Home Blog Page 2909

मोबाइलच्या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे-उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे

0

पुणे-लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनच्यावतीने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . हा कार्यक्रम विश्रांतवाडी येथील  कस्तुरबा हौसिंग सोसायटीमधील  कस्तुरबा हॉलमध्ये संपन्न झाला . या कार्यक्रमाच्या   अध्यक्षस्थानी  लायंस क्लब के अध्यक्ष लायन राजेश अग्रवाल , प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शहराचे उपमहापौर   डॉ. सिद्धार्थ धेंडे ,दिल्ली येथील अखिल भारतीय अग्रवाल संघटनेचे  राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीपजी मित्तल , शिवाजी चमकीरे, कार्यक्रमाचे संयोजक लायन रवि अग्रवाल, सचिव लायन राजेश बंसल, कोषाध्यक्ष लायन उमेश अग्रवाल व मोठ्या  संख्येने सदस्य उपस्थित होते .

      यावेळी ३०० हुन अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देउन सन्मानित करण्यात आले . तसेच भविष्यकाळात या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेन अग्रस्थानी राहील असे आश्वासन यावेळी क्लबच्या सदस्यांनी दिले  .

          क्लबच्यावतीने वर्षभरात  ४७८  सेवा प्रकल्पांची माहिती देण्यात आली .   प्रमुख पाहुणे  लायन  शिवाजी चमकीरे यांनी लिओ इंटरनेशनलच्या माध्यमातून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .पुण्यात  नव्या लियो क्लब माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती देण्यात आली  . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अग्रवाल क्लासेस व सत्यम ग्रुप यांनी विशेष योगदान दिले . 

मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँकेस ६ कोटी २६ लाख नफा

सर्वसाधारण सभेत अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांची माहिती

पुणे :दि मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँकेस २०१८-१९ या  आर्थिक वर्षात ६ कोटी २६ लाख नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांनी दिली.
बँकेची ८७ वी सर्वसाधारण सभा आझम कँम्पस असेंब्ली हॉल येथे रविवार दि. २३जून रोजी सकाळी साडेदहा वाजता झाली. या सभेत बँकेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार बँकेच्या प्रगतीची माहिती दिली.

बॅंकेकडे ५८३ कोटी ६२ लाख रुपये ठेवी असून ३४२कोटी ६७ लाख रुपये कर्जवाटप केले आहे. बँकेचा एन.पी. ए ९ टक्के आहे. मागील वर्षाच्या तुलनेत एनपीए कमी करण्यात यश मिळाले आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात ६ कोटी २६ लाख रुपये फायदा झाला आहे.

पुण्यात मुख्यालय असलेल्या मुस्लीम को- ऑप बँकेच्या राज्यात ‌२६ शाखा असून महाराष्ट्रात विविध शहरात शाखाच्या  विस्ताराची परवानगी रिझर्व्ह बँकेकडे मागण्यात आली आहे.

मोबाईल बँकिंग अॅप, आरटीजीएस- एनईएफटी गो लाईव्ह या  डिजीटल बँकिंग सेवा देण्यात आल्या असून भावी काळात  अत्याधुनिक बँकिंग सेवा दिल्या जाणार आहेत.

बँकेचे  संचालक, सभासद,कर्मचारी या सर्वसाधारण सभेस उपस्थित होते, सभेनंतर ‘ सहकार आणि बॅंकिंग प्रशिक्षण कार्यक्रम ‘ घेण्यात आला. त्यात आधुनिक बँकिंग प्रणालीची माहिती देण्यात आली.

बँकेचे  अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार ,सचिव डॉ.हारुन सय्यद यांनी अहवाल   मांडला .  त्याला सभासदांनी  बहुमताने मंजुरी दिली.

