Home Blog Page 2941

अर्ध्या निवडणुकीनंतर भाजपचा पराभव निश्चित : राहुल गांधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील अर्ध्याहून जास्त निवडणुका पार पडल्या असून, आतापर्यंतच्या आकडेवारीवरून मोदी सरकारचा पराभव होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत बेरोजगारी हाच मुख्य मुद्दा असल्याचे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेत मोदी सरकारच्या पराभव होत असल्याचा दावा केला. राहुल गांधी यांनी बेरोजगारीसह शेतकरी, उद्योगधंदे अडचणीत असल्याने मोदींना लक्ष्य केले. मोदी या विषयांवर काहीच बोलत नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. या विषयांवर मोदींनी माझ्यासोबत 10 मिनिटे चर्चा करावी, फक्त अनिल अंबानींच्या घरी नाही, असेही राहुल यांनी आव्हान दिले.

राहुल गांधी म्हणाले, ”आमचे पहिले लक्ष्य भाजप आणि नरेंद्र मोदींना पराभव करण्याचे आहे. आम्हाला देशातील संस्था वाचवायच्या आहेत. भाजपचा पराभव होणार हे निश्चित आहे. बेरोजगारी हा देशासमोरील सर्वांत मोठा प्रश्न आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पहिला मुद्दा रोजगारी संदर्भात आहे. मोदी याविषयी शब्दही बोलत नाहीत, त्यांच्याजवळ कोणता मुद्दाच नाही. आज देशात कोठेही चौकीदार बोलले की चोर है असा शब्द येतो. मोदींना वाटते ते पराभूत होत आहेत, तसे ते नवे मुद्दे आणतात. गुजरातमध्ये त्यांनी सी प्लेन आणले होते. आता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे, ते पराभूत होत आहेत.”

लष्कर ही मोदींची खासगी संपत्ती नाही. सर्जिकल स्ट्राईक हे लष्कराने केले आहेत. काँग्रेसने केलेले सर्जिकल स्ट्राईकला मोदी व्हिडिओ गेम म्हणत असतील तर ते भारतीय लष्काराचा अपमान करत आहेत. मसूद अजहरला पाकिस्तानमध्ये कोणी पाठविले हे सांगावे. न्याय योजनेमुळे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. अनेक बेरोजगारांना आम्ही रोजगार देणार आहोत. युवकांना उद्योग सुरु करण्यासाठी तीन वर्षे कोणत्याही परवानगीची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयात राफेलचा मुद्दा सुरु असल्याने मी याविषयावर भाष्य केल्याने माफी मागितली. चौकीदार चोर है हा आमचा नारा आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

निवडणूक आयोग पक्षपाती

निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारल्यानंतर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार आल्यानंतर अनेक स्वायत्त आणि महत्त्वाच्या संस्था मोडीत काढण्याचे काम सुरू झाले असल्याचे आम्ही म्हटले होते. निवडणूक आयोगाने आपली जबाबदारी योग्य तऱ्हेने पार पाडायला हवी. पण तसे दिसत नाही. निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा हा भाजपने स्वायत्त संस्था ताब्यात घेतल्याचा परिणाम असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. निवडणूक आयोगाने कितीही भाजपला मदत केली तरी जनताच भाजपला हरवणार आहे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

कसब्यासाठी लढाई महापालिकेतूनच…

पुणे : इच्छुकांना आता विधानसभेचे वेध लागले असून प्रत्येकाने आपापली फिल्डिंग आपापल्या पद्धतीने लावण्यास सुरुवात केली असून पुण्यात कसबा विधानसभा मतदार संघात उमेदवारीपासून ते मतदानापर्यंत चुरस राहील असे दिसते आहे .लोकसभा लढविलेले गिरीश बापट आता कसब्याच्या रिंगणाच्या बाहेरच असतील, आणि त्यांचे कोणी कुटुंबीय देखील आता येथे उमेदवार नसतील याच अनुषंगाने भाजप मध्ये तयारी दिसून येत असून या मतदार संघातून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर उमेदवारी साठी सध्या तरी सर्वाधिक पसंती महापौर मुक्ता टिळक यांना दिली जात आहे तर कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या गोटातून महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्या उमेदवारी साठी सर्वाधिक पसंती दिली जाते आहे .

 पालकमंत्री गिरीश बापट भाजपच्या वतीने  लोकसभा  लढविली  . त्यामुळे येत्या विधानसभेत कसब्याचे नेतृत्व आता कोण करणार, याची उत्सुकता  पक्ष कार्यकर्त्यात जोरात आहे. पक्षासाठी खपलेल्या कार्यकर्त्याला संधी मिळणार की बापट यांची घराणेशाही सुरू होणार होणार यावर  लक्ष केंद्रित होताना दिसते आहे.त्यात विशाल धनवडे सारखे सेनेतील इच्छुक आता कसबा शिवसेनेला सोडा असा जोरदार आग्रह करत आहेत . अर्थात विधानसभेला युती कायम राहिली तर हा प्रश्न उदभवणार आहे.आणि हा निर्णय लोकसभेच्या निकालावर अवलंबून राहील असे दिसते आहे.

आमदार या नात्याने बापट गेली 25 वर्षे कसब्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून कसब्यातून आमदार होण्याची अनेकांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. बापट यांना लोकसभेची उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतर यापैकी अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विद्यमान महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश बिडकर, नगरसेवक धीरज घाटे व हेमंत रासने यांची नावे यात प्रामुख्याने चर्चेत आहेत.बिडकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्याचप्रमाणे घाटे व रासने यांचाही मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्क आहे. बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यादेखील गेल्या वर्षभरापासून पुण्यात सक्रिय आहेत. बापट यांच्यासोबत जवळपास सर्व कार्यक्रम, सभा-सभारंभात त्या वावरत असतात. केवळ बापट यांचे चिरंजीव गौरव यांच्याशी विवाह झाला म्हणून नव्हे तर माहेरी सांगलीत त्या अनेक वर्षे पक्षाचे काम करीत होत्या. त्यामुळे त्यांचे नाव आयत्या वेळी पुढे आल्यास बापटांची घराणेशाही नको असा त्यांना विरोध काही प्रमाणात होणार आहे.

दुसरीकडे काँग्रेसकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली असून लोकसभेचे उमेदवार माजी आमदार मोहन जोशी यांनी आजपासून (शनिवार) काँग्रेस भवन येथे विधानसभानिहाय बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते, नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. कसबा मतदारसंघाची बैठक आज  होणार असून त्यानंतर पुढील आठवडाभर उर्वरित सर्व मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे.

लोकसभेची उमेदवारी अगदी तोंडाजवळ येवून हुकल्याने आता कसबा विधानसभेची उमेदवारी मात्र अरविंद शिंदे यांना नक्की मिळेल असा विश्वास अनेकांना आहे. या शिवाय पालिका निवडणूक काळात कॉंग्रेस मध्ये आलेले रवी धंगेकर हे त्यांचे पक्षांतर्गत प्रमुख स्पर्धक असणार आहेत .

