Home Blog Page 2897

राफाएलतर्फे केआरएएसला 100 दशलक्ष डॉलर्सचे कंत्राट

0

भारतीय सैन्य आणि हवाई दलास 1000 बराक- 8 एमआरएसएएम मिसाइल्स किट्स पुरवण्यासाठी कंत्राट

हैद्राबाद – आज सकाळी झालेल्या समारंभात राफाएल कार्यकारी उपाध्यक्ष आणि हवाई व क्षेपणास्त्र संरक्षक यंत्रणा विभागाचे व्यवस्थापक, ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) पिनी यंगमन यांनी कल्याणी राफाएल अडव्हान्स्ड सिस्टीम्स लि., इंडियाला (केआरएएस) 1000 बराक- 8 एमआरएसएएम मिसाइल्स किट्सचे उत्पादन करण्याचे 100 दशलक्ष डॉलर्सचे कंत्राट दिले असून ते बीडीएलला आणखी घटक समाविष्ट करण्यासाठी पुरवले जाणार आहेत. केआरएएस ही राफाएल अडव्हान्स्ड सिस्टीम्स आणि कल्याणी स्ट्रेटेजिक सिस्टीम्स लि. यांच्यातील 49 : 51 गुणोत्तरानुसार संयुक्त भागीदार असून भारतीय भागिदाराचा त्यातील वाटा 51 टक्के आहे. मेक इन इंडियाशी असलेली बांधिलकी जपत संयुक्त भागिदारांनी सर्वोत्तम उत्पादन सुविधा, अत्याधुनिक अभियांत्रिकी सेवा आणि विस्तारित लाइफ सायकल सपोर्ट (एमआरओ) सिस्टीम्समध्ये भारतीय संरक्षण दलास पुरवण्यासाठी गुंतवणूक केली आहे. केआरएएस 2023 पर्यंत आपली कर्मचारी संख्या वाढवून 300 टेक्निकल तंत्रज्ञांपर्यंत नेण्याची अपेक्षा आहे.

राफाएल अडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीम्सला भारताच्या संरक्षण क्षेत्राशी सहकार्याचा समृद्ध इतिहास लाभला असून त्यातूनच विविध संयुक्त भागिदारी, उपकंपन्या तसेच माहितीचे फलदायी आदानप्रदान उदयास आले आहे. गेल्या दोन दशकांत झालेल्या या भागिदारींद्वारे राफाएलने भारतात आपल्या मेक इन इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून 250 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

या समारंभात ब्रिगेडियर (निवृत्त) पिनी यंगमन यांनी भारतीय सैन्य आणि भारतीय हवाई दल (आयएएफ) यांच्या कामकाजासाठी आवश्यक तयारी करून देण्यावर जोर दिला. ते म्हणाले, ‘केआरएएस तसेच मेक इन इंडिया उपक्रमात आम्ही बजावत असलेल्या भूमिकेचा आणि भारताच्या संरक्षण उद्योगातील दमदार गुणवत्तेशी असलेल्या नात्याचा राफाएलमध्ये आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. या प्रकल्पाची सांगता होत असताना यापुढेही केआरएएस तसेच बीडीएलसारख्या भारतातील इतर भागिदारांबरोबर आणखी विक्रमी टप्पे साजरे करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

भारताचे जागतिकीकरण करण्यात आणि मेक इन इंडिया उपक्रमाला जागतिक ब्रँड बनवण्यात कल्याणी समूहाने कायमच आघाडीची भूमिका बजावली आहे. आपल्या संरक्षण व्यवसाय उद्योगातही समूहाने याच तत्वज्ञानाचे अनुकरण केले असून डीआरडीओ तसेच डीपीएसयू या संयुक्त भागिदारांबरोबर यशस्वी संबंध जोडलेले आहेत.

याप्रसंगी कल्याणी समूहाचे अध्यक्ष बाबा कल्याणी म्हणाले, ‘हे कंत्राट आपल्या देशात अस्तित्वात असलेल्या क्षमतांची आणि त्यांचा मेक इन इंडियाचे ध्येय खऱ्या अर्थाने साकार करण्यासाठी कशाप्रकारे वापर होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आहे. कल्याणी समूहाला या कामगिरीचा आणि राफाएलसोबत असलेल्या नात्याचा अभिमान वाटतो. याचप्रकारे आम्ही आणखी कंत्राटांचीही अंमलबजावणी करू असा विश्वास आहे.’

कल्याणी समूहाबद्दल

कल्याणी समूह हा भारतीय बहुराष्ट्रीय समूह असून तो अभियांत्रिकी स्टील, वाहनउद्योग, औद्यिजकता, अक्षय उर्जा, संरक्षण, शहरी पायाभूत सुविधा आणि विशेष रसायने अशा महत्त्वाच्या क्षेत्रात उच्च तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व उत्पादन क्षमतांसह कार्यरत आहे.

