Home Blog Page 2905

बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी 2 लाखांची मदत

0

पाटणा – पुण्यातील कोंढवा परिसरात भिंत कोसळल्याच्या घटनेची बिहारच्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. ज्या भिंतीखाली मजूर दबले ते सगळेच मूळचे बिहारी होती. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील रहिवासी राहिलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना नितीश यांनी प्रत्येकील 2 लाखांची मदत जाहीर केली. या घटनेत 15 मजुरांचा मृत्यू झाला. तसेच इतर काही मजूर गंभीर जखमी आहेत. त्या जखमी मजुरांना नितीश कुमारांनी 50 हजारांची भरपाई जाहीर केली आहे. ही संपूर्ण मदत मुख्यमंत्री बचत निधीतून केली जाणार आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कार्यालयाकडून एक प्रेस नोट जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, पीडितांच्या कुटुंबियांना तातडीने ही मदत पुरविली जाणार आहे. तसेच जखमी मजुरांवर तातडीने आणि योग्य उपचार व्हावेत यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. पुण्यातील या घटनेवर देशभरातून हळ-हळ व्यक्त केली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, या घनटेतील मृतांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारने आधीच चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेवर शोक व्यक्त केला. तसेच शिवसेनेच्या वतीने अतिरिक्त एक-एक लाख रुपये देणार अशी घोषणा करण्यात आली. दरम्यान, पुण्यातील महापौर मुक्ता टिळक यांनी घटनास्थळाचे काम थांबविण्याचे आदेश जारी केले आहेत. त्या ठिकाणी आता पुन्हा काम सुरू होणार नाही असेही आदेशातून स्पष्ट करण्यात आले.

आदिवासी विकास महामंडळात लाभार्थ्यांच्या योजनांवर डल्ला; सव्वा कोटींच्या अपहाराबद्दल 8 तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापकांसह एका विजतंत्र्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….

0
जुन्नर /आनंद कांबळे 
लाभार्थींना डिझेल इंजिन आणि गॅस शेगडीच्या  वितरण योजनेत केलेल्या 1 कोटी 21 लाखांच्या अपहार प्रकरणी आदीवासी विकास महामंडळातील 8 तत्कालिन व्यवस्थापकांसह,एका विजतंत्र्यावर जुन्नर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जुन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत नलावडे यांनी ही माहीती दिली आदीवासी विकास महामंडळात 2004 ते 2009 या कालावधीत हा अपहार झाला होता.या प्रकरणी विजय गांगुर्डे,प्रादेशिक व्यवस्थापक वर्ग 1 रा. नाशिकरोड,जिल्हा नाशिक यांनी फिर्याद दिली आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या अपहारप्रकरणी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती.त्यावरुन न्यायालयाच्या निर्देशानुसार  चौकशी समिती नेमण्यात आली होती.त्यातून हा अपहाराचा प्रकार उघड झाल्याने ही फिर्याद देण्यात आली असून त्यावरुन जुन्नर येथे विविध कालखंडात कार्यरत असलेले तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापकांवर अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये व्ही.टी.जामनिक,बी.जी.घाटकर,एम.पी.धुर्वे,
एस.एन.मांदळे,एम.एस.बुळे,जी.आर.सोनवणे,यु.के.मेंगडे,,एस.एन.मून,या आठ माजी प्रादेशिक व्यवस्थापकांसह, तत्कालिन वीजतंत्री एस.एस.भारमल रा.जुन्नर या आठ आरोपींचा समावेश आहे.पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार संबंधित योजनेत आदीवासी लाभार्थींना द्यावयाची डिझेल इंजिन आणि गॅस शेगडी वितरणाची कोणतीही कागदपत्रे पुरावे न मिळाल्याने या अपहाराचा प्रकार उघडकीस आला होता.या प्रकरणी अधिक माहीतीनुसार जुन्नरच्या आदीवासी विकास महामंडळातील इंजिन,गॅस शेगडी  लाभार्थींसाठी वाहतूक करुन देणारी नंदुरबार येथील आकाशदीप विद्युत कामगार सहकारी संस्था आणि तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापक यांनी 215 डिझेल इंजिनांची परस्पर विल्हेवाट लावून 38 लाख 55 हजार452 रुपये आणि तेलपंप फिटींग करुन कार्यान्वित करण्यासाठी दिलेली रक्कम 5 लाख 47 हजार 441 रुपये अशी एकूण 44 लाख 2 हजार 893 रुपयांचा अपहार केला होता.तर 2009 ते 2010 या कालावधीत अनुसुचित जमातीतील दारिद्ररेषेखालिल पात्र लाभार्थींना 100 टक्के अनुदानावर देण्यात येणाऱ्या 511 गॅस शेगडी युनिटची बेकायदेशीर विल्हेवाट लावून अपहार करण्यात आला होता.यात 77 लाख 72 हजार रुपयांचा अपहार करण्यात आला असून शासकीय रकमेचे नुकसान केल्याने संबंधित आठ प्रादेशिक व्यवस्थापकांसह वीजतंत्री असलेले भारमळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयीन आदेशानुसार गठीत केलेल्या समितीने पोलीसांना दिले होते.त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या गुन्ह्याच्या अपहरीत रकमेची व्याप्ती मोठी असल्याने या गुन्ह्याचा तपास यानंतर आर्थिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्याकडे वर्ग करण्यात य़ेणार असल्याची माहीती श्री.नलावडे यांनी दिली.

कामगारांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष ; सुप्रिया सुळे

0

पुणे-कापड दुकानांस लागलेल्या  आगीत जळून मारणारे कामगार ,सुरक्षे अभावी मारणारे बांधकाम मजूर अशा विविध घटनांमधून कामगारांच्या जीविताच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्षच झाले आहे हे स्पष्ट होत आहे असा हल्ला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी चढविला .

कामगारांची साधी नोंद नाही,कोंढवा दुर्घटनेने बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर आहे हे पुन्हा समोर आले. बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का? हे कामगार असंघटित क्षेत्रातील आहेत म्हणून त्यांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे  असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे तसेच पुणे महापालिकेने देखील ही घटना गांभिर्याने घ्यावी अशी मागणी केली आहे.

रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर प्रशासनाने या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. त्यामुळे संरक्षक भिंत कोसळून झालेला अपघात आणि त्यामुळे झालेले १५ मृत्यू हे प्रशासनाचं अपयश आहे असं मला वाटतं असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. आपण समाज म्हणून असंवेदनशील होत चाललो आहोत का? बिहारमध्ये जी घटना झाली त्यात १५० मुलं गेली. त्यावर बातम्या झाल्या पुढे काय झालं? त्याचा जाब कुणीही विचारत नाही. आज १५ लोक या अपघातात दगावली आहेत त्यावरही चर्चा होईल पण जाब कोणीही विचारत नाही.

मी जिल्हाधिकाऱ्यांशी यावर चर्चा केली. येत्या चोवीस तासात इमारतीचं आणि इतर ठिकाणचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल असं आश्वासन त्यांनी मला दिलं आहे. साडेचार ते पाच लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही काही माणसाच्या जिवाची किंमत नाही असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. तसंच या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच अशा घटना घडू नयेत म्हणून काय खबरादरी घेतली पाहिजे? काय उपाय केले पाहिजेत त्याची काळजी प्रशासनाने आणि सरकारने घ्यायची आहे असंही त्या म्हटल्या आहे.

