Home Blog Page 2911

दौंड तालुक्‍यातील अनधिकृत वाळू उत्‍खनन व वाहतुकीवर उपाययोजना करा -जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

0

 पुणे, दिनांक 20-  दौंड तालुक्‍यातील अनधिकृत वाळू उत्‍खनन व वाहतूक रोखण्‍यासाठी  महसूल, पोलिस,  उप प्रादेशिक परिवहन विभागाच्‍या अधिका-यांनी उपाययोजना कराव्‍यात, अशा सूचना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्‍या. जिल्‍हाधिकारी कार्यालयातील त्‍यांच्‍या दालनात अवैध गौणखनिज वाहतूक तालुका दौंड बाबत जिल्‍हास्‍तरीय समितीच्‍या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, बारामतीचे अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक जयवंत मिना, दौंड, पुरंदर उप विभागाचे उप विभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, दौंडचे तहसीलदार बाळाजी सोमवंशी, जिल्‍हा खनिज कर्म अधिकारी संजय बामने आदी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले की, तहसील कार्यालयाच्‍या ताब्‍यात असणा-या  57 वाहनधारकाकडून येणारा दंड न भरल्‍यास जुलै अखेर त्‍या वाहनांचा लिलाव करुन दंडाची रक्‍कम वसूल करण्‍यात यावी. उजनी जलाशयाच्‍या अखत्‍यारित अकरा गावांमधील अनधिकृत वाळू उत्‍खनन होत असल्‍यास संबंधित जलसंपदा विभागास जबाबदार धरण्‍यात यावे. भिमा नदीपात्रालगतच्‍या लाणगाव, वाटलूज येथील वन विभागाच्‍या मालकीच्‍या क्षेत्रामध्‍ये अनधिकृत वाळू साठे आढळून आल्‍यास त्‍याबाबत वन विभागाने कारवाई करावी. तसेच महसूल, पोलीस,उप प्रादेशिक परिवहन विभागाने आठवडयातून एकदा विशेष मोहम आखून अनधिकृत वाळू वाहतूक करणारांवर कारवाई करावी. यवत व पाटस या क्षेत्रीय पोलीस विभागानेही सोलापूर-पुणे महामार्गावरुन होणा-या अनधिकृत वाळू वाहतूकीवर कारवाई करावी, अशाही सूचना यावेळी दिल्‍या.

यावेळी  उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि बाबा रामदेव एकत्र – ॲड. आशिष शेलार

0

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि. 21 जून रोजी नांदेडमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बाबा रामदेव उपस्थित राहणार असल्याची माहिती शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
आज मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ॲड. शेलार यांनी योग दिनासंदर्भात माहिती दिली. यावेळी बाबा रामदेव उपस्थित होते.
ॲड. शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला असून जगभरातील देश हा दिवस उत्साहाने साजरा करीत आहेत. स्वस्थ महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित नांदेड येथील कार्यक्रमास पतंजली योगपीठाचे सहकार्य मिळणार असून दीड लाखापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस राज्यातील ३६ जिल्हा मुख्यालय आणि ३२२ तालुका मुख्यालय अशा ३५८ ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. या योग दिनामध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान 5 हजार विद्यार्थी (शाळा/महाविद्यालये/एनएसएस/एनसीसी/स्काऊट गाईड) सहभागी होणार असल्याचे ॲड. शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
योग मुळे दिवस नाही तर आयुष्य चांगले होईल — बाबा रामदेव
नियमितपणे योग केल्याने आपला दिवसच नाही तर आयुष्य चांगले होईल. आजारापासून आपण दुर राहू असे बाबा रामदेव यांनी योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेदरम्यान बाबा रामदेव यांनी योग करण्याचे महत्व, योग कसा करता येतो, योगमुळे काय फायदे होतात याची प्रात्यक्षिके दाखविली.

भारतात ‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावावर कार्यवाही सुरु होणार ?

0
नवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  बोलावलेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. मात्र, राजकीय पक्षांचा या प्रस्तावाला तत्त्वतः पाठिंबा असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला असून, अंमलबजावणी प्रक्रिया ठरविण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा सरकारने केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेणे, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यलढ्याचा हीरक महोत्सव आणि महात्मा गांधींचा दीडशेवा जयंती सोहळा साजरा करण्यावर चर्चेसाठी मोदींनी आज बैठक बोलावली होती. परंतु, या बैठकीतील सहभागावरून विरोधी पक्षांमध्येच परस्परविरोधी मतप्रवाह असल्याचे दिसून आले. एकत्रित निवडणुकांची संकल्पना लोकशाहीविरोधी आणि संघराज्य विरोधी असल्याचे म्हणत कॉंग्रेससह यूपीएमधील सर्व घटक पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, तेलंगण राष्ट्र समिती या पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार घातला.

