Home Blog Page 2916

वाढते बलात्कार – पोलीस आयुक्तालयासमोर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे आंदोलन (व्हिडिओ)

0
पुणे-दिवसेंदिवस महिला सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .पुणे शहरात बलात्काराच्या घटना वाढत आहेत.आणि पोलीस व सरकार मात्र याकडे पाहिजे तेवढ्या गंभीरतेने पाहत नाहीत असा आरोप करीत आज राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रुपाली चाकणकर म्हणाल्या ,’सिंहगड रोड वर गेल्या सहा दिवसापूर्वी जन्मदात्या बापाने मुलीवर बलात्कार केला,नागपुरमध्ये चार वर्षाच्या चिमुरडीवर शाळेच्या आवारात बलात्कार झाला.तिची मेडिकल तपासणी झाली पण आरोपीला कोणतीच शिक्षा झाली नाही.गुहागरमध्ये बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुदायिक बलात्कार करण्यात आला.कोठे आहे महिलांची सुरक्षितता , कोठे आहे?राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत.महिलांना सुरक्षा देण्यासाठी अपयशी ठरलेल्या या गृहमंत्रीनी राजिनामा द्यावा.
आज पुणे पोलिस आयुक्तालय समोर थाळीनाद आंदोलन करून हा महिलांच्या वेदनेचा आवाज आवाज आम्ही गेंड्याच्या कातडीच्या सरकारपर्यंत पोहचवत आहोत.

तिहेरी तलाक द्वारे घटस्फोटाला प्रतिबंध:मुस्लीम महिला विधेयक 2019 ला मंजुरी

0

नवी दिल्ली, 12 जून 2019-सबका साथ,सबका विकास,सबका विश्वास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या रालोआ सरकारचे मुख्य सूत्र आहे.जनतेला दिलेल्या एका  आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत, मुस्लीम महिला (विवाह विषयक अधिकारांचे संरक्षण) विधेयक 2019 ला मंजुरी देण्यात आली. मुस्लीम महिला (विवाह विषयक अधिकारांचे संरक्षण) दुसरा अध्यादेश 2019 ची जागा  हे विधेयक घेईल.

प्रभाव:

या विधेयकामुळे मुस्लीम महिलांचा लिंग समानता आणि समान न्याय सुनिश्चित होईल.विवाहित मुस्लीम स्त्रीच्या अधिकारांचे संरक्षण होण्यासाठी मदत आणि तलाक-ए-बिद्दत च्या प्रथे द्वारे पतीकडून घटस्फोट देण्याला यामुळे प्रतिबंध होणार आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार आहे.

परिणाम:

तिहेरी तलाक बेकायदेशीर म्हणून ठरवण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे.

या गुन्ह्यासाठी तीन वर्ष पर्यंतचा कारावास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

विवाहित मुस्लीम महिला आणि अवलंबून असणाऱ्या अपत्यासाठी निर्वाह भत्त्याची  तरतूद या विधेयकात आहे.

हा गुन्हा दखलपात्र ठरवण्याचा प्रस्ताव आहे.

दंडाधीकाऱ्यांकडून आरोपीला जामीन देण्यापूर्वी संबंधित विवाहित महिलेचे म्हणणे ऐकून घेण्याची तरतूदही यात आहे.

मुस्लीम महिला (विवाह विषयक अधिकारांचे संरक्षण) विधेयक 2019 हे मुस्लीम महिला (विवाह विषयक अधिकारांचे संरक्षण) दुसरा अध्यादेश 2019 प्रमाणेच आहे.

‘वायु’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली: गुजरातला सतर्क राहण्याचा इशारा-भारतीय नौदलाला सज्ज राहण्याचे आदेश

0

नवी दिल्ली, 12 जून 2019-अरबी समुद्रात घोंघावत असलेले ‘वायु’ चक्रीवादळ उत्तरेकडे ताशी 13 किलोमीटर वेगाने सरकत असून, उद्या सकाळी गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. पोरबंदर आणि महुवा दरम्यान वेरावळ परिसरातल्या किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याची शक्यता असून, दि.13 जून रोजी सकाळी ताशी 145 ते 170 किमी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. यामुळे सौराष्ट्र आणि कच्छ परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात ताशी 70 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, जुनागड, दीव, गिरसोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यातल्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाच्या वेळी दीड ते दोन मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

भारतीय नौदलाला सज्ज राहण्याचे आदेश

पश्चिम नौदल कमांडच्या मुख्यालयाने वायु चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जलद प्रतिसादासाठी पुढील तयारी सुरु केली आहे.

  • राज्य प्रशासन, स्थानिक जिल्हा प्रशासन आणि भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून सावध करणाऱ्या सूचना देण्याचे तसेच खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश द्यायला सांगितले आहे.
  • नौदलाच्या जहाजांवर मानवी सहायता आणि आपत्ती मदत सामुग्री तैनात आहे.
  • समुद्रात कार्यरत असलेली भारतीय नौदलाची जहाजे आणि विमाने/हेलिकॉप्टर्सना समुद्रात मच्छिमारीसाठी गेलेल्या नौकांना किनाऱ्यावर परतण्याची सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • स्थानिक प्रशासनाला सहाय्य करण्यासाठी भारतीय नौदलाची बचाव पथके आणि मदत सामुग्री तयार ठेवणे.
  • आपतकालीन वैद्यकीय मदतीसाठी मुंबई स्थित अश्विनी या भारतीय नौदलाच्या रुग्णालयातल्या वैद्यकीय पथक आणि सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
  • पी8आय आणि आयएल विमाने शोध आणि बचाव मोहिमेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
  • मुख्यालय, किनाऱ्यावरील संरक्षण आणि सल्लागार गटाने वायू चक्रीवादळबाबत किनारपट्टी प्रदेशांना सूचना जारी केल्या आहेत.

