Home Blog Page 2938

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष,भाजपचे माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांना मारहाण

0
पुणे : गो रक्षक म्हणून गो शाळा चालविण्यावरुन झालेल्या वादातून समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष आणि पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे व त्यांच्या साथीदारांना गो रक्षकांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली़. ही घटना पुरदंर तालुक्यातील झेंडेवाडी येथे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडला़. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित मोडक व विवेक मोडक हे वडकीमध्ये हंबीरराव मोहिते गो शाळा चालवितात़. गो रक्षा संबंधी एक महिन्यापूर्वी आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकली होती़. तेव्हा मिलिंद एकबोटे यांना सबुरीने घेण्यास सांगितले होते़. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता़.
पुूरंदर तालुक्यातील मौजे झेंडेवाडी येथील ज्वाला मंदिरात मिलिंद एकबोटे  हे कार्यकर्त्यांसह देवदर्शन व प्रवचनासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम संपल्यानंतर ते जवळच असलेल्या शनि मंदिरासमोर जेवणासाठी बसले असताना तेथे पंडित मोडक , विवेक  मोडक , निखिल दरेकर हे ४० ते ५० लोकांचा जमावासह  आले. पंडित मोडक यांनी एकबोटे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत सासवड मध्ये राहायचे नाही अशी धमकी दिली.  तसेच एकबोटे यांना मारहाण केली़. अभिषेक वाघमोडे याच्या हातावर चाकून चाकूने वार केला़. प्रतिक गायकवाड याला देखील जमावाने मारहाण करुन डोळ्यात मिरचीची पूड टाकण्याचा प्रयत्न केला़. आपल्यावर असलेल्या रागातून पंडित मोडक, विवेक मोडक यांच्या सांगण्यावरुन त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली़.
या गुन्हयाचा तपास सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए.बी.घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोेलीस करत आहे.
कोण आहेत मिलिंद एकबोटे ?मिलिंद एकबोटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. सन 1997 ते सन 2002 दरम्यान ते पुणे महानगरपालिकेत भाजपचे नगरसेवक होते. सन 2002 मध्ये भाजपने त्यांना मनपा निवडणुकीत तिकीट नाकारले. अपक्ष निवडणूक लढवुन एकबोटे नगरसेवक म्हणुन निवडुन आले. त्यांनी सन 2007 मध्ये समस्त हिंदू आघाडी या संघटनेची स्थापना केली. सन 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणुक लढविली. मात्र, ते पराभुत झाले. मिलिंद एकबोटे यांच्यावर भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीचे आरोप असून त्यांच्याविरूध्द विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.

महिंद्रा हा भारतातील सर्वात आकर्षक ट्रॅक्टर ब्रँड

टीआरएच्या भारतातील सर्वात आकर्षक ब्रँड – भारतातील पाहणी 2018 यावर आधारित

 मुंबई: भारतातील 16 शहरांतील 5,000 ब्रँडचा समावेश करणाऱ्या पाहणीमध्ये, 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या ‘महिंद्रा’ ट्रॅक्टर्सला ट्रस्ट रिसर्च अॅडव्हॉयजरीने (टीआरए)‘भारतातील सर्वात आकर्षक ब्रँड्स’ – भारतातील पाहणी 2018 या अहवालाच्या पाचव्या आवृत्तीमध्येभारतातील सर्वात आकर्षक ट्रॅक्टर ब्रँड म्हणून गौरवण्यात आले आहे. ही पाहणी टीआरएच्या प्रोप्रायटरी ब्रँडअॅट्रॅक्टिव्हनेस मॅट्रिक्स वर आधारित असून, त्यामध्ये ब्रँड अॅट्रॅक्टिव्हनेसची 36 वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.

टीआरए पुरस्कार मिळाल्याबद्दल, एमअँडएम लि.चे फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष राजेश जेजुरीकर म्हणाले, “टीआरए पुरस्कार म्हणजे, शेतीच्या प्रच्येक प्रकारच्या उपयोगासाठी विविध प्रकारचे ट्रॅक्टर उपलब्ध करण्याबरोबरच, जागतिक ग्राहक-केंद्री ब्रँड निर्माण करण्याच्या आमच्या कामाचा गौरव आहे. महिंद्रामध्ये आम्ही यशस्वी होण्यासाठी सातत्याने ग्राहकांबरोबर काम करण्याचा आणि त्यांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. या पुरस्कारासाठी टीआरएचे आभार मानत असताना, आम्ही यापुढेही ट्रॅक्टर व फार्म मशीनरी या दोन्ही क्षेत्रांमध्ये नवी उत्पादने विकसित करण्यासाठी काम करत राहणार आहोत. त्यासाठी नावीन्य व तंत्रज्ञान यावर भर देणार आहोत”.