जुन्नरमध्ये एतिहासिक गढी परिसरात आढळली गणेशमुर्ती

0
जुन्नर /आनंद कांबळे
  जुन्नर येथे तालुका न्यायालयाच्या नुतन इमारतीच्या बांधकामासाठी पाया खोदन्याचे काम सुरू असताना श्रीगणेशाची मुर्ती आढळल्याने  उत्सुकतेपोटी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मुर्ती  पहाण्यासाठी गर्दी केली होती.न्यायालयाच्या नुतन इमारतीचे काम सुरू असणाऱ्या परिसराला एतिहासिक संदर्भ  असल्याने याठिकाणी  उतखनन करताना काहीतरी अवशेष सापडणार याची अटकळ अगोदरच लावली जात होती.जुन्नर शहरात  मध्यवस्तीत 20 ते 25 एकर क्षेत्र असलेला भुईकोट किल्ला वा गढी आहे.अजूनही अवशेषरूपात भक्कमपने उभे असलेले 14  टोलेजँग बुरुंज व काही ठिकाणी मातीत ,विटात तर काही ठिकाणी दगडात बांधलेली तटबंदी  मुघल काळात जुन्नर शहर महत्त्वाचे ठाणे होते याची साक्ष देते. याला दादोजी कोंडदेव वाडा असेही स्थानिक नागरिक संबोधत होते.तर  ब्रिटिशकालीन गॅझेटमध्ये या गढीचा उल्लेख सिटी फोर्ट असा लिखित स्वरूपात आढळतो. आता ज्या ठिकाणी ब्रिटीश काळात न्यायालयाची इमारत उभी आहे त्या ठिकाणी  बांधण्यात  मराठेशाही वा  पेशवे काळात या ठिकाणी श्रीगणेशाचे मंदिर असावे  असा कयास आहे. मंदिराच्या ओवऱ्यांच्या पायाचे अवशेष या ठिकाणी होते .तसेच या  ठिकाणी  आजही असलेल्या परंतु कोरड्या पडलेल्या  विहीरीवर  मंदिरासमोरील बागेसाठी पाण्यासाठी मोट चालविण्याची व्यवस्था होती असे एतिहासिक संदर्भ सांगितले जातात.**चौकटीसाठी मजकूर–(१) स्थानिक परिसरात असणाऱ्या करड्या रंगाच्या  पाषानात बनविलेली  तीन फ़ुट उंचीची  ,तर दोन फूट रुंदीची तसेच  दीड फ़ुट उंचीची   चतुर्भुज आसनस्थ अवस्थेत असलेली,हातात आयुधे असलेली ,डावीकडे सोंड असलेली ही मुर्ती आहे. मूर्तीची सोंड लांब असुन ,उजवीकडे असलेल्या दाताचा आकार मात्र मोठा आहे.मुर्तीवर शेंदूर लेपन असावे परंतु आता वर्षानुवर्षे  मातीत गाडलेली राहिल्याने मूर्तीला मळकट रंग प्राप्त झाला आहे.(२).अजूनही अवशेषरूपाने उभ्या असलेल्या काही ठिकाणी दगडात बांधलेली तटबंदीत मंदिराच्या स्थापत्यशैलीत वापरले जाणारे नक्षीदार कोरीव काम केलेले चिरे दिसतात. यावरून गढीच्या परिसरात मंदिरे असल्याच्या  व ती कालौघात नष्ट झाली असावीत याला दुजोरा मिळतो.

हज यात्रा मार्गदर्शन शिबिरात १५०० यात्रेकरूंचा सहभाग

0
पुणे :’खुद्दाम-ए -हुजाज’ या सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय हज यात्रा पुणे जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिरात १५०० यात्रेकरूंनी सहभाग घेतला.आझम कॅम्पस येथे हे मार्गदर्शन शिबीर २२ आणि २३ जून रोजी आयोजित करण्यात आले होते. हज यात्रेचा प्रवास ,नियम ,धार्मिक विधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
खुद्दाम-ए-हुजाज’ तर्फे १२ वर्षे हजयात्रेकरूना  अर्जभरण्यापासून विमानात बसेपर्यंतच्या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन करते आणि प्रशिक्षण देते. महाराष्ट्र प्रदेश हज कमिटी च्या अधीन राहून हे कार्य केले जाते.
शिबिराचे उद्घाटन शनिवारी ऑल इंडिया हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मकसूद  खान यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी खुद्दाम-ए-हुजाज’चे अध्यक्ष सय्यद रियाझ काझी,सरचिटणीस भाईजान काझी,डॉ. पी ए इनामदार,मुनवर पिरभॉय व्यासपीठावर उपस्थित  होते . समारोप रविवारी  झाला .
सय्यद मुनाफ ,मुन्ना शेख ,इद्रीस  मेमन  खालू ,मेहबूब  शेख ,उस्मान शेख मन्सूर काझी यांनी शिबीर  यशस्वी  करण्यासाठी  परिश्रम घेतले

गोरगरिबांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे -रामदास आठवले

0
पुणे : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याची शिकवण दिली. त्यांच्या आदर्शांवर काम करणारा आपला पक्ष आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब, कष्टकरी वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, ही जाणीव ठेवून सुनीता वाडेकर यांच्या पुढाकारातून ही तीन कोटींची विकासकामे झाली आहेत, याचा आनंद वाटतो. वंचितांच्या जीवनात आनंद भरण्यासाठी त्यांच्या समस्या सोडविण्याला आपण नेहमी प्राधान्य द्यावे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
औंध-बोपोडी प्रभागातील तीन कोटींच्या निधीतून केलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. माता रमाई आंबेडकर विद्यालयात झालेल्या या समारंभावेळी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार गिरीश बापट, आमदार विजय काळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिक पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष अशोक कांबळे, अल्पसंख्याक आघाडीचे आयुब शेख, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेविका सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, नगरसेवक विजय शेवाळे, प्रकाश ढोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