भारतीय नौदलाला सज्ज राहण्याचे आदेश

 

कोकण किनाऱ्यावर भरती-ओहोटी वाढण्याची शक्यता; समुद्र किनारे बंद ठेवण्याच्या सूचना

0

मुंबई, दि. 12 : अरबी समुद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून दि. 12 व 13 जून रोजी या भागातील समुद्रात मोठ्या प्रमाणात भरती-ओहोटी होणार असल्यामुळे कोकण किनारा जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटक व स्थानिकांसाठी बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती राज्य आपत्ती निवारण कक्षाने दिली आहे.

वायू चक्रीवादळामुळे कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात भरती-आहोटी होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसासाठी समुद्र किनारे बंद ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील 48 तासात मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे आदेशही देण्यात आहेत, असेही कक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

जम्मू आणि काश्मीर मधे राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत 3 जुलै पासून सहा महिन्यांनी वाढ

0

नवी दिल्ली, 12 जून 2019-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालांनी राज्यातल्या स्थितीबाबत दिलेल्‍या अहवालाच्या आधारे संविधानाच्या कलम 356 (4) अन्वये तिथल्या राष्ट्रपती राजवटीचा कालावधी 3 जुलै 2019 पासून आणखी सहा महिने वाढवायला मंजुरी दिली आहे.

प्रभाव:

या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीरमधे राष्ट्रपती राजवट 3 जुलै 2019 पासून आणखी सहा महिने वाढवण्यात येणार आहे.

सध्याची राष्ट्रपती राजवटीची मुदत 2 जुलै 2019 रोजी संपत असून, राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिन्यांनी वाढवण्याची शिफारस केली होती.

अंमलबजावणी:

संसदेची मंजुरी घेण्यासंदर्भातला प्रस्ताव संसदेच्या आगामी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमधे मांडण्यात येईल.

जनगणना, 2021 ची तयारी सुरु – पुण्यातील यशदा येथे राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

0

पुणे-भारताच्या महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त, नवी दिल्ली कार्यालयामार्फत देशाच्या सर्वात मोठ्या प्रशासकीय कामाची म्हणजेच जनगणना 2021 ची तयारी सुरु झाली आहे. जनगणना, 2021 च्या पूर्वतयारी अंतर्गत जनगणनेच्या सर्व टप्प्यांची रंगीत तालिम म्हणजेच “प्री-टेस्ट” संपूर्ण देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर, 2019 या कालावधीत होणार आहे.

जनगणनेअंतर्गत माहिती संकलित करण्याच्या पध्दतीमध्ये क्रांतीकारक बदल आगामी जनगणनेमध्ये प्रस्तावित आहे. या जनगणनेत ऑनलाईन पध्दतीने माहिती संकलित होणार असून, भारताचे महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त, नवी दिल्ली कार्यालयाने यासंबंधी दिनांक 3 ते 11 जून, 2019 या कालावधीत यशदा, पुणे येथे राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाचे उद्‌घाटन रश्मी झगडे, भाप्रसे, जनगणना संचालक, महाराष्ट्र यांच्या हस्ते 3 जून, 2019 रोजी झाले.

राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांचे प्रशिक्षण मे 2019 मध्ये नवी दिल्ली येथे संपन्न झाले होते. या प्रशिक्षकांनी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि गोवा राज्यांमधील प्रशिक्षकांना यशदा, पुणे येथे प्रशिक्षण दिले. राज्यस्तरीय प्रशिक्षक या पुढील टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील.

प्रशिक्षणाच्या उद्‌घाटनप्रसंगी जनगणना संचालक, महाराष्ट्र यांनी प्री-टेस्ट ही जनगणनेची रंगीत तालिम असल्याने त्यातील प्रत्येक टप्प्यात बिनचूक काम झाल्यास प्रत्यक्ष जनगणनेची प्रश्नावली, सूचना पुस्तिका, माहिती संकलनाची पध्दती आणि माहिती संस्करणाची पध्दती सुनिश्चित करणे शक्य होईल असे प्रतिपादन केले.

प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी, राज्यस्तरीय प्रशिक्षकांनी, पुणे जिल्हयातील निवडक ग्रामीण व शहरी भागात चाचणीसाठी माहिती संकलन केले. प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमास भारताचे महारजिस्ट्रार आणि जनगण्ना आयुक्त, विवेक जोशी  उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना विवेक जोशी यांनी जनगणना 2021 साठी प्री-स्टेट अत्यंत महत्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. जनगणना 2021 मध्ये पहिल्यांदाच माहितीचे संकलन ऑनलाईन पध्दतीने करण्याचे प्रस्तावित असून, त्याची चाचणी प्री- टेस्ट मध्ये होणार आहे. जनगणना 2021 मध्ये माहितीचे संकलन ऑनलाईन पध्दतीने झाल्यास शासकीय धोरण ठरविण्यासाठी आणि संशोधकांना आवश्यक जणगणनेची माहिती वेळेत उपलब्ध होऊ शकेल.

