Home Blog Page 2959

10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत नील केळकर, अयान शेट्टी, रित्सा कोंडकर यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

0

पुणे-  नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या फिनआयक्यू करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात नील केळकर, अयान शेट्टी यांनी, तर मुलींच्या गटात रित्सा कोंडकर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगरमानांकित पुण्याच्या नील केळकर याने अव्वल मानांकित दिवीज पाटीलचा 6-2 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. पाचव्या मानांकित अयान शेट्टी याने तिसऱ्या मानांकित ओम वर्माचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या मानांकित द्रोण सुरेश याने सातव्या मानांकित आयुश पुजारीचा टायब्रेकमध्ये 6-5(5) असा पराभव केला.

मुलींच्या गटात रित्सा कोंडकर हिने अकराव्या मानांकित अनन्या दलालचा 6-0 असा पराभव केला. चौथ्या मानांकित प्रिशा शिंदे हिने पाचव्या मानांकित काव्या देशमुखचा 6-2 असा पराभव केला. दुसऱ्या मानांकित मेहक कपूरने सहाव्या मानांकित वरंदीका राजपूतवर टायब्रेकमध्ये 6-5(5) असा विजय मिळवला. तिसऱ्या मानांकित मृणाल शेळके हिने सातव्या  मानांकित ह्रितिका खपलेचा 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी: 10 वर्षाखालील मुली:
रित्सा कोंडकर वि.वि.अनन्या दलाल(11) 6-0;
प्रिशा शिंदे(4) वि.वि.काव्या देशमुख(5) 6-2;
मृणाल शेळके(3) वि.वि.ह्रितिका खपले(7) 6-3;
मेहक कपूर(2) वि.वि.वरंदीका राजपूत(6) 6-5(5);

10वर्षाखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
नील केळकर वि.वि.दिवीज पाटील(1) 6-2;
शौनक सुवर्णा(10) वि.वि.अथर्व येलभर 6-4;
अयान शेट्टी(5)वि.वि.ओम वर्मा(3) 6-4;
द्रोण सुरेश(2) वि.वि.आयुश पुजारी(7) 6-5(5).

10 लाखाचे झाले 11.76 कोटी रुपये…

यूटीआय मास्टरशेअर युनिट स्कीम हा भारतातील पहिला एक्विटी ओरिएंटेड फंड आहे (ऑक्टोबर 1986 मध्ये स्थापन) आणि त्यास 30 हून अधिक वर्षांची संपत्तीनिर्मितीची परंपरा आहे. बाजारात तेजी किंवा मंदी असली तरी यूटीआय मास्टरशेअर युनिट स्कीमने अखंडितपणे वार्षिक लाभांश दिला आहे.  

यूटीआय मास्टरशेअर युनिट स्कीम ही ओपन एंडेड इक्विटी स्कीम प्रामुख्याने आपापल्या क्षेत्रामध्ये आघाडीवर असणाऱ्या लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. स्टॉक निवडत असताना ही स्कीम ग्रोथ अॅट रिझनेबल प्राइस (जीएआरपी) हे गुंतवणूक धोरण अवलंबते. म्हणजे, कंपनीच्या उत्पन्नातील वाढ विचारात घेता, त्या कंपनीचे स्टॉक खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदाराने काय रास्त दर द्यावा, हे ठरवणे. या पद्धतीमुळे, भविष्यात उत्पन्नात वाढ होण्याची क्षमता व चांगले मूल्यांकन असणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉकची खरेदी करण्यासाठी मदत होते.

यूटीआय मास्टरशेअर युनिट स्कीमला अपेक्षित असणारी स्पर्धात्मक फ्रेंचाइजी पाया भक्कम असलेल्या व कर्जांवर नियंत्रण असणाऱ्या, उत्पन्नात सातत्यपूर्ण वाढ असणाऱ्या, भांडवलाच्या खर्चाऐवजी नफ्यावर व भांडवलावरील उच्च उत्पन्नावर भर देणाऱ्या कंपन्यांद्वारे दीर्घ कालावधीमध्ये निर्माण केली जाते. अशा कंपन्या भविष्यातील विस्तारासाठी मोकळा कॅश फ्लो निर्माण करतात आणि सध्याच्या शेअर्सचे डायल्युशन टाळतात. साधारणतः अशा कंपन्या दीर्घ कालावधीमध्ये दराच्या बाबतीत सक्षम ठरतात.

जीएआरपी व स्पर्धात्मक फ्रेंचाइजी या एकत्रित दृष्टिकोनामुळे यूटीआय मास्टरशेअर युनिट स्कीमला पुढील प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे शक्य होते,

  1. दीर्घ कालावधीमध्ये शाश्वत वाढ करण्याची किंवा दराच्या बाबतीत सक्षम असण्याची कंपन्यांची क्षमता दुर्लक्षित आहे.
  2. अनुकूल मागणी, एकत्रिकरण, नियमनात्मक अडचणींवर मात अशा संपूर्ण क्षेत्रामध्ये दिसणारे घटक किंवा खर्चाच्या बाबतीत स्पर्धात्मकता, क्षमतेचा सूज्ञ विस्तार असे कंपनीशी संबंधित असणारे घटक याद्वारे प्रगतीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत सुधारणा.
  3. व्यवसायासाठी भांडवलाची तीव्र गरज आहे, पण कंपन्या विचारपूर्वक गुंतवणूक करतात, कार्यक्षमपणे अंमलबजावणी करतात
  4. उच्च रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइडनुसार (आरओसीई) कॅश फ्लो पुन्हा गुंतवण्याची संधी कंपन्यांकडे आहे.
  5. क्षेत्रामध्ये तुलनात्मक मूल्यांकन चांगले  आहे.

या बदल्यात, दर्जेदार कंपन्यांच्या पोर्टफोलिओचा समावेश करून गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीमध्ये संपत्तीनिर्मिती करण्याची संधी मिळते.

यूटीआय मास्टरशेअर युनिट स्कीमला लार्ज कॅप फंड या श्रेणीमध्ये समाविष्ट केले जाते. त्यामुळे, त्यामध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयटीसी, लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्रा, बँक, इ. आघाडीच्या व लोकप्रिय कंपन्यांचा समावेश आहे. आघाडीच्या 10 स्टॉचे एकूण पोर्टफोलिओमध्ये प्रमाण 49% हून अधिक आहे. ही स्कीम मार्च 31, 2019 पर्यंत, खासगी बँका, रुरल फेसिंग एनबीएफसी, आयटी, औद्योगिक उत्पादन यांना अधिक प्राधान्य देणारी आणि ऊर्जा, कन्झ्युमर व धातू यांना कमी प्राधान्य देणारी आहे.

