Home Blog Page 2952

कलशेट्टी चा थरार , अ‍ॅसिड हल्ला करून ,गोळीबार ..

0

पुणे-

शहरातील सदाशिव पेठेत मंगळवारी रात्री अॅसिड हल्ला आणि गोळीबाराचे थरारनाट्य रंगले. सर्वाधिक रहदारीच्या टिळक रस्त्यावर मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबलेल्या एका युवकावर अज्ञाताने अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली. त्यानंतर सदाशिव पेठेतील ‘आनंदी निवास मारतीमध्ये लपलेल्या या हल्लेखोरास पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही हल्लेखोराने गोळीबार केला. दरम्यान, या घडामोडीत हल्लेखोर इमारतीच्या ‘डक्ट’मध्ये पडून गंभीर जखमी झाला. पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांकडून रात्री उशिरा हल्लेखोराला बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले.

टिळक रस्त्यावर बादशाही हॉटेलजवळ मंगळवारी सायंकाळी एक युवक मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी चालत आलेल्या युवकाने गप्पा मारत थांबलेल्या युवकाच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकले. या वेळी पिस्तुलातून गोळीबार झाल्यासारखा आवाज आल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर काही कळायच्या आत युवक पसार झाला. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या युवकाच्या चेहऱ्याला इजा झाली होती. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती रात्री पोलिसांना मिळाली. त्यानंतर विश्रामबाग पोलिस; तसेच गुन्हे शाखेतील पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या युवकाला बोलता येत नसल्याने पोलिसांना माहिती मिळवता आली नाही. युवकाबरोबर असलेल्या युवतीचे नाव, पत्ता समजला नसल्याने अ‍ॅसिड हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी झालेल्या युवकाचे नाव रोहित खरात असल्याचे समजते. दरम्यान, या घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांचे पथक टिळक रस्त्यावरील ‘आनंदी निवास’ इमारतीत गेले. अ‍ॅसिड हल्ला करणारा युवक इमारतीत असलेल्या सदनिकेत थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथकाने युवकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्या युवकाने पिस्तुलातून पोलिसांवर दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसंनी जादाची कुमक मागवून घेतली. पोलिसांनी इमारतीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इमारतीमध्ये अंधार असल्याने अडचणी येत होत्या. त्यानंतर इमारतीच्या ‘डक्ट’मध्ये हा हल्लेखोर पडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. ‘डक्ट’मध्ये उतरण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने पोसिलांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. पोलिस आणि अग्निशामक दलाने रात्री उशिरा या हल्लेखोरास बाहेर काढले. दरम्यान, हा हल्लेखोर गंभीर जखमी अवस्थेत होता; तसेच त्याने स्वत:वरही गोळी झाडून घेतल्याचे समजते.

राज ठाकरे दिवसा दिवसाला भूमिका बदलतात- भंडारी (व्हिडीओ)

0
पुणे-राज ठाकरे यांच्या भाषणाने ना त्यांच्या उमेदवाराला मते मिळाली ,ना आता त्यांना उमेदवार मिळाले ..त्यांची भाषणे मनोरंजनासाठी लोक ऐकतात …त्यांच्या भूमिका दिवसा दिवसाला बदलत असतात . हरिसाल गावातील लाभार्थी ला घेवून टीका करण्यात त्यांना आनंद घेता येतो, घेवू द्यात . अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी ठाकरे यांच्या भाषणांचा झंजावात आज मोडीत काढण्याचा प्रयत्न केला . एवढेच नाही तर स्मृती इराणी यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित करून त्यांच्यावर पुण्यात तक्रार झाल्या संदर्भात प्रश्न आला तेव्हा त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित केला .आज पुण्यात भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते,
पानशेत पूरग‘स्तांच्या घरांचा मालकी हक्काचा प्रश्‍न गेल्या पंचावन्न वर्षांपासून प्रलंबित होता. कॉंगेस राजवटीत केवळ आश्‍वासने दिली गेली. चटई क्षेत्र निर्देशांकाच्या (एफएसआय) हवेत घोषणा केल्या. मुळात जागेचीच मालकी मिळत नाही तोपर्यंत एफएसआयचा काही संबंध येत नाही. युती सरकारने पूरग‘स्तांचा मालकी हक्क मान्य केला असून, पुढचे प्रश्‍न मार्गी लागतील असे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. शहराध्यक्ष योगेश गोगावले यावेळी उपस्थित होते.
मंगेश खराटे यांचा भाजपमध्ये प्रवेश
कॉंग्रेसचे शहर चिटणीस आणि पानशेत पूरग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. पानशेत पूरग्रस्तांना खर्‍या अर्थाने न्याय भाजपने मिळवून दिला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत असल्याची घोषणा खराटे यांनी केली.

