Home Blog Page 2977

खा. संजय काकडेंनी संभाजी ब्रिगेड कडून पुणे लोकसभा लढवावी…संतोष शिंदे

0

पुणे-खासदार संजय काकडे यांची फरफट पाहवत नाही त्यांनी आता संभाजी ब्रिगेड ची उमेदवारी स्वीकारून पुणे लोकसभा लढवावी असे जाहीर आवाहन संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी केले आहे .

या संदर्भात शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि ,संभाजी ब्रिगेड पुणे लोकसभा निवडणूक लढवणार आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी संभाजी ब्रिगेड’चा जिल्हाध्यक्ष म्हणून मी (संतोष शिंदे) इच्छुक आहे. सामान्य लोकांच्या, प्रत्येक नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आजपर्यंत आम्ही लढत आलो आहोत. आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यसत्ये शिवाय पर्याय नाही. म्हणून संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे व संसदेवर संभाजी ब्रिगेडचा ‘भगवा’ फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही. संभाजी ब्रिगेड साठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे. परंतु संभाजी ब्रिगेडच्या वतीने अजून ‘अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही.’ आणि मी निवडणूक लढणार आहे. व भल्याभल्यांची झोप आम्ही उडवणार आहोत.

खासदार  संजय काकडे  यांची उमेदवारीसाठी वेगवेगळ्या पक्षांकडे रोज मागणी सुरू आहे. परंतु काकडे यांची होणारी फरपट पाहवत नाही भाजपला मा. संजय काकडे यांची किंमत नाही, आणि काँग्रेस संजय काकडे यांना स्वीकारायला तयार नाही. याचा अर्थ संजय काकडेंनी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ‘संभाजी ब्रिगेड’ मध्ये सहभागी व्हावं आणि कर्तुत्वान खा. संजय काकडेंनी ‘संभाजी ब्रिगेड’ कडून लोकसभा निवडणूक लढवावी. संजय काकडे यांच्यासाठी मी निवडणुकीतून एक पाऊल मागे घेऊन  काकडे यांसाठी पुणे लोकसभेची जागा सोडायला तयार आहे. मा. संजय काकडे साहेबांना ‘संभाजी ब्रिगेड’ कडून उमेदवारी मिळण्यासाठी ‘संभाजी ब्रिगेड’ची संपूर्ण निष्ठावंत ताकत मा. काकडे साहेबांच्या पाठीशी उभी करायला तयार आहे. ‘संभाजी ब्रिगेड’ आजपर्यंत मराठा – बहुजन समाजाचे प्रबोधन करत व लाखो मराठा-बहुजन समाज चळवळीच्या रूपाने एकत्र करण्याचा प्रयत्न केला. समाजाच्या न्याय्य हक्कासाठी ब्रिगेड लढत, भांडत, जोडत आली म्हणून संभाजी ब्रिगेडची विचारधारा सर्वांना मान्य आहे. ही विचारांची ताकद व केडरबेस संघटन खा. संजय काकडे यांच्या पाठीशी उभी राहिली तर खा. संजय काकडे यांच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडची ‘भगवी पताका’ संसदेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी आम्ही ‘रक्ताचं पाणी करुन…’ संजय काकडे यांच्या पाठीशी उभा राहिला तयार आहे. व माझी उमेदवारी ‘मी’ त्यांना द्यायला तयार आहे. खा संजय काकडे साहेबांनी संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडचा विचार करून लोकसभेची तयारी करावी व आपली फरफट थांबवावी एवढीच मागणी आहे. खा काकडेंसाठी संभाजी ब्रिगेड एकजुटीने लढायला तयार आहे. त्यांनी विचार करावा.असे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे .

खासदार काकडेंं भवतीच पुणे लोकसभेचे राजकारण – भाजप आणि कॉंग्रेस दोन्हीकडे काकडेंंचीच चर्चा

0

पुणे-एकीकडे दिल्लीत पुण्याच्या उमेदवारीबाबत काकडे यांच्या नावावर चर्चा होत असताना ,दुसरीकडे उद्या दुपारी पुण्यात खासदार संजय काकडे यांच्या स्वागताची तयारी कॉंग्रेस मध्ये सुरु असताना आज सायंकाळी काकडे यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आणि काकडे भाजप मध्ये राहणार कि कॉंग्रेस मध्ये जाणार या संदर्भात चर्चेला उत आला .एवढेच नव्हे तर संभाजी ब्रिगेड ने हि काकडे यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली .

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारी पूर्ण  होताच, भाजपकडून त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांचे व्याही सुभाष देशमुख यांनी मध्यस्थी केली आहे. आज सायंकाळी संजय काकडे, सुभाष देशमुख यांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर बैठक झाली .

