Home Blog Page 2981

11 मार्चपासून सुरू होणार बाबांच्या राजकन्येचा प्रवास

0

राजकन्या म्हटंलं की डोळ्यासमोर उभी राहते ती परीकथा आणि परिकथेतील ती‘ राजकन्या. मात्र सोनी मराठीवर नुकताच लाँच झालेल्या प्रोमोमधून तुमच्या-आमच्या सारखीच साधी, मध्यमवर्गीयमुलगी राजकुमारी म्हणून डोळ्यासमोर येते. तिचं विश्व कसं असेल याच वर्णन करताना तिच्या बाबांनी म्हटलेली कविता, त्यांच्या साठी ती राजकन्याच आहे, हे स्पष्ट दिसून येतं. असं असलं तरी बाबांच्या याराजकन्येच्या वाटेत कितीतरी अडथळे आहेत. डोळ्यात डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या या राजकन्येच्या हाती सफेद डॉक्टरी कोटाऐवजी पोलिसांची खाकी वर्दी आली आहे. खाकीवर्दीतल्या या राजकन्येचं आयुष्य 11 मार्चपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. याची पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत पार पडली. यावेळी बाबांची राजकन्या अवनी म्हणजेच किरण ढाणे, बाबांच्याभूमिकेत दिसणारे किशोर कदम ही प्रमुख पात्रं, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकरमालिकेचे निर्माते – कोठारे व्हिजन चे महेश कोठारेआदिनाथ कोठारे आणि या मालिकेच्याटायटल ट्रॅक ची उत्तम सांगड घालणारे अशोक पत्की त्याबरोबरच याचं शीर्षकगीत लिहिणाऱ्या अश्विनी शेंडे उपस्थित होते. या सगळ्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली.

21 व्या शतकातल्या त्या प्रत्येक स्त्री चं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या अवनीने बाबांचं छत्र डोक्यावरून निसटल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. आई आणि भावाची काळजी घेताना ती कुठेहीअपुरी पडत नाही. बाबांच्या या राजकन्येचा खडतर प्रवास कधी संपणार आणि तिच्या बाबांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे तिला लाखो सलाम कधी आणि कसे छळणार हे हळूहळू मालिकेतून उलगडत जाणारआहे. या मालिकेचं कथानक आणि विषयाबरोबरच शीर्षकगीत हे या मालिकेचं अजून एक वैशिष्ट्य आहे. हे शीर्षकगीत अश्विनी शेंडे यांनी लिहिलं असून त्याला देवकी पंडित आणि अजय पुरकर यांनीआवाज दिला आहे तर एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मालिकाविश्व समृध्द करणाऱ्या अशोक पत्की यांचं संगीत याला लाभलं आहे. या मालिकेच्या शीर्षकगीताच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी जमलेली देवकीपंडित आणि अशोक पत्की यांच्या संगीताची मैफल प्रेक्षकांना सुखावणारी ठरणार आहे.एक होती राजकन्या असा बाबांच्या कवितेतून होणारा या राजकन्येचा उल्लेख आणि राजकुमाराच्या भेटीने होणारा शेवट,11 मार्चपासून सोमवार ते शनिवारसंध्याकाळी 7.30 वाजता  सोनी मराठीवर.

शशिकांत लक्ष्मण म्हेत्रे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित

0

पुणे-सामाजिक कार्यकर्ते शशिकांत म्हेत्रे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले व सामाजिक न्याय राज्य मंत्री यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले . या पुरस्कारामध्ये पंधरा हजार रुपये धनादेश  सन्मान चिन्ह ,   मानपत्र शाल श्रीफळ  देउन सन्मानित करण्यात आले . 

शशिकांत म्हेत्रे हे गेले अनेक वर्षांपासून सफाई कामगार नेते म्हणून काम करीत असून राष्ट्रवादी काँग्रेस सफाई मजदूरचे   महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम केले आहे. मेहेतर वाल्मिकी समाजासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे . त्यांनी मेहेतर  वाल्मिकी समाजाचे राज्यस्तरीय परिषद आयोजित केली होती . तसेच पुणे येथे ते वाल्मिकी समाजाच्या पंचायतमध्ये काम केले आहे . होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत गरजुंना वैद्यकीय मदत त्यांनी केले आहे .

आपल्याला राज्यशासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे आपण आनंदित झालो आहे . यापुढे देखील आपण समाजसेवेचा वसा चालू ठेवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत लक्ष्मण म्हेत्रे सांगितले 

पिनिनफरिना बॅटिस्टा – जगातील पहिल्या पूर्णतः इलेक्ट्रिक लक्झरी हायपरी जीटीचे अनावरण

पिनिनफरिना बॅटिस्टा इटलीमध्ये डिझाइन व निर्मिती केलेली आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली रोड-लिगल कार म्हणून 2020 मध्ये येणार
* 1,900 hp/ 2,300 Nm टॉर्क व झीरो एमिशन यामुळे बॅटिस्टा दोनपेक्षाही कमी सेकंदांमध्ये 100 km/h परंत जाणार, तरीही 120 kWh लि-आयन बॅटरी पॅक असणारी, एकदा चार्ज केल्यावर 450 किमी अंतर जाण्याची क्षमता
* पाओलो पिनिनफरिना म्हणतात, “बॅटिस्टाने स्वप्न प्रत्यक्षात साकारले”. कारण, भविष्यातील सुंदर, नावीन्यपूर्ण, झीरो-एमिशन इलेक्ट्रिक कारच्या नावामध्ये त्यांच्या कुटुंबाचे नाव पहिले लिहिले जाणार आहे

जीनिव्हा आटोमोटिव्ह कामगिरी, डिझाइन व तांत्रिक सहयोग यातील क्रांती पिनिनफरिना बॅटिस्टा या जगातील पहिल्या लक्झरी इलेक्ट्रिक हायपर परफॉर्मन्स जीटीच्या माध्यमातून समोर आली आहे.पिनिनफरिना कुटुंबाचे दीर्घ काळापासूनचे स्वप्न साकार करणारी आणि प्रचंड क्षमतेसह झीरो एमिशन हे नवे लक्ष्य साध्य करणारी, बॅटिस्टा ही पहिली केवळ पिनिनफरिना नाव असणारी कार आहे आणि ती अप्रतिम कामगिरी करणारी आहे. जीनिव्हातील हायपरकारच्या वर्ल्ड प्रीमिअरमध्ये सुंदर बॅटिस्टाची तीनही मॉडेल सादर करण्यात आली असून ती इलेक्ट्रिक कार कशी असावीत, याचा नवा आदर्श आहेत. तसेच, शुद्ध, ऐटदार व कालातीत इटालियन डिझाइनमध्ये सौंदर्य व कामगिरी यांचे सहसा न आढळणारे मिश्रणही त्यातून स्टायलिश पद्धतीने दिसणार आहे.

