Home Blog Page 2933

पीएसएलव्ही-सी 46 द्वारे रिसॅट-2 बी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

0

नवी दिल्ली-आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी 46 या यानाद्वारे रिसॅट-2 बी या उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.पहाटे साडेपाच वाजता यानाचे प्रक्षेपण झाले आणि उड्डाणानंतर सुमारे 15 मिनिटे 25 सेकंदांनी यानाने 556 किलोमीटरवर कक्षेत रिसॅट-2 बी उपग्रह सोडला.

रिसॅट-2 बी  उपग्रहाचे वजन 615 किलोग्रॅम असून, शेती, वन्यक्षेत्र आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रात तो सेवा देणार आहे.इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी मोहिमेत सहभागी सर्वांचे अभिनंदन केले आहे.3.6 मीटर रेडिअल रिब ॲण्टेनासह प्रगत तंत्रज्ञान असलेला हा प्रगत पृथ्वी निरिक्षण उपग्रह असल्याचे सिवन यांनी सांगितले.

नागरिकांसाठी खुल्या असलेल्या प्रेक्षागृहातून 5 हजार खगोलप्रेमींनी या प्रक्षेपणाचा आनंद घेतला.इस्रो आता चंद्रयान-2 च्या प्रक्षेपणासाठीच्या प्रयत्नांना गती देत आहे. 9 जुलै ते 16 जुलै 2019 दरम्यान चंद्रयान-2 प्रक्षेपित केले जाणार असून, 6 सप्टेंबर 2019 ला ते चंद्रावर उतरणे अपेक्षित आहे.

आजचा भारत राजीव गांधींच्या दूरदृष्टीचा परिपाक-अनंत बागाईतकर

पुणे : “स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी अतिशय अल्प काळात धडाडीचे निर्णय घेतले. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान, जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण, संरक्षण क्षेत्रावरील भर, शेजारील देशांशी संबंध आदी गोष्टींचा समावेश आहे. त्यांनी स्वप्न पाहिली आणि कोणत्याही प्रकारची तडतोड न करता कठोर निर्णय घेत त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल क्षेत्राचा विकास झाला आहे. त्यांच्या दूरदृष्टीचा परिपाक आहे,” असे मत ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अनंत बागाईतकर यांनी व्यक्त केले. ‘राजीव गांधी यांची प्रासंगिकता’ या विषयावरील व्याख्यानात अनंत बागाईतकर बोलत होते.
राजीव गांधी स्मारक समिती, मिशन राजीव, पुणे शहर काँग्रेस व तिवारी मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभा व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांचेही ‘राजीव गांधी – जोखीम घेणारा पंतप्रधान’ या विषयावर व्याख्यान झाले. राज्याचे माजी मंत्री आणि अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नवी पेठेतील पत्रकारभवनाच्या कमिन्स सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, मोहन जोशी, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, संयोजक गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.
अनंत बागाईतकर म्हणाले, “राजीव गांधी यांच्याकडे काम करण्याची क्षमता व मनाचा चांगुलपणा होता. ४१५ जागांचे राक्षसी बहुमत असतानाही त्यांनी कधीच विरोधकांचा तिरस्कार केला नाही. याउलट संवादी भूमिका घेत देशाच्या विकासाच्या दृष्टीने धोरणी आखली व राबवली. लोकशाहीचे मूल्य जपताना शिक्षण मंत्रालयाचे मनुष्यबळ विकास मंत्रालय, संरक्षण दलातील महत्वाचे बदल, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, ऑटोमोबाईलला प्रोत्साहन, विविध राज्यांतील चळवळींच्या भावना समजून घेत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न अशा अनेक गोष्टी राजीव गांधी यांनी केल्या. गेल्या चार-पाच वर्षात मात्र, चळवळी आणि विरोधी विचारणा ठेचण्याचे काम होत आहे. भाजप आणि संघाचे लोकही राजीव गांधी यांच्या अनेक निर्णयाचे कौतुक करत असत. हीच त्यांच्या कामाची पोचपावती होती.”
हेमंत देसाई म्हणाले, “सध्याचे सरकार लोकशाही संकुचित करत आहे. राजीव गांधी यांनी नेहमी दोन विचार असावेत, या भूमिकेला प्रोत्साहन दिले. त्यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका करणारे सध्याचे दोन नटसम्राट, बनिया केवळ द्वेषाचे राजकारण करीत आहेत. मतांचे ध्रुवीकरण आणि सौदे करण्यासाठी कोणत्याही अविवेकी भूमिकेतून काम करण्यावर त्यांचा भर आहे. राजीव गांधींनी ३० वर्षांपूर्वी जे काम करून ठेवले त्याची फळे आपण आज चाखत आहोत. पारदर्शक म्हणजे नेमके काय याचे उदाहरण त्यांनी घालून दिले होते. शेजारील देशांशी आणि देशातील राज्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात त्यांची भूमिका मोलाची होती. शपथ घेतल्यानंतर पहिल्या वर्षात त्यांनी धडाधड घेतलेल्या निर्णयांमुळे देश प्रगतीपथावर नेला. आज काही लोक काँग्रेस संपवण्याची भाषा करताहेत. मात्र, काँग्रेस हा विचार असून, तो कधीही संपणार नाही.”
बाळासाहेब थोरात म्हणाले, “देशाला तंत्रज्ञान देण्यात राजीवजींचे योगदान मोठे आहे. पुण्यात असलेले सीडॅक त्यांच्याच प्रयत्नातून उभे राहिले. तंत्रज्ञानासह आर्थिक, व्यापारी आणि शेती क्षेत्रावरही त्यांनी भर दिला होता. त्याबाबतीत अनेक चांगले निर्णय त्यांनी घेतले. माणूस म्हणून त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला होता. आजच्या द्वेषाच्या राजकारणात लोकशाही पुढे न्यायची असेल आणि देशाचा विकास व्हायचा असेल, तर राजीव गांधी यांच्या विचारांवर आपण चालले पाहिजे. त्यासाठी त्यांच्या कार्याचा, विचारांचा प्रचार व प्रसार आपण करायला हवा.”
गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले. हनुमंत पवार यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश गोडबोले यांनी आभार मानले.

राजीव गांधी यांना वाहिली मुख्यमंत्र्यांनी आदरांजली….

0

मुंबई: दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली. तसेच माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली.

