Home Blog Page 2947

पुण्यात ५२, बारामतीत ६१ टक्के

0

पुणे-चुरसीची लढत असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला असून, पुण्यात अंदाजे ५२ टक्के मतदान झाले. तर बारामतीमध्ये अंदाजे ६१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे. पुण्यात मतदारांनी फारसा उत्साह न दाखविल्याने आणि उन्हाचा तडाखा बसल्याने त्याचा परिणाम मतदानावर झाला. गेल्या निवडणुकीपेक्षा पुण्यात दोन टक्के कमी मतदान झाले आहे. याउलट बारामतीमध्ये मतदारांनी दाखविलेल्या उत्साहामुळे सुमारे दोन टक्के मतदान वाढले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या २० लाख ७४ हजार ८६१ आहे. त्यापैकी सुमारे ५२ टक्के मतदारांनी मतदान केले. गेल्या निवडणुकीत पुण्यामध्ये नऊ लाख ९३ हजार २७८ मतदारांनी मतदान केल्यामुळे मतदानाची सरासरी ५४.२४ टक्के झाली होती. यंदा हे प्रमाण कमी झाल्याने जेमतेम ५२ टक्क्यांपर्यंत मतदान होऊ शकले. कमी झालेल्या या मतदानाचा फटका कोणाला बसणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

बारामतीमध्ये २१ लाख १२ हजार ४०८ मतदारांपैकी सुमारे ६१ टक्के… मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत बारामतीत मतदानासाठी उत्साह होता. त्यामुळे सुमारे ६१ टक्के मतदान झाले असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

पुण्यात निरुत्साह

पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४ मध्ये ५४.२४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात सकाळी सात ते नऊ या पहिल्या दोन तासांमध्ये मतदानाचे प्रमाण कमी होते. पुण्यात अवघे ८.७१ टक्के मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. नऊनंतर दुपारी एक वाजेपर्यंत परिस्थितीत फारसा बदल झाला नव्हता. मतदानाचे प्रमाण सुमारे १२.६६ टक्के होते. दुपारी अकरा ते एक या कालावधी मतदानाचा टक्का वाढला. हे प्रमाण सुमारे २२.५८ पर्यंत गेले. दुपारी एक ते तीन या वेळेत मतदानाची सरासरी कमी होती. त्या वेळी पुण्यात निम्म्या मतदारांनीही मतदान केले नव्हते. जेमतेम ३३ टक्के मतदारांनी मतदान केले होते. सायंकाळी चारनंतर मतदानासाठी गर्दी होऊ लागली.

बारामतीत उत्साह

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या वर्षी ५९.४१ टक्के मतदान झाले होते. बारामतीत यंदा सकाळी सात ते नऊ या कालावधीत अवघे सहा टक्के मतदान झाले होते. त्यानंतर अकरा वाजेपर्यंत हे प्रमाण १७.४६ टक्क्यांवर पोहोचले. दुपारी एकनंतर तीन वाजेपर्यंत बारामतीतील मतदानाची संख्या वाढू लागली. बारामतीमध्येही ऊन कमी झाल्यानंतर दुपारी चारनंतर मतदानासाठी मतदार बाहेर पडले. सायंकाळी सहानंतर मतदानासाठी लागलेल्या रांगांमुळे मतांची सरासरी सुमारे ६१ टक्के झाली.

सरासरी मतदान (टक्के)

मतदार संघ २०१४ २०१९

पुणे – ५४.२४ ५२

बारामती – ५९.४१ ६१

 

मतदानाचा हक्क बजावला आम्ही …

0

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी मंगळवार दि.
२३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता ह्यूम मॅकहेनरी स्कूल (Hume McHenry School),
महावीर प्रतिष्ठान समोर, सॅलिस्बरी पार्क, पुणे येथे सहकुटूंब मतदान केले.

कसबा मतदार संघातील अहिल्यादेवी प्रशाला येथे सकाळी मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमानी

गिरिष बापट ,सौ गिरीजा गिरीश बापट,गौरव बापट,सौ स्वरदा गौरव बापट यांचा असा घेतला फ़ोटो

पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष रमेश बागवे यांनी भवानी पेठेतील गोल्डन ज्युबिली कॉलेज येथे सकाळी मतदान केले.

 

काटेवाडी येथील मतदान केंद्रात अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हाधिकारी नवलकिशोर शर्मा यांनी मतदानाचा हक्क बजावला .
अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांनी ही सकाळी च मतदान केले
पुणे महा पालिका आयुक्त सौरव राव यांनी मतदान हक्क बजावला.

सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा – खासदार संजय काकडे

0

पुणे, दि. 23 एप्रिल : भारतावर ब्रिटिशांनी 150 वर्षे राज्य केल्यानंतर आपल्या हजारो देशभक्त क्रांतिकारकांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताने संसदीय लोकशाही व्यवस्था स्वीकारताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राज्यघटनेची निमिर्ती झाली. बाबासाहेबांनी निर्मिलेल्या राज्यघटनेने जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाहीची व्यवस्था आपल्याला मिळाली.

भारतीय लोकशाहीचं अत्यंत महत्त्वपूर्ण वैशिष्ठ्य म्हणजे देशाचा सर्वसामान्य नागरिक मतदानाच्या माध्यमातून आपला लोकप्रतिनीधी निवडतो व त्यांच्यातून संपूर्ण देशाला विश्वस्त असलेले सरकार बनते. त्यामुळे मतदानाचा अधिकार हा घटनेनं आपल्याला दिलेला अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे. म्हणून सर्वांनी आवर्जून मतदान केले पाहिजे. खासदार संजय काकडे यांनी आज एसएनडीटी महाविद्यालयात पत्नी उषा काकडे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार काकडे यांनी हे मत व्यक्त केले.

देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली. आपण 17 व्या लोकसभेसाठी मतदान करतोय. मात्र, अजुनही जास्ती संख्येने भारतीय मतदार मतदान करीत नसल्याचे चित्र आहे. मतदानाची टक्केवारी वाढत नाही. हे चित्र बदलायला पाहिजे. वैयक्तिक किंवा आरोग्याच्या कारणास्तव सर्वांनाच मतदान करणे शक्य नसेलही परंतु, इतरांनी मतदानाचा हक्क बजावल्यास 99 टक्के मतदान होऊ शकते. ज्यावेळी 99 टक्के मतदान होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाही मजबूत होईल आणि स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद आपण उपभोगू. मतदानासाठी सर्वांनी जावं आणि आपला मूलभूत अधिकार बजवावा, असे आवाहन खासदार संजय काकडे यांनी केले आहे.

भाजप ‘नंबर वन’ बनेल!
भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांना या लोकसभा निवडणुकीत देशात व राज्यात सर्वाधिक जागा मिळतील. भाजप व माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींसाठी देशभर अनुकूल वातावरण असून भाजप हा क्रमांक एकचा पक्ष बनेल, असा विश्वास खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केला.

राष्ट्रीय गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या आर्यमान सिंगची लक्षवेधी कामगिरी

0

पुणे: इंडियन गोल्फ यांच्या मान्यतेखाली आयकॉनिक पूना क्लब गोल्फ कोर्स येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय गोल्फ स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्यमान सिंग याने तिसरा क्रमांक पटकावत लक्षवेधी कामगिरी केली.

प्रतिष्ठित अशा कुमार मुलांच्या गटात देशभरातून विविध वयोगटातून अव्वल कुमार गोल्फपटूंनी आपला सहभाग नोंदविला होता. तत्पूर्वी आर्यमान याने मुलांच्या क गटात दुसऱ्या क्रमांकासाठी जबरदस्त चुरस दिली होती, परंतु अखेर त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या 9 होलच्या फेरीत सर्वात कमी दोषांकांसह ही फेरी पूर्ण करताना सर्व गटांमधील सर्वोत्तम कामगिरीची त्याने नोंद  केली. या लक्षवेधी कामगिरीमुळे पदकाच्या शर्यतीत आर्यमानने तिसरा क्रमांक पटकावला असून पदकाचा मानकरी ठरलेला आर्यमान हा महाराष्ट्राचा सर्व गटांमधील एकमेव स्पर्धक ठरला आहे.

योग्य मतदान होण्यासाठी मतदारांनी जागरूक राहण्याचे काँग्रेसचे आवाहन

0

पुणे —- पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमध्ये यंदा ईव्हीएम मशीन आणि
व्हीव्ही पॅट यांचा वापर होत असून मतदाराने मतदान केल्यानंतर बटन दाबल्यानंतर व्हीव्ही पॅट
मशीनमध्ये आपण केलेले मतदान दृश्यस्वरूपात सात सेकंदापर्यंत दिसेल. प्रत्येक मतदाराने ते
पाहून खात्री करून घ्यावे मात्र आपण केलेल्या मतदानाऐवजी वेगळेच चिन्ह दिसल्यास मतदाराने
पुढीप्रमाणे कार्यवाही करावी असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाच्या नियम क्रमांक १३. ३८ (४९एमए) अनुसार संबंधित मतदाराने मतदान
केंद्राच्या खोलीबाहेर न पडता त्या मतदान केंद्राच्या खोलीतच उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यास
भेटून त्याबाबत तक्रार करावी. तक्रार नोंदणीची पद्धत पुढीलप्रमाणे आहे —-
१) रजिस्टर ऑफ व्होटर (१७/ए) नुसार अशा मतदाराला टेस्ट व्होट करण्याचा अधिकार आहे.
२) संबधित मतदान केंद्र अधिकाऱ्याकडे याबाबत तक्रार देण्याचे फॉर्म्स उपलब्ध आहेत.
३) संबधित मतदान केंद्र अधिकाऱ्याकडे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म उपलब्ध आहेत. मतदाराने सेल्फ
डिक्लेरेशन फॉर्म भरून द्यावेत. त्यानंतरच पुढील कार्यवाहीस सुरुवात होईल. (मतदार खोलीच्या
बाहेर गेल्यास त्याची तक्रार मान्य होणार नाही)
४) मतदाराला निवडणूक अधिकाऱ्याकडून जर योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर त्वरित काँग्रेस
पक्षाने स्थापन केलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा.
काँग्रेस पक्ष मतदाराच्या तक्रारीची योग्य ती दखल घेऊन पुढची कार्यवाही करेल असे
आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले आहे.

पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत श्रीवास्तन सूर्यकुमार, आकाश अहलावत, आदित्य बलसेकर यांची आगेकूच

0

मुंबई- प्रॅकटेनिस व एमएसएलटीए यांच्या संलग्नतेने आयोजित आणि आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 3000डॉलर आरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात श्रीवास्तन सूर्यकुमार, आकाश अहलावत, आदित्य बलसेकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या रत्नाकर बँक लिमिटेड(आरबीएल)यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात पहिल्या पात्रता फेरीत श्रीवास्तन सूर्यकुमारने ऋषभ गुंदेचाचा 5-7, 6-2, 11-9 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. चुरशीच्या झालेल्या लढतीत आकाश अहलावत याने मनवीर सिंग रंधावाचा 6-4, 1-6, 10-7 असा पराभव केला. स्पर्धेच्या मुख्य फेरीच्या सामन्यांना बुधवार, 24 एप्रिल रोजी प्रारंभ होणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: पुरुष गट:

धार्मिल शहा(भारत)वि.वि.संदीप कोत्तरकोंडा(भारत)6-4, 7-6(5);

प्रियांक गंगाधरण(भारत)वि.वि.सौमील साकरिया(भारत) 6-1, 6-0;

राघव जयसिंघानी(भारत)वि.वि.राऊ पारकर(भारत)6-1, 6-2;

श्रीवास्तन सूर्यकुमार(भारत)वि.वि.ऋषभ गुंदेचा(भारत) 5-7, 6-2, 11-9;

द्रोणा वालिया(भारत)वि.वि.जिनो थॉमस 6-0, 6-1;

आदित्य कोडकल्ला(भारत)वि.वि.अभिषेक कोनार(भारत)7-6(2), 6-0;

गॅरी टोकस(भारत)वि.वि.प्रशांत सावंत(भारत)6-1, 6-2;

धवल जैन(भारत)वि.वि.तुषार शर्मा(भारत)  6-1, 6-0;

आकाश अहलावत(भारत)वि.वि.मनवीर सिंग रंधावा(भारत)6-4, 1-6, 10-7;

आदित्य बलसेकर(भारत)वि.वि.क्षितिज कमल(भारत) 6-2, 6-2;

वाशू गुप्ता(भारत)वि.वि.गौतम काळे(भारत)6-0, 6-2;

रोहीन गजरी(भारत)वि.वि.रोहन तैनवाला(भारत) 6-1, 6-1.

16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मोहम्मद अलीम खान, अर्जुन प्रेमकुमार, राजेश्वर पटलोल्ला यांचे सनसनाटी विजय

0

पाचगणी: रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या मोहम्मद अलीम खान, कर्नाटकाच्या अर्जुन प्रेमकुमार, तेलंगणाच्या राजेश्वर पटलोल्ला या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 16 वर्षाखालील मुलांच्या गटात पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या कर्नाटकच्या अर्जुन प्रेमकुमार याने तिसऱ्या मानांकित गुजरातच्या हिरक व्होराचा 7-5, 6-2 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या  मोहम्मद अलीम खान याने दहाव्या मानांकित मणिपूरच्या भूषण हॊबमचा 6-4, 3-6, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव केला. तेलंगणाच्या राजेश्वर पटलोल्ला याने आसामच्या अकराव्या मानांकित आकाश देबचा 6-1, 4-6, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.

अव्वल मानांकित गुजरातच्या अर्जुन कुंडू याला महाराष्ट्राच्या प्रणव गाडगीळने कडवी झुंज दिली. अर्जुनने क्वालिफायर प्रणव गाडगीळचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(4) असा पराभव केला. महाराष्ट्राच्या जैष्णव शिंदेने आपला राज्य सहकारी नमित मिश्राचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून दुसरी फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: 16 वर्षाखालील मुले:
अर्जुन कुंडू(गुजरात)(1)वि.वि.प्रणव गाडगीळ(महाराष्ट्र)6-3, 7-6(4);
प्रणव हेगरे(कर्नाटक)वि.वि.सुखप्रीत सिंग(चंदीगढ) 6-3, 3-6, 7-6(4);
क्रिस नासा(महाराष्ट्र)वि.वि.काफिल कडवेकर(महाराष्ट्र)6-4, 6-4;
अनंत मुनी(आंध्रप्रदेश)(15)वि.वि.निरव शेट्टी(महाराष्ट्र)6-4, 6-4;
मोहम्मद अलीम खान(महाराष्ट्र)वि.वि.भूषण हॊबम(मणिपूर)(10) 6-4, 3-6, 6-3;
फरहान पत्रावाला(गुजरात)वि.वि.ज्ञानग्रहिथ मोवा(तेलंगणा) 6-4, 4-6, 6-3;
जैष्णव शिंदे(महाराष्ट्र)वि.वि.नमित मिश्रा(महाराष्ट्र)6-2, 6-3;
निथिलीयन एरीक(कर्नाटक)(6)वि.वि.शुभम कुंडू(कर्नाटक) 7-5, 6-3;
अर्जुन प्रेमकुमार(कर्नाटक)वि.वि.हिरक व्होरा(गुजरात)(3) 7-5, 6-2;
ओजस दबस(महाराष्ट्र)वि.वि.प्रज्वल तिवारी(महाराष्ट्र) 6-3, 6-1;
आयुश हिंदलेकर(महाराष्ट्र)वि.वि.लक्षय बात्रा(हरियाणा) 6-0, 6-4;
दीप मुनीम(मध्यप्रदेश)(14)वि.वि.वेदांत मिस्त्री(महाराष्ट्र) 6-4, 6-7(2), 6-4;
राजेश्वर पटलोल्ला(तेलंगणा)वि.वि.आकाश देब(आसाम)(11) 6-1, 4-6, 6-3;
रेथीन प्रणव(तेलंगणा)वि.वि.आर्यन कुरेशी(महाराष्ट्र) 6-1, 6-2.

‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने आयोजित उद्योजकता मार्गदर्शन परिसंवाद संपन्न

0

पुणे :  युवकांनी उद्योजकतेचा मार्ग  करिअर म्हणून निवडावा, नोकरी शोधण्यापेक्षा आपण  नोकरी देणारे  कसे होऊ शकतो यादृष्टीने मानसिकता तयार करायला हवी, असे मत भारतीय  युवा शक्ती ट्रस्टचे क्षेत्रीय अधिकारी विशाल चव्हाण यांनी व्यक्त केले, ते यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या  शिवाजीनगर येथील  संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे आयोजित  ‘उद्योजकता मार्गदर्शन  परिसंवादात’ बोलत  होते.

यावेळी बोलताना  त्यांनी   उद्योजक होण्यासाठीची मानसिकता, उद्योजकतेचे  प्रशिक्षण, समुपदेशन, बँकेच्या माध्यमातून नवउद्योजकांना  २५ लाख रुपयांपर्यंतचे  विनाजामीन व विना तारण भांडवली  कर्ज  उपलब्ध करून देणे, उद्योजकांच्या  वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करणे  याविषयी  सविस्तर माहिती दिली.

तर भारतीय  युवा शक्ती ट्रस्टचे  पुणे विभाग प्रमुख रोशन अहिरे यांनी बोलताना सांगितले कि, बीवायएसटी तर्फे  नवउद्योजकांना  कशाप्रकारे उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन केले जाते याविषयी माहिती सांगितली, तसेच याआधी  ज्यांनी अशाप्रकारचे मार्गदर्शन घेतले  व जे स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्यात यशस्वी होऊ शकले  अशांची माहितीही सांगितली. तसेच बीवायएसटीतर्फे उद्योग सुरु झाल्यानंतरसुद्धा आवश्यकतेनुसार ज्या बाबी शिकणे व समजून घेणे आवश्यक असते अशा नवीन बाबींचे प्रशिक्षणसुद्धा केले जाते असे सांगितले, ज्यामध्ये  जीएसटी, डिजिटल पेमेंट आदींचा  समावेश होतो.

याप्रसंगी उद्योजकता प्रशिक्षणासाठी  प्रातिनिधिक स्वरूपात  पाच विद्यार्थिनींची  निवड करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला  यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सचे संचालक संजय सिंग, संचालिका  स्मिता धुमाळ. केंद्र  समन्वयक प्राची राऊत यांच्यासह सर्व प्रशिक्षक  व विद्यार्थिनी  उपस्थित  होत्या.

पंडितांच्या उपस्थितीत शुभ मुहूर्तासह साध्वींनी भरला उमेदवारी अर्ज, माजी मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची हजेरी

0

भोपाळ – लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त वक्तव्यांवरून चर्चेत असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भोपाळ लोकसभा मतदार संघातून त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. साध्वींनी शुभ मुहूर्त पाहून गुफा मंदिराचे दर्शन घेतले. यानंतर पंडितांच्या उपस्थितीत स्वस्तिवाचन मंत्रोच्चार करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या. परंतु, आरोग्याच्या समस्या असल्यामुळे त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या चढण्यात अडचणी आल्या. त्यामुळे फॉर्म भरला तरीही तो दाखल करण्यासाठी त्या पुन्हा मंगळवारी कार्यालय गाठतील. सोबतच, मंगळवारी त्यांचे अर्ज भरण्याची व्यवस्था खालच्या मजल्यावरच करण्यात यावे अशी विनंती सुद्धा साध्वींचे प्रस्तावक उमाशंकर गुप्ता यांनी केली आहे.

माजी मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती
फॉर्म दाखल करण्यासाठी साध्वी प्रज्ञा यांच्यासोबत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि माजी मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारी अर्जात कायद्याच्या अडचणी येतील याची जाणीव भाजपला आहे. त्यामुळे, पक्षश्रेष्ठींनी माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील बड्या नेत्यांना त्यांच्यासोबत राहण्याचे निर्देश दिले आहेत.

जामीन रद्द झाल्यास हा आहे भाजपचा प्लॅन बी..
भाजपकडून खासदारकीच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सध्या जामीनावर आहेत. त्यांचे जामीन रद्द झाल्यास काय करावे यासाठी भाजपने प्लॅन बी तयार केला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, साध्वींचे जामीन रद्द झाल्यास त्यांच्या जागी भाजप डमी उमेदवार दाखल करण्याच्या तयारीत आहे. परंतु, हा उमेदवार कोण आहे आणि याची प्रक्रिया काय असेल हे अद्याप समोर आलेले नाही. तज्ज्ञांच्या मते, जामीनावर असताना साध्वींना कायद्याच्या पेच प्रसंगांचा सामना करावा लागू शकतो. साध्वींचा जामीन रद्द करण्यासाठी यापूर्वीच कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. भाजप नेते अनिल सौमित्र यांनी सांगितल्याप्रमाणे, हा काँग्रेसचाच कटकारस्थान आहे. याच कारणामुळे आम्ही सर्वच पर्याय खुले ठेवले आहेत.

