत ज्ञानेश्‍वर सभागृहात आयोजित केेलेल्या या शिबिराचे उद्घाटन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड यांनी केले. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड व माईर्स एमआयटीचे कुलसचिव श्री. सु.वा.उर्फ नाना कुलकर्णी हे उपस्थित होते.
या शिबिरात दीनानाथ मंगेशकर, आचार्य अनंत ऋषी व सह्याद्री ब्लड बँकचे डॉक्टर्स व कर्मचार्‍यांनी विशेष मदत करून ३१२ युनिट ब्लड जमा केले. या रक्तदान शिबिरात विद्यार्थी, विद्यार्थींनी, शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी रक्तदान केले.
यावेळी शिबिराचे आयोजन करणारे स्न्वड्रन लीडर प्रा. डॉ. संजय देशमुख, कॅडेड ओंकार येनपुरे, व्हॉलेंटियर रजत सुरी, एनसीसीचे कॅडेडस व व्हॉलेंटियर्स ेउपस्थित होते.

जीजीआयएस अथ येथे विज्ञानप्रदर्शनाचे आयोजन

0

पुणे :- लहान वयात विद्यार्थ्यांना प्रयोगाची संधी देत जर या विषयांची गोडी लावली, तर त्यातून पुढच्या पिढीतील शास्त्रज्ञ तयार होऊ शकतात.अशी भावना माहिती गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी दिली

त्या पुढे म्हणाल्या कि, आजच्या विज्ञान दिनाचे औचित्याने  लहान मुलांमध्ये विज्ञानाविषयी कुतुहल वाढावे व त्यांना त्या वयापासूनच या विषयांची गोडी लागावी या उद्देशाने गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने बावधन मधील गंगा लेजंड येथे जीजीआयएस अथ(प्री प्रायमरी स्कूल) मध्ये  विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

आजही विज्ञान आणि पर्यावरण विषयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा असला तरी लहान मुलांना समजेल आणि त्यांना करून पाहता येईल,अशा प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान शिकवण्याचे प्रयत्न अजून कमीच पडतात.म्हणूनच यावेळी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी वेगवेगळे प्रयोग सादर केले.

आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या जसे कि, कचऱ्याचे विघटन कसे होते ,जलशुद्धिकरण कसे होते, ढग कसे तयार होतात,गुरुत्वाकर्षण काय असते अशा काही गोष्टींची माहिती शिक्षकांनी चिमुकल्यांना दिली. या प्रदर्शनामध्ये पालकांनी देखील मुलांसोबत सहभाग घेतला.

भारती भागवाणी म्हणाल्या कि, विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात विज्ञानाचा वापर करून समस्या कशा सोडवायला शिकावे ज्यामुळे येणाऱ्या २१ व्या शतकातील वेगवान जगाला सामोरे  जाण्यासाठी ते स्वत:ला तयार करू शकतात.

मराठी भाषा जपल्यामुळेच जगभर फिरता आले – सुधीर गाडगीळ

0

पुणे- एखाद्याची मुलाखत घेताना मुलाखतकाराच्या विचारात स्पष्टता, देहबोली आणि वाचणाबरोबरच
त्याने उत्तम श्रोता असणे आवश्यक आहे असे मत प्रसिध्द निवेदक व मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी
व्यक्त केले. मराठी भाषा जपल्यामुळेच आपल्याला जगभरात फिरता आले असेही ते म्हणाले.
‘मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान’तर्फे महाकवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी (२७ फेब्रुवारी)यंदाचे ‘माध्यम
रत्न’पुरस्कार’ चैत्राली चांदोरकर (महाराष्ट्र टाईम्स ), हलिमाबी अब्दुल कुरेशी (बी.बी.सी.वर्ल्ड न्यूज –
मराठी) आणि दीपा भंडारे (आकाशवाणी) यांना सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी
ते बोलत होते.’पत्रकार भवन’नवी पेठ, पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.. ५००० रुपये रोख, स्मृतीचिन्ह,
शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यासोबतच ‘नाद-संवाद’ या प्रामुख्याने कलावंताच्या छोट्या
मुलाखतींवर आधारित तन्मयी मेहेंदळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही संपन्न झाले. तिला देखील
प्रतिष्ठानतर्फे पाच हजार रुपये, शाल श्रीफळ देऊन गौरविले गेले. श्री महिला गृहोद्योग लिज्जत पापडचे
मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते, ‘मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान’चे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे हे
मंचावर उपस्थित होते.
सुधीर गाडगीळ म्हणाले, मुलाखत घेणाऱ्याचे भान पक्के असावे लागते. त्यासाठी माणसे आणि पुस्तके
वाचावी लगतात. कधी संधी येईल हे सांगता येत नाही. २४ तास सतर्क राहणे ही बोलणाऱ्या माणसाने
लक्षात ठेवण्याची बाब आहे असे नमूद करून गाडगीळ म्हणाले, मुलाखत घेताना समोरच्याच्या मनातून
तुम्हाला काय काढून घ्यायचे आहे याची रूपरेषा तयार असायला हवी. माध्यमांच्या स्वरूपात झालेले बदल
आणि मुलाखत घेताना आलेला आक्रमकपणा यामुळे कदाचित जास्त प्रसिद्धी मिळत असेल परंतु संयम
व बोलण्यातील नम्रपणा हा मुलाखतकाराने ठेवलाच पाहिजे असेही ते म्हणाले. ज्याची मुलाखत घ्यायची
आहे त्याने काही कर्तुत्व केले आहे, आपण त्याला बोलावले आहे याचे भान आपले ठेवले पाहिजे. प्रश्न
विचारण्याच्या नादात मुलाखतकाराने अकारण आक्रमक होणे आवश्यक नाही. ज्याची मुलाखत घ्यायची तो
खोटे बोलत असेल, नाठाळपणे उत्तरे देत असेल तर त्याला खट्याळपणे प्रश्न विचारून त्याची जागा त्याला
दाखवून देता येते असे त्यांनी सांगितले. मी मराठी भाषा जपली. मराठी भाषेच्या माध्यमातून शांघाय,
अमेरिकेतील ५१ शहरे,युरोप असे जगभर मला फिरता आले. मराठी भाषा जपल्यामुळेच ही संधी
मिळाल्याचे गाडगीळ यांनी नमूद केले.