मार्च 31, 2019 पर्यंत, फंडाचा निधी 5,973 कोटी रुपये होता व 5.84 लाख लाइव्ह गुंतवणूकदार खाती होती. हा फंड दीर्घकाळात भांडवलवृद्धी / उत्पन्नाचे वितरण साध्य करायचा प्रयत्न करतो, वर नमूद केल्याप्रमाणे गुंतवणुकीचा शिस्तबद्ध मार्ग अवलंबतो आणि फंडाने स्थापनेपासून दरवर्षी लाभांश दिला आहे. यूटीआय मास्टरशेअर युनिट स्कीमने गेल्या 15 वर्षांत 3,000 कोटी रुपयांहून अधिक एकूण लाभांश वितरित केला आहे.

अशा स्वरूपाच्या या स्कीमने यापूर्वी दीर्घकाळ लार्ज कॅपमध्ये 80% हून अधिक गुंतवणूक राखली आहे व यापुढील काळातही राखेल. ही स्कीम सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे व फार कमी वेळा पोर्टफोलिओमध्ये बदल करते. गेल्या एका वर्षाची कामगिरी विचारात घेता, फंडाचा समावेश या श्रेणीतील आघाडीच्या 25% स्कीममध्ये केला जातो. तसेच, यूटीआय मास्टरशेअर युनिट स्कीमने स्थापनेपासून मार्च 31, 2019 पर्यंत, 14.02% या बेंचमार्क एसअँडपी बीएसई 100 टीआरआय उत्पन्नाच्या तुलनेत 15.81% उत्पन्न (सीएजीआर) दिले आहे. तसेच, फंडाच्या स्थापनेच्या वेळी फंडामध्ये केलेली 10 लाख रुपये इतकी गुंतवणूक आता 11.76 कोटी रुपये झाली आहे, या तुलनेत याच कालावधीत बेंचमार्क एसअँडपी बीएसई 100 टीआरआय उत्पन्न 7.08 कोटी रुपये मिळाले, म्हणजे गेल्या 32 वर्षांत 117 पट अधिक उत्पन्न मिळाले.

दर्जेदार लार्ज कॅप कंपन्या असणाऱ्या लार्ज कॅप पोर्टफोलिओची तुलनेने स्थिर व शाश्वत कामगिरी, तसेच “कोअर इक्विटी पोर्टफोलिओ” निर्माण करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या इक्विटी गुंतवणूकदारांसाठी, तसेच दीर्घकाळामध्ये भांडवलवृद्धी व नियमित लाभांश यांना प्राधान्य देणाऱ्या गुंतवणूकदारांसाठीही यूटीआय मास्टरशेअर युनिट स्कीम साजेशी आहे.

हे मोदी सरकार आहे, पाकमधून गोळी आली तर भारतातून गोळा टाकणार -नागपुरात अमित शहा

नागपूर – लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रचार सभेला संबोधित करताना सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकचे कौतुक केले. 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राइक आणि नुकताच दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले करून साऱ्या जगाला मोदी सरकारने दहशतवादविरुद्धची भूमिका स्पष्ट केली. पाकमधून गोळी चालत असेल तर मोदी सरकारमध्ये भारतातून गोळा टाकला जाईल असे अमित शहा यांनी सांगितले आहे.

हवाई हल्ल्यानंतर देशात जल्लोष अन् राहुल गांधींच्या गोटात शोक -अमित शहा
नागपुरातील सभेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले, पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर काय करावे असा प्रश्न सर्वांना पडला होता. लोक सर्जिकल स्ट्राइकचे अंदाज लावत होते. पाकिस्तानने तर सीमांवर सर्जिकल स्ट्राइकच्या भीतीने सीमेवर रणगाडे तैनात केले होते. अशात मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने वेगळ्या पद्धतीने बदला घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी अतिशय नियोजित पद्धतीने एअर स्ट्राइक करण्यात आले. या हवाई हल्ल्यानंतर समस्त देशात नागरिकांनी जल्लोष साजरा केला. परंतु, दोन ठिकाणी शोक व्यक्त करण्यात आला. त्यापैकी एक म्हणजे, पाकिस्तान आणि दुसरे राहुल गांधी आणि मंडळी… मोदी सरकार सैनिकांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या देशांसोबत शांतता चर्चा करणार नाही असे शहा यांनी स्पष्ट केले आहे.

आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत पीसीएलटीए क्ले किंग्स संघाला विजेतेपद

0

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत प्लेट डिव्हिजन गटात पीसीएलटीए क्ले किंग्स संघाने एसपी कॉलेज 1 संघाचा 22-12 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या सामन्यात पीसीएलटीए क्ले किंग्स संघाने एसपी कॉलेज 1 संघाचा 22-12 असा पराभव केला.100अधिक गटात पीसीएलटीएच्या विजय खन्ना व नंदू रोकडे या जोडीने एसपी कॉलेज संघाच्या आशिष डिके व मंदार मेहेंदळे यांचा 6-1 असा तर, खुल्या गटात डॉ.राजेश मित्तल व अनंत गुप्ता यांनी एसपी कॉलेजच्या केदार पाटील व आदित्य जोशी यांचा 6-2 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 90अधिक गटात पीसीएलटीएच्या रवी जौकनीने निर्मल वाधवानीच्या साथीत एसपी कॉलेजच्या उमेश भिडे व गजानन कुलकर्णी या जोडीचा 6-3 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. खुल्या गटात पीसीएलटीएच्या प्रवीण घोडे व धर्मेश वाधवानी यांना एसपी कॉलेजच्या संतोष शहा व स्वेतल शहा या जोडीचा 4-6 असा पराभव केला. पण सामन्यात पीसीएलटीए क्ले किंग्स संघाने आपले वर्चस्व कायम राखत एसपी कॉलेज 1 संघावर 22-12 अशा फरकाने विजय मिळवला.

स्पर्धेतील विजेत्या पीसीएलटीए क्ले किंग्स संघाला करंडक व 10हजार रुपये, तर उपविजेत्या एसपी कॉलेज 1 संघाला करंडक व 5 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय विजय खन्ना यांना उत्कृष्ट प्रौढ खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.स्पर्धेचे पारितोषिक पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, गिरीश करंबेळकर, सारंग लागू, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: प्लेट डिव्हीजन: उपांत्य फेरी:
पीसीएलटीए क्ले किंग्स वि.वि.लॉ कॉलेज लायन्स 22-13(100अधिक गट: नंदू रोकडे/विजय खन्ना वि.वि.केदार जाठर/श्रीकृष्णा पानसे 6-1; खुला गट: डॉ.राजेश मित्तल/अनंत गुप्ता पराभूत वि.तारख पारीख/अभिजित मराठे 4-6; 90 अधिक गट: रवी जौकनी/निर्मल वाधवानी वि.वि.शिवाजी यादव/प्रोफेसर जयभाई 6-3; खुला गट: नंदू रोकडे/गिरीश कुलकर्णी वि.वि.केतन जाठर/राहुल पंढरपुरे 6-3);