खासदार काकडे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी प्रचंड मेहनत घेतली होती. भाजपचे नगरसेवक मोठया प्रमाणावर निवडून आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासुन त्यांचा भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून सन्मान राखला जात नव्हता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्पना देखील दिली होती. मात्र  त्यावर कार्यवाही न झाल्यामुळे अखेर खासदार संजय काकडे यांनी   काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.आणि कॉंग्रेस मधूनच लोकसभा लढविण्याच्या मार्गावर ते राहिले यानंतर आज संजय काकडे यांची मनधरणी करण्यासाठी सुभाष देशमुख यांनी मध्यस्थी केली आहे. आज या तिघांमध्ये वर्षा बंगल्यावर चर्चा झाली .

एकंदरीत पुण्याच्या लोकसभेचे राजकारण कॉंग्रेस सह भाजप मध्ये हि काकडे यांच्याभवती फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यात आता संभाजी ब्रिगेड ने देखील त्यांना उमेदवारी देण्याची तयारी जाहीर केली .शरद पवार यांच्या राजकीय चाणक्यनीती मध्ये काकडे यांची फरफट होते आहे कि काय ? असा प्रश्न या पार्श्वभूमीवर सामिक्षकांमध्ये उपस्थित होत होता . एकीकडे मी माढा लढविणार नाही म्हणणारे शरद पवार  पुण्यातून स्वतः लढू इच्छितात कि काय ? काकडे यांना बारामती ची ऑफर देवून भाजपने त्यांना बळी चा बकरा बनविण्याचे ठरविले काय ? अशा विविध प्रश्नांवर चर्चा झडत होती .पण प्रत्यक्षात पुण्याच्या राजकारणात पुढे काय होणार आहे ते येत्या थोड्याच दिवसात स्पष्ट हि होणारच आहे .

नृत्यामुळे जीवनाला लय ताल प्राप्त होते :सौ. दीपा श्रीराम लागू

0
पुणे :शिवांजली डान्स अकॅडमीचा 10 वा वर्धापनदिन  जेष्ठ अभिनेत्री सौ. दीपा श्रीराम लागू आणि सीड इन्फोटेकच्या संचालिका सौ. भारती  बर्‍हाटे यांच्या उपस्थितीत टिळक स्मारक मंदिर येथे 10 मार्च 2019 रोजी साजरा करण्यात आला.
अनुजा बाठे यांच्या नृत्य दिग्दर्शित ” हरी -हर” ही संकल्पना 30 विद्यार्थ्यानी सादर केली.’हरी’ हा पालनकर्ता तर ‘हर’ हा संहारकर्ता  अश्या विरोधाभासी रचना प्रस्तुत करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या वेळी सौ. दीपा लागू यांचे  नृत्यामध्ये करियर  यावरील संवाद आणि भारती  बर्‍हाटेचे म्युझिक थेरपी वरचे संवाद विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरले.
पूर्वार्धात अभंग तर उत्तरार्धात अडू पामबे या रचनांना प्रेक्षकांची उस्फूर्त दाद मिळाली.
या वर्षीचा’ स्टुडंट ऑफ द इयर’ चा पुरस्कार दर्शना पासकंठी आणि शुभवि जोशी हिला देण्यात आला.शिवांजली डान्स अकॅडमीचे विश्वस्त श्री. सुहास बाठे, सौ. मीनल बाठे,सचिव अभिजीत बाठे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन श्रुती कुलकर्णी यांनी केले.

