Home Blog Page 2960

तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमीतर्फे २०१९ मधील उन्हाळी क्रिकेट कॅम्प जाहीर

0

मुंबई – तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमीने (टीएमजीए) आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी क्रिकेट मार्गदर्शन कॅम्प २०१९ चे वेळापत्रक जाहीर केले. याचा अभ्यासक्रम सचिन तेंडुलकर आणि मिडलसेक्स कंट्री क्रिकेट क्लब (एमसीसीसी) यांनी एकत्रितपणे सर्वोत्तम क्रिकेट प्रशिक्षण देण्याच्या हेतूने आखला आहे.

हे चार दिवसीय कॅम्प एमआयजी क्लब, बांद्रा पूर्व इथे २ ते ५ मे आणि डीवाय पाटील स्पोर्ट्स सेंचर, नवी मुंबई येथे ९ ते १२ मे या दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. एमसीसीसी प्रशिक्षिक आणि विनोद कांबळी यांच्यासह आंतरराष्ट्रीय खेळाडू तरुण क्रिकेट खेळाडूंना तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या जागतिक दर्जाच्या मार्गदर्शनाचा अनुभव घेण्याची असामान्य संधी देणार आहेत.

दोन्ही ठिकाणच्या कॅम्पसमधील सकाळचे सत्र ७ ते १२ वर्ष वयोगटातील उदयोनमुख क्रिकेट खेळाडूंसाठी, तर दुपारचे सत्र १३ ते १८ वर्ष वयोगटासाठी असेल. गेल्या वर्षीच्या कॅम्पमध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही त्यांची कामगिरी आणखी विकसित करण्यासाठी परत यंदाच्या कॅम्पमध्ये बोलावले जाणार आहे.

असामान्य क्षमता असलेल्या, मात्र कॅम्पचे शुल्क न परवडणाऱ्या खेळाडूंना मोफत प्रशिक्षण दिले जाईल.

सचिन तेंडुलकर म्हणाले, गुणवान तरुण खेळाडूंची क्षमता पारखणे व तिचा विकास करणे हे आमचे ध्येय आहे. त्यांना त्यांचे क्रिकेट कौशल्य आणखी उंचावण्याची संधी देताना पाहाणं परिश्रमांची पावती मिळाल्यासारखं आहे. गेल्या वर्षी कॅम्पला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आम्हाला मुले व त्यांच्या पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळे आम्हाला या कॅम्पच्या पुढच्या आवृत्तीचे आयोजन करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले व मला खात्री आहे, की यंदाचे कॅम्प त्याहीपुढे जात यशस्वी होतील व त्यातून आणखी गुणवान क्रिकेट खेळाडू उदयास येतील.

वितरण भागीदार बेसाइड स्पोर्ट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला टीएमजीए उन्हाळी क्रिकेट कॅम्प मुले व मुलींसाठी खुला आहे. मुलांच्या क्रिकेट क्षमतेबरोबरच खेळाच्या बॅटिंग, गोलंदाजी, अथलेटिक विकासासाठी क्षेत्ररक्षण, क्रीडा मानसिकता, धोरणात्मक विकास, तांत्रिक बदल इत्यादी सर्व पैलूंची माहिती करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

गेल्या वर्षी कॅम्पसला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने प्रत्येक कॅम्पची नोंदणी वेगाने पूर्ण झाली. त्यासाठी एकूण १२०० मुलांनी हजेरी लावली आणि त्यांनी या कॅम्पमधील एकंदरीत प्रशिक्षण अनुभवास ४.८/५ रेटिंग दिले.

निवडणूका शांततेत पार पडतील की नाही शंका वाटते- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची शंका

0

पुणे : देशहितासाठी कार्य करणार्‍या संस्थांवरच ताबा मिळवून विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजप करीत आहे. त्यांच्या विरोधात लाट पसरत असल्याची त्यांना जाणीव झाली आहे. त्यामुळे या निवडणूका शांततेत पार पडतील की नाही याबाबत शंका वाटते. अशी भिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी व्यक्त केली.

लोकशाहीवादी संघटनांचा निर्धार मेळावा टिळक वाड्यातील लोकमान्य सभागृहात पार पडली. त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी, कामगार नेत्या मुक्त मनोहर, कॉमे्रट अजित अभ्यंकर, माहिती अधिकार कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, पी. ए. इनामदार, भटक्या विमुक्तांच्या नेत्या सुषमा अंधारे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, डॉ. रोहित टिळक, शहराध्यक्ष रमेश बागवे, आघाडीचे उमेदवार मोहन जोशी, अन्वर राजन, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर, डॉ. सतीश देसाई, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, इंटकचे सुनील शिंदे, विरेंद्र किराड, गोपाल तिवारी, नरेंद्र व्यवहारे, नगरसेवक रविद्र माळवदकर, सुजाता शेट्टी, हनुमंत गायकवाड यांच्यासह राष्ट्रसेवा दल, अध्दश्रद्धा निर्मुलन समिती, शेतकरी कामगार पक्ष, भीम आर्मी, मतदान जागृती अभियान, संभाजी ब्रिगेड, लोकायत, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शाहु, फुले, आंबेडकर विचार मंच दलित पँथर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, सर्व शासकीय यंत्रणेचा सत्तेसाठी वापर केला जात आहे. त्यांच्या मार्फत कारवाई करून ब्लॅकमेल केले जात आहे. अशा परिस्थितीत लोकशाही वाचविण्यासाठी आपअपसातले मतभेद विसरून भाजपाविरोधात एकत्र निवडणूक लढली पाहिजे. तरच आपण मोदींचा पराभूत करू शकू. संविधान वाचविण्यासाठी म्हणून जनतेनीच ही निवडणूक हातात घेतली आहे. म्हणूनच ही निवडणूक काँग्रेस भाजपापुरती मर्यादित राहिली नाही, तर पक्षीय परिघाच्या बाहेर गेली आहे. त्यामुळेच या निवडणूकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याचेही चव्हाण यांनी नमुद केले.

मोदीं ही निवडणूक व्यक्ती केंद्रीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र काँग्रेससह सर्वांनी मिळून या गोंधळात न आडकता ही निवडणूक मु्द्यांवर आणली पाहिजे. महाआघाडीतल सर्व पक्षाने अशीच एकी टिकवून ठेवल्यास भाजपा आणि आरएसएसच्या विचारणीचा पराभव करणे सहज शक्य असल्याचा आत्मविश्वासही चव्हणांनी व्यक्त केला.

अजित अभ्यंकर म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारात देशातील रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आणणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सुरक्षेची काळजी आणि राष्ट्रवादाचा मक्ता केवळ भाजपलाच आहे, असा गैरसमज त्या पक्षाचा झालेला आहे. राष्ट्रीय सुरक्षा कुणामुळे धोक्यात आली आहे, हे भाजप नेत्यांनी स्पष्ट करावे. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे त्यांच्यावरच उलटणारे आहेत. या निवडणुकीत भाजप पक्षाचा पराभव होणे गरजेचे आहे.

