Home Blog Page 2948

…तर भाजपने नथुराम गोडसेला ही तिकीट दिले असतं : काँग्रेस

0

मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट आली होती. आता काँग्रेसने देखील भाजपवर प्रज्ञा सिंह यांना दिलेल्या उमेदवारीवरून कडाडून टीका केली आहे. महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे जिवंत असते, तर त्यांना देखील भाजपने तिकीट दिले असते, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

जामिनावर सुटलेल्या प्रज्ञा सिंह यांनी २६/११ हल्ल्यात शहिद झालेल्या हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. मी दिलेल्या श्रापामुळेच त्यांचा सर्वनाश झाल्याचा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला होता. आपल्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केल्यामुळेच आपण करकरेंना श्राप दिला होता, असंही त्यांनी म्हटले होते. विषेश म्हणजे, भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. त्यानंतर भाजपकडून प्रज्ञा सिंह यांचे समर्थन देखील करण्यात आले. यामुळे प्रज्ञा सिंह यांचे वक्तव्य भाजपच्या हिंदू कार्ड चालवण्यामागची योजना तर नव्हती ना, अशी शंकाही उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले की, भाजप बेशरमपणे अशा व्यक्तीचे समर्थन करत आहे, जी व्यक्ती दहशतवाद आणि राष्ट्रविरोधी कारवायात सामील आहे. जवानांच्या बलिदानावर मतदान मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रज्ञा सिंहच्या वक्तव्यावर, जनतेची माफी मागावी वाटली नाही, असंही सावंत यांनी नमूद केले. तसेच एवढा विरोध झाल्यानंतरही प्रज्ञा सिंह यांची उमेदवारी कायम राखल्यामुळे भाजपकडून दहशतवादाचे समर्थन करण्यात येत असल्याचे स्पष्ट होते, असा टोलाही सावंत यांनी लागवला आहे.

मतदार जागृती अभियानाचा समारोप

0

पुणे-देशातील लोकसभेच्या निवडणुकीत युवकांचा मतदारांचा मतदार प्रक्रियेत सहभाग वाढला पाहिजे या भावनेने  महात्मा फुले वाड्यात दलित अल्पसंख्यांक सेवा प्रतिष्ठान आयोजित मतदार जागृती अभियानाचा समारोप झाला .

पहिले माझे नमन मतदार बंधूला , मतदार भगिनी तरुण आणि तरुणीला मतदार करुनी तू घडवी या देशाला …. , दिवस मतदानाचा सण हा मोठा देशाचा सहभाग प्रगतीचा मार्ग लोकशाहीचा …. , इनती  करतो आता हि देशाच्या जनतेला  , मतदान करू चला फुलवू या देशाला … असे निवडणूक गीत प्रा . योगेंद्र माने यांनी सादर केले . यावेळी जेष्ठ विधीज्ञ ऍड. राहील मलिक यांच्याहस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले . यावेळी दलित अल्पसंख्यांक सेवा प्रतिष्ठानचे सरचिटणीस  इंद्रजित सकट , काशिनाथ गायकवाड , शिवराम तरुण मंडळाचे अध्यक्ष आसिफ हरुण शेख , राजेश गाडे , विकास भांबुरे , सुनिल पवार , किशोर गायकवाड , महेंद्र जगताप , सुरेश यादव , गौतम वानखेडे , , हनूक केदारी , दिव्येश म्हकांळे , कुणाल चंद्रशेखर सकट , राज साळवे , सतीश लांडगे , जितेंद्र जठार , रितेश शेलार , देवी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी जेष्ठ विधीज्ञ ऍड. राहील मलिक यांनी मतदार जागृती अभियानाबाबत सांगितले कि , पीपल्स रिप्रेझेंटीव्ह ऍक्ट १९४९ या कायद्यान्वये आपण प्रतिनिधि निवडून तो संसदेत पाठवतो . यामध्ये निवडणूक घेऊन ज्याला सर्वात जास्त मतदान होऊन  निवडून येतो  त्याला प्रतिनिधित्व करण्यास मिळते .. निवडणूक आयोग मार्गदर्शनानुसार मतदान प्रक्रिया पार पडली जाते , त्या अनुषंघाने मतदार यादीत फाँर्म ६ प्रमाणे त्यांचे नाव मतदार यादीत येते . त्याचे नाव मतदार यादीत आल्यावर तो मतदारास पात्र ठरतो . मतदार यादीत नाव नोंदविले परंतु मतदार यादीत समजा आले नाही तर त्या मतदाराला ४९ अ प्रमाणे तो चॅलेंज व्होट आपले ओळखपत्र दाखवून करू शकतो .समजा त्याच्या नावावर कोणी डमी मतदान केले असल्यास त्या मतदाराला टेंडर मताद्वारे मतदान करून आपला हक्क बजावू शकतो . त्यामुळे सर्वानी जास्तीत जास्त मतदानकरून लोकशाही बळकट करावी . 

जश शहा, देवराज मंदाडे, अर्जुन किर्तने, अमन शहा, अर्जुन परदेशी यांचे विजय

0

पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) केपीआयटी यांच्या संलग्नतेने तर्फे 12 14 वर्षाखालील मुले मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटातजश शहा, देवराज मंदाडे, अर्जुन किर्तने, अमन शहा, अर्जुन परदेशी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ लॉन टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित जश शहाने हर्षवर्धन सिंगचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला. देवराज मंदाडे याने अवनीश गवळीचा 6-2 असा सहज पराभव केला. अर्जुन परदेशीने राज दर्डाला 6-2 असे पराभूत केले. नवव्या मानांकित अमन शहाने रोहन बोर्डेवर 6-0 असा विजय मिळवला.

14 वर्षाखालील मुलींच्या गटात पहिल्या फेरीत सानिका लुकतुके हिने वैष्णवी सिंगचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. आदिती हरिपने आरुशी प्रकाशचा टायब्रेकमध्ये 6-5(1) असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 14 वर्षाखालील मुली:पहिली फेरी:
सानिका लुकतुके वि.वि.वैष्णवी सिंग 6-4;
आदिती हरिप वि.वि.आरुशी प्रकाश 6-5(1);
यशिका बक्षी(8)वि.वि.कश्वी राज 6-2;
अलिशा कोसंबी वि.वि.डेलिशा रामघट्टा 6-3;
सिमरन छेत्री(7) वि.वि.श्रीया रुगे 6-2;
समृद्धी भोसले(5)वि.वि.अनन्या देशमुख 6-0;
निशिता देसाई वि.वि.कनिका बाबर 6-4;
रिया अरोरा वि.वि.ख़ुशी पाटील 6-1;
श्रावणी देशमुख वि.वि.रितिका मोरे 6-1;

12वर्षाखालील मुले: दुसरी फेरी:
जश शहा(1) वि.वि.हर्षवर्धन सिंग 6-0;
देवराज मंदाडे वि.वि.अवनीश गवळी 6-2;
अर्जुन परदेशी वि.वि.राज दर्डा 6-2;
अमन शहा(9)वि.वि.रोहन बोर्डे 6-0;
रेयांश बेहेले वि.वि.अर्जुन खलाटे 6-3;
अर्जुन किर्तने(3)वि.वि.अर्पित साळुंखे 6-0;
अंकित रॉय वि.वि.हिमनिश बागिया 6-3;
आरुष मिश्रा(7)वि.वि.अभिषेक खंडाळगावकर 6-0.