२१ मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन. यानिमित्त मंत्रालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार आदींसह मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी दहशतवादविरोधी प्रतिज्ञा घेतली व दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले.

महिनाभरात थकीत अनुदान देण्याचे सांस्कृतिक मंत्र्यांचे नव्या मराठी चित्रपट निर्माता महामंडळाला आश्वासन

0

मुंबई (प्रतिनिधी )- ज्या संघटनेच्या नावाला आक्षेप घेत , काही व्हाटसऐप ग्रुप वर चर्चा उसळली आहे अशा नव्याने स्थापन झालेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाने आज सांस्कृतिक मंत्र्याकडून मराठी चित्रपट निर्मात्यांचे थकीत अनुदान महिनाभरात देण्यात येईल असे आश्वासन मिळविले आहे अशी माहिती येथे इम्पाचे संचालक आणि या नव्या निर्माता महामंडळाचे पदाधिकारी बाळासाहेब गोरे यांनी दिली .

ते म्हणाले ,’आज सोमवार दिनांक २० मे  रोजी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची  मंत्रालयातील कार्यालयात अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या  शिष्टमंडळाने भेट घेतली . यावेळी निर्मात्यांच्या विविध समस्यांच्या निरासन करण्याच्या उपाय योजनेबाबत ४५ मिनिटे  चर्चा केली. व त्यांना लेखी निवेदन दिले. मराठी चित्रपटाचे २०१७-१८ पासून अनुदानच्या थकित रक्कमेचे वितरण निर्मात्यांना ताबडतोब मिळाले पाहिजे म्हणून  आग्रह धरला. त्यावर मंत्रीमहोदयांनी निवडणूक आचारसंहिता संपताच येत्या १५ ते २० दिवसात आतापर्यंत थकीत सर्व पात्र चित्रपटांना अनुदान रक्कमेचे वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले.  तसेच मराठी चित्रपटाच्या वितरणासाठी मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे चित्रपट प्रदर्शित करण्याकरिता दिवस आणि शो ची वेळ उशीरा देत असल्याने चित्रपटाची योग्य जाहिरात करता येत नाही अशा नेमक्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली असून त्या बाबत काही उपाय योजनाही सुचविलेल्या आहे त्यासाठी लवकरच पुन्हा बैठक आयोजित  करण्यात येणार आहे. या शिष्टमंडळात अध्यक्ष देवेंद्र मोरे, बाळासाहेब गोरे महाराष्ट्रध्यक्ष, सेक्रेटरी महेश बनसोडे,सहखजिनदार राजेंद्र बोडारे,  सद्स्य बळीराम गावड, सतशील मेश्राम,बाल कलाकार सोहा आदि मान्यवर उपस्थित होते. असे त्यांनी पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हि सर्वात जुनी आणि शासनाकडून विविध अधिकार प्राप्त अशी संघटना आहे . या संघटनेच्या नावाशी या नव्या संघटनेच्या नावाचे साधर्म्य असल्याने काहींनी यावर जोरदार हरकती व्हाटस ऐप चर्चेतून घेतल्या आहेत .हरकती घेणारे  मराठी चित्रपट महामंडळाच्या  संचालक मंडळाचे समर्थक आणि हि नवी संघटना असे २ गट आता निर्मात्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत .कोणाच्याही माध्यमातून यश येवो ,पण मराठी चित्रपट सृष्टी आणि निर्माते ,आणि सर्व स्तरावरील कलाकार अडचणीतून बाहेर येवोत असे मानणारा हि तिसरा  मतप्रवाह हि  येथे आहे .

जी. एस. टी. दरातील कपात ही गृह खरेदीसाठी मोठी पर्वणी

क्रेडाई महाराष्ट्रतर्फे संपूर्ण राज्यात परिसंवाद संपन्न

पुणे :- जी. एस. टीच्या योजनेची माहिती सर्व विकसकांना तसेच चार्टर्ड अकाउंटंट, जी. एस टी कन्सलटंट यांना व्हावी यासाठी क्रेडाई महाराष्ट्र तर्फे राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये परिसंवादाचे आयोजन केले.

जी. एस. टी. मधील सवलतीच्या दराचा फायदा सामान्य ग्राहकास मोठ्या प्रमाणावर होत आहे. यापूर्वी १२ टक्के जी. एस. टी मुळे ग्राहकांच्या भोगवटा प्रमाणपत्र अथवा पूर्ण झालेल्या प्रकल्पामध्ये फ्लॅट बुकिंग करण्याचा कल होता मात्र नवीन नोटिफिकेशनमुळे राज्यभर बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पांमध्ये चांगल्या प्रमाणात सदनिकांची बुकिंग होईल अशी खात्री असल्याची भावना  क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव परीख यांनी व्यक्त केली.

केंद्र शासनाने १ एप्रिल २०१९ पासून घर बांधणीच्या प्रकल्पाकरिता पूर्वीच्या १२ टक्के  व ८ टक्के जी. एस. टी दरावरून ५ टक्के व १ टक्के इतका दर कमी करून भरघोस सवलत देवू केली आहे. यामध्ये पूर्वीचा १२ टक्के व परवडणाऱ्या घरांकरिता ८ टक्के इतका  जी. एस टी दर असताना बांधकाम व्यावसायिकास हा इनपुट क्रेडीटमधून मिळणारी वजावट घेऊन परिणामकारक जी. एस. टी. हा ५ टक्के ते ६ टक्के इतकाच होत होता ब बहुतांश बांधकाम व्यावसायिक त्याचा फायदा फ्लॅटच्या ग्राहकास फ्लॅटच्या दरांमध्ये सवलती द्वारे देत होते. मात्र आता शासनाने सरळ ग्राहकास ५ टक्के व परवडणारी घरे अर्थात नॉन मेट्रो शहरांसाठी ज्या सदनिकांचे चटई क्षेत्र ९० चौ. मी. पेक्षा कमी व सदनिकांची एकूण किंमत ४५ लाखांच्या आत असेल तर त्याला १ टक्के  जी. एस टी दर लागू केला आहे. या जी. एस टीच्या योजनेमध्ये मात्र विकसकास इनपुट क्रेडीटची वजावट घेता येणार नाही. या नवीन योजनांची बांधकाम व्यावसायिकांना योग्य माहिती व्हावी, तसेच अंमलबजावणी मधील संभ्रमावस्था दूर व्हावी या उद्देशाने क्रेडाई महाराष्ट्र तर्फे सोलापूर, जळगाव, मालेगाव, सातारा,नाशिक,नवी मुंबई,रत्नागिरी,सावंतवाडी,अमरावती, धुळे, कोल्हापूर अशा शहरांतील स्थानिक क्रेडाईच्या सहकार्याने नजीकच्या शहरांतील बांधकाम व्यावसायिक, चार्टर्ड अकाउंटंट, जी. एस. टी. कन्सलटंट यांना एकत्र करून व्यापक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चार्टर्ड अकाउंटंट संकेत शहा, चेतन ओसवाल, पोतदार यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे  निरसन देखील करण्यात आले.

