Home Blog Page 2934

शिंदेशाही बाणा’ अनुभवण्यासाठी रसिकांची झुंबड

पुणे : ‘तुला देव म्हणावे की भीमराव म्हणावे’, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक रायगडावर अन एक चवदार तळ्यावर’, ‘नव्हते मिळत पोटाला, आज कमी नाही नोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला’ अशी एक से बढकर एक भीमगीते, ‘उड जायेगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली’सारखी लोकप्रिय कव्वालीचा समावेश असलेल्या ‘शिंदेशाही बाणा’ कार्यक्रमाची अनुभूती घेण्यासाठी सोमवारी रसिकांची झुंबड उडाली. बोपोडीतल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात झालेल्या या कार्यक्रमाला पुणे शहरासह मुंबई आणि आसपासच्या परिसरातील रसिकांनीही हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली. लोकगीतांचा बादशाह आंनद शिंदे यांच्या दमदार आवाजात सादर झालेली लोकगीते, भीमगीते, कव्वाली ऐकणे ही एक पर्वणी असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना करण्यात आली. रसिकांचा प्रतिसाद आणि शिंदेंच्या गाण्याने परिसरात ‘आंबेडकर’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात आनंद शिंदे यांच्या शिवराय, फुले, आंबेडकर यांच्यावर आधारित मराठी-हिंदी गीतांचा, कव्वालीवर आधारित ‘शिंदेशाही बाणा’चा कार्यक्रम रंगला. सांस्कृतिक महोत्सव समितीचे प्रमुख परशुराम वाडेकर यांच्या पुढाकारातुन झालेल्या या कार्यक्रमावेळी नगरसेविका सुनीता वाडेकर, चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेवक विजयदादा शेवाळे, नगरसेवक बंडू ढोरे, नगरसेवक सुनील यादव, रिपब्लिकन नेते शैलेंद्र चव्हाण, प्रा. किरण सुरवसे, निवेदक दीपक म्हस्के यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
शिंदेंनी वडील प्रल्हाद शिंदेंच्या चरणी प्रणाम करत गायनास सुरुवात केली. ‘वंदना वंदना त्या भीम पाखराला’, ‘त्या राजधानीवरती भगवं निशान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे’, ‘आज इथे मांडवात वैभवास नहाले’ अशी बहारदार भीमगीते सादर करत रसिकांची भरभरून दाद मिळवली. कार्यक्रमाची सांगता ‘देखो जी मेरे बाबाकी डोली चली’ या गाण्याने झाली. यावेळी वातावरण भावुक झाले होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते. गायनाचा वारसा लाभलेल्या शिंदेंनी वडिलांची सुप्रसिद्ध कव्वाली सादर करत त्याला पुन्हा नवा उजाळा दिला. सूत्रसंचालन परशुराम वाडेकर, दीपक म्हस्के यांनी केले. कीबोर्डवर कमलेश जाधव, बेन्जोवर विकास महाले, पेटीवर विशाल सोनवणे, तबल्यावर ब्रिजेश मोटघरे, ढोलकीवर अजय खरे आणि कुमार समुद्रे, कोरसवर निशांत गायकवाड आणि बन्सी साळवे यांनी साथसंगत केली.

खातो ते घास, घेतो तो श्वास, राहतो तो निवास आज केवळ बाबासाहेबांमुळेच आहे. एखाद्या लहान मालिकेतून बाबासाहेब मांडता येणार नाहीत. त्यांचा सगळा प्रवास उलगडणारी, एक ते दोन वर्ष चालणारी मालिका आपण बनविणार असून, त्यातून बाबासाहेबांचा जीवनपट जगासमोर मांडण्याचा मानस असल्याचे आनंद शिंदे यांनी यावेळी सांगितले.

कर्मकांड ,अंधश्रद्धा याला फाटा देऊन विवाहप्रसंगी अक्षता म्हणून तांदूळ न वापरता फुले वापरावेत-राजकुमार भुजबळ

0

वावरहिरे,सातारा- सत्यशोधक रघुनाथ ढोक आणि सत्यशोधीका आशा ढोक यांच्या रौप्य महोत्सवी सत्यशोधक विवाह प्रसंगी राजकुमार भुजबळ आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की महात्मा फुले यांनी एकदम साध्या सोफ्या भाषेमध्ये 18व्या शतकात विवाह पद्धत सांगितली असून कर्मकांड, अंधश्रद्धा पासून दूर राहून सत्यशोधक पद्धतीने विवाह करावे असे आवाहन केले , विवाहात अक्षता म्हणून जे तांदूळ वापरले जाते ते बंद करून त्या जागी फुले वापरावीत म्हणजे लोकांना चांगला रोजगार मिळेल.पुढे ते म्हणाले की आम्ही दोघेही चांगल्या घरातील शासकीय पदावर काम करीत असताना देखील सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न केलेचे माहिती देऊन नाहक खर्च होणारे पैसे वाचविलेचे सांगून आपल्या मुलांनाचे विवाह सत्यशोधक पद्धतीने सामुदायिक करा आणि रघुनाथ ढोक यांच्या कार्याला सहकार्य करा असे देखील प्रतिपादन केले.


फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या वतीने पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते सत्यशोधक रघुनाथ श्रीरंग ढोक व सत्यशोधिका सौ आशा रघुनाथ ढोक यांचा सत्यशोधक रौप्य महोत्सवी सत्यशोधक विवाह वर्धपान सोहळा सावतानागर ,वावरहिरे येथील बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रात रविवारी दि 19 मे 2019 रोजी सायंकाळी 6.30वाजता सामाजिक बांधिलकी जपत सम्पन्न झाला.हा या केंद्रातील दुसरा सत्यशोधक विवाह होता.
या प्रसंगी पाहुण्यांचे हस्ते अपंग मोना शिंदे आणि मोहन भोसले यांना तीन चाकी सायकल व अपंग मुलींना कपडे वाटप केले ,धर्मपुरीतील जेष्ठ नागरिक जगन्नाथ सावंत यांना दोन चाकी सायकल पेपर विक्री करून रोजगार मिळविण्यासाठी भेट दिली ते रघुनाथ ढोक लहानपणी चंद्रपुरी पाठशाळेत 7वी पर्यंत शिकले त्या शाळेचे ते शिपाई होते.पुणे येथे ढोक यांनी देखील पेपर टाकून शिक्षण पूर्ण केले होते. यावेळी या सावतानगर मधील प्रवीण कापसे mpsc परीक्षा पास होऊन पोलीस निरीक्षक पदी निवड आणि या भागात पहिला सत्यशोधक विवाह केला म्हणून गणेश कापसे व ज्योती कापसे यांचा देखील सत्कार केला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नातेपुते चे सह्ययक पोलीस निरीक्षक मा.राजकुमार भुजबळसाहेब,बारामती शारदा महिला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.राजाराम ढोक ,डेप्युटी कमिशनर आनंदराव जगताप माजी बीडीओ दहिवडी ,इरेगेशन विभाग इंदापूर च्या सौ.निशा भुजबळ,देशमुख वाडीचे सरपंच विष्णूपंत बनसोडे, महादेव भोसले गुरुजी,बाळासाहेब खिलारे,दत्तात्रय ढोपे उपस्थित होते.
यावेळी डॉ.राजाराम ढोक यांनी देखील मौलिक मार्गदर्शन केले.यावेळी महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले साहित्य व प्रकाशन समिती चे सदस्य रघुनाथ ढोक यांनी सत्यशोधक पद्धतीने पुन्हा विवाह करून का आणि कसे करावे यांचे जिवंत उदाहरण देऊन माहिती दिली.तर
कार्यक्रमाचे सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज,सामाजिक क्रांति चे जनक महात्मा जोतीराव फुले,भारतीय स्री शिक्षणाच्या आध्यप्रनेत्या ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आले.सर्व मान्यवरांचे सत्कार फुले उपरणे आणि फुले शाहु आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले या पुतळ्याची एकत्रित असलेली प्रतिमा व रघुनाथ ढोक लिखित ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले 131 ग्रंथ नुकतेच 131 वा महात्मा दिन साजरा झाला म्हणून मुली व महिलांना भेट दिले.
या वेळी सत्यशोधक रोहिदास तोडकर आणि मुलगा आकाश ढोक यांनी सत्यशोधक पद्धतीने रघुनाथ ढोक आणि आशा ढोक यांचे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे वेषभूषेत 25 वर्षानंतर पुन्हा एकदा विवाह लावला तर बाजीराव वाघ आणि सुदाम धाडगे यांनी फुले रचित मंगळाष्टक म्हंटल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विष्णू लडकत तर आभार प्रदर्शन क्षितिज ढोक यांनी मानले.या प्रसंगी सोनटक्के आणि ढोक परिवार त्यांचे नातेवाईक तसेच पुण्यातून व परिसरातुन मोठे सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठया संख्येने रौप्य महोत्सवी वर्धपान सत्यशोधक विवाह सोहळा पाहणे साठी जमले होते.खास करून सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव नायगाव वरून नवदाम्पत्य सौ.अक्षता अजिंक्य आणि त्यांचे पूर्ण कुटूंब उपस्थित होते.या विवाह सोहळ्याने आदर्श विवाह ,सामाजिक बांधिलकी आणि सत्यशोधक पद्धतीने विवाह का करावा याचे जिवंत दर्शन घडल्याने मोठया चर्चेचा विषय ठरला.

चौथ्या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत प्रियांश प्रजापतीचा मानांकित खेळाडूवर विजय

पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील चौथ्या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रियांश प्रजापती याने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.

मेट्रोसिटी स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लब, कोथरूड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात  प्रियांश प्रजापतीने दहाव्या मानांकित मानस गुप्ताचा 6-1 असा सहज पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.  विष्णू वाघेरेने आदित्य आडतेवर टायब्रेकमध्ये 6-5(5) असा विजय मिळवला. अव्वल मानांकित अर्जुन अभ्यंकर व दुसऱ्या मानांकित ईशान देगमवार यांनी अनुक्रमे शिवम बासू  व नचिकेत गोरे यांचा 6-0 अशा सारख्याच फरकाने पराभव करून तिसरी फेरी गाठली.

 
मुलींच्या गटात  सानिका लुकतुके हिने तेजस्विनी श्रीफुलेचा 6-1 असा तर, अलिना शेखने माही ग्यानचा 6-0 असा पराभव करून आगेकूच केली. 