मोदींसोबतच संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शाह, परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बिजू जनता दलाचे नेते व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आदी नेते सहभागी झाले होते. विरोधी पक्षांतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी, वायएसआर कॉंग्रेसचे प्रतिनिधी, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले, पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी बैठकीत हजेरी लावून चर्चा केली.
या बैठकीत हा प्रस्ताव आकर्षक, परंतु अव्यवहार्य असल्याचे लेखी निवेदनच उपस्थित पक्ष प्रमुखांना दिले. एकत्रित निवडणुकांसाठी घटनादुरुस्तीची आवश्‍यकता, राज्य सरकार बरखास्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या कलम 356 चे अस्तित्व, यावर सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. एकत्रित निवडणुकांसाठी मोठ्याप्रमाणात घटना दुरुस्ती करावी लागेल, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले.या बैठकीनंतर राजनाथसिंह यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. एकत्रित निवडणुकांच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीसाठी 40 पक्षप्रमुखांना निमंत्रण दिले होते. त्यापैकी 21 पक्षांच्या प्रमुखांनी प्रत्यक्ष, तर तीन पक्षांनी लेखी म्हणणे मांडले आहे. त्याआधारे या मुद्द्यावर पुढे कसे जाता येईल, यावर अभिप्रायासाठी समिती नेमण्याची घोषणा मोदींनी या बैठकीत केली. ही समिती आपल्या सूचना सरकारला देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
संसदेत चर्चा का नाही? : गोगोई
या बैठकीवर बहिष्कार टाकणाऱ्या कॉंग्रेसने निवडणूक सुधारणेवर सरकारने संसदेमध्ये का चर्चा करत नाही, असा सवाल केला आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते व खासदार गौरव गोगोई यांनी ही मागणी केली. एकत्रित निवडणुकांसाठी आग्रह धरणाऱ्या सरकारला हिमाचल प्रदेश आणि गुजरातची विधानसभा निवडणूक एकत्रित घेता आली नाही, लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत घेतल्या आणि आता गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी एकत्रित निवडणूक घेऊ शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

श्री क्षेत्र देहू आळंदी विकास आराखड्याअंतर्गत एक हजार कोटी रुपयांहून अधिक कामे – सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पुढाकार