टीआरए रिसर्चचे रिसर्च डायरेक्टर सचिन भोसले यांनी सांगितले, “ब्रँड आकर्षक ठरण्यासाठी महिंद्रा ट्रॅक्टर्स कम्युनिकेशन महत्त्वाची दुहेरी भूमिका बजावत आहे. एक म्हणजे, यामुळे ब्रँडमधील आकर्षकपणा उठून दिसतो, आणि दुसरे म्हणजे, हा आकर्षकपणा भारतातील शेती क्षेत्रातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली जाते. महिंद्रा म्हणजेच ट्रॅक्टर असे समीकरण झाले आहे आणि एक ब्रँड म्हणून तो सर्व भारतीय ट्रॅक्टर ब्रँडमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या यशासाठी महिंद्राचे अभिनंदन.”

टीआरएचा ‘बाइंग प्रॉपेन्सिटी’ निर्देशांक ही शास्त्रीय पद्धत असून, तो ग्राहकांची उत्सुकता समजून घेण्यासाठी व मोजण्यासाठी ग्राहकांच्या खरेदी प्रक्रियेच्या मुळाशी जातो. ग्राहकांच्या प्रभावाबाबतच्या खरेदीला चालना देणाऱ्या ओव्हर्ट, कव्हर्ट व काँटेक्शुअल घटकांद्वारे हा निर्देशांक हे समजून घेतो. बाइंग प्रॉपेन्सिटी निर्माण करणे म्हणजे, ब्रँडविषयी ग्राहकांचा नैसर्गिक कल निर्माण करणे व हा कल ग्राहकाच्या विश्वासाच्या (खरेदी करण्यासाठी व्यवहारात्मक चालनादायी घटक) व आकर्षकपणाच्या (खरेदी करण्यासाठी मानसिक-सामाजिक-सांस्कृतिक चालनादायी घटक) आधारे निर्माण केला जातो.

 महिंद्राविषयी

20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे.त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.

शिवशाहीर पुरंदरे यांना जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून पद्मविभूषण पुरस्‍कार प्रदान

0

पुणे– बळवंत मोरेश्‍वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍या हस्‍ते पद्मविभूषण पुरस्‍कार त्‍यांच्‍या निवासस्‍थानी आदरपूर्वक प्रदान करण्‍यात आला. पुरंदरे यांना भारत सरकारने सन 2019 मध्‍ये पद्मविभूषण पुरस्‍कार जाहीर केला होता. 11 मार्च 2019 रोजी झालेल्‍या पुरस्‍कार प्रदान सोहळ्यास वैयक्तिक कारणास्‍तव बाबासाहेब पुरंदरे उपस्थित राहू शकले नव्‍हते. त्‍यामुळे जिल्‍हाधिकारी राम यांनी त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन पद्मविभूषण पुरस्‍कार ( पद्म विभूषण पदकमिनिएचर व सनद (प्रमाणपत्र) आदरपूर्वक प्रदान केला. यावेळी तहसिलदार तृप्‍ती कोलते-पाटील यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

धनकवडी सांस्कृतिक मंचातर्फे कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान

पुणे : भारताचे दुसरे राष्ट्रपती व प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्‌वादाचा तात्त्विक परिचय करून दिला. भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांच्याकडे पाहिले जाते. तर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात फिल्डमार्शल सॅममाणेकशॉ यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या मुत्सद्दीगिरीमुळेच अनेकजण शरण आले होते. असे हे दोन भारतमातेचे सुपुत्र अनमोल असून, त्यांचे कार्य अतुलनीय आहे,” असे प्रतिपादन व्याख्याते आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी केले. 
 
धनकवडी सांस्कृतिक मंचाच्या वतीने नुकतेच सांस्कृतिक शिबीर आणि समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱया महाराष्ट्रातील व्यक्तींचा विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे अध्यक्ष रविंद्र मोहन धारिया होते. प्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, भारतीय बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष मदन कोठुळे, प्रमुख संयोजिका ॲॅड. वैशाली भोसले नितीन भोसले, ऋतिका कदम आदी उपस्थित होते.
 
