Home Blog Page 2963

सहकारी बँकेत कोट्यवधीचा अपहार, शाखाधिकाऱ्यासह चौघे अटकेत

0

पुणे-संगनमत करून पावणेसहा कोटी रुपयांचे बेकायदा कर्ज मंजूर करत फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या तत्कालीन शाखाधिकाऱ्यासह एका कंपनीचा संचालक अशा एकूण चौघांना पुणे पोलिसांच्या आऱ्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

हरबन्ससिंग शिंगार्रंसग जब्बल (वय ७१, रा. प्राधिकरण, निगडी), बँकेचे शाखाधिकारी मिलिंद टण्णू, तत्कालीन कर्ज अधीक्षक वसंत धाकू भुवड (वय ६५) आणि हनुमंत संभाजी केमधरे (रा. वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सहकार विभागाकडून बँकेचे लेखापरीक्षण करण्यात आल्यानंतर बेकायदा कर्ज वाटप प्रकरण उजेडात आले आहे. विशेष लेखा परीक्षक चांगदेव पिंगळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या शिवाजीनगर शाखेतून जब्बल ऑटो प्रा. लि. आणि याशिपिका इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपन्याना पावणेचार कोटी आणि दोन कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. या दोन्ही कंपन्यांचे मालक जब्बल आहेत. सहकार विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार या कर्ज प्रकरणाची चौकशी सुरु होती. सप्टेंबर २०१३ ते ऑक्टोबर २०१६ या कालावधीत हे कर्ज मंजूर करण्यात आले होते. लेखापरीक्षणात अनियमितता आढळून आली. या प्रकरणात तत्कालीन अधिकारी टण्णू आणि भुवड यांचा सहभाग असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर लेखापरीक्षक पिंगळे यांनी गेल्या महिन्यात २० मार्च रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्याची व्याप्ती विचारात घेऊन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने चौघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बुधवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.  त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली

राहुल गांधी पुण्यातील विद्यार्थ्यांशी थेट दीड तास संवाद साधणार…

पुणे-लोकसभेच्या प्रचाराचा धडाका सुरू झालेला असताना राज्यात निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे 5 एप्रिलला पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या दौऱ्यात ते सभा अथवा रॅलीत सहभागी होणार नाहीत. तर विद्यार्थ्यांशी राहुल गांधी थेट असा दीड तास संवाद साधणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
काँग्रेस नेते राहुल गांधी 5 एप्रिलला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. ते पुण्यातल्या महाविद्यालयीन तरुणाशी, विविध संघटनांच्या तरुणांशी संवाद साधणार असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगितले. पुणे हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानीचे शहर आहे. अनेक विद्यार्थी भवितव्य घडविण्यासाठी पुण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केल्याचे कदम यांनी सांगितले.
असा असेल कार्यक्रम-
हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स येथे सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी 5 हजार विद्यार्थ्यांशी राहुल गांधींचा दीड तास संवाद चालणार आहे. त्यांच्यासोबत सॅम पित्रोदा असणार आहेत. युवा पिढीशी थेट संवाद साधावा यासाठी राहुल गांधी यांचे प्रयत्न असल्याची कदम यांनी सांगितले.

निवडणूक कालावधीत सर्व बँकांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे  : पुणे विभागातील सर्व बँकांनी निवडणूक कालावधीतील बँकींग व्यवहार व उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे क्षेत्रिय अधिकारी व अग्रणी बँकांचे अधिकारी यांची बैठक विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आयकर विभागाचे पुणे आयुक्त रवी प्रकाश, आयकर विभागाचे कोल्हापूर आयुक्त अभिजीत चौधरी, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, कोल्हापूरचे विभागीय सह निबंधक धनंजय डोईफोडे, पुणे विभागीय सहनिबंधक श्रीमती डोंगरे, उपनिबंधक आनंद कटके, एस. बी. कडू, निलकांत कर्वे उपस्थित होते.
डॉ.दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात 10 लोकसभा मतदार संघातील निवडणुका पहिल्या चार टप्प्यात पार पडत आहेत. या निवडणुकात भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.  या निवडणुका भयमुक्त आणि शांततेत पार पाडण्यासाठी बँकांची महत्त्वाची भूमिका आहे. पुणे विभागातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका आणि पतसंस्थांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.
या कालावधीत कोणत्याही व्यवहाराबाबत शंका आल्यास बँकांनी याबाबतीची माहिती तातडीने आयकर विभागाला द्यावी. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांना नियमित अहवाल सादर करावा. 10 लाखांपेक्षा अधिकच्या व्यवहारांची माहिती निवडणूक विभाग आणि आयकर विभागाला द्यावी. मात्र, हे करत असताना सामान्य लोकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी बँकांनी घ्यावी.
बँकांनी काय करावे…
-बँकांनी निवडणूक प्रक्रिये दरम्यान संशयास्पद व्यवहारांबाबतचा रोजचा अहवाल  जिल्हा निवडणूक आधिकारी यांच्याकडे सादर करावा. 
– कोणत्याही ठोस कारणा शिवाय अचानक लोकसभा मतदार संघात अथवा जिल्ह्यात आरटीजीएस/एनईएफटी मार्फत निवडणूक प्रक्रियेदरम्यान व्यवहार होत असतील तर त्यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. 
– उमेदवार, त्याची पत्नी/पती अथवा त्याच्यावर अवलंबून  असणाऱ्या कोणाकडून (शपथपत्रातील माहिती प्रमाणे) 1 लाखापेक्षा अधिक रक्कम खात्यावर जमा केली अथवा काढली तर त्याची माहिती निवडणूक विभागाला तातडीने द्यावी. 
– कोणत्याही पक्षाच्या खात्यावर 1 लाख अथवा त्यापेक्षा अधिकची रक्कम जमा करण्यात आली अथवा काढून घेण्यात आली तर त्याची माहिती निवडणूक विभागाला द्यावी. 
– इतर कोणताही संशयास्पद रोख व्यवहार मतदारांना पैसे देण्यासाठी वापरला जाऊ शकतो, त्यामुळे त्यावरही काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. 
– निवडणूक कालावधीत बँकांनी त्यांच्याकडील व्यवहारांची नियमित माहिती खर्च विषयक विभागाला द्यावी. 
– निवडणूक विभागाला न कळविता निवडणुकीसाठी पैशाचा वापर होत असेल तर आयकर विभागाने अशा पैशाची व ते व्यवहार करणारांची चौकशी करावी. 
–  10 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम बँकेतून काढण्यात आली तर त्याची माहिती आयकर विभागाला देण्यात यावी. 
 – निवडणूक‍ कालावधीत पैशांचे व्यवहार करताना घालून दिलेल्या मानक प्रक्रियेचा काटेकोर वापर होतो का? याचीही बँकांनी काळजी घ्यावी. 
– या सर्व खबरदारी घेत असताना सामान्य लोकांना ज्यांचा निवडणूक प्रक्रियेशी संबध नाही, त्यांना व्यवहार करताना कोणताही त्रास होवू नये याची काळजीही बँकांनी घ्यावी.  

