Home Blog Page 2882

होंडा टुव्हीलर्स इंडियातर्फे बनावटी माल उध्वस्त-उत्तर आणि पूर्व भागात चार मोठ्या धाडी, 49 लाख रुपयांचा नकली माल ताब्यात

तीन वर्षांत होंडा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स एनफोर्समेंट टीमने भारतभरात जप्त केले

दोन कोटी रुपये किंमतीचे 94 हजार सुटे भाग

 दिल्ली– उच्च दर्जाचा मालकी अनुभव, उत्पादनाची विश्वासार्हता आणि देशभरातील 43 दशलक्ष ग्राहकांनी टाकलेला विश्वास जपण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने देशभरात बनावट सुटे भाग विकणारे व्यापारी आणि उत्पादकांवर धाड मोहिमांची मालिका राबवली.

ग्राहकाची सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्यामुळे होंडा टुव्हीलर्स इंडियाने 2017 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय आयपीआर तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली नवी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स एनफोर्समेंट (आयपीआर) टीम तयार केली आहे. तेव्हापासूनच होंडा जेन्युइन पार्ट्स(एचजीपी) अभियानाने होंडाचे बनावटी सुटे भाग विकणारे व्यापारी, उत्पादक आणि पुरवठादारांविरोधात आक्रमकपणे पावले उचलत गुन्हेगारी कारवाई करण्याची सुरुवात केली आहे.

 यापुढचे पाऊल म्हणून होंडाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने दिल्ली आणि कटक येथे जून 2019 मध्ये अनाधिकृत सेवा केंद्रांविरोधात चार यशस्वी धाड मोहीमा राबवत एकूण 10,462 बनावट भाग ताब्यात घेतले. त्यात बनावट सुटे भाग, अक्सेसरीज, विविध प्रकारचे बनवाटी रंग, स्कूटर गार्ड संच, 49 लाख रुपये किंमतीचे नकली पॅकेजिंग उपकरण आणि लेबल प्रिंटिंग उपकरण यांचा समावेश होता.

 होंडाने बावना औद्योजिक परिसर आणि करोल बाग बाजारपेठ परिसरातील बनावट वस्तू आणि अक्सेसरीजच्या वितरकांविरोधात केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी दोन धाडी टाकल्या.

 कटक (ओडिशा) येथे झालेल्या 2 स्वतंत्र धाड मोहिमांमध्ये पोलिसांनी सेक्टर 9 आणि चांदी रस्ता येथे होंडाच्या खोट्या ब्रँड नावाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या दोन सेवा केंद्रावर धाड घालत मालकाला अटक केली.

 होंडाच्या आयपीआर एनफोर्समेंट टीमने आपल्या स्थापनेनंतर गेली तीन वर्ष स्थानिक पोलिस व शोध संघटनांबरोबर काम करत आहे. आतापर्यंत प्रमुख शहरांमध्ये 15 यशस्वी धाडी घालण्यात आल्या असून या शहरांत दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद, सिकंदराबाद, गांधीनगर, मुंबई, अहमदाबाद, कटक आणि गांधी हसारू (गुरगाव) यांचा समावेश आहे. यात एकूण 94 हजार बनावट सुटे भाग, अक्सेसरीज आणि इतर वस्तूंचा समावेश असून त्यांची किंमत तब्बल दोन कोटी रुपये आहे. बाजारपेठेतून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे होंडा आयपीआर एनफोर्समेंट टीमने वाहन उद्योग परिसर तसेच वाहनांचे सुटे भाग पुरवणाऱ्या हबमधील नकली रिटेलर्स/पुरवठादार यांच्यावर धाडी घातल्या असून 2017 मधील तीन धाडींनंतर अलीकडे कार्यवाही तीव्र करत 2019 च्या केवळ सहा महिन्यांत 6 धाडी घातल्या आहेत.

 भविष्यातही होंडा आपल्या ग्राहकांचे बनवाट, नकली आणि खोट्या भागांपासून संरक्षण करण्यासाठी बनावट व्यापारी, पुरवठादार आणि उत्पादकांवर अशाचप्रकारे आक्रमक कारवाई करत राहाणार आहे.

 त्याशिवाय होंडाने आपल्या ग्राहकांना केवळ होंडाचे अस्सल सुटे भाग घेण्याचे आवाहन केले असून हे भाग होंडाच्या भारतभरातील अधिकृत दालनांत, सेवा केंद्रात तसेच वितरकांकडे सहज उपलब्ध असतात. आमच्या मूल्यवान ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेत होंडाने त्यांना केवळ होंडाचेच अस्सल सुटे भाग वापरण्याचे आवाहन केले आहे, कारण हे भाग कठोर निकष वापरून होंडाच्या जागतिक दर्जानुसार बनवलेले असतात.

 होंडाच्या सर्व अस्सल भागांवर उच्च सुरक्षा दर्शवणारे एमआरपी लेबल दिलेले असते. या लेबलशी छेडछाड करणे शक्य नसल्यामुळे तसेच त्यावर असलेल्या सुरक्षा सुविधायुक्त होलोग्राममुळे ते अस्सल आहे की नकली हे सहजपणे ओळखता येते. होंडाचे अस्सल भाग कसे ओळखावे याचे तपशील https://www.honda2wheelersindia.com/services/how-to-idendify-honda-genuine-parts वर देण्यात आले आहेत.

या एचजीपी अभियानामध्ये प्रामाणिक व्हा, प्रामाणिक खरेदी करा या तत्वाचा डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन (डीआयपीपी), कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाइन अँड ट्रेडमार्क्स, जपान चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री इन इंडिया, भारतीय कस्टम्स आणि काही राज्यांच्या पोलिस खात्यांबरोबर बैठकीद्वारे प्रचार करण्यात येत आहे.

विज्ञानाश्रम आयोजित वैज्ञानिक प्रयोग प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