0
पुणे – ज्ञानोबा तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकरिता श्री क्षेत्र देहू आळंदी येथे भक्तिभावाने दाखल होत असलेल्या लाखो वारकरी आणि नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकारतर्फे सुमारे एक हजार कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
श्रीक्षेत्र देहू आळंदी भंडारा डोंगर विकास आराखड्याअंतर्गत स्थानिक प्रशासन आणि विविध विभागांच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विकास कामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत. स्वच्छ वारी सुरक्षित वारी आणि आनंददायी वारी, या त्रिसूत्रीच्या जोरावर भाविकांसाठी सुविधा विकसित करण्यात आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे पूर्ण करण्यात आलेला विकास कामांमध्ये प्रामुख्याने रस्त्यांचे रुंदीकरण, फूटपाथ निर्मिती, बाह्यवळण मार्ग, पार्किंग सुविधा, सुलभ शौचालय आणि पालखीतळ सुविधा विकास आदींचा समावेश आहे.
देहू आळंदीत दाखल होणारे लाखो वारकरी आणि भाविकांना सुलभ व सुरक्षितपणे दर्शन घेता यावे, यासाठी ही विविध विकास कामे उपयुक्त ठरणार आहेत, असा विश्‍वास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
एक हजार कोटींची विकासकामे
श्रीक्षेत्र देहू आळंदी आणि भंडारा डोंगर परिसरात एक हजार कोटींची विकास कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यामध्ये देहूत ३२, आळंदीमध्ये ३४ आणि भंडारा डोंगर व सदुंबरे परिसरात प्रत्येकी सहा विकास कामांचा समावेश आहे.
देहू विकास आराखड्यामध्ये सुमारे १८० कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुख्य घाटाचे पुनर्निर्माण, गाथा मंदिर परिसर आणि घाटाचे पुनर्निर्माण, भक्तनिवास आणि वैकुंठ गमन मंदिर परिसराचा पुनर्विकास,  रस्त्यांचे रुंदीकरण आणि प्रशस्त फूटपाथ, गावांमधील रस्त्यांवरील वाहनांची कमी करून भक्तांसाठी सुरक्षित पायी चालण्याची सुविधा, त्यासाठी प्रशस्त बाह्यवळण मार्ग, सुलभ शौचालय आणि आरोग्य सुविधा केंद्रे आणि सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्प आदींचा समावेश आहे. ग्रामपंचायत स्तरावर विकसित करण्यात आलेला हा पहिलाच सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प ठरणार आहे.
या सर्व विकास कामांमुळे देहू भाविकांना अतिशय आल्हाददायक अनुभव येत आहे, अशी प्रतिक्रिया देहूत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी व्यक्त केली.
आळंदी मध्ये २०० कोटी रुपयांची विकासकामे
आळंदी परिसरात देखील २०० कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
माऊलींच्या दर्शन स्थळ भवतालचा अतिक्रमणांचा विळखा दूर करण्यात आला असून त्या ठिकाणी रुंदीकरण व प्रशस्त फुटपाथ विकसित करण्यात आले आहेत. सिद्धबेट परिसराचे देखील सुशोभीकरण करण्यात आले असून तेथे नदीकिनारी सुंदर वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे जड वाहने बाह्यवळण मार्गाच्या माध्यमातून वळविण्यात आल्याने गावातील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. परिणामी भाविकांना अतिशय सुलभ व सुरक्षितपणे येणे शक्य झाले आहे. आळंदी गावाच्या दोन्ही बाजूला पूल बांधून वाहतूक वळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रशस्त पार्किंग तळाची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आळंदी परिसराला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी विशेष प्रकल्प उभारण्यात आला असून तो लवकरच कार्यान्वित होईल.
या सर्व विकास कामांच्या माध्यमातून श्रीक्षेत्र देहू, आळंदी आणि भंडारा परिसरामध्ये वारीचे नियोजन करणे अतिशय सुलभ होणार आहे.
पुण्याकडून देहू आळंदी परिसरात जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून देखील वाहतूक करण्याची सुलभ सोय झाली आहे. या मार्गावरील रस्त्यांचे रुंदीकरण व पुनर्निर्माण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विश्रांतवाडी भागातून देखील आठ पदरी प्रशस्त मार्गाद्वारे आळंदी-देहू परिसरात जाणे अतिशय सुलभ  झाले आहे.
भाविकांच्या सोयी-सुविधा आणि सुरक्षेला प्राधान्य- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री
श्रीक्षेत्र देहू आळंदी भंडारा परिसर विकास प्रकल्पांतर्गत योजना पूर्णत्वास नेत असताना भाविकांना सोयी सुविधा मिळणे त्यांना सुलभ दर्शन होणे आणि मुख्य म्हणजे त्यांची सुरक्षा याला प्राधान्य देण्यात आले आहे. काही विकास प्रकल्पांमध्ये भूसंपादन  संदर्भातील तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र त्या लवकरात लवकर सोडवून संपूर्ण विकास प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वास आहे

साहित्‍यरत्‍न लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे शिष्‍यवृत्‍तीसाठी अर्ज करण्‍याचे आवाहन

0

पुणे-  मातंग समाज  व तत्‍सम 12 पोटजातीतील इ.10 वी, 12 वी, पदवी, पदव्‍युत्‍तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्‍यासक्रमामध्‍ये विशेष प्राविण्‍य 70 टक्‍के पेक्षा जास्‍त गुण मिळवून उत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थी- विद्यार्थीनीना साहित्‍यरत्‍न अण्‍णाभाऊ साठे शिष्‍यवृत्‍ती गुणानुक्रमे मंजूर करण्‍यात येणार असून  सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात इ.10 वी, 12 वी, पदवी, पदव्‍युत्‍तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्‍यासक्रमामध्‍ये विशेष प्राविण्‍य मिळालेल्‍या विद्यार्थ्‍यांनी आपले अर्ज जिल्‍हा व्‍यवस्‍थापक, साहित्‍यरत्‍न लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन सर्व्‍हे नंबर 103,104 मेन्‍टल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलिस स्‍टेशन समोर, येरवडा, पुणे येथे पुढील कागदपत्रांसह सादर करावेत.

आवश्यक कागदपत्रे- साध्‍या कागदावर फोटो लावून अर्ज भ्रमणध्‍वनीसह, जातीचा दाखला, शाळा सोडल्‍याचा दाखला, रेशन कार्ड शिधापत्रिका छायांकित प्रत, गुणपत्रक, पुढील वर्गात प्रवेशाबाबतचा पुरावा.