सिंहगड रोडवर मोहन जोशींची प्रचार रॅली

पुणे-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार
मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली निघाली. पर्वती विधानसभा मतदार संघातील
रामनगर येथून या प्रचार रॅलीची जल्लोषात सुरुवात झाली. ठिकठिकाणी नागरिकांनी  पुष्पहार
अर्पण करून मोहन जोशींचे स्वागत केले . मार्गावर अनेक ठिकाणी ताक, सरबत दिले
जात होते.
राम नगर येथून ही प्रचार रॅली विठ्ठल नगर – तुकाईनगर – आनंदनगर – महादेव नगर –
गणेश कॉलनी – दामोदर नगर – साई नगर – खोराडवस्ती – आनंद विहार – राजीव गांधी
वसाहत – विश्रांत नगर – हिंगणे खुर्द – सर्व्हे नं. २३/२६ – या मार्गाने जाऊन विठ्ठलवाडी येथे
समाप्त झाली.
या प्रचार रॅलीत विकास दांगट, शैलेश चरवड, बाळासाहेब कापरे, सचिन आडेकर,
सोनाली मारणे, आबा जगताप, चैतन्य पुरंदरे, राजा भाऊ चव्हाण, लहूअण्णा निवंगुणे, अजय
खोडे, नितीन शिंदे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित झाले होते.

तूरडाळ घोटाळा आणि त्याबाबत न्यायालयाने दिलेला आदेश यामुळे बापटांचा भ्रष्ट चेहरा उघड -मोहन जोशी

पुणे, -तूरडाळ घोटाळा आणि त्याबाबत न्यायालयाने दिलेला आदेश यामुळे भ्रष्टाचारी बापट यांचा चेहरा
उघड झाल्याचे सांगून’पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही’धनशक्ती’विरुद्ध’जनशक्ती’ अशी
आहे. गेल्या वीस दिवसाच्या निवडणूक प्रचारात काँग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे नेते व
कार्यकर्त्यांनी दाखविलेली एकजूट तसेच सर्वत्र जनतेचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता
परिवर्तनाची चाहूल लागली असून त्यामुळे माझा या निवडणुकीत विजय निश्चित आहे, पुण्याची ही
निवडणूक आता कॉंग्रेसच्या हातात आली आहे. असा विश्वास पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-
राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी रविवारी काँग्रेस भवनात पत्रकार
परिषदेत बोलताना व्यक्त केला.


या पत्रकारपरिषदेला शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन
तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, पी ए
इनामदार, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार कमल ढोले-पाटील, माजी आमदार दीप्ती चवधरी,
राष्ट्रवादी काँगेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, कॉंग्रेसचे नेते प्रवीण गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस
अभय छाजेड, अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, आबा बागुल, संजय बालगुडे, सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, रवींद्र
धंगेकर, राजेंद्र कुंजीर, नीता रजपूत, डॉ. सतीश देसाई, काका धर्मावत , शानी नौशाद, रमेश
अय्यर, दत्ता एकबोटे, बुवा नलवडे, जयसिंग भोसले, प्रकाश भालेराव , महेश शिंदे, राहुल डंबाळे, योगेश पांडे, शुभम
सोनवणे, बबनराव अडसूळ. आदी उपस्थित होते. प्रारंभी रमेश बागवे यांनी प्रास्ताविक केले.
काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी म्हणाले, प्रचारादरम्यान मी जेथे जेथे गेलो तेथे मला
नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला विशेषतः तरुण वर्गाचाही अनुकूल प्रतिसाद मिळाल्यामुळे
परिवर्तनाची चाहूल लागल्याचे प्रत्यंतर आले. बाबा आढाव यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील यावेळी
प्रथमच उघड भूमिका घेऊन काँगेस आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले. तर पुण्यातील असंख्य
नागरिकांनी भाजप हा रामभाऊ म्हाळगी, अडवाणी यांच्या काळातील राहिला नसल्याने आपण यावेळी
भ्रष्टाचारी उमेदवार दिलेल्या भाजपला मतदान करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा
काँगेस आघाडीचा उमेदवार निवडून येईल आणि पुण्याला कार्यक्षम खासदार देण्याची काँग्रेसची परंपरा
पुन्हा प्रस्थापित होईल असे त्यांनी सांगतले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्याबद्दल बोलताना मोहन जोशी
म्हणाले, पुण्याचे यापूर्वीचे भाजपचे खासदार अनिल शिरोळे अकार्यक्षम असल्याने त्यांना उमेदवारी
नाकारण्यात आली आणि पालकमंत्री असलेले गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र पालकमंत्री