स्मृती इराणी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा खटला

0

पुणे-अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवत असताना भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.मनसे महिला  शहराध्यक्षा रूपाली पाटील यांनी अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत आज इराणींविरुद्ध खटला दाखल केला आहे.

दरम्यान, स्मृती इराणी यांच्या पदवीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पदवीधर असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करणाऱ्या स्मृती इराणी यांनी यावेळी मात्र केवळ १२ वी पास असल्याचं नमूद केलं असून काँग्रेसने त्यावर निशाणा साधत ‘क्योंकी मंत्रीजी भी कभी ग्रॅज्युएट थी,’ असा टोला लगावला होता. त्यावर भाजपकडून ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी काँग्रेसवर पलटवार केला होता. आमच्या उमेदवारांच्या पदव्यांवर बोलण्याआधी स्वत:कडे पाहा. राहुल गांधी तर मास्टर्स न करताच एमफिल झाले आहेत, असा टोला जेटली यांनी लगावला होता.

मोदींनी शपथपत्रात खोटी माहिती दिली, निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी- काँग्रेस

0
नवी दिल्ली- काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आपल्या निवडणूक अर्जात गुजरातच्या गांधीनगरमधील एका भूखंडाबाबत चुकिची माहिती दिल्याचा आरोपा लावला आहे. त्यासोबतच निवडणूक आयोगाने याप्रकणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी असे म्हटले. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी दावा केला आहे की, मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक भूखंड घेतला होता, आणि त्याबद्दल त्यांनी 2007 आणि 2012 च्या विधानसभा निवडणूकीत आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या अर्जात चुकिची माहिती देली आहे. काँग्रेसच्या या आरोपांवर सध्या भाजपकडून कोणतीही प्रतिक्रीया आली नाही.

खेरा म्हणाले- ‘‘सुप्रीम कोर्टात सोमवारी एक जनहीत याचीका दाखल केली आहे. यात पंतप्रधान नेरंद्र मोदींच्या संपत्तीबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे, कारण त्यांनी याबाबत चुकीची माहिती दिली आहे. मोदी मुख्यमंत्री बननल्यानंतर ही जमीन घेण्यात आली. 2007 त्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी गांधीनगरच्या सेक्टर -1 मध्ये एक भूखंड असल्याचा उल्लेख आपल्या निवडणूक अर्जात केला, ज्याचे क्षेत्रफळ त्यांनी 326.22 मीटर असल्याचे सांगितली. याची किंमत 1.3 लाख रूपये असल्याची माहिती मिळाली. बाजार भावानुसार त्याची किमंत आता 1.2 कोटी रूपये आहे.”

ते पुढे म्हणाले की, ‘‘2012 च्या विधानसभा निलडणुकीत त्यांनी भूखंड संख्या 411 चा उल्लेख आपल्या अर्जात केला नाही. त्यांनी दुसरे भूखंड 401/ए चा उल्लेख करताना म्हणाले की, ते याची मालक आहे. याचे क्षेत्रफळ 326.22 वर्गमीटर सांगितले. त्यासोबत पंतप्रधानांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीतदेखील भुंखड 411 चा उल्लेख केला नाही, तर 401/ए चा उल्लेख केला. त्यांनतर त्यांनी आपल्या वेबसाइटवर आपल्या संपत्तीची घोषणा केली, त्यात 401/ए भुखंडाचा उल्लेख करताना म्हटले की, ते याचे एक चतुर्थांश मालक आहेत. त्यामुळे आता त्यांनी निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी कठोर कारवाई करावी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील उद्योजकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास महावितरण कटीबध्द : संजीव कुमार