जम्मू आणि काश्मीरमधे आंतरराष्ट्रीय सीमे लगत राहणाऱ्या नागरीकांना आरक्षण

0

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक 2019 ला मंजुरी दिली. संसदेच्या आगामी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमधे हे विधेयक मांडण्यात येईल.

मंत्रिमंडळाचा हा निर्णय सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास प्रति पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब आहे.

लाभ:

या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीरमधे आंतरराष्ट्रीय सीमे लगतच्या भागात राहणाऱ्या नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांना थेट नियुक्ती, पदोन्नती आणि विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांमधे प्रवेशासाठी आरक्षणाचा लाभ घेता येईल.

गर्भितार्थ:

हे विधेयक जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) अध्यादेश 2019 ची जागा घेईल. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय सीमे लगत राहणारे लोक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत राहणाऱ्या लोकांना मिळणाऱ्या आरक्षणाच्या कक्षेत येतील.

खासदार अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकिय वर्तुळात चर्चांणा उधाण

0

मुंबई- शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. सकाळी 11.30 वाजता अमोल कोल्हे ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले. अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान कोल्हेंनी या भेटीमागचे कारण सांगितले आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, “ही सदिच्छा भेट होती. राज ठाकरे यांच्या सभेचा चांगला इम्पॅक्ट झाला. त्यासाठीच राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी, त्यांची भेट घेतली.”

अमोल कोल्हे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप विरोधात जोरदार प्रचार केला होता, तसेच त्यांनी घेतलेल्या सभांना प्रचंड गर्दी झाली, गर्दीचे रुपांतर मतांमध्ये झाले नाही. पण शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे दिग्गज उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. या विजयात राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेचा परिणाम दिसून आला, अशी भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

पुण्यातील खडकवासला इथे राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली होती. हे सभास्थळ जरी बारामती लोकसभा मतदारसंघात येत असले, तरी त्याचा परिणाम शिरुर, मावळ, बारामती आणि पुणे परिसरात अपेक्षित होता. शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांना राज ठाकरे यांच्या सभेचा फायदा झाला आणि त्यांनी विजय मिळवला.

अनंतनागमध्ये सीआरपीएफ आणि पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या टीमवर दहशदवादी हल्ला, 5 जवान शहीद

0

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दल(CRPF)चे 5 जवान शहीद झाले आहेत. अमरनाथ यात्रा सुरू होण्या आधीच दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये हा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी आज गर्दीच्या रस्त्यावर असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका गस्त घालणाऱ्या पथकावर हल्ला केला. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकही झाली.

चकमकीत आतापर्यंत सीआरपीएफचे 4 जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, सुरक्षा दलांना एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यशही आल्याची माहिती पोलिसांनी दिली. केपी बस स्टँडजवळील खोऱ्यात एका वाहनातून आलेल्या दहशतवाद्यांनी अचानक सुरक्षा दलाच्या गस्त घालणाऱ्या पथकावर हल्ला चढवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अनंतनागचे पोलिस निरिक्षकही जखमी
या हल्ल्यात पथकावर ऑटोमॅटिक रायफलमधून अंदाधुंध गोळीबार तसेच ग्रेनेडही फेकले. यानंतर सुरक्षा दलांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यात एक दहशतवादी ठार झाला आहे. अनंतनाग पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अरशद अहमद देखील या चकमकीत जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी श्रीनगरला हलवण्यात आले.

अल-उमर-मुजाहिद्दीनने जबाबदारी घेतली
दहशतवादी संघटना ”अल-उमर-मुजाहिद्दीन”ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या दहशतवादी संघटनेने 5 जवानांना मारल्याचा दावाही केला आहे. तसेच असे हल्ले सुरुच राहतील, अशी धमकीही दिली आहे.

पावसाळ्यात विजेचे धोके टाळा-निशिकांत राऊत

0

पाऊस आला की वीजपुरवठा खंडित होतो. मुसळधार पाऊस नसताना किंवा वादळ नसताना वीजपुरवठा खंडित का होतो, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यामागे वीज वितरण यंत्रणेवर उन-पावसाचा काय परिणाम होतो, हे जाणून घ्यावे लागेल. यासोबतच पावसाळ्यातील दिवसांत घरातील विजेची उपकरणे किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा यापासून सतर्क राहण्याची गरज आहे. याबाबत सुद्धा सावध राहण्याची गरज आहे.

वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे

वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क इन्सूलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनीमातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्वाचे असतात. उन्हाळ्यात चिनीमातीचे हे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो.

भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही. परंतु, पावसाला सुरवात झाली की पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व वाहिनीत बिघाड होतो. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधला जातो. दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जाईंट करणे आदी कामे करावी लागतात. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीत या कामांमध्ये व्यत्यय येत असल्याने वीजग्राहकांची विजेअभावी गैरसोय होते.