2020 मध्ये सादर झाल्यानंतर, बॅटिस्टा ही इटलीमध्ये डिझाइन व निर्मिती झालेली आजवरची सर्वात शक्तिशाली कार असेल आणि ती इंटर्नल कम्बशन तंत्रज्ञान असणाऱ्या आजच्या कोणत्याही रोड-लिगल स्पोर्ट्स कारला शक्य नसेल अशी उच्च कामगिरी करेल. सध्याच्या फॉर्म्युला 1 रेस कारपेक्षा वेगवान असणारी आणि 0 -100 km/h सब-टू सेकंड स्प्रिंट आणि 1,900 hp  2,300 Nm टॉर्क असणारी बॅटिस्टा झीरो एमिशन पॅकेजमध्ये उत्कृष्ट अभियांत्रिकी व तंत्रज्ञान यांची सांगड घालणार आहे.

2020 हे वर्ष पिनिनफरिना एसपीए डिझाइन हाउसच्या 90व्या वर्धापनदिनाचे वर्ष असून, या डिझाइन हाउसने बॅटिस्टासाठी डिझाइन ब्रिफ घेतले आणि सर्वोत्कृष्ट पिनिनफरिनाची निर्मिती केली: अप्रतिम कामगिरी करण्यासाठी कारची नावीन्यपूर्ण अभियांत्रिकी सुरळीतपणे एकात्मिक करणारे आकर्षक स्वरूप. 1947 मध्ये किसिटालिया 202 नावाने आणि त्यानंतर 100 हून अधिक फरारीमध्ये आणि या दशकात दाखल करण्यात आलेल्या सर्वात अलीकडच्या कारमध्ये आढळलेले क्लासिक पिनिनफरिना कार्समध्ये आढळणारे स्वरूप व कार्यपद्धतीचे डिझाइनविषयक तत्त्व हेच आहे.

पिनिनफरिना बॅटिस्टाचे ऑटोमोटिव्ह इतिहासातील स्थान त्याच्या नावामुळे अधोरेखित झाले आहे. पूर्णतः इलेक्ट्रिक, झीरो-एमिशन, केवळ पिनिनफरिना ब्रँडेड लक्झरी कार या बाबतीतील ही पहिली कार असून, ती संस्थापक बॅटिस्टा, त्यांचा मुलगा सर्जिओ व नातू व पिनिनफरिना एसपीए अध्यक्ष पाओलो यांचे स्वप्न साकार करणारी आहे.

हा अपूर्व नवा ब्रँड आहे आणि त्याची पहिली कार भूतकाळाशी भावनिक धागा असणारी, वर्तमानासाठी महत्त्वाची असणारी व उज्वल भविष्यासाठी क्षमता असणारी आहे – बॅटिस्टाचे डिझाइन कालातीत आहे आणि एक उत्तम कलाकृती आहे.

ऑटोमोबिली पिनिनफरिनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकल पर्श्के यांनी सांगितले: “ही अत्यंत आकर्षक व खरी ऑटोमोटिव्ह यशोगाथा आहे. बॅटिस्टा ही भूतकाळातील उल्लेखनीय परंपरेपासून प्रेरित असणारी भविष्यातील हायपरकार आहे. त्यातील तांत्रिक यशामध्ये व भावनिक आत्मियतेमध्ये खरी प्रेरणा व  नावीन्य सामावलेले आहे. इलेक्ट्रिफिकेशनमुळे कामगिरी नवी उंची गाठणार आहे आणि भविष्यात झीरो एमिशन साधणार आहे, तर ऑटोमोटिव्ह इतिहासाबद्दलच्या पॅशन व आदर यामुळे कारचे अनोखे रंगरूप साकारले जाणार आहे. बॅटिस्टा भविष्यातील क्लासिक व ऑटोमोटिव्ह आदर्श असेल, ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या इतिहासात स्वतःचे पान सुवर्णक्षरांनी लिहेल, असे आमचे उद्दिष्ट आहे.

यशाचे गमक आकडेवारी व इतिहास यांच्या पलीकडे आहे. नवी कार कंपनी सादर करण्यासाठी यापूर्वी कधीही एकत्र न आलेले ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील तज्ज्ञ ऑटोमोबिली पिनिनफरिनासाठी काम करत आहेत आणिपिनिनफरिना एसपीएबरोबर आणि तंत्रज्ञान स्पेशालिस्टबरोबर भागीदारी करत आहेत. याचा परिणाम म्हणजे, बुगाटी विरॉन व चिरॉन, फरारी सर्गिओ, लॅम्बोर्गिनी उरुस, मॅकलॅरन पी1, मर्सिडिज एएमजी-प्रोजेक्ट वन, पगानी झोंडा व पोर्शे मिशन ई अशा कार दाखल करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टीमपासून प्रेरणा व कौशल्य घेऊन तयार केलेली बॅटिस्टा पुढील वर्षी दाखल केली जाणार आहे.

दाखल होणार असलेली हायपरकार जगातील ऑटोमोटिव्ह क्षेत्राला तांत्रिक व सौंदर्य या बाबतीत भुरळ घालणार आहे. तसेच, दुर्मिळता हे तिचे ठळक वैशिष्ट्य असणार आहे. इटलीमध्ये जास्तीत जास्त 150 बॅटिस्टाची निर्मिती केली जाईल आणि त्यांचे समान वितरण उत्तर अमेरिका, युरोप व मध्य पूर्व/आशिया येथे केले जाईल. लॉसएंजलिसपासन लंडन, टोकयोपर्यंतच्या जगातील सर्वोत्तम लक्झरी कार रिटेल स्पेशालिस्टच्या मार्फत अप्रतिम ग्राहकसेवा दिली जाईल. पिनिनफरिना एसपीएच्या काम्बियानो मुख्यालयामध्ये प्रत्येक कार पूर्णतः पर्सनलाइज करण्याची संधी निर्माण करण्याचे नियोजन केले आहे.