मुनगंटीवार आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या विकासाचा केला निर्धार

0
मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा मुंबईला प्राप्त आहे, मात्र मुंबईच्या विकासाकरता अजून भरपूर काही करणं बाकी आहे. विकासाच्या या स्वप्नाला केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मिळून पूर्ण करणार, असे वचन मुंबईकरांना महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिले. अर्थमंत्री मुनगंटीवार आणि आदित्य ठाकरे यांनी रविवारी दक्षिण मुंबई भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी आयोजित केलेल्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला. सकाळी दहा ते रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमात दक्षिण मुंबईतील जवळपास २० हजार सोसायटीतील प्रतिनिधी उपस्थित होते.
शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना आश्वासित केले की, सरकारला मुंबईच्या विकासासाठी मोठी कामे करायची आहेत. या दिशेत शिवसेना संपूर्णपणे सरकारच्या सोबत आहे. यामुळेच मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे पसरत आहे, नवीन वॉटर रिजॉवेयर जलद गतीने बनत आहेत. या कार्यक्रमात मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्राचा बजट प्रथमच सरप्लस गेला आहे. याचे श्रेय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या योग्य निर्णयांना जातो. कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना धन्यवाद करून या कार्यक्रमाचे आयोजक भाजप उपाध्यक्ष लोढा म्हणाले की, मनपा, प्रदेश आणि केंद्र सरकार यांची सांगड अशीच जुडलेली राहिली पाहिजे, तेव्हा दक्षिण मुंबई आणि मलबार हिलच्या विकासाला न्याय मिळेल. यावेळी दक्षिण मुंबई शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अरविंद सावंत म्हणाले की, त्यांनी मागील पाच वर्ष पूर्ण निष्ठेने आणि मेहनतीने काम केले. असंच काम ते पुढेही मुंबईच्या विकासासाठी करत राहतील.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन या कार्यक्रमात मुनगंटीवार, आदित्य ठाकरे आणि लोढा यांनी केले. तसेच उपस्थित नागरिकांच्या समस्यांचे निराकरण, विकास आधारभूत सुविधा आणि विविध लागू झालेल्या योजनांवर आधारित उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांचे संतोष जनक उत्तर दिले. कार्यक्रमात मुंबईतील व्यवसायिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्था आणि कामगार संघटनेचा प्रतिनिधींसह बँकर, डॉक्टर, वकील, इंजिनीयर आणि विविध स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मृणाल शेळके, श्रावणी देशमुख यांचा मानांकित खेळाडूंवर विजय

0

पुणे- पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने तर्फे 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात मृणाल शेळके, श्रावणी देशमुख या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ लॉन टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगरमानांकित मृणाल शेळके हिने अव्वल मानांकित अनुष्का भोलाचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. श्रावणी देशमुख हिने तिसऱ्या मानांकित वैष्णवी चौहानचा 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. पाचव्या मानांकित दुर्गा बिराजदारने रिशिता पाटीलचा 6-2 असा तर, चौथ्या मानांकित अंजली निंबाळकरने स्वरा कोहलीचा 6-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. 

14 वर्षाखालील मुलांच्या गटात  अर्णव ओरुगंती, हर्ष ठक्कर, अर्जुन किर्तने, सार्थ बनसोडे,  प्रणव इंगोळे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 12 वर्षाखालील मुली:उप-उपांत्यपूर्व फेरी:
मृणाल शेळके वि.वि.अनुष्का भोला(1)6-4;
दुर्गा बिराजदार(5)वि.वि.रिशिता पाटील 6-2;
अंजली निंबाळकर(4)वि.वि.स्वरा कोहली 6-3;
रितिका मोरे(8)वि.वि.ध्रुवी  
आद्यथाया6-3;

इशा मोहिते(6)वि.वि.शौर्या सूर्यवंशी 6-0;

श्रावणी देशमुख वि.वि.वैष्णवी चौहान(3) 6-3;
निशिता देसाई वि.वि.अनन्या देशमुख 6-3;
गायत्री मिश्रा(2)वि.वि.सानिया कान्हेरे 5-2सामना सोडून दिला;

14 वर्षाखालील मुले: दुसरी फेरी:
अर्णव ओरुगंती(1)वि.वि.शंतनु चपरिया 6-1;
अमोद सबनीस वि.वि.ऋषिकेश बर्वे 6-2;
अनिश रांजळकर(5)वि.वि.अवजीत नाथन 6-0;
सार्थ बनसोडे(4)वि.वि.अर्जुन परदेशी 6-3;
अर्जुन किर्तने(15)वि.वि.आदित्य रानवडे 6-0;
आदित्य भटवेरा(9)वि.वि.अनिमेश जगदाळे 6-3;
हर्ष ठक्कर(7)वि.वि.आदित्य आयंगर 6-1;
प्रणव इंगोळे वि.वि.पार्थ काळे 6-0.

