Home Blog Page 2974

शहीदांच्या कुटुंबीयांनी स्वावलंबी बनावे -ब्रिगेडियर जठार

0

पुणे : “देशाच्या सीमेवर लढताना जवान शहीद झाल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांतून पाठिंबा, आधार मिळतो. कृतज्ञतेच्या भावनेतून अनेकजण पाठीशी उभे राहतात. परंतु, आयुष्याच्या अखेरपर्यंत स्वाभिमानाने जगण्यासाठी वीरपत्नींनी स्वावलंबी बनले पाहिजे. स्वाती महाडिक, गौरी महाडिक या तरुणीं पती शहीद झाल्यानंतर प्रशिक्षण घेऊन सैन्यात दाखल झाल्या, ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे,” असे प्रतिपादन ब्रिगेडियर (निवृत्त) रघुनाथ जठार यांनी केले. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचे सांत्वन आपण शब्दात करू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

जागतिक महिला दिनानिमित्त जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेतर्फे पुणे जिल्ह्यातील वीरमाता, वीरपत्नी आणि वीरपित्यांचा सन्मान करण्यात आला. देशाच्या सीमेवर संरक्षण करताना वीरमरण आलेल्या सैनिकाप्रती व त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा सोहळा आयोजिला होता. काही दिवसांपूर्वीच शहीद झालेल्या मेजर शशिधरन नायर यांच्या पत्नी तृप्ती नायर, अबोली मोहोरकर, सोनाली सौरभ फराटे, भारत-चीन युद्धापासून आपल्या पतीच्या प्रतीक्षेत असलेल्या मालती जगताप यांच्यासह एकूण ५५ वीरमाता-वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. विजयकुमार मर्लेचा यांनी आपल्या मातोश्री कांताबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मानचिन्ह दिली. या कार्यक्रमासाठी जयंत नातू यांनी सभागृह व अल्पोपहार उपलब्ध करून दिला.

कर्वे रस्त्यावरील अश्वमेध सभागृहात झालेल्या हृद्य सोहळ्याला जिल्हा सैनिक बोर्डाचे मेजर (निवृत्त) मिलिंद तुंगार, कॅप्टन (निवृत्त) सुरेश जाधव, ऍड. इंद्रजित सिंग गिल, वीरपत्नी अबोली मोहोरकर, वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका मीनाताई कुर्लेकर, सुनिता जोगळेकर, कार्यकर्त्या मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले, चैत्राली वाघ आदी उपस्थित होते. मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्प असे या सन्मानाचे स्वरुप होते. देशभक्तीपर गीतांची धून, शहीद जवानांविषयीच्या आठवणी यामुळे सभागृह भारावून गेले होते. अनेकींच्या डोळ्यांत आसवे दाटून आली होती. भावुक वातावरणात सन्मान स्वीकारताना अनेकींच्या डोळ्यांत अश्रू दाटून आल्याचे पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले. प्रत्येकजण आपल्यासोबत असल्याचा विश्वास या शहीदांच्या कुटुंबियांना देत होता.

अबोली मोहोरकर म्हणाल्या, “शहीद झाल्यानंतर कुटुंबियांना सहानुभूती देण्यासाठी अनेकजण भेटतात. पण कालांतराने हळूहळू ते कमी होते. सैनिकांविषयीच्या माहितीचा अभाव अजूनही दिसतो. आर्थिक मदतीची, सहानुभूतीची आम्हाला गरज नसते. परंतु, आपलेपणाचा भावनेने बोलणारे आणि सोबत राहणारे माणसे हवी असतात. ग्रामीण भागातील शहीदांच्या पत्नी, त्यांची मुले यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे. संस्थेने त्यात पुढाकार घेतल्यास मोठे काम उभे राहू शकते.”

मीनाताई कुर्लेकर म्हणाल्या, देशासाठी बलिदान देणार्‍या सैनिकांच्या कुटुंबीयांबरोबर काम करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. यापुढे ज्या शहीदांच्या कुटुंबियांना न्याय मिळालेला नाही, अशांसाठी संस्था मदत करेल. आपल्या सगळ्यांसमवेत आम्ही आहोत. त्यामुळे आपण खचून जायचे नाही. तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहेत. गौरी कुलकर्णी व मंजिरी तिक्का यांनी शहीदांच्या कुटुंबियांसाठी गायन सादर केले. श्रीराम ओक यांनी निवेदन केले. मीनाताई कुर्लेकर यांनी आभार मानले.

दुसरे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलन हे मानवमुक्तीचे संमेलन

0

पुणे-दुसरे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलन हे मानवमुक्तीचे संमेलन आहे . अलीकडच्या काळात समाजक्रांतीकारकांना जातवार विभागून घेण्याची पध्दत पडू लागली आहे . त्याला हे संम्मेलन  अपवाद आहे . असे मत दलित युवक आंदोलन आयोजित दुसरे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ लेखिका विचारवंत डॉ गेल ऑमवेट यांनी मांडले .

सदाशिव पेठमध्ये उद्यानप्रसाद कार्यालयात  दलित युवक आंदोलन आयोजित दुसरे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनात ते अध्यक्षस्थानी बोलत होते . यावेळी संमेलनाचे उदघाटन संविधानाचे पूजन नामवंत लेखिका पत्रकार प्रतिमा जोशी यांच्याहस्ते करण्यात आले . तसेच जातिव्यवस्थेची गुलामगिरीची साखळी तोडून संमेलनाचे उदघाटन केले .

दुसरे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ लेखिका विचारवंत डॉ गेल ऑमवेट यांनी सांगितले कि , आजचे साहित्य दोन प्रकारचे आहे . एक प्रकार सरळ सरळ प्रस्थापित साहित्याचा आहे . दुसरा प्रकार जग बदलण्याची स्वप्ने पाहणारा , जग बदलण्यासाठी चाललेल्या अनेक जणांच्या जीवनातल्या सुख दुःखाचा , नवनिर्मितीच्या सुंदरतेचा बाबतीत साहित्य निर्माण करणारा आहे . आजच्या काळात हा दुसरा प्रवाह निराशावादी पध्दतीने लिहिताना दिसतो . दुखातहि काही सुख मिळवली जाऊ शकतात . आनंदाचे प्रसंग असतात . दुःख संपविण्याची जिद्द असते . नवे जीवन मिळविण्याचा संघर्ष असतो . या सर्व जीवनाविषयी साहित्य आले पाहिजे . शोषित जनतेची नवनिर्माणाची आस कायम जिवंत असते , ती आली पाहिजे . साहित्यासाठी आजचा काळ कठीण आहे . या काळाला सामोरे गेले पाहिजे . स्वातंत्र्य , समता , मैत्री , करुणा यांच्या पायावर स्वयंप्रकाशित होऊन ठाम उभे राहिले पाहिजे . अंधारलेल्या काळात अंधाराची कविताही लिहिली जाऊ शकते . पण त्याबरोबर नव्या पहाटेची सुध्दा कविता लिहिली पाहिजे . नव्या युगाचे साहित्य लिहण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .

या  दुसरे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाचे प्रास्तविक दलित युवक आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे यांनी केले तर स्वागतध्यक्ष शशिकांत घोडे यांनी सर्वांचे स्वागत केले . संमेलनास अन्य मान्यवर उपस्थित होते .

वेगळी चूल मांडणाऱ्यांना पक्षात घेऊ नका -रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचा राजीनामा देणाऱ्या व स्वतःच्या स्वार्थासाठी वेगळी चूल मांडणाऱ्या चार रिपब्लिकन नेत्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये. त्यांनी केलेल्या पक्षविरोधी कृतीचा निषेध करून त्यांना कायमचे पक्षाबाहेर पाठवावे. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मागे ठामपणे उभे राहून त्यांचे हात बळकट करू, असा निर्धार पुणे शहरातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केला.
दोन दिवसांपूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या मातंग आघाडीचे हनुमंत साठे, श्रमिक आघाडीचे महेश शिंदे, पक्षाचे माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता आठवले यांनी राजीनामे देऊन पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष अशोक कांबळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत स्वार्थापोटी पक्षविरोधी वागणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला.
या बैठकीला उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, आयुब शेख, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, निलेश आल्हाट, मंदार जोशी, महिपाल वाघमारे,,संजय सोनवणे, नगरसेविका सुनीता वाडेकर, सोनाली लांडगे, फर्जाना शेख, बाबुराव घाडगे, मोहन जगताप, भगवान गायकवाड, चिंतामण जगताप, महादेव कांबळे, गौतम शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले “रामदास आठवले पक्षासाठी जो निर्णय घेतील त्याचे पालन करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करायला हवे. पक्षातून बाहेर पडून विरोधात काम करणे योग्य नाही. पक्षाने आजवर या नेत्यांना खूप काही दिले. मात्र त्यांच्या अपेक्षा वाढतच आहेत. आठवले यांचे नाव पुढे करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना पुन्हा पक्षात घेऊ नये, असा ठराव झाला आहे.” बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण  यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांचा निषेध केला.

वाचता…वाचता…

0

वाचनाची आवड तशी लहानपणापासूनच. आजोबा आणि काकाला वाचनाची आवड. वर्तमानपत्रातील चांगल्या आणि वाचनीय लेखांची कात्रणं दोघही काढून ठेवत असत आणि कात्रणाची एक फाईलही होती त्यांची. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेही शाळेत असल्यापासूनच गणेश लायब्ररीचे सभासद होतो. पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव आणि पुस्तक वाचल्याची तारीख यांची नोंद आम्ही दोन्ही भावंडं एका वहीत करीत असू.

पुस्तकं वाचता-वाचता बऱ्याच गोष्टी हळूहळू लक्षात यायला लागल्या. प्रत्येक लेखकाची भाषाशैली वेगळी. पु. ल. देशपांडे विनोदी कथा लिहितात तर वपुंच्या कथा ह्या सर्वसामान्य माणसांच्या अंतरंगाचा वेध घेतात. शब्दांचा खेळ इथे अनुभवायला मिळतो. त्यांच्या लेखनात एक वेगळा विचार, दृष्टिकोन असतो. गो.नी. दांडेकरांच्या कादंबरीत, ऐतिहासिक घटना गोष्टीरूपाने सांगण्याचा प्रयत्न असतो; तर विश्वास पाटलांचा ऐतिहासिक प्रसंग भव्य आणि उत्कट पध्दतीने मांडण्याकडे कल असतो. कुसुम अभ्यंकर, सुमती क्षेत्रमाडे, कुमुदिनी रांगणेकर या लेखिका कौटुंबिक जिव्हाळ्याच्या कथा सांगतात. तर अद्भुत रहस्यमय गोष्टी डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्या कथांमधून अनुभवायला मिळतात. सुधा मूर्ती आपल्याला आलेले अनुभव साध्या सोप्या भाषेतून सांगताना विचार करायचा एक दृष्टिकोन देतात…

वि.स.खांडेकरांची ‘उल्का’ कादंबरी शाळेत असताना मैत्रिणींसोबत अगदी झपाटल्यागत वाचली होती. कधी एकदाची मधली सुट्टी होतेय आणि कादंबरी वाचतोय, असं आम्हाला झालेलं असायचं. ‘उल्का’च्या आम्ही प्रेमातच पडलो होतो. कादंबरी आपल्या संग्रही असावी असं वाटायचं, पण ती खूप जुनी असल्यामुळे पुस्तकाच्या दुकानात उपलब्ध नव्हती. जुन्या पुस्तकांचं ‘माहेरघर’ म्हणजे रद्दीवाला! असंच एकदा पुस्तके चाळता-चाळता हाती आली ती ‘उल्का’…जिचा शोध मी बरीच वर्षे घेत होते. रद्दीवाल्याकडे ती कादंबरी सापडली या आनंदापेक्षा मला रुखरुख वाटली ती एवढ्या मोठ्या लेखकाची कांदबरी रद्दीत सापडावी…असो.

‘(वाचनाची)इच्छा असेल तर मार्ग सापडतो’ याचा प्रत्यय मला चिंचपाडा अंगणवाडीत (नॅशनल पार्क, बोरिवली) आला. तिथल्या मुलांनी आपली वाचनाची आवड जोपासली आहे. एक ट्रंकेत नाना प्रकारची पुस्तकं ठेवली आहेत आणि त्या सर्व पुस्तकांची नोंदवहीही आहे. वाचता-वाचता या मुलांचं ‘बालपण’ समृद्ध होतंय!

वपु आणि सुधा मूर्ती यांच्या लेखनाचा माझ्यावर प्रभाव जास्त होता. मलाही हळूहळू प्रसंग आणि व्यक्तिचित्र लिहिण्याची सवय लागली आणि मी लिहिती झाले. वाचता-वाचता या अशा आणि अनेक गोष्टी अनुभवायला आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळाले.

