Home Blog Page 297

भारत माता की जय च्या जयघोषात रिपाइंची ‘भारत जिंदाबाद रॅली’ संपन्न

0

पुणे : पाहेलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून बदला घेतला. पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी, त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, देश सैन्यासोबत असल्याचे दाखवून देण्यासाठी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने शनिवारी ‘भारत जिंदाबाद रॅली’  चे आयोजन करण्यात आले होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुनीता वाडेकर, संघमित्रा गायकवाड, मंगल रासगे व रिपब्लिकन पक्षांच्या महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  ‘भारत जिंदाबाद रॅली’ ला सुरुवात झाली. भारत माता की जय..,   पाकिस्तान मुर्दाबाद..,  भारतीय सैन्याचा विजय असो.., अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.   रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांनी फक्त तिरंगी झेंडे हातात घेतलेले होते. 

रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, असित गांगुर्डे, शैलेंद्र चव्हाण,अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, बसवराज गायकवाड, वसंत बनसोडे, भगवान गायकवाड, वीरेन साठे, सुनिता वाडेकर, हिमाली कांबळे, संघमित्रा  गायकवाड, मंगल रासगे, सुन्नाबी शेख, संदीप धाडोरे, महादेव दंदी, लियाकत शेख, विनोद टोपे, शामशुद्दीन शेख, अविनाश कदम, कपिल जगताप, फिरोज खान, हबीब सैय्यद, भारत भोसले, चांदणी गायकवाड, सविता शेलार, शाम गायकवाड, निलेश गायकवाड, आकाश बहुले, के. जी. पवळे,  हनुमंत गायकवाड, उद्धव चिलवंत, दादा वारभुवन, रमेश तेलवडे, अतुल भालेराव, शांतीनाथ चव्हाण, राजेश गाढे, वैभव पवार,  स्वप्नील जाधव,  रोहित कांबळे, अप्पा वाडेकर, रामभाऊ कर्वे,  दीपक इसावे,  गोविंद साठे, शशांक माने, सुशील मंडल, तानाजी तापकीरे,  विशाल ओव्हाल, अरविंद शिंदे, आनंद लवटे, आनंद कांबळे, विशाल ओव्हाल, गौतम कदम, संजय बनसोडे, विक्की वालके, फक्कडराव शेळके, नंदा निकाळजे, कलावती भंडारे, निर्मला कांबळे, शोभा गायकवाड, आरती देटे, नंदा गायकवाड, अनिता कांबळे, सुनिता गायकवाड, शांता कांबळे, भारताबाई कराळे, सूरज जाधव, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, बाळासाहेब शेलार, रावसाहेब झेंडे, अंकिता भालेराव, शिवाजी गायकवाड, निलेश आल्हाट, अक्षय गायकवाड, बाळासाहेब खंकाल यांच्यासह रिपाइं चे पदाधिकारी कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. 

भर पावसात निघालेल्या या ‘भारत जिंदाबाद रॅली’ मध्ये कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. बंड गार्डन पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड सर व रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यानंतर शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने ‘भारत जिंदाबाद रॅली’ चा समारोप झाला.

उत्तम लेखणी आणि वाणी हे डॉ. सबनीस यांचे वैशिष्ट्य : डॉ. शां. ब. मुजुमदार

भाषणे, प्रस्तावनांची जागतिक नोंद झाल्याबद्दल गौरव-मनोहर कोलते मैत्र संघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : उत्तम लेखणी आणि वाणी हे डॉ. श्रीपाल सबनीस यांचे वैशिष्ट्य असून ते जनसामन्यांमध्ये सुप्रसिद्ध आहेत. आतापर्यंत झालेल्या संमेलनाध्यक्षांकडून साहित्य क्षेत्रात जे कार्य झाले नाही ते कार्य गेल्या आठ वर्षांत डॉ. सबनीस यांच्याकडून झाले आहे. यामुळेच ते जनसामान्यांसह असामान्य व्यक्तीमत्त्वांचेही आवडते लेखक व वक्ते आहेत, असे गौरवोद्गार सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी काढले.

प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या संमेलनाध्यक्ष पदावरील विविधांगी कर्तृत्वाची नोंद जागतिक पातळीवर ‌‘हाय रेंज वर्ल्ड रेकॉडॅस्‌‍‌’ या संस्थेने घेतली आहे. डॉ. सबनीस यांनी संमेलनाध्यक्ष हे पद भूषविल्यानंतर गेल्या 8 वर्षांतील 1648 भाषणांची व 507 प्रस्तावनांची नोंद घेऊन ‌‘वर्ल्ड रेकॉर्ड‌’ म्हणून मान्यता दिली आहे. या विश्वविक्रमाबद्दल मनोहर कोलते मैत्र संघ, पुणे संस्थेतर्फे त्यांचा सत्कार आज (दि. 24) डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते झाला. त्या वेळी डॉ. मुजुमदार बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डॉ. माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हैद्राबाद येथील हाय रेंज वर्ल्ड रेकॉर्डस्‌‍ या संस्थेतर्फे मिळालेले मानपत्र, मानचिन्ह, पदक मान्यवरांच्या हस्ते डॉ. सबनीस यांना प्रदान करण्यात आले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, माजी आमदार दीपक पायगुडे, समीक्षक डॉ. केशव देशमुख, मनोहर कोलते उपस्थित होते.

डॉ. शां. ब. मुजुमदार पुढे म्हणाले, केवळ आठ वर्षांत मोठ्या संख्येने दिलेली भाषणे आणि विविध जाती-धर्माच्या लेखकांच्या पुस्तकांसाठी प्रस्तावना लिहिणे हे सोपे कार्य नाही. प्रस्तावना लिहिताना पुस्तकाचे सखोल वाचन, लेखकाची मानसिकता ओळखणे, त्याला काय सांगायचे आहे हे समजून घेणे आवश्यक असते. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी लिहिलेल्या प्रस्तावना इतक्या उत्तम असतात की, मूळ पुस्तक वाचण्याची आवश्यकताही भासू नये. त्यांच्या या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली याचा मनस्वी आनंद आहे.

डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, डॉ. सबनीस हे हरहुन्नरी व्यक्तीमत्त्व असून साहित्य क्षेत्रातील त्यांचा व्यासंग सखोल आहे. वैचारिक व्यासपीठ उभे करणाऱ्या साहित्यिक प्रस्तावना त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिल्या आहेत. उत्तम लेखक व वक्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ध्येयाने प्रेरित होऊन नवलेखकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य डॉ. सबनीस करत आहेत.

कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी प्रास्ताविकात मनोहर कोलते यांनी माहिती विशद केली. गिर्यारोहक स्मिता घुगे यांच्या सहकार्यामुळे विक्रमाची नोंद करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सबनीस हे साहित्य क्षेत्रातील महान कर्मयोगी, निष्ठावान, अभ्यासू व्यक्तीमत्त्व असल्याचे गौरवोद्गार दीपक पायगुडे यांनी काढले. डॉ. केशव देशमुख यांनी डॉ. सबनीस यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेतला. ह. भ. प. विजय बोथरे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान थिटे यांनी केले तर आभार शैलेद्र भालेराव यांनी मानले.