0

मुंबई:- महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी पुणे व कोंकण प्रादेशिक विभागातील औद्योगिक ग्राहकांसोबत आज प्रकाशगड मुख्यालयातून व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे थेट संवाद साधला. औद्योगिक ग्राहक संघटना व त्यांचे प्रतिनिधी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

पुणे आणि कोंकण प्रादेशिक विभागामधील ठाणे, वाशी, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, अहमदनगर, सांगली, जळगाव, रत्नागिरी, उल्हासनगर, डोंबिवली, शहापूर, मुरबाड, महाड, वसई, मालेगाव, कुपवाड, मिरज इत्यादी औद्योगिक ग्राहक प्रतिनिधींनी या संवादात सहभाग नोंदविला. त्यांनी प्रामुख्याने मोबाईल व्हॅन, मीटर्स, फिडर सेपरेशन करणे, पायाभूत सुविधांची उभारणी इत्यादी विषयांबाबत चर्चा करून महावितरणच्या सेवेत आणखी सुधारणा करण्यासाठी त्यांनी सुचना केल्या. तसेच एमआयडीसी, महापारेषण कंपनीच्या अखत्यारितील मागण्यांबाबत विशेष प्रस्ताव सादर करणे, त्यांच्यासोबत समन्वय बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत सुचविण्यात आले.

औद्योगिक ग्राहकांना नेहमीच उत्कृष्ट सेवा देण्यावर महावितरणचा भर असून त्यात आणखी सुधारणा करण्यात येणार असल्याचे या संवादात सांगण्यात आले. औद्योगिक ग्राहकांसाठी राज्यभरात मीटरचा पुरवठा मुबलक करण्यात आला असून नवीन औद्योगिक ग्राहकांनी वीजजोडणीचा अर्ज ऑनलाईनच करावा, असेही आवाहन श्री. संजीव कुमार यांनी यावेळी केले. देखभाल दुरुस्तीच्या कामाचे योग्य ते नियोजन करून या कामासाठी औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा महिन्यातून एकदाच बंद करण्यात येईल, याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याबाबत क्षेत्रिय कार्यालयांना त्यांनी सूचित केले व या कामासाठी स्वतंत्र कर्मचारीवर्गही नेमण्याचे सांगितले.

औद्योगिक ग्राहकांच्या समस्या समजावून घेऊन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी त्यावर त्वरित उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना सर्वसंबंधिताना व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे दिल्या. औद्योगिक ग्राहक संघटनेच्या प्रतिनिधींनी महावितरणने सुरू केलेल्या औद्योगिक ग्राहकांसोबत व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे थेट संवाद या अभिनव उपक्रमाचे उत्स्पूर्त स्वागत करून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांचे आभार मानले.

व्हिडीओ कॉन्फरेन्सच्या थेट संवादात यावेळी संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू, संचालक (वाणिज्य) श्री. सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कबुतरखाने तोडू नये, कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करू नये