मुक्ता मनोहर म्हणाल्या, देश 2014 ते 19 या कालावधीत देश खूप मागे गेला आहे. देशावर कार्पोरेट पद्धतीचा प्रभाव आहे. जे संविधा व समानता माणतात, जे पुरोगामी आहेत, त्यांची एकमुठ बांधणे आज काळाची गरज आहे. रोजगार, शिक्षण, याचे प्रश्न देशात खूप गंभीर झाले आहेत. कंत्राटी पद्धत सर्वच क्षेत्रात आणली जात आहे. विरोधात बोलले की देशद्रोही म्हंटले जाते. गरीब-श्रीमंतामधील दरी कमी करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहेत. आज देश एका वळणावर आहे, अशा वेळी देशाला सावरण्याची जबाबदारी काँग्रेसने स्विकारावी.

सुषमा अंधारे म्हणाल्या, आज देशात निर्माण झालेल्या परिस्थीतीमुळे चळवळीतील लोकांना राजकीय भूमिका घ्यावी लागत आहे. पूर्वी चळवळीत काम करणार्‍यांना लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख राष्ट्रपती आहेत. दलित, अल्पसंख्यांकांना असुरक्षित केले जात आहे. मुलभुत हक्कांवर गदा आणला जात आहे.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, मोदींचे हाथ रक्ताने माखलेले आहेत. त्यांचे नेतृत्वच दंगलीमधून निर्माण झालेले आहे. अशा या व्यक्तीचे राज्य गेली पाच वर्षात आपणास सहन करावे लागत आहे. देशातील नागरिक आज प्रजा झाली आहे. हे चित्र बदलण्याची संधी आपणास या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली आहे. ही लढाई केवळ काँग्रेसची नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे. लष्कर धर्मनिरपेक्ष ठेवणे गरजेचे आहे. लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख राष्ट्रपती आहेत. मात्र, मोदी ते ताब्यात घेण्या प्रयत्न करत आहेत, असेही सप्तर्षी म्हणाले.

विश्वंभर चौधरी म्हणाले, आज लोक बोलतंच नाहीत. ही लढाई मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी राहिलीच नाही. ती मोदी  विरूद्ध देशातील सामान्य नागरिक अशी झाली आहे. खोटा राष्ट्रवाद पसरवण्याचे काम केले जात आहेत. विरोधात बोलणार्‍यांना जा पाकीस्तानात असे म्हणतात. जणू काय भाजप नेते व्हीजाच घेऊन बसले आहेत. राहुल गांधींची न्याय ही योजना क्रांतीकारी आहे.

निरंजन टकले, नीरज जैन यांनी मनोगत व्यक्त केले. लोकायतच्या कार्यकर्त्यांनी ‘क्या हुआ तेरा वादा‘ हे गीत सादर केले. लोकायतच्या पदाधिकार्‍यांनी काँग्रेसला पाठिब्यांचे पत्र दिले.

मोहन जोशी यांची मंडई, शुक्रवार पेठ, सदाशिव पेठेत संवाद यात्रा

पुणे – ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील मंदिरात शारदा – गजाननाची आरती करून आशिर्वाद घेऊन पुणे शहर
लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – पिपल्स रिपब्लीकन आघाडी, शेकाप आणि मित्र पक्षांच्या
महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज मंडई परिसर, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठेतील नागरीकांशी संवाद
यात्रेव्दारे संवाद साधला. या संवाद यात्रेच्या मार्गावर अनेक गणेश मंडळ आहेत. प्रत्येक ठिकाणी थांबून मोहन जोशी
कार्यकर्त्यांची नावे घेत चौकशी करत कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क अधिक भक्कम करतानाच यावेळी देश, महाराष्ट्र आणि
पुण्याला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करत होते. रणरणत्या उन्हात
फिरत संवाद साधणा-या या सर्वच कार्यकर्त्यांना अनेक ठिकाणी थंडगार पाणी देण्याचे काम मतदारांनी केलेले बघायला
मिळाले.
या संवादयात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकूश काकडे, अखिल मंडई
मंडळाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आण्णा थोरात, डॉ. सतीश देसाई, युवक काँग्रसचे अखिल
भारतीय समन्वयक रोहित टिळक, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष रवींद्र माळवदकर, माजी नगरसेवक बुवा नलावडे,
महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, सदानंद शेट्टी, रवींद्र धंगेकर अजित दरेकर आदी नगरसेवक, संजय
बालगुडे, बाळासाहेब दाभेकर, विरेंद्र किराड, गोपाळ तिवारी, शिरीष मावळे, प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा
कमल व्यवहारे, नीता रजपूत, काँग्रेसचे कसबा ब्लॉकचे अध्यक्ष प्रवीण करपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कसबा ब्लॉकचे अध्यक्ष
विनायक हणमगर, कार्याध्यक्ष गणेश नलावडे, अनिल सोंडकर, बाळासाहेब मारणे, जयसिंग भोसले, संजय पासलकर,
अशोक जाधव, राजेंद्र देशमुख, सतीश मोहळ, सुनील खाटपे, संजय मते, दीपक जगताप, विजय खराडे, रजनी पाचंगे,
मनसेच्या महिल अध्यक्ष ऍड रूपाली पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पक्षांचे पदाधिकारी या संवाद
यात्रेत सहभागी झाले होते.


शारदा गजाननाचे दर्शन घेतल्यावर मंडईतील कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पराह अर्पण करून मोहन
जोशी यांनी मंडईतील व्यापारी, भाजीविक्रेते आणि भाजी खरेदीसाठी आलेले ग्राहक यांच्याशी संवाद साधून आपल्या
यात्रेचा प्रारंभ केला. शिदे आळीत प्रथम मंडळातर्फे नाना मारणे यांनी त्यांचे स्वागत केले. पुढे अकरा मारूत, सेवा मित्र
मंडळ, चिंचेची तालीम मंडळ, जोशी समाज मंडळ, सुभाषनगर, बाजीराव रोड, महाराणा प्रताप उद्यान, खजिना विहीर,
नागनाथ पार, शनिपार मंडळ, अप्पाबळवंत चौक, केसरीवाडा, मोदी गणपती, विजय टॉकीज चौक, खालकर तालीम,
अखिल टिळक रोड मंडळापासून अशोक विद्यालय येथे संवाद यात्रेची सांगता झाली.
आजच्या संवाद यात्रेत कोणतेही वाद्य नव्हते, चौकाचौकात फटाक्यांच्या माळा लावून यात्रेचे स्वागत
करण्यात येत होते. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या फडकणा-या झेंड्यांमुळे यावेळी  वातावरण मोहन जोशीमयझाले होते. उत्साही कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळे पदयात्रेत उत्साह भरला जात होता. जशजशी संवादयात्रा पुढे सरकत
होती तसा उन्हाचा चटका वाढत असला तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. अनेक चौकात मतदारांनी
स्वत:हून पुढे येऊन मोहन जोशी यांच्याशी संवाद साधल्याचे चित्र कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे होते.