ज्या प्रकल्पाचे ३१ मार्च २०१९ पूर्वी बांधकाम सुरु आहे अशा प्रकल्पांकरिता या नवीन नोटीफिकेशन नुसार जी.एस.टी लावायचा की,  जुन्या पद्धतीने १२ टक्क्याप्रमाणे जी. एस. टी लावून इनपुट क्रेडीट घ्यायचे हा निर्णय घेण्यासाठी २० मे ही अंतिम मुदत जी. एस. टी कौन्सिलने ठरवून दिली होती. याबाबत निर्णय घेण्याकरीता हा परिसंवादाचा खूप फायदेशीर ठरला अशा भावना विकसकांनी व्यक्त केल्या.

इनपुट क्रेडीट वजावटीची संधी निघून गेल्याने बांधकामासाठी होणारा खर्च २५० ते ३०० रुपये प्रति चौ.फुट इतका वाढला आहे. त्यामुळे पर्यायाने बांधकाम व्यावसायिकांना फ्लॅट विक्रीच्या दरामध्ये थोडी वाढ करावी लागणार आहे.

फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजबील भरल्याच्या अधिकृत पावत्या घ्याव्यात

0

मुंबई,:- वीजबिलाचा भरणा केल्यानंतर महावितरणकडून वीजग्राहकांना अधिकृत संगणकीकृत पावत्या देण्यात येतात.  परंतु काही ठिकाणी अशा अधिकृत पावत्या न देता वीजबिलावर केवळ शिक्का मारून देण्यात येत असल्याचे निर्दशनास आले आहे.  यामुळे संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी अधिकृत संगणकीकृत पावत्याच स्वीकाराव्यात तसेच अधिकृत पावत्या न देण्याचे प्रकार आढळून आल्यास ग्राहकांनी त्वरीत नजिकच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणने आपल्या सर्व वीजबील भरणा केंद्रांत (पोस्ट ऑफीस सोडून) संगणकीय प्रणाली अंमलात आणली आहे.  त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या वीज देयकाचा भरणा अचूक व ग्राहकाच्या खात्यावर त्वरीत समायोजित होतो तसेच यामध्ये ग्राहकांना अधिकृत संगणकीकृत पावत्याही देण्यात येतात. परंतु काही ठिकाणी वीजदेयक भरल्याची अधिकृत संगणकीकृत पावती न देता केवळ वीजबिलांवर वीजबील भरल्याचा शिक्का देण्यात येत आहे यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. म्हणून वीज ग्राहकांनी महावितरणच्या कोणत्याही प्रकारच्या रक्कमेचा भरणा करताना अधिकृत पावतीचाच आग्रह धरावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी व ऑनलाईन वीजबील भरणा करण्यासाठी ग्राहकांना विविध पर्याय महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in व महावितरणच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ऑनलाईन भरणा करणाऱ्या ग्राहकांना बिलाच्या रकमेच्या ०.२५ टक्के सूट महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सूट ऑनलाईन भरणा केल्यावर पुढील बिलात समायोजित करण्यात येते.  त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईन सुविधांचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वंध्यत्वाची मूळ कारणे जीवनशैलीशी निगडित

0
  • नोवा आयव्हीआय फर्टिलिटी ही भारतातील एक आघाडीची फर्टिलिटी चेन पुणे येथील वंध्यत्वाच्या वाढत्या प्रकारांबाबत करतेय जागृती
  • आयव्हीएफमार्फत 25,000 यशस्वी क्लिनिकल गर्भधारणा

पुणेकोणत्याही संरक्षणाविना वर्षभर लैंगिक संबंध ठेवूनही नैसर्गिकपणे गर्भधारणा न होणे, यास वंध्यत्व असे म्हणतात. बरीच वर्षे, वंध्यत्व ही महिला-केंद्री समस्या असल्याचे मानले जात असे. परंतु, नमूद करण्यात आलेल्या वंध्यत्वाच्या प्रकरणांपैकी 37% प्रकरणे पुरुषांशी संबंधित असतात, 38% स्त्रियांशी संबंधित असतात, आणि 25% प्रकरणांच्या बाबतीत कारणे अनभिज्ञ असतात. मूल होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांच्या जीवनात वंध्यत्वामुळे अनेकदा ताण निर्माण होतो.  विविध प्रकारचे वैद्यकीय निर्णय आणि वंध्यत्वामुळे निर्माण होणारी अनिश्चितता यामुळे अनेकांना प्रचंड शारीरिक व भावनिक त्रास होतो.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत, वंध्यत्वाच्या कारणांविषयी चर्चा करताना नोवा आयव्हीआय फर्टिलिटीच्या फर्टिलिटी कन्स्ल्टंट डॉ. नमीता मोकाशी भालेराव यांनी सांगितले,व्यक्तीच्या विविध पैलूंच्या बाबतीत प्रजननविषयक आरोग्य अतिशय संवेदनशील असते – शारीरिक, जैविक, वर्तनविषयक, सांस्कृतिक व सामाजिक-आर्थिक घटक. हे आरोग्य जीवन समृद्ध करण्याइतके सक्षम असते; आणि तरी सहज परिणाम होऊ शकेल, असे नाजूकही असते. आज, रीप्रॉडक्टिव्ह टॉक्सिसिटी या सर्वसाधारण प्रजननामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या रासायनिक घटकांशी संबंधित असणाऱ्या धोक्यामुळे बहुतांश जोडप्यांच्या प्रजननविषयक आरोग्यावर सर्रास परिणाम होत आहे. सध्याच्या जीवनशैलीविषयक सवयींमुळे विषारी वातावरण निर्माण झाले असून, ते टाळणे अवघड आहे.”