प्लास्टिक, ई -वेस्ट निवारण कृती अभियान ‘ चा कृती कार्यक्रम जाहीर

0
प्लास्टिक उत्पादक ,वापरकर्ता ,संस्था ,उद्योग आणि सरकारी प्रयत्नांचे सुसूत्रीकरण करणार 
पुणे :’प्लास्टिक, ई -वेस्ट निवारण कृती अभियान ‘  चा कृती कार्यक्रम आज पत्रकार परिषदेत  जाहीर करण्यात आला .  प्लास्टिक उत्पादक ,वापरकर्ता ,सामाजिक संस्था ,उद्योगांच्या सीएसआर योजना   आणि सरकारी प्रयत्नांचे सुसूत्रीकरण करणार असल्याची आणि दूरगामी कामातून  प्लास्टिक कचरा समस्येवर उपयोगी ठरणारे नवे प्रारूप (मॉडेल ) उभारणार असल्याचे माहिती या वेळी देण्यात आली .
सामाजिक संस्था -कार्यकर्त्यांच्या  या मंचातर्फे कचरा ,प्लास्टिक समस्येवर कृती कार्यक्रम जाहीर करण्यासाठी  पुणे श्रमिक पत्रकार संघात  सोमवार  दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .
अनंत घरत  (‘माय अर्थ’ ) , ललीत राठी (  कचरा व्यवस्थापन  तज्ज्ञ ),नीलेश इनामदार (‘एन्व्हायरॉन्मेंटल क्लब ऑफ इंडिया) ,संध्या बोमण्णा (भरारी प्रतिष्ठान) ,सचिन निवंगुणे (रिटेल व्यापारी असोसिएशन ),दत्तात्रय देवळे (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अधिकारी )अशा अनेक संस्थांचे प्रतिनिधी  या पत्रकार परिषदेला उपस्थित होते . प्लास्टिक संकलन ते प्रक्रिया ,उत्पादक -संकलक ते उपभोक्ता अशी प्लास्टिक कचरा विषयक साखळीमध्ये सूत्रबद्ध काम करण्याचे नियोजन या मंचाने केले आहे .
या सर्व कृती कार्यक्रमात प्रशिक्षण,जनजागृतीवर देखील भर देण्यात येणार असून  महिला बचत गट ,मंडळे ,सामाजिक संस्था ,सोसायट्याना बरोबर घेण्यात येणार आहे .प्रशिक्षण ,जनजागृतीसाठी विविध माध्यमे ,साधनांची निर्मिती या मंचाद्वारे केली जाणार आहे .  पहिला प्रशिक्षण कार्यक्रम १६ मार्च रोजी इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र (दत्तवाडी ) येथे होणार आहे ,तर १ मे कामगार दिनी कचरावेचक ,स्वच्छतासेवकांचा सन्मान करण्यासाठी ‘पर्यावरण रक्षक दिन ‘ साजरा केला जाणार आहे .
टाकाऊ प्लास्टिक ला हमीभाव देण्याचा भारतातील पहिला  प्रयत्न या मंचाद्वारे केला जाणार आहे ,अशी घोषणाही या पत्रकार परिषदेत करण्यात आली . हमीभाव मिळाल्यास प्लास्टिक वर्गीकरण आणि संकलन करणाऱ्या स्वच्छता सेवकांना प्रोत्साहन मिळणार आहे .

आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी- जिल्‍हाधिकारी राम

0

पुणे- निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होणार असून कोणीही आचार संहितेचा भंग करु नये, असे स्‍पष्‍ट निर्देश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात कार्यालय प्रमुखांची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. त्‍यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून म्‍हणजेच 10 मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचार संहिता म्‍हणजे काय याची सर्वांना माहिती आहे,तथापि, अनावधानाने आचार संहितेचा भंग होऊ शकतो, त्‍यामुळे कोणीही चुकूनही आचार संहितेचा भंग होणार नाही, यासाठी काळजी घ्‍यावी. शासकीय कार्यालय प्रमुखांनीही त्‍याबाबत दक्ष रहावे. आचार संहितेच्‍या काळात काय करु नये आणि काय करावे, याबाबत सादरीकरण करण्‍यात आले. एखाद्या मुद्याबाबत शंका असल्‍यास जिल्‍हा निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधून निराकरण करुन घ्‍यावे, असेही राम यांनी सांगितले.

पार्थ पवार लोकसभेच्या रिंगणात – शरद पवारांचे संकेत

0

पुणे,-

शरद पवारांनी माढ्यातून आपण लाधनार नसल्याचे स्पष्ट करत, दुसरीकडे पार्थ पवार यांच्या उमेदवारी चे संकेत दिले आहेत.

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडीबाबत भूमिका स्पष्ट केली. तसेच, उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्याबाबतही मत स्पष्ट केले. तसेच, माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार नसल्याचे एकप्रकारे मान्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची अन् कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केली नाही. तसेच नव्या पिढीला संधी देण्यासाठी मी निवडणूक न लढण्याचा विचार आमच्या कुटूंबीयात झाल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशा बातम्या राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. विशेष म्हणजे खुद्द शरद पवार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र, निवडणुकांची घोषणा होताच पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली उमेदवारी अद्याप निश्चित नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, आम्हा कुटुंबीयांचेही निवडणूक लढविण्याबाबत काही निर्णय झाले आहेत. त्यानुसार, मी निवडणूक लढविण्याऐवजी नव्या पिढीला संधी द्यावी, अशी भूमिका माझ्या कुटुंबीयांची आहे. त्यामुळे, पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी नेते आग्रही आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन मी निवडणूक न लढवण्याचा विचार करत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, पवार कुटुंबीयांतून सुप्रिया आणि मी दोघेच लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात होतो. पण, यापुढे सुप्रिया आणि पार्थ हे लोकसभेच्या रिंगणात असतील, असेही पवार यांनी सांगितले. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पवार हे देशाचे नेते असून देशभर प्रचाराची जबाबदारी लक्षात घेता, निवडणूक न लढवण्याचा निश्चित झाले आहे.