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान जनजागृतीचा शुभारंभ

0

पुणे- मतदारांना जागृत करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राज्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आऊटरिच ब्यूरोव्दारे महा मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नवी दिल्लीचे ब्यूरो ऑफ आऊटरीच कम्यूनिकेशनचे महासंचालक सत्येंद्र प्रकाश यांनी दिली.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जनजागृती मोहिमेंतर्गत फिरते चित्रवाहन व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पत्र सूचना कार्यालय व रिजनल आऊटरिच ब्यूरोचे अतिरिक्त महासंचालक डी.जे.नारायण, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग,  पुणे रिजनल आऊटरिच ब्यूरोचे  संचालक संतोष अजमेरा, स्वीपचे समन्वयक सुभाष बोरकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक महेश अय्यंगार, सहाय्यक संचालक भारत देवमनी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, व्यवस्थापक जितेंद्र पानपाटील, प्रशासकीय अधिकारी सुनिल डहाके आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्‍हणाले की, पुणे जिल्हयात स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती काम नियोजनबध्द पध्दतीने चालू असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ७० टक्याहून अधिक मतदान व्हावे यासाठी विविध माध्यमाचा वापर केला जात आहे असे सांगून रिजनल आऊटरिज ब्यूरो व्दारे हाती घेण्यात आलेल्या मोहिमेव्दारे मतदानाची टक्केवारी वाढवण्यास नक्कीच मदत हाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचा शुभारंभ महासंचालक सत्येंद्र प्रकाश व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी फित कापून व हवेत फुगे सोडून केला. राज्यातील जिल्हयांमध्ये या जनजागृती मोहिमेस प्रारंभ झाला असून  सांस्कृतिक कार्यक्रम, नाटीका, संगीत अशा वेगवेगळया कार्यक्रमांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आर आर आर च्या टीम ने पुण्यात उभारला भव्य सेट .

0
एस. एस. राजमौली हे आपल्या भव्य सेट साठी ओळखले जातात काही दिवसांपूर्वी त्यांनी आगामी सिनेमा आरआरआरची घोषणा केली आणि त्यांच्या फॅन्सना या सिनेमाची उत्सुकता लागली.
या सिनेमात सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण आलिया भट्ट आणि अजय देवगण यात लीड रोलमध्ये आहे.
आरआरआरचे हैदराबादमध्ये शूटिंगचे पहिले शेड्यूल संपले आहे आणि आता संपूर्ण स्टारकास्ट पुण्यात दुसऱ्या शेडूल शूट करणार आहे ज्या साठी  पुण्यात भव्य सेट उभारला जातो आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस आलिया भटसह सिनेमाची टीम पुण्यात शूट करणार आहे.  30 जुलै 2020 आरआरआर रिलीज होणार आहे.

आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत पीवायसी ब, एफसी अ, महाराष्ट्र मंडळ, लॉ कॉलेज लायन्स संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

0
पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत इलाईट डिव्हिजन गटात पीवायसी ब, एफसी अ, महाराष्ट्र मंडळ, लॉ कॉलेज लायन्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
 
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी ब संघाने एसपी कॉलेज 2 संघाचा 24-05 असा एकतर्फी पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. पीवायसी ब संघाकडून  हिमांशू गोसावी, योगेश पंतसचिव,  अनुप मिंडा, अमित लाटे, सुंदर अय्यर, सारंग पाबळकर, रघुनंदन बेहेरे  यांनी मोलाची कामगिरी बजावली. दुसऱ्या सामन्यात संजय रासकर, संग्राम चाफेकर, गणेश देवखिळे, पुष्कर पेशवा, पंकज यादव, वैभव अवघडे, सचिन साळुंखे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एफसी अ संघाने पीवायसी क संघाचा 24-07 असा पराभव करून आगेकूच केली. अन्य लढतीत महाराष्ट्र मंडळ संघाने एसपी कॉलेज 1 संघाचा 17-14 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. लॉ कॉलेज लायन्ससंघाने डेक्कन 3 संघाला 24-09 असे पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: इलाईट डिव्हिजन:

पीवायसी ब वि.वि.एसपी कॉलेज 2 24-05(100अधिक गट: हिमांशू गोसावी/योगेश पंतसचिव वि.वि.संजय आशेर/प्रणील बाडकर 6-1;खुला गट: अनुप मिंडा/अमित लाटे वि.वि.प्रफुल आशेर/पार्थ महापात्रा 6-3; 90अधिक गट: सुंदर अय्यर/सारंग पाबळकर वि.वि.मिलिंद घैसास/रोहन राजापूरकर 6-1; खुला गट: रघुनंदन बेहेरे/योगेश पंतसचिव वि.वि.प्रफुल नागवणी/संजय आशेर 6-0);         