‘मी भारतात राहतो, भारतात कर भरतो, नागरिकत्वावरुन वाद का..?’-अक्षय कुमार

0

मुंबई– अभिनेता  अक्षय कुमारने मतदान न केल्यामुळे त्याच्या देशप्रेमावरच शंका व्यक्त करण्यात आली होती, त्यानंतर तो म्हणाला-”पण मी गेल्या सात वर्षात माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याचे कधीही लपवले नाही, मग आत्ताच हा सर्व वाद का काढला जातोय, असा सवाल अक्षय कुमारने विचारलाय. शिवाय मी देशासाठी माझ्या वतीने योगदान देत राहिल”, असेही अक्षयने म्हटले आहे.

अक्षयचे स्पष्टीकरण

”माझ्या नागरिकत्वाबाबत बिनबुडाच्या आणि नकारात्मक गोष्टी का पसरवल्या जात आहेत हे मला समजत नाहीये. माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे हे मी गेल्या सात वर्षात कधीही लपवले नाही किंवा नकारही दिलेला नाही. त्याचप्रमाणे मी गेल्या सात वर्षात कधीही कॅनडाला गेलेलो नाही हे देखील तेवढेच खरे आहे. मी भारतात काम करतो आणि सर्व प्रकारचे करही भारतातच भरतो. या गेल्या काही वर्षांमध्ये माझं देशाविषयीचे प्रेम सिद्ध करण्याची वेळ माझ्यावर कधीही आलेली नाही. पण गरज नसताना माझ्या नागरिकत्वाचा मुद्दा मध्ये ओढला जात आहे, हे पाहून दुःख होतंय. हा मुद्दा वैयक्तिक, कायदेशीर, अराजकीय आणि इतरांशी काहीही संबंध नसलेला आहे. माझा भारत आणखी मजबूत बनवण्यासाठी मी कायम योगदान देत राहिन एवढेच सांगतो,” असे स्पष्टीकरण अक्षयने दिले.

नागरिकत्वाबाबत तरतुदी
विविध वृत्तांमध्ये अक्षय कुमार हा भारताचा नागरिक नसल्याचे म्हटले होते, पण जॉली एलएलबी 2 या सिनेमाच्या प्रमोशनवेळी अक्षय कुमारला पत्रकाराने नागरिकत्वाबाबात प्रश्न विचारला होता. यावर अक्षय कुमार म्हणाला, ”हे तुम्ही समजताय तसे नाहीये. हे नागरिकत्व मानद (honorary) आहे.”

भारतीय राज्यघटनेनुसार भारतामध्ये कोणालाही दुहेरी नागरिकत्व ठेवता येत नाही. एखाद्या भारतीय व्यक्तीने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास त्याचे भारतातील नागरिकत्व आपोआप रद्द केले जाते. याची तरतूद राज्यघटनेतील कलम 8 आणि नागरिकत्व कायदा 1955 च्या कलम 8 मध्येही आहे. भारतीय नागरिक नसणाऱ्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार नाही, त्यासोबतच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, खासदार, आमदार, सरकारी सेवा यासाठी अपात्र ग्राह्य धरले जाते.

अक्षय कुमार नेमका कोणत्या देशाचा नागरिक?
मानद नागरिकत्व हे एखाद्या देशाकडून सन्मान म्हणून दिले जाते. मानद नागरिकत्व दिले म्हणजे सामान्य नागरिकत्वाचे अधिकार मिळत नाहीत. म्हणजेच एखादा व्यक्ती कॅनडाचा Honorary Citizenship असेल तर त्यालाही कॅनडात जाण्यासाठी व्हिजा आवश्यक असेल.

अक्षय कुमार हा Overseas Citizenship of India आहे की भारतीय नागरिक आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने यापूर्वीच आरटीआयला उत्तर दिले आहे. तो Overseas Citizenship of India नसल्याचे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. ऑगस्ट 2017 मध्ये आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्रालयाने स्पष्ट केले, की अक्षय कुमार हा भारतीय नागरिक आहे.

 

फनी वादळामुळे भुनवेश्वरच्या विमानतळाच्या छताचा भाग उडाला; ओडिशामध्ये अनेक ठिकाणी झाडे पडून मोठे नुकसान, कोलकतामध्येही जोरदार पाऊस

0

भुवनेश्वर(ओडिशा)- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फनी’ चक्रीवादळ ताशी 200 किमी वेगाने ओडिशाकडे किनारपट्टीवर धडकले. आज सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान हे चक्रीवादळ जगन्नाथ पुरीच्या किनाऱ्यावर धडकले. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. फनी चक्रीवादळामुळे सध्या जगन्नाथ पुरीत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान या वादळामुळे भुवनेश्वरमधील विमानतळाच्या छताचा भाग उडाल्याचे दृष्य समोर आले आहे.

इमरजंसी नंबर
ओडिशा- 06742534177, गृह मंत्रालय- 1938, सिक्योरिटी- 182

अपडेट्स…

वादळामुळे भुवनेश्वरमधील विमानतळाच्या छताचा भाग उडाला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी 48 तासांसाठी आपल्या सगळ्या रॅली रद्द केल्या आहेत.

कोलकतातही फनीचा परिणाम दिसत आहेत, त्यामुळेच येथही जोरदार पाऊस सुरू झाला आहे.
फनीचे मुख्य केंद्र ओडिशामधून पुढे निघत आहे.
ओडिशामध्ये वादळामुळे दुपारपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने सांगितले की, फनीचे मुख्या केंद्र अंदाजे 25 किलोमीटरचे आहे. यामुळेच 150 ते 175 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. काही ठिकाणी हे वारे 200 किलोमीटर वेगाने वाहत आहेत.
एनडीआरएफने एडवायजरीमध्ये म्हटले आहे की- वादळानंतर उद्धवस्त झालेल्या जागेवर जाऊ नका, विजेच्या तारा पडलेल्या असू शकतात. मच्छिमारांनी अतिरीक्त बॅटरीसोबत रेडीओ सेट्स ठेवा.
एनडीआरएफने प्रभावित क्षेत्रात बचावकार्य सुरू केले आहे.
भुवनेश्वर, बेरहामपूर, बालूगावमध्ये फनीचा सगळ्यात जास्त प्रभाव पडला आहे.
पुरीसोबतच किनारपट्टीच्या अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे.
फनीच्या प्रभावामुळे आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टनममध्येही जोरदार पाऊसाची सुरुवात झाली आहे.

नौसेनेचे 3 जहाज बचावासाठी तैनात
किनारपट्टी सुरक्षा बलाने सांगितले की, फनीला पाहता 34 बचाव दल आणि चार किनारपट्टी सुरक्षा दलाला तयार करण्यात आले आहे. नौसेनेचे प्रवक्ते कॅप्टन डीके शर्मा यांनी दिल्लीत सांगितले की, नौसेनेचे पोत सहयाद्री, रणवीर आणि कदमतला बचावकार्यसाठी पाठवण्यात आले आहे.

