डीईएसमध्ये ‘शासन निर्णय कार्यशाळा’
सत्तेसाठी द्वेष वाढविण्याच्या कटाला बळी पडू नये : डॉ.कुमार सप्तर्षी
राजीव गांधींचा अपमान म्हणजे देशाचा अपमान – मोहन जोशी
पुणे-‘राजीव गांधी हे मिस्टर क्लीन असल्याचे सुरूवातीला सांगितले जात राहिले आणि ‘भ्रष्टाचारी नं. 1’ अशी त्यांची जीवनाची अखेर झाली’ अशी विपर्यस्त आणि जहरी टीका दुसर्यांदा पंतप्रधानपद मिळावे यासाठी वेडेपिसे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. याचा काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो. सर्व शहिदांना सदैव वंदन करणारा प्रत्येक भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा धिक्कार करेल ही खात्री व्यक्त करतो. देशातील जनता आता आपल्याला झिडकवणारं आणि सत्ताबदल झाल्यानंतर राफेल घोटाळ्यातील भ्रष्टाचार उघड होईल या भितीने गांगरून गेल्यामुळेच ते अशी बेछूट विधाने करीत आहेत असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी म्हटले आहे.
मोहन जोशी पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणूकीत गेल्या 5 वर्षात आपल्या सरकारने काय केले हे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने जनतेला सामोरे जायला हवे होते. मात्र देशापुढील कोणतेच प्रश्न सोडवता न आल्यामुळे वैयक्तिक खालच्या पातळीवरील टीका करीत वणवण भटकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शहीद पंतप्रधान राजीव गांधींवरील टीका हा असाच वैफल्यग्रस्तेतून केलेला प्रयत्न आहे. 1984-85 मध्येच देशात संगणक क्रांती करून आधुनिक भारताचा पाया रचणार्या कर्तबगार पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशासाठी बलीदान दिले, देशासाठी ते शहीद झाले. राजकीय हेतुने प्रेरीत होऊन त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपामधूनही न्यायालयाने त्यांची मरणोत्तर निर्दोष मुक्तता केली. हा इतिहास माहित असूनही पुन्हा पंतप्रधानपद मिळावे त्यासाठी उताविळ झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधींवर अशी टीका करून शहीदांचा अपमानच केला आहे.
शहीदांचा अपमान करायचा ही भाजपची विकृत संस्कृती आता लपून राहिली नाही. भोपाळमधील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी देखील महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख शहीद हेमंत करकरे यांना त्यांनी शाप दिल्यामुळेच ते मारले गेले असे बेताल वक्तव्य केले होते. शहीद पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले द्वेषाने भरलेले विधानही हीच विकृत परंपरा दाखवते. विशेष म्हणजे पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या नावाने मते मागताना याच पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजिबात वावगे वाटले नाही. ‘काहीही करा पण मला पुन्हा पंतप्रधान करा’ असा आक्रोश करीत ते सध्या देशभर फिरत आहेत. 23 मे रोजी देशातील जनता मात्र या अपयशी आणि हुकूमशाही वृत्तीच्या पंतप्रधानांना सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही आणि ‘सर्वात अपयशी पंतप्रधान’ अशी नोंद त्यांच्याबद्दल इतिहासात कायमची नोंदवली जाईल हे निश्चित.
भारती विद्यापीठाचे राष्ट्रीय टेक्नो कल्चरल फेस्ट २३,२४ रोजी
१८०० विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे :
महापालिकेचे कामगार सल्लागार जागे झाले ..कंत्राटी कामगारांचे वेतन बँकेत जमा करा म्हणाले..