वीजपुरवठा खंडित होण्याचे आणखी कारणे म्हणजे वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी आदी यंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्राचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो.

घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.

अभियंते व जनमित्रांची कसोटी

पावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खर्‍या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचार्‍यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचे तांत्रिक दोष शोधणारे, दुरुस्तीचे काम करणारे महावितरणचे अभियंते व जनमित्र यांच्यासाठी पावसाळा अतिशय आव्हानात्मक असतो.

विजेपासून सावधान!

वीज दिसत नाही, पण परिणाम मात्र जीवघेणे असतात. विजेपासून प्रामुख्याने पावसाळ्यात सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे तसेच पाणी हे विजेचे चांगले वाहक असल्याने विविध दुर्घटना घडतात. त्यामुळे जिवितहानीचा धोका निर्माण होतो. तो टाळण्यासाठी सतर्कता हीच सुरक्षितता हाच सर्वोत्तम उपाय आहे.

पावसाळ्यात वादळवाऱ्यामुळे वीजतारांमध्ये घर्षण होण्याची शक्यता असते. त्यामुळे विजेचे खांब, विजेच्या तारा व रोहित्रे (Transformer) यातून ठिणग्या पडत असतात अशावेळी महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाला त्वरित कळवावे. कारण अशा ठिणग्यांतून वीजतारा तुटून किंवा आग लागून मोठी दुघर्टना घडण्याची शक्यता असते.

खबरदारी हीच सुरक्षितता !

पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. त्यादृष्टीने पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विशेषतः मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे व तात्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून मिटरची जागा बदलून घ्यावी. पावसाळ्यात घरातील कोळी, किटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्वीच बोर्डचा आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते. त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी.

पावसाळयात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये. तसेच ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे वीज उपकरणे अशा ओलाव्यापासून दूर ठेवावीत. तसेच अशी उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर असावीत. जेणेकरुन त्यात पाणी जाणार नाही. विद्युत उपकरणावर पाणी पडले अथवा त्यात पाणी शिरले तर ते उपकरण त्वरित बंद करून ते मूळ वीज जोडणीपासून बाजूला करावे. त्यामुळे त्या उपकरणातून शॉक लागण्याची शक्यता राहणार नाही. कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये तसेच ही तार विजेच्या खांबाला किंवा यंत्रणेला बांधू नये.

मेनस्विचमध्ये फ्यूज वायरच असावी

घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.

उपाययोजनाही महत्वाच्या!

वीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या तारांची स्थिती योग्य असल्याबाबतची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी व घरातील वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे. सर्व वीज उपकरणांची अर्थींग योग्य असल्याबाबतची खबरदारी घ्यावी. योग्य अर्थींगमुळे शॉकची तीव्रता कमी होते तसेच उच्च दाब असलेल्या मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज या उपकरणांसाठी थ्री पिन सॉकेटचाच वापर करावा. अशा थ्री पिन सॉकेटमध्ये अर्थिंगची व्यवस्था असते.

आकाशातील विजेचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी. वीज पडल्यास त्या भागातील विद्युत प्रवाहाचा उच्चदाब वाढून विद्युत उपकरणांचे मोठया प्रमाणात नुकसान होवू शकते. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी.

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. पूर किंवा अतिवृष्टीमुळे तसेच नदीकाठच्या परिसरात कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करावा लागतो.

काय करू नये!

विद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत. त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा. कारण अनावधानाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

विद्युत उपकरणांची दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा. दुरुस्तीदरम्यान पायात रबरी चपला घालाव्यात व पायाखालची जमीन ओलसर असू नये याची खबरदारी घ्यावी. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये. तसेच वायरची जोडणी करावीच लागली तर त्यावर इन्सुलेशन टेप लावावी.

वीज ही अत्यावश्यक गरज आहे. मात्र त्या विजेचा वापर सुरक्षिततेची खबरदारी घेऊन योग्यप्रकारे केला तरच ती उपयोगी ठरु शकते. अन्यथा दुर्घटना घडून वीज अतिधोकादायक होऊ शकते. त्यामुळे वीजग्राहकांनी पावसाळ्यात विद्युत उपकरणे हाताळताना अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

अभियंते व जनमित्रांची कसोटी

पावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खर्‍या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचार्‍यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचे तांत्रिक दोष शोधणारे, दुरुस्तीचे काम करणारे महावितरणचे अभियंते व जनमित्र यांच्यासाठी पावसाळा अतिशय आव्हानात्मक असतो.

टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्गाचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करता येते. यासोबतच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे.

निशिकांत राऊत, पुणे.