कांचन डेव्हलपर्स आणि आल्कन स्टायलसच्या बिल्डर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

0

पुण्यातील कोंढवा भागात आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना रात्री दीडच्या सुमारास घडली. या प्रकरणी आता आल्कन स्टायलस आणि कांचन बिल्डर्सच्या एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कांचन बिल्डर्स या दोहोंच्या आठ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

दोन दिवसांपूर्वीच भिंत खचू शकते या संदर्भातली तक्रार इमारतीत राहणाऱ्या लोकांनी केली होती. मात्र महापालिका प्रशासनाने या प्रकरणी दुर्लक्ष केले असाही आरोप स्थानिक रहिवाशांनी केला. आल्कन स्टायलसचे पाच भागीदार बिल्डर जगदीशप्रसाद अग्रवाल, सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल, राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल, विवेक सुनील अग्रवाल आणि विपुल सुनील अग्रवाल या पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आल्कन स्टायलस या सोसायटीची संरक्षक भिंत तात्पुरत्या शेडमध्ये झोपलेल्या मजुरांच्या अंगावर कोसळली. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात चांगलाच पाऊस होतो आहे. त्यामुळे आल्कन स्यायलस या इमारतीची संरक्षक भिंत खचली होती. ती कोसळल्यानेच पंधरा जणांचा बळी गेला. या प्रकरणी आता आल्कन स्टायलर्स आणि कांचन बिल्डर्सच्या एकूण आठजणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांचन बिल्डर्सच्या पंकज व्होरा, सुरेश शहा आणि रश्मीकांत गांधी या तिघांविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसंच साईट इंजिनिअर , साईट सुपरवायझर आणि मजूर पुरवणारा कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवण्यात आला. यांच्या बांधकाम प्रकल्पावर हे मजूर काम करत होते आणि तिथेच रहात होते.

दरम्यान या ठिकाणी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही भेट दिली. ते कोल्हापुरातून पुण्यात आले होते. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. याशिवाय खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या ठिकाणी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

कोंढवा दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश-मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमींना 25 हजार रुपयांची मदत

0

मुंबई : पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख आणि जखमींना 25 हजार रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे.

या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी मृतांना कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, बांधकाम मजूर रहात असलेल्या कच्च्या झोपडीवर रात्री दीडच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

कोंढव्यात भिंत कोसळून 15 मजुरांचा दुर्दैवी अंत ..दोषींना कडक शासन करण्याची मागणी ..

0

पुणे : -कोंढव्यात बहुमजली इमारतीच्या सोसाटीच्या पार्किंगची संरक्षक भिंत मजुरांच्या झोपडपट्टीवर कोसळल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीनंतर  घडली आहे. यात पहाटेपर्यंत 15 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. आणखी काही मजूर या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे ही घटना घडली आहे. . ही घटना रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

कोंढवा येथील तालाब कंपनीसमोर अल्कोंन स्टायलस सोसायटी आहे. या सोसायटी शेजारीच आणखी एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथील मजुरांनी अल्कोंन सोसायटीच्या पार्किंग संरक्षक भिंतीला लागून या मजुरांनी झोपड्या बांधल्या होत्या. तेथे हे राहत होते. हे मजूर प. बंगाल आणि बिहारचे असल्याचे समजते. गुरु वारपासून शहरात संततधार पाऊस सुरु  आहे. यातच संरक्षक भिंत खचली आणि ती  या झोपड्यांवर कोसळली. यात आतापर्यंत तब्बल 15 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात २ लहान मुलांचा समावेश आहे. आणखी काहीजण अडकले आहेत. त्याना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक, पोलिस दल आणी पालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घट्नास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.मृतांमध्ये बंगाल आणि बिहारमधील मजुरांचा समावेश आहे. तिघांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. २ ते ३ वर्षापूर्वी इमारतीचे बांधकाम करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

मृत जखमींना मदत आणि दोषींना कठोर शासन – जिल्हाधिकारी

कोंढवा बुद्रुक येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नियमानुसार शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असेही ही त्यांनी सांगितले.दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मदत कार्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.कोंढवा येथील दूर्घटनेवरून प्रथमदर्शनी असे लक्षात येते की बांधकाम मजुरांसाठी जी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, ती सुरक्षित नव्हती. जिल्हा प्रशासनाकडे या बांधकामविषयक सर्व माहिती उपलब्ध असून त्याची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.