कल्याणी स्ट्रेटजिक सिस्टीम्स लि. (केएसएसएल) ही कल्याणी समूहातील प्रमुख कंपनी असून ती संरक्षण आणि विमानवाहतूक क्षेत्रातील उपक्रम हाती घेणारी आहे. कर्नल आर भाटिया या प्रसंगी म्हणाले, की केएसएसएलचे भारतीय संरक्षण उद्योगाला विविध सुटे भाग आणि उपयंत्रणांची पुरवठा करणारी पारंपरिक पुरवठादार ते संपूर्ण यंत्रणेचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादार कंपनीमध्ये रुपांतर झाले आहे. पर्यायाने कंपनीने जगातील आघाडीची संरक्षण पुरवठादार कंपनी बनण्याच्या उद्दिष्टाप्रती समर्पित आणि केंद्रित दृष्टीकोन ठेवला आहे.

 

राफाएल अडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीम्स लि.

70 वर्षांचा वारसा लाभलेली राफाएल अडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीम्स लि. इस्त्राएली संरक्षक दलासाठी अवकाश, जमीन, समुद्र आणि अंतराळात वापरता येण्याजोग्या अत्याधुनिक संरक्षण यंत्रणांच्या विस्तारित श्रेणीचे डिझाइन, विकास, उत्पादन आणि पुरवठा करते तसेच भारतीय संरक्षक दलांसाठी आणि भारतातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्यात करण्यासाठी मेक इन इंडिया उत्पादने बनवण्यासाठी बांधील आहे.

‘देवदूत’ प्रकरणी सौरभ रावांची लागणार कसोटी …

0
पुणे- देवदूत नावाच्या निरुपयोगीआणि कुचकामी म्हणून पुढे आलेल्या यंत्रणेवर करोडोंची अनाठायी उधळन केल्याचे प्रकरण चव्हाट्यावर येवूनही या भ्रष्टाचाराची माहिती उघड होवू नये म्हणून महापालिकेत काही बडी धेंडे  कार्यरत असल्याने आता या प्रकरणाची चौकशी करून दोषींना शोधून त्यावर कारवाई करणे कामी महापालिका आयुक्त सौरव राव यांची कसोटी लागणार असल्याचे स्पष्ट दिसते आहे. या कसोटीत श्री राव हे किती सफल होतील ते देखील काही अवधीतच स्पष्ट होणार आहे .
देवदूत प्रकरणी मुख्य सभेत योगेश ससाणे आणि रवी धंगेकर यांनी मागणी करूनही काल सभागृहात प्रशासनाच्या वतीने म्हणणे सादर करण्यास महापौरांनी संधीच दिलेली नाही .तत्पूर्वी एक दिवस अगोदर झालेल्या पत्रकार परिषदेत देवदूत चे दर हे राज्य सरकारनेच ठरवून दिलेले आहेत असे राव यांनी स्पष्ट केले एवढेच नाही तर महापौरांनी आणखी गाड्या घेण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करावी असे पत्र दिले म्हणजे महापौर दोषी होत नाहीत असाच एक प्रकारे निर्वाळा दिला आहे .मात्र एका वृत्तपत्राने गेली काही दिवस देवदूत ची लक्तरे वेशीवर टांगून यात गैरव्यवहार झाल्यचा डंका पिटविलाआहे याकडे त्यांना दुर्लक्ष करून चालता येणार नाही . महापालिकेतला सिएसआर घोटाळा आणि त्यावरील चौकशी अहवाला गेली अडीच वर्षापासून मुख्य सभेत येतोच आहे. माय मराठी ने चव्हाट्यावर आणलेला आणि प्रत्यक्षात आरोपी पकडून दिलेल्या बोगस कामगार प्रकरणी देखील प्रशासनाने नावापुरती करायची म्हणून कारवाई केलेली आहे . महापालिकेच्या संगणक विभागाचा डेटा गायब प्रकरण देखील हवेतच गायब झाले आहे.अनेक चौकश्या आणि त्यांचे अहवाल बासनात गुंडाळून पडले आहेत जे कधीच समोर आलेले नाहीत . कोणतेही प्रकरण चौकशी करून अहवाल देवू असे सांगून थांबविण्याची महापालिकेची परंपरा अगाध मानली जाते .या सर्व पार्श्वभूमीवर आता सौरव राव यांच्या कडून आता देवदूत प्रकरणी ठोस कारवाईची अपेक्षा केली जाते आहे .  जेवढी हि जबाबदारी राव यांच्यावर असणार आहे तेवढीच ती पक्षनेत्यांवर देखील आहे … अन्यथा अशा प्रकरनांवरून त्यांच्याकडे देखील संशयानी पाहायला संधी उपलब्ध होणार आहे हे स्पष्ट दिसते आहे .