एसपी कॉलेज 1 वि.वि.महाराष्ट्र मंडळ 21-14(100अधिक गट: आशिष डिके/मंदार मेहेंदळे वि.वि.संजय सेठी/अर्जुन वाघमारे 6-1; खुला गट: आदित्य जोशी/केदार पाटील वि.वि.अभिषेक चव्हाण/रवींद्र देशमुख 6-2; 90अधिक गट: गजानन कुलकर्णी/उमेश भिडे वि.वि.कमलेश शहा/विकास बचलू 6-5(3); खुला गट: मंदार मेहेंदळे/संतोष शहा पराभूत वि.संजय सेठी/अर्पित श्रॉफ 3-6);

अंतिम फेरी:
पीसीएलटीए क्ले किंग्स वि.वि.एसपी कॉलेज 1 22-12(100अधिक गट: विजय खन्ना/नंदू रोकडे वि.वि.आशिष डिके/मंदार मेहेंदळे 6-1; खुला गट: डॉ.राजेश मित्तल/अनंत गुप्ता वि.वि.केदार पाटील/आदित्य जोशी 6-2; 90अधिक गट: रवी जौकनी/निर्मल वाधवानी वि.वि.उमेश भिडे/गजानन कुलकर्णी 6-3; खुला गट: प्रवीण घोडे/धर्मेश वाधवानी पराभूत वि.संतोष शहा/स्वेतल शहा 4-6).

मृत्‍यू – एक निरंतर प्रवास (लेखिका – पूर्णिमा नार्वेकर)

0

आई गेली…पण चेहरा नेहमीसारखाच शांत…, जातानाही तिने कुणाला त्रास दिला नाही, तिची काही सेवाही करायला लागली नाही’, प्रज्ञा परेशला सांगत होती. मला मात्र हे ऐकता ऐकता माझ्या आजी-आजोबांच्या निधनाचा प्रसंग आठवला…

माझे आजोबा गेले तेव्हा मी साधारण सोळा वर्षांची होते. आजोबा दिसायला उंच, काटक, करारी मुद्रा असे एकंदर प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. त्र्याऐंशी वयाचे असताना निधन पावले. पाय घसरुन पडण्याचे निमित्त झाले. डॉक्‍टरांनी सांगितल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला अ‍ॅडमिट करावे लागले. तशी आजोबांची हॉस्पिटलला जाण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण घरच्यांनी समजूत काढल्यानंतर ते तयार झाले. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता, प्लॅस्टरमध्ये घालण्यात आला. वयोमानाने ऑपरेशन शक्य नव्हते पण नंतर आरोग्याच्या काही तक्रारी अजून वाढत गेल्या.  हे सगळे चालू असताना माझी आजी अत्यंत संयम बाळगून होती,आम्हा सगळ्यांना धीर देत होती. खरे तर तिला धीराची जास्त गरज होती. बाबा-काका-आई सगळ्यांनी आपापल्या परीने आजोबांची सेवा केली, पण नियतीच्या पुढे कुणाचेही चालत नाही. महिन्याच्या आतच आजोबा गेले. तो दिवस मला अचूक आठवतो. बाबा पहाटे पहाटे घरी आले.’काका गेले’ (बाबा-काका आजोबांना’काका’ या नावाने हाक मारायचे) म्हणून सांगितले. आजीची मुद्रा अत्यंत शांत होती. कुठेही आक्रोश, मोठ्याने रडणे नाही. तिने सांगितले की, आता एवढ्या पहाटे कुणालाही कळवू नका…सकाळ होऊ दे,मग सांगा. नाहीतरी मृतदेह मिळेपर्यंत वेळ लागणारच, उगाच लोकांना आतापासून उठवून सांगण्यात काही अर्थ नाही. आम्हालाही *बजावले* की माणसं जमायच्‍या आत उठून चहा-बिस्कीट खाऊन घ्या. आजही हे सगळं आठवलं की अंगावर काटा येतो. एवढा संयम आजीमध्ये आला कुठून? जिचा नवरा या जगात नाही, तीच सगळ्यांना धीर देते आहे. खरंच यासाठी प्रचंड आत्मिक शक्ती लागते आणि ती आजीकडे होती. आजोबांच्या बाबतीत एक योगायोग म्हणजे त्यांचा जन्म संकष्ट चतुर्थीचा आणि मृत्‍यू झाला तेव्हाही *अंगारक* योग होता. आजोबा निर्वतल्याचे कळल्यानंतर ठिकठिकाणाहून माणसे जमली. आजोबांची जोडलेली माणसे तशी बरीच होती. खूप लोकं आली होती. दुपारी आजोबांचा मृतदेह ताब्यात मिळाला आणि प्रथेप्रमाणे विधी केले. आजी शांत मुद्रेने त्यांच्याजवळ बसून होती. स्वत:च्या हाताने तिने बांगड्या काढल्या, कुंकू पुसले आणि मंगळसूत्र काढून दिले. या सगळ्या प्रक्रियेत कुठेही आक्रोश नव्हता की छाती बडवून रडणे नव्हते. तिने स्वीकारले होते की, मृत्यू म्हणजे संपणे नाही तर तो’प्रवास’ आहे…एका जन्माचा दुस-या जन्माकडे! त्यासाठी त्यांना आपण निवांतपणे निरोप दिला पाहिजे, तरच तो आत्मा शांत होणार आणि शरीर गेले तरी आत्मा आहे ना…तो कुठे जातो? तो तर अमर आहे. मग रडून, खूप आक्रोश करुन घेण्यापेक्षा शांतपणे तो प्रसंग *निभावून नेला* पाहिजे. तो प्रसंग आम्हीही त्याप्रमाणेच अनुभवला की आजोबांचा हा प्रवास सुरू झाला…एका जन्माकडून दुस-या जन्माकडे. मृत्युची भीषणता, त्यातील भयंकरता, अकारण भीती कमी झाली.