‘कोथरूड भूषण’ सागर खळदकरला पालिकेचा ‘क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’ प्रदान

0

पुणे :’कोथरूड भूषण’ पुरस्कार विजेते कबड्डी प्रशिक्षक सागर खळदकर यांना पुणे महानगरपालिकेचा ‘कै. बाबुराव दगडू गायकवाड क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’ प्रदान. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते गौरविण्यात आले, अशी माहिती ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’चे संस्थापक राहुल म्हस्के आणि अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी पत्रकाद्वारे दिली.

हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम नुकताच कोथरूड क्षेत्रीय कार्यालय येथे पार पडला.

गेल्या ५ वर्षांपासून कोथरूडमधील कला, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या गुणवंताना ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’च्या वतीने ‘कोथरूड भूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात येते. शहरातील कोथरूड परिसरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे आपल्या कलेच्या माध्यमातून भविष्यात उभारी घेणाऱ्यांना मदत होते, अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक राहुल म्हस्के यांनी दिली.

‘क्रीडा क्षेत्रात कार्य करत असलेल्या कार्याची दखल घेत ‘कोथरूड भूषण’ पुरस्कार मिळाला. अपंगत्व येऊनही पाच शाळांमध्ये या पुरस्कारामुळे कबड्डी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. माझ्या या कामाची दखल घेऊन पालिकेचा हा सन्मान देखील मिळाला आहे. ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’चा, राहुल म्हस्के आणि गिरीश गुरनानी यांचा मी ऋणी आहे. समाजात काहीतरी करू इच्छिणाऱ्या, परिस्थितीशी झगडणाऱ्या गुणवंत, कलावंताना ट्रस्ट पुरस्कार देते हे अभिमानास्पद कार्य आहे, ‘ अशी प्रतिक्रिया सागर खळदकर यांनी दिली.

‘सागर खळदकर या आंतरराष्ट्रीय व महाराष्ट्र स्तरीय कब्बडीपटू ला काही कारणाने अपघात होऊन पॅरालिसिससारख्या आजाराने जखडले. परंतु, खचून न जाता परीस्थितीवर मात करून आपल्यातील खेळाडूची कला इतरांना देण्याचे प्रशिक्षण सुरु केले. भारती विद्यापीठ मधील अभिजितदादा कदम कब्बडी संघाला प्रशिक्षण दिले. जिल्हा, राज्य,विद्यापीठ स्तारावर उत्तम कामगिरी करणारे खेळाडू घडवले. त्याच्या प्रशिक्षणामुळे काही खेळाडूंची आर्मी, पोलीस क्षेत्रात निवड झाली. आपले काम जिद्दीने पुढे नेऊन खेळाडू घडविण्याचे मोलाचे कार्य तो करीत आहे. या त्याच्या कामगिरीसाठी २०१८ मध्ये त्याला ‘कोथरूड भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.’

अक्षयाआनंद ला “इंडियन बिजनेस आयकॉन अवार्ड

0

बंगलोर मध्ये बॉलीवूड अभिनेत्री तनाज इराणी यांच्या हस्ते मिळाला पुरस्कार

बंगलोर: एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व त्यांच्या पत्नी अक्षया यांना २०१९ या वर्षाचा “इंडियन बिजनेस आयकॉन अवार्ड” देण्यात आला. “बेस्ट कपल इमर्जिंग बिजनेसमन” या कॅटॅगिरीमध्ये दोघांना हा पुरस्कार दिला गेला. आनंद व अक्षया यांच्या “360 एक्सप्लोरर, द लिमिटलेस यु व इन्फिनिटी” या त्यांच्या स्टार्टअप साठी त्यांना हे पुरस्कार मिळाले आहेत. बंगलोर येथील हॉटेल लीला पॅलेस येथे बॉलीवूड अभिनेत्री तनाज इराणी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला गेला. दर वर्षी उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या देशातील उद्योजकांना हा पुरस्कार दिला जातो.

यावेळी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी भाषण करताना गेल्या ३ वर्षातील आपला संघर्ष सांगितला. यावेळी संपूर्ण भारतातून अनेक मोठ-मोठे उद्योजक या कार्यक्रमासाठी आले होते.