अनेकदा पुढील घटकांमुळे रीप्रॉडक्टिव्ह टॉक्सिसिटी निर्माण होते:

  • प्रचंड उष्णतेशी संपर्क

पुरुषांच्या बाबतीत, घट्ट अंतर्वस्त्र अंडकोशाचे तापमान वाढते व त्यामुळे स्पर्मच्या निर्मितीमध्ये घट होऊ शकते. बराच काळ सलग बसून गाडी चालवल्यानेही, वाहनातून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त उष्णतेशी अंडकोशाचा संपर्क येऊ शकतो.

  • सेलफोनच्या वापरातून निर्माण होणारे रेडिएशन

सेलफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. फोनमधून इलेक्ट्रो-मॅग्नेटिक लहरी येतात. त्या मानवी शरीरात शोषल्या जाऊ शकतात, त्यांचा परिणाम प्रजनन व्यवस्थेवर व प्रामुख्याने पुरुषांवर होतो. यामुळे स्पर्मचे केंद्रिकरण, मोटिलिटी व प्रमाण यावर परिणाम होऊ शकतो. पँटच्या खिशात सेलफोन ठेवल्याने पुरुषांच्या टेस्टिकल्सची टेस्टोस्टेरॉन निर्माण करण्याची क्षमता बाधित होऊ शकते.

  • अतिरिक्त धूम्रपान, मद्यसेवन

टोबॅको स्मोकमध्ये असणाऱ्या टॉक्सिनमुळे स्पर्म व अंडी यातील डीएनएवर दुष्परिणाम होतो. पॅसिव्ह स्मोकिंगही धूम्रपान करण्याइतकेच घातक असू शकते. अशा धूम्रपानाच्या संपर्कात येणाऱ्या महिलांना अन्य महिलांच्या तुलनेत गर्भधारणेसाठी अधिक वेळ लागतो. अतिरिक्त मद्यपान केल्याने पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन पातळी घटते आणि स्पर्मची गुणवत्ता व प्रमाण कमी होते. त्यामुळे लिबिडोमध्ये घट होऊ शकते व त्यामुळे नपुंसकता निर्माण होऊ शकते.

  • वजनाशी संबंधित जीवनशैलीचे घटक

स्थूलतेमुळे ओव्ह्युलेशनवर व स्पर्मच्या निर्मितीवर नकारात्मक परिणाम होतो. महिलांच्या बाबतीत, इन्सुलिनची अति-निर्मिती होते व त्यामुळे अनियमित ओव्ह्युलेशन व पीसीओएस (पॉलि-सिस्टिक ओव्हरिअन सिंड्रोम) असे परिणाम होऊ शकतात; पुरुषांच्या बाबतीत, स्पर्मची निर्मिती करणाऱ्या टेस्टिकल्सच्या स्टिम्युलेशनवर परिणाम होतो. अतिरिक्त फॅटमुळे टेस्टोस्टिरोन या मेल हॉर्मोनचे रूपांतर इस्ट्रोजनमध्ये होते आणि या इस्ट्रोजनमुळे टेस्टिकल स्टिम्युलेशनमध्ये घट होते. तर दुसरीकडे, वजन कमी असणाऱ्या पुरुषांमध्ये सर्वसाधारण बीएमआय असणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत लोअर स्पर्म ही समस्या असते. महिलांच्या बाबतीत वजन कमी असणे आणि बॉडी फॅट अतिशय कमी असणे, हे ओव्हरिअन डिसफंक्शनशी संबंधित असते, असे डॉ. नमीता यांनी सांगितले.

  • प्रदूषण व पर्यावरणविषयक टॉक्सिन्स

पुरुषांच्या बाबतीत, वायू प्रदूषणामुळे स्पर्मच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याव्यतिरिक्त, स्पर्मची निर्मिती व केंद्रिकरण यामध्ये घट होऊ शकते. यामुळे डीएनएमध्ये बिघाड होऊ शकतो व टेस्टिक्युलर कॅन्सरचा धोका वाढू शकतो. महिलांच्या बाबतीत, हवेतील प्रदूषकांमुळे हॉर्मोनचे, विशेषतः इस्ट्रोजनचे असंतुलन होते व त्याचा परिणाम ओव्ह्युलेशनवर होऊ शकतो. यामुळे गर्भधारणेचे प्रमाण कमी होते व गर्भपात होण्याचा व परिणामी लाइव्ह बर्थ-रेट घटण्याचा धोका वाढतो.

प्लास्टिकमध्ये केमिकल फ्थॅलेट्सचा समावेश असतो व त्यामुळे प्रजनन दर कमी होतो, स्पर्म डीएनएमध्ये बदल होतात, व टेस्टोस्टेरॉन पातळी कमी होते. या टॉक्सिन्समुळे स्पर्म डीएनए खराब होतात किंवा स्पर्ममध्ये जेनेटिक बदल होतात. मासिक पाळीमध्ये अडथळे, ओव्ह्युलेशनमध्ये बिघाड आणि एंडोमेट्रिऑसिसचा व स्पर्मची गुणवत्ता घसरण्याचा धोका यांच्याशी फ्थॅलेट्सची उच्च पातळी संबंधत असते, असे डॉ. नमीता यांनी नमूद केले

रुग्णांतील वंध्यत्वाचे निदान कसे केले जाते?

जननक्षमतेच्या कोणत्याही चाचणीदरम्यान, जोडप्यातील दोघांचीही तपासणी करणे बंधनकारक असते. पुरुषांच्या जननक्षमता मूल्यमापनाची सुरुवात साधारणतः तपशीलवार वैद्यकीय पार्श्वभूमीने आणि वीर्य विश्लेषणाने होते. त्यामध्ये, स्पर्म काउंट, मोटिलिटी व मॉरफॉलॉजी यांचे परीक्षण केले जाते.  या विश्लेषणाच्या निकालांनुसार पुढील चाचण्या केल्या जातात. उदाहरणार्थ, लो स्पर्म काउंट असणाऱ्या पुरुषांना कदाचित हॉर्मोनल किंवा जेनेटिक टेस्टिंग करावे लागू शकते. स्पर्म अजिबात  न आढळल्यास टेस्टिक्युलर बायॉप्सी करावी लागू शकते. असाधारण बाबी आढळल्यास हॉर्मोन प्रोफाइल, डीएनए फ्रॅग्मेंटेशन व डॉपलरसह स्कॉटल स्कॅन केले जाते. रुग्णावर उपचार सुरू असतील तर तीन महिन्यांनी पुन्हा वीर्य विश्लेषण केले जाते.