एफसी अ वि.वि.पीवायसी क 24-07(100अधिक गट: संजय रासकर/संग्राम चाफेकर वि.वि.शैलेश डोरे/अमित नाटेकर 6-1;खुला गट: गणेश देवखिळे/संग्राम चाफेकर वि.वि.ध्रुव मेड/कौस्तुभ शहा 6-0; 90अधिक गट: पुष्कर पेशवा/पंकज यादव वि.वि.हनीफ मेमन/मिहीर दिवेकर 6-3;खुला गट: वैभव अवघडे/सचिन साळुंखे वि.वि.हर्षा वाळबे/सारंग देवी 6-3);          

महाराष्ट्र मंडळ वि.वि.एसपी कॉलेज 1 17-14(100अधिक गट: संजय सेठी/अर्जुन वाघमारे पराभूत वि.गजानन कुलकर्णी/आशिष डिके 1-6; खुला गट: अभिषेक चव्हाण/रवींद्र देशमुख वि.वि.केदार पाटील/आशिष डिके 6-0; 90अधिक गट: कमलेश शहा/विक्रम श्रीश्रीमळ पराभूत वि.मंदार मेहेंदळे/उमेश भिडे 4-6;खुला गट: संजय सेठी/अर्पित श्रॉफ वि.वि.संतोष शहा/स्वेतल शहा  6-2);         

लॉ कॉलेज लायन्स वि.वि.डेक्कन 3 24-09(100अधिक गट: केतन जाठर/श्रीकृष्णा पानसे वि.वि.हेमंत साठे/बाबू जाधव 6-1; खुला गट: अभिजित मराठे/तारख पारीख वि.वि.सुमंत डी./अमोल बापट 6-3; 90अधिक गट: सुरेश घुले/प्रोफेसर जयभाई वि.वि.किरण सोनावणे/सतीश बापट 6-5(5); खुला गट: राहुल पंतसचिव/केतन जाठर वि.वि.केदारी जाधव/दत्तू शिंदे 6-0).   

  

मराठी चित्रपटांना ५० दिवसात, ‘मोदी’ चित्रपटाला दोन दिवसात सेन्सॉर प्रमाणपत्र कसे?मनसेचा सवाल..

0

मुंबई : लोकसभा निवडणूक लक्षात घेता ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी निकाली काढली. हा चित्रपट नियोजीत तारीख ५ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे न्यायालने स्पष्ट केल्यामुळे चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटाला अवघ्या दोन दिवसात सीबीएफसीकडून मिळणारया सेन्सॉर प्रमाणपत्रावरून मनसेने टीका केली आहे.

‘पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाला सीबीएफसीचे सेन्सॉर प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया बुधवारी पार पडणार आहे आणि चित्रपट परवा देशभरात प्रदर्शित होणार. मराठी निर्मात्यांना हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ५० दिवस का थांबावे लागते?’ असा सवाल मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे.

सीबीएफसीने या चित्रपटाच्या ट्रेलरला सेन्सॉर प्रमाणपत्र दिले असून चित्रपटाला अद्याप सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. याची प्रक्रिया बुधवारी पार पडणार आहे. यावरून मनसेने सीबीएफसीकडून चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्याच्या कालावधीवरून सवाल केला आहे.

‘सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी मोदी बायोपिकचा नवा खेळ!’ असे म्हणत ‘मोदी’ चित्रपटाला अवघ्या दोन दिवसात प्रमाणपत्र मिळते तर मराठी चित्रपटांना याहून दिर्घकाळ प्रतीक्षा का करावी लागते? असा सवाल शालिनी ठाकरे यांनी केला आहे.

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटात मोदींचा लहानपणापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास मांडण्यात आला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉयने या चित्रपटात मोदींची भूमिका साकारली आहे. लोकसभा निवडणूकीमुळे देशभरात लागू झालेल्या आचारसंहीतेमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्याची मागणी मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. मात्र या चित्रपटाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

शिरोळेंचे तिकीट का कापले -पहा अजित पवारांचा सवाल अन गिरीश बापटांचा जवाब (व्हिडीओ)

0

पुणे- मागच्या वेळी पुण्याने बहुमताने निवडून दिलेला खासदार ,पुन्हा उमेदवारी मागत होता , जर पुण्यात चांगली विकास कामे झालीत , तर मग त्याची उमेदवारी का कापली ?काय खोट होती त्यांत ? असा सवाल आज पुण्यात अजित पवार यांनी आपल्या भाषणातून केला तर त्यास आजच्या पत्रकार परिषदेतून गिरीश बापटांनी उत्तर हि दिले .. कोणाला कधी संधी द्यायची हे पक्ष ठरवितो , विकास कामे आणि उमेदवारी यांचा काही संबध नसतो हे अजित पवारांना माहिती आहे असे ते म्हणाले ..पहा हा सवाल जवाब व्हिडीओ…

श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवनाचे उद्घाटन समारंभ ६ एप्रिल रोजी