सरकारचा भ्रष्ट कारभार व चूकीच्या धोरणामुळे जनतेची पिळवणुक – रमेश बागवे

0

    पुणे-पुणे व मालाड, मुंबई येथे भिंत कोसळून अनेक जणांचे बळी गेले. केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या पेट्रोल-डिझेलवर अधिभार लावल्याने त्यांच्या दरात प्रती लिटर २.५ रूपयांची वाढ झाली आहे. राज्यात खरीपाचा हंगाम सुरू असून अद्यापही बँकानी पुरेशा प्रमाणात पीक कर्जाचे वाटप केले नाही. या सर्व विषयांमध्ये सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करून निदर्शने करण्यात आली.

आपल्या भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘मागील ५ वर्षांपासून भाजप – शिवसेनेच्या राजवटीत भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात आहे. विरोधी पक्ष, प्रसार माध्यमे आणि आर.टी.आय. कार्यकर्त्यांनी अनेकदा भ्रष्टाचार संदंर्भात ठोस पुरावे समोर आणले आहे. असे असताना सुध्दा सरकारने नेहमी भ्रष्टाचाराला क्लिनचिट देण्याची भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात भिंत कोसळून अनेक गरीब मजूर मरण पावले. या दुर्घटनेला कारणीभूत असलेले बांधकाम व्यावसायिक, अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची गरज आहे. या सर्वांच्या संगनमताने अशा घटना घडतात. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याने १९ जणांचा मृत्यू झाला. आणि ४ जण बेपत्ता आहेत. त्यापूर्वी या धरणाची डागडुगी करण्यात आली तरी सुध्दा ही घटना घडली ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेस दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यास राज्य सरकार कमालीची निष्क्रियता दाखवित आहे. राज्यात खरीप हंगाम सुरू असताना बँकांनी शेतकऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात पीक कर्जाचे वाटप केले नाही अशी तक्रार अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे. सर्व बँकांकडून एन.ओ.सी. आणावी यासाठी बँकांनी शेतकऱ्यांची अक्षरश: अडवणूक सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर अधिभार लावण्यात आला आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांवर व सामान्य नागरिकांवर मोठा अन्याय झाला आहे. त्यामुळे महागाई देखील वाढू लागली आहे. जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची दरवाढ तातडीने मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’

यानंतर काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना भेटून निवेदन सादर केले.यावेळी माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, रविंद्र धंगेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, दत्ता बहिरट, संगिता तिवारी, सोनाली मारणे, सचिन तावरे, विशाल मलके, भुषण रानभरे, शेखर कपोते, भगवान धूमाळ, वाल्मिक जगताप, ज्ञानेश्र्वर मोझे, प्रविण करपे, सुजित यादव, सेल्वराज ॲन्थोनी, साहिल केदारी, राजेंद्र शिरसाट, उस्मान तांबोळी, राजेंद्र मगर, मुन्नाभाई शेख, राजू साठे, लुकस नायडू, विनय ढेरे, नंदा ढावरे, मीरा शिंदे, रजिया बल्लारी, ज्योती अरवेन, मिसाबा शेख, छाया जाधव, ललिता जगताप आदींसह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी  झाले होते .

 

 

‘खडकवासला’ शंभर टक्के भरले; नदीत पाणी सोडले …2568 क्‍यूसेकने विसर्ग

0

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेले खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. दरम्यान, धरणातून कालव्याद्वारे 1712 क्‍युसेकने पाणी सोडण्यातआले त्यानंतर 2568 क्युसेक ने पाणी सोडले गेले.

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे ओढे-नाले यांद्वारे धरणात पाणी जमा होत आहे. खडकवासला प्रकल्पात एकूण 10.62 टीएमसी म्हणजे 36.42 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

खडकवासला धरणातून बुधवारी सायंकाळी 6 वाजता कालव्याद्वारे 300 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. यानंतर आज पहाटे दोन वाजता खडकवासला धरण शंभर टक्के भरल्यामुळे सांडव्यातून 856 क्‍युसेकने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. त्यानंतर सकाळी सहा वाजता आणखी 856 क्‍युसेकने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. आता एकूण 1712 क्‍युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. तर 9 वाजता 1712 वरून 2568 क्यूसेक पर्यंत विसर्ग करण्यात आला

पानशेत 44.40% भरले आहे तर , वरसगाव ३२.७२ टक्के भरले आहे.टेमघर १७ टक्के भरले आहे

छोट्या सिने नाट्य कलावंताना घरे म्हाडा ने द्यावीत यासाठी आदेश बांदेकर घेणार पुढाकार

0

चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांची भेट.