महिलांसाठी प्रजननविषयक चाचण्यांची सुरुवात अनेकदा ओव्ह्युलेशन व मासिक पाळीबाबत समस्या जाणून घेण्यासाठी रुग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी विचारण्यापासून होते. त्यानंतर, हॉर्मोन पातळी व ओव्हरिअन रिझर्व्ह तपासण्यासाठी रक्त तपासणी केली जाते. या अनुषंगाने, फायब्रॉइट किंवा एंडोमेट्रोसिस अशा असाधारण बाबी तपासण्यासाठी पेल्व्हिक परीक्षण केले जाऊ शकते. वंध्यत्वाची रचनात्मक कारणे शोधण्यासाठी अल्ट्रासाउंड इमेजिंग (सोनोग्राम) अशा मिनिमली इन्व्हेजिव्ह प्रक्रिया व सर्जरी केली जाऊ शकते.

नोवा आयव्हीआय फर्टिलिटी (एनआयएफ) ही वंध्यत्व क्षेत्रामध्ये सेवा देणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे आणि तिने आतापर्यंत आयव्हीएफमार्फत 25,000 यशस्वी क्लिनिकल गर्भधारणा केल्या आहेत.

नोव्हा आयव्हीआय फर्टिलिटीविषयी

नोवा आयव्हीआय फर्टिलिटी (एनआयएफ) ही फर्टिलिटी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. स्पेनमधील आयव्हीआयच्या भागीदारीने अॅडव्हान्स्ड असिस्टेड रीप्रॉडक्टिव्ह टेक्नालॉजी (एआरटी) भारतात आणणे, हे एनआयएफचे उद्दिष्ट आहे. या भागीदारीमुळे नोवाच्या आयव्हीएफ सेवा व तंत्रज्ञान यामध्ये लक्षणीय वाढ झाली असून त्यामध्ये प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर, प्रशिक्षण व गुणवत्ता व्यवस्थापन यांचा समावेश आहे. आयव्हीआयकडील ज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदीर्घ अनुभव यांच्या मदतीने एनआयएफने तेथील उत्कृष्ट दर्जाच्या प्रक्रिया, प्रोटोकॉल व धोरणे भारतात आणली आहेत.

आययूआय, आयव्हीएफ व अँड्रॉलॉजी सर्व्हिसेस असा मूलभूत उपचारपद्धतींबरोबरच, एनआयएफमध्ये अनेक अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध आहे, जसे एम्ब्रियोज व अंडी टिकवून ठेवण्यासाठी व्हिट्रिफिकेशन, एम्ब्रियो स्वीकारण्याची गर्भाशयाची वेळ ओळखण्यासाठी ईआरए, जेनेटिकली नॉर्मल एम्ब्रियो हस्तांतर करण्यासाठी पीजीएस व पीजीडी – आयव्हीएफ-आयसीएसआयनंतर गर्भधारणा होण्याची शक्यता लक्षणीय प्रमाणात वाढवणारे सगळे उपचार, यामध्ये अगोदर अनेकदा अपयश आलेल्या रुग्णांचाही समावेश होतो. एनआयएफ सध्या भारतात 20 फर्टिलिटी सेंटर चालवते (अहमदाबाद (2), बेंगळुरू (3), चेन्नई, कोइम्बतूर, हिसार, हैदराबाद, इंदोर, जालंधर, कोलकाता, लखनऊ, मुंबई (2), नवी दिल्ली (2), पुणे, सूरत व विजयवाडा).

अखिल भारतीय नाट्य परिषद ४१वा वर्धापनदिनानिमित्त कलावंतांचा सत्कार सोहळा

पुणे – अखिल भारतीय नाट्य परिषदेचा यंदा ४१ वा वार्धपानदिन सोहळा   उल्हास पवार ( माजी आमदार )अभिनेत्री वर्षा उसगावकर,मेघराज भोसले (अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शहर ) यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे येत्या शनिवारी २५ मे २०१९ रोजी सायंकाळी ४:३० वा बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. 
     नाट्यक्षेत्रात उत्तम अभिनय ,उत्तम दिग्दर्शन ,विनोदी कलाकार ,संगीतकार ,उत्कृष्ट नाट्य निमिर्ती ,पडद्यामागील कलाकार यांचा सन्मान होणार आहे या कार्यक्रमाला सहभागी रंगकर्मी कलाकार प्रवीण तरडे ,आस्ताद काळे ,सौरभ गोखले , शशांक केतकर , चेतन चावडा , आशुतोष वाडेकर ,जमील शेख ,विजय मिश्रा ,केतन क्षीरसागर , सुशांत शेलार , सिद्धेश्वर झाडबुके ,सक्षम कुलकर्णी ,केतन गोडबोले , संस्कृती बालगुडे , मधुरा देशपांडे ,शाश्वती पिंपळेकर ,अश्विनी कुलकर्णी संजीव मेहेंदळे ,कविता टिळेकर ,हेमांगी कवी आणि नैना आपटे आणि इतर क्षेत्रातील अनेक कलाकार ,मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
   या कार्यक्रमाचे संकलन दिग्दर्शन विनोद खेडकर -विजय पटवर्धन ,निवेदन लेखन संजय डोळे,नृत्य दिग्दर्शन अश्विनी कुलकर्णी ,बहुरंगी मनोरंजन ,नाटक ,नाट्यगीते ,नाट्यपदे , प्रहसन इत्यादी या कार्यक्रमांमध्ये होणार आहे.   
 