0
पुणे- एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ, पुणे आणि एमआयटी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवनाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा चैत्र शुध्द प्रतिपदा, नववर्षदिन, गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर, शनिवार, दि. ६ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वाजता विश्‍वराजबाग, लोणी काळभोर, पुणे येथे संपन्न होणार आहे. तसेच
 ज्येष्ठ समाजसेवक, लोकपाल व माहिती अधिकार विधेयकाचे प्रणेते पद्मभूषण मा.श्री. अण्णा हजारे हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संत वृत्तीचे थोर शास्त्रज्ञ आणि जगप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण मा.डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. या श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवनाच्या प्रवेशद्वाराशी ‘दिव्य ज्ञान-यज्ञ कुंड’ उभारण्यात आले. त्यातील ज्ञानज्योतीचे सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते प्रज्वलन करतील. तसेच, सर्वधर्मीय प्रार्थनेसह सदरील श्रीमद् भगवद्गीता ज्ञानभवनाचे उद्घाटन होणार आहे.
 याच्या उद्घाटन प्रसंगी जागतिक कीर्तीचे अस्थिरोग तज्ञ व विद्वान पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, माजी केंद्रीय मंत्री आरिफ महंमद खान, हैद्राबाद येथील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. फिरोज बख्त अहमद, ज्येष्ठ कृषितज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, माजी शिक्षण मंत्री कमल किशोर कदम, पुणे येथील सह धर्मादाय आयुक्त, दिलीप देशमुख, माजी खासदार व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ विठ्ठलराव जाधव, अ.भा.म.सा. सम्मेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रतापराव बोराडे हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शुभाशीर्वाद देण्यासाठी महान साधक व चिंतक प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरूजी, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसन्त गाडगीळ, पुणे येथील स्पायसर अ‍ॅडव्हेटिस्ट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीवन अरसूड, बौध्द धर्माचे गाढे अभ्यासक भंते नागघोष, शीख धर्माचे गाढे अभ्यासक ग्यानी अमरजित सिंग, जैन धर्माचे गाढे अभ्यासक आर.एन. शुक्ल, मुंबई येथील वारकरी प्रबोधन महासमितीचे अध्यक्ष ह.भ.प.श्री.  रामेश्‍वर शास्त्री, झोरास्ट्रियन कॉलेजच्या अध्यक्षा डॉ. मेहेर मास्टर मूस आणि ज्यू धर्माचे विद्वान डॉ. आयझॅक मळेकर हे उपस्थित राहणार आहेत.
ज्ञान विज्ञानधिष्ठित वैश्‍विक भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानालचा, मानवता, सहिष्णूता, विश्‍वशांती आणि ‘ एकं सत विप्रा बहुधा वंदती’ व ‘वसुधैव कुटुंबकम’ असा संदेश देणार्‍या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली विश्‍व शांती सभागृह आणि विश्‍व शांती ग्रंथालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेले आणि ‘ संपूर्ण जगातील धर्मग्रंथ हे खर्‍या अर्थाने जीवनग्रंथ आहेत’,  हा विश्‍वकल्याणाचा संदेश देणारे श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवनाचा हा उद्घाटन सोहळा आहे.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड, इंडिया इंटरनॅशनल मल्टिर्व्हसिटीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम. पठाण, डब्ल्यूएचओचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव आणि मिटसॉटचे प्रकल्प संचालक प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी दिली.

‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपट १२ एप्रिलपासून

0

गेली जवळजवळ वीस वर्ष गायक, संगीतकार, लेखक, परीक्षक, मधली सुट्टी सारख्या कार्यक्रमाचा संकल्पनाकार अश्या विविध भूमिकांमधून रसिकांना आनंद देणारे डॉ. सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून वेडिंगचा शिनेमा हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येत आहेत. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

 या चित्रपटात प्रमुख भुमिकेमध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांबरोबर शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवोदित जोडी झळकणार आहे. डॉ. सलील कुलकर्णी यांनी कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.

 पारंपारिक रीतीरिवाजांपासून आधुनिक फॅशन-तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाफ आणि त्यातून भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणारा बहुचर्चित वेडिंगचा शिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेला टीझर आणि तीन गाणी यांना रसिकांकडून भरपूर प्रतिसाद लाभला आणि चित्रपटाबद्दल खऱ्या अर्थाने हवा निर्माण झाली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये एका लग्नाची तयारी, त्यासाठी केले जाणारे प्री-वेडिंगचे चित्रीकरण, घरातील माणसांची नृत्याची तयारी, चालीरीतींवरील चर्चा या गोष्टी ट्रेलरमधून पुढे येतात. आणि त्याला सिनेरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे’ अशी माहिती या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन डॉ. सलील कुलकर्णी यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 

वेडिंगचा शिनेमाची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबीची आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने आतापर्यंत अनेक गाजलेले मराठी चित्रपट दिले आहेत. त्यांत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई पुणे मुंबई-२, मुंबई पुणे मुंबई-३. बॉईज-२, बापजन्म, आम्ही दोघी, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडियाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरंच काही आणि टाइम प्लीज या चित्रपटांचा समावेश आहे.

मोहन जोशी, सुप्रिया सुळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा लोकसभेची निवडणूक वैयक्तिक टीका टिप्पणी करून व्यक्तिकेंद्री करू पाहत आहेत. मात्र, कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या या व्यक्तीकेन्द्री ‘ट्रॅप’मध्ये न अडकता ही निवडणूक मुद्द्यांवर आणावी असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

पुणे शहर लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना,रिपब्लिकन पीपल्स आघाडी व मित्र पक्षांच्या आघाडीचे पुणे शहर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार माजी आमदार मोहन जोशी व बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित प्रचारसभेत चावाहन बोलत होते.

माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,अ. भा.काँग्रेस कमिटीच्या चिटणीस व महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, मोहन जोशी, खासदार वंदना चव्हाण,आमदार अनंत गाडगीळ, आमदार संग्राम थोपटे,  माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे,  कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, जेष्ठ नेते उल्हासदादा पवार, डॉ. विश्वजित कदम, प्रवीण गायकवाड,  बाळासाहेब शिवरकर, बापू पठारे, प्रदीप गारटकर, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, मोहनसिंग राजपाल,, अॅड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, नगरसेवक आबा बागुल, वीरेंद्र किराड, रवींद्र धंगेकर,  डॉ.सतीश देसाई,सुषमाताई अंधारे, प्रकाश भालेराव, सचिन खरात, सागर अल्हाट,अमिरभाई शेख, अशोक मासाळ आदी यावेळी उपस्थित होते.