वारकर्‍यांना बिशप थॉमस डाबरे यांच्या हस्ते तुळशीरोपाचे वाटप

0

पुणे-संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांचे आज शुक्रवार दि. 28 जून रोजी पहाटे पुण्याहून प्रयाण झाले. यावेळी पुलगेट येथे मायनॉरिटी एज्युकेशन अ‍ॅन्ड सोशिअल ट्रस्टतर्फे इकॉलॉजिक वर्ष 2019 पर्यावरण संतुलन वर्ष निमित्त वारकर्‍यांना तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले. पुण्याचे बिशप थॉमस डाबरे यांच्या हस्ते वारकर्‍यांना तुळशी रोपाचे वाटप करण्यात आले. याचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष एडविन रॉबर्टस् यांनी केले. या प्रसंगी प्रशांत केदारी क्रिस्ती, विनोद सोलंकी, जॅकलिन फॉरेस्टर, आनंद सराफ, नोयला कांबळी, नरेश मुदलियार, फ्रँकी मेन्डोंजा, बेंजामिन डिसूजा, पिटर डिसूजा आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बिशप डाबरे म्हणाले की, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी जगाला मानवतेचा संदेश दिला. तसेच पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिला. आज ग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्ट चक्रात अडकलेल्या जगाला या संताचे विचारच मार्ग दाखवतील आणि त्याचे प्रतीक म्हणून भक्तीभावाने वारी करणार्‍या वारकर्‍यांना तुळशीचे रोप आम्ही श्रद्धापूर्वक दिले आहे.
संस्थेचे अध्यक्ष एडविन रॉबर्टस यांनी स्वागत केले. लतिफ मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. आनंद सराफ यांनी आभार मानले.

मुंबईसह कोकणात पावसाची जोरदार मुसंडी

0

मुंबई- आज येथे पावसाने  जोरदार हजेरी लावली. मुंबईसह कोकणात पाऊस जोर धरू लागला आहे आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली, त्यासोबतच अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामची सुरुवात झाली आहे. यासोबतच हवामान खात्याने येत्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.मुंबईच्या लालबाग, परळ, दादर, माहीम भागात सकाळपासून पावसाने बरसायला सुरुवात केली. वसई-विरारपासून चर्चगेटपर्यंत पाऊस बरसत आहे.

रत्नागिरीत जोरदार पाऊस
रत्नागिरीत जोरदार पाऊस पाहायला मिळाला. पावसामुळे नदी-नाले वाहू लागले आहेत. अचानक पाणी वाढल्याने नदीपात्रात पार्क केलेली वाहने अडकून पडली. राजपुरातील कोदावली नदीपात्रात काल संध्याकाळी दोन गाड्या अडकल्या. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने गाड्या अडकल्या. अखेर नागरिकांच्या प्रयत्नामुळे अडकलेल्या गाड्या काढण्यात यश आलं.

सिंधुदुर्गातही पावसाची जोरदार हजेरी
येथील सावडाव धबधबा प्रवाहित झाला आहे. आज सकाळपासून पाऊस सुरुच आहे. पण काल रात्रभर पाऊस संततधार कोसळत होता. या पावसाने सर्वांच्या प्रतीक्षेत असलेला कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा सकाळपासून प्रवाहित झाला आहे. आंबोली नंतर सावडाव धबधबा पर्यटकांची पसंती आहे.

कल्याणलाही पावसाने झोडपले
काल संध्याकाळपासून कल्याणमध्ये पावसाची सुरुवात झाली. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कल्याणच्या चिकलघर परिसरात पाणी साचले. त्यामुळे नालेसफाईची पहिल्याच पावसात पोलखोल झाली.

शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे लाईट गेली. काल सायंकाळी 6 वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे. महत्वाचं म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

बुलडाणा
जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस आला. संग्रामपूर, बुलडाणा, शेगांवसह इतर ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

कराड
एकीकडे पाऊस होत असताना, साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचा अतिसौम्य धक्का जाणवला. कोयनानगर परिसरात रात्री 9. 36 मिनीटांनी 2.4 रिक्टरर स्केलचा भूकंपाचा अतिसौम्य धक्का जाणवला. या भूकंपाचं केंद्रबिंदू कोयना धरणापासून 9.6 किलोमीटर अंतरावर कोडोली गावच्या नैऋत्य दिशेला 3 किलोमीटर अंतरावर जमिनीत खोली 7.0 कि. मी होती. कोयना धरण व्यवस्थापनाने याबाबतची माहिती दिली.

खेड घाटातील बाह्यवळण कामे लवकरात लवकर पूर्ण करा : खा डॉ अमोल कोल्हे.

0
प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना सोबत घेऊन केली घाटाची पाहणी
     जुन्नर /आनंद कांबळे 
 शिरूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी पुणे -नाशिक रोडवरील खेड घाटामधील समस्या ट्रॅफिक समस्या या संदर्भात अधिकाऱ्यांना समवेत घाटाची पाहणी केली .
      पुणे-नाशिक ट्राफिक समस्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असून याकडे कदापि दुर्लक्ष करून चालणार नाही लवकरात लवकर ट्राफिक समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचं डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले
    प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आज डॉ कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या
    यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या खासदारांसमोर मांडल्या. यापूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अधिकारी वर्गास सोबत घेऊन जमीन अधिग्रहित केली, तसेच  स्वार्थासाठी व स्वताची जमीन वाचवण्यासाठी हा शेतकऱ्यांच्या जमिनी घालवल्या असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
    याप्रसंगी खेड चे माजी आमदार  दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर, कृषी उत्पन्न बाजार समिती खेड संचालक धैर्यशील पानसरे, तुकाईवाडीचे  सरपंच महेंद्र ठिगळे, प्रवीण कोरडे, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

हजारो जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारने सक्त निर्णय घ्यावा – लोढा

0

मॉडल एग्रीमेंट मसूदा लागू व्हावा आणि दोन वर्षात रखडलेल्या पुनर्निर्माणचे काम म्हाडाला सोपविण्यात यावे.

मुंबई : शहरातील हजारो जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारने तत्काळ मॉडल एग्रीमेंट मसूदा लागू करावा. यामुळे लाखो भाडोत्रींसोबत होणारी फसवणूक बंद होईल. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांनी आज विधानसभेत ही मागणी केली आहे. पुनर्निर्माणच्या नावावर ज्या जुन्या इमारतींना रिकामी करण्याबरोबरच दोन वर्षांपर्यंत त्याचा पुनर्निर्माण केला जात नाही, त्यांना म्हाडाला सोपवून त्यांचा विकास केला जावा, अशी मागणीही वरिष्ठ आमदार लोढा यांनी केली आहे. सरकारने या प्रक्रियेत पाऊल उचलल्याने मुंबईतील लाखो नागरिकांना मदत होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा नियम २९३ च्यानुसार मुंबईच्या प्रस्तावावर सभेत जुन्या इमारतींचा विकास व पुनर्निर्माण झालेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांच्या त्रासाचा मुद्दा आमदार लोढा यांनी विधानसभेत मांडला. सरकारने या प्रकरणात तत्काळ व गांभीर्याने निर्णय घ्यावेत, असे लोढा यावेळी म्हणाले. जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांचा त्रास वाढत आहे. विकासक (बांधकाम व्यावसायिक) इमारत रिकामी केल्यानंतंर अनेक वर्षांनंतंरही त्याचे बांधकाम करीत नाही. त्याशिवाय शिफ्टिंगचे भाडेही देत नाही. आमदार लोढा म्हणाले, जुन्या इमारतींचा पुनर्निर्माण करण्यासाठी मॉडल एग्रीमेंट मसूदा तत्काळ प्रभावी पद्धीतीने लागू करण्यात यावा.