कोथरूडसह पुण्यात कुठेही पाणी साचू नये याची दक्षता घ्या!नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

समस्यांचे जलदगतीने निराकरणासाठी नोडल अधिकारी नेमण्याची सूचना

पुणे-हवामान विभागाने यंदा ११७ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पूर्वीचे अनुभव पाहता; ज्या दिवशी अतिरिक्त पाऊस होईल, त्या दिवशी कोथरुडसह शहरात कुठेही पाणी साचणार नाही, ते प्रवाहित होईल; याची दक्षता घ्या, अशा सूचना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. तसेच, पावसमुळे निर्माण होणाऱ्या समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी कोथरुड मतदारसंघात एक नोडल अधिकारी नेमावा, अशी सूचना ना. पाटील यांनी यावेळी दिली.

कोथरुड मतदारसंघातील पावसाळापूर्व कामांचा आढावा ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज घेतला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी., ओमप्रकाश दिवटे, दिनेश गोमारे, आपत्ती व्यवस्थापनचे उपायुक्त गणेश सोनुने, आशा राऊत, कर विभागाचे अविनाश संकपाळ यांच्या सह महापालिकेचे इतर अधिकारी, तीनही प्रभागातील विविध विभागांचे अधिकारी, भाजप कोथरूड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांच्या सह सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी यांनी पुणे शहरासह कोथरूड मतदारसंघातील पावसाळी पूर्व कामांची माहिती ना. पाटील यांना दिली. यात प्रामुख्याने पाणी वाहून नेणाऱ्या शहरातील २०१ मुख्य नाले असून; त्यापैकी १५ नाले हे कोथरुड मतदारसंघात असल्याची माहिती दिली. ह्या नाल्यांची सफाई ८० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित काम जलदगतीने पूर्ण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर नामदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, पुणे शहरासह मतदारसंघातील नाले सफाईची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या. तसेच,मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी १०० स्वयंसेवक नेमावी. त्यासोबतच, महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या पावसाळा पूर्व कामांची पाहणी २४ तासांत अहवाल सादर करावा, अशा सूचना कोथरुड मधील सर्व माजी नगरसेवकांना केल्या.

यावेळी क्षेत्रीय कार्यालयांना कोणतेही अधिकार नसल्याने, दरवेळी अधिकाऱ्यांना कामांसाठी मुख्यालयात जावे लागते, त्यामुळे अनेक नागरी समस्या दीर्घकाळ रेंगाळतात, असा मुद्दा बैठकीत मांडला गेला. त्यावर नामदार पाटील यांनीही हा प्रश्न सुटला पाहिजे; अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. यांनी अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन क्षेत्रीय कार्यालयांना निधी उपलब्ध करून देण्यास सकारात्मकता दर्शविली. तसेच, पावसाळ्यात अनेक भागात दुषित पाणी पुरवठ्याची समस्या मांडण्यात आली. ही गंभीर बाब असल्याने त्याचेही नियोजन करण्याची सूचना ना. पाटील यांनी यावेळी केली. दरम्यान, या बैठकीत वीजपुरवठा खंडित होणे, झाडांच्या फांद्या वेळेत काढणे यांसह इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

लोकांना लुटणाऱ्या खराडी येथील कॉल सेंटरवर छापा:गुजरात आणि राजस्थानच्या ५ भामट्यांना अटक: पुणे पोलीसांची धडाकेबाज कारवाई.

पुणे-अमेरिकन नागरिकांना सायबर गुन्ह्यातील डिजीटल अरेस्टची भिती दाखवुन मिलियन्स यु.एस. डॉलर ला गंडा घालणारी खराडी येथील कॉल सेंटर कंपनीवर छापा टाकुन पुणे पोलीसांची धडाकेबाज कारवाई केली आहे.हे कल सेंटर चालविणाऱ्या गुजरात आणि राजस्थानच्या ५ जणांना अटक केली आहे. यांच्याकडे १११ पुरुष व १२ महिला कामाला ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
प्राईड आयकॉन खराडी मुंढवा रोड पुणे या बिल्डिंगमध्ये ०९ व्या मजल्यावर मैग्नेटेल बीपीएस अॅण्ड कन्सल्टंस एलएलपी हे अनाधिकृत कॉल सेंटर सुरु असुन या कॉल सेंटरमध्ये अमेरिकन नागरीकांना त्यांचे अॅमेझॉन खात्याचा गैरवापर झाला असुन त्यातुन ड्रग्जची तस्करी झाल्याचे सांगुन त्यांना डिजीटल अटकेची भिती दाखवुन त्यांची फसवणुक करण्याकरीता बोगसकॉल सेंटर चालविले जात आहे. अशी गुप्त बातमी मिळाल्याने वरिष्ठांच्या पुर्व परवानगीने सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर व गुन्हे शाखा, पुणे कडील पोलीस अधिकारी व स्टाफ असे तात्काळ मैग्नेटेल बीपीएस अॅण्ड कन्सल्टंस एलएलपी, प्राईड आयकॉन, ०९ वा मजला, खराडी, मुंढवा रोड, पुणे या ठिकाणी येवुन सदर कॉल सेंटर बाबत खात्री करुन शिताफिने मैग्नेटेल बीपीएस अॅण्ड कन्सल्टंस एलएलपी येथे मध्यरात्री छापा टाकला असता सदरचे कॉल सेंटर हे विनापरवाना चालवत असुन तेथे अनधिकृत कॉल सेंटर चालु असल्याचे निदर्शनास आले.
सदर अनधिकृत कॉल सेंटर मैग्नेटेल बीपीएस अॅण्ड कन्सल्टंस एलएलपी ची तपासणी केली असता आरोपी १) सरजितसिंग गिरावत सिंग शेखावत, सध्या रा. खराडी, पुणे मुळ रा. झुंझुना, राजस्थान २) अभिषेक अजयकुमार पांडे, सध्या रा. खराडी, पुणे मुळ रा. अहमदाबाद, गुजरात ३) श्रीमय परेश शहा, सध्या राखराडी, पुणे मुळ रा अहमदाबाद, गुजरात, ४) लक्ष्मण अमरसिंग शेखावत, सध्या राखराडी, पुणे मुळ रा. अहमदाबाद, गुजरात, ५) अॅरोन अरुमन खिश्चन, सध्या राखराडी, पुणे मुळ रा अहमदाबाद, गुजरात हे सायंकाळी ०६.०० वा ते पहाटे ०२.०० वा पर्यत अमेरिकन वेळेनुसार कॉल सेंटर चालवत असुन कॉल सेंटरमध्ये १११ पुरुष व १२ महिला काम करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांचेकडील लॅपटॉपची पाहणी केली असता कॉलसेंटर मध्ये वरिल आरोपी व कर्मचारी हे लॅपटॉपमध्ये अनेक संशयास्पद अॅप्लीकेशनचा, व्हिपीएन सॉफ्टवेअर चा वापर करुन कॉलर माईकव्दारे अमेरिकन नागरीकांना त्यांचे मोबाईल क्रमांकावर संपर्क करुन अॅमेझॉन अकाउंटचा बेकायदेशिर वापर होत असुन त्यामधुन ड्रग तस्करी केली जात असुन तेथील नागरिकांना डिजीटल अरेस्टची भिती दाखवुन त्यांना गिफ्ट कार्ड विकत घेण्यास भाग पाडुन ते गिफ्ट कार्ड आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरत असल्याचे निष्पन्न झाले. याकरीता त्यांचेकडे अमेरिकन नागरिकांच्या मोबाईल क्रमांकाचा लाखांच्या सख्येतील डेटा लॅपटॉपमध्ये मिळुन आलेला आहे.वरिल ५ आरोपी यांना पोलीसांनी शिताफिने ताब्यात घेतलेले असुन मैग्नेटेल बीपीएस अॅण्ड कन्सल्टंस एलएलपी, या अनधिकृत कॉल सेंटरमध्ये ९,६०,०००/- रु किं. एकुण ६४ लॅपटॉप, ४,१०,०००/- रु किंएकुण ४१ मोबाईल फोन, तसेच ४००० रु किं. एकुण ०४ राउटर, कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचा-यांची ओळखपत्र तसेच अमेरिकन नागरीकांना फसवणुक करण्यासाठी कर्मचा-यांना दिलेली इंग्रजीमधील संवादाची स्क्रिप्टची कागदपत्रे, इ. असा एकुण १३,७४,०००/- रु किं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरबाबत सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजिनं ५७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चेकलम ३१६(२), ३१८(४),६१ (१), ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (क), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील आरोपी यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर सायबर गुन्हे करण्याचे कनेक्शन तपासात निष्पन्न झाले असुन गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असुन सदर गुन्ह्यात आरोपी यु.एस डॉलर ची फसवणुक रक्कम भारतीय बँकांचा वापरकरुन हवाला किंवा क्रिप्टो करन्सी मार्फत फिरवतात किंवा त्याची मोठ्या प्रमाणात आफरातफर करीत आहेत याबाबत तपास पथक गुन्ह्याचा तांत्रिक व क्लिष्ट सखोल तपास करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेशकुमार,पोलीस सह आयुक्त रंजनकुमार, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) निखिल पिंगळे, मा. पोलीस उप आयुक्त (आर्थिक व सायबर), विवेक मासाळ सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, सायबर पो. ठाणे, पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उप निरीक्षक, तुषार भोसले, पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे, पोलीस उपनिरीक्षक राम दळवी, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहा. पोलीस फौजदार कैलास चव्हाण, सहा. पोलीस फौजदार अविनाश इंगळे, पोलीस अंमलदार होले, वाघमारे, विजय पवार, बाळासाहेब सकटे, निलेश जाधव, हरीष मोरे, पोलीस अंमलदार विशाल इथापे, देविदास वांढरे, अमित जमदाडे, पो. अमंलदार ऋषिकेश व्यवहारे, निखीलजाधव, महिला पोलीस अंमलदार सीमा सुडीत, स्मिता हंबीर, जान्हवी मडेकर, पोलीस अंमलदार संदीप पवार, मांढरे, दिनेश मरकड, सचिन शिंदे, प्रविण रजपुत यांनी सदरची कामगिरी केली आहे.