म्हणून बापट यांनी पुणे शहराच्या विकासासाठी काय केले? असाच प्रश्न नागरिक विचारीत होते. बापट
यांनी पाच वर्षात पुण्याच्या विकासासाठी एकही प्रकल्प आणला नाही उलट काही प्रकल्प पुण्याबाहेर गेले.
बापट यांच्या निष्क्रियतेमुळे पुण्याची पाणीपुरवठा स्थिती गंभीर झाली तर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे
कोलमडली. विरोधी पक्षात असताना हेल्मेटसक्तीला विरोध करणारे बापट सत्ता मिळताचं लगेच बदलले
आणि त्यांच्या हेल्मेटसक्तीच्या अट्टाहासामुळे कोट्यवधींची दंड वसुली झाली. मात्र या ‘जिझिया करा’; मुळे
जनतेमध्ये वाढती नाराजी आहे. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने एकाचवेळी पुणे आणि नागपूर येथे मेट्रो
प्रकल्पाची घोषणा केली होती. नागपूरचा मेट्रो-प्रकल्प मार्गी लागला मात्र पुण्यात अजूनही फक्त अर्धवट
खांब उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे पंतप्रधानांनी मोठ्या गाजावाजात
उदघाटन केले मात्र फक्त तीनशे कोटीचे अनुदान मिळाल्यामुळे अनेक कामे रखडली. पुण्यातील रस्ते अरुंद
झाल्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडत आहे असे ते म्हणाले.
तूरडाळ घोटाळा आणि त्याबाबत न्यायालयाने दिलेला आदेश यामुळे भ्रष्टाचारी बापट यांचा चेहरा
उघड झाल्याचे सांगून मोहन जोशी म्हणाले, ‘गुटखा-बंदी’असूनही पुणे परिसरात त्यांच्या आशीर्वादाने
निर्वेधपणे गुटखा विक्री चालू आहे.
पुण्याचा सर्वांगीण विकास फक्त काँग्रेसच्याच राजवटीत झाला असा दावा करून मोहन जोशी
म्हणाले, मधल्या काळात भाजपच्या राजवटीत हा विकास खुंटला होता. त्यामुळे भावी खासदार म्हणून
माझ्यावर मोठी जबाबदारी आली आहे. वेगाने वाढणाऱ्या पुण्याच्या विकासा साठी केंद्राकडून स्पेशल पॅकेज
मंजूर करून घेणे तसेच पुण्यात राहणाऱ्या असंख्य निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन पुण्याच्या
विकास कार्यान्वित करणे हे माझे भावी काळातील प्रमुख उद्दिष्ट राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.
‘पुण्यातील पारंपरिक गणेशोत्सव आणि पालखी महोत्सव साजरा करताना पालकमंत्री म्हणून बापट
यांनी अडथळेच आणले. गणेशोत्सवकाळात कार्यकर्त्यांविरुद्ध भरण्यात आलेले खटलेही त्यांनी मागे घेतले
नाहीत. काही वर्षांपूर्वी मी आमदार असताना गणेशोत्सवकाळात कार्यकर्त्यांविरुद्ध भरण्यात आलेले खटले
मागे घेण्यासाठी खास प्रयत्न केले होते. आता मी खासदार म्हणून हे काम करणार आहे असेही त्यांनी
सांगितले.

स्वयंस्फूर्तीने काम केल्यानेच कर्मचाऱ्यांमध्ये गुणवत्ता विकसित होते – एच. एन.श्रीनिवास

0

एनआयपीएम व एआयएसएसएमएस च्यावतीने आयोजित परिसंवाद संपन्न

पुणे  :    स्वयंस्फूर्तीने  काम केल्यानेच कर्मचाऱ्यांमध्ये गुणवत्ता विकसित होते आणि अशी स्वयंस्फूर्ती असण्यासाठी मुळात तो कर्मचारी त्याच्या कामाप्रती त्वत्वनिष्ठ व प्रामाणिक असणे आवश्यक असते तसेच संस्थात्मक  मूल्ये यांचेही महत्व आहे,  असे मत  टाटा ग्रुपच्या मुंबईच्या  ताज हॉटेलचे माजी संचालक एच. एन. श्रीनिवास यांनी व्यक्त केले.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट व ऑल इंडिया  श्री शिवाजी मेमोरियल  सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील पीवायसी जिमखाना येथे मनुष्यबळ  व्यवस्थापन क्षेत्रातील  पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित माहितीपर व्याख्यानात  ते बोलत होते.

यावेळी  बोलताना  त्यांनी २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्यात ताज हॉटेलचे झालेले नुकसान, ताज वर झालेल्या हल्ल्यात जखमी  व मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना  मदत करण्यासाठी टाटा ग्रुपने ताज अँड   टाटा पब्लिक  वेलफेअर  ट्रस्टच्या माध्यमातून उचललेली पावले, ते प्रत्यक्ष मदत पोहेचेपर्यंत आलेले अनुभव, ज्यांना  मदत करण्यात आली अशांची प्रतिक्रिया अशा विविध घटनाक्रमांची  त्यांनी सविस्तर माहिती सांगितली.

याशिवाय कोणत्याही सामान्य मनुष्याकडून अनपेक्षितपणे ‘असामान्य नेतृत्व’ संकटप्रसंगी कसे  दिसून येते  ते ताज वर हल्ला झाल्यावर तेथील विविध कर्मचाऱ्यांनी प्रसंगी स्वतःचा जीव पणाला लावून अनेकांचे  प्राण वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून दिसून येते, असेही त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.

या कार्यक्रमाला एनआयपीएम पुणे विभागाचे अध्यक्ष उमेश जोशी,  एआयएसएसएमएस चे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य राहुल यादव, व्यवस्थापन समितीचे  सदस्य निखिल कणसे, संस्थेचे सहसचिव सुरेश शिंदे यांच्यासह संस्थेच्या विविध विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी  तसेच  पुणे जिल्ह्यातील विविध नामांकीत कंपन्यांचे दोनशेहून अधिक मनुष्यबळ व्यवस्थापक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनआयपीएमचे सेक्रेटरी नरेंद्र पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. मोनिका राव यांनी केले.

