Home Blog Page 2976

९२ वर्षांच्या आजोबांवर टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी यशस्वी

0

पुणे-व्यक्तिच्या आयुष्यातील साधारणतः पंचावन्न ते साठ वर्षे वयाचा व त्यापुढचा काळ हा वृद्धावस्था म्हणून गणला जातो. आणि वयोमानाप्रमाणे माणसाचे शरीरदेखील बदलत असते. वृद्धत्व हा नैसर्गिक नियम असला तरी त्याचबरोबर मधुमेह, रक्तदाब, संधिवात, हृदयरोग, मुत्रविकार या प्रकारचे अनेक आजार घेऊन येतो. परंतु समाजामध्ये असे खूप कमी लोक असतात जे आपल्या वृद्धावस्थेत देखील आजच्या तरुण पिढीमध्ये एक नवा आदर्श घालून देतात.

साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथे नुकतीच ९२ वर्षांच्या श्री व्यंकटेश कुलकर्णी या आजोबांवर अवघड अशी शस्त्रक्रिया पार पाडली. मुळचे कर्नाटकचे असलेले कुलकर्णी यांची वयाच्या ८३ व्या वर्षी डाव्या  पायावर शस्त्रक्रिया झाली होती. परंतु काही दिवसांपूर्वी चालताना त्यांच्या उजव्या गुडघ्यामध्ये अचानक वेदना होण्यास सुरुवात झाली. तेव्हा त्यांनी हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांना दाखविले तेथील डॉक्टरांनी त्यांचा एक्स-रे काढला असता त्यांच्या असे लक्षात आले की, कुलकर्णी यांचा गुडघा बरा होण्यासाठी शस्त्रक्रीयेशिवाय पर्याय नाही. परंतु काही कारणामुळे त्यांना हैदराबाद येथे शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. त्यामुळे कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पुण्यातील साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथे दाखल करण्याचा निर्णय घेतला.

साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीचे संचालक आणि सांधेरोपणतज्ञ डॉ नीरज आडकर यांनी कुलकर्णी  यांना तपासले असता त्यांच्या असे लक्षात आले की, कुलकर्णी यांना बेडवर देखील हालचाल करता येत नव्हती तसेच त्यांना मोठ्या प्रमाणावर वेदना सहन कराव्या लागत होत्या. त्यामुळे त्यांनी त्यांची त्वरीत टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.

याविषयी अधिक माहिती देताना साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीचे संचालक आणि सांधेरोपणतज्ञ डॉ नीरज आडकर म्हणाले की, “ही शस्त्रक्रिया आमच्यासाठी खूप कठीण होती, कारण रुग्णाचे वय हे खूप जास्त असल्याने आम्हांला अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे होते. परंतु कुलकर्णी यांनी उत्तम असे सहकार्य केल्यामुळे आम्हांला ही शस्त्रक्रिया करणे सोपे गेले.”

यावेळी साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथील भूलतज्ञ डॉ तृप्ती पारे म्हणाल्या की, “कुलकर्णी  यांचे वय लक्षात घेता आम्ही त्यांना पूर्णपणे भूल दिली नाही तर फक्त त्यांच्या पायाला भूल दिली. ज्यामुळे त्यांना कमीत कमी त्रास होईल याचा आम्ही प्रयत्न केला.”त्या पुढे म्हणाल्या की, “श्री कुलकर्णी यांना सेगमेंटल एपिड्युलर वर रुग्णाचे व्यवस्थापन करण्यास ठेवण्यात आले होते. त्यांचे वय व कार्डीओलॉजिकल स्थिती देखील आव्हानात्मक होती.”

यावेळी बोलताना श्री व्यंकटेश कुलकर्णी म्हणाले की, “माझे हृदय अजूनही तरुण आहे आणि माझ्यामध्ये खूप उर्जा आहे. मी माझे आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगले आहे. शस्त्रक्रियेनंतर सुद्धा मी माझ्या पायावर उभे राहू शकतो आणि चालू देखील शकतो . यासाठी मी डॉ. नीरज आडकर आणि संपूर्ण हॉस्पिटलचे आभार मानतो.”

दागिने खरेदी अडव्हान्स योजनेमध्ये २५ टक्के वाढीचे कल्याण ज्वेलर्सचे उद्दिष्ट

मुंबई– भारतातील सर्वात विश्वासार्ह ज्वेलर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या कल्याण ज्वेलर्सला नुकत्याच जाहीर झालेल्या दागिने खरेदी अडव्हान्स योजनेमुळे सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे. भारत सरकारने दागिने खरेदीसाठी आगाऊ रक्कम गोळा करणाऱ्या व कोणत्याही नियामक प्राधिकरणास बांधील नसलेल्या घटकांसाठी नुकताच बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्स ऑर्डिनन्स २०१९ जारी केला आहे.

हा आदेश दागिने क्षेत्राला औपचारिक स्वरूप देण्याच्या प्रयत्नांशी सुसंगत आहे. दागिने अडव्हान्स खरेदी योजनेमध्ये असलेली दरी भरून काढण्यात आली आहे आणि भागीदारी तसेच एकल प्रोप्रायटरी संस्थांना नियामक वातावरणाअंतर्गत आणण्यात आले आहे. यामुळे उद्योगक्षेत्रात सर्वांना समान संधी उपलब्ध होईल, असे राजेश कल्याणारामन, कार्यकारी संचालक, कल्याण ज्वेलर्स म्हणाले.

पब्लिक लिमिटेड कंपनी असल्यामुळे कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडवर (केजेआयएल) नुकत्याच जारी झालेल्या या अध्यादेशामुळे परिणाम होणार नाही. केजेआयएलद्वारे चालवल्या जाणाऱ्या दागिने खरेदी अडव्हान्स योजना नियामक असून त्यांना कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाद्वारे मंजुरी मिळालेली आहे तसेच आम्ही कायद्यानुसार बंधनकारक असलेले परतावे रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे (आरओसी) दाखल करतो. म्हणूनच आम्हाला असे वाटते, की भारतातील १०२ दालने आणि ६५० माय कल्याण स्टोअर्स यांचा धनवर्षा व अक्षय खरेदी अडव्हान्स योजनेमुळे विकास होईल, असे श्री. राजेश कल्याणारामन म्हणाले.

कल्याण ज्वेलर्सने २०१४ मध्ये कंपन्यांचे अधिनियमन (ठेवी स्वीकृती) रूल्स २०१४ झाल्यानंतर पूर्वीच्या दागिने खरेदी अडव्हान्स योजना खंडित केल्या होत्या. या नियमानुसार खासगी कंपन्यांना बोनस व इतर फायदे मिळवून देणाऱ्या पारंपरिक दागिने योजना राबवण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, हा नियम भागिदारी तसेच एकल प्रोप्रायटरशीप, एलएलपी यांच्यासाठी बंधनकारक नव्हता,त्यामुळे जून २०१६ मध्ये कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी झाली आणि तेव्हापासूनच दागिने खरेदी अडव्हान्स योजना कायदे व नियमांनुसारच राबवल्या जात आहेत.