जुन्नरमधील बोरी ३३/११ केव्ही वीज उपकेंद्र सहा महिन्यांत पूर्ण करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २४ मे २०२५: जुन्नर तालुक्यातील बोरी (बु.) येथील महावितरणच्या नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्राची उभारणी येत्या सहा महिन्यांत पूर्ण करावी. बोरी बुद्रुक व शिरोली परिसरातील १२ गावांमधील प्रामुख्याने घरगुती, कृषिपंप व इतर ग्राहकांना या उपकेंद्रामुळे दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा मिळणार आहे. उपकेंद्रांची उभारणी वेळेत व दर्जेदार होईल याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. अजित पवार यांनी शनिवारी (दि. २४) दिले.

महावितरणच्या मंचर विभाग अंतर्गत जुन्नर तालुक्यातील नवीन बोरी बुद्रुक येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन ना. श्री. अजित पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार श्री. दिलीप वळसे पाटील, माजी आमदार श्री. अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष श्री. सत्यशिल शेरकर, बोरी (बु)च्या सरपंच श्रीमती वनिताताई डेरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य श्रीमती आशाताई बुचके, श्री. पांडूरंग पवार उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूडी, महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे, अधीक्षक अभियंता श्री. युवराज जरग, कार्यकारी अभियंता श्री. शांताराम बांगर उपस्थित होते.

जुन्नर तालुक्यातील बोरी (बु) व परिसरातील गावे व वाड्या वस्त्यांना महावितरणच्या शिरोली येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र शिरोलीचे उपकेंद्र अतिभारित झाल्यामुळे वीजपुरवठा कमी दाबाने होतो व खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. यावर उपाय म्हणून बोरी (बु.) येथे कृषी धोरण २०२० योजनेतून ९ कोटी ८६ लाख रुपये खर्चाचे नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्र उभारण्यात येत आहे. या उपकेंद्रातून ११ केव्हीच्या ६ वीजवाहिन्या निघणार आहे. त्याद्वारे बोरी बुद्रुक, बोरी खुर्द, कोरडेमळा, माळवाडी, साईनगर गावठाण, शिंदेमळा, बोरी खुर्द गावठाण, वसईमळा तसेच वाड्यावस्त्यांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.

सोबतच सध्या अतिभारित शिरोली उपकेंद्राचा वीजभार देखील कमी होणार आहे. त्याचा फायदा औरंगपुरा, निमगाव, सावा, शिरोली, सुलतानपूर आदी गावांना होणार आहे. या उपकेंद्रासाठी ३३ केव्ही व ११ केव्हीच्या २४ किलोमीटर उपरी तर ७ किलोमीटर भूमिगत नवीन वीजवाहिन्या टाकण्यात येतील. तसेच उपकेंद्रामध्ये ५ एमव्हीएचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबतच सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी काम करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

पुणे, दि.24: महाराष्ट्र पोलीस दलातील शूर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविला आहे, यामुळे पोलीस दलाचा एक गौरवशाली इतिहास आहे; यापुढेही अशाच पद्धतीने देशासह जागतिक पातळीवर पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबत पोलीस दलाचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगले काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अधिनस्त नारायणगाव पोलीस ठाणे नवीन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री धीरबस्सी, उप विभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर आदी उपस्थित होते.

नागरिकांच्या अपेक्षापूर्ती करण्याकरीता काम करावे

श्री. पवार म्हणाले, पोलीस ही शासन व्यवस्थेतील महत्त्वाची संस्था असून शासनाचा दृश्य प्रतिनिधी म्हणून ते काम करीत असतात. पोलीस दलाकडून देण्यात येणाऱ्या वागणुकीवर समाजात पोलीस दलाची पर्यायाने शासनाची प्रतिमा निर्माण होत असते.

पोलीस ठाण्यात आल्यानंतर नागरिकांना चांगली सेवा मिळाली पाहिजे, समाजातील अपप्रवृत्तीस प्रतिबंध घालण्यासोबतच चुकीचे काम करणाऱ्यांना शासन झाले पाहिजे, त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था सुस्थितीत राहिली पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांची असते. त्यामुळे शासन म्हणून नागरिकांच्या अपेक्षापूर्ती करण्याकरीता काम स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने काम करावे.

पोलीस दलाला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे राज्य शासनाची जबाबदारी

राज्यात 21 हजार कोटी रुपये सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीला उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यापैकी पोलीस दलाच्या पायाभूत सुविधांकरिता 600 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये राज्यात 1 हजार 400 कोटी रुपयाचा सर्वाधिक निधी पुणे जिल्ह्याला दिला असून यापैकी 42 कोटी रुपये जिल्हा पोलीस दलाकरिता मंजूर करण्यात आले. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्हा ग्रामीण दलाने एकत्रितरित्या समन्वयाने सायबर गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना, अँटी ड्रोन गन, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहने अशाप्रकारे नागरिकांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने प्राधान्याने पोलीस दलासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींवर भर देण्याचा सूचना दिल्या आहे.