0
पुणे:
विज्ञान आश्रम(पाबळ)चे  संस्थापक डॉ. श्रीहरी कलबाग यांच्या स्मृतिदिनानिमित्त  ३० जुलै रोजी वैज्ञानिक प्रकल्पांचे खुले प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
विज्ञान आश्रमातील नवीन तांत्रिक प्रकल्प, नवीन सुविधा, शैक्षणिक प्रकल्प या बाबतची सविस्तर माहिती विज्ञान आश्रम , (पाबळ ता.शिरुर) येथील प्रदर्शनात मांडण्यात आली होती.
 घरच्या, सोसायटीच्या कचऱ्याचे कंपोस्टिंग, शेतीसाठी माती -पाणी परीक्षण,यांत्रिक शेती, मत्स्य शेती, डिस्टील्ड वॉटर प्रकल्प, फॅब्रिकेशन लॅब, मूलभूत तंत्रज्ञान, सौर उर्जा, सोलर ड्रायर, पाण्याचा पुनर्वापर, फूड टेस्टिंग लॅब,फॅब्रिक डिझाईन,हस्तकला, माहिती तंत्रज्ञान, प्लास्टिक पायरॉलिसिस विषयक प्रकल्प मांडण्यात आले होते.
राज्यभरातून शाळा , मराठी विज्ञान परिषद सारख्या संस्थांचे सदस्य, शेतकरी, पाबळ ग्रामस्थांनी मोठया संख्येने भेट दिली.
प्रदर्शनाची वेळ सकाळी  १० ते सायंकाळी ५.३० पर्यंत होती.
२१ संशोधनांचे पेटंट मिळविणारे युवा संशोधक अजिंक्य कोट्टावार यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
विज्ञान आश्रम’चे संचालक डॉ योगेश कुलकर्णी यांनी स्वागत केले.‘ग्रामीण भागाच्या विकासासाठी विज्ञान  संशोधन,उद्योजकतेच्या माध्यमातून काम करण्याचे प्रशिक्षण या प्रकल्पांद्वारे दिले जाते ‘अशी माहिती योगेश  कुलकर्णी यांनी दिली . 

स्वयंशिस्त यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली- प्रदीप राठी

0
पुणे : “स्वयंशिस्त यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे उद्योग उभारताना आपले आरोग्य, कुटुंब आणि व्यवसाय या क्रमाने प्राधान्य द्यावे. आरोग्य चांगले नसेल, कुटुंबातील लोक समाधानी नसतील, तर उद्योग वाढविताना व्यावसायिक समस्यांबरोबरच आरोग्य आणि कौटुंबिक अडचणींनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे स्वतःला शिस्त लावत इतरांचे व्यवस्थापन करण्याची कला नवउद्योजकांनी आत्मसात करावी,” असे मत सुदर्शन केमिकल्सचे अध्यक्ष प्रदीप राठी यांनी व्यक्त केले.
भारतरत्न जेआरडी टाटा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित २६ व्या आंत्रप्रेन्युअर्स दिनी उल्लेखनीय योगदानाबद्दल उद्योग क्षेत्रातील व्यक्तींचा ‘एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशीप पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी प्रदीप राठी बोलत होते. आंत्रप्रेन्युअर्स इन्टरनेशनल ट्रस्ट, आंत्रप्रेन्युअर्स क्लब ऑफ पुणे, पिंपरी-चिंचवड, निगडी आणि बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात रेणुका इंजिनिर्सचे महेंद्र पाटील (आंत्रप्रेन्युरशीप), नागपूर येथील ज्ञान फौंडेशनचे पेटंटमॅन अजिंक्य कोट्टावार (रिसर्च अँड इनोव्हेशन), राणा हॉस्पिटॅलिटीच्या संचालिका भाग्यश्री जाचक (सर्व्हिस इंडस्ट्री), सांगलीतील ए-वन रोझ हायटेक ऍग्रो फार्मचे तानाजीराव चव्हाण (ऍग्रीकलचर), क्रस्ना डायग्नोसिस्टच्या पल्लवी जैन (सोशल रिलेव्हन्स), ‘इकोस’च्या मानसी करंदीकर व केतकी घाटे (ग्रीन एंटरप्राइज) यांच्यासह हिंदुस्थान कॅटल फीड्सचे सचिन माने (आंत्रप्रेन्युअर्स क्लब, बारामती) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मानपत्र व मोगऱ्याचे रोप असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या एसएमई आणि स्टार्टअप एक्सचेंजचे प्रमुख अजय ठाकूर, आंत्रप्रेन्युअर्स इन्टरनेशनल ट्रस्टचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी, सचिव डॉ. आशिष तवकर, खजिनदार सुनील थोरात, पीसीएमसी क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र कुलकर्णी, बारामती क्लबचे अध्यक्ष भाऊसाहेब तुपे, पुणे फर्स्ट क्लबचे अध्यक्ष सुभाष माईणकर, निगडी क्लबचे अध्यक्ष सागर दाणी आदि उपस्थित होते.
प्रदीप राठी म्हणाले, “उत्तम आरोग्य, समाधानी कुटुंब आणि नियोजनपूर्वक काम केले, तर व्यवसाय जोमाने वाढेल. भविष्यातील यशापेक्षा वर्तमानातील वाटचाल चांगली कशी होईल, यावर विचार करावा. उद्योग करताना येणाऱ्या आव्हानांचा सामना खंबीरपणे करावा. आपण जे काम करतो, ते मन लावून केले, तर समस्या सहज सुटतात. अलीकडच्या काळात लघु आणि मध्यम व्यवसाय उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे काही प्रमाणात अडथळे आले, मात्र त्यातून उद्योगांची भरभराट व्हायला भविष्यात मदत होईल.”
अजय ठाकूर म्हणाले, ”बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (बीएसई) नोंदणीबाबत लघुउद्योजक उदासिन दिसतात. १४३ वर्षाच्या या संस्थेत भारतातून फक्त सुमारे ५००० कंपन्याचीच नोंदणी आहे. खरेतर ५००० कंपन्या एकट्या महाराष्ट्रातून नोंदणी होवू शकतात एव्हडी संभाव्यता आहे. ‘बीएसई’ मध्ये नोंदणी करणे लघुउद्योजकांना फायद्याची असून, उद्योगाचा प्रचार-प्रसार होण्यासह सदस्य असल्याने समाजात प्रतिष्ठाही मिळते, उत्तम कौशल्य त्या व्यवसायात आकर्षित करू शकता. दोन-तीन कोटी पासून वार्षिक उलाढाल असलेल्या, सलग तीन वर्षे व्यवसायात असणाऱ्या कंपन्या ‘बीएसई’ नोंदणी करू शकतात. लघुउद्योजकांनी ‘बीएसई’मध्ये नोंदणी करण्याला प्राधान्य द्यावे.”
अनेक समस्यांचा धैर्याने सामना करीत उद्योग उभारला. जिद्द, मेहनत आणि सातत्य व्यवसाय करताना महत्वाचे आहेत, असे महेंद्र पाटील म्हणाले. विद्यार्थ्यांना आनंददायी असे शिक्षण देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत. शिक्षण व्यवस्थेत नाविन्यपूर्ण बदल होण्यासाठी प्रयत्नशील असून, मुलांमध्ये कुतूहल जागृत करून त्यांच्यामध्ये संशोधक वृत्ती वाढावी या साठी सोनम वांगचुक यांच्या सारख्या बरोबर काम करण्याचा आनंद असल्याचे अजिंक्य कोट्टावार यांनी नमूद केले. भाग्यश्री जाचक म्हणाल्या, कोणतीही पार्श्वभूमी नसताना हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उद्योग उभारला आहे. त्याला पर्यावरणपूरक वातावरणाची जोड दिली आहे. व्यवसायात स्वतःशीच स्पर्धा असते, याची जाणीव ठेवून काम करावे.
प्लास्टिक फुलांच्या वापरामुळे नैसर्गिक फुलांची शेती करणार्यांचे मार्केट ९० टक्क्याने कमी झाले आहे. फ़्लोरिकल्चरला चालना मिळण्यासाठी नागरिकांनी नैसर्गिक फुलांचा वापर करायला हवा, अशी अपेक्षा तानाजी चव्हाण यांनी व्यक्त केली. मध्यमवर्गीयांना आरोग्य तपासण्या अल्पदरात करता येतील, तसेच अखिल भारतीय स्तरावर ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असून, हिमाचल प्रदेशातील छोट्या गावात सुरु केलेला व्यवसाय विविध राज्यात पोहोचल्याचा आनंद असल्याचे पल्लवी जैन म्हणाल्या. नैसर्गिक जैवविविधता टिकवण्यासाठी आपण सर्वानी पुढाकार घेतला पाहिजे, असे केतकी घाटे यांनी सांगितले.
अतुल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सागर दाणी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आशिष तवकर यांनी आभार मानले.

