पुणे-जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून १०० जलाशयांची निर्मिती करण्याचा संकल्प एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी जाहीर केला आहे.
यंदाच्या वर्षी महाराष्ट्र दाहक दुष्काळाचा अनुभव घेत आहे. महाराष्ट्रातील सर्वच धरणातील साठा आता जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे. आणखी दोन महिने पाऊस पडला नाही, तर महाराष्ट्राची स्थिती अतिशय भयावह होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्वतरांगाचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दर्याखोर्यांचा उपयोग करून, कृत्रिम जलाशये निर्माण केल्यास राज्याच्या दृष्टीने ते अतिशय लाभदायक ठरू शकेल आणि मुख्य म्हणजे आपला पुणे जिल्हा हा तलावांचा / जलाशयांचा जिल्हा (Lake District) म्हणून उदयास येईल, याचा विचार आणि गरज लक्षात घेऊन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने या विषयातील तज्ञ, महाराष्ट्र शासनाच्या तसेच जनसामान्यांच्या सहभागाने सदरील प्रकल्पाचा संकल्प सोडला आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांच्या नावाने, तर सिंहगडाच्या पायथ्याशी नरवीर तानाजीच्या नावाने हे भव्य व सुंदर तलाव बांधण्याचा संकल्प केला आहे.
या प्रकल्पासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामध्ये जलतज्ञ डॉ. दिनकरराव मोरे, तेर संस्थेचे अध्यक्ष आणि पर्यावरण क्षेत्रातील नोबेल विजेते डॉ. राजेंद्र शेंडे, जलतज्ञ श्री. शरद मांडे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव आणि स्थापत्त्य अभियांत्रिकी तज्ञ डॉ. मंगेश तु. कराड यांच्यासहित अनेक जलतज्ञ आणि पर्यावरण तज्ञांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे.
येत्या १५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, या विषयातील तज्ञ मंडळींशी आणि महाराष्ट्र शासनाच्या संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून या प्रकल्पाबाबतचा प्राथमिक प्रारूप आराखडा जाहीर करण्यात येणार आहे.
सह्याद्री पर्वतरांगामध्ये १०० जलाशयांची निर्मिती करण्याचा संकल्प !
रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड यांच्या अध्यक्षतेखाली एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे शिष्टमंडळ जी २० आंतरपंथीय परिषदेसाठी आज जपानला रवाना!
पुणे: टोकियो, जपान येथे जी२० आंतरपंथीय परिषद (G20 Interfaith Forum) दि.७ जून ते ९ जून २०१९ या कालावधीत संपन्न होणार आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी, आयोजकांच्या खास निमंत्रणावरून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे भारतचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळ आज रवाना होणार आहे.
या शिष्टमंडळात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल विश्वनाथ कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण , मिटसॉटचे प्रकल्प संचालक प्रा.डॉ. मिलिंद पांडे, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्रोव्होस्ट प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस, रूपमेक इलेक्ट्रिकल्स प्रा.लि.चे अध्यक्ष व उद्योजक श्री. नानिक रूपानी यांचा समावेश आहे.
या परिषदेमध्ये एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाने वैश्विक मुल्याधिष्ठित शिक्षण पध्दतीच्या माध्यमातून जगात शांतता नांदेल, या विषयावर बीजभाषण देणार आहेत.
या परिषदेत प्रा.राहुल विश्वनाथ कराड हे शैक्षणिक आव्हाने – दुर्लक्षित धार्मिक परिमाण आणि २०२० च्या दिशेने वाटचाल या दोन विषयांवर आपले विचार मांडणार आहेत.
या जपान भेटीदरम्यान एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे शिष्टमंडळ जपान, टोकियो येथे असलेल्या रेन्कोजी मंदिरातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जतन केलेल्या अस्थीच्या पवित्र स्थळाला देखील भेट देणार आहे. तसेच, जपान येथील मराठी मंडळ व सोका गाकाई विद्यापीठालाही भेट देणार आहेत.