मुंबई शहरात सुमारे २० हजारहून जास्त पागडी पद्धतीने अत्यंत जर्जर झालेल्या जुन्या इमारती आहेत. त्यामध्ये साधारण २० लाखांहून जास्त लोक राहत आहेत. या इमारती अत्यंत जर्जर असून धोकादायक आहेत. सरकारच्या सध्याच्या नियमांमुळे त्यांचे पुनर्निर्माण व डागडुजीचे काम रखडले आहेत. त्यामुळे लाखो नागरिक त्रस्त आहेत. विधानसभेत लोढा यांनी सरकारला सांगितले, की पुनर्विकास करणाऱ्या सरकारने जो मंडल मसूदा लागू करण्याबाबत सांगितले होते, त्याला तत्काळ लागू करण्यात यावा. ज्यामुळे लाखो लोकांना कमी वेळात घरे मिळू शकतील आणि या जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांचे जीवन सहज होऊ शकतील.

‘वन नेशन-वन कार्ड’ केंद्र सरकारचे मोठे पाऊल-देशात कुठेही करा रेशन खरेदी

0

नवी दिल्ली- केंद्रातील मोदी सरकार “वन नेशन-वन कार्ड”साठी मोठे पाऊल उचलणार आहे. यामुळे भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईलच, त्यासोबत रोजगाराच्या शोधात स्थलांतर करणाऱ्या गरीबांनाही फायदा होणार आहे. गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी गेलेल्या गरीब कुटुंबांना देशात कुठेही राशन खरेदी करता येईल. संपूर्ण देशासाठी एकच रेशन कार्ड देण्याची घोषणा केंद्र सरकारने गुरुवारी केली. या बदलानंतर एकापेक्षा अधिक कार्ड ठेवणाऱ्यांची संख्याही कमी होणार आहे.

केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. स्थलांतर करणाऱ्या मजुरांना याचा सर्वात जास्त लाभ होईल असे ते म्हणाले. यामुळे स्थलांतर करणाऱ्यांना पूर्ण खाद्यसुरक्षा मिळेल. लाभार्थींना खऱ्या अर्थाने या निर्णयामुळे स्वातंत्र्य मिळणार आहे. कारण, ते आता एकाच पीडीएस दुकानाशी बांधिल नसतील, देशात कुठेही धान्य खरेदी करू शकतील आणि यामुळे भ्रष्टाचारही कमी होईल, असेही ते म्हणाले.

या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयाकडून सर्व कार्ड्सचा एक डेटाबेस तयार केला जाईल, ज्यामुळे बनावट कार्ड रद्द करता येतील. इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ पीडीएस म्हणजेच IMPDS आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा आणि त्रिपुरामध्ये आधीपासूनच लागू आहे. इथे लाभार्थी त्याच्या वाट्याचे धान्य कोणत्याही जिल्ह्यातून खरेदी करु शकतो. गरीबांच्या हितासाठी सर्व राज्यांनी हा नियम लागू करावा. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे रहिवासी पुढच्या दोन महिन्यात दोनपैकी कोणत्याही राज्यात रेशन खरेदी करु शकतील, असेही पासवान म्हणाले.

सध्या FCI, CWC, SWCs आणि खाजगी गोदामांमध्ये ठेवलेले 6.12 कोटी टन धान्य दरवर्षी 81 कोटी लाभार्थ्यांना वितरित केले जाते. धान्य खरेदी करण्यापासून ते वितरण करण्यापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत होणारा भ्रष्टाचार कमी होईल.