5000 किचनची व्यवस्था
एनडीआरएफच्या 28, ओडिसा डिझास्टर मॅनेजमेंट रॅपिड अॅक्शन फोर्सच्या 20 यूनिट आणि फायर सेफ्टी डिपार्टमेंटचे 525 लोग रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आहेत. त्याशिवाय आरोग्य विभागाच्या 302 रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात आल्या आहेत. बचाव शिबीरात जेवण्याच्या व्यवस्थेसाठी 5000 किचन तयार करण्यात आले आहेत.

किनारपट्टी असलेल्या जिल्हायीत येणे-जाणे बंद
किनारपट्टी असलेल्या जिल्ह्यात रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतून पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. गुरुवारू मध्यरात्रीपासून बीजू पटनायक इंटरनॅशनल एअरपोर्टवरील सगळी विमान उड्डाने 24 तासांसाठी बंद करण्यात आली आहेत. कोलकता एअरपोर्टदेखील शुक्रवारी रात्रीपासून शनिवार रात्रीपर्यंत बंद असेल.

वादळामुळे ओडिशातील 14 जिल्हे प्रभावित होतील
वादळामुळे ओडिशातील 14 जिल्ह्यात त्याचा परिणाम दिसेल. यात पुरी, जगतसिंहपूर, केंद्रपाड़ा, बालासोर, भद्रक, गंजम, खुर्दा, जाजपुर, नयागड, कटक, गाजापटी, मयूरभंज, ढेंकानाल आणि कियोंझरचा समावेश आहे. या जिल्ह्यातील अंदाजे 10 हजार गावे वादळामुळे प्रभावित होतील. हे वादळ ओडिसानंतर पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे. याचा परिणाम आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूच्या उत्तर-पूर्व भागातली दिसेल. बंगालमध्ये पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, दक्षिण आणि उत्तर 24 परगना जिल्हे, हावड़ा, हुगली, झारग्राम, कोलकातासोबतच श्रीकाकुलम, विजयनग्राम आणि आंध्रप्रदेशचे विशाखापत्तनमध्येही प्रभाव दिसेल.

गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांना भरघोस यश

पुणे :- बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला. पिंपरीतील गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलचा निकाल ९७ टक्के लागला असून येथील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले असून द्रीष्टी पेशवाणी हिला सर्वाधिक ९६.८ %  गुण मिळाले आहेत. परीक्षेला बसलेल्या ११९ विद्यार्थ्यांपैकी ९७  विद्यार्थी सायन्स तर २२ विद्यार्थी कॉमर्सचे आहेत. यातील ६५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयात  डिस्टींकशन मिळविले आहे.

सायन्स विभागात द्रीष्टी पेशवाणी ला ९६.८ शांमभवी सभाहीत  हिला ९६.६ तर संजीवनी नाथानी हिला ९६.२ टक्के तर कॉमर्स विभागात सृष्टी शर्मा हिला ९५ टक्के अक्षदा फणसाळकर हिला ९२.६ तर सोनाली टक्कर हिला ९२.२ टक्के  मिळाले. ९ विद्यार्थांनी ९५ टक्क्यांहून अधिक तर ३२ विद्यार्थांनी ९० टक्क्यांहून अधिक

३२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक तर ६३  विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.

अंशतः दृष्टीहीन असलेल्या सोनाली ठाकूर हिने इंग्लिश मध्ये ९७ तर बिझनेस स्टडीज मध्ये सर्वाधिक ९८ टक्के मिळवत शाळेचे नाव उंचावले आहे.

आमच्या येथील प्रत्येक शिक्षक सकारात्मक विचारांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो . त्यामुळेच येथील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच इतर अनेक कौशल्यांमध्ये पारंगत होत आहेत.म्हणूनच मी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचेही  अभिनंदन करू इच्छ्ते अशा भावना शाळेच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी मांडल्या .

सीआयआय परिषदेत उद्योगक्षेत्रातील दिग्गजांचा लॉजिस्टिक्समध्ये प्रमाणबद्धता आणण्यावर भर

नवी दिल्ली-:  भारतातील लॉजिस्टिक्स क्षेत्र (व्यावसायिक वाहतूक व्यवस्था) हा देशाच्या विकासाचा प्रमुख आधारस्तंभ आहे.  मजबूत व सातत्याने विकसित होत असलेले लॉजिस्टिकस क्षेत्र हे अर्थव्यवस्थेच्या विकासाचे द्योतक असते.  या क्षेत्रामध्ये कार्यक्षमता वाढावी व खर्चांमधे घट व्हावी यासाठी नवनवीन तंत्रज्ञाने आणून मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणले जात आहेत.  जरी हे क्षेत्र विस्कळीत असले, तरी सरकारने केलेले विविध नियामक बदल व काही संघटित थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स संस्था लक्षणीय भूमिका बजावत आहेत, ज्यामुळे भारतातील लॉजिस्टिक्स उद्योगक्षेत्राने अभूतपूर्व भरारी घेतली आहे.

देशाच्या विकासात लॉजिस्टिक्स क्षेत्र बजावत असलेली महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री अर्थात सीआयआयने “स्टॅण्डर्डायझेशन इन लॉजिस्टिक्स २०१९ – अ स्टेप टोवर्डस एक्सेलरेटिंग लॉजिस्टिक्स सेक्टर ग्रोथ” (लॉजिस्टिक्समधील प्रमाणबद्धता – लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या वाढीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल) या विषयावर एका परिषदेचे आयोजन केले होते.

या परिषदेला संबोधित करताना भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सहसचिव – लॉजिस्टिक्स श्री. अनंत स्वरूप यांनी सांगितले, लॉजिस्टीक्ससाठी होणाऱ्या खर्चात घट व्हावी व देशासाठी कामगिरी सूचकांकात सुधारणा व्हावी यासाठी लॉजिस्टिक्स विभाग प्रयत्नशील आहे.  या उद्योगक्षेत्रात प्रमाणबद्धता आणणे हे त्या दृष्टीने उचलले जाणारे महत्त्वाचे पाऊल आहे.  आमच्या विभागाने सादर केलेल्या राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण मसुद्यातही प्रमाणबद्धता मुद्द्याचा समावेश होता.  हे प्रत्यक्षात घडून यावे यासाठी सीआयआय व लॉजिस्टिक्स उद्योगक्षेत्राकडून सहयोग मिळेल अशी आशा आम्ही व्यक्त करतो.”   

बीआयएसच्या महासंचालिका श्रीमती सुरिना राजन यांनी सांगितले, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) हा आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत मानकांना जोडणारा दुवा आहे.  लॉजिस्टीक्समध्ये प्रमाणबद्धता यावी यासाठी हे उद्योगक्षेत्र व सीआयआय एकत्र येऊन काम करत आहेत हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे.  या उपक्रमाला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.” 

