Home Blog Page 2953

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी सुविधा देणार-आमदार विजय काळे

पुणे- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करतील असे दर्जेदार खेळाडू तयार करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा आमदार विजय काळे यांनी केली.महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील विविध सोसायट्यांच्या बैठकांमध्ये आमदार काळे मार्गदर्शन करीत होते. नगरसेवक आदित्य मावळे, विजय शेवाळे, प्रकाश ढोरे, नीलिमा खाडे यांचा सहभाग होता.आमदार काळे म्हणाले, ‘पुण्याच्या क‘ीडा क्षेत्राचे नाव देशभरात उंचविण्यासाठी क‘ीडा धोरणाला मान्यता देण्यात आली आहे. बालेवाडी येथील क‘ीडा नगरीचे सक्षमीकरण, महापालिकेची मैदानांचा खेळासाठी विकास, खेळांसाठी आवश्यक साहित्य पुरविणे, प्रशिक्षकांच्या नियुक्त्या करणे, क‘ीडा अकादमीद्वारे खेळाडूंना प्रशिक्षण, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती, राज्य व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या खेळाडूंना अर्थसहाय्य, खेळाडूंसाठी विमा आदी योजना राबविण्यात येणार आहेत.’

 

 

युतीच्या शासन काळात मागासवर्गीयांच्या विकासाला गती- गिरीश बापट

पुणे- मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला युतीच्या शासन काळात खर्‍या अर्थाने गती प्राप्त झाली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘अंत्योदय’ संकल्पनेतून समाजाच्या शेवटच्या स्तरावरील व्यक्तिपर्यंत विकासाच्या योजना पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिली. 
श्री. बापट यांच्या प्रचारार्थ आज सकाळी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर बाजार येथे प्रचार फेरीला प्रारंभ झाला. ट्रायलक चौक, गुडलक चौक, भोपळे चौक, बाबाजान दर्गा चौक, सेंट्रल स्ट्रीट, दस्तुर मेहर रोड, गवळीवाडा येथे समारोप झाला.
राज्यमंत्री दिलीप कांबळे, आरपीआय (ए)चे शहराध्यक्ष अशोक कांबळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी, नगरसेवक उमेश गायकवाड, विवेक यादव, दीलीप गिरमकर, अतुल गायकवाड, डॉ. किरण मंत्री, संतोष इंदूरकर, अतुल गोणकर, संजय मोरे, किशोर संघवी, शैलेंद्र चव्हाण, महिपाल वाघमारे यांनी सहभाग घेतला.
श्री. बापट पुढे म्हणाले, ‘स्वयंरोजगारासाठी युवकांना मुद्रा कर्ज, मेक इन इंडियातून सव्वा लाख युवकांना उद्योजक होण्याची संधी, उद्योगधंदे उभारण्यासाठी १५ कोटी रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य, विद्यार्थ्यांना संशोधनासाठी २० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज सुविधा, ह्दय, कॅन्सर अशा गंभीर आजारांवरील उपचारांसाठी तीन लाख रुपयांपर्यंत मदत, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी जिल्हानिहाय समित्या, वाल्मिकी-मेहतर समाजाप्रमाणे अनुसूचित जातीतील सङ्गाई कर्मचार्‍यांना नोकरीमध्ये वारसा हक्क, नोकरदार महिलांसाठी ५० तालुक्यांमध्ये वसतिगृह आदी काही महत्त्वाचे निर्णय घेऊन मागासवर्गीयांच्या विकासाला चालना दिली.’ 

‘’ हेल्मेट दंड भरणाऱ्यानो भाजपला धडा शिकवा ‘’-अंकुश काकडे , शांतीलाल सुरतवाला,डॉ .सतीश देसाई

पुणे-शहरातील हेल्मेट सक्ती चा कायदा रद्द करण्यासाठी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी आश्वासन दिले आहे.त्यामुळे ‘’ हेल्मेट दंड भरणाऱ्यानो भाजपला धडा शिकवा ‘’असे आवाहन माजी महापौर अंकुश काकडे , शांतीलाल सुरतवाला,आणि माजी उपमहापौर डॉ .सतीश देसाई यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