केजेआयएल सध्या धनवर्षा व अक्षय खरेदी अडव्हान्स योजना राबवत आहे. या योजनांमध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांना दरमहा सलग ११ महिने पैसे भरावे लागतात व त्यानंतर एकूण भरलेले पैसे व फायद्यांसह कंपनी कायद्यामध्ये असलेल्या मंजुरीनुसार दागिने खरेदी करता येते. धनवर्षा व अक्षय खरेदी अडव्हान्स योजना नियमांचे पालन करणाऱ्या असून ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. मासिक हप्ता रोख पैसे, धनादेश, डीडी आणि ऑनलाइन पेमेंटच्या स्वरुपात भरता येऊ शकतो.

कल्याण ज्वेलर्सने धनवर्षा व अक्षय खरेदी अडव्हान्स योजना ग्राहकांच्या स्वरुपात लक्षणीय विकासाचे उद्दिष्ट ठेवले आहे. नियमांचे पालन करणाऱ्या आणि विश्वासार्ह दागिने खरेदी अडव्हान्स योजनेच्या शोधात असलेल्यांसाठी पसंतीचा ब्रँड बनण्यासाठी कल्याण ज्वेलर्स प्रयत्नशील आहे. ‘ग्राहकांना अशा प्रकारच्या योजनांचे लाभ माहीत आहेत आणि दागिने खरेदी अडव्हान्स योजनांमध्ये उत्पन्न २५ टक्क्यांनी वाढवण्याची क्षमता असल्याची आम्हाला खात्री आहे.’

कल्याण ज्वेलर्सबद्दल

केरळ राज्यातील थिसूर येथे मुख्यालय असलेले कल्याण ज्वेलर्स हे भारतातील सर्वात मोठ्या दागिने उत्पादक आणि वितरकांपैकी एक आहेत. कंपनी गेल्या शतकभरापासून देशातील वस्त्रोद्योग ट्रेडिंग, वितरण आणि हाउक व्यापार क्षेत्रात कार्यरत आहे. १९९३ मध्ये दागिन्यांचे पहिले दालन सुरू केल्यापासून कल्याण ज्वेलर्स भारतीय बाजारपेठेत गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहे. कंपनीने दर्जा, पारदर्शकता, किंमती आणि नाविन्य यांमध्ये नवे मापदंड तयार केले आहेत. कल्याण ज्वेलर्सद्वारे ग्राहकांच्या अनोख्या गरजा पूर्ण करणारे सोने, हिरे आणि प्रेशियस स्टोन्समधील पारंपरिक व अत्याधुनिक दागिने तयार करण्यात येतात. कल्याण ज्वेलर्सची भारत आणि पश्चिम आशियात मिळून १३६ दालने कार्यरत आहेत.

जिल्‍हाधिकारी राम यांची विविध कक्षांना भेट

0

पुणे- लोकसभा निवडणुकीसाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्या विविध कक्षांना जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी आज भेट देऊन पहाणी केली. यावेळी निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, तहसिलदार विकास भालेराव, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीचे काम सुरळीत पार पाडण्‍यासाठी तसेच मतदारांच्‍या सुविधेसाठी विविध कक्ष स्‍थापन करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. त्‍यानुसार  जिल्‍हाधिकारी राम यांनी मतदार मदत केंद्र, तक्रार निवारण कक्ष,  जिल्‍हा नियंत्रण कक्ष, मतदार जागृती कक्ष (स्‍वीप), इव्‍हीएम व्‍यवस्‍थापन याबाबत पहाणी केली. निवडणूक विषयक प्रमुख घडामोडींची माहिती सर्वसामान्‍य नागरिकांपर्यंत पोहोचण्‍यासाठी विविध माध्‍यमांचा वापर करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी दिल्‍या. त्‍यासाठी डिजीटल बोर्ड, बॅनर तयार करण्‍यात यावेत, असेही त्‍यांनी सांगितले.  लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्‍यात आले असून त्‍यावर योग्‍य ते निर्णय घेण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी राम यांनी दिले. विहीत मुदतीत प्राप्‍त झालेले सर्व पात्र अर्ज मंजूर करण्‍यात  येतील, असे बैठकीत सांगण्‍यात आले. लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हाधिकारी राम हे मतदार संघ निहाय दौरा करणार आहेत. दौ-यात झोनल ऑफीसर्ससह इतर अधिका-यांची बैठक घेऊन निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत. यामध्‍ये कायदा व सुव्‍यवस्‍था, मतदान केंद्रे, तेथील सुविधा, संवेदनशील मतदान केंद्रे, आदर्श आचार संहिता, खर्च नियंत्रण कक्ष, मतदान यंत्रांच्‍या सुरक्षितेसाठी केलेल्‍या उपाययोजना, उपलब्‍ध कर्मचारी वर्ग या विषयांचा समावेश असेल.

यंदा निवडणुक ही सोशल मिडिया वॉर – हर्षवर्धन पाटील

काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या प्रचार समितीची बैठक आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस
कमिटी, काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्र प्रचार समितीचे प्रमुख आ.उल्हास पवार यांच्या
अध्यक्षतेखाली आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, पक्षप्रवक्ते
डॉ. रत्नाकर महाजन व आमदार रामहरी रूपनवार, आ. प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत
पार पडली.
यावेळी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ‘‘आगामी लोकसभेच्या
निवडणुकीत राष्ट्रीय मुद्दे, राज्य प्रशासनातील मुद्दे, लोकसभेचे मतदारांचे प्रश्न यावर जास्तीत
जास्त भर प्रचारामध्ये करण्यात यावा. तसेच हे सर्व मुद्दे सोशल मिडीयाच्या माध्यमातून
सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. ही लोकसभेची निवडणुक सोशल
मिडीया वॉर आहे. ती आपण जिंकलीच पाहिजे तसेच या निवडणुकीमध्ये प्रचार करताना टाईम
मॅनेजमेंट करणे गरजेचे आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या जागा वाटपाबाबतही चर्चा होणे गरजेचे
आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस व राष्ट्रवादीने राज्यातील स्थानिक ठिकाणी इतर पक्षांसोबत केलेल्या
आघाड्या तोडणे गरजेचे आहे. देशातील हुकूमशाही, भ्रष्टाचार, राफेल डील, संविधानाला धोका याच
मुद्द्यांबरोबर राज्यातील दुष्काळ व महाराष्ट्रातील भाजपा सेनेचे भ्रष्टाचारी मंत्री यावर देखील
प्रचाराचा रोख असणे गरजेचे आहे.’’
यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रचार समितीचे प्रमुख मा. आ. उल्हासदादा पवार म्हणाले की,
‘‘राज्याचे प्रचार समितीचे प्रमुख मा. सुशिलकुमार शिंदे यांनी विभागवार प्रचार समितीची बैठक
घेण्यास सांगितले व विभागातून प्रचारासाठीच्या सूचना घेण्यास सांगितले त्यामुळे पश्चिम
महाराष्ट्राची बैठक आज पुणे येथे होत आहे. यानंतर पुढे जिल्हा अध्यक्षांनी राष्ट्रवादीबरोबर संयुक्त
बैठक घेऊन प्रचाराची दिशा ठरवावी व तसा अहवाल राज्य समितीकडे पाठवावा. पश्चिम
महाराष्ट्रातील सर्व प्रमुखांनी आपापल्या जिल्ह्याला इलेक्ट्रॉनिक मिडीयासाठी बोलणारा एक
पदाधिकारी निश्चित करावा जेणे करून कार्यकर्त्यांमध्ये एक वाक्यता रहावी.’यावेळी पश्चिम

महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली व पुणे येथून मा. प्रकाश
एलगुलवार, प्रकाश पाटील,  सचिन साठे, संजय जगताप, प्रल्हाद चव्‍हाण,
रणजितसिंग निंबाळकर,  बाळासाहेब शिवरकर,. मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड,
कमल व्‍यवहारे, नीता रजपूत, अमिर शेख, आबा बागुल,
शानी नौशाद,  सीम सावंत, सोनाली मारणे यांच्यासह पश्मिच महाराष्ट्रातील फ्रंटल व
इतर विभागांचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते.