 

पाऊस आला…आला रे आला ! (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

0

अंदमान निकोबारमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन, मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस…वर्तमानपत्रातल्या या कॅप्शनची मुंबईकर दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. आणि तशी बातमी आलीही पेपरमध्ये. भूगोलात शिकलेल्या या नैऋत्य मोसमी वाऱ्यांशी हाच काय तो जिव्हाळ्याचा संबंध! ऐरवी वर्षभरात कुठले वारे कुठल्या दिशेने का वाहेनात, काही सोयरसुतक नसतं. असो…

मे महिन्यात घामाच्या धारांनी चिंब व्हायला झालं की मुंबईकरांना पावसाचे वेध लागतात. तसं म्हटलं तर पावसाचे वेध सगळ्यांनाच लागलेले असतात. कधी एकदाचा पाऊस पडतोय, असं झालेलं असतं. पाऊस पडण्याआधीच पावसाळी पिकनिकचे आणि ट्रेकिंगचे बेत आखले जातात. कुणी एक दिवसाच्या सहलीवर समाधान मानायचं ठरवतं तर काही मस्त ५-६ दिवसाची लंबी टूर प्लॅन करतात. एकंदरीत मुंबईकर पाऊस पडण्याआधीच सहलीचा बेत आखण्याच्या आनंदात भिजत असतो.

उगीच रोज आकाशाकडे नजर लावून ‘आज नक्की पाऊस पडणार, तसं आकाश ढगाळ दिसतंय’ असं आपण म्हणत असतो. बहुदा ठाणे, पुणे नाहीतर रत्नागिरीला पाऊस पडला असावा, असा वेधशाळेसारखा अंदाज मुंबईकर मनातल्या मनात बांधत असतो. पेपर आणि टीव्हीवरील रोजच्या बातम्यांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवले जाते. मान्सून केरळात दाखल, कोकण किनारपट्टीवर दाखल…म्हणजे चला आता ४-५ दिवसांत मुंबईत आगमन होणार, या विचाराने मनोमन न्हाऊन निघतो.

या पावसाच्या आगमनाच्या तयारीला लागतो. माळ्यावरच्या बांधून ठेवलेल्या छत्र्या लगोलग खाली काढल्या जातात. छत्रीची एक-एक काडी आणि छत्रीचं कापड नीट आहे का ते छत्री उघडून, गोल गोल फिरवून (छत्री रिपेरींग करणारा जसं फिरवतो तसं) तपासलं जातं. पावसाळी चप्पल किंवा बूट ची खरेदीही ठरलेली आणि त्यात दुकानदाराला खास सांगण्यात ही येते की पावसाळीच चप्पल हवी आहे पण ऑल सिझन ची असली तर बघा नंतर ही चालेल. रेनकोट पेक्षा स्टायलिश विंड चिटर घेण्याकडे जास्त कल असतो. आणि अतिमहत्त्वाचं म्हणजे जिवलग मोबाईलला प्लास्टीकचं कव्हर, यांची आवर्जून खरेदी केली जाते.

असंच एकदा त्याला भन्नाट स्वप्न पडतं. पाऊस कोकण किनारपट्टीवरून हळहळू मुंबईला सरकतोय आणि तो आल्याची बातमी त्याला एक केरळी माणूस फोन वरून देतोय. मुंबईकरही तितक्याच मिश्किलीने त्याला उत्तर देतोय-

काय म्हणता राव

आमच्याकडे आला,

तुमच्याकडे मुक्काम

खूप दिवस की हो झाला…

आमचाही पाहुणचार

घेऊ द्या की त्याला,

त्याच्या वाटेकडे डोळे लावून

हा मुंबईकर आहे बसला…

खरंच की हो आला

आला रे आला…

पाऊस आला…

झोपेतून उठून बघतो तर खरंच थेंबाथेंबाने पाऊस आला होता. स्वप्न एवढ्या लवकर खरं होऊ शकतं, याचं त्याला अप्रूप वाटून हसायला येतं. मस्त चहाचा घोट घेत घेत खिडकीत बसून पाऊस बघू लागला….

झोंबणारा गारवा

पाऊस सरींचा शिडकावा

मातीचा गंध नवा

गुंजतो मनी मारवा

बेधुंद क्षण हा वाटे हवा…

पहिल्या पावसाच्या सरीने बेधुंद झाल्या मुंबईकराचं आस्ते कदम प्लॅनिंग सुरूही झालं…आता दांडी कधी मारायची आणि मस्त वन-डे पिकनिक कधी करायची…??

 

-पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

पुण्यातील एका बिल्डरच्या 1 कोटी 26 हजाराच्या जुन्या नोटा पकडल्या…(व्हिडिओ)

0

पुणे-नाकाबंदीत पकडलेल्या गाडीतुन शिरूर पोलिसांनी 1 कोटी 26 हजाराच्या जुन्या नोटा जप्त केल्या ;शुक्रवारी (7 जून) रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली..ह्युंदाई कारमधून ही रक्कम जप्त केली..पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले तर एकजण फरार आहे. जप्त केलेल्या जुन्या नोटा पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या आहेत. नोटबंदीच्या काळात या नोटा बदलण्यासाठी पुण्यातील एका महाविद्यालयीन तरुणाला देण्यात आल्या होत्या. परंतु त्या बदलता न आल्यामुळे हा तरुण जुन्या नोटा घेऊन पुण्याच्या दिशेने येत होता. नाकाबंदीदरम्यान शिरूर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या गाडीची झडती घेतली असता या नोटा आढळून आल्या. शिरूर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला..आयकर विभागाला याची माहिती देण्यात आली असून पुढील तपास आयकर विभागाचे अधिकारी करतील अशी माहिती शिरूर पोलिसांनी दिली.