मुंबई-शिवसेना चित्रपट सेनेच्या वतीने चित्रपटातील कलाकारांना, रंगभूमी कलाकारांना आणि तंत्रज्ञ यांना हक्काची घरे द्यावी आणि त्यासाठी चित्रपट सेनेचे प्रमुख आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत बैठक लावावी अशी मागणी करणारे निवेदन म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांना  चित्रपट सेनेचे सचिव संग्राम शिर्के , दिलीप दळवी गिरीश विचारे यांनी आज  येथे दिले  .
ह्या मागणी नुसार आदेश बांदेकर यांच्या समवेत शुक्रवार दिनांक १२ रोजी दुपारी १२वाजता ह्या बैठकीचे आयोजन केले असल्याचे म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले.

“खेड्याकडे चला” संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद…

0

 

वनराई’चा वर्धापन दिन उत्साहात साजरा…_

पुणे, दि. १० जूलै: ‘खेड्याकडे चला’ या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर आधारित भव्य प्रदर्शनाचे आयोजन ‘वनराई’च्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले होते. शाश्वत ग्रामीण विकास कसा साधला जाऊ शकतो? सामुहिक शेती, शेती अवजारे, शेती पुरक व्यवसाय, याचे मार्गदर्शक फलक आलेल्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. पाणलोट व्यवस्थापनाचे कार्य कसे राबविले जाते याची माहिती विद्यार्थ्यांसह नागरिकांना कळावी यासाठी भल्या मोठ्या डोगंराची प्रतिकृति तयार करण्यात आली होती. त्यामध्ये अनगड दगडी बांध, सलग समतल चर, गॅबियन बंधारा, सिमेंट नाला बंधारा,वनराई बंधारा असे विविध बंधारे कशा पद्धतीत काम करतात हे प्रदर्शन पहायला आलेल्यांना लगेच समजत होते. प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने बांबूची सायकल, अपारंपारिक उर्जा उपकरण, पर्यावरण पुस्तके, हॅंड ट्रॅक्टर, इलेक्ट्रीक सायकल, घरगुती वापराच्या पर्यावरणपूरक वस्तू नागरिकांना पाहता आल्या.

यावेळी पुण्यातील विविध शाळांतील सुमारे अडिच हजार विद्यार्थ्यांनी पर्यावरण प्रदर्शनाला भेट दिली. याचबरोबर सामाजिक, राजकीय, कृषी, पत्रकारिता, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पर्यावरण प्रदर्शन आणि स्नेहमेळाव्याला आवर्जून हजेरी लावली. पुणे, सातारा, नाशिक, रायगड, रत्नागिरी, जालना अशा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील गावागावांतील कार्यकर्त्यांनी वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी वनराई कार्यालय परिसरात एकच गर्दी केली होती.

कृषी-ग्रामीण विकासाच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला पाठबळ मिळावं या हेतूने ‘स्नेहमिलन आणि पर्यावरण प्रदर्शनाचे’ दरवर्षी वर्धापनदिनी आयोजन करण्यात येते. निसर्ग जाणून स्वत:चेच नव्हे तर देशाचे आणि जगाचे भविष्य वाचविण्यासाठी पर्यावरण प्रदर्शनात विशेष गोष्टी पहायला मिळल्या.

वनराईच्या प्रमुख उद्दिष्ठांनमध्ये ग्रामीण विकासाचे काम अग्रस्थानी आहे, यामध्ये प्रामुख्याने पाणलोट व्यवस्थापन, वृक्षलागवड, शाश्वत शेती, सामुहिक शेती, घनकचरा व्यवस्थापन,पशुधन विकास, शिक्षण व आरोग्यविषयक सोयी-सुविधा, महिला सक्षमिकरण व कौशल्य विकास प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे यंदाच्या वर्धापन दिनी पुण्यात खेडेगावाची प्रतिकृति वनराईतर्फे साकारण्यात आली. वनराईचा गेल्या ३३ वर्षातील प्रवास यानिमित्ताने नागरिकांना पाहता आला. पुण्यातील मित्रमंडळ चौक, पर्वती येथील वनराई संस्थेच्या आवारात हे ‘खेडेगावाच्या’प्रतिकृतीतील प्रदर्शन होते.

भारतभूमी हरित आवरणाने सदैव नटलेली असावी, इथली पडीक जमीन आणि रिकामे हात सदैव उत्पादनक्षम असावेत, स्वच्छ आणि सुंदर परिसर हा इथला प्रत्येकाचा श्वास असावा, इथले जलस्त्रोत शुध्द पाण्याने नेहमीच खळाळत असावेत, आधुनिक विज्ञान-तंत्राज्ञानयुक्त साधनांचा लाभ इथल्या समाजस्तरातील शेवटच्या घटकापर्यंत व्हावा हे पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया तथा अण्णा यांच स्वप्न होते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं संस्थात्मक रुप म्हणजे वनराई, हि वनराई येत्या १० जूलै २०१९ रोजी ३४ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे.