पुणेकरांचा जीव महत्वाचा कि बांधकाम व्यावसायिकांचे हित ? समाविष्ट २३ गावांमधील रस्तारुंदीला आता चालना द्या :आबा बागुल

0
पुणे :
 समाविष्ट  २३ गावांमधील रस्ता रुंदीला केवळ काही बांधकाम व्यावसायिकांच्या  हितासाठी,  निधी नाही हा मुद्दा पुढे रेटून खो घालण्याचे धोरण स्वीकारले जात असेल तर ते अत्यंत चुकीचे तर आहे शिवाय पुणेकरांच्या जीवाशी खेळ आहे. मग उद्या संपूर्ण विकास आराखड्यासाठी दोन लाख कोटींचा निधी  लागणार असेल तर विकास आराखडा होणारच नाही का ?  जीवघेण्या वाहतुकीतून पुणेकरांना सोडविण्याबरोबरच भविष्यातील सुरळीत वाहतुकीसाठी सर्वांनी  एकत्र येत रस्तारुंदीला चालना देण्याची गरज आहे ,असे आवाहन माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी  आबा बागुल यांनी केले  आहे. 
 याबाबत पालिका आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या निवेदनात  माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि ,ज्यावेळी २३ गावे महापालिकेत समाविष्ट झाली त्यावेळी या गावांमधील रस्ते दीडपट रुंद करण्याची मागणी भविष्यातील वाढत्या लोकसंख्या आणि नियोजनाच्यादृष्टीने करण्यात आली होती. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकही झाली होती. या गावांचा विकास आराखडा करताना रस्तारुंदी कमी दर्शविण्यात आली होती.त्यामुळे नियोजित रस्ता रुंदीसंदर्भांत  विषय  मांडण्यात आला होता मात्र   ‘तारीख पे तारीख ‘चा कारभार अद्यापही  सुरु आहे.  
  पुणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने आगेकूच करीत आहे. साहजिकच नियोजनपूर्वक कामे होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत शहर आणि परिसरात वाहतुकीचा ताण वाढत आहे आणि अपघातांचा आलेखही गंभीर बनत आहे. भविष्यकाळात हा प्रश्न आणखी बिकट होणार तर आहे शिवाय अपघातांमध्ये नाहक बळींची  संख्याही वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर आतापासूनच नियोजन होणे आवश्यक असताना दुर्दैवाने त्यादृष्टीने विचारच होत नाही,हे समाविष्ट २३ गावांमधील रस्ते रुंद करण्याच्या रेंगाळलेल्या प्रस्तावामुळे   अधोरेखित झाले आहे. परिणामी सुमारे ८०० किमी रस्त्यांचे रुंदीकरण रोखले गेले आहे . त्यामुळे पुणेकरांचा जीव महत्वाचा कि बांधकाम व्यावसायिकांचे हित ?हा प्रश्न निर्माण झाला आहे. आज वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेता भविष्याच्यादृष्टीने नियोजन करण्याची संधी यानिमित्ताने मिळत असतानाही ती आपण गमावत आहोत आणि  पुणेकरांच्या जिवाशीही खेळ करीत आहोत, हा मुद्दा  सर्वांनी  विचारात घेण्याची गरज आहे. गेले अनेक वर्षे हा प्रस्ताव रखडलेला आहे. प्रत्येक नागरिकाचा जीव महत्वाचा ही भूमिका घेऊन मी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहे. या प्रस्तावावर  प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय देऊनही   या प्रस्तावाला चालना न देणे ही भूमिका अयोग्य वाटते.६००० कोटी रुपये भूसंपादनाला लागणार ही आवई कशासाठी उठवली जात आहे. रस्तारुंदी करताना भूसंपादन करावे लागते. बांधकामे झाल्यावर रस्तारुंदी करणे शक्य नाही. त्यामुळे रस्तारुंदी करणे क्रमप्राप्त आहे. रस्तारुंदीसाठी टीडीआर , एफएसआय किंवा आर्थिक रकमेतून भरपाई दिली जाते.  त्यामुळे येत्या स्थायी समितीच्या बैठकीत या विषयाला प्राधान्य देऊन तो मार्गी लावावा. वास्तविक २००७  पासून  हा विषय प्रलंबित आहे. काही बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी या विषयाला प्राधान्य दिले जात नाही हे स्पष्ट झाले आहे.   आपल्या खात्याचा अभिप्राय सकारात्मक असताना फेरअभिप्रायात विसंगती का ? असा सवालही आबा बागुल यांनी उपस्थित करून २३ गावांचा विकास करण्यासाठी अजूनही वेळ आहे. तरी त्वरित या विषयाला प्राधान्य देऊन तो मार्गी लावावा अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल मात्र तशी वेळ येणार नाही यादृष्टीने बांधकाम व्यावसायिक  असो किंवा अन्य कुणीही राजकीय व्यक्ती ,  कुणाच्याही दबावाला बळी न पडता  या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घ्यावा,असे आवाहन निवेदनाद्वारे केले आहे. 

धनगर आरक्षणाची कागदपत्रे हरवणे ही जनतेची फसवणूक – सुप्रिया सुळे

0

पुणे – धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधीची कागदपत्रे हरवल्याचे उत्तर सरकारच्यावतीने मंगळवारी उच्च न्यायालयात देण्यात आले. त्यावर ही सामान्य जनतेची फसवणूक असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, कागदपत्रे हरवल्याचे उत्तर न्यायालयात सरकारच्यावतीने देण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धनगर समाजाची फसवणूक करण्याचे काम या फसव्या सरकारने केले आहे. राफेलचे कागदपत्रे हरवल्याचे केंद्र सरकारने तर आता धनगर समाजाच्या आरक्षणाची कागदपत्रे हरवल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. म्हणजे त्यांना ज्या वेळी निर्णय घ्यायचा नसतो, त्यावेळी कागदपत्रे चोरीला जातात, किंवा गायब होतात, हे दुर्दैव असल्याचे त्या म्हणाल्या.