ग्राहकाची फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती गरजेची : खासदार गिरीश बापट

0

ग्राहक संरक्षण विधेयकाचे बापट यांच्या कडून  स्वागत

नवी दिल्ली  : ग्राहकांना आपल्या हक्क आणि अधिकारासंदर्भात विद्यार्थी दशेपासून शिक्षण दिले पाहिजे. या मुळे या ग्राहकांमध्ये जनजागृती होऊन त्यांची होणारी फसवणूक टळेल. असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले. ‘ग्राहक संरक्षण विधेयक २०१९’ चे स्वागत करताना संसदेत ते बोलत होते.

या विधेयकाच्या समर्थनार्थ  बोलताना खासदार बापट म्हणाले, १९८६ पासून आजपर्यंत हे विधेयक कार्यात होते. आजवर या विधेयकामध्ये अनेक वेळा दुरुस्त्या झाल्या,मात्र आज सादर झालेल्या विधेयकांमध्ये ग्राहकाला सर्वोच्च स्थानी ठेऊन विचार केलाय. उत्पादक, वितरक आणि ग्राहक अशी मोठी साखळी देशात सगळ्या करिता कार्यान्वित आहे. ग्राहक हा उपभोक्ता असतो, लाभार्थीं असतो, तो त्या वस्तूंचा वापर करतो, म्हणून सर्वाधिक त्रास त्याला होत असतो. त्याची काळजी या विधेयकामध्ये घेतली आहे म्हणून हे विधेयक वैशिष्ट्यपूर्ण आहे. जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावर वेगवेगेळे विभाग करून त्या त्या विभागातील लोकांना न्याय देण्याकरिता या विधेयकामध्ये असणाऱ्या प्रावधानांचा भविष्यात उपयोग होणार आहे.

सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन हे विधेयक तयार केले आहे. ग्राहकाची फसवणूक झाल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई देण्याचे तसेच फसवणूक करणाऱ्याला दंड आणि शिक्षा करण्याचे प्रावधान या विधेयकामध्ये आहे. आजच्या काळाला अनुसरून या विधेयकामध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामुळे विक्रेत्यावर आणि व्यापाऱ्यांवर मोठा वचक बसणार आहे.

कायदा निर्माण होण्याआधी त्याच्या पळवाटा तयार होतात या पळवाटा टाळण्यासाठी कायदा भक्कम केला पाहिजे. याच्या प्रभावीपणाने अंमलबजावणीसाठी नवीनवीन माध्यमांचा उपयोग करून घेतला पाहिजे. प्रामुख्याने संगणकीकरणाचा वापर वाढवला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली पाहिजे, ग्राहकमंचामध्ये महिलांनासुद्धा स्थान मिळावे, देशभरात ‘जागो ग्राहक जागो’ सारखे अभियान राबवले पाहिजे. असे मत व्यक्त करत, नागरिकांनी ही सजग राहून वेळोवेळी ज्या त्या विभागाकडे तक्रार केल्यास अशा प्रकारांना आळा बसेल असे ही ते म्हणाले.

न्यायालयांना अधिक निधी दिला पाहिजे :

ग्राहक न्यायालयांना केंद्रामार्फत कमी पैसा मिळतो. बऱ्याच ठिकाणी न्यायालयामध्ये वकिलांना, न्यायाधीशांना बसण्यासाठी जागा नाही, इमारतीला जागा नाही. म्हणून विशेष लक्ष याकडे दिले गेले पाहिजे. न्यायालय ही न्याय देण्याची जागा आहे त्यामुळे त्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. अशी अपेक्षा खासदार बापट यांनी यावेळी व्यक्त केली.

 

पुणे शहरातील विधानसभा इच्छुकांच्या मुलाखती काँग्रेस भवन येथे संपन्न(व्हिडीओ)

0

पुणे-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आज मंगळवार दि. ३० जुलै २०१९ रोजी काँग्रेस भवन,
शिवाजीनगर पुणे येथे विधानसभा पुणे शहरातील इच्छुकांच्या मुलाखती पक्षाचे निरिक्षक माजी
खासदार जयंवतराव आवळे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश
शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडल्या. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस व पश्चिम
महाराष्ट्राच्या प्रभारी श्रीमती. सोनल पटेल या ही यावेळी उपस्थित होत्या.
निवड समितीतील सदस्यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांनी आपली मुलाखत दिली
आणि आपले परिचय पत्रक निवड समितीच्या सदस्यांना देऊन सविस्तर आपली बाजू मांडली.
निवड समितीचे सदस्य शहराध्यक्ष रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, रत्नाकर महाजन, दीप्ती चवधरी ,ॲड.
अभय छाजेड, संजय बालगुडे, रोहित टिळक,  अरविंद शिंदे, सचिन साठे व इतर
मान्यवर उपस्थित होते. गटनेते अरविंद शिंदे, विद्यमान नगरसेवक लता राजगुरू, आबा बागुल,
अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, मनीष आनंद, संजय आगरवाल ,माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेवक
दत्ता बहिरट, सदानंद शेट्टी यांच्यासह एकूण ५७ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. इच्छुकांचे
समर्थक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

गोल्फ चौकातील उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरु करणार -आ.जगदीश मुळीक

0

पुणे-महापालिकेच्या अर्थसंकल्पात सुचविण्यात आलेल्या नगर रस्ता वाहतूक आराखड्याअंतर्गत पाच उड्डाणपुलांपैकी गोल्फ चौकातील उड्डाणपुलाचा सल्लागार कंपनीकडून प्रकल्प अहवाल प्राप्त झाला असून, निविदा प्रकि‘या सुरू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भूमिपूजन करुन काम सुरू करण्यात येईल अशी माहिती आमदार जगदीश मुळीक यांनी दिली.
केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत गेल्या वर्षी शहरातील २०० किलोमीटर रस्त्यांचे सुरक्षाविषयक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात पुणे-नगर रस्ता वाहतुकीसाठी सर्वांत धोकादायक असल्याची बाब समोर आली होती. याचा विचार करून नगर रस्ता हे एक एकक मानून नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये गोल्फ चौक, खराडी, येरवडा शास्त्रीनगर, विश्रांतवाडी या ठिकाणी उड्डाणपुल उभारण्यात येणार आहेत. या उड्डाणपुलांच्या जागांची पाहाणी केल्यानंतर आमदार मुळीक बोलत होते.