जुन्नर ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी रत्नाकर आवटे तर कार्याध्यक्षपदी अनिल जोगळेकर यांची बिनविरोध निवड
जुन्नर/आनंद कांबळे
पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकीनचे महिलांना वाटप!
पर्यावरणदिनी माय अर्थ फाउंडेशन व भरारी प्रतिषठान चा उपक्रम
पुणे-महिलांना त्यांच्या मासिक पाळीमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेता यावी आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे अशा हेतुने तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक व चांगल्या दर्जाचे सॅनिटरी नॅपकीन चे वाटप जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. माय अर्थ फाउंडेशन आणि भरारी प्रतिष्ठान यांच्या वतीने पर्वती येथील जनता वसाहतीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पावसाळ्यात गटारे तुंबून पूर स्थिती निर्माण होण्यात प्लास्टिक पिशव्यांसोबतच सॅनिटरी नॅपकीनही कारणीभूत ठरलेली आहेत. या सॅनिटरी नॅपकीनचे विघटन होत नसल्याने नाल्यामध्ये व गटारांमध्ये ते अडकले जातात व पूरस्थिती निर्माण होते. यामुळे पर्यावरणपूरक असलेल्या सॅनिटरी नॅपकीनचा वापर वाढावा आणि महिलांच्या आरोग्याबरोबरच आपल्या पर्यावरणाचेही रक्षण व्हावे या हेतुने बनविण्यात आलेल्या या पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले, असे माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, भरारी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संध्या बोम्मणा, लेडी फ्रेशचे संस्थापक नितीन हरहरे व मनीषा हरहरे, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मंचच्या अध्यक्षा सोहनी डांगे, कचरा व्यवस्थापन मार्गदर्शक ललित राठी, महापालिकेच्या दातार आदी मान्यवर उपस्थित होते.
महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच पर्यावरणपूरक नॅपकिन्स वापरावेत, असे लेडी फ्रेश चे संस्थापक नितीन हरहरे यांनी सांगितले
सॅनिटरी नॅपकीनच्या विघटनासाठी इन्सुलेटर!
सध्या वापरात असलेल्या सॅनिटरी नॅपकीनचे विघटन अथवा त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे गटारातून जाणारे सॅनिटरी नॅपकीन अडकून गटारे तुंबतात व परिणामी पूरस्थिती निमाण होण्याची शक्यता होते. परंतु, आम्ही महापालिकेला सोबत घेऊन सॅनिटरी नॅपकीनचे विघटन करणाऱ्या व त्यांची विल्हेवाट लावणारे इन्सुलेटर बसविण्याचे काम हाती घेतोय. यामुळे सॅनिटरी नॅपकीनचे विघटन होईल आणि पर्यावरणाचं रक्षण होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असेही अनंत घरत यांनी यावेळी सांगितले.
राजेंद्र सरग यांचा सत्कार
पुणे – महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या वाचक अभियानामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी सत्कार केला.पुण्यात झालेल्या या कार्यक्रमास संचालक सुरेश वांदिले, अजय अंबेकर आणि शिवाजी मानकर उपस्थित होते.
जगातल्या सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या 403 शहरांमध्ये; मुंबई नंबर-1, तर दिल्ली चौथ्या स्थानावर…
मुंबई- मुंबई जगातील सगळ्यात जास्त ट्रॅफिक असलेले शहर बनले आहे. ही बाब 56 देशातील 403 शहरांच्या ट्रॅफिक आणि वर्दळीवर तयार केलेल्या तयार केलेल्या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. मुंबईमध्ये पीक आवर्समध्ये लोकांना आपल्या नियोजित ठिकाणावर पोहचण्यासाठी 65% जास्त वेळ लागतो. या यादीत 58% सोबत दिल्ली चौथ्या स्थानावर आहे. ही रिपोर्ट लोकेशन टेक्नोलॉजी कंपनी टॉमटॉमने तयार केली आहे, ती अॅपल आणि उबेरसाठी नकाशे तयार करते.