मातंग समाज व तत्‍सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्‍यांनी आपले अर्ज कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती स्‍वयंसाक्षांकित करुन वरील पत्‍त्‍यावर या कार्यालयाकडे दि. 20 जून 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत पोहोचतील अशा बेताने सादर करावेत, असे अवाहन पुणे जिल्‍हा व्‍यवस्‍थापक यांनी केले आहे.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण अनुदान योजना

0

पुणे–  डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या मदरसांनी अल्‍पसंख्‍यांक विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.अविवि- २०१०/प्र.क्र.१५२/१०/का.६, दिनांक ११ ऑक्‍टोबर २०१३ मध्‍ये नमुद केल्‍याप्रमाणे प्रस्‍ताव तयार करुन जिल्‍हाधिकारी कार्यालय, विशेष कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, पुणे शहर, अ इमारत, २ रा मजला, पुणे स्‍टेशन, पुणे येथे दिनांक ३१ ऑगस्‍ट २०१९ पर्यंत प्रस्‍ताव सादर करावेत. त्‍यानंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव विचारात घेतले जाणार नाहीत याची  नोंद घ्‍यावी, असे निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हास्‍तरीय समिती सदस्‍य सचिव डॉ. जयश्री कटारे यांनी प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये कळविले आहे.

मॉल आणि मल्टिफ्लेक्स ला पार्किंग शुल्क देवू नका – बालवडकर

0

मॉल आणि मल्टिफ्लेक्स ला पार्किंग शुल्क देवू नका – बालवडकर
पुणे-मॉल आणि मल्टिफ्लेक्स येथे पार्किंगच्या जागा कायद्याने सार्वजनिक पार्किंग च्या जागा असल्याने येथे कोणालाही पार्किंग शुल्क घेण्याचा अधिकार नसताना बेकायदेशीर रित्या पार्किंग शुल्क घेतले जात आहे. त्यांनी अशा प्रकरचे बेकायदा कृत्य त्वरित थांबवावे अन्यथा त्यांच्यावर महापालिकेच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देताना शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी ग्राहकांना हि अशा प्रकरच्या बेकायदा शुल्क वसुलीला विरोध करा ,जबरदस्तीने अशी वसुली करणाऱ्यांविरोधात तक्रारी करा असे आवाहन केले आहे . आज बालवडकर यांनी याबाबत महापालिकेकडून बजावण्यात येत असलेल्या नोटिसांची प्रत पत्रकारांना दाखविली  .

पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत फ्लाईंग हॉक्स संघाची रायजिंग ईगल्स संघावर मात

0
पुणे- पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत फ्लाईंग हॉक्स संघाने इंटेन्सिटी टेनिस अकादमी रायजिंग ईगल्स संघाचा 47-33 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. 

डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या सामन्यात इंटेन्सिटी टेनिस अकादमी रायजिंग ईगल्स संघाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. फ्लाईंग हॉक्स संघाने इंटेन्सिटी टेनिस अकादमी रायजिंग ईगल्स संघाचा  47-33 असा पराभव केला. फ्लाईंग हॉक्स संघाकडून  अंशुल पुजारी,  सक्षम भन्साळी,  अर्जुन कीर्तने, श्रावणी देशमुख,  कौशिकी समंथा,  तेज ओक, तनिश बेलगलकर,पार्थ देवरुखकर, श्लोक गांधी यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत संघाकडून आरोही देशमुख, आर्यन हूड, शिवतेज श्रीफुले, वरद उंडरे, सहाना कमलाकन्नन, पृथ्वीराज हिरेमठ यांनी विजय मिळवला.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
फ्लाईंग हॉक्स वि.वि.इंटेन्सिटी टेनिस अकादमी रायजिंग ईगल्स 47-33(एकेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: अंशुल पुजारी वि.वि रित्सा कोंडकर  4-2; 10वर्षाखालील मुले: सक्षम भन्साळी वि.वि.अहान सारस्वत 4-3(2); 10 वर्षाखालील मुली: जसलीन कटारिया पराभूत वि.आरोही देशमुख 1-4; 12 वर्षाखालील मुले: अर्जुन कीर्तने वि.वि.पार्थ काळे   6-0; 12वर्षाखालील मुली: श्रावणी देशमुख वि.वि.देवांशी प्रभुदेसाई  6-1; 14वर्षाखालील मुले: सुधांशु सावंत पराभूत वि.आर्यन हूड  4-6; 14वर्षाखालील मुली:कौशिकी समंथा वि.वि.सिद्धी खोत  6-3; कुमार दुहेरी मुले: तेज ओक/तनिश बेलगलकर वि.वि.अनिश रांजलकर/आर्यन खलाटे  6-2; 14वर्षाखालील मुले दुहेरी: पार्थ देवरुखकर/श्लोक गांधी वि.वि. अनन्मय उपाध्याय/दिव्यांक कवितके 6-2;10 वर्षाखालील मुले दुहेरी: देव घुवालेवाला/निव गोजिया पराभूत वि.शिवतेज श्रीफुले/वरद उंडरे  2-4; मिश्र दुहेरी:चिराग चौधरी/एंजल भाटिया पराभूत वि.सहाना कमलाकन्नन/पृथ्वीराज हिरेमठ 2-6). 