या पत्रकात त्यांनी म्हटले आहे कि,पुणे आधी टांग्याचे, मग सायकलींचे आणि आता स्वयंचलित २५ लाख दुचाकीचे महानगर आहे. अचानक पुणेकरांवर हेल्मेट सक्तीचा वरवंटा फिरवण्यात आला. कोणतेही प्रबोधन, प्रचार आणि प्रसार न करता पोलीस
दलाकडून पुण्याच्या दुचाकी स्वरांची पिळवणूक करण्यात आली. कोट्यावधी रुपयांची लुट केली जात असताना
पुण्याचे पालक मंत्री मात्र डोळे मिटून पुणेकरांचे हाल पाहत होते. शहराबाहेर स्टेट आणि नॅशनल हायवेवर
सक्ती गरजेची आहे मात्र पुण्याचे अरुंद रस्ते, अत्यंत धीम्या गतीने ताशी १० की. मी. वेगाने चालणारी वाहतूक
यामुळे हेल्मेट डोके वाचवण्याऐवजी डोकेदुखी ठरते. पुणेकरांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तरुण–तरुणी,
मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांचेच याबाबत एकमत आहे.
२३ एप्रिल २०१९ ची लोकसभेची निवडणूक हि पुणेकरांना आलेली पर्वणी आहे. राष्ट्रपिता म. गांधीनी
सांगितलेले सविनय कायदेभंगाचा मार्ग हेल्मेट बाबत पुणेकर आचरणात आणत आहेत. ज्या ज्या पुणेकरांचे
हेल्मेट सक्तीवरून खिसे कापण्यात आले त्या त्या पुणेकरांच्या समोर निष्क्रिय गिरीश बापटांना घरी बसवण्याची
संधी आली आहे. ३ लाख पुणेकरांना दंड झाला. हा कायदा संसदेने केला असल्यामुळे पुणेकरांनी संसदेत
पाठवल्या नंतर प्रसंगी खासगी विधेयक मांडून शहरात हेल्मेट सक्तीचा कायदा रद्द करेन, असे  कॉंग्रेस
-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार मोहन जोशी यांनी सांगितले आहे.

पालकमंत्रीपद मिळूनही पुण्याच्या विकासाची संधी बापटांनी वाया घालवली- मोहन जोशी

पुणे-पुण्यात चार दशके राजकीय क्षेत्रात काम करताना गिरीश बापट यांना पूर्ण पाच वर्ष पालकमंत्री
पदाची संधी मिळाली होती या आधारावर ते पुण्याचा भरीव विकास करतील अशी अपेक्षा होती.
पण ही अपेक्षा पूर्ण फोल ठरली असून बापटांनी पालकमंत्री पदाची ही संधी वाया घालवली आहे
अशी टीका काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी केली.
आज वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील भव्य प्रचार फेरीनंतर ते बोलत होते. ते म्हणाले
की, बापट साहेबांनी पुण्याचे मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. काल बापट साहेब मार्केट यार्ड
परिसरात गेले होते तेथील समस्यांकडे आपण लक्ष देऊ असे आश्वासन त्यांनी तेथे दिले, पण
गेल्या पाच वर्षात त्यांना तेथील एकही समस्या का सोडवता आली नाही हा मुख्य प्रश्न आहे.
पुणे शहराच्या सर्वच भागात भाजप आणि बापट यांच्या विषयी हाच प्रश्न आहे. मेट्रो मार्गी
लावली म्हणून प्रत्येक सभेत ते पाठ थोपटून घेत असले तरी पुण्याच्या मेट्रोला भाजप सरकारने
तीन वर्षे उशीर लावला त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च किमान अडीच ते तीन हजार कोटींनी वाढला.
भाजपच्या या बेफिकिरीचा बोजा पुणेकरांनाच सोसावा लागणार आहे. पूर्ण एकहाती सत्ता
असतानाही भाजप पुण्यात काहीच करू न शकल्याने या पक्षाविषयी लोकांमध्ये कमालीचे नैराश्य
आहे त्याची प्रचिती या निवडणुकीत निश्चित दिसून येईल असेही जोशी म्हणाले.या रॅली मध्ये अ.
भा. कॉंग्रेस पक्षाच्या चिटणीस व महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल या देखील सहभागी झाल्या
होत्या.