 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 14वर्षाखालील मुले:

अर्जुन अभ्यंकर(1) वि.वि.शिवम बासू 6-0;
शारंग कसाळकर वि.वि.शंतनू छाप्रिया 6-4;
विष्णू वाघेरे वि.वि.आदित्य आडते 6-5(5);
सार्थ बनसोडे(4) वि.वि.शिवम गायकवाड 6-0;
ईशान देगमवार(2) वि.वि.नचिकेत गोरे 6-0;
शौर्य राडे वि.वि.राजवीर पडाळे 6-1;
अर्जुन प्रधान वि.वि.साईराज साळुंके 6-3;
प्रियांश प्रजापती वि.वि.मानस गुप्ता(10) 6-1;

14वर्षाखालील मुली: पहिली फेरी:
सानिका लुकतुके वि.वि.तेजस्विनी श्रीफुले 6-1;
अलिना शेख वि.वि. माही ग्यान 6-0;
श्रुती नानजकर(4) वि.वि.रितिका मोरे 6-2;
काव्या कृष्णन(6) वि.वि.नैशा कपूर 6-0;
अणिका शहा वि.वि.नाव्या भामिदिप्ती 6-0;

राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत साहेब सोधी, अर्जुन गोहड, बूषन होबम यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

0
मुंबई: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्या तर्फे आयोजित 13व्या रमेश देसाई मेमोरियल सीसीआय 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात साहेब सोधी, अर्जुन गोहड, बूषन होबम या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आजचा दिवस गाजवला.
 
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 16वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत साहेब सोधी याने कडवी झुंज देत सहाव्या मानांकित गुजरातच्या अर्जुन कुंडूचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 4-6, 7-6(3)  असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या अर्जुन गोहड याने गुजरातच्या तेराव्या मानांकित धन्या शहाचा 1-6, 6-2, 6-1 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. मणिपूरच्या बुषण हॊबम याने कर्नाटकाच्या सातव्या मानांकित आयुष भटचा 4-6, 6-0, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या चौदाव्या मानांकित यशराज दळवीने आंध्रप्रदेशच्या अनंत मुनीचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 16वर्षाखालील मुले:
करीम खान(महाराष्ट्र)वि.वि.जितीन छेत्री(चंदीगढ) 6-0, 6-1;
शिवम कदम(महाराष्ट्र)वि.वि.कृतांत शर्मा(आसाम) 6-4, 6-4;
यशराज दळवी(महाराष्ट्र)(14)वि.वि.अनंत मुनी(आंध्रप्रदेश) 6-4, 6-4;
करण सिंग(हरियाणा)(9)वि.वि.अपूर्णवा मजुमदार(पश्चिम बंगाल) 3-6, 6-3, 6-0;
मोनील लोटलीकर(कर्नाटक)वि.वि.ज्ञानग्रहीथ मोव्वा(तेलंगणा) 7-5, 6-1;
बुषण हॊबम(मणिपूर)वि.वि.आयुष भट(कर्नाटक)(7) 4-6, 6-0, 6-2;
अर्जुन गोहड(महाराष्ट्र)वि.वि.धन्या शहा(गुजरात)(13) 1-6, 6-2, 6-1;
साहेब सोधी(महाराष्ट्र)वि.वि.अर्जुन कुंडू(गुजरात)(6) 7-6(5), 4-6, 7-6(3);

कृष्णन हुडा(चंदीगड)(5)वि.वि.नीरव शेट्टी(महाराष्ट्र) 6-2, 6-2;
डेनिम यादव(मध्यप्रदेश)(3)वि.वि.आदित्य नांदल(हरियाणा) 6-4, 6-0;
हिरक वोरा(गुजरात)(8)वि.वि.फरहान पत्रावाला(गुजरात) 2-6, 6-1, 6-2;
दक्ष अगरवाल(महाराष्ट्र)वि.वि.वंश नांदल(हरियाणा) 6-4, 6-0;
अनर्घ गांगुली(महाराष्ट्र)वि.वि.अंश कुंडू(हरियाणा) 6-2, 6-0;
चिराग दुहान(हरियाणा)(2)वि.वि.जस्मित दुहान(हरियाणा) 6-0, 6-1.   

‘मेघावी’ संस्थेच्या ‘स्वर सुमन’ कार्यक्रमात ठुमरी , दादरा आणि सरोद वादन

पुणे -मेघावी संस्थेतर्फे आयोजित ‘स्वर सुमन’ कार्यक्रमात यंदा प्रख्यात उपशास्त्रीय गायिका ध्रिती चटर्जी यांच्या उपशास्त्रीय गायनाचा बहारदार कार्यक्रम रविवार दिनांक २६ मे रोजी सायंकाळी  ५:३० वाजता ‘शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडीटोरीयम’, कर्नाटक हायस्कूल, एरंडवणे येथे संपन्न होणार आहे. मुळच्या कलकत्ताच्या आणि आता पुण्यात स्थायिक झालेल्या ध्रिती चटर्जी या ठुमरी आणि दादरा सादर करणार आहेत. त्यांना उमेश पुरोहित (हार्मोनियम) आणि पंडित अरविंद कुमार आझाद (तबला) यांची वाद्य संगत लाभणार आहे.

या कार्यक्रमानंतर प्रख्यात सरोद वादक अनुपम जोशी यांचे सरोद वादन सादर होणार असून पंडित अरविंद कुमार आझाद हे तबल्याची साथ करतील. मेघावी संस्थेच्या या कार्यक्रमास प्रख्यात बासरी वादक पंडित केशव गिंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पटवर्धन करणार असून हा कार्यक्रम सर्वांना विनामूल्य आहे. मेघावी संस्थेतर्फे सन २००६ पासून उपशास्त्रीय गायन आणि वाद्यसंगीत यांच्या प्रसारासाठी वर्षातून सहा विशेष कार्यक्रमांचे रसिकांसाठी मोफत आयोजन केले जाते.