0
मुंबई. भाजपचे ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईतील कबुतरखाना वाचवण्याची मागणी केली आहे. शिवाय कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या दंडावर बंदी आणावी, अशी मागणी त्यांनी मुंबई महानगरपालिकेकडे केली आहे. आमदार लोढा यांनी आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन दोन्ही मागणीवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही महिन्यापासून महानगरपालिका मुंबईतील जुने कबूतरखाने जमीनदोस्त आहेत. तसेच कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड आकाराला जात आहे. मुंबईतील गोलदेऊळ येथील ज्या गल्लीचे नाव कबूतर गल्ली आहे, तेथील कबूतरखानाही पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आला आहे. या संदर्भात मनपा आयुक्तांशी झालेल्या बैठकीत जैन शक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष कनक परमार आणि राष्ट्रीय पशु कल्याण मंडळाचे सदस्य गिरीश भाईही आमदार लोढा यांच्यासह उपस्थित होते. या प्रकरणी आमदार लोढा यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. कबूतरांना दाणे टाकणे हा भारतीय परंपरेचा एक भाग आहे. जगभरात सार्वजनिक ठिकाणावर कबूतरांना दाणे टाकले जातात. मात्र मुंबईत महापालिकेकडून यावर बंदी घालणे म्हणजे भारतीय परंपरा आणि पौराणिक विश्वासांचे उल्लंघन असल्याचे आमदार लोढा यांनी या निवेदनात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशात असे कुठेही नमूद नाही कि, कबुतरांना दाणे टाकणे बंद करा किंवा दाणे टाकणाऱ्यांकडून दंड आकारण्यात यावा, असे ते सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भत म्हणाले. तसेच आमदार लोढा यांनी कबूतरखान्यांना सुरु ठेवणे आणि कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांकडून मनपाद्वारे करण्यात येणारी कारवाई थांबविण्याची मागणी केली आहे. मनपा आयुक्तांनी याप्रकरणी कायद्यानुसार योग्य कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

शहरी नक्षलवादाचा धोका संपविण्यासाठी मोदी सरकार पुन्हा-प्रदीप रावत

पुणे- शहरी नक्षलवादाचा धोका कायमस्वरूपी प्रभावीपणे संपविण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन माजी खासदार प्रदीप रावत यांनी केले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. रावत बोलत होते. आरपीआयचे (ए) प्रसिद्धी प्रमुख ऍड मंदार जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
रावत म्हणाले, ‘माओवादाचे लोकशाहीला थेट आव्हान आहे. परिवर्तन बंदुकीतूनच होते अशी त्यांची भूमिका आहे. राजकीय, सामाजिक स्वातंत्र्य संविधानाद्वारे मिळू शकते यावर त्यांचा विश्‍वास नाही. गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले. धर्मांमध्ये आणि जातींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे हेतू हाणून पाडले. मोदी सरकारने शहरी नक्षलवाद्यांचे आवाहन मोडून काढल्याने नागरिकांमध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मोदी सरकारला निवडून देणे गरजेचे आहे.’
रावत पुढे म्हणाले, ‘नागरी क्षेत्रात नक्षलवाद्यांनी मोठे जाळे निर्माण केले आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधात सैन्यदल लढत असते. नक्षलवाद्यांची पाळेमुळे खणून काढावी लागणार आहेत. अंतर्गत सुरक्षेच्या धोक्याची जाणीव सर्वांना करून देणे आवश्यक आहे. तरूणांना तथ्य समजावून सांगणे हे आव्हानात्मक काम आहे. हा वैयक्तिक संघर्ष नसून वैचारीक लढा आहे.’

विविध सामाजिक संघटनांचा काँग्रेस आघाडीला सक्रिय पाठिंबा

पुणे-नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा भारतीय जनता पक्ष देशात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करीत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाची मोडतोड करण्याचाही त्यांचा विचार आहे. भाजपचा हा विघातक मार्ग रोखण्यासाठी ‘गणराज्य चळवळीतील विविध सामाजिक संघटनांनी महाराष्ट्रात  काँग्रेस आघाडीला सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा आंबेडकरी आणि स्त्री-मुक्ती चळवळीतील ज्येष्ठ नेत्या सुषमा अंधारे यांनी
केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस -मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवनात आज झालेल्या पत्रकारपरिषदेत त्या बोलत होत्या.
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते , आमदार शरद रणपिसे,कॉंग्रेस चे ज्येष्ठ नेते प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप;गणराज्य चळवळीतीळ कार्यकर्ते रमेश राक्षे, अनिल हातागळे, रावसाहेब खंडांगळे, काँग्रेसमध्ये नव्याने प्रवेश केलेले सचिन तावरे आदी उपस्थित होते.
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, गेल्या ५/६ महिन्यांपासून जनवादी चळवळी अंतर्गत महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या विविध सामाजिक संघटनांच्या एकत्रीकरणाचे काम चालू आहे. त्यातूनच एकत्र आलेल्या २२ लोकशाहीवादी सामाजिक संघटनांनी काँग्रेस आघाडीला सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील लोकशाही टिकण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी रमेश राक्षे म्हणाले, चळवळीत काम करताना अनेक आव्हाने निर्माण झाली. भीमा- कोरेगाव प्रकरणात खरे आरोपी बाहेर होते मात्र आमच्याच कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रवृत्तींविरुद्ध लढा देण्यासाठी आम्ही काँग्रेस आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
अनिल हातागळे म्हणाले, भाजपच्या राजवटीने मातंग समाजावर अन्यायच केला.  मातंग समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी भाजप सरकारने फेटाळली मात्र   शरद पवार यांनी त्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. या निवडणुकीत भाजप-सेनेविरुद्ध रान उठविण्याचा आम्ही निर्णय घेतला असून काँग्रेस आघाडीला सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला
आहे.