पर्वती विधानसभा मतदार संघात पदयात्रा

मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ सोमवारी सकाळी पर्वती विधानसभा मतदारसंघात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस- आणि मित्र पक्षांचे झेंडे घेऊननिघालेल्या कार्यकर्त्यांनी ‘पुण्याची ख़ुशी – मोहन जोशी ‘ एकच वादा मोहन दादा ‘ ‘मोहन दादा आगेबढो हम तुम्हारे साथ है ‘या दिलेल्या विविध घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता .
अप्पर चौकातील तृप्ती हॉटेल पासून सुरु झालेली ही प्रचार फेरी व्ही आय टी कॉलेज – प्रियदर्शनी शाळा – गणेश नगर – अप्पर डेपो – पवन नगर – पद्मावती नगर – सरगम नगर -तुळजाभवानी नगर -अंबिका नगर -या मार्गाने जाऊन कामगार-नाका येथे या प्रचारफेरीचा समारोप करण्यात आला.


या प्रचार फेरीत नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस
अभय छाजेड ,शशिकला कुंभार, नितीन कदम ,सोनाली मारणे,सतीश पवार, जयकुमार ठोंबरे,  गोरख मरळ , सतीश गिले, नीता नेटके , ताई कसबे, रजिया बिल्लारे, टी. एस. पवार, धनंजयकांबळे , दीपक ओव्हाळ , मामा परदेशी, संतोष पाटोळे ,सुमन इंगवले , यांच्या सह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते .
कामगार नाका येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना नगरसेवक आबा बागुल म्हणाले की , कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच पुण्याचा विकास करण्यासाठी काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत मोहन जोशी यांच्या सारख्या कार्यकर्त्यास उमेदवारी दिली आहे . काँग्रेस सत्तेवर आल्यावर काँग्रेसने घोषित केलेल्या आपल्या जाहीरनाम्यानुसार गरिबांच्या खात्यात वर्षाला ७२००० रुपये निश्चितच जमा होणार आहेत, मोदी सरकारच्या १५ लाखाच्या घोषणे सारखा तो भूलभुलैया नाही असेही त्यांनी
सांगितले .
या प्रसंगी अभय छाजेड म्हणाले , केंद्रातील मोदी सरकारने जनतेला खोटी आश्वासने दिली , अर्थव्यवस्था डबघाईला आणली , आज महागाईने सगळी जनता त्रस्त आहे अशावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीने मोहन जोशींसारखा उमदा उमेदवार दिला आहे त्यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

मार्केटयार्ड , मुकुंद नगर परिसरात महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांचा प्रचार

पुणे- शहराच्या संमिश्र अशा मार्केटयार्ड , मुकुंद नगर परिसरात महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी सोमवारी सकाळी प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला . आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने अनेकाना कामावर जाण्याची गडबड होती तरी पण नागरिकांनी श्री बापट याना शुभेच्छा दिल्या.
रणरणत्या कडक उन्हाचा चटका बसत असतानाहि कार्यकर्त्याचा उत्साह कमी झाला नव्हता. वाजत– गाजत आणि घोषणा देत कार्यकर्त्यांनी  प्रचारफेरीचा सारा परिसर  दुमदुमून सोडला. मुकुंद नगरमधील सुजय गार्डन पासून सुरु झालेली  प्रचारफेरी डायस प्लॉट , सॉलिसबरी पार्क, महर्षीनगर, मार्केटयार्ड , मार्गे गंगाधाम चौक येथे समारोप झाला. यामध्ये प्रभाग क्रमांक २८ आणि ३६ चा समावेश आहे . प्रचारफेरी मधील जीपमध्ये महायुतीचे उमेदवार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ , सभगृह नेते श्रीनाथ भीमाले , स्थायी  समिती अध्यक्ष सुनिल कांबळे, नगरसेवक बाला ओसवाल, प्रवीण चोरबेले, राजश्री शिळीमकर, सविता वैरागे,राजा शिळीमकर , हंसा  चव्हाण, मानसी देशपांडे, श्रीकांत पुजारी,  महेश लडकत, शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र शिळीमकर, सुरज लोखंडे, महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा सुनीता चिंतल,बाळासाहेब ओसवाल,बसवराज शेलार त्याचप्रमाणे महायुती मधील विविध घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
”  आले आले रे, भाजप निशाणी घेऊन आले, गिरीश भाऊ बापट आले, ” अशी गीते नागरिकांना प्रचार फेरीच्या माध्यमातून ऐकण्यास मिळाली. डायस प्लॉट आणि सॊलिसबरी पार्क परिसरात श्री बापट यांचे नागरिकांनी अभूतपूर्व असे स्वागत केले. तर चौकाचौकात  सुवासिनींनी औक्षण करून आशीर्वाद दिले. तर बहुतांशी ठिकाणी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली .  मार्केटयार्ड परिसरात व्यापारी बांधवानी श्री बापट यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

ब्लॅकमेल करण्यासाठी कुंडल्या ठेवता काय ? पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांना सवाल (व्हिडीओ)