सीआयआय नॅशनल कमिटी व लॉजिस्टिक्सचे सदस्य व महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडचे सीईओ            श्री. पिरोजशा सरकारी यांनी यावेळी सांगितले, लॉजिस्टिक्स विभाग स्थापन करून सरकारने या क्षेत्राच्या विकासाला चालना दिली आहे.  महत्त्वाचा विषय म्हणून गेल्या वर्षी आम्ही लॉजिस्टीक्समधील प्रमाणबद्धतेला प्राधान्य दिले.  पॅलेट असो वा वाहनाचा आकार असो, गोदामे, कंत्राटे, करार किंवा वाहनचालकांसाठीच्या सुविधा असोत, प्रत्येक बाबतीत संपूर्ण उद्योगक्षेत्रात प्रमाणबद्धता असलीच पाहिजे.  प्रमाणबद्धतेच्या अभावामुळेच आपल्या देशामध्ये इतर देशांपेक्षा लॉजिस्टीक्सच्या किमती जास्त आहेत.  मी असे मानतो की, ‘मेक इन इंडियायशस्वी होण्यासाठी मूव्ह इन इंडिया‘ (भारतातील व्यावसायिक वाहतूक व्यवस्था) सक्षम असणे आवश्यक आहे.  एकसमान प्रमाणबद्धतेच्या दिशेने सुरु झालेल्या या प्रवासात अनेक अडथळे येतील.  पण मला असे वाटते की, आपल्याला यामध्ये यश नक्कीच मिळेल.”

स्लो मोशन गाण्या साठी दिशा ने घेतली हेलन कडून प्रेरणा

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचे भारत चित्रपटातील स्लो मोशन गाणे सध्या चांगलेच गाजत आहे. या गाण्यातील दिशा पाटनीचा लूक व डान्सची देखील जबरदस्त चर्चा आहे. या गाण्यात तिला ज्येष्ठ अभिनेत्री हेलेन यांच्यासारखा लूक देण्यात आला आहे.

दिशाचा या गाण्यातील लूक हॉलिवूडते डिझायनर एशले रेबेलो यांनी डिझाईन केलेला आहे. या गाण्यासाठी दिशाला त्यांनी 60 ते 70 च्या दशकातील अभिनेत्रींचा लूक द्याचा होता. त्यासाठी त्यांच्या डोक्यात अनेक अभिनेत्रींचा विचार आला होता. मात्र अखेर त्यांनी हेलेन यांच्या लूकवरून प्रेरणा घेत दिशासाठी लूक डिझाईन केला. त्यामुळेच या गाण्यातील तिचा लूक भडक असला तरी तो सेन्श्युअस व क्लासी आहे, असे एशेल रेबेलो यांनी सांगतिले. या गाण्यात दिशाने नेसलेली पिवळ्या रंगाची साडी देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. त्यासाठी रेबेलो सुरुवातीला लाल कि पिवळा या दोन रंगात गोंधळलेले होते. अखेर त्यांनी पिवळ्या रंगाला पसंती दिली.

भारत या चित्रपटात सलमान खान, कतरिना कैफ, तब्बू, जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, नोरा फतेही व सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत.हा चित्रपट येत्या ईदला रिलीज होणार आहे.

जागतिक स्तरावर उद्योग विस्तारासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे व्यासपीठ

पुणे : आपल्या उद्योगाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगाला स्थान मिळवून देण्यासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे (जीआयबीएफ) व्यासपीठ उभारण्यात आले आहे. ‘जीआयबीएफ’मध्ये अनेक देशांचे दूतावास, उद्योग मंत्रालय आणि विविध देशांतील उद्योजक जोडले जात आहेत. उद्योगांच्या जागतिक विस्तारासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरणार आहे. उद्योजकांनी जागतिक बाजारपेठेत आपला उद्योग नेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी फोरमच्या वतीने येत्या ११ मे २०१९ रोजी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘जीआयबीएफ’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. डेक्कन येथील पीवायसी जिमखाना येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी वर्ल्ड ट्रेंड सेंटरचे कॉर्डीनेटर निखिल ओसवाल, ‘जीआयबीएफ’चे आंतरराष्ट्रीय समन्वयक दीपाली गडकरी, जीआयबीएफचे सहसचिव धीरेंद्र आपटे, युवा समन्वयक अभिषेक जोशी आदी उपस्थित होते.

डॉ. जितेंद्र जोशी म्हणाले, “भारत हा वेगाने विकसित होणारा आणि जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत असलेला देश आहे. भारत सरकारने सुरु केलेल्या ‘मेक इन इंडिया’, ‘स्किल्स डेव्हलपमेंट’ यांसारख्या अभियानामुळे भारतासह विदेशी कंपन्यांना व्यवसायाच्या मोठ्या संधी उपल्बध झाल्या आहेत. अशावेळी जागतिक स्तरावर उद्योजकांना एक सामायिक व्यासपीठ असावे, या कल्पनेतून ‘जीआयबीएफ’ची स्थापना केली. या व्यासपीठाच्या माध्यमातून ऑटोमोबाइल, अभियांत्रिकी, केमिकल, फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, अवजड उद्योग, सेवा क्षेत्र अशा विविध व्यावसायिकांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. याला कोणत्याही धर्माचे, जातीचे किंवा प्रदेशाचे बंधन नाही. व्यवसाय करणारा कोणीही या फोरमचा सभासद होऊ शकेल. आज ‘जीआयबीएफ’चे ३७ देशांमध्ये कार्य सुरु असून, जवळपास ५३ हजार सभासद आहेत. जागतिक मुख्यालय दुबई येथे, मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे, तर कॉर्पोरेट कार्यालय पुण्यात आहे. एमडीएच मसाल्याचे चुनीलाल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, गायक बप्पी लहरी, संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्यासह इटली, मलेशिया, हंगेरी, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इथिओपिया, इराक आदी देशांचे दूतावास या फोरमचे मानद सभासद झाले आहेत. गेल्या वर्षभरात जीआयबीएफने आंतरराष्ट्रीय स्तरावर ८० कोटीची व्यावसायिक उलाढाल केली आहे.”

“जागतिक स्तरावरील उद्योजकांशी व्यावसायिक भागीदारी करण्याची संधी जीआयबीएफमुळे उपलब्ध होणार आहे. जागतिक स्तरावर उद्योगाला प्रोत्साहित करण्यासाठी राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘जीआयबीएफ पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यातील पश्चिम विभागाच्या पुरस्कारांसाठी निवड समितीने २५ उद्योजकांनी निवड केली आहे. व्हर्लपूल, फिनोलेक्स, केसरी यासह इतर उद्योग समूहांना सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवार, दि. ११ मे २०१९ रोजी सायंकाळी ७.०० वाजता पुण्यातील नगर रोडस्थित हॉटेल हयात येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. इथिओपिया, अफगाणिस्तान आणि इंडोनेशिया दूतावासातील अधिकारी यांच्यासह लीला पुनावाला, झेलम चौबळ आदी या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी सकाळी ९.०० वाजता ‘ट्रेड बियॉन्ड वेस्ट’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. परी रोबोटिक्सचे मंगेश काळे, एचडीएफसीचे अजय सचदेव, कॉऊन्सल जनरल इंडोनेशिया आडे सुकेदार, कौन्सुल जनरल इथिओपिया डेमेक अंबुलू, कौन्सुल जनरल नदीम शरीफी या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. यावेळी उद्योजकांच्या यशोगाथा ऐकण्याची संधी मिळणार आहे,” असेही डॉ. जितेंद्र जोशी यांनी नमूद केले आहे.