शाळांमध्ये संविधान उद्येशिका स्तंभ, बुध्दविहार, व्यायामशाळा, मंदिराची डागडुजी, वाचलनाय, पक्के रस्ते, सीसीटीव्ही कॅमेरे, उद्यानाची निर्मिती, स्वच्छतागृह, पाण्याच्या टाक्यांची उभारणी अशा विविध विकासकामांचे उद्घाटन यावेळी झाले. मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आठवले व महातेकर यांचा विशेष सत्कार प्रभागाच्या वतीने करण्यात आला.

अविनाश महातेकर म्हणाले, “अतिशय कल्पकतेने ही विकासकामे उभारली आहेत. राज्यघटनेचे पहिले पान शाळेत लागले हे महत्त्वाचे आहे. त्यातून लोकांना प्रेरणा मिळेल. माता रमाई आणि डॉ. आंबेडकर यांच्या शिल्पामुळे शाळेचा परिसर अधिकच शोभनीय झाला आहे. या चारही नगरसेवकांनी एकत्र येऊन प्रभागात केलेल्या कामांमुळे लोकांच्या जीवनात बदल घडतील. माझ्यावर टाकलेली मंत्रिपदाची जबाबदारी योग्यरितीने सांभाळून वंचित घटकांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.”

गिरीश बापट म्हणाले, “सामान्य माणसाला जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपण केले पाहिजे. त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करून त्याला दैनंदिन जीवन सुखाचे जगण्याची संधी आपण द्यायला हवी. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी उभा असतो. गोरगरीब माणसांची सेवा हेच आंबेडकर यांना वंदन असून, त्यांच्याकडून प्रेरणा घेत कामी करत आहे. चांगल्या कामांसाठी पैसा कमी पडू देणार नाही. या प्रभागात उभारलेली कामे कौतुकास्पद आहेत.”
रामदास आठवले म्हणाले, “गरिबीत अहोरात्र काबाडकष्ट करून जीवन जगणाऱ्या लोकांसाठी आरोग्य, शिक्षण यासह मूलभूत सुविधा पुरवाव्यात. समाजाच्या हिताचे काम करण्यावर भर दिला पाहिजे. समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी चांगल्या गोष्टी उभारणे गरजेचे आहे. माझ्या मंत्रालयामार्फत अनेक चांगले कामे करणार आहे. लोकांनी चांगले प्रकल्प घेऊन यावे. त्यासाठी लागणार निधी उपलब्ध करून देईन. महिलांनी बचत गट आणखी बळकट करावेत. गिरीश बापट यांचे काम खूप चांगले असून, त्यांना लवकरच केंद्रात मंत्रिपद मिळावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला धरून काम करीत आहेत. देशातील गरिबी निर्मूलन होण्यासाठी आम्ही सगळेच मेहनत घेत आहोत.”
परशुराम वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश ढोरे यांनी आभार मानले.

कॉमर्स क्षेत्र म्हणजे करिअरच्या संधीचे भांडार

0
आयसीएआय‘तर्फे ‘कॉमर्स क्षेत्रातील करिअर’वर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
पुणे : “आर्थिक, व्यवस्थापकीय बाबींशी निगडित असलेल्या वाणिज्य क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी आहेत. सनदी लेखापाल, वित्तीय अधिकारी, लेखापाल, कर सल्लागार या आणि अशा अनेक करिअरच्या वाटा कॉमर्स क्षेत्रात आहेत. सनदी लेखापाल ही परीक्षा अत्यंत कमी खर्चात आणि लागलीच अर्थार्जन देणारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉमर्स क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा. करिअरच्या असंख्य संधी येथे उपलब्ध आहेत,” असे मार्गदर्शन तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स व सीए क्षेत्रातील संधी या विषयावर मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गोखले इन्स्टिट्यूटच्या काळे सभागृहात झालेल्या या मार्गदर्शन कार्यक्रमात वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशनचे (विकासा) चेअरमन सीए अभिषेक धामणे, सीए रिद्धी चांडक, सीए संकेत शहा व सीए पुष्कराज बेडेकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
१० वी १२ वी झालेल्या विदयार्थी आणि पालकांच्या मनात कोणत्या क्षेत्रात काय संधी आहेत, असा मोठा प्रश्न असतो. त्याचे शंका निरसण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजिला होता. या कार्यक्रमात सीएची भूमिका, सीएचे महत्त्व, सीएनंतर विविध क्षेत्रातील संधी, सीए होण्यासाठीची तयारी कशी करावी, अशा वेगवेगळ्या विषयी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर एमबीए, एमएसडब्ल्यू, एमकॉम आणि इतर कर व्यवस्थापक वगैरेच्या संधींविषयी माहिती देण्यात आली.
सीए अभिषेक धामणे म्हणाले, “कॉमर्स कक्षेत्रात खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. सीएसारखे उत्तम करिअर करण्याचा मार्ग इथे सापडतो. सीए ही अतिशय स्वस्तात पूर्ण करता येणारी परीक्षा आहे. अतिसामान्य घरातील मुलेमुलीही या परीक्षेत यश मिळवतात. त्यासाठीची तयारी आपण ११ वी, बारावीपासूनच सुरु केली पाहिजे. आयसीएआय अशा परीक्षांसाठी सतत मार्गदर्शन करीत असते.”
अंजोर खोपडे हिने सूत्रसंचालन केले.

विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षाला दहा जागा सोडाव्यात -रामदास आठवले

निवडणूक कमळ नव्हे, तर स्वतःच्या चिन्हावर लढणार
पुणे : “लोकसभा निवडणुकीत  युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद लावली. युतीत मित्र पक्षांना १८ जागा सोडणार असल्याचे नेत्यांनी जाहीर केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १० जागा सोडाव्यात,” अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. विधानसभा निवडणूक कमळ चिन्हावर नाही, तर आमच्या स्वतःच्या चिन्हावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, राष्ट्रीय निमंत्रक अॅड. मंदार जोशी, सरचिटणीस महिपाल वाघमारे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे आदी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “केंद्रात दुसर्‍यांदा सामाजिक न्याय विभागाचा मंत्री झाल्यानंतर प्रथमच प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेऊन आढावा घेतला. पंतप्रधान आवास योजना, मुद्रा योजना, एसआरए, आरोग्य योजना, शिष्यवृत्ती अशा सगळ्याच बाबतीत चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. झोपडपट्टीतील लोकांना पक्की घरे देण्यासाठी पुढील पाच वर्षांत भर दिला जाणार आहे. त्यासाठी गायरान जमीन ताब्यात घेऊन पंतप्रधान आवास योजनेत घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.”
“व्हीजेएनटीला स्वतंत्र आरक्षण देण्याचा विचार सुरू आहे. धनगर समाजाला न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. माझ्या मंत्रालयाचे बजेट ७६ हजार कोटीचे आहे. त्यामुळे भविष्यात अनेक मोठी कामे मार्गी लागणार आहेत. भीमा कोरेगाव स्मारकाला आणखी भव्य करण्याचा प्रस्ताव आहे,” असेही आठवले यांनी नमूद केले.
युतीबाबत बोलताना आठवले म्हणाले, “शिवसेना-भाजपने युती टिकवून ठेवली पाहिजे. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात तीन जागा व पुण्यात किमान एक जागा मिळाली पाहिजे. मुख्यमंत्री पदावरून सामंजस्याने घ्यावे. अडीच-अडीच वर्षावर चर्चा होत असल्यास युतीने भाजप सेनेला दोनदोन वर्षे व रिपब्लिकन पक्षाला एक वर्ष मुख्यमंत्री द्यावे.”

शिक्षणाच्या माध्यामतून वंचितांच्या सामाजिक विषमतेची दरी भरून काढण्याची शक्ती ‘ व्हर्च्युअल एज्युकेशन’ मध्ये – आशिष शेलार

0

पुणे-राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून सुरु होत असलेल्या ‘पढेगा भारत’ या अभियानाचे उदघाटन जेष्ठ
शास्त्रज्ञ पद्म विभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर व नामदार आशिष शेलार , अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रम
प्रसंगी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख, आमदार सौ मेधा कुलकर्णी,  श्रीधर भाटे,  योगेश गोगावले,

शहाजी पवार, सदाशिव खाडे, माऊली थोरात मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण मंत्री झाल्या नंतर विद्येच्या माहेर घरात व दिग्जाच्या उपस्थितीत पहिला कार्यक्रम होत असल्याचा आनंद शेलार
यांनी व्यक्त केला. सदर प्रसंगी बोलताना नामदार शेलार यांनी अधुन्निक तंत्रज्ञानाचा वापर हा वंचित व पिडीताना मुख्य
प्रवाहाशी जोडणारा सेतू म्हणून केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस

यांच्या संकल्पनेतील शेवटच्या व्यक्ती पर्यंत विकासाची फळे पोहोचविण्याचे काम पढेगा भारत सारखे उपक्रम करत आहेत. या
बद्दल समाधान व्यक्त केले. लेखकाने लिहिलेला धडा त्याच लेखकाने एकाच वेळी लाखो विध्यार्थ्यांना शिकवणे व्हर्च्युअल
एज्युकेशन मुळे शक्य असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्थाविक करताना खासदार अमर साबळे यांनी
“पढेगा भारत”च्या परंपरेमध्ये शिक्षण व चारित्र्य हाच विकासाचा धागा आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञांचा वापर करून ‘ सबका
साथ सबका विकास सबका विश्वास ’ या उक्तीला साजेशे काम केले जाऊ शकते असा विश्वास व्यक्त केला. “पढेगा भारत” व
“चाणक्य मंडल” यांचा सामंजस्य करार झाल्यामुळे १ जुलै पासुन ८ वी ते १२ चे तज्ञ शिक्षकाचे वर्ग तसेच लोकसेवा
आयोगाच्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे चे वर्ग, विविध भाषांचे मार्गदर्शन आदि उपक्रम संपूर्ण राज्यभर सुरु केले जात
असल्याची माहिती दिली. या प्रसंगी बोलताना डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शिक्षनाचा हक्क योग्य शिक्षण व योग्य पद्धतीने दिले जाणारे

शिक्षण यात्री सुत्रीमुळे शालेय शिक्षणापासूनच वैज्ञानिक मुल्य असणारे शिक्षण सर्वत्र पोहोचवले जाऊ शकते. माहिती तंत्रज्ञांच्या

वापरामुळे कठीण विषय सोपे करून शालेय शिक्षणात समाविष्ट केले जाऊ शकतात, असा विशवास व्यक्त केला.
अविनाश धर्माधिकारी यांनी बोलताना शास्त्रज्ञ व देशभक्त व कार्यक्षम अधिकारी हेच देशाचे नेतृत्व करू शकतात, असे सांगितले.

पुस्तकामुळे मनाची मशागत होते तरएक रोपटे हे निसर्गाने लिहिलेले एक महान पुस्तकच असते, त्या मुळे पुस्तक व रोपटे भविष्यासाठी जपले पाहिजेत असे सांगितले. भविष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी उपलब्ध असणारा डाटा हा त्यादेशाच्या प्रगतीचा निर्देशक असेल असे ते म्हणाले.
पाहुण्याचे स्वागत वेणूताई साबळे व आभार सम्यक साबळे यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील अनेक व पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते

रिपब्लिकन पक्षाच्या पुणे महापालिकेतील पक्ष कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन

0

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (A) पुणे महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयाचे रविवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महापालिकेच्या नवीन इमारतीमध्ये सर्व पक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना भव्य कार्यालय देण्यात आली आहेत. त्यात पहिल्या मजल्यावरील रिपब्लिकन पक्षाचे सुसज्ज असे कार्यालय उभारले आहे. पक्ष कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर भारतीय संविधानाची उद्देशिका लावण्यात आली आहे. तर कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संसद भवन यांचे एकत्रित चित्र बसविण्यात आले आहे. आतमध्ये असलेल्या अँटी चेम्बरमध्ये पंढरीच्या वारीचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे.

रामदास आठवले यांनी पक्ष कार्यालयाच्या या सुसज्जतेबद्दल गटनेत्या सुनीता वाडेकर आणि परशुराम वाडेकर यांचे भरभरून कौतुक केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगले काम करण्यासाठी आठवले यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे अयुब शेख, शहराध्यक्ष अशोक कांबळे, राष्ट्रीय निमंत्रक अॅड. मंदार जोशी, सरचिटणीस महिपाल वाघमारे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

दगडूशेठ गणपतीला माउलींच्या पालखी सोहळ्यातील अश्वांची थेट सभामंडपात मानवंदना

0

पुणे-माऊली माऊली… गणपती बाप्पा मोरया… जय गणेश… च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला थेट सभामंडपात जाऊन अनोखी मानवंदना दिली. सलग तिस-या वर्षी माउलींच्या मानाच्या अश्वांनी गणेश मंदिराच्या सभागृहात प्रवेश केला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त व पुणेकरांतर्फे अश्वांचे पूजन करीत विश्वकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.

कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी उर्जीतसिंह शितोळे (सरकार), महादजी राजे शितोळे (सरकार), रामभाऊ चोपदार, दिंडी संघटनेचे अध्यक्ष मारुती कोकाटे, ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, अक्षय गोडसे, मंगेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर रासने, गजानन गोडसे, स्वप्निल फुगे, सुरेश कविटके आदी उपस्थित होते. ट्रस्टतर्फे दोन्ही अश्वांना चांदीचे हार पूजन करुन प्रदान करण्यात आले.

महादजी राजे शितोळे सरकार म्हणाले, माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. तीन वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिरा बाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. परंतु सलग तिस-या वर्षी अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली असून ही शुभ गोष्ट आहे. गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदीकडे प्रस्थान करतील. आषाढी वारी ही शेतक-यांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात.