बॅटिस्टा इलेक्ट्रिक कारची कामगिरी व इच्छित वैशिष्ट्ये या बाबतीत नवी प्रमाणके निर्माण करणार आहे. ईव्ही क्षेत्रासाठी ही पहिली पोस्टर कार असणार आहे आणि ऑटोमोबिली पिनिनफरिनाच्या निरनिराळ्या लक्झरी इलेक्ट्रिक कारसाठी अदर्श असणार आहे. यानिमित्ताने केवळ एक नवी कार सादर झालेली नाही, तर ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी एक नवा क्षण, नवी संकल्पना साकार झाली आहेपहिली झीरो-एमिशन, इटालियन लक्झरी कार.

चार सर्वोत्तम व्यवस्थापन इन्स्टिट्युटमध्ये सूर्यदत्ता इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटचा समावेश

0
पुणे : जागरणजोश डॉट कॉमने पश्चिम भारतातील व्यवस्थापन संस्थांच्या केलेल्या क्रमवारीत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला पहिल्या चार सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये येण्याचा मान मिळाला आहे. जागरणजोश डॉट कॉम ही एक ‘इन्स्टिटयूट रँकिंग’संबंधित एकमेव निपक्ष आणि तटस्थ अशी सर्वेक्षण करणारी प्रणाली आहे. या सर्वेक्षणात भारतातील व्यावसायिक महाविद्यालयांच्या (बी-स्कुल) बाह्यगोष्टी विचारात घेतल्या गेल्या नाहीत, तर विद्यार्थी आणि उद्योगांच्या दृष्टिकोनातूनही विविध पैलूंचे विश्लेषण केले गेले आहे. ‘टाइम्स बी स्कुल’ क्रमवारीतही सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने देशात ४२ वे स्थान पटकावले आहे. त्यामुळे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
‘सूर्यदत्ता’ दरवर्षी आपल्या गुणवत्तेत कमालीची वाढ करीत आहे. उद्योग क्षेत्राकडून मिळणारे सहकार्य व प्रोत्साहन, विद्यार्थ्यांची उल्लेखनीय गुणवत्ता आणि सूर्यदत्ता ग्रुपमधील सर्वानी घेतलेली प्रामाणिक मेहनत या जोरावरच संस्थेच्या प्रगतीचा आलेख चढता राहिला आहे. ‘सूर्यदत्ता’मध्ये अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना त्यांच्यातील क्षमतेनुसार विविध उपक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. शैक्षणिक आणि विविध उपक्रमातील सहभाग यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. आठवड्याला होणाऱ्या तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या कार्यशाळा आणि चर्चासत्रे यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. आजवर २५० पेक्षा जास्त नोबेल आणि पद्म पुरस्कार विजेत्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
सूर्यदत्ता शिक्षण संस्थेत शैक्षणिक कौशल्याच्या माध्यमातून कृती आणि विचारांतून स्वातंत्र्याची भावना रुजवली जाते. क्षेत्रभेटी, छोटे प्रकल्प, उद्योजकता विकास यातून विद्यार्थ्यांना स्व-कार्यक्षमतेसाठी मदत होते. सूर्यदत्ता इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कॅम्युनिकेशन (एसआयएमएमसी) महाविद्यालय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) मान्यताप्राप्त आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन व मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गौरव केलेला आहे. ‘नॅक’च्या मानांकन यादीतही महाविद्यालयाचा समावेश आहे. गेल्या चार वर्षांपासून एआयसीटीई-सीआयआय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात महाविद्यालयाला क्रमवारीत स्थान मिळालेले आहे.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी या यशाचे श्रेय टीमवर्कला दिले असून, सर्व संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सातत्याने घेतलेल्या मेहनतीचे फळ असल्याचे म्हटले आहे.

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पूर्वा ढेरेला ‘श्नायडर इलेक्ट्रिक ‘ची वार्षिक ५० हजार शिष्यवृत्ती

0

पुणे :

भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी  पूर्वा ढेरेला ‘श्नायडर इलेक्ट्रिक’ ची  वार्षिक ५० हजार रुपयांची  शिष्यवृत्ती मिळाली आहे . भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आनंद भालेराव यांनी ही माहिती दिली . पूर्वा ढेरे ही या महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे .प्राचार्य  डॉ . आनंद भालेराव आणि  इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग विभागाचे प्रमुख दीपक बनकर यांनी तिचे अभिनंदन केले . 

आदिवासी भागातील जि. प. प्राथमिक शाळा कोटमवाडी येथे माजी विद्यार्थ्यांमार्फत डिजिटल शाळा उदघाटन उत्साहात संपन्न