अक्षया व आनंद यांना अवार्ड मिळाल्यावर त्यांचा २०१५ मधला एक फोटो व्हायरल झाला आहे. मणक्याच्या आजाराने ग्रस्त हॉस्पिटलमध्ये मध्ये अॅडमिट असताना अक्षया सोबतचा सेल्फी व बाजूला हा अवार्डचा फोटो असे ३ वर्षापूर्वीच्या परिस्थीतीची तुलना करणारे या फोटोवर “प्रेम सर्व सकारात्मकपणे सर्व बदलू शकते” या कॅप्शनखाली हा फोटो व्हायरल झाला आहे.

“हा अवार्ड मिळाल्यामुळे अतिशय आनंद झाला आहे. २०१५ मध्ये आनंद आजारपणात झोपून होते. नुकतेच आमचे लग्नही झाले होते. ३ वर्ष मेहनत करून आम्ही परिस्थिती सुधारली आहे. अजून खूप पुढे जायचे आहे. आता सुरवात केली आहे.”

अक्षया बनसोडे ( उद्योजिका)

अकरावी,बारावीची वर्षेच घडवितात करिअर -चाटे सर (व्हिडीओ)

0
पुणे-दहावी झाली म्हणजे सारे काही झाले असे उसासे टाकू नका ,त्यापुढेच खरी स्पर्धा आणि खरे शिक्षण सुरु होते .अकरावी आणि बारावीची वर्षेच विद्यार्थ्याचे करिअर घडवितात त्यामुळे या दोन वर्षांवर विद्यार्थ्यांसह पालकांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मत चाटे शिक्षण समुहाचे पुण्यातील संचालक प्रा. फुलचंद चाटे यांनी व्यक्त केले आहे .
‘मायमराठी ‘च्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालक यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करावे या हेतूने चाटे सर वेळोवेळी आपली मते मांडत आले आहेत .आज ‘माय मराठी ‘शी बोलताना ते म्हणाले ,’दहावीनंतर महाराष्ट्रात मोठा ड्रॉ बॅक दिसतो .या परीक्षेनंतर मोठ ओझ उतरलं असे समजणारे विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने आहेत . पण दहावीनंतरच खरी स्पर्धा आणि शिक्षण सुरु होते .अकरावी बारावी ची दोन वर्षे विद्यार्थ्याचे करिअर घडवितात .पण काही जन कॉलेज लाईफ एन्जॉय करण्याच्या मूड मध्ये असतात तर काही पदवीधर होऊनंतर पाहू च्या मूड मध्ये असतात .सायन्स शाखेतून विद्याथी प्रत्येक क्षेत्रात जाऊ शकतो .आणि ज्याच्याकडे सक्सेस आहे त्याच्याकडेच जग पाहते .त्याचंच कौतुक होते .परीक्षेत शहरी किंवा ग्रामीण असा भेद नसतो .१ मार्कचे महत्व तेव्हा कळते जेव्हा एका मार्कावरून प्रवेश नाकारला जातो .आणि याच काळात विद्यार्थ्याचं करिअरच्या दृष्टीने संगोपन हा भारतातील पालकांपुढे असलेला मोठा प्रश्न असतो . आपल्या पाल्याला अनावश्यक गोष्टी किंवा करिअरला बाधा निर्माण करतील अशा गोष्टीकडून दूर ठेवणे हा खरा प्रश्न असतो .अशातच महाराष्ट्रातील ३०० ते ३५० इंजीनिअरिंग कॉलेजेस केवळ बेरोजगारांची फौज बाहेर काढण्याचे काम करीत आहेत .बेरोजगारांच्या रांगेत उन्भे करणारे शिक्षण घेवू नका त्या एवजी डिग्री हाती पडताच जॉब तुमच्याकडे चालत येईल असे शिक्षण घेणे आज गरजेचे आहे या सर्व अनुषंगाने आम्ही चाटे ज्युनिअर कॉलेज ची रचना केली आहे असे ते म्हणाले …पहा आणि ऐका ..नेमके चाटे सर नेमके काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात …..

पुणे, बारामतीत २३ एप्रिलला मतदान :लोकसभा निवडणूक

0

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या आहेत. यंदा ७ टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुका या ९ टप्प्यांमध्ये घेण्यात आल्या होत्या. ११ एप्रिल, १८ एप्रिल, २३ एप्रिल, २९ एप्रिल, ६ मे, १२ मे आणि १९ मे या ७ टप्प्यांमध्ये देशभरात निवडणुका होतील. तर २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील. पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले,जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड येथे २३ एप्रिलला मतदान होणार आहे .

लोकसभा निवडणुकीच्या ७ टप्प्यांपैकी पहिल्या ४ टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ जागांसाठीचं मतदान होईल. महाराष्ट्रात ११ एप्रिलला ७ मतदारसंघात, १८ एप्रिलला १० मतदारसंघात, २३ एप्रिलला १४ मतदारसंघात आणि २९ एप्रिलला १७ मतदारसंघात मतदान होईल.