सुरेश कोते म्हणाले, संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांनी त्यांच्या विचारातून , भजनातून लोकांना विचार
दिले. पुढे वारकरी सांप्रदायाने मराठी भाषा जतन करण्याचे काम केले आहे. एकवेळ शिकलेल्या
माणसांकडून माणसांकडून मराठीचे जतन झाले नाही परंतु ग्रामीण भागातील जनतेचे वाचन कमी असले
तरी त्यांचे श्रवण जास्त असल्याने त्यांनी मराठी भाषेचे संगोपन केले. मराठी जगवायची असेल तर
जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मराठीचे संगोपन व्हायला हवे असेही त्यांनी नमूद केले.
चैत्राली चांदोरकर म्हणाल्या, पुण्यातील माध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या ४० टक्केपेक्षा
जास्त आहे. ‘आयडब्ल्यूएमएफ’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात जगभरात माध्यमांमध्ये काम करणाऱ्या
महिलांचे प्रमाण हे ३३ टक्के आहे. युरोप, अमेरिका यासारख्या विकसित देशात हे प्रमाण २० टक्के आहे.
आपल्याकडे अजूनही संधी उपलब्ध असून हे प्रमाण ६० टक्क्यापर्यंत जाऊ शकते. मराठी माध्यमांमध्ये
तरुणींनी मोठ्या प्रमाणात यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हलीमाबी कुरेशी म्हणाल्या, मराठी भाषेबद्दल बोलताना प्रमाण भाषा की बोली भाषा असा वाद निर्माण
होतो. मात्र, हा वाद नसून त्या दोघी बहिणी आहेत असा दृष्टीकोन असायला हवा. आपण ज्या भागात
राहतो, वावरतो ती भाषा आपल्याला येणे आवश्यक आहे असे सांगून पंढरपूरच्या वारीमुळे आपला
पत्रकारीतेते येण्याचा उद्देश सफल झाला असे त्या म्हणल्या. मराठी भाषा आपल्या विचाराने, लिहिण्याने
आणि बोलण्याने कशी समृध्द करता येईल याचा चिचार होणे आवश्यक आहे असेही त्यांनी नमूद केले.
दीपा भंडारी म्हणाल्या, मराठी भाषा समृद्धीच्या प्रवासामध्ये आपल्याला आकाशवाणी , वृत्तपत्रे या
माध्यमांचा उपयोग झाला. तसेच मराठीमुळे आत्मविश्वासातहे भर पडली. संत साहित्य आणि आधात्म्य
याचे खूप वाचन केल्यामुळे माझे मराठी लिखाण अधिक समृध्द होत गेले असे त्या म्हणाल्या.
तन्मयी मेहेंदळे मेहेंदळे म्हणाल्या, विविध माध्यमांमधून मला लिखाण करता आले त्याच्या निवडक ४२
मुलाखतींचे पुस्तक मला करता आले. प्रत्येकामध्ये एक लेखक दडलेला असतो. तो काही ना काही लिहू
शकतो या माझ्या आतापर्यंतच्या गुरुजनांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे हे माझे पहिले पुस्तक मी लिहू
शकले. आजोबा आणि आईवडिलांचे संस्कार यामुळे मराठी भाषा अधिक शुध्द स्वरूपात वापरण्याची सवय
मला जडली असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रवीण प्र.वाळिंबे म्हणाले, की गेली १९ वर्षे मराठी भाषा संवर्धनार्थ
अनेक उपक्रम राबवले जातात. साहित्य, कला, संस्कृतीप्रमाणेच विद्याना-तंत्रज्ञान, व्यापार आणि उद्योग
याच्यात मराठी भाषा रुजली पाहिजे,आर्थिक व्यवहाराची मारतही भाषा व्हायला पाहिजे असे सांगून नव्या
पिढीमध्ये मराठी भाषेची वाक्यरचना व शुद्धलेखन याबद्दल काहीसी अनास्था आहे याबद्दल त्यांनी खंत
व्यक्त केली. मात्र, मराठी भाषा कधी संपणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सूत्रसंचालन करुणा पाटील यांनी तर आभार नीना वाडेकर यांनी मानले. कार्यक्रमास साहित्य, कला,
संस्कृती, नाट्य, चित्रपट, प्रकाशन अशा विविध क्षेत्रातील अनेक नामवंत उपस्थित होते.