आज सामान्य माणसांची फसवणूक होत आहे त्याचा निषेध करत असल्याचे सांगत सरकार कष्टकरी आणि सामान्य माणसांची कशा पद्धतीने फसवणूक करतात ते दिसून येत आहे, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक दक्षतेने कार्यरत- आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

0

मुंबई: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यउत्पादन शुल्क विभाग अधिक दक्षतेने कार्यरत राहणार असल्याचे आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी श्रीमती लवंगारे यांनी या निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडाव्यात यासाठी राज्याच्या सर्व सीमालगत 40 तपासणी नाके सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आवश्यकतेनुसार यात अधिक वाढ करण्याचे तसेच आंतरराज्यीय मद्य तस्करी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. मतदारांना प्रभावित करण्यासाठी मद्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्याचे तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना गुन्हा अन्वेषण व दैनंदिन मद्य विक्रीची माहिती देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मद्य निर्मिती व घाऊक विक्रीच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून त्याची नियमित पडताळणी करावी. मतदान व मतमोजणीच्या दिवशी असलेल्या मनाई आदेशाची कडक अंमलबजावणी करावी. मद्यविक्रीच्या दुकानांमधून असाधारण विक्री झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याबद्दल सखोल चौकशी करून अनुचित प्रकार आढळल्यास त्यावर कडक कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हानिहाय असलेली महसूल उद्दिष्टपूर्ती, १४ ऑनलाइन सेवांची प्रभावी अंमलबजावणी, मद्य निर्मितीबाबत संगणक प्रणालीवर करावयाच्या दैनंदिन नोंदी, याबाबत मार्गदर्शन करून त्यांनी गुन्हा अन्वेषणाबाबत गुणवत्तापूर्वक काम करण्याचे निर्देश दिले.

जिंदगी एक सुहाना सफर ,हसते रहो:हसाते रहो- श्री श्री रविशंकर (व्हिडीओ)

0
पुणे :जिंदगी एक सुहाना सफर है , हसते रहो:हसाते रहो, मगर फसते मत रहो और किसीको मत फसावो असा संदेश देत आज अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी मानसिक तणाव हि २०२५ पर्यंत ची जगातील सर्वाधिक मोठी समस्या असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधले . आनंद देणारी स्थळे हीच खरी मंदिरे आहेत असेही ते म्हणाले .
मालपाणी समूहातर्फे निर्मित लोणावळ्यातील ‘मॅजिक माउंटन्स’ या अॅम्युझमेंट पार्कचे उद्घाटन आज श्री श्री रवीशंकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.आर्ट ऑफ लिव्हिंगच्या भानुमती नरसिंहन, ललितादेवी मालपाणी, खासदार श्रीरंग बारणे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मालपाणी समूहाचे राजेश मालपाणी, संजय मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, आशिष मालपाणी, जय मालपाणी यांबरोबर मालपाणी कुटुंबियांची तिसरी पिढी जय मालपाणी, यश मालपाणी, हर्ष मालपाणी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री श्री रवीशंकर म्हणाले की, आज जगभरात डिप्रेशन अर्थात निराशा येणे ही मोठी समस्या आहे. २०२५ पर्यत ही जागतिक समस्या होईल इतक्या वेगाने ती वाढत आहे. मॅजिक माउंटन्स या अॅम्युझमेंट पार्कमध्ये तुम्ही आलात तर या ठिकाणच्या राईड्स तुमचा तणाव काही काळात पळवून लावतील. या राईड्समध्ये बसून तुम्ही बालपण अनुभवाल, आनंदी व्हाल आणि एकदा तुमचे मन हलके झाले की नाविन्यपूर्ण गोष्टींचा शोध घेत तुम्ही निश्चित प्रगती कराल.
आपले आयुष्यही एखाद्या राईडप्रमाणेच आहे. यामध्ये संकट येतील, अवघड काळ येईल पण नेहमी लक्षात असू द्यात कि एक ईश्वर मानतो अशी शक्ती आपल्या सोबत असते ,या व्यवस्थेमुळेच आयुष्यात संकटांच्या काळात तुम्ही सुरक्षित बाहेर पडाल.
            जागतिक दर्जाच्या ३० हून अधिक राईड्स असलेले व पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारे लोणावळा येथील मॅजिक माउंटन्स हे अॅम्युझमेंट पार्क आता पर्यटकांसाठी खुले असून लोणावळ्याजवळ सुमारे ३५ एकर परिसरात ते पसरले आहे. पर्यावरणाचा विचार करून या अम्युझमेंट पार्कची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये पाण्याच्या पुर्नवापराबरोबरच सौर उर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. याठिकाणी भारतातील सर्वांत उंच झेड फोर्स आणि टर्बो राईड्सचा समावेश आहे. याबरोबरच भारतातील मोठ्या जाएंट फ्रीज्बी, सुपर फन व्हर्टिकल स्विंग, सुपर स्प्लॅश यांबरोबर इतर अनेक राईड्सचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. या सर्व राईड्स कॅनडा, जर्मनी, इटली, फिलीपाईन्स येथील झॅम्पर्ले, मोसेर, हुस आणि व्हाईट वॉटर या ब्रॅण्डच्या असून पर्यटकांच्या आवडीबरोबरच त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊनच त्यांची उभारणी करण्यात आली असल्याचे यावेळी मनीष मालपाणी यांनी सांगितले.
याबरोबरच या अॅम्युझमेंट पार्कमध्ये मल्टी क्विझिन उपहारगृहांमध्ये स्वादिष्ट जेवणाचा आस्वादही पर्यटकांना घेता येणे शक्य आहे. या ठिकाणी एक हजारांहून अधिक चार चाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था आहे. सोलर पॉवर्ड पार्किंग व्यवस्था असलेले हे भारतातील सर्वांत मोठे पार्किंग आहे अशी माहिती यावेळी राजेश मालपाणी यांनी दिली.
सदर अॅम्युझमेंट पार्कसाठी आम्ही सुमारे २५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून हे अम्युझमेंट पार्क भारतातील सर्वांत मोठे अम्युझमेंट पार्क आहे. याबरोबरच नजीकच्या भविष्यात रोलर कोस्टर,तसेच २०० खोल्यांचे एक रिसोर्ट उभारण्याचा आमचा मानस आहे. याबरोबरच तिरुपती बालाजी या ठिकाणी आध्यात्मिक संकल्पानेवर आधारित व अहमदाबाद, बंगळूरू या ठिकाणी लोणावळ्याच्या धर्तीवर अम्युझमेंट पार्क बनविण्याचा आमचा विचार असल्याचे यावेळी संजय मालपाणी यांनी नमूद केले.
मालपाणी समूहाविषयी –  मालपाणी हा देशातील एक मोठा उद्योग समूह असून पुर्ननिर्मितीक्षम उर्जा, एफएमसीजी प्रोडक्ट्स, अम्युझमेंट व वॉटर पार्क, बांधकाम क्षेत्र व हॉटेल व्यवसाय यामध्ये ते कार्यरत आहेत. शिर्डी येथील पहिले ‘वेट अॅण्ड जॉय’ पार्क, लोणावळा येथील भारतातील सर्वांत मोठे वॉटर पार्क म्हणून ओळखले जाणारे ‘वेट अॅण्ड जॉय’ पार्क आणि भारतातील पहिले आध्यात्मिक थीम पार्क म्हणून नावाजलेले शिर्डी येथील ‘साई तीर्थ’ आदी तीन मोठ्या प्रकल्पांची उभारणी मालपाणी समूहाच्या वतीने करण्यात आली आहे. 