तुम्हालाही असाच अनुभव आला असेल वाचता…वाचता…

 

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग, 

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.), 

मुंबई – 400068

पाणी चेंबरमध्ये बुडून कर्मचाऱ्याचा मृत्यू, शोधण्यासाठी गेले चार जण बेशुद्ध

0
मुंबई-मलबार हिल येथे पाण्याची लाईन सुरु करण्यासाठी चेंबरमध्ये उतरलेल्या एका महानगरपालिका कर्मचाऱ्याचा चेंबरमध्ये फसून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या कर्मचाऱ्याला शोधण्यासाठी एक एक करून चार कर्मचारी या चेंबरमध्ये उतरले होते. मात्र तेही तिथे पाण्यात फसले. या चेंबरमध्ये फसून राकेश निजप याचा मृत्यू झाला असून इतर चार जण बेशुद्ध अवस्थेत सापडले आहेत. मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. गावदेवी पोलीस ठाण्यात नाना चौकमध्ये घडलेल्या या दुर्घटनेची नोंद करण्यात आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तीन वाजता भायखळा येथील पाणी खात्यातील पाच कर्मचारी पाणी सुरू करण्यासाठी नाना चौक येथे आले होते. या पाच कर्मचाऱ्यांमधील राकेश पाणीची सप्लाय सुरु करण्यासाठी चेंबरमध्ये उतरला होता. खूप उशीर होऊनही राकेश चेंबरच्या बाहेर न आल्याने बाळासाहेब पवार, उमेश पवार, सुरेश पवार आणि शांताराम भक्ते राकेश याला शोधण्यासाठी चेंबरमध्ये उतरले. मात्र पाण्यात बुडाल्याने राकेशला शोधणे कठीण झाले होते. जवळपास अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर राकेशचा मृतदेह आणि इतर चार जणांना बेशुद्ध अवस्थेत चेंबरमधून बाहेर काढण्यात आलं. यानंतर त्यांना नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेची माहिती मिळताच मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा आणि स्थानिक नगरसेविका मीनल पटेल दुर्घटनास्थळी पोहोचले. यासोबतच मनपाचे बाबुला टँक नियंत्रणचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. शरीरात पाणी शिरून दम घटलेल्या चार कर्मचाऱ्यांचा नायर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. आमदार लोढा यांनी मृताच्या कुटुंबातील एकाला मनपात नोकरी मिळवुन देण्यासाठी सहाय्यता करण्याचे आश्वासन दिले आहे. आमदार लोढा यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची चौकशी केली आणि मृतकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले, तसेच नाना चौकवर जाऊन दुर्घटनास्थळची पाहणी केली. .

न्यूझीलंडः हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्यांमध्ये पुण्यातील एकासह 7 भारतीय

0

ख्राइस्टचर्च – न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमध्ये दोन मशिदींवर झालेल्या वर्णद्वेषी हल्ल्यानंतर ९ भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. त्यातील २ जणांची ओळख पटली आहे. ते हल्ल्यात जखमी झाले असून, रुग्णालयात उपचार घेत आहेत. न्यूझीलंडच्या भारतीय दूतावासातील सचिव परमजित सिंह यांनी सांगितले की, सात भारतीयांना आताच मृत घोषित केले जाणार नाही. कारण, याबाबत न्यूझीलंड सरकारने काहीच म्हटले नाही. मात्र त्यांच्याकडे सात भारतीयांच्या मृत्यूची माहिती असल्याचे दूतावासाचे म्हणणे आहे. त्यातील १ महिला केरळ, २ जण हैदराबाद, १ पुणे आणि १ जण गुजरातचा आहे. इतर दोघे न्यूझीलंडमध्येच स्थायिक आहेत. कुटुंबासमक्ष ओळख पटवल्याशिवाय मृतांची नावे जाहीर करणार नाही, अशी न्यूझीलंड सरकारची भूमिका असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा काही वृत्तसंस्थांनी केला आहे. न्यूझीलंडमध्ये ख्राइस्टचर्च इथल्या 2 मशिदीतील हल्ला एकाच व्यक्तीने घडवला असू शकतो, असा पोलिसांचा कयास आहे. या संशयित हल्लेखोराचं नाव ब्रेन्टन टरांट (28) असं आहे. तो ऑस्ट्रेलियातील असून गौर वर्णियांना उच्च मानणारा आहे.या प्रकरणात आणखी 3 जणांना अटक केली असून त्यांचा यात सहभाग नसावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पण याबद्दल आताच काही निष्कर्ष काढता येणार नाही, असं पोलीस आयुक्त माईक बुश यांनी म्हटलं आहे.

मशीदीत ‘ब्रदर’ म्हणून स्वागत करणाऱ्यावरच झाडली पहिली गोळी
हल्लेखोर ब्रेंटन टॅरंट फेसबुक लाइव्ह करून रायफलीसह मशिदीत पोहोचला तेव्हा सर्वात आधी प्रवेशद्वारावर एक व्यक्तीशी त्याची गाठ पडली. त्या व्यक्तीने हल्लेखोराच्या स्वागतात शब्द उच्चारले, हॅलो ब्रदर. हल्लेखोर रायफल घेऊन त्याच्याच दिशेने वेगाने येत आहे, हेही त्याला माहीत होते. त्याने हॅलो ब्रदर शब्द उच्चारताच हल्लेखोराने गोळी मारली.ही घटना हल्लेखोराच्या फेसबुक लाइव्हवर स्पष्टपणे दिसते.

मुलांची ढाल बनून उभा होता पिता; गोळी लागली, आता धोक्याबाहेर
मशिदीतील गोळीबारादरम्यान ५२ वर्षीय अदीब सामी यांना आपल्या दोन मुलांचा वाचवण्यासाठी हल्लेखोराच्या गोळ्या स्वत:च्या अंगावर घेतल्या. हल्लेखोराने त्यांना थेट गोळी घातली. त्यात ते जखमी झाले. सुदैवाने आता धोक्याच्या बाहेर आहेत. त्यांच्या शरीरातून गोळ्या काढल्या आहेत.अदीब इराकी प्रदेशातील रहिवासी असून दुबईशी त्यांचे नाते आहे. त्यांची दोन मुले अब्दुल्ला (२९) आणि अलीला (२३) ओरखडलेही नाही. मारल्या गेलेल्या ४९ लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. फ्रान्सचेे एफिल टॉवर आणि ऑस्ट्रेलियात ओपेरा हाउसमध्ये वीज बंद राहिली.न्यूझीलंडच्या अल-नूर मशिदीत प्रत्येक धर्माचे लोक एकवटले होते

फेसबुकवर लाइव्ह स्ट्रीमिंग सुरु करून न्यूझीलंडमध्ये मशिदींवर हल्ला 49 ठार-वर्णद्वेषातून स्थलांतरित लोकांचे झालेले भीषण हत्याकांड