लघुवृत्तपत्रांवर झालेल्या अन्यायाविरूद्ध कोल्हापूर येथे 8 मार्च रोजी ठिय्या आंदोलन

0

लघु वृत्तपत्र बचाओ संघर्ष कृती समितीचा निर्णय

कराड – महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नवीन संदेश प्रसार धोरणामुळे लघु वृत्तपत्रांचे अस्तित्व संपुष्टात येऊन अनेक मालक, संपादक आणि त्यांचे कर्मचारी बेरोजगार होतील म्हणून लघु वृत्तपत्र बचाओ संघर्ष कृती समितीने आंदोलनाची भूमिका अंगीकारली आहे. या संदर्भात लघु वृत्तपत्र बचाओ संघर्ष कृती समितीच्यावतीने शुक्रवार ८ मार्च २०१९ रोजी महसूल व बांधकाम मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या निवासस्थानासमोर सकाळी ११ ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ठिय्या (धरणे) आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र लघु वृत्तपत्र बचाओ संघर्ष कृती समितीचे समन्वयक आप्पासाहेब पाटील यांनी दिली.

लघु वृत्तपत्र बचाओ संघर्ष कृती समितीने आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री महोदय, महासंचालक माहिती व जनसंपर्क आदि सर्व संबंधितांना पाठविलेले आहे.कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सिंधुदूर्ग, पुणे, सातारा, सोलापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र मालक, प्रकाशक संपादकांनी शुक्रवार दि. ०८ मार्च २०१९ रोजी सकाळी ११ वाजता ठिय्या (धरणे) आंदोलनासाठी कोल्हापूर येथे उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र लघु वृत्तपत्र बचाओ संघर्ष कृती समितीच्यावतीने आप्पासाहेब पाटील यांनी केलेले आहे. कोल्हापूर येथे होणाऱ्या या धरणे आंदोलनानंतर पुढील आंदोलनाची दिशा लघु वृत्तपत्र संपादक मालकांच्यावतीने मुंबई येथे उपोषणाचा मार्ग अवलंबिण्यात येणार आहे. असेही आप्पासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

राज्याचा अंतरीम अर्थसंकल्प हा सर्वांगीण व पायाभुत विकासाला गतिमान करणारा-पालकमंत्री गिरीश बापट