शेतकऱ्यांनो आत्‍महत्‍या करणे उपाय नाहीःचर्चेने प्रश्न सोडवू- ज्‍येष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक

पुणे  :‘‘शेतीला पाणी व वीज देणे ही शासनाची कायदेशीर जबाबदारी आहे. उत्‍पादनावर आधारीत बाजार भावाचा कायदा करणे, बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देणे हे कायदेशीर आहे. सध्या शेतकरी प्रतिकुल परिस्‍थितून वाटचाल करीत असल्‍याने आत्‍महत्‍या करीत आहेत. आत्‍महत्‍या करने हा त्‍यावरील उपाय नसून शासन व शेतकऱ्यांने मिळून प्रश्न सोडवावेत. असे मत ज्‍येष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्‍यक्‍त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे मानवतातीर्थ रामेश्वर (रुई), येथे उभारण्यात आलेल्‍या ‘तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वशांती स्मृतिभवन’ येथे‘तथागत गौतम बुद्ध जयंती’साजरी करण्यात आली. त्‍यावेळी डॉ. बुधाजीराव मुळीक बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री (DICCI)चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांना विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्‍या हस्‍ते ‘तथागत गौतम बुध्द पंचशील विश्वशांती पुरस्‍कारा’ने सन्‍मानित करण्यात आले. सन्‍मानपत्र, स्‍मृतीचिन्‍ह आणि घोंगडी हे पुरस्‍काराचे स्‍वरूप होते.
या प्रसंगी माजी खासदार गोपाळराव पाटील, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, थोर साहित्यिक व लेखक प्रा.रतनलाल सोनग्रा, ज्येष्ठ दलित नेते मोहनराव माने व लातूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे सभापती संजय दोरवे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी सौ. सीमा मिंलिंद कांबळे, शेतीनिष्ठ कर्मयोगी, ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी काशीराम दा. कराड, विनायक पाटील, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड, सरपंच सौ. सुधामती नारायण कराड आणि उपसरपंच कमाल राजेखाँ पटेल हे उपस्‍थित होते.
डॉ. बुधाजीराव मुळीक म्‍हणाले,‘‘शेतकऱ्यांच्‍या आधारावर सर्वांचे चांगले चालते पण शेतकऱ्यांचे वाईट होते. त्‍यामुळे बुध्द पोर्णिमेच्‍या निमित्‍त शासनाने शेतकऱ्यांसाठी चांगला कायदा करावा अशी मागणीही त्‍यांनी केले. तसेच भगवान गौतम बुध्दांनी जीवनातील पाच तत्‍वे सांगितले, ते म्‍हणजे चोरी करणार नाही, व्‍याभिचार करणार नाही, असत्‍य बोलणार नाही, मद्य पान करणार नाही आणि प्राणी हिंसा करणार नाही. याचे पालन सर्वांनी केल्‍यास समाजात विश्वशांती निर्माण होईल.
शासनावर अवलंबून राहू नका. जे काही दयावयाचे आहे ते कायद्याने दया. जगात शांती पाहिजे असेल तर पोटात दाना हवा, त्‍यासाठी काम दया.
जगात सर्वांना माहिती आहे की शेती फायदेशीर नाही. शेतकऱ्यांचे उत्‍पन्नाचे नुकसान झाले त्‍याची भर कायद्याने दयावी. शेतकऱ्यापेक्षा शेतमजूर व माथाडी कामगार सुखी आहेत. शेतकऱ्याचा माल कोणी घ्यावा तसा कायदा करने गरजेचे आहे.’’
डॉ. मिलिंद कांबळे म्‍हणाले,‘‘डायलॉग, डिबेट आणि डिक्‍सशन या त्रिसूत्रीच्‍या आधारे डिक्‍की कार्य करीत आहे. देशाच्‍या आर्थिक क्षेत्रात आम्‍ही भागीदार बनून नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे युवक बनविणे हे आमचे लक्ष आहे. त्‍याच माध्यमातून भारताला सुदृढ करावयाचे आहे. गरीब, दरिद्र व दुर्बल व्‍यक्‍तीवरच अन्‍याय व अत्‍याचार होत होतात, याचे कारण त्‍यांच्‍याकडे द्रव्‍य नाही. त्‍यामुळे आम्‍ही आर्थिक लोकशाही प्रस्‍थापित व्‍हावे हा धागा धरून सामाजिक आणि वित्तिय समावेशन होण्याचे कार्य करण्यासाठी डिक्‍कीची स्‍थापना झाली. याच्‍या माध्यमातून आज २ हजार उद्योजकांना वेंडर व सप्‍लायर म्‍हणून जोडले. डिक्‍कीच्‍या माध्यमातून आम्‍ही युवकांना वेगळा मार्ग दाखविला. आत्‍मविश्वास व कामाच्‍या प्रति निष्ठा असेल तर आर्थिक विकास होईल. तुच तुझ्या जीवनाचा शिल्‍पकार हो हे सूत्र युवकांनी सैदव लक्षात ठेवावे.
रामेश्वर येथील राममंदिरात बुध्दम शरणम गच्‍छामीची धुन ऐकणे ही इतिहासातील मोठी घटना आहे. डॉ. आंबेडकर यांनी नासिकमध्ये काळाराम मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी केलेल्‍या आंदोलनाची आठवण झाली. या ठिकाणीतील राम मंदिरातील घटनाने स्‍पष्ट जाणवले की येथील लोकांनी दलितांना स्‍विकारले . या जिल्‍ह्यातील इतिहासात ही घटना लिहिली जाईल.’’
प्रा.डॉ. विनश्वनाथ दा. कराड म्‍हणाले, ‘‘छोट्या गावात दोन मोठ्या लोकांचा सत्‍कार होणे अभिमानस्‍पद आहे. ही भूमि साधू संतांची आहे. संपूर्ण जगात भगवान गौतम बुध्द आणि महात्‍मा गांधी यांची शांतीदूत म्‍हणून ओळख आहे. वसुधैव कुटुम्‍बकम ही संकल्‍पना भारताने दिली आहे जी संपूर्ण विश्वाची धारणा आहे. १८९७ साली स्‍वामी विवेकानंद यांनी सांगितले की २१वे शतक भारत मातेचे असेल. या शतकात संपूर्ण जगाला सुख, शांती, समाधान आणि ज्ञानाचा मार्ग भारत दाखविले. परंतू या देशाला जो जाती पातीचा शाप लागला आहे, त्‍यासाठी भगवान गौतम बुध्दांचा संदेश आचरणात आणावा.’’
प्रा.डॉ. रतनलाल सोनग्रा म्‍हणाले,‘‘भगवान बुध्द हे शेतकरी होते त्‍यांनी मना मनाची मशागत केली. प्रत्‍येक मानवाच्‍या मनामध्ये विविध विचारांची स्‍पर्धा निर्माण होत असते. अशावेळेस बुध्दाच्‍या चरणी सर्व अर्पण करने हेच खरे ज्ञान आहे. येथे भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या नावाने जे स्‍मृती भवन निर्माण केले आहे. ते जगातील आश्चर्य आहे. हे स्‍मृतीभवन पहायला लाखों पर्यटक येतील तेव्‍हाच खऱ्या दृष्टीने हे मानवतीर्थ म्‍हणून उदयास येईल.’’
सुरुवातीला गोविंद जाधव व शेषराव कांबळे बुध्द वंदना सादर केली.
डॉ. एस.एन.पठाण यांनी प्रस्‍ताविक केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले. हणमंत गजधने यांनी आभार मानले.