रिपोर्टनुसार, ट्रॅफिकच्या दबावाच्या बाबतीत कोलम्बियाची राजधानी बोगोटा(63%) दूसरे, पेरूची राजधानी लीमा(58%)तिसऱ्या आणि रूसची राजधानी मॉस्को(56%)पाचव्या स्थानावर आहे.
ट्रॅफिकमध्ये लागलेल्या वेळेवर आहे रिपोर्ट
कंपनीने ही रिपोर्ट सगळ्यात जास्त ट्रॅफिकच्या दरम्यान लोकांना आपल्या नियोजित जागेवर पोहचण्यासाठी किती वेळ लागतो, त्याच्या आधारावर काढली आहे. टॉमटॉमचे जनरल मॅनेजर बारबारा बेलपीयरेने सांगितले की, मुंबईमध्ये अंदाजे दर एका किलोमीटरवर 500 कार चालतात. हे दिल्लीपेक्षाही जास्त आहे.
मुंबईमध्ये संध्याकाळी 5 ते 8 दरम्यान सगळ्यात जास्त ट्रॅफिक
रिपोर्टनुसार, मुंबईमध्ये प्रवास करण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ रात्री 2 ते सकाळी 5 पर्यंत आहे, यावेळी सगळ्यात कमी ट्रॅफिक असते. तर सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान आपल्या ठिकाणावर पोहचण्यासाठी लोकांना 80 % जास्त वेळ लागतो. तर संध्याकाळी 5 ते 8 च्या दरम्यान ही वेळ 102 % वर जाते.
बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे वायु प्रदूषण नियंत्रणासाठी वृक्षारोपण
~प्रदूषणमुक्त पर्यावरण उपक्रमांतर्गत दैनंदिन पुढाकार~
पुणे:पर्यावरणविषयक प्रश्न सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक कृती करणार्या बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने वृक्षरोपणाद्वारे वायु प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. देशभरातील बँकेच्या सर्वाच्या सर्व 1832 शाखांद्वारेही मोहीम राबवली जाणार असून बँकेच्या पुणे स्थित मुख्यालयापासून याचा प्रारंभ केला जाईल.
सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकांमधील एक, बँक ऑफ महाराष्ट्र पर्यावरणाला आपण काही देणे लागतो आहोत या विश्वासाने कार्यकृती करत असून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक संधी चालून आली असल्याचे मानते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी जवळपास 4.2 मिलियन मृत्यू वायु प्रदूषणांमुळे झालेले आहेत. एव्हड्या मोठ्या संख्येने मृत्यू होत असतानादेखील जेथे हवेची गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे अशा ठिकाणी जगाची 91 % लोकसंख्या रहात आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री ए. सी. राउत यांनी बँकेच्या मुख्यालय परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी बोलताना श्री राऊत म्हणाले की, बँक कर्मचार्यांनी असा स्वच्छ आणि हरित वसुंधरा असा संकल्प केला असून त्यांचा प्रयत्न हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहणार नाहीत, तो कायमस्वरूपी केला जाईल. ते पुढे म्हणाले की, वृक्षारोपणाव्यतिरिक्त नियमितपणे स्वत:चे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनव्यवस्थेचा वापर करणे अथवा कार्यालयास येण्यासाठी एकत्रित वाहनाचा वापर करणे यासह आपल्या निवासाजवळील रिकाम्या जागेमध्ये वृक्षारोपण करणे आणि कचर्याची योग्य विल्हेवाट लावणे अशा कार्यकृती करून आपण आपला प्रत्येक दिवस प्रदूषणमुक्त भविष्य बनविण्यासाठी अंशदान देऊया.
बारामतीचे पाणी -‘जे करायचे ते करा, पण भान ठेवा’ : शरद पवार
मुंबई-निरा डावा कालव्यातून बारामतीला जाणारे 60% नियमबाह्य पाणी बंद करण्याचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. यावर आता शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणावर बोलताना शरद पवार म्हणाले, “जे करायचे ते करावे, पण भान ठेवले पाहिजे. या प्रश्नात पडू नये, वाद वाढवू नये. ज्यावेळी संबंध महाराष्ट्रात पाण्याचे दुर्भिक्ष आहे, अशा वेळी अशा प्रश्नाच्या बाबतीत सर्वांनी अत्यंत समंजसपणे बोलण्याची गरज आहे.”