0

ख्राइस्टचर्च – न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये शुक्रवारच्या नमाजासाठी एकत्र आलेल्या स्थलांतरित नागरिकांवर नमाजापूर्वी भीषण हल्ला झाला. कोणत्याही देशातील स्थलांतरितांवर झालेला हा आजवरचा सर्वात भीषण वर्णद्वेषी हल्ला आहे. गौरवर्ण श्रेष्ठतेतून झालेल्या या गोळीबाराचा मुख्य आरोपी ऑस्ट्रेलियातील आहे. त्याने प्रथम अल नूर मशिदीमध्ये घुसून गोळीबार केला. त्यात ४१ लोक मृत्युमुखी पडले, ४० जखमी झाले. त्यानंतर तो साडेसहा किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या मशिदीत गेला आणि तेथे ७ जणांना ठार केले. त्याने २१ मिनिटांत हे भीषण कृत्य केले. मशिदीत घुसण्यापूर्वी त्याने फेसबुकवर लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू केले. न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्त संजीव कोहली यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ६ भारतीय मृत झाल्याची माहिती आहे. मात्र सरकारने अद्याप त्यास दुजोरा दिलेला नाही.हल्लेखोर ब्रेंटनने ७४ पानी जाहीरनामा अगोदर दिला, श्वेतवर्णीयांच्या हक्कासाठी हे कृत्य केल्याचे सांगितले
“हा हल्ला युरोपात स्थायिक होणाऱ्या स्थलांतरित नागरिकांना रोखण्यासाठी केला आहे. मी त्यांच्यात दहशत पसरवून ठार मारून संपवेन.’

महिलेसह ४ अटकेत, मुख्य आरोपी पाकमध्ये गेला होता 
२८ वर्षीय हल्लेखोर ब्रेंटन टॅरंट ऑस्ट्रेलियाचा रहिवासी असून त्याच्यासोबत अन्य एक महिला व त्याच्या दोन हस्तकांनाही अटक करण्यात आली आहे. टॅरंट काही महिन्यांपूर्वी पाकलाही गेला होता.

ख्राइस्टचर्चमध्ये भारतीय वंशाचे ३० हजार नागरिक हल्ल्यानंतर नऊ भारतीय बेपत्ता
हल्ल्यानंतर ख्राइस्टचर्चमध्ये राहणारे ९ भारतीय बेपत्ता आहेत, असे उच्चायुक्त संजीव कोहली यांनी टि्वट करून सांगितले. वकिलातीत भारतीय कुटुंबीयांचे सतत फोन खणखणत आहेत. स्थानिक माहितीनुसार हल्ल्यावेळी चार भारतीय व पाच मूळ भारतीय वंशाचे नागरिक मशिदींत उपस्थित होते. यामध्ये दोन हैदराबादचे, एक पुण्याचा व एक गुजरातचा आहे. न्यूझीलंड सरकारने त्यांच्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्यांना मृत मानले गेलेले नाही. ख्राइस्टचर्चमध्ये भारतीय वंशाचे ३० हजार नागरिक वास्तव्यास आहेत.

प्रत्यक्षदर्शी फरीद अहमद म्हणाले, मी मेल्याचे भासवले म्हणून वाचलो…
नमाजापूर्वी एक शस्त्रधारी व्यक्ती आली. त्याने दरवाजा बंद करत गोळीबार सुरू केला. लोक पळू लागले. मी पळू शकलो नाही. माझ्या शेजारच्या लोकांना गोळ्या लागल्या. माझ्या कपड्यावर त्यांचे रक्त उडाले. मी आशा सोडली होती. हल्लेखोर एकेकाला टिपत होता. माझे रक्ताने माखलेले शरीर पाहून मी गतप्राण झालो आहे, असे हल्लेखोराला वाटले. नंतर तो दुसऱ्या खोलीत गेला. पाहतो तर माझ्या आजूबाजूला २४ वर मृतदेह होते.

दिमाखदार सोहोळ्यात संपन्न झाला झी चित्र गौरव पुरस्कार 2019

0
मराठी चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित झी चित्र गौरव २०१९चा पुरस्कार सोहळा दिमाखदार पद्धतीत पार पडली. यंदा झी गौरव पुरस्कार हे २० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मराठी सिनेसृष्टीचा सन्मान करण्यासाठी लाभलेला हा पहिलाच प्रतिष्ठित मंच. या पुरस्कार सोहळा नेहमीच दिमाखदारपणे आणि भव्यदिव्य असा पार पडतो. गेल्या वीस वर्षात या पुरस्कार सोहळ्याने अनेक कलाकार, तंत्रज्ञ् यांना सन्मानित केले. मराठी सिनेसृष्टीचा सन्मान करण्यासाठी लाभलेला हा पहिलाच प्रतिष्ठित मंच. यावर्षी देखील कलाविश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०१९’ सोहळ्यात सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली. सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, मधू चोप्रा, आदिनाथ कोठारे, महेश कोठारे, अशोक सराफ, अंकुश चौधरी आणि अशा अनेक कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्यात सज्ज होऊन या सोहळ्याची रंगात वाढवली.
हा पुरस्कार सोहळा प्रेक्षक ३१ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहू शकतील.

अनुकंपातत्व सारख्या महत्वाच्या विषयावर आधारित वडील आणि मुलीचा अनोखा प्रवास

0

गेले काही दिवस बाबांच्या ज्या राजकन्येविषयी सर्वत्र चर्चा चालली होती ती राजकन्या आता प्रेक्षकांच्या भेटीसआली आहे. साधी, मध्यमवर्गीय, मनमिळावू अशी राजकन्येच्या रुपातून ‘अवनी जयराम भोसले’ छोट्या पद्यावरआपल्याला दिसली आणि अगदी पहिल्याच एपिसोड पासूनच  तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत .सोनी मराठीवरील ‘एक होती राजकन्या’ या नवीन मालिकेचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आहे .   अभिनेते किशोरकदम आणि अभिनेत्री किरण ढाणे यांच्या अभिनयाने सुरुवात झालेल्या या मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्येच  एकंदरीत वडील आणि मुलीच्या गोड  नात्याची गुंफण पाहायला मिळत आहे

 नेहमी डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचं स्वप्नं पाहणा-या अवनीचा कॉन्स्टेबल म्हणून प्रवासाला सुरुवात झालीआहे.आणि ती नुकतीच अनुकंपातत्वावर पोलीस  खात्यात भरती झाली आहे .  अनुकंपा तत्व म्हणजे शासकीयसेवेत असताना दिवंगत किंवा अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकांची त्यांच्या ठिकाणी कामकरण्यासाठी नियुक्ती केली जाते. बाबांचं छत्र हरवल्यामुळे त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर आपल्या अवनीचीनियुक्ती झाली आहे. बाबांचं छत्र हरवल्यानंतर खंबीर बनून अवनी सर्व जबाबदा-या योग्य रितीने पार पाडण्याच्याप्रयत्नात आहे. बाबांची शिकवण आणि त्यांच्या कर्तबगारीमुळे त्यांच्यातील गुण हे  अवनीमध्ये देखील आपसूकआले आहेत.  अवनीचा मदतीला धावून जाण्याचा स्वभाव आणि  रोखठोकपणे आपली मतं मांडण्याचा स्वभावप्रेक्षकांनी नक्की अनुभवला असेल. अश्या ह्या बाबांच्या लाडक्या राजकन्येचा एक अनोखा  प्रवास नक्की पहा. तिच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी पाहत राहा ‘एक होती राजकन्या’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७:३०वाजता फक्त सोनी मराठीवर.