0
जुन्नर /आनंद कांबळे
आदिवासी दुर्गम भागातील जि. प. प्रा. शाळा कोटमवाडी (हडसर )ता-जुन्नर, जि. पुणे येथे डिजिटल शाळेचे उदघाटन करण्यात आले.
 सर्वप्रथम पुलवामा येथे शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाच्या सुरूवातीस ग्रंथदिंडी काढण्यात आली.
शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यी, नोकरदारवर्गानी शाळेसाठी स्मार्ट T. V-2,tab-4,तसेच दप्तरमुक्त रॅक, 6खुर्ची,मांडणी,प्रिंटर,वाॅटर फिल्टर, ढोलकी, हार्मोनियम पेटी, पाण्याची टाकी, समई, स्पिकर सेट, चप्पल स्टॅन्ड,कुंड्या15,व फूलझाडे15 2टेबल,पाटया30,कारपेट, असा एकूण *2,30,000* चा निधी शाळेस उपलब्ध करुन दिला.
 साहित्य प्रदान कार्यक्रमाचे अध्यक्ष  मारुती आबा गवारी, प्रमूख पाहुणे प्रफुल्ल गवारी(इंजिनिअर),मारुती पाल्हू सांगडे(नगरसेवक,पूणे) . भाऊराव भांगरे, सौ.सुमन साबळे,सचिन गवारी ,अशोक सांगडे ,रामचंद्र सांगडे (वि.अ.शिक्षण)विठ्ठल सांगडे(केंद्रप्रमूख)  वामन शेळके(केंद्र प्रमुख)  नारायण सांगडे (मुख्याध्यापक) शेळके निवृत्ती(मुख्याध्यापक), राजेंद्र मते सर, होनाजी गवारी सर, शंकर शेळके सर, सुनिल गवारी सर,अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस  सुभाष मोहरे सर,अखिल शिक्षक  संघटने चे मार्गदर्शक आ.का. मांडवे सर,पोलीस पाटिल, शरद सांगडे ,युवराज मुंढे (अध्यक्ष, पेसासमिती) मा. सुरेश शेळके(सरपंच)मा राजेंद्र सांगडे(ग्रा.पं.सदस्य) यांचे उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक मुठेसर व  संदिप तळपे सर व विद्यार्थी यांचेकडे सुपूर्त करण्यात आले.
याप्रसंगी सौ.मंगल गवारी,निवृत्ती महाराज शेळके,माजी सरपंच गणपत तुकाराम गवारी, गणपत मारूती गवारी,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गवारी ,  सौ. सुमन सांगडे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर सांगडे,भाऊ गवारी, दिगंबर गवारी,ज्ञानेश्वर गवारी,गणपत रुपा गवारी, काशिनाथ शेळके, तुळशिराम मुंढे, यादव तळपे,तान्हाजी लांडे, अशोक शेळके, अंकूश सांगडे,सावळेराम गवारी, पोपट सांगडे,नागेश गवारी, लक्ष्मण शेळके, रोहिदास गवारी, निव्रृत्ती भाऊ गवारी, मारुती गवारी, चंद्रकांत गवारी,सखाराम गवारी,दूंदा शेळके, युवराज शेळके, योगेश गवारी,चितांमण गवारी, लालू गवारी, गूणाबाबा गवारी,या मान्यवरांकडुन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मारूती आबा गवारी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच गावाच्या परिसरातील अन्य शाळेत असलेली सर्व मुले जूनपासून याच  ज्ञानमंदिरात आणावी असे आवाहन केले.
आदिवासी भागातील जनतेला या माजी विद्यार्थ्यांनी एक चांगला आदर्श निर्माण करुन दिला.  “डिजिटल शाळेच्या माध्यमातून शाळेच्या गुणवत्ता विकासास मदतच होणार आहे या प्रसंगी दिलेली मदत शाळेसाठी मोलाची ठरली.
.माजी विद्यार्थीकडून  भविष्यात शाळेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे निवृत्ती शेळके(मुख्याध्यापक)यांनी सांगितले.
डिजीटल शाळा व गुणवत्ता विकासासाठी विस्तार शिक्षण अधिकारी सौ.अनिता शिंदे व केंद्रप्रमूख घोटकर यांचे मार्गदर्शनाखाली ही संकल्पना राबविण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप तळपे सर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक दिलीप मूठे मानले..

स्थायी समिती अध्यक्षपदी सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड

0

पुणे -महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी निवडणुकी दरम्यान अर्ज मागे घेतल्यामुळे सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, मावळते स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शिवसेना गटनेते संजय भोसले तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडून नगरसेवक सुनील कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेविका स्मिता कोंढरे यांना संधी देण्यात आली होती.

तर स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपचे सर्वाधिक सदस्य असल्याने सुनील कांबळे यांचा विजय निश्चित मानला जात होता.

दरम्यान, आज निवडणुकीवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी पक्ष आदेशानुसार अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे सुनील कांबळे यांची स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. सुनील कांबळे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके वाजून आणि गुलाल उधळून एकच जल्लोष केला.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशी आज सकाळी फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी ही निवडणूक बिनविरोध होईल असे सांगितले. सुनील कांबळे यांच्या माध्यमातुन शहराच्या हिताचे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा बापट यांनी व्यक्त केली.

या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील कांबळे म्हणाले, “स्थायी समिती अध्यक्ष दाच्या माध्यमातुन येत्या काळात सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले जातील. तसेच शहराच्या विकासकामांना गती दिली जाईल”

* परिचय *
सुनिल ज्ञानदेव कांबळे
* शालेय जिवणापासून राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपा मध्ये सक्रीय कार्यकर्ता म्हणुन सुरुवात
* अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (१९९१-१९९५) ५ वर्षे पुर्ण वेळ संपूर्ण महाराष्ट्रभर
विद्यार्थ्याच्या विविध प्रश्नासाठी सक्रीय सहभाग
* १९९७ साली मार्केटयार्ड, आंबेडकर नगर मधुन नगरसेवक म्हणून विजयी.
* त्यानंतर २००७, २०१२, २०१७ साली चौथ्यादा नगरसेवक म्हणुन निवड.
* स्थायी समिती, शहर सुधारणा समिती, क्रिडा समिती, महिला व बाल कल्याण समिती अशा
विविध समित्यावर अभ्यासपूर्ण कार्य
* २००९-२०१० साली शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी निवड व यशस्वी कामकाज
* भाजपा अनुसुचित जाती मोर्चा, पुणे शहर अध्यक्षदी दोन वेळा निवड
* भापजा झोपडपट्टी शहराध्यक्ष म्हणून कार्य
* सध्या भारतीय जनता पार्टी पुणे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष पदी दुस-यांदा निवड
* महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या सदस्य पदी नियुक्ती (२०१९)
* स्वामी विवेकानंद व्यापारी संकुलाच्या माध्यमातुन पुणे शहरातील बेरोजगार युवकानां व्यावसायाची
संधी निर्माण करुन स्वताच्या पायावर उभे केले.
* स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पदावर कार्य,
* १९९४ पासुन अनाथ विद्यार्थ्यासाठी शिरुर (पुणे), पंढरपूर, शहापूर (ठाणे) या ठिकाणी
मोफत शिक्षण व वस्तीगृहाची निर्मिती
* जेष्ठ नागरिक शिक्षण योजने अंर्तगत गरीब विद्यार्थ्यानां दत्तक योजना सुरु केली.
* रमाबाई आंबेडकर महिला पंत संस्थेच्या माध्यमातून गरीब व गरजू महिलानां व्यवसाय निर्मीतीसाठी मदत
* देवदासी महिलानां पूनवर्सन करून मार्केटयार्ड व पुणे शहरात नोकरी व रोजगाराची संधी निर्माण करुन दिली
* महिलासाठी ९० बचत गट निर्माण केले.
* झोपडपट्टी मध्ये अठवड्यातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी.
५ मार्च २०१९ पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष पदी निवड