सचिन तावरे यांचा समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणे- पर्वती भागातील शिवसेनेचे सचिन तावरे यांनी मंगळवारी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला . काँग्रेस भवनात दुपारी झालेल्या खास कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सचिन तावरे यांनी आपल्या समर्थकांसह फटाक्यांच्या निनादात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते, आमदार शरद रणपिसे,  पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस -मित्र पक्ष आणि आघाडीचे उमेदवार मोहन जोशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, सचिन तावरे यांच्यासारखा उमदा, तरुण कार्यकर्ता काँग्रेसमध्ये परतल्याबद्द्दल आनंद व्यक्त केला.  मोदी यांचे ढोंगी सरकार हटवून काँग्रेसला सर्वसामान्य माणसांचे राज्य आणावयाचे आहे त्यामुळेच या निवडणुकीत मोहन जोशी यांच्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मोहन जोशी यांनी प्रास्ताविक करताना  शिवसेनेचे  सचिन तावरे यांच्या काँग्रेस प्रवेशाची घोषणा करून त्यांचे काँग्रेसमध्ये सहर्ष स्वागत केले. याप्रसंगी आपल्या  समर्थकांच्या उपस्थितीत  भाषण करताना सचिन तावरे म्हणाले की, गेली काही वर्षे मी दुसऱ्या पक्षात जरी असलो तरी मी मनाने काँग्रेसमध्येच होतो. मी माझी वाट चुकलो होतो. एखादे मूल आईपासून जसे दुरावते आणि आई दिसली की लगेच ते तिला बिलगते तसे माझेही झाले होते.
काँग्रेस ही माझी आई आहे म्हणून मी आज माझ्याच घरी आनंदाने परतलो आहे. काँग्रेस पक्षाचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी मी शपथ घेऊनच या पक्षात पुन्हा आलो आहे आणि प्रत्येक दिवसागणिक काँग्रेसची सर्वांगीण प्रगती झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे जाहीर करून तावरे म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत मोहनदादा विजयी व्हावेत या एकाच प्रामाणिक इच्छेपोटी
मी काँग्रेसमध्ये आलो आणि आता मतदानाला दिवस कमी असले तरी मी आणि माझे कार्यकर्ते रात्रंदिवस कठोर मेहनत करून मोहन जोशी यांचा विजय सार्थ करून दाखवू असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेतही सचिन तावरे यांनी आपल्या घरवापसीबाबतआनंद व्यक्त करून काँग्रेस पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून तो एक विचार आहे आणि हा विचार कोणी काहीही केले तरी मुळीच नष्ट होणार नाही असे ठामपणे सांगितले.

भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे – पृथ्वीराज चव्हाण

पुणे- पुण्यातील वातावरण मोहन जोशी यांना अत्यंत अनुकूल असून भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. हे वातावरण संपूर्ण देशात असून मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ शिवदर्शन येथील साहित्य सम्राट विजय तेंडूलकर नाट्यगृहात आयोजित नागरिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार, माजी उपमहापौर व नगरसेवक आबा बागुल, ज्येष्ठ नेते प्रवीण गायकवाड, पत्रकार सुरेश भटेवरा, रोहित टिळक, नंदकुमार बानगुडे, सतीश
पवार, अमित बागुल, यांसह सागर आल्हाट, द.स. पोळेकर, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, घनश्याम सावंत, प्रकाश आरणे, मामा परदेशी, स्वप्नील नाईक, जयकुमार ठोंबरे, विश्वास दिघे, शफी मामु शेख, ओमराज मारणे, शर्वरी गोतर्णे, ज्योति आरवे आदीसह शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कॉँग्रेसच्या जाहीरनाम्यात किमान उत्पन्न हमी योजना (न्याय योजना) जाहीर झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीबी विरुद्धची अंतिम लढाई जाईल आणि देशातील गरीबी दूर होईल. न्याय योजना ही क्रांतिकारी योजना आहे. त्याचबरोबर शिक्षणासाठी जीडीपीच्या ६ टक्यांची तरतूद करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तरुण पिढी घडविण्यासाठी जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी याचा उपयोग होईल. डिजिटल इंडियाची भाषा करणारे मोदी सरकारने एकही डिजिटल शाळा सुरु केली नाही. राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचा जेईई मेन्सच्या परीक्षेत प्रथम येणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रवीण गायकवाड यांनी उपस्थित नागरिकांना’अछे दिन आले का?, तुमच्या खात्यात १५ लाख रुपये जमा झाले का?, तुमची गरीबी हटली का?, गॅस, डिझेल, पेट्रोल स्वस्त झाले का?, असे प्रश्न विचारात त्यांच्याशी संवाद साधला. उपस्थित नागरिकांनी नाही..नाही असे उत्तर देत सभागृह डोक्यावर घेतले.
गायकवाड म्हणाले, हुतात्मा झालेल्या जवनांच्या नावाने मते मागणे असा प्रकार यापूर्वी कधी या देशात झाला नाही. त्यांनी असे म्हणताच नगिरिकांनी निषेध…निषेध.. अशा घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन वेळा मुख्यमंत्री झाले त्यावेळी कधीही त्यांनी गुजरातमध्ये चहावाला असल्याचे सांगितल्याचे ऐकिवात नाही. मात्र समाजमानाची मानसिकता लक्षात घेवून त्यांची चहावाला महणून प्रतिमा तयार केली गेली. जेणेकरून चहा पिताना त्यांची आठवण व्हावी. परंतु पाच वर्षे त्यांनी जनतेला फसविले आहे. त्यामुळे रोज चहा घेताना मोदींना आपल्याला सत्तेवरून घालवायचे आहे याचे स्मरण करा असे आवाहन त्यांनी केले.
मोहन जोशी म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कोंग्रेस पक्षाने उमेदवारी देवून सर्वसामान्यांचा आदर केला आहे. मी नाही तर तुमच्यातील प्रत्येकजण निवडणुकीसाठी उभा आहे असे समजून काम करा. मोदी सरकारने पाच वर्षात काहीच काम केलेलं नाही. मी माझ्या वचननाम्यात जी आश्वासने दिली आहेत. त्याची पूर्तता काय झाली हे मी दरवर्षी समता भूमी येथे जावून सांगणार आहे.
या कार्यक्रमाचे संयोजक आबा बागूल यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की, स्व. राजीव गांधींनी १९८५ मध्ये संगणक आणण्याची घोषणा केली त्यावेळी याच भाजपने त्याला विरोध केला. आज ते डिजिटल इंडियाची भाषा करत आहेत. देशाचा आणि पुण्याचा विकास हा कोंग्रेसच्याच काळात झाला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून मोहन जोशी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा
असे आवाहन त्यांनी केले.

पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो या वर्षाअखेर सुरू करणार-गिरीश बापट

पुणे : “मेट्रो प्रकल्पाच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापलिका हद्दीतील कामांनी वेग घेतला आहे. या वर्षाअखेर आम्ही पिंपरी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रो सुरू करणार आहोत. त्याचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल.” अशी माहिती महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी येथे दिली. 
 