      तीन महिन्यांनी आजीही आम्हाला सोडून गेली. केवळ ताप येण्याचे निमित्त झाले. बहुदा तिला तिचे मरण जवळ आहे,हे कळून चुकले होते की काय कुणास ठाऊक! कारण सहदेवकाकांना तिने साधारण ती जाण्याच्या एक महिन्याअगोदर सांगितले होते, ‘तुझ्या बायकोला (पार्वतीला) बघायचे आहे, तर बोलव तिला मुंबईला…’ आजीचा जेवढा बाबा-काकांवर तेवढाच सहदेवकाकावर जीव. वयाच्या 12 व्या वर्षांपासून म्हणजे साधारण 1958 सालापासून तो आमच्याकडे कामाला होता. जवळजवळ50 वर्षं तो आमच्या सोबत होता. सहदेवकाका व त्याच्या बायकोवर आजीचा भारी जीव. खडे असलेल्या अशा सोन्याच्या दोन जोड कानातल्या कुड्या आजीकडे होत्या. सहदेवकाकांची बायको जेव्हा आजीला भेटायला आली, तेव्हा त्या कुडाची एक जोड आजीने तिला दिली. केवढं मोठं मन होतं तिचं! हल्ली नोकरमाणसांना जी वागणूक दिली जाते ती बघितली की हटकून आजी आठवते. तिने सहदेवकाका व त्याच्या कुटुंबावर आपल्या मुलाप्रमाणेच प्रेम केले. थोड्या दिवसांनी सहदेवकाका काकूला सोडायला गावी गेला आणि इकडे अचानक आजी तापाने फणफणली. तसा आठएक दिवसांनी तो परत येणारच होता. नेहमीचा तो रविवारचा परत यायचा आणि आला की संध्याकाळी घरी येऊन सांगून जायचा, ‘उद्यापासून कामावर हजर होईन’.यावेळीही रविवारी तो गावाहून आला मात्र घरी आला नाही. इकडे आजीची चौकशी सुरू झाली…सहदेव आला, मग मला भेटायला आला कसा नाही…? ‘काही कामामुळे आला नाही पण उद्या सकाळी येणार’, असे घरच्यांनी सांगितले. नित्यनेमाने सोमवारी सकाळी पावणेसातला तो चहा प्यायला हजर झाला. आजी डोळ्यांत प्राण आणून त्याची वाट बघत होती. त्याला बघून खूश झाली,काकूची चौकशी केली. सहदेवकाकालाही तेव्हाच कळले की आजीला ताप आहे. तोही तिच्या उशाजवळ बसला, त्याने तिला उठवून बसवले, चहा पाजला. आजी त्याला म्हणाली, ‘चला, सहदेव तू आलास…आता काळजी नाही. त्याच्या मांडीवर झोपण्याची तिने इच्छा व्यक्त केली. थोड्या वेळाने तो आजीचे डोके उशीवर ठेवायला गेला, पण आजी केव्हाच कायमची झोपली होती…कधीही परत न उठण्यासाठी. आणि तिची शांत, संयमी,हसरी मुद्रा…मरण इतके सहजही असू शकते! कुठेही जीवाची तडफड नाही. खरंच मृत्युला खऱ्या अर्थाने तिने स्‍वीकारले

होते. आत्म्याचा एका जन्मातून दुस-या जन्माकडे चाललेला एक निरंतर प्रवास…

  पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ, दहिसर (प.), मुंबई – 400068

‘चेटीचंड’मधून घडले सिंधी संस्कृतीचे दर्शन

0
सिंधू सेवा दलातर्फे भगवान साई झुलेलाल यांचा १०६९ वा जन्मोत्सव साजरा
पुणे : भगवान साई झुलेलाल यांची आरती… गायक जतीन उदासी यांचे बहारदार गायन… सिंधी गीतांच्या ऐकाव्याशा वाटणाऱ्या चाली… कलात्मक नृत्य… चाट-सामोसा-गोड भाताचा प्रसाद… रुचकर लंगर… डोक्यावर लाल टोपी आणि झुलेलाल यांचे अखंड भजन यातून नववर्षाच्या सुरुवातीला सिंधी संस्कृतीचे दर्शन घडले.
निमित्त होते, सिंधी समाजाच्या नववर्षाचे. भगवान साई झुलेलाल यांच्या १०६९ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अल्पबचत भवनमध्ये झालेल्या या महोत्सवात संगीत, गायन, भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ यामुळे चेटीचंड महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या कार्यक्रमाला फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे चेअरमन प्रकाश छाब्रिया, मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया प्रमुख पाहुणे म्हणून, तर विशेष अतिथी म्हणून विशाल चुगेरा, विजय अडवाणी उपस्थित होते.
सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी, सचिव सचिन तलरेजा, उपाध्यक्ष अशोक वासवानी, खजिनदार पिशू पर्यानी, सहसचिव परमानंद भटिजा, माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी, विजय दासवानी, सिमरन जेठवानी, डिंपल वासवानी, विनोद रोहानी आदी उपस्थित होते. यावेळी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शीतलदास जवाहरानी यांचा सन्मान करण्यात आला. या महोत्सवात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील जवळपास ५००० सिंधी बांधव सहभागी झाले होते.
चेटीचंड महोत्सवानिमित्त सर्व समाज एकत्र येतो. भगवान साई झुलेलाल यांचा उत्सव साजरा करतो. हा आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी आम्हीही दरवर्षी यामध्ये सहभागी होतो. अशा या सांस्कृतिक आणि सामाजिक महोत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भावना मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्सची आहे. समाजसेवेचे हे काम यापुढेही करत राहू, असे प्रकाश छाब्रिया यांनी यावेळी नमूद केले.
दीपक वाधवानी म्हणाले, “दोन दिवसांच्या चेटीचंड महोत्सवानिमित्त पहिल्या दिवशी भगवान साई झुलेलाल यांची भव्य मिरवणूक व रथयात्रा काढली जाते. दुसऱ्या दिवशी झुलेलाल यांचे विधिवत पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रम व भजन होते. यंदा जनरेशन नेक्स्ट डान्स अकँडमीतर्फे नृत्यकलेचे सादरीकरण आणि जतिन उदासी व सहकार्‍यांचा लाईव्ह कॉन्सर्ट झाला. प्रीतीभोज आणि लकी ड्रॉने महोत्सवाची सांगता झाली.”

‘साजणा’ मालिकेच्या शीर्षक गीताची प्रेक्षकांच्या मनावर भुरळ!!!

0

‘झी युवा’ ही मराठी वाहिनी, प्रेक्षकांसाठी नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या मालिका घेऊन येते. या संकल्पना प्रेक्षकांना पसंत पडतात आणि मालिका लोकप्रिय होतात. अशीच आणखी एक प्रेमकहाणी ‘झी युवा’ घेऊन येत आहे. ‘साजणा’ असं या नव्या मालिकेचं नाव असून, त्याचा टीजर नुकताच प्रदर्शित झालेला आहे. मालिकेचा टीजर आणि शीर्षकगीत यांनी प्रेक्षकांच्या मनावर आतापासूनच भुरळ घालायला सुरुवात केली आहे. सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेले हे गीत, किशोर कदम म्हणजेच कवी सौमित्र यांनी लिहिलेले आहे. अभिजित-विश्वजित या प्रसिद्ध जोडीने हे अप्रतिम गीत, संगीतबद्ध केले आहे. सगळ्याच गोष्टी उत्तम जमून आलेल्या असल्याने, हे गीत प्रेक्षकांना खूपच पसंत पडते आहे. शीर्षकगीत आवडू लागल्याने, प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयीदेखील खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.