पुणे—जर तुमच्याकडे कुंडल्या आहेत तर कारवाई करणे अपेक्षित आहे,पण निव्वळ माझ्या कडे कुंडल्या आहेत अशा धमक्या देणे म्हणजे ब्लॅकमेल करण्यासारखे आहे अणे असे प्रकार पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत हि बाब अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय असल्याचे आज काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे ,
स्व. इंदिरा गांधी यांनी सुरू केलेली गरीबी हटाव योजना याला कुठलीही कालमर्यादा नव्हती.कॉँग्रेसच्याच किमान उत्पन्न हमी योजननेच्या(न्याय योजना) माध्यमातून गरीबी विरुद्धची अंतिम लढाई जाईल आणि देशातील गरीबी दूर होईल असा विश्वास
चव्हाण यांनी व्यक्त केला. न्याय योजना ही क्रांतिकारी योजना असून तो कॉँग्रेसच्या जाहीरनाम्याचा मूळ गाभा आहे असेही त्यांनी संगितले.
कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या  प्रचारार्थ ते येथे आले तेव्हा कॉँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा जाहीरनामा यावर त्यांनी सडकूनटीका केली. कोंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पुणे लोकसभा मतदार संघाचे कोंग्रेस- राष्ट्रवादीआघाडीचे उमेदवार मोहन जोशी दीप्ती चवधरी, नगरसेवक रवींद्र धंगेकर, कमाल व्यवहारे , श्रीकांत शिरोळे, नीता रजपूत आदि यावेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, न्याय योजनेसाठी किती पैसे लागतील याचे सर्व आकलन झाले आहे. देशात टप्प्याटप्प्याने ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी ३ लाख ६० हजार कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. सुरूवातीला १० टक्के लोकांसाठी १ लाख ८० हजार कोटी रुपये लागतील. या योजनेच्या लाभार्थीची निवड काशी करायची हे पुढे ठरवले जाईल. त्या आम्ही करू. या योजनेसाठी इतर लाभांच्या कुठल्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत. जीसटी,डायरेक्ट टॅक्स यामुळे करामध्ये चांगली वाढ होईल. त्यातून या योजनेचे व्यवस्थित नियोजन होईल. त्यामुळे या योजनेसाठी कुठून पैसे
आणणार याची विरोधकांनी चिंता करण्याची गरज नाही.
काँग्रेस पक्षचा जाहीरनामा हा माजी वित्तमंत्री पी चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने तयार केला आहे. हा जाहीरनामा एकूण ५५ पानाचा असून ४२ उपसमित्या त्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. समन्वयक उपसमन्वयक यांच्या माध्यमातून देशातील १२१ ठिकाणी विविध घटकांशी ,संघटनांशी चर्चा करून आणि ५५ लोकसभा मतदार संघात जावून चर्चा करून हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हा कोंग्रेसचा नाही तर जनतेचा जाहीरनामा आहे असे त्यांनी नमूद केले.
इंदिरा गांधींनी गरीबी हटावची घोषणा केली तेचा देशातील ७८ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली होती.त्यांनी गरीबी हटावसाठी कुठलीहे कालमर्यादा संगीतलेली नव्हती. त्यांनी बँकांचे राष्ट्रियकरण करूनत्यातून क्रेडिट पॉलिसी आणली. २० कलमी कार्यक्रम राबविला. अन्न सुरक्षा कडा, मनरेगा या माध्यमातून २००४ ते २०११ पर्यन्त देशातील १४ कोटी जनता दारिद्र्य रेषेच्यावर आली. त्यामुळे न्याययोजना ही दारिद्र्याविरुद्ची शेवटची लढाई आहे असे ते म्हणाले.

भाजपवर टीका करताना चव्हाण म्हणाले,निवडणुका आल्या की त्यांना राम मंदिराचा मुद्दा आठवतो.हा मुद्दा पुढे आणायचा आणि पुढे काहीच कारचे नाही. परंतु एका गोष्टीवर ते निवडणूक लढवू शकत  नाहीत. आता ही निवडणूक मुद्यांवर गेली आहे. भाजप ही निवडणूक व्यक्तिकेन्द्रित करू पाहत आहे. आमच्या नेत्यांवर व्यक्तीगत टीका करायची, स्वत:बद्दल बोलायचे नाही. परंतु त्यांनी मुद्यावर बोलावे, गेल्या पाच वर्षात काय केले? किती आश्वासने पूर्ण केली यावर बोलले पाहिजे.
आमच्या जाहीरनाम्या वर त्यांनी बोलावे. परंतु मोदी मुद्दाम जनतेचे लक्ष विचलित करत आहेत कारण
त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यांच्या जाहीरनाम्यातील किसान सन्मान योजना, शेतकरी उत्पन्न दुप्पट कसं करणार, योजना बोगस आहे, उत्पन्न दुप्पट होण्यासाठी १८ ते २० टक्के विकासदर हवा आहे. महागाई नियंत्रण साठी
भाजपनं नेमकं काय केलं? चुकीचं आयात धोरण राबविले. जेव्हा शेतीमालाला चांगला दर मिळेल तेव्हा निर्यात बंद करायची असे धोरण त्यांनी राबविले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या. भाजपला जाहीरनामा सुद्धा म्हणता आलं नाही, संकल्प पत्र म्हणावं लागलं अशी टीका त्यांनी केली.
कुठलीही व्यक्ति नरेंद्र मोदींचे खरे स्वरूप उघड करत असेल त्यांचा पर्दाफाश करत असेल आणि भाजपचा खोटेपणा लोकांच्या समोर आणला तर ते स्वागतार्ह आहे असे संगत त्यांनी राज ठाकरेंचीपाठराखण केली. त्याचे मतांमध्ये किती रूपांतर होईल हे निवडणुकीनंतरच समजेल असे त्यांनी नमूद केले.

गिरीश बापट यांच्या प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण निवडणूक प्रमुख विजय काळे यांची माहिती

पुणे- पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला असून मतदारांचा प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याची माहिती निवडणूक प्रमुख आमदार विजय काळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
बापट यांच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बापट यांनी सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार फेर्‍या पूर्ण केल्या आहेत. सर्व मतदारसंघातील विभागीय कार्यालये कार्यान्वित झाली असून, त्या मार्फत  प्रभागनिहाय प्रचाराचे नियोजन पूर्ण झाले आहे.
शहरात एकूण १९४४ बूथ असून १८०६ बूथप्रमुखांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्या आहेत. ४१६ शक्तीकेद्रांपैकी ४०६ शक्तीकेंद्राच्या प्रमुखांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. भाजप वॉर रूमच्या माध्यमातून पंचवीस हजार कार्यकर्त्यांची फौज प्रचारात उतरणार आहे. बूथप्रमुखांच्या माध्यमातून शासनाच्या योजना, पत्रक वाटप, मतदार स्लिप वाटप, मोबाईल ऍपद्वारे मतदार यादीतील नाव व केंद्राची माहिती देणे अशाप्रकारची कामांना या काळात प्राधान्य देण्यात येणार आहेत.
प्रचाराच्या दुसर्‍या टप्प्यात सर्व विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या दुसर्‍या फेर्‍यांचे नियोजन करण्यात येणार आहे. या टप्प्यावर बापट यांच्या परिचय पत्रकांचे घरोघरी वाटप, शासनाच्या योजना पोहोचविणे, जाहीरनामा निर्मिती आदी कामे करण्यात येणार आहेत. केंद्र व प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या सभा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (९ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता चंदननगर भाजी मंडई, नगर रस्ता येथे आणि महात्मा फुले विद्यालय, नाना पेठ, क्वार्टर गेट येथे रात्री ८ वाजता जाहीर सभा घेणार आहेत. संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांची सभा १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता नेहरू मेमोरिअल हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.
दुसर्‍या टप्प्यात महायुतीच्या वतीने २०० कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ एप्रिलपासून या सभांना प्रारंभ होणार आहे. त्यासाठी महायुतीच्या स्टार प्रचारक निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे, आरपीआयचे अध्यक्ष अशोक कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, विजय काळे, प्रा. मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, शाम देशपांडे, परशुराम वाडेकर, महिपाल वाघमारे, अशोक हरवाणळ, बाळा ओसवाल, प‘वी जावळे, विशाल धनावडे, पृथ्वीराज सुतार, डॉ. अमोल देवळेकर, संजय सोनावणे असे पन्नास स्टार प्रचारक शहरातील वस्ती व सोसायट्यांमध्ये प्रचार करणार आहेत.