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील  खराडी आणि धानोरी भागात बापट यांची प्रचार फेरी काढण्यात आली होती. येथे ते बोलत होते. आमदार जगदीश मुळीक, माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेवक संदीप जराड, बापूसाहेब कर्णे गुरुजी, संजय भोसले, अविनाश साळवे, अनिल टिंगरे, श्वेता गलांडे, राहुल भंडारे, मुक्ता जगताप, श्वेता चव्हाण, सुनीता गलांडे, हरझाना शेख, शीतल शिंदे, शीतल सावंत, किरण जठार, संतोष राजगुरू, संतोष भरणे, महेंद्र गलांडे, नवनाथ पठारे, सचिन सातपुते, स्वप्नील चव्हाण, राजाभाऊ चौधरी, शैलेश बनसोडे , संतोष खांदवे, रोहन शिंदे , रावसाहेब राखपसारे, सुनील खांदवे, सचिन धिवार आदी यावेळी उपस्थित होते.
 
बापट म्हणाले की, काँग्रेस सरकारने मेट्रो भुयारी असावी की जमिनीवरून या वादातच १५ वर्षे व्यर्थ घालविली. या वर्षात पुण्याची लोकसंख्या वाढल्याने  वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊ लागला. भाजप सरकारमुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लागला. पुणे व पीएमआरडीए मेट्रो अंतर्गत जवळपास २० हजार कोटीची कामे सध्या कार्यान्वित  झाली आहेत. या कामांमुळे जनतेमध्ये नवा आशावाद निर्माण झाला असून तीनही मार्गिकांच्या विस्तारीकरणाची मागणी देखील आता जोर धरू लागली आहे. परंतु, पहिल्या टप्प्यात सध्याच्या मंजूर झालेल्या मार्गिकेचे काम पूर्ण करून पुढील टप्प्यात आम्ही विस्तारीकरणाचा निर्णय  घेणार आहे. या विस्तारीकरणाचा फायदा खराडी भागातील आयटीयन्सला होईल. 
 
 भाजप सरकारच्या कृतीशील, गतिमान आणि पारदर्शी निर्णय प्रक्रियेमुळे १५ वर्षे रखडलेला मेट्रो प्रकल्प  आम्ही अवघ्या ५ वर्षात पूर्णत्वाच्या  दिशेने नेऊ शकलो, असे सांगताना अभिमान वाटत आहे असल्याची भावना देखील बापट यांनी यावेळी व्यक्त केली.

देशाच्या संरक्षणासाठी लष्करी जवान भक्कम ,मोदींनी त्यांचा आसरा घेवू नये – अरविंद शिंदे

पुणे- देशाच्या संरक्षणासाठी भारताचे लष्कर आणि जवान भक्कम आहेत त्यांचा राजकीय आसरा मोदींनी घेण्याची आवश्यक्यता नाही असे प्रतिपादन मोदी यांच्या शहरभर झळकत असलेल्या जाहिरातीनच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी केले तर कॉंग्रेसचे दुसरे युवा नेते नगरसेवक अविनाश बागवे यांनी पुण्याच्या दोन्ही भाजपा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून एक मंत्री निवडणूक प्रचारात सर्वत्र दिसत असून तरीही ते  फरार असल्याची माहिती पोलीस कोर्टाला देत आहेत असा आरोप केला आहे.
आज दुपारी कॉंग्रेस चे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ ताडीवाला रोड या परिसरात पदयात्रा काढण्यात आली तेव्हा ते ‘माय मराठी ‘ शी बोलत होते . या परिसरातील नगरसेवक , कार्यकर्ते आणि दलित ,मुस्लीम समाजाचे असंख्य कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते . या पदयात्रेला  अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला .
पहा या पदयात्रेची एक झलक आणि यावेळी कोणी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या ..