रविंद्र धारिया यांनी सत्कारार्थीचे अभिनंदन केले. जयमाला इनामदार यांनी सादर केलेल्या गाढवाचे लग्न नाटकातील प्रसंगाने उपस्थितांमध्ये हास्य फुलले. ऋतिका कदम यांनी स्वामी विवेकानंद आणि बिरबल यांच्या जीवनातील वेगळेच प्रसंग सांगून कार्यक्रमाची उंची वाढवली. कार्यक्रमात एकूण २४ लोकांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि फिल्डमार्शल सॅममाणेकशॉ पुरस्काराने गौरवण्यात आले. ॲड. वैशाली भोसले यांनी प्रास्ताविक केले. भैरवनाथ कानडे यांनी सूत्रसंचालन केले तर नितीन भोसले यांनी आभार व्यक्त केले

नरेंद्र मोदींच्या विरोधात शनिवारी अलका चौकात निदर्शने – गोपाळ तिवारी

पुणे :”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शनिवार, ११ मे २०१९ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत अलका टॉकीज चौकात राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने प्रतीकात्मक निदर्शने करण्यात येणार आहेत. यामध्ये इतर अनेक संघटना सहभागी होणार आहेत,” असे कॉंग्रेसचे माजी नगरसेवक ,महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजीव गांधी स्मारक समितीचे प्रमुख गोपाळ तिवारी पत्रकार परिषदेत सांगितले  भोला वांजळे, संदीप मोरे, नंदूशेठ पापळ आदी उपस्थित होते.

भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारे आणि केंद्र सरकार शेवटच्या नागरिकांसाठी एक रुपया पाठवते, त्यातील  पंधराच पैसे त्याला मिळतात. उर्वरीत ८५ पैसे कुठे जातात? असा स्पष्ट सवाल करीत भ्रष्टाचारी व्यवस्थेला खडेबोल सुनावणारे स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी हे पहिलेच पंतप्रधान होते. व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संगणकीकरण आणि इंटरनेटचा वापर त्यांनी सुरु केला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याबाबत केलेले वक्तव्य निराधार आणि निषेधार्ह आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर प्रामाणिकपणे बोलणाऱ्या राजीव गांधी यांच्याबाबत त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून अशा प्रकारचे बदनामीकारक वक्तव्य करीत खोटा कांगावा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य खेदजनक आहे,” अशी टीका त्यांनी केली

गोपाळ तिवारी म्हणाले, “व्यवस्थेतील वास्तव सांगण्यासाठी राजीव गांधी यांनी ते वक्तव्य केले होते. केंद्र सरकार राज्यांमध्ये, जिल्ह्यामध्ये, जनतेच्या विकासासाठी एक रुपया पाठवते, तेव्हा ८५ पैसे शासकीय कारकून, अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी या साखळीत विरतात. अनेक वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी व बेपर्वा विरोधक यांचा बऱ्याचदा वरदहस्त असतो. त्यावेळी भ्रष्टाचारावर बोलण्याची एकही विरोधी पक्षनेत्यांत धमक नव्हती. कारण तेही त्यात सामील होऊन, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करून मलाई खात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजीव गांधी यांनी जनतेला जागरूक करण्यासाठी राजधर्माचा पुरुषार्थ दाखवला. तत्कालीन स्वार्थी, स्वतःची तुंबड्या भरणाऱ्या विरोधकांनी भ्रष्टाचारावर आवाज उठवला असता, तर राजीवजींवर हे कटू सत्य मांडण्याची वेळ आली नसती.  अकार्यक्षमतेच्या मुद्यावर सरकारी अधिकाऱ्याची बडतर्फी करण्याचा कायदा आणण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, याच भाजपच्या, तत्कालीन जनसंघाशी सलग्नीत भारतीय मजदूर संघाने विरोध करीत राजीवजींचा भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न हणून पाडला.”

“राजीवजींच्या भ्रष्टाचारविरोधी प्रयत्नांमुळे अनेकांचे भ्रष्टाचार उघड्यावर आल्याने त्यांच्या हत्येमागे काही देशांतर्गत शक्तींचा सहभाग असल्याचा संशय वाटतो. तेव्हाचे विरोधक आता सत्ताधारी बनले आहेत. भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम त्यांनी त्यावेळी केले. राजीव गांधी त्यांचा बुरखा फाडल्याने आज हे लोक राजीवजींच्या वक्तव्याची मोडतोड आणि चुकीचा अर्थ काढून मोदी खोटे आरोप करून आग ओकत आहेत. मात्र, राजीवजींच्या भूमिकेमागील वास्तव जनतेला माहित आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये,” असे गोपाळ तिवारी यांनी सांगितले.