देशातील पडीक जमिनी उत्पादनक्षम व्हाव्यात आणि देशाच्या हरित क्षेत्रात वाढ व्हावी याकरिता वनराईच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आजवर २ कोटीहून अधिक बिया व रोपांचे वाटप केले, तसेच जल-मृद संवर्धनासाठी वनराई बंधा-याची चळवळ उभारली. पाणलोट व्यवस्थापनाबरोबरच चराईबंदी, कु-हाडबंदी, नशाबंदी, नसबंदी व श्रमदान हा ‘पंचसुत्री’ कार्यक्रम राबवला. ग्रामीण भागात १३ प्रशिक्षण केंद्र उभारुन शेतक-यापर्यंत आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान पोहचविले. बचत गटांद्वारे ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला. लोकसहभागातून स्वच्छ, हरित, संपन्न व जलसमृद्ध गावांची निर्मिती केली. यातूनच शाश्वत ग्राम विकासाची गंगा गावागावात वाहू लागली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा अशा विविध भौगोलिक पार्श्वभूमी असलेल्यागावांमध्ये शाश्वत ग्रामीण विकासाद्वारे‘शहरातून खेड्याकडे’ (Reverse Migration) घडवून आणण्यात वनराईने यश मिळवले. वनराईचे उपक्रम स्थानिक ग्रामस्थांचे गरज लक्षात घेऊन आणि ग्रामस्थांच्या सहभागातून राबविले जातात. या सर्व उपक्रामांचा आढावा ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त पहावयास मिळाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी दिली. *यावेळी भाजप प्रवक्ते माधव भंडारी, वनराई संस्थेचे विश्वस्त नितीन देसाई, कमल मोरारका, अविनाश भोसले, रोहिदास मोरे, गिरिश गांधी, गणपतराव पाटील,चंद्रकांत इंगुळकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, तसेच संस्थेचे सदस्य डॉ. जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर, डॉ. विजय केळकर, डॉ. माधवराव ताकवले, डॉ. भूषण पटवर्धन, डॉ. चंद्रकांत पांडव उपस्थित होते.

 

झाडाची फांदी पडून महिलेचा मृत्यू ; पुण्यातील आपटे राेडवरची घटना,पोलिस करणार का महापालिकेवर गुन्हा दाखल

0

पुणे : झाडाची फांदी डाेक्यात पडून एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील आपटे रस्त्यावर ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली.विशेष म्हणजे  पोलिसांनी या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महापालिकेवर मात्र गुन्हा दाखल केलेला नाही.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 12 च्या सुमरास जयश्री जगताप (वय 35) या आपटे रस्त्यावरील संताेष बेकरीजवळ झांबल्या हाेत्या. त्यावेळी त्या ठिकाणच्या एका झाडाची कुजलेली फांदी त्यांच्या डाेक्यात काेसळली. नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी महिलेला मृत घाेषित केले

महिला दिव्यांग असल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे. ज्या ठिकाणची फांदी पडली ती फांदी सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून अर्धी कापण्यात आली हाेती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

याप्रकरणी डेक्कन पाेलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने राज्यात स्टँड अप कॉमेडी स्पर्धा

0

मुंबई, दि. 10 : ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमांर्गत स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे आयोजन राज्यात केले जाणार आहे. पु.लं.च्या साहित्यावर आधारित स्टँड अप कॉमेडीची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रांवर पात्र ठरणाऱ्या निवडक विजेत्यांना स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील विनोदी कलावंतांचे टॅलेंट हंट करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्ताने राज्य शासन करणार आहे. लवकरच या स्पर्धेच्या जिल्हास्तरीय फेऱ्यांना सुरुवात होणार असून,प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक अशी पारितोषिके घोषित करण्यात येणार आहेत. प्रथम आणि व्दितीय क्रमाकांना अनुक्रमे २० हजार आणि १५ हजार अशी रोख स्वरुपाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत स्पर्धेचे आयोजन  होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी ७५०६८४८०५५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर ५ ते ८ मिनिटांचे आपले सादरीकरण चित्रित करून पाठवायचे आहे. या स्पर्धेचा अंतिम सोहळा येत्या २४ ऑगस्ट रोजी पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे रंगणार आहे.
विनोद हा ‘पुलं’च्या साहित्याचा अविभाज्य भाग आहे. समाजातील माणसांच्या वृत्तींवर आपल्या खुमासदार शैलीत ‘पुलं’नी कायम भाष्य केले. स्टँड अप कॉमेडी ही स्पर्धा देखिल अशाच स्वरुपाची होणार आहे. एखाद्या वृत्तीवर, माणसाच्या स्वभावावर दैनंदिन व्यवहारी जीवनात घडणाऱ्या प्रसंगांवर मिश्कील टिप्पणी करत त्यातील विनोद सर्वांसमोर आणण्याचा प्रकार अनेक स्टँडअप कॉमेडियन करतात. सध्या तरुणाईत हा प्रकार अत्यंत लोकप्रिय होत आहे. याच धर्तीवर पुलंचे साहित्य अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित केली आहे. या स्पर्धेदरम्यान सर्व जिल्हा केंद्रांवर पु.ल. जत्रोत्सवही आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून पुलंचे साहित्य, त्यांची भाषणे, त्यांचे कार्यक्रम अनुभवण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे.
या संपूर्ण उपक्रमाचे प्रक्षेपण सोनी मराठी वाहिनीवरून केले जाणार असून, कलावंतांची कला महाराष्ट्रभर पोहोचावी, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.  विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील शहरी; तसेच ग्रामीण भागातील विनोदी कलावंतांना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने ही स्पर्धा राबवण्यात येत आहे.या स्पर्धेस प्रतिसाद देण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक श्रीमती स्वाती काळे यांनी केले आहे.
००००