समाजातील कुरूपता संपविण्यासाठी काम करावे -इंद्रजीत देशमुख

0
पुणे : “दुसऱ्याचे जीवन समृद्ध करतानाच आपले जीवन समृद्ध होत असते. आज समाजात दारिद्र्य, निरक्षरता, भेदाभेद असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी केवळ अधिकारीच झाले पाहिजे असे नाही. आपल्या अस्तित्वाने समाजातील कुरूपता संपविण्यासाठी आपण काम केले पाहिजे. प्रशासनात आल्यावर भ्रष्टाचार करणार नाही आणि आठवड्यातील एक दिवस समाजासाठी काम करणार, हे सूत्र अवलंबले, तर चांगला माणूस होता येते,” असा सल्ला माजी अतिरिक्त मुख्य सचिव इंद्रजित देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिला.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वास्तव ,भवितव्य व दिशा दाखवण्यासाठी आयोजित स्पर्धा परीक्षा महोत्सवात मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. यावेळी २०१९ च्या यूपीएससी परीक्षेतील यशवंत तृप्ती धोडमिसे, एमपीएससी यशवंत स्वाती दाभाडे, सृजन फाऊंडेशनचे संस्थापक व बारामती अॅग्रो फूड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार, एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे, किरण निंभोरे आदी उपस्थित होते.
तृप्ती दोडमिसे म्हणाल्या, “खासगी क्षेत्रात कार्यक्षमता अधिक असते. त्याचा फायदा तयारी करताना झाला. नोकरी सांभाळून तयारी केली. आपणही अशा रीतीने यश मिळवू शकाल. सेवेतील आव्हाने समजून त्यानुसार तयारी करावी. माहिती उपलब्ध आहे म्हणून सगळीकडे लक्ष देण्यापेक्षा आवश्यक तेवढेच वाचले पाहिजे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी मुलांचा टक्का वाढला पाहिजे. राज्य लोकसेवा आयोग इतर राज्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहे. लाखो मुलांमधून तुम्हाला पद मिळवायचे असेल, तर सोशल मीडियाचा वापर कमी केला पाहिजे. तंत्रज्ञानाचा अभ्यासात योग्य वापर केला पाहिजे. दोनतीन वर्षात थांबले पाहिजे. स्पर्धा परीक्षा हे ‘अरेंज मॅरेज’सारखे असून, यशासाठी तडजोडी कराव्या लागणार हे समजून घेतले पाहिजे.”
स्वाती दाभाडे म्हणाल्या, “स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्वयंअध्ययन अधिक महत्त्वाचे असते. प्रक्रिया समजून घेण्यासाठी क्लास, मार्गदर्शन उपयुक्त ठरते. सतत सकारात्मक राहून वेळेचे नियोजन करणे, अभ्यासातील मूलभूत संकल्पना समजून घेणे फायदेशीर ठरते. ट्रेंडपेक्षा आपला आतला आवाज ऐकायला हवा. प्लॅन बी तयार ठेवून वेळीच अन्य संधींबाबत विचार केला पाहिजे. या परीक्षांचा अभ्यास करताना अनेक आकर्षणे येतात. त्यापासून दूर राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. स्वतःशी आणि पालकांशी प्रामाणिक राहिले पाहिजे.”

महेश बडे यांनी प्रास्ताविक केले. निलेश आरडळे, त्रिवेणी काहलकर, आरिप पटेल यांनी सूत्रसंचालन केले. माधव जगताप यांनी आभार मानले.

योगदिनानिमित्त प्रशिक्षण शिबिराचे आयोजन योगासन स्पर्धाः विजेत्यांना हरिद्वार येथे एका आठवड्याचे प्रशिक्षण

0

पुणे, १९ जून: संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्णयानुसार २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात येतो.  त्याचे औचित्य साधून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे गुरुवार, दि. २१ जून २०१९ रोजी सकाळी ६.३० वाजता कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या प्रांगणात योग प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, यावर्षापासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी योगासन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील विजेतांना एका आठवड्यासाठी हरिद्वार येथील पतंजली योगपीठात योग प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे.
या शिबीराच्या निमित्ताने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सुमारे ५ ते ६ हजार विद्यार्थी या योग प्रशिक्षण शिबीरात सहभागी होणार आहेत.
पतंजली योगपीठ, हरिद्वार येथील आचार्य स्वामी विप्रदेवजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे योग प्रशिक्षण शिबीर संपन्न होणार आहे. विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे १९९६ सालापासून दरवर्षी  २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकरीता  योग प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाते. १९८३ सालापासून एमआयटी संस्थेच्या प्रांगणात धूम्रपान करण्यास बंदी आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व चारित्र्य संवर्धन व्हावे यासाठी योगाला नेहमीच प्रोत्साहन दिले जात आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात आयोजित करण्यात असलेल्या या योग प्रशिक्षण शिबीरात जास्तित जास्त लोकांनी व विशेषतः विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड व कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी केले आहे.