आज वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील प्रचार रॅलीची सुरवात शेकडो कार्यकर्त्यांच्या
समवेत शिवाजी पुतळा येथून झाली. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार
अर्पण करून या रॅली चा प्रारंभ झाला.
उमेदवार मोहन जोशी यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या
नागरिकांची गर्दी होती. ही रॅली चंदन नगर – खराडी – खराडी गाव –आपले घर –
बायपास चौक – खुळेवाडी – पाण्याची टाकी – सोमनाथ नगर – गणेश नगर – साईनाथ नगर –
वडगावशेरी – कल्याणी नगर – नगर रोड – साईबाबा मंदिर येथे समाप्त झाली.
माजी आमदार बापूसाहेब पठारे, सुनील टिंगरे, सुमन पठारे, भय्यासाहेब जाधव , महेंद्र पठारे,नारायण
गलांडे, सुनील मलके, महादेव पठारे, संगीता देवकर, राजेंद्र शिरसाठ, राहुल शिरसाठ, उषा गलांडे,

संतोष गलांडे, राजेंद्र खांदवे, अरुण वाघमारे, रमेश सकट, विनय माळी, जितेंद्र गुप्ता, अॅड. रोकडे, बाबा
नायडू, शिवानी माने, विशाल मलके, सुनिता भोसले, विजय साबळे, मुकुंद गलांडे, रवींद्र गलांडे, भीमराव
गलांडे, यांसह कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांचे  कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांचा एकत्रित प्रचार करण्यासाठी
कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे सर्व माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी शिक्षण
मंडळ अध्यक्ष, माजी पीएमटी अध्यक्ष यांचा एकत्रित मेळावा, राष्ट्रवादी कॉंग्रेस जेष्ठ नेते व माजी
उपमहापौर उल्हास ढोले पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. यामध्ये मोहन जोशी यांना
मोठ्या बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला गेला. तसेच गुरुवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी
९.०० वाजता लोकमान्य टिळक पुतळा महात्मा फुले मांडई येथून हे सर्व माजी पदाधिकारी अलका टॉकीज
पर्यंत ‘भाजप हाटाओ- देश बजाव’ रॅली काढणार आहेत.

देशाच्या चांगल्या भवितव्यासाठी मोदी सरकारच्या निर्णायक पराभवाची गरज – मुणगेकर

पुणे-‘गेल्या पाच वर्षातील मोदी सरकारच्या राजवटीमुळे देशाचे संविधान, तसेच
लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही महत्वाची मूल्ये धोक्यात आली आहेत.
त्यामुळे मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास ही मूल्ये टिकतील का नाही याबद्दलच शंका आहे
त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत भाजपचा निर्णायक पराभव होणे आवश्यक आहे असे आवाहन
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ् आणि काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केले आहे. काँग्रेस-
राष्ट्रवादी काँग्रेस -मित्र पक्ष आणि आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन
येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत मुणगेकर बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे
प्रवक्ते व आमदार शरद रणपिसे, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, प्रदेश काँग्रेसच्या सदस्य शानी नौशाद,
दलित चळवळीतील नेते रतनलाल सोनग्रा आदी उपस्थित होते.
मोदी सरकारच्या राजवटीवर घणाघाती टीका करताना भालचंद्र मुणगेकर पुढे म्हणाले,
मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला जी आश्वासने दिली होती त्यातील एकही पाळले नाही.
लोकसभा निवडणुकीनिमित्त तयार करण्यात आलेला भाजपचा जाहीरनामा देखील पराभूत
मानसिकतेतून तयार करण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. या जाहीरनाम्यात २०१४ साली दिलेली
आश्वासनेच देण्यात आली आहेत याचा अर्थ गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने काय केले? हा
प्रश्न निर्माण होतो. मोदी सरकारने दोन कोटी रोजगाराचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात चार
कोटी लोकांचे रोजगार गेले आणि पाच कोटी लोक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत असे सांगून
मुणगेकर यांनी, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी लागू करण्यात आलेली नोटाबंदी म्हणजे शुद्ध
भंपकपणा होता असे सांगितले.
आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक अशा सर्व आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी
झाल्याचे आकडेवारीनुसार सांगताना मुणगेकर म्हणाले, गेल्या पाच वर्षात आर्थिक तसेच
सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढली. शेतकरीवर्ग कमालीचा त्रासून गेला तर मुस्लिम
आणि दलित समाजांवर हेतुतः अत्याचार करण्यात आले. ‘मॉब लिंचिंग’सारखे जगाच्या पाठीवर
कोठेही न घडणारे प्रकार मोदी सरकारच्या राजवटीत घडले. रा. स्व. संघाच्या विचारसरणीच्या
दबावाखाली मोदी सरकार काम करते असा आरोप करून ते म्हणाले, गेल्या साठ वर्षात काँग्रेसने
काहीच केले नाही हे मोदी यांचे सातत्याने केलेले विधान म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस आहे.
आतापर्यंतची देशाची प्रगती काँग्रेसनेच केली हे कोणीही नाकारू शकणार नाही. गेल्या पाच वर्षात