भाजपा रॅलीत विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा पुणेकरांचा दंड परत करा

0

पुणे : पुलावामा हल्ल्यातील शहीदांचा बदला भारताच्या वायुसेनेने घेतल्याच्या पार्श्वभूमिवर या विजय दिनाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने पुण्यातल्या आठही विधानसभा मतदार संघामध्ये दुचाकीवरुन रॅली काढली. या रॅलीत अनेक कार्यकर्त्यांनी हेल्मेट घातले नव्हते. पुण्यात पाेलीस एकीकडे हेल्मेट न घालणाऱ्यांवर कडक कारवाई करत असताना दुसरीकडे या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात न आल्याने यांच्यावर कारवाई करा अन्यथा दाेन महिन्यात सामान्य पुणेकरांकडून वसूल करण्यात आलेला विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याचा दंड परत करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे यांनी केली आहे.

14 फेब्रुवारी राेजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात काश्मीरमधील पुलवामामध्ये 40 हून अधिक सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या कारवाईच्या अनुषंगाने भाजपाने राज्यात विविध ठिकाणी दुचाकी रॅली काढली. पुण्यातही ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी हेल्मेट घातले नव्हते. पुण्यात पाेलिसांकडून कडक हेल्मेटसक्ती राबविण्यात येत असताना या रॅलीतील कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता संभाजी ब्रिगेडकडून भाजप रॅलीतील ‘विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करून दंड वसूल करण्याची मागणी केली आहे. हा दंड वसूल न केल्यास दाेन महिन्यात सामान्य पुणेकरांकडून वसूल करण्यात आलेला विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याचा दंड परत करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांवर हेल्मेट सक्तीची कार्यवाही नाही झाली आणि चौकाचौकात पुणेकरांवर हेल्मेट सक्तीचा दंड वसूल केला तर हा ‘घटनेचा व वाहतूक नियमन कायद्याचे उल्लंघन पोलीस करणार का ? असा सवालही ब्रिगेडकडून उपस्थित करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वायुसेनेची माफी मागावी-पृथ्वीराज चव्हाण

0

पुणे-पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. यानंतर पाकिस्तानला जशास तसे उत्तर वायुसेनेने दिले. मात्र जर देशाकडे राफेल विमानं असती तर निकाल वेगळा लागला असता असं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेनेच्या कामगिरीवर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे त्यांनी वायुसेनेची माफी मागावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुलवामा हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडला होता. मात्र तेव्हा पंतप्रधान भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात धन्यता मानली. तसंच या दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारकडून योग्य ती पावले उचलण्याची आवश्यकता असताना. त्या दरम्यान शहीद जवानांवरुन भाजपकडून राजकारण केले गेले आहे. आपल्या देशावर अनेक सरकारं आली पण अशा प्रकारचे शहीदांच्या मृत्यूचे राजकारण पाहण्यास मिळाले नाही आणि कोणी केले नाही, अशा शब्दात पंतप्रधानावर त्यांनी निशाणा साधला.

प्रकाश आंबेडकरानी कुरापती काढू नये : पृथ्वीराज चव्हाण
आम्ही आरएसएसवर बोलत नाही किंवा कारवाई करीत नाही हे विधान प्रकाश आंबेडकराचे चुकीचे आहे. त्यांनी जावई शोध लावू नये. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएसविरोधात दोन वेळा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रकाश आंबेडकरानी कुरापती काढू नये. अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडत. प्रकाश आंबेडकरांनी सल्ला दिला.

श्री बालाजी मंदिरात ” कल्याणोत्सव सोहळा ” उत्साहात साजरा

0

पुणे- लष्कर भागात सोलापूर बाजार येथे श्री बालाजी मंदिरात   ” कल्याणोत्सव सोहळा ” उत्साहात साजरा करण्यात आला . दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्री जगतपिता भगवान बालाजी लक्ष्मीमाता पदमावती यांचा विवाह सोहळा पार पडला . यामध्ये नवचंडीका पूजा अर्चना व होम श्री विष्णू सहस्त्रनाम हवन पूजा ,आहुती व आरती चुडा भरणे हळदी समारंभ त्यानंतर श्री जगतपिता भगवान बालाजी लक्ष्मीमाता पदमावती यांचा विवाह सोहळा पार पडला .  त्यानंतर महाआरती करण्यात आली . यावेळी भव्य रथयात्रा पुणे लष्कर भागात काढण्यात आली . तसेच प्रविण कन्नन यांचा श्री बालाजी भक्ती संगीताचा कार्यक्रम झाला . या रथयात्रा मिरवणुकीत नादब्रम्ह ढोलताशा पथक सहभागी झाले होते .  यावेळी मोठ्या संख्येने बालाजी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .

या उत्सवामध्ये श्री बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महेश रामचंद्र जेधे ,नगरसेवक विवेक यादव नगरसेवक अविनाश बागवे नगरसेवक प्रशांत जगताप  ,मन्नू कागडा व अन्य मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे आयोजन श्री बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महेश रामचंद्र जेधे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते . 