 

सुर्यदत्ता नॅशनल स्कूलचा सीबीएसई 10 वीचा निकाल 100 टक्के

सलग दुसऱ्या वर्षी शाळेचा निकाल १०० टक्के; तीन विद्यार्थ्यांना ९०च्या पुढे, तर पाच विद्यार्थ्यांना ८०च्या पुढे गुण 
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेत सूर्यदत्ता नॅशनल स्कूलचा निकाल सलग दुसर्‍या वर्षी 100 टक्के लागला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत शाळेसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. तीन विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक, तर पाच विद्यार्थ्यांना 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. सुयश अयाचित 94.4 टक्के गुण मिळवत प्रथम, पियुष बॅनर्जी 93.4 टक्के गुण मिळवत द्वितीय, तर साहिल बदामी 93 टक्के गुण मिळवत तृतीय आला आहे. पियुष बॅनर्जी याने सामाजिक शास्त्र विषयात, तर तनिषा अगरवाल हिने हिंदी विषयात 99 टक्के गुण मिळवले आहेत.
आयसीएसई, आयबी, एसएससी, सेमी इंग्रजी आणि महापालिका शाळा अशा पार्श्वभूमीतून हे विद्यार्थी आले होते. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षक व इतर स्टाफने खूप मेहनत घेतली होती. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांच्या मेहनतीला चांगले फळ मिळाले आहे. व्यक्तिगत आढावा, प्रोत्साहन, मार्गदर्शन यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर शाळेने भर दिला. त्याच जोरावर शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऑलिम्पियाड्समध्ये विजेतेपद पटकावले आहे.
सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या प्राचार्या श्रीमती शीला ओका आणि त्यांच्या शिक्षक सहकार्‍यांच्या मेहनतीमुळेच हे यश प्राप्त झाले आहे. सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय बी. चोरडिया, सुर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या सचिव सुषमा चोरडिया, संचालिका डॉ. अर्चना कालरा यांनी प्राचार्य, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
—————————
सुयश अयाचित (९४.४ टक्के)
पियुष बॅनर्जी (९३.४ टक्के व समाजशास्त्रात ९९ गुण)
साहिल बदामी (९३ टक्के)
तनिषा अगरवाल (हिंदीमध्ये ९९ गुण)

शिल्पाने दिला ‘स्वस्थ राहा मस्त राहा’चा आरोग्यमंत्र

फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या कार्यक्रमात शिल्पा शेट्टीच्या ‘हेल्थ अँड फिटनेस’ ऍपचे अनावरण
पुणे : “नियमित व्यायाम, सकस आहार, ध्यान आणि सकारात्मक विचार या गोष्टी तुम्हाला निरोगी बनवतात. आनंदी जीवन जगण्यासाठी ‘स्वस्थ राहा मस्त राहा’ हा आरोग्यमंत्र अत्यंत गरजेचा आहे. माझ्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीच्या मागे हाच मंत्र आहे. तुम्ही सर्वानी हा मंत्र अंमलात आणावा, नियमित व्यायाम करून चांगला आहार घेत तणावमुक्त आयुष्य जगावे, असा सल्ला प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा हिने दिला.
‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ची (फिक्की) महिला शाखा असलेल्या ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘फ्लो’ या संस्थेच्या पुणे विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिल्पा शेट्टी बोलत होती. सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात शिल्पाने ‘हेल्थ अँड फिटनेस’वर महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी तिने बनविलेल्या ‘एसएस/सिम्पल सोलफूल बाय शिल्पा शेट्टी’ या ऍप्लिकेशनचे अनावरंही करण्यात आले. प्रसंगी फिक्की फ्लो पुणेच्या चेअरपर्सन रितू प्रकाश छाब्रिया, माजी अध्यक्षा संगीता ललवाणी, फिनोलेक्सचे चेअरमन प्रकाश छाब्रिया, अनिता सणस आदी उपस्थित होते. नेहा देशपांडे, डिम्पल सोमजी, मोनाली पटवर्धन व डॉ. निधी अगरवाल यांनी शिल्पा शेट्टीची मुलाखत घेतली. ४५० पेक्षा अधिक महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
शिल्पा शेट्टी म्हणाली, “आपल्याकडील सर्वच वस्तू उत्तम प्रतीच्या आहेत. त्यामुळे स्वदेशी वस्तू वापरण्याला माझे प्राधान्य असते. योग आणि आयुर्वेद ही भारतीय परंपरेची देण आहे. आपण आपल्या आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. माझ्या फिटनेसबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असते. परंतु, नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेण्याला मी प्राधान्य देते. कोणत्याही स्त्रीला प्रसूतीनंतर शारीरिक आकारांतील बदलांना सामोरे जावे लागते. मात्र, योग्य ती मेहनत घेतली तर आपले सौंदर्य आपण कायम ठेवू शकतो.”
“निरोगी आरोग्यासाठी हे ऍप उपयुक्त ठरणार आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात थोडासा फरक करावा लागतो. त्यातील सातत्यामुळे ते शक्य होते. आपण हे करू शकतो, असा आत्मविश्वास आणि त्यातील शिस्त महत्वाची असते. अभिनेत्री, मॉडेल, आई, गृहिणी अशा सगळ्या भूमिका पार पाडत असताना कुटुंबाची साथ मोलाची आहे. आई-वडील, पती यांची उत्तम पाठिंबा आहे.
रितू छाब्रिया म्हणाल्या, “सुदृढ आरोग्य आणि तंदुरुस्त शरीरयष्टीमुळे शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्याला भुरळ घालते. आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी ती जितकी कटाक्ष आहे, तितकीच ती जागृतीसाठीही तयार आहे. तिने बनवलेल्या ऍपमुळे लाखो महिलांना आणि पुरुषांनाही नक्कीच फायदा होईल. फिक्की फ्लोच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जाणार असून, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्याची सुरवात झाली आहे.” नेहा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. गायत्री छाब्रिया यांनी स्वागत-प्रास्ताविक केले.