   – सत्कारार्थीची नावे  पुढीलप्रमाणे 
उत्कृष्ट अभिनय – पुरुष –राज्यनाट्य स्पर्धा – विशाल इंगळे 
उत्कृष्ट अभिनय – स्त्री राज्यनाट्य स्पर्धा -सुचित्रा गिरीधर 
उत्कृष्ट दिग्दर्शन राज्यनाट्य स्पर्धा – अभयसिंह जाधव 
उत्कृष्ट नाट्यनिर्मिर्ती राज्यनाट्य स्पर्धा –निर्माण -पुणे 
मनोरम नातू पुरोस्कृत नाट्यलेखन – डॉ . विवेक बेळे 
उत्कृष्ट व्यावसायिक दिग्दर्शन कै. पार्श्वनाथ आळतेकर स्मृती पारितोषिक – हेमंत एदलाबादकर
नाटक समिक्ष पुरस्कार गो. रा. जोशी स्मृती पुरस्कार – नम्रता फडणीस 
पडद्यामागील पुरस्कार 
छोटा गंधर्व पुरस्कार – अरुण दत्त 
दिगवंत कलाकारांच्या पत्नीस 
कै. रमाबाई गडकरी स्मृती पुरस्कार -सायली बेंद्रे 
उदयोन्मुक संगीत कलाकार 
वसंतराव देशपांडे स्मृती पुरस्कार -लीलाधर चक्रदेव 
पुणे परिषद शाखा कार्यकर्ता -शेखर ढेने ( तात्या )
कै. गंगाधरवंत लोंढे पुरस्कार -राजेंद्र अलमखाने 
 रंगभूमी व चित्रपट विनोदी कलाकार 
वसंत शिंदे पुरस्कार – चेतन चावडा 
कै .सुनील ताटे पुरस्कार – सौरभ गोखले 
लोकनाट्य विनोदी कलावंत 
रामनगरकर स्मृती पुरस्कार -शंकर जाधव 
महान नैपत्यकार 
पु . श्री. काळे स्मृती पुरस्कार -विठ्ठल हुलावळे 
उत्कृष्ट गद्यनट  
नटवर्य केशवराव दाते पुरस्कार – प्रदीप पटवर्धन 
संगीत क्षेत्रातील दीर्घकालीन सेवा 
कै. माणिक वर्मा पुरस्कार – मधुवंती दांडेकर 
अखंड नाट्यसेवा 
कै. बबनराव गोखले पुरस्कार – राजश्री आठवले 
रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवा 
कै. भार्गवराव आचरेकर स्मृती पुरस्कार -दीप्ती भोगले 
रंगभूमीवरील लक्षणीय अभिनय 
कै. यशवंत दत्त पुरस्कार -आस्ताद काळे 
कै. मधू कडू पुरस्कार – महेंद्र चव्हाण 
कै. मधुकर टिल्लू  पुरस्कार – मंजिरी धामणकर 
कै. अरुणभट स्मृती 
जीवन स्पर्श – विजय पटवर्धन 
पारंपरिक लोककला 
यमुनाबाई वाईकर पुरस्कार – शकुंतल नगरकर

राजीव गांधींना अभिवादन

पुणे : राजीव गांधी स्मारक समिती, मिशन राजीव आणि पुणे शहर  काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्या हस्ते कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजीव गांधी स्मारक समितीचे प्रमुख गोपाळ तिवारी, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, सचिन तावरे, लहुअण्णा निवंगुणे, भूषण राहाम्बरे, भोला वांजळे, नितीन पायगुडे, विवेक भरगुडे, अस्लम बागवान, सुरेश उकिरडे, महेश अंबिके, संजय अभंग, आबा जगताप आदी कार्यकर्त्यांसह उद्यान निरीक्षक राजकुमार जाधव उपस्थित होते.

मिरा भाईंदर मनपा 538 कर्मचाऱ्यांना वारसा हक्क मिळून देऊ – भाऊसाहेब पठाण

मुंबई. ( प्रतिनिधी ) – मिरा भाईंदर महानगरपालिकेतील आस्थापनेवरील 538 सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क मिळून देण्यसाठी शासनास भाग पाडू असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी नगरभवन येथे केले आहे. यावेळी सरचिटणीस प्रकाश बने, सह सचिव वरेश कमाने, कोषाध्यक्ष मुंबई मार्तंड द्राक्षे, आरोग्य विभाग संघटनेचे सचिव बाबाराम कदम, राज्य राखीव पोलीस बल संघटनेचे सरचिटणीस सुभाष गोरे हे उपस्थित होते.

यावेळी पठाण म्हणाले की, सफाई कामगारांना लाड / पांगे समितीच्या शिफारस लागू असताना येथील कामगारांना का ? मिळत नाही. भारत देश लोकशाही वर चालणारा देश आहे. सर्व कर्मचाऱ्यांना एकच कायदा आहे. मग येथील कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय का ? मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील 538 सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू करणे तसेच अनुकंपा करण्यासंदर्भात कायद्याने तसेच नियमाने देण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटने मार्फत प्रशासनास भाग पडेल. वेळ पडल्यास मोठे आंदोलन करून, गरज पडल्यास महाराष्ट्र शासन मंत्रालय बंद पाडू असा इशारा पठाण यांनी दिली. सफाई कामगार म्हणून सन 1993 पासून कर्मचारी काम करत आहेत, या कर्मचाऱ्यांना सन 2000 मध्ये लाड / पांगे समिती च्या शिफारस नुसार कायम करण्यात आले. अशा कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची 10 – 12 वर्षे वाया जाऊ नये म्हणून ते पूर्ण भरून काढण्यासाठी त्यांना सेवा ज्येष्ठते मध्ये त्याचा लाभ मिळून देऊ. ज्या कर्मचाऱ्यांना सफाई कामगार मधून प्रमोशन करण्यात आले आहेत. 538 कर्मचारी पैकी 50 ते 60 कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत तर 50 कर्मचारी मयत झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आज उपास मारीची वेळ आली आहे. पण कुटुंब सेवेत येण्यासाठी हक्क दर आहेत. पण प्रशासन कर्मचाऱ्यांना उंबरठे झिजवण्यास का लावते यावर आम्ही कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन पठाण यांनी दिले आहे.

मिरा भाईंदर कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष गोविंद परब म्हणाले की, 538 कर्मचाऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी आम्ही सर्वजण महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू. यावेळी गोविंद परब, सचिव कैलास शेवंते, मुत्तुपांडे पेरूमल, सुनील पाटील, देवानंद पाटील, उल्हास आंग्रे, सुलेमान मुलाणी, वसंत पेंढारे, विजय म्हात्रे, सुजित घोणे, किरण पाटील आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन देण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ – प्रधान सचिव राजेश कुमार