यंदा ही महापालिकेचा महाल’ गळती’ ने चर्चेत (व्हिडिओ)

0
पुणे- सामान्य माणसाचे घरटे चं गळते असे काही नाही , हे या हि वेळेस पुणे महापालिकेची नवी ५० कोटी रुपयांची इमारत पुणेकरांना दिमाखाने जणू सांगते आहे अशी घटना पुन्हा या पावसाळ्यात हि उघडकीस आली आहे.
पुणे महापालिकेची नवी इमारत ,अत्यंत देखणी ,सुंदर आणि मुबलक सुविधा तसेच वाहनतळ उपलब्ध करून देणारी असेल अशी स्वप्ने हि इमारत प्रत्यक्षात उभी राहण्यापूर्वी पाहिली जात होती . प्रत्यक्षात इथे मोठ मोठी सुंदर दालने महापौर आणि पदाधिकारी यांच्यासाठी साकारली गेली .सभागृह देखील भले मोठे साकारले गेले .पण या वस्तूचे उद्घाटन गेल्या वर्षी होतानाच चक्क महापालिकेच्या सभागृहात गळती लागल्याने अक्षरशः बादल्या लावल्या गेल्या . त्यानंतर तरी इमारतीची वर्षभरात व्यवस्थित देखभाल दुरुस्ती झाली असेल अशी कल्पना देखील फोल ठरली . घाणेरडी स्वच्छता गृहे ,अपुरे अस्त्याव्यस्त वाहनतळ असे चित्र सातत्याने पुढे येत असताना आता ..नव्या वास्तूत ..असलेली लिफ्ट चक्क दबदबा गळू लागली आहे .जेवढा जोरात पाऊस तेवढा मोठा लिफ्ट मध्ये धबधबा दिसताच तातडीने हि लिफ्ट आता बंद ठेवून दुरुस्तीच्या कामाला पालिका लागली असली तरी महालाची हि दुरवस्था चव्हाट्यावर मात्र आली आहे …. पहा याबाबत माजी विपक्ष नेते आणि राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष चेतन  तुपे पाटील यांनी काय म्हटले आहे …..

भारतीय विद्या भवन’मध्ये रंगले ‘गायन सतार ‘ सहवादन

0
भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फौंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाला रसिकांचा प्रतिसाद
पुणे :‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘गायन सतार’ या सहवादनाच्या  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मैफलीला पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक २८ जून २०१९ रोजी ‘भारतीय विद्या भवन’चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह’, (सेनापती बापट रस्ता ) येथे सायंकाळी ६ वाजता झाला.
उस्ताद शाहिद परवेझ  यांचे शिष्य आणि सतारवादक समीप कुलकर्णी यांनी बहारदार सतारवादन केले तर सौरभ  काडगावकर यांनी मैफलीत गायकी चे रंग भरले. त्यांना  तबल्यावर अरविंद परांजपे ,हार्मोनियमवर सुखदा खरे यांनी साथसंगत केली.  स्नेहा रानडे  यानी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .
समीप कुलकर्णी यांनी सुरूवातीला एकल प्रस्तुतीत  सतारीवर बिहाग राग विलंबित रुपक द्रूत ताल पेश केला. एकल गायनात सौरभ काडगावकर यांनी राग पुरिया धनश्री प्रस्तुत केला.नंतर ‘ कैसे दिन कठीण ‘, ही बंदीश, ‘ पायलिया झंकार ‘ ही रचना  पेश केली.
सहगायनात दोघांनी मिळून हंसध्वनी राग सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. ‘विघ्न हर गणपती गजानन ‘ , ‘लागी लगन ‘या पेशकशीसह तराणा सादर केला.. सौरभ काडगावकर यांनी भैरवी रागातील ‘अवघा रंग एक झाला ‘ हे भजन सादर केले आणि  भक्तीरंगही भरलेल्या मैफलीची सांगता झाली.
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत झालेला हा   ७७ वा कार्यक्रम  सर्वांसाठी खुला होता.
 ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी  प्रास्ताविक केले.
 मुख्याध्यापक अपर्णा दास यांनी कलाकारांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सत्कार केला.