‘जल होश ‘ :होळी-धुळवडीला पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी पुण्यात भरतनाट्यमद्वारे जनजागृती

0
अनिता नेवे’ज नृत्यपूजा एकेडमी ‘ च्या उपक्रमाला पुणेकरांचा प्रतिसाद !
पुणे :होळी,धुळवड  सणाच्या पार्श्वभूमीवर पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी पुण्याच्या रस्ते ,चौक आणि प्रमुख ठिकाणी  भरतनाट्यमद्वारे जनजागृती  करणारा ‘जल होश ‘ हा अभिनव उपक्रम  ‘अनिता नेवे’ज  नृत्यपूजा एकेडमी ‘ तर्फे १६ मार्च रोजी पुण्यातील रस्त्यांवर ,चौकात आणि ऐतिहासिक प्रमुख ठिकाणी आयोजित  करण्यात आला होता .
 ‘होळी,धुळवडीचा सण २० मार्च रोजी असल्याने त्यापूर्वी ही जनजागृती पुणेकरांमध्ये केली .मानवी जीवनातील पाण्याचे महत्व विविध नृत्यमुद्रांद्वारे सादर करण्यात आले ‘ ,अशी माहिती एकेडमीच्या संचालक अनिता नेवे यांनी  दिली .
पुण्यातील ‘अनिता नेवे’ज नृत्यपूजा एकेडमी ‘ ने हा उपक्रम  १६ मार्च रोजी पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर प्रथमच आयोजित केला . युवा कलाकारांद्वारे जनजागृतीपर भरतनाट्यम सादरीकरण केले  .या उपक्रमादरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,फर्गसन रस्ता ,बालगंधर्व रंगमंदिर प्रवेशद्वार ,शनिवारवाडा ,कर्वे पुतळा कोथरूड येथे शनिवारी सादरीकरण करण्यात आले . पाणीबचतीचा संदेश फलक  घेऊन अनेक स्वयंसेवक सहभागी झाले .
पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले. पाणी बचतीचे आवाहन केले .
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे कुलगुरू नितीन करमाळकर यांनी कलाकारांची भेट घेऊन उपक्रमाचे स्वागत केले.विद्यापीठातील कार्यक्रमात ३०० विद्यार्थी सहभागी झाले .बालगंधर्व,डेक्कन  पोलीस चौकीचे पोलीस या मोहिमेत सहभागी झाले  तर शनिवारवाडा येथे परदेशी पर्यटकांनी या आगळ्या वेगळ्या जनजागृती मोहिमेची माहिती घेतली .

पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार , नगरसेविका पूजा आनंद, रचना पाटील, प्रा. गुंडे, शैलेंद्र पटेल ( वसुंधरा सामाजिक अभियान ),अजित कुमठेकर ,अर्जुन जगताप ,मुक्ता जगताप , अनंत घरत ( माय अर्थ फाऊंडेशन )तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या अभिनव उपक्रमात सहभागी झाले. पुणेकरांनी मोबाईल कॅमेऱ्यात या उपक्रमाचे चित्रीकरण केले . ‘सोशल मीडियाद्वारे पुणेकरांनी जलबचतीचा हा संदेश व्हायरल करावा . होळी आणि धुळवडीला पाण्याची बचत करावी ‘असे आवाहन ‘पूना गेस्ट हाऊस ‘चे संचालक  किशोर सरपोतदार यांनी केले . कल्याणीनगर ,खराडी  ,विमान नगर या ठिकाणी हे जनजागृतीपर भरतनाट्यम सादरीकरण  रविवारी सकाळी होणार आहे .

दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेला ७ जिल्ह्यातून प्रतिसाद

0
पुणे :’ ग्रामीण – शहरी गरजांची सांगड घातली ,कल्पकेने पर्यटकांपर्यंत पोहोचले तर निसर्ग ,शेती ,मोकळ्या हवेची ओढ पर्यटकाला कृषी पर्यटनाकडे खेचून आणेल ‘ असा सूर दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेत उमटला .
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि ‘कृषी पर्यटन विश्व’ यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक ९ आणि १० मार्च या दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळा पराशर कृषी पर्यटन केंद्र राजुरी, जुन्नर पुणे येथे यशस्वीरीत्या पार पडली .
या दोन दिवसीय कार्यशाळेला प्रमुख उपस्थित म्हणून एमटीडीसी प्रादेशिक व्यवस्थापक  दीपक   हरणे, बँकेचे अधिकारी सचिन मस्के, ‘आमंत्रण  कृषी पर्यटन’ चे शशिकांत जाधव, मनोज हाडवळे, गणेश चप्पलवार आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कृषी पर्यटन कार्यशाळेमध्ये सात जिल्ह्य़ातून शेतकरी व कृषी पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांनी  सहभाग घेतला होता. या कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असे आयो़जक एमटीडीसीची प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले.
 या कार्यळेत एम.टी.डी.सीचे प्रादेशिक व्यवस्थापक  दीपक हरणे यांनी कृषी पर्यटनासाठी उपयुक्त आणि पूरक योजानांची माहिती दिली. कृषी पर्यटन संबंधी भविष्यातील योजनेविषयी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले . कृषी पर्यटन क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अडचण आल्यास संपर्क करा असे आवाहन केले .
कार्यशाळेसाठी उपस्थित असलेला शेतकरी वर्ग यांच्या कृषी पर्यटनासाठी मिळणार असणारा पतपुरवठा यांमध्ये विविध बँकिंग योजना पर्यटन कर्ज मुद्रा योजना यांचे मार्गदर्शन सचिन मस्के यांनी केले .  शेतकऱ्यांच्या शकांचे निरसन केले. ‘आमंत्रण कृषी पर्यटन केंद्राचे’  संचालक शशिकांत जाधव यांनी कृषी पर्यटनातीत इतर जोडव्यवसाय करू शकतो ,शहरातील पैसा ग्राणीण भागात कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कसा आणू शकतो,कृषी पर्यटन व्यवसायात रोजगाराची संधी मोठ्यां प्रामाणात  कशा उपलब्ध होत आहेत ,याविषयी मार्गदर्शन केले .
कृषी पर्यटन केंद्रांना काळाची गरज म्हणून नव माध्यंमे, डिजिटल तसेच समाज माध्यम किती महत्वाचे आहेत, मार्केटिंग व जाहिरात तंत्र , सोशल मीडियाचा असलेला जागतिक प्रभाव, वेबसाईटचे फायदे, किवर्ड आणि कंन्टेन्टचा वापर करून आपली वेबसाईट  गुगल सर्च करताना कशी प्रथम निदर्शनास  आणू शकतो या विषयी ‘कृषी पर्यटन विश्व ‘चे संचालक गणेश चप्पलवार यांनी   मार्गदर्शन केले.
कृषी पर्यटनाची भविष्य, संधी, सध्यस्थिती, कृषी पर्यटनाबरोबरच विविध महोत्सव आणि उपक्रम कसे राबवावे याचे मार्गदर्शन मनोज हाडवळे यांनी केले. त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील यशस्वी झालेला द्राक्ष महोत्सवा सारखे महोत्सव कशा पद्धतीने राबवू शकतो या विषयी या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.