१५ एप्रिलपासून ‘साजणा’ ही नवी मालिका, झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मुख्य अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र व मुख्य अभिनेत्री पूजा बिरारी अशी नवीकोरी जोडी यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका गावात या मालिकेचे कथानक घडताना पाहायला मिळेल. पहिलाच टीजर प्रेक्षकांना पसंत पडल्याने, या नव्या कथानकाविषयी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. एका श्रीमंत घरातील मुलगा आणि एका गरीब घरातील मुलगी यांची ही प्रेमकथा आहे. शीर्षकगीताप्रमाणेच मालिकादेखील लोकांच्या मनात स्थान निर्माण करेल अशी खात्री आहे.

या शीर्षक गीताविषयी बोलताना, गायक स्वप्नील बांदोडकर म्हणतात;

“एक अत्यंत सहजसुंदर असं हे गीत, लगेचच मनाला भावतं. हे नितांतसुंदर गीत प्रेक्षकांना सतत ऐकत राहावंसं वाटेल याची मला खात्री वाटते. शीर्षकगीत प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचं ‘झी युवा’कडून मला सांगण्यात आलं. म्हणूनच, प्रेक्षकांच्या अभिप्रायाचीदेखील मला खूप उत्सुकता आहे. गीत आपलंसं वाटत असल्याने, मालिका प्रदर्शित होण्याची उत्सुकता माझ्याही मनात आहे.”

‘साजणा’ ही नवी मालिका, ‘झी युवा’ वाहिनीवर सोमवार १५ एप्रिलपासून पाहायला मिळणार आहे.

पुण्यातून जोशी- बापटांविरोधात 29 अन्य उमेदवार -संभाजी ब्रिगेड नाहीच ;प्रत्येक मतदान केंद्रावर २ ईव्हीएम मशीन

0

पुणे : पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघातील लढतीचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले असून, पुण्यात ३१, तर बारामतीत १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत. दोन्ही मतदारसंघात उमेदवारांची संख्या १५ पेक्षा जास्त असल्याने प्रत्येक मतदार केंद्रात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर (ईव्हीएम) दोन बॅलेट युनिट ठेवावे लागणार आहेत. त्यानुसार पुण्यात तीन हजार ९९४, तर बारामतीत चार हजार ७४४ बॅलेट युनिटची व्यवस्था करावी लागणार आहे.

या दोन्ही मतदार संघातील उमेदवारांची अर्ज माघारीची अंतिम मुदत सोमवारी होती. पुणे लोकसभा मतदार संघातील ४३ उमेदवारांपैकी १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ३१ उमेदवार राहिले आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात २५ उमेदवारांचे अर्ज होते. त्यापैकी सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १८ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

‘ईव्हीएम’वर बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट असते. यंदाची निवडणूक पारदर्शक व्हावा, यासाठी ‘व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल’ अर्थात ‘व्हीव्हीपॅट’ जोडले जाणार आहे. एका बॅलेट युनिटवर १५ उमेदवार आणि एक ‘नोटा’ असे १६ उमेदवार असतात. १५ पेक्षा जास्त उमेदवार असल्यास दोन बॅलेट युनिट ठेवावे लागतात. पुणे लोकसभा मतदार संघात १,९९७ मतदान केंद्रे असून, तेथे तीन हजार ९९४ बॅलेट युनिटची व्यवस्था करावी लागणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघात दोन हजार ३७२ मतदान केंद्रे असून, प्रत्येक मतदान केंद्रात दोन याप्रमाणे चार हजार ७४४ बॅलेट युनिट असणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

पुण्यात ३१, तर बारामतीत १८ उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिट ठेवले जाणार आहेत. अतिरिक्त बॅलेट युनिटची व्यवस्था केली जाणार आहे. सध्या कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटची संख्या अतिरिक्त आहे. मतदानाची सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे.

– मोनिका सिंह

उप मुख्य निवडणूक अधिकारी

————————-

पुण्यातील प्रमुख उमेदवार

गिरीश बापट (महायुती)

मोहन जोशी (महाआघाडी)

अनिल जाधव (वंचित बहुजन आघाडी)

उत्तम शिंदे (बसप)

………

बारामतीतील प्रमुख उमेदवार

कांचन कुल (महायुती)

सुप्रिया सुळे (महाआघाडी)

नवनाथ पडळकर (वंचित बहुजन आघाडी)

मंगेश वनशिव (बसप)

ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये ८ वर्षीय मुलावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

0

पुणे-कोणतेही आई वडील आपल्या अपत्याच्या तब्येती विषयी अतिशय हळवे असतात. मुलांना काही आजार झाल्यास व तो आजार अतिशय गंभीर आहे हे कळल्यावर आई वडिलांना धक्का बसतो. श्री व सौ गिरनाळे  यांना असाच धक्का बसला जेव्हा त्यांना कळाले की त्यांच्या मुलाला  दुर्धर असा यकृताचा विकार झाला आहे आणि तो यकृत  प्रत्यारोपणा शिवाय तो बरा होणे शक्य नाही.

चि. अनुश याला बिलिअरी एस्ट्राशिया(Biliary Atresia)झाला होता, ज्यामुळे त्याची बिलिअरी ट्यूब अरुंद होऊन त्याचे यकृत निकामी झाले होते परिणामी त्याला दैनंदिन कार्य करण्यात अडचण येत असे. त्याच्या वयाच्या अन्य मुलांप्रमाणे तो त्याचे जीवन जगू शकत नव्हता. त्याचे पालक औरंगाबाद व पुणे येथील रुग्णालयात त्याच्या जन्मापासून उपचार करीत होते. त्यांनी त्याच्या उपचारावर खूप  पैसे देखील खर्च केले होते व आर्थिकरित्या त्यांची परिस्थिती नाजूक बनली होती. ज्यावेळी त्यांना त्यांच्या मुलाच्या यकृत प्रत्यारोपण व त्यावर होणाऱ्या खर्चाविषयी कळले तेव्हा ते अजूनच खचले कारण त्यासाठी होणारा खर्च हा त्यांच्या परिस्थितीच्या बाहेरचा होता.

श्री व सौ गिरनाळे यांनी औरंगाबाद मध्ये ज्युपिटर हॉस्पिटल ची पेरिफेरल क्लीनिक ची जाहिरात पहिली.त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ.गौरव चौबळ आणि येथील यकृत प्रत्यारोपण टीम बद्दल माहिती मिळाली तसेच हॉस्पिटल मध्ये लहान मुलांच्या प्रत्यारोपणाच्या खर्चावर १०% सूट देखील मिळणार असल्याचे कळले. त्यांनी अनुशच्या यकृत प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला व त्यांना केवळ शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्चच द्यावा लागला. त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही..