पीएमपीएमएल चा वार्षिक तोटा आता 275 कोटीवर पोहोचणार …?

0

पुणे -२०१८ -१९ मध्ये २४४ कोटीचा तोटा आलेल्या पीएमपीएमएल चा तोटा नव्या सुरु झालेल्या आर्थिक वर्षात 275 कोटीपर्यंत पोहोचला तर नवल वाटणार नाही अशी स्थिती स्पष्ट दिसते आहे.म्हणजे दिवसाला सुमारे पाउन कोटी रुपये पुणेआणि पिंपरीकर पीएमपीएमएलला संचालन तुट म्हणून देतील याकडे आता लक्ष वेधण्याची गरज निर्माण झाली आहे .

पीएमपीच्या संचलनातील तूट भरून काढण्यासाठी दरवर्षी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. पण, प्रशासनाकडून सुधारणा केल्या जात नाहीत, अशी टीका नगरसेवकांनी पीएमपीवर केली. मात्र, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी तूट वाढण्याची कारणे विषद केली आहेत .सीएनजी बसेस ची देखभाल दुरुस्ती महागड़ी,सीएनजी आणि डिझेल च्या दरात होणारी वाढ..लाईफ संपलेल्या बसेसच्या दुरुस्तयांवर होणारा जादा खर्च .. मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पीएमपी बसच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या आहेत. पर्यायाने तूट वाढत आहे, असे त्यांनी मुख्य  सभेत सांगितले.

प्रवाशांची संख्या घटली
पीएमपीचे वर्षभरात प्रवासी कमी झाले आहेत. त्यामुळे ३९ कोटींनी उत्पन्न घटले आहे. तसेच जाहिरात, इमारत भाडे, पुणे दर्शन बससेवेचेही उत्पन्न घटले आणि इंधनाचा खर्च वाढल्याने वर्षात २०१८-१९ मध्ये पीएमपीच्या संचलनातील तूट २४४ कोटींवर गेली आहे. २०१७-१८ मध्ये ही तूट २०४ कोटी होती, असे गुंडे यांनी सांगितले.

पीएमपीला एप्रिल ते जुलै दरम्याच्या संचलनातील तुटीपोटी ४८ कोटींच्या खर्चास मान्यता दिली. या वेळी नगरसेवकांनी पीएमपी प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. तसेच तोटा कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, असा प्रश्‍न विचारला.

गुंडे म्हणाल्या, ”पीएमपीच्या ताफ्यातील अनेक बस जुन्या आहेत. तसेच वर्षभर ठेकेदाराच्या ५६ बस रस्त्यावर उतरलेल्या नाहीत. बसच्या फेऱ्या ८५ हजार किलोमीटरने कमी झाल्या आहेत. त्यामुळे उत्पन्न बुडाले आहे. स्वारगेट ते निगडी आणि कोथरूड ते रामवाडी या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बसच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या आहेत. बस पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे त्या दूरवर उभ्या कराव्या लागतात. सीएनजी गॅस भरण्यासाठी बसना लांब जावे लागते. त्यामुळे डेड किलोमीटर वाढत आहे. अशा कारणांमुळे संचलनातील तूट वाढत आहे.”

पाच वर्षांतील पीएमपीची वाढलेली तूट
२०१४-१५ १६७ कोटी
२०१५-१६ १५७ कोटी
२०१६-१७ २१० कोटी
२०१७-१८ २०४ कोटी
२०१८-१९ २४४ कोटी

पीएमपीत येणार १६४० बस
पुणे महानगर परिवहन मंडळातील (पीएमपी) अनेक बस जुन्या झाल्याने त्या बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. पीएमपीचा तोटा कमी करण्यासाठी व प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी नवीन बस खरेदी केली जाणार आहे. २०२०-२१ पर्यंत नवीन १ हजार ६४० बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील, असे पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सांगितले.