प्रचारासाठी कोणत्याही माध्यम प्रकारांचा उपयोग करण्यात काहीच गैर नाही पण ….

0
असे चालते माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समितीचे (एमसीएमसी) काम..
निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक काळात आदर्श आचार संहितेची अंमलबाजवणी करण्यात येते. आयोगाच्या निर्देशानुसार राजकीय पक्ष अथवा उमेदवारांकडून प्रसारित करण्यात येणाऱ्या कोणत्याही माध्यम प्रकारातील जाहिरात मजकूरांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण व देखरेख (एमसीएमसी) समिती गठीत करण्यात येते. ही समिती जिल्हा आणि राज्य अशा दोन स्तरांवर कार्यरत असते, निवडणुका नि:प्षक्ष आणि मुक्तपणे पार पाडण्यात या समितीचाही महत्वाचा वाटा असतो.
                निवडणूक काळात अधिकृत पक्षाला अथवा वैयक्तिक उमेदवारांना त्यांची ध्येय-धोरणे, त्यांचे काम आणि निवडणुकीतील चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा आणि निवडणुकीचा जाहिरनामा मांडण्याचा हक्क आहे. एकाच वेळी मतदार संघातील प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे उमेदवाराला अथवा पक्षाला शक्य नसते. त्यासाठी त्यांना कोणत्याना कोणत्या माध्यमांची मदत घ्यावीच लागते. पूर्वी वर्तमानपत्र, रेडीओ, घडीपत्रिका, प्रसिध्दीपत्रक, प्रचारसभा एवढीच मर्यादीत असणारी साधने आता दिवसेंदिवस विस्तारत आहेत. नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आकाशवाणी व  दूरदर्शनबरोबरच, फिरती एलईडी वहाने आणि समाज माध्यमांनी यात मोठी आघाडी घेतली आहे.
                उमेदवार अथवा नोंदणीकृत पक्षांनी आपल्या प्रचारासाठी कोणत्याही माध्यम प्रकारांचा उपयोग करण्यात काहीच गैर नाही. मात्र, हे करत असताना या माध्यमांव्दारे प्रसारित करण्यात येणाऱ्या मजकूराचे प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे. या जाहिरात मजकूराच्या माध्यमातून कोणाचेही चारित्र्य हनन होऊ नये, समाजा-समाजात तेढ निर्माण होवू नये, नैतिकता, सभ्यता यांचा भंग होवू नये, शत्रूत्व-तिरस्काराची भावना निर्माण होवू नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आदर्श आचार संहितेमध्ये या सर्व बाबींचा समावेश आहे. याचसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा आणि राज्‍य पातळीवर अशा जाहिरात मजकूरांच्या प्रमाणिकरणासाठी आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात येते. जाहिरातीच्या मजकूरांचे प्रमाणीकरण केल्यानंतर समितीच्यावतीने त्या जाहिरातीसाठी एक प्रमाणपत्र देण्यात येते. प्रत्येक जाहिरातीच्या प्रसारणासाठी स्वतंत्रपणे या प्रमाणपत्राची आवश्यकता असते.
                जाहिरात प्रमाणीकरणाबरोबरच ही समिती निवडणूक होत असलेल्या क्षेत्रात प्रसिध्द होणाऱ्या सर्व प्रकारच्या माध्यमांच्यावरही देखरेख करते. या निवडणूक कालावधीत माध्यमात प्रसारित होणारी वृत्त ही उमेदवाराच्या बाजूने काही मोबदला घेऊन प्रसारित करण्यात येत असतील, अशी शंका समितीला आल्यास अथवा तशी समितीकडे कोणी तक्रार केल्यास त्या वृत्तांसंबंधी संबंधित उमेदवाराला नोटिसीव्दारे समिती खुलाशाची विचारणा करू शकते. जर समितीला संबंधितांचा खुलासा मान्य झाल्यास त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. मात्र समितीला त्याबाबत खुलासा मान्य न झाल्यास संबंधित वृत्त हे पेड न्यूज आहे, असे गृहीत धरून तो खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जातो. जिल्हास्तरीय समितीचा निर्णय उमदेवारास मान्य नसल्यास जिल्हास्तरीय समितीला माहिती देवून राज्यस्तरीय समितीकडे 48 तासाच्या आत अपील करता येते. राज्यस्तरीय समिती 96 तासाच्या आत तक्रारीचा निपटारा करून तसा निर्णय उमेदवार आणि जिल्हास्तरीय समितीला कळवितात. या निर्णया विरूध्द उमेदवार आदेश मिळाल्यानंतर 48 तसांच्या आत भारत निवडणूक आयोगाकडे अपील करू शकतो.
*राज्यस्तरीय समिती*
– मुख्य निवडणूक अधिकारी – (अध्यक्ष)
– निवडणूक आयोगाकडून नेमणूक केलेला निरीक्षक – (सदस्य)
– समितीने नियुक्त केलेला एक तज्ज्ञ. – (सदस्य)
– भारतीय माहिती सेवेचा (आयआयएस) महाराष्ट्रात नियुक्तीस असलेला अधिकारी. – (सदस्य)
– स्वतंत्र नागरिक अथवा प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाने नामांकित केलेला पत्रकार. – (सदस्य) (उपलब्ध असल्यास)
– अतिरिक्त/ संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माध्यम प्रभारी. – (सदस्य-सचिव)
– समाज माध्यम तज्ज्ञ. – (मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी नियुक्त केलेला) – (सदस्य)
*जिल्हास्तरीय समिती*
– जिल्हा निवडणूक अधिकारी/निवडणूक निर्णय अधिकारी. (लोकसभा मतदार संघ)-(अध्यक्ष)
– सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (उप विभागीय दंडाधिकारी अथवा समकक्ष परंतु त्याहून कमी दर्जाचा नाही) – (सदस्य)
– समाज माध्यम तज्ज्ञ. (निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नामांकित केलेला) – (सदस्य)
– केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाचा अधिकारी. (जिल्ह्यात नियुक्तीला असेल तर) – (सदस्य)
– स्वतंत्र नागरिक अथवा प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाने नामांकित केलेला पत्रकार.  – (सदस्य)