रेणुका शहाणे म्हणते, ‘शहाणे’ बना; सावध राहा!

0

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला काही दिवस उरले असताना बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीही सक्रीय झाले आहेत. अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या राजकीय भूमिकेतून सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे यापैकीच एक. निवडणुकीदरम्यान ‘शहाणे’ बना आणि डोळसपणे मतदान करा, असे आवाहन रेणुकाने केले आहे.
‘निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षांचे उमेदवार अचानक ‘सामान्य’ नागरिकांसारखे बस, ट्रेन, मेट्रोमधून प्रवास करतील. गरीबाच्या झोपडीत जावून भोजन करतील. शेतकऱ्यांसोबत राबताना दिसतील. नागरीक या नात्याने या उमेदवारांचे गत पाच वर्षांचे वर्तन आणि काम आपण बघायला हवे

आपले प्रत्येक मत मोलाचे आहे. सावध राहा,’ असे ट्वीट रेणुका शहाणेने केले आहे.रेणुकाचे हे ट्वीट वाचून अनेकांनी तिला पाठींबा दिला आहे. याऊलट काहींनी तिला ट्रोल केले आहे. रेणुकाने या ट्वीटमधून हेमा मालिनी आणि संबित पात्रा सारख्या राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे, असे अनेकांचे मत आहे. अलीकडे हेमा मालिनी शेतकऱ्यांसोबत ट्रॅक्टर चालवताना व त्यांच्यासोबत राबताना दिसल्या होत्या. तर संबित पात्रा गरीबांच्या घरी जेवताना दिसले होते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
काही दिवसांपूर्वी रेणुकाने भाजपा नेते एम. जे. अकबर यांना लक्ष्य केले होते. अलीकडे काँग्रेसने सोशल मीडियावर ‘चौकीदार चोर है’ अशी मोहिम उघडली होती. याच मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडून ‘मैं भी चौकीदार’ या कॅम्पेनची सुरुवात करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे ‘चौकीदार नरेंद्र मोदी’असे नवीन नाव ठेवण्यात आले होते. भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी, मोठ्या नेत्यांनी तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी देखील ‘चौकीदार अमित शाह’ असे नाव ठेवले होते. भाजपाच्या या मोहिमेला माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांनी देखील पाठिंबा दिला होता. यानंतर रेणुका शहाणे यांनी यावरून एम.जे.अकबर यांच्यावर टीका केली होती. ‘ तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच’ असा टोला रेणुका तिने लगावला होता.

शहानवाझ हुसेन यांचे कलाकारांचा अपमान करणारे वक्तव्य म्हणजे विकृत मनोवृत्ती-उल्हास पवार

भीम आर्मीचा मोहन जोशी यांना पाठिंबा
पुणे- सहाशे कलाकारांनी भाजपला मतदान केले नाही तरी भाजपला काही फरक पडत नाही. सहा कोटी
कलाकार भाजपला मतदान करतील हे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांचे वक्तव्य हे उत्तुंग
व्यक्तिमत्व असलेल्या कलावंतांना न जुमाणणारे व त्यांच्या विकृत मनोवृत्तीचे लक्षण आहे अशी टीका
कोंग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार यांनी केली.
पुणे शहर लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार
मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी विरेन्द्र किराड, हे
उपस्थित होते. देशातील सहाशे कलाकार एकत्र येत त्यांनी भाजपाच्या विरोधात मतदान करा असे
आवाहन केले आहे. यात ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्याबरोबरच अभिनेते नसरुद्दीन शहा
यांचा सहभाग आहे. या सहाशे कलाकारांची मते विरोधात गेली तरी भाजपाला फरक पडत नसून
भाजपाच्या बाजूने सहा कोटी कलाकार उभे राहतील अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाझ
हुसेन यांनी शनिवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा उल्हास
पवार यांनी समाचार घेत त्यांचा निषेध विकत केला.
पवार म्हणाले, शहनवाझ हुसेन यांचे वक्तव्य हे अत्यंत निंदनीय आहे. एखाद्याने आपले मत व्यक्त
केले तर त्याला सामाजिक उत्तर देणे अपेक्षित आहे. एवढ्या उत्तुंग आणि नामवंत कलाकारांचा, तुम्ही
आमच्या बाजूला नसाल तर आम्ही तुम्हाला जुमानणार नाही असे वक्तव्य करणे म्हणजे या
कलाकारांचा अपमान आहे. भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला आपले मत
मांडण्याचा अधिकार दिला आहे. या ६०० कलाकारांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. तो त्यांचा मूलभूत
अधिकार आहे. असे असताना या कलावंतांना जुमानत नाही अशा आशयाचे ६०० कलाकारांनी मते दिले
नाही तर फरक पडत नाही असे वक्तव्य म्हणजे विकृत मनोवृत्तीचे लक्षण आहे असे ते म्हणाले.
भीम आर्मीचा मोहन जोशी यांना पाठिंबा
भीम आर्मीचे पुणे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांनी मोहन जोशी यांना संघटनेच्या वतीने पाठिंबा व्यक्त
केला आहे. देशातील वातावरण असंतोषाचे असून संविधान पायदळी तुडविले जात आहे. जाती धर्माच्या
नावाने देश तोडण्याची भूमिका प्रस्थापित सरकारची आहे. त्यांची धोरणे जनता विरोधी असून
सर्वसामान्यांची पिळवणूक करून जनतेला गुलाम करण्याचे धोरण मोदी व त्यांच्या सहकार्‍यांचे आहे.
त्यामुळे संविधान सर्वस्व मानून, संविधनांचे रक्षण व्हावे व लोकशाही अबाधित राहावी या भूमिकेतून

सर्वानुमते मोहन जोशी यांना पाठिंबा देत असल्याचे दत्ता पोळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात
म्हटले आहे.
प्रियंका गांधी यांना ‘रोड शो’साठी विनंती
कोंग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी कोंगेस-राष्ट्रवादी कोंग्रेस आणि मित्र पक्षांच्या
आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यामध्ये रोड शो करावा अशी विनंती त्यांना केली असल्याची
माहिती उल्हास पवार यांनी दिली. आघाडीचे राष्ट्रीय आणि प्रदेश स्तरावरचे नेतेही प्रचारला येणार
असल्याचे उल्हास पवार यांनी संगितले. राज ठाकरे हे त्यांची भूमिका त्यांच्या जाहीर सभांमधून मांडत
आहेत. त्यांनी त्यांच्या स्वेछेने त्यांचे दौरे आयोजित केले आहेत. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करता येणार
नाही. मात्र, त्यांनी पुण्यामध्ये जाहीर सभा घेतल्यास आम्हाला आनंदच होईल असे पवार यांनी नमूद
केले.