सी-व्हिजिल’ॲप:नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा

0
               जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी अयोगाने सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल ॲप देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. कोणताही नागरिक निवडणूकी दरम्यान होणाऱ्या आदर्श आचार संहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन करू शकणार आहे. या तक्रारीवर अवघ्या 100 मिनीटात कार्यवाही होणार आहे. त्यामुळे हे ॲप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा ठरणार आहे.
               निवडणूकी दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी असलेल्या यंत्रणेतील तृटी दूर करण्यासाठी या ‘सी-व्हिजिल’ ॲपची निर्मिती भारत निवडणुक आयोगाच्यावतीने करण्यात आली आहे. पूर्वी आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीची सत्यता तपासून, त्यावर कारवाई करताना यंत्रणेची दमछाक होत असे, तसेच सबळ पुराव्या अभावी संबंधितांवर कारवाई करताना मर्यादा येत असत. या नवीन ॲपमुळे या त्रुटी आणि मर्यादा कमी होणार आहेत.
            ‘सी-व्हिजिल’ हे ॲप निवडणुकांदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी एक नाविन्यपूर्ण अस्त्र असणार आहे. या माध्यमातून नागरिक स्वतंत्र व निष्पक्षपाती निवडणुकांच्या संचालनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावू शकतात.
              ‘सी-व्हिजिल’ हे ॲप यूजर फ्रेंडली असून त्याचा वापर अत्यंत साधा आणि सोपा आहे. या ॲपचा वापर निवडणुकांच्या अधिसूचनांच्या तारखेपासून ते मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. अॅपची विशिष्ट्ये म्हणजे तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हिडिओ पुरवा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. कॅमेरा, चांगले इंटरनेट कनेक्शन आणि ‘जीपीएस’ प्रवेशासह सज्ज असलेल्या कोणत्याही ॲड्रॉईड (जेलीबीन आणि वरील) स्मार्टफोनवरून या ॲपच्या माध्यमातून आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार करता येवू शकते.  तीन टप्प्यात ही तक्रारीची प्रक्रीया पूर्ण होणार आहे.
*पहिला टप्पा-* आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटत असल्यास नागरिकांने त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जी.पी.एस.) स्वयंचलीत स्थान मॅपिंगसह अॅपवर फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा. त्याच्या नंतर त्या तक्रारदार नागरिकाच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो. नागरिक अशा प्रकारे अनेक घटना नोंदवू शकतात, प्रत्येक अहवालासाठी एक आयडी मिळवू शकतात. अॅप वापरकर्त्यास ‘सी-व्हिजिल’ अॅपद्वारे आपली ओळख लपवून सुध्दा तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. यामध्ये मोबाइल नंबर आणि इतर प्रोफाइल तपशील ॲप प्रणालीवर पाठवले जात नाहीत. त्यामुळे निनावी तक्रारीच्या बाबतीत, तक्रारकर्त्यास पुढील स्थिती संदेश मिळणार नाहीत. मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई ही होणार आहे.
*दुसरा टप्पा-*  नागरिकाने तक्रार नोंदविल्यानंतर ती अवघ्या पाच मिनीटातच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होईल. त्या महितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे ती माहिती पाठविण्यात येईल. त्या नुसार संबंधित पथकाकडे असणाऱ्या ‘जीव्हीआयजीआयएल अन्वेषक’ नामक जीआयएस-आधारित मोबाइल ऍप्लिकेशनच्या सहाय्याने जीआयएस संकेत आणि नेव्हीगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या 15 मिनीटाच्या आत पोहोचणे अपेक्षीत आहे. संबंधित तक्रारी बाबत प्राथमिक तपास व तक्रारीतील तथ्यांची तपासणी करून त्या संबंधीचा अहवाल ॲपव्दारेच निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे तातडीने पाठवतील. हा कालावधी 30 मिनीटापेक्षा अधिक नसेल.
*तिसरा टप्पा-* भरारी पथकाने तक्रारीवर कारवाई केल्यानंतर क्षेत्रीय अहवाल तपासकाने ॲपव्दारेच संबंधित निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठविल्यावर, त्या घटनेतील तथ्य, पुरावा आणि अहवालाच्या आधारे निवडणुक निर्णय अधिकारी ती तक्रार ड्रॉप करावयाची, निकाली काढावयाची की पुढे पाठावायची याचा निर्णय घेतील. जर त्या तक्रारीत तथ्य अढळले तर भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविण्यात येईल. तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या 100 मिनिटांच्या आत तक्रारीची स्थिती तक्रार कर्त्याला प्राप्त होईल. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रार कर्त्याच्या मोबाईलवर तसा संदेश प्राप्त होईल.
*ॲपचा दुरूपयोग होवू नये म्हणून…*
– ‘सी-व्हिजिल’ चा उपयोग केवळ निवडणूक होत असलेल्या राज्यांच्या भौगोलिक सीमा अंतर्गतच करता येईल.
– फोटो अथवा व्हिडिओ क्लिक केल्यानंतर ‘सी-व्हिजिल’ वापरकर्त्यास केवळ 5 मिनिटांचा अवधी मिळेल.
– हे ॲप आधीच मोबाईलवर रेकॉर्ड केलेल्या फोटो आणि व्हिडिओंची अपलोड करण्याची परवानगी देणार नाही.
– अॅपवरून क्लिक केलेले फोटो अथवा व्हिडिओ थेट फोन गॅलरीमध्ये जतनही करता येणार नाहीत.
– एकसारख्या तक्रारीच्या दरम्यान किमान 5 मिनिटांचा विलंब करावा लागतो.
– जिल्हा नियंत्रण कक्ष भरारी पथकाला नेमण्या आधीही डुप्लिकेट, फ्रिवोलस आणि असंबंधित प्रकरणे ड्रॉप करण्याचा पर्याय आहे.
– ‘सी-व्हिजिल’चा वापर केवळ आदर्श आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित खटले दाखल करण्यासाठी केला जाणार.
– या शिवाय नागरिकांनी तक्रारी नोंदवण्यासाठी भारत निवडणुक आयोगाच्या मुख्य वेबसाइटचा वापर करावा, अथवा 18001119 50
– किंवा राज्य संपर्क केंद्रावर 1 9 50 मध्ये राष्ट्रीय संपर्क केंद्राला कॉल करा.
*यासाठी ‘सी-व्हिजिल’ करता येईल तक्रार*
-मतदारांना पैसा, मद्य आणि आमली पदार्थांचे वाटप.
– शस्त्रसाठा अथवा शस्त्र वापर.
– मतदारांना मारहाण अथवा दमबाजीच्या प्रकारात.
– जमावाला चिथावणीखोर भाषण देणे.
– पेड न्यूज आणि फेक न्यूज संबंधी.
– मतदारांना अमिष म्हणून वस्तूंचा वापर.
– मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक करणे.
– उमेदवाराच्या मालमत्ता अपात्रते संबंधी व इतर.
*’सी-व्हिजिल’ची तक्रार योग्य असल्यास*
–          संबंधितांवर प्राथमिक माहिती अहवाल (एफआयर) नोंदविला जाईल.
–          संबंधितांवर  क्रिमीनल ॲक्शन होणार.
–          कारवाईतील रोख रक्कम जप्त होणार.
–          कारवाईतील मद्य अथवा आमली पदार्थ जप्त होणार.
      -संग्राम इंगळे
विभागीय माहिती कार्यालय, पुणे.
(संदर्भ : भारत निवडणुक आयोग अधिकृत संकेतस्थळ )

कोची येथे रंगला महिंद्रा थार मालकांचा सर्वात मोठा मेळावा

मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा लि.ने (एमअँडएम) 10 मार्च 2019 रोजी कोची येथे थार फेस्टच्या तिसऱ्या आवृत्तीचा समारोप केला. महिंद्रा अॅडव्हेंचर ‘क्लब चॅलेंजच्या चौथ्या आवृत्तीमुळे थार फेस्टचा उत्साह आणखी वाढला. त्यामध्ये, ऑफ-रोडिंगमध्ये बाजी मारण्यासाठी देशभरातील आघाडीचे 11 ऑफ-रोडिंग क्लबनी चुरस दिली.