– जिल्हा जनसंपर्क अधिकारी/जिल्हा माहिती अधिकारी/ समकक्ष अधिकारी. – (सदस्य-सचिव)
*कोणता जाहिरात मजकूर प्रमाणीकरण करून घ्यावा*
– इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे प्रसारित होणारी जाहिरात.
– दूरदर्शन, केबल चॅनेल आणि रेडिओ यांच्यावर प्रसारित करण्यात येणारी जाहिरात.
– समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातीचा मजकूर.
जाहिरात प्रमाणीकरणासाठी अर्ज कधी द्यावा ?
– नोंदणीकृत राष्ट्रीय अथवा राज्यस्तरावरील पक्ष आणि निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमदेवारांनी जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी किमान तीन दिवस आधी जाहिरात प्रमाणिकरणासाठी अर्ज करावा.
– याशिवाय बिगरनोंदणीकृत राजकीय पक्ष अथवा अन्य व्यक्तींनी जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी किमान सात दिवस आधी  जाहिरात प्रमाणीकरणासाठी अर्ज करावा.
*जाहिरात मजकूर प्रमाणीकरणासाठी आवश्यक दस्ताऐवज आणि माहिती*
– उमेदवाराने अथवा नोंदणीकृत पक्षाने निवडणूक आयोगाने दिलेल्या (ॲनेक्शर ए मधील) नमुना क्रमांक 1 मधील अर्ज.
– जाहिरात चित्रफित अथवा ध्वनीफितीच्या दोन सिडी.
– अर्जासोबत प्रस्तावित जाहिरातीच्या साक्षांकीत अनुप्रमाणीत केलेला प्रतिलेख (ॲटेस्टेड ट्रान्सस्क्रीप्ट) दोन प्रतीत.
– जाहिरात/मजकूर तयार करण्यासाठी आलेल्या खर्चाचा तपशील.
– जाहिरात प्रसारित करण्याचे माध्यम.
– जाहिरात प्रसारणाचा कालावधी – वेळ. (केबल टिव्ही, रेडीओ आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यम असल्यास त्याच्यात प्रसारित करण्यात येणाऱ्या वेळेसह, किती वेळा प्रसारीत करणार त्याचा नेमका प्रसारणाचा तपशील).
– जाहिरात प्रसारणाच्या खर्चाचा संभाव्य तपशील.
*…प्रामुख्याने समिती काय पाहते?*
– प्रमाणीकरणासाठी आलेली जाहिरात कायद्यानुसार सुसंगत आहे का ? तसेच नैतिकता, सभ्यता यांचा भंग करून समाजाच्या अथवा व्यक्तीच्या भावना दुखावणारी आहे का ?
– धार्मिक, वांशिक, भाषिक अथवा प्रादेशिक गटांमध्ये किंवा समुहामध्ये विसंवाद घडविण्यास पोषक ठरतील अशी  दृष्य अथवा मजकूर जाहिरातीत आहे का ?
– जाहिरातीमुळे समाजात शत्रूत्वाची, तिरस्काराची भावना किंवा द्वेष निर्माण होण्याचा संभव आहे का ?
– एखाद्या नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या अथवा उमेदवाराच्या व्यतिरिक्त अन्य त्रयस्थ व्यक्तीने, संस्थेने, ट्रस्टने अथवा सामाजिक संस्थेने समितीकडे जाहिरात प्रमाणीकरणासाठी सादर करताना ही जाहिरात कोणत्याही राजकीय पक्षाच्या, उमेदवाराच्या हितार्थ नसून ती जनहितार्थ प्रसारित करण्यात येणार असल्याचे शपथपत्र अर्जासोबत जोडले आहे का ? हे पाहणे आवश्यक आहे.
– एखाद्या पक्षाने प्रमाणीकरणासाठी अर्ज केला असेल आणि त्या अर्जात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचा उल्लेख नसेल तर जिल्हास्तरीय समिती जाहिरात प्रमाणीत करून देणार नाही, त्यासाठी राज्यस्तरीय समितीकडे अर्ज करावा लागेल.
*एमसीएमसी समितीची कर्तव्ये आणि अधिकार*
– निवडणूक काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमासह इतर माध्यमात प्रसारित होणाऱ्या जाहिरातीच्या मजकुरांचे प्रमाणीकरण केले आहे का?  याच्यावर देखरेख ठेवणे.
– नोंदणीकृत पक्ष अथवा उमेदवार यांच्याकडून छुप्यापध्दतीने जाहिरात करण्यात येते का ? यावर देखरेख ठेवणे.
– प्रसारित झालेल्या जाहिरातींची नोंद उमेदवाराच्या निवडणूक खर्चात होत आहे का ? ते पहाणे. तथापि, जर जाहिरात उमेदवाराच्या मान्यतेने घेतली नसल्यास कलम 171 (एच) च्या भारतीय दंड संहितेंचा भंग केल्या प्रकरणी प्रकाशकावर कारवाई केली जाऊ शकते.
– निवडणूक घडी पत्रिका, पोस्टर्स, माहिती पत्रिका आणि इतर निवडणूक प्रचार साहित्यावर मुद्रक/प्रकाशक आणि प्रतींची संख्या  नियमानुसार नमूद आहे का ? यावर देखरेख ठेवणे. या बाबीचे उल्लंघन झाले असल्यास ते निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देणे.
– उमेदवारांच्या अथवा पक्षाच्या आलेल्या जाहिरातींच्या खर्चाचा रोजचा रिपोर्ट लेखा पथक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या खर्च निरीक्षकाला पाठविणे.
– जाहिरातीचा कोणताही भाग वगळण्याचा अथवा त्यात फेरबदल करण्यास सूचविण्याचा अधिकार समितीला असेल, असे पत्र/संसूचना मिळाल्यानंतर संबंधितांनी 24 तासाच्या आत अनुपालन करून पुनर्विलोकनासाठी आणि प्रमाणीकरणासाठी सामितीकडे सादर करणे आवश्यक आहे.
– जाहिरातीतील मजकूर नियमाप्रमाणे निकषात बसत नसतील आणि जाहिरात प्रसारित करण्यास योग्य नसेल, तर जाहिरातीचे प्रमाणीकरण प्रमाणपत्र नाकारण्याचा समितीला अधिकार आहे.
*अपील आणि कायदेशीर मान्यता*
– कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवाला जिल्हास्तरावरील एमसीएमसी समितीचा निर्णय मान्य नसेल तर त्या आदेशाविरोधात राज्य पातळीवरील एमसीएमसी समितीकडे अपील करता येते.
– सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 13 एप्रिल 2004 रोजीच्या आदेशानुसार निवडणूक आयोगास राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी समिती स्थापन करण्यास प्राधिकृत केले असून समितीचे निर्णय पाळणे सर्वांसाठी कायदेशीररित्या बंधनकारक आहे.
– संग्राम इंगळे,
विभागीय माहिती कार्यालय, पुणे.
(संदर्भ- भारत निवडणूक आयोग)