एनएटीच्या मदतीने रक्त तपासणीमुळे 70 महिन्यांच्या कालावधीत 111 जणांचे प्राण वाचले: जनकल्याण ब्लड बँक

0

पुणे: ऐच्छिक व वारंवार रक्तदान करण्यास उत्तेजन देण्यासाठी, तसेच  ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स (टीटीआय) यांचा प्रसार रोखण्यासठी रक्त तपासणीमध्ये सुरक्षित प्रक्रिया व तंत्रज्ञान यांचा वापर करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो.

रुग्णांना सुरक्षित रक्त उपलब्ध होण्याचे महत्त्व स्पष्ट होण्यासाठी, जनकल्याण ब्लड बँकेने शहरात गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. टीटीआयचा संसर्ग झाल्यास त्यांच्या उपचारासाठी येणाऱ्या खर्चामुळे आरोग्य यंत्रणेवर लक्षणीय ताण येतो, याबद्दल जागृती करण्याबाबतही परिषदेत सविस्तर चर्चा करण्यात आली. जनकल्याण ब्लड बँकेचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी, रॉश डायग्नॉस्टिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रवण सुब्रमण्यम व  रॉश डायग्नॉस्टिक्स इंडियाचे मेडिकल व सायण्टिफिक अफेअर्स हेड डॉ. संदीप सेवलीकर यांनी मीडियाशी संवाद साधताना सुरक्षित ब्लड ट्रान्सफ्युजनवर चर्चा केली.

‘महाराष्ट्रातील रक्तविषयक सुरक्षितता व ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड इन्फेक्शन्सचा प्रतिबंध’ यावरील अहवालाच्या मते, महाराष्ट्रातील डोनरमध्ये दिसून येणाऱ्या टीटीआयमध्ये एचबीव्ही व एचआयव्ही यांचे प्रमाण देशातील सरासरीपेक्षा अधिक आहे. नाकोच्या नव्या अहवालानुसार, 2018-19 मध्ये ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या केसेसमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण 13% होते व 169 संसर्ग झाला.

सर्व सहभागींनी ऐच्छिक रक्तदान करण्याला उत्तेजन देण्याची गरज नमूद केली. यामुळे, टीटीआयचा धोका कमी केला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील सर्व ब्लड बँकांमध्ये एनएटी टेस्टिंगसारख्या आधुनिक रक्त तपासणी पद्धती अवलंबण्यावरही भर देण्यात आला. भारतात अंदाजे 2,500 ब्लड बँक आहेत व त्यातील केवळ 2-3% एनएटी टेस्टिंग करतात. देशातील व राज्यातील अनेक रुग्णालये/ब्लड बँक यांनी एनएटी तपासणी प्रक्रिया राबवलेली नाही.

ट्रान्सफ्युजनसाठी रक्ताचा तुटवडा असणाऱ्या भारतातील रुग्ण अशा संसर्गाला बळी पडण्याची शक्यता असते. चर्चेदरम्यान, एनएटीची शिफारस करण्यात आली, कारण त्यामुळे इन्फेक्टिंग ऑरगॅनिझमच्या जेनेटिक मटेरिअलचे (आरएनए व डीएनए) किंवा एचआयव्ही, हिपेटायटिस बी व हिपेटायटिस सी अशा विषाणूंचे थेट निदान केले जाते. डॉ. संदीप सेवलीकर यांच्या मते, “दान केलेल्या रक्तातील संसर्ग शोधण्यासाठी ही सर्वात संवेदनशील पद्धत आहे आणि ती सध्या जगभर उपलब्ध आहे. त्यामुळे विंडो पिरिएड – जेव्हा रुग्णाला संसर्ग होतो व जेव्हा चाचणी सकारात्मक निकाल दाखवते यादरम्यानचा कालावधी – कमी केला जातो. एनएटीसाठी विंडो पिरिएड कमी असल्याचे विचारात घेता, एनएटी-टेस्टेड रक्त मिळालेल्या रुग्णांमध्ये टीटीआयचे प्रमाण कमी होऊ शकते.”

डॉ. अतुल कुलकर्णी यांनी सांगितले, “ब्लड ट्रान्सफ्युजन हा इमर्जन्सी मेडिकल केअरचा महत्त्वाचा घटक आहे. इमर्जन्सीच्या वेळी पुरेसा रक्तपुरवठा होण्यासाठी सुनियोजित ब्लड ट्रान्सफ्युजन सेवेची गरज असते. यासाठी हे संपूर्ण क्षेत्र व विनामूल्य ऐच्छिक रक्तदानाची तयारी असणारे डोनर यांच्या वर्षभरातील सहयोगामुळेच हे केवळ शक्य होऊ शकते. सर्वांना सर्वंकष आरोग्यसेवा द्यायची असले तर प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित व दर्जेदार रक्ताचा पुरवठा होणे गरजेचे असते. जनकल्याणमध्ये आम्ही एनएटी टेस्टिंगमुळे 70 महिन्यांत 111 जणांचे आयुष्य टीटीआयपासून वाचवू शकलो, ही समाधानाची बाब आहे.”