साध्वी प्रज्ञासिंहला उमेदवारी म्हणजे भाजपचा उद्देश स्पष्ट-प्रवीण गायकवाड

पुणे- नवीन सर्वेक्षणानुसार भाजपला २०० पेक्षा कमी जागा मिळतील. त्यामुळे देशातील वातावरण बघता भाजपच्या
पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सैनिकांच्या नावावर आणि स्वत:ची जात
सांगत मते मागायला लागले आहेत. साध्वी प्रज्ञासिंहला उमेदवारी देऊन भाजपने त्यांचा उद्देश स्पष्ट केला आहे. साध्वीची
उमेदवारी लक्षात घेता भाजपने पुण्यातून मिलिंद एकबोटे आणि सांगलीतून मनोहर भिडे यांना उमेदवारी दिली असती
तरी आश्चर्य वाटले नसते अशी टीका मराठासेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रांताध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी केली.
कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ
कॉंग्रेस भवन येथे आयोजित बहुजन जागृती मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी शांताराम कुंजीर, बाळासाहेब अमराळे,
माजी महापौर मोहनसिंग राजपाल, नगरसेवक दत्ता बहिरट, संगीता तिवारी, सचिन तावरे, अजय दरेकर,भीम आर्मीचे
दत्ता पोळ, प्रकाश भालेराव, सागर आल्हाट, सोनाली मारणे, डॉ. सुनीता मोरे, प्रभाकर दुर्गे, सचिन आडेकर, भोला
वांजळे, रमेश हांडे, विशाल तुळवे, अजयसिंह सावंत, हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, प्राची दुधाने, श्री वाघमारे आदी
यावेळी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, मेक इन इंडियाचा खरा प्रयोग स्व. पं. जवाहरलाल नेहरूंनी केला. मोदी, कॉंग्रेसने ७० वर्षात काय
केलं विचारतात. परंतु कॉंग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. एक राज्यघटना आणि लोकशाही दिली. म्हणूनच एक
चहा विकणारा पंतप्रधान झाला. मोदी काँग्रेसमुळे पंतप्रधान झाले त्यामुळे मोदींनी कॉंग्रेसचे उपकार विसरू नये असा
उपरोधिक टोला त्यांनी लगावला. देशात ५२५ संस्थानिक होते. त्यांना एकत्र करून कॉंग्रेसने भारत देश बनवला. राजीव
गांधींमुळे टेलिकॉम क्रांती झाली. त्याच्यानंतर मोबाईल क्रांती झाली. धर्मनिरपेक्ष राज्य कॉंग्रेसने दिले. तुम्ही काय दिले?
असा सवाल त्यांनी मोदींना केला.
१९९१ साली पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग अर्थमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी खाजगीकरण, उदारीकरण आणि
जागतिकीकरण यावर सह्या केल्या. त्यावेळी बरोबर ६ डिसेंबरला बाबरी मस्जीद पाडली गेली. या देशात विकासाची
गंगा वाहणार होती त्याचवेळी बरोबर १९९३ ला मुंबईत दंगली घडवल्या गेल्या. त्यामुळे १९९२-९३ च्या काळात
भारताची जगात प्रतिमा जातीयवादी, दंगली करणारा देश अशी झाली असे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीतल्या दिग्गज नेत्यांची मुले भाजपमध्ये गेले आहेत. भाजप हा पक्ष नाही तर तो आरएसएसचा चेहरा
आहे. आरएसएस या भाजपच्या मातृ संघटनेला तिरंगा, देशाची घटना व लोकशाही मान्य नाही. हे त्या पक्षात
जाणाऱ्यांना मान्य आहे का असा सवाल त्यांनी केला. मोदींना पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी जनतेच्या मनात
उत्सुकता निर्माण केली गेली. मात्र, त्यावेळी राम मंदिर, समान नागरी कायदा, ३७० वे कलम याबाबत जी
आश्वासने दिली होती ती कुठे गेली? छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक होणार होते त्याचे
काय झाले?, धनगर, मुस्लीम आरक्षण, मराठा समाजाच्या आरक्षणाचे काय झाले? असा सवाल त्यांनी केला.

राफेल विमानाच्या खरेदीमध्ये ३० हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. हा देशातील सर्वात मोठा घोटाळा
झाला आहे. कॉंग्रेसच्या काळात घोटाळ्यांचे आरोप झाल्यानंतर कॉंग्रेसनेच चौकशीसाठी कारवाई केली. परंतु
सर्व निर्दोष सुटले. त्यामुळे मोदी यांची ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ ही घोषणा केवळ खोटी ठरली आहे अशी
टीकाही त्यांनी केली.
शांताराम कुंजीर म्हणाले, मराठा समाजाचे राज्यात शांततेत ५८ मोर्चे निघाले. या सरकारने मागण्यांबाबत
केवळ आश्वासने दिली. आता आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात नेवून ठेवला आहे. सारथी योजना जाहीर
केली त्याबाबत कुठलीही अंमलबजावणी केली नाही, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज
प्रकरणे होत नाहीत, प्रत्येक जिल्ह्यात एक वसतिगृह करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात जी चार
अगोदरचीच वसतिगृह होती त्याला फक्त रंगरंगोटी करून मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली.
समाजात तेढ निर्माण करायची असे करून लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे या
नाकर्त्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व
मित्रपक्षांच्या उमेदवारांमागे उभे राहणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.
संगीता तिवारी म्हणाल्या, गेल्या पाच वर्षात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
लहान मुलींवर होणाऱ्या बलात्कार वाढले आहेत. त्याबाबत काहीही न करता मोदी सरकार केवळ ‘बेटी
बचाव बेटी पढाव’ची घोषणा करते. भाजपच्या मंत्र्यांचे महिलांबाबतचे वक्तव्य आणि कृती पहिली तर ‘
बेटी भगाव’ हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे की काय असे वाटते. मोदी सरकारने गृहिणींनी घरामध्ये बचत करून
साठवलेल्या पैशावर डल्ला मारला. त्यांना बँकेत पैसे भरायला लावले तो पैसा काळा केला असा आरोप
त्यांनी केला.
सचिन तावरे म्हणाले, मी कॉंग्रेस पक्षात काही मिळवायला आलेलो नाही तर इतिहास घडवायला आलो
आहे. ही निवडणूक दोन विचारांची आहे. एका बाजूला असभ्यता, अश्लीलता तर दुसऱ्या बाजूला सभ्यता,
सुसंस्कृत, महिलांचा कायम आदर करणारा माणूस आहे. देठ हिरवा..म्हणणारा, तूरडाळीचा भ्रष्टाचार
करणारा अशा या हिरव्या देठाला जमिनीत गाडावे असे तावरे यांनी आवाहन केले.
यावेळी प्रकाश भालेराव, सागर आल्हाट, डॉ. सुनीता मोरे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन शांताराम
कुंजीर यांनी केले आभार सचिन आडेकर यांनी मानले

 

भाजपचा विकासाचा विचार फक्त बड्या उद्योगपतींसाठी-खासदार कुमार केतकर

पुणे- यंदाची निवडणूक ही केवळ दोन उमेदवार किंवा दोन पक्षातील नसून दोन
विचार धारेतल्या विकासाच्या मूलभूत धोरणांमधली लढाई आहे. कॉँग्रेसच्या
विकासाच्या धोरणामध्ये धरणे, आयआयटी यांसारख्या मुद्यांना महत्व आहेच
परंतु त्याबरोबरच सामाजिक न्याय, मानवी विकास दर यालाही तितकेच महत्व
आहे. त्यामुळे कोंग्रेसचा विकासाचा विचार आणि भाजपचा विकासाचा विचार
यामध्ये फार फरक असून भाजपचा विकासाचा विचार हा फक्त बड्या
उद्योगपतींसाठी आहे अशी टीका खासदार कुमार केतकर यांनी केली.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघाचे
उमेदवार मोहन जोशी व बारामती मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या
प्रचारार्थ आयोजित डॉक्टरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार वंदना
चव्हाण, आमदार शरद रणपिसे, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार, ऍड. अभय
छाजेड, डॉ. नरेंद्र काळे, डॉ. मनोज राका, डॉ रविंद्रकुमार काटकर, डॉ. तोडकर,
डॉ. सुनील जगताप, डॉ. शिवदिप ऊंद्रे, डॉ. सुनीता मोरे डॉ. संभाजी करांडे
पाटील, डॉ. मंगेश वाघ, डॉ. गजानन पाटील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
केतकर म्हणाले, पंडित नेहरूंच्या काळात महामार्ग झाले. राजीव गांधीच्या
काळात नवीन तंत्रज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि टेलिफोन या क्षेत्रात क्रांती
झाली. त्यावेळी देशातील उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांनी देशात
मोर्चे काढले. कॉंग्रेसने या क्षेत्रात प्रगती केल्यामुळे आज अडीच कोटी भारतीय
इतर देशात चांगल्या पदांवर नोकर्‍या करत आहेत. त्यातून त्यांना आर्थिक
सुबत्ता आली आहे. असे असतानाही हा वर्ग नेहेमी कॉँग्रेसच्या विरोधात गरळ
ओकत असतो. साधारण सन 2000 च्या काळात परदेशात गेलेल्या आणि
आर्थिक सुबत्ता मिळवलेल्या अनिवासी भारतीयांचे नातेवाईक किंवा आईवडील
तिकडे जातात तेव्हाही ते त्यांच्याजवळ तसेच बोलतात आणि ते भारतता
आल्यावर त्यांच्यासारखे कॉंग्रेसबाबत तसेच बोलायला लागतात. कॉंग्रेसने त्यांचे