आयएएस भापकर यांच्या कारकिर्दीवरचा ”पुरूषोत्तम’ 10 मे ला सिनेमागृहात ..

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांची प्रस्तुती असलेला ‘पुरूषोत्तम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे अमरापूरकर यांची कनिष्ठ कन्या रीमा अमरापूरकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून, ज्येष्ठ कन्या केतकी अमरापूरकर या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहे. समाजहिताच्या ध्येयाने झपाटलेल्या एका प्रामाणिक अधिका-याची गोष्ट सांगणा-या या सिनेमाची निर्मिती संवेदना फिल्म फाऊंडेशन आणि आदर्श ग्रुप यांनी केली आहे. नंदू माधव यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेटवर्किंग साईटवर ट्रेलर लॉंच करण्यात आला.
औरंगाबादमध्ये घडलेल्या सत्य घटनांनावर हा सिनेमा आधारित असल्याचे या ट्रेलरमधून दिसून येते. तत्कालीन आई इ एस अधिकारी पुरुषोत्तम भापकर यांच्या कारकिर्दीवर आधारित असलेल्या या सिनेमाद्वारे, महाराष्ट्रातील तमाम प्रामाणिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीचा वेध घेण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्या, आणि त्या अनुषंगाने त्यांच्यासमोर उभ्या राहणाऱ्या विविध आव्हानांना ते कसे सामोरे जातात? हे या सिनेमात पाहायला मिळणार आहे. पूर्वापार पासून चालत आलेलं राहणीमान आणि पाश्चिमात्य शहरीकरणाचा रेटा यांमधील संघर्षाची कहाणी ‘पुरुषोत्तम’ या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
या सिनेमात नंदु माधव यांच्यासोबत किशोर कदम, देविका दफ्तरदार, केतकी अमरापूरकर आणि पूजा पवार हे कलाकारदेखील झळकणार आहेत. सदाशिव अमरापूरकर यांच्या जन्मदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच, येत्या १० मे रोजी अमरापुरकर मायलेकींचा ‘पुरूषोत्तम’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘पुष्कर शो THREE’ उपक्रमातून तीन सामाजिक संस्थाना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत

0

–    अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्या ५० वर्षातील पदार्पणानिमित्त आयोजित उपक्रमाला  रसिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद, मान्यवरांची उपस्थिती

मुंबई -मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी नुकतेच वयाच्या ५० व्या वर्षात पदार्पण केले. तसेच त्यांच्या कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाली या निमित्त सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून त्यांनी ‘पुष्कर शो THREE’ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले. यामध्ये रविवारी तीन नाटकांच्या प्रयोगातून तीन सामाजिक संस्थाना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. या उपक्रमाला नाट्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच याप्रसंगी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे संपन्न झालेल्या ‘पुष्कर शो THREE’ या विशेष कार्यक्रमात ‘आम्ही आणि आमचे बाप’, ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘हसवा फसवी’ या तीन नाटकांचे प्रयोग पार पडले, यावेळी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार, विलेपार्लेचे आमदार अॅड. पराग अळवणी, अजित तेंडुलकर, म्हैसकर फौंडेशनचे जयंत म्हैसकर, अनुया म्हैसकर, इंडियन ऑईलचे श्रीधर भागवत, एसबीआय लाईफ इन्श्युरन्सचे आनंद पेजावर, जाई काजळचे राजेश गाडगीळ, जनकल्याण सहकारी बँकेचे संतोष केळकर, अथर्व रिएल्टर्सचे सचिन गुंजाळ, बँक ऑफ इंडियाचे अशोक सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रत्येक संस्थेला या नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून प्रत्येकी दीड लाख रुपये आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, आमदार अॅड. आशिष शेलार आणि आमदार अॅड. पराग अळवणी यांनी प्रत्येकी एका संस्थेला ५० हजार् रुपये अशी एकूण २ लाख रुपयांची मदत प्रत्येक संस्थेला करण्यात आली.