आरएसएस प्रमुख  मोहन भागवत यांच्या हस्ते यंदा मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार

0

मुंबई  – गेल्या 30 वर्षांत आपली आगळी-वेगळी  ओळख बनविणाऱ्या पुणे स्थित आणि नोंदणीकृत चॅरिटेबल संस्था मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे यावेळी  संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींना सन्मानित केले जात आहे. प्रतिष्ठित मंगेशकर कुटुंबाकडून प्रत्येक वर्षी दिले जाणारे हे पुरस्कार या वेळी बुधवारी, म्हणजेच २४ एप्रिल, २०१९ रोजी मुंबई येथील षणमुखानंद हॉल येथे पार पडतील. सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल विजयकुमार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असतील आणि यावर्षीच्या विजेत्यांना आरएसएस प्रमुख  मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील. 

तसेच यावर्षीचे संगीत आणि कला क्षेत्रातील नामवंत शास्त्रीय नर्तकी श्रीमती सुचेता भिडे-चाफेकर यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव श्री सलीम खान यांना प्रदान करण्यात येईल, भारतीय चित्रपटसृष्टीत महत्वपूर्ण योगदानासाठी श्री मधुर भंडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देण्यात येईल. श्रीमती हेलन यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित केले जाईल, साहित्य क्षेत्रात श्री वसंत आबाजी डहाके यांना वागविलासिनी पुरस्कारांनी पुरस्कृत केले जाईल. भद्रकाली प्रॉडक्शनचे ‘सोयारे सकाळ’ हे नाटक मोहन वाघ पुरस्काराने वर्षातील सर्वोत्तम नाटक म्हणून गौरविण्यात येईल, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तालयोगी आश्रमचे पंडित सुरेश तळवळकर यांना आनंदमयी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सीआरपीएफ  डायरेक्टर जनरल श्री विजयकुमार  यांना गृह मंत्रालया अंतर्गत भारताच्या जवानांसाठी सामाजिक कार्य करणारी मान्यताप्राप्त संस्था ‘भारत के वीर’ साठी सम्मानित केले जाईल. आमच्या प्रतिष्ठानाने या वेळी हा पुरस्कार जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात  शाहिद ४० पेक्षा अधिक सीआरपीएफच्या जवानांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमात शहीदाना श्रद्धांजली स्वरूप लता दीदी, त्यांच्या पिता मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतीत ,एक कोटी रुपये दान म्हणून देतील.

  या पुरस्कारांची घोषणा करताना, हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी सांगितले, “एक गायक, संगीतकार आणि मंच कलाकार म्हणून मास्टर दीनानाथचे अमूल्य योगदान स्मृती मंगेशकर कुटुंब प्रत्येक वर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार आयोजित करतो ज्याद्वारे विशिष्ट व्यक्तींना सन्मानित केले जाते. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की, हे आमच्या या अद्वितीय कार्यात सगळ्याच लोकांकडून भरपूर मदत मिळत राहिली आहे.”

उर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, परस्परविरोधी घोषण देत काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

0

मुंबई- उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.

उर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.

उर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.

एमसीएमसीच्‍या कामकाजाची निवडणूक खर्च निरीक्षक श्रीवास्‍तव यांच्‍याकडून पहाणी

0

पुणे शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्‍यात आलेले केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक रंजन श्रीवास्‍तव यांनी जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीला (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्‍ड मॉनिटरींग कमिटी- एमसीएमसी) भेट देऊन पहाणी केली. एमसीएमसीकडून दृक-श्राव्‍य जाहिराती प्रमाणित करुन देण्‍यात येतात. यावेळी उपस्थित सदस्‍यांशी त्‍यांनी चर्चा केली.  समन्‍वय अधिकारी नंदिनी आवडे, उपजिल्‍हाधिकारी सुधीर जोशी, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी जगदीश राव, दूरदर्शनचे कार्यक्रम प्रमुख संजय कर्णिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. योगेश बोराटे, टी.पी.शर्मा, एस.बी.निकम, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पुणे मनपाचे जनसंपर्क अधिकारी संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक शामल दीपक पाटील आदी उपस्थित होते