सर्वसाधारण सभेमध्ये गुंडे यांनी बस खरेदीचा कालबद्ध कार्यक्रम नगरसवेकांना सांगितला. केंद्र शासनाच्या नॅशनल इलेक्‍ट्रिक मोटारव्हेईकल मिशननुसार २०३० पर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सर्व बसेस इलेक्‍ट्रिक असणार आहेत. त्यादृष्टीने पीएमपी पुढील वर्षभरात ५०० इलेक्‍ट्रिक बस घेणार आहे. त्यातील २५ बस सध्या धावत आहेत. १२५ बसची ऑर्डर दिली असून, त्यातील ७० बस जुलै, तर ५५ बस ऑगस्टमध्ये येतील. ४०० सीएनजी बसपैकी जून-ऑगस्टमध्ये प्रत्येकी ५०, तर सप्टेंबर, ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरमध्ये प्रत्येकी १०० बस घेण्यात येणार आहेत. ४४० सीएनजी बस भाड्याने घेण्यासाठी प्रक्रिया सुरू असून, चार निविदा आल्या आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आहे. केंद्र शासनाकडून इलेक्‍ट्रिक बससाठी ५५ लाख रुपये अनुदान मिळत आहे, ३५० बस घेण्यासाठी केंद्राकडे या महिन्याअखेर प्रस्ताव पाठवला जाईल. इतर ३५० बस घेण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे, त्या पुढच्या डिसेंबरमध्ये येतील. अशा प्रकारे नवीन बस खरेदीचे नियोजन केले आहे. या सर्व बस २०२०-२१ पर्यंत रस्त्यावर धावतील. त्यामुळे पीएमपीचे ९० टक्के प्रश्‍न सुटतील. प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल, असे गुंडे यांनी सांगितले.

राजामौलींच्या नव्या सिनेमाची प्रदर्शनाआधीच 70 कोटींची कमाई.

0

एस.एस.राजामौली यांच्या बहुप्रतीक्षित ‘आरआरआर’ या सिनेमाने प्रदर्शनाआधीच एक रेकॉर्ड केला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच परदेशातील थिएटर राई्टसह आतापर्यंत तब्बल 70 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचं शूटिंग अद्याप संपलेलं नाही. तरीही या सिनेमाने फक्त हक्क विकून केलेल्या कमाईने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. परदेशातील फिल्म डिस्ट्रीब्युशन हाऊस ‘फार्स फिल्म्स’ सोबत राजामौलींनी मोठी डील केली.

बाहुबली सिरीजला मिळालेल्या भरघोस यशानंतर राजामौलींच्या आगामी सिनेमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यामुळे ‘आरआरआर’ची घोषणा झाल्यापासूनचं या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली. दक्षिणात्य अभिनेता रामचरण आणि ज्यूनियर एनटीआर यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाचं बजेट जवळपास 300 कोटीचं आहे. विशेष म्हणजे चुलबुली गर्ल आलिया भट या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

‘आरआरआर’ आलियाचा पहिला दाक्षिणात्य सिनेमा असणार आहे. त्याशिवाय ‘सिंघम’ अजय देवगणही या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा काल्पनिक असून 1920 मधील स्वातंत्र्यसैनिक अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन पात्रांभोवती असणार आहे. राजामौली ‘आरआरआर’ सिनेमा बाहुबलीपेक्षा मोठ्या स्केलवर करण्याच्या तयारीत आहेत. 30 जुलै 2020 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासूनच ‘आरआरआर’ची चांगलीच चर्चा रंगत होती. आता बॉक्स ऑफिसवर ‘आरआरआर’ कोणते नवे किर्तीमान प्रस्थापित करतो हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देऊ – कामगार मंत्री डॉ. संजय कुटे

0

कंत्राटदार बदलला तरी कर्मचारी तेच  ठेवण्याची – महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाची मागणी

मुंबई( प्रतिनिधी ) – कंत्राटदार बदलला तरी कर्मचारी ठेवावेत अशी लेखी निवेदनाद्वारे शाहरुख मुलाणी मंत्रालयीन सचिव महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने नवनिर्वाचित महाराष्ट्र शासन मंत्रालय कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या कडे केली आहे.

यावेळी मुलाणी म्हणाले की, राज्यात मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत विविध शासकीय तसेच निम शासकीय कार्यालयात बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी विविध विभागात काम करत आहेत. त्यात मंत्रालय आस्थापना, आयुक्तालय, संचालनालय, महामंडळे, स्थानिक स्वायत्त संस्था यांमध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने चोख काम करत आहेत. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. कंत्राटी कर्मचारी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना यशस्वी करत आहेत. परंतु, अनेक ठिकाणी राजकीय हेवेदावे यामुळे कर्मचारी बळी पडत आहेत. त्यांना कामावरून कमी केले जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. अनेक दिवस काम करून संबंधित कर्मचाऱ्याला कामाचा अनुभव आलेला असतो. आपल्या प्रगतीशील आणि पारदर्शी सरकार मध्ये कंत्राटदार बदलला तरी कर्मचारी तेच ठेवल्यास काम करताना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतचा शासनाच्या वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होईल. त्यानुषंगाने त्याच पदासाठी कंत्राट मागवले असता तेच कर्मचारी ठेवावेत. असे शाहरुख मुलाणी मंत्रालयीन सचिव महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघ यांनी सांगितले.