पहिला टप्पा- ११ एप्रिल- ७ मतदारसंघ

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम

दुसरा टप्पा- १८ एप्रिल- १० मतदारसंघ

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

तिसरा टप्पा- २३ एप्रिल- १४ मतदारसंघ

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा- २९ एप्रिल- १७ मतदारसंघ

नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, दक्षिण मुंबई, मावळ, शिरुर, शिर्डी

निवडणूक आचारसंहिता म्हणजे नेमके काय?

0

निवडणूक आचारसंहिता निवडणूक आयोगाने लागू केलेले काही ठराविक नियम असतात. जे प्रत्येक राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पाळावेच लागतात. निवडणुकीच्या काळात लागू केलेले निर्देश आणि नियमांना आचारसंहिता असे म्हटले जाते. एखाद्या उमेदवाराने याचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाला त्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे. उमेदवाराच्या विरोधात एफआयआर दाखल केला जाऊ शकतो. त्याला निवडणूक लढवण्यास रोखले जाऊ शकते. दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास तुरुंगवास देखील होऊ शकतो. निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू केली जात असते. सरकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतात. ते आयोगासोबत राहून त्यांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करतात.

आचार संहिता लागू झाल्यानंतर होत नाहीत ही कामे…
> आचार संहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची नवीन घोषणा करता येत नाही.
> कुठल्याही योजना किंवा इमारतीचे अनावरण, लोकार्पण किंवा भूमिपूजन केले जाऊ शकत नाही.
> सरकारी खर्चातून असे एकही काम केले जाऊ शकत नाही, ज्यातून कुठल्याही राजकीय पक्षाला फायदा होईल.
> धार्मिक स्थळांचा वापर निवडणुकीच्या प्रचाराचे मंच म्हणून करता येत नाही.
> मंत्र्यांना शासकीय दौऱ्यांच्या वेळी निवडणुकीचा प्रचार करता येत नाही.
> कुठल्याही मंत्र्यास प्रचारासाठी सरकारी वाहन, विमान किंवा इतर वस्तूंचा वापर करता येत नाही.
> मतदान केंद्रांवर विनाकारण गर्दी जमवता येणार नाही.
> उमेदवार, राजकीय पक्षांना सभा, संमेलन किंवा रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
> सरकारी बंगला किंवा सरकारी पैशांचा वापर प्रचारासाठी करता येणार नाही.
> राजकीय पक्षांना कुठरल्याही कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी पोलिसांना कळवणे आवश्य आहे.
> कुठल्याही व्यक्तीकडे 50 हजारांपेक्षा अधिक रोकड किंवा 10 हजार रुपयांपेक्षा अधिकचे गिफ्ट सामुग्री सापडल्यास कारवाई केली जाऊ शकते.
> या काळात कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बदली करता येत नाही. अत्यावश्यक असल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल.
> मंत्री सरकारी खर्चावर होणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिथी म्हणून सहभागी होऊ शकत नाहीत.

लोकसभा निवडणुक-देशात 7 तर महाराष्ट्रात 4 टप्प्यांत मतदान, 23 मे रोजी निकाल

0

निवडणूक आयोगाकडून देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीचा पहिल्या टप्प्याला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार आहे. 11 एप्रिल ते 19 मे पर्यंत मतदान पार पडणार आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत औपचारिक माहिती देण्यात आली. या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांनी सविस्तर माहिती दिली. तारखांसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विविध मतदार संघ, राज्यांचे दौरे केले. शाळा, महाविद्यालयांच्या आणि बोर्डाच्या परीक्षा, सुट्ट्या, उत्सव या सर्वच गोष्टींचा अभ्यास करण्यात आला. असेही मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. सोबतच, मतदारांना यावेळी नोटाचा अधिकार सुद्धा वापरता येईल.

महाराष्ट्रात 4 टप्प्यांत, अशा आहेत मतदानाच्या तारखा
पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी होणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिल, चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल, पाचव्या टप्प्यातील मतदान 6 मे, सहाव्या टप्प्यातील मतदान 12 मे आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी पार पडणार आहे. यानंतर 23 मे रोजी या निवडणुकीचे निकाल समोर येतील. महाराष्ट्रात 4 टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत.