पवार पुढे म्हणाले की, “मला काही दुसरी फारशी चिंता यात वाटत नाहीये. राजकारण करावे पण कुठे आणि कधी याचे तारतम्य ठेवायला हवे. या मुद्यावरून तालुक्या-तालुक्यात दुरावा निर्माण होऊ नये, ही काळजी घ्यायला हवी. ही काळजी माझ्याकडून घेतली जाईल.”
काय आहे प्रकरण ?
निरा डावा कालव्यातून बारामतीला जाणारे 60% नियमबाह्य पाणी बंद करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. यानंतर बारामतीकरांना मोठा धक्का बसला आहे. येत्या दोन दिवसांत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यासंदर्भात लेखी आदेश काढणार असल्याचे बोलले जात आहे.शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला होता. यामध्ये नीरा देवघर धरणातून 60% पाणी डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला तसेच 40% पाणी फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंतच करण्यात आला होता, आता हा कार्यकाळ संपला आहे. विधान परिषदेचे सभापतीपद मिळाल्याने आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी या कराराला विरोध न करता संमती दिली होती. पण आता बारामतीला दिले जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी दिले आहेत.
पर्यावरण समतोलाची जबाबदारी प्रत्येकाची – जयप्रकाश गोयल
गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने पर्यावरण दिन साजरा
पुणे :- दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे अशी भावना गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल यांनी व्यक्त केली. बावधन मधील गंगा लिजंड येथे आज पर्यावरण दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने प्रत्येकवर्षी पर्यावरणदिनानिमित्त असंख्य रोपांचे वृक्षारोपण करण्यात येते. यावर्षी देखील बऱ्याच रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल, अमित गोयल, नगरसेवक किरण दगडे पाटील,मुख्य अभियंता कुमार बर्डे,सीईओ किरण कुमार देवी याप्रसंगी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले कि, वनसंपदेवर मनुष्याची बरीच कामे अवलंबून असून वृक्षांचे रोपण व संवर्धन होणे महत्त्वाचे आहे.राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येकाने वृक्षारोपणाच्या या मोहिमेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अमित गोयल म्हणाले कि, पृथ्वीचे संरक्षण व पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने यांना पार पाडायची असते. पर्यावरणाचे संरक्षण व त्याप्रती जागरूकता निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य पार पाडावे ही आज प्रत्येकाची जबाबदारी बनली पाहिजे. ती आपण निभावली तर उद्याचे आपले भवितव्य उज्ज्वल असेल हे लक्षात ठेवायला हवे.
नीट परिक्षेचा निकाल जाहिर, राजस्थानचा नलीन देशात पहिला, तर महाराष्ट्रातून सार्थक भटने मारली बाजी
मुंबई- नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत देशपातळीवर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 5 मे रोजी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षा (नीट)चा निकाल बुधवारी ऑनलाइन जाहिर करण्यात आला. यंदाच्या निकालात राजस्थानच्या नलिन खंडेलवालने टॉप करत देशात पहिला येण्याचा मान मिळवला. त्याने 720 पैकी 701 गुण मिळवले. तर दिल्लीच्या भाविक बंसलने दुसरा, आणि उत्तर प्रदेशच्या अक्षत कौशिकने तिसरा क्रमांक पटकावला.
नीटमध्ये महाराष्ट्राच्या सार्थक भटने 720 पैकी 695 गुण मिळवून देशात सहावा येण्याचा मान मिळवला. तर मुलींमध्ये माधुरी रेड्डीने टॉप केले असून तिचा ऑल इंडिया रँक सातवा आहे. माधुरी रेड्डीने 720 मधून 695 गुण मिळवले. दरम्यान, पहिल्या 100 जणांमध्ये 20 मुलींचाही समावेश आहे. दिव्यांग श्रेणीमध्ये उत्तर प्रदेशच्या सभ्यता सिंग कुशवाला हिने टॉप केले. तिने 610 गुण मिळवत दिव्यांग श्रेणीतून पहिले येण्याचा मान मिळवला.