काय नुकसान केले आहे? असा प्रश्न उपस्थित करत केतकर म्हणाले, ही सर्व
अनिवासी मंडळी कश्मीर प्रश्न, हिंदुत्व आणि अयोध्या याबाबतच बोलतात.
त्यांची आर्थि भौतिक प्रगती कोणाच्या काळात झाली हे ते विसरतात. त्यांचे हे
राजकीय आणि संस्कृतिक अज्ञान आहे. प्रचार हा अज्ञानाचा कसा होवू शकतो हे
अनिवासी भारतीयांकडे दिसते अशी टीका त्यांनी केली. ते उदारमतवाद, देशाची
प्रगती काशी झाली, देशाच्या भूतकाळ आणि वर्तमानकाळाबद्दल बोलला तयार
नाहीत. हे बेशरम आणि कृतघ्नपणाचे लक्षण आहे असे ते म्हणाले.
१९९९ ते २००० याकाळात देशातील मध्यंवर्गीयांची आर्थिक सुबत्ता कॉँग्रेसच्या
धोरणांमुळे वाढली. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी
अमेरिकेत पाठवले. त्यांना शिक्षण घेवून मोठी पदे मिळाली. त्यातून त्यांची
आर्थिक सुबत्ता वाढत गेली. त्यांची सुबत्ता वाढत असताना इथेही ती वाढत होती.
तेव्हा विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा, आर्थिक स्फोट झाला. मध्यमवर्गातील लोक
नवमध्यम वर्गात गेली. गरीब मध्यमवर्गात गेले आणि तेव्हापासून कॉंग्रेसचा
ह्रास सुरू झाला असे सांगून केतकर म्हणाले, या वर्गाला राहुल गांधींनी जाहीर
केलेल्या न्याय योजनेमुळे आपली आर्थिक सुबत्ता जाणार अशी वाटते.त्यामुळे
हिंदुत्वाच्या, काश्मीरच्या आणि अयोध्येच्या मुद्द्याचे आपल्या आर्थिक सुबत्तेला
कूपन घालण्याचे धोरण या माध्यमवर्गाचे आहे अशी टीका त्यांनी केली. जेवढी
आर्थिक सुबत्ता वाढते तेवढा धर्मवाद वाढत जातो, खोटा राष्ट्रवाद, खोटे
धर्मवादाचे कुंपण स्वत: भोवती ही मंडळी घालून घेतात कारण त्यांना आपण
पुन्हा दारिद्र्य रेषेखाली जातो की काय अशी भीती त्यांना वाटते. देशातील सर्व
प्रश्न सुटले असे कॉंग्रेसने कधीच म्हटले नाही. आपल्यायला यापुढे आणखी
कायकरायचे अशीच भाषा कॉँग्रेसच्या पंतप्रधंनांची असायची. त्यामुळे यंदाची
निवडणूक ही केवळ दोन उमेदवार किंवा दोन पक्षातील नसून दोन विचार
धारेतल्या विकासाच्या मूलभूत धोरणांमधली लढाई आहे याचा विचार करून
कॉंग्रेस –राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे रहा असे आवाहन
त्यांनी केले.

पुणे शहर कॉंग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. रवींद्रकुमार काटकर यांनी प्रास्ताविक
करताना डॉक्टर व्यवसाय समोरील असणारी आव्हाने, डॉक्टरांची असणारी
असुरक्षितता, बोगस डॉक्टरांवर न होणारी कारवाई, डॉक्टर पेशंट संबंध
सुधारण्यासाठी काय पवले उचलता येतील याबद्दल आपले मत व्यक्त केले.
डॉ. सुनील जगताप म्हणाले, राज ठाकरे यांच्यावर त्यांना बारामती वरून स्क्रिप्ट
येते अशी टीका केली जाते. परंतु त्यांनी जे व्हिडीओ दाखवले ते चुकीचे
आहेत, हे सोशल मीडियावर कुठेच आले नाही. मार्डच्या डॉक्टरांनी स्टायपेंड,
हॉस्टेल संदर्भात संप केला. तेव्हा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि आरोग्य
मंत्र्यांनी त्यांचे प्रश्न समजावून घेण्यापेक्षा त्यांना कमी करू, कारवाई करण्याच्या
दम दिला. डॉक्टरांना या सरकारच्या काळात अत्यंत त्रास झाला आहे. त्यामुळे हे
सरकार सत्तेवरून घालवावे लागेल. नाहीतर आपल्याला प्रॅक्टिस करणे अवघड
होईल. हॉस्पिटलसाथी त्यांनी क्लिष्ट नियम आणलेत ते शक्य नाही त्यामुळे
सरकार बदलणे आवश्यक आहे असे ते म्हणले.
डॉ. नरेंद्र काळे म्हणाले, डॉ. मनोज राका, डॉ. रवींद्र काटकर, डॉ. सुनीता
मोरे,डॉ. सतीश देसाई इत्यादी यांनी मोदी सरकारच्या आणि युतीच्या काळात
वैद्यकीय क्षेत्राबद्दलची असंवेदनशीलता याबाबत नाराजी विकत करत
आघाडीच्या उमेदवारांच्या मागे उभे उभे राहण्याचे आवाहन केले. ऍड. अभय
छाजेड यांचीही यावेळी भाषणे झाली.
सूत्रसंचालन संभाजी करांडे पाटील यांनी केले तर आभार डॉ. मंगेश वाघ, डॉ.
गजानन पाटील यांनी मानले.