‘ अवामी महाज ‘ सामाजिक संस्थेकडून सत्कार

0

पुणे :

हाज यात्रेला जाणाऱ्या पुण्यातील यात्रेकरुंचा  सत्कार ‘ अवामी महाज ‘ सामाजिक संस्थेकडून  करण्यात येणार आहे.दंत महाविद्यालय,आझम कॅम्पस(पुणे कॅम्प)  येथे, ११  जुलै, ११ वाजता  हा सत्कार  कार्यक्रम डॉ.पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे . ‘अवामी  महाज ‘ चे सचिव   वाहिद बियाबानी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली

 

‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ मध्ये लग्नाचा सीन साठी घेतली बिपाशा बसू ची मदत

0

विवाहातील तपशिलासाठी बिपाशा बसूकडे विचारणा! स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत लवकरच एक बंगाली पध्दतीचा विवाह पार पडणार असून त्यातीलविधी आणि परंपरांच्या माहितीसाठी मादक सौंदर्यवती अभिनेत्री बिपाशा बसूकडे विचारणा करण्यात आली आहे.

बिपाशाचा पती करणसिंह ग्रोव्हर हा या मालिकेत श्री. बजाज ही खलनायकाची भूमिका साकारीत आहे. या दोघांचा विवाहसुध्दा बंगाली पध्दतीने पार पडला होता. बिपाशा स्वत: बंगालीभाषिक असल्याने बंगाली पध्दतीच्या विवाहातील
विधी, परंपरा यांची माहिती घेण्यासाठी तिच्यासारखी दुसरी कोण असणार!
मालिकेची नायिका प्रेरणाचा विवाह होणार असल्याची कल्पना प्रेक्षकांना आहे. या मालिकेच्या प्रसारणास प्रारंभ
झाल्यापासून प्रेरणाचा विवाह कधी होतो, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. त्यामुळे आता या विवाहाचेचित्रीकरण करताना निर्मात्यांनी बिपशाला आपल्या लग्नाच्या अल्बमचा आधार घेऊन त्यातील प्रत्येक विधी आणि रूढीयांची माहिती देण्याची विनंती केली आहे. लग्नासारखे प्रसंग हे वास्तवातील विवाहांप्रमाणेच आणि मूळ रीतिरिवाजांनुसारच होत आहेत की नाहीत, याकडे प्रेक्षकांचे बारीक लक्ष असते.
सध्या सुरू असलेली ‘कसौटी झिंदगी के’ ही मालिका मूळ मालिकेचाच पुढील भाग आहे. मूळ मालिकेला देशभरातीलप्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम लाभले होते. आता तब्बल 18 वर्षांनी ‘कसौटी झिंदगी के’चा हा पुढील भागप्रसारित होत असून ‘स्टार प्लस’वरून सोमवार ते शुक्रवार रात्री 8.00 वाजता या मालिकेचे प्रसारण केले जाते.

डॉ. विखेंनी केवळ निवडणुकीपुरता वापर केला;

0

अहमदनगर-लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डॉ. सुजय विखे-पाटील यांनी साकळाई पाणी योजनेच्या मुद्द्यांवर मते मागितली होती. परंतु निवडणुकीनंतर त्यांनी हा विषय सोडून दिला. दरम्यान, मतांच्या राजकारणासाठी सुजय विखेंनी साकळाई योजनेचा निवडणुकीपुरता वापर करून फसवणुक केल्याचा आरोप अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केला. अहमदनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

दरम्यान, साकळाई पाणी योजनेच्या मुद्द्यावर दीपाली सय्यद 9 ऑगस्टपासून उपोषणाचे हत्यार उपसणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉ. सुजय विखे-पाटील यांनी साकळाई पाणी योजनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.

मुख्यमंत्र्यांनीही साकळाई योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु निवडणुकीनंतर मुख्यमंत्री आणि विखे-पाटील या दोघांनाही त्याचा विसर पडल्याचे सय्यद म्हणाल्या.