0
पुणे-अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या राज्याचा सन 2019-20 चा अंतरीम अर्थसंकल्प हा राज्याचा  सर्वांगीण   व पायाभूत विकासाची गती वाढवणारा असून सामाजिक न्यायाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या निर्मितीचा ध्यास सांगणार आहे. या अर्थसंकल्पात राष्ट्रीय महामार्गात, नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग, आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. त्या सोबत पुणे मेट्रो प्रकल्पाचे कामे वेगाणे पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे. अशी माहिती मंत्री गिरीश बापट, अन्न व नागरी पुरवठा यांनी दिली.
या अर्थसंकल्पात कोरडवाहू शेतीला स्थैर्य पायाभूत सूविधाचा गतिमान विकास वाढत्या शहरी करणावर सूविधा शेतकरी व युवकांच्या प्रश्नाबाबत प्राधान्य, शेतकऱ्यांना सन्मानाणे जगता यावे म्हणून हाती घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज योजनेमार्फत राज्याचा शेवटचा पात्र शेतकरी कर्ज मुक्त होईपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना योग्य न्याय देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या चार वर्षाच्या काळात राज्याने रस्ते, जलसंपदा, कृषी, आरोग्य, अशा विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. मागील साठ वर्षात जे काम झाले नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वा खाली या सरकारने केले आहे. असे मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
शांतीलाल कटारिया अध्यक्ष,क्रेडाई महाराष्ट्र
 –पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि बांधकाम क्षेत्राचा विकास यावर लक्ष केंद्रित करून आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो. या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ७ हजार कोटी, महामंडळ स्थानकाच्या उभारणीसाठी १०० कोटी, २४०० कोटी स्वच्छ भारत व अमृत योजनेसाठी तर रस्ते विकासासाठी ११ हजार कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली. या महत्वपूर्ण तरतुदींमुळे राज्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. नोकरदार आणि उद्योजक आपल्या राज्यास प्राधान्य व पसंती दर्शवतील.
अतुल गोयल, व्यवस्थापकीय संचालक गोयल गंगा डेव्हलपर्स (इं) प्रा. लि.
२०२२ पर्यंत सर्वांना घरे असे लक्ष्य सरकारने ठेवले असताना आज सादर झालेल्या राज्य अर्थसंकल्पात प्रधानमंत्री आवास योजने साठी मोठी तरतूद करण्यात येणे ही निश्चितपणे स्वागतार्ह बाब म्हणावी लागेल. परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी बांधकाम व्यावसायिकांकडून सरकारला सहकार्य लाभत असताना यासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. सरकार आणि विकसक यांच्या सुयोग्य समन्वयातूनच परवडणाऱ्या घरांचे ध्येय पूर्णत्वास येऊ शकते. एकूणच स्वच्छ भारत, रस्ते व ग्रामीण विकास, आरोग्य, पायाभूत सुविधा यासाठी करण्यात आलेल्या तरतुदीतून सर्वसमावेशक अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर झाल्याचे दिसून आले.

गोवा टुरिझमने मिळवले दोन प्रतिष्ठित इंडिया टुडे पर्यटन पुरस्कार

0

सर्वोत्तम राज्य आणि सर्वोत्तम समुद्रकिनारी पर्यटनस्थळ (पालोलेम) असण्यावर मोहोर

पणजी – गोवा राज्याला इंडिया टुडे टुरिझम सर्व्हे अँड अवॉर्ड्स २०१८ मध्ये सर्वोत्तम राज्य – ट्रॅव्हलर्स चॉइस आणि सर्वोत्तम समुद्रकिनारी पर्यटनस्थळ (पालोलेम- गोवा) म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

 गोव्याचे माननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर यांनी आज गोवा राज्याच्या कामगिरीची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘गोवा हे भारतातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ असल्याचा मी कायम पुनरूच्चार करत असतो आणि सुरक्षा, स्वच्छता, पायाभूत सुविधांचा विकास, नवे पर्यटन उपक्रम व अशा विविध निकषांवर गोवा आघाडीवर राहाण्यासाठी आम्ही विशेष उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे.’

इंडिया टुडे पर्यटन पुरस्कार सोहळ्यात गोवा टुरिझमला  केंद्रीय मंत्री – राज्य पर्यटन (स्वतंत्र पदभार) श्री. के. जे. अल्फोन्स यांच्या हस्ते सोमवारी नवी दिल्लीत दोन प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केल्यानंतर श्री. आजगांवकर यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

पर्यटनासाठी सर्वोत्तम – गोवा पर्ययन क्षेत्रात समुद्रकिनारे मुख्य आकर्षण असले, तरी राज्यात संस्कृती, साहस आणि स्वास्थ्याच्या दृष्टीने इतरही बरंच काही अनुभवता येण्यासारखं आहे. गोव्यात भारतातील सर्वात चांगले आणि उत्तम देखभाल राखण्यात आलेले समुद्रकिनारे आहे. प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला स्वतःची अशी वेगळी खासियत आहे. उत्तर आणि दक्षिण समुद्रकिनारे प्रादेशिक रचना, खाद्यपदार्थ आणि तेथील उपक्रमांच्या बाबतीत एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. ज्या पर्यटकांना निसर्ग आवडतो, ज्यांना सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेले समुद्रकिनारे, रूचकर खाद्यपदार्थ, कला यांच्यावर प्रेम आहे आणि ज्यांना असामान्य स्थापत्यकलेचा अभ्यास करायचा आहे किंवा मसाले नाहीतर काजूच्या बागांची सहल करायची आहे अशांसाठी गोवा आदर्श राज्यआहे. गेल्य काही काळात हे राज्य आपले निसर्गसौंदर्य आणि शांततेमुळे अध्यात्म तसेच योग प्रेमी आणि पर्यायी वैद्यकीय तज्ज्ञांना आकर्षित करत आहे.