वैशिष्ट्यपूर्ण ‘थार’ ब्रँड साजरा करत असताना, ऑफ-रोडिंग समुदाय व 4 X 4 प्रेमी यांच्यातील  नातेही साजरे करणे, हे थार फेस्टचे उद्दिष्ट होते. दिवसभराच्या फेस्टिवलमध्ये, थरारक ऑफ-रोडिंग उपक्रम आणि थारशी संबंधित उपक्रम उपस्थितांना खिळवून ठेवले. प्रेक्षकांनी थार परेड, 4*4 एक्स्पिरिअन्स झोन, हेरिटेज महिंद्रा डिस्प्ले, कस्टमाइज्ड व्हेइकल डिस्प्ले व लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्स अशा अन्य उपक्रमांचाही आनंद घेतला.

भारतभरातील 11 ऑफ-रोडिंग क्लबमधील सहभागींनी भारतातील बेस्ट ऑफरोडिंग क्लब हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकण्यासाठी क्लब चॅलेंजमध्ये एकमेकांना चुरस दिली. परंतु, यातील अडथळ्यांमध्ये वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीवर अधिक भर देण्यात आला. मार्च 9, 2019 रोजी, सायंकाळी 6:30 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत नाइट स्टेजने क्लब चॅलेंजची सुरुवात झाली. पुढील दिवशी, मार्च 10, 2019 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 6:00 या वेळेत डे स्टेज झाले.

काही अडथळे म्हणजे लोकप्रिय ‘डिमॉलिशन डर्बी होते. या उपक्रमात, ऑफ-रोडिंग वाहनांना जंक व्हेइकलच्या ढिगावरून मार्ग शोधायचा होता. आणखी एक मोठा अडथळा म्हणजे ‘पास बॅटन, यामध्ये सर्व श्रेणीतील वाहनांना रिले स्वरूपात गाडी चालवायची असते व बॅटन एका वाहनाकडून दुसऱ्या वाहनाकडे द्यायची असते व फिनिश लाइनपर्यंत पोहोचायचे असते.

दोन दिवस संघर्ष केल्यावर व 8 अडथळ्यांचा सामना केल्यावर, एकंदर विजेत्याचा चषक कन्नुर रायडर्स अँड ऑफरोडर्स क्लब (केआरओसी) यांना देण्यात आला. पहिले रनर-अप बक्षीस बेंगळुरू ऑफरोड ड्रायव्हर्स असोसिएशनने (बीओडीए) जिंकले, तर नॉर्दन इंडिया ऑफरोड क्लबने (एनआयओसी) दुसरे रनर-अप बक्षीस जिंकले. केआरओसी, बीओडीएबीओडीए यांव्यतिरिक्त, यंदा टीम इजमसा, एक्स्ट्रीम रायडर्स मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ मेघालय, केरळ अॅडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब, आरअँडटी ऑटोकॅटलिस्ट, केटीएम जीपर्स आणि टीम फ्लायव्हील हे क्लब सहभागी झाले होते.

महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटो डिव्हिजनच्या सेल्स मार्केटिंगचे प्रमुख वीजय नाकरा यांच्या मते, “महिंद्रा थार हा वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड आहे आणि ऑटोप्रेमींच्या मनात व ऑफ-रोडिंग क्षेत्रामध्ये त्याचे अतिशय खास स्थान आहे. हा महिंद्राच्या परंपरेचाच एक भाग आहे आणि त्यातून कंपनीच्या दणकट व राकट, कोठेही जाता येण्याच्या क्षमता अधोरेखित होतात. क्लब चॅलेंज थार फेस्ट याद्वारे आम्हाला ऑफ-रोडिंगप्रेमींमध्ये दिसणारी पॅशन पाहून आनंद वाटतो. अगोदरच्या वर्षांप्रमाणे, या वर्षीही थार फेस्टमध्ये अनेक 4×4 चाहते एकत्र आले आणि त्यांनी महिंद्रा वाहनांचा दणकट व राकट डीएनए साजरा केला. तसेच, क्लब चॅलेंजमध्ये, वैविध्यपूर्ण ऑफ-रोडिंग क्लबनी आव्हानात्मक भूभागावरून प्रवास करत, अवघड अडथळे पार करत, “बेस्ट ऑफ-रोडिंग क्लब” हा पुरस्कार मिळवण्यासाठी चुरस दिली.”

थार CRDe विषयी

2010 मध्ये दाखल करण्यात आलेली थार CRDe स्टायलिश ऑफ-रोडर आहे, महिंद्राच्या MM 540ची सुधारित आवृत्ती आहे. 2015 मध्ये, कंपनीने या श्रेणीतील सर्वोत्तम वैशिष्ट्ये समाविष्ट करत नवी थार CRDe दाखल केली – ऑटो एंगेजिंग डिफरन्शिअल लॉक. उत्कृष्ट ऑफ-रोडर असणारी नवी थार कोणत्याही भूप्रदेशामध्ये चालवता येऊ शकते आणि अन्य मॉडेलच्या तुलनेत या वाहनात महिंद्राचा दणकट व राकट डीएनए अधिक उठून दिसतो. आज, हे सर्वात पसंतीचे मनोरंजनपर 4×4 वाहन आहे. थार हा महिंद्रा अॅडव्हेंचर ऑफ-रोडिंग उपक्रमांचा गाभा आहे आणि इगतपुरी व मंगलोर येथे असणाऱ्या भारतातील ऑफ-रोड प्रशिक्षण अकादमींतील प्रशिक्षणाचे प्रमुख वाहन आहे.

गेल्या काही वर्षांत, भारतातील लाइफस्टाइल व्हेइल श्रेणीला आकार देण्यामध्ये लक्षणीय भूमिका बजावली आहे. त्यातील शक्तिशाली CRDe इंजिन ताकद व इकॉनॉमी दोन्ही देते. केबिनमध्ये सहा जण बसू शकतात, तर मागील दोन आसने फोल्ड करून ठेवू शकतात, जेणे करून सामानासाठी मोठी जागा उपलब्ध होईल.

हे वाहन BS IV प्रकारात उपलब्ध असून त्यामध्ये पॉवर स्टीअरिंगचा समावेश असल्याने वाहन आरामदायीपणे चालवता येऊ शकते. अस्सल अॅक्सेसरीज व कस्टमायझेशन पर्यायही उपलब्ध आहेत.

महिंद्रा अॅडव्हेंचरविषयी

महिंद्रा वाहनांतील दणकट व राकट डीएनए दाखवणयासाठीची खास संकल्पना असलेला, महिंद्रा अॅडव्हेंचर अम्ब्रेला ब्रँड म्हणून कार्यरत आहे आणि या ब्रँडअंतर्गत विविध साहसी व मोटरस्पोर्ट्स कार्यक्रम आयोजित केले जातात. सर्व साहसी उपक्रमांसाठी स्वतंत्र एंटीटी म्हणून, 2011 मध्ये अॅडव्हेंचर अॅक्टिविटीज चीफ विजय कुमार वाय. यांच्या नेतृत्वाखाली महिंद्रा अॅडव्हेंचरची निर्मिती करण्यात आली. विजय कुमार वाय. मोटरिंगप्रेमी आहेत आणि लोकप्रिय मोटरिंग मासिकाचे माजी संपादक आहेत.