दरम्यान, या विरोधात 9 ऑगस्ट क्रांतीदिनापासून जिल्हा परिषदेसमोर श्रीगोंदा तालुक्यातील सर्व ग्रामस्थांसह आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा यावेळी दीपाली सय्यद यांनी दिला. दरम्यान, त्यांच्या या आरोपांनंतर डॉ. सुजय विखे-पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

घाटघर शाळेत शालेय साहित्य वाटप

0
जुन्नर  / आनंद कांबळे
 जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील  घाटघर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुर्गम परिवार या गिरीप्रेमी परिवाराने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी इयत्तानिहाय आवश्यक वहया, इंग्रजी प्रायमर बुक , डिक्शनरी, पेन्सिल बॉक्स रेनकोट ,पाणी बाटली, खोडरबर, चित्रकला वही, जेवणाचा डबा, पेन ,रंगपेटी, स्केच पेन बॉक्स ,पाटी इत्यादी साहित्य  वाटप केले.
शिवनेरी भूषण रमेश खरमाळे, वनपाल मडके, दुर्गम परिवाराचे शुभम थोरात, सौरभ ठुबे, भाग्यश्री मांझीरे ,मयूर कासरंग, मयूर औटी, सुभाष रावते (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती) पालक यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले .
 अभ्यासाबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे प्राचीन गडकोट किल्ले ऐतिहासिक वारसा जतन करून राष्ट्रपुरुषांच्या पुस्तकांचे वाचन करण्याची श्री खरमाळे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना आवाहन केले या मदतीमुळे पालकांचा आर्थिक भार हलका होत आहे व विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळत आहे .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब गिलबिले यांनी केले तर आभार प्रशांत लोखंडे यांनी मानले .कार्यक्रमाचे नियोजन बाळासाहेब शिंदे, प्रवीण घोलप यांनी केले.

ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अमरजित जाधवला मिळाले ७० लाखाचे पॅकेज

0
विपुल कदम याला कॅपजेमिनी कंपनीकडून १८ लाखाचे पॅकेज 
पुणे : येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकीचा विद्यार्थी अमरजित जाधव याला अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय कंपनीत ७० लाख वार्षिक पॅकेज असलेली नोकरी मिळाली आहे. तर संस्थेच्या केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा विद्यार्थी विपुल कदम याला मलेशिया येथे कॅपजेमिनी कंपनीत १८ लाखाचे पॅकेज असलेली नोकरी मिळाली आहे. सहयोगी अधिष्ठाता प्रा. प्रतिभा चव्हाण, विभागप्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी मेहनत घेतली आहे.
संगणक अभियंता असलेल्या अमरजित याने ट्रिनिटी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. केजे शिक्षण संस्थेने अमरजित याला ‘जीआरई’ व ‘टोफेल’ या परीक्षांची तयारी करण्यासाठी, तसेच अमेरिकेत मास्टर इन कम्प्युटर सायन्स (एमएस) करण्यासाठी मार्गदर्शन व अर्थसहाय्य पुरवले होते. विपुलने इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनची पदवी घेतली आहे. संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, विभावरी जाधव, प्राचार्य डॉ. हरिभाऊ फाकटकर, डॉ. सुहास खोत यांनी दोन्हीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
कल्याण जाधव म्हणाले, “केजे शिक्षणसंस्था इन्फोसिस, विप्रो, पर्सिस्टेंट, झेन्सार, एक्सेंचर, सायबेज यांसारख्या १०० पेक्षा अधिक बहुराष्ट्रीय आणि नामांकित कंपन्यांशी संलग्न आहे. यात्यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकल्पांच्या माध्यमातून इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. या कंपन्यांच्या माध्यमातून कॅम्पस प्लेसमेंट्स होतात. समाजाच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी योगदान देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गेल्या वर्षभरात संस्थेतील ४५० विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरी मिळाली आहे, ही गोष्ट आम्हाला प्रोत्साहित करणारी आहे.”
प्रा. प्रतिभा चव्हाण म्हणाल्या, “अभ्यासामधील अमरजित याची गती पाहून त्याला चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळावी, यासाठी संस्थेकडून सतत साहाय्य करण्यात आले. ‘ट्रिनिटी’मध्ये विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी प्रथम वर्षापासूनच मार्गर्शन केले जाते. व्यक्तिमत्व प्रशिक्षण, कौशल्याचे शिक्षण, क्रिडा यासह ग्रॅव्हिटी, गोकार्ट, रोबो-वॉर यासारख्या स्पर्धां घेण्यात येतात. आज संस्थेतून पदवी घेऊन बाहेर पडलेले हजारो विद्यार्थी अमरजित आणि विपुल यांच्याप्रमाणेच अनेक नामांकित कंपन्यात कार्यरत आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो.”