निलेश ओस्वाल म्हणाले, “अनेक मोठ्या कंपन्या लहान कंपन्यांकडून सेवा घेतात. लघु व माध्यम स्वरूपाच्या कंपन्यांना जोडण्याचे काम जीआयबीएफ करत आहे. जागतिक स्तरावर व्यवसाय विस्तारासाठी जवळपास ३२९ शहरांसोबत जोडले गेलो आहोत. हे सर्व जीआयबीएममुळे साध्य झाले आहे. त्यामुळे अनेक कंपन्या विविध देशांमध्ये ग्लोबल एक्सचेंग, प्रोग्रेस होण्यास मदत होणार आहे. ३१ जुलै रोजी तैवान ट्रेड ऑर्गनिझशनचे २० मेम्बर पुण्यात येणार असून जीआयबीएफसोबत वन-टू-वन बिझनेस करार होणार आहे. जीआयबीएफच्या माध्यमातून ग्लोबल कनेक्ट निर्माण होणार असून, वर्ल्ड ट्रेड सेंटर व जीआयबीएफसोबत जोडल्याचा आनंद आहे.”

पुण्यात जून अखेरपर्यंत पाणी कपात नाही; बापटांचा वायदा (व्हिडीओ)

पुणे : कॉंग्रेसच्या मोहन जोशी यांनी पाणी प्रश्नावर केलेले आरोप ..दुर्लक्षित करत ,ते अदखलपात्र आहेत असे सांगत ,पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज जून अखेर पर्यंत पुण्यात कोणत्याही प्रकारची पाणी कपात केली जाणार नाही असे घोषित  केले मात्र नागरिकांनी पाणी जपून वापरले पाहिजे असाही सल्ला यावेळी त्यांनी दिला  प्रत्येक दहा दिवसांनी पुण्याच्या आणि पुण्याच्या ग्रामीण भागाच्या पाण्याचा आढावा आपण घेणार असल्याचे ते म्हणाले.

धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री गिरिश बापट यांनी आज तातडीची बैठक बोलाविली होती. दुपारी महापालिका आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीस पाटबंधारे विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.तसेच महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे,नगरसेवक अमोल बालवडकर,योगेश मुळीक, तसेच आमदार जगदीश मुळीक,आमदार योगेश टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बापट यांनी सुमारे ४५ मिनिटे अधिकाऱ्यांशी चर्चा केली .शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत  जुलै 15 पर्यंत पुरेल याचे नियोजन करण्यात आले आहे.

मागली वर्षी हा साठा 8.20 टीएमसी होता तो या वर्षी 6 टीएमसी आहे.मात्र, पावसाळा लांबल्यास अडचण होण्याची शक्यता असल्याने पाटबंधारे विभागाने कपात वाढविण्याची मागणी केली आहे. त्यासाठी उद्या ( शनिवारी) ही बैठक होणार होती. मात्र, ती आज अचानक घेण्यात आली. यावेळी महापालिका आणि पाटबंधारे विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान शिल्लक साठा पुरेसा असून कपातीची गरज नसल्याचे बापट म्हणाले.
या बैठकी नंतर माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले पालकमंत्री….थेट त्यांच्याच शब्दात …

फार्टोडा, मडगाव येथे सुरू झालेल्या गोवा हेरिटेज फेस्टिव्हल मोठा प्रतिसाद

0

पणजी, ३ मे – गोवा हेरिटेज फेस्टिव्हल २०१९ ची ओपिनियन पोल स्क्वेयर फार्टोडा, मडगाव येथे मोठ्या धामधुमीत सुरुवात झाली.

गुरुवारी संध्याकाळी श्री. परिमल राय, आयएएस, माननीय प्रमुख सचिव, गोवा यांनी श्री. दौलत हवालदार, आयएएस, आयुक्त आणि सचिव, वित्त, गोवा सरकार, श्री. जे अशोक कुमार, आयएएस, सचिव, पर्यटन, गोवा सरकार, श्री. संजीव गडकर, संचालक, पर्यटन विभाग आणि इतर मान्यवरांच्या सन्मानीय उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन केले.

या महोत्सावाची सांगता रविवारी होणार असून तोपर्यंत विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन त्यात केले जाणार आहे. त्यामध्ये हेरिटेज संकल्पनेवर आधारित चित्रकला, फोटोग्राफी स्पर्धा यांचा समावेश असेल. त्याशिवाय हँडीक्राफ्ट्स, पुस्तके, खाद्यपदार्थ आणि पेयांचे स्टॉल्सचे आयोजन करण्यात आले असून ते पर्यटक व स्थानिकांना नक्की आकर्षित करतील.

हा महोत्सव चार दिवस चालणार असून त्यादरम्यान गोव्याच्या वारशाचा प्रसार केला जाईल.

सांडपाणी नि: सारण यंत्रणा देशभर अद्ययावत करा : नॅशनल ग्रीन ट्रबिन्यूल चा महत्वपूर्ण आदेश

0
पुणे :सांडपाणी नि: सारण यंत्रणा अद्ययावत करा, हा  नॅशनल ग्रीन ट्रबिन्यूल चा देशव्यापी आदेश जारी झाल्याची माहिती पुण्यातील पर्यावरण प्रेमी नितीन देशपांडे यांनी दिली.
पुण्यातील नितीन शंकर देशपांडे यांनी राष्ट्रीय हरित प्राधिकरणात केंद्र सरकारविरोधात दाखल केलेल्या याचिकेत न्या. आदर्शकुमार गोयल, के. रामकृष्णन,नगीन नंदा यांच्या पिठाने हा निर्णय ३० एप्रिल रोजी दिला.
सांडपाणी नि : सरणाच्या  प्रक्रिया यंत्रणा पालिका आणि देशभर जुन्या पद्धतीने चालवल्या जात आहेत. नद्या, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या  कार्यक्षेत्रात जुन्या निकषांना अनुसरून  सांडपाणी प्रक्रिया केंद्रे चालवली जात आहेत. त्यासाठी वेगवेगळे नियम पालिका, नद्यांना लागू होते. आता या निकालाद्वारे एकच आदेश लागू झाला आहे.
स्तित्वात असलेल्या एसटीपी यंत्रणा , निर्माणाधीन यंत्रणा आणि भविष्यातील यंत्रणा , या सर्व बाबतीत राष्ट्रीय हरित प्राधिकरणाचा हा आदेश लागू झाला असल्याची माहिती याचिकाकर्ते आणि पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते नितीन देशपांडे यांनी पत्रकाद्वारे दिली.
देशभर लागू झालेला हा निर्णय अत्यंत ऐतिहासिक आहे ‘ असे नितीन देशपांडे यांनी सांगितले.
सांडपाणी हे त्यावर प्रक्रिया झाल्यानंतरही, नदीत सोडले जाऊ नये, ते शेती आणि उद्योगासाठी वापरले जावे,नव्या अद्ययावत यंत्रणा वापरल्या जाव्यात, अशी मागणी नितीन देशपांडे यांनी याचिकेद्वारे केली होती. ही मागणी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने मान्य केली आहे.
केंद्र सरकारने एका महिन्यात या निकालाधारे अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना जारी करण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.
देशातील ३५३   या प्रदूषित आहेत.पैकी ३२३ नद्या  अतिप्रदूषित आहेत. त्याचे कारण जुन्या पध्दतीने या सांडपाणी प्रक्रिया करून नदीत पाणी सोडले जाते. त्याने नद्या अजून प्रदूषीत होत आहेत. राष्ट्रीय हरित प्राधिकरणात हे सर्व मुद्दे मांडल्यावर हा ऐतिहासिक निकाल प्राधिकरणाने दिला.
अजूनही नद्यांमध्ये पूर्णपणे प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जाते, हाच नद्या प्रदूषित होण्याचे मुख्य कारण आहे,
प्रक्रिया केंद्रांसाठी नियम शिथिल करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला ही हरित प्राधिकरणाने चपराक दिली आहे. प्राधिकरणाने या निकालावर निर्णय घेण्यासाठी तजज्ञ समिती नेमली होती. त्यात आयआयटी, निरी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रतिनिधींचा समावेश होता. या अहवालानंतर प्राधिकरणाने निर्णय दिला, असे नितीन देशपांडे यांनी सांगितले
राज्यस्तरातील सर्व प्रदूषण नियंत्रण मंडळांना हा आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू करण्यास सांगितले आहे.