कृषी पर्यटन कार्यशाळेचे ९-१० मार्च रोजी आयोजन

0
पुणे :महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ , पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि ‘कृषी पर्यटन विश्व’  यांच्या संयुक्त विद्यमाने, दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन  ‘पराशर कृषी पर्यटन केंद्र’, राजूरी( आळेफाटा, नाशिक रोड, पुणे ) येथे करण्यात आले आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटन वृद्धीसाठी कृषी पर्यटन विश्व प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
या दोन दिवसीय कार्यशाळेत कृषी पर्यटन संकल्पना, केंद्र उभारणी, व्यवस्थापन भविष्य आणि डिजिटल मार्केटिंग, जाहिराती, सोशल मीडिया या महत्वाच्या गोष्टीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे . या कार्यशाळेसाठी सशुल्क नोंदणी 7 मार्चच्या आधी करणे आवश्यक आहे. ही कार्यशाळा दिनांक 9 आणि 10 मार्च 2019 रोजी पराशर कृषी पर्यटन केंद्र, राजूरी, आळेफाटा, नाशिक रोड, पुणे येथे  होणार आहे.
इच्छुक शेतकरी व इतर व्यावसायिक मंडळींना, कृषी पर्यटन संकल्पना समजावी. कृषी पर्यटनाची संकल्पना तसेच कृषी पर्यटन केंद्र उभारणीसाठीचे लागणारी माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. नव्याने कृषी पर्यटन केंद्र सुरू करणाऱ्या लोकांना या कार्यळाचे उपयोग नक्कीच होईल. असे कृषी पर्यटन विश्वचे संचालक गणेश चप्पलवार यांनी सांगितले.

या कार्यशाळेत  दीपक हरणे,(विभागीय अधिकारी, एमटीडीसी, पुणे विभाग),  सचिन म्हस्के (शाखा प्रबंधक, आय डी बी आय बँक,) , शशिकांत जाधव (संचालक, आमंत्रण कृषी पर्यटन ),मनोज हाडवळे,(पराशर कृषी पर्यटन), गणेश चप्पलवार (संचालक, कृषी पर्यटन विश्व पुणे)  हे या मार्गदर्शन करणार आहेत

अन खासदार काकडेंंची झाली ए वन दाढी …(व्हिडीओ)

0

पुणे:अनोखी भेट, अनोखं प्रेम हे भारतीय मतदारांकडूनच मिळू शकतंं याचा अनुभव प्रख्यात उद्योजक आणि राज्यसभा सदस्य असलेल्या खा . काकडे यांना आता जनतेत मिसळून येतो आहे . काकडे हे लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी शहर आणि परिसर पिंजून काढला . गेली ४ महिने त्यांचे हे दौरे पाहिले तर त्यांनी अनोख्या भेटी गाठी केल्यात .. असं म्हणाव लागेल .जनतेतील नेत्यांना अनेकदा आपल्या सहकाऱ्यांचं व कार्यकर्त्यांचं अनोखं प्रेम अनुभवायला मिळतं. कार्यकर्त्यांच्या या प्रेमानं नेते भावुक झालेलेही दिसतात… असं  अनोखं प्रेम खासदार संजय काकडे यांना आपल्या या तथाकथित प्रचार दौऱ्यातुन अनुभवायला मिळतंय ..रविवार पेठेतील प्रकाश राऊत यांचे’ए वन हेअर ड्रेसर्स ‘नावाचे सलून आहे. प्रकाश राऊत यांनी खासदार काकडे यांना आपल्या सलुनमध्ये दाढी  करण्याचा आग्रह केला. त्यानंतर खासदार काकडे यांनीही आढेवेढे न घेता दाढी  केली.

लोकसभेची स्वतःची उमेदवारी सर्वप्रथम घोषित करणारे आणि प्रचाराला लागलेले ते पहिले उमेदवार ठरतील असा त्यांचा आलेख या वेळी आहे . निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी जोरदार तयारी केली आहे. शहरातील व्यापारी व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या यानिमित्ताने त्यांनी भेटी घेतल्या व त्यांच्यासोबत चर्चा केली. आपण स्वत: व्यावसायिक असल्याने व्यापाऱ्यांच्या समस्या व त्यांच्यासमोरील आव्हाने यांची आपल्याला जाणीव आहे. यामुळे व्यापाऱ्यांवर कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी न लावता पारदर्शक व निकोप स्पर्धेत व्यापार व्हावा यासाठी मी सदैव व्यापाऱ्यांसोबत असेन, असा विश्वास खासदार संजय काकडे यांनी यावेळी दिला.

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून खासदार संजय काकडे पुणे लोकसभा मतदार संघातील विविध स्तरातील मान्यवरांच्या भेटी घेत आहेत. रविवार पेठेतील विविध व्यापारी, पुणे व्यापारी महासंघ व सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आदी मान्यवरांच्या त्यांनी भेटी घेतल्या. याप्रसंगी महेश तोशीवाल, गोविंद चपरवाल, लक्ष्मीकांत मणियार, कापड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उमेश झंवर, अजमानी डी एस, नानुशेठ परदेशी आणि राजु ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार फंडातून रुग्णवाहिका! 
खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिकांना साप्रस (ईस्ट) उपरुग्णालयामुळे अल्प व रास्त दरात आरोग्यासंबंधी चांगले उपचार मिळतील, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी यावेळी केले. याबरोबरच या रुग्णालयास आपल्या खासदार फंडातून रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याची माहितीही खासदार संजय काकडे यांनी यावेळी दिली. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटलअंतर्गत साप्रस (ईस्ट) खडकी नवीन उपरुग्णालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सभारंभ संपन्न झाला. यावेळी खासदार काकडे बोलत होते. याप्रसंगी संरक्षण दलाच्या दक्षिण विभागाच्या संरक्षण संपत्ती विभागाचे मुख्य संचालक एल. के. पेगु, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर एम. जे. कुमार, उपाध्यक्ष कमलेश चासकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप, नगरसेवक सुरेश दादा कांबळे, मनीष आनंद, नियुक्त सदस्य कर्नल आर. एस. सिद्धु, नगरसेवक दुर्योधन भापकर, नगरसेविका पूजा आनंद, कार्तिकी हिवरकर, नगरसेवक अभय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनींसोबत संवाद साधला.