फिनोलेक्स, ‘मुकुल माधव’तर्फे वारकरी सेवा

0
पुणे : फिनोलेक्स उद्योग समूह आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे, फराळ वाटप व पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये दिघी, लोणी, सासवड येथे आरोग्य शिबीर व फराळ-पिशव्यांचे वाटप झाले. दोन्ही संतांच्या पालखी मार्गावर उरुळी कांचन, नीरा, लोणंद, तरडगाव, फलटण, बारामती, इंदापूर, अकलूज, पिराची कुरोली, वाखरी येथे वारकऱ्यांची सेवा झाली. या उपक्रमात निलेश घुले, अविनाश बामणीकर, आशिष कुलकर्णी, कल्याण गोफणे, संतोष शेलार यांनी या उपक्रमाच्या यशस्वितेत मोलाचे योगदान दिले. ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आरोग्य शिबिरातून वारकऱ्यांची सेवा केली.
———————————————-
‘अभि चॅरिटेबल’तर्फे मोफत आरोग्य तपासणी
पुणे : अभि चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नारायण पेठ येथे आयोजिलेल्या या शिबिरात वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. यात कान, नाक, डोळे, पाठ, गुडघे अशा अनेक अवयवांची तपासणी करून त्यांना आवश्यक ती औषधे मोफत पुरवण्यात आली. डॉ. ज्योत्स्ना जोशी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमने वारकऱ्यांना तपासले. वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. अभि चॅरिटेबल फाउंडेशनसोबत गेली ४ वर्षे आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. यंदा ४०० हुन अधिक वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी व उपचार घेतले, असे डॉ. जोशी म्हणाल्या. डॉ. सोनाली गिरम, डॉ. शंभवी पाठक यांच्यासह अभि चॅरिटेबल फाउंडेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
——————————————–
‘आयसीएआय’तर्फे फराळाचे वाटप
पुणे : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या वतीने संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. साखळीपीर तालीम येथे सकाळी ६ ते ९ या वेळेत सीए, सीए करणारे विद्यार्थी यांच्याकडून चहा-नाश्त्याचे आणि १००० राजगिरा लाडूचे वाटप केले. त्यानंतर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सीए एस. जी. मुंदडा, सीए अभिषेक धामणे, सीए समीर लड्डा यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सीएचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घेवूनी पुण्याची मायेची शिदोरी,वारी निघाली ,विठुरायाच्या दारी …..

0

पुणे-

वाट हि चालली विठुरायाच्या दारी,
घेवूनी पुण्याची मायेची शिदोरी
उत्स्फूर्त झाली तुझ्या दर्शनाला स्वारी ...

पुण्यातून  आपला  मुक्काम संपवून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा पुढील प्रवाससाठी मार्गस्थ झाल्या .या दोन्ही पालख्या पुण्यात पुण्यात नानापेठ व भवानी भवानी पेठेत मुक्कामी होत्या.तुकाराम महाराज यांची पालखी निवडूंगा विठोबा मंदिरात तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी होत्या.त्याची तयारी दोन्ही मंदिरात जोरदार होती.दोन दिवस मुक्काम असल्याने मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला  मिळाली .आज पहाटे दोन्ही पालख्या हडपसर पर्यत एकत्र गेल्या आणि तेथून  वेगवेगळ्या रस्त्याने मार्गस्थ झाल्या .
संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबारायांची पालखी आज पंढरीकडे निघाली. यावेळी नवचैतन्य हस्य क्लबचे सदस्य सहभागी झाले होते.

वारकऱ्यांना नाही धर्म-पंथाची सीमा… संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी एक पंजाबी कुटूंब भजन गाताना दिसत होते

फुगडी खेळत पालख्यांना निरोप-ज्ञानोबा-तुकोबारायांच्या पालख्या आज पंढरपूरकडे निघाल्या,या वेळी सेंट मेरीजमधील विद्यार्थीनी फुगडी खेळताना दिसत होत्या