महापालिकेचे प्रकल्प मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, अधिक्षक अभियंता जगदीश खानोरे, वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेवक अनिल टिंगरे, शीतल सावंत, सुनीता गलांडे, शीतल शिंदे, नाना सांगडे, संदीप जर्‍हाड, राहुल भंडारे, श्‍वेता गलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मुळीक पुढे म्हणाले, ‘स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक यांनी गेल्या वर्षीच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक आराखडा प्रस्तावित केला होता. त्यासाठी अंदाजपत्रकात सुमारे ९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. गोल्ङ्ग चौकातील प्रकल्पासाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून सी. व्ही. कांड यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी सुचविल्याप्रमाणे डिझाईन व नकाशे तयार करण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. निविदा प्रकि‘या सुरू करण्यात आली आहे. येत्या महिन्यात उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.’
आमदार मुळीक पुढे म्हणाले, ‘गोल्फ चौकातील उड्डाणपुलाचा गेली पाच वर्षे पाठपुरावा करीत आहे. गोल्ङ्ग चौकातून गुंजन टॉकीज, विमानतळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शास्त्रीनगर या परिसरातून दररोज सरासरी ९१ हजार दुचाकी, ४९ हजार चारचाकी आणि सात हजार ३०० ट्रक वाहतूक करीत असतात. आय. आर. सी. स्पेसिङ्गिकेशन प्रमाणे या चौकात उड्डाणपुल निर्माण करणे आवश्यक होते. नजिकच्या काळात अन्य चार ठिकाणी उड्डाणपुलाचे प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.’

राज्य सरकारचा मोठा निर्णय, धनगर समाजाला अनुसूचित जमातींचे सर्व लाभ मिळणार

0

मुंबई- महाराष्ट्रात धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याची मागणी तीव्र होत असताना, राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता धनगर समाजाला अनुसूचित जमातींमधील सर्व सवलती लागू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारने डिसेंबरमध्ये याबाबत घोषणा केली होती, त्याचे आथा निर्णयात रुपांतर केले आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना 22 योजना दिल्या जातात, त्या आता धनगर समाजातील नागरिकांनाही लागू होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समजाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला.

महाराष्ट्रात सध्या धनगर समाजाला NT अंतर्गत आरक्षण आहे. पण धनगर समाजाने अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे. पण धनगर आरक्षणाचा मुद्दा हा राज्याच्या नाही तर केंद्राच्या अखत्यारित येतो. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी धनगर समाजाने सातत्याने केली. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर आरक्षणाचे आश्वासन दिले होते, पण त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल संपत आला तरी धनगरांना अनुसूचित जमातीमधील आरक्षण मिळाले नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकारने धनगर समाजाला थेट आरक्षण जाहीर न करता, अनुसूचित जमातीमध्ये मिळणाऱ्या सुविधा देऊ केल्या आहेत.

नदीच्या पात्रात भिडे पुलावर हौश्या नवश्यांचा पहा जीवाशी खेळ …(व्हिडीओ)

0

पुणे- शहरात आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. या चार धरणांपैकी खडकवासला धरण पुन्हा एकदा १०० टक्के भरले असून या धरणातून १३ हजार ९८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे झेड ब्रीज खालील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. हे दृश्य पाहण्यास पुणेकर नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.हौश्या नव्श्यांनी तर कहरच केला आहे. पोलिसांचे बरीगेट ओलांडून जीवाशी खेळ करत भिडे पुलावर जावून या ठिकाणी सेल्फी पोइंट ची काही काळासाठी निर्मिती केली आहे .

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी पानशेत धरणात ८.८९ टीएमसी (८३.५१ टक्के), वरसगाव धरण ८.७६ टीएमसी (६८.३५ टक्के) भरले असून टेमघर धरणात २.२५ टीएमसी (६०.६४ टक्के) पाणीसाठा आहे. खडकवासला धरणाची क्षमता १.९७ टीएमसी असून सद्यस्थितीला १०० टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात संततधार पाऊस होत असल्याने खडकवासला धरणातून १३ हजार ९८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. या चारही धरणात मिळून २१.८८ टीएमसी (८६.६७ टक्के) पाणीसाठा पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागामार्फत सांगण्यात आले आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नदी पात्रालगत राहणार्‍या नागरिकांनी सतर्क राहावे

शक्तिप्रदर्शन टाळून काँग्रेसच्या मुलाखतींना प्रारम्भ

0

पुणे-आगामी विधानसभा निवडणुकीत शहरातील विधानसभा मतदारसंघातील इच्छुक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मुलाखती आज, मंगळवारी दिवसभर काँग्रेस भवन येथे सुरु आहेत. शहरातील विधानसभा मतदारसंघासाठी माजी खासदार जयवंतराव आवळे आणि प्रदेश पदाधिकारी राजेश शर्मा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी काँग्रेसकडून ५३ जणांनी अर्ज केले होते. सर्व मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम प्रदेश काँग्रेसने निश्चित केला. त्यानुसार, आज मंगळवारी सकाळी ११ पासून सायंकाळी सहापर्यंत इच्छुकांच्या मुलाखती सुरु झाल्या. या मुलाखतींची सुरुवात पिंपरी-चिंचवडमधील मतदारसंघांपासून झाली आहे. त्यानंतर, पुणे कँटोन्मेंट, शिवाजीनगर, पर्वती, वडगावशेरी, कोथरूड, हडपसर आणि कसबा पेठ अशा क्रमाने मुलाखती घेण्यात येत आहेत. प्रदेश काँग्रेसने नियुक्त केलेल्या निरीक्षकांसह शहरातील पदाधिकाऱ्यांच्या निवड समितीकडून या सर्व मुलाखती घेण्यात येत आहे.