खेड शिवापूर टोल नाक्याजवळ बिबट्याच्या पिलांची तस्करी करणारे तिघे जेरबंद

पुणे  : पुणे-सातारा महामार्गावरील  खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहने तपासताना राजगड पोलिसांनी मोटारीतून बिबट्याच्या बछड्यांची तस्करी करणा-या तिघांना  राजगड पोलीसांनी सोमवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून बिबट्याचे दोन बछडे ताब्यात घेण्यात आले आहे. या बछड्यांची तपासणी करून त्यांना कात्रज वनउद्यानात पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना हबिब सय्यद (वय ३१,  रा.कवठेयमाई ता.शिरूर जि.पुणे), इराफास मेहबूब शेख (वय ३२ रा.वडगांव बुद्रुक, खडी मशीन शेजारी), आयास बक्षुलखान पठाण (वय ४० रा. घोरपडी पेठ  पुणे) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
सोमवारी सकाळी राजगड पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एका मोटार पोलीसांना संशयास्पद आढळली. त्यांनी मोटारीची तपासणी केली असता गाडीच्या मागच्या बाजला दोन खोकी झाकून ठेवल्याचे दिसले. पोलीसांनी त्याची तपासणी केली असता प्राण्यांकरिता वापरण्यात येणा-या प्लास्टिक बकेट मध्ये बिबट्याची दोन बछडे आढळून आली. पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले. तसेच याची माहिती  नसरापूर येथील वनविभागाचे अधिकारी एस. यु जाधवर यांना दिली. त्यांनी घटनास्थळी येत यातील एक बछडा नर आणि एक बछडा मादी जातीचा असल्याचे सांगितले.
राजगड  पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे  यांच्या मार्गदर्शनाखाली  हवालदार अंबादास बुरटे, सचिन कदम आणि मनोज निंबाळकर यांच्या पथकाने ही कारवाई  केली. पुढील तपास सहायक फौजदार समीर कदम करत आहेत.

पंजाबी गायिका गिन्नी माहीने जिंकली रसिकांची मने

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे बोपोडीत रंगला शाहिरी जलसा 
पुणे : पहाडी आवाजातील भीमगीते, पंजाबी संगीतावरील भांगडा आणि गाण्यांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलेले वंदन यामुळे पंजाबी गायिका गिन्नी माहीने रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवत मने जिंकली. उपस्थितांतून होणारा टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्याही पाहायला मिळाला. गिन्नी माहीच्या पंजाबी बुद्ध आणि भीमगीतांनी बोपोडीकरांच्या मनावर मोहिनी घातली.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात गीन्नी माही हिच्या बुद्ध, शिवराय, फुले, आंबेडकर यांच्यावर आधारित हिंदी-पंजाबी गीतांचा शाहिरी जलसा रंगला. गिन्नी माहीचा पुण्यात पहिल्यांदाच कार्यक्रम असल्याने तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. बोपोडीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात झालेल्या या कार्यक्रमाला हजारो पुणेकरांनी उपस्थिती लावली. सांस्कृतिक महोत्सव समितीचे प्रमुख परशुराम वाडेकर यांच्या पुढाकारातुन हा कार्यक्रम झाला. यावेळी नगरसेविका सुनीता वाडेकर, प्रकाश ढोरे, निवेदक दीपक म्हस्के यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
‘बाबासाहेब तुझको है प्रणाम मेरा’, ‘भीमा तेरे सोच को सलाम’, ‘नमो बुध्दाय नमो नमो’, ‘बाबा लिख दिया ऐसा संविधान’, ‘आँखो में बुद्ध, बातोमे बुद्ध’, ‘रमाबाई तेरे चरणो में सजदा सोसो बार करूं’, ‘फॅन बाबासाहब दी’ यासह बहारदार भीमगीते सादर करत गिन्नी माहीने अक्षरक्ष: खिळवून ठेवले. आपल्या सादरीकरणात रसिकांना सामावून घेत भांगडा नृत्यावर ठेका धरायला लावला. हिंदी-पंजाबी गीतांच्या नजराण्याने बोपोडीकरांचे कान तृप्त झाले. सूत्रसंचालन गौरवकुमार, दीपक म्हस्के यांनी केले. तबल्यावर सरबजीत, कीबोर्डवर धर्मेंद्रसिंग, ढोलकीवर संदीपकुमार, गिटारवर कांचन लिंबाळकर यांनी साथसंगत केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपण सर्व सन्मानाने जगत आहोत. त्यांच्या कर्मभूमीवर येऊन माझी कला सादर करण्याची संधी मला मिळाल्याने खूप आनंदित झाले आहे. आयुष्यभर गायनाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार, तत्वज्ञान जगभर पोहोचविण्यासाठी कार्यरत राहणार आहे, अशी भावना गिन्नी माही हिने यावेळी व्यक्त केली.