सर्वोत्तम समुद्रकिनारी पर्यटनस्थळ – दक्षिण गोव्यात वसलेला पालोलिम समुद्रकिनारा त्याचे भौगोलिक ठिकाण, निसर्ग सौंदर्य व विविध उपक्रमांमुळे भारतातील सर्वात आवडीचा समुद्रकिनारा म्हणून उदयास येत आहे. कौटुंबिक पर्यटक तसेच बॅकपॅकर्स अशा दोन्ही प्रकारच्या पर्यटकांना आकर्षित करणारा समुद्रकिनारा म्हणून तो ओळखला जातो. पालोलिमने गोव्यातील सर्वात चांगल्या समुद्रकिनाऱ्याचे स्थान कायम राखले आहे, कारण तिथे वैविध्यपूर्ण गोष्टी अनुभवायला मिळतात. त्यामध्ये बांबू हट शॅक्स, रंगीबेरंगी कपड्यांची विक्री करणारे स्थानिक, योग, अध्यात्म इत्यादी. इंडिया टुडे पर्यटन पुरस्कार २०१९ द्वारे देशभरातील लोकप्रिय पर्यटन स्थळांची वेगवेगळ्या विभागांनुसार दखल घेतली जाते. यावर्षी आयपीएसओएस या बाजारपेठ संशोधन कंपनीने भारतभरातील १० शहरांत ऑनलाइन व ऑफलाइन सर्वेक्षण केले. विजेत्यांची यादी पर्यटकांची वैविध्यपूर्णतेची– गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यांपासून निर्मनुष्य डोंगराळ भागापर्यंत आणि नदीच्या किनाऱ्यांपासून द्रुतगती मार्गांपर्यंत आस दर्शवणारी आहे. पुरस्कारांची रंगत आणखी वाढवण्यासाठी त्यात ‘आयकॉनिक लँडस्केप्स’ आणि ‘सिनिक रोड्स’ असे विभागही ठेवण्यात आले होते.

 

मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित आणि सक्षम – मुख्यमंत्री

0
मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश आणि आपली सेना शहिदांचा सूड घेण्यासाठी आणि देशाचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. हे पुलवामाचा सूड घेल्याने सिद्ध झालं असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. वाळकेश्वर येथील बाणगंगा येथे आयोजित कमल ज्योति संकल्प अभियान या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राज्य भाजपचे सरचिटणीस विजय पुराणिक आणि महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विविध सरकारी योजनांद्वारे देशाच्या २२ कोटी लोकांच्या जीवनात आलेल्या सकारात्मक विकासाठी लोकांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांनी सरकारी विकास योजनेच्या लाभार्थ्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आमदार मंगल प्रभात लोढ़ा यांचे आभार व्यक्त करत म्हणाले की, कमल ज्योती संकल्पनेच्या या कार्यक्रमात १ हजार पेक्षा जास्त लाभार्थी आणि मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती आनंदाची बाब आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची गती वाढली आहे, कारण देशभरात भ्रष्टाचार संपला असून दलालांचा खात्मा झाला असल्याचे ते म्हणाले आहेत. या कार्यक्रमात भाजपा नेते संजय उपाध्याय यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि, पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याची भावना प्रत्येक भारतीयाच्या हृदयात होती आणि मोदीजींनी देशातील लोकांच्या मनातील भावना समजून सर्जिकल स्ट्राइक करून शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला आहे. भारतीय सेनेकडून  पाकिस्तानात घुसून  केलेल्या  कामगिरीमुळे जनतेत उत्साहाचे वातावरण होते. त्यात कमल ज्योती संकल्प योजना देशातील २२  कोटी लोकांपर्यंत पोहोचविण्याचे यश सर्जिकल स्ट्राईकचा उत्सव झाला होता. या कार्यक्रमात जमलेल्या लोकांनी भारत मातेचा जयघोष करत पाकिस्तान मुरादाबादच्या घोषणा दिल्या.