महिंद्रा अॅडव्हेंचर कॅलेंडरमध्ये वर्षभरातील विविध प्रायोगिक मार्केटिंग कार्यक्रमांचा समावेश असतो – जसे की, लोकप्रिय ऑफ-रोडिंग कार्यक्रम ग्रेट एस्केप, विविध आव्हाने (आव्हाने सादर करण्याच्या कंपनीच्या आश्वासनानुसार स्पोर्टिंग उपक्रम), मल्टि-डे स्पेशल एस्केप – मॉनेस्ट्री एस्केप (10 दिवस), ट्रायनेशन एस्केप (10 दिवस), वन लॅप ऑफ इराण (9 दिवस), ऑथेंटिक मस्तंग (10 दिवस), हिमालयीन स्पिती एस्केप (10 दिवस), द स्नो एस्केप (7 दिवस) आणि समिट – एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत ड्राइव्ह (14 दिवस).

ऑफ-रोडिंगचा प्रसार करण्यासाठी, महिंद्रा अॅडव्हेंचरने मंगलोर येथे महिंद्रा अॅडव्हेंचर ऑफ-रोड ट्रेनिंग अकॅडमी सुरू केली आहे. इगतपुरीमध्ये सुरू केलेल्या पहिल्या महिंद्रा अॅडव्हेंचर ऑफ-रोड ट्रेनिंग अकॅडमीनंतरची ही दुसरी अकॅडमी आहे.

महिंद्रा अॅडव्हेंचर ऑफ-रोड ट्रेनिंग अकॅडमी 28 एकर क्षेत्रात विस्तारली आहे आणि महिंद्रा 4डब्लूडी वाहनांविषयी व ऑफ-रोडिंगविषयी सर्व शिकून घेण्यासाठीचे भारतातील पहिले व एकमेव ठिकाण आहे. यामार्फत, आम्ही कंपनीच्या ऑफ-रोड परंपरेचा लाभ घेऊ शकू, तसेच वाहनांच्या क्षमता दर्शवू शकू व वाहनांचा संपूर्णतः वापर करण्यासाठी सहभागींना आत्मविश्वास देऊ शकू. या प्रकल्पात प्रशिक्षणासाठी आवश्यक वाहने म्हणून महिंद्रा थारच्या ताफ्याचा विशेष करून वापर केला जातो. टीम महिंद्रा अॅडव्हेंचर निर्मितीपासून, रॅलीसाठी सज्ज सुपर XUV500 याद्वारे मोटरस्पोर्ट क्षेत्र गाजवत आहे. महिंद्राच्या चीत्यापासून प्रेरित XUV500 ने इंडियन नॅशनल रॅली चॅम्पिअनशिप (आयएनआरसी) 2017 मध्ये एकंदर चॅम्पिअनशिप जिंकली आहे.

महिंद्राविषयी

20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत

“महिला खेळाडूंसाठी अभिमानास्पद क्षण” अ‍ॅस्पेन वॉचेस तर्फे जस्ट वॉचेस येथे महिला क्रीडापटुंचा सन्मान

0

पुणे : एखाद्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांचे उदघाटन महिला खेळाडूंच्या हस्ते होणे व त्यासाठी आमची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती होणे हा आमच्यासाठी अभिमानस्पद क्षण आहे, असे छत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर व आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू पूजा सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले

महिला शक्ती आणि महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अ‍ॅस्पेन वॉचेस तर्फे एका विशेष कार्यक्रमात महिलांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी भाग्यश्री कोलते, पूजा सहस्त्रबुद्धे, ऋतुजा सातपुते या आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंसह महिला बुद्धिबळपटू व प्रशिक्षक मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर आणि महिला क्रिडा पत्रकार पूनम काटे यांचा गौरव करण्यात आला. अ‍ॅस्पेन हा कर्तृत्ववान महिलांचे प्रतिनिधित्व करणारा लेडीज वॉचेसचा एक लोकप्रिय ब्रँड असून वेस्टएंड मॉल, औंध येथील जस्ट वॉचेस या स्टोअरमध्ये झालेल्या एका शानदार समारंभात या सर्व कर्तृत्ववान महिलांच्या हस्ते आपल्या ज्वेल्स या नव्या कलेक्शनचे अनावरण करण्यात आले.

जस्ट वॉचेसचे प्रमुख मनोज सुब्रमणियन म्हणाले की, जागतिक स्तरावर भारताची मान उंच करणार्‍या या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्याची संधी मिळणे, हा आमच्यासाठी बहुमान आहे. घड्याळांच्या विविध श्रेणीप्रमाणे क्रिडा क्षेत्रातील विविध श्रेणींवरही पुरुषांचे वर्चस्व आहे, तरीही या सर्व महिलांनी असामान्य कर्तृत्वाने आपला ठसा उमटविला आहे. म्हणूनच केवळ महिलांसाठी वाहून घेतलेल्या आमच्या अ‍ॅस्पेन या ब्रँडने खास महिलांसाठी घड्याळांची एक विशेष श्रेणी तयार केली असून आधुनिक विचारांच्या आणि फॅशनेबल अशा आपल्या परंपरा व संस्कृतीवर प्रेम करणार्‍या महिलांसाठी ही श्रेणी खास आकर्षण ठरेल.
यावेळी मृणालिनी कुंटे म्हणाल्या की, महिला खेळाडूंच्या हस्ते महिलांच्या नवीन घड्याळांचे अनावरण होणे हि खूपच अभिनव संकल्पना आहे. त्यामुळे नवीन खेळाडूंनाही उत्तम यश मिळविण्यासाठी प्रेरणा मिळण्यास मदत होईल.

पूजा सहस्त्रबुद्धे म्हणाली कि, सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर असून देशाचे नाव उज्वल करण्यास महिलांचाही मोठा वाटा असतो.

आंतरराष्ट्रीय सायकलपटू ऋतुजा सातपुते हिने सांगितले की, अशा सत्कारांमुळे आम्हांला अधिकाधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

यावेळी उपस्थित असलेल्या विशेष महिला अतिथींमध्ये विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणार्‍या महिलांचा समावेश होता. त्यात भारतातील तिसर्‍या क्रमांकाची तिरंदाज व शिवछत्रपती पुरस्कार विजेती भाग्यश्री कोलते, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती टेबलटेनिसपटू पूजा सहस्त्रबुद्धे, कुमार गटातील गुणवान खेळाडू आणि 16 वर्षाखालील गटातील महाराष्ट्रातील अव्वल मानांकित टेबलटेनिसपटू पृथा व्हर्टिकर, महिला ग्रॅन्डमास्टर व प्रशिक्षक शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मृणालिनी कुंटे औरंगाबादकर, आंतरराष्ट्रीय सायकलपटू ऋतुजा सातपुते आणि पुण्यातील महिला क्रीडापत्रकार पूनम काटे यांचा समावेश होता.