राज्य शासनाच्या कार्यालयांच्या नूतनीकरणावर भर

राज्य शासनाच्या कार्यालयाच्या इमारतींचे नूतनीकरणावर भर देण्यात येत असून त्यानुसार सर्वत्र काम सुरु आहे. आज नारायणगाव पोलीस ठाण्याची 3 एकर जागेपैकी 10 गुंठ्यांत हे नवीन इमारतीचे काम झाले असून शहराच्या वैभवात भर पडली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोय झाली आहे. तसेच नागरिकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना आणखीन वाढेल. त्यामुळे पोलीस ठाण्याचा कारभार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासोबतच त्यांचा विश्वास संपादन करणारा असावा.

पोलीस दलाकरिता निवास्थानाचे बांधकाम करण्यात येईल

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने सेवा देता यावी, त्यांच्या कुटुंबियाची सोय व्हावी याकरीता नारायणगाव पोलीस स्टेशन परिसरात 10 पोलीस अधिकारी व 100 अंमलदारांकरिता निवासस्थाने बांधकाम करण्यात येईल, असेही श्री. पवार म्हणाले.

श्री. गिल्ल म्हणाले, नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 19 गावे असून या पोलीस ठाण्यांतर्गत निमगावसावा येथे दुरक्षेत्र आहे. या पोलीस ठाण्यांतर्गत 4 अधिकारी व 46 अंमलदार आहेत. पोलीस स्टेशनची इमारत जुनी झाल्याने नवीन इमारतीबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य पोलीस निर्माण व कल्याण महामंडळ मर्यादीत मुबंई यांच्याकडून पोलीस स्टेशन करीता 18 एप्रिल 2023 रोजी नवीन इमारत बांधकामास मंजूरी मिळावी. या इमारतीचे 5 कोटी 6 लाख रुपये खर्च करून 27 जानेवारी 2025 रोजी पूर्ण करण्यात आले आहे.

यामध्ये सोलार पॉवर जनरेशन, वर्षा जलसंधारण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) स्वतंत्र पाण्याची टाकी, फर्निचर व इतर सर्व सुविधांसह सुसज्ज इमारत आहे. नवीन इमारतीमध्ये अभ्यंगत कक्ष, भव्य बैठक कक्ष, हिरकणी कक्ष, विश्रांती कक्ष पोलीस ग्रंथालय, पोलीस कवायत मैदान, रनिंग ट्रॅक, हॉलीबॉल मैदान, जनसेवा केंद्र, महिला मदत केंद्राची निर्मिती केली असून महिला व वृद्धाच्या मदतीकरिता निर्भया पथक, भरोसा सेल, महिला दक्ष संमती, जेष्ठ नागरीक मदत केंद्र आदी कार्यरत आहेत.

मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार 100 दिवस कृती आराखडाअंतर्गत पुणे विभागातून नारायणगाव पोलीस यांनी प्रथम कंमाक मिळविला आहे तसेच स्मार्ट ए प्लसप्लस आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.

नारायणगाव पोलीस ठाण्यापासून जवळच मंचर पारगाव, आळेफाटा, जुन्नर, ओतूर ही पोलीस ठाणी असून नारायणगाव पोलीस ठाणे परिसरात 10 पोलीस अधिकारी व 100 अंमलदाराकरिता निवासस्थाने बांधकाम करण्यास मान्यता मिळण्याची मागणी श्री. गिल्ल यांनी केली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषीरत्न अनिल मेहर,

नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नारी शक्तीचा सन्मान एक ऊर्जावान  स्त्रोत-शास्त्रज्ञ डॉ. भूषण पटवर्धन

0


पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड जीवनगौरव पुरस्कार वितरण
डॉ. भूषण पटवर्धन व बडोदा संस्थानचे जितेंद्रसिंह गायकवाड  जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत

पुणे, दि.२४ मे: ” क्षमा, शौर्य, धर्म आणि नितीच्या तत्वांचा समावेश असलेला हा पुरस्कार एक  ऊर्जावान  आहे. आपल्या क्षेत्रात अमूल्य योगदान देऊन समाजाला प्रेरणा देण्याचे कार्य करणार्‍या नारी शक्तीचा हा विशेष सन्मान आहे. मूल्य, मातृत्वप्रेम आणि वारकरी संप्रदायाचे हे प्रतिक आहे. दूरदृष्टी ठेवून विश्वधर्मी डॉ. कराड यांनी नारी शक्तीच्या गौरवासाठी सुरू केलेल्या या पुरस्काराला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांनी आधुनिक काळात नव्याने सशक्तीकरणाच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली आहे.” असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व शास्त्रज्ञ डॉ. भूषण पटवर्धन यांनी केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे यांच्या वतीने विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रूई), ता.जि. लातूर येथे त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या बाराव्या पुण्यस्मरण स्मृतिदिनाचे औचित्य साधून पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
बडोदा संस्थानचे जितेंद्रसिंह गायकवाड हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
या प्रसंगी ज्ञानविज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे सेवाभावी कार्य, समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणार्‍या बडोदा येथील बडोदा संस्थानच्या महाराणी सौ. आशाराजे संग्रामसिंहराजे गायकवाड, ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती भारती ठाकूर, राजस्थान येथील ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ पीस अँड वेलबिईंगच्या राजयोगिनी डॉ. बिन्नी सरीन आणि बद्रिनाथ धाम येथील माणा गावाच्या शिक्षिका व समाजसेविका श्रीमती दमयंती जितवान आणि आळंदी येथील श्रीमती रमाबाई किसन महाराज साखरे यांच्या वतिने (श्रीमती कुलकर्णी ) या पंचकन्यांना पूर्णब्रह्मायोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, स्मृतिपदक व रोख रु. १,२५,०००/- (सव्वा लक्ष रुपये )असे पुरस्काराचे स्वरुप होते.
या प्रसंगी बडोदा संस्थानाचे जितेंद्रसिंह गायकवाड आणि डॉ. भूषण पटवर्धन यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. त्याच प्रमाणे विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचाही विशेष सत्कार ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने डॉ. बिन्नी सरीन यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास ह.भ.प. तुळशीराम कराड, प्रगतीशील शेतकरी काशीराम कराड, डॉ. हनुमंत कराड, प्रा. डॉ. सुचित्रा नागरे, प्रा. स्वाती चाटे, पूनम कराड नागरगोजे, डॉ. विश्वजीत नागरगोजे, कमल राजेखाँ पटेल, ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर, राजेश कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले,” ज्या देशात महिलांचा सन्मान होतो त्याच देशाची संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ ठरते. रामेश्वर गाव आदर्श होण्यामागे मातृशक्ती आहे तेव्हा मातृप्रधान संस्कृती टिकली पाहिजे. त्यागमुर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या पंचकन्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे ”
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, “विश्वधर्मी मानवता तीर्थ म्हणून रामेश्वर गावची देशभर ओळख निर्माण झाली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे मुर्तीमंत प्रतिक त्यागमूर्ती अक्का आहेत. ईश्वर ही व्यक्ती नाही तर शक्ती आहे. रामेश्वर येथे मानव एकतेचे मोठे प्रतिक निर्माण केले गेले आहे. अक्कांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कारातील सर्वच पंचकन्यांचे कार्य महान आहे.”
जितेंद्रसिंह गायकवाड म्हणाले,”कराड सरांचे जे व्हिजन आहे त्यानुसार मला सयाजी गायकवाड यांनी १९०६ मध्ये सुरू केलेल्या पुरस्कारांची आठवण होते. मी याच मातीचा आहे. मला उस्मानाबाद, तुळजापूर सहित ७३ गावांची इनामी मिळाली होती. आज जीवन गौरव पुरस्कारने सन्मानीत केल्यामुळे ही अतिशय आनंदीत आहे.”
पुरस्कार प्राप्त पंचकन्यांचे अभिनंदन केल्यानंतर बडोदा संस्थानच्या महाराणी आशाराजे संग्रामसिंहराजे गायकवाड म्हणाल्या,”अतिशय कणखर व संत प्रवृत्तीच्या त्यागमूर्ती अक्का यांच्या नावाने मला जो पुरस्कार दिला त्याबद्दल आभार. गायकवाड घराणे आणि नेपाळ मधील राजघराण्यात माझे व्यक्तीमत्व प्रगल्भ होत गेले. त्यामुळेच माझा हा सत्कार झाला.”
भारती ठाकूर म्हणाल्या,”विश्व स्वधर्मे सूर्य पाहो, या नुसार अशी अनुभूती झाली की येथे पांडुरंगांच्या भक्त मंडळांचे सम्मेलन भरले आहे. विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर रुई येथील राम रहिम सेतू ही अतिशय सुंदर संकल्पना आहे. या भूमितच विश्वधर्म संकल्पना रुजलेली आहे. कराड परिवारांचे कार्य संपूर्ण जगभर पसरो.”
राजयोगिनी डॉ. बिन्नी सरीन म्हणाल्या,” डॉ. कराड यांच्या दृढ संकल्पाने गावात बदल घडला आहे. त्यांनी शांती, एकता आणि बंंधुत्वासाठी जीवन समर्पित केले आहे. त्यांच्यात सतत नवीन आशा, चेतना आणि ऊर्जेचा अनुभव होत असतो. कणखर व्यक्तिमत्वाच्या अक्का यांच्या नावाचा पुरस्कार स्विकारून मी स्वतःला खूप भाग्यशाली समझते.”
अक्कांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मी माणा गावात कार्य करण्याचे आश्वासन दमयंती जितवान यांनी दिले.
या वेळी डॉ. एस.एन.पठाण यांनी येथे सर्व संमतीने पारीत करण्यात आलेल्या ठरावे वाचन केले. ‘हा ठराव हिंदुत्व याचा अर्थ भारतीय एकात्मता आणी याच्या माध्यमातून सर्व जाती धर्मांच्या लोकांमध्ये एक दुसर्‍यांमध्ये बंधुत्व राहिल, तसेच भारत देशात आणि संपूर्ण जगात विश्वशांतीसाठी कार्य करण्याचा आहे.’
प्रा.स्वाती कराड चाटे यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की, हा पुरस्कार एका कणखर दूरदृष्टी नेतृत्व असणार्‍या अक्कांच्यामुळे आहे. त्यांचे व्यक्तिमत्व हे अध्यात्मिक होते. त्यांनी कराड घराण्याची जडण घडण केली आहे.
डॉ. मिलींद पात्रे यांनी सुत्रसंचलन केले. डॉ. सुचित्रा नागरे यांनी आभार मानले.