महिंद्रातर्फे त्यांच्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे रूप बदलून नवी, उठावदार टीयूव्ही३०० लाँच

ही एसयूव्ही सर्व महिंद्रा वितरकांकडे ८.३८ लाख रुपये (एक्स शोरूम मुंबई) किंमतीत उपलब्ध

मुंबई, ३ मे २०१९ – २०.७ अब्ज डॉलर्सच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एम अँड एम) कंपनीने आज त्यांच्या टीयूव्ही३०० या एसयूव्हीला नवे रूप देत ती लाँच केली. या गाडीतील वैशिष्ट्ये सुधारण्यात आली असून काही नवी वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. नवी टीयूव्ही३०० ८.३८ लाख रुपयांत (एक्स शोरूम मुंबई) उपलब्ध करण्यात आली आहे.टीयूव्ही३००ही अस्सल एसयूव्ही डिझाइन असलेली कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागातील एकमेव गाडी असून ती आता जास्त ठळक आणि उठावदार वैशिष्ट्यासंहखरेदी करता येणार आहे. यामध्ये नवे, आक्रमक, पियानो ब्लॅक फ्रंट ग्रिल ब्लॅक क्रोमो इन्सर्टसह, दणकट साइड क्लॅडिंग आणि नव्याने तयार करण्यात आलेले एक्स आकाराचे मेटॅलिक ग्रे स्पेयर व्हील कव्हर समाविष्ट करण्यात आले आहे. डेटाइम रनिंग लॅम्प्ससह (डीआरएल) नवे हेडलॅम्प डिझाइन आणि कार्बन ब्लॅक फिनिश नव्या, बोल्ड टीयूव्ही ३०० ची स्टाइल आणखी उठावदार करणार आहे.पिनिनफारिना या इटालियन डिझाइन हाउसद्वारे तयार करण्यात आलेली अंतर्गत सजावट नव्या चंदेरी अक्सेंट्स आणि आलिशान लूक दर्शवणारी आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित वैशिष्ट्ये उदा. रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, १७.८ सेमी इन्फोटेनमेंट सिस्टीम, जीपीएससह, स्टॅटिक बेंडिंग हेडलॅम्प्स आणि मायक्रो- हायब्रीड तंत्रज्ञान या गाडीच्या मालकाला सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा अनुभव देणारी आहेत.

महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या ऑटोमोटिव्ह विभागाचे विक्री आणि विपणन प्रमुख विजय राम नाक्रा म्हणाले, ‘नवी, बोल्ड टीयूव्ही ३०० सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. अस्सल एसयूव्हीचे डिझाइन असलेल्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये सात आसनांची जागा आणि आरामदायीपणा यांची उच्च तंत्रज्ञानावर आधारित वैशिष्ट्यांशी सांगड घालण्यात आली आहे. टीयूव्ही ३०० ने एक लाख समाधानी ग्राहकांना सेवा देत यापूर्वीच कॉम्पॅक्ट एसयूव्ही क्षेत्रातले आपले स्थान बळकट केले आहे. नवे जास्त उठावदार आणि दणकट डिझाइन खऱ्या एसयूव्हीच्या शोधात असलेल्या आणि स्टायलिश स्टेटमेंट करू इच्छिणाऱ्यांना ग्राहकांना आकर्षित करेल असा मला विश्वास वाटतो.’

नव्या टीयूव्ही ३०० ला शक्तीशाली एमएचएडब्ल्यूके इंजिनची जोड देण्यात आली असून त्याची क्षमता १०० बीएचपी आणि २४० एनएम टॉर्क इतकी आहे. कुशन सस्पेंशन तंत्रज्ञान आणि ऑप्टिमाइज्ड राइड हाइटमुळे गाडी चालवण्याचा आनंद दुणावतो. त्याव्यतिरिक्त मजबूत प्रकारच्या स्टीलपासून बनवलेल्या टफ बॉडी शेलमुळे प्रवासी सुरक्षित राहातील. टीयूव्ही ३०० ची चासिस महिंद्रा स्कॉर्पिओवरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे.

 ग्राहकांना सात आकर्षक रंगांमधून निवड करता येणार असून त्यात हायवे रेड आणि मिस्टिक कॉपर या दोन नव्या रंगांचाही समावेश करण्यात आला आहे. स्टायलिश ड्युअल टोनशिवाय लाल आणि काळा/ चंदेरी आणि काळा, उठावदार काळा, मॅजेस्टिक सिल्व्हर आणि पर्ल व्हाइट हे मूळ रंगही उपलब्ध आहेत. सध्याच्या व्हेरिएंटशिवाय (टीफोरप्लस, टीसिक्सप्लस, टीएट आणि टीटेन) टी१०(ओ) चा पर्यायी पॅकही उपलब्ध आहे, ज्यात लेदर सीट्स आणि लंबर सपोर्ट मिळेल.