शहरातील आठ मतदारसंघांपैकी शिवाजीनगर आणि कसबा या दोन मतदारसंघातील इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. या दोन्ही मतदारसंघातून प्रत्येकी १२ कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केला आहे. कोथरूड आणि पर्वती या दोन मतदारसंघातील इच्छुकांची संख्या सर्वांत कमी आहे. या मतदारसंघांतून केवळ तीनच इच्छुकांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे, इच्छुकांची संख्या कमी असलेल्या मतदारसंघातील मुलाखती केवळ अर्ध्या तासात पूर्ण करण्याचे नियोजन  आहे. तर, शिवाजीनगर, कसबा पेठ आणि पुणे कँटोन्मेंट या मतदारसंघांतील मुलाखतींसाठी एक तास राखीव ठेवण्यात आला आहे.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यावा

0
 
रिपब्लिकन पक्षातर्फे जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम
पुणे : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कराने सन्मानित करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे यांनी पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
येत्या गुरुवारी (दि. १ ऑगस्ट) अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. अण्णाभाऊंच्या जयंतीदिनी व जन्मशताब्दी वर्षात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हनुमंत साठे बोलत होते. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे उपस्थित होते.
हनुमंत साठे म्हणाले, “अण्णाभाऊंनी समाजसुधारणेसाठी केलेले कार्य मोठे आहे. समाजाचा ते मानबिंदू आहेत. आपल्या साहित्यातून, शाहिरीतून त्यांनी अन्यायाला वाचा फोडली. अशा अण्णाभाऊंचा जन्मशताब्दी वर्षात यथोचित सन्मान व्हायला हवा. राज्यात साधारण ८० टक्के मातंग समाजाकडे मालकीच्या जमिनी नाहीत. शासनाने प्रत्येक कुटुंबाला पाच एकर जमीन द्यावी. त्याच्या मशागतीसाठी आवश्यक निधी द्यावा, अण्णाभाऊ साठे महामंडळाकडे कर्जपुरवठा करण्यासाठी ५०० कोटी रुपये कर्जनिधी देण्यात यावा. मातंग समाजातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महामंडळाचे मागील थकीत कर्ज माफ करण्यात यावे. शासनाने या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर वेळप्रसंगी आंदोलनाचा मार्गही अवलंबिला जाईल.”

अशोक कांबळे म्हणाले, “जन्मशताब्दी निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी सरसबागेजवळील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ दुपारी १ वाजता भव्य अभिवादन सभा होणार आहे. हे जन्मशताब्दी वर्ष रिपब्लिकन पक्षाकडून सामाजिक परिवर्तनाचे वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यासाठी पक्षातील २० प्रमुख पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या शाळांमधून अण्णाभाऊंची जन्मशताब्दी साजरी करावी व त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे पत्र पक्षाने महापौरांना दिले आहे. विद्यार्थ्यांना अण्णाभाऊंचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांच्या जीवनावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. शहर पातळीवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रत्येक महिन्याला कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्यामध्ये परिसंवाद, व्याख्याने, पुरस्कार, साहित्याचे प्रदर्शन, मोफत व माफक दरात पुस्तक वाटप आदी कार्यक्रम असणार आहेत.
परशुराम वाडेकर म्हणाले, “शहराच्या विविध शाखांमधून अण्णाभाऊ जयंतीचे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. जन्मशताब्दीचा समारोप लक्ष्मी रस्त्यावरून भव्य शोभायात्रा काढून होणार आहे. राज्य सरकारने अण्णाभाऊ जन्मशताब्दीसाठी शंभर कोटी खर्चास मान्यता दिली आहे. त्याच्या योग्य विनियोगासाठी मुख्यमंत्र्यांशी समन्वय सुरु आहे.’ संजय सोनावणे यांनी आभार मानले.

भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पाडावा – विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

0

पुणे:-भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिन सर्वांनी उत्साहात पार पाडावा, अशी  सूचना डॉ.दिपक म्हैसेकर यांनी दिली.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त कामकाजाचे नियोजनाची  पूर्व आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी  विधान भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली.  त्यावेळी ते बोलत होते.  या बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपायुक्त संजयसिंह चव्हाण,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  उदय जाधव, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, कार्यकारी अभियंता बाळासाहेब हळनोर, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकरी (माध्यमिक) डॉ.गणपत मोरे आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले की, विधानभवनाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या  मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिका, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम ( विद्युत) विभाग, शिक्षण विभाग, उद्याने व उपवने तसेच नियोजनाची जबाबदारी असलेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी नेटकेपणाने पार पाडून कार्यक्रम उत्साहात पार पाडावा. यावेळी विभागीय आयुक्तांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेऊन उपस्थितांना आवश्यक सूचना केल्या

बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभागाच्या अनघा पुराणिक, शाखा अभियंता आर.एम.मुखेकर, उपवने व उद्याने विभागाचे एस.टी.जाधव,भ.ब.गायकवाड,पुणे महानगर पालिकेचे कामगार अधिकारी  नितीन केंजळे आदी  उपस्थित होते.

झाडांना महापुरुषांचे नाव देऊन त्याचे नीट संगोपन करा-रघुनाथ ढोक

0
नातेपुते-चंद्रपुरी पाठशाळेत 1ली ते 7 वी च्या मुलांकडून व माजी विद्यार्थी व महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले साहित्य साधने व प्रकाशनसमिती चे सदस्य रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते शाळेच्या पटांगणात 125 झाडाचे आणि प्रत्येकाला घरी प्रत्येकी एक झाड असे एकूण 250 झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.या वेळी रघुनाथ ढोक म्हणाले की आपण सर्वांनी झाडे लावा झाडे जगवा या संदेशाचे पालन करून प्रत्येक मुलांनी आपापल्या झाडांना महापुरुषांचे नाव देऊन त्याची चांगली जोपासना करून अभ्यास ही करा,आणि नेहमी मनात चांगल्या गोष्टीची जिद्ध,चिकाटी ठेऊन काम करा यश नक्कीच मिळते.पुढे असेही म्हणाले की शिक्षक बांधवानी देखील आपल्या वर्गातील मुलांनी झाडे कशी जगवली, कोणाचे झाड चांगले मोठे झाले याचे दरमहा मूलांसोबत फोटो काडून नोंद ठेवावी आणि याचा वार्षिक अहवाल तयार करून त्यांना विशेष गुण देण्यास देखील हरकत नाही असे म्हणून सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ज्याचे चांगले मोठे झाड झाले त्यास योग्य बक्षिसे देण्याचे ढोक यांनी कबूल केले.ढोक यांनी जुनी आठवण सांगितली की शाळेत असताना मला मिळालेले शिरसाचे झाड मी घरासमोर लावून त्याची योग्य निगा राखल्याने ते झाड खूप मोठे होऊन अनेकांना सावली देण्याचे काम करीत असल्याने , त्या झाडांमुळे माझे सारखे या गावात नाव निघत होते अशी माहिती देऊन आपण ही त्या पद्धतीने नावलौकिक मिळवावे असे सांगितले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किसन शेळके ,सहशिक्षक धांडे, डहाळे, पाटोळे,रुपणवर,शाळा समितीच्या अध्यक्षा साधना चव्हाण, उपाध्यक्ष सुवर्णा ताई वाघमारे,तांबेवाडी चे सरपंच राजू आवळे,हनुमान वाडीचे माजी सरपंच प्रताप धायगुडे,विलास भोईटे ,सदस्य धनाजी शेळके,सतीश वाघमारे आधी ग्रामस्थ व मोट्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापक शेळके यांनी पुढाकार घेऊन पाणी बचतीचा संदेश देत प्रत्येक झाडांना ठिबक सिचन ची सोय करून प्रत्येक पालकांना आपल्या शेळ्यांनमुळे झाडे मरणार नाही याची दक्षता घ्यावी असे घरी जाऊन उपदेश केला . या कार्यक्रमास
तांबेवाडी ग्रामपंचायतने झाडे उपलब्ध करून दिली त्या बद्दल आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक डहाळे यांनी केले