यावेळी बोलताना ज्युपिटर हॉस्पिटल येथील एच.पी.बी लिव्हर ट्रान्सप्लांट, चीफ सर्जन डॉ गौरव चौबळ म्हणाले की, अनुशची आई सौ. गिरनाळे यांनी त्याला यकृत दान केले व दोघेही आता सुस्थितीत आहेत. लहान मुलांचे यकृत प्रत्यारोपण ही अतिशय कठीण गोष्ट आहे आणि त्यात अनुश ची अगोदर शस्त्रक्रिया झाली असल्याने हे काम अतिशय कठीण होते. हे प्रत्यारोपण करून आम्ही समाधानी आहोत

यावेळी बोलताना डॉ शरण नरुटे, एचपीबी व लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन म्हणाले की, जिवंत यकृत दाता म्हणजे दात्याच्या यकृताचा काही भाग रुग्णास दिला जातो. अनुशच्या आईला जेव्हा आपल्या मुलगा बरा होण्याची आशा दिसली तेव्हा त्या यकृत दानाकरीत लगेच तयार झाल्या.

ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये डॉ पारिजात गुप्ते, डॉ वैशाली, डॉ गौरव चौबळ, डॉ शरण नरुटे, डॉ पवन हंचनाळे, डॉ आदित्य नानावटी, डॉ सागर कक्कड  व डॉ सेजल गराडे यांसाखे अनुभवी व तज्ज्ञ यकृत प्रत्यारोपण करणारे डॉक्टर आहे..

सौ रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या “फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावण्यास कटीबद्द आहेत. कोणत्याही मुलास वैद्यकीय कारणासाठी आर्थिक मदत हवी असल्यास आम्ही पुढे येतो. अशी कसलीही मदत करत असताना आम्ही धर्म व जात पाळत नाही माणुसकी हा एकाच धर्म आम्ही मानतो.”

यावेळी बोलताना अनुशचे वडील म्हणाले की, ज्युपिटर हॉस्पिटल,  डॉ.गौरव चौबळ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो. आज त्यांच्या मुळेच माझ्या मुलाला नवीन जीवन मिळाले आहे.

उमेदवाराने निवडणूक खर्च वेळेवर सादर करावा-जिल्‍हाधिकारी राम

0

पुणे- उमेदवाराने निवडणूक प्रक्रियेदरम्‍यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्‍यापूर्वी निवडणुकीच्‍या अनुषंगाने खर्च केला असल्‍यास तो खर्चात दाखवावा तसेच प्रचारा दरम्‍यान होणारा खर्च वेळेवर सादर करावा,असे जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्‍या बैठकीत ते बोलत होते. निवडणुकीच्‍या संदर्भात निवडणूक आयोगाच्‍या सूचना,आदर्श आचार संहिता, इलेक्‍ट्रॉनिक व्‍होटींग मशीन याबाबत या बैठकीत माहिती देण्‍यात आली. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक राजीव श्रीवास्‍तव, रजत अग्रवाल, केंद्रीय खर्च निरीक्षक प्रियंका गुलाटी, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, निवडणूक खर्च व्‍यवस्‍थापनचे अजित रेळेकर, एक खिडकी योजनेचे सुहास मापारी, इव्‍हीएम व्‍यवस्‍थापनचे विजयसिंह देशमुख आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी राम यांनी उपस्थितांचे शंका निरसन केले. निवडणूक खर्च आणि सोशल मिडीयावरील प्रश्‍नांना समाधानकारक उत्‍तरे दिली. जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, उमेदवाराकडून निवडणुकी दरम्‍यान वेळोवेळी विविध प्रकारच्‍या परवानग्‍या, परवाने घेतले जातात. त्‍या अनुषंगाने रॅली, मेळावे, रेडिओ प्रक्षेपण, व्‍हीडीओ चित्रीकरण, दूरदर्शन प्रक्षेपण, पथनाट्य, मोबाईलवरील एसएमएस, फेसबुक, सोशल मिडीयाद्वारे प्रचारयंत्रणा राबविली जाते. अशावेळी उमेदवार किंवा उमेदवारांच्‍या खर्चासाठी नेमलेल्‍या प्रतिनिधीकडून निवडणूक कार्यालयाला खर्चाची माहिती दिली जात नाही. त्‍यामुळे हिशोबामध्‍ये चूक होऊन तफावत निर्माण होते, म्‍हणून परवानगी घेतल्‍याबरोबर झालेल्‍या कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने लगेच दुस-या दिवशी असा खर्च खर्चाच्‍या नोंदवहीमध्‍ये सविस्‍तरपणे नोंदविणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

केवळ राजकीय पक्षांच्‍या नेत्यांच्‍या सूचीतील नेत्‍यांचा (स्‍टार कॅम्‍पेनर) प्रवासावरील खर्च उमेदवाराच्‍या निवडणूक खर्चाच्‍या हिशेबामध्‍ये समाविष्‍ट करण्‍यातून सूट देता येईल, बाकी इतर सर्व खर्च उमेदवाराच्‍या निवडणूक खर्चात धरावयाचा आहे, असे स्‍पष्‍ट करुन जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, राजकीय पक्षांनी अन्‍य अधिसंघांनी केलेले /अधिकृत केलेले अन्‍य सर्व खर्च उमेदवारांच्‍या हिशोबामध्‍ये समाविष्‍ट करणे आवश्‍यक आहे.

विजयसिंह देशमुख यांनी इव्‍हीएम, व्‍हीव्‍हीपॅट बाबतच्‍या प्रश्‍नांना तर निवडणूक खर्च व्‍यवस्‍थापनचे अजित रेळेकर यांनी खर्चविषयक प्रश्‍नांना उत्‍तरे दिली. बैठकीस विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि समन्‍वय अधिकारी उपस्थित होते.

होंडातर्फे सीबी३००आरच्या वितरणास प्रारंभ-किंमत अडीच लाखावर

गुरुग्रामहोंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज चंदीगढ, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्राम येथील काही ग्राहकांना सीबी३००आरच्या किल्ल्या सुपूर्त करत या गाडीचे देशभरात वितरण करायला प्रारंभ केला. होंडाने १६ स्वतंत्र अक्सेसरीज आणि प्रीमियम, प्रोटेक्शन, स्टँडर्ड आणि स्पोर्ट्स हे चार कस्टमाइज्ड किटही लाँच केले आहेत.

स्पोर्ट्स रोडस्टर ते साध्यासुध्या प्रवासाचे खेळकर सफरीत रुपांतर करणारी सीबी३००आर ही बाइक चालवण्याचा पुरेपूर आनंद देणारी आहे. कमीत कमी बॉडीवर्क, हलक्या वजनाची, विस्चारित, फ्लॅट हँडलबार हे सर्व घटक सीबी३००आर च्या उत्साहवर्धक व्यक्तिमत्त्वात आणि एकंदरीत उपयुक्तपणात हातभार लावणारे आहेत.

सीबी३००आर च्या वितरणास प्रारंभ झाल्याबद्दल होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.च्या विक्री व विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘मध्यम वजनाच्या भारतीय बाइक्सप्रेमींना निओ स्पोर्ट्स कॅफे प्रेरित होंडा सीबी३००आरचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. फेब्रुवारीत लाँच झाल्यापासून मिळत असलेल्या प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो असून अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमची निर्मिती योजना नव्याने तयार केली आहे.’