मोदी सरकार महिलांविरोधीच – खा. वंदना चव्हाण

पुणे – मोदी सरकार महिलांच्या बाबतीत असंवेदनशील असल्यामुळे गेल्या पाच
वर्षात या सरकारने महिलाविरोधी धोरणेच राबविली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या
खासदार वंदना चव्हाण यांनी केला आहे. पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस
व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित
करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला
आघाडीच्या अध्यक्षा फौजिया खान, आमदार विद्या चव्हाण, उषाताई दराडे, प्रदेश काँग्रेसच्या
सदस्य शानी नौशाद, काँग्रेस नगरसेविका सुजाता शेट्टी आदी उपस्थित होत्या.
२०१४ साली सत्तेवर येण्यापूर्वी मोदी सरकारने महिलांच्याबाबतीत ज्या वल्गना
केल्या होत्या त्यापैकी एकाही चांगल्या धोरणाची अंमलबजावणी मोदी सरकारने केली नाही उलट
युपीए सरकारच्या काळात महिलांच्या बाबतीत ज्या काही चांगल्या योजना होत्या त्या गुंडाळण्यात
आल्या असे त्यांनी सांगितले. मोदी सरकारने ‘बेटी बचाव, बेटी पढाव’अशी फक्त घोषणा केली
मात्र त्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत असे त्या म्हणाल्या. युपीए सरकारने युवतींच्या
कल्याणकारी योजनांसाठी ‘निर्भया फंड’अंतर्गत ३६०० कोटींचा निधी जमा केला होता मात्र मोदी
सरकारच्या काळात त्यातील २१०० कोटी निधी अन्यत्र वळविण्यात आला यावरून महिलांच्या
कल्याणाची मोदी सरकारला किती काळजी आहे याची कल्पना येते. युपीए सरकारने खास
महिलांसाठी भारतीय महिला बँक स्थापन केली होती मात्र मोदी सरकारने ती बँक अन्य बँकेत
विलीन करून टाकली. तसेच मुलींवरील बलात्कार प्रकरणासंबधी चुकीच्या पद्धतीने कायद्याची
अम्म्मलबजावणी केली. महिलांच्या प्रसूतीकाळातील रजा १२ आठवड्यावरून २६ आठवडे केली
खरी मात्र त्यामुळे असंख्य महिलांच्या नोकऱ्यांवर गदा आली ही वस्तुस्थिती आहे असे त्यांनी
सांगितले. मोदी सरकारच्या राजवटीत अंगणसेवीकांच्या मानधनात किरकोळ वाढ करण्यात आली
मात्र त्यांच्या इतर न्याय्य मागण्या अमान्य केल्या त्यामुळे त्याचा अंगणवाडी सेविकांना फार
मोठा फटका बसला. श्री शरद पवार यांनी महाराष्ट्रात प्रॉपर्टीमध्ये महिलांना समान हक्क देण्याचा
कायदा केला मात्र तो देशभर व्हावा अशी आमची मागणी मात्र मोदी सरकारने फेटाळून लावली
असे खा. चव्हाण यांनी सांगितले.
मोदी सरकारने पर्यावरणवादी धोरणांना हरताळ फासून अनेक पर्यावरणविरोधी धोरणांची
अम्मलबजावणी केली असा आरोप करून खा. चव्हाण म्हणाल्या, यासाठी मोदी सरकारच्या
काळात अनेक चांगले कायदे बदलण्यात आले. बुलेट ट्रेन होण्यासाठी ७३ हजार झाडे कापण्यात
येणार आहेत अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा फौजिया खान यांनीही यावेळी मोदी
सरकारवर कडाडून टीका करताना महिलांच्या बाबतीत भाजप नेत्यांनी अतिशय निरर्गल विधाने
केली आहेत त्यावरून महिलांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो. तसेच बलात्कारी
प्रकरणातील बाबांना वाचविण्यासाठी भाजपचे मंत्री पुढे येतात यावरून त्यांची 'संस्कृती' दिसून येते
असेहि त्यांनी सांगितले. महिलांच्या कल्याणासाठी काँग्रेस आघाडी सरकारने महाराष्ट्रात डान्स
बारवर बंदी घातली मात्र भाजप सरकारने ही बंदी उठविली असे सांगताना त्या म्हणाल्या हा
अतिशय वेदनादायी गोष्ट आहे.

‘काँग्रेस आघाडीच्या बारामती मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासंबधी
विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खा. वंदना चव्हाण म्हणाल्या, सुप्रिया सुळे या
अतिशय कार्यक्षम प्रतिनिधी आहेत म्हणूनच त्यांना ‘संसद-रत्न’ पुरस्कार मिळाला. त्यांनी ‘ब्ल्यू
फिल्म’वर बंदी आणण्यासाठी संसदेत प्रयत्न केले मात्र पुणे लोकसभा मतदार संघातील भाजपचे
उमेदवार यांनी जाहीर सभेत बोलताना, तुम्हीही ‘ब्ल्यू फिल्म’ पहा मीही पाहतो असे सांगून
आपल्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले. महिलांच्याकडे पाहण्याचा काँग्रेस आणि भाजपमध्ये हा फरक
आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

अर्जुन परदेशी, सक्षम भन्साळी, रिशीता पाटील, मृणाल शेळके यांची विजयी सलामी

0
पुणे- पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने तर्फे 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात अर्जुन परदेशी, सक्षम भन्साळी, अथर्व जोशी, जयदीप तावरे यांनी, तर मुलींच्या गटात रिशीता पाटील, मृणाल शेळके, ध्रुवी आद्यथाया या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. 
 
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ लॉन टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलींच्या गटात रिशीता पाटील हिने प्रेक्षा प्रांजलवर टायब्रेकमध्ये 6-5(3) असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. मृणाल शेळके व ध्रुवी आद्यथाया यांनी अनुक्रमे सारा हंदलगावकर व आरना लोढा यांचा 6-2 अशा सारख्याच फरकाने पराभव करून दुसरी फेरी गाठली. 
 
मुलांच्या गटात सक्षम भन्साळी याने निनाद पाटीलचा 6-1, असा तर अथर्व जोशीने तेज ओकचा 6-4 असा पराभव करून आगेकूच केली. 

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 12 वर्षाखालील मुले:
अवनीश गवळी वि.वि.मिहीर केळकर 6-3;
राज पारडा वि.वि.आरव गुप्ता 6-5(1);
अर्जुन परदेशी वि.वि.कपिल गढीयार 6-1;
अथर्व जोशी वि.वि.तेज ओक 6-4;
अनिकेत रॉय वि.वि.शुभांकर सिन्हा 6-1;
सक्षम भन्साळी वि.वि.निनाद पाटील 6-1;
जयदीप तावरे वि.वि.ईशान कदम 6-1;
वैष्णव रानवडे वि.वि.अनुज भागवत 6-1;
 
12 वर्षाखालील मुली:
मृणाल शेळके वि.वि.सारा हंदलगावकर 6-2;
रिशीता पाटील वि.वि.प्रेक्षा प्रांजल 6-5(3);
स्वरा कोल्हे वि.वि.आर्या बोराडे 6-0;
ध्रुवी आद्यथाया वि.वि.आरना लोढा 6-2.