पुणे -कंत्राटी कामगारांची आर्थिक पिळवणूक करणारी महापालिका असा पुरस्कार खरे तर कोणी या महापालिकेला देत का नाही ? असा प्रश्न कधी कधी पडतो , बोगस कामगार दिमतीला ठेवणे , ते उघडकीस आणूनहि त्याबाबत लाज न बाळगणे ,अशा स्वरूपाच्या धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेतील कामगार सल्लागारांना जणू जाग आली कि काय ? असे वाटण्यासारखी हि बातमी आहे …काय आहे ती बातमी ते पहा …
महापालिकेच्या विविध विभागांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणत्याही स्थितीत वेतन अथवा देय असलेले भत्ते रोख स्वरूपात न देता ते आरटीजीएस अथवा धनादेशाद्वारेच त्यांच्या खात्यात जमा केले जावेत, असे आदेश महापालिका प्रशासनाने काढले आहेत. या कामगारांना दरमहिन्याला ठराविक रक्कम रोख स्वरूपात दिली असल्याचे दाखवून त्यांच्या हक्काच्या वेतनावर डल्ला मारण्याचा घाट ठेकेदारांकडून घातला जात आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे आदेश कामगार सल्लागार विभागाकडून सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत. महापालिकेच्या घनकचरा, पाणी पुरवठा, ड्रेनेज, भवन विभागासह क्षेत्रीय कार्यालयांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात ठेकेदारांच्या माध्यमातून कंत्राटी कामगार घेतले जातात.
त्यांना महापालिकेकडून किमान वेतनाच्या दराने वेतन देण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात ठेकेदारांकडून त्यांना अवघे पाच ते सहा हजार रुपयेच दिले जात असल्याचे तसेच त्यांचे ईपीएफ आणि इतर भत्ते भरलेच जात नसल्याचे समोर आल्याने महापालिकेने या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनात मोठ्या प्रमाणात शिस्त आणली आहे. त्यानुसार, त्यांचे ईपीएफ भरणे, बॅंक खाते उघडणे ठेकेदारांना बंधनकारक केले असून कर्मचाऱ्यांना वेतनचिठ्ठीही (पे-स्लीप) देणे अनिवार्य केले आहे. असे असतानाच; कर्मचाऱ्यांना पैशांची गरज असल्याचे भासवत अनेक ठेकेदारांकडून महिन्याच्या सुरूवातीलाच त्यांना उचल म्हणून रोख रक्कम दिली जात असल्याचे दाखविले जात आहे. तर त्याचे कोणतेही पुरावे या ठेकेदरांकडे नसतात.
त्यामुळे कर्मचाऱ्यांना खरच रक्कम दिली का नाही याची खातरजमा करण्यात प्रशासनाला अडचणी येतात, याचाच गैरफायदा घेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात गोलमाल केला जात असल्याचे वृत्त स्थानिक दैनिकातून प्रसिद्ध झाले होते. त्याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने आता कर्मचाऱ्यांना कोणतेही उचल अथवा देय भत्ते द्यायचे असल्यास ते आरटीजीएस अथवा धनादेशाद्वारे त्यांच्या बॅंक खात्यात भरणे ठेकेदारांना बंधनकारक केले आहे.
त्यामुळे त्यांच्या हक्काचे पैसे कर्मचाऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या शिवाय, वेतनचिठ्ठी असल्याशिवाय ठेकेदारांना या कामगारांच्या वेतनाची रक्कम दिली जाणार नाही तसेच प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना वेतन देणे बंधनकारक करण्यात आले असून वेतन देण्यास विलंब केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
महापालिकेत बापट समर्थकांचा झेंडा …अमोल बालवडकर,ज्योत्स्ना एकबोटे,योगेश समेळ,विजय शेवाळे विषय समित्यांचे अध्यक्ष
पुणे : महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांची, तर उपाध्यक्षपदी धनराज घोगरे यांची, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांची, तर उपाध्यक्षपदी डॉ. श्रद्धा प्रभुणे यांची, विधी समितीच्या अध्यक्षपदी योगेश समेळ यांची, तर उपाध्यक्षपदी वीरसेन जगताप यांची, क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी विजय शेवाळे यांची, तर उपाध्यक्षपदी महेश वाबळे यांची निवड करण्यात आली.निवड झालेले सर्व नगरसेवक पालकमंत्री गिरीश बापट यांचे समर्थक मानले जातात
महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने या समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसनेही उमेदवार उभे केले होते. मात्र, महापालिकेत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने चारही समित्यांचे अध्यक्ष-उपाध्यक्षपद भाजपकडे राहिले.
प्रत्येक समितीत 13 सदस्य आहेत. त्यापैकी भाजपचे आठ, तर राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे चार आणि शिवसेनेचा एक सदस्य आहे. निवडणुकीत पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.