एक्झिट पोल सत्याचा विपर्यास : उल्हास पवार

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या भाजपाच्या दोन प्रमुख नेत्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आपल्याला पूर्ण बहुमत देणारे ठरणार नाहीत, हे लक्षात येताच देशातील काही प्रादेशिक पक्ष आणि छोटे पक्ष यांच्यावर दबाव आणण्यासाठी एक्झिट पोलच्या माध्यमातून संभ्रमाचे (भीतीचे) वातावरण निर्माण करत काँग्रेस आणि इतर पक्षांनी चालवलेल्या बहुमताने सत्ता स्थापनेच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण केला आहे. या विविध चॅनल्सनी दाखवलेल्या एक्झिट पोलमध्ये दिसून येणारी साधर्म्य ही संशयास्पद असून, या आकडेवारीद्वारा निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींचा घोडेबाजार करून सौदा करण्याचा घाट घातला आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते उल्हास पवार यांनी दिली. 
 
एकूण पाच राज्यात निवडणूक करताना ईव्हीएम मशीनला हात न लावता ईव्हीएमबद्दलची विश्वासार्हता निर्माण करून प्रत्यक्ष लोकसभेच्या निवडणुकीत मात्र महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये आपले संख्याबळ टिकवण्यासाठी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक फेरफार करण्यात आला आहे, अशी शंका देशातील ममता बॅनर्जी, चंद्रबाबू नायडू, शरद पवार या प्रमुख नेत्यांनी निवडणुकीपूर्वीच व्यक्त केली आहे. ही सारी निवडणूकच इव्हेंट मॅनेजमेंट करून भाजपाने भारतीय संसदीय लोकशाहीत कलंकित केली आहे, असेही उल्हास पवार यांनी म्हटले आहे.

मतमोजणी दिवशीचे वाहतुकीचे नियमनाची तयारी पूर्ण

पुणे :- पुणे जिल्हयामधील मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुलामध्ये दि.23 मे 2019 रोजी होणार आहे.  या दिवशी करण्यात येणा-या वाहतुकीचे नियमनाची तयारी पोलीस विभागाकडून करण्यात आली आहे. त्याविषयी राजकीय पक्षांच्या उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना  तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देण्याकरीता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

           या बैठकीला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अति.आयुक्त दिलीप गावडे,            उप जिल्हाधिकारी संदीप निचित, पिंपरी-चिंचवड परिमंडल-2 च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त  (प्रशासन) श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक ( वाहतूक) किशोर म्हसवडे आदी अधिकारी उपस्थित होते.

          यावेळी पोलीस प्रशासनाकडून उपस्थित राजकीय पक्षांचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या दिवसाची वाहतुकीविषयी माहिती देताना कोणत्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना कोणत्या ठिकाणी आपली वाहने पार्क करता येईल याबाबतची माहिती देवून   मतमोजणीकरीता उपस्थित राहणा-या सर्वच अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या वाहनांना  ओळखपत्र पाहून मुख्य दरवाज्यातून सकाळी 7 वाजेपर्यंतच प्रवेश देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. तसेच ओळखपत्राशिवाय आत सोडले जाणार नाही व एकदा आत सोडल्यानंतर बाहेर जाताना त्याचे ओळखपत्र जमा करण्यात येवून पुन्हा त्यांना आत सोडले जाणार नाही.तसेच मतमोजणी केंद्रात कोणालाही मोबाईल नेण्यास बंदी असल्याची   माहिती  यावेळी देण्यात आली.

“झंझावात” ध्वनीपुस्तकाचे प्रकाशन संपन्न!

पुणे- “इतिहासात अनेक महान व्यक्तिमत्वे आज विस्मृतीत जाऊ पाहत आहेत. महाराजा यशवंतराव होळकर त्यापैकीच एक. वाचनाची सवय कमी होत असल्याच्या काळात श्राव्य माध्यमातून जगभरातील उत्तमोत्तम साहित्य जगभरातील श्रोत्यांना उपलब्ध करुन देण्याचा वीडा स्टोरीटेलने उचलला आहे. मराठीचे दालनही समृद्ध होत असून आता यशवंतराव होळकरांवरील कादंबरी श्राव्य माध्यमात आल्याने हे विलक्षण व्यक्तिमत्व जगभर पोहोचेल.” असा विश्वास स्टोरीटेलचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. योगेश दशरथ म्हणाले. ते आद्य स्वातंत्र्य सेनानी महाराजा यशवंतराव यशवंतराव होळकरांच्या वादळी जीवनावर आधारित “झंझावात” या ध्वनीपुस्तकाचे प्रकाशन करतांना बोलत होते. याप्रसंगी लेखक संजय सोनवणी, प्रसिद्ध कवी संतोष देशपांडे आणि आदिम हिंदू महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पानपत्ते उपस्थित होते. आदिम हिंदू महासंघातर्फे हा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता.