पुन्हा निवडून दिले तर मोदी, शहा हुकुमशहा होतील- सुशिलकुमार शिंदे

पुणे -साध्वी व साधुला निवडणूकीत उतरवून भाजप देश भगवा करण्याची तयारी करीत आहे.
त्यांना आताच रोखले पाहिजे. अन्यथा देशाचे वाटोळे होईल. या निवडणूकीत भाजपचा विजय
झाल्यास मोदी, शहा हुकुमशाह होतील. अशी टिका माजी केद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी
केली. महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ भवानी
पेठेत संविधान बचाव निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिंदे बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आमदार शरद
रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, उमेदवार मोहन जोशी, महापालिकेतील गटनेते अरविंद
शिंदे, नगरसेवक आविनाश बागवे, माजी महापौर रंजनी ञिभुवन, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहूल
डंबाळे, रिपब्लिकन पक्ष कवाडे गटाचे प्रकाश भालेराव, नगरसेविका लता राजगुरु, महेश शिंदे, गौतम
आर्केडे, सुशिल यादव, जमशेद शेख, हनुमंतराव गायकवाड, राहूल तायडे, पोपटराव गायकवाड
उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, एकीमुळे आपला पुण्यात विजय होईल. साठ महिन्यात भारत बदण्याची
भाषा करणाऱ्या मोदींनी देशाची वाट लावली. ते देश तोडण्याचे काम करीत आहेत. काँग्रेसने
धर्मनिरपेक्षेतेने देश चालविला. भाजप द्वेषाचे राजकारण करीत आहेत. ज्यांनी ग्रोद्रा हत्यकांडात
मोदींनी वाचविले. त्या आडवाणीला उमेदवारीही दिली नाही. त्यांचा वारंवार अपमान केला. ज्या
डाॕ. बाबासाहेबानी धर्मनिरपक्षेतेचा संदेश दिला. त्याचे नातु आज जातीवादी संघटनेला सोबत घेऊन
भाजपला मदत करीत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.
मोहन जीशी म्हणाले, ही निवडणूक ऐतिहासिक आहे. या निवडणूकीतून लोकशाही वाचवायची
आहे. संविधानाने या देशाला मजबूत लोकशाही दिली. त्यास भाजपवाले सुरुंग लावण्याचा प्रयत्न
करीत आहेत. दलितांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना भाजपला धडा शिकविला पाहिजे.
मतदारांची शक्ती माझ्या पाठिंशी आहे. निवडून आल्यावर दलित, मुस्लिम बांधवावर दाखल
करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेईन. शहराच्या विकासात गिरीश बापट स्पिड ब्रेकर बनले
आहेत.
रमेश बागवे म्हणाले, ही निवडून लोकसभेची नाही, तर संविधान सुरक्षित करण्याची आहे.
मतदारांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे महाआघाडीच्या उमेवाराचा विजय निश्चित
आहे. काँग्रेसच्याच हातात देश सुरक्षित असल्याची भावना लोकांत जागृत झाली आहे. त्यामुळे या
निवडणुकीत लोक भाजपाला घरी बसवतील.
शरद रणपिसे म्हणाले, देशाचे भवितव्य निवडणूकीवर अवलंबून आहे. डाॕ. आंबेडकरांनी तयार
केलेल्या संविधानालाच भाजपने आव्हान दिले आहे. लोकशाही टिकविण्यासाठी आपल्याला भाजपाला

घरी बसविले पाहिजे. संस्थांत भांडणे लावली. अर्थव्यवस्था उध्वस्त केली. प्रत्येक क्षेत्रात मोंदी
हस्तक्षेप करीत आहेत.
अरविंद शिदे म्हणाले, भाजप जात, धर्माच्या नावाने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन
प्रचार करीत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातही दलितांवर अन्याय झाला. भाजपने धर्माधर्मात
भांडणे लावण्याचे काम केले. गिरीश बापटांनी दलताविषयी राजकारण केले.
राहुल डंबाळे, करण मकवानी, गौतम आर्केडे, आविनश बागवे, महेश शिंदे यांनी भाषणे केली.

16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत संजीवनी कुतवळ, सोनल पाटील, जिया परेरा यांची आगेकूच

0
पाचगणी- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत  संजीवनी कुतवळ, सोनल पाटील, जिया परेरा या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात  फेरीत प्रवेश केला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 16 वर्षाखालील मुलींच्या गटात सोनल पाटील हिने रिशीता अगरवालचा 9-1 असा तर, संजीवनी कुतवळने वेदिका माळीचा 9-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली. हरश्री आशेर हिने सैशा कारेकरचा 9-7 असा संघर्षपूर्ण पराभव केला. कनिष्का मल्लेला(कर्नाटक)वि.वि.श्रुती नानजकर(महाराष्ट्र) 9-0. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: 16 वर्षाखालील मुली:
कुंडली माजगैने (महाराष्ट्र)वि.वि.मधुरिमा सावंत(महाराष्ट्र) 9-3;
मिली चुग(महाराष्ट्र)वि.वि.मोहिनी घुले(महाराष्ट्र) 9-3;
वृशिष्ट कुमार(महाराष्ट्र) वि.वि.गौरी माणगावकर(महाराष्ट्र) 9-6;
हरश्री आशेर(महाराष्ट्र)वि.वि.सैशा कारेकर(महाराष्ट्र) 9-7;
नागा रोशनी अरुणकुमार(तामिळनाडू) वि.वि. प्राप्ती पाटील(महाराष्ट्र) 9-5;
संजीवनी कुतवळ(महाराष्ट्र)वि.वि.वेदिका माळी(महाराष्ट्र) 9-0;
गार्गी शहा(महाराष्ट्र)वि.वि.लोलाक्षी कांकरिया(महाराष्ट्र) 9-6;
सोनल पाटील(महाराष्ट्र)वि.वि.रिशीता अगरवाल(महाराष्ट्र)9-1;
जिया परेरा(महाराष्ट्र)वि.वि.सानिया मोरे(महाराष्ट्र)9-6;
कनिष्का मल्लेला(कर्नाटक)वि.वि.श्रुती नानजकर(महाराष्ट्र) 9-0. 