कोल्ह्यांचा हल्ला चुकवला ;जंगलातील चिखल तुडवून रात्रभर वीजयंत्रणेची दुरुस्ती पूर्ण…

 वेल्हासह ४१ गावांचा विळखा सुरू आहे

पुणे, दि. २४ मे २०२५ : कामथडी ते पाबे (ता. राजगड, जि. पुणे) सुमारे ४० किलोमीटर लांब ३३ केव्ही पाबे वीजवाहिनी तारा शुक्रवार (दि. २३) शनिवार ११.३० च्या स्थानिक तुटल्या. ४१ गावे, वाड्या वस्त्य ६ हजार ग्राहकांचे वाटा खंडित झाले. मात्र भर पावसात महाअभियंता व विरतेच्या जंगलातील चिखल तुडवत, कोल्ह्यां चा संकटे अनेक धोके पत्करत रात्रीभर वीजयंत्रणेचे काम केले. खूप मतदान (२४) सकाळच्या अनुभव वेल्हा, पाबे वाजे घर आदींसह ४१ गावे आणि वाड्यावस्त्यांचा वीज लाभ सुरळीत

खाली अशी की, महावित नसरापूर उपविभाग अंतर्गत पाबे ३३ केव्ही वीजवाहिनीद्वारे राजगड (वेल्हे माहिती) महिलांच्या पाबे ३३ केव्ही उपेंद्रांला लाभ लाभ दिला. या उपकेंद्र संच चार वीजांद्वारे वेल्हा गाव, पाबे, दापोडी, विंभूळ, वाजेघर, पाल आदींसह सुमारे ६ हजार वस्त्ये, व्यावसायिक व शेतीपंपांना गाव गावे होते. मात्र, ४० किलोमीटरची चौकी आणि पूर्णतः जंगलात पाबे वीजवाहिनीमध्ये (दि. ११. २३) शनिवार ३० च्या घटना बिघाड झाल्या. या सर्व ग्राहकांचा वीज खंडित झाला.

महावितरणकडून पुढीलच बिघाड शोधण्याचे काम सुरू झाले. सातारा समुद्रतळारण येथील निबिड जंगल वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाने चार वीज खाबांवरील तारा तुटले लोक आले. ज्या ठिकाणी वीजतारा तुटल्या त्या ठिकाणी जाणे जास्त धोक्याचे व जिकरीचे होते. भाताच्या खाड्यात आणि जंगलातले निसर चिखल चालणे स्वस्थ बसले होते. मात्र उपकार्यकारी अभियंता श्री. नवनाथ घाटूळे, वेल्हाचे अधिकारी कनिष्ठ अभियंता सचिन कुलकर्णी मुजावर, सूर्यकांतवीर, गणेश, राहुल भुरूक, रवी कातुरडे, नीलेश शेंडकर, गणेश गायके, अमोल डांगे, चेतन चोरगे, अमोल भोरे या १० तंत्रज्ञ समुच्चयांचा निर्णय घेतला. थेट या १२ प्रकाशदूतांनी भर पावसात जंगलातून पायदळ सामुग्री नेत मोबाइल, साधनाच्या उजेडात तुटलेल्या जोडण्याचे काम १२.१५ मध्यरात्री सुरू केले. रानडुक्क कोल्ह्यांचे वावर व सर्व सावध होते. प्रधान तंत्रज्ञ समीर मुजावर कोल्हे सैनिकांच्या तयारीत असताना दोन-ती सहकाऱ्यांनी आरडाओरड केली. कोल्ह्यांच्या तोंडावर प्रकाशझोत टाकला. ते कोल्हे पाऊन गेले.

पाबे वीजेच्या तुटलेल्या तारा जोडण्याचे ० टक्के काम तास पूर्ण सहकार्य किरकोळ यात आली आणि पाबे ३३ केव्ही उपकेंद्राचा मुलगा मिळाला. त्यानंतर या उपेंद्र चार वीजेद्वारे १०.१५ च्या सर्वेच ६ हजार शेतकरी, व्यावसायिक व शेतीपंपांचे शेतकरी शेतकरी . तत्पर ग्राहक सेवेसाठी प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीशी झुंज वीज वीज अनुभव सुरळीत प्रकाशदूतांचे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांनी कौतुक केले आहे.

रखडलेल्या महापालिका निवडणुका कधी होणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितला महिना

राज्यातील महापालिका निवडणुका येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यानंतरच लागणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.


सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मनपाच्या निवडणुका लागण्याची शक्यता असून भाजप कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. जिल्हापरिषद नगरपरिषदांच्या निवडणुकाही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होतील त्यामुळे तयार राहा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहेत.जिथे निवडणुका जिंकाल तिथे मोठ्या प्रमाणावर निधी देऊ असे आश्वासन फडणवीसांनी दिले आहे. तसेच पालिका, जिल्हापरिषद, नगरपरिषदांच्या निवडणुका दीड महिन्यात होतील असेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने 6 मे रोजी राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाचे निर्देश दिले होते. चार महिन्यांच्या आत रखडलेल्या निवडणुका घ्या, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ठराविक वेळेत घ्या. कोर्टाच्या या आदेशानंतरच आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झाला आहे.अखेर आज या निवडणुकीचे संकेत मिळाले आहेत.

गुजरात राजस्थान येथून पुण्यात कापड वाहतुकीच्या नावाखाली….

पुणे: गुजरात , राजस्थान येथून पुण्यात कापड वाहतुकीच्या नावाखाली प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सिगारेटची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत हा प्रकार उघडकीस आणला आहे.
याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुटख्यासह टेम्पो, कंटेनर असा सुमारे एक कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाकडून ऊरुळी देवाची येथील मंतरवाडी फाट्यावर करण्यात आली.

याप्रकरणी अजिनाथ बबन धुमाळ (वय ३१, चालक, रा. केशवनगर, मांजरी बुद्रुक), मदनसिंग चित्तो राम (वय ३८, चालक, रा. जम्मू काश्मीर), राधेशाम बाबुलाल वर्मा (रा. मंतरवाडी), मिथुन नवले (रा. गणेश पेठ), दौलतराम जांगिड (रा. मंतरवाडी) आणि निखिल अगरवाल (महाराष्ट्र फ्राईट कॅरिअर्स प्रा. लि. व चंद्राई वेअर हाऊस या गोडाऊनचे मालक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार पृथ्वीराज किसन पांडुळे ( गुन्हे शाखा 5) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंतरवाडी-कात्रज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कपड्याचे गोडाऊन्स आहेत. कपड्याचे व्यापारी गुजरात, तसेच राजस्थानमधून कापड आणून मंतरवाडी-कात्रज रस्त्यावरील गोडाऊन्समध्ये ठेवतात. मात्र कापड विक्रीच्या नावाखाली प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सिगारेटची तस्करी होत आहे. अशी माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (१९ मे) साडेसहा वाजण्याच्या सुमारास मंतरवाडी-कात्रज रस्त्यावर उरुळी देवाची येथील एका हॉटेलच्या मागे छापा टाकून प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याची वाहतूक करणारा चालक धुमाळ याला टेम्पोसह अटक केली.

दरम्यान, तपासात कापडाच्या बॉक्समध्ये प्रतिबंधित गुटखा, पानमसाला असल्याचे पोलिसांना आढळून आले. तसेच अधिक तपासात या टेम्पोचा मालक आरोपी नवले असल्याचे समोर आले. चालकाकडे याबाबत चौकशी केली असता त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंतरवाडी-कात्रज रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ छापा टाकत गुन्हे शाखेच्या पथकाने एक कंटेनर चालकासह ताब्यात घेतला आहे. मदनसिंग असं चालकाचं नाव आहे.

जप्त केलेल्या कंटेनरमधून प्रतिबंध केलेला पानमसाला, तंबाखू आणि सिगारेटची अवैधरीत्या बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे समोर आले. आरोपी निखिल अगरवालने तपासात सांगितल्यानुसार, चालक मदनसिंग याने दिल्लीवरुन प्रतिबंधित गुटखा आणि सिगारेटची कंटेनरमधून वाहतूक केल्याचे समोर आले.

दरम्यान, पोलिसांनी चंद्राई वेअर हाऊस नावाच्या गोडाऊनवर छापा टाकून ‘आरसीबी फॉर एक्सपोर्ट’ नावाचा प्रतिबंधित गुटखा गुन्हे शाखेने जप्त केला आहे.

गुन्हे शाखा 5 च्या कारवाईत पोलिसांनी 2 चालक, वाहनांचे मालक तसेच गोडाऊनचा व्यवस्थापक आणि मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारवाई करून पोलिसांनी 1 कोटी १३ लाख ७२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.

व्हेनम: द लास्ट डान्सचा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर सोनी मॅक्स आणि सोनी PIX वर

व्हेनम: द लास्ट डान्स या बहुप्रतीक्षित ब्लॉकबस्टरचा ग्रँड टेलिव्हिजन प्रीमियर हिंदी भाषेत, सोनी मॅक्सवर होणार आहे, रविवार, 25 मे रोजी दुपारी 1 वाजता आणि त्याच वेळी हा चित्रपट सोनी PIX वर ‘संडे मेगा प्रीमियर’ अंतर्गत इंग्रजी भाषेत प्रसारित करण्यात येईल.

या चित्रपटातील मुख्य अभिनेता टॉम हार्डी याने केली मार्सेलसोबत ‘व्हेनम: द लास्ट डान्स’च्या कथेचे सह-लेखन देखील केले आहे. केली मार्सेलद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट या सिरिजची ओळख असलेला डार्क हयूमर आणि जबरदस्त अॅक्शन सादर करतो. ही एडी आणि व्हेनमची गोष्ट आहे, ज्यांचा शोध सरकार घेत आहे आणि गॉड नल (Knull) हा दुष्ट एलियन त्यांच्यावर टपून बसला आहे, ज्याला हे ब्रह्मांड जिंकण्यासाठी व्हेनमच्या आत असलेले ‘कोडेक्स’ हवे आहे. टॉम हार्डी पुन्हा एकदा व्हेनमच्या रूपात दिसणार आहे. हा चित्रपट एडी आणि व्हेनम यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्याचा शोध घेत या फ्रँचाईजचे भावनिक समापन दर्शवितो. समीक्षकांनी एडी आणि व्हेनम या टॉम हार्डीने साकारलेल्या दोन्ही भूमिकांचे आणि त्या दोघांमधील नात्याचे कौतुक केले आहे. या चित्रपटातील नाविन्यपूर्ण अॅक्शन दृश्ये आणि जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्स, विशेषतः जेव्हा व्हेनम वेगवेगळ्या जीवांचा ताबा घेतो, ती दृश्ये खूप वाखाणली गेली आहेत.

व्हेनम: द लास्ट डान्स हा व्हेनम त्रयीचे थरारक समापन दर्शवतो. व्हेनमच्या कथेचा असा नाट्यमय शेवट होतो. या चित्रपटाची निर्मिती कोलंबिया पिक्चर्स आणि मार्व्हल एन्टरटेन्मेंटने केली आहे, तर सोनी पिक्चर्सने चित्रपटाच्या वितरणाची बाजू सांभाळली आहे. सोनीच्या स्पायडर-मॅन युनिव्हर्स (SSU) मधील हा पाचवा चित्रपट आहे.

सोनी मॅक्स ही भारतातील एक महत्त्वाची टेलिव्हिजन वाहिनी आहे, ज्यावर इंग्रजी चित्रपट हिंदीत डब करून दाखवले जातात. हिंदी भाषिक प्रेक्षकांसाठी ही वाहिनी प्रामुख्याने अॅक्शन, साय-फाय आणि फॅंटसी चित्रपट घेऊन येते.

हा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर – रविवार25 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता फक्त सोनी मॅक्स आणि सोनी PIX वर.