बाउंसर ग्रुपकडून भेट व शुभेच्छा!पु

णे हे सांस्कृतिक शहर आहे. संगीत, नाटक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून शहरातील या कार्यक्रमांना सेलिब्रिटींची उपस्थिती लक्षणीय असते. यासाठी बाउंसरची आवश्यकता वाढली आणि आज पुण्यात तो एक चांगला व्यवसाय बनला आहे. ’09 बाउंसर ग्रुप’च्या सदस्यांनी खासदार काकडेंची भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचे 550 सभासद आहेत. याप्रसंगी नगरसेवक राहुल भंडारे, विशाल गायकवाड, निखील गाडे, अभिजित उकंडे व 09 बाउंसर ग्रुपचे सभासद उपस्थित होते.

सिंधी समाजाचा वधू-वर मेळावा

0
पुणे : सिंधू सेवा दल आणि भारतीय सिंधू सभा यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधी समाजातील विवाहेच्छूकांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. रविवार, दि. १७ मार्च २०१९ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० या वेळेत पुणे कॅम्पातील अल्पबचत भवन येथे हा वधू-वर मेळावा होणार आहे, अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी व भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष ज्ञान पंजाबी यांनी दिली. सचिन तलरेजा, विजय दासवानी, सुरेश जेठवानी, परमानंद भटिजा, पुरुषोत्तम परयानी, रेश्मा खियानी आदी उपस्थित होते.
 
एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार हा सिंधी समाजाचा पाचवा वधू-वर मेळावा असून, त्यासाठी देशभरातून सिंधी समाजातील विवाहेच्छूकांचा या प्रतिसाद मिळतो. समाजातील इच्छूक तरुण-तरुणींना एकमेकांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, परस्पर परिचय वाढावा व विवाहाच्या निर्णय प्रक्रियेला गती मिळावी, या उद्देशाने हा मेळावा आयोजिला जातो. या मेळाव्यासाठी इच्छूकांनी १० मार्च २०१९ पर्यंत बायोडेटा, फोटो व कुंडली देणे आवश्यक आहे. या मेळाव्याच्या नावनोंदणीसाठी सिंधू सेवा दल (०२०-२६३३३१५९), भारतीय सिंधू सभा (०२०-२६१४०४६६) यांचे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रत्येक शिधापत्रिका धारकाला अन्न धान्य देण्यासाठी शासन कटिबध्द -पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे,- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रभावी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमुळे लाभार्थींना अन्न धान्य, गॅस, रॉकेल, मीठ यांचे वितरण अधिक कार्यक्षमतेने व पारदर्शकतेने होत आहे. प्रत्येक शिधापत्रिका धारकाला अन्न धान्य देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मत अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण, अन्न वऔषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

 येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सील हॉलमध्ये  अन्न धान्य वितरण विभागाच्या ई-पॉस पावती आधारित लॉटरी सोडत पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रम पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार मेधा कुलकर्णी, चंद्रकांता सोनकांबळे, ॲड. विवेक चव्हाण, चिंतामणी जोशी,  पुरवठा उपआयुक्त निलीमा धायगुडे, अन्न धान्य वितरण  अधिकारी अस्मिता मोरे आदी उपस्थित होते.

  श्री. बापट पुढे म्हणाले की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ग्राहकांचा सहभाग वाढविण्यासाठी रेशन ग्राहकांसाठी आता ई-पॉस पावती आधारित बक्षीस योजना सुरु करण्यात आली आहे. रेशनवरील अन्न धान्य घेतल्यानंतर मिळणाऱ्या ई-पॉसच्या पावतीच्या क्रमांकातून दर महिन्याला लकी  ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यातील विजेत्या ग्राहकांना वस्तू स्वरुपात बक्षीस देण्यात येणार आहे. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची बायोमेट्रीक ओळख पटवून ई-पॉसव्दारेअन्न धान्याचे वितरण केले जाते त्यावेळी लाभार्थ्यांना पावती दिली जाते. याबाबत मोठया प्रमाणात जागृकता व्हावी. ग्राहकांना पावती घ्यावयाची सवय लागावी. त्यातून दुकानदारांना ग्राहकाला पावती देणे बंधनकारक व्हावे या हेतुने जिल्हास्तरावर ही नावीन्यपूर्ण बक्षीस योजना राबविण्याचा आपण निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र व्दारे संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. ई- पॉसव्दारे निघणाऱ्या पावतीतून या प्रणालीव्दरे एक क्रमांक निवडण्यात येऊन या योजनेअंतर्गत प्रत्येक रेशन दुकानातून एक, प्रत्येक तालुक्यातून एक, प्रत्येक जिल्हयातून एक लाभार्थी आणि जिल्हयातून एक दुकानदार दरमहा निवडला जावून बक्षीस दिले जाणार आहे.

रॉकेल विक्रेत्यांच्या कमीशनमध्ये  ४५० रु. वरुन आता ६७५ रु. प्रति किलो लिटर इतकी वाढ करण्यात आली आहे. राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी वाढविण्याचाही निर्णय घेतला आहे. दुकानदारांचेही कमिशन ७० वरुन १५० वर करण्यात आले आहे. ग्राहकांनाही ऑनलाईनव्दारे पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.  पाहिजे त्या सोयी सुविधा रेशन दुकानदारांना  पुरवल्या जातील. चांगले काम करणाराचे कौतुक झालेच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

  आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, अन्न धान्य वितरण विभाग चांगले काम करत आहे. या विभागाकडून अन्न धान्य वितरण करतांना खऱ्या गरजु लाभार्थ्यांपर्यंत वितरण होत असल्याने प्रत्येक लाभार्थ्यांच्या  घरांमध्ये धान्य पोहचवू लागले आहे. हा चांगला उपक्रम आहे असेही त्या  म्हणाल्या.