श्री. योगेश दशरथ पुढे म्हणाले की, जगभरातील श्रुत परंपरा पुरातन आहे. गोष्टी, आख्याने ऐकतच पुर्वी लोक मोठे व्हायचे. आज धकाधकीच्या जीवना श्राव्य माध्यमाला पुन्हा महत्व येवू लागले आहे. स्टोरीटेलने अशा सर्वच श्रोत्यांसाठी लक्षावधी पुस्तके आता ऐकण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे. साहित्य संस्कृतीला यामुळे आता एक वेगळे वळण मिळाले आहे.

लेखक संजय सोनवणी म्हणाले की शून्यातुन स्वत: एक राज्य निर्माण करत राज्याभिषेक करुन घेत नंतर इंग्रजांना भारतातून हाकलण्यासाठी एकहाती लढा उभारणा-या यशवंतरावांचे जीवनच एक महाकाव्य आहे. महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या या महावीराबद्दल मात्र क्वचितच कोणाला माहिते असते. त्यांचे जीवन लिहिणे आणि ध्वनीमुद्रित कर्णे हाच एक थरारक अनुभव होती. प्रत्येकाने ते ऐकलेच पाहिजे.

श्री. सतीश पानपत्ते यांनी सूत्र संचालन केले.

शंभर टक्के विजय आपलाच – मोहन जोशी

पुणे-
येणारी २३ तारीख ही आपल्या विजयाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची तारीख आहे. मतमोजणी प्रतिनिधींनी
ईव्हिएम मशीनबाबत जागृत राहून मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत उपस्थित राहावे. विजय शंभर टक्के
आपलाच आहे. असा विश्वास पुणे लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार
मोहन जोशी यांनी व्यक्त केला.
पुणे लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या
मतमोजणीच्या निमित्ताने मतमोजणी प्रक्रिया आणि ईव्हिएम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे निरीक्षक राहुल साळवे यांनी मतमोजणी
कशी करायची व मतमोजणी प्रक्रियेसाठी काय कारायचे याबाबत सादरीकरण केले. उपस्थित मतमोजणी
प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी यावेळी अनेक तांत्रिक मुद्दे आणि एखादा शंका घेण्यासारखा प्रसंग उपस्थित झाला
तर त्यावेळी नेमके काय करायचे याबाबत प्रश्न विचारले. साळवे यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करत त्यांना
मार्गदर्शन केले. अॅड. अभय छाजेड, माजी महापौर दत्तात्राय गायकवाड, नितीन कदम, गोपाल तिवारी,
नगरसेवक दत्ता बहिरट, मनीष आनंद, वीरेंद्र किराड, अॅड. रुपाली पाटील, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा
सोनाली मारणे, शशिकला कुंभार, शशिकांत तापकीर, सागर अल्हात जयंत किराड, अनिल सोंडकर, रवींद्र
भुतडा, सचिन आडेकर, प्रवीण करपे, बाळासाहेब अमराळे, दत्ता सागरे, शिवाजी बांगर, दीपक जगताप, विजय
खराडे, गणेश नलावडे, शैलेश नलावडे, यासिर बागवे, आदी यावेळी उपस्थित होते.
मोहन जोशी म्हणाले, कॉंग्रेसच्या आणि सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी निवडणूक
जिंकण्यासाठी कष्ट करून मतदान करून घेतले. त्यामुळे २३ मे ही तारीख विजयाच्या दृष्टीने महत्वाची आहे.
मतमोजणी प्रतिनिधींनी वेळेवर मतमोजणी केंद्रावर आपापल्या जागेवर उपस्थित राहावे. ही निवडणूक
संघर्षाची आहे. शेवटच्या फेरीपर्यंत विजय जाणार आहे आणि शंभर टक्के विजय आपलाच आहे. त्यामुळे शेवटची
फेरी संपेपर्यंत जागा सोडू नये असे आवाहन त्यांनी केले.
दीपक जगताप यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सहाही मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित
होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित दरेकर यांनी केले तर सूत्रसंचालन गौरव बोराडे यांनी केले. वीरेंद्र किराड यांनी
उपस्थित असलेला प्रत्येक कार्यकर्ता हा ऐतिहासिक विजयाचा साक्षीदार असणार आहे. त्यामुळे
मतमोजणीसाठी सकाळी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करत सर्वांचे आभार मानले.

महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेला ३८ जागा: एक्झिट पोल

मुंबई-लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार असले तरी एक्झिट पोलचे चित्र स्पष्ट झाले असून महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचा वरचष्मा कायम राहताना दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी गेल्यावेळेपेक्षा किंचित सुधारणार असाही अंदाज आहे.

टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला ३८ जागा मिळण्याची शक्यता असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला १० जागा मिळण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला ४२ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेस आघाडीला ६ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस आघाडीच्या ४ जागा वाढून १० जागांपर्यंत आघाडी मजल मारणार असून भाजप-शिवसेनेला ४ जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
२०१४मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने ३४.१ टक्के तर भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने ५१.३ टक्के मते मिळवली होती. अन्य पक्षांच्या पदरात १४.६ टक्के मते गेली होती. आताचे एक्झिट पोल पाहता भाजप आघाडीचा मतटक्का २.७ ने घटून ४८.६ टक्क्यांवर येईल तर काँग्रेस आघाडीला ३६.५ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. अन्य पक्षांना १४.९ टक्के मतदान होऊ शकतं.
राज यांच्या सभांचा फायदा कुणाला?
उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक ४८ जागा महाराष्ट्रात असून राज्यात ४ टप्प्यांत मतदान झाले होते. राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध जोरदार प्रचार मोहीम राबवली. प्रमुख महानगरांमध्ये जाहीर सभा घेत राज यांनी रान उठवले. त्याचा तितकासा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल, असे या सर्वेक्षांमधून मात्र दिसत नाही.

नगररस्त्यावरील राष्ट्रवादीचे नगरसेवक आमरण उपोषण करणार

पुणे: उन्हाळयात पाण्याची मागणी वाढलेली असतानाच; नगर रस्ता परिसरात सातत्याने कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणीही मिळत नाहीत. याबाबत प्रशासनाला वारंवार पत्र देऊन तसेच तातडीनं इतर पर्यायाद्वारे नागरिकांना पाणी देण्याची विनंती करूनही काहीच फरक पडत नाही. त्यामुळे नगर रस्ता परिसरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी येत्या 28 मे पासून महापालिके समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांना दिला आहे. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात येणार असल्याने नगरसेवक महेंद्र पठारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पठारे म्हणाले की, गेल्या काही वर्षात वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. चंदननगर, खराडी, साईनाथनगर, वडगावशेरी, विमाननगर, लोहगाव परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. अचानक दोन दोन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होतो. तर येणाऱ्या पाण्याचा दाब प्रचंड कमी असतो. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी तासंतास घालवावे लागतात. याबाबत अनेकदा मोर्चा, आंदोलनही केली असून मुख्यसभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आवाज उठविला आहे. या नंतर काही दिवस पाणी पुरवठा सुरळीत होतो.

मात्र, त्यानंतर पुन्हा पाण्यासाठी टॅंकरचा नागरिकांना पाण्याचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे एका बाजूला मिळकतकरात पाणीपट्टी भरूनही दुसऱ्या बाजूला टॅंकरसाठीही पैसे मोजावे लागतात. त्यामुळे पाण्यासाठी नागरीकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून प्रशासनाने तातडीनं पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी आता आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत महापालिका आयुक्तांना माहीती देण्यात आल्याचे पठारे यांनी स्पष्ट केले.

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील मते यात तफावत आढळणार नाही -जिल्हाधिकारी

पुणे : यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट मधील स्लिपांची मोजणी केली जाणार आहे. सर्वसाधारणपणे एका मतदान केंद्रावर बाराशे ते दीड हजार मतदान झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 120 मतदान केंद्रांमधील तब्बल दीड लाख व्हीव्हीपॅट स्लिप्सची मोजणी करावी लागेल. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील मते यात तफावत अढळून येण्याची शक्यता नाही. उमेदवारांनी यासंदर्भात काही आक्षेप घेतले तर त्यावर कोणता निर्णय घ्यावा,याबाबतही सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले .

येत्या २३ तारखेला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. निकाल कधी लागणार या बद्दलची कमालीची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. मात्र गुरुवारी (दि. २३) संध्याकाळी उशीरापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता नाही. त्यातही व्हीव्हीपॅट चिठ्यांची मतमोजणी, उमेदवारांचे आक्षेप यावरुन वाद उद्भवल्यास निकाल आणखी लांबू शकतो, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वास्तविक ईव्हीएमवर मतदान झाल्याने मतमोजणी कमीत कमी वेळेत होणे अपेक्षित असते.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार, जिल्ह्यातील चार मतदार संघांचे मतदान दोन वेगवेगळ्या टप्प्यात घेण्यात आले. पुणे व बारामती मतदार संघाचे मतदान २३ एप्रिलला तर आणि शिरूर व मावळ मतदार संघाचे मतदान २९ एप्रिलला झाले. देशातल्या सर्व लोकसभा मतदारसंघांमधल्या मतदानाचा अंतिम टप्पा रविवारी (दि. १९) संपतो आहे. त्यानंतरच देशातली मतमोजणी होणार आहे. जिल्हा प्रशासनानेही मतमोजणीसाठी आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण केली असून मतदार संघनिहाय आणि प्रत्येक टेबल निहाय कर्मचा-यांच्या नियुक्तीचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चारही लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्रांच्या चिठ्ठ्या तयार केल्या जाणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघांतर्गत येणा-या विधानसभा मतदार संघातील पाच मतदान केंद्रांची चिठ्ठ्यांमधून लॉटरी काढली जाईल.त्यानंतर ईव्हीएममधील मते आणि व्हीव्हीपॅटमध्ये जमा झालेल्या स्लिप्स यातील मतांची पडताळणी होईल.पुणे लोकसभा सभा मतदार संघातील कसबा, शिवाजीनगर, वडगावशेरी, कोथरूड ,पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड या सर्व मतदार संघातील प्रत्येकी पाच मतदान केंद्रांमधील मतांची मोजणी करण्यात येईल.त्यामुळे एका लोकसभा मतदार संघातील 30 मतदान केंद्रांची मोजणी होईल.तर चार लोकसभा मतदान केंद्रांमधील 120 मतदान केंद्रांची मोजणी करण्यात येईल.