टीयूव्ही २०० ची नवी वैशिष्ट्ये

  • पियानो ब्लॅक फ्रंट ग्रिल
  • डीआरएलसह नवे हेडलॅम्प डिझाइन
  • एक्स आकाराचे मेटॅलिक ग्रे स्पेयर व्हील कव्हर
  • दणकट साइड क्लॅडिंग आणि चिन प्लेट
  • क्लियर लेन्स टेल लॅम्प्स
  • एक्सटेरियर पेंट पर्याय (हायवे रेड आणि मिस्टिक कॉपर)
  • चंदेरी अक्सेंट्ससह नवी अंतर्गत सजावट
  • रिव्हर्स पार्किंग कॅमेरा

फ्लॅटच्या आकारानुसार मेन्टेनन्स चार्ज नाहीच : न्यायालयाचा आदेश

0

पुणे : सहकारी संस्थेने मेन्टेनन्स चार्जची (देखभाल शुल्क) आकारणी फ्लॅटच्या आकारानुसार न करता सर्व सदनिकांच्या मालकांकडून समान शुल्क घेणे बंधनकारक आहे, असा अंतरिम निकालआणि आदेश  सहकार न्यायालयाने दिला आहे. तसेच, तूर्तास मेन्टेनन्स चार्ज जमा करू नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.अनेक ठिकाणी सोसायटीवर निवडून आलेले पदाधिकारी नियमांच्या नावाखाली सदनिकाधारकांना विविध मार्गे त्रास कसा देता येईल,स्व वर्चस्व कसे निर्माण करता येईल या साठी कार्यरत असतात,त्यातून नको झंझट म्हणून सदस्यांची अनेकदा फसगत होते .न्यायालयाच्या या निर्णयाने अशा पदाधिकाऱ्यांना हि आता सदस्य लक्ष करू शकणार आहेत .

कोथरूडमधील करिष्मा को-ऑप. हाउसिंग सोसायटी फ्लॅटच्या आकारानुसार मेन्टेनन्स चार्ज आकारत असल्याप्रकरणी दर्शन महाराणा, हर्षद अभ्यंकर, अभिजित चाफेकर, सोनाली राव आणि अरुण वेलणकर या पाच सभासदांनी दावा दाखल केला होता. सोसायटीच्या स्थापनेपासूनच फ्लॅटमध्ये किती बेडरूम आहेत, यावर मेन्टेनन्स चार्ज आकारला जात आहे. सध्याचा वार्षिक मेन्टेनन्स चार्ज हा टू बीएचकेसाठी 25 हजार 200, थ्री बीएचकेसाठी 38 हजार 800 आणि फोर बीएचकेसाठी 50 हजार 400 रुपये आहे. मात्र, सहकारी गृहनिर्माण संस्थेने समान मेन्टेनन्स चार्ज आकारणीबाबत राज्य सरकारने 21 एप्रिल 2000 रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार, सर्व निवासी फ्लॅटच्या मेन्टेनन्स चार्जची आकारणी त्यांच्या आकारावर न करता समान करणे बंधनकारक आहे. हा आदेश लक्षात घेता या सोसायटीची मेन्टेनन्स चार्ज आकारण्याची पद्धत बेकायदा आहे, असे ऍड. हरीश कुंभार, ऍड. राकेश उमराणी, ऍड. वनिती पंडित यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

अर्जदार सभासद सोसायटीत मेन्टेनन्स चार्ज आकारणीच्या मुद्द्यावर कायदेशीर पुराव्यांसह 2015 पासून प्रयत्न करत होते. त्यांनी प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मांडला होता. मात्र, त्यांना विरोध करण्यात आला. अर्जदार सभासदांनी सहकारी संस्थेच्या उपनिबंधकांकडे दाद मागितली होती. सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बेडरुमप्रमाणेच मेन्टेनन्स चार्जची आकारणी सुरू राहील, असा ठराव करण्यात आला होता, त्यामुळे सभासदांनी दावा दाखल केला. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने वरीलप्रमाणे अंतरिम आदेश दिला असून, या सभासदांकडून तूर्तास मेन्टेनन्स चार्ज आकारण्यास बंदी घातली आहे, अशी माहिती ऍड. उमराणी यांनी दिली.

  • ”सदनिकेचा मेन्टेनन्स चार्ज नेमका कशा प्रकारे घेतले जातो, याची माहिती अनेकांना नाही. त्यामुळे त्यांची अशाप्रकारे फसवणूक होते. या निकालामुळे फसवणूक झालेल्यांना दिलासा मिळणार आहे.”
    – राकेश उमराणी, वकील

महापालिकेत शिवसेनेच्या हातावर तुरी -प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी पहा कोण कोण नगरसेवक पुढे …

पुणे -लोकसभेला शिवसेनेचे सहाय्य घेतले आता महापालिकेतील पदांच्या वाटपात शिवसेनेला त्याचा मोबदला दिला पाहिजे अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या हातावर  भाजपने ‘तुरी’ठेवल्या आहेत .दरम्यान आज नगरसचिव सुनील पारखी यांनी प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली .9 प्रभाग समिती साठी प्रत्येकी 1/1 उमेदवारी अर्ज दाखल झाले तर 6 ठिकाणी प्रत्येकी २/२ उमेदवारी अर्ज दाखल झाले .सभागृहनेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, ”शिवसेनेला आम्ही एक समिती देता येणार होतो , तशी चर्चा देखील झाली; पण शिवसेनेने त्यांचा निर्णय कळवला नाही, त्यामुळे आमचे उमेदवार जाहीर करण्यात आले.”दरम्यान शिवसेनेची मात्र चार प्रभाग समित्यांवर अध्यक्ष पद मिळावे अशी मागणी होती .

महापालिकेतील शहर सुधारणासह चारही विषय समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने शिवसेनेचा महिला बाल कल्याण समितीचा हट्ट फेटाळला आणि क्रीडा किंवा विधी समिती घ्या असे सांगितले पण विषय समित्याचे वाटप यातच फिसकटले .नंतर शिवसेनेनेही आता ताठर भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. आता भाजपच्या ताब्यात येणाऱ्या अकरापैकी चार प्रभाग समित्यांची मागणी करीत, भाजपची अडवणूक केली. मात्र, सभागृहातील तुटपुंज्या ताकदीची जाणीव करून, भाजपने या सर्वच जागांवर आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे मनोमिलन होण्याची शक्‍यता फारच धूसर झाली आहे.

दरम्यान, येरवडा प्रभागात तीन नगरसेवक असल्याने प्रभाग समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ मिळण्याची शक्‍यता असतानाही शिवसेनेने मात्र आपला उमेदवार दिला नाही. महापालिकेत विषय समित्यांसह प्रभाग समित्यांसाठी निवडणूक होणार आहे, त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली.

लोकसभा निवडणुकीआधी भाजप- शिवसेनेची युती असल्याने चारपैकी एक विषय समिती देण्याबाबत भाजप नेत्यांनी शिवसेनेशी चर्चा केली होती. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने युतीनंतरही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील बेबनाव उघड झाला. विषय समित्यांचा वाद ताजा असतानाच प्रभाग समित्यांच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरूनही भाजप- शिवसेनेत मतभेद सुरू झाले आहेत.

भाजपकडे ११ प्रभाग समित्या जाण्याची शक्यता 
महापालिकेच्या विषय समित्यांसह १५ प्रभाग समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने त्यासाठी निवडणूक होत आहे. सभागृहातील संख्याबळानुसार १५ पैकी ११ समित्या भाजप, तर तीन समित्यांचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. एका प्रभाग समितीसाठी चिठ्ठी काढण्यात येईल. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी होती. ही प्रक्रिया पूर्ण झाली .