नाराज शिवसेनेने पाळला युतीचा धर्म
महापालिकेतील विषय समित्यांसह प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने डावलल्यानंतर ताठर भूमिका घेतलेल्या शिवसेनेने आता एक पाऊल मागे घेतले असून, विषय समित्यांच्या निवडणुकीत भाजपला साथ देत युतीचा धर्म पाळल्याचे शिवसेनेने दाखवून दिले. परंतु, भाजपच्या भूमिकेबाबत शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे शनिवारी पुन्हा उघड झाले.
विषय समित्यांपैकी शहर सुधारणा किंवा महिला बालकल्याण समितीच्या मागणीवर शिवसेना ठाम होती. मात्र, शिवसेनेच्या मागणीआधीच क्रीडा किंवा विधीपैकी एका समितीचे अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव भाजप नेत्यांनी शिवसेनेपुढे ठेवला होता. त्यावरून नाराज झालेल्या शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळला होता. त्यामुळे युतीच्या नेत्यांमधील मतभेद दिसून आले. त्यानंतर प्रभाग समित्यांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यानही या दोन्ही पक्षांत नाराजीनाट्य रंगले.
भाजपकडील 11 पैकी चार समित्या देण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली. मात्र, प्रभागांमधील ताकद दाखवून देत एका समितीचा भाजपचा प्रस्ताव शिवसेनेने नाकारला. त्यामुळे लोकसभा निवडणूक संपूनही आठवडा होण्याआधीच युतीला तडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, विषय समित्यांच्या निवडणुकीत भाजपचे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना शिवसेनेच्या सदस्यांनी मतदान केल्याने महापालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते संजय भोसले म्हणाले, “”आम्ही युतीचा धर्म पाळला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मदत केली आहे. या पुढील काळात आम्ही भूमिकेवर ठाम असू.”
शरद पवारांचे दुसरे नातू विधानसभेच्या आखाड्यात, रोहित पवारांनी सुरू केली तयारी…
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अजून एक पिठी राजकारणात आपली पाय जमवण्यास तयार झाली आहे. पवारांचे नातू रोहित पवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. स्वत: रोहित पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली. आपण विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असून, अद्याप मतदारसंघ ठरला नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना रोहित पवार याबाबत म्हणाले, लोकांशी चर्चा केल्यानंतर लक्षात येते की गेले 12 वर्ष मी व्यावसाय करताना सामान्य नागरिकांशी माझी नाळ जोडली गेलेली आहे. काम करताना माझा सामाजाचा अभ्यासही चांगला झालेला आहे. त्यामुळे विधानसभा लढण्याचा माझा विचार आहे. मी कुठून लढणार याचा निर्णय पक्षाचे नेते चर्चा करून त्याचा निर्णय घेतील. हा निर्णय मला मान्य असेल. मी पवार साहेबांच्या विचाराने काम करतो, त्यामुळे जामखेड भागातून आपल्याच विचाराचा आमदार निवडून आला पाहिजे. या भागातील शेती, महिला, तरुणांचे प्रश्न या भागातून निवडून येणारा आमदार निश्चीत सोडवेल.
नियोजन न केल्याने पाण्याचा प्रश्न
पाण्यावरून शहरी आणि ग्रामीण असा वाद नाही. सध्याच्या सरकारमधील पालकमंत्री, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी व्यवस्थित नियोजन न केल्याने पाणी कमी पडत आहे. व्यवस्थित नियोजन असते तर ही स्थिती निर्माण झाली नसती. पाणी वापराबाबत प्रबोधन केले तर पुणेकर आणखी योग्य प्रकारे पाणी वापरतील असेही पवार यांनी सांगितले.
पाच वर्षात पार्थ काय बदल करतील याचा विचार करा
मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना मार्गदर्शन केले नाही का? असे विचारले असता पवार म्हणाले, पार्थ यांना 22 लाख मतदारांपर्यंत पोहोचायचे होते आणि मी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये फिरत होतो. आमची चर्चा नक्कीच होत असते, एकमेकांचे विषय समजून घेत असतो. पार्थ चांगल्या मतांनी निवडून येतील. सुरूवातीला पार्थ यांना काही लोकांनी ट्रोल केले, पण त्यांचे सुरूवातीचे भाषण आणि शेवटचे भाषण यात फरक आहे. या 20 दिवसात त्यांच्यात बदल केला. तर पाच वर्षात पार्थ या परिसराचा काय बदल करतील याचा तुम्ही विचार करा असेही पवार म्हणाले.
- रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडून बारामतीचे प्रतिनिधित्व करतात. पवार कुटुंबातील असल्याने मोठे राजकीय वलय त्यांना आहे. पण, रोहित पवार कुठल्या मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार, याची माहिती नसल्याने, राजकीय वर्तुळात खळबळं उडाली आहे.
कोण आहेत रोहित पवार?
रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू. राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री आप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे बंधू. राजकारणात रोहित पवार यांची ओळख शरद पवारांच्या नावाने होणे सहाजिक आहे. मात्र, पवारांच्या नावासोबत येणारी भलीमोठी जाबाबदारीही पेलण्याची ताकद रोहित पवारांमध्ये आहे. शरद पवारांकडे जे शेतीविषयक अफाट ज्ञान आहे, त्याची चुणूक रोहित पवारांमध्ये दिसून येते.
वडिलांसोबत सुरुवातीला व्यवसायात उतरलेल्या रोहित यांनी पुढे आजोबा आणि काकाच्या पावलावर पाऊल टाकत, राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरसुफळ गणातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढलवी आणि राज्यात दुसऱ्या, तर पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्क्यांनी ते निवडून आले. राजकारणातील त्यांचा प्रवेशही मोठ्या दिमाखात झाला. सध्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून विविध कामांचा धडाका त्यांनी सुरु केला आहे. या कामांची सोशल मीडियासह अनेक ठिकाणी चर्चा सुरु असते.
रोहित पवार सध्या भूषवत असलेली पदे
-मुख्य कार्यकारी अधिकारी, बारामती अॅग्रो लिमिटेड
– अध्यक्ष, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन
-उपाध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन
– संचालक, आयएसईसी
– नियमक मंडळ सदस्य, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट
– कार्यकारी सल्लागार समिती सदस्य, इंडियन पोल्ट्री इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडिया
मी सरपंचांना जाहीरनामा पाठवतेय, भाजपवाले त्यांना लिफाफ्यात 20 हजार रुपये पाठवत आहेत; प्रियंकांचा गंभीर आरोप
भाजप सरकारने शेतकऱ्यांचे नव्हे, उद्योजकांचे कर्ज केले माफ
प्रियंका यापुढे म्हणाल्या, देशात लोकशाही जिवंत ठेवणारे आणि सामान्य जनतेसाठी काम करणारे सरकार हवे आहे. भाजपचे हेतूच वाइट आहे. बोटांवर मोजण्याइतक्या मोठ्या उद्योजकांचे भले होईल अशी त्यांची धोरणे आहेत. सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाही. परंतु, 5 वर्षांत त्यांनी उद्योजकांचे 5.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे.
15 लाख अजुनही मिळाले नाहीत…
प्रियंका यांनी सांगितल्याप्रमाणे, पीएम नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये आश्वासन दिले होते, की देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील. ते 15 लाख अजुनही आलेले नाहीत. आमची सत्ता आल्यास गरीबांच्या खात्यांत न्याय योजना अंतर्गत दरवर्षी प्रत्येकी 72 हजार रुपये दिले जातील. लोकांनी काँग्रेसचा जाहीरनामा वाचावा असे आवाहन प्रियंका यांनी केले आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आली तेव्हा सर्वात पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे झाले याची आठवण प्रियंका यांनी सभेत करून दिली.
अरविंद केजरीवालांवर रोड शो दरम्यान हल्ला, अज्ञात युवकाने जीपवर चढून कानशिलात लगावली
दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर भर रस्त्यावर हल्ला झाला. मोतीनगर परिसरात ते शनिवारी रोड शो करत होते. त्याचवेळी अचानक एक युवक त्यांच्या जीपच्या बोनटवर चढला आणि चापट मारले. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी ते रस्त्यावर उतरले होते. या दरम्यान त्यांनी हात उचलून सर्वांना अभिवादन केले. याच दरम्यान लाल रंगाचे शर्ट घातलेल्या एका युवकाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्याच ठिकाणी उपस्थित आपच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला पकडले.
‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’वर मोफत मार्गदर्शन
सृजन फौंडेशन व एमपीएससी स्टुडंट्स राईट्सतर्फे स्पर्धा परिक्षा राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन
गिरीश बापट यांनाच पुणेकर अदखलपात्र करतील- मोहन जोशी
पुणे-पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असताना त्याचे योग्य
नियोजन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले नाही. त्यामुळेच पुणेकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या
संकटाला सामोरे जावे लागत आहे. या मी केलेल्या जाहीर टिकेला उत्तर देण्याऐवजी ‘अदखलपात्र’
अशी संभावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी करून पुणेकरांच्या जीव्हाळ्याच्या प्रश्नाला बगल देण्याचा
प्रयत्न केला. मात्र पुणेकर जनता त्यांनाच २३ मे रोजी म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकालाच्या
दिवशी अदखलपात्र करेल अशी टीका काँग्रेसचे नेते व काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष
आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी केली. गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री आहेत मालकमंत्री
नाहीत अशी टिका ही मोहन जोशी यांनी केली.
मोहन जोशी म्हणाले कि काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत पुणेकरांना पाण्याचा प्रश्न
भेडसावला नाही कारण आम्ही पुणेकरांचे हित साधण्यासाठी पाण्याचे नियोजन केले. पालकमंत्री गिरीश
बापट यांनी मात्र ग्रामीण भागात भाजपला मते मिळतील या आशेने पुणेकरांना वेठिस धरून पुण्याच्या
पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा बट्याबोळ केला त्यामुळेच पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या
संकटाला तोंड द्यावे लागत आहे या संदंर्भात योग्य खुलासा करण्याऐवजी ‘अदखलपात्र’अशी
उडवाउडवीची उत्तर देणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापट यांनाच पुणेकर जनता २३ मे रोजी
‘अदखलपात्र’ठरवेल असे मोहन जोशी यांनी म्हंटले तसेच पुण्याचा पाणीप्रश्नासह, नागरीप्रश्न आणि
विकास प्रकल्प यासंदंर्भात आपण पुण्याचे मालकमंत्री म्हणून नाही तर पालकमंत्री म्हणून पुणेकरांच्या
हितासाठी काम करायला हवे होते अशी टीका ही मोहन जोशी यांनी केली.
डॉ. बाळकृष्ण दामले यांना ‘ नेल्सन मंडेला शिक्षारत्न सन्मान’
कर्वे समाज सेवा संस्थेत समाजकार्य पदव्युत्तर अभ्यासक्रम
प्लास्टिक बंदीसाठी कारवाई-रिटेल व्यापारी संघाच्या वतीने महापालिकेचा निषेध
पुणे, दि. 4 मे : प्लास्टिक बंदीसाठीच्या कारवाईने पुन्हा एकदा डोकं वर काढले असून शहरात आज महापालिकेकडून दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. परंतु, ही कारवाई बेकायदेशीर असून दंड वसूल करण्याच्या हेतुने प्रेरित होती, असा आरोप पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच, या कारवाईचा आम्ही जाहीर निषेध करीत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सांगितले.
शहरातील कात्रज, धनकवडी, चंदननगर, सिंहगड रस्ता परिसरातील दुकानदारांवर प्लास्टिक बंदीबाबत कारवाई करण्यात आल्याची माहिती निवंगुणे यांनी दिली. ते म्हणाले की, प्लास्टिक पिशव्यांचा वापर किरकोळ दुकानदारांकडून कमी झाला आहे. मात्र, रस्त्यावरील विक्रेत्यांकडून त्याचा वापर होत आहे. असे असताना महापालिकेकडून केवळ दंडाची रक्कम गोळा करण्याच्या हेतुनेच किरकोळ दुकानदारांना लक्ष्य केले जात आहे. चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांवर जरुर कारवाई करावी परंतु बेकायदेशीरपणे अन्यायकारक कारवाईस आमचा विरोध आहे.
बिबवेवाडीतील एका दुकानदारांवर कारवाई करताना त्याचा वजनकाटा जप्त करण्यात आला. हे कोणत्या कायद्यात बसते असा सवालही व्यापारी विचारत आहेत. संघटनेच्या पातळीवर प्लास्टिक बंदीबाबत जागृती करीत असतानाच त्याचा पूनर्वापर व त्यापासून वस्तू तयार करण्याचे काम सुरु आहे. सकारात्मक भूमिकेत किरकोळ व्यापारी व दुकानदार असताना त्यांच्यावर अशा प्रकारे चुकीची कारवाई होऊ नये हीच अपेक्षा आहे, असेही निवंगुणे म्हणाले.