इंटकच्या कामगार मेळाव्यात काँग्रेस आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार

पुणे–राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या (इंटक) रविवारी सायंकाळी काँग्रेस भवनात झालेल्या भव्य मेळाव्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीच्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या मेळाव्यास विविध क्षेत्रातील कामगार संघटनांचे प्रतिनिधी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, इंटक पुणे शहर व जिल्ह्याचे अध्यक्ष व या मेळाव्याचे संयोजक कैलास कदम, पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी माजी आमदार दीप्ती चवधरी, राष्ट्रवादीचे गोपालकृष्ण गुनाळे, शहर काँग्रेसच्या उपाध्यक्ष शलाका पाटील, इंटकचे कायदेशीर सल्लागार फैयाज शेख व अन्य कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल म्हणाल्या की, ‘जुमले की सरकार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोदी सरकारच्या राजवटीत कामगारांचे कोणतेही प्रश्न सोडविण्यात आले नाहीत मात्र काँग्रेसने नेहमीच कामगार हिताचे धोरणे राबविली आहेत त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना विजयी करणे हे प्रत्येक कामगारांचे कर्तव्य आहे.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, मोदी सरकारचे धोरण कामगारविरोधी व उद्योगपतीधार्जिणे होते त्यामुळे कामगारांचे फार नुकसान झाले. नोटबंदीच्या निर्णयामुळे हजारो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. एकीकडे महागाई तर दुसरीकडे बेकारी यामुळे कायदा व सुव्यस्थेची स्थिती बिघडली. त्यासाठी आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे. कामगारांनी एकजुटीने काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या उभे राहून त्यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी म्हणाले, मीही सुरुवातीला एक गिरणी कामगार होतो. कामगारावर अन्याय झाल्यास त्यासाठी आंदोलन करणारा करणारा कार्यकर्ता होतो. त्यामुळे या निवडणुकीत मी निवडून आल्यास कामगारांचा एक लोकप्रतिनिधी म्हणून कामगारांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे त्यांनी आश्वासन दिले.
इंटक पुणे शहर व जिल्ह्याचे अध्यक्ष व या मेळाव्याचे संयोजक कैलास कदम यांनी इंटकचे कामाचा आढावा घेऊन सांगितले की, देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाण्याची कामगार शक्तीची ताकद आहे मात्र गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने कामगारांचे कोणतेच प्रश्न सोडविले नाहीत उलट त्यांचे जिणे हराम केले त्यामुळे हे सरकार आता खाली खेचण्याची गरज निर्माण झाली आहे त्यासाठी सर्व कामगारांनी काँग्रेस आणि आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.
याप्रसंगी शहर काँग्रेसच्या उपाध्यक्ष शलाका पाटील, राष्ट्रवादीचे गोपालकृष्ण गुनाळे, नासिरुद्दीन इनामदार, रफिक शेख आदींची भाषणे झाली. श्री मनोहर गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. अनिल आवटी यांनी आभार मानले.

काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस -मित्र पक्ष आणि आघाडीचे उमेदवार मोहन जोजही यांच्या प्रचारार्थ रविवारी मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दांडेकर पूल -पानमळा -सिंहगड रस्ता -राजाराम पूल- हिंगणे खुर्द – जनता वसाहत -पर्वती गाव – लक्ष्मीनगर -सारंग सोसायटी- सहकारनगर -अरण्येश्वर- दाते स्टॉप -ट्रेझरपार्क सहकारनगर पोलीस स्टेशन या मार्गाने गेलेल्या या रॅलीचा चव्हाण नगर तीन हत्ती चौक इथे समारोप झाला. शंभरहून अधिक मोटारसायकलींसह कार्यकर्ते काँग्रेस व मित्रपक्षांच्या झेंड्यासह या रॅलीत सहभागी झाले होते. उमेदवार मोहन जोशी या रॅलीत सहभागी झाले तेंव्हा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अभय छाजेड यांनी या रॅलीचे आयोजन केले होते.

‘बापूंच्या कारावासाची कहाणी’ पुस्तकाचे गुरुवारी आगाखान पॅलेसमध्ये प्रकाशन

0

पुणे : कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट इंदोर व महाराष्ट्र शाखा, सासवड आणि नगर रस्त्यावरील गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी आगाखान पॅलेस यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य ‘बा’ अर्थात कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘बापूंच्या कारावासाची कहाणी’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले आहे. गुरुवार, दि. ११ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ वाजता आगाखान पॅलेस येथील कस्तुरबा स्मृती सभागृहात हा प्रकाशन सोहळा होणार आहे. हिंदी लेखिका स्वर्गीय डॉ. सुशीला नायर लिखित मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. शोभनाताई रानडे यांनी केला आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्ट, इंदोरचे माजी अध्यक्ष धीरूभाई मेहता व समाजसेविका सुनीती रघुनाथ सुलभा यांच्या हस्ते होणार असून, यावेळी कस्तुरबा गांधी नॅशनल ट्रस्टच्या उपाध्यक्षा गायत्रीदास दीदी, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, कस्तुरबा ट्रस्टच्या मंत्री सुरजदिदी डामोर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कस्तुरबा गांधी ट्रस्ट, इंदोरचे अध्यक्ष डॉ. करुणाकर त्रिवेदी असतील, अशी माहिती कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, सासवडच्या शेवंताताई चव्हाण यांनी दिली.

10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत दिवीज पाटील, नील केळकर, नमिश हूड, ओम वर्मा यांचे विजय

0

पुणे-  नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या फिनआयक्यू करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत आदित्य योगी, मिहीर कदम, अंशूल पुजारी, विरेन चौधरी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित दिवीज पाटीलने स्मित उंद्रेचा 6-0 असा सहज पराभव केला. नील केळकर याने मिहीर कदमचा 6-0 असा तर, नमिश हूडने स्वर्णीम येवलेकरचा 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. तिसऱ्या मानांकित ओम वर्माने पृथ्वीराज दुधानेवर 6-0 असा विजय मिळवला.