याप्रसंगी अ‍ॅस्पेन वॉचेस तर्फे ज्वेल्स या विशेष कलेक्शनचे अनावरण करण्यात आले. या कलेक्शनमध्ये अभिनव डिझाईन आणि ज्वेलरी यांचा उत्कृष्ट संगम असलेल्या घड्याळांचा समावेश आहे. ज्वेल्स ब्रँडच्या घड्याळांमुळे नेहमीच्या घड्याळांपेक्षा काहीतरी आगळेवेगळे आणि हिरेजडीत दागिन्यांची जागा घेणारी अ‍ॅक्सेसरीज वापरण्याचा आनंद महिलांना मिळणार आहे. या घड्याळांसाठी इटली, रशिया, चीन व इतर देशांमधून खास मागविलेल्या विविध प्रकारच्या चेनचा वापर करण्यात आला असून या घड्याळांना एक आकर्षक लूक देण्यासाठी विशेष प्रकारच्या डायल्सचा वापर करण्यात आला आहे.

जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेतर्फे रविवारी वीरमाता-वीरपत्नींचा सन्मान

0

पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेतर्फे पुणे जिल्ह्यातील वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान करण्यात येणार आहे. देशाच्या सीमेवर संरक्षण करताना वीरमरण आलेल्या सैनिकाप्रती व त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून या सोहळ्याचे आयोजन आले आहे, अशी माहिती वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका मीनाताई कुर्लेकर, सुनिता जोगळेकर, कार्यकर्त्या मीनाक्षी नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विजयकुमार मर्लेचा म्हणाले, “रविवार, दि. १७ मार्च २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता कर्वे रस्त्यावरील अश्वमेध सभागृहात हा सन्मान सोहळा होणार आहे. जिल्हा सैनिक बोर्डाचे मेजर मिलिंद तुंगार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे व ब्रिगेडियर रघुनाथ जठार हे सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मानचिन्ह, श्रीफळ व पुष्प असे या सन्मानाचे स्वरुप आहे.”

मीनाताई कुर्लेकर म्हणाल्या, “देशासाठी बलिदान देणार्‍या सैनिकांच्या कुटुंबीयांबरोबर काम करण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे. सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागाला मानवंदना देण्यासाठी हा कार्यक्रम महत्वपूर्ण आहे. एकूण ५६ वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. गौरी कुलकर्णी व मंजिरी तिक्का यांच्या गायनाचा कार्यक्रमही यावेळी होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.”

अखेर वनदेवी चौकात सिग्नल कार्यान्वित – रोजच्या वाहतूक कोंडीतुन नागरिकांची सुटका

0

पुणे-कर्वेनगर मधील वनदेवी मंदिर चौक हे अपघाताचे केंद्र झाले होते . या चौकात रोजच सकाळ संध्याकाळ होणाऱ्या वाहतूक कोंडी ने नागरिक त्रस्त झाले होते.येथे रोज वादावादीचे प्रकार आणि किरकोळ अपघात ही नित्याचीच बाब झाले होती.हे लक्षात घेता क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर आणि सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील दुधाने हे या ठिकाणी सिग्नल बसविला जावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते.या ठिकाणी सिग्नल बसवून २ महिने झाले तरी तो कार्यान्वित होत नव्हता,अखेर  संदीप खर्डेकर यांनी येथील वाहतूक पोलीस निरीक्षक  वाखारे व मनपा च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली , स्वप्नील दुधाने यांनी संबंधित कंत्राटदार  नितीन पाडळे यांना त्वरित टायमिंग सेट करायला सांगितले आणि येथील सिग्नलचे काम पूर्ण झाले.भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराम मेंगडे,नगरसेविका लक्ष्मीदुधाने,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,वृषाली चौधरी यांच्या हस्ते हा सिग्नल कार्यान्वित करण्यात आला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.यावेळी बापूसाहेब मेंगडे,प्रशांत हर्सूल,अजय बराटे,हेमंत बोरकर,जगदीश डिंगरे,कल्पनाताई पुरंदरे,इ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकीय पक्षांनी आचार संहितेचे पालन करावे- जिल्‍हाधिकारी राम

0

पुणे- कोणत्‍याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने वेगवेगळ्या जाती-जमाती, भिन्‍न धर्मीय किंवा भिन्‍न भाषिक यांच्‍यामध्‍ये मतभेद वाढतील किंवा जातीय वैमनस्‍य निर्माण होईल, अशा प्रकारच्‍या कोणत्‍याही कृत्‍यामध्‍ये भाग घेवू नये, असे स्‍पष्‍ट निर्देश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी उप‍ जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी  श्री. राम यांनी सी-व्‍हीजील या अॅपबाबतही  विस्‍तृत माहिती दिली. निवडणुकी दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी असलेल्या यंत्रणेतील त्रूटी दूर करण्यासाठी या ‘सी-व्हिजिल’ ॲपची निर्मिती भारत निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आली आहे.           ‘सी-व्हिजिल’ हे ॲप निवडणुकांदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी एक नावीन्‍यपूर्ण अस्त्र ठरणार आहे. कोणताही नागरिक या अॅपचा वापर करु शकतो. या माध्यमातून नागरिक स्वतंत्र व निष्पक्षपाती निवडणुकांच्या संचालनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावू शकतात, असेही  ते म्‍हणाले.

जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कायदा व सुव्‍यवस्‍था भंग होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्‍यावी, असे सांगून मेळावे, जाहीर सभा याबाबतीत आवश्‍यक त्‍या परवानग्‍या घेण्‍यात याव्‍या,असे सांगितले.

प्रारंभी जिल्‍हाधिकारी राम यांनी आचार संहितेच्‍या काळात काय करावे आणि काय करु नये, याबाबत विस्‍तृत सादरीकरण केले. उपस्थितांच्‍या प्रश्‍नांचीही समाधानकारक उत्‍तरे दिली.  निवडणूक खर्च व्‍यवस्‍थापन या विषयावर अजित रेळेकर, एक खिडकी योजनेबाबत सुहास मापारी, टपाली मतपत्रिकेबाबत सुनील गाढे यांनी सादरीकरण करुन शंकानिरसन केले.

कॉंग्रेस मध्ये जाण्याच्या निर्णयावर ठाम – खा. संजय काकडे

0

पुणे- मी जरूर मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो पण त्याचा अर्थ असा नाही कि मी माझी भूमिका बदलली ,मी माझ्या कॉंग्रेस प्रवेशाच्या भूमिकेवर ठाम आहे असे स्पष्टीकरण खासदार संजय काकडे यांनी ‘माय मराठी ‘ कडे  फोन वर संपर्क साधून केले आहे .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला काकडे संध्याकाळी मुंबईतील वर्षा  बंगल्यावर गेले तेव्हा माध्यमांमध्ये आणि सामिक्षकांमध्ये याबाबत राजकीय चर्चेला उत आला . आणि काकडे भाजप च्या सानिध्यात राहणार कि कॉंग्रेस मध्ये जाणार यावर खलबते सुरु झाली . या सर्व प्रकाराबाबत काकडे यांनी माय मराठी कडे सविस्तर खुलासा केला आहे. ते म्हणाले मी मित्र म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मित्र म्हणून संबध कायम राहतील असे पुन्हा स्पष्ट करतो . मी कॉंग्रेस मध्ये जाण्याच्या निर्णयावर ठाम आहे . कुणीही चुकीचा अर्थ काढू नये अशी माझी विनंती आहे ,.