मोदी एकदाही पत्रकारपरिषदेला सामोरे गेले नाहीत. त्यांच्याजवळ तेवढे धैर्य नसल्यामुळेच त्यांनी
आपली 'मनकी की बात' सुरु केली असे ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याबत बोलताना मुणगेकर म्हणाले, काँग्रेसचा
जाहीरनामा हा जनतेचा जाहीरनामा आहे जास्तीत जास्त राज्यात जाऊन तेथील लोकांशी प्रत्यक्ष
चर्चा करून व त्यांच्या अनेक चांगल्या सूचना विचारात घेऊन हा जाहीरनामा तयार करण्यात
आला त्यामुळे लोकांच्या अपेक्षांचे त्यामध्ये दर्शन घडले आहे. आणि त्यासाठी काँग्रेस वचनबद्ध
आहे. पाच कोटी गरीब लोकांना न्यूनतम आय योजना अंतर्गत (‘न्याय’) वर्षाला ७२ हजार रुपये
देण्यासंबंधीचा काँग्रेसचा निर्णय क्रांतिकारी आहे. त्यामुळे मोदी सरकार चांगलेच कोंडीत सापडले
आहे असे सांगून ते म्हणाले, या योजनेसाठी कसा निधी उभा करावयाचा तेही काँग्रेसने निश्चित
केले आहे. हा दारिद्र्यावरचा शेवटचा घाला असेल असेही ते म्हणाले. काँग्रेसचा जाहीरनामा हा
राष्ट्रविरोधी आहे या कायदेमंत्री अरुण जेटली यांच्या आरोपाचा समाचार घेताना ते म्हणाले, जेटली
यांनी अर्थमंत्री म्हणून एक तरी चांगला कार्यक्रम पाच वर्षात जाहीर केला आहे काय? नोटाबंदी
सारखा महत्वपूर्ण निर्णय देखील या अर्थमंत्र्याला माहित नव्हता. काँग्रेसचा जाहीरनामा हा मुळीच
राष्ट्रविरोधी नाही असे स्पष्ट सांगून मुणगेकर यांनी राष्ट्रवाद, देशभक्ती ही कोण्या एका पक्षाची,
धर्माची वा जातीची मक्तेदारी नाही. तसेच निवडणुकीच्यानिमित्ताने देशाच्या जवानांच्या शौर्याचे
राजकारण केले जाऊ नये असे त्यांनी शेवटी मोदींना उद्देशून सांगितले.

७० वर्षे केवळ ‘गरीबी हटाओ’चा नारा -काँग्रेसच्या घोषणेचा बापट यांच्याकडून खरपूस समाचार

पुणे: “ज्यांच्या तीन पिढ्या गेली ७० वर्षे केवळ ‘गरीबी हटाओ’चा नारा देत आहेत. त्यांनी विकासाची खोटी स्वप्न जनतेला दाखवू नयेत. देशाला शाश्वत विकासाची गरज असताना वर्षानुवर्षे सत्ता उपभोगूनही जे देशातील गरीबी हटवू शकले नाहीत ते काय विकास करणार?” असा सवाल उपस्थित करत महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी काँग्रेसच्या ‘गरीबी हटाओ’ घोषणेचा खरपूस समाचार घेतला.

सावित्रीबाई फुले स्मारक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन सभा व मातंग समाज कार्यकर्ता मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, नगरसेवक गोपाळ चिंतल, स्वाती लोखंडे, हनुमंत साठे, अशोक लोखंडे, श्रीधर कसबेकर, सुषमा कांबळे, विकासभाऊ सातारकर, सुखदेव आढागळे उपस्थित होते.

बापट म्हणाले की, काँग्रेसच्या फसव्या धोरणांमुळे क्षमता असूनही देशाची प्रगती झाली नाही. निवडणूक आली की, काँग्रेस पक्षाला गरीब आठवतात. काँग्रेस गेली ५० वर्ष सत्तेत होती. तरी त्यांना गरिबांना न्याय देता आला नाही. याउलट मोदींनी गरिबांसाठी अनेक योजना आणल्या. यामध्ये पंतप्रधान आवास, उज्वला गॅस, आयुष्यमान भारत यासारख्या योजना आणून गरिबांच्या आयुष्यात नवचैतन्य आणले.