नीट परीक्षेसाठी यंदा देशभरातून 15 लाख 19 हतार 375 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 7 लाख 97 हजार 42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. आज जाहिर झालेल्या निकालानंतर गुणांच्या आधारावर कौन्सिलिंग आणि अंडरग्रॅजुएट मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन होणार आहे. मेडिकल कौन्सिलिंग कमिटी एमसीसीच्या होमपेजवर नीट कौन्सिलिंग 2019 ची यादी जाहीर करण्यात येणार आहे.
दानशूर व्यक्तींमुळेच समाजकार्य उभे राहते -प्रा. विलास चाफेकर
पुणे : “विनायक पालेकर यांच्यासारखे अनेक दानशूर माणसे समाजात आहेत. न मागताही चांगल्या कामासाठी लाखो रुपयांची देणगी त्यांनी दिली. निरपेक्ष भावनेने दान करणाऱ्या दानशूर व्यक्तींमुळेच समाजकार्य उभे राहते. त्यातून माणुसकीचा धागा विणला जातो,” असे मत वंचित विकास संस्थेचे संस्थापक प्रा. विलास चाफेकर यांनी व्यक्त केले.
शरण्या गवारे, सुदिप्ता कुमार, सिध्दांत बांठीया यांना एमएसएलटीए वार्षिक पुरस्कार प्रदान
राष्ट्रीय व राज्य स्तरावर अव्वल तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळविणाऱ्या आणि आपल्या देशासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत असल्याचे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.
राज्यातील प्रत्येक गटातील अव्वल तीन खेळाडूंना 10 लाखांहून अधिक रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. श्रीराम गोखले यांना एमएसएलटीए सर्वोत्कृष्ट टेनिस ऑफिशियल म्हणून, तर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेसाठी बॉल कीड म्हणुन निवड झाल्याबद्दल जेनिका जयसन हीला वि
शिष्यवृत्ती मिळालेल्या खेळाडूंची यादी-
‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
श्रावणी देवधर दिग्दर्शित आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (जीसिम्स)च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार निर्मित मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’ मध्ये स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १४ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी आता एकदम नव्या लूकमध्ये या चित्रपटात प्रेक्षकांसमोर येणार आहे. स्वप्निल जोशीच्या नव्या अवतारामुळे तसेच श्रावणी देवधर पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या भूमिकेत आहे स्वप्नील जोशी तर त्याच्या आईची भूमिका साकारली आहे नीना कुलकर्णी यांनी. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे स्वप्नीलच्या काकाची भूमिका साकारत आहेत. स्वप्नील नव्या रुपात असल्याने ओळखीच्या चेहऱ्याची पुन्हा नव्याने ओळख या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. चित्रपटाचे आत्तापर्यंत प्रकाशित करण्यात आलेले टीझर, पोस्टर आणि गाण्यांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
या चित्रपटामध्ये स्वप्निल जोशीसह नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, संदीप पाठक, आनंद इंगळे, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.
‘मोगरा फुलला’ला रोहित राऊतने संगीत दिले असून यातील गाणी शंकर महादेवन, बेला शेंडे, जसराज जोशी आणि रोहित राऊतने गायली आहेत. “हलके अन हळुवारसा.. हो मुका अन अलवारसा…” या नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या आणि शंकर महादेवन यांनी गायलेल्या गाण्याला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. त्याआधी रोहित राऊतने संगीतबद्ध केलेले व गायलेले श्रवणीय असे ‘मनमोहिनी‘ हे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे रोहित राऊत आणि बेला शेंडे यांनी गायले असून स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांच्यावर चित्रित झाले आहे. त्यालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटातील ‘मारवा’ हे गाणे आघाडीचा गायक जसराज जोशी याने गायले आहे.