डॉ. श्रवण सुब्रमण्यम यांनी सांगितले, “सुरक्षित व सहज उपलब्ध होईल असे रक्त व रक्तविषयक उत्पादने पुरवू शकतील अशा सुसंयोजित ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसचा (बीटीएस) प्रभावी क्लिनिकल वापर करणे सर्वप्रथम गरजेचे आहे. रॉशमध्ये आम्ही टीटीआयच्या संसर्गाच्या दृष्टीने, जगभर स्वीकारले जाणारे एनएटी टेस्टिंग भारतातील रुग्णांसाठीही उपलब्ध झाले पाहिजे, हे ओळखले आहे. जगभर 20% देशांनी एनएटी टेस्टिंग सक्तीचे केले आहे. सक्षम डायग्नॉस्टिक्समुळे आपल्याला सुरक्षित रक्तपुरवठा करून सुरक्षित केले जाते व यामुळे रुग्णांना त्यांच्या अन्य आजारांवर उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करता येते.”

ब्लड ट्रान्सफ्युजन हा रुग्ण व्यवस्थापनातील महत्त्वाचा पैलू आहे. ब्लड ट्रान्सफ्युजन ब्लड ट्रान्सफ्युजनमधील गुंतागुंतीमुळे एचआयव्ही, हिपेटायटिस बी (एचबीव्ही) व हिपेटायटिस सी (एचसीव्ही) अशा टीटीआयची लागण होऊ शकते.

जनकल्याण ब्लड बँक

जेकेआरपी ही आता ब्लड सर्व्हिससाठी नावाजली जात असून, ती नावाप्रमाणेच “लोकांच्या कल्याणा”साठी रक्त या महत्त्वाच्या विषयावर गेली 30 वर्षे कार्यरत आहे. ऐच्छिक रक्तदान चळवळीमध्ये ही ब्लड बँक जवळजवळ 30 वर्षे आघाडीवर आहे. पुणे विभागातील रुग्णांच्या सुरक्षित रक्तविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी 1983 मध्ये जेकेआरपीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ब्लड बँकेने विश्वासार्ह व अवलंबण्यायोग्य ब्लड बँक म्हणून प्रतिष्ठा मिळवली. विविध क्षेत्रांतील व स्वयंसेवी कार्यकर्त्यांचा सहभाग असणारे वश्वस्त पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे ही ब्लड बँक चालवतात.

रॉश डायग्नॉस्टिक्स इंडिया

रॉश डायग्नॉस्टिक्स इंडिया प्रा. लि.ची स्थापना 2002 मध्ये झाली व कार्यालये चेन्नई, दिल्ली, कोलकाता व मुंबई येथे असून एकूण कर्मचारी 400 आहेत. आमच्या वैविध्यपूर्ण डायग्नॉस्टिक चाचण्या व व्यवस्था एकात्मिक आरोग्यसेवा सुविधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि लवकरच्या टप्प्यात निदान, टारगेटेड स्क्रीनिंग, आजाराचे मूल्यमापन व देखरेख यांचा समावेश करतात. रॉश डायग्नॉस्टिक्स इंडियाचे उद्दिष्ट “रुग्णांना नंतर ज्याची आवश्यकता भासेल ते आत्ताच करणे” हे आहे आणि त्यामुळेच देशाच्या भविष्यातील आरोग्यसेवा गरजांसाठी तयारी केली जाते.

पुणे रोटरीने भागवली दुष्काळग्रस्तांची,डोंगराळ भागाची पाण्याची तहान !