  •  क्षेत्रीय कार्यालयाची नावे आणि त्यापुढे अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल झालेल्या नगरसेवकांची नावे पहा 

औंध बाणेर -ज्योती कळमकर

शिवाजी नगर;घोले रोड -आदित्य माळवे

सिंहगड रोड -नीता दांगट

वानवडी;रामटेकडी – रत्नप्रभा जगताप

कोंढवा;येवलेवाडी- मनीषा कदम

कसबा ;विश्रामबागवाडा -स्मिता वस्ते

बिबवेवाडी – प्रवीण चोरबोले

येरवडा -मारुती सांगडे

कोथरूड -छाया मारणे

नगर रोड -सुमन पठारे ,मुक्ता जगताप

ढोले पा. रोड- मच्छिंद्र गायकवाड ;मंगला मंत्री

सहकार मगर :धनकवडी -युवराज बेलदरे ,दिशा माने

वारजे :कर्वेनगर -लक्ष्मी दुधाने ,जयंत भावे

हडपसर;मुंढवा -पूजा कोंढरे ,उज्वला जंगले

भवानी पेठ -वनराज आंदेकर ;सुलोचना कोंढरे

 

 

 

बड्या हस्तींच्या बड्या मोटारी लक्ष -पुण्यात’धूम’टोळी सक्रीय- पोलीस नेहमीप्रमाणे निष्क्रिय

पुणे : नगरसेवकांसह राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांच्या महागड्या फॉर्च्युनर कार चोरून नेण्यावर सध्या चोरट्यांच्या टोळीने जोरदार सपाटा लावल्याची सद्यःस्थिती आहे. मंगळवारी रात्री चोरट्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातून अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने तब्बल तीन फॉर्च्युनर कार (फॉर्च्युनर) चोरून नेल्या. काही दिवसांपासून शहरात कार चोरीचे प्रकार वाढले असूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याची सद्यःस्थिती आहे.

नगरसेवक पोटे यांची मोटार सिंहगड रस्त्यावरून त्यांच्या घराजवळून २४ जानेवारीला मध्यरात्री २ ते ३ च्या दरम्यान चोरीस गेली होती. या वेळी ही गाडी शोधण्याचा प्रयत्नही पोटे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आला. मात्र, त्यांच्यासह पोलिसांना त्यात यश आले नाही आणि पुणे शहरातून ‘फॉर्च्युनर’ चोरण्याचा सपाटा सुरू झाला. त्यानंतर नऊ एप्रिलच्या पहाटे मिलिंद वस्ते यांची ‘फॉर्च्युनर’ चोरीला गेली. एका कारमध्ये आलेल्या तीन चोरट्यांनी अवघ्या काही वेळात त्यांची कार चोरली. या वेळी कारचा वाजलेला सायरन त्यांनी अवघ्या काही सेकंदात बंद केला आणि सराईतपणे कार चोरली. त्यानंतर चोरट्यांचे धाडस अधिकच वाढले.

चोरट्यांनी २९ एप्रिलच्या मध्यरात्री पुन्हा ‘फॉर्च्युनर’ चोरी केल्या. कसबा पेठेत रस्त्यावर पार्क करण्यात आलेली राजवर्धन शितोळे यांची ‘फॉर्च्युनर’ अवघ्या १५ मिनिटांत चोरट्यांनी चोरली. चोरीच्या ‘फॉर्च्युनर’मध्ये बसून चोरटे जुना तोफखाना येथे आले. तेथे, नगरसेवक धंगेकर यांची ‘फॉर्च्युनर’ पार्क केलेली होती. चोरट्यांनी ते आलेल्या मोटारीमध्ये बसून तंत्रज्ञानाच्या साह्याने धंगेकर यांच्या ‘फॉर्च्युनर’चे लॉक उघडले आणि काही मिनिटात त्यांनी धंगेकर यांची ‘फॉर्च्युनर’ चोरली आणि ते पसार झाले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा कोथरूडकडे वळविला.

कोथरूड येथील अनिल विटेकर यांची ‘फॉर्च्युनर’ केळवाडी चौकात पार्क करण्यात आली होती. चोरट्यांनी पहाटे चारच्या सुमारास ती मोटार अगदी सहज चोरली. चोरट्यांनी सराईतपणे अवघ्या पाच ते सहा मिनिटांत तीही मोटार चोरली. तेथे उपस्थित असलेल्या बँकेच्या सुरक्षारक्षकाला विटेकर यांचा चालक ती मोटार नेत असावा, असे वाटले. चोरट्यांकडून सुरू असलेला ‘फॉर्च्युनर’ चोरीचा सपाटा पाहून इतर ‘फॉर्च्युनर’ मालकांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. ‘फॉर्च्युनर’ रस्त्यावर पार्क केली, तर ती सहज चोरीला जात असल्याने या मोटारींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोथरूडमधील केळेवाडी येथील अनिल विठ्ठल विटेकर यांच्या मालकीची फॉर्च्युनर कार चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. विटेकर यांनी त्यांच्या घरासमोर बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कार लावली होती. त्यानंतर चोरट्यांनी त्यांची चोरून नेली. विटेकर यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

कसबा पेठेतील कारचोरीप्रकरणी राजवर्धन योगेंद्र शितोळे (वय 36, रा.शनिवार पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शितोळे हे सोमवारी रात्री कसब्यातील त्यांच्या जुन्या घरी गेले होते. त्यांनी त्यांची फॉर्च्युनर कार (एमएच 12, एमबी 7070) कसबा पेठेतील रॉयल ट्रॅव्हल्ससमोरील मोकळ्या जागेत लावली होती. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांची कार चोरून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे नऊ वाजता शितोळे यांना आपली कार चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान शिवाजीनगर येथील जुना तोफखाना परिसरात दिलीप राणे यांनी त्यांच्या ताब्यातील फॉर्च्युनर कार (एमएच 12 एलडी 5472) रस्त्याच्याकडेला मंगळवारी रात्री दहा वाजता लावली होती. दरम्यान, कसबा पेठेतून कार चोरणाऱ्या चोरट्यांनीच पहाटे तीन वाजता राणे यांची कार अवघ्या 18 मिनीटांमध्येच चोरून नेली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राणे बाहेर जाण्यासाठी निघाले, तेव्हा कार चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान ही कार नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या मालकीची असल्याची माहिती पुढे आली.

नगरसेवक दीपक पोटे यांची फॉर्च्युनर कार त्यांच्या घरासमोरून चोरीस गेली होती. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. दरम्यान बिबवेवाडी परिसरातील एका माजी नगरसेवकाचीही फॉर्च्युनर कार चोरीस गेली. याबरोबरच सहकारनगर येथूनही एक वॅगनर कार मागील आठवड्यात चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. असे असूनही पोलिसांकडून कार चोरीच्या प्रकरणाचा संथगतीने तपास सुरू आहे.