पुणेकरांना दर पाच मिनिटाला बस मिळेल -बापट

पुणे-पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात ५०० ई-बसेस आणि ८४० सीएनजी बसेसची खरेदी करण्याची प्रकि‘या सुरू झाली आहे. या वर्षी ऑगस्ट  पर्यंत पीएमपीएमएलच्या ताफ्यात पुरेशा बसेस उपलब्ध होतील. त्यामुळे प्रमुख रस्त्ययांवर पुणेकरांना दर पाच मिनिटाला बस उपलब्ध होऊ शकेल असा विश्‍वास पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
वडगाव-शेरी विधानसभा मतदारसंघातील मांजरी, वडगाव शिंदे आणि निरगुडी या ग‘ामीण भागात  बापट यांच्या प्रचारार्थ प्रचार ङ्गेरी काढण्यात आली होती. आमदार जगदीश मुळीक, संतोष खांदवे, सुनील खांदवे, हेमलता शिंदे, वैभव शिंदे, रोहिदास उंद्रे, दादा सातव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
श्री. बापट पुढे म्हणाले, ‘पीएमपीच्या ताफ्यात दरवर्षी स्कॅप होणार्‍या बसेसच्या तुलनेत नव्याने दाखल होणार्‍या बसेसचे प्रमाण अत्यल्प होते. २०१३ ते २०१७ कॉंग‘ेस पक्षाच्या उदासिनतेमुळे केवळ १२ नव्या बसेसची खरेदी करण्यात आली होती. भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर एका वर्षांत बसेस खरेदीची प्रकि‘या सुरू झाली. २६ जानेवारीला २५ ई-बसेस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या. या महिन्या अखेर १२५ बीआरटी, जुलैमध्ये ४०० सीएनजी आणि सप्टेंबर २०१९ मध्ये सीएनजी तत्त्वावरील ४४० सीएनजी भाडेतत्त्वावरील सीएनजी बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे या वर्षी ऑगस्टपर्यंत दर पाच मिनिटांत बस उपलब्ध होऊ शकेल.’ 
श्री. बापट पुढे म्हणाले, ‘महिलांसाठी खास तेजस्विनी बससेवा सुरू केली आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नवीन येणार्‍या बसेस एससी असल्याने आरामदायक आहेत. तसेच त्या पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. पुणेकरांना सक्षम, सुरक्षित, सुलभ व जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बसेस खरेदीसाठी आवश्यक असणारा केंद्र व राज्य शासनाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’

विरोधकांकडे प्रचारांचे मुद्देच नाहीत- उज्ज्वल केसकर

0
पुणे-महायुतीचे कार्यकर्ते आक‘मक व सकारात्मक पद्धतीने सरकारने केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहाचवत आहेत. या उलट विरोधी पक्षांकडे प्रचारांचे मुद्दे नसल्याने सत्ताधारी महायुतीला घेरण्यात त्यांना अपयश आले असून महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांचा विक‘मी मताने विजय होईल असा विश्‍वास शहर भाजपचे सरचिटणीस उज्ज्वल केसकर यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. केसकर बोलत होते. शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र शिंदे, आरपीआयचे (ए) प्रसिद्धी प्रमुख ऍड. मंदार जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुण्याच्या स्थानिक प्रश्‍नांविषयी बोलताना केसकर यांनी काही गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला. केसकर म्हणाले, ‘पुण्याच्या मेट्रोविषयी भाजपच्या केंद्र, राज्य व मनपा प्रशासनाने उचललेली सकारात्मक पावले आणि त्यामुळे पुणे मेट्रोच्या कामामध्ये झालेली लक्षणीय प्रगती, समान पाणीपुरवठा योजना, रिंगरोडच्या कामात झालेली प्रगती, ई बसेसची खरेदी पीएमआरडीएच्या माध्यमातून झालेली प्रगती, मुळा-मुठा नदी शुद्धीकरण ही विकासकामे वेगात सुरू असल्याने विरोधक भांबावून गेले आहेत. त्यामुळे विरोधक वैयक्तिक स्तरावर चर्चा करीत आहेत.’

रिक्षाचालकांसाठी आवश्यक उपाययोजना करणार-बापट

पुणे-प्रवाशांना मीटर सेवा देण्यासाठी शासनाकडून रिक्षा ऍप सुरू करणे, रिक्षाचालकांच्या कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी, चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली रिक्षांची कर्जमाफी , स्मार्ट सिटीत रिक्षाला सहभागी करून अत्याधुनिक प्रिपेड थांबे, आणि रिक्षाचा विमा हप्ता कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिली.
पुणे शहर ऑटो चालक मालक कृती समितीच्य वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात श्री. बापट बोलत होते. अशोक येनपुरे, राजश्री शिळीमकर, डॉ. भरत वैरागे, बाबा शिंदे, एकनाथ ढोले, बाबा कांबळे, बाप्पू भावे, दत्ता पाटील, चंद्रकांत गोडबोले, बादशहा सय्यद, सुरेश जगताप, अनिल यादव, अरविंद गाडे, ठकसेन पोरे, अरुण थोपटे, अशोक साळेकर, जीवन धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
बापट पुढे म्हणाले, ‘शहरात सुमारे दीड लाख कुटुंबे रिक्षा व्यवसायावर अवलंबून आहेत. या कुटुंबांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. रिक्षाचालकांचे अनेक प्रश्‍न मी मार्गी लावले आहेत. भविष्यात प्रलंबित प्रश्‍न सोडविणार आहे. रिक्षाचालकांना समाजाम मानसन्मान मिळवून दिला आहे. त्यामुळे शहरातील रिक्षा व्यावसायिक महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा ठाम विश्‍वास आहे.
ऍम्युनिशन फॅॅक्टरीच्या कामगारांना भेट
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी आज सकाळी ऍम्युनिशन ङ्गॅक्टरीच्या कामगांराच्या भेटी घेतल्या. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने पुणे शहराचे महत्त्व वेगळे आहे. ते जपण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्‍वासन श्री. बापट यांनी यावेळी दिले. देशाच्या सिमेवर लढणार्‍या जवाना इतकेच मोलाचे काम ऍम्युनिशन फॅॅक्टरीचे कामगार करीत असल्याच्या भावना बापट यांनी व्यक्त केल्या.
दत्ता खाडे, परशुराम वाडेकर, प्रशांत बधे, चिंतन शहा, शाम काची अमर देशपांडे मुकेश गवळी कमलेश पांगुवाले, अजित पवार, किरण वायलारकर, संतोष गव्हाणे, यश सुर्ती, चेतन सत्तूर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
वाणी समाजाचा पाठिंबा
अखिल लाडशाखीय वाणी समाजाने पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांना जाहीर पाठींबा दिला.  बापट यांच्या समर्थनार्थ कोथरूड येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. वाणी समाज सुशिक्षित व सुसंस्कृत आहे. हा समाज कायमच महायुतीच्या पाठीमागे उभा राहीला. मी समाजा प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. पुणे शहराच्या गतीमान विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. नगरसेवक दीपक पोटे, कैलास वाणी, शाम शेंडे, डॉ. जगदीश चिंचोरे, अनिल चितोडकर, विवेक शिरोडे यावेळी उपस्थित होते.