काही दिवसांपूर्वी या सिनेमातील कलाकारांचे हटके लुकमधील पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले होते. या कलाकारांच्या लुकला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या चित्रपटामध्ये नेमकं काय काय पहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
“वेगळा लुक, उत्तम कलाकार, दर्जेदार संगीत आणि त्याजोडीला कसदार कथा व साजेसे दिग्दर्शन या गोष्टींमुळे मोगरा फुलला अगदी जुळून आला आहे. हा चित्रपट चित्रित करताना एक वेगळे समाधान मला मिळाले आणि तो पाहताना ते प्रेक्षकांनाही मिळेल, याबद्दल शंका नाही,” असे उद्गार स्वप्नील जोशीने काढले.
‘मोगरा फुलला’मध्ये आगळ्या पद्धतीने गुंफलेली अशी प्रेमकथा आहे. कौटुंबिक समस्यांमध्ये गुंतलेल्या एका मुलाभोवती ही कथा फिरते. त्याच्या या समस्यांमुळे त्याच्या लक्षातही येत नाही की, आपले लग्नाचे वय उलटून गेले आहे. एके दिवशी तो अत्यंत खंबीर आणि स्वतंत्र विचाराच्या मुलीच्या प्रेमात पडतो. ती एका वेगळ्या वातावरणात वाढलेली मुलगी आहे. त्याच्याही लक्षात जेव्हा प्रेमाची ही बाब येते तेव्हा ही प्रेमकथा खूप पुढे सरकलेली असते,
‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जीसिम्स फिल्म्स’ने आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात फुगे, तुला कळणार नाही, रणांगण यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे, स्टार प्रवाह वरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेची निर्मिती त्याचबरोबर ‘भिकारी’ या चित्रपटची प्रस्तुती देखील ‘जीसिम्सने केली आहे. भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपन्यांमधील एक अग्रणी कंपनी असलेल्या ‘पॅनोरमा स्टुडिओज’ने ‘मोगरा फुलला’च्या वितरणाची जबाबदारी घेतली आहे.
प्रख्यात दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी याआधी अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यांमध्ये लपंडाव, सरकारनामा, लेकरू या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना फिल्मफेअर आणि स्क्रीन यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ‘मोगरा फुलला’ला स्वतःचा असा वेगळा ‘टच’ देण्यास त्या सज्ज झाल्या आहेत.
वाढते वायू प्रदूषण मानवासाठी धोक्याची सूचना -वैज्ञानिक डॉ. गुफ्रान बेग
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा स्थापना दिवस व जागतिक पर्यावरण दिन कोथरूड येथील कॅम्पसमध्ये साजरा करण्यात आला. पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने युनायटेड नेशन्सने संपूर्ण जगामध्ये “बीट एअर पोल्यूशन्स” ही थीम दिली होती. त्याच धर्तीवर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने स्थापित केलेल्या “एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन” चे उद्घाटन पाहुण्याचे करण्यात आले. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी वाहन प्रदुषण नियंत्रण करण्यात यावे या करीता प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी विकसीत केलेल्या “विश्वास सायलेन्सर” टु व्हिलर, बस, ट्रक व टेम्पो इ . वाहनांना बसवून प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल विश्वनाथ कराड , कुलगुरू डॉ. एस. परशूरामण , एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे -पाटील आणि एमआयटी डब्ल्यूपीयूच्या पीस स्टडी विभागाचे प्रमुख प्रा. मिलिंद पात्रे हे उपस्थित होते.