त्यावर महाराष्ट्र शासन मंत्रालय कामगार मंत्री डॉ. संजय कुटे म्हणाले की, हे सरकार शेतकरी व कामगार यांचे सरकार आहे त्याअनुषंगाने बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळून देऊ असे सांगितल्याचे मुलाणी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच महाराष्ट्र शासन मंत्रालय मुख्य सचिव अजोय मेहता यांना ईमेल द्वारे व समक्ष सदर निवेदन दिले असता आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन प्रधान सचिव सीताराम कुंटे, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजीव कुमार, तसेच वित्त विभागाला कळवले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा याचिकाकर्ते मुकूंद जाधवर, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, कार्याध्यक्ष सचिन जाधव, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, सरचिटणीस शहाजी नलवडे, सह कार्याध्यक्ष सचिन पाटील आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

उप जिल्‍हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांच्‍या हस्‍ते भारतीय नागरिकत्‍वाच्‍या प्रमाणपत्राचे वाटप

0

पुणे : पाकिस्‍तानहुन येऊन पुणे पिंपरी चिंचवड येथे स्‍थायिक झालेल्‍या 17 नागरिकांना  जिल्‍हाधिकारी कार्यालयात निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांच्‍या हस्‍ते भारतीय नागरिकत्‍वाच्‍या  प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आले. यावेळी तहसिलदार हेमंत निकम, डॉ.युधिष्ठिर लालजी, वीरेंन्‍द्र कुकरेजा, डब्‍बू आसवानी, बाळासाहेब रुणवाल आदी उपस्थित होते.

हजार किलोमिटरचा प्रवास करून पुण्यात आलेल्या सिंधी बांधवांना अखेर भारताने आपले म्हणून स्विकारले आहे. त्यांच्यातील 22 जणांना भारतीयत्व प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे ते आता आपण भारतीय असल्याचे अभिमानाने सांगु शकणार आहेत. यापुर्वी सिंध यापूर्वी 120 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते.

सिंधी समाजातील 22 जण पाकिस्तानातील सिंध प्रांतातून पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात स्थायिक झाले होते. त्यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात भारतीय नागरिकत्व देण्यात आले. सिंधी समाजातील संत युधिष्ठिर लालजी, नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, डब्बू आसवानी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, तहसीलदार हेमंत निकम, ‘मेरे अपने’ संघटनेचे बाळासाहेब रुणवाल आणि सिंधी समाज बांधव या वेळी उपस्थित होते.

सिंधी समाजाला गेल्या काही वर्षापासून भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी बऱ्याच अडचणी येत होत्या. परंतु 2016 मध्ये याबाबत कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर सिंधी लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संघटनेच्या पाठपुराव्यानंतर तातडीने दखल घेत सिंधी समाजातील लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणाऱ्या अडचणी दूर केल्या. यावेळी सिंधी समाजाने जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

45 कोटींची वर्गीकरणे फक्‍त 10 मिनिटांत मान्य

0

पुणे – मंगळवारी झालेल्या महापालिका मुख्यसभेत अवघ्या 10 मिनिटांत 45 कोटी रुपयांची वर्गीकरणे मान्य करण्यात आली. या मुख्यसभेसाठी सोमवारी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे आयुक्तांनी अंदाजपत्रकातील वर्गीकरणांना शिस्त लावण्यासाठी आदेश काढून आठ दिवस होण्याआधीच ही वर्गीकरणे झाली आहेत.

स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर नगरसेवकांनी 35 प्रस्ताव यापूर्वीच दिले होते. त्यामध्ये सुमारे 12 कोटी रुपयांच्या कामांचे वर्गीकरण सूचविण्यात आले होते. सोमवारी (दि.17) सकाळी स्थायी समितीची बैठक सुरू होताना आयत्यावेळी 48 वर्गीकरणांचे प्रस्ताव नगरसेवकांनी दाखल केले. त्यामध्ये 10 लाखांपासून ते 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त कामांचे वर्गीकरण सूचविण्यात आले होते. त्यात पटापट बदल करून एकाच बैठकीत सुमारे 45 ते 50 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली. एप्रिलमध्ये अंदाजपत्रक तयार करताना ड्रेनेजलाइन-जलवाहिनी टाकणे, रस्ता करणे बहुउद्देशीय हॉल बांधणे, इंटरलॉकिंग ब्लॉक बसविणे, रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे, विद्युत विषयक कामे करणे, वाहनतळ उभारणे अशी विविध कामे सूचविली होती. पण आता ही कामे रद्द करून एका कामाची तरदूत तीन-चार कामांमध्ये विभागून नवीन कामे वर्गीकरणांमध्ये सूचविण्यात आली आहेत.