0
पुणे :ग्रामीण भागातील स्वच्छ पाण्याची निकड लक्षात घेऊन रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या सदस्यांनी १४ हून अधिक गावांमध्ये स्वच्छ पाण्याचे प्रकल्प उभारून तहान भागविण्याचे काम केले आहे .’अमृतधारा ‘प्रकल्पाद्वारे ‘वॉटर एटीएम ‘ या फिल्टर आर ओ प्लांट उभारणीतून ६ गावांची स्वच्छ पाण्याची गरज रोटरीने भागवली तर ‘ अमृत कुंड ‘ प्रकल्पाद्वारे डोंगराळ भागातील झऱ्याचे पाणी टाकीतून उपलब्ध करून  ८ गावांची तहान  रोटरीने भागवली आहे .
रोटरी क्लब  डिस्ट्रिक्ट 3131च्या वॉटर कमिटीचे अध्यक्ष सतीश खाडे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
होतले (तालुका मुळशी),बुचकेवाडी (पाथर्डी),नसरापूर(पुणे ),आटपाडी (सांगली) यासारख्या ६ गावात  गावात हे स्वच्छ पाण्याचे आर ओ प्लँट ‘अमृतधारा ‘प्रकल्पाद्वारे उभारण्यात आले आहेत.आर ओ फिल्टर प्लांटद्वारे प्रत्येक गावात  दररोज ४ हजार लिटर पाणी शुद्ध करण्याचे काम होत आहे. गावकऱ्यांसाठी वॉटर एटीएम कार्ड तयार करून दिले असून वापराची नोंद त्यावर होते.त्या नोंदीद्वारे गावकऱ्यांकडून वर्गणी स्वरूपात पैसे गोळा केले जातात. गावातील गावकऱ्यांनाच प्रशिक्षण देऊन वर्गणी ,प्रकल्प देखभाल प्रशिक्षण ही कामे केली जातात. पूर्वी नदीचे पाणी ही गावे पित होती. बोअरवेल मुळे क्षारयुक्त पाणी येते. ७० टक्के आजार हे अशुद्ध  पिण्याच्या पाण्याने होतात. त्यामुळे ग्रामीण भागात शुद्ध पाण्यासाठी प्लांट उभारण्यात आले ते टाळण्यासाठी आरओ प्लांट चा पर्याय निवडण्यात आल्याचे सतीश खाडे यांनी सांगितले. ५ रुपयाला २० लिटर याप्रमाणे पाणी गावकऱ्यांना या प्रकल्पातून मिळते.अशोक भंडारी (रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड) यांच्यासह अनेकांची या प्रकल्पात मदत झाली.प्रत्येक  प्रकल्पासाठी अडीच लाख रुपये खर्च रोटरी क्लबने केले आहेत.
 ‘अमृत कुंड’ या अनोख्या  संकल्पनेद्वारे डोंगराळ भागातील  टंचाईग्रस्त गावात टाकी बांधून आणि जलवाहिनीद्वारे गावात गुरुत्वाकर्षणाने पाणी आणणारे प्रकल्प  उभारण्यात आले आहेत.आणखी ८ गावात हे प्लांट उभारण्यात येणार आहेत .
डोंगराळ भागात झऱ्याचे पाणी आणण्यासाठी महिलांचा अर्धा दिवस जात असे .५ किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत होते. फेब्रुवारी ते जून या काळात पाणीटंचाई निर्माण होत असे.त्यावर उपाय म्हणून रोटरी सदस्यांनी’अमृतकुंड ‘प्रकल्पाची रचना केली.
 ‘कुंड ‘प्रकल्पात डोंगरात झऱ्याजवळ फेरोक्रीट सिमेंटची १२ हजार लिटर पाण्याची टाकी बांधण्यात येते. जलवाहिनीद्वारे ते पाणी गावाजवळ दुसऱ्या टाकीत सोडले जाते.भोर तालुक्यात वरोडी,धानवली,कोरले,कोवी,आणि मुळशी तालुक्यात सुसले,गोरे वस्ती,कातकरी वस्ती अशा  एकूण ८ गावात कुंड प्रकल्प उभारण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील चार गावांना रोटरीने ७ लाख ४० हजार खर्च केला. मजुरी पोटी गावचा अडीच लाख रुपये खर्च आला. आता पुढील १० गावांचे काम २५ लाख ३० हजार रुपयात होत आहे.
 सिंजेंटा कंपनीने त्यांच्या सीएसआर निधीतून काही निधी दिला आणि रोटरी क्लबने उर्वरित निधी जमवून हे प्रकल्प पूर्ण केले. गावकऱ्यांनी श्रमदान केले. त्यामुळे विनामूल्य पाणी गावकऱ्यांना मिळू लागले आहे. या सर्व प्रकल्पांच्या उभारणीमध्ये सिंजेंटा कंपनीचे संजीव रस्तोगी,अमानोरा क्लब ‘चे इंदर सिंघी,भोर -रायगड रोटरी क्लब ‘चे विनय कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.
आगामी ५ वर्षात पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागातील  सर्व वाड्यावस्त्यांमध्ये पाण्याची सोय’अमृत कुंड’प्रकल्पाद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी  मदत उभी केली जाणार आहे,’असे सतीश खाडे यांनी सांगितले.

पुणे परिमंडलात एक लाखांवर वीजमीटर उपलब्ध , वीजमीटरचा कोणताही तुटवडा नाही – महावितरण

0

पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडलात सध्या सिंगल व थ्री फेजचे एकूण 1 लाख 15 हजार 792 मीटर उपलब्ध आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणी व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

सजग नागरिक मंचचे अध्यक्ष श्री. विवेक वेलणकर यांनी पुणे परिमंडलात वीजमीटरचा तुटवडा असल्याचा आरोप केला. महावितरणकडून त्याबाबत खुलासा करण्यात आला आहे. याशिवाय गेल्या 2 वर्षात महावितरणकडून पुणे परिमंडलात सिंगल व थ्री फेजचे एकूण 4 लाख 50 हजार 668 नवीन वीजजोडणी व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

पुणे परिमंडलात सद्यस्थितीत सिंगल फेजचे 1 लाख 9 हजार 874 तसेच थ्रीफेजचे 5918 वीजमीटर उपलब्ध आहेत. त्यामुळे वीजमीटरचा कोणताही तुटवडा नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच गेल्या दोन वर्षात सिंगल फेजच्या 2 लाख 78 हजार 975 व थ्री फेजच्या 49089 अशा एकूण 3 लाख 27 हजार 884 नवीन वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत आणि 1 लाख 22 हजार 784 वीजमीटर बदलण्यात आलेले आहेत.

महावितरणने मटेरियल मॅनेजमेंटची प्रक्रिया ही ईआरपीच्या (एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) माध्यमातून ‘ऑनलाईन’ केलेली झालेली आहे. त्यामुळे साधनसामग्रीची उपलब्धता व पुरवठा ही प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत अधिक गतिमान झालेली आहे.