पोषण मुल्यांचे धडे देणे आवश्यक

0

पुणे  :-बारीक होण्यासाठी उपाशी राहणे नव्हे तर आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटकांची कमी होणार नाही याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.राहुरीमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख  म्हणून काम  पाहणाऱ्या डॉ.युडी. चव्हाण यांनी असा सल्ला दिला. ‘मानवी आरोग्यासाठी पोषक अन्नधान्यया विषयावर ते बोलत होते.आपल्या रोजच्या आहारातून ‘पोषणमूल्य‘ किती प्रमाणात शरीरात जात आहेत याविषयीची माहिती सर्वांना व्हायला हवी त्यासाठी पोषणमुल्यांचे धडे देणे आवश्यक आहेअसे मत त्यांनी मांडले. स्कायरूट व्हेनचर्स एलएलपीने ”निरोगी आरोग्यासाठी आवश्यक पौष्टिक आहार”  या  व्हेनचर्स एलएलपीने ”निरोगी आरोग्यासाठी आवश्यक पौष्टिक आहार” या कार्यक्रमाचे  आयोजन केले होतेस्कायरूट व्हेनचर्सएलएलपीचे विश्वस्त अजय कंग्राळकर,संचालिका जयश्री चौधरी, इंडियन डायटरी असोसिएशनच्या पुणे विभागाच्या अध्यक्षा शिल्पा शिरोळे, अर्चना रायरीकर  तसेच अनेक न्यूट्रीशिनिस्ट आणिडायटिशियन्सही उपस्थित होते.यावेळी न्यूट्रीशियस पदार्थ वापरून त्यापासून वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ बनविण्याच्यास्पर्धेचे देखील आयोजन केले होते.

 चांगला पौष्टिक आहार प्रभावी औषधाप्रमाणेच असतो,शरीराचे कार्य नीट चालवायला त्याची मदत होते, तो योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत गेला नाही तर आपले आरोग्य बिघडते. यासाठी प्रक्रिया केलेले अन्न न खाता आपल्या मातीत उगवलेल्या पारंपारिक धान्यांचा समावेश आहारामध्ये करणे आवशयक आहे.अशा भावना सच हॉस्पिटॅलिटीच्या संचालिका कमलजित कौर यांनी व्यक्त केल्या.

 सिनियर न्यूट्रिशनिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या  अंबिका नायर  म्हणाल्या कि,धान्यमोड आणण्याच्या प्रक्रियेने त्यातील क्षार आणि प्रथिनांचे प्रमाण वाढतेतसेच जीवनसत्वे आणि इतर पोषकतत्वेही यामध्ये असतातमोडविलेले कडधान्य पचण्यासही हलके होतेमोडविलेल्या कडधान्याच्या सेवनाने शरीरामध्ये चरबी वाढत नाही.अन्य जीवनसत्वे व प्रथिने यामध्ये भरपूर मात्रेमध्ये असल्याने ह्याचे सेवन डोळेत्वचाकेस यासर्वांच्याच आरोग्यासाठी लाभकारीआहेमोडविलेल्या कडधान्याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्टेरोलची मात्रा कमी होऊन धमन्यांमध्ये अडथळे दूर होतात याशिवाय शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.

स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ व स्वच्छ शहर तारांकित मानांकन मध्ये जुन्नर नगरपरिषदेचे यश

0
जुन्नर /आनंद कांबळे 
केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालय,भारत सरकार यांच्या द्वारे  आयोजित स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ मध्ये भारतातील 4237  शहरांमधून जुन्नर नगरपरिषदेने घवघवीत यश संपादन केले आहे.
दिनांक ६ मार्च २०१९ रोजी विज्ञान भवन,नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात माननीय राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नगरपरिषदेचा गौरव केला जाणार आहे.
या कार्यक्रमास जुन्नर शहराचे नगराध्यक्ष .शाम पांडे ,  मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर बोराडे  उपस्थित राहणार आहेत.
 पश्चिम विभागातून क वर्ग नगरपरिषदांमध्ये जुन्नर नगरपरिषदेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून महाराष्ट्र शासनातर्फे सुद्धा जुन्नर नगरपरिषदेला गौरवण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर बोराडे यांनी दिली.
नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सर्व जुन्नर वासीयांचे आभार मानले.
जुन्नर शहराला अव्वल आणण्यासाठी सर्व नगरसेवक ,पदाधिकारी ,आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री, बांधकाम विभाग प्रमुख विवेक देशमुख ,नगरपरिषदेचा सर्व स्टाफ, मुकादम व सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामामुळेच हे यश आल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले.

मास्‍टर ट्रेनर्सना इव्‍हीएम वापराबाबत प्रशिक्षण –अपर जिल्‍हाधिकारी डॉ. पडियार

0

पुणे- गत लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी इलेक्‍ट्रॉनिक व्‍होटींग मशिन्‍स (इव्‍हीएम) वापरण्‍याचा अनुभव असला तरी यंदाच्‍या यंत्रांमध्‍ये नवीन फीचर्स असल्‍यामुळे त्‍याबाबत माहिती घेवून त्‍यानुसार कार्यवाही करावी, असे अपर जिल्‍हाधिकारी तथा नोडल अधिकारी प्रशिक्षण डॉ. ज्‍योत्‍स्‍ना पडियार यांनी सांगितले.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात मास्‍टर ट्रेनर्सना मतदान यंत्रांबाबत तसेच व्‍हीव्‍हीपॅट (वोटर व्‍हेरिफीएबल पेपर ऑडीट ट्रेल)  बाबत प्रशिक्षण देण्‍यात आले. यावेळी उपजिल्‍हाधिकारी विजयसिंह देशमुख, शिल्‍पा करमरकर आदी अधिकारी उपस्थित होते.