‘पुष्कर शो THREE’ या उपक्रमांतर्गत आदी कल्चरटेन्मेंट निर्मित ‘आम्ही आणि आमचे बाप’ या प्रयोगाचे उत्पन्न ठाण्यातील ‘सिग्नल शाळा’ संस्थेला देण्यात आले, बदाम राजा निर्मित ‘अ परफेक्ट मर्डर’ या प्रयोगाचे उत्पन्न कोल्हापुरातल्या ‘चेतना’ संस्थेला तर जिगिषा-अष्टविनायक निर्मित दिलीप प्रभावळकर लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘हसवा-फसवी’ च्या प्रयोगाचे उत्पन्न अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथे उभ्या राहणाऱ्या ‘कलाश्रय’ या वृद्धाश्रमाच्या स्थापनेसाठी देण्यात आले.

या विषयी बोलताना पुष्कर श्रोत्री म्हणाले, आजचा उपक्रम माझे निर्माते, सहकलाकार, प्रायोजक यांच्या सहकार्याने यशस्वी झाला. अभिनेता म्हणून नाट्य, चित्रपट रसिकांनी मला आजपर्यंत दाद दिली आहे, या प्रयोगाच्या निमित्ताने मला साथ देऊन हे प्रयोग हाऊसफुल केले याबद्दल मी त्याचा ऋणी आहे.

आठवी ते दहावीच्या विद्यार्थी-पालकांसाठी सुपरमाईंड संस्थेतर्फे मोफत शैक्षणिक समुपदेशन

पुणे : “इयत्ता आठवी व दहावी महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमात, मुल्यामापनात बदल होत असतात. तसेच दहावी सीबीएसईच्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल झाला आहे. हा बदल नेमका काय आणि कसा आहे. याबद्दल आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी पुण्यातील सुपरमाईंड संस्थेतर्फे मोफत समुपदेशन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे,” अशी माहिती सुपरमाईंड संस्थेच्या संचालिका मंजुषा वैद्य आणि अर्चिता मडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंजुषा वैद्य म्हणाल्या बदलणारा अभ्यासक्रम, बदललेला पाटर्न आणि मूल्यमापन पद्धतीप्रमाणे अभ्यासाच्या पद्धतीत बदल केला पाहिजे. तो का्य व कसा? याबद्दल सप्ताहात मार्गदर्शन केले जाणार आहे.
दोषपूर्ण अभ्यास पद्धतीत का्य बदल करावा? आकलनासह वाचन कसे करावे? लेखनाचा वेग वाढविण्यासाठी का्य करावे? भाषा विषयातील कृतिपत्रिका कशी सोडवावी? गुण अणि गुणवत्ता मिळवण्यासाठी सुरवातीपासूनच स्वअध्ययनाची सवय कशी करावी? अशा अनेक गोष्टींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या सप्ताहात पालकांसमवेत विद्यार्थ्याशी वैयक्तिक बोलून त्यांच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणीवर तोडगा काढला जाणार आहे.”
“या सप्ताहाला शुक्रवार, दि. १० मे २०१९ पासून सुरवात होत आहे. रोज सकाळी १० ते ८ यावेळेत विद्यार्थी व पालक समुपदेशनासाठी येऊ शकतात. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडून दहावी व आठवीचे पाठ्यपुस्तके, पॅटर्न व मुल्यामापनात बदल होत आहेत. कृतियुक्त (Activity Based), उपयोजित (Application Based), कौशल्याधारित व क्षमताधिष्ठित ज्ञान रचनावादावर आधारित या अभ्यासक्रमाबद्दल पालक व विद्यार्थ्यांच्या मनात खूप संभ्रम आहेत. तसेच CBSE बोर्डाने दिलेला नविन पॅटर्न काय आहे, त्याप्रमाणे अभ्यास पद्धतीत करावयाचे बदल, अभ्यासाचे नियोजन, विषयवार वेळापत्रक याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात अनेक अनेक व्याख्याने होत आहेत. पण प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक पातळीवर भेटून सर्व शंकांचे निरसन होणे गरजेचे असल्यामुळे सुपरमाइंड संस्थेने या या उपक्रमाचे आयोजन केले आहे.” असे अर्चिता मडके यांनी सांगितले.
“या समुपदेशन सप्ताहात आठवी ते दहावीचे विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत समुपदेशन घेऊ शकतील. १० मेपासून सुपरमाइंडचे नवी पेठ, पुणे येथील ऑफिसमध्ये याचे आयोजन केले गेले आहे. समुपदेशन मोफत असले, तरी नियोजनासाठी पालकांनी वेळ निश्चित करून येणे आवश्यक आहे. त्यासाठी ९०४९९९२८०७/८/९ या क्रमांकावर किंवा www.supermindstudy.com या संकेतस्थळावर संपर्क करावा. सुपरमाईंड संस्थेने आयोजिलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थी व शिक्षण प्रक्रियेत दुवा साधला जाईल व विद्यार्थ्यांना अभ्यासाची शास्त्रशुद्ध दिशा मिळेल, असा विश्वास वाटतो,” असे मंजुषा वैद्य यांनी नमूद केले.