चव्हाण म्हाणाले, पंतप्रधान नरेंद्र मोडी आणि भाजपा लोकसभेची निवडणूक वैयक्तिक टीका टिप्पणी करून व्यक्तिकेंद्री करू पाहत आहेत. परंतु त्यांना उत्तरे देण्याच्या भानगडीत पडू नका तर त्यांना प्रश्न विचारा. भाजपला जाहीरनामा घोषित करता येणार नाही कारण मागच्या जाहीरनाम्यात आश्वासन दिलेली एकाही गोष्टीची पूर्तता त्यांनी केलेली नाही. कॉंग्रेसच्या काळात बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. २० कलमी कार्यक्रम राबविण्यात आला. दारिद्र्य निर्मुलानाकारीता साधने निर्माण करून देण्यात आली. शिक्षणाचा, माहितीचा, असे विविध अधिकाराचे कायदे करण्यात आले. युपीएच्या काळात १४ कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वरती आले. यंदाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात २० टक्के गरीब जनतेला म्हणजे ५ कोटी कुटुंबाला वर्षाला सरसकट ७२,०००/- रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. ते कसे द्यायचे याचे सर्व गणित तयार आहे. देशाच्या सुरक्षेचा विषय महत्वाचा आहे. परंतु पुलवामा, सर्जिकल स्ट्राईक याबाबत प्रश्न विचारायला घाबरू नका. तो आपला अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. परंतु राज्यात जनावरांसाठी चाऱ्याची सोय नाही, पाणी नाही, छावण्या नाही याबाबत त्यांना जाब विचारा व निवडणूक मुद्द्यांवर आणा असे ते म्हणाले. २०१४च्या निवडणुकीत भाजपला ३४ टक्के मते पडली होत. ६५ टक्के लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केले होते. परंतु आघाडीच्या अंतर्गत मतभेदामुळे भाजप त्यातून सटकून गेला. परंतु यावेळी ते होणार नाही. २३ पक्षांची आघाडी झाली असून आता आपल्या मतांचे विभाजन होणार नाही. त्यामुळे भाजपला १७० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात भाजप व केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग हे कमी बोलतात अशी टीका त्यावेळी आताचे सत्ताधारी करीत होते. डॉ. मनमोहन सिंग हे कमी बोलत असतील पण ते मुद्द्यांच आणि कामाच बोलत असत. पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी, तरुणाचा रोजगार, याबाबत पाच वर्षात काय कामे केली ही जनतेसमोर आणा असे आव्हान त्यांनी दिले.

पुणे शहरात पाणी प्रश्न गंभीर होऊन बसला असून त्यावर सत्ताधारी पक्षाकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही. शहराला आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी धरणे कोरडी पडली आहेत.आम्ही सत्तेमध्ये असताना कधीही शहरी आणि ग्रामीण भागाला पाणी कमी पडू दिले नाही. मात्र आताचे सरकार पाण्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरले आहे.

केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता असताना. विरोधकांना कधीही वेठीस धरले नाही. पण आताचे सत्ताधारी सत्तेचा गैर वापर करून चौकशी लावण्याची भीती दाखवून  आणि संस्था वाचवण्यासाठी आर्थिक आमिषे दाखवून  तर काही व्यक्तिना पदे देऊन भाजपात घेतले जात आहे. त्यांच्याकडे गेले आहेत, त्यांच्या बरोबर मी काम केले आहे. त्यांची मला सर्व अंडी पिल्ले माहिती आहेत. जे गेले त्यांनी थोडी कळ काढली पाहिजे होती असेही ते म्हणाले.

२०१४ च्या निवडणुकीत पुण्यातून अनिल शिरोळे यांना पुणेकर नागरिकांनी प्रचंड मतांनी निवडून दिले.  त्यांनी पाच वर्षात काय केले याचे प्रगती पुस्तक काढले. मात्र, त्यांच्याच पक्षाने त्यांना नापास केले. त्यांचे तिकीट कापून पालकमंत्र्यांना तिकीट दिले. विद्यमान खासदारांचे तिकीट का कापले याचे उत्तर भाजपने द्यावे असे आव्हान त्यांनी दिले.

मोहन जोशी म्हणाले, पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पाच वर्षात पुणेकरांची घोर निराशा केली आहे. मी खरा सच्चा पुणेकर असून माझी पुण्याची बांधिलकी आहे. मागच्या खासदारांनी जेवढे काम केले त्यापेक्षा दुप्पट काम करून आपण दाखऊ.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, युपीएचे सरकार सत्तेवर आले तर शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी आम्ही करू. शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांची अंबलबजावणी बारामती ताकुक्यात झाली आहे. बारामती तालुका कुपोषणमुक्त केल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी आणि भाजप आम्ही ६० वर्षात काय केले असे विचारतात आता त्यांनी पाच वर्षात काय केले याचा हिशेब द्यावा, आम्ही निर्माण केल्या शिक्षण संस्थांमध्ये  आपण शिक्षण घेतले व लिहायला वाचायला शिकले असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. केंद्रातील सरकार हे फेकू सरकार आहे. या सरकारकडे पाच वर्षात काय केले याबाबत बोलण्यासारखे नसल्याने ते वैयक्तिक टीका करत आहेत. परंतु ही निवडणूक पवार कुटुंबाची नाही. ही निवडणूक महागाई, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा याबाबत विचार करण्याची आहे असे त्यांनी सांगितले.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अनंत गाडगीळ, दिप्ती चवधरी, कमाल व्यवहारे, अॅड. अभय छाजेड, प्रवीण गायकवाड,  अरविंद शिंदे, महेश शिंदे, सुषमाताई अंधारे, प्रदीप गारटकर, अमीरभाई शेख, अशोक मासाळ, सागर आल्हाट, सचिन खरात, प्रकाश भालेराव यांचीही यावेळी भाषणे झाली. पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघातील हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

पिंपळवंडी येथे स्फोटक पावडरसदृश्य वस्तू तसेच इतर घातक हत्यारांसह आरोपीस अटक

0
जुन्नर /आनंद कांबळे
   जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी     येथील अभंगवस्ती परिसरात मंगळवारी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून बॉम्ब सदृश्य वस्तू तसेच इतर घातक हत्यारांसह आरोपीस अटक केली.
    पिंपळवंडी येथील अभंगवस्ती (भटकळवाडी) परिसरात स्फोटक पावडरसदृश्य वस्तू तसेच इतर घातक शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.या नुसार पथकाने सापळा रचून आरोपी राजाराम किसन अभंग (वय 60,रा.अभंगवस्ती पिंपळवंडी) यास अटक केली असल्याची माहिती,पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
    या वेळी संबंधीत आरोपिकडे 2 भाले,1 पाईप गण(बंदूक),1 तलवार,1 हेलमेट,1 चिलखत,तसेच स्फोटक पावडरसदृश्य वस्तू आदी साहित्य सापडले. या ठिकाणी बॉम्बशोधक पथकानेही भेट दिली असून पंचनामा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.या ठिकाणी 2003 मध्येही असाच प्रकार घडला होता

लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करा… विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

0
17 व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी 10 मार्चला केली आणि निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली. पुणे विभागातील लोकसभा मतदार संघाचं मतदान 18, 23 आणि 29 एप्रिल रोजी होत आहे. या निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे विभागाच्या तयारीबाबत विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी निरीक्षक तथा दिव्यांग मतदारांसाठीचे ॲक्सेसिबिलिटी ऑब्झर्व्हर डॉ. दिपक म्हैसेकर यांची वृषाली पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत….!
निवडणूक विषयक कामाचं नियोजन कसे आहे?-  पुणे विभागात निवडणुकीच्या कामकाजासाठी विविध विभागातील 1 लाख 81 हजाराहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात आले असून विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत.  विविध कक्षांमार्फत निवडणुकीचे काम नियोजनबध्द पार पाडले जात आहे.
 मतदार यादीत नाव आहे पण मतदाराकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर मतदान करता येईल का?–
1) पासपोर्ट, 2) वाहन चालक परवाना 3) केंद्र/ राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचा-यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र 4)बँक/ पोस्ट ऑफिसद्वारे जारी केलेल्या फोटोसह पासबुक  5) पॅन कार्ड 6) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड 7) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) जॉब कार्ड 8) श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड 9)फोटोसह पेंशन दस्तऐवज 10) खासदारांना / आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र  11) आधार कार्ड..  यांपैकी कोणतेही कागदपत्र अथवा ओळखपत्र मतदानासाठी मतदार यादीत नाव असेल आणि निवडणूक ओळखपत्र नसेल तर ग्राहय धरले जाईल.
मतदारांसाठी सुविधा–सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विविध प्रकारच्या मुलभूत सुविधा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरीक, अपंग आणि अंध व्यक्तींसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच प्रत्येक मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या माहितीचे फलक लावण्यात येणार आहेत. तसेच ट्रु व्होटर ॲपही उपलब्ध करुन दिले आहे. मतदान केंद्र स्थळी मतदारांना माहिती देण्यासाठी मदत कक्ष उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता गृह, विजेची सोय तसेच तसेच अन्य आवश्यक सुविधा देवून आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात येत आहेत.
दिव्यांग मतदारांसाठी उपाययोजना —  कोणत्याही प्रकारचा मतदार निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहता कामा नये यासाठी दिव्यांग मतदार जागृती करण्यात येत आहे.  भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग व्यक्तिंचा मतदान प्रक्रीयेत सहभाग वाढवण्यासाठी पीडब्लूडी  ॲप (PWD App) तयार केले आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी काही मदतीची आवश्यकता असल्यास दिव्यांग व्यक्ति पीडब्लूडी ॲप मोबाईल वर डाऊनलोड करुन या ॲपव्दारे ते मदतीचे स्वरुप नोंदवू शकतात. तसेच 1950 किंवा 1800111950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. त्यानंतर त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्हिलचेअर अथवा वाहनाची सोय करुन देण्यात येईल. दिव्यांगांची मतदार नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हिल चेअरची मागणी आदि सोयींसाठी निवडणूक आयोगाने हा ॲप उपलब्ध करुन दिला आहे.
आचारसंहितेच्या तक्रारीबाबत– निवडणूक कालावधीत आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत “सी-व्हिजिल” हा मोबाईल ॲप देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केला आहे. निवडणुकी दरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार नागरिक या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन दाखल करू शकतील. या तक्रारीवर अवघ्या 100 मिनिटात कार्यवाही होणार आहे. नागरिक NGRSव्दारे ही तक्रार दाखल करु शकतात.
सैन्यदलातील तसेच निवडणूक विषयक कामात असणाऱ्या मतदारांना मतदान करता यावे, यासाठी काय सुविधा आहेत?- सैन्यातील सर्व्हिस वोटर्स साठी ईटीपीबीएस म्हणजेच इलेक्ट्रॉनिकली ट्रान्स्मीटेड पोस्टल बॅलेट सर्व्हीस ही प्रणाली यावेळी नव्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर निवडणूक विषयक कामकाजात असणा-या मतदारांना मतदान करण्यासाठी  Election Duty Certificate (EDC) किंवा Postal Ballot (PB)  सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
अधिकाधिक मतदारांनी मतदान करावं, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न–  विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत महाविद्यालये आणि सार्वजनिक मोक्याच्या ठिकाणी मेळावे तसेच पथनाट्ये, विविध स्पर्धा तसेच जाहिरातींव्दारे मतदान करण्याबाबत संदेश देण्यात येत आहे. याबरोबरच गावांमध्ये मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार असल्यास तो बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी नोकरदारवर्गांना मतदान करण्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे.
मतदारांना संदेश — राज्यघटनेने आपल्याला मतदान हा सर्वात मौल्यवान हक्क दिला आहे. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावायलाच हवा. मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या सद्सद्वविवेक बुद्धीने मतदान करायला हवं…!
        –शब्दांकन- वृषाली मिलिंद पाटील,
    विभागीय माहिती कार्यालय, पुणे

एकदिलाने काम करण्याचे आघाडीच्या नेत्यांचे आवाहन

पुणे- लोकसभा २०१९ ची निवडणूक ही हुकुमशाही विरुध्द लोकशाहीची निवडणूक आहे. संविधान, लोकशाही आणि मानवतेच्यादृष्टीने ही निवडणूक आहे. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्याने आपण स्वत:च उमेदवार आहोत असे समजून एकदिलाने काम करून पुणे शहर, बारामती, शिरूर आणि मावळच्या जागा जिंकून केंद्रातील भाजप सरकारला सत्तेवरून खाली
खेचावे असे आवाहन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांच्या नेत्यांनी केले. कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून मोहन जोशी यांचीनिवड झाल्याबद्दल कॉंग्रेस भवनात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला .


पुणे शहर लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना,रिपब्लिकन पीपल्स आघाडी व
मित्र पक्षांच्या आघाडीचा उमेदवार म्हणून माजी आमदार मोहन जोशी यांची सोमवारी रात्री उशिरा उमेदवारी जाहीर झाली.
त्यानिमित्त मंगळवारी दुपारी कॉंग्रेस भवन येथे आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी
उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,अ. भा.काँग्रेस कमिटीच्या चिटणीस व
महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल, खासदार वंदना चव्हाण, आमदार अनंत गाडगीळ, आमदार संग्राम थोपटे, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे, पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष
सचिन साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघीरे, कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, जेष्ठ नेते उल्हास पवार,माजी खासदार अशोक मोहोळ, नाना नवले, बाळासाहेब शिवरकर, श्रीकांत शिरोळे, प्रदीप गारटकर, दिलीप बराटे, दीप्ती
चवधरी, कमल व्यवहारे, मोहनसिंग राजपाल, अॅड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, डॉ.सतीश देसाई, यावेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, कार्यकर्त्यांचा उत्साह हा निवडणुकीचे वारे दर्शवणारा आहे. हा उत्साह तीन आठवडे असाच टिकवला पाहिजे. पुढे पुढे तो वाढत गेला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने जीव झोकून देऊन काम केले तर त्याचा परिणाम आगामो विधानसभा निवडणुकांमध्ये दिसेल. महाराष्ट्राची सत्ता पुन्हा कोणाच्या हातात द्यायची हा निर्णय ठरवणारी ही लोकसभेची निवडणूक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील जाहीर सभेत पवार कुटुंबीयांबद्दल केलेल्या विधानाचा समाचार घेत अजित पवार म्हणाले,
पंडित नेहरूंपासून डॉ. मनमोहनसिंगांपर्यंत अनेक पंतप्रधान मी पाहिले. परंतु मोदींसारखे पंतप्रधान मी पाहिले नाही. पंतप्रधानांनी
देशातील बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासाठी काय केले, मुलींवर होणारे अत्याचार त्यांचे संरक्षण, कामगारांचे प्रश्न, महागाई, इंधनाच्या वाढत्या किमती याबाबत बोलणे अपेक्षित असताना ते पवारांच्या कुटुंबाबद्दल बोलले. पवार कुटुंब त्यांचे बघण्यासाठी समर्थ आहेत. पवार साहेब आमचे काल, आज आणि उद्याही दैवतच असेल असे त्यांनी स्पष्ट केले. दरवर्षी २ कोटी रोजगार असे पाच वर्षात १० कोटी रोजगार दिले का? दुष्काळाने महारष्ट्र होरपळत असताना चार्यांच्या छावण्या, पाण्याचे टँकर याबाबत बोलण्याऐवजी पवार घराण्याबद्दल बोलता मात्र, पंतप्रधान मोदींचा आदर ठेवून जर त्यांना तुमच्या कुटुंबाबद्दल काय? असे
म्हटले तर? असं सवाल त्यांनी केला.डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला संविधान, कायदा आपल्या हातात दिला. त्याचा आदर आपण करायला पाहिजे. त्यासाठी ही निवडणूक महत्वाची असून चारही मतदार संघात जिथे ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दुसर्या मित्र पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता कुठेही कमी पडणार नाही, रुसणार नाही,फुगणार नाही व कुठलीही वेगळी अपेक्षा करणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

वर्धा येथे झालेल्या पंतप्रधान मोदींच्या सभेला ३५ हजार संख्या होती. ही गर्दी २ लाखावरून ३५ हजारावर आळी आहे. २०१४ ला ऊन होते आणि आता ऊन आहे. मात्र हवा बदलती आहे हे लक्षात घ्या आणि जीव ओतून काम करा विजय आपलाच आहे असे आवाहन पवार यांनी केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, २०१९ ची लोकसभेची निवडणूक ही ही केवळ उमेदवारापुरती, देशासाठी अथवा महाराष्ट्रासाठी नसून
प्रत्येकाच्या प्रपंचाकरीता अस्तित्वाची लढाई आहे. सर्व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी किंतु परंतु मनात न ठेवता एकदिलाने काम करून
पुन्हा एकदा सत्ता खेचून आणा असे आवाहन त्यांनी केले.
सोनाल पटेल म्हणाल्या, आपल्याला देशात कॉंग्रेस आघाडीची सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा जिंकून
आणायच्या आहेत. केंद्रातील सध्याचे सरकार घालवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
उल्हास पवार म्हणाले, लोकशाही, संविधानाच्या दृष्टीने २०१९ ची निवडणूक अतिटतीची आहे. मोहन जोशी यांना आपण अगदी सामान्य कार्यकर्ता असल्यापासून पाहत आहोत. त्यांना तिकीट म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला तिकीट असे असल्याने आपण
स्वत; निवडणुकीसाठी उभे आहोत या भावानेने सर्वांनी काम करावे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका एकदिलाने काम करा असे
आवाहन त्यांनी केले.
चेतन तुपे म्हणाले, मोहन जोशी यांना तिकीट मिळाले ही आनंदाची बाबा आहे. हुकुमशाही विरुध्द लोकशाही अशी ही लढाई
असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकदिलाने काम करतील.
मोहन जोशी म्हणाले, २०१९ ची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे. देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली.
संविधान संपविण्याचे काम सध्याच्या केंद्रातील सरकारने चालवले आहे. त्याबाबत निर्णय घेण्याची ही निवडणूक आहे. पुणे,
बारामती, मावळ आणि शिरूर ही चारही जागा आपल्याला जिंकायच्या असून त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करावे असे आवाहन
त्यांनी केले.