महेश सूर्यवंशी म्हणाले, वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. सलग तिस-या वर्षी हे अश्व दगडूशेठ गणपती मंदिराच्या सभामंडपात आले. ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त वारीसोहळ्यातील राबविण्यात येणा-या उपक्रमांची सुरुवात चांगली झाली असून रुग्णवाहिका, आरोग्यसेवा आणि वारक-यांकरीता अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

दलित साहित्यिकांची उपेक्षा होऊ देणार नाही -रामदास आठवले

0
‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपेंना हक्काच्या घराची किल्ली सुपूर्त

पुणे : “लेखक-साहित्यिक चळवळी बळकट करण्यासाठी आपले आयुष्य लावतात. मात्र, अनेक साहित्यिकांना वृद्धापकाळात हलाखीचे जीवन जगावे लागते. काही दिवसांपूर्वी झुलवाकार जेष्ठ साहित्यीक उत्तम बंडू तुपे यांच्या हलाखीच्या जगण्याची वस्तुस्थिती माध्यमांनी समोर आणली होती .त्यांनतर समाजातील विविध स्तरातून त्यांना मदतीचा ओघ सुरू सुरू झाला. यापुढे दलित साहित्यिकांची उपेक्षा होणार नाही, यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार आहोत,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून ‘झुलवाकर’ उत्तम बंडू तुपे यांचे दुमजली घर उभे राहिले आहे. त्या घराचे हस्तांतरण रामदास आठवले यांच्या हस्ते तुपे यांच्याकडे करण्यात आले. राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, आमदार विजय काळे ,नगरसेवक विजय शेवाळे, नगसेविका स्वाती लोखंडे, रिपाइंचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, परशुराम वाडेकर, संपत जाधव, आयुब शेख, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “उपेक्षित, दलित माणसाचे दुःख, वेदना तुपे यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या. त्यांच्या हलाखीच्या जीवनाकडे सर्वांचे लक्ष उशिरा गेले. परंतु यापूढे कोणत्याही दलित साहित्यिक विचारवंतांची उपेक्षा होऊ देणार नाही. झुलवा, काट्यावरची पोटं यासारख्या असंख्य पुस्तकातून तूपेंनी साहित्यसेवा केली आहे. अशा थोर साहित्यिकाचा मला अभिमान आहे. तसेच यापुढेही आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत.”
डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी प्रास्ताविकात तुपे यांची पूर्व परिस्थिती सांगून पुणे महापालिका आणि महाराष्ट्र शासनाकडून त्यांना सर्व प्रकारची मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ; विद्यार्थी ताब्यात

0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्वच्छ वारी, स्वास्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियान महासंकल्प कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना सोमनाथ लोहार या विद्यार्थ्याने गोंधळ करत त्यांना निवेदन देण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी त्याला कार्यक्रम स्थळापासून दूर नेले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या स्वच्छ वारी, स्वास्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियान महासंकल्प कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत असताना सोमनाथ लोहार या विद्यार्थ्याने गोंधळ करत त्यांना निवेदन देण्याची मागणी केली.

रेफ्याक्टरीतील जेवणाच्या दर्जाबाबात केलेल्या आंदोलनात विद्यार्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी या विद्यार्थ्यांने केली. मात्र, पोलिसांनी त्याला कार्यक्रम स्थळापासून दुर नेले. त्यामुळे परिसरामध्ये काही वेळेसाठी गोंधळ उडाला होता. पोलिसांनी या विद्यार्थ्यास चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले. मात्र, या प्रकरणामुळे आंदोलन केलेल्या विद्यार्थ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

आंदोलकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभी राहणार 

0
पुणे :
विद्यापीठाच्या रिफेक्टरी प्रश्नात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी आवाज उठविणाऱ्या सोमनाथ लोहार च्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत ,आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबू दिला जाणार नाही यासाठी लढत सुरु ठेवू  ,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश समन्वयक सुहास उभे यांनी आज सायंकाळी पत्रकाद्वारे सांगितले .
आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात सोमनाथ लोहार या विद्यार्थ्याने  रिफेक्टरी प्रश्नात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्याने त्याला चतुःशृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले . या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी सुहास उभे यांनी कार्यकर्त्यांसह चतुःशृंगी पोलीस स्टेशन ला जाऊन  अधिकाऱ्यांची भेट घेतली .
‘सोमनाथ लोहार चे म्हणणे ऐकून  घेण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी ‘भारत माता की जय ‘च्या घोषणा देऊन उपस्थितांचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला ‘असा आरोपही  उभे यांनी केला . या कार्यक्रमात सकाळपासून  सहभागी ‘कमवा आणि शिका ‘ योजनेतील विद्यार्थ्यांना  दुपारपर्यंत जेवण मिळाले  नाही . ते मिळण्यासाठी आम्हाला विद्यापीठ अधिकाऱ्यांशी फोनाफोनी करावी लागली ,असेही सुहास उभे यांनी सांगितले .
‘न्याय्य मागण्यांसाठी आवाज उठविणाऱ्या सोमनाथ लोहार च्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत ,आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबू दिला जाणार नाही यासाठी संवैधानिक मार्गाने लढत सुरु ठेवू  ‘असेही उभे यांनी म्हटले आहे .