महिंद्रा XUV300 ने ओलांडला 26,000 बुकिंगचा टप्पा

एप्रिल 2019 मध्ये भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली गेलेली सब-4 मीटर एसयूव्ही

  • प्रत्येक 3 पैकी 2 बुकिंग XUV300 च्या टॉप एंड प्रकारासाठी झाली
  • एकूण बुकिंगमध्ये पेट्रोल प्रकाराचा हिस्सा लक्षणीय

 

मे 07, 2019, मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम लि.) या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने, यंदा फेब्रुवारीमध्ये दाखल केल्यापासून XUV300 या नव्या ऐटदार व आकर्षक एसयूव्हीने 26,000 बुकिंगचा टप्पा ओलांडला असल्याचे आज जाहीर केले आहे. एप्रिलमध्ये,  XUV300 ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली गेलेली सब-4 मीटर एसयूव्ही ठरली.

थरारक वैशिष्ट्य, श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी, श्रेणीतील पहिली सुरक्षेविषयक व हाय-टेक वैशिष्ट्ये यामुळे XUV300 देशभरातील, विशेषतः महानगरे व शहरे येथील ग्राहकांच्या पसंतीस पडली आहे. 3 प्रकारांमध्ये टॉप एंड प्रकाराला जास्तीत जास्त मागणी आहे आणि एकूण बुकिंगमध्ये त्याचे प्रमाण 70% आहे. 1.2 L टर्बो-पेट्रोल असणारा पेट्रोल प्रकार श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी करणारा आहे व XUV300 विक्रीमध्ये त्याचा हिस्सा लक्षणीय आहे.

बुकिंगच्या या मैलाच्या टप्प्याबाबत बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह विभागाचे सेल्स व मार्केटिंग प्रमुख वीजय राम नाकरा यांनी सांगितले, “दाखल झाल्यापासून केवळ दोन महिन्यांमध्ये XUV300 साठी 26,000 हून अधिक बुकिंग आली, ही समाधानाची बाब आहे. XUV300 ही ग्राहकांसाठी आकर्षक व सर्वंकष वाहन ठरत असून, ते थरारक कामगिरी करणारे, श्रेणीतील पहिली सुरक्षेची वैशिष्ट्ये असणारे व वेधक डिझाइन असणारे आहे व या सर्वांचे प्रतिबिंब बुकिंगच्या आकड्यामध्ये दिसून येते. पेट्रोल प्रकारासाठी लक्षणीय बुकिंग आले आहे, हेही वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक ग्राहक-केंद्री कंपनी म्हणून, प्रतीक्षेचा कालावधी कमीत कमी ठेवण्याचा आणि ग्राहकांना त्यांची XUV300s लवकरात लवकर देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. येत्या काही वर्षांत XUV300 ब्रँड अतिशय सक्षम होईल, असा विश्वास आहे.”

थरारक कामगिरी, श्रेणीतील पहिली सुरक्षेची वैशिष्ट्ये, वेधक डिझाइन, श्रेणीतील पहिली हाय-टेक वैशिष्ट्ये व श्रेणीतील सर्वोत्तम अंतर्भाग अशा वैशिष्ट्यांमुळे XUV300 ही एसयूव्ही सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. XUV300ने सांगयोंग तिवोली या जगभर यशस्वी झालेल्या उत्पादनाशी सहयोग केला आहे. 2015 मध्ये दाखल झाल्यापासून, या उत्पादनाने 50 हून अधिक देशांत 2.6 लाखांहून अधिक युनिटची विक्री केली आहे. तिवोलीला सुरक्षेसाठी व अर्गोनॉमिक पुरस्कारही मिळाले असून, त्यामध्ये 2015 केएनसीएपी (कोरिअन न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम) कडून ग्रेड 1 सेफ्टी अवॉर्ड याचाही समावेश आहे.