0

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – राज्यातील बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांना थेट वेतन देण्यात यावे असे लेखी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी महाराष्ट्र शासन मंत्रालय कामगार विभाग प्रधान सचिव राजेश कुमार यांच्या कडे केली असता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन देण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन देण्यात आल्याचे मुलाणी यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी म्हणाले की, महाराष्ट्र शासन मंत्रालय वित्त विभागाच्या धोरणानुसार शासनाचा खर्च वाचवण्यासाठी राज्यातील विविध शासकीय कार्यालयात बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे विविध पदांवर कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत तसेच घेतला ही जात आहे. परंतु, शासनाच्या निर्णयाप्रमाणे संबंधित कार्यालयाने ठरवलेल्या वेतनानुसार वेतन कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदार तुपाशी आणि कर्मचारी उपाशी दुर्दैवी दशा राज्यात पाहायला मिळत आहे. ज्या शासकीय विभागात तथा विभागांतर्गत कार्यालयात कंत्राटदारामार्फत कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले आहेत. अशा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाच्या दिवसानुसार महिन्याकाठी कंत्राटदाराने संबंधित कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात वेतन जमा करणे आवश्यक आहे तसेच, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वैधानिक देणी / वजावटी कापून घेऊन त्या संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वैधानिक देणी जमा करण्याच्या खात्यांमध्ये (PF, ESIS, PT accounts) जमा करावे असे कायद्याने आवश्यक असताना कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने कंत्राटदार कर्मचाऱ्यांना अतिशय तुष्ट्पुंजी वेतन देत आहेत. त्यात काही महिन्याचा PF, ESIS, PT accounts देण्यात येतो तर काही महिन्याचा देत येतच नाही. असा गंभीर आरोप महासंघाकडून करण्यात आला.

राज्याचे प्रशासन गतिमान, प्रगतिशील तसेच पारदर्शी सरकार आहे. त्याच अनुषंगाने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे तसेच ठेकेदारांची टक्केवारी ठेकेदारांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत तातडीने शासन निर्णय करावा आणि बाहस्रोत कष्टकरी कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावे अशी मागणी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी केली आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा याचिकाकर्ते मुकूंद जाधवर, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, कार्याध्यक्ष सचिन जाधव, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, सरचिटणीस शहाजी नलवडे, सह कार्याध्यक्ष सचिन पाटील आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून मतमोजणी केंद्रास भेट

पुणे– विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी आज भारतीय अन्‍न महामंडळाच्‍या परिसरात उभारण्‍यात आलेल्‍या मतमोजणी केंद्राची तसेच मिडीया सेंटरची भेट देऊन पहाणी केली. यावेळी त्‍यांच्‍या समवेत उपायुक्‍त प्रताप जाधव, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.  जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनीही मतमोजणी केंद्रातील आणि मिडीया सेंटर मधील सुविधांचा आढावा घेतला. यावेळी पोलीस उपायुक्‍त मितेश घट्टे, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, दत्‍तात्रय कवितके, संजय देशमुख, पल्‍लवी घाटगे, विकास भालेराव तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्‍न महामंडळाच्‍या परिसरात होणार आहे.

पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवसाअखेर केडन्स संघाचे वर्चस्व

क्लब ऑफ महाराष्ट्रला 166धावांवर रोखले
  • पूना क्लबचे पीवायसीपुढे 213 धावांचे आव्हान

पुणे:  पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित  पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात अचूक गोलंदाजी करत केडन्स संघाने क्लब ऑफ महाराष्ट्रला 166 धावांवर रोखले व त्यानंतर निखिल पराडकर(57धावा) व गणेश गायकवाड नाबाद(57धावा) यांनी शतकी भागीदारी करून 17 धावांची आघाडी राखत पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. तर, दुसऱ्या सामन्यात ऋषिकेश मोटकर(84 धावा) व विश्वराज शिंदे(48धावा) यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर पूना क्लब संघाने पीवायसी संघासमोर 213 धावांचे आव्हान उभे केले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या डावात केडन्स संघाच्या अचूक व शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 30.3षटकात 166धावांवर आटोपला. 10 गडी बाद झाल्याने क्लब ऑफ महाराष्ट्रची अंतिम धावसंख्या 116 झाली. यात देवदत्त नातू 49, निकित धुमाळ 26, यश क्षीरसागर 25, नौशाद शेख 23, यांनी थोडासा प्रतिकार केला. केडन्सकडून गणेश गायकवाडने 20 धावात 3 गडी, तर सिद्देश वरगंटी(30-2), हर्षद खडीवाले(23-2), इझान सय्यद(45-2)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. याच्या उत्तरात केडन्स संघाने सावध सुरुवात केली. सलामीचे फलंदाज अथर्व धर्माधिकारी 20, हर्षद खडीवाले 14 हे झटपट बाद झाल्यानंतर निखिल पराडकर 82 चेंडूत 57धावा व गणेश गायकवाड 86 चेंडूत नाबाद 57धावा यांनी पाचव्या गडयासाठी 158 चेंडूत 117 धावांची करत संघाच्या डावाला आकार दिला. आजदिवसअखेर केडन्स संघाने 35 षटकात 5बाद 183धावा करून पहिल्या डावात 17 धावांची नाममात्र आघाडी घेतली. केडन्सचा उर्वरित 5 षटकांचा खेळ अजून बाकी आहे.

पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावरील सामन्यात पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना पूना क्लब संघाने 38.3षटकात 213 धावा केल्या. 10 गडी बाद झाल्याने पूना क्लबची अंतिम धावसंख्या 163झाली. पूना क्लब 19.1षटकात 7 बाद 111 असा अडचणीत असताना ऋषिकेश मोटकरने 107 चेंडूत 11 चौकारांसह 84 धावा व विश्वराज शिंदेने 77 चेंडूत 48 धावा केल्या. ऋषिकेश मोटकर व विश्वराज शिंदे यांनी आठव्या गडयासाठी 119 चेंडूत 86 धावांची भागीदारी केली. पीवायसीकडून प्रीतम पाटीलने 48धावात 3 गडी, तर यश मानेने 17 धावात 3 गडी, रोहन दामले(41-2), दिव्यांग हिंगणेकर(47-2)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून पूना क्लबला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना पीवायसी संघाने आज दिवसअखेर 22 षटकात 4बाद 106धावा केल्या. यात अभिषेक परमारने 89 चेंडूत नाबाद 54धावा, दिव्यांग हिंगणेकरने 22धावा, रोहन दामलेने 12धावा केल्या.पीवायसी संघाचा 18 षटकांचा खेळ अजून बाकी असून ते 107 धावांनी पिछाडीवर आहेत. अभिषेक परमार नाबाद 54 धावांवर, तर साहिल मदन नाबाद 7 धावांवर खेळत आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 30.3षटकात सर्वबाद 116धावा(166-50धावा)(देवदत्त नातू 49(63,7×4), निकित धुमाळ 26(44), यश क्षीरसागर 25(40), नौशाद शेख 23(18), गणेश गायकवाड 4.3-20-3, सिद्देश वरगंटी 6-30-2, हर्षद खडीवाले 4-23-2, इझान सय्यद 6-45-2) वि.केडन्स: 35 षटकात 5बाद 183धावा(निखिल पराडकर 57(82,4×4) गणेश गायकवाड नाबाद 57(86,6×4), अथर्व धर्माधिकारी 20, हर्षद खडीवाले 14, अजित गव्हाणे नाबाद 0, नौशाद शेख 6-30-2, निकित धुमाळ 6-26-1, प्रज्वल गुंड 5-14-1, यश क्षीरसागर 6-33-1);