मुख्‍यमंत्री फडणवीस यांच्‍या हस्‍ते नाना वाड्याचे पुनरुज्जीवन व “स्वराज्य” क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन

0

पुणे दि.२३-  पुण्यनगरीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काम “स्वराज्य” या क्रांतिकारकांच्या संग्रहालयात झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित पेशवे कालीन नाना वाड्याचे पुनरुज्जीवन व “स्वराज्य” क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, जगदीश मुळीक, महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते  श्रीनाथ भिमाले,स्‍थायी समिती अध्‍यक्ष सुनिल कांबळे हेमंत रासने, राजेश येनपुरे, गायत्री खडके,महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाना वाड्याचे पुनरुज्जीवन करून महापौर आणि नगरसेवक यांनी अभिनंदनीय कार्य केले आहे. पुण्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंची कमी नाही. आपल्या देशाला 5000 वर्षांची संस्कृती आहे.

आपण आपल्या देशाचा इतिहास जतन केला पाहिजे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाणीतून त्या किल्ल्यांची माहिती ऐकण्याची पर्वणी असते. राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन करण्याचे काम राज्य शासनाने दोन वर्षापासून हाती घेतले आहे.रायगड किल्ल्याचे संपूर्णपणे संवर्धन केले जात आहे, तेथे झालेल्‍या उत्खननात अडीचशे पेक्षा अधिक साईट सापडल्या आहेत. त्यातून महाराजांचे देदीप्यमान चित्र समाजापुढे उभे राहणार आहे. आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा समाजापुढे आला नाही तर समाज ऊर्जावान होऊ शकत नाही, नाना वाड्याचे पुनरुज्जीवन हा या शृंखलेतील एक भाग आहे.

नाना वाड्यातील संग्रहालय ‘इतिहासाचं चालते बोलते पुस्तक’ असून या ठिकाणी देदीप्यमान इतिहास मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. पुणे महापालिकेच्यावतीने अशा पद्धतीने होणाऱ्या कामास राज्य सरकार पूर्ण मदत करेल, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या बद्दलही मुख्‍यमंत्र्यांनी महापालिकेचे कौतुक केले.

पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही थोडक्‍यात आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.  मी विद्यार्थी आहे,

असे नम्रपणे नमूद करुन देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी हाल-अपेष्‍टा सहन करणा-या एका तरी क्रांतीकारकाचे

चरित्र पूर्णपणे वाचावे, असे आवाहन केले. ‘मुक्‍या मनाने किती उधळावे शब्‍दांचे बुडबुडे, तुझे पोवाडे गातील पुढचे तोफांचे चौघडे’ या काव्‍यातून समर्पकपणे आपल्‍या भावना मांडल्या.

खासदार गिरीश बापट यांनी हा एक ऐतिहासिक कार्यक्रम असल्‍याचे सांगितले. पुणे शहराला सांस्‍कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, औद्योगिक वारसा असल्‍याचा उल्‍लेख करुन स्‍मार्ट सिटीच्‍या माध्‍यमातून पुणे शहराला आदर्श शहर बनविण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. नाना वाड्यातील संग्रहालयामुळे आजच्‍या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन आपला इतिहास न विसरण्‍याचे नागरिकांना आवाहन केले.

महापौर मुक्‍ता टिळक यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकात या संग्रहालयाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून नानावाडा ही वर्ग एक दर्जाची ऐतिहासिक वास्तू असल्‍याचे सांगितले. सन 1740 ते 1750 या कालावधीत पेशव्यांचे मंत्री असलेल्या नाना फडणवीसांनी हा वाडा बांधून घेतला. या वाड्याचे क्षेत्रफळ सुमारे दोन हजार चौ.मी. आहे. या वाड्यामध्ये ब्रिटीशकालीन दगडी इमारत आणि एल आकारातील मूळ पेशवाई वास्तू यांचा समावेश आहे.