 यावेळी  पालकमंत्री  गिरीश बापट यांच्या हस्ते  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागीय तांत्रिक अधिकारी,परिमंडळ अधिकारी, पुरवठा निरीक्षक, स्वस्त धान्य दुकानदार यांना प्रशस्तीपत्रक वाटप, प्रथम क्रमांक इलेक्ट्रीकल दुचाकी ११ परिमंडळ कार्यालयाचे ११ लाभार्थीं, व्दितीय क्रमांक प्रेशर कुकर ११ परिमंडळ कार्यालयाचे ११ लाभार्थी यांना वितरण करण्यात आले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरवठा उपआयुक्त निलीमा धायगुडे यांनी  केले तर  अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

गच्ची- लेखिका :पूर्णिमा नार्वेकर

0

‘माय डिअर गच्ची, लहानपणापासून पतंग उडवायला आणि चांदणं बघायला मी गच्चीवर यायचे.’ गच्ची  सिनेमातील प्रिया बापटचे हे वाक्य आणि हा सिनेमाही  गच्चीबद्दल खूप काही सांगून जातो. चाळ-बिल्डिंग संस्कृतीत ज्यांचा जन्म झाला आला आहे त्यांना नक्कीच हे पटेल, कारण त्यांनी हे अनुभवलं असणार. दादरला आमच्या ‘ए’ विंगच्या बिल्डिंगला चौथ्या मजल्यावरती मोठी गच्ची होती. संक्रांत जवळ आली की त्या गच्चीत आम्ही पतंग उडवायला जात असू. ती गच्ची उंचावर आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये असल्या कारणाने आजी पाठवायची नाही. फक्त पतंगीच्या सिझनला सूट असायची कारण तेव्हा आमच्याबरोबर घरातील कोणीतरी मोठी माणसे बरोबर असायची.

आमच्या ‘सी’ विंगला काही गच्ची नव्हती, याचं खूप वाईट वाटायचं. पण बाजूला माझ्या आजोळी म्हणजे’इलम महाल’ बिल्डिंगला मात्र प्रत्येक माळ्यावर गच्ची होती, मला याचं खूपच अप्रूप होतं. आमच्या घराची खिडकी आणि बाजूच्या बिल्डिंगची गच्ची समोरासमोर होती. खिडकीतून मी त्या गच्चीतल्या गमतीजमती अनुभवायचे. सकाळी काही मंडळी पेपर वाचायला यायचे, तर काही कोवळी उन्हं अंगावर घ्यायला. अकरानंतर उन्हं आली की वाळवणं किंवा कपडे सुकत घातले जायचे. संध्याकाळी मुले खेळत असायची, तर कुणी अभ्यासही करत असायचे. रात्री बरेच जण गच्चीत आकाशातील तारे बघत शांत झोपायचे. माझे आजोबा (आईचे वडील) सकाळी आणि संध्याकाळी नेमाने आमची चौकशी करायला गच्चीत येऊन आम्हाला हाक मारायचे. हा त्यांचा नेम ते हयात असेपर्यंत कधीही चुकल्याचे मला तरी आठवत नाही. आमच्या घरी किंवा आईच्या माहेरी काही खास पदार्थ केला की त्याची देवाणघेवाण काठीला पिशवीत डबा घालून व्हायची (आमची खिडकी आणि आजोबांची गच्ची यातील अंतर इतके कमी होते!). आम्ही बहीण-भाऊही गच्चीत खेळण्यासाठी जात असू. मे महिन्याच्या सुट्टीत खास करून…कारण आजी आम्हाला खिडकीतून पाहू शकत होती; त्यामुळे तीही आजोळी खेळायला पाठवायची. मी,नीतामावशी, भावनामावशी आणि त्यांच्या मैत्रिणी खूप खेळायचो. रात्री झोपायला सुद्धा मी जायचे. कारण गच्चीत झोपायला मिळणार म्हणून. चिक्कार गप्पा मारायचो आणि खिदळायचो. मग आजोबा चिडायचे आणि म्हणायचे, “किती हसता तुम्ही फिदीफिदी. झोपा आता. आजूबाजूला लोक झोपलेत…त्यांची झोप मोडायची.” चांदणं बघत बघत कधी शांत झोप लागायची ते कळायचंही नाही. (गच्चीतल्या चांदण्या रात्रीचा अनुभव आम्ही गेल्या वर्षी तबला कार्यशाळेतील मुलांना दिला. गच्चीत बसून गप्पा मारणे, चांदणे अनुभवत शांत झोपणे यातील मजा बोर्डीला जयेशभाईंच्या बंगल्यातल्या गच्चीवर मुलांनी अनुभवली.)

दहा बाय दहाच्या खोल्या, त्यात माणसं मात्र खोलीच्या आकारमानापेक्षा जास्त. मग अशावेळी ही गच्ची खूपच जवळची आणि आपली वाटायची. घरात काही प्रसंग किंवा कार्य असले की गच्चीत मांडव घालून ते पार पडायचे. हा अनुभव गच्चीचा सहवास अनुभवलेल्या सर्वांचाच असेल. घरात काही भांडण झालं तरी मनसोक्त रडण्यासाठीही गच्चीचा कोपराच जवळचा वाटायचा.  जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी ही गच्ची सगळ्यांना जवळची वाटायची.

कालांतराने चाळ संस्कृती जाऊन मोठमोठे टोलेजंग टॉवर बांधले जाऊ लागले. गच्चीचे आधुनिक बारसे झाले ‘टेरेस’!  हा टेरेस आता सर्वांत वरती. त्याचा उपयोगही मोठाल्या पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी,डिश अँटेना बसविण्यासाठी होऊ लागला. कधी तरी थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन होऊ लागले. त्या टेरेसला गच्चीची सर मात्र नाही. मन मोकळं करून, मनसोक्त रडून पुढं लढायला उभं करणारी गच्ची…या टेरेसचा उपयोग मात्र हताश झालेल्या मनाला आत्महत्या करण्यासाठी म्हणून काहींनी करून घेतला. अशा प्रसंगाने टेरेसबद्दल आपुलकी वाटण्यापेक्षा भय जास्त वाटू लागले. टेरेसशी आपलेपणाचे नाते नाही जोडले गेले. गच्ची ती गच्चीच…

‘से द बँड’चे गच्ची वरून… हे गाणे खासच आहे, गच्चीच्या सहवासाचे आणि आठवणींचे. ते गाणे ऐकले की मन परत गच्चीची सफर करून येतं आणि ताजंतवानं होतं. आहेच मुळात ही गच्ची जवळची!

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068