 एयर इंडियातर्फे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी वन- वे भाडेशुल्क ११९९ रुपयांपासून सुरू..

0

·         देशांतर्गत सर्वसमावेशक वन- वे भाडेशुल्क ११९९ रुपयांपासून सुरू

·         आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वसमावेशक राउंड ट्रिपचे भाडेशुल्क ११,९६९ रुपयांपासून सुरू

·         सेलसाठीचे शुल्क २५ मे पर्यंत उपलब्ध, शेवटचा दिवस एयर इंडिया संकेतस्थळ आणि मोबाइल अपवर एक्सक्लुसिव्ह

·         कन्व्हिनियन्स शुल्क नाही आणि अतिरिक्त प्रमोशनल सवलत केवळ थेट ऑनलाइन चॅनेल्सवर

गुरुग्राम, २३ मे २०२५ – एयर इंडियाने संपूर्ण नेटवर्कवर प्रमोशनल सेल जाहीर केला असून त्याअंतर्गत एयर इंडियाच्या देशांतर्गत आणि आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर सर्वसमावेशक शुल्क उपलब्ध केले जाणार आहे.या प्रमोशनल सेलदरम्यान देशांतर्गत मार्गावरील भाडेशुल्क ११९९ रुपयांपासून सुरू होणार असून आंतरराष्ट्रीय मार्गावरील शुल्क ११,९६९ रुपयांपासून सुरू होईल.

संपूर्ण नेटवर्कदरम्यानचा हा सेल २५ मे २०२५ पर्यंत २३५९ वाजेपर्यंत सुरू राहाणार असून सेलचे शेवटचे २४ तास एयर इंडियाचे संकेतस्थळ आणि मोबाइल अप यावरच सुरू राहील. सेलमधील भाडेशुल्क ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या प्रवासासाठी आणि बहुतेक सर्व ठिकाणच्या प्रवासासाठी लागू असेल. उत्तर अमेरिका, युरोप (युकेसह) आणि ऑस्ट्रेलियासारख्य काही निवडक, लांब टप्प्याच्या प्रवासासाठीची व्हॅलिडिटी १० डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवता येईल.

सेलअंतर्गत बुकिंग सेलच्या आंतरराष्ट्रीय पॉइंट्सवर आणि स्थानिक चलनानुसारच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे.

थेट बुक करण्याचे फायदे

एयर इंडियाची वेबसाइट आणि मोबाइल अपवर तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांना सेलच्या काळात कन्व्हिनियन्स शुल्क लागू होणार नाही. त्याशिवाय प्रवाशांना FLYAI हा प्रोमो कोड वापरून प्रत्येक व्यक्तीमागे ३००० रुपयांची बचत करता येईल तसेच युपीआय किंवा नेट बँकिंग पेमेंट्सवर अनुक्रमे UPIPROMO आणि NBPROMO हे प्रोमो कोड वापरून प्रती व्यक्ती २५०० रुपयांची सवलत मिळेल.

युपीआय/नेटबँकिंग इन्स्टंट डिस्काउंट ऑफर
प्रवासाचा प्रकारट्रॅव्हल क्लाससवलतप्रोमो कोड
देशांतर्गत राउंड ट्रिपइकॉनॉमी/प्रीमियम इकॉनॉमीरू. 500  UPIPROMO/NBPROMO
बिझनेस/ फर्स्टरू. 1,200
आंतरराष्ट्रीय राउंड ट्रिपइकॉनॉमी/प्रीमियम इकॉनॉमीरू. 800
बिझनेस/ फर्स्टरू. 2,500

पूरक ऑफर्ससह प्रवासाचा आनंद द्विगुणित

या सेलचा एक भाग म्हणून एयर इंडियाद्वारे प्रवास आणखी आनंदी करण्यासाठी शुल्कावर लोकप्रिय पूरक सेवा दिल्या जात आहेत. ग्राहकांना प्रीपेड बॅगेजवर ४० टक्क्यांपर्यंतची सवलत (केवळ नॉन- स्टॉप प्रवासासाठी लागू), प्रीफर्ड आणि जास्त लेगरूम असलेल्या सीट्ससह सीट सिलेक्शनमध्ये २० टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे.

या ऑफर्स एयर इंडियाच्या थेट ऑनलाइन चॅनेल्सद्वारे (वेबसाइट आणि मोबाइल अप) खास उपलब्ध करण्यात आल्या असून त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

खास बँक ऑफर्ससह अतिरिक्त बचत

फ्लाइंग इकॉनॉमी, प्रीमियम इकॉनॉमी आणि बिझनेस/फर्स्ट क्लास यापैकी कोणत्याही विभागात एयर इंडिया ग्राहकांना एचएसबीसी क्रेडिट कार्डवरून एयर इंडियाची वेबसाइट आणि अपवर आणखी सवलत मिळवता येईल.

पात्र एचएसबीसी कार्डधारकांना त्यांच्या ट्रॅव्हल क्लासनुसार देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राउंड- ट्रिप बुकिंग्जवर ८००० रुपयांची तत्काळ सवलत मिळवता येईल.

एचएसबीसी इन्स्टंट डिस्काउंट ऑफर
ट्रिपचा प्रकारट्रॅव्हल क्लाससवलतPROMO CODE
देशांतर्गत राउंड ट्रिप इकॉनॉमीINR 500 HSBCDOM
प्रीमियम इकॉनॉमीINR 1,000
बिझनेस/ फर्स्टINR 2,000
आंतरराष्ट्रीय राउंड ट्रिपइकॉनॉमीINR 2,500 HSBCINT
प्रीमियम इकॉनॉमीINR 4,000
बिझनेस/ फर्स्टINR 8,000
सॅम्पल – महत्त्वाच्या प्रदेशांसाठी सर्व- समावेशक राउंड ट्रिप भाडेशुल्क
(
एक्स- इंडियाअंशतः नोंदणी)
प्रदेश चलनइकॉनॉमीप्रीमियम इकॉनॉमीबिझनेसप्रवासाचा कालावधी
भारत- युके रुपये 44,000 95000 1,64,000 १० डिसेंबर २०२५ पर्यंत 
भारत -युरोप रुपये 42,500 68,000 1,35,000 
भारत -कॅनडा रुपये 66,500 NA 2,75,000 
भारत -ऑस्ट्रेलिया रुपये 54,173 NA 1,84,627 
भारत -युएसए रुपये 57,890 1,30,751 1,96,390 
भारत -युएई रुपये 18,507 24,014 80,663 ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत  
भारत -सिंगापूर रुपये 14,814 22,371 42,870 
भारत -थायलंड रुपये 21,174 35,463 71,178 
भारत -इंडोनेशिया रुपये 45,238 61,958 1,25,620 
भारत -मलेशिया रुपये 22,503 35,654 62,313 
भारत -हाँगकाँग रुपये 23,936 60,679 1,03,107 
भारत -दक्षिण कोरिया रुपये 39,489 73,816 1,45,726 
भारत -जपान रुपये 46,219 1,07,715 1,75,693 
सॅम्पल – महत्त्वाच्या प्रदेशांसाठी सर्व- समावेशक राउंड ट्रिप भाडेशुल्क
(
एक्स- इंडियाअंशतः नोंदणी)
प्रदेश चलनइकॉनॉमीप्रीमियम इकॉनॉमीबिझनेसप्रवासाचा कालावधी
युके- भारतजीबीपी420 830 1,750 १० डिसेंबर २०२५ पर्यंत 
युरोप- भारतईयुआर 450 770 1,400 
कॅनडा- भारतसीएडी 960 NA 2,885 
ऑस्ट्रेलिया- भारतएयूडी 946 NA 5,270 
अमेरिका- भारतडॉलर 551 1,468 2,651 
युएई- भारतएईडी 717 940 3,563 ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत  
सिंगापूर – भारतएसजीडी 219 362 708 
थायलंड- भारतटीएचबी 9,811 15,837 33,978 
इंडोनेशिया- भारतआयडीआर 8,463,749 14,451,590 28,877,100 
मलेशिया- भारतएमवायआर1,183 1,729 3,143 
हाँग काँग- भारतएचकेडी 2,162 5,384 13,699 
दक्षिण कोरिया- भारतकेआरडब्ल्यू 654,095 1,174,915 2,100,389 
जपान- भारतजेपीवाय78,946 205,060 311,188 