मतदानाच्या तारखा
11 एप्रिल 7 जागांवर मतदान
18 एप्रिल 10 जागांवर मतदान
23 एप्रिल 14 जागांवर मतदान
29 एप्रिल 17 जागांवर मतदान

प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर, सोशल मीडिया, पेड न्यूजवर करडी नजर
– 90 कोटी लोक बजावणार मतदानाचा अधिकार
– दीड कोटी मतदारांचे वय 18-19 वर्षे, 1.60 कोटी नोकरीपेशा मतदार
– लोकसभेत प्रथमच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार
– 10 लाख पोलिंग स्टेशन वापरले जातील
– मतदानाच्या 48 तासांपूर्वी बंद होणार लाउडस्पीकर
– रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाउडस्पीकरवर बंदी
– अधिक माहितीसाठी आयोगाकडून 1950 हेल्पलाइन
– आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई
– यावेळी मतदारांना नोटा अधिकार वापरता येणार
– तक्रार नोंदवण्यासाठी Android App, 100 तासांत उत्तर देतील अधिकारी
– ईव्हीएमच्या हालचालींवर जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिमने नजर ठेवणार
– संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची, मतदानाची व्हिडिओग्राफी
– निवडणुकीत मीडियाची सकारात्मक भूमिका, पेड न्यूज विरोधात सक्त कारवाई केली जाणार
– सोशल मीडिया पोस्टवर सुद्धा निवडणूक आयोगाची करडी नजर

– उमेदवारांना द्यावी लागणार सोशल मिडिया खात्यांची माहिती
– सोशल मिडियावरच्या जाहिरातींनाही लागणार पूर्वपरवानगी
– विविध परवान्यांसाठी सुविधा अॅप
– दिव्यांगांच्या सोयीसाठी स्वतंत्र अॅप
– यंदा १० लाख मतदान केंद्रे
– गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान केंद्रांत १०.१ टक्क्यांची वाढ
– सर्व केंद्रांवर ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रे असतील

असे होते 2014 च्या लोकसभेचे चित्र…
2014 च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यकाळ 3 जून रोजी संपुष्टात येत आहे. 543 सदस्य संख्या असलेल्या लोकसभेत बहुमताचा आकडा 272 आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तब्बल 282 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपच्या नेतृत्वातील एकूणच राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडे सध्या 336 जागा आहेत. लोकसभेत विरोधी पक्ष नेता होण्यासाठी राजकीय पक्षाला सभागृहात किमान 10 टक्के जागा जिंकाव्या लागतात. परंतु, 10 वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत फक्त 44 जागा मिळाल्या. दरम्यान, निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोग विविध मतदार संघाचे दौरे करून आकडेवारी गोळा करत होता. निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर करता येतील, तसेच सर्वच मतदार संघ निवडणुकीसाठी तयार आहेत का याचा देखील अभ्यास करण्यात आला.

यापूर्वी 2004 मध्ये रविवारीच झाली घोषणा
निवडणूक आयोगाकडून सहसा रविवारी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जात नाही. तरीही आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी रविवारचा दिवस निवडला आहे. यापूर्वी 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा रविवारीच करण्यात आली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि दिग्गज नेते शरद पवार यांनी देखील मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीच्या घोषणा होणार अशी शक्यता वर्तवली होती. तर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यासाठी होणाऱ्या विलंबावरून निवडणूक आयोगावरच निशाणा साधला होता.

 

‘गुड टच, बॅड टच’ उपक्रम राज्यभर राबविणार- प्रवीण घुगे

0
ग्रॅव्हिटस फाउंडेशन व रिफ्लेक्शन कौन्सिलिंग सेंटरतर्फे जागृती कार्यक्रम
पुणे : “बाललैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी मुलांना स्पर्शज्ञान असणे महत्वाचे आहे. ग्रॅव्हिटस (युएसके) फाउंडेशनने सुरु केलेला ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. मुलांना चांगल्या-वाईट स्पर्शाचे ज्ञान देऊन होणाऱ्या अन्यायाविरोधात मोकळेपणाने बोलता यावे व त्यांच्यात निर्भयता यावी, याकरिता ‘गुड टच, बॅड टच’ हा उपक्रम राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी केले.
ग्रॅव्हिटस (यूएसके) फाउंडेशन आणि रिफ्लेक्शन कौन्सिलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने लांडेवाडी (भोसरी) येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात शालेय मुलामुलींसाठी आयोजिलेल्या ‘गुड टच, बॅड टच’ या जाणीव जागृती उपक्रमावेळी प्रवीण घुगे बोलत होते. याप्रसंगी ग्रॅव्हिटस (यूएसके) फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, बालहक्क आयोगाच्या सदस्या आसमा शेख, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ लोंढे, सचिव अनिल लोंढे, मुख्याध्यापिका माळी मॅडम, रिफ्लेक्शन सेंटरच्या आशा खेडकर यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवीण घुगे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, चांगला-वाईट स्पर्श कसा ओळखावा तसेच आपल्यावर अतिप्रसंग झाल्यास त्याला प्रत्युत्तर कसे द्यावे, याविषयी अतिशय सहजतेने या उपक्रमातून जागृती केली जात आहे. अलीकडच्या काळात मोबाईल, इंटरनेटचा वापर लहान वयातील मुलेही करत आहेत. परंतु, त्याचा वापर विधायक गोष्टींसाठी करावा. पालकांनी मुलांचे चांगले मित्र बनून त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे. मुलांतील अबोला दूर करण्यासाठी शिक्षक-पालकांनी विद्यार्थ्यांना आपलेपणाची भावना द्यावी.”
उषा काकडे म्हणाल्या, “मुलामुलींनी चांगला वाईट स्पर्श ओळखून वेळीच त्यावर बोलले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, ७३ कोटी मुले, तर १५० कोटी मुली लैंगिक अत्याचाराला बळी पडल्याचे समोर आले आहे. नात्यातील, ओळखीच्या व्यक्तीकडून असे प्रकार होतात. मुले आणि पालक यांच्यातील संवाद वाढल्यास अशा घटनांना आळा बसेल. हा संवाद वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम चालू केला आहे. गेल्या दीड वर्षात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सरकारी व खासगी ६५० शाळांतील तीन लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवल्याचे समाधान आहे.”
शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनीही या उपक्रमाचा फायदा झाला असून, चुकीच्या गोष्टी समजल्या. मुले बोलती झाली, असे अभिप्राय दिले. लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन नं १०९८ असल्याची माहिती मुलांमध्ये पोहोचली आहे. शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यात संवाद वाढला आहे.