डॉ. गुफ्रान बेग म्हणाले, वाहतुकीकरण, औद्योगिकरण, व अन्य कारणांनी वायू प्रदूषणात वाढ होते. तसेच घराबरोबरच औद्योगिकरणामुळे हे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. औद्योगिकरणामुळे कार्बनडाय ऑक्साइडच्या प्रमाणात मोठी वृध्दी झाली आहे. त्यामुळे शरिरातील फुफ्फूस खराब होतात. देशाची राजधानी ही वायू प्रदूषणाची ही राजधानी झाली आहे. त्यानंतर अहमदाबादचा नंबर लागतो. तिसऱ्या नंबर पुणे येथे ६५ ते ७५ टक्के प्रदूषण वाढले आहे. चौथ्या नंबर मुंबईचा नंबर येतो आणि त्यानंतर देशातील अन्य मोठ्या शहराचा नंबर येतो. देशातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी अत्याधुनिक वाहनांची संख्या वाढवावी, तसेच या संदर्भात जनजागृती ही अत्यंत महत्वाची आहे.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, आज पर्यावरणात वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्या प्रमाणे मनाचे प्रदूषण वाढत असून त्याल नियंत्रित करणे गरजेचे आहे. जागतिक तापमान वाढ हा या सृष्टीवरील सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्याला कमी करण्यासाठी ठोस पाऊले उचलावी. आपल्या शहराचा विचार केला असता दर दिवसाला ५ हजार वाहने रस्त्यांवर येतात. त्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणवर वाढत आहे. विश्वास सायलेन्सर लावण्याने वाहनांचे प्रदूषण कमी होण्यास मदत मिळेल.
डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले, पर्यावरण दिवसाबरोबरच आजचा दिवस हा स्टॉप टॉकिंग टू द मशीनचा आहे. भविष्य काळात ७५ बिलियन मशीन्स येतील जे जनसंख्येपेक्षा कित्येक पटीने मोठे असतील. त्यावेळी यंत्राच्या वाढत्या आवाजाला थांबविणे खूप गरजेचे असेल. पर्यावरणाबरोबर शांतता ही गरजेची आहे. २०१९ मध्ये साजरा केल्या जाणाऱ्या या पर्यावरण दिवसी संकल्प केला पाहिजे की पर्यावरण रक्षणासाठी योग्य ती पाऊले उचले गेली पाहिजेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांची रक्षा करणे गरजेचे आहे.
डॉ. एम.पी. तांबे म्हणाले, वायू प्रदूषणामुळे आरोग्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे छातीचे व श्वासाचे आजारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
डॉ. राजेश कुमार म्हणाले, स्वताचा शोध हेच जीवन जगण्याचा उद्देश आहे. मग आपण कसे जगायचे हे आपल्या हातात आहे. विज्ञानाने बरीच प्रगती केल्यामुळे आपले जीवन सुखमय झाले आहे.
डॉ. संदीप साळवी म्हणाले, घरातील वायू प्रदूषणामुळे जवळपास ५० टक्के आजार उद्भवतात. त्यामुळे घरातील प्रदूषणाला थांबावे. या प्रदूषणामुळे ९० टक्के लोकांना योग्य ऑक्सिजन मिळत नाही. यामुळेच कित्येक लोक हे मृत्यूशी झुंज देत असतात. यावरूण हवा किती महत्वाची आहे हे कळते. प्रदूषणामुळे फूफ्फूस खराब होते तसेच हदय रोग, किडनी, मधुमेह व विसराळूपणा, कॅन्सर यासारखे आजार निर्माण होतात.
डॉ. संजय झोडपे म्हणाले, मानवतेसाठी शाश्वत विकास हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. वाढत जाणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण करणे गरजेचे आहे. गुणवत्तापूर्ण जागतिक आरोग्य सेवा देणे हे ही गरजेचे आहे. स्वस्थ्य भारत स्वच्छ भारत हा नारा समाजापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.
प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या विद्यापीठाने नेहमीच पंचमहाभूताचे रक्षण करण्यासाठी पाऊले उचली आहेत. तसेच, एमआयटीच्या स्थापनेपासून पर्यावरण नियंत्रणासाठी वेगवेगळ्या प्रयोग राबविले जात आहेत. डॉ. विश्वनाथ कराड यांनी तयार केलेला विश्वास सायलेन्सर हा त्यातीलच एक मुख्य भाग आहे.
डॉ. एस. परशूरामन म्हणाले, सृष्टीवर वाढत जाणाऱ्या सर्व स्तरावरील प्रदूषणाला नियंत्रित करणे काळाची गरज आहे. वर्तमानकाळात पिण्याच्या पाण्याची सर्वात मोठी समस्या उद्भवली आहे. ही समस्या अशीच वाढत जाईल तर भविष्यात मोठा धोका निर्माण होईल.