ते पुढे म्हणाले की, गरीब, मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेऊन विधायक योजना आम्ही राबवल्याने खऱ्या अर्थाने अच्छे दिन आता आले आहेत. झोपडपट्टी पुर्नवसन योजना, प्रधानमंत्री आवास योजनेतून हजारो लोकांना पक्की घरे मिळत आहे.

आज पुण्यात अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये पैसे वाढवून देऊन त्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेला व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा आमचा भविष्यात प्रयत्न असणार आहे. त्याच प्रमाणे लहुजी वस्ताद यांचे ही भव्य स्मारक उभा करण्यासाठी भविष्यात आम्ही प्रयत्नशील असणार आहे. सरकार आपल्या दारी घेऊन येऊन तुम्हाला मदत करायची हा विचार घेऊन ही निवडणूक मी लढवत आहे. असे मत मी यावेळी व्यक्त केले.

भाजपने मागासवर्गीय समाजाला संधी दिली : कांबळे
स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे म्हणाले, भारतीय जनता पक्षावर जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातो. मात्र भारतीय जनता पक्षाने अनेक मागासवर्गीय समाजातील लोकांना संधी देऊन नेतृत्वाची संधी दिली आहे. पुणे शहरा पुरता विचार करायचा झाल्यास मातंग समाजातील 11 नगरसेवक निवडून आले आहेत.भारतीय जनता पक्ष जातपात न बघता सर्वसमावेशक विकास करतो त्यामुळे काँग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता विकासाठी भाजपाला मत देण्याचे आवाहनही त्यांनी यांवेळी केले.

आय .टी . स्किल्स ‘ मेगा शो मध्ये २ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

0
 पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन  सोसायटीच्या ‘पी ए  इनामदार इन्फर्मेशन कम्म्युनिकेशन टेक्नॉलॉजी ऍकेडमी ‘ तर्फे नुकतेच ‘आय .टी . स्किल्स परफॉर्मन्स ‘  मेगा शो  आयोजित करण्यात आला होता . त्यामध्ये २ हजार विद्यार्थ्यांनी  इन्फर्मेशन कम्म्युनिकेशन टेक्नॉलॉजी कौशल्ये सादर केली . संस्थेचे अध्यक्ष डॉ . पी . ए . इनामदार यांनी उदघाटन केले . सरहद ‘संस्थेचे  संस्थापक संजय नहार  ,’पी ए  इनामदार इन्फर्मेशन कम्म्युनिकेशन टेक्नॉलॉजी ऍकेडमी ‘च्या संचालक मुमताज सय्यद ,रसिक मित्र मंडळ ‘चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला  उपस्थित होते .
कॉम्प्युटर हार्डवेअर ,मोबाईल रिपेरिंग ,रोबोटिक्स,टायपिंग ,टॅली टॅक्सेशन,ग्राफिक्स ,सायबर सिक्युरिटी  विषयक कौशल्यांचे सादरीकरण ९२१ विद्यार्थ्यांनी केले .  टॅब आणि एलसीडी स्क्रीन वरून अध्ययन  सादरीकरणात ९५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . ‘संगणक आणि माहिती तंत्रज्ञान  क्षेत्रातील अत्याधुनिक  प्रगतीच्या सर्व संधी शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून मिळाव्यात ,यासाठी संस्था राज्यभर कार्यरत असून गरीब ,मागास विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील प्रगतीची दारे उघडून देण्याचे काम याद्वारे होत आहे. रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जात आहे . शालेय अध्ययन -अध्यापन पूर्णपणे डिजिटल माध्यमातून केले जात आहे .’ अशी माहिती डॉ .पी ए इनामदार यांनी यावेळी बोलताना दिली .  ‘ऍकेडमी ‘च्या संचालक मुमताज सय्यद यांनी स्वागत केले .

मावळ  लोकसभा मतदार संघ-उमेदवारांचे दैनंदिन लेखे, रोख नोंदवही तपासणी वेळापत्रक जाहीर

0

 

पुणे:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोख नोंदवही व बँक नोंदवही याची तपासणी करण्यात येते. मावळ  लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या लेख्यांचा तपासणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 15 एप्रिल, 20 एप्रिल  आणि 27 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजे दरम्‍यान मावळ लोकसभा मतदार संघ, पुणे यांचे कार्यालय, सहावा मजला, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधीकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी, पुणे येथे निवडणूक खर्च निरीक्षक हे उमेदवारांचे दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोख नोंदवही व बँक नोंदवहीची तपासणी करणार आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी कळविले आहे.