छोटा गंधर्व यांच्या स्मरणरंजनाचे ‘स्मृतिगान ‘

0
भारतीय विद्या भवनमध्ये शुक्रवारी ‘ स्मृतिगान ‘ चे आयोजन 
पुणे : ‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत  छोटा गंधर्व यांच्या आठवणी ,नाट्यपदे यांचे  स्मरणरंजन  सादर करणाऱ्या  ‘ छोटा गंधर्व स्मृतिगान ‘ या कार्यक्रमाचे आयोजन  शुक्रवार, दिनांक १५ मार्च  रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत हा ७१ वा कार्यक्रम आहे.संगीत रंगभूमीवर आपल्या मधुर गळ्याने ,अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या छोटा गंधर्व यांची नाट्यपदे या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत . 
 शंकर कुलकर्णी यांचा  संवाद  ‘ प्रस्तुत  हा  कार्यक्रम  ‘भारतीय विद्या भवन‘चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रस्ता  येथे होणार आहे, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली.
मुकुंदराज गोडबोले ,माधुरी ओक,चिन्मय जोगळेकर ,राजश्री ओक हे गायन करणार आहेत . तबल्यावर विद्यानंद देशपांडे तर सिंथेसायझरवर अमित ओक साथसंगत करणार आहेत . छोटा गंधर्व यांचे शिष्य विश्वनाथ ओक हे छोटा गंधर्व यांच्या आठवणी सांगून कार्यक्रमाचे विवेचन करणार आहेत .

महापौरांच्या हस्ते मंजू लोढा यांना पुरस्कार

0
मुंबई -मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते समाजसेविका आणि परमवीर पुस्तकाच्या लेखिका मंजू लोढा यांना मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात येणार ‘जागतिक महिला दिवस पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं. मुंबई महापालिकेच्या वतीनं महिलांना देण्यात येणारा हा महत्त्वपूर्ण सन्मान आहे. हा सन्मान काही विशिष्ट लोकांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी देण्यात येतो. मंजू लोढा यांनी हा सन्मान मुंबईच्या हजारो गरीब वर्गातील महिलांना समर्पित केला, ज्यांच्या सोबत त्या गेल्या २५ वर्षांपासून काम करत आहेत.
जागतिक महिला दिवसानिमित्त हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मंजू लोढा यांची स्तुती करत त्यांना ‘जागतिक महिला दिवस पुरस्कारा’ने सन्मानित केलं. मंजू लोढा यांना हा ‘जागतिक महिला दिवस पुरस्कार’ महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि वैयक्तिक विकासाच्या क्षेत्रात विशिष्ट कार्यासाठी देण्यात आला आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान सभागृहात आयोजित या सन्मान सोहळ्यात मुंबईचे उपमहापौर यशवंत जाधव, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती कुंदन यांच्यासह नगरपालिका समितीचे अध्यक्ष, अनेक नगरसेवक आणि विविध सामाजिक संस्थांशी संबंधित प्रमुख मान्यवर उपस्थित होते. लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू लोढा गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक, साहित्यिक आणि महिला विकासाच्या क्षेत्रात सक्रिय आहेत