सिमी संघटनेसंबंधी प्रकरणाची औरंगाबाद येथे सुनावणी १७ व १८ मे रोजी

0

मुंबई, दि. 7 : बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) अधिनियमातील कलम 3(1) नुसार भारतीय इस्लामिक विद्यार्थी चळवळ (सिमी) या संघटनेस बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम 1967 अन्वये केंद्र शासनाने बंदी घातली आहे. या संघटनेच्या विविध प्रकरणांची सुनावणी औरंगाबाद येथे दि. 17 व 18 मे रोजी होणार आहे.

सिमी संघटनेच्या संबंधित प्रकरणांची तपासणी करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती मुक्ता गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या आवारात होणार आहे.

३१ लाखांचे सोने पुणे विमानतळावर पकडले

पुणे-दुबईहून आलेल्या विमानातून तस्करी करून आणलेले ३१ लाख १३ हजार रुपये किंमतीचे ९५७ ग्रॅम सोन्यासह सीमा शुल्क विभागा(कस्टम) च्या पथकाने पुणे विमानतळावर एका प्रवशाला पकडले. त्याच्याकडून पकडलेले सोने हे एका पॉलिथीन पिशवीमध्ये पेस्ट अवस्थेत मिळून आले.

बाबा मिया मोमीन असे पकडलेल्याचे नाव आहे.सोमवारी सकाळी दुबईहून आलेले विमान आय़ एक्स २१२ पुणे विमानतळावर उतरले. त्यावेळी प्रवाशांच्या साहित्याची तपासणी करत असताना सीमा शुल्क (कस्टम) विभागाच्या अधिकाऱ्यांनी संशयावरून शहेजाद बाबा मिय़ा खान याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे एका पातळ पॉलिथीन बॅगमध्ये ठेवलेले पेस्ट च्या स्वरुपात सोने आढळून आले. पथकाने त्याच्याकडून ते सोने हस्तगत केले. त्या सोन्याची किंमत ३१ लाख १३ हजार ४४६ रुपये असून त्याचे वजन ९५७. १० ग्रॅम आहे.

सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोनं जप्त करून शेहजाद खान याच्यावर कस्टम अक्ट १९६२ च्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संस्कारक्षम पिढी घडविण्याचे आव्हान – श्रीराम कुलकर्णी.

सामुदायिक उपनयन संस्कार संपन्न …..
पुणे-सोशल मीडिया चा मायाजाल वेगाने सारे विश्व् आपल्या ताब्यात घेत असून,त्याचे दुष्परिणाम सर्व क्षेत्रात जाणवू लागले आहेत, पुढील काळात संस्कारक्षम पिढी घडविण्याचे मोठे आव्हान असून सामुदायिक मुंजीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न करत आहोत असे देशस्थ ब्राह्मण संघाचे कार्याध्यक्ष श्रीराम कुलकर्णी म्हणाले.अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ कोथरूड – कर्वेनगर शाखेच्या वतीने सामुदायिक मुंजीचा कार्यक्रम पार पडला त्या वेळी ते बोलत होते.यावेळी आमदार मेधा कुलकर्णी,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,उद्यम बँकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर,कीर्तनकार प्रा.न.ची.अपमार्जने,शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शाम देशपांडे,ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डा.अरुण हुपरीकर,कार्याध्यक्ष श्रीराम कुलकर्णी,सचिव सतीश कुलकर्णी व सहसचिव सौ. साधना ओढेकर उपस्थित होते.
यावेळी आमदार मेधा कुलकर्णी यांनी बटु ना शुभाशीर्वाद दिले तर नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी बटु ना मातृभोजनाचा घास भरविताना ” आज मुंज झाल्याने तुमच्यावर जे संस्कार झाले आहेत ते भावी आयुष्यात फार मोलाचे असून आई वडील आणि गुरुजनांचे म्हणणे ऐका आणि त्यांचा आदर करा ” असे सांगितले.
मनोहर मंगल कार्यालय येथे हा सोहळा पार पडला,यावेळी बटु व त्यांच्या कुटुंबीयांचा उत्साह ओसंडून वाहात होता,श्रीराम कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर डा हुपरीकर यांनी सर्वांचे स्वागत केले.

पुणे ग्रामीण पोलीस दलातील ठाणे अंमलदारांना कलम 36 नुसार अधिकार प्रदान

पुणे, दि. 7पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 21 मे 2019 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 नुसार अधिकार प्रदान केले आहे.

            या अधिकारान्वये रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणूकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहीत करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या,कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविणेचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्णकर्कश वाद्ये वाजविणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणूकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होवू नये म्हणुन ध्वनीक्षेपकाचा (लाऊड स्पीकर) उपयोग करणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे 33, 35,37 ते 40,42,43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे असे अधिकार प्रदान केले आहेत.

हे आदेश दिनांक 21 मे, 2019 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत  लागू राहतील, असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मो. सुवेज हक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.