बँक ऑफ महाराष्‍ट्र तर्फे स्वयंसहाय्यता आणि शेतकर्‍यांसाठी “शेतकरी संपर्क अभियानाचे” आयोजन

0

पुणे-बँक ऑफ महाराष्‍ट्रच्या पुणे पूर्व अंचल कार्यालयातर्फे दिनांक 16 मार्च, 2019 रोजी लोणी काळभोर येथे स्वयं सहाय्यता समूह आणि शेतकर्‍यांसाठी शेतकरी संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले होते ज्यात आसपासच्या परिसरातील बँकेचे सुमारे 1200 ते 1400 ग्राहक सामील झाले होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून त्यांना बँकेच्या विविध कृषी कर्ज योजनांची माहिती देणे आणि त्यांच्यात जागरूकता आणणे हे होते. हा कार्यक्रम लोणी काळभोर येथील जिजाऊ गार्डन येथे करण्यात आला होता.

यावेळी बँक ऑफ महाराष्‍ट्रचे कार्यकारी संचालक श्री हेमन्‍त टम्‍टा यांच्या हस्ते 168 लाभार्थीना रुपये 10कोटी रकमेची कर्ज मंजूरी पत्रे वितरित केली गेली. शेतकर्‍यांशिवाय बँक लघु उद्योग आणि स्वयं सहाय्यता समुहानादेखील कर्ज मंजूर करते जे राज्याच्या आर्थिक विकासामध्ये महत्‍वपूर्ण भूमिका निभावातात.

यावेळी बँक ऑफ महाराष्‍ट्रचे कार्यकारी संचालक श्री हेमन्‍त टम्टा म्हणाले की, “महाराष्‍ट्र राज्याचीअर्थव्‍यवस्‍था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्र तसेच सेवा आणि उद्योग क्षेत्रावर अवलंबित आहे. राज्याच्या एकूणजीडीपीमधील जवळपास 11% सहभाग कृषी क्षेत्रातुन येतो आणि राज्याच्या अर्थव्‍यवस्थेच्या विकासामध्येअभिन्‍न भूमिकेचा दृष्टिकोन राखणारी ही बँक असल्या कारणाने आम्ही शेतकरी आणि स्वयं सहाय्यता समूहयांना आपल्या सेवा अधिक संवेदनशीलतेने देण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे.”

श्री टम्टा पुढे म्हणाले की, या शेतकरी संपर्क अभियानाच्या माध्यमातून विविध कर्ज योजनांवर शेतकरी आणि स्वयं सहाय्यता समूह यांना शिक्षित करण्याचे आमचे ध्येय आहेआम्ही उत्तम कृषी तसेचव्‍यवसाय पद्धतींवर त्यांना अधिक शिक्षित करणे आणि आर्थिक तज्ञांबरोबर चर्चा करण्यासाठी त्यांना व्यासपीठ देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आम्ही  महाराष्‍ट्र राज्यातील शेतकर्‍यांच्या प्रगती आणि समृद्धीच्या कार्यात उत्‍प्रेरकाची भूमिका निभावण्यासाठी तत्पर आहोत.”

या कार्यक्रमामध्ये यशस्वी ग्राहकांचा त्यांच्या उल्‍लेखनीय कार्याबद्दल गौरव करून सम्‍मानित करण्यात आले.

-निवडणूक निर्णय अधिका-यांना इव्‍हीएम-व्‍हीव्‍हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण

0

पुणे– जिल्‍ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना आज इव्‍हीएम-व्‍हीव्‍हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण समन्‍वय अधिकारी डॉ. ज्‍योत्‍स्‍ना पडियार यांनी आज दिले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या या प्रशिक्षणास मावळच्‍या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुरचे रमेश काळे यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते. डॉ. पडियार यांनी इलेक्‍ट्रॉनिक व्‍होटींग मशीन, कंट्रोल युनिट, व्‍हीव्‍हीपॅट यांच्‍या जोडणीचे प्रात्‍यक्षिक करुन घेतले तसेच शंकांचे निरसन केले. 

वंचित बहुजन आघाडीच्या ३७ उमेदवारांची मदार आंबेडकर आणि ओवेसींंच्या भाषणांंवरच

0

पुणे-आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी राज्यातील ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पुणे लोकसभेसाठी अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर मावळ लोकसभा मतदारसंघातून राजाराम पाटील आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून नवनाथ पडळकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.यातील बहुसंख्य उमेदवारांची नावे अल्पपरिचित असल्याने आता या उमेदवारांची मदार प्रचार यंत्रणा आणि खुद्द आंबेडकर -ओवेसी यांच्या सभांवरच अवलंबून असणार आहे .मनसेच्या राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते,पण मनसेला त्या प्रमाणात मतदान होत नाही . आता या दोघांच्या सभांनी मतदानात काय आणि कशाप्रके उत्साह किंवा परिवर्तन होईल हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ११ मतदारसंघ वगळता उर्वरित ३७ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्याअंतर्गत पुण्यातून अनिल जाधव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक आणि शेतकरी असलेले अनिल जाधव राज्यातील वडार सामाजिक संघटनेचे तरुण नेते असून, गेल्या १२ वर्षांपासून विविध सामाजिक कामात सहभागी आहेत. ते पुणे जिल्हा येरवडा मध्यवर्ती कारागृह अभिविक्षक समितीचे माजी सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षातही ते कार्यरत होते. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत जानेवारीत पिंपरी येथे झालेल्या सभेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. येणाऱ्या काळात वंचितांची ताकद दाखवून देऊ, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला होता.

उमेदवारीवरून चर्चेला उधाण

अॅड. आंबेडकर यांनी कोल्हापूर येथील सभेत वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेसाठी विठ्ठल लक्ष्मण सातव यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. मात्र, शुक्रवारी अचानक वंचित बहुजन आघाडीतर्फे पुणे लोकसभेसाठी अनिल जाधव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे खुद्द प्रकाश आंबेडकरांनी घोषणा करून अंतिम उमेदवार यादीत विठ्ठल सातव यांचे नाव नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.