झिंबाबवेतील वादळग्रस्तांना पुणेकर रोटेरियनची 4 वॉटर फिल्टर ची मदत

0
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ आणि ‘युनायटेड नेशन झिंबाबे ग्रुप’ चा पुढाकार  
पुणे : झिंबाबेमध्ये  मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या इडाई या वादळ- पाऊस-पुर संकटात बेघर झालेल्या नागरिकांना पुणेकर रोटेरियन राहुल पाठक यांनी  ४ वॉटर फिल्टरची मदत केली आहे . रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ आणि ‘युनायटेड नेशन झिंबाबे ग्रुप’  यांनी याकामी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पाठक यांनी ही मदत केली आहे .
झिंबाबेमध्ये  मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या इडाई या वादळ- पाऊस-पुर संकटात  अनेक नागरिक  मृत्युमुखी पडले
हजारो लोक बेघर झाले.  २ लाख लोकांना या वादळाचा फटका बसला .पिके आणि जनावरे पण नष्ट झाली.
‘युनायटेड नेशन झिंबाबे ग्रुप’ या नावाने भारतातील व इतर देशांतील हितचिंतकांचा एक समूह  कार्यरत असतो. त्या ग्रुपमधे पुण्यातून रईसा  शेख , सतीश खाडे हे सदस्य कार्यरत आहेत. सतीश खाडे यांनी रोटरी परिवारात आवाहन केल्याबरोबर रोटरी क्लब कोथरूड चे राहुल पाठक  यांनी त्यांच्या ‘एक्वा प्लस ‘( Aqua plus) या कंपनी मार्फत ताबडतोब 4  मोठे वॉटर फिल्टर    झिंबाबे येथे मदत म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला .सर्व प्रकाच्या औपचारिकता पार पाडीत ४ वॉटर फिल्टर घेऊन स्वतः रोटेरियन राहुल पाठक आपल्या सहकाऱ्यांसोबत  झिंबाबेत दाखल झाले,आणि 4 मोठे वॉटर फिल्टर बसविले .
 ‘एक्वा प्लस ‘(Aqua plus) ही कंपनी पुण्यातील असून पूर, वादळ, भूकंप अशा आपत्कालीन संकटाच्या वेळी  शुद्ध आणि संरक्षित पाणी देण्यासाठी वॉटर फिल्टर सारखे विविध उपकरणे बनवते. अशा उपकरणामध्ये वीज वा इतर उर्जा लागत नाही. सहज व जलद उभारु शकणारे हे फिल्टर्स अॅक्वा प्लस कंपनीने बनवले आहेत.
हजारो लोकांना आता वादळ व पुरानंतर येणाऱ्या रोगराई वेळी दूषित पाणी मिळण्याऐवजी शुद्ध पिण्याचे पाणी  त्यामुळे उपलब्ध होईल पुण्यातील  रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१   सर्वात प्रथम तिथे राहुल पाठकांच्या रूपात धावून गेले आहे.  हे घडवून आणण्यात  रोटेरियन सतीश खाडे व रईसा शेख यांचा सहभाग महत्वाचा ठरला .
राहुल पाठक व त्यांच्या कंपनीने या पूर्वी  गेल्या पावसाळ्यात केरळ मध्ये आलेल्या पुराच्या वेळी सुद्धा तीनच दिवसात अनेक वॉटर फिल्टर्स उभारून हजारो लोकांना साथीच्या रोगापासून वाचवले होते.
‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चा  पाणी विषयक उपक्रम  फक्त पुणे जिल्हा व महाराष्ट्राच्या पलीकडे पोहचला आहे याचा आम्हाला अभिमान  आहे ‘असे  रोटरीचे प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर यांनी म्हंटले आहे

२६ ते २८ एप्रिल ‘द स्पिरीट ऑफ गोवा’

0

पणजी– २६ ते २८ एप्रिल २०१९ दरम्यान द स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिव्हलच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यासाठी गोवा टुरिझम
सज्ज झालेअसून गोवा फेणी डिस्टिलियर्स अँड बॉटलर्सच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात येणारआहे.

हा तीन दिवसीय महोत्सव गोव्याचे आवडते खाद्यपदार्थ म्हणजेच, नारळ, काजूपासून बनवलेली विविध उत्पादने, खाद्यपदार्थ,पेये,
हस्तकलेच्या वस्तू इत्यादींवर आधारित आहे. या पदार्थांचे पारंपरिक पैलू आणि चांगले गुणधर्म तसेच त्याच्याशी संबंधितपूरक उत्पादने
आणि पेये प्रदर्शित केली जाणार असून त्यामध्ये फेणी, उरक, स्थानिक पेये, लिकर्स, घरगुती वाइन यांचा समावेशअसेल.

द स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिव्हल २०१९ मध्ये काजूरसाचे डिस्टिलिंगचे होऊन गोव्याची आवडती आणि वारशाने चालत आलेलीफेणी कशी
बनते याचं प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे. अस्सल गोवन खाद्यपदार्थांशिवाय नारळ आणि काजू या तीन दिवसीयमहोत्सवादरम्यान
बनवले जाणारे खाद्यपदार्थ आणि पेयांचा मुख्य घटक असेल. यावेळेस कॅश्यू स्टॉम्पिंग (काजू तुडवणे) स्पर्धाघेतली जाणार आहे. त्याशिवाय
कार्ल फर्नांडिस यांच्यासारखे व्यावसायिक मिक्सॉलॉजिस्ट आणि प्रसिद्ध व्यावसायिक यांच्यातर्फेआणि खाद्यपदार्थांच्या प्रात्यक्षिकासह
मास्टरक्लास घएतील आणि शेफ अविनाश मार्टिन्स व टिझ मार्टिन्स अस्सल तरीहीनाविन्यपूर्ण गोवन खाद्यपदार्थ दाखवणार आहेत.
या महोत्सवादरम्यान प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी विविध आकर्षक उपक्रम, मनोरंजन, कार्यशाळा आणि स्पर्धांचे आयोजनकरण्यात
आले असून भरपूर बक्षिसे व सरप्राइजेसही ठेवण्यात आली आहेत.