डॉ. पडियार म्‍हणाल्‍या, 2014 च्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी असलेल्‍या मतदान यंत्रासोबत व्‍हीव्‍हीपॅट नव्‍हते. त्‍यामुळे मतदान यंत्रांच्‍या जोडणीचा क्रम योग्‍य पध्‍दतीने लक्षात घेणे आवश्‍यक आहे. मतदान यंत्रांची काळजीपूर्वक हाताळणी, जोडणीचा क्रम न चुकवणे, दिलेल्‍या आदर्श सूचनांचे पालन करणे याबाबत त्‍यांनी सूचना दिल्‍या. मतदान यंत्रांच्‍या जोडणीबाबत पुरेसा सराव करण्‍यात यावा, असेही त्‍या म्‍हणाल्या.

विजयसिंह देशमुख यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्‍हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत सर्वांनीच कटीबध्‍द असणे गरजेचे आहे. मतदान यंत्रांबाबत मनात कोणताही प्रश्‍न, शंका न ठेवता, त्‍याचे निरसन करुन घ्‍यावे. सेक्‍टर ऑफीसर्सना मास्‍टर ट्रेनर्स प्रशिक्षण देणार असल्‍यामुळे त्‍यांनी आपले प्रशिक्षण काळजीपूर्वक पूर्ण करायला हवे, असे ते म्‍हणाले.

मतदार यादीचा एकही अर्ज प्रलंबित राहता कामा नये-जिल्‍हाधिकारी राम

0

पुणे- मतदार यादीत नाव समाविष्‍ट करण्‍यासाठी आलेला एकही अर्ज प्रलंबित राहता कामा नये, अशा स्‍पष्‍ट सूचना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्‍या. आगामी लोकसभा निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणच्‍या (पीएमआरडीए) अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. कविता द्विवेदी, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, लोकसभेसाठी मतदार म्‍हणून ऑनलाईन तसेच ऑफलाइन अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची तपासणी करुन त्‍यावर योग्‍य ती कार्यवाही करण्‍यात यावी. एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये. आलेल्‍या प्रत्येक अर्जावर कार्यवाही झाली पाहिजे, असे स्‍पष्‍ट करुन जिल्‍हाधिकारी राम यांनी त्‍याबाबत नियमित आढावा घेण्‍यात येईल, असे सांगितले. मतदार यादीचा कार्यक्रम कालबध्‍द असल्याने नियोजनबध्‍द आणि गतीने काम करण्‍यात यावे, त्यासाठी स्‍वतंत्र कक्ष स्‍थापन करुन दररोज आढावा घ्‍यावा, अशा सूचना त्‍यांनी संबंधितांना केल्‍या.

बैठकीत जिल्‍हा निवडणूक नियोजन आराखडा,स्‍वीप कार्यक्रम (मतदार जागृती कार्यक्रम), वाहन आराखडा, दिव्‍यांगासाठीच्‍या सुविधा, निवडणूक खर्च व्‍यवस्‍थापन याबाबतचा आढावा घेण्‍यात आला.  सी-व्‍हीजील अॅप यावेळी महत्‍त्‍वाचे ठरणार असून याबाबत  दक्ष राहण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

रोबोटिक सांधेरोपण शस्रक्रिया सेंटर चे उद्घाटन

0
  • मुंबई मध्ये प्रथमच रोबोटिक सांधेरोपण शस्रक्रिया सेंटर चे उद्घाटन
  • अनेक फायदे रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना मिळतात
  • रुग्णांना माफक दरात अधिक चांगल्या सुविधा मिळ्तील व शस्त्रक्रियेनंतर चा त्रास ही कमी होतो

मुंबई-उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबई मध्ये एका पाठोपाठ २ रोबोटिक च्या माध्यमातून सांधेरोपण शस्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये ६५ वर्षाच्या कांचन पाटील या ५ वर्षापासून गुधगेदुखीच्या त्रासाला सामोरे जात होत्या.मात्र गुढघ्यावर झालेल्या  नॅव्हीओ पीएफएस रोबोटिक्स सर्जिकल च्या माध्यमातून त्या शस्त्रक्रियेच्या चार तासाच्या आत चालू देखील लागल्या.