गिरीश बापट यांचा मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल

पुणे- पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप, सेना, आरपीआय (ए), रासप व शिवसंग‘ाम महायुतीचे उमेदवार गिरीश बापट आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचनताई कुल यांनी मिरवणुकीने जाऊन आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. श्री. बापट यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे दुपारी बारा वाजता उमेदवारी अर्ज सादर केला.

राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, शिवसंग‘ामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळा कदम, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शिवसंग‘ामचे शहराध्यक्ष भरत लगड, रासपचे शहराध्यक्ष सनी रायकर, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, राहुल कुल, भीमराव तापकीर, विजय काळे, प्रा. मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, महेश लांडगे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, सभागृह नेता श्रीनाथ भिमाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिरवणुक सुरू होण्यापूर्वी गिरीश बापट यांनी प्रमुख नेत्यांसह पुण्याचे ग‘ामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. कसबा गणपती मंदिरापासून सुरू झालेल्या मिरवणुकीचा ङ्गडके हौद चौक, दारूवाला पूल मार्गे नरपतगिरी चौकात समारोप झाला. महायुतीचे दहा हजारहून अधिक कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. सर्व आमदार, नगरसेवक जथ्या जथ्याने मिरवणुकीत सामील होत होते. शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑङ्ग इंडिया (ए), रासप, शिवसंग‘ाम, लोकजनशक्ती पार्टी, पतित पावन संघटना, हिंदू एकता आंदोलन आणि विविध दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांची सं‘या लक्षणीय होती.

मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी शुभेच्छा देणार्‍या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ध्वनिक्षेपकावर प्रचाराची गाणी लावून स्वागत करण्यात येत होते. महिलांनी ठिकठिकाणी औक्षण केले. ङ्गटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, बँड पथकावरील देेशभक्तीपर गाणी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या जयघोषाच्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता. मैं भी हूं चौकीदार, ङ्गिर एक बार मोदी सरकार, पुण्याची ताकद गिरीश बापट या घोषणा कार्यकर्ते उत्स्ङ्गूर्तपणे देत होते. महिला कार्यकर्त्या आणि युवकांचा मोठा सहभाग होता. मै भी हूं चौकीदार टोप्या घातलेले कार्यकर्ते लक्षवेधत होते. आरपीआयचे कार्यकर्ते झेंडे घेऊन मोठ्या सं‘येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. उन्हाची तीव‘ता लक्षात घेऊन कार्यकर्त्यांना पाणी व ताक वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी सव्वा अकराच्या सुमाराला मिरवणुकीत नरपतगिरी चौकात पोहोचली. या ठिकाणी मिरवणुकीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी महायुतीचे दहा हजारहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या सभेत बोलताना गिरीश बापट म्हणाले, ‘आयुष्यभर घाम गाळणार्‍या महायुतीच्या कार्यकर्त्यांना मी सलाम करतो. कार्यकर्ता हा संघटनेचा आत्मा आहे. अशा कार्यकर्त्यांच्या जोरावरच पक्षाचा विचार जिवंत राहीला आहे. आमचा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आमच्याकडे घराणेशाही नाही. गेल्या पन्नास वर्षांत कॉंग‘ेसला देशाचा विकास करता आला नाही. मात्र गेल्या पाच वर्षांत केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत. त्यामुळे देशात चांगले वातावरण आहे. नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार आहे. आम्ही घराणेशाहीत जन्माला आलेले कार्यकर्ते नाहीत. आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक, कुटुंब आणि शिक्षकांचे चांगले संस्कार आहेत. देश, धर्म आणि समाजासाठी काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. पंधरा वर्षे महापालिकेत नगरसेवक, पंचवीस वर्षे आमदार अशी जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली. आता मी लोकसभेत प्रतिनिधित्व करावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे मी या निवडणुकीस उभा राहात आहे. घरोघरी जाऊन विकासाची कामे मतदारांपर्यंत पोहोचवा. गहाळ राहू नका.’

कांचन कुल म्हणाल्या, ‘सर्वसामान्य जनता आणि महायुती आमच्या मागे खंबीरपणे उभी आहे. कार्यकर्त्यांची मोठी ङ्गळी कार्यरत आहे. कशाला कुणाची भिती पाठीशी आहे महायुती. त्यामुळे बारामतीत महायुतीचा विजय निश्‍चित आहे.’

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या दहाही जागा जिंकायच्या आहेत. त्याची सुरूवात पुणे आणि बारामतीपासून होणार आहे. या जागा नुसत्याच जिंकायच्या नसून प्रचंड मताधिक्याने जिंकायच्या आहेत. पुण्याची जागा देशातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणायची आहे. महाराष्ट्रात आणि बारामतीत कांचनताईंच्या हस्ते परिवर्तन घडणार आहे.’

डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या, ‘पुणे तेथे काय उणे असे म्हटले जायचे परंतु आता पुणे तेथे राष्ट्रवादी व कॉंग‘ेस उणे असे म्हणावे लागणार आहे. दोन्ही उमेदवारांना लाखो मतांनी निवडून द्यायचा संकल्प करू या.’ महादेव जानकर म्हणाले, ‘बारामतीत महायुतीचा उमेदवार विजयी होणार आहे. देशातील परिवर्तनाची सुरूवात पुण्यापासून होणार आहे.’ विनायक मेटे म्हणाले, ‘महायुतीची वज‘मूठ अभेद्य आहे. देशाला व राज्याला पुढे नेण्याचे काम पूर्ण करण्यासाठी बापट व कुल यांना निवडून द्या.’ विजय शिवतारे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील परिवर्तन बारामतीपासून होणार आहे. सेल्ङ्गीताई ग‘ीत बसणार आहेत आणि कांचनताई दि‘ीत जाणार आहेत.’

खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, शिवसेनेचे संपर्कप्रमुख, बाळा कदम, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक कांबळे यांची ही भाषणे झाली. निवडणूक प्रमुख आमदार विजय काळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.