सीबी३००आरसाठी अधिकृत अक्सेसरीज

ग्राहकांचा सीबी३००आर बाइक मालकीचा अनुभव आणखी समृद्ध करण्यासाठी होंडाने सीबी३००आरच्या अधिकृत अक्सेसरीजची नवी श्रेणी लाँच केली आहे. या श्रेणीमध्ये १६ स्वतंत्र पर्यायी अक्सेसरीजचा समावेश आहे. ग्राहकांना ४ कस्टमाइज्ड किट्समधूनही निवड करता येणार असून हे किट त्यांच्या वेगवेगळ्या गरजा आणि पसंती लक्षात घेत तयार करण्यात आले आहेत.

होंडा सीबी३००आर मॅट अक्सिस ग्रे मेटॅलिक आणि कँडी क्रोमोस्फियर रेड या दोन आकर्षक रंगांच २.४१ लाख रुपयांना (एक्स शोरूम पॅन भारत) उपलब्ध आहे. गाडीची नोंदणी भारतभरातील विंग वर्ल्ड वितरकांकडे खुली करण्यात आली आहे.

एल अँड टी लीडरशीप डेव्हलपमेंट अकॅडमीला हरित कॅम्पससाठी प्रतिष्ठित गोल्ड रेटिंग प्रदान

मुंबईलार्सन अँड टुब्रोच्या लोणावळा येथील लीडरशीप डेव्हलपमेंट अकॅडमीला (एलडीए) इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) ग्रीन कॅम्पस सर्टिफिकेशन अंतर्गत प्रतिष्ठित गोल्ड रेटिंग प्रदान करण्यात आले आहे.

आयजीबीसी ग्रीन कॅम्पस सर्टिफिकेशनद्वारे राष्ट्रीय प्राधान्यक्रम उदा. नैसर्गिक स्त्रोतांचे जतन, उर्जा आणि पाणी कार्यक्षमतेची मागणी, अक्षय उर्जेचा वापर, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कचऱ्याचे व्यवस्थापन, आरोग्य आणि आराम व जैववैविध्य इत्यादींवर काम करण्यासाठी आवश्यक हरित संकल्पना आणि तंत्राच्या अंमलबजावणीस प्रोत्साहन दिले जाते.

श्री. योगी श्रीराम, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॉर्पोरेट एचआर, एल अँड टी म्हणाले, ‘एक जबाबदार कॉर्पोरेट या नात्याने एल अँड टी आपल्या काही शाश्वत उपक्रमांसह भारतीय कॉर्पोरेट विश्वात आदर्श पायंडा घालून देत आहे. एल अँड टी लीडरशीप डेव्हलपमेंट अकॅडमीचा (एलडीए) कॅम्पस भारतातील अभिनव कॉर्पोरेट विद्यापीठ म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यासाठी सार्थ असलेले आयजीबीसीचे गोल्ड रेटिंग मिळाले आहे. हरित कॅम्पससाठी आयजीबीसी गोल्ड रेटिंग मिळाल्याचा आम्हाला अतिशय आनंद झाला आहे.’

आयजीबीसीने एलडीएचा २४ एकरांच्या लँडस्केप कॅम्पसचे आठ निकषांवर मूल्यांकन केले. प्रत्यक्ष ठिकाणचे नियोजन आणि व्यवस्थापन, शाश्वत वाहतूक, जल संवर्धन, उर्जा कार्यक्षमता, साहित्य आणि स्त्रोत व्यवस्थापन, आरोग्य आणि स्वास्थ्य, हरित शिक्षण, संशोधन व विकास यांचा त्यात समावेश होता.

येथील शुद्ध पर्यावरणाचे जतन करण्यासाठी एलडीएने कार्बन उत्सर्जनचे प्रमाण कमीत कमी राहावे म्हणून विशिष्ट धोरण, पद्धती व प्रक्रिया अवलंबल्या आहेत. सौर पॅनेल्स, सांडपाण्याचे व्यवस्थापन, वाहतुकीसाठी बॅटरीवर चालणाऱ्या कार्स, तज्ज्ञ बागकामशास्त्रज्ञांद्वारे देखरेख केली जाणारी लँडस्केप सुविधा, हरित- औषधी वनस्पती आणि फुलझाडे यांचा एलडीच्या हरित उपक्रमांत समावेश होतो.

पुण्याजवळील लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या एलडीएमध्ये भविष्यातील नेतृत्व आणि जागतिक कॉर्पोरेट उद्योजक तयार करण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. १९९७ मध्ये स्थापना झाल्यापासून एलडीएने एल अँड टी तसेच काही निवडक कॉर्पोरेट्सच्या व्यवसायांना मदत केली आहे.

आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत पीवायसी अ संघाला विजेतेपद

0

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत इलाईट डिव्हिजन गटात पीवायसी अ संघाने पीवायसी ब संघाचा 21-11 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पीवायसी अ संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत सलग आठव्या वर्षी विजेतेपदाचा मान पटकावला. अंतिम फेरीच्या सामन्यात 100 अधिक गटात पीवायसी अ संघाच्या केदार शहा व डॉ.अभय जमेनिस यांना पीवायसी ब संघाच्या अनुप मिंडा व हिमांशू गोसावी यांनी 3-6 असे पराभूत केले.त्यानंतर खुल्या गटात पीवायसी अ संघाच्या अभिषेक ताम्हाणे व केतन धुमाळ यांनी  पीवायसी ब संघाच्या योगेश पंतसचिव व अमित लाटे या जोडीचा 6-3 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. 90 अधिक गटात पीवायसी अ संघाच्या ऋतू कुलकर्णीने जयंत कढेच्या साथीत सारंग पाबळकर व सुंदर अय्यर यांचा 6-0 असा तर, खुल्या गटात पीवायसी अ संघाच्या केदार शहा व प्रशांत सुतार या जोडीने पीवायसी ब संघाच्या अमोघ बेहेरे व अनुप मिंडा यांचा 6-2 असा सहज पराभव करून संघाचा विजय सुकर केला.

स्पर्धेतील विजेत्या पीवायसी अ संघाला 40हजार रुपये व शशी वैद्य मेमोरियल करंडक, तर उपविजेत्या पीवायसी ब संघाला 15हजार रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, गिरीश करंबेळकर, सारंग लागू, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
पीवायसी अ वि.वि.पीवायसी ब 21-11(100अधिक गट: केदार शहा/डॉ.अभय जमेनिस पराभूत वि.अनुप मिंडा/हिमांशू गोसावी 3-6; खुला गट: अभिषेक ताम्हाणे/केतन धुमाळ वि.वि.योगेश पंतसचिव/अमित लाटे 6-3; 90अधिक गट: ऋतू कुलकर्णी/जयंत कढे वि.वि.सारंग पाबळकर/सुंदर अय्यर 6-0; खुला गट: केदार शहा/प्रशांत सुतार वि.वि.अमोघ बेहेरे/अनुप मिंडा 6-2).