प्रत्येक गोयंकराच्या मनात दडलेल्या संगीतप्रेमी रसिकाला चालना देण्यासाठी स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिव्हल एंटरटेनमेंटआयोजित करण्यात आले आहे. कालातीत कोंकणी आणि पोर्तुगीज अभिजात संगीतापासून आधुनिक इंग्रजी लॅटिन शैलीचे जॅझव फंक रिदमसह संगीत यात
ऐकायला मिळणार आहे. महोत्सवात भव्य सादरीकरण आणि आतापर्यंत कधी न पाहायलामिळालेला पूर्ण ब्रास सेक्शन अनुभवता येणार आहे.
पहिला दिवस, शुक्रवार २६ एप्रिल – या दिवशी व्हॅलेंटिनोसचे सादरीकरण आणि अस्सल पारंपरिक गोवन नृत्य पाहायलामिळणआर असून त्यानंतर १५ संगीतकार व गायकांचा समावेश असलेले टेक ५ एन्सेम्बल सादर केले जाणार आहे. विशेषम्हणजे, यात हॉर्न सेक्शन, व्हायोलिन सेक्शन, फ्लुट गिटार्स, कोरस गायक आणि काही आघाडीचे गायक असा पूर्ण सेट असेल.
दुसरा दिवस, शनीवार २७ एप्रिल – या दिवशी क्ले जार्स नावाचा गोव्यातील सर्वात लहान ड्रमरचा आणि इतर तरुण, गुणवानकलाकारांचा समावेश असलेला गोवन संगीताचा समूह ते ‘ए युनिट’ नावाच्या नृत्य समूहासह फ्युजन सादरीकरण करणारआहेत. या सादरीकरणानंतर मंचावर विविध कथा सादर करतील.
त्यांच्या सादरीकरणानंतर व्हायोलिन्स, सेलासह पूर्ण ब्रास, १४संगीतकार व गायकांचा समावेश असलेले द कॉफी कॅट्स एन्सेम्बल आपली कला सादर करतील. अशाप्रकारचे भव्य सादरीकरणगोव्यात कदाचित पहिल्यांदाच सादर होत असावे.
तिसरा दिवस, २८ एप्रिल – यादिवशी जॅझ जंक्शन त्यांचा लॅटिन ताल आणि जॅझ फंकसह मंच उजळवणार असून त्यामध्ये गोवाव पोर्तुगालमधील पाहुण्या गायकांचा समावेश असेल.
फिनालेमध्ये गोव्याचे लेजंड म्हणून ओळखले जाणारे लोर्ना लाइव्ह सादरीकरण करत या तीन दिवसीय महोत्सावाची योग्यसांगता करतील.
महोत्सवामध्ये लाइव्ह अकॉस्टिक ब्रास बँड्सही समाविष्ट असल्यामुळे स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिव्हल २०१९ च्या दिमाखातआणखी भर
पडेल.
महोत्सवात एक भव्य, डिजिटली मॅप केलेला स्क्रीन अस्सल गोवन संकल्पनांवर आधारित थ्रीडी पार्श्वभूमी दर्शवत राहाणारअसून त्यामुळे
सर्व प्रेक्षकांना नेत्रसुखद पर्वणी मिळेल. महोत्सवाच्या ठिकाणी एक प्रवेशद्वार आणि एक निर्गमन द्वारासहमोफत पार्किंग सुविधा ठेवण्यात आली आहे. पार्किंगसाठी जागा नसल्यास प्रेक्षकांनी परेड मैदान वापरावे असे आवाहन करण्यातआले असून ट्रॅफिक पोलिसांनी सर्व कार चालकांना आपल्या गाड्या पदपथावर न लावण्याचे आवाहन केले आहे.

जर्मन कथक नृत्यांगनांच्या पदन्यासाला उत्स्फूर्त दाद

0

प्रकृती कथक नृत्यालयातर्फे ‘धन्य’ मैफलीचे आयोजन
पुणे : परदेशी नृत्यांगनाचा भारतीय परंपरेने सादर झालेला कार्यक्रम नुकताच रसिकांना अनुभवता आला. या कथक नृत्याविष्काराद्वारे शिवस्तुती, गुरुवंदना, ‘कथक’चे खास वैशिष्ट्य असलेला नृत्याविष्कार समग्र तीन तालात पेश केला गेला. कथकमध्ये अभावानेच बघायला मिळणाऱ्या  बैठकीच्या अभिनयामध्ये ‘वर्षा ऋतू’ हे विरह गीत सादर करण्यात आले. सरगम, तरणा, गीत आणि नटवरी या चार रंगांनी नटलेला ‘चतरंग’ नृत्य आविष्कारही यावेळी झाला. मैफलीची सांगता गणेशस्तुतीने करताना नांदीच करण्यात आली.

गुरु रोहिणी भाटे व त्यांच्या ज्येष्ठ शिष्य नीलिमा अध्ये यांच्याकडे ‘कथक’ची तालीम घेतलेल्या जर्मन कथक नृत्यांगना कॅरोलिन डॅसेल आणि त्यांची शिष्या तान्जा प्रेड यांच्या कथक नृत्याविष्काराची ‘धन्य’ या मैफलीस जाणकार रसिकांची दाद मिळाली. येथील प्रकृती कथक नृत्यालयातर्फे ही मैफल आयोजित करण्यात आली होती. कॅरोलिन जर्मनीतील म्युनिच शहरात ‘धन्य कथक नृत्यालय’ संचालित करतात. युरोपात त्यांच्या कलेला नावाजले जातेच पण कथक मधील जाणकार भारतीय प्रेक्षकांसमोर त्यांच्या नृत्याविष्कारास दाद मिळावी, या हेतूने या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

अर्पिता वैशंपायन यांनी स्वरसाथ दिली आणि अजय पराड (संवादिनी) तर आदित्य देशमुख यांनी तबला साथ केली. नीलिमा अध्ये यांनी  पढंत सादर केले. बिलासखानी तोडी रागातील सरगम ( ताल रूपक ), तराणा (झप ताल), गीत (अद्ध), नटवरी (एक ताल) पेश करण्यात आला. रसिकांची त्याला विशेष दाद मिळाली.