पूना क्लब: 38.3षटकात सर्वबाद 163धावा(213-50धावा)(ऋषिकेश मोटकर 84(107,11×4), विश्वराज शिंदे 48(77,8×4), यश नाहर 30(34), प्रीतम पाटील 6-48-3, यश माने 3.3-17-3, रोहन दामले 8-41-2, दिव्यांग हिंगणेकर 7-47-2) वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 22 षटकात 4बाद 106धावा(अभिषेक परमार नाबाद 54(89,6×4,1×6), दिव्यांग हिंगणेकर 22, रोहन दामले 12, साहिल मदन नाबाद 7, आशिष सूर्यवंशी 6-24-1, दर्शन लुंकड 4-19-1, विश्वराज शिंदे 2-6-1);

उंड्री -वडाचीवाडी रस्त्यावर “माणुसकीची भिंत”

पुण्यातील  उंड्री परिसरातील वडाचीवाडी रस्त्यावर ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन पुणेकर व अस्टोनिया क्लासिक सोसायटी यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या “माणुसकीची भिंत” या स्तुत्य उपक्रमाची सुरवात आरोग्यम आश्रमाचे संस्थापक योगगुरू अनंत झाम्बरे यांच्या हस्ते उदघाटन करून करण्यात आली.  शनिवार पासून  हा उपक्रम सर्वांसाठी खुला  करण्यात  आला  आहें.
या कार्यक्रमाची संकल्पना विशद करताना  संयोजक सचिन पुणेकर म्हणाले कि वापरात नसलेले कपडे, चादरी आणि इतर गृहउपयोगी वस्तू या भिंतीला अडकवायच्या आणि ज्यांना ज्या वस्तूंची गरज असेल, त्यानं त्या वस्तू घरी न्यायच्या, अशी माणुसकीच्या भिंतीमागची संकल्पना आहे. परिसरातील नागरिकांनी या समाजउपयोगी उपक्रमात सहभागीं होऊन ही लोकचळवळ  यशस्वी करण्यास हातभार लावावा अशी त्यांनी विनंती केली आहे. रोटरी क्लब च्या देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत कोलंबिया तुन भारतात आलेल्या मोरा व्हलेण्टिना  यांनी या उपक्रमाला भेट देऊन प्रशंसा केली.
बायोस्फियर चे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सचिन अनिल पुणेकर व रोटरी  क्लब पुणे चे संचालक अतुल सलाग्रे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला उद्योगपती राजेंद्र भिंताडे, नानासाहेब बांदल, सरपंच दत्तात्रय बांदल,  उत्तम फुलावरे, विशाल कामठे, प्रफुल्ल कदम,  साधू शेंडकर, मयूर कामठे, विजय कामठे, अविनाश पुणेकर, कैलास पुणेकर, अस्टोनिया क्लासिक चे सर्व सदस्य आणि  परिसरात सोसायटयांचे  नागरिक उपस्थित होते.
प्रायोगिक तत्वावर चालू केलेला  हा उपक्रम यशस्वी झाल्यास,  संपूर्ण  परिसरात राबवणेचा संयोजकांचा  मानस आहे.

वर्ल्ड क्लास लॅबसाठी टेक्‍नीश आणि एमआयटीमध्ये सामंजस्‍य करार

पुणे- जागतिक दर्जाच्‍या लॅब निर्मितीसाठी टेक्‍नीश आणि एमआयटीमध्ये नुकताच सामंजस्‍य करार झाला आहे. नॅनो धूळ विस्फोट होण्याच्‍या धोक्‍यांवरील प्रयोगात्‍मक तपासणीसाठी संयुक्‍तपणे प्रयोगशाळेची स्‍थापना करण्यात येणार आहे. या सामंजस्‍य करारावर टेक्‍नीशचे संचालक निलेश सकपाल आणि माईर्स एमआयटीचे संस्‍थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी स्‍वाक्षरी केली. ही संशोधन ग्रांड सर्वात मोठी म्‍हणजे जवळपास ९१.५ लाख रूपयांची आहे.
यावेळी टीपीएलचे संचालक मेधा साकपाल, टेक्‍नीशचे अक्षय आगवान व हरीश कदम तसेच एमआयटीचे प्राचार्य डॉ.एल.के.क्षीरसागर, पेट्रोलियम विभागाचे प्रमुख डॉ. समर्थ पटवर्धन, डॉ. नाईक, डॉ. पाटील व डॉ. जाधव आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.
या प्रयोगशाळेत स्फोटकपणा आणि ज्वलनशीलतेसाठी चाचणी केली जाईल. त्‍यात खनन, औषध, पॉलिमर, तेल, गॅस आणि अन्न उद्योगातील विविध प्रकारचे धूळीचा समावेश आहे. प्रायोगिक डेटाच्या आधारावर, या प्रोजेक्ट अंतर्गत सुरक्षा मानकांची स्थापना करण्यासाठी गणितीय मॉडेल विकसित केले जाणार आहे. तसेच हे संशोधन आऊटपुट संरक्षण क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये गुंतलेल्या धूळीचा धोका समजण्यासाठी आणि नॅनो धूळ कणांच्या विविध गुणधर्मांचे विश्लेषण करण्यासाठी संशोधन आवश्यक असल्याने, एमआयटीने तंत्रज्ञानाद्वारे डीएसटी (एसईआरबी) कडे प्रस्ताव सादर केला होता. संशोधनासाठी हे अनुदान मंजूर केले गेले आहे आणि याचा वापर एमआयटी परिसर अंतर्गत अत्याधुनिक नॅनो-डस्ट स्फोट सुविधा स्थापित करण्यासाठी केला जाईल.
हा मंजूर प्रस्ताव डीएसटी, सरकारच्या आयआरआरडी (इंडस्ट्री प्रासंगिक संबंधित आर अँड डी) योजने अंतर्गत आहे.