मुलींच्या गटात रित्सा कोंडकर,दिया अगरवाल, स्वनिका रॉय, सिद्धी मिश्रा, श्रावी देवरे यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 1वर्षाखालील मुले:

दिवीज पाटील(1) वि.वि.स्मित उंद्रे 6-0;

वीरेन चौधरी वि.वि.आयुष खादादे 6-2;

राम मगदूम वि.वि.आदित्य योगी 6-1;

नील केळकर वि.वि.मिहीर कदम 6-0;

नमिश हूड वि.वि.स्वर्णीम येवलेकर 6-2;

अहाण शेट्टी(5) वि.वि.सुश्रुत बोरगावकर  6-0;

अर्जुन परदेशी वि.वि.सोहम नाग 6-3;

चिन्मय ठाकरे वि.वि.क्षितिज अमीन 6-4;

आयुष पुजारी(7) वि.वि.ईशान ओक 6-0;

ओम वर्मा(3) वि.वि.पृथ्वीराज दुधाने 6-0;

10 वर्षाखालील मुली: पहिली फेरी:

रित्सा कोंडकर वि.वि.प्रांजली पंडुरे 6-0;

दिया अगरवाल वि.वि.आदिती सागवेकर 6-5(5);

स्वनिका रॉय वि.वि.वंशिका अगरवाल 6-5(3);

सिद्धी मिश्रा वि.वि.दिया बोरुंदीया 6-2;

श्रावी देवरे वि.वि.स्वरा जावळे 6-0.

‘आयसीएआय’ पुणे शाखेची चार पारितोषिकांवर मोहर

0
राष्ट्रीय दोन, विभागीय दोन पारितोषिकांचा समावेश; आनंद जाखोटिया यांनी मानले सर्वांचे आभार
पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेला २०१८ मधील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर दोन, तर विभागीय पातळीवर दोन असे चार पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर ‘आयसीएआय पुणे’ला दुसरी सर्वोत्तम शाखा आणि सर्वोत्तम विद्यार्थी (विकासा) शाखा म्हणून पहिले पारितोषिक मिळाले. तर विभागीय पातळीवर आयसीएआय पुणे शाखा आणि विद्यार्थी शाखा दोघानांही प्रथम पारितोषिक मिळाले.
दरवर्षी विविध शाखांना त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संस्थेच्या मुख्य व विभागीय कार्यालयातून सर्वोत्तम शाखेचे पारितोषिक दिले जाते. राष्ट्रीय पातळीवरील यंदाच्या सर्वोत्तम १० शाखांमध्ये पुणे शाखेने पात्रतेच्या निकषांप्रमाणे काम करत ९९ टक्के गुण संपादन केले व राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम शाखेचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. तर विकासा या विद्यार्थी शाखेने १०० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. नुकताच नवी दिल्ली येथे हा पारितोषिक वितरणसोहळा भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक राजीव मेहरीशी यांच्या हस्ते पार पडला.


याचबरोबर पुणे शाखेने आणि विद्यार्थी शाखेने विभागीय स्तरावरील (पश्चिम विभागामध्ये सुमारे ४० शाखा आहेत ) १०० टक्के गुण संपादन करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. हा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मुंबई येथे पार पडला. ही चारही पारितोषिके आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए आनंद जाखोटिया (२०१८-१९) यांच्या नेतृत्वाखाली मिळाली आहेत. ५७ वर्षांच्या इतिहासात चार पारितोषिके मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे.
आनंद जाखोटिया म्हणाले, “या यशामध्ये शाखेचे पदाधिकारी कार्यकारी मंडळाचे सदस्य मुख्य कार्यालयाच्या कार्यकारणीचे सभासद पश्चिम विभागीय कार्यकारणीचे सभासद ,शाखेच्या उपमंडळाचे सदस्य, पुण्यातील सर्व लेखापरीक्षक, व्याख्याते, विद्यार्थी, शाखेमधील सेवक इत्यादीचा महत्वाचा वाटा आहे. सर्वांच्या सहकार्याने व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने हे यश संपादन करणे शाखेला शक्य झाले आहे. ‘आयसीएआय’च्या देशभरात एकूण १६३ शाखा असून, पुणे शाखा राष्ट्रीय स्तरावरील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शाखा आहे. या शाखेत ८००० सीए असून, २२ हजार सीए करणारे विद्यार्थी आहेत. विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष सीए राजेश अगरवाल यांचा सहभाग उल्लेखनीय राहिला.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंगळवारी पुण्यात २ सभा -15 दिवसात दीडशे पथनाट्यासाठी टीम सज्ज

पुणे-
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (९ एप्रिल) संध्याकाळी दोन जाहीर सभा घेणार आहेत. पर्वती व कॅन्टोन्मेंट विधानसभेसाठी संयुक्त आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात सभांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे संघटन सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र शिंदे, आरपीआयचे प्रसिद्धी प्रमुख ऍड. मंदार जोशी उपस्थित होते.
         सांस्कृतिक आघाडीच्या वतीने पथनाट्य भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश आणि शहर सांस्कृतिक आघाडीच्या वतीने महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ पथनाट्याची निर्मिती केली आहे. पथनाट्याचे दोन संघ असून प्रत्येक संघात पाच कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दररोज दहा प्रयोग करण्यात येणार आहेत. पुढच्या पंधरा दिवसात शहराच्या विविध भागांत दीडशे प्रयोग करण्यात येणार आहेत.
पथनाट्याची वैशिष्ट्ये
‘ पथनाट्याचे नाव ः फिर  एक बार, मोदी सरकार
‘ लेखक ः विजय मंगेश पगारे
‘ सादरकर्ते ः भाजप सांस्कृतिक आघाडी
‘ गेल्या पाच वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेले विविध विकास प्रकल्प आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करणे 
‘ मेट्रो प्रकल्प, नोकरी व्यवसाय संधी, शेतकर्‍यांना दिलेल्या सुविधा हे विषय निवडले आहेत
‘ एकूण दोन टीम
‘ दररोज दहा प्रयोग
‘ एकूण १५० शो करणार
‘ कलाकार टीम १ः सुजित मेस्ट्री, नितीन जाधव, मनोज भिसे, प्रायजोत शिंदे, प्राप्ती भोसले
‘ कलाकार टीम २ ः यतिन पवार, मंथन खांडगे, प्रतिक पवार, प्रथमेश पाटील, ऐश्‍वर्या बापट  

रविवारच्या सुटीतील प्रचार फेरीत -बापटांवर शुभेछ्यांचा वर्षाव

पुणे-रविवारचा सुट्टीचा दिवस , त्यातच सकाळपासून जाणवणारा असह्य असा उकाडा पण याचा कोणताही परिणाम कार्यकर्त्याच्या उत्साहावर अजिबात झाला नाही .वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील रविवारी सकाळी आयोजित केलेल्या महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद पुणेकरांकडून मिळाला.

सुमारे चार तासाच्या प्रचारफेरीत उमेदवार श्री बापट यांनी प्रभाग क्र . १ , २ आणि ६ हा सारा भाग प्रचाराने पिंजून काढला. मोठ्या रस्त्यांबरोबर लहान रस्त्यावरून निघालेल्या प्रचारफेरीचे नागरिकांनी जोरदार पणे स्वागत केले. ठिकठिकाणी उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडले ,तर अनेक भागात नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्तेपणाने श्री बापट यांना शुभेच्छा दिल्या . आणि श्री बापट यांनीही पुणेकरांच्या शुभेच्छाचा हात उंचावून स्वीकार केला. अनेक सुवासिनींनी श्री.बापट याना औक्षण करून आशिर्वाद दिले.