रोबोटिक सांधेरोपण शस्रक्रिया ही पारंपारिक शस्त्रक्रिये पेक्षा नक्कीच फायदेशीर आहे. या रोबोटिक असिस्टेड शस्रक्रियेत अधिक अचूकता, कमीत कमी रक्तस्राव, लवकरात लवकर बरे होण्याची खात्री आणि बदललेल्या कृत्रिम सांध्यात मिळणाऱ्या नैसर्गिक हालचाली असे अनेक फायदे रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना मिळतात. “रोबोटिक असिस्टेड सांधेरोपण शस्रक्रिया ही पारंपारिक शस्त्रक्रिये पेक्षा नक्कीच फायदेशीर आहे.” असे प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन आणि उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे ऑर्थोपेडिक्सचे प्रमुख डॉ. तेजस उपासनी म्हणाले. ते पुढे म्हणाले की“मानवी क्षमतेच्या त्रुटी रोबोटिक च्या साह्याने दूर करणे व रुग्णांना सर्वोत्तम रिझल्ट देणे शक्य झाले आहे. हे अतिशय प्रगत असे तंत्रज्ञान आमच्या रुग्णालयात उपलब्ध आहे. ज्यामुळे रुग्णांना माफक दरात अधिक चांगल्या सुविधा मिळ्तील व शस्त्रक्रियेनंतर चा त्रास ही कमी होतो”

उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबई येथे रोबोटिक सांधेरोपण शस्रक्रिया सेंटर चे उद्घाटन श्री. अतुल कुलकर्णी, अभिनेते यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.

यावेळी श्री अतुल कुलकर्णी म्हणाले कि, “वैदकीय क्षेत्रातील या महत्वाचा बदलाने आयुष्य वाढवले आहे, हे विज्ञानाची सिद्धी आहे वैदकीय शास्त्रात झालेली प्रगती व नव-नव्या सोयी व उपकरणांमुळे  मोठ मोठ्या आजारांवर आळा घालण्यास मदत होते”.

जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या परिणामांमुळे या रुग्णांचे नातेवाईक अत्यंत आनंदी आहेत, या शस्त्रक्रिये नंतर रुग्ण २-३ दिवसात घरी जाऊ शकतो. मानवी क्षमतेच्या त्रुटी रोबोटिक च्या साह्याने दूर करणे व रुग्णांना सर्वोत्तम रिझल्ट देणे शक्य झाले आहे, शस्रक्रियेनंतर रुग्ण अधिक समाधानी व आत्मविश्वासपूर्वक चालू  शकतात. एक-दोन दिवसातच स्वतः घरी चालत जाऊ शकतात, यामुळे रुग्णालयात राहण्याचा अतिरिक्त खर्च देखील कमी होतो, तसेच वेदना खूपच कमी झाल्याने वेदनाशामक औषधांचा वापर कमी होतो. रुग्ण स्वतःच हिंडू/ फिरू शकल्याने शस्रक्रियेनंतर फिजिओथेरपीची आवश्यकता भासत नाही.  एकूणच, रोबोटिक तंत्रज्ञान रुग्णांसाठी एक वरदानच ठरले आहे.

उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे ऑर्थोपेडिक आणि नी रिप्लेसमेंट सर्जन डॉ.तेजस उपासनी व सेठ जी.एस मेडिकल कॉलेज चे माझी विभाग प्रमुख डॉ. विनोद लाहिरी  यांच्या पुढाकाराने रोबोटिक तंत्रज्ञान रुग्णांना उपलब्ध करून दिले आहे.

या वेळी सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज चे माजी विभाग प्रमुख डॉ. विनोद लाहिरी, म्हणाले, “रोबोटीक टेक्नोलॉजी च्या साहाय्याने कमी वेळात पेशंटस् ना कृत्रिम भाग बसवणे जास्त  फायदेशीर आणि अचूक होत आहे. यामूळे कृत्रिम भाग दीर्घयुष्यी झाले. मुंबई मध्ये रोबोटीक टेक्नोलॉजी कृत्रिम भाग बसवण्याची ही सुविधा उपलब्ध झाल्या व त्याचबरोबर  उपासानी सूपर स्पेशालीटी हॉस्पिटल च्या सर्जनच्या योग्य हातात आहे याचा मला आनंद आहे.”

जेव्हा डॉ. तेजस उपासनी ना विचारले की त्यांनी ही टेक्नोलॉजी का निवडली, ते म्हणाले, “आम्ही USSH मध्ये नेहमी पेंशटंस् ना चांगलंच देण्यावर विश्वास ठेवतो. आम्ही नेहमी पेशटंच्या सुरक्षतेवर व चांगल्या परिणामांवर  लक्ष केंद्रित करतो.”

या प्रसंगी रुग्ण म्हणाले कि “ या शस्त्रक्रिये नंतर माज्या वेदना पूर्णपणे कमी झाल्या आहेत, याचा मला आनंद आहे. आणि  रोबोटिक असिस्टेड सांधेरोपण शस्रक्रिया ही मला अतिशय लाभदायक ठरली.”