सागवानी लाकडात बनवलेल्या तुळ्या, दगडी खांब, दुर्मिळ मेघडंबरी, नाजूक कलाकुसर असलेले फॉलसिलींग,  दिवाणखाना, दुर्मिळ भीत्तीचित्रे ही या वाड्याची वैशिष्ट्ये आहेत. ही सर्व वैशिष्‍ट्य जतन करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या वाड्यात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असणा-या क्रांतीकारकांची माहिती असणारे संग्रहालय उभारण्यात आले आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये तळमजल्यावर असलेल्या अकरा खोल्यात स्वागत कक्ष, उमाजी नाईक, वासूदेव बळवंत फडके, लहुजी वस्ताद या क्रांतिकारकांचे तसेच 1857 चे युध्‍द, आदिवासींचा उठाव, नेमस्तांची चळवळ,  बाळ गंगाधर टिळक,  चापेकर बंधू,  जोतिबा-सावित्रीबाई फुले, शाहू महाराज या समाजसुधारकांचे जीवन चरित्र यामध्ये दर्शविण्यात आले आहे.   उद्घाटनापूर्वी  मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी या संग्रहालयाला भेट देऊन पहाणी केली.

 

आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यात महातेकरांचे योगदान मोलाचे -रामदास आठवले

0
पुणे महापालिकेच्या वतीने महातेकर यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ प्रदान

पुणे : “अविनाश महातेकर हे अतिशय प्रांजळ, प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. विचारांशी एकनिष्ठ राहत आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यात त्यांचे योगदान मोलाचे राहिलेले आहे. समाजाचा सर्वांगीण विकास हे बाबासाहेबांचे सूत्र आणि माणसाला जोडणारे बुद्धांचे तत्त्वज्ञान जगणाऱ्या महातेकरांनी आंबेडकरी चळवळीच्या कार्यात यापुढेही कायम सक्रिय राहावे व समाजाच्या विकासात योगदान द्यावे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पुणे महापालिकेच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत व संपादक आणि राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले ,रिपब्लिक पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष अशोक कांबळे, अल्पसंख्याक आघाडीचे आयुब शेख, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, फरझाना शेख, सोनाली लांडगे, नगरसेवक राजेश येनपुरे, प्रा. विलास आढाव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “लोकमान्य टिळक यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात, तर डॉ. आंबेडकर यांनी रचनेत मोठे योगदान दिले. पुण्यात होणारा सन्मान मोठा असतो. येथे सर्व जातीधर्माचे लोक एकत्रितपणे नांदतात, ही आनंदाची बाब आहे. नरेंद्र मोदी हे संविधानाला प्रमाण मानून काम करीत आहेत. संविधानामुळेच एक चहा विकणारा माणूस पंतप्रधान झाला, याचा त्यांना अभिमान आहे. त्यामुळे संविधान बदलणार, अशा वावड्या आहेत. निळा झेंडा घेऊन मी संविधानाच्या रक्षणासाठी दिल्लीत आहेत. मोदी हटावसाठी एकत्र आलेलेच बाजूला हटले. रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या पाठीशी उभा राहतो, त्याची सत्ता येते, हे आपण समजून घ्यावे. एकही खासदार नसताना मंत्रीपद मिळाले, याचे अनेकांना आश्चर्य वाटते. परंतु, पण आमची ताकद आहे आम्ही ज्यांना पाठिंबा ते निवडून येतात. कारण आमची पुण्यासह इतर अनेक शहरांत ताकद आहे. मला अनेकजण कुत्रा, मांजर, गल्लीबोळातील कार्यकर्ता म्हणून हिणवत असतात. मात्र, त्याकडे लक्ष न देता मी दिल्लीत चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो.”

अविनाश महातेकर म्हणाले, “ज्या शहरात घडलो, त्या शहराच्या वतीने झालेल्या या सन्मानाने मोठा आनंद झाला आहे. आंबेडकरी चळवळीच्या निमित्ताने अनेक लोकांच्या संगतीने जीवन समृद्ध होत गेले. विचारांशी प्रामाणिक राहत योग्य वेळी सन्मान मिळेल ,याची खात्री होती. त्यामुळे मागून काही घ्यायचे नाही आणि सन्मानाने मिळाल्याशिवाय स्वीकारायचे नाही हा संस्कार माझ्यावर झाला. आजही हा संस्कार जगतो आहे. संविधान कोणीही बदलू शकत नाही. काहीजण विनाकारण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे चुकीचे आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार आंबेडकरी चळवळीचा गाभा आहे.”

गिरीश बापट म्हणाले, “महातेकर दलित चळवळीतील धडाडीचे अभ्यासू नेते आहेत. मोठ्या प्रतीक्षेनंतर त्यांना मंत्रिपद मिळाले आहे. पुढेही ते कायम राहील. पीडित लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. तसेच समाजकल्याण खात्याला आलेली मरगळ झटकण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा.”

प्रास्ताविक मुक्ता टिळक यांनी केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.