वडगावशेरी विधानसभा मतदार संघ हा अतिशय मोठा असा मतदारसंघ होय. या मतदारसंघातील विश्रांतवाडी येथून सुरु झालेली प्रचारफेरी ,टिंगरेनगर, धानोरी, भैरवनगर, प्रतीकनगर, शांतीनगर , महाराष्ट्र हौसिंग बोर्ड , आणि तेथून येरवडा येथील पर्णकुटी चौक येथे समारोप झाला . श्री बापट यांनी सर्व कार्यकर्त्याच्या भेटी घेतल्या . आणि प्रचारफेरीची सांगता केली. प्रचार फेरीतील जीपमध्ये श्री बापट यांच्या समवेत वडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार जगदीश मुळीक ,उपमहापौर सिद्धार्थ धेंडे तसेच अन्य नगरसेवक सहभागी झाले होते.

या प्रचारफेरीमध्ये नगरसेवक योगेश मुळीक , गोपाळ चिंतल , संदीप जराड , राहुल भंडारी, बापू कर्णे गुरुजी, संजय भोसले , सुनील टिंगरे, नाना सांगडे , किरण जठार, अविनाश साळवे. शीतल सावंत , सुनीता गलांडे, श्वेता शिंदे, आदींचा यामध्ये समावेश होता. प्रचारफेरीमध्ये महायुतीमधील विविध घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बहुतांशी कार्यकर्ते दुचाकीसह प्रचारफेरीत सहभागी झाले होते. अनेकांच्या दुचाकीवर पक्षाचे झेंडे फडकत होते. ” बापट याना मत म्हणजे विकासाला मत ” , ” पुण्याची ताकद , गिरीश बापट ” या घोषणांनी सारा परिसर निनादून गेला होता.

कार्टूनिस्‍ट्स कंबाईन’चे 13 आणि 14 एप्रिलला नाशकात वार्षिक संमेलन

0

पुणे – ‘कार्टूनिस्‍ट्स कंबाईन’ हे अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांचे व्यासपीठ आहे. प्रसिध्द व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शि.द.फडणीस,मंगेश तेंडुलकर, वसंत हळबे, राम वाईरकर,संजय मिस्त्री, खलील खान या सारख्या महाराष्ट्रातील मान्यवर व्यंगचित्रकारांच्‍या उपस्थितीत व्यंगचित्रकलेच्‍या संवर्धनासाठी दादर येथे सेना भवनात या संस्‍थेची स्‍थापन केली.

विनोद, व्यंगचित्रे, हास्यचित्रे यांची आवड नाही अशी व्यक्ती सापडणे कठीणच. हेच लक्षात घेऊन ‘कार्टूनिस्‍ट्स कंबाईन’ या संस्थेतर्फे व्यंगचित्रकलेच्‍या विकासासाठी व्यंगचित्रकारांचे संमेलन, व्यंगचित्र प्रदर्शन गेल्या काही वर्षांत पुण्‍यासह नांदेड, मुंबई,ठाणे, नागपूर तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर शहरात आयोजित झालेले आहे.

            दि. 13 व 14 एप्रिल 2019 रोजी नाशिकच्‍या कुसुमाग्रज प्रतिष्‍ठान येथे व्यंगचित्रकार संमेलन व व्यंगचित्र प्रदर्शन‘हास्‍य मैफील’ या नावाने होणार असून यामध्‍ये देशभरातील 70 पेक्षा जास्त दिग्गज तसेच नवोदित व्यंगचित्रकार प्रत्यक्ष हजेरी लावणार आहेत. प्रदर्शनाच्या ठिकाणी सहभागी व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिके रसिकांना बघायला मिळतील. प्रदर्शनामध्‍ये ज्ञानेश सोनार, विकास सबनीस, प्रभाकर वाईरकर, प्रभाकर झळके, जगदीश कुंटे, रवींद्र बाळापुरे, महेंद्र भावसार, अतुल पुरंदरे, विश्‍वास सूर्यवंशी,लहू काळे, अनंत दराडे, भटू बागले, शरयू फरकंडे, वैशाली दांडेकर, अशोक सुतार,सुहास पालीमकर, निखिल मुळये, अनंत दराडे यांच्‍यासह मान्यवर व्यंगचित्रकारांच्या सुमारे 300 व्यंगचित्रांचा समावेश आहे.

संमेलनाचे उद्घाटन माजी उपमुख्‍यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शनिवार दिनांक 13 एप्रिलला सकाळी  10.30 वा होईल व याचवेळी सुप्रसिध्द व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांना त्‍यांच्‍या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल. कार्यक्रमात सोनार यांच्‍या पेंटीग्‍जचे कॉफी टेबलबुक  ‘डिफरंट स्‍ट्रोक्‍स’चे प्रकाशन केले जाणार आहे.  तसेच त्‍यांच्‍या कारकिर्दीवरील ध्‍वनी-चित्रफीत दाखविली जाणार आहे. कार्यक्रमा दरम्‍यान प्रा. डॉ. शंकर बोराडे हे सोनार यांची प्रकट मुलाखत घेतील.

            दुपारच्‍या सत्रात प्रशांत कुलकर्णी हे ‘अद्भूत कल्‍पना’ आणि त्‍यानंतर वैजनाथ दुलंगे  ‘सराव व्‍यंगचित्रांचा’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करतील. तिस-या सत्रात‘आपले व्यंगचित्र आपल्या समोर’ या कार्यक्रमात  रसिकांना आपले व्यंगचित्र काढून घेण्‍याची संधी मिळेल.

            दि. 14 एप्रिलला सकाळी 10.30 वाजता व्‍यंगचित्रकलेच्‍या विविध शाखांतील तज्ञांचा परिसंवाद आयोजित करण्यात येणार असून नवोदित तसेच व्यंगचित्रकलेत, अॅनिमेशन क्षेत्रात काही करू पाहणाऱ्यांना

विकास सबनीस, विनय चानेकर, ज्ञानेश सोनार, चारूहास पंडित, घनश्‍याम देशमुख हे मार्गदर्शन करणार आहेत. सूत्रसंचालन राजीव गायकवाड व योगेंद्र भगत करतील. संमेलनात माजी कार्यकारणी अध्यक्ष विवेक मेहेत्रे व इतर सदस्‍यांचाही सत्कार करण्यात येणार असल्‍याचे कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री यांनी कळविले आहे. रसिकांनी या सांस्कृतिक पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्टूनिस्‍टस् कंबाईनच्‍या कार्यकारिणीने केले आहे.

(अधिक माहितीसाठी संपर्क संजय मिस्‍त्री 9819523741  / रवींद्र बाळापुरे 7507329721 )