हिमालयाची सावली’ नाट्य रसिकांच्या भेटीला

0

जुने ते सोने’ या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्यकलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी पुनःपुन्हा बघाव्याशा वाटतात. कदाचित म्हणूनच, रंगभूमीवर या जुन्या नाट्यकलाकृतींची नव्याने नांदी होऊ घातली आहे. प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखणीने सजलेल्या आणि डॉ. श्रीराम लागू ,शांता जोग, अशोक सराफ या कलाकारांच्या उत्तम अभिनयाच्या अदाकारीने गाजलेल्या हिमालयाची सावली या दर्जेदार अभिजात नाट्यकलाकृतीचा आस्वाद नाट्यरसिकांना लवकरच घेता येणार आहे. आजवर अनेक सकस अशा नाट्यकलाकृती प्रेक्षकांना देणारे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी या नाटकाचे शिवधनुष्य पेलले आहे.

प्रकाश देसाई प्रतिष्ठान (पाली) व अद्भुत प्रॉडक्शन्स निर्मित व सुप्रिया प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या या नाटकाचे प्रस्तुतकर्ते गोविंद चव्हाण व प्रकाश देसाई आहेत. तब्बल ४० वर्षांनी रंगभूमीवर येणारे हे नाटक सर्व रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस निर्माता व दिग्दर्शकांचा आहे. प्रा. वसंत कानेटकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.रविवार २९ सप्टेंबरला नाशिक येथीलकालिदास’ नाट्यगृहात या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे.

या नाटकाच्या नव्या संचाबद्दल बोलताना दिग्दर्शक राजेश देशपांडे सांगतात की, ‘‘एक अभिजात कलाकृती पुन्हा रसिकांसमोर सादर करणे आमच्यासाठी एक जबाबदारीच आहे. कानेटकरांच्या लेखनाला कुठेही धक्का बसणार नाही याची काळजी घेऊन नव्या संचात हे नाटक करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. अभिजात कलाकृती पुन्हा पहायला मिळणे हे अगोदरच्या पिढीतील प्रेक्षकांसाठी स्मरणरंजन असेल तर नव्या पिढीला जुन्या कलाकृतींचे सामर्थ्य यामुळे लक्षात येईल’’ असे राजेश देशपांडे सांगतात.

नव्या संचामध्ये ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे श्रीराम लागू यांनी केलेली नानासाहेबांची भूमिका साकारणार असून  त्यांच्यासोबत शृजा प्रभूदेसाई,जयंत घाटे, विघ्नेश जोशी, कपिल रेडकर, मीनल बाळ, कृष्णा राजशेखर आदि कलाकार या नाटकामध्ये दिसणार आहेत. संगीताची जबाबदारी राहुल रानडे तर कलादिग्दर्शन संदेश बेंद्रे यांचे असणार आहे. वेशभूषा मंगला केंकरे यांची आहे. निर्मिती सूत्रधार सुभाष रेडेकर आहेत. अंजली व अंशुमन कानेटकर यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे.

एका व्रतस्थ समाज कार्यकर्त्याच्या पत्नीला कशाप्रकारे अवघं आयुष्य जगावं लागतं अशा आशयाच हे नाटक जुन्या-नव्या पिढीसाठी ही नाटय़ मेजवानी असेल हे नक्की

बी एम सी सी महाविद्यालयात यंदापासून नवीन अभ्यासक्रम

0
पुणे-बीएमसी सीमहाविद्यालयाने यावर्षी ट्रॅव्हल ऍण्ड टूरिझम हा दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. यामध्ये टूरिझम कन्सेप्ट आणि प्रिन्सिपल, कम्युनिकेशन स्किल्स, ट्रॅव्हल एजन्सी मॅनेजमेण्ट, बिझनेस क्म्युनिकेशन, डोमेस्टिकआणि इन्टरनॅशनल टूरिझम, पासपोर्ट ,विझा, टूर पॅकेज संदर्भातील विषयाचा समावेशआहे. तसेच टूर कॅास्टींग, आयटनरिज- मध्ये फॅॅमिली, ग्रूप तसेच कस्टमाइज टूर पॅकेज तयार करणे. या फील्डमध्ये ऑन फील्ड आणि ऍाङ्गिस वर्क अशा विषयांचा समावेश आहे.
या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात प्रॅक्टीकल आणि थिअरी ह्या दोन्ही गोष्टीचा समावेश असेल. . तसेच आपले नियमित शिक्षण करता करता विद्यार्थी  हा कोर्स बरोबरीने देखील करु शकतील.  तसेच विद्यार्थ्यांना कोर्स पुर्ण केल्या नंतर या क्षेत्रातील करिअर विषयी मार्गदर्शन केले जाईल.या कोर्स साठी ऍडमिशन साठी विद्यार्थी  BMCC महाविद्यालयाच्या वेबसाइटवर माहिती घेवु शकतात.