डॉ.पी.के.भारद्वाज म्हणाले, आपल्या जीवनाचे आपणच मॉनेटर आहात. आपला व्यवहाराचा परिणाम हा पर्यावरणावर होत असतो. त्यामुळे अध्यात्माच्या आधारे जीवन जगल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते.
डॉ. चंद्रकांत पांडव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्याचे स्वागत केले.
डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डी.पी. आपटे यांनी आभार मानले.
खासदार पदामुळे विकासाची जबाबदारी वाढली – गिरीश बापट – राज्यातील मंत्रिपदाचा राजीनामा
पुणे : राजकारणातील प्रगतीसाठी नव्हे तर केंद्रातून जास्तीत जास्त निधी आणून पुण्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी लोकसभेत गेलो आहे.
नगरसेवक, आमदार आणि मंत्री म्हणून पुण्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलो. यातून काही प्रश्न मार्गी लावले पण आणखी बरंच करायचं आहे. त्यासाठी खासदार म्हणून माझी जबाबदारी वाढली असल्याची मत पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर आज त्यांनी आपल्या आमदार आणि मंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला.
पुणे महानगरपालिकेत तीन वेळा नगरसेवक,स्थायी समितीचे अध्यक्ष, कसबा पेठ मतदार संघाचे पाच वेळा अशी यशस्वी कारकीर्द बापट यांची होती. विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकार मध्ये अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.
यावेळी बोलताना खासदार बापट म्हणाले, पुण्याच्या सर्वांगीण विकासाठी पालकमंत्री म्हणून पीएमआरडीएची स्थापना, पुण्याच्या विकास आराखडयास मंजुरी, पुणे मेट्रो, नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, लोहगाव विमानतळाचा विस्तार,हिंजवडी आयटी पार्क मधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांची निर्मिती, जायका प्रकल्प, २४ तास पाणीपुरवठा, मुंढवा जॅकवेल प्रकल्पाचे पुनरूज्जीवन असे अनेक विकासाचे प्रकल्प शासन स्तरावर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानाच्या हस्ते पुणे मेट्रोचे पहिल्या टप्याचे उदघाटन झाल्यानंतर हिंजवडी ते शिवाजीनगर अशा दुसऱ्या टप्यालाही केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. या मार्गाचे काम ही आत्ता सुरु झाले आहे. रिंग रोडची निर्मीतीतून शहरातील वाहतूक कोंडीवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून या विभागात अनेक समाजपयोगी निर्णय घेतले. समाजातील सर्वसामान्य घटकांना योग्य दरात अन्न धान्याचा सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पुरवठा करण्याचे काम या विभागामार्फत होते. गेल्या वर्षी पासून सक्षम सार्वजनिक वितरण प्रणालीचा वापर करून ई पॉस व्दारे धान्य वितरण करण्यात येत आहे. राज्यातील १४ जिल्हयात शेतकऱ्यांना कमी दरात रेशन दुकानात अन्न धान्य उपलब्ध करण्यात येत आहे. नवीन गोदाम धोरण, व्दारपोच योजना, अन्न व औषध पध्दती मध्ये सुलभता व कालबध्दता आणली. माझ्या कार्यकाळात अन्न परवाना नोंदणी मध्ये राज्य प्रथम क्रमांकावर राहिले. अन्न व औषध भेसळी करीता कडक प्रावधानाची तरतुद करताना यापूर्वीची ६ महिन्यांची शिक्षा बदलून आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतुद केली. अशा विविध योजना मी मंत्री असताना कार्यान्वीत केल्या.
बापट पुढे म्हणाले, पुण्यातील लोकांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वास, सहकार्यामुळे पुण्याचा विकासाला चालना देवू शकलो. पुण्यातील विविध विकासाच्या प्रश्नाबाबत लोकसभेमध्ये पाठपुरावा करून केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त विकास निधी मिळविण्याचे उद्दिष्ट माझ्या समोर असल्याचे ही त्यांनी सांगितले.