10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत अथर्व येलभर, अनन्या दलाल, मृणाल शेळके यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

0

पुणे:  नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या फिनआयक्यू करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात अथर्व येलभर याने तर, मुलींच्या गटात अनन्या दलाल, मृणाल शेळके या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत 10 वर्षाखालील मुलींच्या गटात दहाव्या मानांकित अनन्या दलाल हिने सातव्या मानांकित अद्विता गुप्तावर 6-3 असा विजय मिळवला. बिगरमानांकीत मृणाल शेळके हिने तेराव्या मानांकित ईमान वीरजीचा 6-0 असा एकतर्फी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. दुसऱ्या मानांकित  मेहक कपूर हिने आरोही देशमुखवर 6-0 असा विजय मिळवला. सहाव्या मानांकित ह्रितिका कापले हिने नवव्या मानांकित वसुंधरा भोसलेला 6-3 असे नमविले. 

मुलांच्या गटात बिगरमानांकीत अथर्व येलभर याने चौथ्या मानांकित सक्षम भन्साळीचा 6-2 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित दिवीज पाटील याने राम मगदूमचे आव्हान 6-3 असे मोडीत काढले. नील केळकरने नमिश हूडचा 6-2 असा, तर पाचव्या मानांकित अयान शेट्टीने अर्जुन वेलुरीचा 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 10 वर्षाखालील मुली:उप-उपांत्यपूर्व फेरी: 
रित्सा कोंडकर वि.वि.स्नेहा आगलावे 6-1;
अनन्या दलाल(10) वि.वि.अद्विता गुप्ता(7) 6-3;
प्रिशा शिंदे(3) वि.वि.दिया अगरवाल 6-0; 
काव्या देशमुख पुढे चाल वि.ईश्वरी कवठेकर;
ह्रितिका कापले(6) वि.वि.वसुंधरा भोसले(9) 6-3;
मृणाल शेळके वि.वि.ईमान वीरजी(13) 6-0;   
वरंदिका राजपूत(5) वि.वि.सिद्धी मिश्रा 6-0; 
मेहक कपूर(2) वि.वि.आरोही देशमुख 6-0;
 
10 वर्षाखालील मुले:
दिवीज पाटील(1) वि.वि.राम मगदूम 6-3;
नील केळकर वि.वि.नमिश हूड  6-2;
अथर्व येलभर वि.वि.सक्षम भन्साळी  (4) 6-2;
शौनक सुवर्णा(10)वि.वि.श्रीराम जोशी 6-1; 
अयान शेट्टी(5) वि.वि.अर्जुन वेलुरी 6-1; 
ओम वर्मा(3) वि.वि.शार्दूल खवले(13) 6-1;  
आयुष पुजारी(7) वि.वि.शिवराज जाधव 6-3;
द्रोण सुरेश(2) वि.वि.वैष्णव रानवडे 6-3. 

फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनकडून ससून रुग्णालयाला दोन कोटीचे अर्थसहाय्य

0
पुणे : पीव्हीसी पाईप्सच्या उत्पादनात भारतातील अग्रणी असलेल्या फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन यांच्याकडून ससून सर्वोपचार रुग्णालयाला दोन कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्यातून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे देण्यात आली आहेत. येत्या १६ एप्रिलला नवजात शिशु अतिदक्षता विभागाच्या (एनआयसीयू) दुसऱ्या, तर एंडोस्कोपी युनिटच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या अद्ययावत यंत्रणेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे.
एंडोस्कोपी युनिट आणि एनआयसीयू या विभागात ही अद्ययावत यंत्रणा बसविण्यात येत आहे. एंडोस्कोपी युनिटमध्ये किरणांपासून बचावासाठी अल्ट्रा साउंड विथ हेड प्रोटेक्शन, थायरॉईड शिल्ड, लीड ऍप्रॉन,प्रोटेक्टिव्ह आय गिअर्स, ओजिडी स्कोप आदी उपकरणांचा, तर एनआयसीयूमध्ये क्रिटिकूल, अत्याधुनिक सेंट्रल एअर प्रेशर, दोन, सिपाप, ब्लड गॅस ऍनालायझर, ब्रेन ऍनालायझर या उपकरणांचा समावेश आहे. एप्रिल २०१७ मध्ये ५९ खाटांचे एनआयसीयू युनिट, तर मार्च २०१८ मध्ये एंडोस्कोपी युनिट सुरु करण्यात आलेले आहे.
जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याचे ध्येय फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचे आहे. यासह ससून रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सर्व सोयींनी युक्त असे तीन सुसज्ज विश्रांती कक्ष उभारण्यात आले आहेत. समविचारी लोकांच्या मदतीने फाउंडेशनतर्फे १० लाख रुपयांच्या निधीतून आधुनिक लेसर मशीनद्वारे दंतरोपण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अशा प्रकारचे दंतचिकित्सा करणारे हे पहिलेच शासकीय रुग्णालय आहे. डायबेटीस, यकृत प्रत्यारोपण आणि नेत्रोपचार सेवा देण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे. फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशन २०१२ पासून ससून रुग्णालयांशी जोडले गेले असून, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील गरजू मुलांना अर्थसहाय्य केले जात आहे. १०० विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाही उभारण्यात आली आहे.
याविषयी बोलताना मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “केवळ उपक्रमांना अर्थसहाय्य देऊन आम्हाला थांबायचे नाही. पैसे दिले आणि आमची जबाबदारी संपली अशा स्वरूपात आम्ही काम करत नाही. समाजाला चांगल्या आरोग्य सुविधा अल्पदरात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्याकडे असलेल्या यंत्रणेमार्फत समाजाच्या नेमक्या गरजा ओळखून त्यानुसार त्यावर काम करीत आहोत. एनआयसीयूमुळे गेल्या दोन वर्षात ५२०० बाळांना जीवदान दिल्याचा, तर एंडोस्कोपीमार्फत केवळ ३५० ते ११५० रुपयांत उपचार देण्यात यश आले, याचा आनंद आहे.”
ससून रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, “पहिल्यांदाच शासकीय रुग्णालय आणि उद्योगसमूह यांच्या संयुक्त प्रयत्नातून असा एक चांगला उपक्रम सुरु झाला. आज ससून रुग्णालयाला समाजाकडून अर्थसहाय मिळत आहे. त्यामुळे येथील उपचार अत्याधुनिक होत आहेत. सर्वसामान्यांना परवडतील अशा अनेक शस्त्रक्रिया येथे होऊ लागल्या आहेत. ‘ससून फॉर कॉमन मॅन’ ही संकल्पना प्रत्यक्षात येत असून, सामान्यांसाठी ससून रुग्णालय आधार बनत आहे. ससून रुग्णालय अधिकाधिक लोकाभिमुख आणि लोकप्रिय होत आहे.”