टीका करणारे जेव्हा समोर समोर आले ….

0
पुणे-
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारास जोर धरलेला असताना ,राजकारणातले विरोधक आरोप प्रत्यारोपाचा मारा एकमेकांवर किंवा एकमेकांच्या विचारावर ,पक्षांवर ,नेत्यांवर करत असताना …प्रचाराच्या रणधुमाळीत असा एखादा क्षण येतो ..क्षणभर ..हे जुने मित्र ..एकमेकासमोर उभे ठाकतात ..आणि प्रचारातील ..ओकलेली गरळ..विसरून प्रेमाने,स्नेहाने कसा एकमेका नमस्कार करतात याचे अनोखे चित्र आज आंबेडकर जयंती च्या निमित्ताने दिसून आले.
भाजप आणि कॉंग्रेस आघाडी असे दोन्ही उमेदवार आज आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले होते .. वेगवेगळ्या वेळी जरी ते तिथे गेले ..तरी येता जाता त्यांच्या अशा गाठी पडल्या .. तो क्षण अनेकांनी फोटोत टिपण्याचा प्रयत्न केला . महापौर मुकता  टिळक आणि कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी या छायाचित्रात एकमेकांना नमस्कार करताना दिसत आहेत तर ज्यांची राजकारणात घट्ट मैत्री आहे कि खरोखर  प्रखर विरोधक आहेत यावर ज्यांच्या बाबत नेहमी अनेकांना प्रश्न पडतो  ते  महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि कॉंग्रेसचे गट नेते अरविंद शिंदे क्षण भर तरी अशा खेळीमेळी च्या वातावरणात दिसले ..आंबेडकर जयंतीचा हा करिष्मा कॅमेऱ्यात टिपायला अनेकांनी लगबग केली .

‘भाजपच्या काळात दहशतवादी हल्ले वाढले’-बी.जी. कोळसे पाटील

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी पठाणकोट आणि उरी हल्ल्याचे राजकारण करत असून भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ले वाढल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी शनिवारी . ‘पुलवामा हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरलेले आरडीएक्स देशात आलेच कसे,’ असा सवालही त्यांनी केला.

शहर काँग्रेस व लोकायत संघटनेतर्फे टिळक वाड्यात ‘मोदी सरकारची पाच वर्षे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ‘लोकायत’चे नीरज जैन, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालिकेतील गटनेते वसंत मोरे, किशोर शिंदे, ‘इंटक’चे सुनील शिंदे आदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे आणि खोट्या आकडेवारीने देशाची अर्थव्यवस्था मातीत गेली आहे. विविध प्रश्नांचा गुंता वाढत चालला आहे. त्यामुळे मोदींना पराभूत केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. तत्पूर्वी, नीरज जैन यांनी मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या आर्थिक कामगिरीचे विश्लेषण मांडले. भाजपला लोकशाही, समानता व धर्मनिरपेक्षता नको असून सत्तेच्या माध्यमातून संघाचा अजेंडा राबविला जात आहे. जाती-धर्मांत जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण केली जात आहे. दुसरीकडे विकासदर सातत्याने घटत असून अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यामुळे पाच वर्षांत भाजपने देशाची दुरवस्था केल्याचा आरोपही त्यांनी केला.

नाविन्यपूर्ण, कलात्मक डिझाईन्सचे सादरीकरण-‘डेझिनो-२०१९’ प्रदर्शन

0

पुणे : वृत्तपत्रांपासून साकारलेला सोफासेट व फर्निचर, टाकाऊ कागदापासून उभारलेला सेल्फी पॉईंट, अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकाची प्रतिकृती, पेपरच्या साहित्यातून तयार केलेल्या भिंती, विविध पॉट्स, घराच्या आतील सजावटी अशा असंख्य नाविन्यपूर्ण आणि कलात्मक डिझाईन्सचे सादरीकरण पुणेकरांना पाहण्यासाठी खुले झाले आहे. हे प्रदर्शन सोमवार (दि. १५) व मंगळवार (दि. १६) या दोन दिवशी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे.

सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पॅरामेट्रिक संकल्पनेवर इंटीरियर डिझाईन्सच्या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालनात रविवारी झाले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील सहायक अधिकारी संतोष वामन, आर्किटेक्ट प्रिया गोखले, महेश बांगड, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, प्राचार्य अजित शिंदे, विभागप्रमुख मंदार दिवाने, गीता दीक्षित, प्रा. अपूर्वा ठोसर, भूपेश गर्ग, दिशा कुचेकर, विद्यार्थी प्रतिनिधी संकल्प सोनी आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनात पेपर, फोमबोर्ड, मॅट्रिक्स, फ़ॅब्रिक, जिओमॅट्रिक्स, टाकाऊ वस्तू यासह विविध नैसर्गिक वस्तूंच्या वापरातून डिझाईन्स साकारले आहेत. एकूण ३५ इंटिरियर डिझाइन्सचे मॉडेल्स, १६ पॅनल मॉडेल्स, ९८२ डिझाईन शीट्स, थ्रीडी मॉडेल्स, छंद म्हणून मुलांनी काढलेली असंख्य पेंटिंग्स मांडण्यात आले आहेत. इंटिरिअर डिझाईन्सच्या एकूण २२० विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन भरवले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि अभियंता मित्र मासिकाचे संपादक डॉ. कमलाकांत वडेलकर यांनीही प्रदर्शनाला भेट देत विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले.

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “अतिशय कलात्मक डिझाइन्स विद्यार्थ्यांनी साकारल्या आहेत. त्यांच्यातील कलेला वाव देण्यासाठी अशा इंटिरिअर डिझाइन्सचे प्रदर्शन दरवर्षी भरविण्यात येते. त्यातून त्यांना प्रात्यक्षिक अनुभव मिळतो. अनेक कलाकृती या प्रथमच पाहायला मिळाल्या आहेत. समाजासमोर असलेल्या समस्या शोधून त्यावर उपाय शोधण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना विकसित कराव्यात. आपली कलाकृती उत्कृष्ट कशी आहे, हे सांगण्याचे कौशल्य आत्मसात करावे.”

विज्ञान परिषदेतर्फे डॉ. नीलिमा राजूरकर यांचे अणुउर्जेवर व्याख्यान

0
पुणे : मराठी विज्ञान परिषद व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनशास्त्रज्ञ डॉ. नीलिमा राजूरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ‘अणुऊर्जा : मिथक आणि सत्य’ या विषयावर मंगळवार, दि. १६ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. सर्व विज्ञानप्रेमी नागरिकांसाठी हे व्याख्यान विनामूल्य खुले असणार आहे.
अणुऊर्जा म्हटले की आपल्याला आठवते ते दुसऱ्या महायुद्धात जपानमध्ये हिरोशिमा, नागासाकी येथे टाकलेले अणुबॉम्ब, १९७९ मध्ये अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियातील तीन माईल आयलंड व १९८६ मध्ये युक्रेन, चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात झालेले अपघात. जैतापूरमधील अणुऊर्जा प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात होणारा विरोध. आज भारताकडे ७७८० मेगावॅट क्षमतेचे ७ अणुऊर्जा प्रकल्प आहेत. जगात सध्या अणुऊर्जा हीच योग्य आहे, अशी समजूत रूढ होते आहे. परंतु भारतात अणुउर्जेला भीतीपोटी विरोध केल्या जातो आहे. यातील मिथक काय? व सत्य काय? हे डॉ नीलिमा राजूरकरसांगणार आहते.

अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक व्हावी-पद्मश्री डॉ सुदाम काटे

0

पुणे –समाजातील वंचित आणि गरजुंच्या सामाजिक समस्या बऱ्याच आहेत त्या सोडवण्यावर लक्ष देत असताना अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक व्हावी अशी अपेक्षा पद्मश्री डॉ सुदाम काटे यांनी व्यक्त केली आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नूतन वास्तूचे उदघाटन डॉ काटे यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते बोलत होते.

संस्थेचे अध्यक्ष  शरद कुंटे ,कार्यवाह श्रीकृष्ण कानिटकर,नियामक मंडळ उपाध्यक्ष महेश आठवले, शाळा समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे, खेमराज रणपिसे , प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष नितीन आपटे,आदी व्यासपीठावर उपस्थित होते. नूतन वास्तूच्या उभारणीत महत्वपूर्ण सहभाग असणाऱ्या व्यक्तीचा यावेळी सत्कार करण्यात आला.