सेलअंतर्गत बुकिंग एयर इंडियाची वेबसाइट आणि मोबाइल अप तसेच एयर इंडियाची एयरपोर्ट तिकिट ऑफिसेस (एटीओज), एयरलाइनचे कस्टमर केयर सेंटर आणि ट्रॅव्हल एजंट्सद्वारे उपलब्ध खुले करण्यात आले आहे.

सेलमधील सीट्स मर्यादित आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर उपलब्ध आहेत. हा सेल निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर खुला असून एक्सचेंजचा लागू होणारा दर आणि करानुसार वेगवेगळ्या शहरांतील भाडेशुल्कात थोडा फरक पडू शकतो देशांतर्गत बुकिंग्जवर ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रवास करता येईल, मात्र लांब टप्प्याच्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी हा कालावधी वेगळा असू शकतो.

पीएमआरडीएच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

पुणे (दि.२३) : शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तृतीय क्रमांक मिळवला. या कामगिरीबद्दल महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ श‍िंदे, उपमुख्यमंत्री अज‍ित पवार यांच्या हस्ते गौरव‍िण्यात आले होते. या विशेष मोहिमेमध्ये सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे पीएमआरडीएचे नाव राज्यस्तरावर पोहोचल्याने संबंधितांचा सत्कार ग.दि. माडगूळकर सभागृहात शुक्रवारी महानगर आयुक्त, अतिरिक्त महानगर आण‍ि मुख्य दक्षता अधिकारी तथा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आला.

शासनातर्फे नुकतीच १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम राबवण्यात आली. यात उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे पीएमआरडीएला राज्य स्तरावर तिसरा क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसह इतर संस्थांच्या सामूहिक प्रयत्नामुळेच पीएमआरडीएला हे यश मिळाल्याचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आण‍ि अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले. या सर्वांचा गौरव व्हावा, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्य दक्षता अधिकारी तथा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक सुनील मरळे, मुख्य अभ‍ियंता र‍िनाज पठाण, प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह वर‍िष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

विभागाअंतर्गत स्पर्धेतील यश
या विशेष मोहिमेअंतर्गत पीएमआरडीए कार्यालयातील विभागअंतर्गत स्पर्धा घेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात आले. यात अनाधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाने प्रथम, जमीन व मालमत्ता विभाग द्वितीय आणि अभियांत्रिकी विभाग यांनी तृतीय क्रमांक मिळवला. यासह बांधकाम क्षेत्रातील संघटना, पीएमआरडीएअंतर्गत कार्यरत असलेल्या विविध खाजगी एजन्सीच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

खासदार मुरलीधर मोहोळ यांचा रविवारी कसब्यात जनता दरबार !

पुणे -पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा सुरू असून या दुसऱ्या टप्प्यात दुसरे अभियान कसबा विधानसभा मतदारसंघात रविवारी, दि. २५ मे, २०२५ रोजी सकाळी १० वाजता राबविण्यात येत आहे. शुक्रवार पेठेतील साठे कॉलनीमधील श्री शिवाजी मराठा सोसायटी या ठिकाणी हे अभियान होणार असून यात नागरिकांनी आपल्या समस्या, प्रश्न आणि नव्या कल्पना घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ केले आहे.

खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर मोहोळ यांनी विधानसभा निहाय खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार सुरू केले असून या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न, नागरी समस्या, प्रलंबित विषय आणि नव्या कल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसरा टप्पा सुरू झाला असून कोथरूडनंतर आता कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे. मोहोळ यांना भेटण्यासाठी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष नोंदणी सुरु होणार आहे. तर त्यानंतर टोकन नंबरद्वारे मोहोळ हे थेट नागरिकांना भेटतील. समस्या मांडण्यासोबतच नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहितीही उपलब्ध होणार आहे. शिवाय महापालिका प्रशासन, पोलिस प्रशासन आणि शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल्स येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘माझ्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी असली तरी खासदार या नात्याने पुणेकरांचे प्रश्न समजून घेणे आणि ते सोडविणे हे माझे कर्तव्यच आहे. आजवर झालेल्या ७ अभियानांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून कसबा विधानसभा नागरिकांनीही आपले प्रश्न आणि समस्या घेऊन अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करतो. आजवर आलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात चांगले यश मिळाले आहे. शिवाय या अभियानावर नागरिकांच्या प्रतिक्रियाही समाधानकारक आहेत.’

मुंढव्याच्या उड्डाणपुलासाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर …

पुणे -मुंढव्याच्या उड्डाणपुलासाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरली . मुंढवा येथील महात्मा फुले चौकामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने उड्डाणपुलाच्या मागणीसाठी शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी उपशहरप्रमुख आबा निकम, सुनील जगताप, विभाग प्रमुख दिलीप व्यवहारे उपशहरसंघटक सुरज मोराळे, गिरीश गायकवाड , उत्तम भुजबळ, राहुल बायस, राम खोमणे सोमनाथ गायकवाड आत्माराम देशमुख दत्तात्रय घुले अजय परदेशी अनिल परदेशी बाबा कोरे गजानन गोंडसवर बंडू नाना बोडके विजय पालवे राकेश कांबळे बाळासाहेब सणस सोनू पाटील अहिरे अंकित कौशिक रेड्डी आनंद उडेद मनीष सिंग अशोक येवले अरुण उगलमुगले सागर इंदलकर प्रवीण रणदिवे आकाश जगताप योगेश ढेरे अविनाश गायकवाड सचिन गलांडे वैशाली गायकवाड मीना गायकवाड स्वाती आडनावे गौरव मस्के किशोर शिंदे श्रीकांत सूर्यवंशी मंगलसिंह सूर्यवंशी बाळासाहेब मोडक अनिल परदेशी उपस्थित होते. यावेळी संजय मोरे म्हणाले कि,’भाजपचा नाकर्तेपणा व झोपलेलं प्रशासन जागे करण्यासाठी, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मुंढवा येथील महात्मा फुले चौकामध्ये वाहतूक कोंडीची समस्या वारंवार भेडसावत आहे. या अनुषंगानेमहापालिका आयुक्तांना उड्डाणपूल किती आवश्यक आहे यासाठी चार वेळा भेटून निवेदनं दिली. तेव्हा कुठे आज आंदोलन स्थळी पुणे मनपा प्रकल्प विभागातील अभियंता सौरभ चौधरी यांनी भेट देउन सांगितले कि स्थायी समितीच्या बैठकीमधे मुंढवा येथील चौकात कशा प्रकारचा पूल असावा यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. तसा ठराव संमत झाला. परंतू निर्णय कधी घेणार हे सांगितले नाही. म्हणून शिवसेनेच्या वतीने भरपावसात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.