आणीबाणीत तुरुंगात गेलेल्यांसाठी ४५५ कोटी आहेत मात्र आयुष्य झिजवलेल्या पत्रकारांसाठी २ कोटी देखील नाहीत -पेन्शन प्रकरणी २ पत्रकारांनी काढले अवयव विक्रीला -हाय रे सरकार

0

पेन्शन योजनेतून नाकारलेल्या हिंगोलीच्या दोन पत्रकारांनी काढले आपले अवयव विक्रीला

फक्त 23 जणांनांच योजनेचा लाभ दिल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठाच असंतोष

हिंगोली ः आणीबाणीत तुूरूंगात गेलेल्या 1906 जणांना पेन्शन देण्यासाठी सरकारजवळ दरसाल 455 कोटी रूपये आहेत आणि आयुष्यभर समाजासाठी पत्रकारिता करणार्‍या 300 पत्रकारांसाठी सरकारजवळ दोन कोटी रूपये देखील नाहीत हे पटण्यासारखं नाही. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी (पेन्शन )अर्ज केलेल्या ३२६ मधून अवघ्या 23 पत्रकारांची निवड करून सरकारनं राज्यातील पत्रकारांची क्रूर चेष्टा केली आहे असा संताप मराठी पत्रकार परिषदेचे एस एम देशमुख यांनी  व्यक्त केला आहे .

ते म्हाणाले ,’आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेत अख्ख्ंया राज्यातून अवघ्या 23 ज्येष्ठ पत्रकारांनाच सामावून घेतले गेल्याने राज्यातील पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून सरकार पक्षपात करून पत्रकारांमध्ये ‘फोडा आणि झोडाचे’ राजकारण करीत असल्याची भावना आहे.या विरोधात पत्रकार वेगवेगळ्या पध्दतीनं आपला संताप व्यक्त करीत असून हिंगोलीच्या दोन पत्रकारांनी तर आपल्या शरीराचे अवयव विकून सरकारनं त्यातून येणार्‍या पैश्यातून ज्येष्ठ पत्रकारांना सन्मान योजनेत सामावून घ्यावे असे शपथपत्रावर लिहून ते शपथपत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

एस.एम.देशमुख आणि मराठी पत्रकार परिषदेच्या 23 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र शासनाने 2 फेब्रुवारी 2019 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर योजनेस तत्वतः मान्यता दिली.या योजनेसाठी 25 कोटींचा निधी ठेव स्वरूपात ठेऊन येणार्‍या व्याजातून पत्रकारांना दरमहा आर्थिक मदत करण्याचे धोरण सरकारनं नक्की केलं.या योजनेसाठी मग राज्यभरातून ज्येष्ठ पत्रकारांचे अर्ज मागविले गेले.’ज्याचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांनी 30 वर्षे पत्रकारिता केलेली आहे त्यांचा या सन्मान योजनेत समावेश केला जाईल’ असं सांगितलं गेलं.इतरही काही निकष लावले गेले.त्यानुसार राज्यभरातून 326 पत्रकारांनी अर्ज केले.या अर्जाची छाननी केल्यानंतर अवघ्या 23 पत्रकारांचाच या योजनेत समावेश केला गेला.वस्तुतः ही पत्रकार पेन्शन योजना नाही तरीही अनेक पत्रकारांना तुम्ही साठीनंतरही कार्यरत आहात हे कारण देत त्यांना बाद केलं गेलं.शासकीय अधिकारी निवृत्तीनंतरही विविध ठिकाणी नोकर्‍या करतात,पण त्यामुळं त्याचं पेन्शन बंद होत नाही.इथं मात्र हा सन्मान हवा तर पत्रकारांनी घरीच बसलेलं पाहिजे अशी अजब अट घातली गेली.बहुसंख्य पत्रकार या अटीचे बळी ठरले..सरकार असं सांगतंय की,’पहिल्या टप्प्यात 23 पत्रकारांना सन्मान दिला गेला.पुढील टप्प्यात आणखी काही पत्रकारांना आर्थिक मदत मिळेल.पहिल्या टप्प्यात 80च्या पुढील वयोवृध्द पत्रकारांना पेन्शन देण्याचं ठरल्याचंही सांगितलं गेलं’ .मात्र ती देखील फसवणूक आहे.कारण यातील काही पत्रकार 70 वर्षांचे देखील नाहीत तरीही त्यांना 27 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आर्थिक मदतीची पत्रं आणि चेक दिले गेले .त्यामुळं 23 जणांची निवड करताना कोणते निकष लावले गेले ? याबद्दलच मोठा संशय आहे.सरकारी अधिकार्‍यांनी आपल्या मर्जीतल्या पत्रकारांनाच ही मदत दिल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत.मुळात टप्पे पाडण्यालाच राज्यातील पत्रकारांचा विरोध आहे.सर्वांना एकत्रीतच या योजनेत सामावून घेतले पाहिजे असा पत्रकाराचं आणि या योजनेसाठी सातत्यानं लढा देणारे एस.एम.देशमुख आणि मराठी पत्रकार परिषदेचा आग्रह आहे.