आपण स्वतः गेली अनेक वर्षे आदिवासी क्षेत्रात काम करीत आहोत, असे नमूद करून ते म्हणाले, आदिवासी समाजात अनेकविध प्रकारच्या अंधश्रद्धा, गैरसमजुती  आहेत. त्या दूर करण्याची गरज आहे. हे काम करीत असताना अनेक अडचणी आल्या आहेत. काही बाबी त्यांना पटू लागल्या आहेत. विशेषतः सातपुड्याच्या पट्ट्यातील आदिवासी भागात सिकल सेल हा आजार आढळून आला आहे.  तो दूर करण्यासाठी प्रयन्त सुरु आहेत. त्याला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज असून गरजू रुग्णांना त्याची उपलब्धी झाली तर त्याचा जीव वाचणे शक्य आहे. असे ते म्हणाले. 
या संस्थेशी माझा लहानपणापासूनच ऋणानुबंध आहे. असे नमूद करून ते म्हणाले , या संस्थेच्या शाळेत केवळ  शिक्षण झाले नाही तर मनावर चांगले संस्कार झाले त्याचा जीवनात नक्कीच उपयोग झाला आहे. यावेळी त्यांनी शाळेविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.  यावेळी श्री कुंटे यांनी मनोगत व्यक्त केले 

गिरीश बापट यांच्या प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण-शहराध्यक्ष योगेश गोगावले

0
पुणे- रविवारच्या सुट्टीचा दिवस साधून पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ १९४४ बूथपैकी बहुतांश कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन परिचय पत्रकांचे वाटप केले. ‘एक दिवस बूथसाठी’ या अभियानाअंतर्गत उद्या संध्याकाळपर्यंत सर्व बूथमध्ये पत्रक वाटप पूर्ण होणार आहे. या अभियानाद्वारे महायुतीच्या प्रचाराची दुसरी फेरी  पूर्ण झाली असून मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी आज पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र शिंदे आणि आरपीआयचे प्रसिद्धी प्रमुख ऍड. मंदार जोशी यांची उपस्थिती होती.
श्री. गोगावले म्हणाले, ‘दुसर्‍या टप्प्यात सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये दुसरी प्रचार फेरी पूर्ण झाली. पथनाट्य, व्हिडिओ रथ, कोपरा सभांद्वारे मतदारसंघ ढवळून काढण्यात आला. महिला, युवक, अल्पसंख्यांक , भटक्या विमुक्त जमाती, वाल्मिकी समाज, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी आदी मेळाव्यांचे आयोजन केले होते. विविध समाजघटकांनी बापट यांना पाठिंबा जाहीर केला.’
श्री. गोगावले पुढे म्हणाले, ‘पुढील टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, पंकजा मुंडे, विनय सहस्रबुद्धे यांच्या जाहीर सभा होणार आहेत. महायुतीचा जाहीरनामा येत्या बुधवारी जाहीर केला जाणार आहे. मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत शोधता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. १६ एप्रिलपासून मतदारांना घरोघरी जाऊन स्लिपांचे वाटप केले जाणार आहे.’

अभिवादन मिरवणुकीत सर्वधर्मीय विद्यार्थ्यांचा सहभाग

0
पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रविवार,दि.१४ एप्रिल २०१ रोजी सकाळी ८.३० वा.पासून अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते मिरवणुकीचे उद्घाटन ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते झाले .संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले.मिरवणुकीचे हे १ वे वर्ष होते.
संस्थेतील ३० आस्थापनातील १० हजार अल्पसंख्यक,सर्वधर्मीय विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले. दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोल – ताशा यांचा मिरवणुकीत समावेश होता.राखीव जागांच्या संदर्भात महात्मा गांधी -डॉ आंबेडकर यांच्यातील ‘पुणे करार’ हा जिवंत देखावा या अभिवादन मिरवणुकीचे आकर्षण ठरला.
 आझम कॅम्पस येथून मिरवणुकीस प्रारंभ होऊन पुना कॉलेज, गोल्डन ज्युबिली,जुना मोटार स्टँड, पद्मजी पोलीस चौकी,भारत सिनेमा,ए. डी. कॅम्प चौक,मॉडर्न बेकरी चौक,संत नरपतगिरी चौक, वीज वितरण कार्यालय, जिल्हा परिषद, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ.आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून  मिरवणुकीची सांगता झाली.
अवामी महाज’या सामाजिक संघटनेतर्फे या ठिकाणी मोफत पाणपोई आणि सरबत वाटप केंद्र व्यवस्था करण्यात आली होती.
दरवर्षी एम.सी.ई संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म.फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.त्यातून महामानवांचे सामाजिक,शैक्षणिक संदेश प्रसारित केले जातात.