‘सिंधुरवदना मदनसम सुंदर’ या गणेशस्तुतीने मैफलीची सांगता करण्यात आली. या रचनेचे काव्य, संगीत आणि नृत्य गुरु रोहिणी भाटे यांचे होते. गणेशाच्या रूपाचे आणि नृत्याचे वर्णन करणारी ही नृत्यरचना सादर करताना

कॅरोलिन यांनी वठवलेले बारकावे स्तुत्य होते. त्यांचे लालित्य आणि पदन्यास दोन्ही कौतुकास पात्र होते. पाश्चात्य नृत्यांगनाचे ‘कथक’  सादरीकरण या कौतुकापोटी नव्हे तर त्यांच्या शैलीच्या विशुद्ध नृत्याकरिता कॅरोलिन यांनी रसिकांची वाहवा मिळवली.

  • पहाटे तीनला ‘कथक’ साधना !

    जर्मन कथक नृत्यांगना  कॅरोलिन डॅझेल यांचा मुलगा दोन वर्षांचा असताना कथक शिकण्यासाठी त्या पुण्यात नीलिमा अध्ये त्यांच्याकडे आल्या होत्या. मात्र, त्यांच्या मुलामुळे त्यांना नृत्यसाधनेत अडथळे येत होते. त्यावर नीलिमाताईंनी तोडगा काढला. पहाटे तीन ते सहा अशी कथक तालीम त्यांनी कॅरोलिन यांच्याकडून करून घेतली. नीलिमाताईंचे ॠण व्यक्त करताना याचा आवर्जून उल्लेख  त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. भारतीय कथक कलाकार, जाणकारांसमोर ध्वनिफितीऐवजी प्रत्यक्ष साथसंगतकारांसमवेत कला सादर करून त्यांची दाद मिळाल्याने विशेष आनंद वाटल्याचे कॅरोलिन यांनी आवर्जून सांगितले.

16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत प्रणव गाडगीळ, प्रज्वल तिवारी, संदेश कुरळे, रुमा गाईकैवारी, संजीवनी कुतवळ, सोनल पाटील, जिया परेरा यांचा मुख्य फेरीत प्रवेश

0

पाचगणी- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात प्रणव गाडगीळ, प्रज्वल तिवारी, संदेश कुरळे यांनी, तर मुलींच्या गटात रुमा गाईकैवारी, संजीवनी कुतवळ, सोनल पाटील, जिया परेरा  या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला. 

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 16 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रणव गाडगीळने आर्यन हूडचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-4 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. प्रज्वल तिवारीने चैतन्य आलूमवर टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-3 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. यशराज दळवीने शर्विल पाटीलचा 6-0, 6-0 असा सहज पराभव केला. संदेश कुरळे याने अनुप बंगार्गीला 6-2, 6-4 असे पराभूत केले.

 मुलींच्या गटात रुमा गाईकैवारी हिने हरश्री आशेरचा 6-1, 6-0 असा तर, सोनल पाटीलने गार्गी शहाचा 6-0, 6-0 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी:
16 वर्षाखालील मुले:
यशराज दळवी(महाराष्ट्र)वि.वि.शर्विल पाटील (महाराष्ट्र)6-0, 6-0;
संदेश कुरळे(महाराष्ट्र) वि.वि.अनुप बंगार्गी 6-2, 6-4;
अर्जुन प्रेमकुमार(कर्नाटक)वि.वि.ओम काकड(महाराष्ट्र) 6-2, 6-1;
आयुश हिंदलेकर(महाराष्ट्र)वि.वि.आर्यन कोटस्थाने(महाराष्ट्र) 6-4, 6-4;
शंतनु नांबीयार(महाराष्ट्र)वि.वि.ईशान जिगली(महाराष्ट्र) 6-3, 6-2;
प्रणव गाडगीळ(महाराष्ट्र)वि.वि.आर्यन हूड(महाराष्ट्र) 7-6(4), 6-4;
प्रज्वल तिवारी(महाराष्ट्र)वि.वि.चैतन्य आलूम 7-6(4), 6-3;
काफिल कडवेकर(महाराष्ट्र)वि.वि.प्रसाद इंगळे(महाराष्ट्र) 2-6, 6-2, 7-5;

16 वर्षाखालील मुली:
लक्ष्मी अरुणकुमार वि.वि.कुंडली मजगैने(महाराष्ट्र) 1-6, 6-3, 6-4;
हर्षिता बांगेरा वि.वि.मिली चुग(महाराष्ट्र) 6-2, 6-2;
वैष्णवी वाकिती(तेलंगणा)वि.वि.वृशिष्टा कुमार(महाराष्ट्र) 6-2, 6-3;
रुमा गाईकैवारी(महाराष्ट्र)वि.वि.हरश्री आशेर(महाराष्ट्र) 6-1, 6-0;
नागा रोशनी अरुणकुमार(तामिळनाडू)वि.वि.श्रावणी खवळे(महाराष्ट्र)7-5, 7-5;
संजीवनी कुतवळ(महाराष्ट्र)वि.वि.साज तंडेल(महाराष्ट्र) 6-2, 6-2;
सोनल पाटील(महाराष्ट्र)वि.वि.गार्गी शहा(महाराष्ट्र) 6-0, 6-0;
जिया परेरा(महाराष्ट्र)वि.वि.कनिष्का मल्लेला(कर्नाटक) 6-4, 6-0.