यावरही सरकारकडं उत्तर आहे.सरकार म्हणतंय त्यासाठी पैसा नाही.पैसा नसेल तर मग सरकारनं ही योजना जाहीर करण्याची घाई केवळ निवडणुकासमोर ठेऊन केलीय का ? असाही प्रश्‍न पत्रकार विचारत आहेत.निवडणूक प्रचारात ‘आम्ही राज्यातील पत्रकारांना पेन्शन दिले ‘ असे सांगण्यासाठीच तर सन्मान योजनेचा हा फार्स नाही ना ? अशी शंका पत्रकारांमध्ये आहे। मात्र सरकारची आर्थिक अडचण दूर करण्याची नामी शक्कल हिंगोलीच्या दोन पत्रकारांनी काढली आहे.नंदकिशोर लक्ष्मीनारायण तोष्णीवाल आणि नजीर अहमद पिता मो.सिकंदर अशी या पत्रकारांची नावं आहेत.तोष्णीवाल गेली चाळीस वर्षे ‘कळमनुरी समाचार’ हे वृत्तपत्र काढतात तर नजीर अहमद हे ‘पुसेगांव की खबर’ हे नियतकालिक 30 वर्षापासून प्रसिध्द करतात.अनेक अडचणीवर मात करून ग्रामीण भागात पत्रकारिता करून त्या भागाच्या विकासात योगदान देणार्‍या या पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी अर्ज केला.पण त्यांना असं सागितलं गेलं की,’तुम्ही कार्यरत असल्यानं तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही’ .सरकारकडं निधीची कमतरता असल्यानं पुढील टप्प्यत तुमचा विचार केला जाईल असंही तोंडी चॉकलेट या दोन्ही पत्रकारांना दिलं गेलं.मात्र यामुळं हे दोन्ही पत्रकार चिडले आणि त्यांनी 28 जुलै 2019 रोजी शंभर रूपयांच्या बाँडपेपरवर एक शपथपत्र तयार करून ते मुख्यमंत्र्यांकडं रवाना केलं आहे.या शपथपत्रात त्यांनी म्हटलं आहे की,’ आमचे दोन्ही डोळे,खोपडी,,खांदा,यकृत,ह्रदय,लहान आतडे,दोन्ही किडन्या आणि पत्ताशय आणि अन्य अवयवांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 6 कोटी रूपये आहे.आम्ही दोन्ही पत्रकार शपथपत्रावर लिहून देतो की,सरकारनं आमची अवयवं विकवित,त्यातून येणारे 12 कोटी रूपये बाळशास्त्री जांभेकर योजनेत ठेवावेत आणि त्यातून येणार्‍या व्याजातून गरजू,गरीब,आणि आयुष्यभर निष्ठेनं पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांना या योजनेत सामावून घ्यावे.”तोष्णीवाल आणि नजीर अहमद या ज्येष्ठ पत्रकारांच्या या शपथपत्रांमुळं खळबळ उडाली असून राज्यातील पत्रकारांच्या भावना या सन्मान योजनेतील पक्षपाती भूमिकेबद्दल किती संतप्त आहेत हे समोर आले आहे.

मराठी पत्रकार परिषदेची मागणी

‘आलेल्या 326 अर्जातून बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी अवघ्या 23 पत्रकारांची निवड करून सरकारनं राज्यातील पत्रकारांची क्रूर चेष्टा केली आहे.आणीबाणीत तुूरूंगात गेलेल्या 1906 जणांना पेन्शन देण्यासाठी सरकारजवळ दरसाल 455 कोटी रूपये आहेत आणि आयुष्यभर समाजासाठी पत्रकारिता करणार्‍या 300 पत्रकारांसाठी सरकारजवळ दोन कोटी रूपये देखील नाहीत हे पटण्यासारखं नाही.सरकारला पत्रकारांसाठी काही करण्याची खरोखरच इच्छा असेल तर आता तातडीने सर्व पात्र पत्रकारांना सन्मानपूर्वक या योजनेत सामावून घ्यावे आणि त्यांची उत्तर आयुष्यात काळजी घ्यावी,त्यांच्यावर आपले अवयव विकण्याची वेळ येऊ देऊ नये’ अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.सरकारनं याबद्दल तातडीने काही निर्णय घेतला नाही तर राज्यातील पत्रकारांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा  एस एम देशमुख यांनी दिला आहे .

गुन्ह्यांचा शोध गतिमान करणाऱ्या ‘ॲम्बिस’ प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

0

जागतिक प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य

मुंबई, दि. 29 : सुमारे सहा लाख गुन्हेगारांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, डोळ्यांचे बुबुळ इत्यादींचा एकत्रित डेटाबेस ऑनलाईन उपलब्ध करुन देणाऱ्या ‘ॲम्ब‍िस’ प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुभारंभ केला. देशात अशा प्रकारची जागतिक प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

गुन्हेगारांची माहिती तात्काळ देतानाच गुन्हे व अपराध सिद्धीचे प्रमाण वाढविण्यास ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. गुन्हे तपासात गुणात्मक फरक जाणवतानाच गुन्ह्यांचा शोध ते गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी अॅम्बिस प्रणाली महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी पोलीस आयुक्तालयातील जे.एस. भरुचा सभागृहाचे उद्‌घाटन, कचरामुक्त मोहिमेचा शुभारंभ आणि मुंबई पोलिसांच्या रक्षक हैं हम या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, पोलीस गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी, महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र सायबरने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या ॲम्बिस प्रणालीचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या प्रणालीचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञानाचे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्याने कायदा व सुव्यवस्था उत्तमपणे राखण्यासाठी मदत होत आहे. या माध्यमातूनच गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे, हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅनिंग साठविण्यासाठी ॲम्बिस (ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम) प्रणाली गुन्ह्यांच्या तपासाची गती वाढवणारी ठरेल. त्या माध्यमातुन गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

पोलीस दलाने आधुनिकीकरणाची कास धरताना आरोपींचे फिंगर प्रिंट घेण्याची कालबाह्य पद्धत बदलून आता केवळ बोटांचे ठसेच नाही तर हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करुन ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यात येणार असल्याने गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ॲम्बिस प्रणाली पोलिसांचे गुगल म्हणून नावारुपास येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले

राज्यात सीसीटीव्ही, सीसीटीएनएस आणि ॲम्बिस प्रणालीचा वापर सुरु केल्यानंतर गुन्हेगारास तात्काळ अटक होतानाच गुन्हे व अपराध सिद्धीचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत बसविलेल्या सीसीटीव्हीतच शहरातील प्रत्येक भागावर नजर ठेवणे शक्य झाले आहे. त्यामुळे मुंबईत निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती, सणासुदीच्या काळात वाहतुकीत करावयाचे बदल हे या माध्यमातून शक्य झाले आहे असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त मोहिमेतून कचरामुक्त मुंबई अभियान सुरु करण्यात आले आहे. सगळ्यांना एकत्रित करुन लोक, समाज आणि प्रशासन एकत्र आले तर त्यातून निर्माण होणाऱ्या उर्जेतून सकारात्मक कार्य घडते हे स्वच्छ भारत अभियानातून दिसून आले आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कचरामुक्त मुंबईद्वारे लोकांच्या सवयी बदलताना प्रबोधनाबरोबरच शासनही आवश्यक असल्याचे सांगत यामुळे केवळ बाह्य मुंबई नव्हे तर अंतर्गत मुंबईतला भाग स्वच्छ करावा, नाले, गटारी स्वच्छ ठेवून निर्मळ वातावरण राखण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.मुंबई पोलिसांनी सुरु केलेल्या ‘रक्षक हैं हम’ या विशेष अभियानाच्या माध्यमातून लोकांमध्ये विश्वास निर्माण करतानाच पोलीस मित्र वाटले पाहिजे असे वातावरण तयार होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रक्षक हैं हम’ अभियानाच्या माहितीपट आणि जाणीव जागृतीपर पोस्टरचे अनावरण यावेळी करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त श्री. परदेशी, मुंबई पोलीस आयुक्त श्री.बर्वे यांची भाषणे झाली. कचरामुक्त मुंबई मोहिमेच्या माध्यमातून पोलीस आणि महापालिका यंत्रणा एकत्रित आल्याने शहर स्वच्छ होतानाच गुन्हेगारी कमी होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावेल असे यावेळी त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यावेळी म्हणाले, ॲम्बिस प्रणाली देशातील पहिली प्रणाली असून गुन्हेगारांची संपूर्ण माहिती याद्वारे मिळणार आहे. मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून ही प्रणाली राबविण्यात येत आहे. सुमारे 200 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना या प्रणालीचे प्रशिक्षण दिले आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी ॲम्बिस प्रणालीसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक अविनाश सरवीर, रुपाली गायकवाड, सुरेश मगदून, सहायक पोलिस निरिक्षक प्रसाद जोशी, उल्हास भाटले, संदीप जाधव यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कचरामुक्त मुंबईत काम करणाऱे समन्वयक अधिकारी सुभाष दळवी, मुंबई महापालिकेचे सह आयुक्त अशोक खैरे यांचा सत्कारही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

जुन्या व पारंपरिक पद्धतींनी होणाऱ्या कामकाजाची परिभाषा बदलून राज्य पोलिस दलाने आता आधुनिकीकरणाची कास धरली आहे. आरोपींचे फिंगरप्रिंट घेण्याची कालबाह्य पद्धत बदलून आता फक्त फिंगरप्रिंटच नाही तर आरोपीच्या हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करून या सर्वांची डिजिटल पद्धतीने साठवणूक करण्याचा निर्णय राज्य पोलीस दलाने घेतला आहे. यासाठी अद्ययावत अशी ‘अॅम्बिस’ (ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम) प्रणाली विकसित केली गेली आहे. या प्रकल्पाअंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये संगणक आणि हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करण्यासाठीची यंत्रसामग्री दिली जाणार आहे. तसेच दिली गेलेली ही यंत्रणा थेट मुख्य डेटाबेसशी जोडलेली असणार आहे.

  • जगातील सर्वोत्तम अशी‘ॲम्बिस’ प्रणाली वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य
  • डोळ्यांचे, हाताच्या तळव्यांचे स्कॅन यांचा वापर करून गुन्हेगाराचा अचूक शोध घेण्यास मदत
    • 41 युनिटमधील, 1160 पोलीस ठाण्यात उपलब्ध होणार ही सुविधा

    *       2600 पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार प्रणाली वापरण्याचे प्रशिक्षण.

    • एका क्लिकवर मिळणार आरोपींची सर्व माहिती
    •      फिंगर प्रिंट गोळा करण्यासाठी मोबाइल स्कॅनरचा वापर
    • सीसीटीएनएस आणि सीसीटीव्हीशी कनेक्टेड
    • नवीन सिस्टीमनुसार डिजिटल स्वरूपात साठवले जुने साडेसहा लाख बोटांचे ठसे
    • 1435 चान्सप्रिंट्स प्रणाली मध्ये उपलब्ध
    • पहिल्याच दिवशी शोधल्या 85 गुन्ह्यांशी संबंधित 118 चान्सप्रिंट्स

    ‘ॲम्बिस’ प्रणालीची अंमलबजावणी आणि पोलीस दलास हस्तांतरण करण्याची जबाबदारी सायबर विभागाला देण्यात आली आहे. ‘ॲम्बिस’ प्रणाली आयडेमिया या कंपनीला ही प्रणाली विकसित करण्यात गुन्हे अन्वेषण विभागातील तांत्रिक प्रतिनिधी, स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि आयआयटीमधील तज्ज्ञांनी योगदान दिले आहे. प्राईस वॉटर हाऊस कूपर्स या कंपनीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले आहे.

महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

0

मुंबई, दि. २९ : राज्यात २०१४ साली १९० वाघ होते ते वाढून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले असून ही वाढ अंदाजे ६५ टक्के आहे, स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याचे हे यश असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

देशातील वाघांची संख्या २९६७

भारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना करण्यात येते. त्यानुसार देशात पहिली व्याघ्रगणना २००६ साली झाली. तेव्हा देशात १४११ वाघ होते, सन २०१० साली दुसरी गणना झाली तेंव्हा १७०६, सन २०१४ साली तिसरी गणना झाली तेव्हा देशात २२२६ वाघ होते. वाघांच्या या संख्येत वाढ होऊन आता देशात २९६७ वाघ झाले आहेत.

महाराष्ट्रातील व्याघ्रसंवर्धनाला भरीव यश

महाराष्ट्रात २००६ साली १०३ वाघ होते. ते २०१० मध्ये वाढून १६८ झाले. २०१४ साली झालेल्या व्याघ्रगणनेत ही संख्या आणखी वाढून १९० झाली. तर मागील चार वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत अंदाजे ६५ टक्के वाढ होऊन आता ही संख्या ३१२ इतकी झाली आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प

राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या सहा व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील स्थानिकांचे वनावरचे अवलंबित्व कमी व्हावे, मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा या उद्देशाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना राबविली जात आहे. योजनेमध्ये समाविष्ट गावांमध्ये जन, जल, जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढवताना मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येतात. यामध्ये स्थानिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना पर्यायी रोजगार संधी विकसित करून दिल्या जात आहेत.

व्याघ्रसंवर्धनात पहिली पाच राज्ये

देशात मध्यप्रदेश राज्यात वाघांची संख्या ३०८ वरुन ५२६ इतकी झाली आहे. हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर कर्नाटक राज्यातील वाघांची संख्या ४०६ वरुन ५२४ इतकी झाली आहे. हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. व्याघ्रसंवर्धनात तिसरा क्रमांक उत्तराखंड राज्याने पटकावला असून येथील वाघांची संख्या ३४० वरुन ४४२ इतकी झाली आहे. महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून राज्यातील वाघांची संख्या १९० वरुन ३१२ इतकी झाली आहे. पाचव्या स्थानावर तामिळनाडू राज्य असून येथील वाघांची संख्या २२९ वरुन २६४ झाली आहे.